Home Blog Page 3047

‘फिनोलेक्स इंडस्ट्रीज’तर्फे दुबईमध्ये सहयोगींचा मेळावा

0

राहत फतेह अली खानच्या संगीत मैफलीच्या निमित्ताने 600 जणांना कंपनीतर्फे परदेशीवारी

पुणे : पीव्हीसी पाईप्स व फिटिंग्ज यांची देशातील आघाडीची कंपनी असलेल्या फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि.ने दुबईमध्ये आपल्या प्रमुख वितरकांचा व सहकाऱ्यांचा मेळावा नुकताच आयोजित केला. दोन दिवसांच्या या मेळाव्यात कंपनीचे वितरक आपल्या कुटुंबियांसमवेत सहभागी झाले होते.

फिनोलेक्स कंपनीच्या सध्याच्या उत्पादनांची माहिती वितरकांना देणे आणि त्यांच्याबरोबरीचे दीर्घकालीन संबंधांचे नाते साजरे करणे हा या सहलीमागील कंपनीचा हेतू होता. या मेळाव्यात सर्वांनी आपापले विचार आणि व्यवसाय वाढीबद्दल कल्पना मांडल्या. फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश छाब्रिया आणि कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची तसेच ग्राहकांचा व एकंदर बाजारपेठेचा प्रतिसाद नमूद करण्याची संधी या निमित्ताने सर्वांना मिळाली.

हा मेळावा केवळ औपचारीक व गंभीर राहू नये, यासाठी खास मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुबईतील पर्यटनाचा व येथील स्वादिष्ट पक्वान्नांचा आस्वाद घेण्याची संधी अनेकांना मिळाली. 19 नोव्हेंबर रोजी दुबईतील द ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये झालेल्या जागतिक कीर्तीचे गायक उस्ताद राहत फतेह अली खान यांच्या मैफलीचा आनंद सर्वांना लुटता आला.

मेळाव्यात सर्व वितरकांना संबोधित करताना फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रकाश छाब्रिया म्हणाले, ‘’फिनोलेक्सच्या वाटचालीत आपल्यासोबत वाटचाल करणाऱ्या भागीदारांसोबत अशा रितीने वेळ घालवण्याचा व त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचा हा अनुभव समाधानकारक आहे. या मेळाव्यात सहभागी झाल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि त्यांनाही या मेळाव्यात आनंदाचे क्षण घालवता आले, अशी आशा व्यक्त करतो. कंपनी नवनवीन क्षितिजे ओलांडण्याचा प्रयत्न करीत असताना या भागीदारांची साथ अशीच मिळत राहील, अशी अपेक्षा आहे.’’

‘फिनोलेक्स इडस्ट्रीज’विषयी ..

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. ही पुण्यात मुख्यालय असलेली कंपनी पीव्हीसी पाईप्स व फिटींग्ज यांचे उत्पादन करते. कृषी व इतर क्षेत्रांत ही उत्पादने वापरली जातात. महाराष्ट्रात पुणे व रत्नागिरी येथे, तसेच गुजरातमध्ये मसार येथे कंपनीचे अत्याधुनिक व अद्ययावत कारखाने आहेत. रत्नागिरी येथे पीव्हीसी रेझिन बनविण्याची सुविधा ही यूएचडीई जीएमबीएच आणि होश टेक्नॉलॉजी या कंपन्यांच्या सहयोगाने उभी करण्यात आली आहे. तेथे पाईप बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या रेझिनचे उत्पादन घेण्यात येते. यातून आम्ही उत्कृष्ट दर्जाचे साहित्य ग्राहकांना पुरवीत असल्याचे सिध्द होते. रत्नागिरीजवळ समुद्रात पीव्हीसी कॉम्प्लेक्स कंपनीने स्वतःची जेट्टी उभारली असून खासगी उद्योगाने अशी जेट्टी उभारण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. आयएसओ 9001-2008 हे प्रमाणपत्र मिळवणारी ही देशातील पहिलीच पीव्हीसी पाईप उत्पादक कंपनी आहे.

कंपनीचे सामर्थ्य हे तिच्या कुशल मनुष्यबळात सामावलेले आहे. कंपनीच्या कामकाजातील उत्कृष्टता आणि तिचे यश यांचे सर्व श्रेय कर्मचाऱ्यांना आम्ही देतो. आमचा कारभार हा देशव्यापी असून सर्वत्र वितरक व उप-वितरक यांची 18 हजार दुकाने अस्तित्वात आहेत. ग्राहकांना जोडून घेण्यामध्ये हे वितरक आमची मोलाची मदत करतात. दर्जा, विश्वास आणि अखंडता या आमच्या मूल्यांमुळे आमचे ग्राहकांशी व इतर सर्व सहयोगींशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत.

