Home Blog Page 3205

अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या शेतावर मृद व जलसंधारच्या विविध उपचारासाठी योजना

0

पुणे : जिल्हा वार्षिक योजनेमधून अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत (विशेष घटक योजना) अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या शेतावर मृद व जलसंधारणाचे विविध उपचार राबविण्यासाठी पुणे जिल्हयास दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला असून अनुसूचीत जातीमधील शेतकऱ्यांना उत्पनांचे इतर कायम स्वरुपी साधन नसते, त्यांचे संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठीच्या मर्यादा लक्षात घेता त्यांच्या कृषी उत्पन्नात वाढ वाढ करण्यासाठी पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे राहणीमान सुधारणे व त्यांचे स्थलांतर रोखने यासाठी ही योजना 100 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जातीचे लाभार्थींची संमती घेऊन त्यांची वैयक्तीक क्षेत्रावर मृद व जलसंधारणाचे पुढील प्रमाणे उपचार घेण्यात येतात. सलग समतल चर, कंपार्टमेंट बंडिंग, अनघड दगडी बांध, शेततळे, मजगी, जुने भात शेती दुरुस्ती, इत्यादी व सामुहीक स्वरुपाचे माती नाला बांध, सिमेंट नाला बांध, इत्यादी उपचार घेण्यात येतात.

या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीचा दाखला,7/12 उतारा व 8 अ चा उतारा इत्यादी कागदपत्र देणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत लाभ घेऊ इच्छित असलेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक,कृषी सहाय्यक, तसेच उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा 68 वा वर्धापन दिन समारंभ

0

पुणे दि. 22 : प्रजासत्ताक दिनाचा 68 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त दि.26 जानेवारी 2018 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस संचलन मैदान, शिवाजीनगर, पुणे येथे राष्ट्रध्वजास मानवंदना व पोलीस, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, इत्यादींच्या संयुक्त संचलनाचा शासकीय समारंभ होईल.

पालकमंत्री गिरीश बापट हे या प्रसंगी मानवंदना स्विकारणार आहेत. पुणे शहरातील सर्व विभाग प्रमुख यांनी या कार्यक्रमास दि.26 जानेवारी 2018 रोजी सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे. तसेच आपल्या कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना प्रशासकीय नियंत्रणाखाली पुणे येथील सर्व दुय्यम कार्यालय प्रमुखांना, कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात. अधिकारी, कर्मचारी  यांची उपस्थिती लक्षात येण्यासाठी संबंधित कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयापुरता हजेरीपट ठेवून कार्यक्रमास अनुपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची नावे तात्काळ या कार्यालयास कळवावीत.

जास्तीत जास्त व्यक्तींना या मुख्य कार्यक्रमास भाग घेता यावा त्यासाठी त्या दिवशी सकाळी 8.45 ते 10 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा इतर कोणताही शासकीय किंवा अशासकीय समारंभ करण्यात येवू नये. एखादया कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहरणाचा समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.45 पूर्वी किंवा 10 नंतर करावा.  तसेच या समारंभास उपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय पोशाख परिधान करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी  राजेंद्र  मुठे यांनी पत्रकान्वये  कळविले आहे.

शिवसृष्टीला बजेट मध्ये नव्याने स्थान नाही .

0

पुणे-गेल्या कित्येक वर्षांपासून कोथरूडला होऊ घातलेल्या शिवसृष्टीचा प्रकल्पासाठी यंदा नव्याने कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नसून यामुळे मेट्रो आधी कि शिवसृष्टी आधी हा प्रश्न जणू हवेतच उरणार आहे कि काय ? अशी शंका घेण्याजोगे वातावरण आहे . आज २०१८ -१९ चा अर्थसंकल्प महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केला . त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिवसृष्टीच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, अद्याप शिवसृष्टीला शासनमान्यता आलेली नाही त्यामुळे या बजेट मध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही . मात्र मान्यता आली कि आपण त्यासाठी तरतूद करवून देवू .
हे अंदाज पत्रक गेल्यावार्षापेक्षा २०३ कोटींनी का कमी झाले यावरही आयुक्तांनी मोठे समर्पक आणि अंजन घालणारे उत्तर दिले आहे … त्यासाठी हा व्हिडीओ नक्की पूर्ण पहा ..

