Home Blog Page 3052

पुण्याचे ‘जिजापूर ‘ आम्ही स्वागतच करू -आनंद दवे (ब्राम्हण महासंघ )

0

पुणे-जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे स्मारक शनिवारवाड्यावर व्हावे, अशी आमची आधीपासूनच मागणी आहे. तसेच ज्या पुणे शहराचे नाव पुण्येश्वर महादेवावरून पडले, अमृतेश्वर महादेवावरून पडले त्या दोन्ही ठिकाणी आता मुस्लीम समाजाने अत्याचार करत आणि जबरदस्तीने दर्गे बांधले आहेत. संभाजी ब्रिगेडला जर खरंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रेम असेल तर त्यांनी दर्गे उठवण्याची मागणी करावी, त्याला ब्राम्हण महासंघाचा पूर्ण पाठिंबा असेल, असे सांगत ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी ‘ जिजापूर नावाचे  आम्ही स्वागतच करू असे स्पष्ट केले आहे .

ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे म्हणाले, आतापर्यंत देशातील ज्या-ज्या शहरांची नावे बदलण्याची मागणी करण्यात आली, त्या देशांची नावे मुस्लीम आक्रमकांनी ठेवली होती. तेव्हा त्यांनी अत्याचार करत, जबरदस्ती करत ती नावे ठेवली होती. परंतु पुणे शहराचा इतिहास, पुणे शहराचे नाव तशा भुमिकेतून ठेवण्यात आलेले नाही. तरीही पुण्यातील जनतेचे जिजापूर या नावावर एकमत झाले तर या नावाचे आम्ही स्वागतच करु. आम्हीच (हिंदुत्त्ववाद्यांनी) सर्वप्रथम ही भूमिका मांडली होती.

धार्मिक उत्पात निर्माण करण्यासाठी शहरांची नावे बदलण्याची मोहीम -संजय सोनवणी

0
पुणे-धार्मिक उत्पात निर्माण करण्यासाठी  शहरांची नावे बदलण्याची मोहीम राबविली जात असल्याचा आरोप
इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांनी केला आहे .

या संदर्भात त्यांनी सांगितले की, मोदी सरकारने धार्मिक उत्पात निर्माण करण्यासाठी देशातील शहरांची नावे बदलण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतून सामाजिक आणि धार्मिक वातावरण बिघडवण्याचा सरकारचा हेतू आहे. देशात निर्माण झालेली ही नामांतराची लाट जर चांगल्या कारणांसाठी असती, प्रगतीसाठी, विकासाठी असती तर आपण त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहू शकलो असतो. खरे तर लोकांची मागणी असताना एखाद्या शहराचे नाव बदलणे हा भाग वेगळा, पण इथ उलटंच होत आहे. सरकार धार्मिक आणि राजकीय अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन शहरांची नावे बदलत असल्याचा आरोप सोनवणी यांनी केला.

पुणे शहराचे नाव जिजापूर करून संभाडी ब्रिगेडला काय फायदा होणार यावर  संजय सोनवणी म्हणाले, संभाजी ब्रिगेडसुध्दा आता राजकारणात उतरली आहे. त्यांच्या प्रकाशनात मागील अनेक वर्षांपासून पुणे शहराचे नाव जिजाऊनगर किंवा जिजापूर असेच छापत आले आहेत. अशात त्यांना ही राजकीय फायदा मिळवण्याची संधी वाटली. ही संधी खुद्द सरकारनेच त्यांना दिली. संभाजी ब्रिगेडचा आतापर्यंतचा इतिहास सर्वांनाच माहित आहे. त्यांनी आजवर सामाजिक सलोख्याच काम केलेलं आढळत नाही. अशा परिस्थितीत संभाजी ब्रिगेडने जी काही मागणी केली आहे. त्यांच्या या भूमिकेमागे केवळ राजकिय हेतू नाही तर त्यामागे सामाजिक तेढ निर्माण करण्याचे उद्दीष्ट तर नाही ना, अशी शंका येणे स्वाभाविक आहे.

दुष्काळामुळे उध्वस्त झालेले पुणे नव्याने वसविण्याचे काम जिजाऊंनी केले, हा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे पुण्यनगरीची निर्माती म्हणून जिजाऊंचे ऋण आहेतच. त्यांच्या या ऋणामध्ये पुण्यासह संपुर्ण महाराष्ट्रातील नागरिक आहेत. परंतु त्यासाठी नामांतर केले तरच जिजाऊंची महती वाढेल, या मताशी सहमत नसल्याचे संजय सोनवणी यांनी शेवटी सांगितले.

पुण्याचं नाव ‘जिजापूर ‘ करा -संभाजी ब्रिगेड ने दिले लेखी निवेदन

0

पुणे – पुण्याचे नाव बदलून जिजामातेवर आधारित जिजापूर असे पुण्याचे नव्याने नामकरण करा अशी मागणी करणारे निवेदन
आज  उपजिल्हा अधीकारी जयश्री कटारे यांना संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाच्या वतीनेदेण्यात आले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद आणि फैजाबाद या शहराची नावे बदलून अनुक्रमे प्रयागराज आणि अयोध्या अशी ठेवली आहेत. यानंतर देशातील विविध शहरांची नावे बदलण्याचा जणू ट्रेंड सुरु झाला आहे. अहमदाबाद, हैद्राबाद, आग्रा यासह औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावे बदलण्याचीही मागणी जोर धरू लागली आहे. असे असतानाच पुणे शहराचेही नाव बदलून जिजापूर करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली. यावर शहरातील तज्ज्ञांनी तसेच नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी पुणे शहराला जिजाऊंचा वसा व वारसा आहे. हे शहर राष्ट्रमाता जिजाऊंनी सोन्याचा नांगर चालवून वसवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही सर्व खजिना खाली करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुणे शहराचे नाव बदलून जिजापूर ठेवावे, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर पुणे शहराविषयी अस्था असणारे, इतिहास संशोधक आणि नारिकांमध्ये एकच चर्चा सुरु झाली आहे.

