Home Blog Page 3195

सूर्याजी पिसाळांना उत्तर देण्याचं काम हा दीपक मानकर करेल … शिवसृष्टी विरोधकांना इशारा (व्हिडीओ)


पुणे- मुख्यमंत्र्यांनी शिवसृष्टीसाठी घेतलेला निर्णय मान्य आहे ,त्याबद्दल त्यांचे अभिनंदन …पण आता त्वरेने काम सुरु करा असे सांगत माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी इथे शिवसृष्टी सारखे चांगले काम होताना काही सूर्याजी पिसाळ निर्माण होत आहेत ,पण अशा पिसाळांना उत्तर देण्याचं काम हा दीपक मानकर करेल … असा गर्भित इशारा तथाकथित पर्यावरणवाद्यांना दिला .
आज महापालिकेच्या शिवसृष्टीवरील खास सभेत  ते बोलत होते . यावेळी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत या विषयावर 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीचा आणि निर्णयाचा परामर्श घेण्यात आला .
येथे शिवसृष्टी होऊ नये म्हणून कधीही एक झाड न लावलेल्यांनी पर्यावरणाची झूल अंगावर पांघरून भूल देण्याचे काम करू नये शासनाने देखील आम्बेगावला जर काल ३०० कोटी अशाच कारणास्तव दिले असतील तर मुख्यमंत्री इथेही ५०० कोटी देतील मला त्यांच्यावर विश्वास वाटतो आहे म्हणून मी चांदणी चौकातील शिवसृष्टीला मान्यता दिली . पण येथील जागा आता त्वरेने ताब्यात घेवून वर्षभरात शिवसृष्टी उभारण्याची त्यांची जबाबदारी आहे . जर जागा देता येत नसेल तर माझी १०० एकर जागा आहे असे सांगत दीपक मानकर यांनी शिवसृष्टीबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांसह पालिकेतील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले . मानकर यांनी २००८ पासून शिवसृष्टी व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत .पण आता श्रेयावादावरून लढाई होते आहे .याबाबत ते म्हणाले ,’ क्रेडीट कोणालाही घेवू द्यात पण शिवसृष्टी त्वरेने करा’ शिवसृष्टीसाठी पाहिजे ते बलिदान करण्याची आपली तयारी आहे . 

पहा आणि ऐका मानकर यांचे पूर्ण भाषण …जसेच्या तसे ….

वीजबिल थकबाकीदारांविरुद्ध महावितरणची धडक मोहीम – 19 हजार वीजजोडण्या खंडित

0

पुणे : पुणे परिमंडलातील वीजबिलांच्या थकबाकीदारांविरोधात महावितरणकडून सुरु असलेल्या ‘शून्य थकबाकी’च्या धडक मोहिमेत 19 हजार 452 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा 10 कोटी 84 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे खंडित करण्यात आला आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील 6 लाख 78 हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांकडे असलेल्या 132 कोटी 48 लाख रुपयांच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. ही थकबाकी शुन्यावर येईपर्यंत ही मोहीम सलगपणे सुरु राहणार आहे.

पुणे परिमंडलातील 5 लाख 59 हजार घरगुती वीजग्राहकांकडे 75 कोटी 79 लाख रुपयांची सर्वाधिक थकबाकी आहे. तसेच 1 लाख 2 हजार वाणिज्यिक ग्राहकांकडे 40 कोटी 30 लाख तर 16 हजार 361 औद्योगिक ग्राहकांकडे 16 कोटी 38 लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरणने आक्रमकपणे ‘शून्य थकबाकी’ मोहीम सुरु केलेली आहे. या मोहिमेत प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे व मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सर्व उपविभाग व शाखा कार्यालयप्रमुख अभियंते, लेखा अधिकारी तसेच हजारो जनमित्र सहभागी झाले आहेत.

पुणे शहरात आतापर्यंत 11 हजार 98 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 4 कोटी 46 लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांपोटी खंडित करण्यात आला आहे. भोसरी व पिंपरी विभागअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील 3650 वीजग्राहकांची वीज 2 कोटी 44 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आली आहे. मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभाग अंतर्गत मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील 4714 ग्राहकांचा वीजपुरवठा 3 कोटी 94 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे खंडित करण्यात आला आहे. थकीत वीजबिलाच्या रकमेचा भरणा करता यावा म्हणून दि. 10, 11 व 13 फेब्रुवारीला पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्ग कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.

ट – कटू कारवाई टाळा, सहकार्य करा – वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकीचा भरणा करणे, त्याची पावती संबंधीत कार्यालयात दाखवणे, रिकनेक्शन चार्जेस भरल्यानंतर वीजपुरवठा सुरु करून घ्यावा लागणार आहे. थकीत वीजबिल भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केंद्गे तसेच घरबसल्या ‘ऑनलाईन’ पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.

दिवे येथील ब्रेक चाचणी पथ नागरिकांसाठी महत्वपूर्ण ठरेल – दिवाकर रावते

0

पुणे: पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी, दिवे येथील  ब्रेक चाचणी पथामुळे नागरिकांची सोय होणार असून हा पथ सर्वांसाठी  महत्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.

पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी, दिवे येथे सुरु करण्यात आलेल्या ब्रेक चाचणी पथाचे लोकार्पण  श्री. रावते यांच्या हस्ते  करण्यात आले, या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, सहपरिवहन आयुक्त प्रसाद महाजन, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ब्रेक चाचणी पथाची तसेच  ब्रेक चाचणीसाठी आलेल्या वाहनांची पाहणी श्री. रावते, श्री. शिवतारे व अन्य मान्यवरांनी केली. तसेच हा पथ तयार करण्यासाठी योगदान दिलेल्या व्यक्ती, संस्था, संघटना व अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

श्री. रावते म्हणाले, परिवहन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना जलदरित्या चांगली सेवा देवून समाजात शासनाबाबत सकारात्मक प्रतिमा निर्माण करावी. परिवहन विभागाकडे असणाऱ्या कामाची व्याप्ती व त्या तुलनेत असणाऱ्या अपुऱ्या मनुष्यबळाचा विचार करुन नागरिकांनीही सहकार्य करावे, असे सांगून ते म्हणाले, ब्रेक चाचणी पथाचे कामकाज गतीने होण्यासाठी 1 कोटी 31 लाख 72 हजार रुपये मंजूर  करण्यात आले आहेत. या निधीतून या ठिकाणी कार्यालय,प्रतिक्षाकक्ष, तसेच पाणीपुरवठा,विद्युत सुविधा, अंतर्गत जोडरस्ते व वाहनतळ, स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. तसेच ब्रेक चाचणी पथाची गरज लक्षात घेवून आणखी एक पथ उपलब्ध करुन दिला जाईल. नागरिकांच्या परिवहन विभागाकडे असणाऱ्या कामांचे स्वरुप विचारात घेवून त्यांना विविध सोयीसुविधा देण्यासाठी हा विभाग प्रयत्नशील असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

श्री. शिवतारे म्हणाले, या ब्रेक चाचणी पथावर विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. या परिसराचा पूर्णत: विकास झाल्यास याद्वारे मोठया प्रमाणावर रोजगाराची संधी निर्माण होईल. ज्याप्रमाणे पुरंदरच्या  भागात पिकणारे अंजीर, सिताफळ, पेरु ही  फळे सर्वत्र प्रसिध्द आहेत, त्याप्रमाणेच या भागातील नियोजित विमानतळ आणि हा पथ अल्पावधीत महत्वाचे केंद्र बनेल.

श्री. सौनिक म्हणाले, याठिकाणी देण्यात आलेल्या सुविधांचा उपयोग करुन प्रादेशिक परिवहन विभागाने नागरिकांना वेळेत सेवा द्यावी.

श्री. महाजन म्हणाले, परिवहन विभागाचे अधिकाधिक संगणकीकरण व यांत्रिकीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच वाहनचालकांना जास्तीतजास्त सुविधा मिळवून देण्यात येत आहेत.