विशिष्ट ध्येयाप्रती कामगिरी या तत्वामध्ये आमचा विश्वास आहे. त्यातूनच आम्ही समाजासाठी बांधिलकी मानून मुकूल माधव फाऊंडेशनच्या माध्यमातून काही विकासात्मक कामे करीत असतो. रत्नागिरी, पुणे व मसार य कारखान्यांच्या परिसरातील वंचित समाजासाठी काही सामाजिक व आर्थिक कामे आम्ही उभारली आहेत. मुले व महिला यांच्यासाठी शिक्षण, आरोग्य, समाजविकास, पर्यावरण व स्वयंविकास या क्षेत्रात ही आमची कामे चालतात.

५ हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना देणार नोकरी-भाऊसाहेब आंधळकर

0

पुणे : जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र एक करणाऱ्या पोलीस अधिकारी,कर्मचारी तथा निवृत्त पोलिसांच्या मुला मुलींना ५ हजार नोकरी देण्याचे वचन  शिवसेनेचे नेते तथा माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांनी दिले आहे.
 महाराष्ट्राची सद्यस्थिती पाहता रोजगार समस्या सध्या भेडसावत आहे. नोकरी मिळणे कठीण झाले असून हा एक गंभीर विषय बनला आहे. याच विषयाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांच्या मुलांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार चांगली नोकरी मिळावी यासाठी हा एक प्रयत्न आहे. अशी माहिती भाऊसाहेब आंधळकर यांनी दिली.
निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनतर्फे घेण्यात येणाऱ्या नोकरी महोत्सवाची माहिती २० देशात वाचली गेली असून २२ हजार मुलांनी bit.ly/2Rnl4iB यासंकेतस्थळावर भेट दिली आहे तथा ६ हजार मुलांनी ऑनलाईन अर्ज भरला आहे. या महोत्सवात १०० पेक्षा जास्त कंपन्या सहभाग घेणार आहेत. निवड झालेल्या अर्जदारांना २ तारखेला सायंकाळी ५ वा. समारोप समारंभात मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. 
 सदरील कार्यक्रम १ व २ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. पोलीस मुख्यालयपाषाणपुणे येथे ठेवण्यात आले असून सकाळी १० वा. कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधवपुण्याचे पोलीस आयुक्त व्यंकटेशनचंद्रशेखर दैठणकरखंडेरावजी शिंदेपी.टी. लोहारकोल्हापूर जिल्ह्याचे आय.जी. विश्वास नांगरे पाटीलपुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटीलसाबदे,न्यायनिरगुणेमदन चव्हाणएस.पी.राजहंसप्रकाश घारगेधैर्यशील पवारमाधवराव माळवेराजा तांबटसोपानराव महांगडेराजू सोनवणेकाशीनाथ कचरेभाई शिंदेराजू सोनूलेए.पी.आय. मोरे,संपत जाधवरामराव पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार असून सदर कार्यक्रमास संपूर्ण सहकार्य पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचे आहे. असेही आंधळकर यांनी सांगितले.

२३व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

0

पुणे : विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत शनिवार, दि. २४ नोव्हेंबर ते शुक्रवार, दि. ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत २३वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला एमआयटी डब्ल्यूपीयू कँपसमधील संतश्री ज्ञानेश्‍वर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

‘विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये शांतता नांदेल’, हे स्वामी विवेकानंदांचे वचन व  तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर माऊली व जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराज यांच्या ज्ञानेश्‍वरी व गाथेतील ज्ञान-विज्ञानाधिष्ठित तत्त्वदर्शन हा या व्याख्यानमालेचा मुख्य हेतू आहे.

या व्याख्यानमालेसाठी शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, तसेच, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांना निमंत्रित केले असून, मानवी आणि आध्यात्मिक मूल्यांचे या व्याख्यानमालेद्वारे संवर्धन व्हावे, हा या व्याख्यानमालेमागील प्रमुख उद्देश आहे. 

या व्याख्यानमालेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांच्या शुभहस्ते शनिवार, दि. २४ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे असतील. 

