Home Blog Page 3127

पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाची 30 जून रोजी ऑनलाईन सोडत

0

पुणे दि. 27 : “सर्वांसाठी  परवडणारी घरे” हा शासनाचा उपक्रम साध्य करण्यासाठी म्हाडा ,पुणे मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे दिनांक 17.052018 रोजी 3139 सदनिका व 29 भूखंडासाठी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.  या सदनिका व भूखंडाच्या जाहिरातीमध्ये पुणे,सातारा, कोल्हापूर, सोलापुर जिल्हयातील विविध ठिकाणच्या योजनांचा समावेश आहे.  या जाहिरातीस अनुसरून सुमारे 40,000 नागरीकांनी योजनेमध्ये प्रत्यक्षपणे भाग घेतला आहे. प्रस्तुत सदनिका व भुखंडाची ऑनलाईन सोडत दि. 30 जून 2018 रोजी सकाळी 10.00 वा. आय.टी. इन्क्युबेशन सेंटर ,नांदेड सिटी , सिंहगड रोड पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन सोडत www.lottery.mhada.gov.in या संकेत स्थळावरही  पहाता येणार आहे, अशी माहिती  पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मडळाचे कार्यकारी अभियंता-1 यांनी दिली आहे.

मराठा समाजाला ओ बी सी प्रवर्गामध्ये घेण्यास विरोध

0

पुणे-मराठा समाजाला ओ बी सी प्रवर्गामध्ये घेण्यास विरोध केला पाहिजे अशी भूमिका ओ बी सी आरक्षणाच्या मुद्यावरती हॉटेल सेंट्रल पार्क येथे झालेल्या बैठकीत मांडण्यात आली .

      या बैठकीमध्ये विविध सामाजिक संघटना , संस्था , तसेच अनेक ओ बी सीवर्ग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . ओ  बी सी प्रवर्गामध्ये मराठा समाज मागास नसल्या कारणाने समाविष्ट करण्यात येऊ नये . मराठा समाज आर्थिक , सामाजिकशैक्षणिक स्तराने जर विचार केला तर मराठा समाज कुठेच मागास नाही तर मग त्यांना ओ बी सी मध्ये समाविष्ट करण्यात येऊ शकत नाही . मराठा समाजामध्ये काही लोक गरीब व बेरोजगार आहेत हि वस्तू स्थिती लक्षात घेतात्यांच्यासाठी काही उपक्रम आखले आहेत . त्यांची  परिस्थिती सुधारण्यासाठी आणखी योजना आखण्यात याव्यात . हि मागणी सर्वानुमते मांडण्यात आली .

तमाम महाराष्ट्रातील  ओ बी सी प्रवर्गाला आव्हान केले आहे कि , सामाजिक संस्था , सामाजिक संघटना तसेच वैयक्तिक निवेदने जास्तीत जास्त संख्येने शुक्रवार दि. २९ जून रोजी कौन्सिल हॉलमधील विभागीय आयुक्त कार्यालयात येथे  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे देण्यात यावे . आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हि तमाम ओ बी सी प्रवर्गाला संधी आहे . सर्व ओ बी सी मधील सर्व संघटना , राजकीय पक्ष , संस्था  , मंडळे यांनी  जास्तीत जास्त संख्येने निवेदने घेऊन शुक्रवार दि. २९ जून २०१८ ला उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे . तसेच , आपले वैयक्तिक निवेदन सादर करू शकता . असे आवाहन करण्यात आले .

मागील ओ बी सी समाजाची वेगवेगळ्या ठिकाणी निवेदने देताना कार्यकर्त्यावर हल्ले झाले त्यासाठी पुण्यात २९ जून २०१८ निवेदन दिले जाणार आहेत . त्यावेळी असे भ्याड हल्ले होऊ नयेत यासाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे . असे ओ बी सी च्या संघटनांनी मागणी केली आहे .

या बैठकीस कृष्णकांत कुदळे ,माजी नगरसेवक  संदीप लडकतमृणाल ढोलेपाटील , सपना माळी , प्रितेश गवळी , रघुनाथ ढोक , प्रदीप बनसोडे , प्रकाश लोंढे , डॉ. पी. बी. कुंभार , राजेंद्र पंडित , सुधीर पाषाणकर , नंदकुमार गोसावी , रमजान शेख , आनंदा कुदळे विठ्लराव सातव , कैलास काठे , सुधीर पैठणकर , सचिन कचरे , ऍड.मंगेश लेंडघर , पंकज गिरमे , चंद्रकांत भुजबळ , प्रा . लक्ष्मण हाके , उमेश कोकरे , राजेंद्र नेवसे , सुरेश रायकर , बंडू कचरे , किरण बारटक्के , अजय मुंडे , रमाकांत दरवडे , दिलीप शेलवंटे , अभिजत भडके , प्रदीप फलटणे आदी मान्यवर उपस्थित होते .

