Home Blog Page 3201

नवीन आव्हाने व तंत्रज्ञानानुसार बदल आत्मसात करा -महावितरणचे अध्यक्ष संजीव कुमार

0

अहमदनगर:

सद्यस्थितीत विज वितरण व्यवसायाचे क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. नवनवीन आव्हाने यातून निर्माण होत आहेत. ही आव्हाने व नवीन तंत्रज्ञानानुसार बदल आत्मसात केला तरच महावितरण स्वतःच्या बळावर सक्षमपणे उभे राहू शकेल, असे प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी केले.

अहमदनगर जिल्ह्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठ येथे आयोजित सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनच्या ४५ व्या वार्षिक अधिवेशनप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. जलसंधारण मंत्री श्री. राम शिंदे, आमदार स्नेहलता कोल्हे, महापारेषणचे संचालक गणपत मुंढे, महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. सतीश करपे, श्री. संजय ताकसांडे, मुख्य अभियंता श्री. दीपक कुमठेकर, श्री. सुरेश गणेशकर, असोशिएशनचे अध्यक्ष संजय ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते.महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार म्हणाले, नवीन तंत्रज्ञान, ग्राहकांच्या अपेक्षा, नवीन धोरण, वितरण क्षेत्रातील स्पर्धा आणि वीज निर्मिती क्षेत्रातील मोठे बदल यासारख्या विविध कारणांमुळे वीज वितरण व्यवसायात कमालीचे बदल होत आहेत. हे बदल समजून घेऊन आपल्या कार्यप्रणालीत आवश्यक त्या सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा संघटना प्रबळ असूनही काही सार्वजनिक उपक्रम धोक्यात आल्याची उदाहरणे आहेत. त्यासाठीच एकूणातील ५ टक्के मीटर रिडींगची फेरपाडताळणी, फिडर रिडींग आदींसारख्या उपाययोजना आखल्या असून त्यांना योग्य प्रतिसाद अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, एम्प्लॉयी पोर्टल आणि डॅशबोर्ड या दोन सुविधा कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. एम्प्लॉयी पोर्टलमध्ये वैयक्तिक सेवेशी संबंधित सर्व बाबींसोबतच आवश्यक  परिपत्रकेही माहितीसाठी देण्यात आली आहेत. तर कारवाईशी संबंधीत प्रकरणे निश्श्चित कालमर्यादेत निकाली काढण्याची तरतूद यात आहे. यासोबतच येऊ घातलेल्या कर्मचारी पून:र्रचनेत संचालन, दुरुस्ती, बिलिंग, वसुली अशा विविध कामांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ देण्यात येणार आहे. यातून जबाबदारी निश्चित होऊन कामात सुसूत्रता येईल. प्रत्येकाचा जॉब-चार्ट तयार असेल व कामात सुस्पष्टता येईल. प्रत्येक क्षेत्रात काम केल्याशिवाय संबंधित कर्मचाऱ्याला पदोन्नती मिळणार नसल्याचे श्री. संजीव कुमार यांनी स्पष्ट केले. महावितरण डिजिटल युटिलिटी म्हणून जाहीर करण्यात आले असून लवकरच सर्व महावितरणची सर्व देणी इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसच्या माध्यमातून चुकती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

———

इलेक्ट्रिक चार्जिंगचे ५०० सेंटर

इलेक्ट्रिक चार्जिंगची सुविधा देणारे ५०० सेंटर राज्यात स्थापन करण्यात येणार आहेत. काळाची पावले ओळखून तसेच राज्यातील वीज ग्राहकांचे योगदान लक्षात घेऊन ही सुविधा देण्यात येणार असल्याचे श्री. संजीव कुमार यांनी सांगितले.

बोगस कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार -आयुक्त

0
पुणे- महापालिकेत नौकरीवर नसताना ,नियुक्तीपत्र नसताना ,आय कार्ड नसताना ७८ बोगस कर्मचारी कार्यरत असल्याच्या वृत्ताला खाजगीत दुजोरा देत या बोगस कर्मचाऱ्यांवर आगामी काळात कायदेशीर कारवाई होईलच असे स्पष्ट संकेत महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी मायमराठी शी बोलताना दिले आहेत .
महापालिकेतील काही ‘म्हातारे’ संगणकीय कामकाज न करता अशा प्रकारे बोगस कर्मचारी पाळत असून या सर्वांचा गोपनीय अहवाल तयार करण्यात येतो आहे. त्याचप्रमाणे महापालिकेचे कामकाज ठप्प होऊ नये म्हणून लवकरच वृत्तपत्रात जाहिरात देवून आपण नौकर भरती करू तत्पूर्वी सर्व बोगस कर्मचारी बाहेर काढू असे हि स्पष्ट त्यांनी केले आहे .
 

पुण्यात १५० वाय-फाय हॉटस्पॉट्सचे ‘बिटा व्हर्जन’ सुरू

0

पुणे-

इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी प्रजासत्ताक दिनी शहरातील मोफत वाय-फाय सेवेचे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (PSCDCL) आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने व एल अँड टी, रेलटेल यांच्या सहकार्याने पुण्यातील १५० वाय-फाय हॉटस्पॉट्सचे ‘बिटा व्हर्जन’ सुरू करण्यात आले आहे. शहरातील निवडक उद्याने, रुग्णालये, पोलीस ठाणी, सरकारी कार्यालये आणि संग्रहालये अशा सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय सुविधा पुरवण्यात येत आहे.

मोफत पुणे वाय-फायचा लाभ कसा घ्याल ?