लोकसहभागातून  ब्रेक चाचणी पथाचे काम पुर्ण करण्यात आले आहे. याठिकाणी येणारे वाहनचालक व परिवहन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या दृष्टिने मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे  आवश्यक असल्याचे मत श्री.आजरी यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी सुत्रसंचालनातून विभागाच्या अडीअडचणी मांडल्या. आभार  मोटार वाहन निरीक्षक अमरसिंह गवारे यांनी मानले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, राज्य शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठया संख्येने  उपस्थित होते

ताज हॉटेल पॅलेसेस रिझॉर्ट सफारीने जाहीर केली पुण्यात नवीन महाव्यवस्थापकांची नियुक्ती

0

मुंबई ताज हॉटेल पॅलेसेस रिझॉर्ट सफारीजने आपल्या पुण्यातील हॉटेल्ससाठी काही नवीन नियुक्त्यांची घोषणा केली आहे. सुजु कृष्णन आणि जयंत दास हे केरळच्या कटिबंधीय बॅकवॉटर्समधून पुण्यात, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत आले आहेत.  सुजु कृष्णन ताज ब्ल्यू डायमंडच्या विवांताची सूत्रे हाती घेतील, तर जयंत दास पुण्यातील हिंजवडी येथील गेटवे हॉटेलची जबाबदारी सांभाळतील.

सुजु हे कंपनीत २४ वर्षांपासून कार्यरत असलेले ताजचे निष्ठावंत कर्मचारी आहेत. ताज ग्रॅज्युएट ट्रेनिंग कार्यक्रमाचा भाग म्हणून कोलकाता येथील ताज बेंगाल हॉटेलमध्ये ते १९९४ साली फ्रण्ट ऑफिस कर्मचारी म्हणून रुजू झाले. अनेक शहरांमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर सुजू यांना आग्रा येथील फतेहाबाद मार्गावरील द गेटवे हॉटेलमध्ये महाव्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले. पुण्यात येण्यापूर्वी ते एर्नाकुलमच्या मरिन ड्राइव्हवरील गेटवे हॉटेलचे महाव्यवस्थापक होते.

“पुण्यासारख्या उत्साही शहरातील ताज ब्ल्यू डायमंडच्या विवांतामध्ये एक नवीन खेळी सुरू करण्याबाबत मी खूपच रोमांचित आहे. सर्वोत्कृष्ट सेवेचा ताजचा वारसा पुढे चालवायला मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे,” असे सुजु कृष्णन म्हणाले.

बेंगलोर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतलेले सुजु यांना ताज ब्रॅण्डबद्दल खूपच उत्कट जिव्हाळा आहे आणि स्वत: उदाहरण घालून देऊन नेतृत्व करण्यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांना भारतीय आणि पाश्चिमात्य शास्त्रीय संगीत आवडते. वाचन आणि आउटडोअर अॅक्टिव्हिटीज हे त्यांचे छंद आहेत.

“सुजु यांनी ताजमध्ये स्वत:ला सिद्ध केलेले आहे. ते आमच्या सर्वांत तरुण महाव्यवस्थापकांपैकी एक होते. टाटा समूह युवा व्यवस्थापक नेतृत्व कार्यक्रमासाठी त्यांना नामांकन मिळाले होते. त्यांनी अनेक ठिकाणी यशस्वी नेतृत्व केले आहे आणि ते निकालावर (रिझल्ट) लक्ष केंद्रित करणारे व्यावसायिक आहेत. जयंत दास यांनीही समूहात अनेक आव्हानात्मक कामे हातात घेतली आहे आणि त्यातील बहुतेक यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. ते अत्यंत परिपक्व आणि मेहनती आहेत. मी या दोघांनाही पुण्यातील त्यांच्या नवीन कामासाठी शुभेच्छा देतो,” असे ताज हॉटेल पॅलेसेस रिझॉर्ट्स सफारीजचे पश्चिम विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) फरहात जमाल म्हणाले.

जयंत दास हे पुण्यातील हिंजवडी येथील गेटवे हॉटेलच्या महाव्यवस्थापकपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. ते यापूर्वी केरळमधील अथ्थे ताज कुमारकोम रिझॉर्ट आणि स्पाचे महाव्यवस्थापक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली या हॉटेलने दोन राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्राप्त केले आहेत. जयंत यांनी त्यांची ताजमधील कारकीर्द १९९३ मध्ये कोलकात्याच्या ताज बेंगालमधून केली.

“हिंजवडीच्या गेटवे हॉटेलमधील तरुण व प्रतिभावान कर्मचाऱ्यांसोबत काम सुरू करून आमच्या पाहुण्यांना ताज ब्रॅण्डची ओळख असलेली उच्च स्तरावरील सेवा देण्यास मी उत्सुक आहे,” असे जयंत दास म्हणाले.

जयंत यांनी पटणा येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमधून पदवी घेतली आहे. त्यापूर्वी त्यांनी त्रिपुरा विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतली आहे. फावल्या वेळात जयंत शास्त्रीय आणि सुगम संगीताचा आनंद घेतात आणि नॉन-फिक्शन प्रकारातील पुस्तके वाचतात. असामान्य स्थळांना भेटी देण्याची आवड त्यांना आहे- यात जंगल सफारींचा क्रमांक पहिला आहे!

दोन्ही ताज हॉटेलांमधील पाहुणे पुणे शहराचा दिमाख अनुभवू शकतील. ताज-ब्ल्यू डायमंडचे विवांता पुण्याच्या हृदयस्थानी आणि व्यावसायिक तसेच मनोरंजन क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहे. तर हिंजवडी येथील गेटवे हॉटेल हे पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या केंद्राजवळ तसेच पुणे-मुंबई महामार्गालगत, अत्यंत सोयीस्कर ठिकाणी आहे.

ताज हॉटेल पॅलेसेस रिझॉर्ट्स सफारीजविषयी

ऐषोरामाचा अस्सल अनुभव हवा असलेल्या जगातील सर्वांत चिकित्सक पर्यटकांना सेवा देणारा ताज हॉटेल पॅलेसेस रिझॉर्ट सफारीज हा इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड अर्थात आयएचसीएलचा प्रतिष्ठित ब्रॅण्ड १९०३ सालापासून कार्यरत आहे. जगविख्यात लॅण्डमार्क्सपासून ते आधुनिक बिझनेस हॉटेल्सपर्यंत, रमणीय बीच रिझॉर्ट्सपासून ते अस्सल भव्य राजवाड्यांपर्यंत ताजच्या सर्व हॉटेल्समध्ये भारतीय आतिथ्यशीलता, जागतिक दर्जाची सेवा आणि आधुनिक ऐषोराम यांचा मिलाफ साधलेला आहे. मुंबई येथील ताज महाल पॅलेस हॉटेल म्हणजे समूहाचा मुकुटमणी असून, सर्वोत्तम सुसंस्कृत राहणीमान, कल्पकता आणि जिव्हाळ्याचा मापदंड या हॉटेलने निर्माण केला आहे. कडवे श्रम आणि कडवा श्रमपरिहार (वर्क-हार्ड, प्ले-हार्ड) या तरुणांच्या जीवनशैलीला साजेसा आधुनिक आणि सृजनशील आतिथ्याचा अनुभव विवांतामध्ये मिळतो. गेटवे हॉटेल्सचे वैशिष्ट्य म्हणजे पाहुण्यांना ताजेतवाने करणारा, निवांत अनुभव तसेच दर्जा, सेवा व शैलीतील सातत्य.

इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचा (आयएचसीएल) ताज हॉटेल्स पॅलेसेस रिझॉर्ट्स सफारीज हा प्रमुख ब्रॅण्ड आहे. आयएचसीएलचा इकॉनॉमी विभागातील हॉटेल्सचा जिंजर ब्रॅण्डही भारतातील ब्रॅण्डेड बजेट हॉटेल्सच्या क्षेत्रातील पहिला ब्रॅण्ड असून सर्वांत मोठाही आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड सॅट्स (पूर्वीचे नाव सिंगापोर एअरपोर्ट टर्मिनल सर्व्हिसेस) या हवाई खानपानसेवा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीसोबत ताजसॅट्स एअर केटरिंग ही सेवा जॉइंट व्हेंचरच्या स्वरुपात देते. महत्त्वाच्या शहरांमध्ये होणाऱ्या हवाई वाहतुकीमध्ये या सेवेद्वारे अन्नपदार्थ पुरवले जातात.