‘डॉक्टर्स डे ‘ रुग्णांसाठी डॉक्टर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात करणार प्रार्थना …

0
पुणे : ‘डॉक्टर्स डे निमित्त’ १ जुलै रोजी पुण्यातील सर्व डॉक्टर्स संघटना एकत्र येऊन रुग्णांसाठी प्रार्थना करणार आहेत. या दिवशी सकाळी ७:३० वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुढे सर्व डॉक्टर्स व असोसिएशन्स चे सदस्य एकत्र येऊन प्रार्थना करणार असल्याची माहिती साई स्नेह हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सुनिल जगताप यांनी पत्रकाद्वारे दिली.
डॉक्टर व रुग्ण यांच्यातील संबंध द्रुढ होणे यासाठी डॉक्टर्स व अससोसिएशन्स चे सदस्य विविध उपक्रमांचे आयोजन डॉक्टर्स डे ‘ ला करतात.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती येथे सकाळी ८:०० ची गणपतीची आरती करुन रुग्णांना आराम पडावा, सर्वत्र निरामय आरोग्य राहावे,यासाठी प्रार्थना करणार आहेत.
 आगामी उपक्रमांविषयी माहिती देण्यासाठी  लगेचच पत्रकारांशी संवाद साधला जाणार आहे.
या प्रार्थना उपक्रमात  मध्ये ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए, पुणे), पुणे डॉक्टर्स असोसिएशन्स (पीडीए), जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (जीपीए), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल (पुणे), ​काँग्रेस डॉक्टर सेल (पुणे), आयएमए डॉक्टर असोसिएशन, ​​​​जनरल प्रॅक्टिस असोसिएशन (पुणे), डॉक्टर्स असोसिएशन्स ​​​​हडपसर, डॉक्टर असोसिएशन कोथरूड, डॉक्टर असोसिएशन, ​​​​शिवाजीनगर, भोई प्रतिष्ठान (डॉ. मिलिंद भोई), ​​​​सिंहगड डॉक्टर असोसिएशन, भाजपा डॉक्टर सेल (डॉ. राजेंद्र खेडेकर), ​​​इंडियन डेंटल असोसिएशन (पुणे) व इतर संघटना सहभागी होणार आहेत. वर्षभर एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे

 

वाघोली पाणीपुरवठा योजेनेसाठी जागा निश्चित… पीएमआरडीए निविदा काढणार

0

पुणे-– वाघोली गाव पुणे नजदीक असल्याने लोकसंख्या लक्षात घेता बांधकामामध्ये झपाट्याने वाढ
होत आहे. उपलब्ध जलसाठा लोकसंखेसाठी कमी पडत आहे. वाघोलीत वाढीव पाण्यासाठी ग्रामस्थ
पीएमआरडीएकडे पाठपुरावा करत होते, ही मागणी लक्षात घेता वाघोली पाणीपुरवठा योजनेसाठी जागा
निश्चित करून जलशुद्धीकरण केंद्रासाठी देखील जागा पाहणी करण्यात आली. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही
यामुळे मिटणार आहे. याकरिता अंदाजपत्रक तयार करून लवकरच निविदा मागविण्यात येणार आहेत.
यावेळी पीएमआरडीए महानगर आयुक्त किरण गित्ते, आमदार बाबुराव पाचर्णे, माजी जिल्हापरिषद सदस्य
रामभाऊ दाभाडे, वाघोली सरपंच वसुंधरा उबाळे, तसेच माजी सरपंच आव्हाळवाडी, वाघोली पंचायत समिती
सदस्य तसेच पीएमआरडीएचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
वाघोलीच्या चार रस्त्यांना पीएमआरडीएकडून ‘ना हरकत’
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) वाघोलीतील सोसायट्यांकडे जाणाऱ्या मुख्य
रस्त्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चार रस्त्यांना ‘ना हरकत’ दिली आहे. सबंधित रस्त्यांची पाहणी दि.
२६ ला (मंगळवारी) सकाळी ९ वाजता करण्यात आली. मुख्य चार रस्त्याचे कामकाज करण्यासाठी हे रस्ते
ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत स्वखर्चातून हे रस्ते करणार आहेत. वाघोली
येथील नगररोड ते आयव्ही इस्टेट रस्ता, बायफ रोड ते आरएमसी रोड, नगररोड ते प्रिस्टांईन सातव जुनिअर
कॉलेज या रस्त्यांचे कामकाज केले जाणार आहेत.
ग्रामपंचायतीच्यावतीने या रस्त्याची मागणी करण्यात आली होती. यामुळे रस्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
आयव्ही सोसायटी समोर तात्पुरता रस्ता करण्यात येणार आहे. तसेच या भागातील रस्त्यांसोबतच ड्रेनेज,
पाणी व्यवस्थेची माहिती घेण्यात आली. त्याचप्रमाणे नगर रस्त्यास पर्यायी बायपास उपलब्ध होतील अशा
रस्त्यांची पाहणी करण्यात आली. तसेच वाघोली अग्निशमन केंद्रालाही भेट देण्यात आली. प्रस्तावित
आव्हाळवाडी व वाघोली येथील रिंगरोडची देखील चर्चा करण्यात आली.