स्मार्टफोन आणि लॅपटॉपवरूनही वाय-फाय सुविधा वापरता येणार आहे. नेटवर्कच्या क्षेत्रात असणाऱ्या लोकांना मोबाईलवर पाठवल्या जाणारा वन टाईम पासवर्ड (ओटीपी) टाकून सोप्या लॉग-इन प्रक्रियेद्वारे वाय-फाय सुरू करता येईल. तसेच, क्यूआर कोड स्कॅन करूनही सर्वांना ही सुविधा वापरता येणार आहे. वाय-फाय हॉटस्पॉट आणि त्याच्या ठिकाणांबद्दल पुणे स्मार्ट सिटीच्या फेसबुक पेजवरील ‘इव्हेंट’मध्ये किंवा www.pmc.gov.in/en/wi-fi या लिंकवर अधिक माहिती मिळेल.

१. तुमच्या वाय-फाय सेटिंगमध्ये पुणे वाय-फायचा पर्याय निवडा

२. स्क्रीनवर तुमचा मोबाईल नंबर टाकून ‘रिसिव्ह SMS’च्या पर्यायावर क्लिक करा

३. SMS द्वारे मिळालेला OTP कोड टाकून ‘कनेक्ट’ या पर्यायावर क्लिक करा

४. तुम्ही इंटरनेटचा आनंद घेण्यास तयार

शहरात याठिकाणी मिळणार मोफत वायफायची सुविधा

1 Faraskhana Police Station
2 HutatmaBabu Genu
3 Late. MukundraoLele
4 Nana Nani Garden
5 ChhatrapatiShivajiMaharaj, Sadashiv Peth
6 Dr.Kotnis Health Centre
7 Khadak Police Station
8 Late. SavitribaiPhule
9 MaharanaPratap
10 Swargate Police Station
11 Ganesh Kala  Kendra
12 AayuktMahilaVaBalvikas
13 Koregaonpark Police Station
14 Late. BabusahebGenujiKawdePatil
15 Limca Jogging Track
16 Mahatma Gandhi Udyan
17 Dattawadi Police Station
18 Late. MatoshriRamabaiAmbedkar
19 Late. VartakUdyan
20 Late.AnandibaiNarharGadgil
21 Late.KalavatibaiMalave
22 Lokmanyanagar Jogging Park
23 Shri. Sachin Tendulkar Jogging Track
24 Vishrambaug Police Station
25 Bundgarden Police Station
26 Darshan Museum
27 Lashkar Police Station
28 Late. MamasahebBadade
29 MSEB Police Station
30 Samarth Police Station
31 Bharatratna Late. Rajiv Gandhi
32 Dr. GaddaSingh Cheema
33 Late. LokshahirAnnabhauSathe
34 Late.DamodarRaojiGalandePatil
35 Late.DamodarraojiGalandePatil
36 Yerawada Police Station
37 Lumbini Park
38 Maharashtra Housing Board No.1
39 Birth Death Regtration Office
40 Tilak Road Ward Office
41 Dr.Naidu Hospital
42 Kamala nehru hospital
43 Late.Dadasaheb Gaikwad
44 Aaiappa
45 Chris Rock Edward Paul
46 Tingare Nagar Lane No. 14.
47 Tirupati Campus, Dhanori
48 Pragati
49 PeshweUrja
50 Late. KakasaebGadgil
51 Late. RamchanraKeshavTaware
52 Late. ShankarraoRanchandraKaware
53 Late. YashwantraoChavan
54 Late.ShivshankarPote
55 Late.VasantraoEknathBagul
56 RajmataJijauprasutijruha (Lions Club Hospital)
57 Sahakar Nagar Police Station
58 Sarasbaugh
59 Bibwewadi Police Station
60 PMC Hospital, Bibwewadi, Ward no.72, Pune
61 ChittaranjanVatika
62 Dr. Homi J. Bhabha
63 Late. Prakash Narayan Bahirat
64 Late.Shakuntala Narayan Nikam
65 MSBTE Pune Regional Office
66 SamarthaRamdas
67 Shri.GajananMaharaj
68 Symbiosis Society
69 Kamla Nehru Park
70 Alankar Police station
71 Joshi Museum
72 Late. SundarabaiGanpatRaut
73 Late. TatyasahebThorat
74 Late.BinduMadhavThakare
75 ChhatrapatiSambhajiRaje
76 Deccan Police Station
77 Late.JangalraoKondibaAmrale
78 Model Colony Lake
79 महाईसेवाकेंद्र
80 Shivaji Nagar Police Station
81 Late. ChanduMamaSonawane
82 Late.BalajiRakhmajiGailkwad
83 Late.RohidasKirad
84 Sant. RohidasUdyan
85 ShrimantBhairavsinghGhorpadePeth
86 BharatRatnaDr.BabasahebAmbedkar
87 G.B.IndumatiManilal Khanna
88 Gul Poonawala
89 KantishalakaArunaAsaf Ali Udyan
90 Late. Vithabai Pujari
91 Marketyard  Police Station
92 Honble. JyotibaPhule
93 HutatmaSmarak
94 Siddharth Hospital
95 Vishrantwadi Police Station
96 Kalas Hospital
97 Late. VijayabaiShirke Health Centre
98 Sinhagad Road Police Station
99 WarjeMalwadi Police Station
100 Late. Bartakke
101 Anna HazareAnand Park
102 Chandan Nagar
103 Chandan Nagar Police Station
104 Late. Major BhaskarraoSakhojiraoShinde
105 Sub Registrar Office
106 Viman Nagar
107 Vimantal Police Station
108 ChhatrapatiShahuMaharaj
109 Late. VitthalraoShivarkarUdyan Jogging Track
110 Bharatratna Dr. Bhimsen Joshi
111 Kothrud Police Station
112 Bharti Vidhyapeeth Police Station
113 KatrajSapraUdayan
114 Kondhawa Police Station
115 Late Rajiv Gandhi Zoological park
116 Sh.Abdul Hamid AyurvedicUdyan
117 Shahid Ashok Kamthe Garden
118 Late. SakharamKundlikKodre
119 Mundhwa Police Station
120 ChhatrapatiShivaji
121 kamalnayan Bajaj
122 Khadki Police Station
123 Late. BaburaoGenbaShewale
124 Late.MadhavraoShinde
125 lc,vcm,vcm,
126 Chaturshringi Police Station
127 Baner Abb01
128 Baner Abb02
129 Bremen Square 1
130 Late. SahdevEknathNimhan
131 Late. Marutrao Gaikwad
132 Panchavati
133 Pashan Lake entrance
134 G.Pr.PradhanUdyan
135 Hadapsar Police Station
136 LohiyaUdyan
137 VitthalraotupeUdyan
138 Wanavadi Police Station
139 Dr. Shama Prasad Mukherjee
140 Late. Raja Mantri
141 Late. Yashwant Vishnu Tharkade
142 Major. ShahidPradipTathawade
143 Shivsenspramukhbalassahebthackrey hospital
144 Todkar hospital
145 Late Annasahebmagar,maternity home
146 Aundhkuti maternity home
147 Rajarshishahumaharaj
148 Dr.Dalvi
149 Pune ST Stand WIFI
150 Swargate ST Stand WIFI

पुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे यास भारतातून एअर फोर्स विंग मध्ये बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक

0
The Prime Minister, Shri Narendra Modi at the NCC Rally, in New Delhi on January 28, 2018.
The DG, NCC, Lt. Gen. B.S. Sahrawat is also seen.
The Prime Minister, Shri Narendra Modi at the NCC Rally, in New Delhi on January 28, 2018.
The Union Minister for Defence, Smt. Nirmala Sitharaman, the Minister of State for Defence, Dr. Subhash Ramrao Bhamre the three Service Chiefs: Air Chief Marshal B.S. Dhanoa, General Bipin Rawat & Admiral Sunil Lanba and the DG, NCC, Lt. Gen. B.S. Sahrawat are also seen.

नवीदिल्ली-प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या निमित्ताने पंतप्रधान रॅली मध्ये पुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे यास भारतातून एअर फोर्स विंग मध्ये बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमास भारताचे  पंतप्रधान  नरेंद्र मोदी  संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन,संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे ,सेनादलाचे तिन्ही प्रमुख जनरल बिपीन रावत, ऍडमिरल सुनील लांभा, चिफ मार्शल बिरेंद्र सिंग  धनोआ आदी   उपस्थित होते.  पंतप्रधान आपल्या भाषणात बोलले कि   विविधतेत एकता  तसेच  एकमेकांपासून शिकण्यासारखे बरेच काही आहे.    आपल्या आजूबाजूतील बदल भारतातील तरुण देशामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतात

व तसेच पंतप्रधानांनी सशस्त्र दलांवर आपल्या राष्ट्राला  अतिशय गर्व आहे, असे सांगितले.
आपण देशाचे सेवारत असलेल्या शूर व्यक्तींबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दरवर्षी 28 जानेवारी रोजी प्रधानमंत्री रॅली करिअप्पा परेड ग्राऊंड दिल्ली छावणी मध्ये होत असते. यावर्षी च्या 2018 च्या प्रधानमंत्री रॅली मध्ये एन.सि. सि. च्या माध्यमातून  पुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे यास भारतातून  एअर फोर्स  विंग मध्ये बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सर्वेश बद्दल आपण माहिती जाणून घेऊया. सर्वेश चे वय १९ वर्ष असून तो  मॉडर्न कॉलेज पुणे येथे बी.एस.सी  द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. प्रजासत्ताक दिन 2018 च्या रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी  सर्वेश ने R.D. कॅम्प मध्ये आपला सहभाग नोंदविला.  नोव्हेंबर  2017 मध्ये पुणे विभागातून सर्वेश ची निवड पुढील कॅम्प साठी औरंगाबाद येथे झाली. अविरत मेहनत घेऊन विशेष नैपुण्य दाखवल्या मुळे सर्वेश प्रधानमंत्री रॅली मध्ये सहभागास पात्र ठरला. महाराष्ट्रातुन  112 कॅडेट यामध्ये सहभागी झाले होते. सर्वप्रथम महाराष्ट्रा मधून सर्वेश ची बेस्ट कॅडेट म्हणून निवड झाली.तदनंतर संपूर्ण भारतातुन दिल्ली मध्ये  17 डिरेक्टरेट चे 2500 पेक्षा जास्त कॅडेट्स  यामध्ये सहभागी झाले होते. या सर्वांन सोबत सर्वेश ची स्पर्धा होती.यामध्ये लेखी परिक्षा, शारीरिक चाचणी, मुलाखत या सर्वांना मध्ये सर्वेश ने एअर फोर्स  विंग मध्ये प्रथम येणाचा बहुमान प्राप्त केला. संपूर्ण भारतातुन एअर फोर्स  विंग मध्ये बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक प्राप्त झाले.

नगरसेविकेने बळकाविला शासकीय भूखंड (व्हिडीओ रिपोर्ट)

0
पुणे- सरकारी भूखंड एका नगरसेविकेने पतीच्या मदतीने बळकाविल्याचा प्रकार गेल्या चार महिन्यापूर्वी घडला ,राजकीय ,शासकीय आणि  सामाजिक पातळीवर याबाबीची सर्वांना माहिती असूनही याबाबत सर्व गप्प -चिडीचूप असल्याचे दिसून येत आहे . विशेष  म्हणजे हा भूखंड सहकारनगर सारख्या शिक्षित आणि सभ्य लोकांच्या वसाहतीत असून आणखी त्याचे मोठ्ठे वैशिष्ट्य म्हणजे हा भूखंड पोलीस चौकीला लागुनच आहे . सुमारे 2 गुंठे आकाराचा हा भूखंड कंपाऊंड टाकून ,शेड मारून ,नंतर थोडे बांधकाम करून बळकाविण्यात  आला . त्यावर ओरड होऊ नये म्हणून येथे जनसुविधा केंद्र चालविण्यात येणार असल्याचे दर्शविले गेले .
 गेल्या २५ सप्टेंबर २०१७ रोजी पुणे महापालिकेतील बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता गंगाप्रसाद दंडीमे यांनी या जागेवर पाहणी केली तेव्हा या जागेवर अतिक्रमण केले कोणी? हे कसे ठरवायचे असा त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला . म्हणून त्यांनी आहे त्या अतिक्रमणावर नोटीस डकविली .परंतु त्यास कोणीही जुमानले नाही . अखेरीस हा प्रकार त्यांनी आपले वरिष्ठ अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिला ,त्यानंतर त्यांनी या प्रकारची माहिती जिल्हाधिकारी यांना हि कळविली .मात्र तरीही अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही . कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक कार्यकर्तेही या भागात आहेत . पण सारेच याबाबत मुग गिळून आहेत .
जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आपल्या अखत्यारीतील या भूखंडाचे रक्षण करायला हवे , आणि विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी या प्रकारची तातडीने दाखल घेवून विनाविलंब कारवाई करायला हवी अशी स्थिती असताना त्यांच्या प्रशासकीय पातळीवर मात्र शांतता दिसते आहे .

