Home Blog Page 3097

वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावास विरोध केल्याने एमआयएमच्या नगरसेवकाला सभागृहातच मारहाण

0

औरंगाबाद – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध केला म्हणून  एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना भाजप नगरसेवकांनी शुक्रवारी जोरदार मारहाण केली

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले. त्यानंतर शुक्रवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या श्रद्धांजलीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध केला. त्यांनी विरोध करताच नगरसेवक राज वानखेडे, दिलीप थोरात, प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, उपमहापौर विजय औताडे यांनी मतीन यांच्यावर धावून जात त्यांना जोरदार मारहाण केली. त्यानंतर त्यांना सभागृहाबाहेर पिटाळून लावले. सय्यद मतीन यांना कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या घटनेचे पडसाद थोड्याच वेळात शहरात उमटले. एमआयएमच्या काही कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोर भाजप संघटन मंत्री भाऊराव देशमुख यांच्या गाडीची तोडफोड केली. एवढेच नाहीतर चालकालाही मारहाण केली. यामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे.

ही घटना संपूर्ण शहरात वार्‍यासारखी पसरली. घटनेनंतर मतीन यांचे समर्थक महापालिका मुख्यालयासमोर जमा झाले. तसेचभाजपचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमा झाले. भाजप आमदार अतुल सावे यांच्यासह पदाधिकारी पोलिस आयुक्तांना भेटण्यासाठी गेले असता मतीन यांच्या समर्थकांनी भाऊराव देशमुख यांची स्कार्पिओ गाडीवर दगडफेक केली. तसेच चालक विलास काशिनाथ गोराडे यांना बेदम मारहाणही केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून यांची बोराडे यांची टोळक्यातून सुटका केली. या घटनेमुळे शहरात तणाव पसरला आहे. शहरातील चौका-चौकांत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

 

अंकीत फडिया यांचें ‘द कसिनो जॉब’ प्रकाशित

0
 हॅकिंग थीमवर आधारित भारतातील पहिले पुस्तक
पुणे– सर्वाधिक विक्रीचा विक्रम असणारे लेखक अंकित फाडिया एथिकल हॅकिंगवर आधारित पुस्तके लिहण्यासाठी प्रसिद्ध आहेत, आणि आता एथिकल हॅकिंगमधुन बाहेर निघत त्यांनी आपली पहिली कल्पनारम्य कादंबरी द कसिनो जॉब लॉंंच केली आहे.
 ‘द कसिनो जॉब’  तीन जिवलग मित्रांची कथा आहे. रोहन, हार्दिक आणि मल्लिका हे तीघे गोव्यात जातात आणि तेथे भरपूर मजा करतात. एक संध्याकाळी गोव्यामधील एल डॉराडो कसिनो जहाजावरील  एक टेबलवर ते तीन पत्ती खेळत आसतात, तेंव्हा अचानक त्यांचा हा खेळ उंदीर-मांजरामधील खुनी खेळात बदलतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ते पाहतात की ते निर्जन समुद्र किनार्यावर पोहचलेले अाहेत, त्यांनी सगळे पैसे गमावले आहेत आणि ते धोकादायक इस्रायली माफियांच्या निशाण्यावर आहेत.  ही कथा या तीन मित्रांवर आधारित आहे.  फसवणूक, दगा, छळाच्या वादळामध्ये अडकलेले हे तीन मित्र त्या परिस्थितीतून कसे बाहेर येतात ह्यावर ही कहानी आधारित आहे.
पुण्यातील क्रॉसवर्ड औंध, मध्ये ह्या प्रकाशनाच्या दरम्यान आपले विचार व्यक्त करताना अंकीत फाडिया म्हणाले कि, वयाच्या १४ व्या वर्षी मी माझे पहिले पुस्तक लिहिले होते. एक कल्पनारम्य कादंबरी लिहने माझे स्वप्न होते. जसे की ह्या कथेच्या सारांशामध्येच समजते की द कैसीन जॉबचे मुख्य पात्र एक हैकर आहे जे फावल्या वेळेत गंमत म्हणून कंप्यूटर आणि वेबसाइट हॅक करते. हॅकिंग ह्या कथेचा मुख्य मुद्दा आहे. याचबरोबर आजच्या महाविद्यालयीन मित्रांच्या आयुष्यावर देखील हे पुस्तक प्रकाश टाकते.
‘द कसिनो जॉब’ लिहण्याची प्रेरणा मला तेंव्हा मिळाली जेंव्हा मी माझ्या मित्रांबरोबर गोव्यास गेले होतो. जेंव्हा आम्ही तिथे कसिनोमध्ये गेलो तेंव्हा आम्ही आश्चर्यचकित झालो की लोक खुप सारे पैसे जुगारीमध्ये घालवतात. त्यावेळी मला जाणवले  की जिथे  जास्त पैसा तिथे तितक्याच गुन्हेगारी घटनांना वाव मिळतो.
द कॅसिनो जॉब वेस्टलॅंड बुक्स (अमेझॅन) द्वारे प्रकाशित केले असुन त्याची किंमत २९९ रुपए आहे.  अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ऑनलाइनसह भारतातील सर्व प्रमुख बुक स्टोअरमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे.

‘टेक केअर गुड नाइट’ (टीसीजीएन) ३१ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात

0

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. आघाडीचे लेखक गिरीश जयंत जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील (एस पी एंटरटेन्मेंट) आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे त्याला संगीत आहे. टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाची माहिती देण्यासाठी पुणे येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी यांनी ही माहिती दिली. यावेळी या चित्रपटातील कलाकार सचिन खेडेकरइरावती हर्षेआदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे उपस्थित होते. अभिनेते महेश मांजरेकर यांची सुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. टेक केअर गुड नाईटचा ट्रेलर सुद्धा यावेळी दाखविण्यात आला.