नवीन मराठी शाळेत संगीत दालन

0
पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेतील संगीत दालनाचे उद्घाटन समरसता साहित्य परिषदेच्या अध्यक्षा शामाताई घोणसे व शाला समितीचे अध्यक्ष सुनील भंडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
संगीताला भाषा नसते. संगीतामुळे व्यक्तीच्या आयुष्यात आनंद, समाधान व उत्साह निर्माण होतो. विद्यार्थ्यांवर संगीताचा संस्कार व्हावा या उद्देशाने संगीत दालनाची निर्मिती करण्यात आली.
सिध्दी कराडकर या विद्यार्थीनीने भारू, तनय नाझीरकर याने गवळण, अनन्या गोवंडे हिने भावगीत सादर केले. सान्वीत मुंढे यांनी पेटीवादन केले. मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तनुजा तिकोणे, जयश्री खाडे व धनंजय तळपे यांनी संयोजन केले.
डी. ई. एस. सेकंडरी शाळेचे दहावी परीक्षेत यश
 
डी. ई. एस. सेकंडरी शाळेतील विद्यार्थ्यांनी मार्च २०१८ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. डी.ई.एस. सेकंडरी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. विशेष प्राविण्य मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ११३ तर प्रथम वर्ग मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ३२ आहे.
५६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. परीक्षेला १४५ विद्यार्थी बसले होते. अव्दैत शैलेश जोशी ९९ टक्के (प्रथम), चारूता योगेश खरे ९८.२० टक्के (व्दितीय), अर्चिता प्रशांत रावतेकर ९८ टक्के (तृतीय), वैष्णवी राहुल जोशी ९७ टक्के, अथर्व जितेंद्र चिरजपुटकर ९७.८० टक्के व गितिका राहुल महाजन हिने ९६.८० टक्के मिळविले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता नायडू, उपमुख्याध्यापिका सौ. ज्योती बोधे व पर्यवेक्षिका मंजुषा बोरावके यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

शिवाजी महाराजांच्या गुण वैशिष्ट्यांवर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची आवश्यक्यता – योगेश गोगावले

0
पुणे-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुण वैशिष्ट्यांवर आधारित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावा आणि या विषयात संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी विद्यारपीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेऊन केली.
शिवाजी महाराजांचे बालपण, विजापूर घराण्याशी संघर्ष, अफजलखानाचा वध, पन्हाळ्याचा वेढा, पावनखिंडीतील लढाई, मुघलांबरोबरील संघर्ष, शाहिस्तेखानावरील हल्ला, राज्याभिषेक आदी प्रसंगांचा सविस्तर इतिहास अभ्यासक्रमाच्या पहिल्या भागात असावा आणि दुसर्‍या भागात शिवाजी महाराजांची न्याय पध्दत, अष्टप्रधान मंडळ, जमीन महसूल, चलन, व्यापार, कर पध्दती, सामाजिक व्यवस्थापन, प्रशासन, संस्कृत आणि मराठीचा प्रसार, धार्मिक धोरण, लष्कर, किल्ले, नौदल, शिवाजी महाराजांनंतरचे मराठा साम्राज्य आदी विषयांचा समावेश असावा असे श्री. गोगावले यांनी म्हटले आहे.
विद्यापीठात हा  अभ्यासक्रम शिकवित असतानाच तो दूरशिक्षण पध्दतीने विद्यार्थ्यांना शिकता यावा अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी. आर्थिक मागस विद्यार्थ्यांना फेलोशिप व शिष्यवृत्ती द्यावी आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना विशेष उत्तेजन द्यावे. अशी मागणी करण्यात आली.