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात शैलेश काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

0
पुणे :‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हिराबाग, टिळक रोड येथील पक्ष कार्यालयात सकाळी 10 वा.10 मि.  वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण होत्या.
यावेळी अंकुश काकडे, चेतन तुपे, रवींद्र माळवदकर, व्यंकटराव अवधूत, नगरसेवक रुख्साना इनामदार, शशीकांत तापकीर, अ‍ॅड. संदीप कापरे, योगेश जगताप, विपुल म्हैसूरकर, उदयन महाले, राजू गिरे, सुनील खाटपे, इक्बाल शेख, वासंती काकडे, मनोज पाचपुते, भगवान साळुंखे, अशोक राठी, नीलेश निकम आदी उपस्थित होते.
पक्षाच्या क्रीडा सेल च्या वतीने पर्यावरण संवर्धन सायकल स्वारी करणाऱ्या ८ सायकल स्वारांचा सत्कार करण्यात आला.

अय्यारी की टीम ने वाघा बॉर्डर पर मनाया गणतंत्र दिवस का जश्न!

गणतंत्र दिवस के मौके पर, अय्यारी के निर्माता के साथ फ़िल्म की स्टारकास्ट ने वाघा बॉर्डर पर स्थित बीएसएफ शिविर का दौरा किया।

नीरज पांडे, शीतल भाटिया ने मनोज बाजपेयी, सिद्धार्थ मल्होत्रा, रकुलप्रीत सिंह और पूजा चोपड़ा के साथ इस साल एक अनूठे तरीके से गणतंत्र दिवस का जश्न मनाया।

गणतंत्र दिवस की शुरुवात ध्वज आरोहण के साथ हुई और अय्यारी की टीम को इस शुभ उत्सव का हिस्सा बनने के लिए सम्मानित किया गया।

ध्वज आरोहण समारोह के बाद, पूरी टीम ने बीएसएफ खासा के जवानों और अधिकारियों के साथ ढेर सारी बातचीत भी की।

चूंकि ‘अय्यारी’ सेना की पृष्ठभूमि पर आधारित है, इसलिए यह भारत के गणतंत्र दिवस का जश्न मनाने का एक आदर्श तरीका था।

इससे पहले अय्यारी की टीम ने जैसलमेर में बीएसएफ शिविर का दौरा किया था, जहाँ सभी ने जवानों के साथ एक बहुत अच्छा समय बिताया था।

जब से फ़िल्म का ट्रेलर रिलीज हुआ है, तब से अय्यारी के निर्माताओं को देश भर से सेना के अधिकारियों और जवानों से कई प्रशंसा कॉल और संदेश मिल रहे है।

ट्रेलर में दिखाए गए मनोज बाजपेयी और सिद्धार्थ मल्होत्रा ​​के गुरु संरक्षक रिश्ते को जनता द्वारा खूब पसंद किया जा रहा है।

बेबी, ए वेडनेसडे, स्पेशल 26, एम एस धोनी: एन अनटोल्ड स्टोरी जैसी अविश्वसनीय फ़िल्मो के साथ दर्शको का मनोरंजन करने बाद नीरज पांडे 2018 की पहली जासूसी थ्रिलर “अय्यारी” के साथ वापसी कर रहे है।

यह फ़िल्म सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज बाजपेयी, रकुल प्रीत, पूजा चोपड़ा, नसीरुद्दीन शाह और अनुपम खेर जैसे बेहतरीन कलाकरों से लैस है।

नीरज पांडे की फ़िल्म “अय्यारी” प्लान सी स्टूडियोज और जयंतलाल गड़ा (पेन) द्वारा प्रस्तुत है। शीतल भाटिया, धवल जयंतीलाल गड़ा द्वारा निर्मित मोशन पिक्चर कैपिटल 9 फरवरी 2018 को देशभर में रिलीज होगी।

‘स्किमर’ मेकींगमध्ये ‘श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूल’, ‘जेट टॉय’ मध्ये ‘सौपीन्स स्कूल’ विजयी

0

पुणे :’एसएई इंडिया (सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स) यांच्या वतीने आयोजित दहाव्या ’अ वर्ल्ड इन मोशन ‘ नॅशनल ऑलिंपिक्स’ मध्ये ‘स्किमर’ मेकिंग विभागा मध्ये श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूल (रत्नागिरी) आणि ‘जेट टॉय’ मेकिंग विभागामध्ये सौपीन्स स्कूल (चंदीगड) यांनी विजेतेपद पटकाविले.

‘ऑल इंडिया कौंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’, दिल्ली चे अध्यक्ष डॉ अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले, अशी माहिती डॉ.के.सी.व्होरा (अध्यक्ष एस एई इंडिया वेस्टर्न) यांनी दिली.

