रसिकांनी अनुभवली गुरु शिष्य परंपरेची ‘अनुकृती’
’अ वर्ल्ड इन मोशन नॅशनल ऑलिंपिक्स’ चे पुण्यात आयोजन
पुणे :’एसएई इंडिया (सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स), एआरएआय (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया), इटॉन टेक्नॉलॉजी, कमिन्स इंडिया आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अ वर्ल्ड इन मोशन नॅशनल ऑलिंपिक्स’ पुण्यात २० ते २२ जानेवारी रोजी होणार आहे.
या स्पर्धेचे उदघाटन ऑर्कीड हॉटेल (बाणेर) येथे शनिवार दिनांक २० रोजी सायंकाळी ५ वाजता’फ्युएल ग्रुप’ चे केतन देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती डा.के. सी.व्होरा (अध्यक्ष एस एई इंडिया वेस्टर्न) यांनी दिली.
बालेवाडी येथे देशातील विद्यार्थी वाहनांच्या मॉडेल निर्मिती स्पर्धेत भविष्यातील वैज्ञानिक शोधांचे आविष्कार दाखविणार आहेत !
या ऑलिंपिक्समध्ये देशातून टीम सहभागी होणार आहेत.
दिनांक २१ जानेवारी रोजी स्पर्धा कमिन्स इंडिया ऑफिस कॅम्पस, बालेवाडी येथे सकाळी ९ ते ५ या कालावधीत होईल. स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
सहभागी विद्यार्थी एक टीम म्हणून काम करणार आहे.
स्किमर आणि फुग्यावर चालणारी जेट टॉय कार यासारखी वाहने बनविण्यासाठी शास्त्रीय रचना संकल्पना लागू करणे, फोर्स, गती, घर्षण, जेट प्रणोदन इत्यादीसारख्या भौतिकशास्त्राचे तत्त्वे शोधणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.
डॉ अनिल सहस्त्रबुद्धे (ऑल इंडिया कौंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशन चे अध्यक्ष) यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात येणार आहेत.
देशातील ऑटोमोबाईल अभियंत्यांची गरज वाढत असून, या क्षेत्रात कारकीर्द करण्याबद्दल जागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विज्ञान, गणित, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीतील मूलतत्त्वे छोटी मॉडेल्स तयार करून शिकणे हा अ वर्ल्ड इन मोशन उपक्रमाचा उद्देश आहे.
या स्पर्धांमधून देशाचे भावी इंजिनियर्स घडणार आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्राला दरवर्षी ६ लाख अभियंत्यांची गरज आहे. ती भागविण्यासाठी शालेय विद्यार्थामध्ये आतापासून गोडी निर्माण करण्यासाठी या ऑलिपिक्स स्पर्धा घेतल्या जातात
पुणे ऑलिंपिक्स मध्ये मदर तेरेसा हायस्कूल, खराडी हे विजेते झाले. ते नॅशनल ऑलिंपिक्स मध्ये सहभागी होतील, अशी माहिती डॉ.के.सी.व्होरा यांनी दिली.
अजिंक्य डी वाय पाटीलचा दुसरा दीक्षांत समारोह संपन्न आदर पूनावाला आणि हुकम चांद शर्मा डी. लिटने सन्मानित
पुणे-विद्यार्थ्यांचा जल्लोष, पालकांचे गर्वाने पाणवलेले डोळे आणि टाळ्यांच्या गजरात डी. वाय. पाटीलचा दुसरा दीक्षान्त समारोह पार पडला. माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून आवर्जाने उपस्थित होत्या. तसेच सोहळ्याला डॉ. डी वाय पाटील (बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल), डॉ. विजय पाटील (कुलपती, डी. वाय. पाटील विद्यापीठ) व डॉ. अजिंक्य डी वाय पाटील (अध्यक्ष, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ) ह्यांची उपस्थिती लाभली . आदर पूनावाला(सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी) आणि हुकम चांद शर्मा (कायदेशीर लिमिक) यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते डी. लिटने सन्मानित करण्यात आले. ह्या विलक्षण क्षणाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. ही संध्याकाळ म्हणजे निव्वळ गुणवत्ता आणि यश याचे एक उत्तम प्रतिक होती.
अजिंक्य डी वाय पाटीलच्या दुसऱ्या दीक्षांत सामारोचा मी एक भाग असून हा माझ्यासाठी अत्यंत भाग्याचा आणि आनंदाचा क्षण आहे असे मी समजते अशी भावना माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर विद्यार्थ्यांच्या जीवनात उत्तम बदल घडवून आणण्याचे ध्येय ह्या विद्यापीठाने फार अल्प कालावधीत साध्य केले हे अतिशय कौतुकास्पद आहे असेही त्या म्हणाल्या.