 

‘हृदयात वाजे समथिंग’; साजरा करा प्रेमाचा सीझन

0

फेब्रुवारी म्हणजे प्रेम आणि रोमान्सचा महिना आणि हा प्रेमाचा सोहळा झी टॉकीज आपल्या लाडक्या प्रेक्षकांसोबत साजरा
करणार आहे. ११ वर्षे प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालेली झी टॉकिज हि वाहिनी आपल्या प्रेक्षकांचा व्हॅलेंटाइन डे अधिक खास
बनवण्यासाठी सादर करत आहे ‘हृदयात वाजे समथिंग’ कोल्हापूरच्या रांगड्या मातीत आणि उत्साही प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार
पडलेला, दमदार डान्स परफॉर्मन्सेस, खळखळून हसवणारे विनोदी स्किट्स आणि धमाकेदार गायकांची अप्रतिम गाणी अर्थात
मनोरंजनाने परिपूर्ण  असलेला’हृदयात वाजे समथिंग’ हा कार्यक्रम ११ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता खास झी टॉकिज वर प्रसारि त होणार आहे!सिनेकलाकारांच्या दमदार परफॉर्मन्सेसनी या कार्यक्रमाला चार चांद लावलेत तसेच या खास कार्यक्रमाच्या उत्स ाहात भर घातलीती म्हणजे प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेता वैभव तत्ववादीने. या कार्यक्रमात तो लोकप्रिय सिनेमा सैराट मधील गाण्यांवर टॅलेंटेडडान्सर मीरा जोशी सोबत परफॉर्म करणार आहे. या सीझनची थीम आहे रोमान्स आणि मयुरेश पेम आणि माधवी नेमकरटाइमपास सिनेमातील ‘दाटले रेशमी’; या प्रसिद्ध रोमँटिक गाण्यावर परफॉर्म करणार आहेत. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरासांभाळली इंडस्ट्रीतील हास्यसम्राट व्यक्तीमत्व -नम्रता आवटे आणि प्रियदर्शन जाधव यांनी. फक्त एवढेच नाही! योगेश शिरसाट,सुहास परांजपे, आरती सोळंकी आणि समीर चौगुले हे विनोदवीर त्यांच्या कॉमेडीने प्रेक्षकांना मनोरंजित करणार आहेत. संगीत,लावणी, कथक आणि बहु-सांस्कृतिक परफॉर्मन्सेस आणि बरेच काही’हृदयात वाजे समथिंग’ द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.कोल्हापूरकरांसमोर परफॉर्म करण्याची भावना व्यक्त करताना वैभव तत्ववादी म्हणाले, ;फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना आहे आणिअशा खास व विलक्षण उत्सवात सामील होण्यासाठी मला अतिशय आनंद झाला आहे. व्हॅलेंटाइन डे आता अगदी जवळ आलाअसताना, आम्ही सैराट मधील प्रेक्षकांना आवडणारी प्रेमाची गाणी निवडली आहेत. माझ्या परफॉर्मन्स शिवाय या शो मध्ये अजून
असे काही आहे की त्यामुळे तुम्ही हा व्हॅलेंटाइन सीझन आमच्या सोबतच साजरा कराल!
‘हृदयात वाजे समथिंग’ द्वारे झी टॉकिज तुम्हाला खात्री देत आहे उत्कृष्ट मनोरंजन, अखंड हास्य, चांगले संगीत आणि विलक्षण नृत्येयांनी भरलेल्या रात्रीचे.

साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान तर्फे 5 रंगकर्मी कलाकारांना ‘तेंडूलकर-दुबे स्मृती’ पुरस्कार जाहीर !

0
पुणे- साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान तर्फे पाच प्रतिभावान रंगभूमी कलाकारांसाठी देण्यात येणारा ‘तेंडूलकर-दुबे स्मृती पुरस्कार’ आज रोजी जाहीर करण्यात आला. 1 लाख रूपयांचा हा वार्षिक पुरस्कार 2018-19 या वर्षासाठी सपन सरण, इश्पिता चक्रबोर्ती, निरंजन पेडणेकर, बिक्रम घोष आणि युगंधर देशपांडे यांना देण्यात येणार आहे.
हा अव्दितीय पुरस्कार देण्याचे प्रतिष्ठानचे हे तेरावे वर्ष असून आजपर्यंत 57 कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. पहिले तीन वर्ष हा पुरस्कार साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक मधु गानू यांच्या नावाने 7 रंगकर्मींना प्रदान केला गेला. त्यानंतर प्रसिध्द उद्योगपती कै.श्री.विनोद दोशी यांच्या नावाने विनोद आणि सरयु दोशी फाऊंडेशन यांच्या पाठींब्यासह गेली 8 वर्षे हा पुरस्कार प्रदान केला जात होता. गतवर्षीपर्यंत रंगभूमीतील 52 कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला होता. प्रतिष्ठानच्यावतीने या वर्षी तेंडूलकर-दुबे यांच्या नावाने देण्यात येणार्‍या या पुरस्काराने अर्धशतकी ही ‘मॅजीकल फिगर’ गाठली आहे. प्रतिष्ठान तर्फे पुरस्कार मिळालेल्यारंगभूमी कलाकाराची संख्या आता 57 झाली आहे.
गतवर्षीपासून प्रसिध्द नाटककार विजय तेंडूलकर आणि रंगभूमी दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या दोघांनाही प्रतिष्ठानबद्दल आस्था होती आणि त्यांनी प्रतिष्ठानच्या विकासासाठी मार्गदर्शन केले व पाठींबा दिला. युवा रंगकर्मीना विनाअट शिष्यवृत्ती देणे, ही कल्पना तेंडूलकरांचीच होती. केवळ कल्पना देऊन ते थांबले नाहीत तर, त्यांनी त्यासाठी आवश्यक असलेला निधी जमा करण्यास हातभारही लावला. त्यामुळे या दोघांच्या स्मृतीप्रिर्थत्य देण्यात येणार हा पुरस्कार अधिक समर्पक व यथायोग्य ठरतो.
पत्रकारांशी बोलताना प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्‍वस्त अशोक कुलकर्णी म्हणाले की, 2003 मध्ये काही कलाकारांनी साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानची स्थापना केली. कला व कलाकारांना प्रोत्साहन देणे हा प्रतिष्ठानचा उद्देश आहे. कलेच्या क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम करणार्‍या व कला क्षेत्रातच महत्वाकांक्षी कारकीर्द करू इच्छिणार्‍यांना प्रतिष्ठान तर्फे हा पुरस्कार देऊन आर्थिक पाठिंबा दिला जातो. या पुरस्कार केवळ महाराष्ट्रातील कलावंतांसाठीच मर्यादित न ठेवता इतरही राज्यातील कलावंतांना याचा लाभ घेता येतो. राजस्थानच्या इस्पिता आणि दिल्लीच्या बिक्रम घोष यांना ही शिष्यवृत्ती देऊन स्पष्ट केले आहे.
या पुरस्काराची 1 लाख रूपयांची रक्कम कलाकारांना 12 धनादेशांव्दारे दिली जाते. यामुळे कार्यपध्दतीमधील कुठेही दिरंगाई न होता कलाकारांना मासिक खर्चासाठी हातभार मिळतो. हा पुरस्कार विनाअट प्रदान करण्यात येतो, हे याचे मुख्य वैशिष्ट आहे. तसेच यासाठी कोणतीही अर्ज, निमंत्रण किंवा निवड-प्रक्रिया अशा गोष्टी नसतात. आपल्या कलेच्या प्रति समर्पितवृत्तीने काम करण्याची इच्छा व सक्रीय सहभाग असणारे, नाट्य चळवळीत कार्यरत असणारे कलाकार या पुरस्कारासाठी पात्र ठरतात.
नाट्यसृष्टीत महत्वाचे काम करणार्‍यांना मदत म्हणून हा पुरस्कार दिला जातो. ही पुरस्काराची रक्कम खर्च करण्यास संस्थे तर्फे कोणतीही मर्यादा नसून कलाकार आपल्या इच्छेनुसार ही रक्कम खर्च करू शकतात.
तीन वर्षापासून प्रतिष्ठानने प्रकाशन क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. 2015 मध्ये प्रतिष्ठानने ‘अजून तेंडूलकर’ (मराठी) संपादिका रेखा साने इनामदार व ‘द सिन्स वी मेड’ (इंग्रजी) संपादिका शांता गोखले ही दोन पुस्तके प्रकाशित करण्यासाठी हातभार लावला आहे. या बरोबरच प्रतिष्ठानच्यावतीने दोन वैयक्तिक रंगभूमी निर्मिती संस्थांना आर्थिक पाठींबा दिला असून रंगभूमीतील जेष्ठ्य आणि गरजू कलावंतांसाठी वैद्यकीय सेवांसाठी आर्थिक मदतही केली जाते.
‘तेंडूलकर-दुबे’ पुरस्कार जेष्ठ्य नाट्यकर्मी समीक बंडोपाध्याय यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. हा औपचारीक कार्यक्रम रविवार, दि.18 फेब्रुवारी 2018 रोजी घरकुल लॉन्स्, म्हात्रे पुलाजवळ येथे संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.
* अधिक माहितीसाठी संपर्कः अशोक कुलकर्णी, कार्यकारी विश्‍वस्त, साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान, 9423002026.
सपन सरण (9833681807), इश्पिता चक्रबोर्ती (9717591363), निरंजन पेडणेकर (7350641234), बिक्रम घोष (9811392916), युगंधर देशपांडे (8698905780).

