Home Blog Page 3055

मायडिया ग्रुपने १,३५० कोटींच्या नवीन गुंतवणुकीसह सुप्यात रोवली टेक्नोलॉजी पार्कची कोनशिला

0

पुणे- अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धी पासून जवळचे गाव , गावातील गाडी , मंदिर,शाळा  असे रूप बदलून आता सुप्याला जणू आधुनिक रूप बहाल होते आहे मायडिया ग्रुप या जागतिक ग्राहकोपयोगी उपकरण उत्पादक तसेच फॉर्चुन ५०० कंपनीने आज भारतातील महाराष्ट्र राज्यातील सुपा पारनेर येथे टेक्नोलॉजी पार्कची कोनशिला रोवली  उपकरणे,एचव्हीएसी आणि कॉम्प्रेसर यांचे उत्पादन कारखाने असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस;मायडिया ग्रुपचे संस्थापक शिंगजियान हे आणि मायडिया ग्रुपचे अध्यक्ष श्री. पॉल फंग यांच्या हस्ते कोनशिला रचण्यात आली.यावेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले: “महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम करते. अनुकूल परिसंस्था निर्माण करण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम हाती घेतल्यामुळे आता महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी पसंतीचे ठिकाण झाले आहे. आमच्या राज्यात टेक्नोलॉजी पार्क स्थापन करण्यासाठी गुंतवणुकीचा निर्णय मायडिया ग्रुपने घेतला याचा मला आनंद आहे. महाराष्ट्र हे उत्पादन, निर्मिती आणि संशोधनाचे केंद्र म्हणून विकसित करण्याच्या प्रवासात याची आम्हाला मदत होईल.

टेक्नोलॉजी पार्कचे संकुल पुण्याजवळील सुपा पारनेर येथील एमआयडीसी इंडस्ट्रियल पार्क क्रमांक दोन भागात २०१८ मध्ये संपादित करण्यात आलेल्या ६८ एकर परिसरात उभारले जात आहे. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाशी सुसंगती राखत, येत्या पाच वर्षांत अंदाजे १,३५० कोटी रुपयांची गुंतवणूक करून टेक्नोलॉजी पार्क स्थापन करण्याचे मायडियाचे नियोजन आहे. या टेक्नोलॉजी पार्कमध्ये गृहोपयोगी उपकरणे, एअर कंडिशनर्स आणि कॉम्प्रेसर्सचे उत्पादन केले जाईल. गृहोपयोगी उपकरणे,एचव्हीएसी उपकरणे आणि कॉम्प्रेसर्सच्या उत्पादनासाठी या टेक्नोलॉजी पार्कमध्ये कारखाने उभारले जातील.यामध्ये कॅरिअर मायडिया इंडिया या मायडिया आणि यूटीसी क्लायमेट कंट्रोल अॅण्ड सिक्युरिटी (यूटीसी सीसी अॅण्ड सी) यांच्या ६०:४० संयुक्त उपक्रमाचा उत्पादन कारखानाही असेल.

एचव्हीएसी उत्पादनांसाठीचे कॉम्प्रेसर तयार करणारा जगातील सर्वांत मोठा उत्पादक तसेच मायडिया ग्रुपमधील एक कंपनी जीएमसीसीचा कारखानाही टेक्नोलॉजी पार्कमध्ये असेल. या आधुनिक कारखान्यामध्ये ग्रुप गुंतवणूक करत आहे. त्याचप्रमाणे मायडियाच्या कारखान्यांना पूरक भाग पुरवणाऱ्या कंपन्यांकडूनही टेक्नोलॉजी पार्कमध्ये गुंतवणूक केली जाण्याची शक्यता आहे.

टेक्नोलॉजी पार्कमधून २०००हून अधिक लोकांसाठी रोजगाराच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संधी निर्माण होणे अपेक्षित आहे. २०२० सालाच्या सुरुवातीला या संकुलातून व्यावसायिकरित्या काम सुरू होण्याची शक्यता आहे.

मोहित हुसेन आणि छवी मित्तल यांच्या एसआयटीच्या पार्टीला सेलिब्रिटींनी आणली रंगत!

0
आजच्या वेबसीरिजच्या जमान्यात सर्वत्र लोकप्रिय असणाऱ्या एसआयटी म्हणजेच ‘शिट्टी आइडिया ट्रेन्डिंग’ या युट्युब चॅनलने युट्युब वर १ मिलियन तर फेसबुक वर ४ मिलियन फॉलोअर्सचा उच्चांक गाठून मोहित हुसेन आणि छवी मित्तल या एसआयटीच्या संस्थापकांनी हिंदी तसेच मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांसमवेत आपल्या यशस्वी वाटचालीचा आनंद साजरा केला. शरद आणि किर्ती केळकर, गौरव गेरा, अयूब खान, करण व्ही. ग्रोव्हर, पूजा गोर, राजसिंग अरोरा, किश्वर मर्चंट, प्रचीन चौहान, मानसी पारेख, व्रजेश हिरजी, मानसी रच, जयती भाटिया, शुभांगी लिटोरिया, विनोद सिंह, अनुज सचदेव, शक्ति आनंद यांसारख्या अनेक तारकांनी पार्टीस रंगात आणली. प्रसंगी मोहित आणि छवी यांनी ‘द फॅमिली वेकेशन’ या एसआयटीच्या आगामी नवीन वेब सिरीजची घोषणा देखील केली.

स्वर-ताल-पदन्यासातून रसिक मंत्रमुग्ध!

0
संवेदन मैफलीद्वारे पं. रोहिणी भाटे यांना आदरांजली
पुणे : जमिनीला स्पर्श करणाऱ्या लांबच लांब जटा, हार, रुद्राक्ष माळ अन् भगवी वस्त्रे परिधान केलेली… एका हाताने एकतारीवर छेडलेले सूर तर दुसऱ्या हाताने कमरेवर अडकवलेल्या छोट्या डग्ग्यावर धरलेला ताल, पायातील जाडसर पैजणांचा मधुर निनाद अन गोड चालीत, आशयघन पद्यात एकरूप झालेली सुमधुर गायकी रंगमंचावर अवतरली…सूर-ताल-लय अन् नृत्य म्हणजे परिपूर्ण संगीत…पार्वती बाऊल यांच्या गायन, वादन अन् पदन्यासातून ते जणू प्रत्यक्ष साकारलं
कथक सम्राज्ञी गुरू पं रोहिणी भाटे यांच्या स्मरणार्थ, नीलिमा अध्ये यांच्या संकल्पनेतून प्रकृति कथक नृत्यालयातर्फे ‘संवेदन’ मैफल भरविण्यात आली होती. जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना प्रेरणा श्रीमाळी यांचा नृत्याविष्कार आणि ‘बाऊल’लोकसंगीताची परंपरा उलगडणारा पार्वती बाऊल यांचा स्वर-पदन्यास दोन्ही एकाच स्वरमंचावर अनुभवता आल्याने रसिकांसाठी ही मैफल सांगीतिक मेजवानीच ठरली.
प्रकृतिच्या शिष्यांनी ‘गणनाथ गौरी सुत’ ही गणेशाचे वर्णन करणारी धृपद रचना सादर करत मैफलीस आरंभ केला. त्यानंतर रोहिणीताईंच्या ज्येष्ठ शिष्या नीलिमा अध्ये आणि हसिता ओझा यांनी चार ताल आणि चार राग यांना एकत्रित बांधणारी ‘चतरंग’ ही नृत्यरचना पेश करून रसिकांची मने जिंकली. त्यांना अजय पराड (संवादिनी), आदित्य देशमुख(तबला), सुनील अवचट (बासरी), सुखन मुंडे (पखवाज), अर्पिता वैशंपायन (गायन) आणि आसावरी पाटणकर (पढंत) अशी समर्पक साथ दिली.
कथकच्या जयपूर घराण्यांच्या प्रेरणा श्रीमाळी यांनी पारंपरिक राजस्थानी धाटणीच्या शिवस्तुतीने आपल्या सादरीकरणाची सुरुवात केली. तीनतालातील विलंबित विस्तार, थाट, उठाण, परण प्रस्तुत करत जयपूर घराण्याच्या कथक अविष्काराचे विविध रंग उलगडले. त्यांनी साकारलेली ‘चतुरणी नायिका’ विशेष भावली. तालाची सूक्ष्म जाण आणि कथक साधनेची उंची याचे विलक्षण दर्शन त्यांच्या पदन्यासातून रसिकांना घडले. अभिनय आणि नृत्य यांच्या सुरेख मिलाफातून साकारलेल्या ‘कबीर पदाने त्यांनी आपल्या सादरीकरणाची सांगता केली. त्यांना फत्तेहसिंग गंगाणी(तबला) पूरक साथ दिली.
उत्तरार्धात पार्वती बाऊल यांचे सुमधुर गायन झाले. अध्यात्म, ज्ञान, योग, साधना आणि कलेवर असलेल्या प्रभुत्वातून बंगलाच्या ‘बाऊल’ संगीताचे विलोभनीय दर्शन त्यांनी घडविले. गुरू सनातनदास बाऊल यांच्याकडून त्यांनी आत्मसात केलेल्या ‘माया’रचनेची प्रस्तुती अंतर्मुख करणारी ठरली. नामस्मरण आणि ध्यान यांचं महत्व सांगणारे, कान्होपात्रा यांच्या १ हजार वर्षापूर्वीचे कथाकाव्यात रसिकांना तल्लीन केले. बंगाली, पाली आणि संस्कृत अशा तीन भाषांची सुरेख गुंफण असलेल्या गीताचं श्रवणीय सादरीकरण व इंग्रजी भाषेतून त्यांनी केलेले विस्तृत विवेचन रसिकांना विशेष भावले. ही अभिव्यक्ती ‘ये हृदयीचे ते हृदयी’ पोहोचल्याचा प्रत्यय त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या कलाविष्कारातून रसिकांना आला.

राज्य सरकारकडून बांधकाम कामगारांना दिवाळी भेट

0

  इतरांची घरे बांधणा-या कामगारांच्या स्वत:च्या घराचे स्वप्न होणार साकार

–  घरांसाठी मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचे सरकारी अनुदान

