Home Blog Page 3147

माधुरीच्या वाढदिवसानिमित्त बकेट लिस्ट चित्रपटाचं’तू परी’ रोमँटिक गाणं प्रसारित

येत्या 25 मे ला संपुर्ण जगभरात प्रदर्शित होणाऱ्या बकेट लिस्टया चित्रपटातील “होऊन जाऊ द्या!” या गाण्याच्या तुफानी हवेनंतर माधुरी दीक्षितच्या वाढदिवसाचं अवचित्य साधून चित्रपटातील रोमँटिक असं तू परीहे दुसरं गाणं आज सोशल मीडियाद्वारे प्रसारित होऊन आपल्याला पाहायला मिळणार आहे.

 बकेट लिस्टचित्रपटातील पहिल्या गाण्यात सर्व कलाकारांनी धरलेला नृत्याचा ताल आपल्या आकांक्षांना उजाळा देणारा ठरला. आता बकेट लिस्टचित्रपटातील  तू परीया गाण्यामुळे प्रेमाची नाती नव्याने खुलताना आपणांस बघायला मिळणार आहेत. लाखो-करोडो लोकांच्या स्वप्नातील परी अर्थातच माधुरी दीक्षित आणि अभिनय असो, संगीत असो वा नृत्य असो आपल्या प्रत्येक कलाकृतीने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडणारा अभिनेता सुमित राघवन ही चित्तवेधक जोडी या रोमँटिक अशा गाण्यातून आपणांसमोर येणार आहे. हे गाणं पाहताना जणू परी कथेतील परी स्वर्गातून लंकावी मध्ये अवतरली असल्याचा भास होतो.

 माधुरीच्या वाढदिवसानिमित्त बकेट लिस्टचित्रपटातील प्रसारित करण्यात येणार तू परीहे गाणं म्हणजे आपल्या सर्वांसाठी पर्वणीच म्हणावं लागेल. तू परीया गाण्याचं संपूर्ण शूटिंग मलेशिया येथील लंकावी येथे करण्यात आलेले आहे. तू परीगण्यादारम्यान आपणांस लांकवी येथील अप्रतिम लोकेशन्स व त्याच बरोबर सौंदर्यवती माधुरीच्या मोहक अदा, सुमित राघवनचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे.

 लंकावी सारखे नयनरम्य लोकेशन, माधुरी दीक्षित आणि सुमित राघवन ह्या अत्यंत गोड अशा जोडीचे नृत्य आणि श्रेया घोषाल आणि रोहन प्रधान यांच्या मधुर स्वरांनी सजलेलं तू परीहे सूर मधुर गाणं म्हणजे आपल्यासाठी खरी-खुरी रोमँटिक ट्रीट आहे असं म्हणायला हरकत नाही.

 धर्मा, करण जोहर आणि ए ए फिल्म्स प्रस्तुत, दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित, लेखिका देवश्री शिवडेकर आणि दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर लिखित, डार्क हॉर्स सिनेमाज्, दार मोशन पिक्चर्स आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स निर्मित चित्रपट बकेट लिस्टयेत्या 25 मे ला संपुर्ण जगभरात प्रदर्शित होणार असून रोहन-रोहन या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेलं, मंदार चोळकर यांच्या लेखणीतून अवतरलेलं आणि माधुरी दीक्षित व सुमित राघवन यांच्या रोमॅन्सने भरलेलं तू परीहे गाणं आपल्याला पुन्हा आपल्या आवडत्या व्यक्तीच्या प्रेमात पडायला भाग पाडेल यात काही शंकाच नाही.

256 कोटी रुपयांची गुंतवणूक करून पीएनजीची आणखी १५ दालने ..


पुणे-पी. एन. गाडगीळ अँड सन्स लिमिटेड (“कंपनी”) या स्टोअरच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या कंपनीने (स्रोत: क्रिसिल अहवाल) 500 कोटी रुपयांच्या प्रारंभी समभाग विक्रीतील अंदाजे 256 कोटी रुपयांची रक्कम महाराष्ट्र आणि/किंवा लगतच्या राज्यांतील 15 ठिकाणी 15 नवी स्टोअर सुरू करण्यासाठी वापरायचे ठरवले आहे. कंपनीच्या स्टोअरचे जाळे एप्रिल 1, 2012 रोजीच्या दोन स्टोअरवरून मार्च 31, 2018 रोजी 25 स्टोअरपर्यंत वाढले आहे. स्टोअरची संख्या आर्थिक वर्ष 2019 मध्ये 29 पर्यंत व आर्थिक वर्ष 2020 मध्ये 40 पर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे. ही सर्व स्टोअर कंपनीच्या मालकीची आहेत व कंपनीद्वारे चालवली जातात.

कंपनीने 2 ठिकाणी लार्ज फॉरमॅट स्टोअर्स (सरासरी 6,000 चौरस फूट बिल्ट अप क्षेत्र) सुरू करायचे ठरवले असून त्यासाठी प्रत्येकी 5.3 कोटी रुपये भांडवली खर्च (कॅपेक्स) केला जाणार आहे, तसेच प्रत्येक 1.12 कोटी रुपये कॅपेक्सद्वारे 9 स्मॉल फॉरमॅट स्टोअर (सरासरी 1600 चौरस फूट बिल्ट अप क्षेत्र) सुरू करायचे ठरवले आहे. कंपनी प्रति स्टोअर 1.81 कोटी रुपये खर्च करून पुण्यातील उपनगरे व बदलापूर/डोंबिवली येथे मीडिअम फॉरमॅट स्टोअर (सरासरी 2850 चौरस फूट बिल्ट अप क्षेत्र) व प्रति स्टोअर 1.12 कोटी रुपये कॅपेक्सद्वारे शिर्डी व फलटण येथे स्मॉल फॉरमॅट स्टोअर सुरू करणार आहे. कंपनीने विशिष्ट कर्जांची परतफेड/प्रीपेमेंट करण्याच्या दृष्टीने 112 कोटी रुपये व उर्वरित रक्कम अन्य कॉर्पोरेट उद्देशाने वापरण्याचे नियोजन केले आहे.

