Home Blog Page 309

नारायण राणेंच्या काळात पुण्यातील फॉरेस्टचा 30 एकराचा भूखंड बिल्डरला देण्याचा निर्णय बेकायदा -सुप्रीम कोर्ट

राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि खासगी बिल्डर यांच्यातील साटेलोटे

मुंबई- भारताचे 52 वे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शपथ घेतल्यानंतर पहिलाच निकाल पुण्यातील भूखंड घोटाळ्यावर दिला . 1998 साली युती सरकार असताना नारायण राणे हे महसूल मंत्री होते. यावेळी त्यांनी पुण्यातील वन विभागाची 30 एकर जमीन एका बिल्डरला देण्याचा निर्णय घेतला होता. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी हा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे नारायण राणे यांना दणका बसला आहे.भारताचे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी दिलेला पहिला निकाल पुण्यातील वन विभागाच्या जमिनीशी संबंधित होता. कोंढवा भागातील शेकडो कोटी रुपये मूल्यमान असलेली 30 एकर जमीन एका बिल्डरला देण्याचा निर्णय हा राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि खासगी बिल्डर यांच्यातील साटेलोटे संबंधाचे ठळक उदाहरण असल्याचे त्यांनी या निकालात नमूद केले.

या जमिनीवर ‘रिची रिच’ नावाची गृहनिर्माण सोसायटी उभारण्यासाठी जमीन बिल्डरला देण्यात आली होती. यासाठी पुरातत्व खात्याच्या नोंदींमध्ये जाणीवपूर्वक बदल करण्यात आले होते. या सगळ्या प्रकाराचा पर्दाफाश झाल्यानंतर, सरन्यायाधीश गवई यांनी या व्यवहारातील सर्व निर्णय बेकायदेशीर ठरवत ती जमीन पुन्हा वन विभागाच्या ताब्यात देण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला.

पुण्याच्या कोंढवा भागातील 30 एकर जमीन ही मूळतः वन विभागाच्या मालकीची असतानाही, 1998 मध्ये त्या वेळचे महसूल मंत्री नारायण राणे यांनी ती चव्हाण नावाच्या व्यक्तीला देण्याचा निर्णय घेतला. चव्हाण यांनी ही जमीन स्वतःची शेतजमीन असल्याचा दावा केला होता. मात्र, जमीन मिळताच त्यांनी ती केवळ दोन कोटी रुपयांना ‘रिची रिच’ सहकारी गृहनिर्माण संस्थेला विकली.

या व्यवहारानंतर काही दिवसांतच, पुण्याचे विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी विजय माथनकर आणि उपवन संरक्षक अशोक खडसे यांनी ही जमीन ‘बिगर शेती’ म्हणून प्रमाणित केली. यामुळे त्या जमिनीवर बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा झाला.

‘रिची रिच’ सोसायटी या ठिकाणी 1,550 फ्लॅट्स, तीन क्लब हाउसेस, 30 रो हाउसेस आणि एक भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा प्रकल्प होता. हा प्रकल्प सिटी ग्रुपचे अनिरुद्ध देशपांडे, ऑक्सफर्ड प्रॉपर्टीज आणि रहेजा बिल्डर्स यांनी मिळून राबवायचा होता. मात्र, या निर्णयाविरोधात पुण्यातील ‘सजग चेतना मंच’ या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील वनजमीन खासगी बिल्डरला देणे पर्यावरणासाठी घातक असल्याचे नमूद करण्यात आले होते.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने मे 2002 मध्ये तपासासाठी ‘सेंट्रली एम्पॉवर्ड कमिटी’ स्थापन केली. समितीचे अध्यक्ष पी. व्ही. जयकृष्णन, सदस्य एम. के. जीवराजिका आणि ए. डी. एन. राव यांनी पुण्यात येऊन संबंधित जागेची पाहणी करून आपला अहवाल न्यायालयात सादर केला. या अहवालात नारायण राणे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची शिफारस करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ उपवन संरक्षक अशोक खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

या जागेसंबंधी न्यायालयीन लढाई सुरू असल्याने प्रत्यक्षात कोणतेही बांधकाम झाले नाही. दरम्यान, रिची रिच सोसायटीने ही जागा बिगर शेती असल्याचा दावा करत पुरावा म्हणून राज्याच्या पुरातत्व विभागाच्या मुंबईतील काळा घोडा कार्यालयातील काही दस्तऐवज डिसेंबर 2023 मध्ये न्यायालयात सादर केले. मात्र, वन विभागाने या पुराव्यांवर शंका उपस्थित केली आणि पुरातत्व विभागाला विचारणा केली.या चौकशीत असे आढळून आले की, संबंधित ब्रिटिशकालीन रेकॉर्डमध्ये फेरफार करण्यात आले होते. त्या दस्तऐवजाचे शेवटचे अर्ध पान कोरे ठेवून नंतर नव्याने मजकूर छापण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाला दिशाभूल करण्यासाठी हा बनाव रचल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा तपास जानेवारी 2024 मध्ये सीआयडीकडे सोपवण्यात आला. वन विभागाने या सर्व तथ्यांची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.अखेर, ‘वन विभाग विरुद्ध रिची रिच सोसायटी’ या खटल्यात भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी निकाल देताना, संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर ठरवत, वादग्रस्त 30 एकर जमीन पुन्हा वन विभागाच्या ताब्यात देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला.

ट्रम्प 84 कोटींचे बक्षीस असलेला दहशतवादी अल-शाराला भेटले:सीरियावरील निर्बंधही हटवले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर लादलेले सर्व निर्बंध रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प म्हणाले की, या निर्णयामुळे सीरियाला पुन्हा प्रगती करण्याची संधी मिळेल.या आदेशानंतर दुसऱ्या दिवशी, मंगळवारी, ट्रम्प यांनी सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे सीरियाचे राष्ट्रपती अहमद अल-शारा यांची भेट घेतली. एकेकाळी सर्वाधिक वाँटेड दहशतवादी असलेल्या अल-शारासोबत ट्रम्प यांची भेट जगभर चर्चेत आहे.

अहमद अल-शाराने २०११ मध्ये सीरियामध्ये अनेक आत्मघातकी हल्ले केले. अमेरिकेने त्याच्यावर १० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ८४ कोटी रुपये) बक्षीस ठेवले होते, जे पाच महिन्यांपूर्वी डिसेंबरमध्ये काढून टाकण्यात आले.अहमद अल-शारा पूर्वी अबू मोहम्मद अल-जुलानी म्हणून ओळखला जात असे. २००३ मध्ये जुलानीने वैद्यकीय शिक्षण सोडले आणि अल कायदाच्या नेत्यांच्या संपर्कात आला. २००६ मध्ये त्याला अमेरिकन सैन्याने अटक केली आणि तुरुंगात पाठवले. तुरुंगातून सुटल्यानंतर, अल-शाराने २०१२ मध्ये अल-कायदाची सीरियन शाखा, जबात अल-नुसरा, स्थापन केली.

२०१६ मध्ये, तो अल-कायदापासून वेगळा झाला आणि हयात तहरीर अल-शाम (HTS) ची स्थापना केली. डिसेंबर २०२४ मध्ये बशर अल-असदच्या पतनानंतर जुलानीने सत्ता हाती घेतली. यानंतर जगाला त्याचे खरे नाव कळले.

