Home Blog Page 3152

भाजपने स्वतःच्या फायद्यासाठीच छगन भुजबळ यांना बाहेर काढले-राज ठाकरे

0
मुंबई-
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यानंतर मनसे  अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. भाजपने स्वतःच्या फायद्यासाठीच छगन भुजबळ यांना बाहेर काढले आहे असा थेट आरोपच राज ठाकरे यांनी केला आहे.छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी केली जाईलच, आणि त्यात ते दोषी आढळले, तर त्यांना शिक्षाही होईल. मात्र कोर्टाने सांगितल्यानंतरही त्यांना दोन वर्षे जामीन मिळतच नव्हता. हे चुकीचे आहे. भुजबळांना जामीन मिळण्यासाठी खूपच उशीर झाला आणि याला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे असे म्हणत, आता मात्र भाजपच्या फायद्यासाठी भुजबळांना बाहेर काढण्यात येत आहे अशी टीका राज यांनी केली. अशा प्रकारचं राजकारण चुकीचं असल्याचेही ते म्हणाले.भाजपवर टीकास्त्र सोडताना त्यांनी, भाजपला एक्सपायरी डेट आहेच, असे म्हणत टोलाही लगावला.

अंबरनाथमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर एका वृत्त वाहिनीशी बोलताना राज यांनी या विषयावर भाष्य केलं.

भुजबळांचा कारागृहातील मुक्काम संपला..मात्र उपचारासाठी रुग्णालयातच …

0

मुंबई-राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेतून आणि नंतर पंकजा मुंडे यांच्या एका भाषणातून छगन भुजबळ यांच्या सुटकेचे संकेत गेल्या महिन्यात मिळाले होते त्यांनतर आज बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केल्याने त्यांचा कारागृहातील मुक्काम संपला असला तरी त्यांचा रुग्णालयातील मुक्काम मात्र संपलेला नाही . स्वादूपिंडाचा त्रास असल्यामुळे भुजबळांवर उपचार सुरु आहेत. सध्या केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स आदी प्रकरणांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या तीन गुन्ह्याप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना सक्तवसुली महासंचालनालयाकडून (ईडी) १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. भुजबळ यांची मुंबईतील ईडीच्या मुख्यालयात चौकशी सुरू होती. छगन भुजबळ यांनी आपण चौकशीत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते मात्र, सरकारकडून सुडाचे राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता.

भुजबळांसह १७ जणांवर आरोपपत्र
महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स या व्यवहारातून भुजबळ कुटुंबीयांना मिळालेल्या ८७० कोटी रुपयांबाबत महासंचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. छगन भुजबळांसह त्यांचा मुलगा पंकज आणि समीर यांच्यासह १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

जामीन मिळणं हा त्यांचा अधिकार आहे तो त्यांना मिळाला आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. आमचे नेते भुजबळ यांच्या संपर्कात होते असे ते म्हणाले. सरकारनं त्यांना जामीन मिळू नये असा खूप प्रयत्न केल्याचे सांगताना अखेर कायद्यानुसार त्यांना जामीन मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

भाजप नगरसेवकाच्या लग्नातला फोटो विनापरवानगी झळकला भारत मेट्रीमोनीच्या संकेतस्थळावर

पुणे : भाजपचे गुरुवार पेठ परिसरातील नगरसेवक सम्राट थोरात यांचा लग्न सोहळ्यातला फोटो विनापरवानगी इंटरनेटवरील भारतमेट्रीमोनी या विवाह संस्थेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला. या विवाह संस्थेविरुद्ध सम्राट थोरात यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. वाय. एस. पैठणकर न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत खडक पोलिसांना प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.
नगरसेवक सम्राट थोरात यांचा १५ मे २०१५ रोजी ऐश्वर्या अजय भोसले यांच्या विवाह सोहळा झाला होता. त्या सोहळ्यातील एक फोटो भारत मेट्रीमोनी या इंटरनेटवरील संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर अपलोड करण्यात आला. सर्वप्रथम ही घटना अतुल भिसे यांच्या निर्दशनास आले. त्यांनी ही बाब तातडीने थोरातांच्या लक्षात आणून दिली. भिसे हे थोरात यांचे मित्र आहे. या विवाह संस्थेने आम्ही प्रतिष्ठित घरातील मुला मुलांचे लग्न जमवतो हे भासविण्यासाठी हे कृत्य करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. ही घटना उघडकीस आल्यावर थोरात यांनी अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेत भारत मेट्रीमोनी या संस्थेविरुद्ध खटला दाखल केला. न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करुन तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश खडक पोलिसांना दिले आहे. फिर्यादींच्या राजकीय प्रसिद्धीचा फायदा उचलण्यासाठी हे कृत्य केले आहे. या बाबतीत थोरात यांनी आपले लग्न या संस्थेमार्फत झाले नसून संस्थेकडून आपली फसवणूक करण्यात आली आहे, असे तक्रारीत नमूद केले आहे.