यंदा 203 कोटीने बजेट घसरले -पुणे महापालिका २०१८ -१९ चे अंदाजपत्रक सादर

0

पुणे -महापालिका -२०१८ -१९ चे अंदाजपत्रक आज महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी स्थायी समितीला सादर केले आहे . महापौर मुक्ता टिळक,स्थायी सामिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ ,उपमहापौर सिद्धार्थ धेंडे ,शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले,राष्ट्रवादीचे चेतन तुपे पाटील कॉंग्रेसचे अरविंद शिंदे, आणि अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार ,नगरसचिव पारखी आदी नगरसेवक अधिकारी पत्रकार उपस्थित आयुक्त कुणालकुमार यांनी आज ५३९७ कोटीचे बजेट सादर केले . गेल्या वर्षी त्यांनी ५६०० कोटीचे बजेट सादर केले होते . यंदा जमा बाजू मधील ५३९७ कोटी मध्ये त्यांनी जीएसटी द्वारे १८८२ कोटी मिळतील .मिळकत करा पोटी १६९१ कोटी ९१ लाख मिळतील ,विकास शुल्कापोटी ७५० कोटी मिळतील पाणीपट्टी पोटी ३३९ कोटी ९० लाख मिळतील शासकीय अनुदानापोटी २९९ कोटी मिळतील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ४६.९८ कोटी मिळतील असे अपेक्षित धरले आहे

राज्यात रँचो निर्माण करणार -मंत्री विनोद तावडे

0

पुणे-राज्यात रँचो निर्माण  करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री मंत्री विनोद तावडे यांनी केले . नवीन उद्योजकामध्ये  नवीन कौशल्य घडविण्यासाठी टिळक रोडवरील स. प. महाविद्यालयातर्फे मेवेन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .  महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये आयोजित केलेल्या या परिषदेस ,शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष ऍड. सोहनलाल जैन , स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ ,  उपप्राचार्य अशोक मोरवाल , स. प. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या प्रमुख व मेवेनच्या मुख्य संयोजक डॉ. सरोज हिरेमठ आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  सांगितले कि , युवकांनी शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण व तांत्रिक कौशल्य आत्मसात केले पाहिजे . त्यासाठी देशाचे आद्योगिक धोरण देखील बदलत आहे . या परिषदेमधून व्यावसायिक निर्माण करण्याची अभिनव कल्पना कौतुकास्पद आहे . मातृभाषेतून शिक्षण घेतले तर ज्ञानग्रहण जास्त होते , त्यामुळे आता इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमात शिक्षण घेण्याकडे कल  वाढत आहे . जगात मातृभाषेमध्ये शिक्षण चळवळ सुरु झाली आहे . पुढचा पाठ मागचा सपाट हा पॅटर्न बदलला आहे . दहावीमधील नापास विद्यार्थ्यांना एक महिन्याच्या आत पुन्हा परीक्षा देउन आपण त्यांचे शैक्षणिक वर्ष वाचविले आहे . राज्यात  रँचो निर्माण  करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष ऍड. सोहनलाल जैन यांनी राज्याचे उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री मंत्री विनोद तावडे  यांचे स्म्रुतीचिन्ह देउन स्वागत केले . यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष ऍड. सोहनलाल जैन यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले .

 

 

पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्वाचे -फत्तेचंद रांका

0

पुणे-पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्वाचे असल्याचे प्रतिपादन रांका ज्वेलर्सचे व्यस्थापकीय संचालक फत्तेचंद रांका यांनी केले . स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये नवीन उद्योजकामध्ये  नवीन कौशल्य घडविण्यासाठी टिळक रोडवरील स. प. महाविद्यालयातर्फे मेवेन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . यशस्वी उदयोगाची गुरुकिल्ली या विषयावर  रांका ज्वेलर्सचे संचालक फत्तेचंद रांका त्याचे अनुभव कथन केले . फत्तेचंद रांका यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि , विद्यार्थ्यांनी आपले करिअर करत असताना व्यवसाय , नोकरी तसेच पारंपरिक व्यवसाय करतात , तर काही द्विधा मनस्थितीत असतात , यामध्ये विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे कि , या जगात आपण सर्व काही मिळवू शकतो परंतु आपला आत्मविश्वास घालवू नका . त्यासाठी आपले करिअर डिझाईन करा . आयुष्यात ध्येय ठेवून करिअर करा . त्यासाठी नियोजन करा . मी उंच शिखरावर जाणार त्यासाठी मी माझा विचार बदलणार , त्यातून माझे जीवन बदलणार . जे काही करायचे आहे , ते इच्छाशक्ती ठेवून काम करा . त्यातून झपाटून जीव ओतून काम करा . इच्छाशक्ती हि जीवनात इंधनासारखी आहे , ती तुम्हाला आयुष्यभर खादय पुरणारी आहे . व्यवसाय करताना चिकाटीने आणि प्रामाणिकपणे करा . ते करत असताना अनेक संकटे येतील ती संकटे तुमची परीक्षा घेतील परंतु तुम्ही न डगमगता संकटाना सामोरे जा . टीमवर्कने काम करा . , वेळेची शिस्त पाला व्यवसाय करत असताना , त्या शहराची गरज , तेथील लोकांच्या जीवनमानाला अनुकूल व्यवसाय आहे का ?  हे ओळखून  व्यवसाय करा . तसेच परिस्थितीप्रमाणे बदलत राहा , तसा , तुमचा व्यवसायाचा देखील विस्तार होईल . त्यासाठी आपण बदल करण्यास शिकले पाहिजे . लोकांचा संपर्क वाढवा , त्यांच्या मागण्या पहा , लोकांच्या तक्रारिचे विश्लेषण करा . त्यांचा फीडबॅक घ्या ,तर तुम्ही व्यवसायात उत्तमप्रकारे पुढे जाऊ शकाल . त्यातून बिझनेस सिस्टीम डेव्हलपमेंट करा . बिझनेस मी स्वतःच करणार , सगळेच मीच पाहणार या मानसिकेतेमुळे तुम्ही व्यवसायात यशस्वी होऊ शकणार नाही . व्यवसायात योग्य तो नफा कमवा , लोकांची सेवा करून व्यवसाय करा हे तत्व पाळून व्यवसाय करा . आजचे काम आजच करा , लोकांशी चांगले बोला , त्यांचा आदर करा , लोकांना तुमच्याविषयी आदर वाटेल . व्यवसायात ताबडतोब पैसा पाहिजे , ग्राहकाला फसविणार , हलका माल  देऊन जास्त पैसा कमविणार, यातून ताबडतोब श्रीमंत होणे धोक्याचे आहे . कासवाच्यागतीने श्रीमंत व्हा . बिझनेस वाढवा , नफा वाढवा , त्यातून रोटेशन व टर्नओव्हर देखील वाढेल . नक्कीच नफा प्राप्त होईल . तुम्ही डिग्री मिळविली म्हणजे सर्व काही मिळविली असे समजू नका कारण पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्वाचे आहे .

त्यानंतर  जे. आर. डी. प्रिंटपॅक प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका जान्हवी धारिवाल हे ”  कौटूंबिक व्यवसाय जतन व वाटचाल ” या विषयावर मार्गदर्शन करताना  सांगितले कि ,व्यवसाय करताना अनेकांना अनुभवाची शिदोरी घेऊन अनेक संकटे पार केली . माझ्या आई बाबांनी देखील मार्गदर्शन केले , त्यातून माझा आत्मविश्वास वाढला . व्यवसाय करत असताना तो प्रामाणिक व सचोटीने करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले .

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ यांनी पाहुण्यांचे स्मृतिचिन्ह देउन सन्मानित  केले . यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य अशोक मोरवाल , उपप्राचार्य शामराव थोरात , वाणिज्य विभागाच्या प्रमुख व मेवेनच्या मुख्य संयोजक डॉ. सरोज हिरेमठ , मेवेनचे समन्वयक आदेश बिडकर  , सप्रेम स . प. माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव सचिन मेहता व अन्य मान्यवर उपस्थित होते .

त्यानंतर ए. के. स्टुडिओचे संचालक केदार आठवले हे ध्वनी मुद्रण या विषयावर मार्गदर्शन केले . दुपारच्या सत्रात करिअर वाटांचा शोध व कौशल्य विकास या विषयावरील चर्चासत्रामध्ये  आय. एफ. सी. बी. ए.चे अध्यक्ष शंतनू भडकमकर , एस. ए. व्ही. केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक अंकिता श्रॉफ , पर्पल चायचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली शर्मा , रेड एफ एम  पुणे कार्यक्रम अधिकारी सोनिया पाठक चव्हाण , थॉटवर्क्सचे सुनील मुंद्रा आदी मान्यवर सहभागी झाले होते .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत स. प. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या प्रमुख व मेवेनच्या मुख्य संयोजक डॉ. सरोज हिरेमठ यांनी केले तर सूत्रसंचालन रोहित बिजलानी केले तर आभार रुचिता ओसवाल यांनी मानले .