डॉ. अजिंक्य पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले. ह्यावेळी बोलताना त्यांनी आपले विद्यापीठाचे असलेले ध्येय आणि त्यामागचा त्यांचा विचार आणि दृष्टीकोन देखील बोलून दाखविला. हा सोहळा म्हणजे फॅकल्टी आणि विद्यार्थ्यांसाठी एक संस्मरणीय अनुभव आहे असे ते आपल्या भाषणात बोलले. माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या आपल्यासोबत असून ही एक भाग्याची बाब आहे. हे सर्व श्रेय आपले सर्वस्व मानणाऱ्या आणि अथक परिश्रम करणाऱ्या आमच्या फॅकल्टी मेम्बर्सना जाते. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देऊन त्यांना दैनंदिक आव्हानांना, वाढत्या संकटांना सामोरे जाण्यासाठी स्वावलंबी बनविण्याचे ध्येय असून त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी काहीतरी करावे हा आमचा उद्देश आहे. शिक्षणाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांना देशाचा एक उत्तम नागरिक बनविणे ह्यावर आमचा विशेष भर आहे. भविष्यात काही करू पाहणाऱ्या आणि विशेषतः व्यवसायात कल असणार्यांसाठी आमचे विद्यापीठ अतिशय चोख काम करते आहे.अवघ्या २ वर्षातच विद्यापीठाची इतकी वाढ झाली असून आमचे सुमारे ५० उत्तम कोर्सेस आहेत.
डॉ.एकनाथ खेडकर (व्हाईस चॅन्सेलर, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ) ह्यांनीही विद्यापीठाचे यश, योजना आणि नवनवीन कार्यक्रमांवर बोलुन पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कायदा, व्यवस्थापन, मिडिया आणि कम्युनिकेशन, चित्रपट निर्मिती, डिझाईन, ऑटोमोबाइल आणि डिजिटल मॉडेलिंग ह्या विवध क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकं प्रदान करण्यात आली.
सुवर्ण पदक विजेत्यांची यादी -
बीबीए मीडिया अँड कम्युनिकेशन अंकिता सुदा
एमबीए मीडिया अँड कम्युनिकेशन श्रद्धा केळकर
एलएलएमआशिष घनश्याम बर्वे
एम डेस इन ऑटोमोबाइल्स डिझाईन तेजस माणिक
पोस्ट ग्रॅजूएट डिप्लोमा इन डिजिटल मॉडेलिंग अक्षय भोसले
अंडर ग्रॅजूएट डिप्लोमा इन ऑटोमोबाइल्स डिझाईन मोहद जाहिद
लाखात एक माझा फौजी…
लय असत्याल मनमौजी पण लाखात एक तूच माझा फौजी…अजिंक्यसमोर शीतल प्रेमाची अशी थेट कबुली देणार आहे.
टेलिव्हिजनवरची खट्याळ जोडी म्हणजे लागिर झालं जीचे अजिंक्य आणि शीतल यांचं प्रेम आता एका नव्या वळणावर पोहोचत
आहे. दोघांनीही आपण एकमेकांना आवडत असल्याची मूक कबुली दिली आहे. दोघांमध्ये प्रेमळ नोकझोक देखील होत आहे. पण
अजूनही दोघांनी एकमेकांना उघडपणे प्रेमाची कबुली दिली नाही आहे. त्यामुळे आता शीतलने ठरवलं आहे की अजिंक्यला आपल्या
मनातली भावना उघडपणे सांगायची. शीतल पवारने एखादी गोष्ट ठरवली की मग ती झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे शीतलचा
प्रपोज सुद्धा तिच्यासारखाच लाखात एक होणार आहे. चक्क आर्मी ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊन शीतल अजिंक्यला प्रपोज करणार आहे.
येत्या सोमवार ते बुधवारच्या भागात आर्मी ट्रेनिंग सेंटरमध्ये आलेली शीतल आणि अजिंक्यला प्रपोज करण्याची तिची धडपड
आपल्याला पाहायला मिळणार आहे.
शीतल आणि अजिंक्यला एकमेकांच्या मनातली भावना ठाऊक आहे. पण केवळ प्रेम असून उपयोग नसतो तर ते शब्दांत व्यक्तही
करावं लागतं. प्रेमात समोरच्या व्यक्तीकडून कमिटमेंट घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं असं शीतलच्या मैत्रिणींना तिला सांगितलं.
शिवाय प्रपोज नेहमी मुलानेच का करावा? मुलीच्या मनात प्रेम आहे तर तिने ते व्यक्त करायला हरकत काय आहे? असा सल्ला देत
यास्मिनने सुद्धा शीतलसोबत पैज लावली आहे की अजिंक्यच्या आधी शीतलने त्याला प्रपोज करावं.
एनएसएसच्या कॅम्पच्या निमित्ताने आर्मी ट्रेनिंग सेंटरला पोहोचलेली शीतल अजिंक्यला शोधून काढते आणि सगळ्या ट्रेनिंग
सेंटरसमोर अनोख्या पद्धतीने अजिंक्यला प्रपोज करते. पण शीतल पाठोपाठ हर्षवर्धन आणि जयश्री सुद्धा आर्मी ट्रेनिंग सेंटरला
पोहोचतात. शिवाय घरामध्ये नाना शीतलचं नाव वधूवर सूचक मंडळात नोंदवतात. अशा परिस्थितीत शीतल आणि अजिंक्यमधली
ही प्रेमाची कबुली कशी होणार याची एक निराळी उत्सुकता आहे. त्यामुळे अजिंक्य आणि शीतलसोबत प्रेमाचं लागिरं
अनुभवण्यासाठी पुढच्या आठवड्यातले भाग चुकवू नका.