शुक्रवार, दि. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता या व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. या समारंभासाठी भारत सरकारचे इटलीतील माजी राजदूत श्री. बसंत कुमार गुप्ता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

शनिवार, दि. २४ नोव्हेंबर ते शुक्रवार, दि. ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सायंकाळी ४.३० वाजता होणार्‍या व्याख्यानमालेत सुप्रसिध्द विचारवंत आणि तत्त्वज्ञ डॉ. हनिफ खान शास्त्री व    नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण (गीता आणि कुरानामधील साम्य) बेंगलोर येथील स्वामी विवेकानंद योगा अनुसंधान संस्थानचे प्राध्यापक व सैध्दांतिक भौतिकशास्त्रज्ञ डॉ. अलेक्स हॅन्की    (ॐ  = E = Mc2    ), भटके व विमुक्त जातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष श्री. दादा इदाते (जे का रंजले गांजले),  सुप्रसिध्द पत्रकार व विद्वान श्री. गोपाल मिश्रा (भारतीय राज्यघटनेसमोरील आव्हाने) व महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त सचिव (सेवा) श्री. सीताराम कुंटे ( सेवा परमो धर्म:) अशा मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.

या व्याख्यानमालेला जोडूनच रविवार, दि. २५ नोव्हेंबर ते गुरुवार, दि. २९ नोव्हेंबर २०१८ पर्यंत रोज सकाळी ८.४५ ते १२.०० पर्यंत सकाळचे सत्र पार पडणार आहे. यामध्ये सुप्रसिध्द गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, कार्डिऑलॉजि सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. जगदीश हिरेमठ, सुप्रसिध्द विचारवंत आणि तत्त्वज्ञ श्री. अभय जगताप, सिध्द योगा आश्रमच्या संस्थापिका व शांतीदूत स्वामी राधिकानंद सरस्वती, नाशिक येथील एम एबी अ‍ॅव्हिएशनचे व्यवस्थापकीय संचालक व स्तंभलेखक श्री. मिलिंद भारदे, सुप्रसिध्द लेखक, विचारवंत आणि तत्त्वज्ञ श्री. गिरीष दाबके, दैनिक लोकमतचे संपादक श्री. प्रशांत दीक्षित, प्रख्यात तत्त्वज्ञ व विचारवंत, माजी सनदी अधिकारी श्री. श्याम देशपांडे, हिमालयातील स्वामी योगी अमरनाथजी व दीक्षित डाएटचे संस्थापक व जगप्रसिध्द मधुमेह तज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित  या मान्यवरांची विश्‍वशांती, संस्कृती व प्रबोधन इत्यादी विषयांवर व्याख्यानांची विशेष कार्यशाळाही आयोजित केली आहे.

प्रत्येक व्याख्यानानंतर वक्ता व श्रोते यांच्यामधील प्रश्‍नोत्तरांचा कार्यक्रम हे या व्याख्यानमालांचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे या व्याख्यानमालेमध्ये दि. २५ नोव्हेंबर ते दि. २९ नोव्हेंबर २०१८ पर्यंत माईर्स एमआयटी संकुलातील व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी अंतर्गत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी सकाळी ७.०० ते ८.०० या वेळात योगासन वर्गाचेही आयोजन योगाचार्य श्री. मारूती पाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. योगासन वर्ग आयोजित करणारी ही एकमेव शैक्षणिक संस्था आहे. 

सदरील सकाळ आणि संध्याकाळच्या दोन्ही सत्रातील व्याख्यानमाला विनामूल्य असून त्या सर्वांसाठी खुल्या आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, अशी संयोजकांची अपेक्षा आहे. 

अशी माहिती विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.राहुल विश्‍वनाथ कराड व २३व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पांडे यांनी दिली. 

पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाची आगेकुच

0
पुणे- पीवायसी हिंदु  जिमखाना क्लब यांच्या  तर्फे  पीवायसी करंडक 14 वर्षाखालील   निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक  वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने कॅडेन्स अकादमी संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. 
नेहरू स्टेडीयम येथे  झालेल्या या सामन्यात साखळी फेरीत ओंकार राजपुतच्या अफलातून अष्टपैलू कामगिरीच्या बळावर व्हेरॉक  वेंगसरकर क्रिकेट अकादमी  संघाने कॅडेन्स अकादमी संघाचा 7 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना ओंकार राजपुत व सक्षम काडलक यांच्या अचूक गोलंदाजीपुढे 
कॅडेन्स अकादमी संघ केवळ 28.1 षटकात सर्वबाद 122 धावांत गारद झाला. वेदांत जगदाळेने 44  धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. ओंकार राजपुतने 20 धावांत 4 तर सक्षम काडलकने 35 धावांत 3 गडी बाद करत कॅडेन्स अकादमी संघाचा धुव्वा उडवीला. तर भार्गव महाजन , साहिल सावंत व ओम भाबड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. 122 धावांचे लक्ष यश्वीत साईच्या 38, ओंकार राजपुतच्या नाबाद 27,कबीर भट्टचार्जीच्या नाबाद 11 तर प्रसन्न पवारच्या 21 धावांसह  व्हेरॉक  वेंगसरकर क्रिकेट अकादमी  संघाने केवळ 27.5 षटकात 3 गडी गमावत 125 धावांसह सहज पुर्ण केले. नाबाद 27 धावा व 20 धावांत 4 गडी बाद करणारा ओंकार राजपुत सामनावीर ठरला. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी  
कॅडेन्स अकादमी- 28.1 षटकात सर्वबाद 122 धावा(वेदांत जगदाळे 44, मोहित दहिभाते 24, अनिरूध्द साबळे 20, ओंकार राजपुत 4-20, सक्षम काडलक 3-35, भार्गव महाजन 1-15, साहिल सावंत 1-17, ओम भाबड 1-18) पराभूत वि व्हेरॉक  वेंगसरकर क्रिकेट अकादमी –  27.5 षटकात 3 बाद 125 धावा(यश्वीत साई 38, ओंकार राजपुत नाबाद 27, प्रसन्न पवार 21, कबीर भट्टचार्जी नाबाद 11, अर्कम सय्यद 1-20) सामनावीर- ओंकार राजपुत 
व्हेरॉक  वेंगसरकर क्रिकेट अकादमी  संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.  