अंधांमधील आत्मविश्‍वास हा समाजाला प्रेरणादायी : रश्मी शुक्ला

0
पुणे : अंधांमधील आत्मविश्‍वास हा समाजाला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी येथे केले.माजी उपमहापौर आबा बागुल व पुणे ब्लाईंड्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंध विद्यार्थीनी, भगिनींसमवेत हळदी-कुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी रश्मी शुक्ला बोलत होत्या.
यावेळी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल,  अमित बागुल, हर्षदा बागुल, पुणे ब्लाईड्स असोसिएशनचे अध्यक्ष परवेज बिलीमोरीया, सेक्रेटरी किशोरभाई  व्होरा, अ‍ॅड. चंद्रशेखर पिंगळे, कश्मीरा ठाकर, डॉ. सायली कुलकर्णी, नितीन बोरा, गोरख मरळ, सुरेश कांबळे, हेराल्ड मेसी, ज्योती अरविंद, महेश ढवळे, दत्तवाडी पोलिस स्टेशनच्या सर्व महिला पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला म्हणाल्या, संकट कधी येईल हे सांगता येत नाही, त्यामुळे संकटाला सामोरे जाताना स्वत:वरील विश्‍वास हाच महत्त्वाचा असतो. आज अंध महिला भगिनी स्वत:ची कामे स्वत: करत आहेत. जरी डोळे नसले तरी त्यांच्यातील आत्मविश्‍वासावर त्या जीवन जगत आहेत. त्यांच्यातील हा आत्मविश्‍वासच संपूर्ण समाजाला दिशादर्शक ठरेल, असा आहे. आज हा कार्यक्रम येथे पार पडत आहे. ज्यांनी या कार्यक्रमासाठी नियोजन केले अशा संस्थांचे जाळे आणखीन व्यापक होणे गरजेचे आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. 
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल म्हणाल्या की, परमेश्‍वराने सर्व ग्रहांमध्ये पृथ्वी अतिशय सुंंदर बनविली आहे. आईच्या रुपात आपण सर्वजण पृथ्वीकडे पाहतो आणि जीवनात ही स्त्री ही सर्वसमावेशक आहे. आपल्या भगिनी किंवा आपण जरी अंध असलो तरी दैवी शक्ती आहे. म्हणजेच ईश्‍वर आपल्या बरोबर आहे. कोणत्याही संकटाला मात करण्यासाठी आपल्यातील आत्मविश्‍वास खूप महत्त्वाचा आहे. असेही त्या म्हणाल्या.
हळदी कुंकुच्या कार्यक्रमामध्ये पोलिस आयुक्तांसमवेत आणि महिला पदाधिकार्‍यांबरोबर अंध भगिनी-विद्यार्थीनींनी संवाद साधला. ऑर्केटस्ट्राचा मनमुराद आनंद लुटताना काही काळ त्या अधंत्वही विसरून गेल्या. आकर्षक भेटवस्तुंचे वाण, स्नेहभोजनाने हा कार्यक्रम संपन्न झाला. चैतन्य हास्य योग क्लबचे पदाधिकारी यावेळी सहभागी झाले होते.

‘ओन्ली एच आर’ संस्थेला ‘आऊटस्टँडिंग एच आर इनिशिएटिव्ह’ अवॉर्ड प्रदान

0
पुणे : पुण्यातील कंपन्या, आस्थापनांच्या मनुष्यबळ विकास व्यवस्थापक, अधिकाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या ‘ओन्ली एच आर’ संस्थेला ‘आऊटस्टँडिंग एच आर इनिशिएटिव्ह’ अवॉर्ड मिळाले आहे. ‘राष्ट्रीय युवा सप्ताहा’निमित्त ‘एमपीटीए  एज्युकेशन’ परिवर्तन कार्यक्रमात हे पारितोषिक देण्यात आले . मनुष्यबळ विकास अधिकारी, व्यवस्थापकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केल्याबद्द्दल हे पारितोषिक मिळाल्याची माहिती ओन्ली एच आर’ संस्थेचे संस्थापक जितेंद्र पेंडसे दिली.
नेहरू हॉल, घोले रोड येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सदानंद देशपांडे (व्यवस्थापकीय संचालक, एमपीटीए एज्युकेशन), श्री. शेखर (संचालक, एमपीटीए एज्युकेशन), श्री. कऱ्हाडकर (संचालक, एमपीटीए एज्युकेशन) यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. ओन्ली एच आर संस्थेचे विश्वस्त जितेंद्र पेंडसे आणि सुधीर पाठक यांनी हे पारितोषिक स्वीकारले.