झी युवावर श्रेयस आणि गिरीजा म्हणत आहेत ‘स्माईल प्लिज’
तो वय 30 , स्ट्रगलिंग एक्टर, वेगवेगळ्या ऑडिशन्स देत फिरतोय. बाबा ड्रायव्हर, त्यामुळे आर्थिक परिस्थितीचा स्ट्रगलपण आहे, पण त्याचं एकच ब्रीद वाक्य आहे. ‘सतत हसायचं आणि हसवायचं’- स्माईल प्लीज. एकअसा तरुण जो कोणत्याही परिस्थितीत हसणं सोडत नाही आणि इतरांना हसवायला सुद्धा. आणि हाच कथेचा सार आहे. झी युवावरील गुलमोहर या दोन एपिसोड च्या मालिकेतील पहिली कथेत २२ जानेवारीपासून सोमवार आणि मंगळवार रात्री ९:३० वाजता श्रेयस आणि गिरीजा प्रेक्षकांना म्हणणार आहेत ‘स्माईल प्लिज’.
कोणतही नातं टिकवण्यासाठी, ते खुलवण्यासाठी महत्त्वाचं असतं ते त्या नात्यात असणारं प्रेम. प्रेम ही अशी भावना आहे जी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवलेली असते. मग ते प्रेम प्रियकर प्रेयसीचं असो, आई मुलाचं किंवा नवरा बायकोचं. नातेसंबंध आणि त्यात असणारं प्रेम वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून झी युवा गुलमोहर या मालिकेद्वारे घेऊन येत आहे. या मालिके द्वारे प्रेक्षकांचे अनेक आवडते कलाकार झी युवाच्या प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. स्माईल प्लिज गुलमोहर या मालिकेतील पहिली कथा असून श्रेयस तळपदे आणि गिरीजा ओक गोडबोले यांचे प्रेम आणि प्रेमापेक्षाही अतिशय वेगळ्या दर्जाचं बॉण्डिंग या कथेद्वारे उलगडत जाईल. या कथेत उदय सबनीस आणि उदय टिकेकर सुद्धा महत्वाच्या भूमिकेत आहेत.
एसओटीसीतर्फे पुण्यात हॉलिडे बाझार जाहीर
~ग्राहकांसाठी अनोखी ऑफर आणि उत्साहवर्धक डील्सही~
पुणे-प्रमुख आणि निम शहरांमधील उच्चतम क्षमतांची लेझर मार्केट्स शोधण्यावर लक्ष केंद्रीत केलेल्या, एसओटीसीतर्फे आपल्या ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठीच्या अनोख्या उपक्रमाचा दुसऱ्या भाग जाहीर करण्यात आला, राइट टू इट्स कस्टमर डोअरस्टेप – या उपक्रमाअंतर्गत एसओटीसीने हॉलिडे बाझारची घोषणा केली असून, हा उपक्रम 21 जानेवारीपासून सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत सुरू होत आहे.
एसओटीसीमधील अंतर्गत माहितीनुसार पुण्यातील हॉलिडे बुकिंगचा ट्रेंड निदर्शनास आला, यात सुरेख बगिचे, थरार, समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठेवा व संस्कृती आदींना पसंती देण्यात येत आहे. या अनोख्या उपक्रमामुळे मूल्याधिष्ठित उपक्रमांच्या शोधात असलेल्या भारतीय ग्राहकांना अनोखा असा सहलीचा अनुभव देण्यासाठी, आमच्या पात्र सेल्स पर्सोनेलकडून या ठिकाणी सहाय्य करण्यात येईल.
या ऑफरविषयी एसओटीसी ट्रॅव्हलते भारत आणि एनआरआय मार्केटच्या विक्री विभागाचे प्रमुख डॅनियल डिसुझा म्हणाले की, “हॉलिडे बाझार ही संकल्पना परवडणाऱ्या दरांसह ऑफर देते. ग्राहकांच्या मागणीनुसार सादर करण्यात आलेल्या एसओटीसी हॉलिडे बाझारला गेल्या वर्षी भरघोस प्रतिसाद लाभला होता, यावेळेसही प्रवाशांना त्यांच्या सहलीचा वेगळा अनुभव या उपक्रमातून देता येईल, अशी आशा वाटते, हा अनुभव सुयोग्य दरात मिळणार असल्याने आमच्या ग्राहकांमध्ये तो भरपूर लोकप्रिय झाला आहे. हॉलिडे बाझारमधून ग्राहकांना रोख रकमांच्या सवलती, अपग्रेड्स, अॅड ऑन फ्री हॉलिडे अशा सवलती देण्यात येत आहेत.”
40-50 व त्यापेक्षा जास्त वयोगट असलेल्या आणि ग्रूप टूर आणि कस्टमाइज हॉलिडेंमध्ये स्वारस्य असलेल्या पुण्यातील ग्राहकांची संख्या मोठी आहे. या सर्व सेवा शहरातच हॉलिडे बाझारमधून देण्यास आम्हाला आनंद होत आहे.
स्थळ : द प्राइड हॉटेल, 5, युनिव्हर्सिटी रोड, शिवाजीनगर, पुणे.
रोजगार मेळावा एक प्रभावी माध्यम- उपसंचालक अंगणे
पुणे – उद्योजकांना आवश्यक असणारे मनुष्यबळ आणि बेरोजगारांना त्यांच्या इच्छेप्रमाणे तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध होण्यासाठी रोजगार मेळावा हे एक प्रभावी माध्यम ठरत असल्याचे प्रतिपादन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता उपसंचालक शरद अंगणे यांनी केले.
ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे इन्फॉर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजीमध्ये विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सोसायटीचे सहसचिव सुरेश शिंदे, प्राचार्य पी.बी. माने, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते.