विवो, ओपो ने केल्या बेकायदा जाहिराती-बुडवला पालिकेचा महसूल – नगरसेवक नाना भानगिरे यांचा दणका..

0

 

पुणे -महापालिकेच्या जाहिरात धोरण २००३ नुसार शहरामध्ये कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्यापूर्वी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे.तरीही १५२ ठिकाणी विनापरवानगी मोबाईल कंपन्यांनी जाहिराती मोठ्या होर्डिंग्जवर लावतात.महापालिकेकडून केवळ नोटिसाच दिल्या जातात त्यामुळे या कंपन्यांचे फावले असून मनपाचा महसूल बुडत असल्याकडे शिवसेनेचे नगरसेवक यांनी पुणे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्याने पुणे मनपाने या मोबाईल कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.पुणे शहरामध्ये अनधिकृतपण व महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवत मोबाईल दुकानांच्या बाहेर सर्रास जाहिरातबाजी सुरु आहे. मोबाईल कंपन्यांनी शहरामध्ये १५२ ठिकाणी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे जाहिराती केल्या आहेत. संबंधित कंपनीला महापालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत, परंतु तीन पट दंड वसुल करण्याकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे. विवो कंपनीचे शहरात ६८ ठिकाणी तर ओपोचे ८४ ठिकाणी अशा प्रकारे विनापरवानगी जाहीराती लावण्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नामध्ये ही माहिती समोर आल्याने आता पुणे मनपाने या मोबाईल कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

महापालिकेच्या जाहिरात धोरण २००३ नुसार शहरामध्ये कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्यापूर्वी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. २२२ रुपये प्रति चौरस फुट शुल्क आहे. याशिवाय शहरातील सर्वच दुकानदारांना आपल्या व्यवसायाची जाहिरात करता यावी, यासाठी दुकानाच्या दर्शनी भागाच्या लांबीएवढी व ३ फूट उंचीची जाहीरात लावण्यास मुभा देण्यात आली आहे.
सध्या शहरात विविध भागात विविध मोबाईल कंपन्यांच्या दुकानांच्या बाहेर महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवत मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जात आहे. जंगली महाराज रस्ता, कॅम्प परिसर, नवी पेठ, कोरेगाव पार्क परिसरातील सर्वच मोबाईल दुकानांच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे समोर आले आहे.याबाबत महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या वतीने सर्व मोबाईल दुकानदारांना नोाटिसा देऊन नियमानुसार जाहिरात शुल्क भरण्याचे आदेश दिले आहेत. परंतु महापालिकेच्या नोटिसांना केराची टोपली दाखवत मोबाईल दुकानदारांनी दुर्लक्ष केले. यात प्रशासनाने गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केल्यानंतर अखेर मोबाईल कंपन्यांनी दुकानाबाहेर जाहीरात करण्यासाठी परवानगी घेण्यास सुरुवात केली.महापालिकेच्या वतीने शहरामध्ये मोबाईल कंपन्यांकडून करण्यात येणा-या जाहिरातींचा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये ओपो कंपनीने ११७ ठिकाणी तर विवो कंपनीने २३५ ठिकाणी जाहिरात फलक लावले आहेत. यामध्ये काही ठिकाणी परवानगी घेऊन नियमानुसार जाहीरात शुल्क भरले देखील.परंतु आजही अनेक ठिकाणी विनापरवानगी जाहीरातबाजी सुरु आहे.

