Home Blog Page 3112

अशोक पवार यांचे निधन

0

पुणे- कॉंग्रेस चे नेते , माजी आमदार उल्हास पवार यांचे बंधू आणि सहकार नगर भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक शिवराम पवार (वय ६७ ) यांचे येथे दुखःद निधन झाले . त्यांच्या मागे २ मुली १ मुलगा असा परिवार आहे .

माजी उपमहापौर आबा बागुल तसेच कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि विविध पक्षातील अनेकांनी त्यांना आज सकाळी येथे श्रद्धांजली वाहिली त्यांची अंत्ययात्रा दुपारी ३ वाजता सहकारनगर मधील त्यांच्या घरापासून निघेल . वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

२३ जानेवारी २०१९ रोजी ‘ठाकरे’

0

राष्ट्रीय आणि जागतिक व्यासपीठावर मराठी माणसांची शक्ती स्थापन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांची कथा अलौकीक आणि अमर आहे. उत्कृष्ट व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय रोमांचक आहे. नम्र सुरवातीपासून चालत आलेला त्यांचा जीवन प्रवास सामान्य लोकांचा असामान्य आवाज बनून जगभरात गरजला.

बाळासाहेब ठाकरें यांचे धडाडी तसेच चित्तवेधक जीवन एखाद्या चित्रपटात समाविष्ट करण्यासाठी शिवसेनेचे खासदार आणि सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांच्यापेक्षा कोण योग्य असू शकेल? बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास संजय राऊत यांनी जवळून स्वतःहून अनुभवला आहे. म्हणूनच संजय राऊत लिखित आणि निर्मित ‘ठाकरे’ चित्रपटाचे शूट सुरु असतानाच तो सर्वत्र चर्चेत आहे. राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी अंतर्गत नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत ‘ठाकरे’ चित्रपट अभिजीत पानसे दिग्दर्शित करीत आहेत.

१९६०च्या दशकातील जुन्या मुंबईचे दर्शन घडवणारे भव्यदिव्य सेट्स नवाझ यांचा हुबेहूब बाळासाहेबांसारख्या दिसणारा लूक व ‘ठाकरे’ चित्रपटाचा रंजक टिझर यांमुळे संजय राऊत यांच्यासमवेत ‘ठाकरे’ चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी कार्निवल मोशन पिक्चर्स उत्सुक आहेत.

सचिन: अ बिलियन ड्रीम्स या २०१७ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने कार्निवल मोशन पिक्चर्सने अभूतपूर्व यश प्राप्त केले. कार्निव्हल मोशन पिक्चर्स आता सक्रियपणे हिंदी, मल्याळम आणि इतर प्रादेशिक व भाषिक चित्रपटांची निर्मिती करीत आहेत.

डॉ. श्रीकांत भसी, कार्निवल ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष म्हणतात की, “आम्ही कार्निवल समूह चित्रपटाच्या आशयावर विश्वास ठेवतो. सर्वसामान्य माणसामध्ये बदल कसा होऊ शकतो हे अनुभवण्यासाठीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे होय. बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडणारा नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत ‘ठाकरे’ या चित्रपटाचा आम्ही एक भाग आहोत हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. याचप्रमाणे संजय राऊत यांच्यासमवेत २०१९ मधील सर्वांत जास्त प्रतीक्षेत असलेल्या ‘ठाकरे’ चित्रपटाची निर्मिती करताना देखील आम्हांस खूप आनंद होतो आहे.”

कार्निवल मोशन पिक्चर्स समवेत हातमिळवणी कारण्याप्रसंगी संजय राऊत म्हणतात की, “जर महात्मा गांधींनंतर एखाद्या व्यक्तिमत्त्वाचे जीवनचरित्र रुपेरी पडद्यावर रेखाटले जावे तर ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचेच! बाळासाहेब ठाकरेंसारख्या ज्वलंत व्यक्तिमत्त्वाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा बाळगून जगभरातील लाखो लोकांपर्यंत हा सिनेमा पोचण्यासाठी हातभार लावणाऱ्या कार्निव्हल मोशन पिक्चर्सचे ‘ठाकरे’ चित्रपट निर्मितीत स्वागत आहे. येत्या वर्षात जास्तीत जास्त जनतेपर्यंत त्यांच्या हृदयसम्राटाला पोहोचविण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

श्री संजय राऊत आणि डॉ. श्रीकांत भसी निर्मित आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शित केलेला ‘ठाकरे’ हा चित्रपट बाळासाहेबांच्या जयंती दिवशी २३ जानेवारी २०१९ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे

पुण्यातील डॉ. रोहिणी रवी शिंदे पटकाविला मिसेस नाईटिगेलचा मुकुट

0

 पुणे- वॉव…दॅट्स ग्रेट…ब्युटिफूल असे उद्गार निघत होते. पाय थिरकवणारं म्युझिक सुरू होतं. एकाहून एक सुंदर ललना या म्युझिकच्या तालावर रॅम्पवर अवतरत होत्या. हा सगळा माहोल रंगला होता ‘ मिसेस इंडिया 2018 च्या निमित्ताने पुण्यामधून मिसेस इंडिया शी इज इंडिया २०१८ – मिसेस नाईटिगेल म्हणून  डॉ. रोहिणी रवी शिंदे यांना मुकुट घालण्यात आला.हा मुकुट भारताची  पहिली मिसेस वर्ल्ड  व प्रसिध्द अभिनेत्री डॉ. अदिती गोवित्रीकर यांच्याहस्ते शिरपेचावर रोवण्यात आला .

      जागतिक स्तरावर महत्वाच्या मानल्या जाणा-या सौंदर्य स्पर्धापैकी मिसेस इंडिया २०१८. बुध्दिमत्ता आणि सौंदर्य यांची सुरेख सांगड घालत विविध कानाकोप-यातून सौंदर्यवती या स्पर्धेत सहभागी  झाल्या.  ही स्पर्धा   दिल्ली  पार पडल्या, या स्पर्धेसाठी  भारतभरातल्या विविध शहरांतून आलेल्या ४५ सौंदर्यवतींनी भाग घेतला होता. त्यात पुण्यामधून  म्हणून मिसेस इंडिया शी इज इंडिया २०१८ – मिसेस नाईटिगेलचा  डॉ. रोहिणी रवी शिंदे  यांना मुकुट घालण्यात आला. शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीची स्पर्धा रंगली होती.  या स्पर्धेमुळे  डॉ. रोहिणी रवी शिंदे यांनी  पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

        या स्पर्धेबाबत बोलताना  डॉ. रोहिणी रवी शिंदे म्हणाल्या,  पुण्यामध्ये महाराष्ट्राची ऑडिशन झाली. त्यामध्ये ४०  स्पर्धकांमधून १२ जणींची निवड करण्यात आली. मिसेस इंडिया शी इज इंडिया आणि कौटूंबिक हिंसाचार वर काम करते.  स्पर्धा तीन फेरीत झाली. पहिल्या फेरीत स्वतची ओळख ज्यामध्ये देहबोली, आत्मविश्वास आदींचा विचार झाला. दुसऱ्या फेरीत परंपरा आणि संस्कृती यावर आधारित पेहराव करत ‘रॅम्पवॉक’ करण्यात आला. आपण जो पेहराव करू त्यावर स्पर्धकाला २ ते ३  मिनिटे बोलावे लागले. अंतिम फेरीत परीक्षकांकडून प्रश्नही विचारण्यात आले. संपूर्ण भारतातून व काही भारताबाहेरील असे मिळून ४५ स्पर्धक होते. हे क्षेत्र वेगळे होते.  आणि त्यात मला मिसेस इंडिया शी इज इंडिया २०१८ चा मिसेस नाईटिगेल असा मुकुट मिळाला,

    

 

 पुण्यामधील नवीन नाना पेठमध्ये   डॉ. रोहिणी रवी शिंदे  या वैद्यकीय व्यवसायाने प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ व वंध्यत्व आणि जनुकीय दोष तज्ञ  आहेत. गेल्या १५  वर्षांपासून त्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत . नवीन नाना पेठभागात त्या वंशवेल क्लिनिकच्या   संचालिका आहे. त्यांनी स्त्री रोग तज्ञ म्हणून आतापर्यंत पाच हजार रुग्णाना आपली वैद्यकीय सेवेचा लाभ दिला आहे . तसेच त्यांना गायनाची देखील आवड आहे . त्यांनी दिवंगत प्रसिध्द संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्याबरोबर काम केले आहे .

      हा मुकुट मिळाल्यानंतर  डॉ. रोहिणी रवी शिंदे यांनी सांगितले कि , हा मुकुट जिंकल्याचा खूप आनंद होत आहे . आयुष्यात माझे राहिलेले स्वप्न मला या स्पर्धेमुळे पूर्ण करता आले . नाईटिगेल  हा पक्षी परदेशात रात्री व पहाटेच्या वेळी गाण्यासाठी प्रसिध्द आहे . त्यामुळे आजचा मला मिळालेला मुकुट हा गानकोकिळा म्हणून मला देण्यात आला , त्याचबरोबर रुग्णसेवेचा पाया रोवणाऱ्या आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईट‌िंगेल या वैद्यकीय क्षेत्रात परिचारिका म्हणून प्रसिध्द आहेत .त्यांनी  असंख्य आव्हानांचा सामना करीत रुग्णांची सेवा केली.  त्यामुळे मला आजचा मुकुट मला माझ्या वैद्यकीय क्षेत्रामधील कामामुळे मिळाला आहे . याचा मला फायदा झाला आहे . आयुष्यात खचून न जात धैर्याने आयुष्याला सामोरे जा . आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी सज्ज राहा . समाजाचे ऋण फेडण्यासाठी आई वडिलांची आयुष्यात दिलेली शिकवण मला कामी आली . या स्पर्धेसाठी पुण्यातील प्रसिध्द आयुर्वेदतज्ञ डॉ. संगीता गायकवाड यांनी मार्गदर्शन केले . तसेच ,माझा मुलगा आदित्यने मला या स्पर्धेत भाग घेण्यास प्रोत्साहन दिले . नाईटिगेल हा ‘किताब माझ्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे .

     या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून प्रसिध्द सौ जगत सुंदरी रिचा सिंग, भारतीय सौंदर्यवतीचा किताब विजेती व  अभिनेत्री संगीता बिजलानी , प्रसिध्द व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक रिटा गंगवाणी , बॉलिवूड अभिनेता अमन वर्मा , बिग बॉस फेम आशका गोराडिया आदींनी काम पाहिले .

26 जूलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

0

  पुणे  : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे व टुरिझम व हॉस्पिटॅलिटी स्कील कौन्सिल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 26 जूलै 2018 रोजी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटियन एज्युकेश्न सोसायटी, आझम कॅम्पस, कॅम्प, गोळीबार मैदानाजवळ, पुणे  येथील आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेजमध्ये सकाळी 9 ते दुपारी 4 वा.पर्यंत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात इयत्ता 1 ली ते पदवीधर पास / नापास पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या तसेच आयटीआयमधून प्लंबर, इलक्ट्रीशियन, एअर कंडीशनिंग व रेफ्रिजरेशन रिपेअरिंग व मेन्टेनन्सचे कोर्स केलेल्या 18 ते 30 वयोगटातील युवक, युवतींना टुरिझम व हॉस्पिटॅलिटी सेक्टर मधील विविध पदांसाठी चांगल्या वेतनाचे रोजगार उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. आवश्यकतेनुसार प्रशिक्षणाची सेाय देखील उपलब्ध होणार आहे. तसेच मेळाव्याच्या ठिकाणीच हॉटेल, रेस्टॉरंट, रस्ते, जल, हवाई वाहतूक व पर्यटन या क्षेत्रांमध्येही नोक-या उपलब्ध होणार आहेत. संबधित आस्थापना, उद्योजक यांचे प्रतिनीधी सदर ठिकाणी उपस्थित राहून पात्रताधारक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना लागलीच नियुक्ती पत्रही देण्यात येणार आहे. या मेळाव्याअंतर्गत महिला उमेदवारांनाही रोजगार मिळण्याच्या दृष्टीने संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

पात्रता धारण केलेल्या सक्षम तसेच दिव्यांग युवक, युवतींनी रोजगार मेळाव्यामध्ये मुलाखतीस येताना फोटोसहित असलेला आपला ओळखीचा पुरावा आणावा. व प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे या कार्यालयाशी (दुरध्वनी क्र. 020-26133606, 26050085) संपर्क साधावा, असेही श्रीमती पवार यांनी कळविले आहे.

स्वरचित नृत्याविष्कारांतून गुरुदक्षिणा अर्पण

0

नृत्यभारती’च्या शिष्यांकडून कथक गुरू रोहिणी भाटेंंना आदरांजली

पुणे : लालित्यपूर्ण पदन्यासाने मंत्रमुग्ध करणाऱ्या नृत्याविष्काराद्वारे कथकचे विविधांगी दर्शन रसिकांना शुक्रवारी घडले. आषाढातील सांजवेळी रंगलेल्या या हृद्य मैफलीने पुणेकरांची मने जिंकली. ‘नृत्यभारती’च्या चारही पिढीतील विद्यार्थ्यांनीं ‘कथक’ रचनांची गुरुदक्षिणा स्व. रोहिणी भाटे यांच्या स्मृतीस विनम्रपणे अर्पण करत कृतज्ञ भाव व्यक्त केला.

निमित्त होते ‘नृत्यभारती’ कथक डान्स अकॅडमीतर्फे गुरुपौर्णिमेनिमित आयोजित ‘वेध साधनेचा’ या  मैफलीचे. गेली ७१ वर्षे अखंडित सुरू असलेल्या अभिजात कथक परंपरेचा प्रवास यातून रसिकांसमोर उलगडला.
मैफलीचा प्रारंभ रोहिणी भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या मनीषा अभय, आभा वांबुरकर, आसावरी पाटणकर यांच्या सादरीकरणाने झालाा. प्रसिद्ध तबलावादक पं. अरविंदकुमार आजाद यांनी रचलेल्या गुुुुरूवंदनेवर लयबद्ध नृत्याविष्कार सादर करत त्यांनी वातावरणात अधिक प्रसन्नता आणली. त्यानंतर सुकृति डान्स अकॅडमीच्या मनीषा अभय व त्यांच्या शिष्यांनी ‘चौताला’तील रचना प्रस्तुत केली. यास पखवाजवादक गोविंद भिलारे यांची समर्पक साथ लाभल्याने रंगत वाढली. त्यांनी पेश केलेले ‘यति परण’ हा जणू ऊर्जाविष्कारच होता. त्याला दाद मिळाली.
सामाजिक विषयाला कथक नृत्योद्गार देणाऱ्या आसावरी पाटणकर व त्यांच्या शिष्यांनी कथकच्या ‘असीम’ शैलीचे दर्शन घडविले. त्यांनी सादर केलेल्या ‘चैतन्य’ या संवेदनशील कलाकृतीने रसिकांना अंतर्मुख केले.
‘सज धज सजन मिलन चली’ ही ‘अभिसारिका नायिका’ आभा वांबुरकर यांनी साभिनय व पद्न्यासाातून रसिकांसमोर उलगडली. त्यानंतर ‘राग सागर’मधील रचना `नृत्यभारती’च्या शिष्यांनी सादर करत पहिल्या पर्वाची सांगता केली.
दीक्षा कथक डान्स अकॅडमीच्या आभा वांबुरकर व त्यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या शिववंदनेने दुसऱ्या पर्वाची सुरुवात झाली. त्यांचे ‘रूप धमार’ मधील सादरीकरण सर्वांना भावले. ‘कॅलिडोस्कोप’ हा यमन रागातील तराणा व निसर्गाच्या बदलत्या रूपाचे वर्णन करणाऱ्या ‘ऋतुगान’ या अजरामर रचनेचे ही सादरीकरण झाले. रोहिणीताईंची ही मूळ रचना  असून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ज्येष्ठ शिष्या नीलिमा अध्ये यांनी मोलाचे परिश्रम घेतले. या प्रस्तुतीने मैफलीची आगळीच उंची गाठली.ताल आणि लयीप्रमाणेच साहित्यावरही प्रभुत्व असलेल्या गुरू रोहिणी भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या अमला शेखर यांनी आपल्या काव्यमय नृत्यातून रोहिणीताईच्या व्यक्तिमत्त्वातले अव्यक्त पैलू उलगडले.  यांनी ‘नृत्यभारती’ परिवारातर्फे भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या शरदिनीताई गोळे यांचे गुरूपूजन करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पं. अरविंदकुमार आजाद (तबला), अजय पराड (संवादिनी), अर्पिता वैशंपायन (गायन), गोविंद भिलारे (पखवाज), सुनील अवचट (बासरी) आदींनी पूरक साथसंगत करून मैफलीत रंग भरले. आभा औटी यांनी सूत्रसंचालन केले.

८५ ओलांडलेल्या शरदिनीताईंचा नृत्याविष्कार!
शरदिनीताई गोळे या रोहिणी भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या आणि नृत्यभारतीच्या आजवरच्या वाटचालीच्या साक्षीदार. शरदिनीताई सादरीकरणासाठी रंगमंचावर अवतरल्या, तेव्हा उपस्थितांना सुखद धक्काच बसला. रोहिणीताईंना भावलेल्या प्रल्हाद कथेवरील काव्यावर त्यांनी अभिनयाविष्कारातून त्यांनी नृत्य सादर केले. वयाची ८५ पार केलेल्या शरदिनींताईंच्या उत्साहास रसिकांनीही मनापासून दाद दिली.

रमणबागेच्या विद्यार्थ्यांची भारत इतिहास संशोधक मंडळास भेट

0
पुणे-भारत इतिहास संशोधक मंडख ही संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी मान्यवर संशोधन संस्था आहे. त्याच्या १०८ व्या वर्धापन दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेतील भेट दिली. प्रशालेलचे इतिहस शिक्षक भेट दिली. प्रशालेचे इतिहास शिक्षक मोहन शेटे यांनी मंडळाच्या कार्याची संस्थापक वि.का. राजवाडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित केला. ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ पांडुरंग नलकवडे यांनी विद्यार्थ्यांना समजले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जीजाबाई, औरंगजेब यांची मूळ पत्रे प्रत्यक्ष पहाता आली. त्याच बरोबर विविध मूर्ती, नाणी, ताम्रपट, शस्त्रे, पोथ्या, रागमाले वरील चित्रे, किल्ल्यांचे जुने फोटो, नकाशे पहायला मिळाले.
इयत्ता १० वी च्या इतिहास अध्ययनाच्या दृष्टीने ही भेट उपयुक्त ठरली असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. या प्रसंगी वर्गशिक्षिका दिपाली चौघुले आणि इतिहास प्रेमी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक‘मास प्रशालेच्या प्रभारी मु‘याध्यापिका रजनी कोलते, उपमुख्याध्यापिका जयश्री रणखांबे, पर्यवेक्षक जगन्नाथ जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

एका झाडासाठी त्यांनी वृक्ष प्राधिकरणातच मांडला ठिय्या

0

पुणे : सातत्याने अर्ज करुनही इमारतीसमाेरील पदपथावरील झाड न काढल्याने व्यावसायिकाने शनिवारी थेट पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातच ठिय्या मांडला. विक्रम खन्ना असे या व्यावसायिकाचे नाव असून जाेपर्यंत कर्मचारी इमारतीसमाेरील झाड काढत नाहीत, ताेपर्यंत प्राधिकरणातून हलणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी केला हाेता, अखेर पालिकेने फांद्या छाटण्याचे लेखी अाश्वासन दिल्यानंतर त्यांनी अापले अांदाेलन मागे घेतले.

विक्रम खन्ना यांची लक्ष्मी रस्त्यावर इमारत अाहे. या इमारतीच्या समाेर एक उंबराचे झाड अाहे. ते झाड काढावे असा अर्ज त्यांनी 3 जानेवारी 2018 राेजी पालिकेकडे केला हाेता. झाड काढणे शक्य नसेल तर इमारतीला अडथळा ठरणाऱ्या फांद्यातरी छाटून द्याव्यात अशी त्यांची मागणी हाेती. परंतु महापालिकेने झाड काढण्याबाबत कुठलिही कारवाई केली नसल्याचे किंवा त्यांच्या अर्जाबाबत कुठलाही निर्णय कळवला नसल्याचे खन्ना यांचे म्हणणे अाहे. त्या एका झाडाच्या बदल्यात इतर ठिकाणी झाडे लावण्याची त्यांनी तयारी दर्शवली अाहे. परंतु त्यांच्या अर्जावर पालिकेचे अधिकारी टाेलवाटाेलवी करत असल्याचे त्यांचे म्हणणे अाहे. झाड पाडणे शक्य नसल्यास त्याच्या फांद्यातरी छाटून देण्यात द्याव्यात अशी त्यांची मागणी अाहे. त्याचबराेबर सात महिन्यापूर्वी केलेल्या अर्जावर काय कारवाई झाली याची माहिती मिळावी यासाठी त्यांनी शनिवारी महापालिकेच्या वृक्षप्राधिकरणात थेट ठिय्याच मांडला.

याबाबत बाेलताना खन्ना म्हणाले, सात महिन्यापूर्वी मी झाड काढण्यासाठी अर्ज केला हाेता. त्यावर काय कारवाई केली याचे उत्तर मला पालिकेने दिले नाही. त्यानंतरही अनेक अर्ज करुनही कुठलेही ठाेस उत्तर देण्यात अाले नाही. नेहमी टाेलवाटाेलवीची उत्तरे देण्यात अाली. झाड कापणे शक्य नसेल तर फांद्या छाटून द्याव्यात अशी मी मागणी केली. परंतु पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत अाहे. तसेच खासगी व्यक्तीकडून फांद्या कापण्यास सांगण्यात येत अाहे. वास्तविक ते झाड पालिकेच्या मालकीचे असून त्याच्या फांद्या छाटून देणे ही पालिकेची जबाबदारी अाहे.

मातंग समाजाला आपली ताकद दाखविण्याची वेळ आणू नका – रमेश बागवे (महामोर्चाची व्हिडीओ झलक)

पुणे :मातंग समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका आणि आपली एकत्रित ताकद दाखविण्यास भाग पाडू नका असा स्पष्ट इशारा आज मातंग समाजाचे नेते रमेश बागवे यांनी येथे दिला .राज्यातील मातंग समाजाच्या अन्याय अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याच्या कारणावरून पुणे शहरात आज मातंग समाजाच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला. सारसबागेच्या जवळील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. संविधान उद्देशिका वाचनाने मोर्चाची सुरवात झाली . मूकपणे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव सहभागी झाले होते.कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे , अविनाश बागवे हे आपल्या संपूर्ण कुटुंबीया सह मोर्चात सहभागी झाले होते .तर रिपब्लिकन पक्षाचे आणि पुण्याचे उपमहापौर डॉ . सिद्धार्थ धेंडे ,राष्ट्रवादीचे सुभाष जगताप ,योगेश वऱ्हाडे ,भाजपचे नगरसेवक धीरज घाटे , शाम शिंदे ,तसेच कविता वैरागे ,भरत वैरागे, मालन साठे ,हिरामण बनकर, अभय छाजेड,लता राजगुरू ,मनीष आनंद ,सोनाली लांडगे ,सरस्वती शेंडगे असे विविध पक्षांचे आणि संघटनांचे असंख्य मान्यवर नेत्यांसह अराजकीय क्षेत्रातील बहुसंख्य पुरुष,महिला ,तरुण वर्ग या मोर्चात सहभागी झाला होता . विराट अशा या मोर्चाने रिमझिम होणाऱ्या पावसाची तमा बाळगली नाही ,मात्र जोशमय अशा या मातंग समाजाचा मोर्चाने शहरातील सर्व वाहतूक विस्कळीत झाली . हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला .

     या मोर्चातही मराठा मोर्चाप्रमाणे महिला अग्रस्थानी होत्या. स्वारगेट ते जिल्हाधिकारी कार्यलयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चासाठी वाहतूक मार्गांमध्ये काही बदल करण्यात आले होते. मोर्चासमोर कोणताही अडथळा येऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुणे शहर आणि जिल्ह्यासह मातंग समाजातील विविध मान्यवर मोर्चात सहभागी झाले होते. प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्च्याची सांगता करण्यात आली.

यावेळी माध्यमांशी बोलताना रमेश बागवे यांनी म्हटले कि , गेल्या 4 वर्षात मातंग समाजावर अन्याय वाढतो आहे त्याची परिणीती म्हणून  कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता काढलेल्या या मोर्चाने विराट स्वरूप धारण केले आहे . यामुळे सरकारने याची तातडीने दाखल घ्यावी आणि या समाजाला आपली एकत्रित ताकद दाखविण्याची वेळ येवू देवू नये . ऍट्रासिटी कायदा शिथिल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी आता तरी सावध व्हावे आणि या कायद्याची कडक अंमलबजावणी करावी . झोपडपट्टीमधील तरुणाई व्यसनी होते आहे यामुळे झोपडपट्टीतील देशी दारूची सर्व दुकाने तातडीने बंद करावीत .भीमा कोरेगाव प्रकरणातील साक्षीदार पूजा सकट च्या मारेकऱ्यांना कडक शासन झाले पाहिजे . मातंग समाजातील अबकड वर्गवारी नुसार आरक्षण अंमलबजावणी सुरु झाली पाहिजे . .पुण्यात लहूजी वस्तादांचे स्मारकाचे काम तातडीने सुरु केले पाहिजे . अशा विविध मागण्या आम्ही या मोर्चा द्वारे मांडल्या आहेत . त्या तातडीने सरकारने मान्य कराव्यात .

शिवाजीनगर कामगार पुतळ्याजवळील पुलावरून टँकर नदीत कोसळला ; एकाचा मृत्यू

0

पुणे-शिवाजीनगर कामगार पुतळ्याजवळील पुलावरून कठडा तोडून एक टँकर नदीत कोसळला. ही घटना आज पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. या घटनेत एकजण मृत्युमुखी पडला असून त्याचा मृतदेह सापडला आहे. अन्य एक जण असल्याची शक्यता असून शोधकार्य सुरु आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिवाजीनगर कामगार पुतळ्याजवळील रेल्वे पुलाच्या शेजारी असलेल्या पुलाचा कठडा तोडून हा टँकर नदीत कोसळला. रेल्वेचा पूल त्याच्या शेजारील पुलाच्या मध्यभागी असलेल्या जागेतून हा टँकर खाली कोसळला. आज पहाटे साडेचारवाजता घटनेची वर्दी मिळाल्यानंतर त्वरित अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाले.

टँकर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असून खोल पाण्यात पडल्यामुळे तो बाहेर काढणे अवघड झाले आहे. दरम्यान या घटनेतील एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. अन्य काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून शोधकार्य सुरु आहे.

सफाई कंत्राटी कामगारांना तीन महिन्यात किमान वेतनाच्या फरकाची रक्कम द्या; उच्च न्यायालयाचा पालिकेला आदेश

0

18 वर्षाच्या न्यायालयीन लढ्यास यश; राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांची माहिती

पुणे– पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचा-यांना किमान वेतनाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी यासाठी गेल्या 18 वर्षांपासूनच्या राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या लढ्याला यश आले आहे. 572 कंत्राटी कर्मचा-यांच्या नावांची छाननी करा. फरकाच्या रकमांची तपासणी करुन तीन महिन्याच्या आतमध्ये कामगारांना मोबदला देण्यात यावा, असा महत्वपुर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच फरकाची रक्कम देऊन ही याचिका निकाली काढावी, असा न्यायलयाने आदेशात म्हटले आहे, असे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी आज (शनिवारी)पत्रकार परिषदेत सांगितले. यामुळे कामगारांना फरकाची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून 18 वर्षाच्या न्यायालयीन लढ्यास यश आले. तसेच या निर्णयाचा देशभरातील 80 कंत्राटी कामगारांनाही फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अॅड. प्रशांत क्षीरसागर, शिवराम गवस, सचिन वाळके, अमोल कार्ले, दिनेश पाटील, दिपक पाटील, दिपक अमोलिक, अॅड. संकेत मोरे, संभाजी पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विठ्ठल ओझरकर, अमोल घोरपडे, अमोल बनसोडे, अहमद खान इत्यादी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

