पुणे- कात्रजच्या भारती विद्यापीठाच्या मागील प्रचंड कॉंक्रीटच्या जंगलात राहणाऱ्या हजारो रहिवाश्यांना पुण्यश्लोक लोकमता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने एका छोट्या पण सुरेख उद्यानाची भेट मिळते आहे . साडेचार एकरातील हे उद्यान 1 जुलै रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर नागरिकांसाठी खुले होणार आहे .
दक्षिण पुण्याचे जंगल निसर्गसंपदा गेल्या काही वर्षात लयाला जावून इथे मोठ्माठ्या इमारतींनी कॉंक्रीटच्याच्या जंगलाची निर्मिती केली . लोकसंख्या प्रचंड वाढली . आणि हिरवाई निसर्गसंपदा हरवत चालली अशा परिस्थितीत मनसे च्या नगरसेवक वसंत मोरे यांनी शहराची फुफुसे गणल्या जाणाऱ्या उद्यानाच्या निर्मितीकडे लक्ष दिले आणि आपल्या १२ वर्षाच्या कारकिर्दीत हे ९ वे उद्यान त्यांनी आता विकसित केले आहे .गेली कित्येक वर्षे आरक्षित जागेवर आरक्षण विकसित न झाल्याने पडीक म्हणून कुजक्या ठरलेल्या या भूखंडाचा वापर आता जनतेला मोकळा श्वास घेता यावा यासाठी करता येणार आहे … या संदर्भात आज इथे जोरदारपणे काम सुरु असताना नगरसेवक मोरे इथे भेटले …आणि पहा ऐका ते काय म्हणाले ….
दक्षिण पुण्याला अहिल्यादेवींच्या नावे नव्या उद्यानाची भेट (व्हिडीओ)
Date:

