Home Blog Page 3190

धर्मनिरपेक्ष छत्रपती शिवाजी महाराज देशाला समजले पाहिजेत…

0

‘शिवजयंती’ देशभर साजरी झाली पाहिजे…

पुणे-स्त्रियांचा सर्वोच्च सन्मान करत रयतेला आधार देणारे, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू न देणारे खरे संरक्षक म्हणजे कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज होय. आजची ३८८ वी ‘शिवजयंती’ हि जातीयवाद व धर्मवादाला मुठमाती देणारी धर्मनिरपेक्ष राज्य व्हावे… यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिवरायांचे शेतकरी धोरण आज अवलंबले पाहिजे. कारण सध्याच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांसोबत कुटूंबातील सदस्य ही आज आत्महत्या करत आहेत. धर्मा पाटील यांची राज्याच्या सर्वोच्च सभागृहासमोरील आत्महत्या हि राज्यकर्त्यांचे अपयश आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. म्हणून ३८८ वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व आदर्शाची गरज वाटते… हाच त्यांच्या समतावादी धर्मनिरपेक्ष विचारांचा विजय आहे. म्हणून देशाला शिवराय कळण्यासाठी… शिवजयंती देशभर साजरी केली पाहिजे… असे मत संभाजी ब्रिगेड’चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.

संभाजी ब्रिगेड च्या वतिने SSPMS येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी महिलांचा पाळणा घेण्यात आला.

यावेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, Vbvp च्या प. म. उपाध्यक्ष कु. पुजा झोळे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, अॕड. मिलींद पवार, छावा क्रांतिवीर सेनेच्या अध्यक्ष छायाताई खैरणार, विठ्ठल सुर्यवंशी, सुवर्णा बनबरे, प्रा. प्रतिमा परदेशी, अॕड. किरण कदम, अजय पवार, सचिन जोशी, प्रदिप तांबे, आदी शिवप्रेमी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष माळी समाजाचे नेते जंयत ससाणे यांचे निधन

0

श्रीरामपूर : येथील काँग्रेसचे माजी आमदार आणि शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष आणि माली समाजाचे नेते जंयत ससाणे यांचे सोमवारी सकाळी निधन झाले.  त्यांच्या पश्चात पत्नी राजश्री, मुलगा करण आहे.
ससाणे दोन वेळा श्रीरामपूरचे आमदार होते. त्यांनी १० वर्षे नगराध्यक्षपदही भूषविले होते. मुळा-प्रवरा वीज संस्थेचे संचालक आणि काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरही त्यांनी काम केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते फुफ्फुसाच्या कर्करोगाने आजारी होते. सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी आमदार जयंत ससाणे यांच्या निधनामुळे एक सक्रिय, सजग आणि संवेदनशील लोकसेवक हरपला आहे. ते माझे मित्र आणि निकटचे सहकारी होते. त्यांच्या निधनाने आम्ही कुटुंबातील एक सदस्य गमावला आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.

‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने शिवजयंती मिरवणूकीतील स्वराज्य रथांचे स्वागत

0
पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वागतकक्ष उभारण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित मिरवणूकीतील शिवभक्तांचे स्वागत करण्यासाठी हा स्वागतकक्ष पुणे महानगरपालिका येथे उभारण्यात आला होता.
मिरवणूक मंडळातील पदाधिकाऱ्यांचे श्रीफळ देऊन पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आलेयावेळी माजी उपमहापौर दीपक मानकर ,कारण मानकर तसेच पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, अशोक राठी, नगरसेवक सचिन दोडके, राकेश कामठे, रुपाली चाकणकर, नीलेश वरे, सुकेश पासलकर, प्रदीप देशमुख, शंकर शिंदे, युसूफ शेख, गणेश नलावडे, सुनिता मोरे महेश हांडे,नितीन राठोड रोहन पायगुडे अरुन गवळे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

एकात्म, एकसंघ होण्यासाठी महापुरुष हे प्रेरक शक्ती-डॉ. श्रीपाल सबनीस

0

पुणे : महापुरुष हे कोण्या एका जातीचे, धर्माचे नसतात. सर्वसामान्यांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचा जीवनसंघर्ष असतो. त्यामुळे जातीधर्मापलिकडे जाऊन एकात्म व एकसंघ होण्यासाठी शिवाजी महाराज यांच्यासह अनेक थोर महापुरुष हे प्रेरक शक्ती आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सोमवारी (दि. 19) केले.

महावितरण व महापारेषणच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य वक्ते म्हणून डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. रोहिदास मस्के तर प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता सर्वश्री महेंद्र दिवाकर, अनिल कोलप, सुंदर लटपटे, सतीश गायकवाड, जयंत कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, शिवाजी महाराजांनी माणुसकीच्या मुल्यावर आधारित स्वराज्य निर्माण केले. सर्व जातीधर्माचे सहकारी सोबत घेतले. त्यामुळे वर्तमानातील प्रश्न सोडविण्यासाठी तसेच भविष्यकाळ सुधारण्यासाठी शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वातील व इतिहासातील प्रेरक सुत्र स्वीकारली पाहिजेत. यावेळी मुख्य अभियंता श्री. रोहिदास मस्के यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. बाबा शिंदे यांनी केले तर श्री. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. शिवाजी वायफळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महावितरण व महापारेषणमधील अभियंते, अधिकारी, कर्मचारी व सर्व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर तसेच सर्व संघटनांचे पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला.