या चित्रपटाची कथा ही एका शहरातील कुटुंबाची असून या कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. हा लढा देताना या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील वडिलांना बदलत्या तंत्रज्ञानाचे धडे घेत तंत्रज्ञानाबद्दलचे त्यांचे अज्ञान दूर करून घ्यावे लागते. आपल्या समुपदेशन कौशल्यावर बसलेली धूळ पुसत त्याचा वापर यातील आईला याकामी करून घ्यावा लागतो. आपल्या आई वडीलांबरोबरचा संवादाचा तुटलेला धागा यातील मुलीला पुन्हा जोडावा लागतो. कथेमध्ये मग या सर्व गोष्टी पुढे येतातच पण त्याचबरोबर आजच्या तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जीवनशैलीचे अनेक पैलूही उलगडत जातात.

लेखक गिरीश जोशी म्हणतात कीया संकल्पनेचा जन्म त्यांच्या एका नातेवाईकच्या बाबतीत जो प्रसंग त्यांच्या वयाच्या ५०व्या वर्षी घडला. हे नातेवाईक काही काळासाठी परदेशात असतात. परत आल्यावर त्यांच्या लक्षात येते कीत्यांचे काही लाख रुपये हे त्यांच्या क्रेडीट कार्डावरून ऑनलाइन काढले गेले आहे. “अत्यंत हतबल झालेल्या या नातेवाईकांनी मग मला मदतीसाठी दूरध्वनी केला. मी मग त्यांना तक्रार नोंदविण्यासाठी सायबर सेल विभागात घेऊन गेलो. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या संभाषणामध्ये मला माझ्या काकांच्या बाबतीत घडलेल्या त्या घोटाळ्याबाबत आणखी माहिती मिळत गेली. पण त्याचवेळी संपूर्ण जगात या अशा घोटाळ्यांचे प्रमाण किती मोठे आहेहे ध्यानात आले. जगभरात लाखो लोक मोबाइलक्रेडीट कार्डइंटरनेट वापरतात आणि त्यावरून व्यवहार करतात. तो त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग झालेला असतो. या सर्वांच्या बाबतीत हा धोका संभवतो. अशी कोणती नेमकी गोष्ट असते की ज्यामुळे सायबर गुन्हेगारांना या लोकांच्या आयुष्यात आणि व्यवहारात शिरकाव करण्याची संधी मिळतेहे मला शोधून काढायचे होते. एक लेखक म्हणून याबद्दल लिहिणे खूप गरजेचे आहेअसे मला वाटत राहिले,” ते म्हणतात.

जरी हे माझ्या नातेवाईकच्या बाबतीत घडत असले तरी मी याबाबत मोठ्या प्रमाणावर लिहिले पाहिजे असे मनोमन ठरवून घेतले होते. जसजशा व्यक्तिरेखा आकार घेत गेल्या तसतसे ही सायबर क्राइमची समस्या किती गहन आहेहे अधिकाधिक उलगडत गेले. ‘सर्वसाधारण संवादाचा अभाव आणि माणसामाणसांमधील तुटलेला संपर्क’ हे मध्यवर्ती सूत्र आकाराला आले. हाच धागा पुढे विकसित होत गेला आणि या प्रवासातील सर्जनशील भाग अधिकाधिक संमिश्र होत गेला. जसजसे मी लिहित गेलो तसतसा माझ्यातील दिग्दर्शक अधिकाधिक आकार घेऊ लागला. त्यातून मग गती येत गेली आणि चित्रपटाला लय मिळत गेली. जेव्हा मी चित्रपटाचा अंतिम ड्राफ्ट तयार केलातेव्हा मी ठरवले की या चित्रपटाचे दिग्दर्शनही मीच करणार. ‘टेक केअर गुड नाईट’ मग माझ्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट ठरला.

मेकॅनीकल इंजीनीयरिंगचा विद्यार्थी म्हणून महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला असतानाच गिरीश यांच्या ध्यानात आले कीआपण वर्गापेक्षा रंगमंचावर अधिक काळ घालवला आहे. रंगमंचावरील स्पर्धेत आपल्याला मशीनच्या थीयरीपेक्षा अधिक मजा येतेअसेही त्यांना मनोमन जाणवले होते. त्याचवेळी त्यांनी कॉलेजला रामराम ठोकायचे ठरवले आणि पुढील काही वर्षे मग त्यांनी रंगमंचावर घालवली. रंगमंचावर विविध भूमिका बजावल्या आणि आपले कलेचे अंग अधिक सक्षम केले. लेखक,दिग्दर्शकअभिनेता आणि अगदी सेट डिझायनर आणि लाईट डिझायनर अशा विविध भूमिकांमध्ये त्यांनी पन्नासहूनही अधिक नाटकांमध्ये कामे केली. जसजशी संधी मिळाली तसतसा आकार घेत स्वतःचे नाव निर्माण केले. पुढे नाटक आणि चित्रपट अशा दोन्ही क्षेत्रांत आपला वावर त्यांनी प्रस्थापित केला. पुणे येथील ‘मीडिया स्कूलमध्ये त्यांनी ‘स्क्रीनप्ले अंड स्ट्क्चर’ हा विषय तीन वर्षे शिकवला. त्यांनी विविध टीव्ही मालिकांचे ५०० हूनही अधिक भाग लिहिले आणि त्यानंतर ते चित्रपट लेखनाकडे वळले.

या चित्रपटाची प्रस्तुती करत असलेल्या एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोयशिक्षणाच्या आयचा घो,हापूसआयडीयाची कल्पनातुकारामआजचा दिवस माझाहॅप्पी जर्नीकॉफी आणि बरेच काहीटाइम प्लीजमुंबई पुणे मुंबई – बापजन्म आणि आम्ही दोघी या काही चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती कंपनीने केली आहे.

गोयल गंगा इंटरनैशनल स्कूलमध्ये वन प्रकल्पाचा शुभारंभ

0

पुणे :-  ७२ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पिंपरी येथील गोयल गंगा इंटरनैशनल स्कूल मध्ये वनप्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून मैन्यूफैक्चरिंग ग्रुप ऑफ आर्मी बेस वर्कशॉपचे उपमहाव्यवस्थापक कर्नल के.टी. कुरिआकोस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गोयल गंगा इंटरनैशनल स्कूलच्या सोनू गुप्ता,मुख्याध्यापिका भारती भागवाणी,  इतर शिक्षक आणि पालकही उपस्थित होते.

