Home Blog Page 3176

एशियन ग्रॅनिटो इंडिया लि.तर्फे पुण्यामध्ये ‘एजीएल एक्स्लुझिव्ह’ शोरूमचे धर्मेंद्र यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे- एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेड (एजीआयए) या भारतातील एका सर्वात मोठ्या टाइल्स कंपनीने महाराष्ट्रातील पुणे येथे ‘एजीएल एक्स्लुझिव्ह’ शोरूम सुरू केले आहे. या 1,800 चौरस फूट क्षेत्रातील शोरूममध्ये सर्व प्रकारची उत्पादने असतील – सिरॅमिक वॉल व फ्लोअर टाइल्स, पॉलिश्ड व्हर्टिफाइड टाइल्स, ग्लेझ्ड व्हर्टिफाइड टाइल्स, आउटडोअर व पार्किंग टाइल्स.  हे महाराष्ट्रातील 19वे ‘एजीएल एक्स्लुझिव्ह’ शोरूम असेल.

कंपनीने एस. के. सिरॅमिक्सच्या सहयोगाने शॉप नं. 35/6, मार्बल मार्केट, आंबेगाव (बुद्रुक), पुणे-मुंबई महामार्ग, पुणे, महाराष्ट्र येथे शोरूम सुरू केले आहे. शोरूमचे उद्घाटन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या हस्ते,  एशियन ग्रॅनिटो इंडिया लि.चे संचालक भावेश पटेल व ग्रेस्टेक व्हिजनचे असोसिएट डायरेक्टर शौनक पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ग्रेस्टेकचे एव्हीपी राहुल शर्मा, एजीएल टाइल्सचे सीनिअर जीएम विकास खन्ना, ग्रेस्टेकचे जीएम विवेक जैसवाल व सिनीअर आरएसएम सर्वेश द्विवेदी हे प्रमुख पाहुणे होते. एजीआयएलने बाजारातील रिटेल व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी आणि भारताच्या कानाकोपऱ्यात सेवा देण्यासाठी धोरण आखले आहे. एशियन ग्रॅनिटोने विविध उत्पादने दर्शवण्याच्या हेतूने जागेच्या उपलब्धतेनुसार निरनिराळी शोरूम सुरू केली आहेत.

याविषयी बोलताना, एशियन ग्रॅनिटो इंडिया लि.चे सीएमडी कमलेश पटेल म्हणाले, “आम्हाला पुणे या महाराष्ट्रातील झपाट्याने प्रगती करणाऱ्या शहरात ‘एजीएल एक्स्लुझिव्ह’ सुरू करताना अतिशय आनंद होत आहे. यामुळे महाराष्ट्रातील शोरूमची संख्या आता 19 झाली आहे. विविध डिझाइन व टेक्शर असलेल उत्पादने उपलब्ध असल्याने इंटिरिअर डेकोरेटर्स, आर्किटेक्ट्स व घरमालकाना आता सजावटीची उत्पादने म्हणून लोकप्रिय ब्रँडेड टाइल्सना पसंती देतात. सतत काहीरी वेगळे व खास शोधणाऱ्या व्यक्तींसाठी ‘एजीएल एक्स्लुझिव्ह’ शोरूम आवश्यक आहे, असे आम्हाला वाटले व या शोरूमद्वारे आम्ही या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करू शकू, अशी आशा आहे.”

एजीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश पटेल म्हणाले, “ग्राहकांशी थेट संवाद साधून कंपनीच्या रिटेल विक्रीमध्ये वाढ करण्याच्या कंपनीच्या धोरणाचा भाग म्हणून शोरूम सुरू करण्यात आली आहेत. कंपनीने येत्या तीन वर्षांत रिटेल विक्रीतील हिस्सा सध्याच्या 35% वरून 50% पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पर्यटन व हॉटेल उद्योगांमध्ये भरभराट असल्याने व रिअल इस्टेट व गृह क्षेत्रही स्थिरपणे वाढत असल्याने महाराष्ट्रातील टाइल्स उद्योगामध्ये वर्षागणिक वाढ होत आहे. एजीआयएलचे महाराष्ट्रात डीलर-सब डीलरचे सक्षम जाळे असून ते येत्या 2-3 वर्षांत अनेक पटींनी वाढणार आहे. एशियन ग्रॅनिटो इंडिया लि. ग्राहकांसाठी फ्लोअर, वॉल व डेकोरेटिव्ह श्रेणीसाठी नवे व सर्वोत्तम कलेक्शन उपलब्ध करते.”

एशियन ग्रॅनिटो इंडिया लि. (एजीआयएल) 16 वर्षांच्या अल्प कालावधीत 2000 या वर्षातील दररोज 2,500 चौरस मीटरवरून सध्या अंदाजे 1 लाख चौरस मीटर (आउटसोर्सिंगसह) अशी प्रगती करून भारतातील एक सर्वात मोठी सिरॅमिक कंपनी म्हणून नावारूपास आली आहे. कंपनीच्या उत्पादनांमध्ये सिरॅमिक फ्लोअर, डिजिटल वॉल, व्हिट्रिफाइड, पार्किंग, प्रोक्लेन, ग्लेझ्ड व्हिट्रिफाइड, आउटडोअर, नॅचरल मार्बल कम्पोझिट व क्वार्ट्झ आदींचा समावेश आहे.

श्री क्षेत्र वढूबुद्रुक, तुळापूर विकासासाठी भरीव निधीची तरतूद करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे

0

पुणे दि. 17 : श्री क्षेत्र वढूबुद्रुक तसेच तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिस्थळाच्या विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूद शासनाकडून केली जाईल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा, उच्च व तंत्र शिक्षण, अल्पसंख्याक व वक्फ बोर्ड, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी केले.

पुणे जिल्हयातील वढूबुद्रुक तसेच तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी श्रीमती वर्षा तावडे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबुराव पाचर्णे, इतिहासकार पांडुरंग बलकवडे, अभिनेते डॉ.अमोल कोल्हे, वढूबुद्रूक गावच्या सरपंच रेखा शिवले, तुळापूरचे सरपंच गणेश पुजारी आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंत्री महोदयांबरोबरच उपस्थितांनीही छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतिस्थळास अभिवादन केले. तसेच शासकीय मानवंदना देण्यात आली.

श्री. तावडे म्हणाले, इतिहासाच्या पुस्तकातून जशी आपण विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची ओळख करुन देतो तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाविषयी देखील पाठयपुस्तकात धडा समाविष्ट करण्याबाबत मी इतिहास अभ्यास मंडळास सूचविले आहे. या निमित्ताने येथून पुढील काळात छत्रपती संभाजी महाराजांच्या  पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनावरील महानाटय या ठिकाणी दाखविण्यात येईल. याबरोबरच त्यांच्या जीवनावर आधारीत एक भव्य संग्रहालय उभारण्याची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री या नात्याने  विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबुराव पाचर्णे, सिने अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

डॉ.अमोल कोल्हे यांना  शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राजेंद्र निंबाळकर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त

0

पुणे – उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी (विशेष) नियुक्ती झाली आहे. सोमवारी ते पदभार स्वीकारणार आहेत. शुक्रवारी या संदर्भातील बदल्यांचे आदेश मंत्राल्यातून पारित करण्यात आले.