 

‘माऊली’ चित्रपटातून ‘माझी पंढरीची माय’ गाण्याद्वारे रितेश देशमुख सह अजय-अतुल करणार रुपेरी पडद्यावर पदार्पण!

0

अनेक हिंदी अभिनेत्यांना रुपेरी पडद्यावर आपल्या संगीताच्या तालावर नाचायला लावणारी विख्यात संगीतकार जोडगोळी अजय-अतुल आता ‘माऊली’ या रितेश देशमुख निर्मित आगामी मराठी चित्रपटात झळकताना दिसून येणार आहेत.

रितेश देशमुख यांच्या विनंतीचा मान राखून अजय-अतुल या संगीतकार बंधूंनी ‘माझी पंढरीची माय’ या गाण्याद्वारे रुपेरी पडद्याची शोभा आणखीन द्विगुणित केलेली आहे. चित्रपटादरम्यान या गाण्याचे शूटिंग सुरु असतानाच रितेश देशमुख यांनी अजय-अतुल आणि चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री सैय्यमी खेर यांच्यासह एक खास प्रचारात्मक व्हिडिओ शूट केला आहे.

रितेश देशमुख म्हणतात की, “अजय-अतुल या संगीतकार जोडीस मी या भक्तिपूर्ण गाण्याचे संपूर्ण संक्षिप्त स्वरूप दिले होते आणि त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या संगीत रचनांनी आश्चर्यचकित करून सोडले. मी त्यांना दिलेल्या गाण्याच्या संक्षिप्त माहितीच्या अगदी उलट असं गाणं त्यांनी माझ्यासमोर प्रस्तुत केलं. खरंतर त्यांच्या संगीत रचनेने आमच्या चित्रपटाच्या पटकथेचा आढावा घेतला व चित्रपटाच्या चांगल्यासाठीच त्यात बदल केले.”

‘माझी पंढरीची माय’ या गाण्याद्वारे रुपेरी पडद्यावरील पदार्पणाबद्दल सांगताना अजय गोगावले म्हणतात की, “या व्हिडिओत आम्ही असावं, ही रितेशची ईच्छा होती.” तर अतुल गोगावले सांगतात की, “रितेशने आम्हाला गाणी तयार करण्यास संपूर्ण स्वातंत्र्य दिले. सैराट (२०१६) नंतर आता पुन्हा ‘माऊली’ या मराठी चित्रपटासाठी काम करण्यास आम्हाला खूप आनंद झाला.

सीएम चषकाला युवकांमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद, 14 लाख लोकांचा सहभाग

0

मुंबई: संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावात आणि गल्लीबोळात चालू असलेल्या आतापर्यंतची सर्वात मोठी क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धा असलेल्या ‘सीएम चषका’बद्दल महाराष्ट्रभरात मोठा उत्साह दिसून येत आहे. ‘सीएम चषक’मध्ये सहभाग घेण्यासाठी आतापर्यंत १४ लाख लोकांनी नोंदणी केली आहे. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आयोजित ‘सीएम चषका’ला प्रदेश स्तरावर उत्तम प्रतिसाद तर मिळतच आहे, शिवाय मुंबई शहरातूनही अडीच लाखांहून जास्त युवकांनी यात नोंदणी केली आहे.

‘सीएम चषका’साठी संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण १३ लाख ९२ हजार १०२ लोकांनी आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपली नोंदणी केली आहे. यात ५ लाख ४० हजार ८१६ लोकांनी ऑनलाईन आणि ८ लाख ५१ हजार २८६ लोकांनी थेट अर्ज भरून आपली नोंदणी केली आहे. यात मुंबईच्या एकूण सहभागी असलेल्याची २ लाख ६७ हजार ८०५ आहे. यामध्ये मुख्यत्वे युवक आणि विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी आहेत. खूप कमी वेळात ‘सीएम चषका’शी मोठ्या संख्येने लोक जोडले गेल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चार्चे अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी सांगितले कि प्रदेश स्तरावरील प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाशी जोडले जाण्याच्या या प्रयत्नाच्या यशस्वीतेमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विकासपुरुष असलेली प्रतिमा एकमेव कारण आहे. युवा मोर्चार्चे मुंबई अध्यक्ष मोहित कंबोज यांनी सांगितले कि मुंबईसारख्या व्यस्त शहरातही ‘सीएम चषका’शी अडीच लाखांहून जास्त लोक जोडले जातात हि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रियतेची एकप्रकारे पोचपावतीच आहे.