शाळेच्याच भागात सहावी ते दहावीच्या मुलांनी यावेळी ५० झाडे लावून ‘वन प्रकल्पा’ची सुरुवात केली. याचा शुभारंभ काल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाला. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये  ७०० हून अधिक झाडे लावण्याचा आणि जोपासण्याचा आमचा मानस आहे अशा भावना मुख्यध्यापिका भारती भागवाणी यांनी व्यक्त केल्या.

आपल्या नैसर्गिक संसाधनाचा वापर कसा देशाच्या चांगल्यासाठी करता यावा तसेच त्याचे जतन कसे करावे,  हाच या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.  असे मत सोनू गुप्ता यांनी मांडले.

आपल्या मधील कौशल्यामुळे अनेक गोष्टी सहज साध्य करता येतात . पण त्यासोबत ही क्षमता वाढविणे, जोपासणे आणि त्याचा उपयोग समाजातील अधिकाधिक लोकांच्या कल्याणासाठी कसा करता येईल हा विचार करणे आवश्यक आहे असे मत कुरिआकोस यांनी मांडले. याशिवाय ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेचे काय पैलू आहेत, येणाऱ्या पिढ्यांच्या स्वातंत्र्यासाठी आधीच्या पिढ्यांनी नेमकी काय किंमत मोजली याची माहितीही या निमित्ताने करून देण्यात आली.

‘भारतीय विद्या भवन’मध्ये 24 ऑगस्ट रोजी ‘गीत रामायण ’कार्यक्रम

0
पुणे :‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सुधीर फडके  यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘गीत रामायण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम मालिकेतील हा ५२ वा कार्यक्रम आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक 24 ऑगस्ट 2018 रोजी ‘भारतीय विद्या भवन‘चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह‘, सेनापती बापट रोड येथे सायंकाळी 6 वाजता होणार आहे. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
विक्रम पेंढारकर प्रस्तुत या कार्यक्रमात वर्धन पेंढारकर, अथर्व बुरसे हे किशोरवयीन गायक गीत रामायणातील निवडक गीते सादर करून गदिमा आणि बाबूजींना स्वरांची मानवंदना देणार आहेत. मैत्रेयी पेंढारकर आणि वैशाली जोशी हे त्यांना साथ करणार आहेत.
कार्यक्रमाचे निवेदन वैशाली जोशी करणार आहेत. प्रसाद वैद्य (तबला), उद्धव कुंभार (ताल वाद्ये), चारूशीला गोसावी (व्हायोलिन) हे साथ संगत करतील, अशी माहिती यांनी विक्रम पेंढारकर यांनी दिली.
चार वर्षांपूर्वी या कार्यक्रमास सुरूवात केली असून, आतापर्यंत 10 कार्यक्रम सादर करण्यात आले आहेत, असे विक्रम पेंढारकर यांनी सांगितले.

वाजपेयी पंचत्त्वात विलीन; मानसकन्येनं दिला मुखाग्नी

0

नवी दिल्ली-  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आज (शुक्रवार) पंचत्त्वात विलीन झाले. दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती स्थळावर त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. वाजपेयी यांच्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी त्यांना मुखाग्नि दिला. यावेळी वाजपेयी यांच्या अंतिम क्षणांचे साक्षीदार असलेले हजारो उपस्थित लोक साश्रू नयनांनी हात जोडून उभे होते. वाजपेयी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

त्यांच्या नात निहारिका यांनी तिरंगा ग्रहण केला.यावेळी राष्ट्रीय स्मृती स्थळावर शांतता पसरली होती. उपस्थित सर्वजण दु:खात बुडालेले होते. त्यांच्या कन्या, नात आणि कुटुंबीयांसह स्मृतिस्थळी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते.  ते नेहमी मैत्रीचा हात पुढे करत गेले, त्यांना शत्रू कुणीच नव्हते. याचीच प्रचिती आज त्यांना अंतिम निरोप देताना येत होती. राष्ट्रीय स्मृती स्थळावर सैन्याच्या तिन्ही दलांनी वाजपेयी यांना अखेरची सलामी दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाजपेयी यांचे जवळचे जुने मित्र लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक दिग्गज वाजपेयीं यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मृती स्थळी उपस्थित होते.

7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

त्यांच्या निधनावर 7 दिवसांच्या राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा करण्यात आली. शुक्रवारी देशातील 12 राज्यांनी राजकीय शोक आणि अवकाशाची घोषणा केली. यात दिल्ली, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, ओडिशा, पंजाब, बिहार, झारखंड, हरियाणा, तेलंगण, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्य यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये सरकारी कार्यालय, शाळा आणि कॉलेजांमध्ये अवकाश ठेवण्यात आला आहे. दिल्लीमध्ये व्यापाऱ्यांनीही सर्व बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अटलजींनी गुरुवारी संध्याकाळी 5.05 वाजता एम्समध्ये शेवटचा श्वास घेतला होता. ते 9 वर्षांपासून आजारी होते आणि 67 दिवसांपासून एम्समध्ये अॅडमिट होते.

राष्ट्रीय स्मृतिस्थळावरच बनणार अटलजींचे स्मारक:
यमुना किनारी राष्ट्रीय स्मृतिस्थळावर दीड एकर जमिनीवर अटल बिहारी वाजपेयींचे समाधि स्थळाची निर्मिती होईल. यूपीए सरकारने नदीकिनारी समाधि स्थळ बांधण्यावर रोख लावली होती, परंतु मोदी सरकारने या निकालाला फिरवून तेथे समाधी स्थळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मोदी सरकार लवकरच अध्यादेश आणू शकते.

पाकचे कायदे मंत्री आज दिल्लीला येणार:
भूतानचे नरेश जिग्मे खेसर नामगेयाल वांगचुक, नेपाळचे परराष्ट्र मंत्री पी. के. ग्यावाल, श्रीलंकेचे कार्यकारी विदेशी मंत्री लक्ष्मण किरीला, बांग्लादेशचे विदेश मंत्री अबुल हासन महमूद अली आणि पाकिस्तानचे कायदे मंत्री अली जफर अटलजींना श्रद्धांजलि वाहण्यासाठी आज दिल्लीला पोहोचणार आहेत.