बँक ऑफ महाराष्ट्र आणि रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स यांचा भागीदारी करार

0

पुणे: रिलायन्स कॅपिटल लिमिटेडची उपकंपनी रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्सने प्रमुख बँकांमधील एक, बँक ऑफ महाराष्ट्र बरोबर बँकॅश्युरंस संदर्भात व्यापक करार केला. या भागीदारीचे लक्ष सर्वाधिक लोकप्रिय वित्तीय सेवा सुपरमार्केटच्या रूपाने बँकेची स्थिती आणि बँकेच्या ग्राहकांच्या आधाराची संवृद्धी आहे. बँकेसाठी या भागीदारीचा उद्देश वितरण शुल्कामध्ये वाढ होणे हा आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रचे संपूर्ण देशामध्ये आणि विशेषत: महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरीय, शहरी आणि ग्रामीण भौगोलिक भागामध्ये शाखांचे व्यापक जाळे आहे. या शाखांद्वारे रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्सला अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल.

या युतीचा प्रारंभ करतेवेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आर पी मराठे म्हणाले “रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्सबरोबर भागीदार होण्यास आम्हास विशेष आनंद होत आहे कारण या भागीदारीमुळे संरक्षण, बचत आणि गुंतवणूक अशा पूरक वित्तीय सेवा आम्ही आमच्या ग्राहकांना सादर करू शकू.  रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स त्यांच्या 700 पेक्षा अधिक शाखांना वितरण कव्हरेजसह आमच्या  ग्रामीण आणि शहरी बाजारपेठेमध्ये विशिष्ट सेवा पुरविण्यासाठी त्याचबरोबर वितरण परिचलीत करण्याच्या स्थितीमध्ये आहे.”

भागीदारी संदर्भात रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्सचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशीष व्होरा म्हणाले “बँक ऑफ महाराष्ट्रनी आम्हास मोठी संधी उपलब्ध करून दिलेली असून आम्ही या संधीचा फायदा करून घेण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम प्रक्रियांची उपाययोजना केलेली आहे. आम्ही देऊ करत असलेले दीर्घकालीन संरक्षण आणि खात्रीच्या परताव्याची उत्पादने बँकेच्या उत्पादनाशी पूरक असतील. ही संधी वित्तीय क्षेत्रामधील बँकेचा ब्रॅंड यासह आम्हास आमची क्षमता वृद्धिंगत करण्याची सुसंधी असून आम्ही ग्राहकांना चांगला परतावा देवू शकू”

 

आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय च्या आंतरराष्ट्रीय परिषदेला चांगला प्रतिसाद

0

पुणे :‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय’ च्या वतीने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. व्यवस्थापनातील धोरणे विषयावरील या परिषदेला अनेक तज्ञ सहभागी झाले होते. व्यवस्थापनातील अस्थिरता, अनिश्‍चितता, जटिलता आणि अस्पष्टता, आव्हाने आणि संधी या विषयी या परिषदेत चर्चा करण्यात आली. ही परिषद 4 सत्रांमध्ये पार पडली.

या परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. पी.ए.इनामदार (अध्यक्ष, एम.सी.ई.सोसायटी) होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शैला बूटवाला यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या परिषदेसाठी भारत, युएई, इराण, येमन, नेपाळ अशा विविध देशांमधून 51 प्राध्यापक उपस्थित होते.

प्रा. डॉ. ध्रृवराज पोखरेल, (त्रिभूवन विद्यापीठ, काठमांडू, नेपाळ, व्यवस्थापन विभाग), प्रा.डॉ. क्रिस्टिना कुट्रा (‘बिझीनेस स्कूल’, न्यू यॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अबु धाबी, युएई), डॉ. एस. आर. माळी, डॉ. एम.डी.लावरेन्स, डॉ. मोहसिन शेख, डॉ. अनील केसकर तज्ञांनी मार्गदर्शन केले.

‘देशाची लोकसंख्या एक असे संसाधन आहे, तिचा योग्यरित्या उपयोग केल्यास ती वरदान ठरते. परिस्थितीने उभारलेल्या आवाहनांना समर्थपणे तोंड देणार्‍या संघटनाच टिकाव धरु शकतात, ’ असे प्रतिपादन डॉ. पी.ए.इनामदार यांनी केले.