डीएसकेंचे नागरिकांना क्राऊड फंडिंगद्वारे मदतीचे आवाहन

0

पुणे-अमेरिकेत एखादा उद्योजक आर्थिक संकटात सापडल्यावर तेथे क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून त्या उद्योजकाला आर्थिक संकटातून बाहेर काढले जाते. आता माझ्यासाठी देखील डीएसके क्राऊड फंडिंग अंतर्गत पैसे गोळा केले जाणार आहेत. नागरिकांनी अधिकधिक मदत करण्याचे आवाहन बांधकाम व्यवसायीक डीएसके उर्फ दशरथ सखाराम कुलकर्णी यांनी आज पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार केले. मी कोणाचेही पैसे बुडवणार नाही, तर न्यायालयाच्या आदेशानुसार गुंतवणुकदारांच्या पैशाचे वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उद्योजक मंदार जोगळेकर हे देखील उपस्थित होते.

डीएसके म्हणाले, मी मागील वर्षभरापासून आर्थिक अडचणीमध्ये सापडलो असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्यावर मी अधिक काही बोलणार नाही. मंदार जोगळेकर यांनी नव्याने आणलेल्या प्लॅनमधून माझ्यासह भविष्यात बांधकाम क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीला आर्थिक अडचणींमधून बाहेर पडण्यास मदत होणार आहे. अमेरिकेत क्राऊड फंडिंग हा उपक्रम राबविला जातो. त्यातून अनेक अडचणीत सापडलेल्या बांधकाम व्यवासायीकांना याचा फायदा झाला आहे. त्यामुळे आता पुण्यातून अशाच उपक्रमाचे सुरुवात होणार असून या क्राऊड फंडिंगमध्ये १ हजार रुपयांपासून लाखो रुपये लोक देऊ शकतात. ती माझ्यासाठी मदत असणार आहे. मात्र, ते पैसे पुन्हा मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ते पुढे म्हणाले, मागील चार दिवसांपासून नागरिकांच्या अशा प्रकारच्या मदतीद्वारे आतापर्यंत ९ लाख रुपये जमा झाले असून मला नागरिक निश्चित मदत करतील. मला भीक नको, तर मदत करा असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणाले, मी वयाने थकलो असेल मात्र या संकटाने थोडासा देखील ढासाळलेलो नाही, यातून पुन्हा नक्कीच उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उद्योजक मंदार जोगळेकर म्हणाले, अमेरिकेत आर्थिक अडचणीत सापडलेल्या उदयोजकासाठी क्राऊड फंडिंग असा उपक्रम राबविला जातो. यातून अनेक उद्योजक बाहेर पडल्याचे पाहावयास मिळत असून आता डीएसकेंसाठी देखील याच क्राऊड फंडिंग सेतूचा वापर केला जाईल. याला नागरिक अधिकधिक प्रतिसाद देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमांतर्गत प्रतिक कोळपे या विद्यार्थ्याने त्याच्या पॉकेट मनीमधून आपल्याला तब्ब्ल १८ हजार रुपये मदत करीत असल्याचे जाहीर केले. तसेच माझ्या वयाचे अनेक तरुण मदत करण्यास तयार असल्याचे त्यांने सांगितले.

डीएसके मदत करण्यासाठी अकाउंट नंबर

दीपक सखाराम कुलकर्णी (Deepak Sakharam Kulkarni)
बँकेचे नाव- ऍक्सिस बँक, पुणे मुख्य शाखा
खाते क्रमांक-  9160100809355369
ifsc – UTIBOOOO37

Head office at pune

1187/60, J . M. Road

Shivaji Nagar,Pune -5

Mumbai Office-

D.s. kulkarni Developers LTD.

DSK house,1 and 2 nd Floor

Veer Savarkar Marg,(Cadel Road)

Next to Mayors Bunglow,Shivaji Park

Mumbai-28

परदेशातून ट्रान्स्फर करणाऱ्यांसाठी

भारताबाहेरून बँक खात्यात लोकवर्गणी जमा करण्यासाठी

Bank Name- 1st CONSTITUTION Bank

Address- P.O. Box 634, Route 130,CRANBURY,NJ 08512

Account Name- DSK DEVELOPERS CORPORATION

Account Number- 9760131329

Routing number FW 021207154

Swift Code-WFBIUS6S

मुंडेंच्या बदलीनंतर – ‘तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा ‘साठी पालिकेत गर्दी …

0

पुणे- पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आल्यानंतर आज महापालिकेत ..कधी काळी सर्व पीएमटी च्या चाव्या हातात असलेले अजित आपटे यांच्यासह बडतर्फ कर्मचारी आणि अस्तास गेलेले कामगार नेते यांनी आज महापालिकेत गर्दी केली होती . काहीजण पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत होते तर काही जन अधिकाऱ्यांच्या भेटीस सज्ज होते .दरम्यान मुंडे जातील आणि गुंडे मॅडम येतील …पुन्हा मॅडम  ना या प्रश्नांना सामोरे जायचे आहे . पालिकेतील लॉबी,पीएमपीएमएल मधील लॉबी यांचा सामना पूर्ण न करताच मुंडे यांना गाशा गुंडाळावा लागला आहे ,तर प्रेरणा देशभ्रतार या हि लॉबी च्या बाहेर होत्या आता त्या हि गेल्या आहेत .या पार्श्वभूमीवर आता ‘तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा ‘ असा अनुभव येतो कि लोण्याच्या गोळ्या साठी भांडणे होतात .. ते येणाऱ्या काळात दिसणारच आहे .

मुंढे यांनी दहा महिन्यांपूर्वी ‘पीएमपी’चा कारभार स्वीकारला होता. मुंढे यांनी मागील दहा महिन्यांत घेतलेल्या विविध निर्णयांमुळे तसेच कर्मचाऱ्यांवरील कारवाईच्या धडाक्यामुळे पीएमपीच्या सर्व कामगार संघटना त्यांच्याविरोधात गेल्या होत्या. मुंढे यांची बदली होताच पीएमपीच्या कर्मचा-यांकडून जल्लोष करण्यात आला आहे .