अमृता सुलतान खिलजीची दिवानी!

0

जिने आपल्या नृत्य आणि अभिनय कौशल्याने सर्वांना घायाळ केलं अशी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर हि कोणाची fan आहे, हे तिच्या social media अकाउंट्स वरून आपल्याला समजलंच असेल. जिचा अख्खा महाराष्ट्र दिवाना आहे ती दिवाणी आहे बॉलीवूडच्या सुलतान खिलजीची म्हणजेच रणवीर सिंगची.

नुकत्याच झालेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या कार्यक्रमात अमृताला आमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्याच कार्यक्रमात रणवीर सिंग सुद्धा हजेरी लावणार, हे अमृताला समजल्यावर तिची उत्सुकता शिगेला पोहोचली. या गोष्टीची दाखल घेत रणवीर सिंग स्वतः अमृताला तिच्या व्हॅनिटी मध्ये भेटायला गेला आणि इतकाच नव्हे तर त्याच्या “खलिबली” या गाण्यावर डान्स सुद्धा केला. अमृता आणि रणवीर यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर खुपचं वायरल झाल्याचे समजते. अमृताने तिची फॅन गर्ल मुव्हमेंट तिच्या चाहत्यांसोबत share करत तिने रणवीरला थँक यु सुद्धा म्हंटलं.
नुकत्याच झालेल्या DID फायनल मध्ये अमृताने एक बहारदार नृत्य सादर केले. तसेच ती लवकरच मेघना गुलज़ार हिच्या “राज़ी” या चित्रपटात आलिया भट्ट आणि विकी कौशल सोबत दिसणारं आहे.

 

हडपसर मध्ये ४ एकरातील बागेच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

0

पुणे-हडपसर सर्वे नं ४८ (श्री राम चौक मागील बाजूस ) नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे व नगरसेवक  घुले यांच्या विकास निधीतुन सुमारे ४ एकर क्षेत्रावर अद्यावत बागेच्या ( गार्डन) उभारणीच्या कामाचे भूमिपूजन काल  प्रभागातील जेष्ठ मंडळींच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगरसेविका सौ. प्रची आशिष आल्हाट व चिंतामणी नगर, उद्योग नगर, सातव नगर, व काळेपडळ परिसरातील विविध मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

10 हजार विद्यार्थ्यांची मिरवणुकीद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

0

पुणे :‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील विद्यार्थ्याच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

आज सोमवारी सकाळी साडे आठ वाजता संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. एकूण दहा हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

मिरवणुकीचे हे 17 वे वर्ष होते.मिरवणुकीचे नेतृत्व संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी केले.आझम कॅम्पस ते लाल महाल असा या मिरवणुकीचा मार्ग होता.

संस्थेच्या कला महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘समतावादी छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर आधारित ‘बारा बलुतेदार’ हा देखावा मिरवणुकीचे आकर्षण ठरला.मिरवणूकीत दरबार ब्रास बॅण्डची दोन पथके, ढोल-ताशांचे पथक, तुतारी, नगारे, छत्रपती शिवाजी महाराजांची तैल चित्रे असलेली गाडी सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांच्या हातात ‘जाणता राजा’, ‘समतेचा पुरस्कार्थी राजा’, ‘स्त्रियांचा आदर करणारे राजे’, ‘रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे राजे’ ‘शेतकर्‍यांचा कैवारी’ आदी घोषवाक्यांचे फलक होते.मिरवणुकीत शाहीद इनामदार, वाहिद बियाबानी, सिकंदर पटेल, शाहीद मुनीर शेख, डॉ. शैला बूटवाला, डॉ. व्हि.एन.जगताप, डॉ. किरण भिसे, प्रा. रबाब खान, प्रा. आयेशा शेख, प्रा. परवीन शेख, प्रा. गफार सय्यद, प्रा. गुलजार शेख, प्रा. मजिद सय्यद, प्रा. हेमा जैन, प्रा. इरफान शेख, पदाधिकारी, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

स्वत:तील कौशल्य जाणूनच करिअर निवडा प्रसिद्ध फॅशन डिझायनर राघवेंद्र राठोड यांचे मत

0

पुणे : आपण जे शिक्षण घेत आहोत ते समजून घेण्याची आवड, मानसिकता आणि कौशल्य असेल तरच त्या क्षेत्रात उत्तम करिअर होऊ शकते. आपल्या ज्ञानाबरोबरच बाजारात कशाची मागणी आहे हे समजून ती गोष्ट उपलब्ध केली तर आपला समाजाला फायदा होतो. स्वत:चे कौशल्य काय आहे, हे जाणून घेऊनच करिअरची निवड करावी, असे मत प्रसिद्ध फॅशन डिझायनर राघवेंद्र राठोड यांनी व्यक्त केले.