यावेळी अतुल कुंटे, ललीतकुमार सूर्यवंशी, नितीन चाळके, सुनील कुलकर्णी, शिखर भटनागर, अनील गुप्ता, सुबोध मोर्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

देशभरातून 30 शहरातील विविध शाळांमधून 80 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धतील विजेते डेट्रॉईट (अमेरिका ) येथील जागतिक पातळीवरील ‘ अ वर्ल्ड इन मोशन’ ऑलिंपिक्स मध्ये सहभागी होणार आहेत.

एआरएआय (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया), ‘इटॉन टेक्नॉलॉजी’, ‘कमिन्स इंडिया’, ‘महिंद्रा अँड महिंद्रा, ‘जॉन डियर’, ‘ट्रीम इंडिया’, ‘अल्टीअर’, ‘मारूती सुजूकी’, ‘फेडरल मोगूल’, ‘आय ए सी’, ‘अँसिस’, ‘व्ही.जी.ए. प्रींटरसँड हॉस्पिटॅलिटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा पुण्यात अलिकडेच कमिन्स इंडिया ऑफिस कॅम्पस, बालेवाडी येथे पार पडली.

’फ्युएल ग्रुप’ चे केतन देशपांडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले होते.

इयत्ता पाचवीसाठी आयोजित स्किमर मेकिंग स्पर्धेमध्ये ‘श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूल’ (रत्नागिरी) विजयी ठरले. ‘जी.पी.एच.एस हॉन्नासांद्र’, बंगळूरू यांनी प्रथम उपविजेतेपद तर ’व्हॅलेन्टाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूल’, सोलापूर यांनी द्वितीय उपविजेतेपद मिळविले.

इयत्ता सहावीसाठी आयोजित जेट टॉय स्पर्धेमध्ये सौपीन्स स्कूल (चंदीगड) यांनी विजेतेपद पटकाविले. आश्रय नीलबाघ स्कूल, बंगळूरू यांनी प्रथम उपविजेतेपद तर प्रगति माध्यमिक विद्यालय, नाशिक यांना द्वितीय उपविजेतेपद मिळाले.

आझम कॅम्पसमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

0
पुणे:प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलीटन एज्युकेशन सोसायटी’च्या आझम कॅम्पसमध्ये अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. टी.एस. भाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम.सी.ई सोसायटी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार होते.
संस्थेच्या २५ हजार विद्यार्थ्यांनी ध्वजवंदन करून मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. हा कार्यक्रम व्ही. एम. गेनी स्पोर्ट्स ग्राऊंड, आझम कॅम्पस येथे झाला.
संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतिफ मगदुम, सहसचिव इरफान शेख, ‘स्कूल ऑफ आर्ट अ‍ॅण्ड आर्ट अ‍ॅकॅडमी’च्या संचालक हेमा जैन, प्राध्यापक – शिक्षक वर्ग उपस्थित होता.
आर्ट वॉक अ‍ॅण्ड ग्राफिटी वॉल 2017-18’ प्रदर्शनाचे उदघाटन :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या स्कूल ऑफ आर्ट अ‍ॅण्ड आर्ट अ‍ॅकॅडमी च्या वतीने वार्षिक ‘आर्ट वॉक अ‍ॅण्ड ग्राफिटी वॉल 2017-18’ प्रदर्शनाचे उदघाटन अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. टी.एस. भाल यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.
यंदाचे प्रदर्शनाचे 10 वे वर्ष होते. हे प्रदर्शन दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आले होते. प्रसिद्ध शिल्पकार महेंद्र थोपटे आणि विपुल खटावकर यांच्या शिल्पकलेचे (मातीकाम) प्रात्यक्षिक हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले.

सलग तिसऱ्या वर्षी शिबिराचे आयोजन : ११७ रक्त दात्यांनी नोंदवला सहभाग

0

पंढरपूर-
येथील गणेश देसाई मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरामध्ये ११७ रक्त दात्यांनी सहभाग नोंदवला असून यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने घेण्यात येणाऱ्या या शिबिरास कायमच आम्ही पाठिम्बा देऊ अशी ग्वाही यावेळी रक्तदात्यांनी  दिली.
सलग तिसऱ्या वर्षी घेण्यात आलेल्या या शिबिरास कायमच रक्तदात्यांचे अनमोल सहकार्य असून यामुळे अनेक रुग्णांना याचा फायदा होणार असल्याने अशीच अनेक शिबिरे घेऊन समाजपयोगी कार्य  करत राहणार असल्याचे यावेळी गणेश देसाई यांनी सांगितले.
हे  रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी गणेश देसाई, ओंकार देसाई, राहुल क्षीरसागर, राहुल वरखेडकर, संकेत लाड, युवराज सलगर, ऋषिकेस घळसासी, सुमित खटावकर, स्वप्नील खटावकर, पिंटू बुद्धीनेर, माउली बुद्धीनेर आदींसह गणेश देसाई मित्र परिवाराने सहकार्य केले.

श्रीविद्या ची पन्नाशी

0

जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार या खेड्यात जन्मलेल्या अल्प शिक्षण,पण पडेल ते कामाची
मानसिकता आणि आकाशाला गवसणी घालण्याच्या जिद्द असलेल्या म्रुदुस्वभावाच्या माणसाने
उभारलेल्या साम्राज्याला ५० व्या वर्धापनदिनी सलामी देण्याचा प्रयत्न. २६ जानेवारी १९६८
मध्ये कै.दामोदर दिनकर उर्फ मधुकाका कुलकर्णी यांनी श्रीविद्या प्रकाशन संस्थेची स्थापना
केली. श्रीविद्या प्रकाशन या शब्दाबरोबर डोळ्यापुढे येतात ते गोल चेह-याचे हसमुख मधुकाका
कुलकर्णी किंवा मधुकाका म्हटल तर डोळ्यापुढे येतो तो मराठी साहित्यातील एक से एक
बढकर अनेक नामवंत लेखकांचा अजरामर साहित्याचा डोंगर. पु.ल.देशपांडे,डॉ य.दि.फडके,
डॉ. जयंतराव नारळीकर, एन.व्ही.फडके, माधवराव गडकरी, वी.स.वाळिंबे, आदरणीय
रा.चिं.ढेरे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मालती पांडे, प्र.ना.बेहरे,अरुण टिकेकर,
इसाकमुजावर, डॉ पदमाकर दुभाषी,माधवराव गोडबोले, डॉ हे.वि. सरदेसाई ,भालचंद्र फडके,
रामदास फुटाणे अशा अनेक नांवांची जंत्री लिहित बसलो तर एक ग्रंथच तयार होईल.
श्रीविद्याच्या ह्या हरहुन्नरी माणसाने मराठी साहित्यात एक आदरयुक्त दरारा निर्माण केला
होता असच मी म्हणेन. श्रीविड्या प्रकाशनाच बँक अकौंट पुण्याच्या जनता सहकारी बँक मध्ये
होते, त्यामुळे त्यांचेशी बोलण्याचा, श्रीविद्याला भेट देण्याचे भाग्य मला लाभले. माधुकाकांनी
किती विविध स्वभावाची माणसे स्नेहाने गुंफली होती. परदेशात जाऊन पुस्तकाचे प्रकाशन
करण्याचे श्रेय श्रीविद्याला जाते. कुंपणापलीकडले शेत, गोठलेल्या वाटा, हिमगंध हि पुस्तके
अमेरिकेत तर ध्वजदंड हि कादंबरी मास्कोत,तमसातटाकीचे लंडन येथे झालेले प्रकाशन हे
प्रकाशन विश्वात चर्चेचा विषय ठरला. त्यांचा पुस्तक प्रकाशन सोहळा म्हणजे एखाद्या
चित्रपटाचा प्रीमिअयर शो चाच समारंभ वाटावा असा देखणा. प्रीमियर शोला सेलिब्रिटी
कलाकारांना पहायला त्यांचे चाहते गर्दी करतात तसेच चित्र श्रीविद्याच्या प्रकाशन समारंभास
मराठी साहित्यातील नामवंत लेखकांना पहाण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी गर्दी होत
असे. श्रीविद्याच्या प्रकाशन समारंभाला पुस्तकाच्या विषयास अनुसरून प्रमुख पाहुणे,वक्ते
मधुकाका आवर्जून बोलवत हे त्याकाळातील एक वैशिष्ठ्यच होते. रा.चि.ढेरे यांच्या “ लज्जा
गौरी “ या ग्रंथाचे प्रकाशनासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे हस्ते करत असताना त्यांचे
बरोबर य.दि फडके, माधवराव गडकरी यांच्या भाषणाबरोबरच आण्णा ढेरे यांचे अभ्यासपूर्ण
विचार ऐकताना श्रोते तल्लीन झालेले पहिले आहे. ज्येष्ठ कलाकार शांताबाई हुबळीकर यांच्या “
कशाला उद्याची बात “ या पुस्तकाचे प्रकाशनाचे वेळी उषा किरण व शाहू मोडक यांना
पहाण्यास जमलेली गर्दी आठवते. य.दि.फडके लिखित “ केशवराव जेधे ‘ चरित्र ग्रंथाचे

प्रकाशनाचे वेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व नानासाहेब गोरे यांचे भाषणातील चुटकुले
ऐकण्याची मजा काही औरच होती. उषाकिरण लिखित “उष:काल “ या आत्मचरित्र प्रकाशनाचे
वेळी शबाना आझमीनी केलेलं कौतुक. मधुकाकांनी स्मिता पाटील, अशोककुमार,लीला
चिटणीस, श्रीमंत पद्मीनीताईराजे पटवर्धन असे सेलिब्रिटीज , आणि शरद पवार,सुशीलकुमार
शिंदे,बाबा आढाव, निलमताई गोऱ्हे, विद्याबाळ, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा
पाटकर, प्रा.शिवाजीराव भोसले,जयंत नारळीकर अशा दिग्गजांना श्रीविद्याच्या मांडवात जमा
करण्याची मधुकाकांची हातोटी होती.इतका स्नेह त्यांनी निर्माण केला होता.समाजवादी
विचारातून त्यांनी लहानपणापासून क्रांतिकारी चळवळीत भाग घेतल्याने माधुकाकांनी जेलची
हवाही खाल्ली होती. त्यांचे नाव स्वातंत्र्यसैनिक म्हणून नोंदले गेलेले आहे हे फारच कमी
लोकांना माहित असेल.श्रीविद्याला आखिल भारतीय स्तरावर उत्तम साहित्य निर्मितीचे
पारीतोषीक सलग दोन वेळा मिळाले. १९८१ साली केंद्रीय सांस्कृतिक मंत्री ना. वसंतराव साठे
यांच्या हस्ते तर १९८२ साली राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते देण्यात आलेले आहे.
महाराष्ट्राचे भाई पूज्यनीय पु.ल.देशपांडे व सुनीताताई यांनी आपल्या पुस्तकांचे हक्क श्रीविद्या
प्रकाशन संस्थेला देवून पुस्तकाचे “ प्रकाशकांचे हक्क “ हा लेखक व प्रकाशन संस्था यांचेतील
नवा पायंडा प्रकाशन विश्वात पहिल्यांदा निर्माण केला हा श्रीविद्यावरील केवढा विश्वास.
आदरणीय भाईंच्याप्रमाणेच डॉ.य.दि.फडके, डॉ.हे.वी.सरदेसाई. डॉ.जयंतराव नारळीकर,
माधवराव गडकरी आशा ज्येष्ठतम साहित्यकांनी आपला अनमोल ठेवा श्रीविद्या अर्थातच
मधुकाकांच्या हवाली,तोही विश्वासाने सुपूर्द केला ही मधुकाकांची क्षमता होती. मधुकाकाचे
नंतर त्यांचे पुत्र उपेंद्रने त्याच तडफेने सुरवात केली पण श्रीविद्याला त्यांचा सहवास कमी
मिळाला.आता माधुकाकांची नातसून व उपेन्द्र्ची सून सौ.श्रीती ही परत तीच झळाळी
आज्जेसास-याच्याच जिद्दीने श्रीविद्याला आणण्याचा प्रयत्न करतेय हेही कौतुकाचेच.
श्रीविद्याच्या ५० व्या वर्धापनाच्या निमित्ताने सर्व रसिक वाचकांतर्फे मनापासून शुभेच्छा.
दरवर्षी अनेक अनेक उत्तम साहित्याचा नजराणा मराठी रसिकांना सादर होऊ देत हीच अपेक्षा
ठेवतो.
सुहास जोशी (९८९००१५२३४).