इन्स्टिट्यूट फाॅर प्राॅस्टेट कॅन्सरचे २ ते १२ जुलै दरम्यान मोफत शिबीर

0
पुणे दि. 27 जून: 2018 :
इंडियन नॅशनल कॅन्सर रजिस्ट्रीनुसार प्रॉस्टेट कॅन्सर बाधित पुरुषांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.यासाठी इन्स्टिट्यूट फाॅर प्राॅस्टेट कॅन्सर (IPC) मागील ५ वर्षांपासून प्रॉस्टेट कॅन्सर आणि त्याचे निदान करण्यासाठी उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जागकृता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ह्यामध्ये १३० पेक्षा अधिक शिबीरांच्या माध्यमातून ७०,००० पेक्षा जास्त लोकांची जनजागृती केली. पुण्यातील इन्स्टिट्यूट फाॅर प्राॅस्टेट कॅन्सर ने २ ते १२ जुलै दरम्यान मोफत शिबीराचे आयोजन केले आहे.
प्रामुख्याने ५० वर्षे वयानंतरच्या पुरुषांमध्ये हा कॅन्सर अाढळतो. हा कॅन्सर जगभरातील पुरुषांच्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण ठरला आहे. आणि दुर्देवाची बाब म्हणजे प्रत्येक सहावा पुरुष प्राॅस्टेट कॅन्सर बाधीत आहे.
आज जगभरातील विकसीत देशांमध्ये डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन (बोटाद्वारे गुद्वारतुन आणि पीएसएच्या) च्या माध्यमातून कॅन्सरबद्दल जागरूकता होत आहे मात्र भारतात प्राॅस्टेट कॅन्सरबाबत आज देखील तितकीशी जागरूकता नाही. जवळपास ६० टक्के रुग्ण डाॅक्टरला भेटतात जेव्हा ते शेवटच्या टप्यावर पोहचलेले असतात.
कॅन्सरची प्राथमिक लक्षणे : वारंवार लघवी येणे, रात्री वारंवार लघवीला जावे लागणे, लघवीला त्रास होणे, लघवी पूर्ण होत नसल्याची जाणीव होणे ही आहेत. कॅन्सरच्या पूढील टप्यात हाडांमध्ये वेदना होणे, भूक कमी होणे याबरोबरच फ्रॅक्चर आणि अर्धांगवायूचा धोका देखील संभावतो. भविष्यात प्रॉस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी ५० वर्षांपूढील पुरूषांनी पीएसए आणि डीआरई तपासणी करण्याचा सल्ला इन्स्टिट्यूट फाॅर प्रॉस्टेट कॅन्सरने दिला असून कोणत्याही प्रकारच्या पाठदूखीकडे दुर्लक्ष करू नये असे देखील सुचवले आहे.
जर वेळेत निदान झाले तर हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. विशेषत: ५० वर्षे वयानंतर कोणत्याही पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. पूर्व निदानद्वारे प्रॉस्टेट कॅन्सर असल्याचे कळाले तर बायोअप्सी करणे गरजेचे असते. बायोअप्सी ही एक साधी, सरळ पद्धत असून ही अल्ट्रासाउंड मशीनच्या मदतीने केली जाते. टीआरयुएस (ट्रान्स रेक्ट अल्ट्रासाउंड) च्या मदतीने केली जाणारी बायोअप्सी आदर्श बायोआॅप्सी समजली जाते. एमआरआयद्वारे कॅन्सरचा अधिक अचूक निदान होऊ शकते.
मोफत शिबीर- २  ते १२ जुलै २०१८,
स्थळ – इन्स्टिट्यूट ऑफ प्रोस्टेट कॅन्सर,
           ग्राउंड फ्लोअर, कुमार – दि ओरायन,
          सेंट मिराज कॉलेज जवळ,
          डॉनबॉस्को युथ सेन्टरच्या विरुद्ध,
          कोरेगाव पार्क, पुणे-४११००१
संपर्क – ०२०-६६०३७७७७/ ७८, ७७९८५७७५६३
वेळ- अपॉईंटमेंट नुसार

दक्षिण पुण्याला अहिल्यादेवींच्या नावे नव्या उद्यानाची भेट (व्हिडीओ)