पुन्हा एकदा भाजपात ‘काकडे स्फोट’ (व्हिडीओ)

लोकसभेची तयारी सुरु :खा .संजय काकडे

पुणे- पुण्याच्या राजकारणात बराच अवधी साधलेली ‘चुप्पी’ राज्यसभेचे सदस्य असलेले,भाजपचे सहयोगी खा. संजय काकडे यांनी आज जाहीरपणे तोडल्याने   आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपात पुन्हा एकदा ‘काकडे स्फोट ‘ होत असल्याचे दिसून येते आहे . आपणास भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळेल आणि लोकसभेला आपण इच्छुक असल्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून आपण निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत असे आज खा. संजय काकडे यांनी पत्रकार परिषदेतच जाहीर केले. आपण साडेतीन लाखाच्या मताधिक्याने लोकसभा जिंकू असा दावा करत आणि पक्ष देईल तो आदेश पाळू , अनिल शिरोळेना उमेदवारी दिली तर त्यांचे काम मनापासून करू,गिरीश बापटांना उमेदवारी दिली तर पक्ष म्हणून काम करू अशी त्यांनी पुष्टी जोडल्याने …त्यांची इच्छुक उमेदवारी हे गिरीश बापटांना शह देण्याचे राजकारण आणि शिरोळे यांना पाठींबा देणारी कृती आहे  कि २०२० नंतर पुन्हा एकदा राज्यसभा निश्चिती करून घेण्याचे राजकारण आहे यावर खल होणार आहे .
दरम्यान या सर्व प्रश्नांचा काकडे यांनी इन्कार केला , आपणास स्वतःला आता जनतेतून निवडून जावयाचे आहे . आणि आपण तशी खास तयारी केली आहे.आणि आपल्या तयारीचा सर्वकष फायदा हा पक्षालाच होणार आहे . आपण राष्ट्रवादीत जाणार नाही, तशी ऑफर आपल्याला नाहीच ,आणि येणार हि नाही हे स्पष्ट करत त्यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीकडे उमेदवारच नाही .. अशी स्थिती आहे याकडे लक्ष वेधून आपण भाजपकडून च लढू आणि पक्ष आपल्यालाच उमेदवारी देईल असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले .यदाकदाचित तुम्ही ..नाहीच दिली पक्षाने उमेदवारी तर काय ? हा प्रश्न विचारताय म्हणून .. आपण पक्षाचे काम करू … असे ते म्हणाले .
एकंदरीत गिरीश बापट यांना काकडे यांचा विरोध असल्याचा राजकीय समीक्षकांचा दावा आहे आणि म्हणूनच ते निवडणुकीच्या रणांगणात एवढ्या अगोदरच शड्डू ठोकून उभे ठाकले आहेत . असेही सांगण्यात येते .या पार्श्वभूमीवर आता लोकसभेच्या तोंडावर भाजपमध्ये ‘काकडे स्फोट ‘ कोणकोणते रंग उधळणार आहे, आणि त्यांचा  भाजपातील बापट समर्थक कसा सामना करणार आहे  ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईल असे दिसते आहे .

मोफत डायपर सेवेद्वारे ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य करा – आबा बागुल

