Home Blog Page 3161

दहाव्या पेसापालो या खेळाचे विश्व् चषक स्पर्धेचे पुण्यामध्ये आयोजन

0

पुणे-पेसापालो फाऊंडेशनचीची कार्यकारिणी मंडळाची बैठक पुणे शहरात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशभाऊ बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांच्यासमवेत झाली . या बैठकीत पुणे शहरात नोव्हेंबर २०१९ मध्ये होणाऱ्या दहाव्या पेसापालो या खेळाचे विश्व् चषक स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले .

हि बैठक  पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाली . महाराष्ट्र पेसापालो फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्वरदा बापट  , नगरसेवक महेश लडकत ,  कार्याध्यक्ष चेतन पागवाड , कार्यकारिणी सदस्य मार्क भस्मे  , संतोष पाटील , रणजित देशपांडे , आंतरराष्ट्रीय पेसापालो खेळाडू किशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते .

या बैठकीत पुणे शहरात नोव्हेंबर २०१९ मध्ये होणाऱ्या दहाव्या पेसापालो या खेळाचे विश्व् चषक स्पर्धेचे आयोजन करण्याचे  ठरविले . त्या संदर्भात खेळाच्या आयोजनबदल चर्चा करण्यात आली . या विश्व् चषक स्पर्धेमध्ये १२ देशामधील ५०० खेळाडू सहभागी होतील . यामध्ये प्रामुख्याने भारत  , फिनलँड , स्वित्झरलँड , स्वेडन , जर्मनी , ऑस्ट्रेलिया , अमेरिका , रशिया , नेपाळ , भूतान , श्रीलंका आदी देशामधील खेळाडू सहभागी होतील . आशिया व आफ्रिकेमधील इतर देशाची खेळाडू सहभागी होतील असे महाराष्ट्र पेसापालो फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष चेतन पागवाड यांनी सांगितले .

या खेळाचा सुरुवात लावरी पिखाला यांनी सन १९०२ साली  फिनलँड येथून केली . हा खेळ फिनलँड या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे . व सन १९५२ साली फिनलँड  हेलसिंकी येथे झालेल्या ऑलम्पिकमध्ये या खेळाचे प्रात्यशिक दाखविण्यात आले . तसेच या खेळात  फिनलँड ऑलम्पिक व शालेय स्तरावर याचे सामने होतात प्रीमियर लीगचे आयोजन दरवर्षी केले जाते . या मध्ये युरोपियन व आशियायी देशातील खेळाडू सहभाग होत असतात . हा खेळ बेसबॉल व सॉफ्ट बॉल  या खेळासारखा एका संघात १२ खेळाडू असतात . त्यातील प्रत्यक्ष ९ खेळाडू खेळतात , ३ राखीव खेळाडू असतात . तो संघ जास्त धावा मिळवतो तो संघ विजयी ठरतो . भारतीय पेसापालो महासंघाची स्थापन सन २०१० साली महाराष्ट्रातून करण्यात आली . याची प्रात्यशिक स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने राजनंदन गाव (छत्तीसगड) येथे सन मे २०१७ साली करण्यात आले .

आम आदमी पार्टी व शेठ ताराचंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप

0

पुणे-आम आदमी पार्टी व शेठ ताराचंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते . पुणे लष्कर भागातील बाबाजान चौकातील तेलगू हॉलमध्ये झालेल्या आरोग्य शिबिराचे उदघाटन आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा निरीक्षक ऍड विकास साबळे व महाराष्ट्र कौन्सिल  ऑफ इंडिया मेडिसिनचे सदस्य डॉ. अनुपमा शिंपी यांच्याहस्ते करण्यात आले .

या शिबिराचे आयोजन आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते एस. एम. अली , संदेश दिवेकर , आनंद अंकुश ,  राजेश चौधरी , साजिद कुरेशी , किशोर मुजुमदार , इफ्तेखार खान , हमीद शेख ,संदीप सोनवणे , मनोज थोरात , सुभाष कारंडे , सुनील कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले . यावेळी स्फुरलू फाऊंडेशनच्या अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या गीता बोरा यांनी महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप करण्यात आले .