मार्च 31, 2018 रोजी, कंपनीच्या सर्व 25 स्टोअरमध्ये असलेल्या एकूण इन्व्हेंटरीचे प्रमाण 381.999 कोटी रुपये असून ते प्रति स्टोअर सरासरी 15.28 कोटी रुपये आहे. कंपनीने नवी 15 स्टोअर सुरू करायचे ठरवले आहे आणि इतक्याच प्रमाणात सरासरी इन्व्हेंटरीची आवश्यकता व्यक्त केली आहे. प्रस्तावित नवी स्टोअर सुरू करण्यासाठी 229.2 कोटी रुपयांची गरजेची आहेत, असा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.

“पी. एन. गाडगीळ” ब्रँडची परंपरा सन 1832 पासून, प्रमोटर-अध्यक्ष गोविंद गाडगीळ यांच्या कुटुंबाच्या अंदाजे सहा पिढ्यांपासून चालत आली आहे. कंपनीच्या स्टोअरचे वर्गीकरण प्रामुख्याने स्टोअरच्या आकारानुसार तीन फॉरमॅटमध्ये केले आहे –  11 ‘लार्ज फॉरमॅट स्टोअर्स’ (3,500 चौरस फुटांहून अधिक बिल्ट अप क्षेत्र), 6 ‘मीडिअम फॉरमॅट स्टोअर्स’ (2,200 चौरस फुटांहून अधिक बिल्ट अप क्षेत्र) व 8 ‘स्मॉल फॉरमॅट स्टोअर्स’ (1,000 चौरस फुटांहून अधिक बिल्ट अप क्षेत्र). मार्च 31, 2018 रोजी, कंपनीची महाराष्ट्रात 23 स्टोअर्स आहेत व गुजरात व कर्नाटक येथे प्रत्येकी एक स्टोअर असून, एकूण बिल्ट अप क्षेत्र 100,213 चौरस फूट आहे. कार्यक्षम व्यवस्थापन व कार्यपद्धतीसाठी, कंपनीने स्टोअरची विभागणी झोनल मॉडेलनुसार तीन स्वतंत्र झोनमध्ये केली आहे – पुणे-झोन, नाशिक-झोन व सोलापूर-झोन. कंपनी आपल्या उत्पादनांची ऑनलाइन विक्रीही करते – www.onlinepng.com.

आर्थिक वर्ष 2014 व आर्थिक वर्ष 2018 या दरम्यन कंपनीच्या एकूण उत्पन्नामध्ये वार्षिक 12.20% वाढ झाली. कंपनीचे उत्पन्न आर्थिक वर्ष 2014 मध्ये 1159.19 कोटी रुपये होते व ते आर्थिक वर्ष 2018 मध्ये 1,836.752 कोटी रुपये झाले. एबिटामध्ये वार्षिक 18.76% म्हणजे, आर्थिक वर्ष 2014 मधील 57.238 कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष 2018 मध्ये 113.87 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली व करोत्तर नफ्यामध्ये 24.84% म्हणजे, आर्थिक वर्ष 2014 मधील 23.697 कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष 2018 मध्ये 57.558 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली.

बीआयएसने नमूद केल्याप्रमाणे, कंपनीने गुणवत्ता व शुद्धता निकषांच्या अनुषंगाने 22 कॅरेटपर्यंतच्या व हॉलमार्क असलेल्या सुवर्ण दागिन्यांची विक्री करण्यासाठी संपूर्ण व्यवसायामध्ये गुणवत्ता नियंत्रणाच्या पद्धतींचा अवलंब केला आहे. कंपनीद्वारे विक्री केले जाणारे हिऱ्यांचे सर्व दागिने आयजीआय प्रमाणित आहेत व विकले जाणारे सर्व हिरे जीआयए प्रमाणित आहेत. तसेच, दागिन्यांचे डिझाइन व निर्मिती करत असताना विविध प्रकारच्या गुणवत्ता नियंत्रण पद्धती वापरल्या जातात. कंपनीने ग्राहकांच्या विशिष्ट पसंतीनुसार डिझाइन केलेली  निरनिराळी ज्वेलरी कलेक्शन सादर केली असून त्यामध्ये व्हॅल्यू मार्केट सेग्मेंटमधील लोकप्रिय ‘लाइट वेट ब्युटी’, ‘लव्ह अगेन अँड अगेन’ हिऱ्यांचे दागिने, ‘सप्तपदी ब्रायडल’ ज्वेलरी व टेम्पल ज्वेलरी कलेक्शन ‘लँटर्न कलेक्शन’ यांचा समावेश आहे.

एचडीएफसी बँक लिमिटेड व येस सिक्युरिटीज (इंडिया) लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर (“बीआरएलएम”) आहेत.रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे दिले जाणारे इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसई येथे सूचिबद्ध करणे प्रस्तावित आहे.

वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीचे कामे महिन्याअखेर पूर्ण करा

प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांचे निर्देश

पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे कामे मे महिन्याअखेर पूर्ण करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. तसेच सद्यस्थितीत किंवा येत्या पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तातडीने पूर्ववत करण्यासाठी अभियंता व कर्मचार्‍यांनी युद्धपातळीवर उपाय करण्याची सूचना त्यांनी क्षेत्रीय कार्यालयांना केलेली आहेत.

सेनापती बापट मार्गावरील प्रकाशभवनमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांच्यासह अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांची उपस्थिती होत. वादळ, गारपिट किंवा मुसळधार पावसामुळे नादुरुस्त झालेल्या वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी ताबडतोब कार्यवाही करण्यात यावी. पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा तत्परतेने सुरु करण्यात यावा. तसेच रोहित्र, वीजखांब, केबल्स, ऑईल व इतर साहित्य संबंधीत कार्यालयांनी उपलब्ध करून ठेवण्याची सूचना प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी यावेळी केली. बारामती व कोल्हापूर परिमंडलातील कार्यालयांना याप्रमाणेच सूचना देण्यात आलेल्या आहेत.

पावसाळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी तसेच पुणे, बारामती व कोल्हापूर परिमंडल अंतर्गत सर्व विभागांमध्ये 24 तास कार्यरत असणारे दैनंदिन नियंत्रण कक्ष उघडण्यात यावेत असे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले. यासोबतच खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी किंवा आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सर्व विभागांतर्गत साधनसामुग्रीसह फिरते पथक तयार ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठीची उपाययोजना म्हणून मान्सूनपूर्व वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जातात. यामध्ये रोहित्राची तपासणी, त्याचे अर्थिंग व टर्मीनल कनेक्शन चेक करणे, ऑईलची पातळी कायम ठेवणे, फिडर पिलरची दुरुस्ती करणे, वीजतारांजवळील झाडांच्या फांद्याची छटाई, डिस्ट्रीब्यूशन बॉक्समधील फ्यूज बदलविणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, गंजलेले वीजखांब बदलणे, वीजतारांमध्ये स्पेसर्स बसविणे, स्टेवायरने वीजखांबांचा आधार मजबूत करणे, फुटलेले इन्सूलेटर बदलणे, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणार्‍या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे आदी कामांचा समावेश आहे. रोहित्र तसेच वीजयंत्रणेच्या ठिकाणी नागरिकांनी टाकलेला कचराही या मोहिमेत साफ करण्यात येत आहे. यासोबतच उपकेंद्गातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जींग, अर्थींग, पॉवर टॉन्सफॉर्मरचे ऑईल फिल्टरेशन, रिले टेस्टींग, ग्रिसींग, इन्सूलेटर क्लिनींग आदी कामे करण्यात येत आहेत.

खंडित वीजपुरवठ्याची तक्रार नोंदविण्यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे 1912 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे तीन टोल फ्री क्रमांक 24×7 उपलब्ध आहेत.

विवाह प्रसंगी नवदाम्पत्यांनी घेतली, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 4 मुलांची शैक्षणिक जबाबदारी

पुणे-“विवाहाच्या शुभ मुहूर्तावर नवं दाम्पत्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 4 मुलांना शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेऊन व विवाहातील उपस्थित लोकांना 1000 वृक्ष सप्रेमभेट देऊन आपल्या सहजीवनाची आगळी वेगळी सुरुवात केली.
दौंड तालुक्यातील मौजे हिंगणिगाडा येथील बाळासाहेब खराडे यांची मुलगी व वरिष्ठ न्यायाधीश उमेशचंद्र मोरे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांची मेव्हूनी सुषमा ही विधी पदवीधरअसून पुणे येथे इन्फोसिस मध्ये विधी विभागात काम करते.चि.अमित लक्ष्मण मोहिते हा मौजे तळबीड तालुका कराड येथील असून बजाज ऑटो पुणे येथे डिझाइन इंजिनिर म्हणून कार्यरत आहे.या नवं दाम्पत्याने सामाजिक बांधिलकी ची नाळ तुटू नये म्हणून व सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आपल्या विवाह खर्चात बचत करून निरंजन सेवाभावी ट्रस्ट ही आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची मुके शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेते.या संस्थेला 4 मुलांना शैक्षणिक दृष्टीने दत्तक घेतले व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन माजी आमदार रमेशअप्पा थोरात यांचे हस्ते निरंजन चे कार्याध्यक्ष  विराज तावरे यांचे कडे आर्थिक मदतीचा चेक सुपूर्द केला.तसेच दिवसेंदिवस बेसुमार वृक्षतोड व नागरीकरणामुळे होणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हास वाचवण्यासाठी’ झाडे लावा झाडे जगवा”हा संकल्प सुद्धा नवं दाम्पत्याने विवाह सोहळ्यात हाती घेतला व प्रत्येक उपस्थितांना वृक्ष भेट दिला जेणेकरुन पर्यावरणाचा संतुलन राखण्यास मदत होईल.

संत तुकाराममहाराजांच्या ‘ वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे |पक्षी सुस्वरे|आळविती|| येणे सुख रुचे पळीताचा वास|नाही गुणदोष|’ या अभंगाचा बोर्ड विवाह स्थळी लावून 1000 वृक्ष नवं दाम्पत्याने सप्रेम भेट दिले.  या नवंदाम्पत्यास शुभ आशीर्वाद देण्यास माजी आमदार  रमेश अप्पा थोरात ,माजी आमदार श्रीमती रंजनताई कुल,श्री राजसिंह मोहिते पाटील (चेअरमन शिवामृत दूध संघ) शिव व्याख्याते श्रीमंत कोकाटे,योग गुरू दत्ताजी कोहिणकर, विकास अण्णा पासलकर,पुणे महानगरपालिका सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक,उद्योजक राजू थोरात,महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादीकाँग्रेसचे लीगल सेल चे अध्यक्ष भगवानराव साळुंखे , उद्योजक फाळके ,महाराष्ट्र बार काँसिल चे शिस्त पालन समिती सदस्य तुषार कोठावळे,पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष राजेंद्र दौंडकर,दैनिक सकाळ चे मुख्य कार्यकारीअधिकारीमहेंद्र पिसाळ, ऍड प्रशांत गिरमकर,शिवराज जहागीरदार,विराज तावरे ,शिवाजीराव निगडे ,देशमुख हरी प्रकाश निगडे देशमुख उपस्थित होते.

कोरेगाव-भिमा दंगल – संभाजी भिडे यांच्याविषयीची भूमिका- रिपब्लिकन अधिवेशनात घेणार ?