खाजगी क्षेत्रातील रोजगार विषयक असणा-या संधीचे स्वरुप दिवसेंदिवस बदलत असल्याने खाजगी क्षेत्राकडे असणा-या नोक-यांचे प्रमाण जास्त आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांकडेही नोक-यांचे प्रमाण वाढलेले आहे. मार्केटींग क्षेत्रात सुध्दा अनेक संधी उपलब्ध आहेत. विभागीय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उद्योजकांना आवश्यक ते मनुष्यबळ आणि बेरोजगारांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळेल, असा विश्वास अंगणे यांनी व्यक्त केला.
सोसायटीचे सहसचिव सुरेश शिंदे यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले. मेळाव्याचे प्रास्ताविक प्राचार्य पी.बी. माने यांनी केले. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक अनुपमा पवार, कानीटकर तसेच इतर अधिकारी-कर्मचारी प्रयत्नशील होते.
युवकांनी राजकारणाकडे करिअर म्हणून पाहावे -प्रकाश जावडेकर
पुणे : “लोकशाहीमध्ये सर्वाना उत्कर्षाची संधी मिळते. रेल्वे स्टेशनवर चहा विकणारी व्यक्ती पंतप्रधान होते. दलित समाजातून येणारी व्यक्ती राष्टपती होते, तुमच्यातील प्रत्येकजण चांगला राजकारणी बनू शकेल. युवकांनी राजकारणाकडे करिअर म्हणून पाहत आपल्यातील जिद्ध, मेहनत, प्रतिभा आणि चिकाटीच्या जोरावर देशाचे भवितव्य घडविण्यासाठी योगदान द्यावे”, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री ना.प्रकाश जावडेकर यांनी केले.
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे, एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी, पुणे व भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड येथील एमआयटी परिसरात आयोजित आठव्या भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटनप्रसंगी ना.प्रकाश जावडेकर बोलत होते.
याप्रसंगी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.विनोद तावडे, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, आध्यात्मिक गुरू परम पुज्य स्वामी चिदानंद सरस्वती, महात्मा गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार गांधी, ज्येष्ठ संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर, प्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया, उद्योजक राजीव बजाज, उद्योजक नाणिक रूपानी, हरियाणातील खासदार दुष्यन्त चौटाला, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, भारतीय छात्र संसदेचे संस्थापक व प्रमुख निमंत्रक व एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. जय गोरे, प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, एमआयटीचे विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा. दीपक आपटे, सामाजिक कार्यकर्ते हरिभाई शहा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कर्नाटक विधान परिषदेचे सभापती डी. एच. शंकरमूर्ती यांना ’आदर्श सभापती’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र व एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
भारत सरकारचे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, तसेच, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या मदतीने ही छात्र संसद होत आहे. नॅशनल टीचर्स काँग्रेस फाउंडेशन, नॅशनल वूमन्स पार्लमेंट आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) यांच्या सहकार्याने ही संसद भरवण्यात आली असून अनेक राष्ट्रीय संस्थांनीही याला पाठिंबा दिला आहे.
ना.प्रकाश जावडेकर म्हणाले, कोणत्याही प्रकारची घराण्याची परंपरा, पैशाचे पाठबळ किंवा मनगटशाही नसतानाही नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. या उदाहरणापासून प्रेरणा घेऊन युवकांनी राजकारणात यावे. गुणवत्ता आणि मेहनत यांच्या जोरावर तेही उच्चपद प्राप्त करू शकतील. अर्थात राजकारण म्हणजे मखमली गादीवर आराम करण्याची गोष्ट नाही हेही त्यांनी लक्षात ठेवावे. २५-२५, ३०-३० वर्षे अखंडपणे प्रयत्न केल्यानंतरच त्यांना काही फळ मिळू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या विकासासाठी जोमाने प्रयत्न करीत आहे. दहशतवाद, भ्रष्टाचार, जातीयवाद, संप्रदायवाद, अस्वच्छता यापासून भारताला मुक्त करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत. पाच वर्षात ही सर्व उद्दिष्टेे पूर्ण करावयाची असून, त्यामध्ये वाढता लोकसहभाग समाधानकारक आणि प्रेरक आहे. पारदर्शक कारभारासाठी डिजिटल इंडिया, कॅशलेस सारख्या अनेक योजना आणल्या आहेत. लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात लाभ मिळत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसत आहे. आज देशासमोर अनेक आव्हाने आहेत. तशाच संधीही आहेत. त्यामुळे देशाचे भवितव्य घडवू पाहणार्या युवकांनी राजकारणात सक्रिय सहभागी झाले पाहिजे.
मोदींच्या ’सबका साथ, सबका विकास’ याप्रमाणे आम्ही ’सर्वांसाठी शिक्षण, चांगले शिक्षण’ हा मंत्र घेऊन काम करीत आहोत. शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल करीत आहोत. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभार सुधारण्यासाठी महाविद्यालयांप्रमाणे शाळांचेही ’नॅक’सारख्या संस्थांकडून मूल्यांकन केले जाणार आहे. शिक्षणात संशोधन, नाविन्य यावर भर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. रोजगारक्षम, कौशल्यपूर्ण शिक्षण समाजाला मिळाले, तर देशाचा विकास गतीने होईल, असेही प्रकाश जावडेकर यांनी नमूद केले.