पुणे 
कुटुंबासाठी असो किंवा समाजासाठी दिशादर्शक ठरणाऱ्या ;पण  उतारवयात आजरपणामुळे अंथरुणाला खिळून असलेल्या  ज्येष्ठ नागरिकांना महापालिकेकडून त्यांचे बेडपान व्यवस्थित व्हावे यासाठी मोफत डायपर उपलब्ध करून त्यांचे जीवन सुसह्य करावे अशी मागणी माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. 
यासंदर्भात आयुक्तांना दिलेल्या पत्रात  माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे कि, कुटुंबीय असो किंवा सार्वजनिक जीवनात दिशादर्शक ठरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची उतारवयात अवस्था खूपच बिकट होते. आजारपणामुळे अंथरुणाला खिळून पडलेल्या या वयोवृद्ध माता-पित्यांकडे आजच्या धकाधकीच्या आणि मॉडर्न  जीवनात कुटुंबियांचेही  दुर्लक्ष होते. परिणामी अंथरुणावर त्यांचे बेडपान व्यवस्थित होत नसल्याने किंबहुना घरच्या मंडळींकडून किळस म्हणून होणाऱ्या दुर्लक्षामुळे या वयोवृद्धांचे खूप हाल होतात. परिणामी त्याचा त्यांच्या आरोग्यावरच विपरीत परिणाम होतो.ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यांना सेवा मिळतात मात्र बहुतांश वयोवृद्धांकडे त्याचीही व्यवस्था नसल्याने त्यांचे हाल होतात.नैसर्गिक विधी आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे या वयोवृद्धांचे जीवन असह्य होत आहे. त्यामुळे कुटुंबासाठी ,समाजासाठी योगदान देणाऱ्या या वयोवृद्ध माता-पित्यांचे हाल होऊ नये आणि आपली एक नैतिक जबाबदारी या हेतूने महापालिका हद्दीतील सर्व वयोवृद्ध माता -पित्यांसाठी महापालिकेच्यावतीने मोफत डायपर उपलब्ध करून दिल्यास खऱ्या अर्थाने या वयोवृद्धांचे अखेरचे जीवन सुसह्य होईल. त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करून वयोवृद्ध नागरिकांसाठी महापालिकेने आधारवड ठरावे असे आबा बागुल यांनी नमूद केले आहे. 

राज्य पुरस्कारा मध्ये ‘मंत्र’ चा सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट पुरस्काराने गौरव

–    आयटी क्षेत्रातील टीमचा चित्रपट क्षेत्रात वेगळा ठसा

ड्रीमबुक प्रॉडक्शन्सने वेदार्थ क्रिएशन्सच्या मदतीने तयार केलेल्या मराठी चित्रपट ‘मंत्र’ ने यंदाच्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात आपला ठसा उमटविला. राज्य पुरस्कारामध्ये सामाजिक विषय सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासाठी निर्माता संजय काटकर, दिग्दर्शक हर्षवर्धन आणि सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता म्हणून शुभंकर एकबोटे यांना पुरस्कार देण्यात आले.

माणूस फक्त पैशासाठी काम करत नाहीतर त्या कामात तो समाधान शोधतो’ हे  चित्रपटातील वाक्य ‘मंत्र’ च्या निर्माते आणि दिग्दर्शकांना तंतोतंत लागू पडते. आय.टी क्षेत्रात काम करत असतानाच चित्रपटाची निर्माण प्रक्रियाही त्यांना आकर्षित करत होती. त्यामुळेच दोनेक वर्षात या क्षेत्रात लागणाऱ्या तांत्रिक बाजूंचे कौशल्य अवगत करून वेदार्थ क्रिएशन्सच्या देवेंद्र शिंदेरजनीश कलावंतसचिन पंडित यांनी  संगीतकार विश्वजित जोशी यांच्या बरोबर  मंत्र’ ची योजना करून ती  ड्रीमबुक प्रोडक्शन्सच्या संजय काटकर यांच्यापुढे मांडली. विषयाचं वेगळेपण भावल्यान त्यांनीही या चित्रपटाच्या निर्मिती बरोबरच मार्केटींग आणि सादरीकरणाची जबाबदारी घेतली.

निर्माते, दिग्दर्शक यांच्या बरोबरच मुख्य भूमिका करणारा सौरभ गोगटे या सर्व IT मधील लोकांचा मंत्रहा पहिलाच चित्रपट, पण पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, संस्कृती कलादर्पण मागोमाग महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारातही जाणकारांच्या प्रशंसेस पात्र ठरला हे या टीमच्या प्रयत्नांचे यश आहे. याच महिन्यात जर्मनीमध्ये होणाऱ्या मराठी चित्रपट उत्सवासाठीही  मंत्रची निवड केली आहे.  

  देव आणि धर्म या विषयावर भाष्य करणं हे आजच्या काळात खूपच धाडसाचे काम आहे. पण हा  अत्यंत संवेदनशील विषय ‘मंत्र’ या चित्रपटात फारच संतुलितपणे मांडण्यात आला आहे. एका पुरोहिताचा मुलगा पैशासाठी वडिलांचा पेशा स्वीकारतो पण जेव्हा त्याच्या आयुष्यात कर्मकांडाला न मानणारी मुलगी येते तेव्हा ‘मंत्रची कथा घडते. प्रेक्षकांना, समीक्षकांना आणि वेगवेगळ्या महोत्सवातील तज्ज्ञ परीक्षकानांही चित्रपटाचा विषय, त्याची मांडणी आणि लेखकान मांडलेल्या तर्कशुद्ध विचारांनी प्रभावित केले आहे. खर तर लेखानाप्रमाणेच या चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या अभिनयालाही सर्वत्र दाद मिळते आहे. पदमश्री मनोज जोशी, दीप्ती देवी, पुष्कराज चीरपुटकर, सिद्धेश्वर झाडबुके, सुनील अभ्यंकर यांच्या बरोबरच अनेक नव्या चेहर्यांनी कमाल केली आहे. सनी आंबवणे हे पात्र रंगवणारा शुभंकर एकबोटे हा दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा. त्याचा अभिनय आईसारखाच नैसर्गिक वाटतो. एकंदर या IT मधल्या तज्ज्ञ लोकांकडून भावी काळातही चांगला content तयार होण्याची अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

‘वायू’ म्हणतोय ‘श्या… कुठे येऊन पडलो यार…..!!