प्रा.डॉ. क्रिस्टिना कुट्रा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, ‘व्हि.यू.सी.ए. मुळे (अस्थिरता, अनिश्‍चितता, जटिलता आणि अस्पष्टता) प्रभावित झालेल्या घटकांना सामुदायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) द्वारा मदत देण्यावर भर दिला. तसेच प्रत्येक समस्येमध्येच समाधानाचे बीज असते’.

प्रा. डॉ. ध्रृवराज पोखरेल यांनी ‘नोटबंदी नंतर स्वयंम संतुलित अर्थशास्त्रीय प्रणाली’, डॉ. शैला बुटवाला यांनी ‘अनिश्‍चितता असलेल्या परिस्थितीमधील धोरणात्म बदल व आव्हाने’, डॉ. एस.आर माळी यांनी अस्थिर परिस्थितीमधील व्यूहरचनात्मक नेतृत्व’, डॉ. एम.डी.लॉरेन्स यांनी ‘भविष्यात येणार्‍या संकटाचा वेध कसा घ्यावा’ याविषयी आपले विचार मांडले.

डॉ. मोहसिन शेख यांनी आपल्या भाषणातून ‘व्हिसीयुए ने मंदीच्या काळात संधी व आव्हाने दोन्हीही निर्माण केले. अशा वेळी एकात्म प्रणालीचा उपयोग करण्याची गरज आहे.’ यावर प्रकाश टाकला.

डॉ. अनील केसकर यांनी ‘व्हिसीयुए ला सामोरे जाण्यासाठी लागणार्‍या विविध धोरणांचे विवेचन केले.

‘सबका साथ, सब को निवास’ हे क्रेडाईचे ध्येय: शहा

0

क्रेडाई महाराष्ट्रच्या शिखर परिषदेचा उत्साहात समारोप

पुणे: क्रेडाईच्या यशस्वी वाटचालीत महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे आहे. क्रेडाई हे एक कुटूंब आहे. एकी आणि पारदर्शकता हीच क्रेडाईची खरी ताकद आहे. आगामी काळात सबका साथ, सबका विकास आणि सबको निवास या ध्येयाने आपण कार्य करू, देशाच्या उज्ज्वल भवितव्यास हातभार लावू, असे प्रतिपादन क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष जक्षय शहा यांनी येथे केले.

क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीने हॉटेल ह्यात रिजन्सी येथे दोन दिवसीय परिषद भरविण्यात आली होती. यावेळी दुसऱ्या दिवशीच्या सत्रात ते बोलत होते. क्रेडाई नॅशनलचे माजी अध्यक्ष कुमार गेरा, क्रेडाई नॅशनलचे चेअरमन गीतांबर आनंद , क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष बोमन इराणी, सचिव रोहित राज मोदी, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यशस्वी नेतृत्वाविषयी बोलताना शहा म्हणाले की, बहुआयामी गुण अंगिकारून तुम्ही स्वतःला यशस्वी नेतृत्व घडवू शकता. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवसायाचे नेतृत्व करता तेव्हा तुमच्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींचा इतरांवर प्रभाव पडत असतो. तुम्हाला अनेक जण आदर्श मानत असतात. हे लक्षात घ्यायला हवे. काय करावे व काय करू नये हे सुद्धा कळले तरच तुम्ही स्वतःची वाटचाल यशस्वी नेतृत्वाच्या दिशेने करू शकता, असेही त्यांनी सांगितले.

इराणी म्हणाले, ‘जो माणूस यशाचे श्रेय दुसऱ्याला देतो आणि चुकांची जबाबदारी स्वतः स्वीकारतो तोच यशस्वी नेतृत्व करू शकतो. तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट केलेत, आपल्या नेतृत्वाखाली काम करण्यावर विश्वास दाखवला तर तुम्ही नक्कीच आपल्या कार्यात यशस्वी होऊ शकता.’

तर क्रेडाईची जन्मभूमी व कर्मभूमी महाराष्ट्र आहे. अनेक महत्वपूर्ण निर्णय, योजनांची सुरुवात क्रेडाईने महाराष्ट्रातून केली आहे. ललीतकुमार जैन, सतीश मगर, कुमार गेरा यांच्यासारखे राष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रभावी नेतृत्व महाराष्ट्रानेच क्रेडाईला दिले असल्याच्या भावना रोहित राज मोदी तसेच गीतांबर आनंद यांनी व्यक्त केल्या.