निंबाळकर यांनी याआधीही प्रतिनियुक्तीवर महापालिकेत काम केले होते. त्यांनी जकात प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यावेळी त्यांची कारकीर्द विशेष गाजली होती. त्यानंतर शहरात “म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच पुण्याचे विभागीय उपायुक्त म्हणूनही काम केले आहे. “म्हाडा’मध्ये असताना त्यांनी अनेक प्रकल्प मार्गी लावले होते.

प्रेरणा देशभ्रतार यांच्या बदलीनंतर अतिरिक्त आयुक्तपदी कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ते या पदावर रुजू झाले नाहीत. त्यांची लातूर येथे बदली करण्यात आली.

श्यामला वनारसे, मीरा बडवे, अपूर्वा पालकर यांचा होणार सन्मान

0

पुणे :

‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन’ चे ‘व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार 2018’ (व्होकेशनल एक्सलेन्स अ‍ॅवॉर्ड ) अपूर्वा पालकर (शैक्षणिक क्षेत्र), शामला वनारसे (मानसशास्त्रज्ञ )मीरा बडवे ( दृष्टीहीन प्रज्ञाचक्षू व्यक्तींसाठी सामाजिक काम) यांना  जाहीर झाले आहेत.

रविवार, दिनांक 18 मार्च, रोजी सायंकाळी 7.30 वाजता गांधीभवन हॉल, कोथरूड येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर (दक्षिण विभाग) यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा होणार आहे, अशी माहिती ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन’चे अध्यक्ष गणेश जाधव यांनी दिली.

2019-20 मधील प्रांतपाल रवी धोत्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मनीष धोत्रे (सचिव,‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन’), विदुला भट (निमंत्रक ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन’) यावेळी उपस्थित राहतील.

रूढी -परंपरेला छेद देत स्त्री जन्माचे स्वागत व्हावे :अमृता फडणवीस

0
वसंत अमराळे मित्र परिवारातर्फे ३०० विधवांचा सन्मान 
 
पुणे 
आज विविध क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत ;पण रूढी परंपरेचा विळखा अजून काही सुटलेला नाही. जन्म न घेऊ देता मुलीच्या उज्ज्वल भविष्याची शक्यता मारून टाकण्याची अपप्रवृत्ती आजही आहे .त्यामुळे रूढी परंपरेला छेद देत स्त्री जन्माचे स्वागत व्हावे अशी अपेक्षाअक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा अमृता फडणवीस यांनी येथे व्यक्त केली. 
वसंत उर्फ बाळासाहेब अमराळे मित्र परिवारातर्फे पती विरहाचे दुःख बाजूला सारून प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या ३०० महिलांचा  अमृता फडणवीस यांच्या हस्ते स्वयंसिद्धा पुरस्काराने गौरव करण्यात आला त्याप्रसंगी फडणवीस बोलत होत्या. यावेळी नॅशनल शिपिंग बोर्डाचे अध्यक्ष व माजी खासदार प्रदीप रावत, कोहिनुर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, सामाजिक समरसता परिषदेच्या डॉ. श्यामा घोणसे ,पालकमंत्री बापट यांच्या स्नुषा व सांगलीच्या नगरसेविका स्वरदा बापट,नगरसेवक दिलीप वेडेपाटील , संयोजक वसंत उर्फ बाळासाहेब अमराळे, स्मिता अमराळे  आदी उपस्थित होते. यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या कि, अकाली आलेल्या वैधव्यानंतर प्रतिकूल परिस्थितीमध्ये न डगमगता आत्मविश्वासाने जीवनाला सामोरे जाणाऱ्या या महिलांचा  माझ्या हस्ते सन्मान होत आहे,त्या एकप्रकारे  हिरकणीच आहेत.   मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे वृत्त कळताच काही क्षण मला असे वाटले ,सारे काही संपले मात्र आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने देवेन्द्र फडणवीस बचावले. पती निधनानंतर तुम्ही संपूर्ण घरासाठी खंबीर उभ्या राहिल्या याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे.पूर्वी खूप चुकीच्या प्रथा होत्या परिणामी स्त्रियांना अनेक यातना भोगाव्या लागल्या मात्र आज वातावरण बदलले आहे. अनेक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत पण रूढी -परंपंरा अजूनही आहे. स्त्री नको हा एकप्रकारे अत्याचारच आहे. उलट स्त्री जन्माचे स्वागत ही प्रवृत्ती वाढीस लागली पाहिजे. स्त्री असल्याचा मला अभिमान आहे.मुलगी ही देशाचीच नव्हे तर विश्वाचे भवितव्य आहे.  त्यामुळे स्त्री जन्माचे स्वागत होण्याची विचारधारा रुजणे ही काळाची गरज आहे. प्रास्ताविकात संयोजक वसंत उर्फ बाळासाहेब अमराळे यांनी कोणत्याही संकटाना पुरुषांपेक्षा स्त्री सक्षमपणे सामोरी जाते. आज महिला विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत. मात्र रूढी – परंपरेच्या विळख्यात मात्र समाज अजूनही बुरसटलेल्या विचारधारेत अडकून पडला आहे. पती विरहाचे दुःख बाजूला सारून घरासाठी सक्षम बनलेल्या स्त्रियांचा सर्वांनी  सन्मान केला पाहिजे यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  रूढी -परंपरेला कायमचे हद्दपार करण्यासाठी समाजात  सकारात्मक मानसिकता निर्माण व्हावी हा उद्देश यामागे आहे,असे ते म्हणाले.    यावेळी पांडुरंग साठे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट 3131 यांच्या वतीने वॉटर फेस्टीव्हल चे आयोजन

0

पुणे :‘रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट 3131’ यांच्या वतीने दिनांक 20 मार्च ते 22 मार्च 2018 या तीन दिवसीय ’जलोत्सव’ 2018 (वॉटर फेस्टीव्हल) चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरी प्रांत पुणे ३१३१चे प्रकल्प संचालक आणि ‘जलोत्सव’ (वॉटर फेस्टीव्हल) चे संयोजक सतीश खाडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला गणेश जाधव, (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन)​​,​उदय कुलकर्णी, (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल)​,​दीप्ती पुजारी (पौड रोड रोटरी अध्यक्ष)​,​नितीन चौरे,सुजाता कुलकर्णी, दिनकर पळसकर, अशोक भंडारी उपस्थित होते.पुण्यातील १० रोटरी क्लब एकत्र येऊन हा जलोत्सव आयोजित करीत आहेत.​यामध्ये​’​रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड

​’​रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास
​’रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन
​’​रोटरी क्लब ऑफ निगडी
​’​रोटरी क्लब ऑफ रॉयल
​’रोटरी क्लब ऑफ पौड रोड
​’​रोटरी क्लब ऑफ शनिवारवाडा
​’​रोटरी क्लब ऑफ अपटाऊन
रोटरी क्लब ऑफ चिंचवड
​’​रोटरी क्लब ऑफ साऊथ
​’​यांचा समावेश आहे.​या तीन दिवसीय जलोत्सवाचे उदघाटन मंगळवार, दिनांक 20 मार्च रोजी दुपारी दीड वाजता साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ. लक्ष्मिकांत देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. ‘जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे हा कार्यक्रम होईल.

जलोत्सवातील मान्यवरांची मार्गदर्शक व्याख्याने दुपारी १.३० ते रात्री ८ या वेळात ‘जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन’, घोले रोड येथे होणार आहेत.

‘महाराष्ट्रातील 500 हून अधिक रोटरी क्लब आणि 25 हजारांहून अधिक रोटेरियन्सनी उभा केलेला सकारात्मक ऊर्जेचे प्रतिनिधीत्व हा जलोत्सव करतो आहे. शहरी व ग्रामिण नागरिकांमध्ये जल साक्षरता निर्माण व्हावी, तसेच उद्योग, प्रशासन, धोरण कर्त्यांसाठी, शेतकर्‍यासाठी, रोटेरियन्ससाठी मुलांसाठी आणि पुढच्या पिढीसाठी या जलोत्सवाच्या माध्यमातून जल साक्षरता निर्माण होऊन हे कार्य पुढे चालू राहावे या प्रमुख उद्देशाने या ‘ वॉटर फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले’, असल्याचे ‘फेस्टिव्हल’चे संयोजक सतीश खाडे यांनी  सांगितले.

या महोत्सवामध्ये अनेक मान्यवर पाणी विषयक विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये साहित्य आणि जलसाक्षरता, पाणी आणि अंधश्रद्धा, कुरणशेती, वॉटर ऑलिपियाड, पाण्याचा टाहो, बारीपाडा विकास मॉडेल, क्षारशेती, महानगरांच्या तोंडचे पाणी पळणार, भारतीय संस्कृती आणि मान्सून, पुण्याच्या पाण्याचे नियोजन, दुष्काळमुक्त बुलढाणा, विनावीज- विनाखर्च पाण्याचा पुर्नवापर या विषयांचा समावेश आहे.

महापौर मुक्ता टिळक, उपेंद्र घोडे, डॉ. धनंजय नेवाळकर, प्रदीप पुरंदरे, चैत्राम पवार, दिनेश कुंवर, डॉ. श्रीकांत गबाले, भरत व्हयगाले, दिगंबर डुबल, सतीश वैजापूरकर, मयुरेश प्रभुणे, शिवानी चौगुले, अरुण म्हात्रे, शांतिलाल मुथा, डॉ. समीर शास्त्री, आदी मान्यवर ‘जलोत्सव’ (वॉटर फेस्टिव्हल) मध्ये मार्गदर्शन करतील.

पाणी विषयक क्षेत्रात काम केलेल्या स्वयंसेवी संस्थाचा या फेस्टिव्हलमध्ये गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक रोटरी क्लबने जलसंवर्धनासाठी  केलेल्या कामाचा आढावा घेण्यात येईल. यात रोटरीच्या  3131,3132,3142 या  प्रांतांचा समावेश आहे. अनेक संस्थांचा समावेश आहे. उल्लेखनीय कार्य करणार्‍या अनेक ‘रोटरी क्लब’ चा सन्मान देखील करण्यात येणार आहे.

महोत्सवाची सांगता रोटरी वॉटर ऑलिम्पियाडमधील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रमाने  होईल . हा कार्यक्रम  डॉ. नितीन करमळकर (कुलगुरू, सावित्रीबाई फुले  पुणे विद्यापीठ ) व उद्योजक किशोर देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.

यावर्षी जलोत्सव मोबाईल फोनवर सुद्धा पाहता येईल, त्यासाठी तीन दिवसांसाठी फक्त दहा रुपयांचे डिजीटल पासेस उपलब्ध होतील, असे या वेळी सांगण्यात आले

एनआयपीएम संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा.

0

पुणे: नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ पर्सोनेल  मॅनजमेंट अर्थात एनआयपीएमचा वर्धापनदिन नुकताच एनआयपीएमच्या पुणे विभागाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.एनआयपीएम पुणे विभागाचे अध्यक्ष श्री. विश्वेश कुलकर्णी यांनी यावेळी आपल्या मनोगतात एनआयपीएममुळे राष्ट्रीय पातळीवर मनुष्यबळ व्यवस्थापकांचे प्रतिनिधित्व करणारे व्यासपीठ निर्माण झाले असून यामुळे विविध औद्योगिक कंपन्यांमधील मनुष्यबळ व्यवस्थापकांनाही आपापल्या  कार्यक्षेत्रात अधिक चांगल्या प्रकारे योगदान देत आहेत.

वर्धापनदिनाच्या या कार्यक्रमात  एनआयपीएम  पुणे विभागाचे माजी  अध्यक्ष आवर्जून उपस्थित होते.

या प्रसंगी एनआयपीएमच्या सदस्यांनी व त्यांच्या कुटुंबीयातील  सदस्यांनी  केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल  त्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या सत्कारार्थींमध्ये  कु. मेघना यशवंत पाटील, अनिता आर्वीकर, अंजली आर्वीकर, सानिका दाभोळकर, मृण्मयी चितळे, रुपाली वीरकर, आदित्य काणे, डॉ. अमितकुमार गिरी, कविता कालेकर, दत्तात्रय  आंबुलकर, गजानन मोरे, फारुख शेख, श्रीनिवास रायरीकर, डॉ. कॅप्टन. सी.एम.चितळे, उमेश दुगानी, केदार निबांळकर, संजय आभोरकर, योगेश वाणी, अपूर्व चौबे, उज्ज्वल भट्टाचार्जी, संतोष पणीकर,मल्हार लिंबेकर व जयकर शेट्टी यांच्यासह अमला  करंदीकर, अमृता करमरकर, पवन शर्मा, प्रशांत कुलकर्णी यांनाही स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले

याप्रसंगी डॉ. संतोष भावे यांनी २८ व २९ सप्टेंबर २०१८ रोजी एनआयपीएमच्या वतीने पुण्यात होणाऱ्या ‘नॅटकॉन’ या  राष्ट्रीय   परिषदेची सविस्तर माहिती सांगितली.

या वर्धापनदिन सोहळ्याला एनआयपीएमचे सर्व सदस्य आपल्या कुटुंबीयांसमवेत मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी  आयोजित  संगीत रजनी कार्यक्रमातही उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

एनआयपीएम विषयी

एनआयपीएम ही मनुष्यबळ व्यवस्थापकांचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय स्तरावरील संस्था असून कोलकाता येथे मुख्यालय असलेल्या या संस्थेचे संपूर्ण देशभरात ५२ ठिकाणी  विभागीय कार्यालये आहेत. तसेच २५ हजार हुन अधिक सदस्य असलेल्या एनआयपीएम तर्फे सातत्याने विविध औद्योगिक कंपन्यांमधील मनुष्यबळ व्यवस्थापकांसाठी अनेक विषयांवर कार्यशाळा घेतल्या जातात.

‘गो ग्रीन: अ न्यू वे फॉर हॉटेल इंडस्ट्री’ परिसंवादाला चांगला प्रतिसाद

0
पुणे : एमसीई सोसायटीच्या एम.ए.रंगूनवाला इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या वतीने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
‘गो ग्रीन: अ न्यू वे फॉर हॉटेल इंडस्ट्री’ या विषयावरील हा परिसंवाद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या अंतर्गत आयोजित केला गेला.
महाविद्यालयाच्या प्राचार्य अनिता फ्रांत्झ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
परिसंवादामध्ये आर्किटेक्ट अनघा परांजपे-पुरोहित आणि कांचन सिधये (व्हीके: ई पर्यावरण) यांनी पर्यावरण संबधीत इमारती आणि अशा इमारत संबंधित प्रमाणपत्रे, नियम व अटी आणि हॉटेलमध्ये पर्यावरणाची स्थिरता त्यासाठी उपाय या विषयी मार्गदर्शन केले.
परिसंवादाला चांगला प्रतिसाद मिळाला.

व्यावसायिक कर्जांच्या बाबतीत झपाट्याने प्रगती व तुलनेने कमी अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) असलेली एमएसएमई ठरते आहे सर्वात चांगली श्रेणी

0

मुंबई,-: सिडबीने ट्रान्सयुनियन सिबिलच्या सहयोगाने देशातील एमएसएमई श्रेणीचा बारकाईने मागोवा घेण्यासाठी व पाहणी करण्यासाठी “एमएसएमई पल्स” हा एमएसएमईंच्या कर्जविषयक घडामोडींविषयी तिमाही अहवाल जाहीर केला आहे. हा अहवाल औपचारिक कर्जसुविधा उपलब्ध असलेल्या, भारतीय बँकिंग व्यवस्थेमध्ये लाइव्ह कर्जसुविधा असणाऱ्या अंदाजे 5 दशलक्ष सक्रिय एमएसएमईंच्या आधारे तयार केला आहे.

मायक्रो, स्मॉल अँड मीडिअम एन्टरप्राइजेस (एमएसएमई) हे क्षेत्र अतिशय परिवर्तनशील व सक्षम असून भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीच्या दृष्टीने या क्षेत्रामध्ये प्रचंड क्षमता आहे. देशात अंदाजे 51 दशलक्ष एमएसएमई युनिट आहेत व त्यांनी विविध क्षेत्रांतील अंदाजे 117 दशलक्ष जणांना रोजगार दिला असून एकूण मनुष्यबळामध्ये त्यांचे योगदान 40% आहे. एकूण ढोबळ देशांतर्गत उत्पादनामध्ये (जीडीपी) एमएसएमईचा हिस्सा अंदाजे 37% आहे आणि वाणिज्य मंत्रालयातर्फे नोंद केल्या जाणाऱ्या निर्यातीविषयी माहितीमध्येही त्यांचे योगदान 43% आहे. या श्रेणीचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप विचारात घेता, संभाव्य नुकसान नियंत्रित करण्यासाठी योग्य वेळी हस्तक्षेप केला जाण्याच्या दृष्टीने धोरण, बँकिंग व व्यवसायविषयक निर्णय यांची परिणामकारकता तपासण्यासाठी एमएसएमई पोर्टफोलिओची नियमितपणे व वारंवार पाहणी करणे गरजेचे आहे.

सर्वेक्षणातील मुख्य निष्कर्षांमध्ये आढळले आहे की, गेल्या दोन वर्षांमध्ये एमएसएमई क्षेत्रातील एनपीएचे प्रमाण 8% ते 11% या प्रमाणात आहे, तर याच कालावधीमध्ये मोठ्या कॉर्पोरेटमधील एनपीएचे प्रमाण याच 7.9% वरून तब्बल 16.9% पर्यंत वाढले आहे. तसेच, औपचारिक कर्ज व्यवस्थेचा लाभ घेणाऱ्या नव्या अर्जदारांची संख्या लक्षणीय वाढली असून, ती 2016 मधील जानेवारी ते जून या सहा महिन्यांतील 2.7 लाखांवरून 2017 मधील जुलै ते डिसेंबरमध्ये 4 लाख झाली आहे. नव्याने गुंतवणूक केली जात असल्याचे यातून दिसून येते. या अहवालामध्ये, कर्ज देणाऱ्या संस्थांना जोखीम व नफा या दृष्टिकोनातून एमएसएमई क्षेत्राबद्दल गरजेची माहिती देण्याबरोबरच, जीएसटीअंतर्गत नोंदणी केलेल्या एमएसएमईंसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या दिलासादायक उपायांचा परिणाम, तसेच जीएसटी व नोटाबंदी या दोन आर्थिक घटकांचा परिणाम नमूद करण्यात आला आहे.

सिडबीचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद मुस्तफा यांनी सांगितले, निर्णय घेण्यासाठी योग्य माहिती उपलब्ध असणे महत्त्वाचे असते आणि ही माहिती योग्य वेळी मिळाली तर आवश्यक हस्तक्षेप किंवा अन्य तरतुदी करता येऊ शकतात. आर्थिक साधने अतिशय प्रभावी असतात असे सिडबीचे मत आहे आणि धोरणे ठरवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असलेला पाठिंबा देण्यासाठी सिडबी बाहेरच्या संस्थेकडून स्वतंत्र मूल्यमापन देऊ करते. एमएसएमई पल्स जाहीर करण्याच्या माध्यमातून कर्जविषयक निर्णय योग्य प्रकारे घेतले जाण्यासाठी कर्ज उद्योगाला नवे ट्रेंड उपयुक्त माहिती देणे हे सिडबी ट्रान्सयुनियन सिबिल यांचे उद्दिष्ट आहे.या क्षेत्राला सध्या देण्यात आलेल्या औपचारिक कर्जांच्या सद्यस्थितीविषयी बोलताना त्यांनी सांगितले, संघटित कर्जांच्या बाबतीत एमएसएमई क्षेत्राला अतिशय कमी प्रमाणात कर्जसेवा मिळत आहे. 51 दशलक्ष एमएसएमई युनिटपैकी केवळ 5 दशलक्ष युनिटना औपचारिक कर्जांची मदत उपलब्ध आहे. डिजिटल पद्धतीचा अवलंब जीएसटीची अंमलबजावणी यामुळे एमएसएमईंचे औपचारिकीकरण करण्यासाठी त्यांचा जास्तीत जास्त प्रमाणात समावेश करण्यासाठी मदत होईल.”

ट्रान्सयुनियन सिबिलचे व्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश पिल्लई यांनी सांगितले, एमएसएमईवर लक्ष केंद्रित केले योग्य प्रकारे सेवा दिली तर येत्या 3-4 वर्षांत भारतीय बँकांच्या व्यावसायिक बॅलन्स शीटमध्ये नफ्यामध्ये या श्रेणीचा मोठा हिस्सा दिसून येऊ शकतो. स्थिर पद्धतीची जोखीम, मोठ्या प्रमाणात प्रगती कर्ज उपलब्ध होण्याची व्याप्ती हे घटक शाश्वत वाढीसाठी महत्त्वाचे ठरू शकतील. या सर्वेक्षणामुळे विविध उपश्रेणी आणि कर्ज देणाऱ्यांच्या विविध श्रेणी या बाबतीत एमएसएमईंसाठी कर्जसुविधेच्या संख्यात्मक गुणात्मक पैलूंचा सखोल अभ्यास करण्यासाठी मदत होईल.