२१व्या शतकातील फॅशन डिझायनिंग क्षेत्राचे शैक्षणिक महत्त्व आणि त्याच्या बदलत्या प्रभावामुळे मानवी जीवनावर पडणारे विविध पैलू याविषयी प्रसिद्ध फॅशन डिझायनर राघवेंद्र राठोड यांनी आज पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हॉटेल जे डब्ल्यु मेरियट येथे या कार्यक्रमाचे गुरुकुल फॅशन डिझायनिंग स्कूलतर्फे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

फॅशन डिझायनिंग हे क्षेत्र वेगळं आहे. या क्षेत्राची गरज ओळखून काम करण्याला विशेष महत्व आहे. विद्यापीठात शिक्षण घेणे महत्वाचे असले तरी त्या शिक्षणाचा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी किती उपयोग करता येईल. याचा विचार करुन काम केले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रातले शिक्षण घेत असताना पाच वर्षानंतर त्याचा स्वत:ला आणि समाजाला किती फायदा होणार आहे, याचाही विचार व्हायला हवा, असेही राठोड म्हणाले.

सर्वसाधारणपणे बाजारात जे मिळते त्याकडे लोकांचा कल नसतो. प्रत्येक वेळी समाजाच्या वेगळ्या मागण्या असतात. त्या मागण्यांची पूर्तता करता आली, तर फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात करिअर होऊ शकते. ज्यांना फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करायचे आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल स्कूल ऑफ डिझाईन सुरु करण्यात आले आहे. ज्यामध्ये समाजाच्या मागण्यांचा पूर्ण अनुभव घेऊन फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील शिक्षण दिले जाते. फॅशन, टेक्सटाईल, ग्राफीक, संवाद कौशल्य, मार्केटींग आदी विषयांबाबत प्रात्यक्षिकांसह शिक्षण दिले जाते, असेही राठोड म्हणाले.

सावधान ..बँकांवरचा विश्वास कमी होतो आहे …

0

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर ..पंजाब बँकेला टोपी घालून गेलेला निरव मोदी या छायाचित्रात दिसतो आहे . हे छायाचित्र व्हायरल झाले आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत ..ललित मोदी या छायाचित्रात दिसतो आहे . हे छायाचित्र व्हायरल झाले आहे .
पुढच्या रांगेत पंतप्रधान मोदी.. आणि मागच्या रांगेत बँक लुटारू निरव मोदी
एका आंदोलनाचे छायाचित्र

पंजाब नॅशनल बँक(पी.एन.बी) ११,४०० कोटी रुपयांचा गंडा घालून परदेशात पळालेले नीरव मोदी,मेहुल चोक्सी यांना अटक करून सरकार यांच्या कडून पैसे वसूल करणार का? हा प्रश्न जनतेला भेडसावत आहे,
अगोदरच जनतेचा व विशेषतः ठेवीदारांचा बँकावरील विश्वास उडत चालला आहे.आज सार्वजनिक क्षेत्रातील बड्या बँका ह्या कर्जाच्या विळख्यात सापडल्या आहेत.पी.एन.बी मधील काही अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने नीरव मोदी व त्याच्या साथीदारांनी हा डल्ला मारला आहे.हे एकट्या मोदीचे काम नव्हे.त्याला राजकीय आशिर्वाद ही असू शकतो.या निमित्ताने बँकिंग क्षेत्रात नितीमत्तेची , प्रामाणिक तेची कशी दिवाळी-खोरी निघाली आहे याची प्रचिती जनतेला येत आहे.

 

बँकांना लुटून परदेशात पळून गेलेला मल्ल्या .. ची हि छायाचीते व्हायरल झालेली आहेत .. पहा कशी ऐश ..करतात ..ही चोर मंडळी …

एरवी सामान्य माणूस कर्ज मागायला बँकांच्या दारात गेल्यास त्याच्या कडून अनेक कागदपत्र व तारण घेऊनही त्याला कर्जासाठी हेलपाटे मारायला लावणाऱ्या बँक बड्या उद्योगपतींना विना तारण विना ग्यारंटी कर्ज देण्यासाठी पायघड्या घालत आहे.हा सर्व जाणून बुजून व ठरवून झालेला प्रकार आहे.
एकटी पंजाब नॅशनल बँक नव्हे तर बँक ऑफ इंडिया,बडोदा बँक,भारतीय स्टेट बँक व इतर बँकांमधून मागील पाच वर्षात ६१हजार कोटीचे गैरव्यवहार झाला आहे.हे आकडे जनतेला भयभीत करणारे आहेत.हा गैरव्यवहार करणारे व्यापारी,उद्योगपती व बँक कर्मचारी हे लुटारू असून (व्हाईट कॉलर चीटर) यांनी बॅंका बुडवायला सुरवात केली आहे.इथे घोटाळे करून परदेशात पळून जाणे सोपे झालेले दिसते.प्रथम ललित मोदी.विजय मल्ल्या यात यशस्वी झाले.त्यांना आजपर्यंत पकडण्यात किंवा पैसे वसूल करण्यात अपयश आलेले दिसते.
सरकार कोणत्याही पक्षाचे असो.एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून ह्याचा राजकीय लाभ उठवण्या पेक्षा अशा लुटारूंवर कारवाई करून जरब बसवायला हवी.तरच अर्थव्यवस्थेला शिस्त लागेल.
आज देशात भाजप चे सरकार आहे त्यांच्या नेत्यांच्या मते ह्यांची सुरुवात 2011 मध्ये म्हणजे यु.पी.ए च्या काळात झाली. तर काँग्रेस चे म्हणणे आहे की ही मंडळी पळून जाई पर्यंत रिझर्व बँक व अर्थमंत्रालाय व इतर कोणीच जबाबदार घटकांनी कारवाई का केली नाही. मोठे आर्थिक व्यवहार जिथे चालतात तिथे काटेकोर लेखापरीक्षक (ऑडिट) केले जाते त्यांच्याही लक्षात गोष्टी येऊ नयेत म्हणजे संशयाला नक्कीच जागा आहे.