पुणे : इतरांची घरे बांधणा-या बांधकाम कामगारांचे स्वत:च्या घराचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. दिवाळी निमित्ताने राज्य सरकारने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दिल्या जाणा-या २ लाख रुपयांच्या अनुदानात आता ५० हजार रुपयांची वाढ केली  असून यामुळेप्रधानमंत्री आवास योजनेतून मिळणारे अनुदान जमेस धरता बांधकाम कामगारांना घरासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे सरकारी अनुदान मिळू शकणार आहे. राज्याच्या कामगार व कौशल्य विकास विभागाचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळा अंतर्गत नोंदणीकृत कामगारांना मिळणा-या लाभांचे वाटप करण्यासाठी क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने नांदेड सिटी येथे आयोजित कार्यक्रमात निलंगेकर बोलत होते. क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, सचिव रणजीत नाईकनवरे, क्रेडाईच्या महिला विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षा दर्शना परमार, क्रेडाईच्या कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, सभासद मिलिंद तलाठी, कामगार विभागाचे अतिरिक्त आयुक्त शैलेंद्र पोळ, उपायुक्त विकास पानवेलकर, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर, महाव्यवस्थापक उर्मिला जुल्का आदि यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, बांधकाम व्यवसायातील कामगार मोठ्या प्रमाणावर असंघटितअसल्यामुळे अनेक योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. बांधकाम कामगारांचे घर हा देखील यातलाच एक भाग आहे. आपल्या सर्वांचे घर बांधणा-या या कामगारांचे स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य सरकारने काहीतरी करावे यासाठी क्रेडाईचे नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांनी पुढाकार घेतला. बांधकाम कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दिल्या जाणा-या अनुदानात ५० हजार रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत. या निर्णयामुळे आता कामगारांना रुपये पाच लाखांपर्यंत सरकारी अनुदान मिळू शकणार आहे. ज्यामध्ये २ लाख ५० हजार रुपये (अडीच लाख) हे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तर अडीच लाख रुपये हे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने देण्यात येतील. या संदर्भातील धनादेशांचे वाटप एका महिन्याच्या आत सुरु करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलावीत अशा सूचना यावेळी निलेंगेकर यांनी कामगार आयुक्तालयातील अधिका-यांना दिल्या.

महाराष्ट्र राज्यात कामगारांची संख्या ३ कोटी ६५ लाख इतकी आहे. यापैकी नोंदणीकृत कामगारांची संख्या ही ४५ लाख आहे. राज्यात येत्या २५ वर्षांत होणारा पायाभूत सुविधांमधील विकास लक्षात घेता आपल्याला २७ लाख नोंदित आणि कुशल बांधकाम कामगारांची गरज भासणार असून ती संख्या सध्या ११ लाख आहे.

बांधकाम कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकांची गरज ही मोठ्या प्रमाणात आहे. हेप्रशिक्षण देणे व प्रशिक्षक तयार करण्याचे कामी सुमारे १०० ते १५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे असा मुद्दा रणजीत नाईक नवरे यांनी उपस्थित केला व त्यासाठी आर्थिक मदत करावी अशी विनंती निलंगेकर याना केली त्यावर  सकारात्मक प्रतिसाद देत आमच्याकडे हा प्रस्ताव पाठविल्यास लवकरात लवकर त्यासंदर्भातील निर्णय देऊ,असेही निलंगेकर यावेळी म्हणाले.

निलंगेकर पुढे म्हणाले की, बांधकाम कामगार हा अनेक वर्षांपासून काम करीत असतो मात्र त्याला त्याच्या कामाचे कोणतेही प्रशस्तीपत्रक दिले जात नाही. त्यामुळे कोठेही त्याचा अनुभव हा गृहीत धरला जात नाही. याच कामगारांना नोंदित करण्यासाठी व त्यांच्या कौशल्य विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. याबरोबरच नव्या तंत्रज्ञानचे प्रशिक्षण कामगारांना मिळावे आणि त्यांचा कौशल्यविकास व्हावा या उद्देशाने त्या नव्या तंतज्ञानाचे कामगारांना मोफत प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे.  यावेळी निलंगेकर यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना सुरक्षा कीटचे वाटप देखील करण्यात आले.

‘ मिरी निर्यातीची कोकणातील शेतकऱ्यांना चांगली संधी ‘

0
‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’ मधील परिसंवादाचा सूर 
पुणे :’जगात फक्त ५ देशात काळी मिरीचे उत्पादन होत असल्याने कोकणवासीयांना काळी मिरी लागवडीतून निर्यातीची चांगली संधी आहे त्यातून कोकणातील शेतकऱ्याला आर्थिक समृद्धी मिळवता येईल ‘ असा सूर ग्लोबल कोकण फेस्टिव्हल मधील परिसंवादात  उमटला .
‘आधुनिक शेती ;कोकणचे वैभव ‘ या परिसंवादात हा सूर उमटला . फलोत्पादन तज्ज्ञ विजय जोगळेकर ,कृषी तज्ज्ञ प्रभाकर सावे , मसाला पिकांचे तज्ज्ञ मिलिंद प्रभू ,कृषी -पणन मंडळाचे अधिकारी भास्कर पाटील ,बी .व्ही .जी . इंडिया  कंपनीतील कृषी तज्ज्ञ पी . कोळेकर  यांनी या परिसंवादात भाग घेतला .
‘ मेस्से ग्लोबल एक्झिबिशन सेंटर ‘ (लक्ष्मी लॉन , मगरपट्टा सिटी ) येथे  कोकण भूमी प्रतिष्ठान आणि एक्झीकाँन  ग्रुप  आयोजित ‘  ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ‘ अंतर्गत हा परिसंवाद शुक्रवारी सायंकाळी  झाला . हा फेस्टिवल १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान सुरु राहणार आहे .
मसाला पीक तज्ज्ञ मिलिंद प्रभू म्हणाले ,’काळी मिरी जितकी पिकवू तितकी विकली जाते . कोकणात फार्मा कंपन्या त्या विकत घेतात आणि निर्यात करतात . काजू आणि काळी मिरी एकत्र घेतली तर दुप्पट फायदा होतो . ‘
‘शेती पाहणे हाही पर्यटनाचा विषय झाल्याने पर्यटकांना शेती कशी होत असते ,हे पाहण्याचे कुतूहल असते . त्यामुळे शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण शेती प्रयोग केल्यास कृषी आणि पर्यटन विषयक असे दोन्ही प्रकारचे लाभ होऊ शकतात ‘,असे मत प्रभाकर सावे यांनी व्यक्त केले .
विजय जोगळेकर म्हणाले ,’ वनस्पती शास्त्राची ओळख असेल तर फळबागायतीमधून चांगला फायदा होतो . या शास्त्राची जाण वाढवणे आवश्यक आहे . फलोत्पादनासाठी ठीबक सिंचन पद्धती महत्वाची असून सिंचनाचा विचार करताना पाणी बचतीपेक्षा अन्नद्रव्ये मुळाशी शंभर टक्के पोचतील यावर भर द्यावा ‘
ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ‘चे संयोजक संजय यादवराव ,एम . क्यू .सय्यद ,किशोर धारिया यांनी स्वागत केले .