इंदिरा भिलारे, विराज तावरे, सचिन बेनकर, महेश घाग, पुजा भाले यांचा खा. वंदना चव्हाण यांच्या हस्ते सत्कार

0
पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त ​’वन स्टेप फाऊंडेशन​’ च्या वतीने आणि  ‘एसजीएम मॉल​’​ च्या सहकार्याने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणां​चा सत्कार करण्यात आला. सत्कारार्थीना ​’​पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’ च्या शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत इंदिरा भिलारे (संस्थापक अध्यक्ष बहुउद्देशीय धर्मादाय संस्था), विराज तावरे, सचिन बेनकर, महेश घाग, पुजा भाले या पाच जणांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ‘सिप्पा डान्स अकादमी’ च्या वतीने नृत्य कार्यक्रमाचे देखील आयोजन केले होते. यामध्ये ४ संघातून २०० जणांनी सादरीकरण केले. हा कार्यक्रम ​शुक्रवारी ‘​एसजीएम मॉल’, मोलेदिना रोड कॅम्प येथे सायंकाळी झाला.
समाजात सुधारणा घडवून आणणे आणि समाजाच्या चांगल्या भविष्यासाठी उपक्रम राबवले ​जावे या हेतूने ​​’​वन स्टेप फाऊंडेशन​’ ​संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने प्रथमच आयोजित या सत्कार कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ययाती चरवड , साहिल शाह, विकास वाघे, विक्रम जाधव, विशाल मोरे यांचा सहभाग होता.
पर्यावरण संरक्षण ​संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात तरुणाईला पर्यावरणविषयक जनजागृती करणे आणि प्रोत्साहन देणे या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

यशस्वी अकॅडमीने ‘यशस्वी’ विद्यार्थी घडवले —अरविंद जगताप

0
‘यशोगाथा’ या स्मरणिकेचे प्रकाशन संपन्न
पुणे  :  युवकांची  चौकटीबाहेर जाण्याची मानसिकता तयार करून जीवनात वेवेगळ्या वाटेने जाण्याची दिशा देण्याचे काम यशस्वी अकँडमी  फॉर स्किल संस्था गेली अनेक वर्षे  यशस्वीपणाने करीत आहे . हे नक्कीच उल्लेखनीय आहे असे संवाद लेखक अरविंद जगताप यांनी सांगितले.
संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘यशोत्सव’ स्नेहसंमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणूंन ते बोलत होते. यावेळी ‘यशोगाथा’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले . व्यासपीठावर संचालक राजेश नागरे, मल्हार करवंदे , तसेच अजय रांजणे ,मकरंद  कुलकर्णी उपस्थित होते.
 यावेळी  बोलताना  अरविंद जगताप  पुढे  म्हणाले की, युवक घडण्यासाठी यशस्वी सारखी  संस्था असली पाहिजे,असे नमूद करून ते म्हणाले या संस्थेतील विद्यार्थी संख्या अधिक प्रमाणात वाढणे  अपेक्षित आहे . आपले प्रश्न आपणच सोडवणे गरजेचे असून  त्यासाठी अन्य  जणांवर अवलंबून राहण्याची मानसिकता युवकांनी मनात ठेवायला नको तरच ते यशस्वी होतील . सध्याच्या काळात स्किल डेव्हलपमेंट  ग्रामीण  भागातील युवकांमध्ये जनजागृती  होण्याची  गरज आहे  आणि याविषयावर अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे . पण तसे प्रत्यक्षात मात्र होत नाही असे ते म्हणाले.
याप्रसंगी विविध कंपन्यांतून  ऑन  द जॉब  ट्रेनिंग मध्ये  उल्लेखनीय  कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना  अरविंद  जगताप  यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात  आले.तसेच ‘यशस्वी’ संस्थेतील काही  कर्मचाऱ्यांचाही उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष  सत्कार करण्यात आला.
संचालक राजेश नागरे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या वाटचालीची माहिती सांगितली . हिना वानखेडे या विद्यार्थिनीने  मनोगत व्यक्त केले. संचालक मकरंद करवंदे यांनी आभार मानले  योगेश रांगणेकर यांनी सूत्रसंचालन केले. मुख्य कार्यक्रमापूर्वी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.” शिकता शिकता कमवू या “या समूह गीताने कार्यक्रमाची  सुरवात झाली .  यावेळी  विद्यार्थ्यानी नृत्य, गायन, एकपात्री अभिनय व काव्य वाचन असे  विविध कलाप्रकार सादर केले.  या कार्यक्रमासाठी सुनीता  पाटील, वैशाली  भुसारे, तेजस लवंगे, माधवानंद  खांडेकर, सौमीन पात्रा, वर्षा इंगळे, कौस्तुभ कुलकर्णी, कल्याणी  कबाडे, ऋतुजा लोखंडे,उर्मिला सातपुते,प्रशांत कुलकर्णी, राहुल कोल्हापुरे,निसार शेख,नागेश नाले    आदींनी  विशेष  सहकार्य  केले.