या शिबिरासाठी डॉ. अनुपमा शिंपी , डॉ . नंदन देवरे , डॉ. अभिनव मुळे , डॉ. सुप्रिया पवार , डॉ. ऋतुजा कणसे आदी वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले . या शिबिरात रक्तदाब , रक्त शर्करा , किडनी व लिव्हरचे आजार   असलेले रुग्ण आढळले . तसेच मोफत चष्मे वाटप करण्यात आले . मोफत औषधें वाटप करण्यात आले .

खासदार निधीतून साने गुरुजी मंडळास रुग्णवाहिका लोकार्पण

0

पुणे-“साने गुरुजी तरुण मंडळाचे कार्य नेहमीच जनसेवेसाठी आदर्शवत राहिले असून आज लोकार्पण केलेल्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्ण सेवेचे कार्य मंडळाचे कार्यकर्ते नक्कीच ध्येयाने करतील असा विश्वास खासदार अनिल शिरोळे ह्यांनी व्यक्त केला. खासदार अनिल शिरोळे ह्यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत नगरसेवक धीरज घाटे ह्यांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या साने गुरुजी तरुण मंडळास रुग्णवाहिकेचे लोकार्पण पी एम सी कॉलनी पर्वती मतदारसंघ येथे नुकतेच करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते. ह्या कार्यक्रमास स्मिताताई वस्ते, मनीषा घाटे, सरस्वती शेंडगे, राजाभाऊ शेंडगे तसेच संगे गुरुजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचनातून महामानवाला आदरांजली अर्पण

0

पुणे – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त ‘लीड मिडिया’ च्या वतीने आणि अखिल सदाशिव, शनिवार, नारायण पेठ आंबेडकर जयंती महोत्सव समिती व वंदेमातरम संघटना यांच्या सहकार्याने ‘डॉ. आंबेडकर जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करूया’ या अभिनव उपक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर  वाचनातून यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

आपटे रस्त्यावरील सुशील बंगला येथे कलाकार, साहित्यिक, उद्योजक, विद्यार्थी, शिक्षक आणि माध्यम प्रतिनिधी यांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी एकत्र येऊन पुस्तकांचे वाचन करत आदरांजली अर्पण केली. या प्रसंगी लीड मिडियाचे विनोद सातव, वंदे मातरमचे वैभव वाघ, अभिनेते प्रवीण तरडे, नाट्य परिषद पुणेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, अॅड. रमेश परदेशी, केदार वांजपे, योगेश नांदुरकर, दीपक रेगे, मकरंद टिल्लू, सचिन जामगे, अनघा फाटक, शिरीष मोहिते, पियुष शहा, अरुण पटवर्धन, मनीषा पाटील, मिलिंद वेर्लेकर, किशोर वाघमारे, प्रदीप दिसले, डॉ. सायली कुलकर्णी, देवेंद्र गायकवाड, चेतन चावडा, अश्विनी तेरणीकर, मंदार आडकर, कुशल कोंडे, भूपाल पंडित आदी उपस्थित होते.

या उपक्रमाबद्दल बोलताना लीड मिडियाचे विनोद सातव म्हणाले, आपल्या महापुरुषांचे जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात विविध प्रकारे साजऱ्या होत असतात, हल्ली डीजे, फ्लेक्स लावून, रस्त्यावर धांगडधिंगा घालून, प्रदूषण करून ह्या जयंत्या साजऱ्या होत आहेत. त्याऐवजी विधायक उपक्रमातून त्यांचे विचार जागवूया ही खरी आदरांजली ठरेल म्हणून ‘डॉ. आंबेडकर जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करूया’ हा उपक्रम आम्ही हाती घेतला.

वैभव वाघ म्हणाले, आपल्याकडे महापुरूषांची विविध रंगात विभागणी झाली आहे, ते सर्व तिरंग्यावर असायला हवेत यासाठी हा उपक्रम आम्ही राबविला, या निमित्ताने पहिल्यांदाच  सदाशिव, शानिवार, नारायण पेठेत आणि आपटे रस्त्यावर डॉ. आंबेडकर जयंती साजरी झाली आहे.