हडपसरच्या कचरा प्रकल्पाचा अप्रत्यक्ष ठेकेदार: आमदार योगेश टिळेकरच असल्याचा मनसेचा आरोप (व्हिडीओ)

0

आमदार योगेश टिळेकरांचा संपर्क प्रमुखच महापालिकेच्या कचरा प्रकल्पाचा  ठेकेदार

पुणे :  भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे कार्यालयीन संपर्क प्रमुख आनंद देशमुखहाच  महापालिकेच्या रामटेकडी येथील भुमी ग्रीन एनर्जी या कच-यापासून खतनिर्मिती प्रकल्पामध्ये प्रमुख भागीदार आहे.. आमदारांकडे असलेली एमएच १२ एनसी ००७८   या क्रमांकाची इन्होव्हा क्रीस्टा ही अलीशान मोटार  या भुमी ग्रीन एनजीर्चे संचालक विजय टिळेकर यांनी खरेदी केली आहे. नागरिकांचा प्रचंड विरोध असताना आमदारांच्या कृपेनेच हडपसरमध्ये नव्याने कचरा प्रकल्प येत असल्याचा आरोप मनसचे गटनेते वसंत मोरे यांनी केला. त्यामुळे देशमुख याच्या हडपसर येथील कॅनरा बँक खात्यांची चौकशी करावी, अशी मागणी देखील मोरे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.मर्सिडीझनंतर आमदारांची इनोव्हा क्रिस्टा वादात सापडली असून कचरा प्रकल्पात आमदारांचा संपर्क कार्यालय प्रमुख आनंद देशमुख यांच्या चेहरा पुढे करून  कोट्यवधी रुपयांची कमाई आमदार टिळेकर यांनी केलेली असल्याचा आरोप देखील यावेळी मोरे यांनी केला.हडपसरमध्ये कचरा प्रकल्प स्वकमाई साठीच  आणले गेले ..त्याचे अप्रत्यक्ष ठेकेदार टिळेकर हेच होते .. असे निष्कर्ष चौकशी अंती निघतील असा दावा देखील मोरे यांनी केला .दरम्यान याप्रकरणी आमदार टिळेकर यांच्याकडून उशिरापर्यंत कोणताही खुलासा वा स्पष्टीकरण करण्यात आले नव्हते .

                 महापालिका भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर उपस्थित होते. मोरे यांनी सांगितले, की डिसेंबर २०१५ मध्ये अजिंक्य बायोफोर्ट या कंपनीने त्यांचा रामटेकडी येथील कच-यापासून  खत तयार करण्याचा प्रकल्प भुमी ग्रीन एनर्जी कंपनीला हस्तांतरीत करण्यात आला. यानंतर दुस-याच दिवशी भुमी ग्रीन एनजीर्ने तीन संचालकांचे भागीदार पत्र तयार केले. त्यामध्ये विजय टिळेकर, पंकज पासलकर आणि आनंद सुरेश देशमुख हे तिघे समान हक्काचे संचालक आहेत. भुमी ग्रीन कंपनीच्यावतीने हडपसर आणि वडगाव बुद्रुक येथे चालणा-या प्रकल्पातील कामापोटी महापालिकेकडून आता पर्यंत १० कोटी ५० लाख रुपयांची बिले अदा करण्यात आली आहेत. आनंद देशमुख हे आमदार योगेश टिळेकर यांचे कार्यालय संपर्क प्रमुख आहेत. त्यामुळे आनंद देशमुख व भुमी ग्रीन एनर्जी यांच्या हडपसर मगरपट्टा कॅनरा बँक शाखेतील खात्यावरून होणा-या सर्व रकमांचे व्यवहार तपासण्यात यावेत.