अमेरिका, चीन, पाकिस्तान, ब्रिटन आणि बांग्लादेशने व्यक्त केला शोक:
पाकिस्तान तहरिक-ए-इंसाफचे नेता आणि पंतप्रधानपदी जात असलेले इमरान खान म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी राजकारणातील एक मोठे व्यक्तिमत्त्व होते. भारत-पाक संबंधांमध्ये सुधारासाठी त्यांच्या प्रयत्नांना नेहमी आठवले जाईल. चीनचे राजदूत लुयो झाओहुई यांनी ट्वीट केले- “अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने अतिव दु:ख झाले आहे.” भारतातील अमेरिकी दूतावासाने म्हटले, “माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या सत्ताकाळात अमेरिकेच्या सोबत मजबूत संबंधांवर भर दिला.” ब्रिटन आणि जपानच्या राजदूतांनी म्हटले की, ते वैश्विक नेत्यांपैकी एक होते. बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी म्हटले की, बांग्लादेशच्या लोकांमध्येही अटल बिहारी वाजपेयी खूप लोकप्रिय होते.

मोदी म्हणाले- वडिलांचे छत्र हरपले:
नरेंद्र मोदींनी अटलजींना श्रद्धांजली देत म्हटले की, त्यांचे जाणे वडिलांचे छत्र हरपल्यासारखे आहे. यापूर्वी त्यांनी ट्विटमध्ये म्हटले- ‘‘मैं नि:शब्द हूं, शून्य में हूं, लेकिन भावनाओं का ज्वार उमड़ रहा है। हम सभी के श्रद्धेय अटलजी हमारे बीच नहीं रहे। यह मेरे लिए निजी क्षति है। अपने जीवन का प्रत्येक पल उन्होंने राष्ट्र को समर्पित कर दिया था। उनका जाना, एक युग का अंत है।’’

 

भारतातील हँडवॉश उद्योगाची उलाढाल ७४० कोटी रुपये

0

गोदरेज तर्फे ‘प्रोटेक्ट मि.मॅजिक’ पावडर टू लिक्विड हँडवॉश दाखल

मुंबई: सामाजिक बदल घडवून आणतील, अशी नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करण्यावर भर देत, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने ‘प्रोटेक्ट मि. मॅजिक’ हा पहिलावहिला पावडर टू लिक्विड हँडवॉश सादर केला आहे. भारतातील हँडवॉश उद्योगाची उलाढाल ७४० कोटी रुपये आहे व त्यामध्ये होणारी वाढ १५% आहे. हँडवॉशिंग सोप्सची उलाढाल ८००० कोटी रुपये आहे. परंतु, हँडवॉशच्या प्रमाणात होणारी वाढ अतिशय मंद आहे व शहरी भागात अंदाजे २०% असलेल्या उच्च एसईसीपुरती मर्यादित आहे. म्हणजे केवळ २ कोटी घरांमध्ये लिक्विड हँडवॉशचा वापर केला जातो.

 गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे (जीपीसीएल) भारत व सार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया यांनी सांगितले, “लिक्विड हँडवॉश महाग असतात, या समजामुळे अनेक घरे त्याचा वापर करणे टाळतात. प्रत्येक घराला लिक्विड हँडवॉश खरेदी करणे परवडेल अशा भविष्याचे स्वप्न आम्ही नेहमी पाहिले आहे. प्रोटेक्ट मि. मॅजिक या पहिल्यावहिल्या पावडर टू लिक्विड हँडवॉशमध्ये नीम व अॅलो व्हेरा असे नैसर्गिक घटक समाविष्ट केलेले आहेत. नीममधील जर्मिसायडल गुणधर्म व अॅलो व्हेरामधील उपयुक्तता, यामुळे हे उत्पादन हातासाठी सौम्य व जर्मसाठी कठोर आहे. प्रोटेक्ट मि. मॅजिकची किंमत माफक असल्याने सर्व श्रेणीतील व विविध ठिकाणच्या भारतीय घरांना हायजेनिक जीवनशैलीसाठी या नावीन्यपूर्ण स्वरूपातील हे उत्पादन खरेदी करणे शक्य होईल.”

 न्यू हॉरिझोन्स चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर अँड रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक–संचालक डॉ. समीर दलवाई यांनी सांगितल, “हाताच्या स्वच्छतेकडे विशेषता सार्वजनिक आरोग्याचा अतिशय किफायतशीर उपाय म्हटले जाते. त्यामध्ये जगभरात आजारांचे प्रमाण लक्षणीय कमी करण्याची क्षमता  आहे. पाच वर्षांखालील अंदाजे १.५ दशलक्ष बालके दरवर्षी डायरियामुळे दगावतात. आवश्यक त्या वेळी सोप किंवा लिक्विड हँडवॉशने हात धुतल्याने–खाण्यापूर्वी किंवा अन्न शिजवण्यापूर्वी व शौचालयाचा वापर केल्यावर–डायरियाचे प्रमाण ४०% पेक्षा कमी होऊ शकते.”

 हँडवॉशिंग सोप्सच्या तुलनेत, लिक्विड हँडवॉश अधिक आरोग्यदायी आहे, अधिक स्वच्छ आहे व वापरण्यास सोयीचा आहे. एखाद्याने हात धुतले की हँडवॉशिंग सोप खराब दिसू लागतो, पण लिक्विड हँडवॉशचा थेंब अन् थेंब स्वच्छ, अस्पर्शी व किटाणूरहित असतो. प्रोटेक्ट मि. मॅजिकची किंमत किफायतशीर असल्याने, साबणापेक्षा हँडवॉश स्वस्त ठरतो. लोकांमध्ये लिक्विड हँडवॉशने हात धुण्याची सवय बाणण्यासाठी, ही सर्व वैशिष्ट्ये अतिशय उपयोगी ठरतात.

धनगरांसह धनगरांची मेंढरंही उतरली आता रस्त्यावर …(व्हिडीओ)

0

तुळजापूर -येथे धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाण पत्र मिळावे तसेच चौंडी च्या निरापधारावरील गुन्हे मागे घेण्यात यावे आणि धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना मदत देऊन कुटुंबातील व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी याकरिता धनगर आरक्षण अंमलबजावणी समिती महाराष्ट्र राज्य च्या वतीने भाजप सरकार चले जाव अशी तुळजापूर ते चौंडी पदयात्रा काल काढण्यात आली.