पुणे : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्यव्यापी अधिवेशन येत्या रविवारी (दि. २७) प्रादेशिक परिवहन विभागा (आरटीओ) जवळील एसएसपीएमएसच्या मैदानावर होणार आहे. सायंकाळी ४ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या युवक आघाडीचे राज्य सरचिटणीस डॉ. विजय मोरे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. युवक आघाडीचे महासचिव बाळासाहेब जानराव, युवक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर, जिल्हा युवती अध्यक्ष प्रियदर्शिनी निकाळजे, शहर युवक आघाडीचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण या वेळी उपस्थित होते.
अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी, मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत आरक्षण, कोरेगाव-भिमा दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांच्याविषयीची भूमिका, सुक्षित बेरोजगार युवकांना दरमहा ५ हजार बेकार भत्ता, लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथील स्मारक अशा विविध मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे.

महापौरांनी बडवला ढोल तर मास्तरांनी ताशा .. (व्हिडीओ)

पुणे-
पुण्यात भाजपचा जल्लोष पुणे- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने भाजपने शंभरहून अधिक जागांवर आघाडी घेतल्यानंतर. विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु होताच पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी बाजीराव रस्त्यावरील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याजवळ जल्लोष केला .यावेळी महापौरांनी ढोल बडविला तर हेडमास्तर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी तशा वाजविला. हेमंत रासने ,अशोक येनपुरे यांच्यासह अनेक नगरसेवक नगरसेविकांनी नाचून जल्लोष केला .
 भाजपचे पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले
आजचा भाजपचा विजय संपूर्ण देशाला  संदेश देणारा आहे. राजकीय परिपक्वता, प्रगल्भता, विकासाचे राजकारण, विकासाप्रती असलेली सरकारची प्रामाणिक भावना आणि नरेंद्र मोदींचे प्रामाणिक नेतृत्व यामुळे मतदरांनी भाजपला मते दिली. तर विरोधातील अत्यंत बालिश, कुठल्याही प्रकारची संघटनात्मक बैठक नसलेला, राजकीय परिपक्वता नसलेला इतर पक्षाचा विचार आणि जनतेची आजवर केलेली दिशाभूल यामुळेच जनतेने काँग्रेसला हा धडा शिकवला आहे. त्यामुळे कर्नाटकचा विजय हा संपूर्ण देशाच्या जनतेचा कौल आहे.
खा. अनिल शिरोळे
कर्नाटकच्या जागरूक,सक्रीय जनतेने काँग्रेसला नाकारलंय आणि ४ वर्षांच्या मोदी सरकारच्या कार्यकर्तृवावर, आणि भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवलाय. येणाऱ्या मध्यप्रदेश,छत्तीसगड आणि राजस्थान च्या निवडणूकीत आणि २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला निश्चित विजय मिळेल आणि श्रेष्ठ ,समर्थ, विकसित भारताचा संकल्प २०२२ पर्यंत सिध्दिस जाईल याचा विश्वास वाटतो.
महापौर मुक्ता टिळक
कर्नाटक राज्यात मिळालेल्या विजयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वसामान्य जनतेने टाकलेला विश्वास दर्शवतो. नरेंद्र मोदींनी गेली चार वर्षे फक्त सर्वासामन्य जनतेच्या हितासाठी काम केले आहे हे जनतेला आता कळायला लागले आहे. यापुढील काळातही देशात भाजपचे वारे जोरात वाहायला लागेल आणि 2019 मध्येही भाजपचा विजय होईल.
विरोधकांनी कितीही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तरी भारतीय जनता पक्षाने कर्नाटकमध्येही विजयचा झेंडा रोवला आहे. नरेद्र मोदींची लोकप्रियता, विश्वासाहर्ता, अमित शहा यांचे संघटन कौशल्य आणि शेवटच्या कार्यकर्त्याने केलेले काम यामुळे आम्हाला कर्नाटकमध्ये विजय संपादन करता आला आहे.

प्रवाशांची लुट ;आरटीओकडून ३२ बस जप्त

पुणे : प्रवाशांकडून वाढीव भाडे घेण्याच्या तक्रारी आल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने २ ते १४ मे दरम्यान खासगी बस तपासणीची मोहीम राबविली. यामध्ये एकुण ५१८ बसेसची तपासणी करण्यात आली असून ३२ बस जप्त करण्यात आल्या. उन्हाळी सुट्टी किंवा सण-उत्सवाच्या काळात खासगी बसेसमध्ये प्रवाशांकडून वाढीव भाडे घेतले जाते. यापूर्वी शासनाचे कसलेही नियंत्रण नव्हते. त्यामुळे प्रवाशांची लुट होत होती. यापार्श्वभमीवर राज्य शासनाने खासगी बसेसच्या भाडेदरावर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एसटी बसेसच्या भाडेदराच्या दीड पटीपेक्षा अधिक भाडे न घेण्याचा नियम करण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी दि. २८ एप्रिलपासून सुरू झाली. त्यानंतर निश्चित भाडेदरापेक्षा जास्त भाडे घेतल्याच्या तक्रारी आरटीओकडे येवू लागल्या. त्यानुसार दि. २ ते १४ मे या कालावधीत खासगी बस तपासणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये वायुवेग पथकांमार्फत ५१८ बसेसची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १२५ बसेसवर कारवाई करण्यात आली असून ३२ बस जप्त करण्यात आल्या आहेत. थकीत मोटार वाहन कर, योग्यता प्रमाणपत्र मुदतीत नसणे, विना परवाना वाहतूक करणे अशा विविध कारणास्तव बसेस आरटीओ कार्यालयामार्फत जप्त करून स्वारगेट एसटी आगार, बालेवाडी पीएमपी आगार याठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. जप्त वाहनांपैकी १२ वाहनांकडून १ लाख ८९ हजार २०० रुपये तडजोड शुल्क व ६ लाख ५९ हजार ७६१ रुपये वाहन कर असा एकुण ८ लाख ८४ हजार ९६१ रुपयांचा महसूल वसूल करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली.

पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे विश्‍वजीत कदम बिनविरोध विजयी

0

सांगली : पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार विश्‍वजीत कदम बिनविरोध विजयी झाले. भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी माघार घेतली. भाजपने कॉंग्रेसपुढे पालघर लोकसभा मतदार संघात तहाचा हात पुढे केला होता, तो यशस्वी झाला नाही, तरीही पलूस-कडेगावमधून भाजपने माघार घेतली.

 त्यामागे दिवंगत पतंगराव कदम यांचा सर्वपक्षिय सलोखा आणि भाजपचे सन 2019 मधील या मतदार संघासाठीचे ‘सुरक्षित’ नियोजन कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. संग्रामसिंह देशमुख यांच्यासारख्या क्‍लीन आणि आश्‍वासक उमेदवारावर पतंगरावांच्या सहानुभुतीच्या लाटेत पराभवाचा शिक्का नको, अशी सावध भूमिका भाजप आणि देशमुख दोन्हीकडून घेण्यात आली आहे.

माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनानंतर पलूस-कडेगावची पोटनिवडणूक लागली. त्यात विश्‍वजीत कदम यांना कॉंग्रेसची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर बिनविरोधच्या चर्चा सुरु झाल्या. राष्ट्रवादीने पाठींबा जाहीर केला, मात्र भाजपबाबत संदिग्ध स्थिती होती. कदमांचे पारंपारिक विरोधक असलेल्या देशमुखांनी पक्षादेशाप्रमाणे काम करू, असे जाहीर केले होते. भाजपने राज्यातील पोटनिवडणुकांचा रागरंग लक्षात घेऊन तह करण्यासाठी पलूस-कडेगाव मतदार संघात देशमुखांना अर्ज दाखल करायला सांगितला. अर्थात, हा डाव आहे, असे भासणार नाही, याची खबरदारी घेतली होती.

माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्याऐवजी त्यांचे चुलतबंधू, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी भाजपचा नियोजित राजकीय डावपेच होता. तह झाला नाही तर आम्ही ताकदीनेच लढू, विश्‍वजीत विरुद्ध संग्राम हा नवा रणसंग्राम घडवू, असा स्पष्ट संदेश त्यामाध्यमातून दिला गेला होता. त्यामुळे माघारीच्या क्षणापर्यंत भाजप लढेल का, असे चित्र राहिले. पालघरमध्ये कॉंग्रेसने मदत केली तर पलूस-कडेगावमधून माघार घेऊ, हा भाजपचा प्रस्ताव कॉंग्रेसने बेदखल केला होता. त्यामुळे संदिग्ध स्थिती होती. अखेरच्या क्षणी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत माघारीची घोषणा झाली. भाजपने इथे माघार घेऊन राजकीय मुत्सद्देगिरी दाखवली आहे. डॉ. पतंगराव कदम हे असामान्य नेते होते. त्यांच्या अकाली निधनानंतर सहानुभुतीचा फायदा विश्‍वजीत कदम यांना होणार, हे सरळ होते. अशावेळी भाजप लढले असते, मात्र त्यात पक्षाची आणि सोबतच देशमुखांच्या प्रतिमेविषयी नाहक नकारात्मक चर्चा झाली असती. त्याचा पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नव्हती.संग्रामसिंह देशमुख हे आश्‍वासक नेते आहेत. त्यांची मतदार संघात चांगली प्रतिमा आहे. ती पुढील निवडणुकीसाठी जपून ठेवण्याचा भाजपचा इरादा स्पष्ट आहे. दुसरीकडे पतंगराव कदम यांचे सर्वपक्षिय सलोख्याचे, मैत्रीचे संबंधही येथे कामी आल्याचे सांगितले जातेय. भाजपमध्येही त्यांचे अनेक मित्र राहिले आहेत. त्यामुळेच विश्‍वजीत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला गेला.

छुप्या मिळकतींचा घेणार शोध – मोळक

पुणे-मिळकत कर आकारणी पासून दूर राहिलेल्या छुप्या मिळकती पुणे महापालिका हद्दीत असून त्यांचा शोध घेण्याची मोहीम २१ ते ३१ में दरम्यान राबविण्यात येईल असे येथे पालिकेचे उपायुक्त आणि मिळकत कर विभागाचे प्रभारी प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले .
पालिका हद्दीत अनेक इमारती ,मिळकती बांधल्या गेल्या त्यांची खरेदी विक्री केली गेली .मात्र महापालिकेकडे मिळकत कर आकारणी साठी  सुमारे साडेआठ लाख मिळकतींची नोंद आहे. निबंधक कार्यालय आणि पालिका मिळकत कर विभाग यांच्यात कोणताही समन्वय नसल्याने स्वतः जे मिळकत मालक कर आकारणीसाठी पालिकेत येतात अशांचीच मिळकत कर विभागात नोंद होते .पण अशा नोंदी करवून घेण्यापासून म्हणजे कर आकारणी पासून दूर राहिलेल्या अनेक छुप्या मिळकती असाव्यात असा कयास आहे . त्यांची शोध मोहीम राबवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे मोळक यांनी सांगितले ..पहा नेमके मोळक यांनी काय म्हटले आहे ….

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ” लाक्षणिक धरणे आंदोलन “

पुणे- शहर मातंग समाज समिती व दलित संघटनाच्यावतीने बंडगार्डन रोडवरील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एक दिवसीय ” लाक्षणिक धरणे आंदोलन ”  करण्यात आले . शिरूर येथील पूजा सकट व सातारा येथील अमरावती सखाराम चव्हाण यांना एल अँड टी कंपनीच्या लोकांनी पेट्रोल टाकून जाळून मारून टाकण्यात आले . यांच्या  मृत्यूची सखोल चौकशी करून मूळ गुहेगारांना अटक करून कडक कारवाई करण्यासाठी हे लाक्षणिक धरणे आंदोलन  करण्यात आले . मातंग समाजातील  जेष्ठ  नेते अंकल सोनवणे यांच्या नेर्तृत्वाखाली हे एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन  करण्यात आले .