           याशिवाय आमदार टिळेकर हे मागील दोन वर्षांपासून वापरत असलेली एनोव्हा क्रिस्टा ही गाडी २६ मे २०१६ रोजी भुमि ग्रीन एनजीर्चे संचालक विजय टिळेकर यांच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे. या गाडीवर भाजप युवा मोर्चा प्रदेशअध्यक्ष आमदार योगेश टिळेकर अशी नेमप्लेटही लावण्यात आली आहे. आमदार योगेश टिळेकर यांनी भुमी ग्रीन या कंपनीस रामटेकडी आणि वडगाव बुद्रुक येथील प्रकल्पांचे काम घेउन दिले आहे. त्या बदल्यात भुमि ग्रीन कंपनीने त्यांना सुमारे २६ लाख रुपये किंमतीची मोटार भेट दिली. भुमि ग्रीन कंपनीने १ सप्टेंबरला या गाडीचे सुमारे ९ लाखांचे कर्ज एकरकमी फेडले. यानंतर कागदपत्रांचे सोपस्कार पुर्ण करत ही गाडी आमदार टिळेकर यांचे धाकटे बंधू चेतन टिळेकर यांच्या नावे करण्यात आली आहे. याचे सर्व कागदोपत्री छायाचित्र आणि फेसबुकवरील छायाचित्रांच्या प्रतिही वसंत मोरे यांनी यावेळी पत्रकारांना दाखविल्या.येवलेवाडी विकास आराखड्यातील आरक्षण उठविण्याच्या बदल्यात आमदार योगेश टिळेकर यांनी बांधकाम व्यावसायीकाकडून मर्सिडीज बेंज ही तब्बल एक कोटी किंमतीची महागडी गाडी वापराचे  प्रकरण उघडकीस आणले होते. 

 

 

केरळ फ्लड रिलीफ फंडासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी दिले दोन कोटी एकोनचाळीस लाख रूपये

0
पुणे-सामाजिक दायित्वाचे  निर्वाहन करत , बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचार्यांनी  केरळच्या आपत्ति ग्रस्त 
नागरिकांसाठी केरळ राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहायता फंडासाठी आपले एक दिवस वेतन दिले. 
बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री ए सी राउ यांनी दी. 25.10.2018 रोजी  तिरुवनंतपुरम 
येथे विशेष कार्यक्रमाकेरळचे माननीय मुख्यमंत्री श्री पिनाराय विजयन यांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या 
कर्मचार्यांच्या वतीने केरळ राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहायता फंडासाठी  रु 2,39,02,192.रुपये 
(दोन  करोड़ रुपये, एकोणचालिस लाख दोन हजार एकसे ब्यानवे) चा चेक सोपविला या कार्यक्रमास 
चेन्नई  विभागीय व्यवस्थापक श्री राजेश कुमार सिंह तसेच अन्य बँक अधिकारी उपस्थित होते.

व्यंग्यचित्र, छायाचित्रांतून उलगडणार ‘पुलं’चे जीवन

0
साहित्यवेध प्रतिष्ठान, संवाद पुणे आणि कोहिनूर ग्रुपतर्फे ७ ते ९ नोव्हेंबर २०१८ दरम्यान प्रदर्शन
पुणे : साहित्यवेध प्रतिष्ठान, संवाद पुणे आयोजित आणि कोहिनूर ग्रुप प्रायोजित महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांच्या जीवनातील विविध पैलूंतुन त्यांचे व्यक्तिमत्व उलगडणाऱ्या व्यंग्यचित्रांचे आणि त्यांच्या दुर्मिळ फोटोबायोग्राफीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. दि. ७ ते ९ नोव्हेंबर २०१८ रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत हे प्रदर्शन पुणेकरांना पाहण्यासाठी खुले असणार आहे.
या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार, दि. ७ नोव्हेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून कोहिनुर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच गुरुवार, दि. ८ नोव्हेंबर २०१८ रोजी पहाटे ६.०० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘आनंदयात्रा’ हा दिवाळी पहाट कार्यक्रम होणार आहे.
‘पुलं’चा जीवनप्रवास उलगडणारे आणि त्यातून खळखळून हसवणारे हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, तरी सर्व रसिक-साहित्यिक प्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन साहित्यवेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास भिंगारे आणि संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी कृष्णकुमार गोयल, मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

पीएमपीएल नफ्यात आणण्यासाठी कामगारांनी काम करावे – खासदार संजय काकडे

0

आभार मानन्यासाठी आलेल्या कामगारांकडून खासदार काकडेंची अपेक्षा

पुणे : पीएमपीएलच्या इतिहासामध्ये प्रथमच दिवाळीच्या अगोदर कामगारांच्या खात्यामध्ये बोनस जमा झाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कामगारांच्या प्रश्नांसाठी मध्यस्थी केलेल्या खासदार संजय काकडे यांनी कामगारांनी आता पीएमपीएलला नफ्यात आणण्यासाठी काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कामगारांनीही खासदार काकडे यांना याबाबत विश्वास दिला आहे.

दिवाळीपूर्वी बोनस मिळाल्यामुळे यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाल्याची भावना पीएमपीएलच्या  कामगारांनी आज व्यक्त केली. कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात खासदार संजय काकडे यांनी मध्यस्थी केल्याने त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी कामगार खासदार काकडेंना भेटले. यावेळी पीएमपीएल कामगार संघटनेचे सुनील नलावडे, माजी नगरसेवक दिनेश धावडे, संघटनेचे उपाध्यक्ष कैलास पासलकर, हरिष अोव्हाळ, राजेंद्र आचार्य, राजाभाऊ पायगुडे, आनंद कदम, बाळासो गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार संजय काकडे यांनी पीएमपीएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांचे विशेष आभार मानले. त्यांच्यामुळेच कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस मिळाला व इतर प्रश्नही मार्गी लागले. आता कामगारांनी पीएमपीएल ला नफ्यात आणण्यासाठी काम करावे. ज्या संस्थेत आपण काम करतो ती संस्था चांगली राहावी व नफ्यात चालावी. तसे झाले तरच, त्यामध्ये काम करणारांचे भवितव्य उज्ज्वल राहू शकते. त्यामुळेच कामगारांची जबाबदारी आता वाढली आहे. याबरोबरच इंटक कामगार संघटनेबरोबरही सकारात्मक चर्चा झाली असून आस्थापना आराखडा मंजूर करण्यासंदर्भात दोन्ही कामगार संघटनांमध्ये एकमत झाले आहे. तसे पत्र त्यांनी गुंडे यांना दिले आहे, असे सांगितले.