–    उन्हाळ्याच्या सुट्टीत धम्माल मस्ती करण्यासाठी बच्चेकंपनीला ‘वायू’ चे निमंत्रण

एक कोवळं रोपटं…त्याच्या जागेवर आनंदाने‌ डोलणारं….अचानक उपटून दुसरीकडे पेरलं तर काय होईल त्याचं ?  कोल्हापूरात आपल्या घरात.. अंगणात…मित्रांमध्ये…रमलेला हा मुलगा..”.वायू “….. त्याला अचानक उचलून‌ मुंबईत आणलं आई-बाबांनी…. गोंधळलेल्या… घुसमटलेल्या वायूच्या मनांत आलेला हा वैताग…श्या… कुठे येऊन पडलो यार….श्या…!!

उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे लहान मुलांसाठी धम्माल, मस्ती करण्याची पर्वणीच.सुट्ट्यांमध्ये लहान मुले मनसोक्त खेळतातआणिबागडतात. अशातच त्यांच्या सुट्ट्या अधिक रंगतदार करण्यासाठी दिग्दर्शक विजू माने घेऊन आले आहेत बालचित्रपट ‘मंकी बात’. नुकतेच या चित्रपटातील श्या… कुठे येऊन पडलो यार….श्या…!! हे गाणे रिलीज झाले असून हे गाणे अल्पावधीत मुलांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरले आहे.

जरा काही आवडेनासं झाला  की “श्या…” म्हणत कंठ काढताना आपण लहान मुलांना बघितले असेलच.‘मंकी बात’ मधील वायू मुंबई शहरात येण्यापूर्वी मस्त कोल्हापुराला राहायचा.तेथीलजिवलग मित्रांचा सहवास आणि सोबतीला नदी, दऱ्या, डोंगर होता, या सर्व गोष्टीत तो रमून जायचा. नयनरम्य निसर्ग आणि बागडण्यासाठी त्याला पूर्ण रानं मोकळ होते.शहरात आल्यानंतर मात्र मर्यादित जागेचं आयुष्य त्याला आवडेनासं झाले. त्याचाशी कुणी लवकर गट्टी करेना, कुणी सोबत खेळू देईना. शिवाय शाळेतही जीवाला खाणारा एकटेपणा आहेच यामुळे वायू म्हणतोय श्या… कुठे येऊन पडलो यार…..!!

प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांची  ‘मंकी बात’ हि कलाकृती लहान मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामधली खास मेजवानी ठरणार आहे. निष्ठा प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची प्रस्तुती आकाश पेंढारकर, विनोद सातव, अभय ठाकूर, प्रसादा चव्हाण, शंकर कोंडे यांची असून विवेक डी, रश्मी करंबेळकर, मंदार टिल्लू आणि विजू माने निर्माते आहेत. चित्रपटाची गीते आणि संवाद  संदीप खरे यांचे तर  संगीत डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिले आहे.  ‘मंकी बात’ मध्ये बाल कलाकार वेदांत, पुष्कर श्रोत्री आणि भार्गवी चिरमुले प्रमुख भूमिकेत आहेत.चित्रपटाची कथा महेंद्र कदम आणि विजू माने यांची आहे. खास बच्चेकंपनीसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत येणारा हा चित्रपट येत्या १८ मी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘बीग बी’ अमिताभ बच्चन यांनी मराठी गाण्यांचा व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा

‘लय भारी’, ‘येरे येरे पैसा’ अशा गाजलेल्या चित्रपटांचे आणि ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या लोकप्रिय नाटकांचे ‘निर्माते अमेय विनोद खोपकर याची कलारसिकांना वेगळी ओळख करून द्यायला नको. आता त्यांची निर्मिती संस्था अमेय विनोद खोपकर (एव्हीके) एंटरटेन्मेंट  युट्युब चॅनल क्षेत्रात पदार्पण करत असून त्यांच्या पहिल्या व्हिडीओचे वैशिष्टे म्हणजे कोणत्याही वाद्याविना तयार झालेले मराठी गाणे, या व्हिडीओ मध्ये दिग्गज अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकारांसह तब्बल ६४ कलावंताचा समावेश आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून बॉलीवूडचे महानायक ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडीओ शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