 

ललित मोदी..पहा बड्या नेत्यासमवेत
ललित मोदी आणि विजय मल्ल्या


“त्यांना (काँग्रेसला) ६० वर्षे दिलीत आम्हाला (भाजपला) ६० महिने द्या!”तसेच “ना खाऊंगा ना खाने दुगा असे म्हणत सतेवर आलेले पंतप्रधान नरेंद मोदी अर्थमंत्री अरुण जेटली व एकूणच सरकाने ह्या विषयाचे राजकारण न करता ह्या गुन्हेगारांची पाळेमुळे खणून त्यांच्या भोवतालचा फास आवळून त्यांना कडक शिक्षा व पैसेही वसूल केले पाहिजे.अन्यथा आता ही विषवल्ली फोफावत जाऊन असे अनेक मोदी व मल्ल्या निर्ढावतील.
नागरिक जेंव्हा आपल्या कष्टाचा पैसा बँकांमध्ये ठेवतात तेंव्हा त्याचा पूर्ण  विश्वास असतो. आज अनेक बँका दिवाळखोरीत निघत आहेत.ठेवीदारांना लग्नकार्यासाठी,आजारपणासाठी पैसे मिळत नाहीत.व हे उद्योगपती,व्यापारी हे हजारो कोटी घेउन परदेशात पलायन करीत आहे.त्यामूळे सामान्य ठेविदारांच्या बँकावरील विश्वास कमी होत चालला आहे.तेव्हा ह्या समाजकंटाकाच्या च्या मुसक्या आवळ्ल्या पाहिजे. खरे तर पूर्वी बँकांमध्ये घुसून बँकावर दरोडे टाकण्यात येत तेव्हा बँक अधिकारी बहुधा अशा दरोड्यात सामील नसत .उलट त्यांना हानी पोहोचत . पण आता बँकांचे ग्राहक होऊन, अधिकाऱ्यांशी संगनमत करून हजारो कोटींचे काटज घेऊन ते बुडवून जाणाऱ्यांना ..दरोडेखोरच म्हटले पाहिजे ..आणि पूर्वीच्या दरोडेखोरांवर होत तशीच कारवाई यांच्यावर देखील व्हायला हवी .. वेळीच अशी कारवाई झाली नाही आणि असे दरोडे वाढत गेले तर साहजिकच बँकात पैसे ठेवायला कोणी पुढे येणार नाही . आणि बँकात पगार जमा करणार असेल अशी नौकरी कोणी स्वीकारणार नाही .. बड्या लुटारूंना साथ देणाऱ्या बँकांवर लोकांनी बहिष्कार टाकण्याची वेळ या देशात येणार आहे काय ? असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही .

 

स्थायीच्या चेअरमनचे नाव मुख्यमंत्री आणि खा. काकडे यांच्याकडून निश्चित

पुणे : पुणे महापालिका स्थायी समितीच्याअध्यक्षपदासाठी यावेळी कोणाला संधी द्यायची या नावावर मुख्यमंत्री फडणवीस आणि खासदार संजय काकडे यांनी निर्णय निश्चित केल्याचे वृत्त आहे . दरम्यान काल प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे , पालकमंत्री गिरीश बापट , भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले एकत्र असूनही या विषयावर त्यांनी आपसात काही चर्चा केली किंवा कसे याबाबतची माहिती मात्र मिळू शकली नाही .दरम्यान स्थायीचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी  नगरसेवक सुनील कांबळे आणि हेमंत रासने यांनी नेत्यांकडे फिल्डींग लावली आहे. त्यामुळे ..कौन बनेगा चेअरमन .. याबाबत आता महापालिकेच्या वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे .

स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त झाल्याने या जागांसाठी पुढील आठवड्यात निवड होणार आहे. त्यात विद्यमान अध्यक्ष मुरलीधर माहोळ यांच्यासह भाजपच्या चार, राष्ट्रवादीचे दोन, कॉंग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. भाजपकडे चार जागांसाठी तब्बल 24 नगरसेवकांनी अर्ज केले आहेत. विद्यमान अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना सदस्य म्हणून पुन्हा संधी मिळण्याची शक्‍यता असून उर्वरित तीन जागांसाठी जोरदार स्पर्धा आहे.तर शिवसेनेत ही नाना भानगिरे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे . कॉंग्रेस मध्ये अविनाश बागवे यांना पुन्हा संधी देण्याशिवाय पर्याय  नसल्याचे सांगण्यात येते . दरम्यान आपल्या प्रभागातील अन्य सदस्यांची नावे गटनेते अरविंद शिंदे रेटून धरतील कि आबा बागुल आणि अविनाश बागवे यांना पाठींबा देतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे . कॉंग्रेस मध्ये  इनमिन तीन हुशार  असल्याचे आजवर दिसून आले आहे बागुल ,बागवे आणि शिंदे यांच्या शिवाय अन्य कोणाचाही विशेष प्रभाव महापालिकेच्या राजकारणात पडलेला दिसत नाही .पालिकेच्या मुख्य सभागृहात , आणि विविध समितींच्या सभागृहात एकंदरीत पालिकेच्या राजकारणात कॉंग्रेस कडे हे तीनच एकांडे शिलेदार असल्याचे दिसून आले आहे .  कोणाला संधी दिल्याने त्याचा फायदा पक्षाला आणि जनमानसाला  होणार आहे याचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे .या परिस्थितीत बागवे यांना पुन्हा संधी द्यायची नाही असे ठरले तर आबा बागुलांना संधी दिलेले पक्ष हिताचे  ठरणार आहे .