मोदींची दिवाळी भेट, फक्त ५९ मिनिटात मिळणार १ कोटीचे कर्ज

0

नवी दिल्ली – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना (एमएसएमई) आता केवळ ५९ मिनिटात कर्ज मिळणार आहे. तसेच जीएसटी नोंदणीकृत उद्योजकांना १ कोटी रुपयांच्या कर्जावर २ टक्के सूट मिळेल, असे पंतप्रधान मोदी यांनी घोषित केले आहे. एमएसएम उद्योजकांसाठी सपोर्ट आणि आउटरिच कार्यक्रमाचे नवी दिल्ली येथे आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

लघू उद्योजकांना आता बँकेच्या मोठमोठाल्या रांगेत लागावे लागणार नाही. त्यासाठी जीएसटी भरणाऱ्या प्रत्येक एमएसएमई उद्योजकाला ऑनलाईन कर्ज मिळणार आहे. विशेष म्हणजे कर्ज मिळवण्याची ही प्रक्रिया फक्त ५९ मिनिटात मान्य केली जाईल आणि आवेदनकर्त्याला घरबसल्या कर्ज मिळेल, असेही पंतप्रधानांनी यावेळी प्रतिपादन केले.


तसेच, जीएसटी पोर्टलवर नोंदणी झालेल्या उद्योजकाना १ कोटी रुपयांच्या कर्जावर २ टक्के सूट मिळणार आहे. तर, उद्योजकांना आपले उत्पादन वाहून नेण्यासाठी मिळणारे शिपमेंट क्रेटीड ३ टक्के वरुन वाढून ५ टक्के पर्यंत वाढवण्यात आले आहे. शासकीय कार्यालयात लागणारे सामान विकत घेताना महिला उद्योजकांना प्रथम प्राधान्य मिळणार आहे. तर, ३ टक्के सामान हे महिला उद्योजकांसाठी आरक्षित करण्यात आले आहे.

उद्योजकांचे उत्पादन तत्काळ विक्री होण्यासाठी गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (जेम) नावाचे नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योजकांना आपले समाना आता ऑनलाईन विकता येणार आहे. तसेच या प्रणालीला मजबूत करण्यासाठी केंद्राच्या सर्व कंपण्यांना जेमची सदस्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने पुण्याच्या पाणी कपातीचा मुद्दा संपुष्टात(व्हिडीओ)

0

पुणे-गेली महिनाभर जलसंपदा विभागाने घेतलेल्या पवित्र्यामुळे चर्चिला जाणारा ‘तथाकथित पाणी कपातीचा ‘ मुद्दा च आता संपुष्टात आल्याचे आज सभागृहनेता श्रीनाथ भिमाले यांनी दिलेल्या माहितीने स्पष्ट झाले आहे.
धरणात पाणी किती आहे ? ते पुरेसे आहे कि नाही ? महापालिकेकडे पाटबंधारे चे  येणे किती आहे ? अशा विविध मुद्द्यांवर मंथने घडवीत पाटबंधारे खात्याच्या मुंडे यांनी पुण्याचे पाणी मुरते कुठे ? असा सवाल हि केला आणि माणशी किती पाणी द्यायला हवे ? पुण्याजवळ धरण म्हणजे पुण्याचे नाही असा पवित्रा देखील घेत स्थानिक नेत्यांना अडचणीत आणण्याचे वारंवार प्रयत्न केल्याचे आजवर स्पष्ट झाले आहे .२०० एम एल डी ची दर दिवशी कपात करून पुण्याला ११५० एम एल डी एवढेच पाणी देऊ अशी स्पष्ट भूमिका घेऊन त्यांनी पुण्याच्या आणि पुण्याच्या नेत्यांच्या तोंडचे पाणीही पळविले .या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री पुण्यात आले असताना या विषयावर महापौर ,सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष या तिघांनी पाण्यासह विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांपुढे गाऱ्हाणे मांडले .
याबाबत तेव्हा कोण कोणत्या विषयावर मुख्यमंत्री द्वेंद्र फडणवीस यांनी काय आदेश दिले … याबाबत आज सभागृहनेता श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकारांना माहिती दिली..पहा आणि ऐका नेमके याबाबत श्री. भिमाले काय म्हणाले ….

बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ रविंद्र मराठे आणि कार्यकारी संचालक आर के गुप्ता यांचे अधिकार संचालक मंडळाद्वारे पुन्हा बहाल

0

पुणे: बँक ऑफ महाराष्ट्राच्या संचालक मंडळाने दिनांक 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीद्वारे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविंद्र मराठे आणि कार्यकारी संचालक श्री आर के गुप्ता यांच्या कार्यशील अधिकार पुनर्बहाल केले आहेत. बँकेच्या संचालक मंडळाने दिनांक 29 जून रोजी झालेल्या बैठकीमध्ये या दोघांना त्यांच्या कार्यशील जबाबदार्‍यांपासून परावृत्त केले होते.