कंत्राटी सफाई कर्मचा-यांना किमान वेतनाच्या फरकाची रक्कम देण्याबाबतचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने पालिकेला दिले आहेत. परंतु, पालिकेकडून ती देण्यास चालढकल केली जात असल्यामुळे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी आयुक्तांविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका देखील केली होती. या अवमान याचिकेवर 17 जुलै 2018 रोजी सुनावणी झाली. न्यायमूर्ती एन.डब्ल्यू. सांबारे व न्यायमूर्ती शंतनु केमकर यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.

कामगारांची संख्या पडताळणी, पृष्टीकरण करणे जे रक्कम घेण्यास पात्र आहेत. रक्कमेचे परिमाण पिंपरी महापालिकेने याआधी देण्यात आलेला पगार व आता देण्यात येणारी रक्कम यातील फरक इत्यादी सर्व ठरविण्याबाबत पालिकेला निर्देश देण्याची मागणी भोसले यांच्या वकिलाने केली. त्यावर खंडपीठाने म्हटले आहे की, आवश्यक कागदपत्रांसह महापालिकेच्या अधिका-यांनी दोन आठवड्यात पुण्याच्या अप्पर आयुक्तांकडे हजर रहावे. महापालिकेने दहा दिवसात त्यांचा प्रतिसाद द्यावा. याचा तीन महिन्याच्या आतमध्ये निवाडा करावा. 7 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 11 वाजता अप्पर कामगार आयुक्तांकडे हजर रहावे.

आवश्यक तारखा न घेता हे प्रकरण वेळेत ठरविण्याकरिता सहकार्य करावे. वरील आदेश देऊन याचिका खारिज करावी, असा न्यायालयाने आदेशात म्हटले, असल्याचे यशवंत भोसले यांनी सांगितले. याचिकाकर्ते यशवंत भोसले यांच्या बाजूने ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. एम.पी.राव व अॅड. व्ही.एल.कोळेकर यांनी बाजू मांडली. 572 कर्मचा-यांची वेतन फरकाची यादी व त्यामधील 65 कोटी 80 लाख दोन हजार 200 रुपये अप्पर आयुक्तांपुढे छाननी झाल्यानंतर तीन महिन्याच्या आतमध्ये देण्यात यावे. ही रक्कम 18 टक्के व्याजासह द्यावी, अशी संघटनेची मागणी आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधात कंत्राटी सफाई कर्मचा-यांना पालिका सेवेत कायम करावे व कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, याबाबत आपण महापालिकेविरोधात सन 2001 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सन 2004 मध्ये या याचिकेवर निर्णय झाला आणि त्यामध्ये कंत्राटदार बदलले तरी कामगारांना सेवेत कायम ठेवावे. तसेच अतिरिक्त आयुक्त कामगार विभाग यांनी दिलेल्या निर्णयानुसार समान काम समान वेतन कर्मचा-यांना देण्यात यावे. तसेच सन 1198 पासून 2004 पर्यंत किमान वेतनाच्या फरकाची कर्मचा-यांची यादी व रक्कम 16 कोटी 80 लाख 2 हजार 200 रुपये देण्याबाबतचेही निर्देश देण्यात आले होते.

या निकाला विरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन त्यावर स्थगितीचे आदेश आणले. यानंतर सर्व कामगारांना पालिकेने काढून टाकले. या याचिकेवर 12 जानेवारी 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवून महापालिकेची याचिका फेटाळली. गेली 2 वर्षे 3 महिने या निकालाची अंमलबजावणी करावी, यादीतील सर्व कर्मचा-यांना त्यांच्या नावे धनादेश द्यावेत, व सर्व 572 कामगारांना कामावर घ्यावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. तथापि, निकालाची अंमलबजावणी न केल्याने महापालिका आयुक्तांविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. या अवमान याचिकेवर न्यायालयाने तीन महिन्याच्या आतमध्ये मोबदला देण्याचा आदेश दिला आहे.

यशवंत भोसले म्हणाले, “न्यायालयाने हा अंतिम आदेश दिला आहे. कर्मचा-यांना फरकाची रक्कम देऊन ही याचिका निकाली काढावी असे सांगितले आहे. त्यामुळे आता आयुक्त सकारात्मत निर्णय घेऊन स्वच्छतागृह साफ करणा-या गोरगरिबांचे पैसे देतील अशी अपेक्षा आहे. पैशांची वाट बघत 572 पैकी 42 कामगारांचा मृत्यू झाला आहे. आता तरी पालिकेला पाझर फुटवा आणि न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी ” अन्यथा आपल्या परीने पुढील लढा लढणार असल्याचेही, त्यांनी सांगितले.

एनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत 1500 धावपटू सहभागी

0

पुणेनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑपथेलमॉलजी(एनआयओ) आणि रन बडिज क्लब यांच्या तर्फे चौथ्या एनआयओ व्हिजन अर्ध मॅराथॉन स्पर्धेत 1500 धावपटू सहभागी असुन यामध्ये 500 ब्लॉईंड फोल्डेड धावपटू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा रविवारदि. 22 जुलै 2018 या दिवशी होणार आहे. 