भाजपा मधील इच्छुक 24 नावांमधून अंतीम चार नावे निवडताना  शहराध्यक्ष गोगावले यांना मोठी कसरत करावी लागते  आहे. त्यातच काही जणांनी नेत्यांमार्फत दबाव आणण्यास सुरवात केली आहे. रिक्त झालेल्या एकूण आठ नव्या जागा भरल्या जाणार असून त्यात भाजप चार, राष्ट्रवादी दोन, कॉंग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.

भाजपच्या नावामध्ये सुनील कांबळे, मंजुषा नागपुरे, हेमंत रासने, माधुरी सहस्त्रबुद्धे, मानसी देशपांडे, राणी भोसले, स्मिता वस्ते, कविता वैरागे यांच्यासह अन्य काही नावांची चर्चा आहे.

कांबळे व रासने यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद हवे असल्याने त्यांनी तशी तयारी सुरू ठेवली आहे.स्थायी समितीचे अध्यक्षपद महिला सदस्याला द्यावे त्यासाठी मंजुषा नागपुरे  यांनी मोहीम आखली आहे .
शिवसेनेच्या वाट्याच्या एका जागेसाठी बाळा ओसवाल, नाना भानगिरे, संगिता ठोसर हे इच्छुक आहेत.. राष्ट्रवादीकडे देखील दोन जागा असून यावर तब्बल 25 जणांनी दावा केला आहे.

स्थायी समिती म्हणजे महापालिका  तिजोरीच्या  चाव्या असे समीकरण आहे . या दृष्टीने स्थायी समिती साठी आता इच्छुकांनी जोरदार मोहीम  सुरु केली आहे .

रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग स्पर्धेत सिटी प्राईड सुपरस्टार्स संघाला विजेतेपद

0

पुणे- डेक्कन जिमखाना तर्फे आयोजित अनिल. जी. रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग स्पर्धेत अंतिम फेरीत श्रीनिवास चाफळकर(40धावा व 1-9)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सिटी प्राईड सुपरस्टार्स संघाने हॉग्स संघाचा 31 धावांनी पराभव करून विजेतेपद संपादन केले.

डेक्कन जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत पहिल्यांदा फलंदाजी करताना सिटी प्राईड सुपरस्टार्स संघाने 7षटकात 1बाद 78धावांचे आव्हान उभे केले. यात श्रीनिवास चाफळकरने 20चेंडूत 1चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 40धावा व  प्रतीक वैद्यने 14 चेंडूत 1चौकार व 1 षटकारांच्या मदतीने नाबाद 24धावा केल्या. श्रीनिवास चाफळकर(40धावा) व प्रतीक वैद्य(24धावा)यांनी पहिल्या गड्यासाठी 26 चेंडूत 58धावांची भागीदारी करून संघाला भक्कम अशी धावसंख्या उभारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना सिटी प्राईड सुपरस्टार्स संघाच्या भेदक गोलंदाजीपुढे हॉग्स संघाचा डाव 7षटकात 4बाद 47धावावर आटोपला. यात मंदार चितळे 12(11), आदित्य गांधी 11यांच्या धावा वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकला नाही. सिटी प्राईड सुपरस्टार्सकडून सचिन गोडबोले 2-7, अर्जुन मेहता 1-5, श्रीनिवास चाफळकर 1-9यांनी अफलातून गोलंदाजी करून संघाचा विजय सुकर केला. सामन्याचा मानकरी श्रीनिवास चाफळकर ठरला.

याआधीच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात प्रतीक वैद्य(2-3)याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सिटी प्राईड सुपरस्टार्स संघाने वाडेश्वर विझार्डसचा 7 गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली.दुसऱ्या सामन्यात हर्षल गंद्रेच्या उपयुक्त 37धावांच्या जोरावर हॉग्स संघाने स्पार्टन्स संघाचा 8गडी राखून पराभव केला.