या उपोषणामध्ये विभागीय उपायुक्त  याना पुणे शहर मातंग समाज समिती व दलित संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन देण्यात आले . यावेळी मयत अमरावती सखाराम चव्हाण यांचे  पुत्र बाप्पू चव्हाण हे निवेदन देताना उपस्थित होते .

या लाक्षणिक उपोषणात पुणे शहर मातंग समाजचे सचिव प्रकाश वैराळ ,रिपब्लिकन संघर्ष दलाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय भिमाले , पुणे शहर अध्यक्ष नितीन बालकी, दलित युवक आंदोलनाचे सचिन बगाडे , भारतीय दलित विकास आघाडीचे रवी आरडे ,   दलित युवक संघर्ष समितीचे अध्यक्ष सुधीर नेटके , रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे , लहुजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हातागळे , भीम आर्मीचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष दत्ता बालकी  पोळ , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आर पी आय )चे अध्यक्ष सुहास गजरमल  , आल्वासा फाऊंडेशनचे अध्यक्ष दता जाधव , भारिप बहुजन महासंघाचे नागेश भोसले , रिपब्लिकन युवा मोर्चाचे अश्विन दोडके , भारिप सदस्य धनंजय सोनवणे , विनोद साळवे , लहुजी छावा संघटना शाम देडे , लहुजी संघर्ष सेनेचे दत्ता कांबळे , कामगार नेते सुहास बनसोडे , रिपब्लिकन मातंग सेनेचे अध्यक्ष अमोल तुजारे ,क्रांतिगुरू लहुजी महासंघाचे संतोष घोलप  आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

खराडी येथील आग रोहित्राच्या स्फोटामुळे नाही

विद्युत निरीक्षकांच्या तपासणी अहवालातून स्पष्ट

पुणे : खराडी येथील झेन्सॉर आयटी पार्कजवळ सॅण्डविच स्टॉलला रोहित्राच्या स्फोटामुळे किंवा विद्युत कारणांमुळे आग लागली नाही. तसेच रोहित्राचा स्फोट झालेला नाही किंवा त्यातून ऑईलसुद्धा बाहेर फेकल्या गेले नाही असे विद्युत निरीक्षक विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान या आगीमध्ये महावितरणचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले असून संबंधीत सॅण्डविच स्टॉल चालकाविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी, की खराडी येथे झेन्सॉर आयटी पार्कजवळ शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी रोहित्राजवळील स्टॉलला आग लागली होती. परंतु महावितरणचे 200 केव्हीए क्षमतेचे रोहित्र सिमेंटच्या चौथर्‍यावर सुस्थितीत होते व त्यातून एकूण क्षमतेच्या 37 टक्के जोडभार देण्यात आले होते. तसेच या रोहित्राभोवती लोखंडी जाळ्यांचे कंपाऊंड करण्यात आले आहे. या रोहित्राच्या लगतच एक फूट अंतरावर असलेल्या ए-वन सॅण्डविच स्टॉलमध्ये आग लागली. स्टॉलमागील आंब्याच्या झाडाच्या फांद्यांनी पेट घेतला व या पेटलेल्या फांद्या तुटून रोहित्र व वीजवाहिन्यांवर पडल्या. त्यामुळे रोहित्र व वीजवाहिन्या जळाल्या. परंतु या वीजयंत्रणेने पेट घेण्यापूर्वीच महावितरणकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे स्टॉलला रोहित्राच्या स्फोटामुळे किंवा अन्य विद्युत कारणांमुळे आग लागलेली नाही हे विद्युत निरीक्षकांनी केलेल्या तपासणी अहवालातून स्पष्ट झालेले आहे.

आगीनंतर सॅण्डविच स्टॉलमध्ये गॅसचे एक सिलिंडर, शेगडी, रेग्यूलेटर, पाईप हे अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आले होते. या आगीमध्ये महावितरणचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे व याप्रकरणी संबंधीत सॅण्डविच स्टॉलचालकाविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

खबरदार ..पुण्याचे पाणी पळविण्याचा प्रयत्न कराल तर – चेतन तुपे पाटील

पुणे :  पुणेकरांसाठी महापालिका जादा पाणी देत असल्याचे सांगत वारंवार पुणेकरांच्या पाण्याचे “मोजमाप’ काढणाऱ्या पाटबंधारे विभागाने पुणे शहराचे पाणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) देण्याचा घाट घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जलसंपदा विभागाने लोकसंख्येच्या निकषानुसार, 2017 पर्यंत महापालिकेस प्रतिवर्ष 8.2 टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे. तर राज्यशासनाने 2021 पर्यंत 11.50 टीएमसी पाणी मंजूर केले आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिका 16 ते 17 टीएमसी पाणी वापरत असल्याने महापालिकेने या पाण्याची बचत करावी, तसेच हे पाणी “पीएमआरडीए’ने घ्यावे असा अहवालच दिला आहे. या अहवालाचा आधार घेत “पीएमआरडीए’ने नुकतेच महापालिकेस पत्र पाठविले असून त्यात पालिकेने मंजूर कोट्यापेक्षा जादा पाणी वापर होत असल्याने पाणी बचतीचा अहवाल “पीएमआरडीए’ला सादर करावा, अशी मागणी केली आहे.
हद्दीतील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र धरण बांधण्याची घोषणा “पीएमआरडीए’ने ली होती. मात्र, कृष्णा खोरे लवादाच्या निर्णयानुसार, भिमा उपखोऱ्यात नवीन धरण बांधणे शक्‍य नाही. त्यामुळे पिरंगुट व लगतच्या सहा गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी टेमघर धरणातून पहिल्या टप्प्यात अर्धा टीएमसी पाण्याची मागणी “पीएमआरडीए’ने जलसंपदा विभागाकडे केली होती. त्या बैठकीत पुणे महापालिका जादा पाणी वापरत असून त्यांनी बचत केल्यास आणि भामा-आसखेड धरणातून दोन्ही महापालिकांना मंजूर करण्यात आलेला कोटा रद्द झाल्याने तसेच खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत शहरातून जाणारा मुठा कालवा भुयारी केल्याने जे पाणी वाचेल, ते “पीएमआरडीए’ला देणे शक्‍य असल्याचे सांगत, पुणेकरांचे पाणी पळविण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना मिळणाऱ्या पाण्यात लवकरच नवीन भागीदार येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