ना.विनोद तावडे म्हणाले, युवाशक्तीला राष्ट्रशक्ती बनविण्यासाठी भारतीय छात्र संसद हे अतिशय उपयुक्त व्यासपीठ आहे. राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि त्याकडे चांगले करिअर म्हणून पाहण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेच्या धर्तीवर भारतीय राजकारण सेवा अर्थात इंडियन पोलिटिकल सर्व्हिस (आयपीएस) आणली पाहिजे. युवाशक्तीला कोणत्याही मुद्द्यावर आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याचा वापर करून आपल्यातील प्रतिभा, राजकारणी गुण इ. पारखले पाहिजेत. विद्यार्थ्यांतील गुणवत्ता वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे.
शिवराज पाटील म्हणाले, माणूस घडविण्याचे शिक्षण आजच्या युवापिढीला देणे गरजेचे आहे. विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून येथे शिक्षण दिले जात आहे. त्यातून भारतीय संस्कृतीचा प्रसार होत असून, या नीतिमूल्यांना अंगीकारून युवा पिढी राजकारणात आली, तर देशाचा विकास झपाट्याने होईल. जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संसद, विधानसभेत, विधानपरिषदेत लोकप्रतिनिधी चर्चा करतात. कायदे बनवितात. मात्र, तेथील गोंधळ पाहिल्यानंतर अनेकदा चीड येते. सुसंस्कृत राजकारणी कमी असल्याची जाणीव होते. लोकशाहीच्या या प्रक्रियेत सर्वांगीण ज्ञान असलेले आणि सुसंस्कृत प्रतिनिधी राजकारणात यायला हवेत. त्यासाठी एमआयटी आणि भारतीय छात्र संसद युवकांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडत आहेत. युवकांनी राज्यघटना, संसदेचे कामकाज इ. समजून घेतले पाहिजे.
डॉ. विजय भटकर म्हणाले, आपण प्रत्येकजण सरकारच्या निर्णयावर, राजकारणावर टीका करतो. परंतु, यामध्ये आपण सहभागी होत नाही. आपलो लोकशाही बळकट करायची असेल, तर प्रत्येकाने मी काय योगदान देऊ शकतो, याचा विचार केला पाहिजे. भारताला संस्कृती, परंपरेचा मोठा वारसा आहे. याचा योग्य लाभ घेत शालेय आणि उच्च शिक्षण गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे. त्यातून देशाचा विकास साधला जाईल. राजकारण हा केवळ पुस्तकी शिक्षणातून नव्हे, अनुभवातून शिकण्याचा भाग आहे. त्यामुळे युवकांनी राजकारणात येऊन लोकशाही प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी झाले पाहिजे. ग्रामीण-शहरी भागात प्रगती साधण्याचे हे योग्य माध्यम आहे.
मा.चिदानंद सरस्वती म्हणाले, भारत देश म्हणजे पृथ्वीचा केवळ एखादा तुकडा नाही, तर शांतीचे पीठ आहे. सुपर कॉम्प्युटर आणि सुपर कल्चरचे ठिकाण आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. देशाला दिशा देण्याचे काम संतांनी केले असून, त्या भूमीत लोकशाहीच्या सक्षमीकरणाची चर्चा होते. देशाच्या कानाकोपर्यातून युवक येथे आले आहेत, ही आनंदाची बाब आहे. या युवाशक्तीला मूल्यांचे शिक्षण मिळाले तर येणारी पिढी देशाच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देईल. एकात्मतेच्या भावनेतून प्रत्येकाने एकमेकांचा आदर केला पाहिजे. इंटरनेटपेक्षा इनरनेटचा आवाज ऐकला पाहिजे.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले, गौतम बुद्ध, महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद यांच्या नावाने भारत ओळखला जातो. याच विचारांनी प्रेरित भारत देशाकडे सर्व जग आशेने पाहत आहे. एकविसावे शतक भारताचे असल्याचे स्वामी विवेकानंदांनी सांगितले होते. आज युवाशक्ती करीत असलेल्या कामगिरीकडे पाहिल्यावर विवेकानंदांचे भाकीत सत्यात उतरताना दिसत आहे. अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालून काम केले पाहिजे. भारतीय अस्मिता युवा पिढीत जागविण्यासाठी एमआयटी प्रयत्न करीत आहे.
प्रा. राहुल कराड म्हणाले, राजकारणात चांगल्या लोकांनी यावे, यासाठी प्रोत्साहित करणारे हे भारतीय छात्र संसदेचे व्यासपीठ आहे. ही राजकारणाच्या सुधारणेची चळवळ आहे. ती व्यापक व्हायला हवी. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने या छात्र संसदेला राष्ट्रीय युवक महोत्सवाचा दर्जा द्यावा. वेगवेगळ्या राज्यांच्या राजधानीत अशा छात्र संसदा आयोजित करून लोकशाही प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा.
डी. एच. शंकरमूर्ती यांनी सत्काराला उत्तर दिले. पंडित हरिप्रसाद चौरसिया, राजीव बजाज, नानिक रूपानी. दुष्यन्त चौटाला यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. गौतम बापट, नीलम शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.
महारेरामध्ये १५ हजारांहून अधिक -प्रकल्प नोंदणीकृत; श्रेय क्रेडाईला
क्रेडाई महाराष्ट्राच्या शिखर परिषदेत चॅटर्जी यांचे प्रतिपादन
पुणे ता. १९: क्रेडाई महाराष्ट्र आणि ‘महारेरा’ यांच्या संयुक्त प्रयत्नातून अल्पावधीतच ‘महारेरा’मध्ये १५ हजाराहून अधिक प्रकल्प नोंदणीकृत होऊ शकले. हा कायदा लागू होण्यापुर्वी व नंतर क्रेडाई महाराष्ट्रने विविध माध्यमातून ‘महारेरा’विषयी जागरूकता निर्माण केली, असे सांगत ‘महारेरा’चे अध्यक्ष गौतम चटर्जी यांनी ‘महारेरा’ नोंदणीचे संपूर्ण श्रेय क्रेडाई महाराष्ट्राला दिले.
क्रेडाई महाराष्ट्रच्या ‘नेतृत्व विकास’ या विषयावर आधारित भरविण्यात आलेल्या शिखर परिषदेचे आज नगरविकास विभागाचे संचालक एन. आर. शेंडे यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी दुसऱ्या सत्रात ते बोलत होते. क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष सतीश मगर, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया, क्रेडाई महाराष्ट्राचे संस्थापक व माजी अध्यक्ष रामकुमार राठी यांच्यासह राज्याच्या ५०हून अधिक शहरातून क्रेडाईचे पदाधिकारी व २००हून अधिक सदस्य यावेळी उपस्थित होते.
चॅटर्जी म्हणाले की, काही नोंदणीकृत प्रकल्पाच्या बाबतीत नियमांची पूर्तता होताना दिसत नाही. अशा व्यावसायिकांना महारेरामार्फत ई मेलद्वारे कळविले जात असले तरी क्रेडाईने देखील आपल्या माध्यमातून त्यांना जागरुक करावे, यासाठी संबंधित प्रकल्पाची आवश्यक ती माहिती पुरविण्याचे सहकार्य महारेराकडून केले जाईल.
ते पुढे म्हणाले की, काही अपप्रवृतींमुळे बांधकाम क्षेत्रामध्ये ग्राहक आणि विकसक यांच्यातील परस्पर विश्वास उरला नाही. तो ज्यावेळी निर्माण होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने बांधकाम क्षेत्राचा विकास होईल. या प्रक्रियेत विकसकांप्रमाणेच महारेराचीही भूमिका महत्वाची ठरेल.
यावेळी शेंडे म्हणाले की, संपूर्ण राज्यात प्रमाणबद्ध प्रक्रिया निर्माण करण्याचे काम नगरविकास विभागामार्फत चालू आहे. याबरोबरच संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करून विकासकांना व पर्यायाने त्याचा फायदा नागरिकांना व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नव्याने होणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी पुढील १० ते २० वर्षांचा नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करण्याचे काम आम्ही प्रगतीपथावर करत आहोत. परंतु, या सर्व कार्यात आम्हाला क्रेडाईच्या सक्रीय सहभागाची अपेक्षा आहे. यातून विचारांचे आदानप्रदान होईल, समस्याचे निराकरण होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच महिन्यातून अथवा तीन महिन्यातून एकदा नगरविकास विभागाशी चर्चात्मक बैठकीचे आयोजन करण्याची सूचनाही शेंडे यांनी यावेळी क्रेडाई महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांना केली.
यावेळी कटारिया म्हणाले की, गौतम चॅटर्जी यांच्या दुरदृष्टीकोनामुळेच महारेरा कायदा प्रभावीपणे प्रत्यक्षात येऊ शकला. शेंडे आणि चॅटर्जी यांच्यासारखे कृतिशील अधिकारी असल्याने बांधकाम क्षेत्राशी निगडित अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा आहे. यावेळी सतीश मगर, रामकुमार राठी, राजीव पारीख यांनी मनोगत व्यक्त केले. केवळ ५ शहरांना घेऊन आम्ही सुरू केलेल्या क्रेडाई महाराष्ट्र संघटनेचा आज ५० शहराहून ठिकाणी झालेला विस्तार पाहून अभिमान वाटत असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
केअर इंडिया मेडिकल सोसायटी तर्फे रन फॉर कॅन्सरचे 4 फेब्रुवारी रोजी आयोजन
पुणे– कॅन्सर ग्रस्तांसाठी दीर्घकाळापासून कार्यरत असलेल्या केअर इंडिया मेडिकल सोसायटी(सीआयएमएस) यांच्या तर्फे संस्थेच्या कार्याला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रन फॉर कॅन्सर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेत व्हिडीओ कॅन्फरन्सव्दारे संवाद साधताना संस्थेच्या पेट्रन प्रिया दत्त म्हणाल्या, माझा व माझ्या कुटूंबाला कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचा फार जूना अनूभव आहे. इस्पितळ व घरी जाऊन रूग्नाना सेवा देणारी केअर इंडिया मेडिकल सोसायटी ही संस्था गेली 25 वर्षे अविरत सेवा पुरवीत आहे. भारतात कॅन्सरची समस्या फार गंभीर आहे. सरकारने अधिक गांभीर्याने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. कॅन्सरचे लवकरात लवकर निदान होणे आवश्यक आहे, तसेच कॅन्सर विषयी लोकंमध्ये जागृती वाढवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले. रन फॉर कॅन्सर या स्पर्धेसाठी मी स्वतः उपस्थित राहील असेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना बोर्ड ऑफ ट्रस्टीचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल एम.ए. तुटकने(निवृत्त), संस्थापक विश्वस्त एन.एस.न्यायापथी, ट्रस्टी ब्रिगेडिअर एल.व्ही.सदाशिवन(निवृत्त) यांनी सांगितले कि, येत्या रविवार, दि.4 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.30वाजता बीएमसीसी रोड वरील महावीर जैन मुलींच्या हॉस्टेलपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. हि स्पर्धा 3,5, 10किलोमीटर या गटांत पार पडणार असून स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व गटातील धावपटूंना पदक, नाश्ता आणि टी-शर्ट देण्यात येणार आहे. तसेच, स्पर्धकांना बीएमसीसी रोड वरील महावीर जैन मुलींच्या हॉस्टेलपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून चतुश्रुंगी येथून पुन्हा महावीर जैन मुलींच्या हॉस्टेल येथे या शर्यतीचा समारोप होणार आहे.