अभिनेते प्रवीण तरडे म्हणाले, आज आपटे रस्त्यावर ‘डॉ. आंबेडकर जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करूया’  हा कार्यक्रम होत आहे पुढील वर्षी हा उपक्रम जनता वसाहत, दांडेकर पुल भागात हा उपक्रम राबवूया यामधुन एक डीजे कमी झाला, चार लोक रस्त्यावर नाचण्यापेक्षा वाचनाकडे वळले तरी ती खऱ्या अर्थाने डॉ. आंबेडकरांना आदरांजली ठरेल. नाट्य परिषद पुणेचे अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी आभार मानले. या उपक्रमात  वंदे मातरम् संघटना, अ. भा. मराठी नाट्य परिषद शाखा पुणे, सेवादल परिवार, एकपात्री कलाकार परिषद, रसिक साहित्य आदी संस्थानी सहभाग घेतला होता.

साईबाबांच्या पादुकांचे उत्साहात स्वागत

0

पुणे- साईबाबांनी धारण केलेल्या पादुकांचे साई भक्तांनी आज उत्साहात स्वागत केले. शनिवार पेठेतल्या न्यायमूर्ती रानडे बालक मंदिरात आज रविवार १५ एप्रिल पहाटे पाच ते रात्री दहा या वेळेत पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या यावेळी भाविकांनी गर्दी केली होती . श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने समाधी वर्षाच्या शताब्दीनिमित्त या कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले आहे. साईगंगा प्रतिष्ठान, साईदास मंडळ, साईबाबा पालखी सोहळा समिती यांनी संयोजन केले आहे.

कर्वे समाज सेवा संस्थेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह संपन्न

0

पुणे:  येथील कर्वे समाज सेवा संस्थेच्यावतीने दि ८ ते १४ एप्रिल हा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर, प्रा चेतन दिवाण व रजिस्ट्रार विनायक कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा व मुख्य जयंती सोहळयानिमित्त मान्यवरांचे निरनिराळ्या विषयांवर मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

“ डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवीकरण”  या विषयावर आयोजित वादविवाद स्पर्धेमध्ये कर्वे समाज सेवा संस्थेच्या समाजकार्याचे शिक्षण घेत असलेल्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या बहुतांशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले विचार व्यक्त केले. तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये “ फुले वारीअर्स” या गटाच्या मकबूल देशिंग, योगिता मंडल व मोहिनी साळुंखे यांनी प्रथम क्रमांक तर दलित पँथर्स या गटाच्या अजित मिसाळ, शिवराज सूर्यतळ व नम्रता पेंढारकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.परीक्षक म्हणून प्रा. चेतन दिवाण व प्रा. दादा दडस यांनी काम पाहिले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादनपर आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह सांगता समारंभामधील कार्यक्रमामध्ये संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर, डॉ महेश ठाकूर, डॉ. चित्रलेखा राजुस्कर, सतीश खुडे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर अजिंक्य खारतोडे, सिमरन हटकर, शिवराज सुर्यतळ, दिपाली पवार, मकबूल देशिंग, राधा कांबळे, सोनाली देशमुख, शुभम ठाकरे, अभिजित काकडे या विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध क्षेत्रातील उपक्रम व योगदानाविषयी विस्तृत मांडणी करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी जाधव यांनी केले तर आभार प्रवीण गुंजाळ यांनी मानले.

दलित वस्त्यांचे 100 टक्के विद्युतीकरण ग्राम स्वराज्य अभियानाचा शुभारंभ

0

मुंबई- केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापासून ते 30 एप्रिलपर्यंत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत असून सौभाग्य योजनेतून दलितवस्तीत 100 टक्के  विद्युतीकरण करण्यात येणार आहे. या अभियानाची राज्यात आजपासून सुरूवात झाली असून हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व अधीक्षक अभियंत्यानी क्षेत्रीय स्तरावर विशेष शिबीरांचे आयोजन करावे, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.संजीव कुमार यांनी व्हीडीओ कॉन्फरेन्सद्वारे आज दिले..