 

चित्रपट निर्मिती क्षेत्रात वेगळा ठसा उमटविलेल्या एव्हीके एंटरटेन्मेंटच्या या पहिल्या युट्युब व्हिडीओची खासियत म्हणजे यामध्ये गाणे आहे मात्र स्वरवाद्य, तालवाद्य, तंतुवाद्य अशा कुठल्याही वाद्याचा यात वापर करण्यात आलेला नाही. हा संगीत प्रकार ‘आकापेला’ नावाने प्रसिध्द आहे. हरिहरन, सोनू निगम, अवधूत गुप्ते, कौशल इनामदार, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, सुदेश भोसले आदी दिग्गज गायक कलाकारांनी मराठी मधील अजरामर अशा  गाण्यांचे ‘मेडले’ केले आहे. यामध्ये black & white सिनेमा ते २०१८ सालच्या गाण्यांचा समावेश आहे.

दरम्यान, या व्हिडीओ मध्ये विक्रम गोखले, अशोक सराफ, महेश मांजरेकर, भरत जाधव,  स्वप्नील जोशी, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, सचिन खेडेकर, फुलवा खामकर, केदार शिंदे, अभिनय देव, मकरंद अनासपुरे, विक्रम फडणीस, मृणाल कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, रामदास पाध्ये, अतुल परचुरे, जितेंद्र जोशी, अजित परब, संजय जाधव, मंगेश देसाई, अनिकेत विश्वासराव, सोनाली खरे, विनोद कांबळी, किशोरी शहाणे, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, अभिनय बेर्डे, सायली संजीव, क्रांती रेडकर, दिपाली विचारे, आयान पटेल, मानसी नाईक, अभिनित पानसे, सचिन कुंभार, आदिनाथ कोठारे, प्राजक्ता माळी, मधुरा वेलणकर,नीलिमा कुलकर्णी, साहिल जोशी, चारू देसाई,चेतन शाशिथल,अमोल परचुरे, सौमित्र पोटे, जयंती वाघधरे, प्रेरणा जंगम,  विशाल इनामदार, बालकलाकार मृणाल जाधव, इशान खोपकर, तृष्णीका, स्नेहा चव्हाण, आदीसह मराठीतील अनेक सुप्रसिद्ध कलाकार झळकले आहेत. थोडक्यात सांगायचे तर  प्रेक्षकांना मंत्रमुग्ध  करेल असे वैविध्यपूर्ण गाण्यांचे मिश्रण आपणास या आकापेले संगीत प्रकारातील पहिल्या मराठी व्हिडीओ सॉंग मध्ये अनुभवायला मिळते.

अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंटने विक्रांत स्टुडीओच्या सहयोगाने प्रस्तुत केलेल्या या व्हिडीओची निर्मिती स्वाती खोपकर यांनी केली असून सुभाष काळे हे सहनिर्माते आहेत. विनय प्रतापराव देशमुख याची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेल्या या व्हिडिओला रुपाली मोघे आणि शाम्प्रद भामरे यांनी संगीत दिले, तर राहुल भातनकर यांनी संकलन आणि निखील गुल्हाने यांनी छायांकन केले आहे.  निनाद बत्तीन आणि तबरेज पटेल यांनी एव्हीके एंटरटेन्मेंटचे  व्यवसाय प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

भरदिवसा लक्ख उजेडात .नदी वर दरोडा … उपमहापौरांची तक्रार

पुणे- शहराचे मांगल्य,वाहिन्या मानल्या जाणाऱ्या मुळा मुठा नदीवर भर दिवसा लक्ख उजेडात दरोडा घाण्याचे काम सुरु असल्याचा प्रकार उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी आज चव्हाट्यावर आणला आहे . आणि नदीचे गळे घोटणाऱ्या चोरांवर कडक कारवीची मागणी केली आहे. जर आयुक्तांनी कारवाई केली नाही तर मी न्यायालयात जाईल अशी तंबी हि त्यांनी दिली आहे .
खुद्द उपमहापौर धेंडे यांनी या प्रकरणी लेखी तक्रर महापालिका आयुक्तांकडे  केली आहे , नदी पात्रात भराव टाकून ती बुजवून तिथे भूखंड निर्माण करून तो लाटण्याचा प्रकार होतो आहे . या कडे लक्ष वेधून त्यांनी तातडीने कारवाई ची मागणी केली आहे .. या संदर्भात पहा आणि ऐका नेमके उपमहापौर यांनी काय म्हटले आहे …

बोगस गुंठेवारी स्कँडलचा पहिला धागा कात्रजमधील माऊली मंगल कार्यालयापासून ?