श्री मराठे यांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तर श्री आर के गुप्ता यांचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांचे कार्यशील अधिकार संचालक मंडळाद्वारे पुंनर्संचयित करण्याची बाब बँकेसाठी स्वागतार्ह असून या आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीमध्ये बँकेने देखील गेल्या 10 तिमाहीनंतर चांगले आर्थिक परिणाम दाखवले आहेत.

कार्यशील अधिकारांचे पुनर्संचयन करण्यामुळे न केवळ बँक ऑफ महाराष्ट्र मधील तर एकंदर देशातील बँकिंग वर्तुळामधिल सर्वांचेच मनोबल वाढणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे.

जनधन योजना, मुद्रा, सामाजिक सुरक्षा योजना या सारख्या शासकीय योजनांच्या सदरीकरणामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र नेहमीच अव्वल राहिली आहे. या निर्णयाचा सखोल आणि गहन परिणाम बँकेच्या दैनंदिन कामकाजावर सकारात्मक होणार असून त्याचे पडसाद लाभप्रदता- नफ्यामध्ये वाढ आणि विकासावर होणार आहे.    

वर्ल्ड टुरिझम ‘ मध्ये कोकण महत्वाचं ठिकाण ठरेल :मुख्यमंत्री

0
पुणे :  ‘ कोकणचे ब्रॅण्डिंग ,मार्केटिंग करण्यासाठी ‘ग्लोबल कोकण फेस्टिवल ‘च्या माध्यमातून  होणाऱ्या सातत्यपूर्ण कामातून  कोकणचा ‘ब्रँड ‘ तयार होत असून वृक्षराजी ,तळी ,आणि गोव्यापेक्षा चांगले सागर किनारे ‘ यामुळे ‘ वर्ल्ड टुरिझम ‘ मध्ये कोकण महत्वाचं ठिकाण ठरेल ‘ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले .
७ व्या ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ‘ चे उदघाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेस्से  ग्लोबल एक्झिबिशन सेंटर ,लक्ष्मी लॉन ,मगरपट्टा सिटी ,हडपसर येथे  तुळशी वृन्दावनाला पाणी घालून आणि प्रदर्शन दालनांची फीत कापून गुरुवारी सायंकाळी झाले . यावेळी   समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे ,खासदार अनिल शिरोळे ,आमदार विजय काळे ,योगेश टिळेकर ,जगदीश मुळीक ,विजय गोगावले ,किशोर धारिया उपस्थित होते . ६ वर्षे मुंबईत होणारा ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ‘ यावर्षी प्रथमच पुण्यात आयोजित करण्यात आला आहे .
कोकण भूमी प्रतिष्ठान ‘ आणि  ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ‘चे अध्यक्ष संजय यादवराव यांनी प्रास्ताविक केले . सहसंयोजक एम . क्यू . सय्यद यांनी स्वागत केले . कोकणातील यशस्वी उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
मुख्यमंत्री म्हणाले ,’यापूर्वीही मुंबईच्या ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ‘मध्ये मी सहभागी झालो होतो . यावर्षी पुण्यातही उपस्थित राहण्याचा योग आला . संपूर्ण कोकण या फेस्टिव्हल मध्ये पाहायला मिळते . कोकण भूमी प्रतिष्ठान ,ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ने सातत्यपूर्ण कामातून कोकणचे ब्रॅण्डिंग ,मार्केटिंग करण्यासाठी प्रयत्न केले, हे कौतुकास्पद आहे . त्यातून कोकणचा ‘ब्रँड ‘ तयार होत असून वृक्षराजी ,तळी ,आणि गोव्यापेक्षा चांगले सागर किनारे ‘ यामुळे ‘ वर्ल्ड टुरिझम ‘ साठी कोकण महत्वाचं ठिकाण ठरेल.
पर्यटन वृद्धीसाठी ५ गावे कोकण भूमी प्रतिष्ठानने निवडली असून तेथे होम स्टे ,टुरिझम वृद्धिंगत केले जाणार आहे ,हे महत्वाचे पाऊल आहे . सरकारही कोकण विकासासाठी प्रयत्न करीत असून चिपी विमानतळ ,रत्नागिरी विमानतळ ,दिघी बंदर आणि चौपदरीकरण होत असलेला मुंबई -गोवा महामार्ग यामुळे कोकण ची कनेक्टिव्हीटी वाढणार असून ४ तासात कोकणात पोहोचणे शक्य होणार असल्याने पर्यटक कोकणात येण्यास मदत होणार आहे .
हा फेस्टिव्हल ४ नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते रात्री १०  सुरु राहणार आहे . कोकण विकासविषयक परिसंवादाचे दर रोज आयोजन केले जात आहे . कोकणची संस्कृती ,कला ,रोजगार ,बांधकाम व्यवसाय ,स्टार्ट अप ,पर्यटन ,गुंतवणूक ,फळ प्रक्रिया ,खाद्यसंस्कृती विषयक स्टॉ ल  या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत . १५० हुन अधिक स्टॉल,५०० हुन अधिक कोकणी उद्योजकांचा सहभाग ,२ लाखाहून अधिक कोकणप्रेमींची उपस्थिती आहे . फूड फेस्टिव्हल ,फॅशन शो , मनोरंजनाचे कार्यक्रम यांचेही आयोजन करण्यात आले आहे .