या अभियानात  राज्यातील 192 गावांत सौभाग्य योजनेतून वीजजोडणी देण्यात येणार आहे. अधीक्षक अभियंता (संचालन व सुव्यवस्था) यांच्यावर ही जबाबदारी टाकून त्यांनी त्यांच्या मंडलाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी संबंधित विभागाचे प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंता यांना देण्यात आले. यासाठी स्थानिक पातळीवरील जनमित्र, तंत्रज्ञ यांच्या मदतीने वीजजोडणी नसलेल्यांची आकडेवारी घेऊन ती तपासून त्यांना वीजजोडणी तात्काळ देण्यात यावी, असेही यावेळी सांगण्यात आले.

ज्या खेडी, पाडे, वाडी व वस्तीतील ग्राहकांना महावितरणच्या पायाभूत सुविधेतून वीजजोडणी देता येत नाही अशा ग्राहकांची यादी तयार करून त्यांना अपारंपारिक पध्दतीने सौरऊर्जेची वीजजोडणी देण्यात यावी.तसेच त्याप्रमाणे कृतीकार्यक्रम तयार करून  192 गावात तातडीने वीजजोडणी देण्यासाठी दि. 05 मे 2018 ची वाट न बघता दि. 30 एप्रिल 2018 पर्यन्त ही कामे पूर्ण करण्याचेही यावेळी सांगण्यात आले.पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री हर घर बिजली योजना अर्थात सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबांपर्यन्त वीज पोहचविण्याचे धोरण असून ग्रामीण व शहरी भागातील वीज नसलेल्या प्रत्येक घरात वीजजोडणी देण्यात येणार आहे

नगरसेविका सौ स्वप्नाली सायकर यांचा मदतीचा हात

0
पुणे-प्रभाग क्र ९ मधील कु आरती सुनील भालेराव हिची भारतीय सॉफ्टबॉल  संघात निवड  झाली असून ७ वी एशियन जुनियर वुमेन्स सॉफ्टबॉल चम्पियनशीप स्पर्धा क्लार्क फिलिपिन्स या देशात होणार आहे. या स्पर्धेत निवड झालेल्या  कु. आरती सुनील भालेराव हिची आर्थिक परिस्थती बेताची असून तिला मदत म्हणून  बाणेर बालेवाडी परिसरातून  अनेक  संस्थानी आर्थिक मदत केली आहे स्वराज्य  प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री प्रल्हाद सायकर व नगरसेविका सौ स्वप्नाली सायकर यांच्या वतीने आर्थिक मदतीचा  चेक  आज देण्यात आला याप्रसंगी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती गणेश कळमकर,श्री अक्षय बालवडकर,श्री पोळीचे पाटील  श्री आनंदा कांबळे  उपस्थित होते.
 अप्लुया परिसरात अनेक असे  खेळाडू आहेत परंतु आर्थिक परिस्थितीमुळे या खेळाडूंना पुढे जाता येत नाही भविष्यात प्रभागातील अशा खेळाडूंना आर्थिक हात मिळावा  व त्यांच्या कला  गुणांना वाव मिळावा यासाठी प्रयत्नशील राहील.या परीसरातील माझ्यासह अनेक  सामाजिक  संस्थानी,नागरिकांनी या उदोयन्मुख खेळाडूस 1 लक्ष रुपयापर्यंत मदात केली असून तिच्यापुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

२५००० भीमअनुयायींना अन्नदान , १०० पिशव्या रक्तदान शिबिरात जमा , १२७ व्यक्ती पँथर भीमरत्न पुरस्काराने सन्मानित

0

पुणे-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त दलित पँथर महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने  जिल्हाधिकारी कार्यलयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुतळ्यास अभिवादन करणाऱ्यास आलेल्या २५००० भीमअनुयायींना अन्नदान व १०० पिशव्या रक्तदान शिबिरात जमा करण्यात आल्या . या सामाजिक उपक्रमाचे उदघाटन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी  दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .सायंकाळी प्रसिध्द गायक अनिरुध्द बनकर यांचा प्रबोधनकार  गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या १२७ व्यक्तींना ”  पँथर भीमरत्न पुरस्कार ” प्रमुख पाहुण्याच्या हस्ते देउन सन्मानित करण्यात आले .