रनबडिज्‌ क्लब या शहरांतील महत्वाच्या संस्थेने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा 3कि.मी, 5कि.मी, 10कि.मी, 15कि.मी आणि 21कि.मी.या प्रकारात होणार आहे. रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर  येथे  स्पर्धेचा फ्लॅग ऑफ होईल.  स्पर्धेचा मार्ग रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर येथुन स्पर्धेला प्रारंभ होणार असून औधच्या दिशेने पुन्हा फिरून रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर असा मार्ग असणार आहे. स्पर्धेचा फ्लॅग ऑफ एनआयओ व्हिजनचे  डॉ.श्रीकांत केळकर व एनआयओच्या संचालिका जाई केळकर यांच्या हस्ते होणार आहे. 

एनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धा यावर्षी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. युके मधे डोळेबांधून धावण्याचा विक्रम करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.  

भारती विद्यापीठ आय.एम.ई.डी.च्या विद्यार्थ्यांची स्वीडन व ग्रीससाठी निवड

0
पुणे :
भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ( आय.एम.ई.डी. )च्या चार विद्यार्थ्यांची युरोपियन युनियनमधील इरास्मस प्रोग्राम द्वारे  कॅटरिनी (ग्रीस) येथे होणार्‍या ‘यूथ एक्सचेंज प्रोग्राम’साठी निवड झाली आहे.
 हे विद्यार्थी आयएमईडीमध्ये एमबीए व बीबीएचा अभ्यासक्रम शिकत असून, त्यांना सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळाले आहे. ‘ पत्रकारितेमधील लिंग- समानता हक्क अधिकार ’(Gender Equality in journalism-Getting the Balance Right)  हा या कार्यक्रमाचा विषय आहे.
 15 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या दरम्यान कॅटरिनी (ग्रीस) येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मयुरी गुप्ता, शंतनु कर्णिक, शुभांगी पांडे व शुभेंदु तुली अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
तसेच बी.बी.ए.मध्ये शिकत असणारे विनोद अलबाने व अनन्या द्विवेदी हे दोन विद्यार्थी लिनिअस विद्यापीठ, पाल्मे ( स्वीडन ) यांनी आयोजित केलेल्या स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्राम  मध्ये निवडले गेले आहेत.
 ‘भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड मॅनेजमेंट डेव्हलपमेंट’ (आयएमईडी)चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांची निवड झाली.
 यामुळे संपूर्ण एक सत्र हे विद्यार्थी स्वीडनच्या  लिनिअस विद्यापीठातच अभ्यासक्रमाचा काही भाग पूर्ण करतील.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. विश्‍वजीत कदम व कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी अभिनंदन केेले.

महाराष्ट्रातील कुस्तीगिरांना मिळणार मानाचं व्यासपीठ – झी टॉकीज घेऊन येत आहे ‘महाराष्ट्र कुस्ती लीग’

0

महाराष्ट्रातील सांस्कृतिक संचिताचा मानबिंदू म्हणजे कुस्ती. अंगात मुरलेली रग, क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारे नाट्य, प्रतिष्ठा, सन्मान या वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेला हा खेळ. मराठी माणसासाठी कुस्ती हा केवळ खेळ नाही, तर छत्रपती शिवरायांशी इमान राखणाऱ्या मर्द मावळ्यांच्या लढवय्या प्रवृत्तीचं प्रतीक आहे. एकेकाळी लयाला गेलेल्या या कुस्तीला राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या राजाश्रयामुळे नवसंजीवनी मिळाली. त्यानंतर महाराष्ट्र हे कुस्तीचं माहेरघर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. बदलत्या कालानुरूप, मातीत खेळला जाणारा हा खेळ आता मॅट वर खेळला जात असला तरी त्यातील थरार कायम टिकून आहे. शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी जोखणारा हा खेळ नाट्य, जिद्द, अभिमान,प्रतिष्ठा यांचं एक अफलातून मिश्रण आहे. खाशाबा जाधव यांच्यापासून सुरु झालेली कुस्तीची परंपरा अलीकडेच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदावर आपलं नाव कोरून राहुल आवारेने कायम ठेवली आहे.

                महाराष्ट्रातील नंबर १ चित्रपट वाहिनी झी टॉकीज, ‘महाराष्ट कुस्ती लीग’द्वारे कुस्ती आणि कुस्तीगीरांना  घराघरात पोहोचवणार आहे. महाराष्ट्र कुस्ती लीगचा थरार २ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत पुण्यातील बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात रंगणार आहे. महाराष्ट्रातील नावाजलेल्या कुस्तीगिरांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीगिरांशी लढताना बघण्याची पर्वणी आपल्या झी टॉकीजवर प्रेक्षकांना मिळणार आहेत.

याबद्दल बोलताना झी टॉकीज आणि झी युवाचे व्यवसायप्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात की, ‘महाराष्ट्र कुस्ती लीग’च्या माध्यमातून कुस्तीगिरांना एक नवे आणि भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. झी समूह कुस्ती आणि अशा अनेक भारतीय खेळांना बढावा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. यापूर्वी विविध लीग्सच्या माध्यमातून कबड्डी आणि क्रिकेट खेळाडूंच्या करिअरला नवी दिशा आणि संजीवनी प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र कुस्ती लीगमधूनही गुणी खेळाडूंना अशीच एक मोठी संधी उपलब्ध होईल. या लीगमधील संघमालकी मिळवण्यासाठी आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत असून लवकरच फ्रँचाइजी  बिडिंग  प्रक्रिया सुरु होईल.’

महाराष्ट्र कुस्ती लीगला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अखिल भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता लाभली आहे. या लीगमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मल्ल आपला जलवा दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत. महाराष्ट्र कुस्ती लीगमुळे कुस्तीला आणि कुस्तीगिरांना  सन्मानाचं आणि यशाचं एक नवं क्षितिज प्राप्त होईल. यामुळे अनेक नव्या दमाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा आपलं नाव सुवर्ण अक्षरात लिहितील.