एमएसएमई पल्सची ठळक वैशिष्ट्ये

  • व्यावसायिक कर्जव्यवस्थेमध्ये झपाट्याने वाढते प्रमाण: डिसेंबर 16 ते डिसेंबर 17 या कालावधीत, मायक्रो (1 कोटी रुपयांपेक्षा कमी कर्ज) व एसएमई (1 कोटी ते 25 कोटी रुपये कर्ज) श्रेणींचे कर्ज व्यवस्थेतील प्रमाण 11.7 लाख कोटी रुपये (थकित व्यावसायिक कर्जांच्या 23%) असून, त्यामध्ये त्यामध्ये वार्षिक वाढ अनुक्रमे 20% व 9% होत आहे, या तुलनेत मिड श्रेणीची वाढ 4% (25 कोटी ते 100 कोटी रुपये) व लार्ज श्रेणीची 0.5% (100 कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज) आहे.

    मालमत्तेची गुणवत्ता तुलनेने स्थिर: मायक्रो श्रेणीसाठी एनपीएचे प्रमाण 9.2% (डिसेंबर 16) ते 8.8% (डिसेंबर 17) आणि एसएमई श्रेणीसाठी 11.3% (डिसेंबर 16) ते 11.2% (डिसेंबर 17) राहिले आहे. या तुलनेत, लार्ज कॉर्पोरेट श्रेणीमध्ये एनपीएचे प्रमाण 14.7% (डिसेंबर 16) वरून 16.9% (डिसेंबर 17) पर्यंत वाढले आहे. मालमत्तेच्या गुणवत्तेच्या बाबत, एमएसएमई क्षेत्राने कर्जामध्ये प्रचंड वाढ अनुत्पादकतेच्या बाबतीत तुलनेने कमी प्रमाण नोंदवले. एमएसएमईच्या (10 कोटी रुपयांपेक्षा कमी) पोर्टफोलिओच्या गुणवत्तेविषयी सखोल विचार केला असता, एनपीए स्थिर असल्याचे नियंत्रणात असल्याचे, तसेच एनपीए दरामध्ये अचानक वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे निदर्शनात येते. एमएसएमई क्षेत्रासाठी डिसेंबर 17 पर्यंत एनपीएचे प्रमाण 77,000 कोटी रुपये होते, तर अन्य बँका किंवा कर्जदात्या संस्थांनी किमान एकदा तरी कर्जास एनपीए असे ठरवलेल्या एंटीटींचे नॉनएनपीए प्रमाण 8000 कोटी रुपये आहे. गेले सहा महिने सातत्याने कर्जे थकित असलेल्या, परंतु अद्याप एनपीए ठरवण्यात आलेल्या एंटीटींना 26,000 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. या 34,000 कोटी रुपयांपैकी काही भाग नजिकच्या भविष्यात एनपीएमध्ये रुपांतरित होण्याची दाट शक्यता आहे.

     पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्या एमएसएमई अर्जदरांच्या संख्येत वाढ: पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्या मएसएमईंची (न्यू टू क्रेडिट (एनटीसी) बॉरोअर्स) संख्या लक्षणीय वाढली आहेजानेवारी ते जुलै 2016 या सहा महिन्यांतील 2.7 लाख रुपयांवरून जुलै ते डिसेंबर 2017 पर्यंत 4 लाख रुपये. एनटीसी एमएसएमई साधारणतः अतिशय लहान श्रेणीतील (10 लाख रुपयांपेक्षा कमी कर्जे) असतात. एनटीसी एमएसएमईंना कर्ज पुरवण्यासाठी साधारणतः सरकारी बँका पुढाकार घेतात त्यांनी या श्रेणीतील अंदाजे 80% कर्जे दिली आहेत.

अतिशय लहान श्रेणीतील (10 लाख रुपयांपेक्षा कमी कर्जे) एनटीसी अर्जदारांना प्रमुख्याने पब्लिक सेक्टर बँक (पीएसबी) कर्जे पुरवतात. या श्रेणीतील एनटीसी कर्जदारांना देण्यात आलेल्या कर्जांमध्ये पीएसबीचा हिस्सा 79% आहे. मायक्रो एन्टरप्राइजेसच्या आर्थिक समावेशकतेच्या बाबतीत पीएसबी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

खासगी बँकांचा हिस्सा वाढतो आहे: पब्लिक सेक्टर बँकांमुळे आर्थिक समावेशकतेला चालना मिळत असताना, नफा पीएसएल (प्रायॉरिटी सेक्टर लेंडिंग) या दृष्टिकोनातून खासगी बँका एनबीएफसीही एमएसएमई श्रेणीकडे आकृष्ट होत आहेत. खासगी बँका एनबीएफसी यांनी शाखांचा विस्तार डिजिटायझेशन या माध्यमातून या क्षेत्रात आक्रमक व्यवसाय सुरू केला आहे त्यासाठी या श्रेणीतील अर्जदारांना लोअर टर्नअराउंडटाइम (टीएटी) दर्जेदार सेवा देत आहेत. यामुळे त्यांचा बाजारहिस्सा डिसेंबर 15 मधील 34% वरून डिसेंबर 17 मध्ये 40% पर्यंत वाढला आहे.

नोटाबंदी जीएसटी यांचा परिणाम: लहान एमएसएमई किंवा लहान केंद्रांमध्ये असलेल्या एमएसएमई यांच्यावर नोटाबंदीचा अधिक परिणाम झाल्याचे आढळले आहे. परंतु, जीएसटीचा परिणाम मात्र एमएसएमईंच्या सर्व उपश्रेणींमध्ये सर्वत्र सारखा होता. असे असले तरी, या सर्व एंटीटी या दोन्ही घटनांच्या परिणामांतून आता सावरल्या आहेत आणि त्यांच्या कर्जविषयक घडामोडी नोटाबंदीच्या आधीच्या कालावधीनुसार पूर्वपदावर आल्या आहेत. एसएमई अर्जदारांच्या एनपीएसंबंधी रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सूचनांचा परिणाम: एनपीए ठरलेल्या जीएसटीसाठी नोंदणी केलेल्या एमएसएमईंविषयी भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडेच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे जानेवारी 18 मध्ये अंदाजे 12,910 कोटी रुपयांचे कर्ज असलेल्या 1.41 अर्जदारांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. यामुळे 82,000 कोटी रुपये कर्जे घेतलेल्या, तसेच सिबिल एमएसएमई क्रम 7 ते 10 असलेल्या येत्या काही महिन्यांत कर्ज भरले जाण्याची शक्यता असलेल्या आणि यावर उपाय करण्यासाठी कर्ज देणाऱ्यांना घेणाऱ्यांना अतिरिक्त वेळ गरजेचा असलेल्या 1.66 लाख अर्जदारांनाही फायदा मिळणार आहे.