या सामाजिक उपक्रमाचे आयोजनासाठी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम , दलित पँथरचे कार्यकर्ते अल्ताफ सय्यद , इलियास शेख , किरण ठोगेपाटील , मुदस्सर शेख , अजय वंडगल , बाप्पू माने , सोनू सुतार , राजेंद्र नडगम , प्रिन्स कांबळे , अनमोल नडगम , कुणाल सुरवसे यांनी विशेष परिश्रम घेतले .

या रक्तदान शिबिरामध्ये १०० पिशव्या रक्त संकलित करण्यासाठी रेड प्लस ब्लड बँकेने विशेष सहकार्य केले . यावेळी रक्तदान केलेल्याना प्रमाणपत्र व अल्पोपहार देण्यात आला . रक्तदान करणाऱ्या मध्ये युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . तर अन्नदानाचा  दिवसभर सुरु होता . या अन्नदानाचा मोठ्या संख्येने भीमअनुयायींना लाभ घेतला . तसेच सायंकाळी प्रसिध्द गायक अनिरुध्द बनकर यांचा प्रबोधनकार  गीतांचा कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती .

एलईडी बल्ब वितरित करणाऱ्या मोबाईल व्हॅनला दाखविली हिरवी झेंडी

0

मुंबई-  ईनर्जी ईफिशिएन्सी सर्व्हिसेस लि., द्वारे रु. 50/- मध्ये एलईडी बल्बचा पुरवठा मोबाईल व्हॅनमार्फत करण्यात येणार आहे. या व्हॅनचे उद्घाटन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार आणि आणि ईनर्जी ईफिशिएन्सी सर्व्हिसेस लि., चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. सौरभ कुमार यांनी हिरवी झेंडी दाखवून आज केले.

 विद्युत मंत्रालय, ग्राम स्वराज्य अभियान, उजाला योजनेंतर्गत केंद्रीय ऊर्जा मंत्रालय यांच्या निर्देशानुसार ग्राम स्वराज्य अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी दि. 14 एप्रिल 2018 पासून सुरू होत आहे. याचे औचित्य साधून मे. ईनर्जी ईफिशिएन्सी सर्व्हिसेस लि., द्वारे रु. 50/- मध्ये एलईडी बल्बचा पुरवठा करणाऱ्या मोबाईल व्हॅनला हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. 14 एप्रिल ते 05 मे  2018 या दरम्यान राज्यातील 80 टक्क्यांपेक्षा जास्त दलितवस्ती असलेल्या गावात सर्वांना वीजजोडणी देण्यात येणार असून ही वीजजोडणी राज्यातील 192 गावांत सौभाग्य योजनेतून देण्यात येणार आहे. सदर गावात वीजजोडणीसाठी शिबीर लावून दिनांकनिहाय कार्यक्रम निश्चित करण्यात येत आहे. अशा कुटुंबांना 50 रुपयांत एक एलईडी बल्ब मे. ईनर्जी ईफिशिएन्सी सर्व्हिसेस लि., या कंपनीद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  हा बल्ब 9 वॅटचा असून त्याची 3 वर्षांची वॉरटी राहणार आहे.  म्हणजे काही तांत्रिक कारणाने बल्ब खराब झाल्यास ३ वर्षांपर्यन्त तो मोफत बदलून मिळणार आहे.