स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी आकर्षक पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉ.अनंतभूषण रानडे, एमसीएचे अध्यक्ष अभय आपटे आणि मराठे ज्वेलर्सचे प्रणव मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक मिहीर केळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
वाडेश्वर विझार्डस: 7षटकात 7बाद 38धावा
(रोहन राजपुरकर नाबाद 10, हर्षवर्धन पटवर्धन 8, साकेत गोडबोले 6, प्रतीक वैद्य 2-3, नीरज कुलकर्णी 1-4, अर्जुन मेहता 1-6, श्रीनिवास चाफळकर 1-7)पराभूत वि.सिटी प्राईड सुपरस्टार्स: 5षटकात 2बाद 41धावा(प्रतीक वैद्य नाबाद 14, रिषभ गादिया 11, श्रीनिवास चाफळकर नाबाद 16, साकेत गोडबोले 1-16);सामनावीर-प्रतीक वैद्य;

स्पार्टन्स: 7षटकात 3बाद 68धावा(अमित परांजपे 39(24, 7×4, 1×6), पराग चितळे 25(14)) पराभूत वि.हॉग्स: 6.1षटकात 1बाद 73धावा(साहिल मदन 35(18, 2×4, 2×6), हर्षल गंद्रे 37(17, 4×6), पराग चितळे 1-20);सामनावीर-हर्षल गंद्रे;

अंतिम फेरी:
सिटी प्राईड सुपरस्टार्स: 7षटकात 1बाद 78धावा(श्रीनिवास चाफळकर 40(20, 1×4, 2×6), प्रतीक वैद्य नाबाद 24(14, 1×4,1×6), गौरव चाफळकर नाबाद 8, मंदार चितळे 1-4)वि.वि.हॉग्स: 7षटकात 4बाद 47धावा(मंदार चितळे 12(11), आदित्य गांधी 11(10), सचिन गोडबोले 2-7, अर्जुन मेहता 1-5, श्रीनिवास चाफळकर 1-9);सामनावीर-श्रीनिवास चाफळकर;

इतर पारितोषिके: 
सर्वोत्कृष्ट फलंदाज:अमित परांजपे(186धावा)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: पराग चितळे(7विकेट)
मालिकावीर: हर्षल गंद्रे(199धावा व 5विकेट)

आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत अर्णव पापरकर , नील कोठारी, अर्चित धुत, मेहेक कपुर, प्रिशा शिंदे यांची आगेकुुच

0

पुणे: पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित तिसऱ्या आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत    अर्णव पापरकर ,  नील कोठारी, अर्चित धुत,  मनन अगरवाल ,  स्वराज ढमढेरे ,  अभय नागराजन , मेहेक कपुर,  प्रिशा शिंदे  यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. 

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत  10 वर्षाखालील मुलांच्या गटात दुस-या फेरीत अव्वम मानांकीत अर्णव पापरकरने देवराज रेड्डीचा 6-0 असा एकतर्फी पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. चौथ्या मानांकीत नील कोठारीने भावेश पिलानीचा 5-2 असा तर सातव्या मानांकीत मनन अगरवालने विश्वजीत झनसचा 5-1 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. 

10 वर्षाखालील मुलींच्या गटात सातव्या मानांकीत मेहेक कपुर ईशा राठोडचा 5-1 असा तर आठव्या मानंकीत प्रिशा शिंदेने वृंदा सार्खाचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल:  फेरी: 10 वर्षाखालील मुले: दुसरी फेरी

अर्णव पापरकर(1) वि.वि देवराज रेड्डी 6-0

स्वराज ढमढेरे(9) वि.वि अंशुल देशपांडे 5-0

मनन अगरवाल(7) वि.वि विश्वजीत झनस 5-1

नील कोठारी(4) वि.वि भावेश पिलानी 5-2

सुर्या काकडे(12) वि.वि पृथ्विराज हिरेमत 5-2

अभय नागराजन(8) वि.वि स्वरनीम येवलेकर 5-0

अर्चित धुत(5) वि.वि अमोघ दामले 5-2

नमिश हुड(11) वि.वि अथर्व जोशी 5-2

10 वर्षाखालील मुली- पहिली फेरी

निहारीका घोशाल वि.वि सेजल इजनकर 5-3

रितिका कापरे वि.वि धान्या  भंडारी 5-0

मेहेक कपुर(7) वि.वि ईशा राठोड 5-1

प्रिशा शिंदे (8) वि.वि वृंदा सार्खा 5-0

पुण्याच्या पालकमंत्र्यांना कचरा प्रश्नाचे गांभीर्य नाही :काँग्रेस पर्यावरण विभाग प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे यांची टीका