पुणे- बोगस गुंठेवारी प्रकरणाला वाचा फोडत आज या प्रकरणाचा पहिला धागा आम्ही कात्रजच्या माऊली मंगल कार्यालयाचा आयुक्तांकडे सोपवीत आहोत या द्वारे बोगस गुंठेवारी स्कँडलचा पर्दाफाश करून  कात्रजच्या या नगरसेविकेचे नगरसेवक पद काढून घ्यावे अशी मागणी आज महापालिका आयुक्त सौरव राव यांच्याकडे मनसे चे नगरसेवक वसंत मोरे यांनी केली आहे .या संदर्भात त्यांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात पहा आणि ऐका …

पालिकेच्याच संगणकावरून ठेकेदारांचा काळाबाजार

पुणे-पालिकेचाच तोही एकच संगणक वापरून त्यावरून 5 निविदा भरण्यात आल्या, आणि  निविदांप्रकरणी  अनामत रक्कम भरताना एकाच खात्यातून ड्राफ्ट देण्यात आला ,सर्व निविदा धारकांचा पत्ता एक असणे , ठेकेदार म्हणून बोगस इसम उभा करणे,अशा तक्रारीनंतर राष्ट्रीय सपर्धा आयोगाने 6 ठेकेदारांना पावणे दोन लाखापासून ते ३४ लाखापर्यंत दंड केला .या सर्व ठेकेदारांना काळ्या यादीत टाका अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली आहे .
महापालिका हद्दीतील घनकचरा व्यवस्थापना संदर्भात महापालिकेचे घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेने टेंडर -निविदा मागविल्या होत्या .याप्रकरणी राष्ट्रीय स्पर्धा आयोगाने कारवाई केल्यानंतर आज अरविंद शिंदे यांनी हि मागणी केली आहे .

महाराष्ट्र दिनी कष्टकऱ्यांचा सन्मान

कात्रज – येथील सावंत विहार फेज 3 येथे सिद्धिविनायक ग्रुप च्या वतीने कष्टकऱ्यांचा सन्मान करून आणि वृक्षारोपण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला .

जिल्हा न्यायाधीश आर बी पाटील यांच्या हस्ते यावेळी पद्मावती माने, अभिमन्यू मिश्रा ,मोहम्मद खान,सविता डोलारे,कोमल जगताप,सुनिता पैलवान या श्रमजीवी वर्गातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला . तर ज्येष्ठ नागरिक रामलाल उणेचा,उल्हास नाईक,विठ्ठल पाटील ,निवृत्ती कापरे,यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. दिनेश यादव ,अॅड. दिलीप जगताप,सुनिता काळे,राजेंद्र घाडगे,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिन सोहळा पार पडला . यावेळी वृक्षारोपण ही करण्यात आले.रमेश देशमुख विनायक अंदालकर,चंद्रकांत कदम या वेळी उपस्थित होते. विनायक महांगडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .

परमवीर चक्र विजेते कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार शहीद अब्दुल हमीद यांच्या वीरपत्नी, रसुलन बीबी यांना यशोदा पुरस्कार जाहीर..

दीपक मानकर यांची माहिती; माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गौरव

पुणे (प्रतिनिधी) : भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावताना १९६५ साली पाकिस्तानविरोधात झालेल्या युद्धात अद्वितीय कामगिरी करणाऱ्या परमवीर चक्र विजेते कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार शहीद अब्दुल हमीद यांच्या वीरपत्नी श्रीमती रसुलन बीबी जी यांना यंदाच्या यशोदा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मानकर यांच्या मातोश्री स्व. सौ. मालतीताई माधवराव मानकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा हा पुरस्कार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पाच मे रोजी दुपारी साडेचार वाजता बालगंधर्व रंग मंदिरात प्रदान करण्यात येणार आहे.

दीवा प्रतिष्ठान आणि वीर हनुमान मित्र मंडळाच्या वतीने हा पुरस्कार गेल्या तीन वर्षांपासून दिला जात असून खडतर आणि संघर्षमय वाटेने जाणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना हा पुरस्कार दिला जातो. गौरव सोहळ्यास ज्येष्ठ उद्योजक विठ्ठलशेठ मनियार, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, इस्लामचे अभ्यासक अनिस चिश्ती, ब्रिगेडीयर प्रसाद जोशी, शहीद अब्दुल हमीद यांचे नातू जमील आलम, सैनिक मित्र आनंद सराफ आणि उद्योजक मयूर जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेस वीर हनुमान मंडळाचे संस्थापक दत्ता सागरे, दीवा प्रतिष्ठानचे संस्थापक हर्षवर्धन मानकर, अध्यक्ष करण मानकर उपस्थित होते.