0

पुणे-  कात्रजच्या भारती विद्यापीठाच्या मागील प्रचंड कॉंक्रीटच्या जंगलात राहणाऱ्या हजारो रहिवाश्यांना पुण्यश्लोक लोकमता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने एका छोट्या पण सुरेख उद्यानाची भेट मिळते आहे . साडेचार एकरातील हे उद्यान 1 जुलै रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर नागरिकांसाठी खुले होणार आहे .
दक्षिण पुण्याचे जंगल निसर्गसंपदा गेल्या काही वर्षात लयाला जावून इथे मोठ्माठ्या इमारतींनी कॉंक्रीटच्याच्या जंगलाची निर्मिती केली . लोकसंख्या प्रचंड वाढली . आणि हिरवाई निसर्गसंपदा हरवत चालली अशा परिस्थितीत मनसे च्या नगरसेवक वसंत मोरे यांनी शहराची फुफुसे गणल्या जाणाऱ्या उद्यानाच्या निर्मितीकडे लक्ष दिले आणि आपल्या १२ वर्षाच्या कारकिर्दीत हे ९ वे उद्यान त्यांनी आता विकसित केले आहे .गेली कित्येक वर्षे आरक्षित जागेवर आरक्षण विकसित न झाल्याने पडीक म्हणून कुजक्या ठरलेल्या या भूखंडाचा वापर आता जनतेला मोकळा श्वास घेता यावा यासाठी करता येणार आहे … या संदर्भात आज इथे जोरदारपणे काम सुरु असताना नगरसेवक मोरे इथे भेटले …आणि पहा ऐका ते काय म्हणाले ….

जीटीडीसीचे ‘गोवामाइल्स’ हे टॅक्सी अॅप पुढील महिन्यात लाँचसाठी सज्ज

0

डिजिटल यंत्रणेत सहभागी होण्यासाठी २८०० परवानाधारक टॅक्सीचालक इच्छुक

 पणजी, 27 जून – गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) टॅक्सी अप गोवामाइल्स पुढील महिन्यात लाँच होण्यासाठी सज्ज झाले आहे. सध्या हे अप प्रत्यक्ष परिस्थितीत चाचणी घेण्याच्या अंतिम टप्प्यावर आहे. गोव्यातील २८०० टॅक्सी चालकांनी हे अप वापरण्यात रस दाखवला असून प्रवाशांकडून येणआरी मागणी वाढल्यानंतर चालकांच्या संख्येतही वाढ होम्याची दाट शक्यता आहे. हा प्रकल्प प्रवासाचे सोयीस्कर साधन मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे.

पर्यटन मंत्री श्री. मनोहर आजगांवकर म्हणाले, गोव्यातील टॅक्सी सेवेवर आधारित अपचे लाँच टॅक्सी चालक, पर्यचक आणि स्थानिक अशा सर्व भागधारकांसाठी वाहतूक व्यवस्थेमध्ये क्रांतीकारी बदल आणणार आहे. मला खात्री आहे, की गोव्यातील सर्व पर्यटक टॅक्सी चालक या डिजिटल यंत्रणेमध्ये सहभागी होतील म्हणजे गोवा राज्य अशाप्रकारची सेवा यशस्वीपणे कार्यरत    असलेल्या इतर राज्यांच्या मागे पडणार नाही.

 गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) माननीय अध्यक्ष श्री. निलेश काब्राल म्हणाले, गोव्यातील एक दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचून त्यांना गोवामाइल्स या टॅक्सी अपची माहिती देण्यासाठी  आम्ही सार्वजनिक माहिती अभियान राबवणार आहोत. सर्वसामान्य लोकांकडून आम्हाला उदंड प्रतिसादाची अपेक्षा असून ते हे अप पर्यटन कारणांसाठी डाउनलोड करतील तसेच दैनंदिन प्रवासासाठी वापरतील अशी खात्री आहे.

 श्री. काब्राल म्हणाले, अपवर आधारित ही टॅक्सी सेवा डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देईल, पर्यटकांसाठी प्रवास सोपा करेल, तर टॅक्सीचालकांना चांगले उत्पन्न देईल. या उपक्रमामुळे ग्राहकांना पूर्णपणे नवा अनुभव मिळेलच, शिवाय टॅक्सीचे भाडे भरणे सोपे व सुरक्षित होईल, असे ते पुढे म्हणाले. त्यांनी पुढे असेही सांगितले की हे पहिले असे अप आहे, जे स्थानिक गोवन टॅक्सी चालकांच्या खिशावर कोणताही परिणाम करत नाही व ते अतिशय वेगवान आणि सोयीस्कर पद्धतीने राबवले जाते. यातून त्यांनाही या डिजिटल यंत्रणेमध्ये भागीधारक बनून पर्यटकांना चांगला ग्राहकानुभव देता येतो.

 उत्कर्ष दाभाडे, व्यवस्थापकीय संचालक, गोवामाइल्स म्हणाले, गोवामाइल्स प्रवाशांना परवानाधारक, व्यावसायिक टॅक्सी चालक मिळवून देण्यासाठी मदत करते. त्यांना आपण कशाचे पैसे भरत आहोत याची कल्पना येते आणि मोबाइल अपद्वारे कॅब कुठे जात आहे हे पाहाता येते. गोवामाइल्स सध्याच्या टॅक्सी कंपन्यांशी भागिदारी करून आणि त्यांच्यासोबत काम करून चालकांना जास्त ग्राहक मिळवून देण्यासाठी मदत करेल.

