Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

स्वरचित नृत्याविष्कारांतून गुरुदक्षिणा अर्पण

Date:

नृत्यभारती’च्या शिष्यांकडून कथक गुरू रोहिणी भाटेंंना आदरांजली

पुणे : लालित्यपूर्ण पदन्यासाने मंत्रमुग्ध करणाऱ्या नृत्याविष्काराद्वारे कथकचे विविधांगी दर्शन रसिकांना शुक्रवारी घडले. आषाढातील सांजवेळी रंगलेल्या या हृद्य मैफलीने पुणेकरांची मने जिंकली. ‘नृत्यभारती’च्या चारही पिढीतील विद्यार्थ्यांनीं ‘कथक’ रचनांची गुरुदक्षिणा स्व. रोहिणी भाटे यांच्या स्मृतीस विनम्रपणे अर्पण करत कृतज्ञ भाव व्यक्त केला.

निमित्त होते ‘नृत्यभारती’ कथक डान्स अकॅडमीतर्फे गुरुपौर्णिमेनिमित आयोजित ‘वेध साधनेचा’ या  मैफलीचे. गेली ७१ वर्षे अखंडित सुरू असलेल्या अभिजात कथक परंपरेचा प्रवास यातून रसिकांसमोर उलगडला.
मैफलीचा प्रारंभ रोहिणी भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या मनीषा अभय, आभा वांबुरकर, आसावरी पाटणकर यांच्या सादरीकरणाने झालाा. प्रसिद्ध तबलावादक पं. अरविंदकुमार आजाद यांनी रचलेल्या गुुुुरूवंदनेवर लयबद्ध नृत्याविष्कार सादर करत त्यांनी वातावरणात अधिक प्रसन्नता आणली. त्यानंतर सुकृति डान्स अकॅडमीच्या मनीषा अभय व त्यांच्या शिष्यांनी ‘चौताला’तील रचना प्रस्तुत केली. यास पखवाजवादक गोविंद भिलारे यांची समर्पक साथ लाभल्याने रंगत वाढली. त्यांनी पेश केलेले ‘यति परण’ हा जणू ऊर्जाविष्कारच होता. त्याला दाद मिळाली.
सामाजिक विषयाला कथक नृत्योद्गार देणाऱ्या आसावरी पाटणकर व त्यांच्या शिष्यांनी कथकच्या ‘असीम’ शैलीचे दर्शन घडविले. त्यांनी सादर केलेल्या ‘चैतन्य’ या संवेदनशील कलाकृतीने रसिकांना अंतर्मुख केले.
‘सज धज सजन मिलन चली’ ही ‘अभिसारिका नायिका’ आभा वांबुरकर यांनी साभिनय व पद्न्यासाातून रसिकांसमोर उलगडली. त्यानंतर ‘राग सागर’मधील रचना `नृत्यभारती’च्या शिष्यांनी सादर करत पहिल्या पर्वाची सांगता केली.
दीक्षा कथक डान्स अकॅडमीच्या आभा वांबुरकर व त्यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या शिववंदनेने दुसऱ्या पर्वाची सुरुवात झाली. त्यांचे ‘रूप धमार’ मधील सादरीकरण सर्वांना भावले. ‘कॅलिडोस्कोप’ हा यमन रागातील तराणा व निसर्गाच्या बदलत्या रूपाचे वर्णन करणाऱ्या ‘ऋतुगान’ या अजरामर रचनेचे ही सादरीकरण झाले. रोहिणीताईंची ही मूळ रचना  असून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ज्येष्ठ शिष्या नीलिमा अध्ये यांनी मोलाचे परिश्रम घेतले. या प्रस्तुतीने मैफलीची आगळीच उंची गाठली.ताल आणि लयीप्रमाणेच साहित्यावरही प्रभुत्व असलेल्या गुरू रोहिणी भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या अमला शेखर यांनी आपल्या काव्यमय नृत्यातून रोहिणीताईच्या व्यक्तिमत्त्वातले अव्यक्त पैलू उलगडले.  यांनी ‘नृत्यभारती’ परिवारातर्फे भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या शरदिनीताई गोळे यांचे गुरूपूजन करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पं. अरविंदकुमार आजाद (तबला), अजय पराड (संवादिनी), अर्पिता वैशंपायन (गायन), गोविंद भिलारे (पखवाज), सुनील अवचट (बासरी) आदींनी पूरक साथसंगत करून मैफलीत रंग भरले. आभा औटी यांनी सूत्रसंचालन केले.

८५ ओलांडलेल्या शरदिनीताईंचा नृत्याविष्कार!
शरदिनीताई गोळे या रोहिणी भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या आणि नृत्यभारतीच्या आजवरच्या वाटचालीच्या साक्षीदार. शरदिनीताई सादरीकरणासाठी रंगमंचावर अवतरल्या, तेव्हा उपस्थितांना सुखद धक्काच बसला. रोहिणीताईंना भावलेल्या प्रल्हाद कथेवरील काव्यावर त्यांनी अभिनयाविष्कारातून त्यांनी नृत्य सादर केले. वयाची ८५ पार केलेल्या शरदिनींताईंच्या उत्साहास रसिकांनीही मनापासून दाद दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तुकडेबंदी कायदा रद्द अधिसूचना जारी … बावनकुळे

मुंबई- सरकारने याच अधिवेशनात केलेल्या घोषणेप्रमाणे तुक्देबंदी कायदा रद्द...

मीरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १६ : मेट्रो लाईन समवेत असणारे काशिगाव मेट्रो...

आम आदमी पार्टी जिल्ह्यात सर्व स्थानिक निवडणुका लढवणार

पुणे-राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गण,...