सीएनजी कार करा इलेक्ट्रिककार , एका चार्जिंगमध्ये १५० किलोमीटर रनिंग

0

नवी दिल्ली – देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि त्यामुळे होणा-या प्रदूषणामुळे विद्युत वाहनांच्या वापरावर जोर दिला जात आहे. केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती आणि विक्रीवर सवलत देत आहे. जेणेकरुन अधिकाधिक लोक याचा वापर करतील. परंतु भारतासारख्या देशात प्रत्येकालाच नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करणे शक्य नाही. अशातच तेलंगानाची स्टार्टअप E Trio ने हे काम सोपे केले आहे.

एकदा चार्जिंग केल्यानंतर चालेल 150 किमी
आता भारतात Maruti Suzuki आणि WagonR सारख्या कारमध्ये इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला जाऊ शकतो. तेलंगाना टुडेमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ही गाडी एकदा चार्जि़ंग केल्यानंतर 150 किमी पर्यंत चालू शकते. इलेक्ट्रिक किट पूर्णपणे सेफ्टी स्टँडर्ड सोबत तयार केले असल्याचा कंपनीचा विश्वास आहे. ही इलेक्ट्रिक कार कोणत्याही वेळी चार्ज केले जाऊ शकते. तसेच त्याचा मेंटनंस पेट्रोल कारपेक्षा कमी येईल.

भारतातील पहिली अशी कंपनी
E Trio कंपनीत इलेक्ट्रिक किट स्थापित करण्याचा पर्याय देते. भारत सरकारच्या वतीने हे काम करण्याची परवानगी देण्यात आलेली E Trio भारतातील अशी पहिलीच कंपनी आहे. कंपनीला सरकारी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशनच्या वतीने मान्यता मिळाली आहे. प्रत्येक महिन्यात इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी किट स्थापित करून 1500 कार तयार करण्याची आमची क्षमता असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

चीन आणि जपान मधून येणार इलेक्ट्रिक किट 

या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक किटला चीन आणि दक्षिण कोरियामधून मागवण्यात येणार आहे, तर कंट्रोलरची निर्मिती स्वत: कंपनी करणार आहे. कंपनी अशाप्रकारची कार बनविण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून टेस्टिंग करत आहे. स्टार्टअप आधारित E Trio कंपनी विद्युत किट स्वस्त आणि अधिक प्रभावी बनविण्यासोबतच बॅटरी चार्जिंग वेळ 25 मिनिटे करण्यावर काम करत आहे. या बाबतीत त्यांची जपानी आणि थाई कार निर्मात्यांशी चर्चा सुरू आहे.

क्रिआ युनिव्हर्सिटीतर्फे दलाई लामा सेंटर फॉर एथिक्स अँड ट्रान्स्फर्मेटिव्ह व्हॅल्यूजबरोबर भागीदारीची घोषणा

0

क्रिआ युनिव्हर्सिटीचा अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रमामध्ये नीतिमूल्ये गुंफण्याचा निर्णय  

चेन्नईक्रिआ युनिव्हर्सिटी आणि दलाई लामा सेंटर फॉर एथिक्स अँड ट्रान्स्फर्मेटिव्ह व्हॅल्यूज (“द सेंटर”) यांनी क्रिआ युनिव्हर्सिटीच्या अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी मूल्यशिक्षणाचा अनुभव नव्याने घेण्यासाठी व सह-निर्मित करण्यासाठी आज चेन्नई येथे औपचारिक करार केल्याचे जाहीर केले आहे. क्रिआ युनिव्हर्सिटी अतिशय क्लिष्ट व अनिश्चित विश्वामध्ये भविष्यातील नेतृत्व घडवण्यासाठी नैतिक कारणमिमांसा व निर्णयप्रक्रिया यांचा चालना देण्यावर भर देत आहे. हे सेंटर क्रिआला अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण एथिक्स अभ्यासक्रम समाविष्ट करण्यासाठी मदत करणार आहे.

क्रिआ युनिव्हर्सिटी ही लिबरल आर्ट्स अँड सायन्सेस युनिव्हर्सिटी ऑगस्ट 2019 पासून, अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी पहिल्या बॅचच्या क्लासना सुरुवात करणार आहेत. क्रिआ सुसूत्र शिक्षणाचा पायंडा पाडत आहे – कलेची सांगड शास्त्रांशी घालत आहे आणि इंटलेक्च्युअल इन्क्वायरीची सांगड प्रायोगिक शिक्षणाशी घालत आहे. क्रिआच्या सुसूत्र शिक्षणाच्या दृष्टिकोनामध्ये नीतिमूल्यांचे शिक्षण अविभाज्य भाग ठरणार आहेत, कारण क्रिआच्या शैक्षणिक समितीने तयार केलेल्या अभ्यासक्रमाच्या आठ मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नीतिमूल्ये हा एक भाग आहे. सर्व अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी नीतिमूल्ये हे बंधनकारक स्किल कोर्स म्हणून प्रस्तावित आहे.

यानिमित्त बोलताना, क्रिआ युनिव्हर्सिटीचे कुलगुरू सुंदर रामस्वामी यांनी सांगितले, “या भागीदारीमुळे क्रिआमधील तरुणांना नैतिक प्रश्नांबद्दल विचार करता येईल, उद्देश शोधता येईल व त्यांच्या कृतीचा समाजावर होणारा परिणाम समजून घेता येईल”. दलाई लामा सेंटरचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी व्हेनरेबल तेनझिन प्रियदर्शी यांनी सांगितले, “सध्याच्या आव्हानात्मक काळामध्ये, नव्या पिढीतील तरुण नेतृत्व घडवत असताना, शिक्षणाच्या केंद्रस्थानी नैतिक शिक्षण व नेतृत्व समाविष्ट करण्यास मदत करण्याच्या दृष्टीने ही दोन्ही संस्थांसाठी विशेष संधी आहे. नीतिमूल्ये ही केवळ एक विषय म्हणून शिकवली जाऊ नयेत, तर अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमामध्ये, तसेच क्रिआच्या मूल्यांमध्ये व संस्कृतीमध्येही ती विविध स्वरूपांमध्ये समाविष्ट करावीत.” क्रिआ युनिव्हर्सिटीमध्ये व्हेनरेबल तेनझिन प्रियदर्शी हे प्रॅक्टिस इन ह्युमॅनिटीजचे व्हिजिटिंग प्रोफेसर असणार आहेत.

दे सेंटर पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला, क्रिआ शिक्षकांबरोबर एथिकल लर्निंग व शिक्षणशास्त्र यावर सत्रे सुरू करणार आहे. अभ्यासक्रमातील नीतिमूल्यांच्या पलीकडे, क्रिआ युनिव्हर्सिटी एक संस्था म्हणून उच्च नैतिक मापदंड निर्माण करणे कायम ठेवणार आहे.

दलाई लामा सेंटर फॉर एथिक्स अँड ट्रान्स्फर्मेटिव्ह व्हॅल्यूज जीवनातील नैतिक व माणुसकीच्या पैलूंविषयी चौकशी, संवाद व शिक्षण यासाठी समर्पित आहे. सहयोगात्मक व निःपक्षपाती संस्था म्हणून, द सेंटरचा भर विज्ञान व तंत्रज्ञान ते शिक्षण व आंतरराष्ट्रीय संबंध अशा विविध विषयांतील आंतरशाखीय संधोधन व कार्यक्रमांचा विकास यावर असतो. आमचे कार्यक्रम जबाबदारीवर लक्ष केंद्रित करतात आणि व्यक्ती, संस्था व समाज यांच्यातील यथार्थता व नौतिक उद्देश यांचे परीक्षण करतात.

दलाई लामा व आर्कबिशप एमेरिटस देसमंड तेतू यांच्यासह शांततेच्या नोबेल पुरस्काराचे सहा मान्यवर द सेंटरचे संस्थापक राहिले आहेत. 2009 मध्ये, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी येथे स्थापना झाल्यापासून, द सेंटरचे कार्यक्रम 8 देशांमध्ये विस्तारण्यात आले आहेत.

देशातील काही सर्वोत्तम व्यक्ती व विचारवंत यांचा पाठिंबा असलेल्या क्रिआ युनिव्हर्सिटीचा (www.krea.edu.in) उद्देश उच्च क्षमता असणाऱ्या व्यक्तींना वैविधपूर्ण व परिवर्तनशील विश्वात सकारात्मक, मार्गदर्शक परिणाम नैतिक पद्धतीने निर्माण करणे शिकता येणार आहे. विश्लेषणात्मक विचार, नीतिमूल्ये, क्वांटिटेटिव्ह रिझनिंग व संवाद या बाबताती उत्तम कौशल्यांबरोबरच, येथे सर्व शाखांमध्ये 3 वर्षांच्या निवासी बी. ए. (ऑनर्स) व बी. एससी. (ऑनर्स) पदवी उपलब्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचसाठी प्रवेशप्रक्रिया 1 नोव्हेंबर 2018 रोजी सुरू होणार आहे.

शनिवारवाड्याजवळील देशपांडेवाड्याला अाग

0

पुणे-शनिवारवाड्याजवळील देशपांडे वाड्यात अाज संध्याकाळी 6.30 च्या सुमारास अाग लागली. या अागीत घरातील सामान जळून खाक झाले. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. 20 ते 25 मिनिटात अाग अाटाेक्यात अाणण्यात अाली. या अागीत कुठलीही जिवीत हानी झाली नाही. 

    कसबा अग्निशमन केंद्राचे स्टेशन अाॅफिसर रवींद्र अाढाव यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारवाड्याजवळील देशपांडे वाड्याला अाग लागली हाेती. अाग लागली तेव्हा घरात काेणी नव्हते. घरातील सर्वजण खरेदीसाठी बाहेर गेले हाेते. देवा समाेर लावलेल्या दिव्याच्या संपर्कात पडदा अाल्याने अाग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत अाहे. अग्निशमन दलाला अागीची माहिती मिळताच कसबा अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वाडा बंद असल्याने कुलुप ताेडून जवानांनी वाड्यात प्रवेश केला. पाण्याचा मारा करत 20 ते 25 मिनिटात अाग अाटाेक्यात अाणण्यात अाली. 

    दरम्यान या अागीत कुठलिही जिवीत हानी झाली नसली तरी घरातील सामान जळून खाक झाल्याने माेठ्याप्रमाणावर अार्थिक नुकसान झाले अाहे. 

पुणे लोकसभा – कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची ‘गुप्तगू’ गुलदस्त्यातच …(व्हिडीओ)

पुणे-पुणे लोकसभेच्या कॉंग्रेसच्या पारंपारिक  जागेवर राष्ट्रवादी ने आग्रह धरल्यानंतर ,कॉंग्रेस राष्ट्रवादी ची आघाडी होऊनहीआणि शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण पुण्यातून लढणार नाहीत हे स्पष्ट झाल्यावरही … पुण्याची जागा कोणाच्या पारड्यात पडणार ? उमेदवार आयात करणार काय ? असे सारे प्रश्न … आजही गुलदस्त्यातच उरल्याचेच स्पष्ट झाले आहे . मात्र भाजपला चीतपट करणारच उमेदवार इथे दिला पाहिजे असा आग्रह धरला जात असल्याचे हि स्पष्ट झाले आहे . आज येथे  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेनंतर या बाबी स्पष्ट झाल्या    .
केंद्र सरकारने नोटाबंदी घेतलेल्या निर्णयाला दोन वर्ष पूर्ण झाळे. आणि ‘तो’काळा दिन कॉंग्रेसे घोषित केला आहे.या निमित्ताने  आज पुण्यात काँग्रेस भवन येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, कमल व्‍यवहारे,ॲड. अभय छाजेड, अरविंद शिंदे, आबा बागुल, नीता रजपूत, रशिद शेख, शिवाजी केदारी, सदानंद शेट्टी,गोपाळ तिवारी, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, अविनाश बागवे, अजित दरेकर, वैशाली मराठे, रफिक शेख,मनीष नंद, दत्ता बहिरट, शेखर कपोते, नरेंद्र व्‍यवहारे, सोनाली मारणे, सुजित यादव, राजेंद्र भुतडा, सतिशपवार, प्रविण करपे, सुनिल घाडगे, प्रदिप परदेशी, सुरेखा खंडागळे, द.स.पोळेकर, चेतन आगरवाल, बंडूनलावडे, बाळासाहेब अमराळे, रवि ननावरे, प्रकाश आरणे, दिपक ओव्‍हाळ, रामविलास माहेश्र्वरी, संजयखडसे, अविनाश अडसुळ, प्रशांत वेलणकर, राहुल तायडे, नदिम मुजावर, चैतन्य पुरंदरे, साहिल राऊत, देवीदासमगर, विनय ढेरे, हेरॉल्ड मॅसी, प्रशांत सुरसे, सुनिल पंडित, रवि पाटोळे, सेल्वराज ॲथोनी, बाबा शेख, प्रकाशपवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका देखील केली. तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी बाबत त्यांनी भूमिका देखील मांडली.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी शहरांच्या नाव बदलण्याच्या सरकारांच्या भूमिकेवर टीका केली आहे. विकासाच्या अजेंड्यावर सरकार सत्तेवर आलंय. त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाचा वापर सुरू आहे. अशा प्रकारचे काम सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित आहे. पुण्याचं नाव बदलून इतिहास पुसण्याचे काम कोणीही करू नये. तुम्हाला इतिहासाची लाज वाटते का?, असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.  आता पुण्याचे नाव बदलण्याची मागणी होत आहे. त्यांनी एवढे लक्षात ठेवावे की, इतिहास पुसण्याचे काम करू नये. तुम्हाला इतिहासाची लाज वाटते का ? अशा शब्दात राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाण साधला.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र लढणार का? मनसे ला बरोबर घेणार का या प्रश्नावर चव्हाण म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित लढणार असून जागा वाटपा बाबत सकारात्मक चर्चा देखील झाली असून पुढील बैठक मुंबई मध्ये या आठवड्यात होणार आहे. तसेच आम्ही एमआयएम आणि  मनसे ला सोबत घेणार नाही. मात्र प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेण्यास तयार असून त्यांच्यासाठी काही जागा सोडण्यास तयार असल्याची भूमिका त्यांनीपुन्हा मांडली

तुम्ही पुण्यातून लोकसभेची जागा लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रश्‍नावर ते म्हणाले की, मी कराड दक्षिण मधून विधानसभा निवडणूक लढवणार पुण्यातून मी अजिबात इच्छुक नसून पुण्यातील लोकसभेची जागा कोण लढविणार हे ठरले नसल्याचे त्यांनी सांगितले.
अवनी वाघिणी मृत्यू प्रकरणावरून राज्य सरकार वर सर्व स्तरातून लक्ष केले जात आहे. त्यावर ते म्हणाले,अवनी वाघिणी ला बेशुद्ध करण्याची आवश्यकता होती. मात्र या सरकारने तिचा फेक एनकाऊंटर केला. अशा शब्दात भाजप सरकार वर त्यांनी सडकून टीका केली.

 

नोटबंदी म्हणजे मोदी नावाच्या हिटलरशाहीने भारतीय जनतेची केलेली छळवणूक- पृथ्वीराज चव्हाण

पुणे-गेल्या ८ नोव्‍हेंबर २०१६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुघलकी निर्णय घेऊन या देशातील
चलनात असलेल्या ५०० व १,००० रूपयांच्या नोटा एका रात्रीत बंद केल्या. त्यावेळी देशाच्या हितासाठी
दहशतवाद विरोधी कारवाई करणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी, खोट्या नोटा छापणाऱ्यांना जरब बसण्यासाठी,
व काळ्या पैशाचा नाश करण्यासाठी ही नोटबंदी करत असल्याचे त्यांनी तेव्हा  सांगितले परंतु असे काहीही न
घडता हा निर्णय पूर्णपणे चूकीचा ठरला. यामुळे देशाची अर्थव्‍यवस्था पूर्णपणे विस्कळित झाली आहे. या उलट
या देशामध्ये बँकासमोर मोठ मोठ्या रांगा लागून सर्वसामान्य जनतेचे हाल होऊन त्यामध्ये १५० च्या वर
निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. २ वर्षांनी या देशामधील लघुउद्योजक, छोटे व्‍यापारी हे
देशाधडीला लागले असून कामगारांना सगळ्यात मोठा फटका या नोटबंदीमुळे बसला आहे. देशातील सर्वात
मोठा शेतकरी वर्ग या नोटबंदीमुळे आत्महत्या करण्यापर्यंत प्रवृत्त झाला आहे. या सर्व कारणांमुळे निषेध
व्‍यक्त करण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज बाटा चौक, कॅम्प, पुणे येथे महाराष्ट्र
राज्याचे माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्‍हाण यांच्या नेतृत्वाखाली व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे
अध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली धरणे – आंदोलन करण्यात आले.
यावेळी,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्‍हाण म्हणाले की, ‘‘८नोव्‍हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान मोदीनी नोटबंदीचा

निर्णय घेतला. या निर्णयाचे दुष्परिणाम आजही देशाची जनता  भोगत आहे. सन २०१४ पर्यंत मनमोहन सिंग यांचे

सरकार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रगती
केली. देशाची अर्थव्‍यवस्था सुरळीत होती आणि जी.डी.पी. ही वाढलेले होते. देशाचे अर्थमंत्री अरूण जेठली हे
वारंवार नोटबंदीचे समर्थन करीत आहे परंतु आजपर्यंत या नोटबंदीमुळे देशाची किती प्रगती झाली हे सांगण्यात
अपयशी ठरले. नोटबंदीच्या निर्णयाच्या ४ तास पूर्वी रिझर्व बँक बोर्डच्या बैठकीत नोटबंदी करू नये व
देशाच्या अर्थव्‍यवस्थेसाठी घातक आहे असा सल्ला दिलेला असताना देखील मोदी, जेठली व अमित शहा
यांच्या त्रिकुटाने हा निर्णय सर्वसामान्य भारतीयांवर लादला.
जनतेची दिशाभुल करण्यासाठी मोदी सरकारने अनेक कल्याणकारी योजनांच्या घोषणा केल्या. या
कल्याणकारी योजनांसाठी आर्थिक तरतुद केलेली नाही. निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन या योजनांच्या घोषणा
करण्यात आल्या. या योजनांसाठी रिझर्व बँकेकडून साडे तीन लाख कोटी रूपये घेण्याचे प्रयत्न मोदी सरकार
करीत आहे. रिझर्व बँकेचे गव्‍हर्नर उर्जित पटेल यांनी पैसे देण्याच्या संदंर्भात आपली असमर्थता दाखविली
आहे. मोदी सरकार रिझर्व बँकेची सायत्ता संपविण्याचे प्रयत्न करीत आहे. अशा पध्दतीने सरकार रिझर्व बँकेचा
अधिकार काढून आपल्या फायद्यासाठी सर्व अधिकार आपल्याकडे ओढून घेत आहे.

रिझर्व बँकेचे माजी गव्‍हर्नर रघुराम राजन यांनी सुध्दा सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाच्या विषयावर
टिका केली आहे. असे असताना सुध्दा मोदी सरकार देशाच्या जनतेला चूकीची माहिती देत आहे. येणाऱ्या
आगामी निवडणुकीत जनता त्यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.’’
यानंतर शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘नोटबंदीमुळे समाजाच्या प्रत्येक घटकाला फटका बसला
आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे, बाजारात मंदी आहे. दैनंदिन मजूरी करून आपले पोट भरणाऱ्या मजूराला
काम नाही आणि मोदी सरकार अच्छे दिन आले म्हणून दिंडोरी पिटवित आहे. अशा या हिटलरशाही सरकारला
जनता पराभूत केल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, कमल व्‍यवहारे,
ॲड. अभय छाजेड, अरविंद शिंदे, आबा बागुल, नीता रजपूत, रशिद शेख, शिवाजी केदारी, सदानंद शेट्टी,
गोपाळ तिवारी, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, अविनाश बागवे, अजित दरेकर, वैशाली मराठे, रफिक शेख,
मनीष आनंद, दत्ता बहिरट, शेखर कपोते, नरेंद्र व्‍यवहारे, सोनाली मारणे, सुजित यादव, राजेंद्र भुतडा, सतिश
पवार, प्रविण करपे, सुनिल घाडगे, प्रदिप परदेशी, सुरेखा खंडागळे, द.स.पोळेकर, चेतन आगरवाल, बंडू
नलावडे, बाळासाहेब अमराळे, रवि ननावरे, प्रकाश आरणे, दिपक ओव्‍हाळ, रामविलास माहेश्र्वरी, संजय
खडसे, अविनाश अडसुळ, प्रशांत वेलणकर, राहुल तायडे, नदिम मुजावर, चैतन्य पुरंदरे, साहिल राऊत, देवीदास
मगर, विनय ढेरे, हेरॉल्ड मॅसी, प्रशांत सुरसे, सुनिल पंडित, रवि पाटोळे, सेल्वराज ॲथोनी, बाबा शेख, प्रकाश
पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार मेधा कुलकर्णींच्या आवाजात ऐका ही कविता…

0

पुणे- कोथरूडच्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी दिवाळीच्या धामधुमीत एका कार्यक्रमात एक कविता गाऊन सादर केली आणि तिला प्रेक्षकांनी भरभरून  दाद दिली ..आपण ऐकली नसेल तर ऐका  ही कविता प्रत्यक्षात आमदार कुलकर्णींच्या आवाजात  ….

पुण्याचं नाव ‘जिजापूर ‘ करा – संभाजी ब्रिगेड

0

पुणे-राज्य सरकारने… औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर, उस्मानाबाद जिल्ह्या’चे धाराशीव व पुणे शहराचे ‘जिजापुर…’ हे जिल्हा नाव बदल करावे. कारण पुणे शहराला जिजाऊंचा वसा व वारसा आहे. हे शहर राष्ट्रमाता जिजाऊंनी सोन्याचा नांगर चालवून वसवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व खजिना खाली करून आपल्या ‘शेतकऱ्यांना कर्ज मुक्त केले.’ म्हणून पुण्याचे नाव ‘जिजापुर’ केलेच पाहिजे.अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत आपण सोमवारी निवेदन देणार असल्याच त्यांनी म्हटलं आहे .

‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ १६ नोव्हेंबरला चित्रपटगृहात

0

पसायदानात एक ओळ आहे, ‘भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे’… हे दोन जीवांचे मैत्र… मग ते दोन जीव म्हणजे दोन माणसं असतील किंवा माणूस आणि प्राणी असेल…. वेगवेगळ्या प्राण्यांना घेऊन बॉलीवूड आणि हॉलिवूडमध्ये वेगवेगळे चित्रपट केले जातात मात्र मराठी चित्रपटसृष्टीत असे चित्रपट पहायला मिळणं तसं दुर्मिळच. मात्र आता प्राणीप्रेमावर आधारलेला ‘अआइई एन्टरटेंन्मेंट’ निर्मित व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट हा मराठी चित्रपट १६ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत  आहे.

निसर्गरम्य माथेरानमध्ये पर्यटकांना घोड्यावरून सैर घडवून आणणारे बाबू पवार त्यांची पत्नी, मुलगा चिनू, मुलगी तेजू यांच्या चौकोनी कुटुंबात ‘व्हॅनिला’चं आगमन होतं. या कुटुंबाची ‘व्हॅनिला’ सोबतच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटातून आपल्याला पहायला मिळणार आहे. माथेरानमधल्या ग्रामपंचायतीच्या शाळेत शिकणारी मुलगी आणि त्याच शाळेच्या आवारात राहणारी ‘व्हॅनिला’, या दोघींच्या आयुष्याभोवती या चित्रपटाची कथा गुंफलेली आहे. ‘व्हॅनिला’ आणि तेजू यांच्या सुरेख नात्याची गुंफण दाखवतानाच मुक्या जीवांच्या रक्षणाचा मुद्दा हा चित्रपट अधोरेखित करतो. चित्रपट माध्यमातून हा मुद्दा ठळकपणे समाजापुढे येईल या उद्देशाने या चित्रपट निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याचं दिग्दर्शक गिरीश विश्वनाथ सांगतात.

या चित्रपटाची खासियत म्हणजे माथेरानसारख्या नयनरम्य ठिकाणी चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण करणारा व्हॅनिला स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट हा पहिलाच चित्रपट आहे. माथेरानची भौगोलिक परिस्थिती सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या या थंड हवेच्या ठिकाणी कोणतेही वाहन नेण्यास मज्जाव आहे त्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण हे संपूर्ण टीमसाठी आव्हानात्मक होतं. चित्रीकरणाच्यावेळी व्हॅनिटी व्हॅन तर सोडाच पण चित्रीकरणस्थळी जाण्यासाठीही कलाकार व तंत्रज्ञांना पायी चालत जावे लागायचे, तरीही हे आव्हान टीमने पेललं आणि यशस्वीरित्या चित्रीकरण पूर्ण केलं.

या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक गिरीश विश्वनाथ आणि त्यांची लेक अभिनेत्री जानकी पाठक चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. या सिनेमाची निर्मिती गिरीश विश्वनाथ यांची आहे. कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व दिग्दर्शन अशी सगळी जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. नवोदित अभिनेत्री जानकी पाठक, रवी काळे, राजश्री निकम, राधिका देशपांडे, क्षितीज देशपांडे, विनोद जाधव या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.