काय केले होते मुंडे यांनी …

– सतत गैरहजर राहणा-या पीएमपीमएलच्या 158 बसचालकांना पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी सेवेतून बडतर्फ केले होते.
– बदली हंगामी कर्मचारी म्हणून या बसचालकांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतू ऑगस्ट 2017 ते डिसेंबर 2017 या कालावधीत हे बसचालक सतत गैरहजर राहिल्यामुळे त्यांची सेवा संपुष्टात आणली होती.
– बडतर्फ केलेले कर्मचारी बदली, हंगामी आणि रोजंदारीवर काम करणारे होते. या कर्मचा-यांनी सुटीचे दिवस सोडून एका महिन्यात 21 दिवस काम करणे गरजेचे होते.
– परंतू ही अट ते पूर्ण करू शकले नाहीत त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. शिवाय कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत 13 वाहतूक निरीक्षकांना निलंबित केले होते.
– पीएमपीएमएलचा पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढेंनी कामात हलगर्जीपणा करणा-या 200 पेक्षा अधिक कर्मचारी आणि अधिका-यांना निलंबित केले होते. त्यामुळे बदली होताच त्यांनी जल्लोष केला.

11 वर्षात तब्बल 10 वेळा बदली-

2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या मुंढेंची 11 वर्षात तब्बल 10 वेळा बदली करण्यात आली आहे. अरुण भाटीया गेल्यानंतर  आपल्या कामाच्या धडाकेबाज कारवाईने गाजणारे म्हणून पुण्यात आलेले ते पहिलेच अधिकारी म्हणून ओळखले जातील .हेकेखोर ,लोकप्रतिनिधींना किंमत न देणारे ,त्यांना अवमानास्पद वागणूक देणारे , कामगारांवर हुकुमशाही पद्धतीने दहशत बसविणारे म्हणून त्यांच्यावर राजकीय क्षेत्रातून आरोप केले गेले .मुंडे यांनी लोकप्रतिनिधींच्या आक्षेपांना उत्तरे देण्यासाठी कायम पालिकेच्या मुख्य सभेत जाणे टाळले , गेले तेव्हा स्वतःचे निवेदन करून लोकप्रतिनिधींचे म्हणणे न ऐकता मधूनच  निघून गेल्याचा आरोप त्यांच्यावर झाला .पीएमपीएमएल साठी पैसे देणे महापालिकेचे कर्तव्य आहे त्यासाठी मी भिक मागण्याची गरज नाही अशा स्वभावाचे मुंडे  आणि लोकप्रतिनिधी यांच्यात कधीही सुसंवाद झाला नाही. ते आमचा अवमान करतात अशी भावना लोक्प्रतीन्धींची कायम असताना पुण्याचे खासदार अनिल शिरोळे आणि त्यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे यांचे मात्र त्यांच्याशी चांगले संबध होते .मोडेल पण वाकणार नाही अशा स्वभावाने  भाटीया यांनी सर्वच राजकीय पक्षातील लोकांशी  आणि कामगारांशी देखील एकाच वेळी परिणामांची  तमा न बाळगता वाईट पणा घेतला आणि त्यांच्या वारंवार बदल्या होत गेल्या . तसाच काहीसा प्रकार मुंडे यांच्या बाबत हि होता असल्याचे दिसून आले आहे .भाटीया  हे मीडियाशी फटकून राहत पण त्यांना झोपडपट्टीतील आणि आम जनतेचा माथ्य स्वरूपात पाठींबा काही काल लाभला होता . मुंडे  यांच्या बाजूला मात्र मोठ्या मीडियाशी सलगी  आणि बड्या विद्यार्थ्यांचा पाठींबा  अशा दोन गोष्टी दिसून आल्या आहेत. पीएमपीएमएल च्या प्रवाश्यांचा त्यांना पाठींबा कधी मिळाल्याचे फारसे जाणवले नाही .मी एकटाच प्रामाणिक अशी त्यांची भावना असल्याचा आरोप होत गेला  … पण केवळ प्रामाणिक असून प्रत्यक्षात जनतेच्या पदरी काय ?उपयोग काय ? असे हि प्रश्न उपस्थित झाले .

तुकाराम मुंढेंना केजरीवालांनी दिली होती लोकसभा निवडणूक लढविण्याची ऑफर- भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून समोर आलेले नवे राजकीय नेतृत्त्व म्हणून अरविंद केजरीवाल यांच्याकडे पाहिले गेले. त्यांनी तुकाराम मुंढेंची लोकाप्रती असलेली तळमळ पाहून त्यांना लोकसभा निवडणुकीत उभा राहण्याची ऑफर दिली. प्रारंभी ते तयार होते. मात्र, राजकारणात चढ-उतार असतात. अधिकारी म्हणून कायमच लोकांची सेवा करण्याची संधी मला परमेश्वराने दिली आहे असे सांगत त्यांनी राजकारणात जाण्यास नकार दिला होता.

पुणेकरांच्या हिताचे निर्णय घेताना काहींचे हितसंबंध दुखावले म्हणून माझ्या विरोधात नाराजी – तुकाराम मुंढे

0

पुणे -महानगर परिवहन महामंडळाचा व्यवस्थापकीय संचालक म्हणून गेल्या १० महिन्यात पुणेकरांच्या आणि पीएमपीच्या हितांचे निर्णय घेत असताना काही लोकांचे हितसंबंध दुखावले त्यामुळे माझ्या विरोधात नाराजी होती. मात्र, मी नियमात राहून प्रवासी हितांचे निर्णय घेतले. त्याचा परिमाण प्रवासी संख्या वाढवण्यात झाला आहे, असे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

तुकाराम मुंढे यांची बदली नाशिकच्या महापालिका आयुक्तपदी करण्यात अली असून त्यानिमित आज पत्रकार परिषदेत घेतली. त्यावेळी मुंढे म्हणाले की, नाशिकमध्ये काम करण्याच्या जास्त संधी म्हणून आनंदी आहे. नाशिकचे आयुक्तपद हे मोठे असून मी ते चॅलेंज म्हणून नाही तर संधी म्हणून पाहत आहे. पीएमपी संचालक पदाच्या कालावधीत माझ्यावर प्रवासी विरोधी असल्याची टीका करण्यात आली. मात्र, मी घेतलेले निर्णय हे प्रवासी हितांचे होते. त्याचा परिमाण प्रवासी वाढविण्यात झाला. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये ठेकेदारांना शिस्त लावण्यात यश आले आहे. यामध्ये काही लोकांचे हितसंबंध दुखावले गेले. मात्र मी नियमात राहून काम केले आहे, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

भारतीय प्रजा सुराज्य पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता

0
बारामतीत ‘सामाजिक सलोखा’ सभा घेऊन नव्या पक्षाचा श्रीगणेशा : राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ राऊत यांची माहिती
 
पुणे ः ‘राष्ट्रीय समाज पक्षा’तून बाहेर पडलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या ‘भारतीय प्रजा सुराज्य पक्षा’ला निवडणूक आयोगाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊन मान्यता मिळाल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ राऊत, राष्ट्रीय सचिव विष्णू चव्हाण, मुख्य सचिव प्रल्हाद जाधव, कोषाध्यक्ष अशोक तडवळकर यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 
 
नव्या पक्षाच्या सार्वजनिक जीवनातील, राजकारण, समाजकारणातील विधायक श्रीगणेशा करण्यासाठी बारामती येथे रविवारी ‘राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोखा जाहीर सभा’ आयोजित करण्यात आली आहे. ही सभा रविवार, दि. 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता रेल्वे मैदान (भिगवण रोड), बारामती येथे होईल.
 
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी, ‘ऑल इंडिया मुस्लिम ओ.बी.सी. बोर्डा’चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी, ‘जनता दला’च्या महासचिव सुशीला मोराळे या सलोखा सभेला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. 
 
याच ‘सलोखा सभे’त राज्याच्या 3 हजार खेड्यांना भेट देणारी ‘सामाजिक सलोखा’ यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. ही यात्रा ‘बारामती ते दीक्षाभूमी’, ‘दीक्षाभूमी ते रायगड किल्ला’ असा प्रवास करणार आहे. 
 
देशात, राज्यात सत्तेसाठी धर्माच्या नावाने, जातीजातीत तेढ निर्माण करून राजकारण चालू असल्याने समाजाचे विभाजन होत आहे. या संघर्षात सामान्य नागरिक नाहक बळी जात आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी आधी राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा’ यासाठी काम केले पाहिजे. नव्या पक्षाच्या कामाचा श्रीगणेशाच आम्ही ‘सामाजिक सलोखा’ सभा आणि ‘सामाजिक सलोखा’ यात्रेद्वारे करीत आहोत, असे दशरथ राऊत यांनी सांगितले.
 