ट्रम्प म्हणाले- अल-शारा, परदेशी दहशतवाद्यांना देशातून हाकलून लावाट्रम्प यांनी त्यांच्या भेटीदरम्यान अल-शारा यांच्याशी सुमारे ३७ मिनिटे चर्चा केली. गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदाच एखाद्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने सीरियन राष्ट्रपतींची भेट घेतली. ट्रम्प यांनी अल-शारा बद्दल सांगितले की ते तरुण आणि आकर्षक आहेत.ट्रम्प म्हणाले की, त्यांनी शारा यांना इस्रायलशी संबंध सामान्य करण्यास आणि सीरियामधून परदेशी दहशतवाद्यांना हाकलून लावण्यास सांगितले. अल-शारा यांनेही ट्रम्प यांचे कौतुक केले आणि म्हटले की ते मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यास सक्षम आहेत.

अमेरिकन संसदेने २०१९ मध्ये सीरियावर कठोर निर्बंध लादण्यासाठी एक कायदा मंजूर केला. तथापि, या कायद्यात अशी तरतूद होती की राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हे निर्बंध काढून टाकू शकतात.या अधिकाराचा वापर करून, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सर्व बंदी उठवली आहेत.सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि तुर्कीचे अध्यक्ष तैय्यप एर्दोगान यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. दोन्ही देशांनी सीरियावरील निर्बंध उठवण्यास उघडपणे पाठिंबा दिला.

२०११ मध्ये गृहयुद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेने सीरियावर सर्वाधिक निर्बंध लादले. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या सरकारने निदर्शकांवर हिंसक कारवाई केली होती.यामध्ये हजारो नागरिकांचा बळी गेला. सरकारवर रासायनिक शस्त्रांचा वापर करून नागरिकांना मारल्याचा आरोप होता, ज्याचा जगभरात निषेध करण्यात आला.अमेरिकेने असद सरकारवर हिजबुल्लाहसारख्या संघटनांना पाठिंबा देण्याचा आरोप केला. याशिवाय, अमेरिकेने सीरियाच्या धोरणांना, विशेषतः इराण आणि रशियाशी असलेल्या त्याच्या युतीला पश्चिम आशियातील अस्थिरतेचे कारण मानले. अशा परिस्थितीत, अमेरिकन सरकारने असद सरकारला एकाकी पाडण्यासाठी अनेक निर्बंध लादले.

एमआयटी तर्फे प्रा.डॉ. ललितकुमार क्षीरसागर यांना भावपूर्ण श्रध्दांजली

पुणे, दि.१५ मे: माईर्स एमआयटीचे माजी प्राचार्य व प्रभावी व्यक्तिमत्वाचे प्रा.डॉ. ललितकुमार क्षीरसागर (६९) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांना माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.
भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. ललितकुमार क्षीरसागर हे पेट्रोलियम इंजीनियरिंगचे प्राध्यापक म्हणून ४२ वर्षापूर्वी एमआयटी संस्थेत रूजू झाले. तत्पूर्वी ते ओएनजीसी सारख्या प्रख्यात कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते. शिक्षकी पेशा असल्याने त्यांनी सतत एमआयटीच्या प्रगतीसाठी कार्य केले. एमआयटी मध्ये खाजगी शिक्षणक्षेत्रातील पहिल्या पेट्रोलियम डिपार्टमेंटची स्थापना त्यांनी केली. ओएनजीसी चेअरची स्थापना, संशोधन कार्याची पायाभरणी, जागतिक कीर्तीच्या सब.सी प्रयोगाची उभारणी, उद्योगभिमुखता, विद्यार्थी केंद्रित व उद्योगाभिमूख शिक्षणाचे प्रयोग असे त्यांच्या कार्याचे विविधांगी स्वरूप होते.
या प्रसंगी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “एमआयटीच्या विकासात डॉ.ललितकुमार क्षीरसागर यांनी मोलाचे योगदान दिले आहे. ते अतिशय निर्मळ व प्रांजळ व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पहावे लागेल. चेहर्‍यावर सदैव हास्य ठेवून ते आयुष्य जगले. त्यांच्या अचानक जाण्याने संस्थेची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”
या वेळी माइर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा.पी.बी.जोशी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, डॉ. प्रसाद खांडेकर, डॉ. संजय उपाध्ये, प्रा.डॉ. दत्ता दंडगे आणि अन्य शिक्षक वर्गाने आपली भावना व्यक्त केली.
या वेळी माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.

इच्छित स्थळी सहजतेने बदली झाल्याने अधिकारी झाले खूश!

0

पुणे, दि. 15 – पुन्हा एकदा इतिहास घडविताना या ऐतिहासिक क्षणाची मी साक्षीदार होतेयं याचा मला अतिशय आनंद होत आहे. अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवून भ्रष्टाचारमुक्त धोरण राबविणे यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या करण्याचा निर्णय मी घेतला. हा निर्णय भविष्यातही कायम राहील. गाव पातळीवर कष्ट करणाऱ्या सर्व सामान्य लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी महत्वाचा आहे. तुमच्या बदल्या मनासारख्या केल्या आहेत, आता चांगले आणि फ्रेश मनाने काम करा, अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
राज्याच्या सर्व भागात मनुष्यबळाचा समतोल साधला जावा आणि बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी व सहाय्यक आयुक्त या संवर्गातील बदल्या समुपदेशनाने करण्याचा ऐतिहासिक निर्णय पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी नुकताच घेतला होता. या बदल्यांची प्रक्रिया आजपासून आयुक्त पशुसंवर्धन यांच्या कार्यालयात श्रीमती. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सुरू झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. पशुसंवर्धन विभागाचे सचिव एन. रामा0स्वामी, आयुक्त प्रवीण कुमार देवरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतल मुकणे यावेळी उपस्थित होते.

श्रीमती मुंडे म्हणाल्या की, ग्रामविकास मंत्री असताना शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचा निर्णय मी घेतला होता, त्यावेळी त्याचा फायदा अनेक शिक्षकांना जे तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हते त्यांना झाला. आऊट ऑफ बॉक्स जाऊन निर्णय घेण्याची आवड असल्याने आताही पशुसंवर्धन विभागासाठी मी हा निर्णय घेतला. एकदा घेतलेला निर्णय बदलत नाही, त्यामुळे भविष्यातही हा निर्णय कायम राहणार आहे. माझे वडील लोकनेते मुंडे साहेब नेहमी म्हणायचे, ज्याची पत नाही, ऐपत नाही त्यांचा आवाज बनण्यासाठी मी राजकारणात आहे, अगदी तोच वारसा घेऊन मी काम करत आहे. माझ्यावर प्रेम करणारे असंख्य लोकं आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काम करता, त्यामुळे हा निर्णय घेतला. सर्व सामान्य लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला महत्वाचा वाटतो. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी आपल्या परिवारापासून दूर असणारे, आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना यामुळे हवी ती पोस्टींग मिळणार आहे. हव्या त्या ठिकाणी बदल्या झाल्याने तुमच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद समाधान देणारा आहे, असं श्रीमती मुंडे यावेळी म्हणाल्या.

लोकसेवक म्हणून पशुसेवा करण्याची उत्तम संधी- सचिव डॉ. रामास्वामी एन.
पशुवैद्यकीय शिक्षणानंतर शासन सेवेत पदार्पण करणाऱ्या पशुवैद्यकांना लोकसेवक म्हणून पशुसेवा करण्याची उत्तम संधी प्राप्त होत असते. पशुसंवर्धन विभागाचा आजवरचा गौरव टिकवून ठेवत या विभागाची प्रतिष्ठा आणखी उंचावण्याची सामुहिक जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय सेवांची उपलब्धता क्षेत्रीय स्तरावर सहजतेने करुन देणे आवश्यक आहे. या कामात समर्पित वृत्तीने सर्वांनी योगदान देत विभागाचा नावलौकीक वाढवावा, असे आवाहन सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी केले.