या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते डॉ. सुनील निचलानी आहेत. संकलन सागर भाटिया तर छायांकन सचिन खामकर यांचे आहे. संगीत शंतनू नंदन हेर्लेकर यांचे असून जावेद अली, उपग्ना पंड्या, ऋतुजा लाड यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. सहदिग्दर्शन निलेश देशपांडे यांचे आहे.

१६ नोव्हेंबरला व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आरोग्य कर्मचार्‍याना साडी, कपडे, मिठाई वाटप

0
पिंपरी –
ऊन, थंडी आणि पावसाची तमा न बाळगता परिसर स्वच्छता करण्याचे काम सफाई कर्मचारी वर्षभर अविरतपणे करतात. स्वच्छता हे समाजाच्या प्रगतीचे मूळ असून, सार्वजनिक स्वच्छता ठेवणार्‍यांचा सन्मान व्हायला हवा, या उद्देशाने मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दिवाळीनिमित्त आरोग्य कर्मचार्‍यांना साडी, कपडे आणि मिठाई वाटप करण्यात आले. प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, ह.भ.प. बब्रुवान वाघ महाराज, ह.भ.प. शिवानंद महाराज यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.
पिंपळे गुरव येथील ट्रस्टच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, नगरसेवक बाबा त्रिभुवन, सचिव सूर्यकांत कुरुलकर, माधव मनोरे, भैरुजी मंडले, अदिती निकम, नितीन चिलवंत, मुंजाजी भोजने, बळीराम माळी, पंडित किनीकर, अभिमन्यु गाडेकर, वामन भरगंडे, दत्तात्रय धोंडगे, प्रभाकर साळुंके, अनिसभाई पठाण, महादेव बनसोडे, विजय सोनवणे, मारुती बानेवार, दिनेश गाडेकर, किसन फसके, बिरु व्हनमाने, बाळासाहेब काकडे, हरिभाऊ पाटील, सुनिल काकडे, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरीक संघ, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरीक संघ, भैरवनाथ ज्येष्ठ नागरीक संघाचे सदस्य, केशव बोदले, उमाकांत तळवडे, किशोर आटरगेकर, मल्लपा म्हेत्रे, अशोक पाटील, अंकुश बिरादार, राजेश गाटे, संतोष आरगुलवाड, विजय वडमारे आदी उपस्थित होते.
बब्रुवान वाघ महाराज म्हणाले, सण-उत्सवांच्या काळात स्वच्छता कर्मचार्‍यांची खरी परीक्षा असते. स्वत:च्या घराची स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता हे ते दिव्य पार पाडतात. जेथे स्वच्छता असते, तेथेचे लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे इथल्या स्वच्छतेचे श्रेय स्वच्छता कर्मचार्‍यांना जाते. त्यामुळे अरुण पवार यांनी या सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून दीनदुबळ्याची सेवा केली आहे. दिवाळी सर्वजन साजरी करतात, पण जे खरे कष्टकरी असतात, त्यांची दिवाळी अगोदर साजरी झाली पाहिजे, असा उद्देश ठेवून अरुण पवार अशा कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी करीत असतात. समाजातील
एकनाथ पवार म्हणाले, दिवाळीसारख्या सण-उत्सवाच्या काळात स्वत:च्या घरापेक्षा शहराच्या विविध भागात सफाई करणार्‍या स्वच्छता कर्मचार्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेला सन्मान सोहळा कौतुकास्पद आहे.
दरम्यान, सुनील काकडे यांची ह्युमन राईट फोरमच्या पुणे जिल्हा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच बिदर जिल्हा मित्र मंडळातर्फे पाठविण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप कामगारांच्या मुलांना करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय धोंडगे यांनी, तर सूर्यकांत कुरुलकर यांनी आभार मानले.

दत्तात्रय वळसे पाटील सुपर स्पेशालिटी आय केअर हॉस्पिटलचे शरद पवारांनी केलं उदघाटन

0

पुणे -महापालिका व व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन तर्फे बोपोडी येथे भाऊ पाटील रस्त्यावर बांधण्यात आलेल्या दत्तात्रय वळसे पाटील सुपर स्पेशालिटी आय केअर हॉस्पिटल या डोळ्यांच्या हॉस्पिटल चे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज रविवारी सायंकाळी झाले याप्रसंगी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील, डॉ अंबरीश दरक, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील उपस्थित होते यावेळी श्री शरद पवार यांनी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपकरणे नवीन तंत्रज्ञान सुविधा ची पाहणी केली.