५ जानेवारी २०१७ रोजी ६ विभागाध्यक्ष, १८ जिल्हाध्यक्षांसह आपण ‘रासप’ पक्ष सोडला होता. आता ३० विधानसभा, ८ लोकसभा मतदारसंघावर आमचा नवा पक्ष लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच आगामी काळात संघटन बळकट करून सर्व निवडणुका लढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ​

झी युवावरील अंजली मालिकेने गाठला २०० भागांचा यशस्वी टप्पा

0

तरुणाईचे लोकप्रिय चॅनल झी युवावर सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता प्रसारित होणाऱ्या अंजली या मालिकेने
यशस्वी २०० एपिसोड पूर्ण केले आहेत. स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी चाललेल्या एका तरुण स्त्री डॉक्टरच्या
प्रवासाची कथा प्रेक्षकांची मने जिंकत आहे. सुरूची अडारकर साकारत असलेली डॉ. अंजली ही एक नाशिक जवळच्या
एका खेड्यातून आलेली मेहनती मुलगी आहे जी ग्रामीण भागातील लोकांची मदत करण्यासाठी मोबाइल रुग्णालय
उभारण्याचे स्वप्न बाळगते आणि तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी करण्यासाठी ती डॉ. जनार्दन खानापूरकरांच्या रुग्णालयात
काम करत आहे. डॉ. अंजली तिच्या मार्गात आलेल्या अनेक आव्हानांचा सामना निडरपणे करते.
मालिकेने २०० भाग पूर्ण केल्याचा आनंद संपूर्ण टीमने केक कापून साजरा केला. पण हा केक कापण्याचा मान मुख्य
कलाकारांनी मालिकेतील जुनिअर आर्टिस्ट्स जे डॉक्टर, वॉर्डबॉयज, रुग्ण, नर्सेस, आणि अशा अनेक भूमिका साकारत
आहेत त्यांना दिला आणि त्यावेळी बाकीची टीम त्यांना प्रोत्साहन देत होती. मालिकेच्या निर्मात्यांचा विश्वास आहे की
मोठ्या किंवा छोट्या अशा सर्वांच्या सहभागामुळेच हे अंजलीचे यश मिळाले आहे.
२०० भागांचा टप्पा गाठल्याच्या उत्सुकतेविषयी बोलताना, डॉ. अंजलीची भूमिका साकारणाऱ्या सुरूची आडारकर,
म्हणाल्या, ‘‘अंजली हे पात्र फक्त मालिका पाहणाऱ्या हजारो तरुण मुलींनाच नाही तर मला स्वतःला देखील माझी स्वप्नं
पूर्ण करण्यासाठी प्रेरित करते. डॉ. अंजलीची भूमिका साकारण्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. मला खात्री आहे
की प्रेक्षक आमच्या कामाची अशीच स्तुती करत राहतील आणि अंजलीला तिचे ध्येय गाठण्यासाठी मदत करतील.’’
डॉ. यशची भूमिका साकारणारे हर्षद अतकरी म्हणाले, ‘‘मी जेव्हा प्रथम ही कथा ऐकली होती तेव्हा माझ्या लगेच
लक्षात आले होते की अंजली मध्ये तरुणांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एक सशक्त संदेश देण्याची संभाव्यता आहे.
२०० वा टप्पा ही खरेतर नुसती सुरूवात आहे आमच्यासाठी आणि आमच्या या यशाचा मला अतिशय आनंद झालेला
आहे.’’
डॉ. असिमचे पात्र रंगविणारे अभिनेता पियुष रानडे म्हणाले, ‘‘एक अभिनेता म्हणून जेव्हा तुमचा शो 200 वा टप्पा
गाठतो तेव्हा खूपच छान वाटते, येणाऱ्या अनेक टप्प्यातील पहिला टप्पा. माझे सह-कलाकार आणि निर्माते माझे कुटुंब
बनले आहेत आणि ते माझ्यासाठी माझी ताकद सुद्धा आहेत. प्रेक्षकांनी आमच्या प्रयत्नांना नेहमीच पाठिंबा दिला आणि
त्यांचं मनोरंजन करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित केले आहे.’’
अंजलीच्या यशाविषयी बोलताना, झी युवा आणि झी टॉकिजचे बिझनेस प्रमुख, बवेश जानवलेकर म्हणाले, ‘‘झी
युवाच्या अंजली या मालिकेमधून आम्ही तरुणांना विशेषतः मुलींना त्यांच्या स्वप्नांचा मागोवा घेण्यासाठी प्रेरित
करण्याचा प्रयत्न करत आहोत. मालिकेने गाठलेल्या २०० भागांच्या टप्प्याने आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे
आणि आम्ही २०० वरून २००० पर्यंत तो जाईल अशी आशा व्यक्त करत आहोत. आमच्या अंजली या मालिकेविषयी
दाखविलेल्या प्रेम आणि अखंड पाठिंब्यासाठी आम्ही आमच्या प्रेक्षकांचे आभारी आहोत. आम्हाला खात्री आहे की ते या
मालिकेला असाच पाठिंबा देत राहतील.’’

‘बीएमसीसी’त शैक्षणिक पारितोषिक वितरण

0

 

पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
डॉ. उमराणी म्हणाले, ‘सकारात्मकता, विकासाचा ध्यास आणि खेळ यामुळे महाविद्यालयांमध्ये समृध्द शैक्षणिक वातावरण निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, संस्कृती आणि संस्कार मिळतात. ज्याचा उपयोग जीवनात अधिक चांगले यश मिळविण्यासाठी होतो.’
ते पुढे म्हणाले, ‘शिक्षणातील प्रगती तपासण्यासाठी परीक्षा आवश्यक आहेत.’ अकरावी, बारावी, बी. कॉम, बीबीए, बीसीए, एम. कॉम आदी परीक्षांतील २०० हून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. एम. ङ्गिलच्या बारा आणि पीएच. डीच्या सात विद्यार्थ्यांचा त्यात समावेश होता.
प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, डॉ. सुरेश वाघमारे, डॉ. आशीष पुराणीक, डॉ. एन. सी. नायकवडी, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. गौतम बेंगाळे, विद्यार्थी प्रतिनिधी शुभम पाटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाटेक २०१८ या व्यावसायिक प्रदर्शनात ३०० हून अधिक नामांकित कंपन्यांचा समावेश

0

 

पुणे:महाटेक – २०१८ हे औद्योगिक प्रदर्शनाचे उदघाटन कृषी महाविद्यालय पटांगण (नवीन), सिंचन नगर, शिवाजी नगर, पुणे येथे कोनक्रेन चे व्यवस्थापकीय संचालक श्री.सुहास बक्शी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महाटेकचे संस्थापक काकासाहेब मराठे, पालक मंत्री श्री गिरीश बापट (पुणे) आणि महापौर सौ.मुक्ता टिळक  हे प्रतिष्ठित अतीथी म्हणून उपस्थित राहिले होते .

या वेळी महाटेक चे संस्थापक श्री. काकासाहेब मराठे, श्री. विनय मराठे, संचालक(महाराष्ट्र इंडस्ट्री डिरेक्टरी), श्री राजेंद्र माली, संचालक (फायर प्लाय), कु. गौरी मराठे, डिजिटल मार्केटिंग हेड (मराठे इन्फोटेक), श्री पवन सिंह राठोड, सह-संस्थापक, (स्कूल ऑफ इन्स्पिरेशनल लेंडरशिप), सौ. वृषाली हुरडे, संचालिका (शारदा केबल ट्रेज) आदी. मान्यवर उपस्थित होते.

महाटेकने यावर्षी १४व्या वर्षात दमदार पदार्पण केले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उत्पादक आणि वितरकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. उत्पादन क्षेत्राची वाढ व आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदिजींचे व्हिजन ‘मेक इन इंडिया’ला पाठींबा हा महाटेक २०१८चा मूळ उद्देश आहे. महाटेक मध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे भारतीय सेवा क्षेत्रातील संधी यांचे प्रदर्शन भरविण्यात आलेले  आहे.  तसेच प्रत्येक विभागातील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध करणार आहेत.