राष्ट्रवादी आंदोलकांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यास कोर्टाचा नकार

0
पुणे :
पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क्र २. एन. डी. मेश्राम यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यां विरोधात पोलिसांनी दाखल केलेले दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करून घेण्यास नकार दिला व सदरील दोषारोपपत्र फरासखाना पोलीस ठाणे यांच्याकडे परत पाठवण्याचे आदेश दिले.
दिनांक २७/१०/२०१६ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांनी ऐन दिवाळीच्या काळात झालेल्या अन्न धान्याच्या भाववाढीच्या विरोधात पुणे जिल्हाच्या पालक मंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली होती व त्यासंबंधी फरासखाना पोलीस स्टेशन यांनी १) अशोक राठी २) गणेश नलावडे ३) दीपक जगताप ४) हेमंत येवलकर ५) शेरअली शेख ६) राकेश कामठे ७) वनिता जगताप ८) मनाली भिलारे ९) श्वेता होनराव १०) संतोष ढोक ११) रवींद्र माळवदकर १२) रुपाली चाकणकर व इतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासानंतर वरील व्यक्तींवर भा.द वी कलम १८८ व महा.पो.अधि.३७(१)(३) सह १३५ अन्वये दोषारोपपत्र मे न्यायालया समोर दाखल करून घेणेस दि १५/०१/२०१८ रोजी विनंती केली होती .
 त्यावर आरोपींच्या वकिल अॅड. रोनक अनिल व्हनकळस व अॅड. इम्रान मजीद पठाण यांनी तीव्र   आक्षेप घेतला व त्यांनी ,फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४६८ च्या तरतुदीनुसार सदर गुन्ह्याची शिक्षा सहा महिन्यापेक्षा जास्त नसल्यामुळे सदर गुन्ह्याची दखल मे. न्यायालयाला मुदतबाह्य झाल्याने म्हणजेच गुन्हा दाखल झाल्यापासून एक वर्षाच्या आत न घेतल्याने आता घेता येणार नाही असा युक्तिवाद करून कोर्टाच्या निदर्शनास आणले.
त्यावर मे कोर्टाने सरकारी वकील यांचे युक्तिवाद एकूण 18 जानेवारी रोजी आरोपींच्या वकिलांचा आक्षेप घेतलेला युक्तिवाद ग्राह्य धरीत दोषारोपपत्र मुदतीत न दाखल केल्यामुळे दोषारोपपत्र दाखल करण्यास नकार दिला व सदरील दोषारोषपत्र फरासखाना पोलीस ठाणे यांच्याकडे परत पाठवण्याचे आदेश दिले.

फ़िल्म रिलीज से पहले अय्यारी की टीम पहुंची स्वर्ण मंदिर!

फ़िल्म रिलीज होने से पहले अय्यारी के कलाकार और क्रू के सदस्यों ने स्वर्ण मंदिर का दौरा किया।

निर्देशक नीरज पांडे और शितल भाटिया के साथ अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज वाजपेयी, रकुल प्रीत सिंह और पूजा चोपड़ा ने वाघा बॉर्डर में गणतंत्र दिवस मनाने के बाद अमृतसर में स्वर्ण मंदिर पर माथा टेका।

टीम ने 9 फरवरी को रिलीज होने वाली अपनी आगामी जासूसी थ्रिलर फ़िल्म की सफ़लता के लिए स्वर्ण मंदिर में आशीर्वाद लिया।

‘अय्यारी’ के कलाकारों और दल ने बीएसएफ खासा कैम्प में गणतंत्र दिवस पर बीएसएफ के जवानों के साथ एक दिन बिताया, जिसके बाद टीम ने वाघा बॉर्डर पर तिरंगा फहरा कर गणतंत्र दिवस का जश्न का कभी ना भूलने वाला लुत्फ उठाया।

इससे पहले अय्यारी की टीम ने जैसलमेर में बीएसएफ शिविर का दौरा किया था, जहां उन्होंने जवानों के साथ 3 दिन बिता कर उनके दिनचर्या को समझने और उसमें ढलने की कोशिश की थी।

जासूसी थ्रिलर शैली के महारथी नीरज पांडे अब अपनी अगली सेना की पृष्ठभूमि पर आधारित फिल्म “अय्यारी” को प्रस्तुत करने के लिए तैयार है।

“अय्यारी” दो कठोर दिमाग वाले फ़ौज अधिकारियों के इर्दगिर्द घूमती है जो पूरी तरह से अलग विचार रखते हैं, लेकिन फिर भी अपने तरीके से बिल्कुल सही हैं।

फ़िल्म में सिद्धार्थ मल्होत्रा ​​और मनोज बाजपेयी गुरु-शिष्य की भूमिका में नज़र आएंगे। इसके साथ ही अय्यारी अनुपम खेर, नसीरुद्दीन शाह, राकुल प्रीत सिंह, कुमुद मिश्रा, पूजा चोपड़ा, आदिल हुसैन और विक्रम गोखले प्रमुख जैसे उम्दा कलाकारों से लैस होगी।

अपनी शैली को बरकरार रखते हुए नीरज पांडे की जासूसी थ्रिलर एक बार फिर दिमाग को झंझोड़ कर रख देने वाली कहानी को प्रस्तुत करने के लिए तैयार है। “अय्यारी” के जरिये महान फ़िल्म निर्माता अपनी पिछली फिल्में बेबी, रुस्तम, ए वेडनेसडे, स्पेशल 26, एम एस धोनी: एन अनटोल्ड स्टोरी की तरह दर्शकों का मनोरंजन करते हुए नज़र आएंगे।

“अय्यारी” के ट्रेलर ने हर किसी को अपनी तरफ आकर्षित कर, फ़िल्म देखने के लिए उत्साहित कर दिया है। फ़िल्म के ट्रेलर को न केवल दर्शक बल्कि हमारे देश के वीर जवानों द्वारा भी खूब पसंद किया जा रहा है।

नीरज पांडे की फ़िल्म “अय्यारी” प्लान सी स्टूडियोज और जयंतलाल गड़ा (पेन) द्वारा प्रस्तुत है। शीतल भाटिया, धवल जयंतीलाल गड़ा द्वारा निर्मित मोशन पिक्चर कैपिटल 9 फरवरी 2018 को देशभर में रिलीज होगी।