नगरसेविकेच्या मुलाविरुध्द मारहाणीचा गुन्हा दाखल

0

पुणे- कॅन्टोमेंन्ट बोर्डाच्या महिला नगरसेविकेच्या मुलासह पाच जणांवर लष्कर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. एका मोबाईलचे कव्हर विकणाऱ्यास त्याचा स्टॉल हलवण्यासाठी त्यांनी मारहाण केली होती. यापैकी नगरसेविकेच्या मुलासह चौघांना अटक करण्यात आली आहे.
स्वप्निल शैलेंद्र बिडकर(21), किरण सुर्यकांत बिडकर, स्वप्निल बाळु नायकु(22), शुभम गणेश चवंडके(22,रा.सर्व लष्कर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर निलेश संजय झारखंडे याच्याविरुध्दही गुन्हा दाखल आहे.
याप्रकरणी कादीर शाह(24,रा.भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानी दिलेल्या फिर्यादीनूसार तो मोबाईल कव्हरचे स्टॅंन्ड लावून लष्कर परिसरातील अरोरा टॉवर येथे व्यवसाय करतो. शनिवारी दुपारी स्वप्निल बिडकर याने त्याला मोबाईलवर फोन करुन मी नगरसेविकेचा मुलगा बोलत आहे, तुझ्या स्टॅंड जवळची बॅग बाजूला कर माझ्या मित्राचा स्टॉल तेथे लावायचा आहे असे सांगितले. यावर फिर्यादीने धंदा असल्याने बॅग सतत जवळ ठेवावी लागते, ती बाजुला ठेऊन चालणार नाही असे स्पष्ट केले. यावर स्वप्निलने त्याला शिवीगाळ केली. यानंतर साथीदारांना घेऊन तो फिर्यादीकडे आला. तेथे वाद घालून फिर्यादीला लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यानंतर किरण व स्वप्निल बिडकर यांनी फिर्यदीच्या डोक्‍यावर कठीण वस्तूने फटका मारला. यामध्ये फिर्यादी जखमी झाल्यावर सर्वजण तेथून पळुण गेले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पी.जी.गज्जेवार करत आहेत.
यासंदर्भात पोलिसांनी माहिती देताना सांगितले की स्वप्निलची आई कॅन्टोमेंट बोर्डामध्ये विद्यमान नगरसेविका असून त्याचे वडिल माजी नगरसेवक होते.

‘पवारांना’ पुण्याने काय दिले – शरद पवारांची खंत

पुणे -शहरातील एसपी कॉलेजच्या इमारतीसह इतरही अनेक महत्त्वाच्या वास्तू नरहर गणपत पवार या वास्तूविशारदाने बांधल्या आहेत. पण, पुण्याने पवारांना काय दिले, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची आज सुधीर गाडगीळ यांनी मुलाखत घेतली. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, ‘माणदेशाने महाराष्ट्राला ग.दि. माडगूळकरांचे साहित्यिक दिले. मात्र माफ करा पुण्याने त्यांचा सन्मान केला नाही. म्हणून मी बारामतीला ग. दी माडगूळकर या नावाने मोठं सभागृह बांधलं.’

पुणे शहराविषयीच्या जुन्या आठवणींना शरद पवार यांनी मुलाखती दरम्यान उजाळा दिला. या मुलाखतीत आता पुण्याचे नेतृत्व करायला आवडेल का?, असा प्रश्न सुधीर गाडगीळ यांनी केला असता. त्यावर आता निवडणूक नाही असे सांगत पवारांनी उत्तर देणे टाळले.

पुण्यात शिक्षण घेताना विविध महाविद्यालयीन निवडणुका पवार पॅनेलच्या माध्यमातून लढवल्या आणि जिंकल्याही. या निवडणुकीमध्ये विशेषत ग्रामीण भागातील विद्यार्थी असायचे. तेव्हापासून आजपर्यंत संघटन करण्याचे काम केले. आज राजकारणातील कारकिर्दीला 52 वर्षे पूर्ण होत असून पुण्याच्या त्या निवडणुका हाच त्याचा पाया आहे.

जुन्या पुणे शहराच्या छायाचित्रांचे कॉफीटेबल बुक ‘पुणे एकेकाळी ‘आणि स्मरणरम्य दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘आठवणीतले पुणे’ या विषयावर सुधीर गाडगीळ यानी शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांनी महा विद्यालयीन जीवनापासून आज अखेर पर्यंतच्या पुणे शहरातील अनेक आठवणीना उजाळा देखील दिला. तर यावेळी लेखक मंदार लवाटे, पेपरलीफचे संस्थापक जतन भाटवडेकर उपस्थित होते.

शरद पवार यांनी पानशेत धरण फुटल्याने झालेल्या नुसकानीच्या आठवणीला उजाळा दिला. शरद पवार यांना शिकवायला असलेले शारीरिक शिक्षणाचे शिक्षक त्याचे घर पानशेतच्या पुरात वाहून गेले होते. सर रोज रडत बसत असत तेव्हा त्यांना मुले धीर देण्यासाठी समजुतीचे संवाद करत असत. तेव्हा सर मुलांना म्हणाले कि मला घर बुडाल्याचे दुःख झाले नाही, तर पुराच्या पाण्यात जर्मनी ऑलंपिकमध्ये मिळालेले पदक वाहून गेले आहे त्याचे दुःख मला झाले आहे. यातून सरांची असलेले खेळा संदर्भातील प्रेम आणि राष्ट्रभक्ती दिसून आली, असे शरद पवार म्हणाले.

पुण्यातील कोणते पदार्थ तुम्हाला आवडतात असे श्रीनिवास पाटील यांना मुलाखतकारांनी विचारले असता पाटील यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली कि, मला एस पी कॉलेज समोरील चहा, बटाटे वडे खायला आवडतात. तेव्हा शरद पवार मधेच म्हणाले ‘पाटील कासमचा खिमा विसरलात का?’ या वाक्या बरोबर सभागृह हास्य कल्लोळात नाहून गेले. यावेळी या दोन्ही नेत्यांनी महाविद्यालयीन जीवनापासून आज अखेर पर्यंतच्या पुणे शहरातील अनेक आठवणीना उजाळा देखील दिला. शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांची आजची मुलाखत म्हणजे पुणेकरांसाठी पर्वणीच होती.