‘महापशुधन वार्ता’चे प्रकाशन
पशुसंवर्धन विभागाने पशुवैद्यकीय सेवा, धोरणात्मक निर्णय व योजनांच्या अंमलबजावणीबाबत जनजागृती करण्यासाठी महापशुधन वार्ता या शिर्षकांतर्गत डिजीटल ई-मासिक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘महापशुधन वार्ता’ या मासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

पशुपालकांना पशुसंवर्धनाच्या व्यवसायाची माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी व आधुनिक व्यवसाय व्यवस्थापन पद्धतीनुसार पशुपालकाच्या उत्पन्नात भर पडावी, या उद्देशाने विभागाने हे ई-मासिक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक पशुपालकाला हे मासिक एका क्लिकवर उपलब्ध व्हावे, यासाठी विभागामार्फत मासिकाच्या अंकाचा ‘क्यूआर कोड’ तयार करण्यात आला आहे. या क्यूआर कोडचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

हवी ती पोस्टींग मिळाली, अधिकारी खूश!
समुपदेशनाने बदल्यांची कार्यवाही आजपासून सुरू झाली असून उद्याही म्हणजे १६ मे रोजी ही कार्यवाही सुरू असणार आहे. आज आदिवासी व नक्षलग्रस्त अवघड क्षेत्रात असलेल्या ११८ आणि बिगर अवघड क्षेत्रात असलेल्या ४४४ अधिकाऱ्यांच्या बदल्या त्यांच्या मनाप्रमाणे करण्यात आल्या. ना. पंकजाताई मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मनाप्रमाणे आणि सहजतेने हवी ती पोस्टींग मिळाल्याने अधिकारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

खूप चांगला निर्णय – डॉ. आकाश ठाकरे
मी यवतमाळ जिल्ह्यातील आहे, माझी पहिली पोस्टींग २०२२ मध्ये त्र्यंबकेश्वर येथे झाली. आदिवासी क्षेत्रात तीन वर्ष सेवा दिली. आता समुपदेशनाने मला माझा जिल्हा मिळाला. मला खूप आनंद झाला. ना. पंकजाताईंनी घेतलेला निर्णय आमच्या सारख्या अधिकाऱ्यांचे मनोबल वाढविणारा आहे.

डॉ. प्रियंका स्वामीदास
मी सिरोंचा तालुक्यात कार्यरत होते. हा भाग तेलंगणा सीमेवर असल्याने इथे मराठीपेक्षा तेलगू बोलली जाते. मला तेलगू भाषा येते.खेड्यातील लोकांशी चांगला संवाद साधता येतो. लोकं म्हणाले तुमची बदली झाल्यावर आमचे कसे होईल? आता समुपदेशनाने मी इथेच राहिले. हवे असलेले ठिकाणी मिळाल्याने मी खूश आहे. खरचं हा निर्णय ऐतिहासिक आहे. मंत्री महोदय श्रीमती पंकजाताईंचे खूप खूप आभार!

कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची कार्यशाळा संपन्न; आर्थिक बचतीचे मार्गदर्शन

पुणे, दि. १५: कोविड काळात आई-वडील असे दोन्ही पालक गमावलेल्या ‘पीएम केअर्स’ योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक बचतीच्या अनुषंगाने व शैक्षणिक आणि भविष्यातील संधीबाबत समुपदेशन व मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली.

जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयामार्फत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी मनीषा बिरारीस, तसेच बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शक सुमित्रा आष्टीकर यांच्यासह ‘पीएम केअर्स’ योजनेतील लाभार्थी मुले व त्यांचे सध्याचे पालक उपस्थित होते.

यावेळी श्रीमती बिरारीस यावेळी म्हणाल्या, कोरोना काळात दोन्ही पालक गमावल्यामुळे बालकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. ते कोणत्याही प्रकारे भरून काढता येण्यासारखे नसले तरी ‘पीएम- केअर्स’ या निधीतून १० लाख रुपयांची तसेच राज्य शासनाने ५ लाख रुपयांची ठेव या बालकांच्या खात्यावर ठेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यातून दरमहा येणारे व्याज तसेच अन्य योजनांच्या अर्थसहाय्यातून बालकांनी आपले शिक्षण जिद्दीने पूर्ण करावे. महिला व बालकल्याण विभाग कायम आपल्यासोबत आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी बालकांना दिला.

श्रीमती आष्टीकर यांनी या बालकांना आर्थिक बचतीचे महत्त्व सांगितले. उज्ज्वल भविष्यासाठी पैशांची बचत करतानाच शिक्षण चांगल्या प्रकारे पूर्ण करावे. दहावी व बारावीनंतर पुढील शिक्षणाच्या अनेक संधी असून व्यावसायिक शिक्षण तसेच कौशल्य विकासाचे अभ्यासक्रमही उपलब्ध असून त्यानुसार रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून मार्गदर्शन व मदत होईल, असेही त्या म्हणाल्या.

या प्रत्येक बालकाला ‘पीएम केअर्स’ योजनेतून १० लाख रुपये त्यांच्या खात्यावर ठेव म्हणून ठेवण्यात आले असून वयाच्या २३ व्या वर्षी ते त्यांना काढता येणार आहेत. तसेच याची दरमहा ५ हजार ५०० इतकी व्याजाची रक्कम त्यांना देण्यात येत आहे. याशिवाय राज्य शासनाने स्वत:च्या योजनेतून ५ लाख रुपयांची ठेव त्यांच्या खात्यावर ठेवली आहे. त्यावरील व्याज दरमहा देण्यात येत आहे. महिला व बालविकास विभागामार्फत याचे संनियंत्रण होत आहे.

या बालकांचे आयुष्मान भारत कार्ड काढण्यात आले असून त्यातून त्यांना प्रतिवर्षी 5 लाख रुपयांचे कॅशलेस उपचार मिळणार आहेत. सामाजिक न्याय विभागाकडून दरवर्षी ४० हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत असून व्यावसायिक शिक्षणासाठीही शिष्यवृत्ती आदी लाभ देण्यात येतो.

जिल्ह्यात कोविड काळात दोन्ही पालक गमावलेली १८ वर्षाखालील ११० मुले असून त्यापैकी ९० मुले या कार्यशाळेला उपस्थित होती.

कोयनाधरण प्रकल्पग्रस्तांनी राज्यासाठी केलेला त्याग मोठात्यांना पर्यायी जमीनवाटप व पुनर्वसन हे शासनाचे कर्तव्य-उपमुख्यमंत्री अजित पवार

कोयनाधरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन आणि जमीनवाटपाच्या
प्रस्तावांबाबत विभागीय आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करावी
-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. 15 :- कोयनाधरण प्रकल्पग्रस्तांनी राज्यासाठी केलेला त्याग मोठा आहे. त्यांना पर्यायी जमिन देणं शासनाचं कर्तव्य असून, या धरणग्रस्तांना पर्यायी जमिन देण्यासंदर्भात आलेले प्रस्ताव पुणे, सातारा, सांगली, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ तपासून महिनाअखेपर्यंत पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठवावेत. विभागीय आयुक्तांनी अर्जांची पडताळणी करावी. जूनच्या पहिल्या पंधऱवड्यात धरणग्रस्तांच्या संघटनांसोबत बैठक घेऊन पात्र धरणग्रस्तांना जमीन वाटपाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