यावेळी क्रेडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष पंकज कोठारी, क्रेडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष अनंत राजेगांवकर यांनी नेतृत्व विकास व नेतृत्व कौशल्य याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीने भरविण्यात आलेल्या या परिषदेस ५० हून अधिक शहरातून २०० पेक्षा जास्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी क्रेडाई महाराष्ट्र मध्ये स्वतंत्रपणे सुरू करण्यात आलेल्या महिला समिती मधील कर्तृत्ववान उद्योजिकांचाही सत्कार करण्यात आला. ही दोन दिवसीय परिषद आमच्यासाठी फलदायी ठरली असल्याच्या भावना क्रेडाई महाराष्ट्राच्या विविध शहरातील प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केल्या.

 

क्रेडाई महाराष्ट्राची यशस्वी घोडदौड: कटारिया

५० हून अधिक शहरात क्रेडाईची स्वतंत्र शाखा असणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. क्रेडाईच्या राष्ट्रीय पातळीवरही महाराष्ट्र राज्यातील अनेकांनी उत्कृष्ट काम केले आहे. महारेराची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यातही महाराष्ट्र राज्य अग्रस्थानी असून क्रेडाई महाराष्ट्रची यशस्वी घोडदौड सांगतांना अभिमान वाटत असल्याचे मत कटारिया यांनी व्यक्त केले.

समाविष्ट गावांतील अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करा- विजय शिवतारेंचे महापालिकेला आदेश

0

पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांना नागरी सुविधा त्वरीत उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, आणि त्याबरोबरच येथे अनधिकृत बांधकामांना थारा न देता तातडीने त्यावर कारवाई करावी  अशी सुचना जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पुणे महापालिका अधिकाऱ्यांना केली.

आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, फुरसूंगी, देवाची उरळी येथील विकासकामांबाबत श्री. शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली व्ही व्ही आय पी सर्कीट हाऊस, पुणे येथे आढावा  बैठक झाली,  त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पुणे महानगरपालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे आणी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. श्री. शिवतारे म्हणाले, नव्याने समाविष्ट झालेल्या या गावांमध्ये अंतर्गत रस्त्यांची कामे, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन आदी कामे गतीने होणे आवश्यक आहे. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने कचरा व्यवस्थापन तसेच सांडपाणी वाहून जाण्यासाठी बंदीस्त गटारे बांधावीत. या भागातील ॲमिनिटी स्पेस मध्ये मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण तयार करणे, जॉगिंग ट्रॅक बनविणे तसेच डायलेसिस केंद्र तयार करणे आवश्यक आहे. या कामांसाठी आमदार निधीतून तरतुद करण्यात येईल.  या कामांची सुरुवात तात्काळ  करुन ही कामे गतीने मार्गी लावावीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आंबेगाव खुर्द व आंबेगाव पठार या भागात असणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई दुर होण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच या भागात झालेल्या बांधकामांची पाहणी करुन अनधिकृत बांधकामांवर  तात्काळ कारवाई करावी, अशा सुचना त्यांनी संबधित विभागांच्या अधिका-यांना केल्या. तसेच अपुर्ण कामे तात्काळ पुर्ण करण्याबरोबरच मंजूर कामे त्वरीत सुरु करावीत, असे सांगून या भागातील समस्या व विकास कामांच्या सद्यस्थितीबाबत पुणे महानगरपालिकेमध्ये लवकरच बैठक घेऊन सविस्तर आढावा घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