यावर आज महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी पीएमआरडीए ला सज्जड दम भरला आहे … काय आणि कसा तो ऐका त्यांच्याच शब्दात ……

मालवणी भाषेच्या गोडव्यातला ‘रेडू’

‘काय गो, काय करतंस?’ किंवा ‘तुका-माका, हय-खय’ हे शब्द कानी पडले, कि समोरचा व्यक्ती मालवणी आहे हे हमखास कळते. मालवणी माणसांचा प्रेमळ आणि तितकाच असलेला मिष्कील स्वभाव त्यांच्या बोलीभाषेतून व्यक्त होत असतो. म्हणूनच तर, नारळासारखे बाहेरून टणक पण आतून गोड असलेल्या या मालवणी माणसांवर आधारित ‘रेडू’ हा राज्य पुरस्कारप्राप्त सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. लँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि ब्लिंक मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड सह नवल फिल्म्सचे नवल सारडा यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे सागर छाया वंजारी यांनी दिग्दर्शन केले आहे.

मालवणी संस्कृतीचा सार या सिनेमाला लाभला असल्याकारणामुळे, स्थानिक कलाकारांची मोठी फळीच आपल्याला यात दिसून येणार आहे. मालवणी बोलीभाषा अवगत असलेल्या तब्बल ५५ कलाकारांचा यात समावेश असून. या सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना विशेष एक महीन्याचे प्रशिक्षणदेखील देण्यात आले होते. एवढेच नव्हे तर, ‘रेडू’ सिनेमा ६०-७० च्या दशकातला असल्याकारणामुळे, तो काळ मोठ्या पडद्यावर सादर करण्यासाठी रेडूच्या टीमला विशेष तजवीजदेखील करावी लागली होती. कारण यावेळचे मालवण आधुनिक झाले असून, आज प्रत्येक गाव प्रसारमाध्यमे आणि विद्युत जाळ्यांमुळे एकमेकांना जोडली गेली आहेत. त्यामुळे दूरवर पसरलेल्या विजेच्या तारा तसेच दूरदर्शनचे अँँटीने दिसू नयेत, यासाठी संपूर्ण टीमला चीत्रीकरणासाठी घनदाट झाडी असलेल्या अज्ञात जागी सेट उभा करावा लागला होता. चहुबाजूने जंगल आणि निर्मनुष्य अशी ती जागा असल्याकारणामुळे चित्रीकरण संपेपर्यंत संपूर्ण टीमला बाहेरील जगाची संपर्क करण्याचे कोणतेच मध्यम तेथे उपलब्ध होत नव्हते. अश्यावेळी मग फोनवर बोलायचे असल्यास, नेट्वर्किंग क्षेत्रात येण्यासाठी किमान दोन तास तरी लांब शहरात जावे लागे. याप्रकारे ‘रेडू’ च्या सर्व टीमने अश्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपापले काम अचूक पूर्ण करत,सिनेमाला योग्य न्याय मिळवून दिला.

‘रेडू’ म्हणजे ‘रेडियो’ वर अमाप प्रेम करणाऱ्या ७० च्या दशकातील एका सामान्य ग्रामीण युवकाची कथा या सिनेमात मांडण्यात आली आहे. त्यावेळी गावात टीव्ही पोहोचला नसल्यामुळे रेडूला अधिक महत्व होते. आणि त्यामुळेच ‘रेडू’ बद्दलची ग्रामस्थांमधील उत्सुकता आणि कुतूहल गमतीदार पद्धतीने या सिनेमात मांडण्यात आले आहेत. शशांक शेंडे आणि छाया कदम हे दोन मातव्वर कलाकार या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र येत असून, यात त्यांची प्रमुख भूमिका आहे. तसेच गौरी कोंगे, विनम्र भाबल आणि मृण्मयी सूपल या कलाकारांचीदेखील यात भूमिका आहे. ५५ व्या राज्य चित्रपट तसेच दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘रेडू’ या सिनेमाने मान पटकावला असून, राज्य शासनाच्या वैयक्तित ६ पुरस्कारांचादेखील हा सिनेमा मानकरी ठरला आहे. संजय नवगिरे कथा पटकथा लिखित, येत्या १८ मे रोजी प्रदर्शित होत असलेला ‘रेडू’ हा सिनेमा गावची आस लागणाऱ्या सर्वांसाठी कोकणपर्यटनाची पर्वणीच ठरणार आहे.

प्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला अपघात – सर्वजण सुखरूप

0

पुणे, दि. १४ – आगामी ‘मस्का’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कोल्हापूरला जात असलेल्या अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या फोर्च्युनरला आज सोमवारी सकाळी द्रुतगती मार्गावर अपघात झाला. या अपघातात प्रार्थना बेहेरे हिचा हात फ्रॅक्चर झाला, अनिकेत विश्वासराव सुखरूप आहे तसेच गाडीचे खूप नुकसान झाले. या मोठया संकटातून बाहेर पडत मस्काची टीम “शो मस्ट गो ऑन” या उक्तीला अनुसरून कोल्हापूरकडे रवाना झाली.