0
पुणे :‘पुण्याच्या पालकमंत्र्यांना कचरा प्रश्नाचे गांभीर्य नाही ,आता आयुक्त पातळीवर आणि रस्त्यावर आंदोलन करून पुण्याच्या कचरा प्रश्नावर तोडगा काढायला भाग पाडू ‘असा इशारा काँग्रेस पर्यावरण विभागाच्या प्रदेशाध्यक्ष अशोक  मोरे यांनी प्रदेश कार्यकारिणी बैठकीत दिला .
ही बैठक हॉटेल ‘डेक्कन एट ‘ भांडारकर रस्ता ,पुणे येथे रविवारी दुपारी झाली .  त्यानंतर अशोक  मोरे यांनी पत्रकारांना प्रदेश कार्यकारिणी बैठकीतील निर्णयांची माहिती दिली .
राज्यातील महत्वाच्या पर्यावरण समस्यांच्या सोडवणुकीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा ठराव काँग्रेस पर्यावरण विभाग प्रदेश कार्यकारिणीत करण्यात आला .
अशोक  मोरे म्हणाले ,’पुण्याच्या कचरा प्रश्नाला सत्ताधारी पक्षाने बाजूलाच ठेवले आहे . उरळी येथे डम्पिंग चालू आहे . पुण्याच्या कचरा व्यवस्थापन प्रश्नी आता चर्चाही होत नाही आणि मार्गही काढला जात नाही . तसेच अजूनही सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात आहे . पालकमंत्र्यांना  पुण्याच्या पालकमंत्र्यांना कचरा प्रश्नाचे गांभीर्य नाही आता आयुक्त पातळीवर ,रस्त्यावर आंदोलन करून पुण्याच्या कचरा प्रश्नावर तोडगा काढायला भाग पाडू’
‘पिंपरी पालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी घेतलेली हिंजवडीतील जागा बिल्डरांच्या दबावामुळे वापरली जात नाही .त्यामुळे तेथे कचरा समस्या आहे .  राज्यातील तिवरांची जंगले वाचविणे ,वृक्षतोड रोखणे ,जलपर्णी निर्मूलन ,मल निःस्सारण प्रक्रिया ,नदी स्वच्छता प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेस पर्यावरण विभाग आता रस्त्यावर उतरणार आहे . ‘
प्रदेश सरचिटणीस तेजेंद्रसिंह अहलुवालिया म्हणाले ,’भाजप सरकारने गंगा नदी शुद्धीकरणासाठीचा खरेच किती वापरला याचे उत्तर जनतेला द्यावे . भाजप सरकारचे पर्यावरणीय समस्यांवर स्वतःचे काहीच व्यवस्थापन नाही . पुणे कॅन्टोनमेंट,खडकी कॅन्टोन्मेंट येथेही कचरा व्यवस्थापन शून्य आहे . ‘
या प्रदेश बैठकीला तेजेंद्रसिंह अहलुवालिया (प्रदेश सरचिटणीस )  पराग आठवले (प्रदेश सरचिटणीस ),राजन पानसे (पुणे शहराध्यक्ष ),वैशाली परदेशी (पुणे शहर उपाध्यक्ष ) ,राज्यातील जिल्हाध्यक्ष ,कार्यकारणी सदस्य उपस्थित होते . पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली . ‘राहुल फॉर इंडिया ‘  पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .

मुलांना भाषा चांगली बोलायला, वापरायला शिकवून चांगली पिढी घडवा – डॉ. अरूणा ढेरे

0

कवीवर्य ग. दि. माडगूळकर साहित्य नगरी (पुणे) – चंगळवाद, प्रलोभनं, नैराश्य, यातून मुलांना फक्त शिक्षकच बाहेर काढू शकतात. प्रत्येक मुलामध्ये एक कथा दडलेली असते. ती समजण्यासाठी शिक्षक ती किती समृद्धपणे घेतो, सकसपणे घेतो यावर सगळं अवलंबून आहे. इतरांपेक्षा शिक्षकांना एक जादा शक्ती भाषेच्या रूपाने मिळाली आहे. शिक्षकांनी करावा. मुलांना भाषा चांगली बोलायला शिकवून त्यांना प्रलोभनं, चंगळवादाच्या विळख्यातून बाहेर काढून चांगली पिढी घडवावी असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरूणा ढेरे यांनी आज येथे केले.

बालगंधर्व रंगमंदिरातील कविवर्य ग. दि. माडगूळकर साहित्य नगरीत भरलेल्या पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोप प्रसंगी डॉ. ढेरे बोलत होत्या. स्वागताध्यक्ष आमदार विजय काळे, शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, शिक्षणाधिकारी दिपक माळी, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या समारोप समारंभात स्वच्छ भारत अभियानाबद्दल हुजूरपागेची विद्यार्थीनी पूर्वी गवळी हिने काढलेल्या चित्राचे टपाल तिकीट काढले आहे. त्याबद्दल पूर्वा व तिच्या पालकांचा यथोचित गौरव डॉ. अरूणा ढेरे यांच्या हस्ते करण्यात आला.

डॉ अरूणा ढेरे म्हणाल्या, नोबेल पारितोषिक मिळवणारे रविंद्रनाथ यांचे कायम आठवण शिक्षकांनी ठेवले पाहिजे. शिक्षक काय करू शकतो तर शिक्षक एक साहित्यिक घडवतो हे रविंद्रनाथांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे त्यांची आठवण ठेवणे गरजेचे आहे. त्यांच्या प्रमाणे आपल्यातही विचार, भावना व्यक्त करणारी आंतरिक ओढ असली पाहिजे. काही झाले तरी मी हे जग सुंदर करून दाखवीन असा आंतरीक दिवा पेटवा असा सल्ला त्यांनी दिला.