पुरस्काराची माहिती देऊन मानकर म्हणाले, ‘देशसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सैनिकांप्रती सामान्य नागरिक म्हणून असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमच्या मातोश्रींच्या नावाने हा पुरस्कार वीरपत्नी रसुलन बीबी जी यांना देताना पुणेकरांनीही मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. परमवीर चक्र विजेते हवालदार शहीद अब्दुल हमीद यांच्यानंतर पत्नी रसुलन यांनी धैर्याने आयुष्याला सामोरं जात कुटुंबियांना साथ तर दिलीच पण अनेक तरुणांना यामुळे सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणाही मिळाली.

कलमाडींनंतर रामदास आठवलेंबरोबर संजय काकडेंची ‘डिनर डिप्लोमसी’!

खासदार काकडेंच्या भेटींमुळे राजकीय वातावरण तापले

पुणे- माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्याबरोबर झालेल्या राजकीय गुप्तगूनंतर मंगळवारी रात्री खासदार संजय काकडे यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व रिपाइं (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासोबत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘डिनर’ केला. दोघांमध्ये पुणे लोकसभा निवडणूक, सामाजिक घडामोडी आणि पुण्यातील विकासकामांसंदर्भात चर्चा झाली. खासदार काकडेंच्या या सलग भेटी व आठवलेंसोबतच्या ‘डिनर डिप्लोमसी’मुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे.आठवले यांच्यासोबतच्या ‘डिनर’मध्ये खासदार काकडे व आठवले यांच्यात पुणे लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भाजपामधील खासदार काकडे यांच्याबरोबरच इच्छुक असलेले अन्य उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसने नव्याने केलेला या मतदार संघावरील दावा आणि काँग्रसची भूमिका याविषयी दोघांमध्ये चर्चा झाली.

पुणे लोकसभा मतदार संघात दलित मतदान निर्णायक आहे. रामदास आठवले यांना मानणारा मोठा वर्ग पुण्यात आहे. खासदार काकडे यांचे सुरुवातीपासूनच रामदास आठवले, स्थानिक दलित नेते व कार्यकर्त्यांसोबत सौहार्दाचे संबंध आहेत. खासदार काकडे यांना मानणाऱ्यांपैकी दलित कार्यकर्त्यांची संख्या मोठी आणि शहरातील सर्व प्रभागांमध्ये आहे. खासदार काकडे यांनी पुणे महापालिका निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतरही राजकारणातील जातीय समतोल राखण्यासाठी पुण्याचे उपमहापौर पद रिपाइं ला देण्याचा आग्रह धरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तो मान्य केला आणि रिपाइंला उपमहापौरपद मिळाले.

लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केल्यानंतर तत्काळ खासदार संजय काकडे यांनी वेगाने भेटीगाठी सुरु केल्या आहेत. शहरातील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती वाढली आहे. लोकसभा निवडणूक अजून वर्षभर दूर असली तरी पुण्यातील राजकीय वातावरणाचा पारा उन्हाळ्यातील तापमानाप्रमाणे चांगलाच वाढला आहे.

रिपाइंच्या अधिवेशनाला खासदार काकडेंची प्रमुख उपस्थिती!

पुण्यात येत्या 25 ते 27 मे दरम्यान रिपाइं चे राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. त्याचे आयोजन व नियोजन उत्तम व दर्जेदार करण्यासाठी खासदार काकडे यांची मदत होणार हे निश्चित मानले जात आहे. तसेच, खासदार काकडे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येणार असून तशी चर्चाही केंद्रीय मंत्री रामदास आठवले व खासदार संजय काकडे यांच्यात झाल्याचे समजते.