कोयना धरणग्रस्तांचे संपूर्ण पुनर्वसन आणि पर्यायी जमिन वाटपाचा प्रश्न प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असून तो सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने प्रयत्नशील आहेत. यापूर्वीही अनेकदा बैठका घेऊन त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी दूर केल्या आहेत. आजमितीस सातारा जिल्ह्यात 310 आणि सांगली जिल्ह्यात 215 पात्र प्रकल्पग्रस्तांची यादी तयार असून त्यांना जमिनवाटपाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. उर्वरीत जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यांच्याकडील प्रस्तावांची तपासणी करुन आपापल्या जिल्ह्यांचे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठवावेत. विभागीय आयुक्त त्यांच्या स्तरावर निर्णय घेतील, जे प्रश्न शासनस्तरावर सोडवायचे असतील, ते शासनाकडे पाठवावेत. त्याबाबत तातडीने निर्णय घेतला जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीला, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, वित्त विभागाचे प्रभारी अपर मुख्य सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, कोकणचे विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशी, धरणग्रस्तांचे नेते तथा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, कोयना धरणग्रस्त-अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेचे संघटक चैतन्य दळवी आदींसह प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्हीसीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीतशेतकरी हितरक्षण, व्यापाऱ्यांकडून करवसुली, सुरक्षेवर चर्चा

मुंबई, दि. 15 :- राष्ट्रीय नामांकित बाजार अनुषंगाने राज्यस्तरीय बाजारांचा विकास करताना राज्यातल्या शेतकऱ्यांचं हित जपलं गेलं पाहिजे. बाजार समिती सदस्यांच्या अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे. बाजार समिती सदस्य जनप्रतिनिधींमधून निवडून येतात. शेतकऱ्यांचे, समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधीत्व करतात. या सदस्यांचे अधिकार कायम ठेवण्यातच शेतकरी व समाजाचे हित आहे. यातूनच बाजार समित्या अधिक कार्यक्षम, बळकट होतील. बाजार समित्यांसदर्भातील निर्णय घेत असताना शेतकऱ्यांते हित सर्वोच्च असावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यासंदर्भातील विविध प्रश्नांवर आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात, राष्ट्रीय बाजार अनुषंगाने राज्यस्तरीय बाजार विकसित करणे, कृषी उत्पन्न बाजार समिती करसुधारणा करणे, कृषी उत्पन्न बाजार समित्यांची देखभाल दुरुस्ती, वस्तू व सेवाकराबाबत अडचणी, छोटे उद्योग व व्यापाऱ्यांच्या व्यवसाय कराबाबतच्या समस्या, कळंबोली येथे स्टीलमार्केटसाठी सिडकोच्या माध्यमातून जमीन उपलब्ध करुन देणे आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, पणनमंत्री जयकुमार रावल, वित्त विभागाचे प्रभारी अपर मुख्य सचिव सौरभ विजय, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, राज्य कर आयुक्त आशिष शर्मा, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल (व्हिसीद्वारे), उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, महाऊर्जाच्या महासंचालक डॉ. कादंबरी बलकवडे, पणन संचालक विकास रसाळ, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष जितेंद्र शहा, ‘एमएएसएसएमए’चे अध्यक्ष चंदन भन्साली, नवीमुंबई एपीएमसीचे संचालक सुधीर कोठारी (व्हीसीद्वारे) आदी मान्यवरांसह संबधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला सुरक्षित बाजारपेठ उपलब्ध करत शेतकऱ्यांचे हित जपण्याचं, त्यांच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावण्याचं काम बाजार समित्यांनी सातत्याने केलं आहे. शेतकऱ्यांच्या हितांचं रक्षण राज्यासाठी सर्वोच्च आहे. केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या नवीन 2017 च्या कायद्यातील तरतूदींनुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) या 1963 च्या कायद्यात सुधारणा करुन राष्ट्रीय नामांकित बाजार समिती स्थापन करणे, अस्तित्वात असलेल्या बाजार समितीचे रुपांतर राष्ट्रीय नामांकित बाजार समितीमध्ये करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. त्यानुसार राष्ट्रीय बाजार समिती स्थापन झाल्यानंतर शासनाकडून त्यासमितीवर नामनिर्देशित व्यक्तींची नियुक्ती होणार आहे. राष्ट्रीय बाजारांच्या अनुषंगाने राज्यस्तरीय बाजारांचा विकास करण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुनच यासंदर्भातील निर्णय घ्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

व्यापारी वर्गाकडूनही बैठकीत अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. जीएसटी आकारणीत सुसुत्रता, व्यापाऱ्यांना अकारण होणारा त्रास थांबवण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. करचुकवेगिरी रोखण्यासाठी जीएसटी वसुली पद्धतीत सुधारणांसंदर्भात व्यापारी संघटनांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल. जीएसटी कौन्सिलच्या आगामी बैठकीत व्यापाऱ्यांच्या मागण्या उपस्थित करुन त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. उद्योग, व्यापार क्षेत्रातील गुंडटोळ्यांचा बंदोबस्त करुन सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिल्या.

आंबेडकर जयंती, बुद्ध पौर्णिमा उत्साहात

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून वीर वरदान चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. रक्तदान शिबीर, धम्मवंदना, भीमगीते, शैक्षणिक साहित्याचे वाटप व महार बटालियनचा सत्कार समारंभ घेण्यात आला. स्नेहभोजनाने कार्यक्रमांची सांगता झाली.

वीर वरदान चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अविनाश मोरे यांच्या पुढाकारातून हे कार्यक्रम आयोजिले होते. पुणे सीरोलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँकच्या सहकार्याने घेतलेल्या रक्तदान शिबिरात ६० बाटल्यांचे संकलन करण्यात आले. महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांच्या हस्ते बुद्धवंदना, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आंबेडकरी नेते यशवंत नडगम, युवा नेते रविंद्र जांभूळकर, मिलिंद आहिरे, सुनिल घेने, विशाल पवार, अविनाश जगताप, संगीता बोराडे, बळीराम संगेकर, प्रदिप पाटोळे, रूपेश पाईकराव, प्रशांत होनमाने, धनराज घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशांत जगताप, यशवंत नडगम यांनी मनोगत व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले.

अविनाश मोरे म्हणाले, “कार्यक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे. आंबेडकर जयंती, बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने तसेच स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, शालेय साहित्याचे व रोपांचे वाटप केले जाते. भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अधिक व्यापक पद्धतीने पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे.”

या देशात सर्व पैसे ,कायदे ८ ते १० टक्के लोकांच्या हातात, ९० टक्के मजूरच

राहुल विना परवानगी हॉस्टेलमध्ये पोहोचले, 12 मिनिटांत भाषण संपले:बिहार पोलिसांनी 3 किमी आधी ताफा थांबवला; राहुल म्हणाले- हा दलितांवर सरकारी अत्याचार

दरभंगा-राहुल गांधी येथे म्हणाले,”या देशात ९० टक्के लोकसंख्येसाठी बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही.’ वरिष्ठ नोकरशाहीत तुमचे लोक शून्य आहेत, डॉक्टरांमध्ये तुमचे किती लोक आहेत… शून्य आहेत, शिक्षण व्यवस्थेत तुमचे किती लोक आहेत, शून्य. तुम्ही वैद्यकीय व्यवस्थेत तुमचे किती लोक आहेत, शून्य.’जर तुम्ही मनरेगाची यादी पाहिली तर सर्व लोक तुमचे आहेत.’ जर तुम्ही मजुरांची यादी काढली तर ती तुमच्या लोकांनी भरलेली असेल. सर्व पैसे आणि करार ८-१० टक्के लोकांच्या हातात जातात.