एमएसएमईंसाठीच्या कर्ज उपलब्धतेचे राज्यनिहाय प्रमाण एमएसएमई क्षेत्रासाठी बँकिंग क्षेत्राकडून कर्ज उपलब्धतेच्या बाबतीत महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश या पाच प्रमुख राज्यांचे योगदान 45% आहे. प्रमुख 10 राज्यांमध्ये राजस्थानचा एनपीए दर सर्वात कमी म्हणजे (डिसेंबर 17 पर्यंत) 3.5% असून तो एमएसएमई क्षेत्राला दिलेल्या एकूण कर्जांपैकी 4.3% आहे.

 

महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर हल्लाप्रकरणी सरपंच गायकवाडची तुरुंगात रवानगी

0

सोलापूर, : माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथे  महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी प्रमुख आरोपी सरपंच मनोज अप्पाराव गायकवाड याच्यासह 8 आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी (दि. 16) बेड्या ठोकल्या आहेत. या सर्व आरोपींना सोमवार, दि. 19 पर्यत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
उपळाई बुद्रुक येथील सरपंच मनोज अप्पाराव गायकवाड व त्याच्या इतर साथीदारांनी दि.15 रोजी महावितरणचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता रमेश चव्हाण, सहायक अभियंता प्रेमनाथ चव्हाण, तंत्रज्ञ शिवाजी यमलवाड, अक्षय सलगर, राजकुमार हजारे, उपयंत्रचालक अतुल हरणे, बाह्यस्रोत कर्मचारी भास्कर सुतार यांना अमानुषपणे बेदम मारहाण केली. या मारहाणीत महावितरणचे सातही अभियंते व कर्मचारी जबर जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी उपळाईचा सरपंच मनोज अप्पाराव गायकवाड व त्याचे साथीदार लक्ष्मण चांगदेव जाधव, बाळू विठ्ठल माळी, सिद्धेश्वर अप्पाराव शेलार, शंकर शिवाजी गोरे, पप्पू महादेव डुचाळ, ज्ञानदेव चांगदेव राऊत, बाळू तुकाराम डुचाळ व सुनील क्षीरसागर यांचा मुलगा अशा एकूण 9 आरोपींविरुद्ध भा.दं.वि.च्या कलम 353, 332, 143, 147, 149, 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल केला.
उपळाई बुद्रुक येथील मारहाण प्रकरणाची महावितरण व्यवस्थापनाने गंभीर दखल घेत सर्व आरोपींना ताबडतोब अटक करून कठोर कारवाईची मागणी पोलिस प्रशासनाकडे केली. आरोपींच्या अटकेसाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी माढा पोलिस ठाण्यात गुरुवारी ठाण मांडून होते. यासोबतच जिल्हा पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनीही आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस यंत्रणेने या सर्व आरोपींना अटक करण्यासाठी गुरुवारी शोध मोहीम सुरु केली. यात शुक्रवारी (दि. 16) सकाळच्या सुमारास प्रमुख आरोपी व उपळाईचा सरपंच मनोज अप्पाराव गायकवाड याच्यासह लक्ष्मण चांगदेव जाधव, बाळू विठ्ठल माळी, सिद्धेश्वर अप्पाराव शेलार, शंकर शिवाजी गोरे, पप्पू महादेव डुचाळ, ज्ञानदेव चांगदेव राऊत, बाळू तुकाराम डुचाळ या आरोपींना माढा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोस यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या व गजाआड केले.

“फुलपाखरू” मध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मानस आणि वैदेहीची एक नवीन सुरुवात

0

गेल्या काही वर्षात महाराष्ट्रामधल्या असंख्य युवकांच्या मनात आपलं एक प्रेमाचं आणि हक्काचं स्थान निर्माण केलेली मराठी वाहिनी म्हणजे झी युवा.  या वाहिनीवरची फुलपाखरू ही मालिका आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातली वैदेही (हृता दुर्गुळे) तमाम तरूणांच्या दिलाची धडकन आहे तर मानस (यशोमान आपटे) सगळ्या मुलींचा लाडका आहे. कॉलेजच्या अल्लड वयात जुळलेलं प्रेम.. त्यांचा एकमेकांवरचा लटका राग.. त्यांची खोडकर मस्ती.. थोडे रुसवे – फुगवे.. एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या मानस आणि वैदेहीची हि प्रेमकथा म्हणजे “फुलपाखरू”…

धुळवडीच्या दिवशी मानस आणि वैदेही एका निसटत्या क्षणी एकमेकांच्या अत्यंत जवळ आले आहेत. दोघांच्याही घरून त्यांच्या प्रेमाला सुखद होकारसुद्धा मिळाला असल्याने दोघेही खुश आहेत. सगळं आलबेल असताना अचानक माशी शिंकावी तशी रॉकीने या दोघांमध्ये एन्ट्री घेतली आहे. मायाचा मित्र असलेल्या रॉकीने   दिलेलं चॅलेंज वैदेहीने स्विकारलं आहे. रॉकीला हरवण्यासाठी मानस आणि वैदेहीने आपल्या मित्रांना घेऊन ‘दोस्ती’ बॅंड सुरु केला आहे. सगळेच नवीन असल्यामुळे त्यांची थोडी धांदल उडतीये, पण तरीही मानस आणि वैदेही सगळ्यांना मॉरल सपोर्ट देत आहेत. आपल्या होणाऱ्या सुनाबाईंचा अपमान सहन न होऊन मानसचे वडीलही त्यांना हवी ती मदत करायला तयार झालेले आहेत. वैदेहीने घेतलेलं चॅलेंज पूर्ण करण्याच्या दृष्टीने मानस बॅंडसाठी एक नवीन गाणं लिहिणार आहे. गुढीपाडव्याचा दिवशी त्याची इन्सपिरेशन असलेल्या वैदेही समोर असताना अचानक मानसला हे गाणं सुचतं. फुलपाखरूच्या प्रेक्षकांसाठी या नव्या गाण्याची पर्वणी असणार आहे. तिथे माया मानसला वैदेहीपासून वेगळं करण्यासाठी तान्या आणि रॉकीला हाताशी धरून नवनवीन चाली खेळत आहे. मानसचं गाणं हे बॅण्डचं गाणं होऊ शकेल का? या गाण्याने दोस्ती बॅण्ड रॉकीला हरवू शकेल का? वैदेहीने घेतलेल्या चेलेंजमध्ये ती कितपत यशस्वी होऊ शकेल? माया वैदेहीला हरवण्यासाठी कुठला नवीन डाव खेळेल?

जाणून घेण्यासाठी पहा गुढीपाडव्यानिमित्त फुलपाखरू या मालिकेचा महाएपिसोड येत्या रविवारी म्हणजेच १८ मार्च २०१८ दु. १ आणि सायं ८ वाजता फक्त झी युवावर

“बापमाणूस” दादासाहेबांच्या मागचं शुक्लकाष्ट येत्या गुढीपाडव्यापासून सुटेल का?

0

झी युवा…. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रामधल्या असंख्य युवकांच्या मनात आपलं एक प्रेमाचं आणि हक्काचं स्थान निर्माण केलेली मराठी वाहिनी. आजच्या नवतरुणांच्या मनात असलेले नेमके प्रश्न, त्याच्या आयुष्यात सुरु असलेल्या, त्यांना जवळच्या वाटणाऱ्या गोष्टी या कथा – मालिकेच्या रूपात प्रेक्षकांच्या समोर आणण्यात झी युवा वाहिनी चांगल्यारितीने यशस्वी झाल्याचं प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून दिसून येत आहे. झी युवावर सुरु असलेल्या प्रत्येक मालिकेमधून दाखवण्यात येणाऱ्या विषयामध्ये प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन देण्याचा झी युवाचा प्रयत्न महाराष्ट्राच्या तरुण वर्गाला निश्चितपणे आकर्षित करतो आहे.