 गोवामाइल्स हे प्रवाशांना अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मद्वारे मोफत डाउनलोड करता येणार आहे. प्रवाशाने टॅक्सीची विनंती केल्यानंतर सर्वात जवळची टॅक्सी ठिकाण पाहिल आणि पिकअप तसेच येण्याची वेळ निश्चित करेल. त्याचबरोबर यामध्ये लास्ट ड्रायव्हर नावाचे वैशिष्ट्य आहे, ज्याच्या मदतीने प्रवाशांना तातडीने चालकांशी कनेक्ट करता येते आणि टॅक्सीमध्ये राहिलेल्या वस्तू लगेचच मिळवता येतात.

 गोवामाइल्स प्रवाशांना अशी सोय देणार आहे, जी त्यांना यापूर्वी कधीच गोव्यात मिळालेली नाही – ती म्हणजे त्यांच्या राइडला श्रेणी देण्याची सोय. जर चालकाला सातत्याने चांगली श्रेणी मिळत असेल, तर त्याला चांगला व्यवसाय मिळेल. गोवामाइल्सच्या प्रवाशांना सर्वोत्तम परवानाधारक आणि नियंत्रित चालकांद्वारे सेवा मिळवून देण्याची खात्री आम्हाला करायची आहे, असे काब्राल म्हणाले. ग्राहकांना श्रेणी देण्याची सुविधा मिळआल्याने चालकही त्यांची सेवा उंचावतील. ग्राहकांना त्यांचा आवाज मिळेल आणि यामुळे एकंदरीतच टॅक्सी व्यवसाय सुधारेल.

 गोवामाइल्स राज्यभरातील टॅक्सीचा जास्तीत जास्त वापर करून ज्या ठिकाणी सेवा मिळत नाही तेथेही सेवा प्रचलित करणार आहे आणि अधिक भाडे मिळवण्यासाठी चालकांना अंदाज लावत बसावे लागते, ते होणार नाही. गोवामाइल्स प्रवाशांना चालकांशी ते कुठेही म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर, शहराच्या मध्यभागी किंवा अपरिचित ठिकाणी असले, तरी त्यांच्याशी कनेक्ट करण्याची सुविधा पुरवेल.

 चालकांकडून गोवामाइल्स मॉडेलचा अवलंब

शेकडो टॅक्सी चालकांनी गोवामाइल्स ड्रायव्हर उपक्रमात रस दाखवला आहे. गोवामाइल्स टीम चालकांना हे गोवामाइल्स ड्रायव्हर अप सर्वोत्तम पद्धतीने कसे वापरावे हे शिकवण्यासाठी सत्रांचे आयोजन करणार असून त्यात जनतेला चांगली सेवा कशी द्यावी आणि जास्त व्यवसाय कसा मिळवावा याचे प्रशिक्षण देणार आहे. व्यावसायिक चालक नेहमीच्या केवायसी फॉरमॅलिटीजसह गोवामाइल्स आजमावून पाहू शकतील आणि काही मिनिटांतच सेवा सुरू करू शकतील. त्यानंतर चालकांना अमर्यादित गोवामाइल्स पिकअप्स मिळतील व ते थांबेपर्यंत ही सेवा सुरूच राहील.

 चालकांना शिष्टाचार, पर्यटन स्थळांची माहिती, प्राथमोपचार किट, गोव्याची संस्कृती आणि परंपरेची माहिती इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्यामुळे त्यांना गोवा टुरिझमचे ब्रँड अम्बेसिडर म्हणून वावरता येईल. जीटीडीसी टॅक्सी चालकांच्या कुटुंबांसाठी आरोग्य विमा आणि शिष्यवृत्ती योजनाही सुरू करणार असून सर्वोत्तम श्रेणी मिळालेल्या चालकांना दर महिन्याला रोख बक्षिस दिले जाणार आहे.

333 व्या पालखी सोहळयातील वारकऱ्यांसाठी श्रीमती सोनिया, राजीव गांधींच्या नावे फिरता मोफत दखाखाना

0

बारामती:- येथील कै.रामचंद्र भिसे (गुरुजी ) वैद्यकिय प्रतिष्ठान च्या वतीने जनसेवा हिच ईश्वरसेवा या उद्देशाने प्रेरीत देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर आषाढी वारीत संत तुकाराम महाराज 333 व्या पालखी सोहळयातील वारकऱ्यांसाठी श्रीमती सोनियाजी राजीवजी गांधी फिरता मोफत दखाखाना  ही सुविद्या उपलब्ध करुन दिली जाणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय रामचंद्र भिसे यांनी दिली आहे.