 तुळजापूर मधील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पासून धनगरांच्या 1000  मेंढ्या कळपा सह मोर्चा निघाला .तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या परिसरात जाऊन तेथे भाजप सरकारच्या विरोधात जागरण गोंधळ घालून येळकोट येळकोट जय मल्हार, धनगराचे पोरग काय म्हणत आरक्षण देता की घरी जाता,तसेच भाजप सरकार चले जाव च्या घोषणा  देण्यात आल्या.

 धनगर आरक्षण अंमलबजावणी समितीचे मुख्य समन्वयक सुरेश कांबळे यांनी तुळजापूर चे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच समन्वयक सुरेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर ते चौंडी  हजारो धनगर समाज  आणि धनगराच्या मेंढ्यांच्या कळपा सह पदयात्रा काढण्यात आली .ही यात्रा 10 दिवस चालणार आहे 
अशी माहिती  धनगर आरक्षण अंमलबजावणी समितीचे  मुख्य समन्वयक सुरेश कांबळे यांनी यावेळी दिली .

‘ट्रकभर स्वप्नं’ २४ ऑगस्टला चित्रपटगृहात

0

मुंबईत आपल्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक जण त्यासाठी दिवसरात्र झटत असतात.  ‘एक घर हो सपनों का’ पण स्वप्न प्रत्यक्षात आणणे हे महाकठीण काम… खास करुन महानगरांमध्ये तर विचारुच नका. प्रत्येकाच्या मनात लपलेली ही इच्छा कधी पूर्ण होते तर कधी स्वप्नांच्या हिंदोळ्यावरून परतून जाते. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका मध्यमवर्गीय कुटुंबाने  केलेली धडपड दाखविणारा  ट्रकभर स्वप्नं हा  चित्रपट २४ ऑगस्टला आपल्या भेटीला येणार आहे. आयकॉनिक चंद्रकांत प्रॅाडक्शन्स प्रा. लि व आदित्य चित्र प्रा.लि यांची प्रस्तुती असलेल्या या  चित्रपटाचे दिग्दर्शन प्रमोद पवार यांचे आहे.

एका चौकोनी कुटुंबाची आणि त्यांच्या स्वप्नांची कथा दाखवताना हक्काच्या घरासाठी त्यांना करावी लागणारी धडपड, आलेल्या भल्या – बुऱ्या अनुभवांची आणि भेटलेल्या वेगवेगळ्या माणसांची कथा ट्रकभर स्वप्नं या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. सामान्यांच्या जगण्याचं प्रतिबिंब यात प्रत्येकाला पहायला मिळेल.

मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर यात महत्त्वपूर्ण भूमिकेत असून मकरंदने यांनी या सिनेमात टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे तर क्रांतीने मकरंदच्या पत्नीच्या भूमिकेत रंग भरले आहेत. या दोघांसोबत मुकेश ऋषी, मनोज जोशी स्मिता तांबे, आदिती पोहनकर, विजय कदम, आशा शेलार, वैभवी पवार, प्रेमा किरण, जनार्दन लवंगरे, साहिल गिलबिले, ज्योती जोशी, सतीश सलागरे, सुरेश भागवत, जयंत गाडेकर, दिपज्योती नाईक या कलाकारांच्या भूमिका यात आहेत

वेगवेगळ्या पठडीतली ४ गाणी ट्रकभर स्वप्नं या चित्रपटात असून श्रेयस यांच्या लेखणी व संगीतातून साकारलेल्या या गीतांना सोनू निगम, आनंदी जोशी, ममता शर्मा, आदर्श शिंदे, जावेद अली, अश्मी पाटील यांचा स्वरसाज लाभला आहे. ‘लुकलुकले स्वप्न’ हे प्रेमगीत, ‘सेल्फीवाली’ हे आयटम सॉंग, मुंबईच्या जीवनावर भाष्य करणारे ‘धडक धडक’ गाणं आणि ‘देवा तुझ्या’ हे भक्तीमय गीत यांचा सुरेख नजराणा या चित्रपटात आहे.

मीना चंद्रकांत देसाई, नयना देसाई या ‘ट्रकभर स्वप्नं’ चित्रपटाच्या  निर्मात्या आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रवीण तरडे यांनी लिहिले आहेत. छायांकन राजीव जैन यांनी केले असून संकलन प्रशांत खेडेकर यांचे आहे. कलादिग्दर्शन हेमंत भाटकर यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे. वेशभूषा पूर्णिमा ओक तर रंगभूषा सुहास गवते यांची आहे. ध्वनी विजय भोपे यांचे आहे. पोस्ट प्रोडक्शनची जबबदारी मिलिंद सकपाळ, केदार जोशी यांनी सांभाळली आहे. संजय खानविलकर या चित्रपटाचे निर्मीती सल्लागार आहेत. सुहास पांचाळ या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

‘पुष्पक फिल्म’ ट्रकभर स्वप्नं हा चित्रपट २४ ऑगस्ट ला सर्वत्र प्रदर्शित करणार आहे.