मीनाक्षी मल्होत्रा बनल्या मिसेस महाराष्ट्र २०१८

0
पुणे-: मिसेस महाराष्ट्र २०१८, सिजन ३ ही सौंदर्यस्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहत पार पडली. महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, कर्हाड, मुंबई अशा कित्येक जिल्ह्यांतून स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यामध्ये उंची, व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, रॅम्पवॉक, इच्छाशक्ती, संवाद कौशल्य व परीक्षकांनी दिलेले गूण हे निकष लक्षात घेऊन या अत्यंत कठीण निवड प्रक्रियेनंतर मीनाक्षी मल्होत्रा यांनी मिसेस महाराष्ट्र २०१८ चा किताब पटकवला.
या सौंदर्य स्पर्धेमध्ये संपुर्ण महाराष्ट्रीत सौंदर्यवतींनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता, उत्तम १० स्पर्धकांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. ज्यामध्ये मीनाक्षी मल्होत्रा यांना मिसेस महाराष्ट्र ही उपाधी मिळाली . हे आयोजन रेसिडेन्सी क्लब मध्ये झाले होते.
ह्यावेळी आपले विचार व्यक्त करताना मीनाक्षी मल्होत्रा म्हणाल्या कि  “मी खरोखरच आनंदी आहे की हे स्वप्न सत्यात उतरले आहे, माझे पालक,  मित्र आणि शुभचिंतकांच्या प्रेम आणि पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. आम्हा सगळ्या मिसेसना हा उत्तम प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आयोजकांची खरोखरच ऋणी आहे”
या खास सौंदर्यस्पर्धाच्या परिक्षक म्हणुन हेमा कोटणीस (मिसेस इंडिया), मंजुषा मुळीक (मिसेस महाराष्ट्र २०१७) आणि शुभांगी शिंत्रे (मिसेस इंडिया इंटरनॅशनल) उपस्थित होत्या.  जॅझमाटाझ मागील २७ वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. यावेळी कपड्यांसाठी सिद्धी  हे डिझायनर होते तसेच हेअर-मेकअप व्हीएलसीसी ने केला.

आईबीएस पुणे द्वारा नवीन पीजीपीएम कोर्स सुरु

0
पुणे: आईसीएफएआई बिजनेस स्कूल (आईबीएस), पुणे ने  २०१८ ह्या चालु वर्षामध्ये पुन्हा एकदा ९९ टक्के प्लेसमेंट मिळविले आहे, ज्यात ९ अंतर्राष्ट्रीय प्लेसमेंटचा देखील समावेश आहे. आयबीएससाठी ही मोठी कामगिरी अाहे.  मागिल चार वर्षात १०० टक्के प्लेसमेंट मिळवून  आयबीेेएस ने उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
आयबीएस  २०१८-१९ च्या बॅच मध्ये  ५०० विद्यार्थी होते ज्यांना बॅंक आणि वित्तीय, कन्सलटन्सी,आयटी, सेल्स आणि मार्केटिंग अश्या अनेक क्षेत्रांमध्ये प्लेसमेंट मिळाले आहे. आयबीएसच्या विद्यार्थ्यांना अॅमेझॉन, केपीएमजी, एचडीएफसी, आईसीआईसीआई, स्टॅंडर्ड चार्टर्ड सारख्या कंपन्यांमध्ये उत्कृष्ट प्लेसमेंट मिळाले. आयबीएसच्या 2 वर्षाच्या पीजीपीएम कोर्स नंतर विद्यार्थ्यांना हे प्लेसमेंट मिळते .हा अभ्यासक्रम सटीक आहे.
पाठ्यक्रमास सरळ सोपे बनविण्यासाठी या अभ्यासक्रत प्रात्यक्षीक अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. या पाठ्यक्रमाचा मुख्य उद्येश्य भविष्यामध्ये  व्यवसाय करु इच्छीनार्या लोकांना कार्यात्मक आणि व्यवस्थापन क्षेत्राबद्दल  योग्य ज्ञान देने हा आहे. याचबरोबर त्यांना नवीनतम उपकरणे आणि तंत्रज्ञानाशी देखील अवगत केले जाते.
आयबीएसमध्ये शिकवण्याच्या पद्धतीमार्फत विद्यार्थ्यांना समस्येचे निराकरण करणे, तसेच व्यावसायिक जीवनात आव्हानांना सामोरे जाण्यास शिकवले जाते. याशिवाय, विद्यार्थ्यांना ‘ ‘सॉफ्ट स्किल’ देखील शिकवले जाते, हे ज्ञान भविष्यात उद्योग संघटनांशी संबंध स्थापित करण्यात मदत करते. याव्यतिरिक्त, आईबीएस मध्ये कम्युनिकेशन आणि प्रेजेंटेशन स्किल देखील शिकवले जाते.
आईबीएस पुणे  ह्या  कोर्स मध्ये 14 आठवड्यांचा समर इंटर्नशिप प्रोग्राम (एसआईपी) देखील समाविष्ट आहे. आईबीएस ने बनविलेल्या ह्या शिक्षणपद्धत्तीमुळे विद्यार्थ्यांचा प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास होण्यात मदत होईल. याच माध्यमातुन आईबीएस पुण्यातील विद्यार्थ्यांनी पुणे व  पुण्याबाहेरील खेळ, वाद-विवाद  आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बरेच पुरस्कार जींकले आहेत.