दि.5 जुलै 2018रोजी संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान देहूतून होणार आहे.या पालखी सोहळयातील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी औषधोपचार करण्यात येणार असुन यावर्षी रुग्णवाहिका सेवा  ही पुरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर  पालखी मार्गावर मोफत तपासणी औषधोपचार करणाऱ्यां संस्थांना ही औषधांची मदत केली जाणार आहे.या जनसेवेच्या उपक्रमात ज्या दानशूर व्यक्तिंना औषधीदान करुन सहभागी व्हायचे असेल त्यांनी डॉ.विजय भिसे यांचेशी भ्रमणध्वनी . क्रं.9325330624 या क्रंमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

कै.रामचंद्र भिसे (गुरुजी ) वैद्यकिय प्रतिष्ठानचे या जनसेवेच्या उपक्रमाचे हे अखंड 20 वे वर्ष असुन या उपक्रमातील पथकात  डॉ.अप्पा आटोळे डॉ.योगेश पाटील (लासुर्णे) राजेंद्र गायकवाड हे  मदतनीस सहभागी होणार आहेत अशी माहिती संस्थेचे  अध्यक्ष डॉ.विजय भिसे यांनी दिली आहे.          

     

मुलांच्या कर्तुत्वाने होते पालकांची ओळख – प्रा. फुलचंद चाटे (व्हिडीओ)

पुणे– आपल्या मुलांच्या कर्तुत्वाने ,पालकांची आणि विद्यार्थ्यांच्या कर्तुत्वाने शिक्षकांची ओळख होते असे प्रतिपादन येथे प्रा फुलचंद चाटे यांनी केले . प्रत्येक मुलात,विद्यार्थ्यात गुणवत्ता ,बुद्धीमत्ता असते ती विकसित करण्याची मोठी जबाबदारी शैक्षणिक संस्थावर येवून ठेपलेली आहे असेही ते म्हणाले . 2017-18 मध्ये दहावी बारावी व स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांच्या अण्णाभाऊ साठे सभागृहात सन्मान सोहळा प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाटे समुहाचे चेअरमन प्रा. गोपीचंद चाटे तसेच संचालक प्रा. फुलचंद चाटे, पुणे विभागाचे विजय बोबडे व प्रा. बापू काटकर यासह खुप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक उपस्थित होते, प्रत्यक्षात चाटे सर यांचे हे भाषण पहा आणि ऐका ….

‘ करिअरच्या नव्या दिशा ’ ज्ञानाचा खजिना -डॉ.पुरूषोत्तम भापकर

0

औरंगाबाद– ‘करिअरच्या नव्या दिशा’ (शासकीय अभ्यासक्रमांची ओळख) हे पुस्तक ज्ञानाचा खजिना आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य महत्त्वपूर्ण असते. या पुस्तकातून ते एकत्रित मिळाल्याने हा ज्ञानाचा खजिना सर्वांसाठी खुला झाल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर आज म्हणाले.
डॉ. भापकर यांच्याहस्ते समता दिनाचे औचित्य साधून ‘करिअरच्या नव्या दिशा’चे प्रकाशन झाले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. भापकर बोलत होते. यावेळी उपायुक्त वर्षा ठाकूर, महेंद्र हरपाळकर, सूर्यकांत हजारे, पारस बोथरा, साधना सावरकर, सरिता सूत्रावे, उपजिल्हाधिकारी मृणालिनी सावंत-निंबाळकर, पुस्तकाचे लेखक तथा संचालक (माहिती) देवेंद्र भुजबळ, प्रकाशक विद्या बुक पब्लिशर्सचे शशीकांत पिंपळापुरे यांची उपस्थिती होती.
डॉ. भापकर म्हणाले, भारतीय संविधानाला समता प्रस्थापित होणे अभिप्रेत आहे. वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणल्यास समता प्रस्थापित होण्यास मदत होते. ज्ञान आणि कौशल्य शिक्षणातून बळ मिळते. हे बळ देण्याचे कार्य या ‘करिअरच्या नव्या दिशा’ यातून होणार आहे. ग्रामीण स्तरावरील, शहरी भागातील तरुणांना या पुस्तकाच्या वाचनातून प्रगत जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी यशाची गुरूकिल्ली यातून सापडणार आहे. स्वत:मधील क्षमता, आवड ओळखून शासनाच्या विविध रोजगाराभिमुख, कौशल्यावर आधारीत महत्त्वपूर्ण अभ्यासक्रमांची, संकेतस्थळांची माहिती होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
मराठवाडा विभागातून ‘स्कील इंडिया’ अंतर्गत एकच लक्ष दशलक्ष युवकांना रोजगाराभिमुख बनविण्याचा  मानस आहे. या उपक्रमाला या पुस्तकाच्या माध्यमातून बळ मिळणार आहे. अत्यंत माहितीपूर्ण, संशोधनपूर्ण अशा या पुस्तक निर्मिती व लेखनाबद्दल श्री. भुजबळ, श्री. पिंपळापुरे यांचे कौतुक व अभिनंदन. राज्यातील तरुणांना ‘करिअरच्या नव्या दिशा’ दिशादर्शक ठरेल, असा विश्वासही डॉ. भापकर यांनी व्यक्त केला.
सुरुवातीला श्री. भुजबळ यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका विषद केली. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रीय स्तरावरच्या संस्था, अभ्यासक्रम आहेत. मात्र, इंग्रजी ज्ञानाच्या अभावामुळे देशातील महत्त्वपूर्ण अशा रोजगाराभिमुख कोर्सेसची माहिती मराठी भाषक तरुणांना समजणे अवघड जाते. म्हणून शासनाच्या महान्यूज वेब पोर्टलवर ‘करिअरनामा’ सदरातून याबाबत लेखन केले. संबंधित लेखनास वाचकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. तज्ज्ञांनी या सदरातील लेखन पुस्तक स्वरूपात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रकाशक पिंपळापुरे यांच्या माध्यमातून ती पूर्ण झाली. पारंपरिक शिक्षणापेक्षाही इतर कोर्सेस करून आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो, हे या पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न असल्याचेही श्री. भुजबळ म्हणाले.