जिल्हा प्रशासनाकडून परवानगी न मिळाल्यानंतरही, राहुल गांधी गुरुवारी दरभंगा येथील आंबेडकर वसतिगृहात पोहोचले. जरी ते विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकले नाही, तरी त्यांनी व्यासपीठावरून त्यांना संबोधित केले.एनएसयूआयच्या शिक्षा न्याय संवाद कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या राहुल यांचे भाषण अवघ्या 12 मिनिटांत संपले. यावेळी त्यांनी आंबेडकरांचा फोटोही दाखवला. राहुल १५ मिनिटे कार्यक्रमस्थळी थांबले. आता ते दरभंगाहून पाटण्याला रवाना झाले आहेत.

राहुल म्हणाले- तुम्हाला बोलू दिले जात नाही, २४ तास अत्याचार होत असतात. पेपर लीक होत आहे. तुम्हाला बोलू दिले जात नाहीये. जातीय जनगणना योग्य पद्धतीने झाली पाहिजे.तुम्हाला असंबद्ध गोष्टी सांगून तुमचे लक्ष दुसरीकडे वळवले जाते.’ पण तुम्हाला एकत्र उभे राहावे लागेल. बिहार पोलिसांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते मला थांबवू शकले नाहीत कारण तुम्हा सर्वांची शक्ती माझ्या मागे आहे. म्हणूनच जगातील कोणतीही शक्ती आपल्याला रोखू शकणार नाही.

‘लोकसभेत आम्ही पंतप्रधान मोदींना सांगितले की तुम्हाला जातीय जनगणना करावी लागेल. संविधान कपाळावर लावावे लागेल. तुमच्या दबावामुळे पंतप्रधानांनी जातीय जनगणना करण्याची घोषणा केली. पण ते लोकशाही, संविधान आणि जातीय जनगणनेच्या विरोधात आहेत. हे अदानी-अंबानींचे सरकार आहे.राहुल गांधी दरभंगा येथे पोहोचण्यापूर्वीच पोलिस प्रशासन आणि कामगार आमनेसामने आले. राहुल यांना दलित-अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांशी बोलायचे होते, परंतु प्रशासनाने त्यांना वसतिगृहात तसे करण्याची परवानगी दिली नाही.त्यांना दरभंगाच्या टाऊन हॉलमध्ये भाषण देण्याची परवानगी देण्यात आली होती, परंतु टाऊन हॉलमध्ये जाण्याऐवजी राहुल पायीच वसतिगृहात गेले. ५ मिनिटांच्या भाषणानंतर बैठक संपली.

याआधी, दरभंगा येथील ललित नारायण मिथिला विद्यापीठाच्या कॅम्पसच्या तीन किलोमीटर आधी राहुल यांचा ताफा थांबवण्यात आला.बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम म्हणाले होते की, “आम्ही कोणत्याही परिस्थितीत आंबेडकर वसतिगृहात जाऊ.”येथे, एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी म्हणाले, ‘एनडीए सरकार दलितविरोधी आहे. सरकारच्या दबावामुळे हा कार्यक्रम होऊ दिला जात नाहीये.शैक्षणिक न्याय संवाद कार्यक्रम म्हणजे काय?

काँग्रेसच्या मते, ‘शिक्षा न्याय संवाद’ ही काँग्रेसची नवीन जनसंपर्क मोहीम आहे. बिहारमधील शिक्षण व्यवस्थेची वाईट स्थिती अधोरेखित करणे हा त्याचा उद्देश आहे. शिक्षण संवादात मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे, काँग्रेस एक न्यायपत्र (न्यायाचे पत्र) तयार करेल आणि ते बिहार निवडणुकीच्या जाहीरनाम्याचा एक भाग असेल.काँग्रेस पहिल्यांदाच ‘शिक्षा न्याय संवाद’ घेत आहे. काँग्रेसने यापूर्वी कधीही असा कार्यक्रम आयोजित केलेला नव्हता. हा संवाद कार्यक्रम बिहारमध्ये दीड महिना चालेल. जिथे मान्यता मिळाली आहे, तिथे ती शैक्षणिक संस्थांमध्ये केली जाईल आणि जिथे मान्यता मिळाली नाही, तिथे ती कॅम्पसच्या गेटवर केली जाईल.गुरुवारी ७० ठिकाणी ‘शिक्षा न्याय संवाद’ कार्यक्रम आयोजित केला जाईल. यामध्ये ३५ जागा टाऊन हॉल म्हणजेच नगर भवनमध्ये असतील आणि ३५ जागा वसतिगृहांमध्ये असतील, यामध्ये एससी-एसटी वसतिगृहे आणि अल्पसंख्याक वसतिगृहांचा समावेश आहे.काँग्रेसचे खासदार, आमदार, माजी मुख्यमंत्री, विद्यमान मंत्री येत आहेत. त्यात सुप्रिया श्रीनेट, अशोक गेहलोत, कन्हैया कुमार, दीपेंद्र सिंग हुडा, मालविका मोहन, देवेंद्र यादव, रागिणी नायक यांचा समावेश असेल.या कार्यक्रमानंतर, राहुल गांधी पटना येथील सिटी सेंटर मॉलमध्ये काँग्रेस नेत्यांसोबत फुले हा चित्रपट पाहतील.

ॲ​​​​​​​पलची उत्पादने भारतात बनवू नका, अमेरिकेत उत्पादन वाढवा, भारत स्वतःची काळजी घेईल-ट्रम्प यांचा कंपनीचे CEO टिम कुक यांना सल्ला

अमेरिकेच्या बाजारपेठेत विकले जाणारे ५०% आयफोन भारतात बनवले जातात,२०२६ पर्यंत, देशात दरवर्षी ६ कोटी+ आयफोन तयार होतील,आर्थिक वर्ष २०२४ मध्ये आयफोनची विक्री ८ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल

नवी दिल्ली-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टिम कुक यांना सांगितले आहे की, भारतात कारखाने उभारण्याची गरज नाही. आम्हाला तुमच्या भारतात होणाऱ्या उत्पादनात रस नाही, भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो.गुरुवारी कतारची राजधानी दोहा येथे व्यावसायिक नेत्यांसोबत झालेल्या कार्यक्रमात ट्रम्प यांनी अ‍ॅपलच्या सीईओंसोबत झालेल्या संभाषणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ॲपल आता अमेरिकेत उत्पादन वाढवेल. ट्रम्प यांच्या मते, ॲपलने फक्त भारतीय बाजारपेठेला लक्ष्य करण्यासाठी भारतात कारखाना बांधावा.त्याच वेळी, ट्रम्प यांनी कार्यक्रमात असेही म्हटले की भारताने आम्हाला व्यापारात शून्य शुल्क कराराची ऑफर दिली आहे. ते म्हणाले की, भारत आमच्याकडून व्यापारात कोणतेही शुल्क आकारण्यास तयार नाही.

अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी अलिकडच्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, अमेरिकेच्या बाजारपेठेत विकले जाणारे ५०% आयफोन भारतात तयार केले जात आहेत. एप्रिल-जून तिमाहीत अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोनसाठी भारत हा मूळ देश बनेल, असे कुक म्हणाले. त्यांनी सांगितले की एअरपॉड्स, अ‍ॅपल वॉच सारखी इतर उत्पादने देखील बहुतेक व्हिएतनाममध्ये तयार केली जात आहेत.चीनच्या तुलनेत कमी दरांमुळे कंपनी भारत आणि व्हिएतनामला प्राधान्य देत आहे. चीनमधील उच्च आयात शुल्काच्या तुलनेत भारत आणि व्हिएतनाममधून आयातीवर फक्त १०% कर आहे.