 

आपलं दुःख मनात लपवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे.. “बापमाणूस”

अवघ्या काही दिवसांवर गुढीपाडवा येऊन ठेपलेला असताना मोठ्या मुलाची अनुपस्थिती वाड्यातील सर्वांच्या चेहऱ्यावर काळजीच्या रूपात दिसत आहे. एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेऊन दादासाहेब सगळ्यांना धीर देत यंदाचा गुढीपाडवा नेहमीच्या हर्षोल्हासात साजरा करायला समजावतात. छोटीशी इरा आपल्या वडिलांना म्हणजेच चंद्राला भेटण्याचा हट्ट धरून बसलेली आहे. दादासाहेब इन्स्पेक्टर पवारांची मदत घेऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर चंद्रा आणि इराची भेट घडवून आणतात. दादासाहेब आणि सूर्याच्या मागे लागलेला कट कारस्थानांचा ससेमिरा अजूनही कमी होत नाही आहे. चंद्रा आणि इरा भेटल्यानंतर तिथे ठाकूर येतो. सूर्या ठाकूरला घडत असलेली परिस्थिती समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा ठाकूर सूर्याच्या कानाखाली लगावतो. सूर्या तिरमिरीत घरी येऊन स्वतःला खोलीत बंद करून घेतो. ऐन सणासुदीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकाराने घरातील सगळेच लोक काळजीत पडतात. ठाकूरने सर्वांसमोर केलेल्या सूर्याच्या अपमानाचं उत्तर दादासाहेब आणि सूर्या कसे देतील? चंद्राच्या अनुपस्थितीमध्ये घरातली गुढी कोण उभारेल? चंद्राचा गुढीपाडवा पोलीस स्टेशनमध्ये कसा असेल? हर्षवर्धन येत्या नवीन वर्षात दादासाहेबांविरुद्ध नेमकं कोणतं नवं कुभांड रचेल?

 

 

भाजपा सत्तेच्या विरोधात महापालिकेत मनसेचे ‘गाजर हलवा’ आंदोलन (व्हिडिओ)

पुणे-महापालिकेत भाजपच्या सत्तेला एक वर्ष पूर्ण झाले आहे मात्र या एकवर्षेत भाजपने फक्त आश्वासनाची फक्त गाजरे दिली आहेत त्यामुळे त्या गाजराचे हलवा करून मनसेने महापालिकेत गाजर हलवा आंदोलन केले.

यावेळी मनसे नगरसेवक वसंत मोरे, साईनाथ बाबर, माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच भाजप ही गाजर पार्टी असल्याचा आरोप करत पालिकेत गाजराचा हलव्याचे वाटप करण्यात आले.

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर फेब्रुवारी महिन्यात अक्षय कुमार अग्रस्थानी

0

मुंबई -प्रभावी सामाजिक चित्रपट पॅडमॅनमुळे बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार फेब्रुवारी महीन्यात स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता असल्याचं दिसून आले आहे. पद्मावत चित्रपटाच्या सूमारास तरूण पिढीचा हार्टथ्रोब रणवीर सिंगने अक्षयला मागे टाकले होते. मात्र पॅडमॅनच्या रिलीजच्या महिन्यात लोकप्रियतेमध्ये खिलाडी कुमार पहिल्या क्रमांकावर, अमिताभ बच्चन दुस-या क्रमांकावर, सलमान खान तिसऱ्या आणि शाहरुख खान चौथ्या स्थानावर होते. तर रणवीर सिंग पाचव्या क्रमांकावर पोहोचला होता.

स्कोर ट्रेंड्सच्या अनुसार, जानेवारी महिन्यात 57.67 गुणांसह तिस-या स्थानी असलेला अक्षय फेब्रुवारी महिन्यात 36.83 गुणांची आघाडी घेत, 94.50 गुणांसह अग्रस्थानी पोहोचला.

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्विनी कौल ह्याविषयी सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधल्या 600 बातम्यांच्या स्रोताव्दारे हा डेटा एकत्र केला आहे. मीडियामध्ये उपलब्ध आकडेवारीनुसार, हा डेटा मिळतो.”

अक्षयच्या रँकिंगमध्ये आलेल्या चढउताराचे विश्लेषण स्कोर ट्रेंडने केलंय. त्यानुसार, टॉयलेट: एक प्रेम कथा आणि पॅडमॅन ह्या सामाजिक विषयांवर असलेल्या दोन चित्रपटांमूळे अक्षय कुमारची जनमानसातली प्रतिमाच बदलली. बॉलीवूडच्या मुख्य प्रवाहात अशा पध्दतीचे चित्रपट घेऊन आल्याने अक्षयच्या लोकप्रियतेत वाढ झाली. त्याचप्रमाणे सीमेवर शहिद झालेल्या जवानांच्या कुटूंबियांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी सुरू झालेल्या ‘भारत के वीर’ ह्या सामाजिक उपक्रमात पुढाकार घेतल्याने एक ‘संवेदनशील आणि जागरूक’ अभिनेत्याची अक्षय कुमारची प्रतिमा बनली आहे.

अश्विनी कौल ह्याविषयी सांगतात, “फेसबुक, ट्विटर, व्हायरल न्यूज, वृत्तपत्रे आणि डिजिटल साइट्सवर अक्षयच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याला पॅडमॅनच्या रिलीजच्या सूमारास सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.”

व्होल्टासने वातानुकूलनाच्या उत्पादनांची श्रेणी-२०१८ बाजारात आणून आणखी भक्कम केले आघाडीचे स्थान

नवी दिल्ली : व्होल्टास या भारतातील पहिल्या क्रमांकाचा एसी ब्रॅण्ड असलेल्या टाटा समूहातील कंपनीने २०१८ सालची नवीन “व्होल्टास ऑल स्टार इन्व्हर्टर एसीज”ची मालिका बाजारात आणून आपले आघाडीचे स्थान अधिक भक्कम केले आहे. या आगळ्यावेगळ्या टू स्टेज स्टेडी कूल कंम्प्रेसर तंत्रज्ञानावर आधारित एसींमध्ये दोन टप्प्यांतील कम्प्रेशनमुळे दोन टप्प्यात गारवा वाढवला जातो. यामुळे स्टेडी कूलिंग अॅण्ड स्टेडी सेव्हिंग्ज अर्थात गारवा अचानक न वाढता स्थिरपणे वाढवणे आणि ऊर्जेची बचत हे दोन्ही साध्य होते. ही सुविधा अन्य एसींमध्ये नाही. यावर्षी व्होल्टासने एसी विभागात १२० एसकेयूज लाँच केले आहेत. त्यामध्ये इन्व्हर्टर एसी, स्प्लिट एसी आणि विंडो एसींचा समावेश आहे.