‘भारतीय विद्या भवन’मध्ये उलगडले रागदारी आणि लोकसंगीताचे नाते

0
‘गोफ स्वरांचा’ कार्यक्रमाने जिंकली रसिक मने
पुणे :
‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘गोफ स्वरांचा’ या सांगितिक कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. हा 47 वा  कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह’, सेनापती बापट रोड येथे झाला.
‘भारतीय विद्या भवन’ च्या कार्यक्रमात रागदारी आणि लोकसंगीताचे नाते उलगडले गेले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन रंजना काळे यांनी केले.
या कार्यक्रमात डॉ. राजश्री महाजनी, माधुरी करंबेळकर, रंजना काळे यांनी गायन सादर केले. राग संगीत, नाट्यसंगीत, टप्पा, दादरा, धून अशा विविध रचना सादर केल्या.
सतार आणि व्हायोलिन च्या सुरेल सुरात रसिक भारावून गेले.
जया जोग (सतार), डॉ. नीलिमा राडकर (व्हायोलिन), अमृता माळी-जाधव (हार्मोनियम), भावना टिकले (तबला) या कलाकारांनी साथसंगत केली होती.
डॉ. राजश्री महाजनी, माधुरी करंबेळकर, रंजना काळे यांच्या गायनाने सभागृहाचे वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.  कार्यक्रमाची सुरुवात राग भीमपलास ने झाली. नंतर ठुमरी, पहाडी (नादवेध) रागातील गाण्याने रसिकांची वाहव्वा मिळविली. कार्यक्रमाची सांगता भैरवीने झाली. 
भारतीय विद्या भवन ने गेल्या पावणे दोन वर्षात देशभरातून 11 राज्यात 422 कार्यक्रम राबविले. साडे तीन  हजाराहून अधिक कलाकारांनी या कार्यक्रमाद्वारे आपली कला सादर केली, असे काकिर्डे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत अत्रेय राव, अभिराम कंडत, संवेद देशमाने, आर्यन कोटस्थाने यांची आगेकूच

0

पुण :  महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन(12 व 14वर्षाखालील)टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत अत्रेय राव, अभिराम कंडत, संवेद देशमाने, आर्यन कोटस्थाने, राघव अमीन, ईशान देगंवार व ईशान नाथन या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात अत्रेय राव याने आदित्य भटवेराचा टायब्रेकमध्ये 9-8(8-6)असा पराभव करून आगेकूच केली. अभिराम कंडतने आदित्य पवारचा 9-3असा तर, संवेद देशमाने याने अथर्व बिराजदारचा 9-6असा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. ईशान देगंवार व ईशान नाथन यांनी अनुक्रमे आरिन माळी व दक्ष जालीवाला यांचा 9-1अशा सारख्याच फरकाने पराभव केला. आर्यन कोटस्थाने याने आदित्य जहागीरदारवर 9-0असा विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी:
14वर्षाखालील मुले:

अभिराम कंडत वि.वि.आदित्य पवार 9-3;
संवेद देशमाने वि.वि.अथर्व बिराजदार 9-6;
राघव अमीन वि.वि.अनिश रांजळकर 9-7;
आदित्य तलाठी वि.वि.सोहम सावंत 9-0;
ईशान देगंवार वि.वि.आरिन माळी 9-1;
ईशान नाथन वि.वि.दक्ष जालीवाला 9-1;
आर्यन कोटस्थाने वि.वि.आदित्य जहागीरदार 9-0;
अत्रेय राव वि.वि.आदित्य भटवेरा 9-8(8-6).

अनमोल नागपुरे वि.वि यश मस्कर 9-0;

श्रेयश कुमार वि.वि ऋषीकेश बर्वे 9-2.

आंतर क्लब टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र मंडळ , डेक्कन इ, एफसी अ, लॉ चॅर्जर संघांची आगेकूच

0
पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना  व  पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत  या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.  
 
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्लेटडिव्हिजन गटात पहिल्या सामन्यात  संजय सेठी, धनंजय पूर्वाणी,  अभिषेक चव्हाण, विक्रम श्रीमळ,  कमलेश शहा, डॉ. विकास,  संजय सेठी व आरोहित श्रॉफ यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर  महाराष्ट्र मंडळ संघाने मगरपट्टा ब  संघाचा 24-6 असा सहज पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. 
 