प्रदेश स्तरावरील प्रत्येक गाव आणि शहरात ‘सीएम चषका’अंतर्गत होणाऱ्या क्रिकेट, कबड्डी, खो-खो, वॉलीबॉल, कॅरम, कुस्ती, पेंटिंग, रांगोळी, कविता, नृत्य इत्यादी स्पर्धांमध्ये लोक खूप उत्साहाने भाग घेत आहेत. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण आणि खासकरून महिलांमध्ये मोठा उत्साह आहे. महाराष्ट्रात भाजप सरकारला ४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १ नोव्हेंबरला पुण्यातून सुरु झालेल्या ‘सीएम चषका’ची समाप्ती एका भव्य सोहळ्याच्या रूपात स्वामी विवेकानंद जयंतीला १२ जानेवारीला मुंबईत होईल.

कमिशनर साहेब,हे घ्या ..हेल्मेटच्या ‘सक्ती ‘ला विरोध करणारे हे भाजपच्या संदीप खर्डेकरांचे तुम्हाला खुले -जाहीर पत्र ..आता तुम्ही कराल खुला जाहीर खुलासा ?

0

प्रती,

मा.के वेंकटेशम,
पोलीस आयुक्त,पुणे.
विषय – हेल्मेट सक्तीचा विषय पोलिस नागरिक संघर्षाचा नाही….सर्वोच्च न्यायालयात पुण्यातील परिस्थिती/वस्तुस्थिती मांडावी…हेल्मेट नसल्यास पेट्रोलपंपावर पेट्रोल मिळणार नाही या वक्तव्याबाबत ही कृपया खुलासा करावा….
मा.महोदय,
आपण केलेल्या हेल्मेट सक्तीच्या घोषणेनंतर पुण्यातील राजकीय सामाजिक वातावरण ढवळुन निघाले आहे व विविध संस्था, संघटना,राजकीय पक्ष व सामान्य पुणेकर आंदोलनाच्या तैयारीत आहे.हेल्मेट सक्ती हा विषय पोलिस आणि नागरिक यांच्यातील  संघर्षाचा नाही हे पहिले समजून घेतले पाहिजे.हा विषय संवेदनशीलतेने हाताळण्याचा असून त्यात अतिरेकी भूमिका ही सुखावह नाही.
आज वाहतूक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांचे एका वृत्तपत्रातील विधान आगीत तेल ओतणारे असून  “कोणत्या कायद्याने पोलिस हेल्मेट न वापरणाऱ्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळु देणार नाहीत ” असा सवाल पुणेकर विचारत आहेत.( अर्थात मी मा सातपुते मॅडम यांच्याशी संपर्क केला असता असे विधान केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे ) पण मला वाटते की याबाबतीत पुणेकरांच्या भावना तीव्र असून,प्रत्येक वेळी हेल्मेट सक्ती चा विषय पुढे आणताना पोलिसांकडून सर्वोच्च न्यायालयाचा दाखला दिला जातो.मात्र पुण्यातील गत १५ वर्षात या सक्ती विरोधात झालेली आंदोलने ,पुण्यातील परिस्थिती,येथील प्रचंड अशी २७ लाख दुचाकींची संख्या आणि हेल्मेट सक्ती बाबत पुणेकरांनी मांडलेले व्यवहार्य मुद्दे….हे सगळे पुणे पोलिसांनी न्यायालयात मांडल्यास निश्चित पणे मेहेरबान न्यायाधीश महोदय प्राप्त परिस्थितीत पुण्याला या सक्तीतून वगळू शकतात.सर्वोच्च न्यायालयापुढे पुणेकरांची बाजू व्यवस्थितपणे मांडले गेले पाहिजे.
तसेच मा पोलिस उपायुक्त वाहतूक यांच्या हेल्मेट आणि पेट्रोल विक्री चा संबंध जोडणाऱ्या विधानाबाबत ही योग्य खुलासा करावा ही विनंती.
काही मुद्दे खाली देत आहे….
*विरोध हेलमेट सक्तीला – ज्याने त्याने स्वेच्छेने हेलमेट वापरावे*
काही मंडळींचे असे म्हणणे आहे की अपघातात अनेक लोक मृत्युमुखी पडतात – हेल्मेट मुळे अनेक जीव वाचतील…
मुळात नागरिकांचे मत आहे की *चार चाकीतून फिरणारे दुचाकी वाल्यांच्या डोक्यावर हेल्मेट लादू इच्छितात* माझे साधे आवाहन आहे की *परिवहन मंत्री/पोलिस आयुक्त/वाहतूक पोलिस उपायुक्त/विभागीय आयुक्त/मनपा आयुक्त व अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केवळ एक महिना आपल्या आलिशान गाड्या बाजूला ठेवुन दुचाकी वरुन हेल्मेट घालून शहरात फिरावे* – मग त्यांना त्याचा नेमका त्रास काय होतो ते समजेल……