यावेळी बोलताना कोनक्रेन चे व्यवस्थापकीय संचालक श्री.सुहास बक्शी म्हणाले,

” व्यवसाय मर्यादित ठेवू नका तो वाढवायचा प्रयत्न करा आणि व्यवसायात एकमेकांशी स्पर्धा करण्या पेक्षा एकमेकांना सहकार्य करा तरच आपले उद्योग हे देश विदेशात पसरतील. ”

यावेळी महाराष्ट्र इंडस्ट्रीज डिरेक्टरीचे संचालक विनय मराठे म्हणाले की,” गेल्या काही वर्षात महाटेकने स्वतःचा पाय भक्कमपणे रोवला असल्याने आज मॅनुफॅक्चरिंग इंडस्ट्री मधून मोठ्याप्रमाणावर मागणी आहे. पुणे आता जवळजवळ एक दशकांपासून एक विकसित जिल्ह्या असून शहराचा परिसरात स्थायिक झालेले अनेक नवीन उद्योग आहेत. यात अभियांत्रिक उद्योग हि मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. याच स्थानिक उद्योजकांसाठी नवीन तंत्रज्ञान तयार करणे आवश्यक आहे. प्रदर्शनामध्ये नामांकित कंपन्यांनी आपले स्टॉल बुक केले आहेत. शहरातील उद्योजक आणि नवीन उद्योजकांना माहिती मिळवून देण्याची ही उत्तम संधी आहे. तसेच या मध्ये छोट्या उद्योजकांसाठी ४ विविध परिषदांचे  आयोजन करण्यात आले आहेत”

महाटेक २०१८ या प्रदर्शनात  ३०० पेक्षा अधिक  कंपन्या सहभागी झालेल्या  असून आधुनिक उत्पादने, उपकरणे विपणनासाठी आणि विक्रीसाठी प्रदर्शनात उपलब्ध आहेत. या प्रदर्शनात प्रत्येक क्षेत्रातील उद्योजक सहभागी होत असून मोठ्या उद्योज कांपासुन ते लघु उद्योजकांपर्यत आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅंडपर्यंत सर्व घटकांचा समावेश आहे.  तसेच इतर उद्योजकांशी व्यावसायिक चर्चा होतात. यामध्ये देशभरातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योजकांचे अद्यावत तंत्रज्ञान, उपकरणे पाहता आणि खरेदी करता येणार आहेत. प्रक्रिया, उपकरणे, इलेकट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक, मशिनरी आणि मशीन टूल, इन्स्त्रूमेंटेशन आणि ऑटोमेशण उपकरणे या चार प्रकारामध्ये प्रदर्शनाचे वर्गीकरण करण्यात  आले आहे.

या मेगा प्रदर्शनामध्ये व्यक्तिगत पातळीवर व्यवसाय मार्गदर्शन आणि नेटवर्किंग संधी असल्याने बाजारपेठेतील बदलता ट्रेंड ओळखण्यास नवउद्योजकांना यामधून निश्चित सहाय्य मिळेल.

या प्रदर्शनात भाग घेतलेल्या काही नामांकित कंपन्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

Indian Tools-Birla Group Company, FS Compressors India, Suresh Indu Lasers Pvt. Ltd., Sharang Corporation, MGSTechnologies, SH Electronics co, Indo construction fastening systems (ICFS), SFS Equipments private limited, BDS Machines Private limited, Excellent handling systems Pvt Ltd., Energy Mission Machineries India Pvt ltd, Hiver Aircon private limited, Trilok lasers Pvt ltd, Innovative Solutions, Berlin Machine Corporation, Purvaj Engineers, Rajesh machines (India) LLP, Mikro Innotech India Pvt ltd, SFS Equipments private limited, Fuel instruments

  • व्हेंडर डेव्हेलपमेंट मीट:

आमच्या महाटेकच्या प्रदर्शकांसाठी, शुक्रवार, ९ फेब्रुवारी २०१८ ला सकाळी १०.३० ते ५.३० ला आगामी येणाऱ्या  महाटेक २०१८ मध्ये विक्रेता विकास परिषद आयोजित करण्याचा मनसुबा आहे. प्रदर्शक एसेमीना विक्रेता विकास परिषदेचा फायदा होईल. ओईम खरेदीदार व एसेमी विक्रेत्यांमध्ये माहितीची सुलभ देवाण -घेवाण, विक्रेता नोंदणी प्रक्रियेची माहिती, संबंधित कायदे व नियम, ओईम चे नियम हा ह्या परिषदेचा उद्देश आहे.

 

  • GST कि बात:

हि परिषद महाटेक कडून दि.१० फेब्रुवारी २०१८ रोजी १०.३० ते १.३० ला आयोजित करण्यात आलेली आहे.

या मध्ये GST आणि SMEs या विषयावरील मार्गदर्शन श्री. मानस जोशी MCCIA चे समिती सदस्य यांच्या कडून मिळणार आहे.हा  जीएसटीवर विविध कंपन्यांना ऑनलाइन पाठिंबा देण्यासाठी एक विशेष मंच आहे. या परिषदे मध्ये अशा गोष्टीन वर चर्चा होणार आहे कि जे उद्योगान मध्ये जीएसटीचे पालन करताना काही समस्यांना तोंड द्यावे लागते, बजेट मधील जीएसटीतील महत्वाचे बदल व परिणाम, ई-वे बिल संबंधित तरतुदी समजून घेणे, या परिषदेत वित्त, कर, लॉजिस्टिक्स,अकाउंटिंग, आयटी, शैक्षणिक, वित्त कंट्रोलर्स, सीएफओ, पार्टनर्स, मॅनेजर्सचे सर्व व्यावसायिक सहभागी  होणार आहे .

 

  • SME’s साठी डिजिटल मार्केटिंग:

त्याच दिवशी दुपारी २.३० ते ५.०० या वेळेत डिजिटल मार्केटिंग या विषयावर परिषद होणार आहे. SMEs वर विविध प्रकारच्या डिजिटल मीडियाद्वारे ब्रँडला प्रोत्साहन आणि लोकप्रिय करण्यासाठी हा मुख्य उद्देश आहे. डिजिटल मीडिया चॅनेलचे लाभ जसे की वेबसाइट, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO), सर्च  इंजिन मार्केटिंग, सोशल मिडिया मार्केटिंग, रीस्ट्रॉल्टिंग आणि रीमार्केटिंग.

  • एन्त्रेप्रेनेऊरशिप डेव्हलोपमेंट परिषद :

हि परिषद दि.११ फेब्रुवारी २०१८ ला सकाळी १०.३० ते ५.०० या वेळेत ठेवण्यात आलेली आहे. या परिषदे मध्ये स्कूल  ऑफ  इन्स्पिरेशनल लीडरशिप कडून व्यवसाय कसा यशस्वी बनवायचा व येणाऱ्या संकटाना कसे सानोरे जायचा यावर मार्गदर्शन देण्यात येणार आहे.याचा उपयोग उद्योजकांना व  नवीन व्यावसायिकांना होणार आहे.

हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले आहे.