स्त्री स्वातंत्र्यासाठीचा महात्मा फुले यांचा लढा मोठा – उपमहापौर धेंडे

0
पुणे- महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्री स्वातंत्र्यासाठी तसेच त्यांच्या शिक्षणासाठी  दिलेला लढा मोठा आहे. त्यांच्या या लढ्यामुळे आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात सर्वाच्च पदावर विराजमान होऊ शकली, त्यांच्या प्रती कृतद्नता व्यक्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर डाॅक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी करून कुमार आहेर यांनी ही संविधान भूमी निर्माण केली तसेच ते मनापासून फुले यांचे एकपात्री करून समाजाचे खऱ्या अर्थाने प्रबोधन करतात या बद्दल अभिनंदन केले . धेंडे आणि अमेरिका स्थायिक उद्योजक चेतन सराफ यांच्या हस्ते कात्रज येथील प्रती महात्मा फुले वाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे उद्घाटन 72 व्या स्वातंत्रदिनी करण्यात आले  यावेळी तेथे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्यांचे अनावरण शिक्षिका बीना बुनगे व राजेश बुनगे या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले. सदर पुतळे माळी आवाज संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार लडकत यांनी प्रती फुलेवाड्यास भेट म्हणून दिले आहेत.
याप्रसंगी बोलताना चेतन सराफ यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख महात्मा फुले यांनी प्रथम आपल्या पोवाड्यामधून करुन दिली. आम्ही अमेरिकेत असलो तरी हा पोवाडा आजही वाचला की महाराजांच्या विविध पैलूंचे दर्शन आम्हाला घडते. त्यामुळे आज या सभागृहाचे उद्घाटन करताना महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांचेही अनावरण होत आहे हा एक चांगला योग आहे.
बीना बुनगे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, आज मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे ते केवळ महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कृपेमुळे.त्यांनी जर स्त्री शिक्षणासाठी लढा दिला नसता तर आज आम्ही महिला चूल आणि मूल यातच गुरफटून गेलो असतो. समताधिष्ठित समाजरचनेचे महात्मा फुलेंचे स्वप्न होते ते स्वप्न साकारण्यासाठी या प्रति फुलेवाड्यातून अनेक सामाजिक चळवळी निर्माण झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी विजयकुमार लडकत, संतोष शिंदे,विष्णू गरूड, माजी नगरसेवक हरिश्चंद्र दांगट, निर्मला वनशिव यांचीही भाषणे झाली.
प्रास्तविकात कुमार आहेर यांनी या वाड्याच्या निर्मिती मागची भूमिका  स्पष्ट करून फुलेंना अभिप्रेत असलेले समाज कार्य येथे करीत असतो असे म्हंटले.सूत्रसंचालन हनुमंत टिळेकर यांनी केले. रघुनाथ ढोक यांनी आभार मानले अॅड. तेजल आहेर यांनी स्वागत केले
या कार्यक्रमासाठी विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या प्रसंगी लघुपट, गौतमी आहेर दिग्दर्शित स्रियांवरील अत्याचार ही एकांकिका सादर करून अभिनेत्री स्वप्ना दुर्वे हिच्या अभिनयाने लोकांचे डोळे भरून आले पुढे नृत्य असे अनेक बहारदार कार्यक्रम झाले. परिसरातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौतमी आहेर गौरव आहेर, आकाश ढोक, आशा ढोक, रागिणी लडकत आदींनी विशेष परिश्रम घेतले.

‘लहजा’ या हिंदी पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

0

पुणे: नृत्यभारती कथक डान्स अकॅडमी, पुणेच्या वतीने, गुरू पं रोहिणी भाटे यांच्या ‘लहजा’ या हिंदी भाषेतील पुस्तकाचे येत्या रविवारी( ता.१९) प्रकाशन होणार आहे.शकुंतला शेट्टी सभागृह, कलमाडी हायस्कूल, कर्वे नगर येथे सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम पार पडेल.

नृत्यभारती कथक डान्स अकॅडमीची ७१ वर्षपूर्ती तसेच कथक सम्राज्ञी पं रोहिणी भाटे यांची  १० वी पुण्यतिथी असे दुहेरी औचित्य साधून या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मूळ मराठी पुस्तक ‘लहजा ‘ यातील गुरु रोहिणीताईंच्या शोधनिबंधाच्या हिंदी रूपांतराबरोबरच त्यांचे मूळ हिंदीतूनच लिहिलेले शोधनिबंध व कथक नृत्यासाठी लिहिलेले हिंदी कविता यांचा समावेश आहे. तसेच काही मान्यवरांचे गुरु रोहिणी  भाटे यांच्यावरील लेखही यात समाविष्ट करण्यात आले आहेत. भाषांतराचे  काम  स्मिता दाते, नीलिमा अध्ये, सुनीता पुरोहित यांनी केले आहे. दिल्ली येथील रझा फाऊंडेशन व राजकमल प्रकाशन यांच्याकडून रझा पुस्तक माला: कला या अंतर्गत हे पुस्तक प्रकाशित होत आहे. 

रझा फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक वाजपेयी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून प्रसिद्ध अभिनेते डॉ मोहन आगाशे यांच्या हस्ते  या पुस्तकाचे प्रकाशन होईल. यावेळी प्रसिद्ध नर्तक व लेखक पुरु दधीच आणि प्रसिद्ध नर्तक  जयंत कस्तुआर हे पुस्तकाची समीक्षा करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी  खुला असून पुस्तक सवलतीच्या  दरात उपलब्ध असेल. 

होंडा नाव्हीने पार केला एक लाख विक्रीचा टप्पा

0

यंदाच्या वर्षात निर्यातीच्या नव्या बाजारपेठांत प्रवेश करणार

 गुरुग्राम८ – होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने (एचएमएसआय) आज फन्टॅस्टिक नाव्हील्यूशनने एक लाख ग्राहकांना आनंदी केल्याचे जाहीर केले. ऑटो एक्स्पो २०१६ मध्ये मोठ्या धामधुमीत नाव्हीचे लाँच करून होंडाने दुचाकी क्षेत्रात खळबळ उडवून दिली. देशातील बहुचर्चित दुचाकी होंडा नाव्ही ही होंडा आर अँड डी भारताद्वारे तयार करण्यात आलेली पहिली शंभर टक्के भारतीय गाडी असून तिच्या संकल्पनेपासून व्यावसायिक उत्पादनापर्यंतचे सर्व काम भारतातच करण्यात आले आहे.

 केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात आनंदाचे क्षण निर्माण करणारी होंडा नाव्ही आता यंदाच्या वर्षात डोमिनिकन रिपब्लिक आणि कोस्टा रिका या दोन नव्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध होणार आहे. सध्या दहा देशांमध्ये नाव्हीची निर्यात केली जाते.

या विक्रमी कामगिरीबद्दल श्रीय यदविंदर सिंग गुलेरिया – वरिष्ठ उपाध्यक्ष, विक्री आणि विपणन, होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. म्हणाले, ट्रेंडी नाव्ही ही तरुणांसाठी अनोखे स्टाइल स्टेटमेंट तयार करणारी ट्रेंडसेटर गाडी आहे. हीचे अभिनव डिझाइन, एकंदर लूक्स आणि आपल्या आवडीप्रमाणे बदल करण्याची अमर्याद क्षमता यामुळे केवळ भारतातीलच नव्हे, तर संपू४ण जगभरातील दुचाकीप्रेमींना भुरळ घातली आहे. ते सर्व जण नाव्हीच्या फन राइडचा आनंद घेत आहेत आणि अभिनव ग्राहक पर्याय आजमावून पाहात आहेत.