पुण्याचे उपमहापौर खोटारडे – विरोधीपक्षनेते तुपे पाटील

0
पुणे- काल महापालिकेच्या मुख्य सभेत माझ्या प्रभागात खड्डे नाहीत असा दावा करणारे उपमहापौर हे खोटारडे असून आज त्यांच्याच भागातील नागरिकांनी त्यांच्या प्रभागातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो काढून आपल्याला पाठविले असे येथे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी सांगितले आणि त्याचबरोबर हे फोटो देखील सादर केले . पहा हे फोटो ….
(येथे mymarathi.net वर हे फोटो देत आहोत हे फोटो चेतन तुपे यांच्या बाईट मधील व्हिडीओ मध्ये नाहीत .ते mymarathi.net इथेच पाहावेत)
पहा आणि ऐका नेमके तुपे पाटील काय म्हणाले …. 

सॉफ्टझील टेक्नॉलॉजीचे मार्केटिंग तंत्र वाखाणण्याजोगे – छत्रपती मालोजीराजे

0
भारतातल्या सर्वात मोठ्या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद 
 

पुणे, दि. २० :

सॉफ्टझील टेक्नॉलॉजी कंपनीने भव्य रोजगार मेळावा घेण्यात पुढाकार घेऊन मोठे काम केले आहे. यामुळे कामाच्या शोधात असलेल्या अनेकांना काम मिळण्यास मदत होणार आहे. सॉफ्टझीलने सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्केटिंग तंत्र वापरले, हे वाखाणण्याजोगे आहे, असे प्रतिपादन  ऑल  इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे सचिव छत्रपती मालोजीराजे यांनी केले.

                 महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र, सॉफ्टझील टेक्नॉलॉजी यांच्या वतीने ऑल  इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्याचे उदघाटन ऑल  इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे सचिव छत्रपती मालोजीराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या सहाय्यक संचालिका अनुपमा पवार, सोसायटीचे सचिव सुरेश शिंदे, जिल्हा कौशल्य विकासाचे उपसंचालक शरद अंगणे,  सॉफ्टझील टेक्नॉलॉजीचे संचालक दौलत बाफना, कौशल्य विकास अधिकारी महेश गवळी, तसेच विविध कंपन्यांचे ३०० हून अधिक एच आर आदी मान्यवर उपस्थित होते. 

        या रोजगार मेळाव्यात १४६ कंपन्यांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे २६ हजार ५०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असताना तब्बल ५० हजाराहून अधिक विद्यार्थी मुलाखतीसाठी आले होते. या अनुशंगाने हा भारतातला सर्वात मोठा रोजगार मेळावा ठरला आहे.
         यावेळी छत्रपती मालोजीराजे म्हणाले, आज रोजगाराची समस्या गंभीर आहे. शासन सर्वच गोष्टी एकटे करू शकत नाही. समाजातील उद्योगपती, कंपन्या याना बरोबर घेऊन शासन रोजगार मेळाव्यांचे आयोजन करीत असते. मार्केटिंग, संधी आणि रोजगारांच्या संख्येत समतोल निर्माण होणे गरजेचे आहे. असमतोल निर्माण झाल्यास अनेक प्रश्न निर्माण होतील. महाराष्ट्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र, कौशल्य विकसित केलेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. २०३० पर्यंत भारत जगातली सर्वात मोठी तिसरी आर्थिक महासत्ता बनणार आहे. आर्थिकदृष्ट्या भारत पुढे जातोय, हि स्वागतार्ह गोष्ट आहे. त्यामुळे तरुणांनी नोकरी, व्यवसायात स्थिरस्थावर झाले पाहिजे. आज अनेक संधी आहेत. त्यामुळे असे रोजगार मेळावे शैक्षणिक संस्थांनी राबविणे गरजेचे आहे. आम्ही दरवर्षी विविध सामाजिक घटकांना एकत्र घेत रोजगार मेळावे आयोजित करणार आहोत, असेही छत्रपती मालोजीराजे यांनी सांगितले.
               सॉफ्टझील टेक्नॉलॉजीचे संचालक दौलत बाफना यांनी सांगितले कि, विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कंपन्यांकडे कामासाठी नोंदणी केली पाहिजे. सध्याच्या ओपनिंग ट्रेंडचा अभ्यास करणेही गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी फक्त पदवी प्राप्त ना करता त्यासोबत कौशल्य आत्मसात केले, तरच इथून पुढच्या काळात त्यांना काम मिळणार आहे. कौशल्य विकसित केल्यास रोजगार नक्की मिळेल. त्यामुळे इथून पुढे पुस्तकी शिक्षणापेक्षा कौशल्याधारित शिक्षणाची आवश्यकता आहे. बाहेरच्या जगाचा अनुभव आवश्यक आहे.
                अनुपमा पवार म्हणाल्या, जिल्हा  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र २००७-०८ पासून रोजगार मेळावे आयोजित करते. मात्र, हा रोजगार मेळावा उल्लेखनीय आहे. बेरोजगारांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने असे मेळावे आवश्यक आहेत.
                 शरद अंगने म्हणाले, रोजगार, स्वयंरोजगारातून आर्थिक प्रगती शक्य आहे. हा रोजगार मेळावा भारतातला सर्वात मोठा रोजगार मेळावा म्हणता येईल. खरे तर या मेळाव्याला करिअर मार्गदर्शन म्हणता येईल. सध्याच्या तरुणाईला नाविन्याचा ध्यास लागला आहे. शासनाच्या स्टार्ट अप योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
                सूत्रसंचालन धनंजय कुलकर्णी यांनी केले.