पुणे: ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ च्या ‘एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च’ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्तविद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ‘सायबर गुन्हे : भारतातील सर्वात जलद वाढती फसवणुक’ याविषयावरील ही राज्यस्तरीय कार्यशाळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणा विभागातंर्गत नुकतीच आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य अनिता फ्रांत्झ यांनी दिली.
कार्यशाळेचे उद्घाटन इम्रान सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते शबीब अहमद शेख (वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, सीएसआयआर, युनिट फॉर रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑफ इन्फॉरमेशन प्रॉडक्टस्, एन.सी.एल. कॅम्पस), हेमा कुलकर्णी (सीएसआर समुपदेशक), एम.सी.ई. सोसायटीचे सचिव लतिफ मगदूम उपस्थित होते.
सायबर जगातील अलिकडच्या वर्षात झालेली सायबर गुन्हेगारीची वाढ आणि सायबर गुन्हेगारी प्रतिबंध चे उपाय याविषयी इम्रान सय्यद यांनी मार्गदर्शन केले.
हेमा कुलकर्णी यांनी सायबर गुन्ह्यांमागील मानसशास्त्र, सायबर व्यवहार आणि इंटरनेट वापरताना घ्यावयाची काळजी या विषयावर प्रकाश टाकला.
महाविद्यालयाच्या प्राचार्य अनिता फ्रांत्झ यांनी आभार मानले.