केअर इंडिया मेडिकल सोसायटी या संस्थेची फेब्रुवारी 1993 मध्ये नोंदणी करण्यात आली. या संस्थेतर्फे गेल्या 25 वर्षापासून गरजू व गरीब कॅन्सर रुग्णांना विविध प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात. त्यामध्ये कर्करोगाविषयी शिक्षण, कर्करोगाचा लवकरात लवकर शोध, त्यावरील उपचार व असाध्य कर्करोग झालेल्या रुग्णांसाठी अखेरच्या क्षणापर्यंत वैद्यकीय सेवा व उपचार यांचा समावेश आहे.
या संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या विविध सेवांमध्ये सत्सत्ससेवा(कर्करोग निकोपाला गेलेल्या रुग्णांना घरपोच सेवा), विश्रांती(रुग्णालयात दाखल करावे लागलेल्या रुग्णांसाठी वेदनाशामक व अन्य सेवा), मातृसेवा(महिलांसाठी कर्करोग प्रतिबंधक व कर्करोग संशोधक कार्यक्रम), कॅन ट्रीट(कर्करोगावरील वैद्यकीय उपचार व सेवा) या विभागांचा समावेश आहे.
या संस्थेच्या उपक्रमांविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरूकता वाढत असून त्यामुळे नागरी व शहरी विभागातील झोपडपट्टयांमधील तसेच सभोवतालच्या खेड्यांमधील रुग्ण मोठ्या प्रमाणात पुण्यात दाखल होत आहेत.विशेष म्हणजे केअर इंडिया मेडिकल सोसायटी तर्फे या सेवा मोफत दिल्या जातात.तसेच, शासनाकडून कोणतीही मदत न घेता समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांच्या पाठिंब्यावर या संस्थेने आपल्या कार्याचे पाव शतक पूर्ण केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेचे प्रवेशशुल्क 3किलोमीटरसाठी 300रुपये, 5 किलोमीटरसाठी 400 रुपये आणि 10किलोमीटरसाठी 500 रुपये ठेवण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत महेंद्र शहा, सल्लागार उदय गुजर, निखिल शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
पुण्यातील विझीटेक सोल्युशन्सचा चेंतोपे या जपानी कंपनीसोबत करार
ब्लॉकचेन संशोधन व विकास केंद्राची स्थापना.
पुणे-विझीटेक सोल्युशन्स या पुण्यातील आर्थिक-तंत्रज्ञानावर (Fintech) आधारित कंपनीने चेंतोपे या जपान येथील कंपनीसोबत करार करून, पुण्यात ब्लॉकचेन संशोधन व विकास केंद्राची स्थापना केली. या केंद्रात ब्लॉकचेन संदर्भात नाविन्यपूर्ण संशोधन करून तंत्रज्ञानातील विकसकांना प्रशिक्षण देण्यात देईल. चेंतोपे सोबत झालेल्या करारातून या नवीन केंद्राचा फायदा कंपनीच्या पुढील संशोधन आणि उत्पादनाच्या विकासासाठी होणार आहे. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट या क्षेत्रामध्ये ही कंपनी एक अघाडीची कंपनी म्हनून कार्यरत आहे. उदारणार्थ, चेंतोपे ने नुकतेच जपानमध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर एक अप्लिकेशन तयार केले, जे रिअल इस्टेट क्षेत्राला लाभदायक असून, ज्यामध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यवहार जसे की, जमिनीच्या मालकीची हक्काची नोंदणी व जमिनीचे व्यवहार जलद गतीने होतील तसेच फसवणूक संबधित शक्याता कमी होतील. विझीटेक सोल्युशन्स, ही मॅनेज्ड सर्व्हिस डोमेन मधील वेगाने वाढणारी कंपनी असून, उच्चदर्जाच्या ब्लॉकचेन च्या विकासासाठी काम करणाऱ्या विकसकांना हाताशी धरून जपान व अमेरीकेतील कंपन्यांना त्यांच्या संशोधन प्रकल्पांमध्ये मदत करणार आहे. विझीटेक चे संस्थापक व कार्यकारी अधिकारी, श्री आनंदसागर शिराळकर म्हणाले की, “या उपक्रमात चेंतोपे च्या अत्याधुनिक संशोधना सोबत विझीटेकचे मार्केट व्हिजन एकत्र आले आहेत. यामुळे तरुण व इच्छुक विकासकांना या जीवन बदलणाऱ्या तंत्रज्ञानात संशोधन करून, भारतात व विदेशात नव-नवीन संधी उपलब्ध होतील”. विझीटेकच्या टीम ने श्री. हिदोकी शोदा, (संस्थापक, चेंतोपे) याच्याबरोबर ऑक्टोबर २०१७ मध्ये अनेक महाविद्यालयांना भेटी दिल्या, ज्यामध्ये SICSR आणि PICT चा समावेश होता, यामधुन अनेक गुणवान अभियंते मिळाले. “लवकरच जास्तितजास्त उमेदवारांसाठी आम्ही संधी उपलब्ध करून देऊ अशी अशा आहे” असे मत श्री. हिदोकी शोदा यांनी व्यक्त केले. ज्यांचे ध्येय पुण्यातील संशोधन व विकास केंद्र हे भारतातील तरुण ब्लॉकचेन विकासकांसाठी व इच्छुकांसाठी एक डीजीटल प्लेग्राउंड बनवण्याचे आहे. विझीटेकने ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे विविध मीट-अप ग्रुप