डेक्कन इ संघाने एफसीटीसी संघाचा 20-10 असा पराभव केला. विजयी संघाकडून विश्वजीत पवार , श्रीकांत कुलकर्णी, गिरिष शहा, हेमंत पुरोहीत, केदार जाधव व किरण सोनावणे यांनी संघाला विजय मिळवू दिला. 
 
संजय रासकर, पंकज यादव,  मित सातोसकर, गणेश देवखीळे,  राजेश जोशी, धनंजय कवडे, सचिन साळुंखे व पुष्कर पेशवे यांनी केलेल्या अफलातून खेळीच्या बळावर  एफसी अ संघाने डेक्कन क संघाचा 24-2 असा एकतर्फी पराभव केला. लॉ चॅर्जर संघाने पीवायसी फायटर्स संघाचा 24-5 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केला. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: प्लेट डिव्हिजन: 
महाराष्ट्र मंडळ वि.वि.मगरपट्टा ब  24-6(100अधिक गट: संजय सेठी/धनंजय पूर्वाणी वि.वि.प्रदीप जगपाले/प्रदीप मित्र  6-2; खुला गट: अभिषेक चव्हाण/विक्रम श्रीमळ वि.वि.रतिश आर/अमनदीप टी  6-1; 90अधिक गट: कमलेश शहा/डॉ. विकास वि.वि.मयूर पारीख/दिएगो ग्राफी  6-2; खुला गट: संजय सेठी/आरोहित श्रॉफ वि.वि.साकेत माळी/कृष्णन नारायण  6-1)                
 
डेक्कन इ वि.वि एफसीटीसी 20-10(100 अधिक गट- विश्वजीत पवार / श्रीकांत कुलकर्णी वि.वि जयंतराव चितळे/सिध्देश परळकर 2-6, खुला गट-मनोज हार्डीकर/श्रीरंग भावे पराभूत वि अमित मुलकर/मनोज कुलकर्णी 2-6, 90 अधिक गट- गिरिष शहा/हेमंत पुरोहीतवि.वि अरविंद रायरीकर/देवेन बडवे 6-2, खुला गट- केदार जाधव/किरण सोनावणे वि.वि सुनिल लोणकर/कपिल जोशी 6-0
 
एफसी अ वि.वि डेक्कन क- 24-2(100 अधिक गट- संजय रासकर/पंकज यादव वि.वि सतिश बापट/केदार जोगळेकर 6-0, खुला गट- सुमित सातोसकर/गणेश देवखीळे वि.वि अशिष धोंडगे/किरण भंडारी 6-0, 90 अधिक गट- राजेश जोशी/धनंजय कवडे वि.वि मयुर गुजराथी/भरत ससबे 6-2, खुला गट- सचिन साळुंखे/पुष्कर पेशवे वि.वि शरद कल्याणी/समिर केक्रे 6-0)
 
लॉ चॅर्जर वि.वि पीवायसी फायटर्स 24-5(100 अधिक गट- भुषण तळवळकर/मिलिंद राउत वि.वि सुनिता रावळ/नरेश तिडके 6-3, खुला गट- श्रीनिवास रामदुर्ग/राहूल मंत्री वि.वि राहूल रोडे/अकाश सुपेकर 6-2, 90 अधिक गट- संदिप महेश्वरी/नितिन गवळी पुढे टाल 6-0, खुला गट- विक्रांत गुणे/ केदार राजपाठक वि.वि रवी रावळ/ नरेश तिडके 6-0)
 

नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत पार्थ भोईटे, जिया परेरा, मधुरिमा सावंत यांचे संघर्षपूर्ण विजय

0

पाचगणी- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील नॅशनल सिरीज्  टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात पार्थ भोईटे, कुणाल पवार,  अयान तेजाबवाला, ध्रुव सुरेश यांनी तर, मुलींच्या गटात  व्योमा भास्कर, जिया परेरा, सायना देशपांडे,  मधुरिमा सावंत,  स्वरदा परब या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली. 