आपल्या नेहमीच्या रुपात नाव्ही डिझाइन स्टेटमेंट आहेच, शिवाय तिचे कस्टमायझेशन पर्याय पाहाण्यासाठी, राइडचा आनंद घेण्यासाठी आणि निर्मिती करण्यासाठी आकर्षक आहेत. २०१८ च्या आवृत्तीमध्ये स्टायलिश फ्युएल गॉज, मेटल मफलर प्रोटेक्टर अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, ती अधिक सोयीस्कर आहेत. ही गाडी दोन नव्या रंगात – रेंजर ग्रीन आणि लडाख ब्राउनमध्ये उपलब्ध असून त्याला ग्रॅब रेल, हेडलाइट कव्हर, रिअर व्ह्यू मिरर्स, स्पोर्टी लाल रंगाचे कुशन्स अशा वैशिष्ट्यांची जोड देण्यात आली आहे. यामुळे गाडीचे लूक्स आणखी फनटॅस्टिक दिसतात.

 होंडा नाव्हीला १०९ सीसी इंजिन देण्यात आले आहे, जे सात हजार आरपीएमवर आठ पीएस देते आणि ट्यूबलेस टायर्ससह ५५०० आरपीएममध्ये ८.९६ एनएम टॉर्क देते. गाडीला पुढे वरून खालच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागच्या बाजूला हायड्रॉलिक मोनोशॉक बसवण्यात आले आहे. नाव्हीची किंमत ४४,७७५ रुपयांमध्ये (एक्स शोरूम दिल्ली) उपलब्ध करण्यात आली आहे.

स्टँडर्ड नाव्ही सहा रंगांत उपलब्ध करण्यात आली आहे – पॅट्रिअट रेड, शास्ता पांढरा, स्पार्की ऑरेंज, ब्लॅक, न्यूरेंजर ग्रीन, न्यू लडाख ब्राउन

लव्हलीना शहा यांच्या पुढाकाराने विद्यार्थीनींना स्वयं सुरक्षेचे प्रशिक्षण

0

पुणे: राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असल्याने कायदा, सुव्यवस्था, सामाजिक प्रबोधन यांवर ताशेरे ओढण्यापेक्षा महिलांना स्वतः चे संरक्षण स्वतः करता आले पाहिजे, या भावनेने लव्हलीना शहा गेली अनेक वर्ष महिलांना मोफत स्वयं सुरक्षेचे प्रशिक्षण देत आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून त्यांनी ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थीनींना स्वयं सुरक्षेचे प्रशिक्षण दिले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थीनींसाठी त्यांनी हा विधायक उपक्रम राबविला.

यात मार्शल आर्ट चॅम्पियन राजन वर्नेकर यांनी देखील त्यांना सहकार्य केले. हडपसर येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेतील १६ वर्षांपेक्षा कमी वयातील मुलींसाठी ही विनामूल्य स्वरूपात कार्यशाळा घेण्यात आली .सुमारे ६० विद्यार्थ्यांनींनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवून या कार्यशाळेचा लाभ घेतला.

या उपक्रमात सुरक्षितता जागरूकता, मानसिक स्वास्थ्य, शारीरिक तंदुरुस्ती, दैनिक जीवनातील सुरक्षाविषयी माहिती व उपयुक्त ठरणारी संरक्षण तंत्र यांसारख्या विषयांवर लव्हलीना शहा व राजन वर्नेकर यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.

 लव्हलीना शहा या स्वतः मार्शल आर्ट चॅम्पियन असून

सामाजिक कार्यातही त्यांनी कायमच पुढाकार घेतला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी काम करण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगले असून अशा महिलांना सुरक्षा विषयक व्यावसायिक प्रशिक्षणाबरोबरच, वैद्यकीय व दंत तपासणी, लसीकरण शिबीर आदी उपक्रम शहा यांनी विनामूल्य स्वरूपात राबविले आहेत. तर राजन वर्नेकर हे देखील मार्शल आर्ट चॅम्पियन असून बलात्कारासारखा प्रसंग ओढवल्यावर उपयुक्त ठरणारी प्रात्यक्षिकांचे धडे व कायद्याची माहिती विद्यार्थीनींना गेली अनेक वर्ष देत आहेत.

वयोश्री योजनेंतर्गत आयोजित दिव्यांग शिबीर आयोजनामध्ये सर्व विभागांनी ताळमेळ ठेवावा… निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख

0

पुणे,दि.16 :- राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील ज्येष्ठ दिव्यांग नागरिकांना विविध साहित्य व वस्तू पुरविण्यासाठी 24 ऑगस्ट रोजी बारामती येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराच्या आयोजन व यशस्वीतेसाठी सर्व संबधित विभागांनी ताळमेळ ठेवून कार्य करावे अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी केली आहे.

            जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत, या शिबीराच्या तयारीसंबधी केलेल्या कार्यवाहीचा आढावा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. या शिबीरामध्ये ज्येष्ठ संवर्गातील दिव्यांग नागरिक सहभागी होणार असल्यामुळे लाभार्थ्यांची अचूक यादी तयार करणे, साहित्य वितरणात सुसूत्रता ठेवणे, सर्व लाभार्थ्यांना साहित्य वितरीत करणे आदी बाबींचा आढावा घेण्यात आला. शिबीरात सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांना गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

            बैठकीला प्रांताधिकारी हेमंत निकम, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ..व्ही.मोहोळकर, पोलीस निरिक्षक व्ही.डी.डबाडेल व सर्व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

एमआयटीतर्फे संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञांच्या पूर्णाकृती ५४ पुतळ्यांची स्थापना