‘अ वर्ल्ड इन मोशन नॅशनल ऑलिंपिक्स ‘ चे पुण्यात उद्घाटन*

0
देशातील ३४ शहरातील ३०० शालेय विद्यार्थी सहभागी
पुणे :’अ वर्ल्ड इन मोशन नॅशनल ऑलिंपिक्स ‘ या वाहनांच्या मॉडेल्स निर्मितीच्या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन शनीवारी सायंकाळी केतन देशपांडे ( अध्यक्ष, फ्युएल ग्रुप ) यांच्या हस्ते झाले.
सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया,इटन टेक्नॉलॉजी, कमिन्स इंडिया, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांनी संयुक्तपणे या ऑलिंपिक्सचे आयोजन केले आहे
 उद्घाटन कार्यक्रम कमिन्स इंडिया ( कॅम्पस ) बालेवाडी येथे झाला.केतन देशपांडे,डॉ.के.सी .व्होरा ( अध्यक्ष, सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स, वेस्टर्न सेक्शन ) दीपक जोशी (इटन टेक्नॉलॉजी ), सुबोध मोरे ( महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ), ललीत सूर्यवंशी ( कमिन्स‌ ), अतुल कुंटे, शिखर भटनागर यांच्या हस्ते उद्घाटन झाले
शालेय विद्यार्थांसाठी असलेल्या या स्पर्धत देशातील 3४ शहरातून ३०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
विजेत्याना एप्रिल मध्ये अमेरिकेतील डेट्रॉईट येथे होणाऱ्या जागतिक ऑालींपिक्स मध्ये सहभागी होता येणार आहे. शिवाय २ लाखांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
भारताला दरवर्षी ६ लाख ऑटोमोटिव्ह इंजिनियर्सची आवश्यकता आहे. ही गरज भागवण्यासाठी विद्यार्थाना शालेय वयात वाहन निर्मिती क्षेत्राचा परिचय व्हावा, गोडी लागावी, यासाठी ‘ वर्ल्ड इन मोशन उपक्रम ‘ आयोजित केला जातो
पुण्यातील नॅशनल ऑलिंपिक्सचे पारितोषिक वितरण अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनील सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते कमीन्स इंडिया कॅम्पस ( बालेवाडी ) येथे रविवारी ५ वाजता होणार आहे

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बीएमसीसीची शोभायात्रा

0

पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाच्या ७५ वर्षांच्या सुवर्ण काळाची माहिती देणारी शोभायात्रा माजी विद्यार्थी संघाच्या सहकार्याने काढण्यात आली होती.


ढोल-ताशांच्या गजरात आज सकाळी न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. संस्थेची शिक्षण क्षेत्रातील कामगिरी आणि विविध क्षेत्रात उ‘ेखनिय कामगिरी करणार्‍या माजी विद्यार्थ्यांची माहिती चित्ररथाद्वारे प्रदर्शित करण्यात आली होती.
मराठी भाषेचे संवर्धन, विविधतेतून एकता, संत साहित्य, गणिताचा इतिहास, बेटी बचाओ, डिजिटल इंडिया, जीएसटी, स्टार्ट अप योजना यांची माहिती देणारे ङ्गलक विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केले होते. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पालकमंत्री गिरीश बापट, प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, डॉ. सुरेश वाघमारे, डॉ. आशीष पुराणीक, बाळासाहेब अनास्कर, राजू मराठे, सुधीर गाडगीळ, गौतम बेंगाळे, सुहास धारणे, अरुण निम्हण, युवराज शहा, संजय साबळे, सुरेश केकाणे, किशोर लोहोकरे आदी माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.

बीएमसीसी व आयएमए यांच्यात शैक्षणिक करार

0

पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी) आणि अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑङ्ग मॅनेजमेंट अकाउन्टटस (आयएमएम) यांच्यात नुकताच शैक्षणिक करार करण्यात आला. त्यानुसार आयएमएच्या ङ्गायनान्स या विषयाचा अभ्यासक‘म बीएमसीसीच्या बी. कॉम अभ्यासक‘मात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे बीकॉमची पदवी संपादन करीत असताना विद्यार्थ्यांना ङ्गायनान्स या स्पेशल विषयात आयएमएची सर्टिङ्गाईड मॅनेजमेंट अकाउन्टटस ङ्गायनान्स ही पदवी मिळविता येणार आहे. बीएमसीसीच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण शाळिग‘ाम, प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ आणि आयएमएचे अध्यक्ष जेङ्ग‘ी थॉमसन यांनी स्वाक्षर्‍या केल्या. यावेळी श्री. थॉमसन यांचे भविष्यकाळातील अकाउन्टटसचे व्यवसायातील स्थान या विषयी व्या‘यान झाले. जगात यांत्रिकीकरण झपाट्याने होत असल्याने नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळवणे गरजेचे झाले आहे, त्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करा आणि चिकित्सक विचार करून योग्य निर्णय घ्या असे आवाहन श्री. थॉमसन यांनी यावेळी केले. उपप्राचार्य डॉ. आशीष पुराणीक, डॉ. जगदीश लांजेकर, डॉ. सुरेश वाघमारे, प्रा. यशोधन महाजन यांनी संयोजन केले.