तयार केले आहेत तसेच १०,००० पेक्षा जास्त विध्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले आहे. विझीटेकने आतरराष्ट्रीय ब्लॉकचेन समुदाय तयार केला आहे ज्यामध्ये तज्ञ, गुंतवणूकदार, उद्योजक व विकासक यांचा समावेश असून, दर्जेदार ब्लॉकचेन प्रकल्पांसाठी अमेरिका, जपान, मध्य पूर्व तसेच भारतात विकासक व भागीदार स्त्रोत तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ब्लॉकचेन ही एक अशी डीस्ट्रीब्यूटेड लेजर प्रणाली असून, ज्यामध्ये कुणाचीही मध्य्दस्ती नसते आणि ही प्रणाली हॅक होणे अवघड आहे. हे तंत्रज्ञान व्हायरल क्रिप्टोकरेन्सी “बिटकॉईन” साठी मुलत; अधार तंत्र म्हणून उदयाला आलेले आहे, त्याच्या संबंधित डोमेनमध्ये संभाव्य दूरगामी परिणामांसह ते इतर अनेक उद्योगांमध्ये विस्तारले आहे. ब्लॉकचेन विषयची जागरूकता भारतात वाढत असून, २७ पेक्षा जास्त बँकांमध्ये बँकचेन तंत्रज्ञान वापरले जात आहे. यामध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विकासाला वाव आणि या नवीन तंत्रज्ञानाच्या भविष्याची अमर्याद क्षमता आहे.
सायकल योजना म्हणजे शिळ्या कढीला ऊत- अरविंद शिंदे
पुणे-पुण्यातील सायकल योजना म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार असून हि योजना पुणेकरांसाठी नाहीतर केवळ ठेकेदाराच्या फायद्यासाठी राबविली जात असल्याचा आरोप आणि त्याबाबतचे विवेचन आज महापालिकेतील बैठकीत कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केले .
पुणे महापालिकेच्या सभागृहात आज सायकल आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
सायकल योजनेचा ठराव बेकायदा – चेतन तुपे आणि श्रीनाथ भिमालेंमध्ये खडाजंगी
पुणे-सायकल योजनेचा ठराव बेकायदेशीरपणे मंजूर करून त्यास विरोध करनाऱ्यांवर दबाव आणण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी आज एका बैठकीत केल्यानंतर सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी त्यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत निव्वळ स्टंट बाजीचे राजकारण करू नका असे सांगत संताप व्यक्त केला .
शहरातील नागरिकांसाठी सुरु केलेल्या सायकल शेअरिंग योजनेला महापालिकेतील विरोधीपक्षाकडून विरोध होत असल्याचा प्रचार करून काही संस्थेच्या माध्यमातून विरोधीपक्षातील नेत्यांना ट्रोल करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केला. पुणे महापालिकेच्या सभागृहात आज सायकल आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
चेतन तुपे यांनी कॉंग्रेस चे नगरसेवक अविनाश बागवे यांच्याप्रमाणे च आक्षेप घेत म्हणाले ,’शहरातील काही समाजसेवी संस्था महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ‘We Support Cycle’ असे कॅम्पेन चालवत असून यामध्ये विरोधी पक्षाचा सायकल योजनेला विरोध असल्याचे सांगत विरोधीपक्षतील नेत्याचे नंबर देऊन मसेज करण्यास सांगितले जात असल्याचा आरोप तुपे यांनी केला आहे. अशा प्रकारचे अनेक मेसेज त्याना प्राप्त झाल्याचे ते म्हणाले.
पुणे महापालिका शहरातील नागरिकांना भाडेतत्त्वावर सायकली उपलब्ध होण्यासाठी पब्लिक सायकल शेअरिंग सिस्टम योजना राबविण्याचे नियोजन करून सविस्तर प्रकल्प अहवालला (डीपीआर) मुख्यसभेची मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या सायकल आराखड्याचे सादरीकरण देण्यात आले नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यामुळे आज सभागृहात सर्व सभासदांसाठी सायकल आराखड्याचे सादरीकरण सादर करण्यात आले. त्यावेळी विरोधकांनी योजनेला आपला पाठिंबा आहे मात्र ज्या प्रकारे योजना राबवण्यात येत आहे त्याला आपला विरोध आल्याचे सांगितले, तसेच या योजनेत अनेक त्रुटी असून त्याच्या दुरुस्तीनंतर या योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली
सायकल योजनेतील ‘साखळी’ भ्रष्टाचाराची अन दडपशाहीची-अविनाश बागवे यांचे घणाघाती भाषण नक्की पूर्ण ऐका
पुणे- पुण्यात ३५० कोटी रुपय्र खर्च करून सायकल मार्ग उभारण्याच्या योजनेमागे असलेल्या’ साखळी’चा पर्दाफाश आज कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला त्यांचे घणाघाती भाषण नक्की पूर्ण ऐका
वाढते सायबर गुन्हे आणि उपाय याविषयावर चर्चा