फायनान्शियल टाईम्सच्या वृत्तानुसार, अॅपल चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी त्याची पुरवठा साखळी चीनबाहेर हलवण्यावर बऱ्याच काळापासून काम करत आहे.जर अॅपलने या वर्षाच्या अखेरीस त्यांची असेंब्ली भारतात हलवली तर २०२६ पासून दरवर्षी येथे ६ कोटींहून अधिक आयफोन तयार होतील. हे सध्याच्या क्षमतेच्या दुप्पट आहे.

आयफोनच्या उत्पादनात सध्या चीनचे वर्चस्व आहे. आयडीसीच्या मते, २०२४ मध्ये कंपनीच्या जागतिक आयफोन शिपमेंटमध्ये याचा वाटा अंदाजे २८% असेल असा अंदाज होता. अमेरिकेच्या बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या आयफोनचे उत्पादन चीनबाहेर हलवल्याने कंपनीला उच्च शुल्क टाळण्यास मदत होईल.

मार्च २०२४ ते मार्च २०२५ या १२ महिन्यांत, ॲपलने भारतात २२ अब्ज डॉलर्स (सुमारे ₹१.८८ लाख कोटी) किमतीचे आयफोन तयार केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ६०% वाढ झाली आहे.

या काळात, ॲपलने भारतातून १७.४ अब्ज डॉलर्स (सुमारे ₹१.४९ लाख कोटी) किमतीचे आयफोन निर्यात केले. त्याच वेळी, जगातील प्रत्येक ५ आयफोनपैकी एक आता भारतात तयार केला जात आहे. भारतात, तामिळनाडू आणि कर्नाटकमधील कारखान्यांमध्ये आयफोन तयार केले जातात.

फॉक्सकॉन त्याचे सर्वाधिक उत्पादन करते. फॉक्सकॉन हा अॅपलचा सर्वात मोठा उत्पादन भागीदार आहे. याशिवाय, टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि पेगाट्रॉन देखील उत्पादन करतात.

२०२४ च्या आर्थिक वर्षात अॅपलची स्मार्टफोन विक्री ८ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली. तर त्याचा बाजारातील वाटा फक्त ८% होता. भारतातील उदयोन्मुख मध्यमवर्गीयांमध्ये आयफोन अजूनही एक लक्झरी वस्तू आहे. त्यामुळे येथील बाजारपेठ वाढण्याची अपेक्षा आहे.

अॅपल भारतावर इतके लक्ष का केंद्रित करते?

पुरवठा साखळी विविधीकरण: ॲपलला चीनवरील अवलंबित्व कमी करायचे आहे. भू-राजकीय तणाव, व्यापार वाद आणि कोविड-१९ लॉकडाऊन यासारख्या समस्यांमुळे, कंपनीला असे वाटले की एकाच क्षेत्रावर जास्त अवलंबून राहणे योग्य नाही. या बाबतीत, भारत अॅपलसाठी कमी जोखीम असलेला पर्याय असल्याचे सिद्ध होत आहे.
खर्चाचा फायदा: भारत चीनपेक्षा कमी किमतीत कामगार पुरवतो, ज्यामुळे तो आर्थिकदृष्ट्या अधिक आकर्षक बनतो. याव्यतिरिक्त, स्थानिक पातळीवर उत्पादन केल्याने कंपनीला इलेक्ट्रॉनिक्सवरील उच्च आयात खर्च टाळण्यास मदत होते.
सरकारी प्रोत्साहने: भारताच्या मेक इन इंडिया उपक्रम आणि उत्पादन संलग्न उपक्रम (पीएलआय) योजना स्थानिक उत्पादन वाढवण्यासाठी कंपन्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करतात. या धोरणांमुळे फॉक्सकॉन आणि टाटा सारख्या अॅपलच्या भागीदारांना भारतात अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.
वाढत्या बाजारपेठेची क्षमता: भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या स्मार्टफोन बाजारपेठांपैकी एक आहे. स्थानिक उत्पादनामुळे अॅपलला ही मागणी चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यास मदत होते, तसेच त्याचा बाजारातील वाटा वाढतो, जो सध्या सुमारे ६-७% आहे.
निर्यात संधी: अॅपल भारतात बनवलेल्या त्यांच्या ७०% आयफोनची निर्यात करते, ज्यामुळे चीनच्या तुलनेत भारतातील कमी आयात शुल्काचा फायदा होतो. २०२४ मध्ये भारतातून आयफोन निर्यात १२.८ अब्ज डॉलर्स (सुमारे ₹१,०९,६५५ कोटी) पर्यंत पोहोचली. येणाऱ्या काळात त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
कुशल कामगार आणि पायाभूत सुविधा: अनुभवाच्या बाबतीत भारताचे कामगार दल चीनपेक्षा मागे आहे, परंतु त्यात लक्षणीय सुधारणा होत आहे. फॉक्सकॉनसारखे अॅपलचे भागीदार उत्पादन गरजा पूर्ण करण्यासाठी कामगारांना प्रशिक्षण देत आहेत आणि कर्नाटकातील $२.७ अब्ज (₹२३,१३९ कोटी) प्लांटसारख्या सुविधांचा विस्तार करत आहेत.

तुळजाभवानी मंदिराच्या मद्यधुंद‎ पुजाऱ्याची कार्यालयात तोडफोड‎, गैरवर्तनप्रकरणी 3 महिने मंदिरात प्रवेशाला बंदी‎

तुळजापूर‎-तुळजाभवानी मंदिर कार्यालयात मद्यधुंद‎अवस्थेत सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ करत‎पुजाऱ्याने तोडफोड केली. हा धक्कादायक‎प्रकार १३ मे रोजी घडला. मंदिरात गैरवर्तन‎‎केल्याप्रकरणी देऊळ‎‎कवायत कायद्यानुसार‎‎संबंधित पुजाऱ्याला ३‎‎महिने मंदिर ‎‎प्रवेशबंदीची नोटीस ‎‎बजावली आहे. अनुप ‎‎कदम असे तोडफोड‎‎ करणाऱ्या पुजाऱ्याचे‎ नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा‎दाखल करण्यात आला आहे.‎

पुजारी अनुप कदम याने १३ मे रोजी‎मंदिरातील व्हीआयपी गेटवर सुरक्षा‎रक्षकांसोबत धक्काबुक्की व शिवीगाळ ‎केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देत ‎‎जबरदस्तीने मंदिरात प्रवेश केला होता.‎तसेच संस्थानच्या कार्यालयातील‎ सीसीटीव्ही कंट्रोल रूमच्या दरवाजाला ‎लाथ मारली. त्यामुळे दरवाजाची काच ‎‎फुटली. त्यामुळे पुजारी कदम याला १३ मे‎ रोजी ३ महिने मंदिर बंदची नोटीस‎ बजावण्यात आली आहे. मंदिरातील ‎‎तोडफोडप्रकरणी पुजारी कदम विरोधात ‎कलम २२१, ३५२, ३२४(४) नुसार गुन्हा ‎‎दाखल झाला आहे. पुढील तपास‎ तुळजापूर पोलिस करत आहेत.‎

यापूर्वी १५ एप्रिलला जिल्हाधिकारी तथा ‎तुळजाभवानी संस्थान अध्यक्षांच्या ‎दालनात कार्यालयीन कामकाज सुरू होते.‎त्याच वेळी पुजारी कदम याने अपर‎जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे मुख्य‎कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापक,‎तहसीलदारांशी हुज्जत घातली होती.‎या प्रकरणात सुरक्षा रक्षक पुरवठादार कंपनीचा‎अहवाल प्राप्त झाल्यानंतर संस्थानने सीसीटीव्ही‎फुटेजची पडताळणी केली, तसेच घटनाक्रमाची‎खात्री केली. त्यानंतर १३ मे रोजी पुजारी कदमला‎‘अशोभनीय वर्तन केल्याने देऊळ कवायत‎ कायदा कलम २४ व २५ नुसार ३ महिन्यांची मंदिर ‎प्रवेशबंदी का करण्यात येऊ नये ?’ अशी नोटीस ‎पुजारी कदमला बजावली होती.‎