प्राथमिक माहितीनुसार, प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘मस्का’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी प्रार्थना, अनिकेत आणि पप्रार्थानाची सहायक हे तिघे कोल्हापूरला जात होते. लोणावळ्याच्याच रस्त्यावर घाटात रस्त्याच्या कडेला बंद पडल्याने उभ्या असलेल्या टेम्पोला ही फोर्च्युनर धडकली. चढाच्या रस्त्याला चालक मोटार चालवत जात असताना, समोर अचानक थांबलेला टेम्पो दिसल्याने त्याने मोटार वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र भरधाव वेग असल्याने मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटून तो टेम्पोला धडकून बाजूला असलेल्या मोठ्या दगडाला धडक देऊन थांबला सुदैवाने अपघात झाला त्या ठिकाणी तो मोठ्ठा दगड होता, अन्यथा डाव्या बाजूला असलेली दरी पाहता अपघाताची भीषणता अधिक असती.

खा.संजय काकडेंचे चाललंय तरी काय ?

पुणे-भाजपमधून लोकसभा लढविण्याच्या तयारीला लागलेल्या राज्यसभा सदस्य असलेल्या  भाजपचे सहयोगी खासदार यांनी प्रथम सुरेश कलमाडी, रामदास आठवले आणि नंतर खुद्द शरद पवार यांच्याशी साधलेला संवाद ..म्हणजे नानांची मुशाफिरी मानली जात असून हि मुशाफिरी नेमकी राजकारणात कशी रंगत आणणार आहे याकडे आता पुण्यातील राजकीय समीक्षकांचे लक्ष लागून आहे .गेली ३ वर्षे सातत्याने राष्ट्रवादी आणि त्यांच्या नेत्यांशी दूर दूर राहिल्यानंतर काकडे यांनी आता थेट शरद पवारांशी गुजगोष्टी केल्याने याकडे राजकीयदृष्ट्या पाहिले जाते आहे .

सुरेश कलमाडींच्या अस्तानंतर त्यांच्या तोडीचा नेता पुण्याच्या राजकारणाला लाभला नाही हे निर्विवाद सत्य आहे ,कलमाडींनंतर सामुहिक नेतृत्वाची धुरा पत्करलेल्या कॉंग्रेसची आजही शकलेच झालेली पहायला मिळतात .अशा स्थितीत पुण्याच्या राजकारणाला ‘बाहुबली ‘ चीच आवश्यकता असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.तर त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजितदादांनी तर पुण्याच्या लोकसभेची जागा आमचाच उमेदवार लढवेल अशी घोषणा देखील केली आहे , मात्र राष्ट्रवादीकडे लोकसभेसाठी इच्छुकांचे चेहरे देखील उघड झालेले नाहीत , दुसरीकडे ज्यांनी भाजपकडून लोकसभा लढविणार अशी स्वघोषणा केली त्या भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी परवा पुण्याच्या विधान भवनात खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांशी केलेल्या कानगोष्टींनी ; नेमके नानांचे चाललंय तरी काय ‘ असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे .
खासदार संजय काकडे हे ‘नाना’ या नावाने परिचित आहेत . पण प्रत्येक गोष्ट ‘हाहा ‘मध्ये रुपांतरीत कशी करवून घ्यायची , याबाबत त्यांचे हातखंडे त्यांचे अधून मधून सांगितले जातात . पुण्याची लोकसभा लढविण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून त्यांनी निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे, असेही त्यांनी जाहीर सांगितले आहे.एकीकडे भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांच्या कामाबाबत तक्रार नाही असे म्हणणारे काकडे आता स्वतः च इथून इच्छुक म्हणून सर्वप्रथम रणांगणात उतरल्याने , शिरोळे यांचा पत्ता कापला जावूनच त्यांना उमेदवारी मिळू शकते हे समजणे अशक्य नाही . दुसरीकडे नानांची ओळख भाजपचे ज्येष्ठ नेते पालकमंत्री गिरीश बापट यांचे विरोधक अशी देखील राजकारणात आहेच .
अशा सर्व पार्श्वभूमीवर नानांनी ‘भाईंची’ म्हणजे सुरेशभाई कलमाडी यांची त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त करून भेट घेतली , त्यानंतर त्यांनी रिपब्लिकन नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची ही भेट घेतली . या दोन्ही भेटीत त्यांनी आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे या दोघांच्या ही कानावर घातले. रामदास आठवले यांनी तर , आमच्या पक्षात येवून लोकसभा लढा .. अशी ऑफर ही त्यांना टाकल्याच्या बातम्या झळकल्या . पण मी भाजपमध्येच राहणार , नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली लोकसभा लढणार असे काकडे सांगतात ना सांगतात तोच  परवा पुण्याच्या विधानभवनात त्यांनी पवारांशी कानगोष्टी केल्या. यावर खसखस पिकल्याशिवाय रहात नाही .
जर काकडे भाजपच्याच सानिध्यात राहणार असतील तर पवारांशी नेमक्या त्यांनी काय गुजगोष्टी केल्या याबाबत राजकीय कार्यकर्त्यांत उत्सुकता आहे.
याबाबत खुद्द संजय काकडे , यांनी आपले वैयक्तिक काम होते त्यासाठी आपण पवारांकडे वेळ मागितली ‘. असे स्पष्टीकरण दिले असले तरी , असे कोणते त्यांचे काम पवारांकडे आहे , जे फडणवीस किंवा मोदी करू शकत नाहीत ? या प्रश्नांची उकल होणे कठीण आहे .
राष्ट्रवादीकडे अद्याप लोकसभेच्या इच्छुकाचे नाव नाही तर कॉंग्रेसकडे नावे असूनही ती ‘सीट’ घालविणारी नावे मानली जातात . अशा परिस्थीतिचा फायदा काकडे घेतील काय ?का त्यांचा कुठला सर्व्हे सुरु आहे ? लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही मुशाफिरी कोणकोणत्या रंगांची उधळण करणार आहे … याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.