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय मंत्री यांचे बार्टी येथे अभिवादन

0

पुणे,दि.26:राजर्षी छत्रपती शाहू महाराजयांनात्यांच्याजयंतीनिमित्तसामाजिक न्याय व विशेष
सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी बार्टी येथे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी समाज कल्याण
आयुक्त मिलींद शंभरकर, अपंग कल्याण आयुक्त रुचेश जयवंशी, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे आदी
उपस्थित होते.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य् मंत्री राजकुमार बडोले यांच्याहस्ते यावेळी दहावी परिक्षेत विशेष
प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सामाजिक न्याय विभागांतर्गत
समाज कल्याण, बार्टी तसेच अपंग कल्याण आयुक्तालयाच्यावतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसांठी राबविण्यात
येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा मंत्रीमहोदयांनी घेतला. संबधित विभागाच्या प्रलंबित
प्रश्नांसह कामकाजाबाबत आढावाही यावेळी घेतला.
बैठकीला समाज कल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, अपंग कल्याण आयुक्तालय तसेच बार्टीचे
अधिकारी उपस्थित होते.

राजर्षी शाहू महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

0

पुणे, दि. 26 : जिल्हा प्रशासनातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात, अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी, तहसीलदार मीनल कळस्कर, विकास भालेराव, हेमंत निकम, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा समाजातील विद्यार्थी – विद्यार्थीनींसाठी औंध आयटीआयमध्ये सुरू होणार वसतीगृह

0

पुणे , दि. 26 : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह सुरू करण्याचे मा. मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेल्या निर्णयानुसार राजर्षी शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) मार्फत पुण्यात सुरू करण्यात येणाऱ्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथील वसतीगृहाच्या इमारतीची महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज भेट देऊन पाहणी केली. इमारतींची पाहणी करून येत्या महिनाभरात हे वसतीगृह सुरू करण्याचे निर्देश महसूल मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी संबंधितांना दिले.

मराठा समाजाच्या मागणीनुसार प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारण्यात येणार आहे. पुण्यात सध्या ‘सारथी’ संस्थेच्या अंतर्गत पुण्यातील औंधमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरातील इमारतीत मुलींसाठी हे वसतीगृह सुरू करण्यात येणार आहे. सुमारे 450 चौमी क्षेत्रफळात ही इमारत असून सध्या येथे 9 खोल्या निवासासाठी उपलब्ध आहेत. तसेच वसतीगृह अधीक्षकांसाठी एक, जेवणाच्या हॉलसाठी एक खोली उपलब्ध आहे. तसेच 8 स्वच्छतागृहे व 8 स्नानगृहे आहेत. सुमारे 50 मुलींच्या राहण्याची येथे व्यवस्था करण्यात येणार असून त्यासाठी पलंग, गादी, टेबल खुर्ची आदींची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या इमारतीची पाहणी महसूल मंत्री श्री. पाटील यांनी केली. वसतीगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थींनीना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. तसेच या परिसरातच लवकरच मुलांसाठीही वसतीगृह सुरू करण्यात येणार असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.