मुळात पुण्यासारख्या शहरात जेथे दुचाकीचा वेग ताशी ३० किमी पेक्षा जास्त नाही तेथे हेल्मेट अभावी अपघातात माणसे दगावतात हा जावईशोध कोणी लावला ? आणि मग *An Accident also known as an Unintentional injury ,is an Undesireable,incidental and an Unplanned Event* आणि मग अपघात तर बस कार कश्याचा ही होवु शकतो, मग बस मधे हेल्मेट घालुन बसले तर जीव वाचतील ? ज्येष्ठ नागरिक हे घरात आणि त्यातूनही स्नानगृहात पडण्याचे प्रमाण मोठे आहे / मग त्यांनी चिलखत घालुन फिरावे काय ? मला माहिती आहे की हा तर्क वाह्यात आणि अनावश्यक आहे पण मग हेल्मेट वापरा अशी सक्ती करणारे तरी काय तर्क देत आहेत ?
माझ्या साध्या प्रश्नाचे उत्तर द्यावे पोलिस आयुक्तांनी – *पुण्यात २७ लाखांपेक्षा जास्त दुचाकीस्वार त्यात साधारण ५/१० लाख डबल सीट,दर्जेदारआय एस आय मार्क ५० लाख हेल्मेट उपलब्ध आहेत का* ? रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या हेल्मेटच्या दर्जाचे काय ? त्याने जीव वाचेल ? हजारो महिला आपल्या लहान मुलांना दुचाकीवरुन शाळेत सोडतात – *या महिलांनी हेल्मेट वापरलेच पाहिजे जीव महत्त्वाचा – मग मागे बसलेल्या किंवा पुढे उभे राहणाऱ्या चिमुकल्यांचे काय ?* त्यांच्या मापाचे हेल्मेट आहेत ? ते त्यांच्या मानेला पेलवतील ? आणि सायकल स्वार / पादचारी हे ही अपघातात मरतात – मग त्यांना ही सक्ती करायची ? हेल्मेट अभावी २११ लोक मृत्यूमुखी पडले…. *दारु / तंबाखु / सिगारेट सेवनाने तर हजारो मरतात ? मग त्याला बंदी नको – बंदीनंतर ही गुटखा सहजगत्या उपलब्ध आहे – हे अपयश कोणाचे* ? रस्त्यावरील हातगाड्यांभोवती /पदपथांवर जागोजागी रात्री दारु पिणारे दिसतात तर जागोजागी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे ही आढळतात/ हा ही कायद्याने गुन्हा आहे ना ? मग तेथे जेथे ह्या सेवनाने हजारो मरतात तेथे पहिले कारवाई प्रबोधन गरजेचे आहे असे आपणांस वाटत नाही का ? का सामान्य दुचाकीचालक पुणेकर हे Soft Target असल्याने तो लक्ष्य ?
विविध कंपन्या/शासकीय कार्यालये/शाळा /कॉलेज येथे गेल्यावर हेल्मेट ठेवायचे कुठे हे सांगून टाका ? का कोणतेही संयुक्तिक कारण नसताना आणि हेल्मेट सक्तीचा गत १० वर्षांचा पुण्यातील आंदोलनाचा इतिहास माहिती असताना पुणेकरांना चीड वाटावी,शहरातील शांत वातावरण ढवळुन निघावे,चौकाचौकात वाहतूक पोलिस आणि नागरिक यांच्यात वादावादी व्हावी यासाठी हा उद्योग ?
हेल्मेट वापरामुळे मान दुखीचा त्रास होतो /शेजारुन वाहन गेलेले दिसत नाही / side view block होतो / हॉर्न ऐकु येत नाही / असे एक ना अनेक विषय आहेत …. हेल्मेट सक्ती अव्यवहार्य असून हेल्मेट हा स्वेच्छेने वापरण्याचा विषय आहे…..साहेब आपण अपघात होवु नयेत यासाठीच प्रयत्न करु ना –  *दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा वाहतूक पोलिसांनी चौकात थांबून वाहतूक नियमन केले ना तर निम्मे प्रश्न सुटतील वाहतूकीचे*
मी ह्या सक्तीच्या निर्णयाला विरोध असण्याचे शेकडो कारणे सांगू शकतो…..पण सर्वात महत्त्वाचे आहे ते प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असल्याने हा विषय ज्याच्यात्याच्या सदसदविवेकबुद्धीवर सोडावा हेच श्रेयस्कर…..
*संदीप खर्डेकर*
अध्यक्ष क्रीएटिव्ह फौंडेशन….
मो ९७५०९९९९९५