शरद पवार यांचा पक्ष मूळ पक्ष आहे. ते अजित पवार यांच्या गटात कशासाठी जातील?-खासदार संजय राऊत

0

अजित पवार हे शरद पवार यांच्या पक्षाला त्यांच्या गटामध्ये घ्यायला तयार नाहीत

आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी धोका निर्माण केला-काँग्रेसने खुलासा न मागता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागायला हवा, अशा शब्दात संजय राऊत यांनी काँग्रेसलाही सुनावले आहे. एक प्रधानमंत्री देशाशी खोटे बोलत आहे आणि आपल्या सैनिकांचे पाय खेचून त्यांना मागे घ्यायचे काम करत आहे. आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी धोका निर्माण केला आहे. ते आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोट्या खेळत आहेत का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

मुंबई- अजित पवार हे शरद पवार यांच्या पक्षाला त्यांच्या गटामध्ये घ्यायला तयार नाहीत. अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर खोचक टोला लगावला आहे. या संबंधी ते म्हणाले की, शरद पवार यांचा पक्ष मूळ पक्ष आहे. ते अजित पवार यांच्या गटात कशासाठी जातील? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. मोदी – शहा गेल्यानंतर यांच्याकडे काहीही राहत नाही. त्यामुळे हे दिवस निघून जातील, असा सल्ला देखील त्यांनी शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांना दिला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लवकरच देशाच्या राजकारणातून बाजूला होतील, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. त्यांना देशातील राजकारणातून जावे लागेल. फक्त माझे पुस्तक येण्याची वाट पहा. त्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजेल, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. माझे पुस्तक आल्यानंतर अमित शहा यांच्या अध:त्पतनाला सुरुवात होणार असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपच्या वतीने काढण्यात येणाऱ्या तिरंगा यात्रेवरही त्यांनी निशाणा साधला. तिरंगा यात्रा काढण्याचे कारण काय? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. जागतिक युद्धाच्या इतिहासात पहिल्यांदाच शस्त्रसंधी झाल्यानंतर अशा प्रकारे आनंद साजरा होत असल्याचा आरोप त्यांनी केला. युद्ध विराम आणि माघार घेत, शस्त्रसंधी करून हाच विजय मानून एक पक्ष विजयी सोहळा साजरा करत आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे. शस्त्र संधी हा विजय कसा असू शकतो? दुसऱ्यांच्या हस्तक्षेपाने झालेली शस्त्र संधी हा विजय कसा असू शकतो? असे प्रश्न राऊत यांनी विचारले आहेत.

या वेळी राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी देखील तिरंगा यात्रा काढली होती. यावरुन त्यांचे डोके फिरले आहे का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. तुमच्या माघारी मुळे युद्ध विरामामुळे अख्खा देशाला धक्का बसला आहे. तुमच्या अशा धोरणामुळे अख्खा देश धक्क्यात असताना एकनाथ शिंदे यांनी तिरंगा यात्रा नाही तर डोनाल्ड यात्रा काढायला हवी, असा टोलाही त्यांनी लगावला. शिंदेंनी अमेरिकेचा झेंडा हातात घ्यायला हवा, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

पृथ्वीवरून अंतराळातील परिस्थितीबाबत जागरुकता वाढवण्यासाठी डीएसटी आणि डीआरडीओ यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी

नवी दिल्ली, 14 मे 2025

भारताची पृथ्वीवरून अंतराळातील परिस्थितीबाबत जागरुकता वाढवण्याची क्षमता बळकट करण्याच्या दृष्टीने अंतराळ संशोधन करण्यासाठी आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस (एआरआयईएस) मधील निरिक्षण सुविधा आणि वैज्ञानिक कौशल्याचा वापर करण्यासाठी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) एका संस्थेने संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) संस्थेशी भागीदारी करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

एआरआयईएस (ARIES) नैनीताल, ही डीएसटीची स्वायत्त संस्था आणि इन्स्ट्रुमेंट्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (आयआरडीई), डेहराडून, ही डीआरडीओची प्रयोगशाळा, यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. मनीष कुमार नाजा, संचालक, एआरआयईएस, आणि अजय कुमार, संचालक, आयआरडीई, यांनी 13 मे 2025 रोजी आयआरडीई, डेहराडून येथे या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

एआरआयईएस (ARIES) ही खगोलशास्त्र, खगोलभौतिकी आणि वातावरणीय विज्ञान क्षेत्रातील एक प्रमुख संशोधन संस्था असून, या ठिकाणी 3.6 मीटर देवस्थळ ऑप्टिकल टेलिस्कोप आणि एसटी रडार प्रणालीसह अत्याधुनिक राष्ट्रीय निरीक्षण सुविधा आहेत.

आयआरडीई (IRDE) ही जमीन, सागरी, हवाई आणि अंतराळ क्षेत्रात सशस्त्र दलांसाठी इलेक्ट्रो-ऑप्टिकल सर्व्हेलन्स सिस्टमचे डिझाइन आणि विकास करणारी अग्रगण्य संस्था आहे.

या सामंजस्य करारामध्ये,अंतराळातील वस्तूंवर देखरेख आणि डेटा संपादनासाठी एआरआयईएस (ARIES) मधील निरीक्षण सुविधांचा वापर, खगोलशास्त्र आणि एसएसए वापरासाठी इलेक्ट्रो-ऑप्टिक्स आधारित प्रणाली संयुक्तपणे विकसित करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग (एआय / एमएल) चा एकत्रित वापर करून प्रतिमा प्रक्रिया आणि डेटा विश्लेषण तंत्राचा विकास आणि ज्ञानाची देवाणघेवाण, प्रशिक्षण उपक्रम आणि वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधन आणि विकासाद्वारे क्षमता विकास याचा समावेश आहे.

एआरआयईएस (ARIES) चे डॉ. ब्रिजेश कुमार आणि डॉ. टी. एस. कुमार, आणि आयआरडीई (IRDE) चे रुमा ढाका, डॉ. सुधीर खरे, डॉ. मानवेंद्र सिंह, अभिजीत चक्रवर्ती आणि भरत राम मीणा यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आलेला हा सामंजस्य करार उत्तराखंडमधील दोन प्रमुख वैज्ञानिक संस्थांमधील धोरणात्मक भागीदारीचे प्रतिनिधित्व करत असून, अंतराळ देखरेख प्रणाली आणि भू-आधारित खगोलशास्त्रातील उद्दिष्टे पुढे नेणे, हे याचे उद्दिष्ट आहे.