0
पुणे- “एमआयटीच्या वतीने लोणी काळभोर येथे साकार होत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटाच्या वास्तूमध्ये संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञांच्या पुतळ्यांची स्थापना करण्यात आली. त्यामुळे येथे विज्ञान, अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाचा संगम झाला आहे. या घुमटातून सर्व जगाला मानवतेचा व शांतीचा संदेश दिला जाणार आहे.” असे मत जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठ, पुणे व विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत यांच्यातर्फे ‘विश्‍वराजबाग’, लोणी काळभोर, पुणे येथे साकार होत असलेल्या, जगातील सर्वात मोठ्या व एकमेवाद्वितीय अशा घुमटाकार वास्तुमध्ये – तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर विश्‍वशांती प्रार्थना सभागृहात भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, संत, तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञांच्या भव्य व सुंदर अशा पुतळ्यांच्या स्थापनेचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
भारताचा विश्‍वशांतीचा व मानवतेचा संदेश देणार्‍या या विशाल सभागृहामध्ये मानवकल्याणाचे महत्कार्य करणार्‍या आणि मानवी इतिहासाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञांचे पूर्णाकृती पुतळे मान्यवरांच्या हस्ते बसविण्यात आले.
त्यापैकी संतश्री ज्ञानेश्‍वर महाराज, तत्त्वज्ञ संतश्री तुकाराम महाराज, बाबा बुल्लेेशाह, संत कबीर, प्लेटो, गॅलिलिओ, रामकृष्ण परमहंस, गुरू नानकदेव, भगवान महावीर, गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, सेंट पीटर, नरसी मेहता, संत तुलसीदास, आद्य शंकराचार्य, महर्षी वेदव्यास, मोझेस, अ‍ॅरिस्टॉटल, सॉके्रटिस, कांट, हेगेल, स्पिनोझा, आयझॅक न्यूटन, अल्बर्ट आइनस्टाईन, बेंजामिन फँ्रकलिन, लुई पाश्‍चर, चार्लस डार्विन, कोपर्निकस, हिप्पोक्रॅटस, मॅक्स प्लँक, गुरूदेव रवींद्रनाथ टागोर, सी.व्ही. रामन यांचे पूर्णाकृती पुतळे मान्यवरांच्या हस्ते स्थापन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ संगणकतज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीचे जनक सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप, ज्ञानोबा-तुकोबा पुरस्काराचे यंदाचे मानकरी ह.भ.प.किसन महाराज साखरे, भारताचे माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान, मौलाना अब्दुल कलाम उर्दू विद्यापीठाचे कुलपती डॉ. फिरोज बख्त अहमद, महान तपस्वी व साथक ह.भ.प. श्री. तुळशीराम दादाराव कराड, थोर मुस्लिम विचारवंत हजरत शेख बियाबानी, ज्येष्ठ पत्रकार डॉ. वेद प्रताप वैदिक, विचारवंत प्रा. रतनलाल सोनग्रा, श्रीलंकेचे बौद्ध साधक आनंद महाथेरोे, फादर डाबरे व डॉ.एडिसन सामराज यांच्या हस्ते पुतळ्यांची स्थापना करण्यात आली.
तसेच, थोर साधक श्रीकृष्ण उर्फ कर्वे गुरूजी, एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष  प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं.वसंतराव गाडगीळ, श्री.काशीराम दादाराव कराड, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय, एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.आय.के.भट व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण हे उपस्थित होते.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले,“जगात अनेक वास्तू उभारलेल्या आहेत. परंतू डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी उभारलेली ही वास्तू अनोखी आहे. यामध्ये विज्ञान आणि अध्यात्माची अनुभूती येते. विज्ञानमुळे बाह्य सुख तर अध्यात्मामुळे आंतरिक शांती मिळते. या दोन्हीचा मिलाफ येथे पहावयास मिळतो. हा घुमट केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण विश्‍वाला दिलेली अमूल्य देणगी आहे.”
डॉ. विजय भटकर म्हणाले,“स्वातंत्र्याच्या विशेष दिनी मानवतेचे मंदिर उभे राहिले. हे मानव कल्याणसाठी महत्वपूर्ण आहे. या सृष्टीवर आइनस्टाइन हे सर्वात थोर शास्त्रज्ञ होते. त्यांच्या सारख्या अन्य शास्त्रज्ञांचे पुतळे येथे उभे करून विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयाने विश्‍वशांतीचा संदेश दिला गेला आहे.”
प्रा. डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“२००५ साली या घुमटाची मुहूर्तमेढ रोवली गेली. १२वर्षांनी ही वास्तू पूर्णत्वास आली आहे. त्यावेळी आम्हाला वाटले नव्हते की, जगातील सर्वात मोठा घुमट निर्माण होईल. अगदी अलिकडच्या काळातच आम्ही याची सत्यता पडताळून पाहिली, तेव्हा लक्षात आले की, हा जगातील सर्वात मोठा घुमट आहे. या वास्तूमध्ये संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ यांच्या पुतळ्यांची स्थापना करण्यात आली. त्यांचा संदेश संपूर्ण मानव जातीच्या कल्याणसाठी होईल.”
डॉ. वेद प्रकाश वैदिक म्हणाले,“येथे उभारण्यात आलेला घुमट हे अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयाने निर्माण केलेले विश्‍वमंदिर आहे. त्यामुळे भविष्यात हे मानवतातीर्थ म्हणून जगात ओळखले जाईल. तसेच, विश्‍व यात्रा, पर्यटन आणि अध्यात्माचे केंद्र बनेल.”
आरिफ मोहम्मद खान म्हणाले,“येथील जगातील सर्वात मोठा घुमट हा तीर्थक्षेत्र म्हणून उदयास येईल. मानवजातीला समर्पित अशा या घुमटात अध्यात्म आणि विज्ञानाच्या महान अनुभूतीची प्रचीती मिळते.”
फिरोज बख्त अहमद म्हणाले,“देशासाठी समर्पित घुमटाच्या माध्यमातून मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केले जाईल. तसेच जगाला सुख व शांतीचा मार्ग दाखविला जाईल.”
त्यानंतर डॉ.एन.महाथेरो, डॉ. एडिसन सामराज, पं.वसंतराव गाडगीळ,                प्रा. रतनलाला सोनग्रा यांनी आपले विचार मांडले.
प्रा.राहुल विश्‍वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.गौतम बापट यांनी केले. प्रा.डॉ. मंगेश तु. कराड यांनी आभार मानले.