जेव्हा सहृदयशक्ती आणि मानसिक शक्ती एकत्र येते तेव्हा साहित्य निर्माण होते असे सांगून त्या म्हणाल्या, साहित्यिक आपल्या भोवतीच्या समाजाला, वातावरणाला स्पष्ट शब्द देऊ शकतो. शिक्षकांना भाषेची देणगी ही त्यांच्या पेशानेच दिलेली असल्याने शिक्षकांनी साहित्यिक व्हावे. साहित्याने दिलेली देणगी मुलांपर्यंत पोचवावी. आपल्या समोर वर्गात असलेल्या नव्या पिढीत साहित्यिक निर्माण व्हावेत यासाठी मुलांना पाठ्यपुस्तकाच्या बाहेर न्या. मुलांना चांगली भाषा वापरायला, बोलायला शिकवा

साहित्यिक लहान मुलासारखा असतो. तो कुतुहल दृष्टीने जगाकडे बघतो असे सांगून डॉ. ढेरे म्हणाल्या, त्याने अनुभवलेल्या सुखदु:खांना आणि त्या पलिकडे त्याने गमावलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवतो. साहित्यिक पंचेंद्रीयांनी जग अनुभवतो. भोवतीचं जग आपलं करतो म्हणूनच जे सामान्य माणूस पाहू शकत नाही ते साहित्यिक पाहू शकतो. व्यवहारातील भाषेला सर्जनशीलतेच्या पातळीवर नेतो तो खरा साहित्यिक. असा साहित्यिक होण्याच शिक्षकांनी प्रयत्न करावेत आणि समाजाला दिशा द्यावी असे आवाहन त्यांनी केले,

प्रास्ताविकात स्वागताध्यक्ष आमदार विजय काळे म्हणाले, पूर्वी पगार कमी असला तरी अनेक जण ठरवून शिक्षक झाले. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आज नोकरी मिळत नाही म्हणून शेवटी शिक्षकाची नोकरी स्वीकारली जाते. आज विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, व्यसनाधिनता असे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. मोबाइलमुळे मुले पालकांच्या हातात राहिलेली नाहीत. हे चित्र बदलण्याची, त्यात परिवर्तन करण्याची ताकद फक्त शिक्षकांच्यात आहे. त्यासाठी त्यांनी आवांतर वाचन, लेखन करण्याची गरज आहे. यासाठी त्यांना स्फूर्ती मिळावी म्हणून हे शिक्षक साहित्य संमेलन आहे. असे संमेलन पुढच्या वर्षीही होणार असून त्यासाठी महिनाभर अगोदर नाव नोंदणी केली जाणार असून संमेनलाने गांभिर्य व वातावरण चांगले रहावे यासाठी नोंदणी केलेल्यांना संमेलनात प्रवेश दिला जाणार आहे.

शिवरायांचे चरित्र फक्त अभ्यासण्यासाठी नाही तर आचरणात आणण्यासाठी -योगेश गोगावले.

0
पुणे- शिवरायांचा नुसता जयजयकार करणे किंवा केवळ त्यांच्या चरित्राचा अभ्यास करणे पुरेसे नव्हे तर शिवप्रभूंचे चारित्र्य आचरणात आणणे महत्त्वाचे आहे असे मत भाजप चे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी व्यक्त केले.क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित शिवजयंती महोत्सवात शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार विजेते डॉ अरुण दातार,शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित अनंतराव शेळके(कबड्डी) अभिषेक केळकर (बुद्धिबळ) कोमल पाठारे घारे (तायक्वांदो) आणि ऋतुजा सातपुते( सायकलिंग) ह्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी महोत्सवाचे संयोजक क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,भाजप युवा मोर्चा चे अध्यक्ष नगरसेवक दीपक पोटे,मंदार बलकवडे,विशाल भेलके,उमेश भेलके इ मान्यवर उपस्थित होते.भाजप चा भर हा तरुणांना टी व्ही च्या मायाजालातून दूर करून क्रीडांगणावर आणणे हा असून त्यासाठीच विविध शाळांमध्ये क्रीडा केंद्र उभारण्यात येणार आहेत असे ही ते म्हणाले.

*Healthy Mind Resides in a Healthy Body* हा मंत्र ध्यानात ठेवा,मी सातत्याने पासष्ट वर्ष सूर्यनमस्कार घालत असून आपल्यापैकी कोणाला ही सूर्यनमस्कार शिकायचे असतील तर मी उपलब्ध आहे असे शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित डॉ अरुण दातार म्हणाले.शहरातील सर्व बागा ,क्रीडांगण, इमारतींच्या गच्चीवर सूर्योदयाला नागरिक व्यायाम करताना दिसावेत असे माझे स्वप्न असून त्यादिवशी माझ्या जीवन गौरव पुरस्काराचे सार्थक होइल असे ही ते म्हणाले.

सध्याची सामाजिक स्थिती पाहता शिवप्रभुंचे आचार विचार हेच तारणहार असल्याचे महोत्सवाचे संयोजक संदीप खर्डेकर म्हणाले,शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांनी कोथरूड चे नाव जगात पोहचविले असून त्यांच्या सन्मान करण्याची संधी आम्हांस मिळाली हे आमचे भाग्य आहे,शिवजयंती ही गणेशोत्सवाप्रमाणे घराघरात साजरी व्हावी असे ही ते म्हणाले.यशवंतराव चव्हाण नाटयगृहात आयोजित शिवजयंती महोत्सवात आज फक्त महिलांसाठी लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अकलूजच्या लावणी महोत्सवात सलग अकरा वर्ष पारितोषिक जिंकणारे लावणी कलावंत योगेश देशमुख आणि पूनम यांना ही सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्र संचालन संदीप खर्डेकर यांनी केले तर विशाल भेलके ,उमेश भेलके मंदार बलकवडे यांनी स्वागत व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी आभार प्रदर्शन केले.