परंपरेतुन उलगडणार “विरासत’’

0

 

चार गुरु-शिष्यांचे पहिल्यांदाच एकत्रित सादरीकरण

१५ फेब्रुवारीला रंगणार मैफिल

लुई बॅंक्स – जिनो बॅंक्स (पिता-पुत्र), विद्वान विक्कू विनायकराम – सेल्वा गणेश (पिता-पुत्र), गणेश राजगोपालन – कुमरेश राजगोपालन (भाऊ) आणि तौफिक कुरेशी – उस्ताद झाकीर हुसेन (भाऊ)

 

पुणे – हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये गुरु – शिष्य परंपरा दीर्घकालीन आहे. सांगीतिक घराण्यांसह एकाच घरातील, रक्ताच्या नात्यातील गुरु आणि शिष्य यांचे या सांगीतिक परंपरेत एक वेगळे स्थान आहे. अशाच रक्ताच्या नात्यातील गुरु – शिष्यांच्या सुप्रसिद्ध चार जोड्यांच्या सादरीकरणातून पारंपरिकतेबरोबरच आधुनिक संगीताची अविस्मरणीय, अदभूत अशी ‘विरासत’ पुणेकरांना अनुभवता येणार आहे.  अशी माहिती प्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मिराज क्रिएशन्स आयोजित, राहुल रानडे यांची संकल्पना आणि प्रस्तुती असलेली ‘विरासत’ ही अनोखी संगीत मैफल येत्या १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वा. महालक्ष्मी लॉन्स , डी.पी. रस्ता, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर येथे संपन्न होत आहे. यात रक्ताचे नाते असण्याबरोबरच गुरु – शिष्य असे नाते असलेल्या सुप्रसिद्ध अशा ८ ज्येष्ठ कलावंताचे एकाच व्यासपीठावरती होणार्‍या एकत्रित सादरीकरणाची अनुभूती रसिकांना घेता येणार आहे. या कार्यक्रमात दोन ग्रॅमी व पद्मभूषण पुरस्कर्त्यांचे वादन एकाच रंगमचावर ऐकण्याची दुर्मिळ संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘विरासत’ मधे ग्रॅमी पुरस्कार विजेते प्रसिद्ध घट्टंम वादक पद्मभूषण विक्कू विनायकराम व त्यांचे सुपुत्र सेल्वा गणेश आणि ज्येष्ठ वादक तैफिक कुरेशी – प्रसिद्ध तबलावादक ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसैन हे सुप्रसिद्ध बंधू समाविष्ट होणार आहेत, शिवाय प्रसिद्ध वादक लुई बॅंक्स – जिनो बॅंक्स ही पिता – पुत्रांची जोडी,  कर्नाटकचे प्रसिद्ध व्हायोलीन वादक गणेश – कुमरेश हे दोघे भाऊ असले तरी त्यांच्यात गुरु – शिष्य नाते आहे, अशा कलावंतांचा समावेश आहे.  यातील गुरु – शिष्यांचे एकत्रित सादरीकरण अनेकदा बघायला मिळते मात्र चार गुरु – शिष्य, बंधू, पिता – पुत्र अशा जोड्यांचे एकाच वेळी सादरीकरण हे ‘विरासत’चे खास वैशिष्ट्य असून असा दुर्मिळ योग पहिल्यांदाच घडणार आहे.

‘विरासत’ विषयी अधिक माहिती देतांना राहुल रानडे म्हणाले की देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात होत असलेली ‘विरासत’ ही फक्त सांगीतिक मैफल नाही तर यातून आपली पुणेरी

परंपरा उलगडणार आहे. मुख्य रंगमंचाला शनिवारवाड्याचा लुक असेल तर मुख्य प्रवेशद्वारावर नऊवारी साडीतील स्वागतिका संगीत मैफलीला येणाऱ्या संगीत रसिकांचे स्वागत करणार आहेत. येथील सजावट आणि एकूण प्रकाशयोजना अस्सल भारतीय संगीत परंपरेला साजेशी असणार आहे. निवेदनातही ‘विरासत’ जपलेली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ आणि त्यांचा मुलगा केतन गाडगीळ ही पिता – पुत्राची जोडी करणार आहे.

पुण्याच्या ‘विरासत’ मधे मानाचं स्थान असलेले पद्मविभूषण डॉ. के. एच, संचेती व त्यांची धुरा पुढे चालवणारे त्यांचे सुपुत्र डॉ. पराग संचेती आणि कन्या सौ. मनीषा संचेती-संघवी, यांचा या निमित्ताने सत्कार करण्यात येणार आहे.

या मैफलीच्या व्यवस्थापनात श्याम भूतकर यांनी रंगमंच, हर्षवर्धन पाठक यांनी लाईट्स, मुजीब दादरकर यांनी ध्वनी संयोजन, सचिन नाईक यांनी ध्वनीयंत्रणा, तर जाहिरात डिझाईन मिलिंद मटकर यांनी केले आहे. मैफलीचे इव्हेंट मेँनेजमेंट ‘ए – फील्ड प्रा. ली.’ तर पी.आर. ‘लीड मिडिया’ सांभाळत आहे असे रानडे यांनी सांगितले.

‘विरासत’ या भव्य कार्यक्रमाचे प्रायोजक स्टेट बँक ऑफ इंडिया, आय.आर.बी, विलास जावडेकर असोसिएट्स असून विविध पार्टनर्स पू. ना. गाडगीळ (नळ स्टॉप शोरूम), केसरी टूर्स, गिरिकंद हॉलिडेज, धीरेंद्र आऊटडोअर मीडिया सर्व्हिसेस व रेडिओ सिटी आहेत.

या कार्यक्रमाची तिकिट विक्री बुक माय शो वर ऑनलाईन चालू असून प्रत्यक्ष तिकिटे बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सकाळी ९ ते ११.३० व संध्याकाळी ५ ते ७ मधे मिळू शकतील. ग्रुप बुकिंगसाठी ९१४५५०८०८८ या नंबरवर संपर्क साधता येणार आहे असेही रानडे यांनी नमूद केले.

पैसे नाही रे भाऊ … निराधार, वंचित, उपेक्षित घटकांसाठी सुरू असलेल्या महापालिकेतील योजना बंद

0

पुणे : शिवसृष्टीसाठी हवा तेवढा निधी उपलब्ध करवून देवू ,सायकल मार्गासाठी ३५0 कोटी खर्च करू ,मेट्रो चा प्रकल्प धुमधडाक्यात करू ..पुरंदरला विमान तळ उभारू …आणि सामन्य माणसाला अच्छे दिन मिळवून देवू  अशी हाकाटी पिटणाऱ्या सत्ताधारी भाजपने समाजातील निराधार, वंचित, उपेक्षित घटकांसाठी सुरू असलेल्या महापालिकेतील  योजना बंद करण्याचा निर्णय  घेतला. पैसे नसल्याचे अनाकलनीय कारण यासाठी देण्यात आले आहे. पक्षनेत्यांची बैठक महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी महापौर कार्यालयात झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

माता रमाई योजना, बाबा आमटे योजना अशी त्यांची नावे आहेत. निराधार महिला, अपंग, गतीमंद अशांना त्यातून आर्थिक मदत देण्यात येत असते. अनेक गरजूंना या योजनेचा उपयोग झाला आहे.
सुमारे १५ कोटी रुपये या योजनांसाठी लागतात. तशी तरतूदही अंदाजपत्रकात केली जाते. मागील वर्षी मात्र प्रशासनाने फक्त ५ कोटी रूपयांचीच तरतूद केली होती. आता आर्थिक वर्ष संपण्यास अवघे दोन महिने शिल्लक असताना प्रशासनाने योजना बंद करण्याचा प्रस्ताव दिला व त्याला सत्ताधारी भाजपाने मान्यताही दिली.

सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, मनसेचे वसंत मोरे, शिवसेनेचे संजय भोसले आदी बैठकीला उपस्थित होते.
महापालिकेच्या वतीने गेली अनेक वर्षे या योजना राबवल्या जात आहे.
बैठकीत राष्ट्रवादी काँगेसने योजना बंद करण्याला विरोध केला. मात्र अन्य पक्षांच्या पाठिंब्याअभावी ते एकटे पडले. किमान जे अर्ज आले आहेत त्यांची छाननी करावी व त्यांना तरी मदत करावी अशी मागणी करण्यात आली. २७ हजार अर्ज आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. मात्र ते अमान्य करण्यात आले. उलट या योजनांसाठी ठेवलेली ५ कोटी रुपयांची तरतूदही दुसऱ्या योजनेसाठी वर्ग करण्याला मान्यता देण्यात आली. कोट्यवधी रुपयांच्या जादा दराच्या निविदांना सहज मंजूरी देणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून उपेक्षित समाजघटकांवर होणारा हा अन्याय खेदजनक आहे, असे याविषयी बोलताना तुपे यांनी सांगितले. २७ हजार अर्जदारांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार असल्याची टीका त्यानी केली.