स्टँडर्ड चार्टर्ड बँक- ब्रँड अम्बेसेडर म्हणून अनुष्का शर्माची निवड

रिटेल डिजिटल बँकिंग उपक्रम केले जाहीर

मुंबई – स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने आज रिटेल डिजिटल बँकिंग उपक्रम दाखल केल्याचे जाहीर केले आहे.या उपक्रमांमुळे ग्राहकांना विविध बँकिंग सेवांच्या बाबतीत सुरळीत डिजिटल अनुभव मिळणार आहे – तातडीने खातेउघडण्यापासून रिलेशनशिप मॅनेजरशी (आरएम) डिजिटल पद्धतीने संवाद साधण्यापर्यंत. बँकेने आज इन्स्टंटडिजिटल खाते उघडण्याची क्षमता वाढवली असून त्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन किंवा मोबाइलद्वारे आधार तपशीलचावापर करून बचत खाते तातडीने उघडता येईल.
विविध प्रकारच्या डिजिटल बँकिंग सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने, ग्राहकांना आता म्युच्युअल फंडामध्येगुंतवणूक करता येईल व युनिफाइडपेमेंट इंटरफेस (यूपीआय) व भारत क्यूआर याद्वारे पेमेंट करता येईल, असेबँकेने जाहीर केले आहे. तसेच, ग्राहकांना आता सर्व्हिर रिक्वेस्टसाठी ऑनलाइन चॅट करता येईल आणि प्रायॉरिटी वप्रीमिअम बँकिंग ग्राहकांना आरएमच्या मदतीने व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिक वेगाने सल्ला घेता येईल.
बँकिंग क्षेत्रामध्ये झपाट्याने बदल होत असून बँका व त्यांचे ग्राहक यांच्यातील संवादासाठी डिजिटल सुविधामहत्त्वाच्या ठरत आहेत. ग्राहक, प्रामुख्याने युवकांना स्मार्ट डिजिटल सुविधांच्या मदतीने बँकिंग सेवा झपाट्याने वसुरळित मिळण्याची अपेक्षा असते. या सुविधांमुळे बँकांना आपल्या विविध सुविधा तरुण व उदयोन्मुख उच्चभ्रूग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे, तसेच उच्चभ्रू ग्राहकांमधील स्थान अधिक सक्षम होणार आहे.काम करणाऱ्या तरुण ग्राहकांशी जोडले जाण्यासाठी बँकेने कॅम्पेन ब्रँड अम्बेसेडर म्हणून अनुष्का शर्मा यांची निवडकेली आहे. भारतातील एक आघाडीची अभिनेत्री व तरुणांची आदर्श असलेल्या अनुष्काच्या व्यक्तिमत्त्वातून बँकेचीमूल्य, तसेच उच्चभ्रू युवकांच्या आकांक्षा प्रतित होतात.या निमित्त बोलताना, स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी झरिन दारूवाला यांनी सांगितले,
“भारतातील तरुण व आकांक्षी युवकांमध्ये तंत्रज्ञानाचा झपाट्याने केला जाणारा स्वीकार विचारात घेता, आम्हीरिटेलमध्ये परिवर्तन आणण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे. यामागील उद्देश तंत्रज्ञानाचा वापर करणे, ग्राहकांनामिळणारा अनुभव संपूर्ण बदलणे; त्यास डिजिटल बाबतीत सक्षम व सुरळीत करणे, परंतु आमच्या सर्व बाबींमध्येग्राहक केंद्रितता कायम ठेवणे.आमच्या वाटचालीतील हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. आम्ही सर्व प्रकारची खाती उघडणे, यूपीआय व्यवहार वव्हर्च्युअल आरएम अशा विविध प्रकारच्या डिजिटल बँकिंग सेवा आम्ही दाखल करत आहोत, तसेच यासाठीतरुणांच्या आदर्श अनुष्का शर्मा यांच्याशी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. त्यांच्याव्यक्तिमत्त्वातील ताजेपणा, सकारात्मकता व महत्त्वाकांक्षा आमच्या डिजिटल उपक्रमांशी साधर्म्य सांगणारी आहेआणि युवकांची पसंतीची बँक असे स्थान आम्हाला मिळवायचे आहे,” असे झरिन दारूवाला यांनी सांगितले.
अनुष्का शर्मा यांनी सांगितले, “भारतातील 160 वर्षांची पार्श्वभूमी आणि समकालीन वअत्याधुनिक राहण्यासाठी प्रयत्न यांची सांगड घालणाऱ्या स्टँडर्ड चार्टर्ड या बँकेशी सहयोग करतानामला अतिशय आनंद होत आहे. विश्वास व एकता जपण्याबरोबरच सातत्याने डिजिटल नावीन्यआणण्याची स्टँडर्ड चार्टर्डची प्रेरणा मला भावली. एक कलाकार म्हणून, विविध प्रकारच्या भूमिकानिवडून व क्लीन स्लेट फिल्म्स या माझ्या प्रॉडक्शन हाउसमध्ये विविध सिनेमांची निर्मिती करूनमी स्वतःला आव्हान देण्याचा प्रयत्न करते. या कॅम्पेनच्या बाबतीत, सातत्याने नवीन काहीतरीकरण्याची ऊर्मी हा गुण मला माझ्यासारखा वाटला आणि मी उत्पादन व सेवांसाठी ब्रँड अम्बेसेडरव्हायचे ठरवले.”