इन्व्हर्टर एसींच्या या नवीन मालिकेतील एसी तापमान ५५ अंशांपर्यंत कमी करू शकतात आणि केवळ १८ डेसिबल ध्वनीची निर्मिती करतात. यामध्ये आणखीही काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. उदाहरणार्थ, प्रगत एअर प्युरिफायर आणि फाइव्हडी डीसी मोटर तंत्रज्ञान (एसींमधील सर्व मोटर्स डीसी तत्त्वावरच काम करतात). याशिवाय या मालिकेतील सर्व उत्पादनांसोबत पाच वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी, मोफत स्टॅण्डर्ड इन्स्टॉलेशन आणि  क्रेडिट डेबिट कार्डामार्फत खरेदी केल्यास पाच टक्के कॅशबॅक अशा अनेक ऑफर्स आहेत.

याबाबत व्होल्टास लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रदीप बक्षी म्हणाले, “कूलिंग आणि कंफर्ट क्षेत्रात व्होल्टासची ब्रॅण्ड इक्विटी सर्वाधिक असून, एसी विभागात हा पहिल्या क्रमांकाचा ब्रॅण्ड आहे. आता ग्राहक इन्व्हर्टर एसीला प्राधान्य देऊ लागले असून एसी उद्योगातील हा सर्वाधिक वेगाने वाढणारा विभाग आहे. उद्योगातील प्रवाहाशी सुसंगती राखत, व्होल्टासने इन्व्हर्टर एसीच्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वांत मोठ्या श्रेणींपैकी एक लाँच केली आहे.”

सर्व हवामानांसाठी अनुकूल एसी” (ऑल वेदर एसी)

सध्या उपलब्ध असलेल्या ऑल वेदर एसींमध्ये आणखी सुधारणा करत व्होल्टासने ऑल वेदर एसींची एक नवीन आणि सुधारित श्रेणी बाजारात आणली आहे. आसपासचा परिसर अधिक थंड करण्याची क्षमता, योग्य पद्धतीने हीटिंग आणि हवेतील आर्द्रता नियंत्रित करण्याची सुविधा यात आहे. या सुविधांमुळे ग्राहकांना वर्षभर सर्व प्रकारच्या हवामानांमध्ये एसीचा वापर करता येतो.

या सर्व नवीन सुविधांनी युक्त उत्पादनांसह कंपनीने इन्व्हर्टर एसी, स्प्लिट एसी, विंडो एसी यांच्या दमदार श्रेणी देशभरातील १५ हजारांहून अधिक केंद्रांच्या मार्फत विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. एसींच्या नवीन श्रेणी व्होल्टासच्या वेगवान वाढीत हातभार लावतील आणि कंपनीचे बाजारपेठेवरील वर्चस्व कायम राखतील. नुकत्याच झालेल्या एका त्रयस्थ व स्वतंत्र रिटेल लेखा अभ्यासाच्या अहवालानुसार, कंपनीचा बाजारपेठेतील वाटा २३. टक्के (२०१७-१८ आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत) असून सर्वांत नजीकच्या स्पर्धकांना खूप मागे टाकून व्होल्टास भारतातील पहिल्या क्रमांकाचा एसी ब्रॅण्ड ठरला आहे.

फ्रेश एअर कूलर्स

आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करत, कंपनीने यावर्षी व्होल्टास फ्रेश एअर कूलर्सची नवीन श्रेणी बाजारात आणली आहे. हर गर्मी का कूलरअर्थात कोणत्याही प्रकारच्या उन्हाळ्यात थंडावा देणारा कूलर असे या श्रेणीचे घोषवाक्य आहे. या कूलर्समध्ये स्मार्ट ह्युमिडिटी कंट्रोलतंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून परिसरातील हवेतील आर्द्रतेचा योग्य वापर करून हे कूलर्स समतोल थंडावा देतात. याशिवाय टर्बो एअर थ्रो आणि अॅण्टि-मायक्रोबिअल टँकसारख्या सुविधांची जोड कूलर्सना देण्यात आली आहे. व्होल्टास एअर कूलर विकत घेण्यासाठी ग्राहकांना आकर्षक वाटणारी झिरो परसेंट कंझ्युमर फायनान्स योजना उपलब्ध आहे.

उत्पादनांची उपलब्धता यावर्षी आणखी वाढवण्यात आली असून, डेझर्ट, पर्सनल, विंडो आणि टॉवर कूलर या सर्वच विभागांत ३५ एसकेयू ठेवण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या स्वतंत्र आणि त्रयस्थ लेखा अभ्यासाच्या अहवालानुसार ही कंपनी भारतातील आघाडीच्या तीन कूलर्स ब्रॅण्ड्समध्ये आहे.

व्यावसायिक शीतकरण उत्पादने

व्यावसायिक शीतकरण उत्पादनांच्या उदयोन्मुख विभागात, व्होल्टासने नवीन कॉम्बो कूलर, कर्व्ह्ड ग्लास फ्रीझर आणि व्हर्टिकल डिसप्ले फ्रीजर्स यांच्यासारखे नवीन एसकेयूज लाँच केले आहेत. शिवाय व्होल्टासने आरओ आणि यूव्ही शुद्धीकरण तंत्रज्ञानाने युक्त असे एसीही लाँच केले असून अशा प्रकारच्या पहिल्या एसींमध्ये त्यांची गणना होते. व्होल्टासने बॉटम माउंटेड वॉटर डिस्पेन्सर्सही बाजारात आणले आहेत. यासह व्होल्टासच्या व्यावसायिक शीतकरण उत्पादनांनी १०० एसकेयूज टप्पा ओलांडला आहे.

एसी, एअर कूलर्स आणि व्यावसायिक शीतकरण उत्पादनांच्या विस्तारित श्रेणीसह व्होल्टासने २०१८ सालात बाजारपेठेत शीतकरणाच्या उत्पादनांचे २५०हून अधिक एसकेयूज लाँच केले आहेत.

व्होल्टास लिमिटेडविषयी : आपल्या युनिट्सच्या स्वरुपातील उत्पादनांच्या व्यवसायासह (यामध्ये एअर कंडिशनर्स, एअर कूलर्स आणि व्यावसायिक शीतकरण उत्पादनांचा समावेश होतो.) व्होल्टास ही आघाडीची इंजिनीअरिंग सोल्युशन्स पुरवणारी तसेच प्रोजेक्ट स्पेशालिस्ट कंपनी आहे.  भारतात १९५४ साली स्थापन झालेली व्होल्टास ही कंपनी उष्मीकरण (हीटिंग), व्हेंटिलेशन व वातानुकूलन (एचव्हीएसी), शीतकरण, विद्युत-यांत्रिकी प्रकल्प, वस्त्रोद्योग यंत्रसामुग्री, खाणकाम व बांधकाम उपकरणे, जल व्यवस्थापन व उपचार, शीतगृह सेवा, इमारत व्यवस्थापन प्रणाली, विद्युतीकरण आणि अंतर्गत हवेचा दर्जा आदी क्षेत्रांत इंजिनीअरिंग सेवा पुरवते. व्होल्टास लिमिटेड ही टाटा समूहातील आघाडीच्या दहा कंपन्यांपैकी एक आहे.