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात  पार्थ भोईटे याने सोहम कलगेचा टायब्रेकमध्ये 9-8(4)असा पराभव केला.  अयान तेजाबवाला याने विनीत मुटयालाचा 9-7असा संघर्षपूर्ण पराभव केला. कुणाल पवारने नमित मिश्राला 9-4असे नमविले.  वेद कुलकर्णीने आदित्य शिंदेचा 9-0असा सहज पराभव केला. 

मुलींच्या गटात  जिया परेरा हिने ख़ुशी रंगधोळचा टायब्रेकमध्ये 9-8(5)असा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.  मधुरिमा सावंतने परी चव्हाणचे आव्हान 9-8(4)असे मोडीत काढले. रिया भोसलेने अन्या जेकबचा 9-3 असा तर, स्वरदा परबने हर्षिता बांगेराचा 9-4असा पराभव करून आगेकूच केली. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी: 16 वर्षाखालील मुले: कुणाल पवार वि.वि.नमित मिश्रा  9-4; पार्थ भोईटे वि.वि.सोहम कलगे 9-8(4); ध्रुव सुरेश वि.वि.सार्थक कलगे 9-1; प्रणव हेगरे वि.वि.अथर्व साळुंखेपाटील 9-5; आयुष हिंदळेकर वि.वि.अथर्व पाटील 9-4; अयान तेजाबवाला वि.वि.विनीत मुटयाला 9-7; वेद कुलकर्णी वि.वि.आदित्य शिंदे 9-0;

16 वर्षाखालील मुली: व्योमा भास्कर वि.वि.इनिका रेड्डी 9-4; जिया परेरा वि.वि.ख़ुशी रंगधोळ 9-8(5); लाक्षण्या विश्वनाथ वि.वि.सोनल पाटील 9-4; सायना देशपांडे वि.वि.हर्षाली मांडवकर 9-5; रेश्मा मारूरी वि.वि.समीक्षा श्रॉफ 9-3; मैथिली मोटे वि.वि.संजीवनी कुतवळ 9-2; मधुरिमा सावंत वि.वि.परी चव्हाण 9-8(4); रिया भोसले वि.वि.अन्या जेकब 9-3; स्वरदा परब वि.वि.हर्षिता बांगेरा 9-4; सुहिता मारूरी वि.वि.निहारिका देशमुख 9-1.

गायिका कविता राम यांचा फ्युजन सॉंग व्हिडीओ युट्यूबवर

0

गायिका कविता राम सगळ्यांच्या चांगल्या परिचयाची आहे. अनेक हिंदी मालिकांसाठी तसेच मराठी सिनेमांसाठी पार्श्वगायन कविता यांनी केले आहे. कविता यांनी नुकतंच युट्यूबवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ट्रिब्यूट करणाऱ्या वेगवेगळ्या पाच गाण्यांचे फ्युजन सॉंग्स अपलोड केले आहेत. ही पाचही गाणी कविता राम यांनी गायली आहेत. कविता यांनी गायलेली ही गाणी मुळात उत्तरा केळकर, आनंद शिंदे, शाहीर विठ्ठल उमप यांनी गायली आहेत.  कविता यांनी “ये रिश्ता क्या कहलाता है”, “गोदभराई”, “मेरे घर आयी एक नन्हीं परी” “कैरी” ” साथ निभाना साथिया”  या मालिकांसाठी तर “या टोपीखाली दडलंय काय”, “लाज राखते वंशाची”, “दुर्गा म्हणत्यात मला”, “शिनमा” “थँक यू विठ्ठला”, “नगरसेवक” “हक्क”, “लादेन आला रे” यांसारख्या मराठी तर “गब्बर इज बॅक”, “सिंग इज किंग” या हिंदी सिनेमांसाठी गाणी गायली आहेत

या जुन्या गाण्यांना नव्या रूपात म्हणजेच फ्युजनच्या रूपात सादर करून कविता यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी आदरांजली दिली आहे. कविता यांनी केलेल्या या नव्या फ्युजनच्या सादरीकरणाबद्दल आनंद शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.