एआरआयईएस (ARIES) आणि आयआरडीई (IRDE) ची भौगोलिक सान्निध्यता नियमित संवाद, सुविधांची उपलब्धता, तांत्रिक देवाणघेवाण आणि संयुक्त उपक्रमांचे समन्वय सुलभ करेल अशी अपेक्षा आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका:फेर प्रभाग रचना करा-निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला निर्देश

0

लोकशाहीच्या मूळ तत्वांचा अवमान-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर न घेणे हे लोकशाहीच्या मूळ तत्वांचा अवमान आहे. सद्य स्थितीत ग्रामपंचायत ते जिल्हा परिषदांपर्यंत सर्वच प्रातिनिधिक संस्था केवळ अधिकाऱ्यांच्या ताब्यात असल्याचे चित्र आहे. हे अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची रखडलेली निवडणूक 2022 च्या जुलैपूर्वी लागू असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या आधारे घेण्यात याव्यात. हा आदेश अंतिम नाही. बांठिया आयोगाच्या अहवाला देण्यात आलेल्या आव्हान याचिकेवरील निर्णयानंतर या निवडणुकांच्या वैधतेवर फेरविचार होऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटलेले आहे .स्थानिक स्वराज्य संस्थांना अनिश्चित काळासाठी वाऱ्यावर सोडता येणार नाही. वेळेवर निवडणुका हे तळागाळातील लोकशाहीचे सार आहे. त्यामुळे जिथे मुदत संपली आहे किवा प्रशासन राज आहे अशा सर्वच महापालिका, नगर परिषदा, नगर पंचायती व जिल्हा परिषदांची लवकर निवडणुका घेण्यात याव्यात, असे निरिक्षणही न्यायालयाने या प्रकरणी आपल्या आदेशात नोंदवले आहे.

मुंबई-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी फेर प्रभाग रचना करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार आता राज्य सरकारला फेर प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मागील जवळपास पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील राजकारण्यांमध्ये अस्वस्थता होती. मात्र अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता आगामी चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने देखील तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यातच आता निवडणूक आयोगाने देखील या निवडणुका लवकरात लवकर घेण्यासाठी कंबर कसली आहे. यात आता राज्य सरकारला फेरफार रचना करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील 4 महिन्यांच्या आत घेण्याचे महूत्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करताना दिले. कोर्टाने ही निवडणूक 1994 ते 2022 पर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसार घेण्याचे आदेश दिलेत. विशेषतः राज्य निवडणूक आयोगाला यासंबंधी 4 आठवड्यांच्या आत अधिसूचना जारी करण्याचेही निर्देश दिलेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वी उडणार हे निश्चित झाले आहे. ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे महाराष्ट्रात 2021 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती एन के सिंह यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी झाली. त्यात कोर्टाने ह्या निवडणुका 4 महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश दिलेत. कोर्टाच्या आदेशांनुसार, ओबीसी समुदायाला 2022 पूर्वी असणारे आरक्षण कायम ठेवून 4 महिन्यांच्या आत ही निवडणूक घ्यावी लागेल. ही निवडणूक बांठिया आयोगाच्या अहवालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निकालाच्या अधीन असतील, असेही कोर्टाने या प्रकरणी स्पष्ट केले आहे.

40 रुपयांची दारू प्यायल्याने 23 जणांचा तडफडून मृत्यू,डीएसपी सह एक्साईज इन्स्पेक्टर पर्यंत अनेकजण सस्पेंड

अमृतसर:40 रुपयांची दारू प्यायल्याने 23 जणांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच पंजाब मध्ये घडली आहे . मृत्युमुखी पडणाऱ्या मध्ये मजूर, बस चालक आणि शेतमजूर अशा गरीब वर्गातील लोकांचा समावेश आहे . हे सर्वजण दिवसभर कष्ट करून आपले घर चालवत होते. ते अमृतसर जिल्ह्यातील रहिवासी होते. गावेही जवळच होती. १२ मे रोजी पाऊच दारू प्यायली. घरी परतले तेव्हा छातीत जळजळ आणि तीव्र वेदना होऊ लागल्या. वाचा बंद झाली.नेमकी समस्या काय आहे हे सांगताही येत नव्हते.मराडी कलान, भंगाली कलान आणि थ्रिवाल या तीन गावांत पोहोचले. तिन्ही गावांमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे.विषारी दारूमुळे २३ मृत्यू झाल्यानंतर, पंजाब सरकारने मजिठा येथील डीएसपी अमोलक सिंग आणि एसएचओ अवतार सिंग, उत्पादन शुल्क विभागाचे ईटीओ मनीष गोयल आणि उत्पादन शुल्क निरीक्षक गुरजीत सिंग यांना निलंबित केले आहे.दारू रॅकेटचा प्रमुख सूत्रधार साहिब सिंग याला आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

मृत झालेल्या लोकांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना रुग्णालयात नेले, पण वाटेतच त्यांनी एकेक करून शेवटचा श्वास घ्यायला सुरुवात केली. १२ मे रोजी सकाळपासून १३ मे रोजी संध्याकाळपर्यंत एकूण २३ मृत्यू झाले आणि १० जण अजूनही रुग्णालयात आहेत. मृतांमध्ये २५ वर्षांचा एक तरुण ते ८० वर्षांचा एक पुरुष आहेत.

या घटनेमुळे थ्रिवल, पातालपुरी, मरारी कलान, तलवंडी खुम्मन, कर्नाळा, भांगवान, जलालपूर, भंगाली कलान या गावांमध्ये शोककळा पसरली आहे.या गावांमध्ये बेकायदेशीर दारूची सहज उपलब्धता होत असल्याचे स्पष्ट झाले आहे .मृत्यू झालेल्यांमध्ये दारू पुरवल्याचा आरोप असलेल्या दोन लोकांचा समावेश आहे. पाउचमध्ये उपलब्ध असलेल्या या दारूची किंमत ३५ ते ४० रुपये आहे. मृताने प्यायलेल्या दारूमध्ये मिथेनॉलचे प्रमाण जास्त असल्याचा डॉक्टरांना संशय आहे. यामुळे त्यांचा मृत्यू झाला .

डीजीपी गौरव यादव म्हणाले की, दारू रॅकेटचा प्रमुख सूत्रधार साहिब सिंग आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. लुधियानातील मिथेनॉल पुरवठादार पंकज कुमार आणि अरविंद कुमार यांनाही अटक करण्यात आली आहे. प्रभजीत सिंग, कुलबीर सिंग, निंदर कौर, गुरजंत सिंग, अरुण ऊर्फ ​​काला आणि सिकंदर सिंग ऊर्फ ​​पप्पू हे दारू पुरवठा करत होते. त्यांनाही अटक करण्यात आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रॅकेटचा प्रमुख सूत्रधार साहिब सिंग याने लुधियाना आणि दिल्लीतील रासायनिक कंपन्यांकडून ऑनलाइन मिथेनॉल ऑर्डर केले होते. यापासून बनावट दारू बनवली जात होती. डॉक्टरांच्या मते, मिथेनॉल हे मृत्यूचे कारण आहे. हे एक विषारी रसायन आहे. त्याची थोडीशी मात्रा देखील अंधत्व, मूत्रपिंड निकामी होणे आणि मृत्यूला कारणीभूत ठरू शकते.
या अपघातानंतर पोलिस आणि उत्पादन शुल्क विभाग एकमेकांवर आरोप करत आहेत. पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की, उत्पादन शुल्क धोरणाची अंमलबजावणी करणे आणि बेकायदेशीर दारू विक्री थांबवणे ही उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी आहे.त्याच वेळी, उत्पादन शुल्क विभागातील सूत्रांचा असा युक्तिवाद आहे की त्यांच्याकडे बेकायदेशीर दारू विक्री शोधण्यासाठी कोणतीही गुप्तचर यंत्रणा नाही. त्यांना भारतीय राखीव बटालियनकडून बळ मिळते. त्यांना व्हीआयपी ड्युटी किंवा इतर कामावर ठेवले जाते. जेव्हा आपण बेकायदेशीर दारू विकणाऱ्या लोकांना पकडतो आणि त्यांना पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जातो तेव्हा आपल्याला गुन्हा दाखल करण्यासाठी तासनतास विनवणी करावी लागते.