गोळीबाराने हादरले पुणे, पळून जाणाऱ्या आरोपींचा रेल्वे स्टेशनवर पोलीस निरीक्षकावर गोळीबार…

0

पुणे-शहरात एकाच दिवशी तीन गाेळीबाराच्या घटना घडल्या असल्याने शहरात एकच खळबळ उडाली अाहे. चंदननगर, येवलेवाडी अाणि पुणे स्टेशन येथे घडलेल्या घटनांमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून पुणे स्टेशन येथे पाेलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर अाराेपींनी गाेळी झाडल्याने ते गंभीर जखमी झाले अाहेत. तर तिसऱ्या घटनेत सराफ दुकानात करण्यात अालेल्या गाेळीबारात एक कर्मचारी गंभीर जखमी झाला अाहे.

अाज पुण्यात विविध तीन ठिकाणी गाेळीबाराच्या घटना घडल्या असल्याने शहरात दहशतीचे वातावरण अाहे. अाज सकाळी चंदननगर येथील अानंद पार्क चाैकातील इंद्रायणी गृहरचना साेसायटीत राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी (वय 34 ) या महिलेवर सकाळी अाठ वाजून पंधरा मिनिटांनी दाेन तरुणांनी घरात घुसून महिलेच्या छातीत गाेळ्या झाडून हत्या केली. दाेन तरुण दुचाकीवरुन इंद्रायणी साेसायटीत अाले. अाराेपींनी भाटी यांच्या घराची बेल वाजवली. भाटी यांनी दार उघडताच अाराेपींनी गाेळीबार केला. या गाेळीबारात भाटी यांचा मृत्यू झाला. याच गुन्ह्यातील अाराेपी हे झेलम एक्सप्रेसने पळून चालले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 2 ला मिळाली हाेती. या माहितीच्या अाधारे युनिट 2 चे पाेलीस निरीक्षक गजानन पवार हे त्यांच्या सहकाऱ्यांसाेबत अाराेपींचा संध्याकाळी 5.15 च्या सुमारास प्लॅटफाॅर्म क्र. 3 वर शाेध घेत हाेते. त्यावेळी अाराेपींनी पाेलिसांना पाहताच पळून जायचा प्रयत्न केला. यावेळी तिघा अाराेपींपैकी एकाने पवार यांच्यावर गाेळी झाडली. पवारांच्या पाेटात गाेळी लागल्याने माेठा रक्तस्त्राव झाला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले. दरम्यान पवार यांच्या सहकाऱ्यांनी एका अाराेपीला पकडले तर रेल्वे पाेलीस अाणखी एका अाराेपीला पकडण्यात यशस्वी झाले. तिसरा अाराेपी पळून गेला.

तिसरी घटना काेंढवा येथील येवलेवाडीमध्ये भर बाजारपेठेत असलेल्या गणेश ज्वेलर्स या दुकानात घडली. या दुकानातील कामगारावर गाेळीबार करण्यात अाला अाहे. यात दुकानातील कामगार अमृत मेघावल गंभीर जखमी झाला अाहे. त्याला हाताला गाेळी लागली. अाज दुपारच्या सुमारास गणेश ज्वेलर्स या दुकानात चार व्यक्ती अाल्या. त्यांनी अमृत बराेबर चर्चा केली. त्यानंतर त्यातील एकाने अमृतवर गाेळी झाडल्याचे सीसीटिव्ही मध्ये दिसत अाहे. यानंतर हल्लेखोर दोन दुचाकीवरून कात्रजच्या दिशेने फरार झाले. या दुकानाचे मालक मालतसिंग ओदसिंग देवठी हे त्यांच्या गावी मागील आठ दिवसांपासून गेलेले आहेत. तेव्हापासून अमृत हा एकटाच दुकान सांभाळत आहे. विशेष म्हणजे दुकानातील कोणत्याही सोन्या-चांदीच्या वस्तू हल्लेखोरांनी चोरल्या नाहीत किंवा तसा प्रयत्न केल्याचेही दिसून येत नाही. यामुळे हा दरोड्यांचा प्रयत्न होता की यामागे वेगळे कारण आहे, याचा अधिक तपास कोंढवा पोलीस करीत आहेत. दरम्यान या गाेळीबारा मागील कारण अद्याप स्पष्ट हाेऊ शकले नाही.

वडगावशेरी येथील आनंद पार्क चौकातील इंद्रायणी गृहरचना सोसायटी मधील ज्ञानदीप इमारतीत राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी (वय ३४ )या महिलेवर सकाळी आठ वाजून १५ मिनिटांनी दोन तरुणांनी घरात घरात घुसून महिलेच्या छातीत गोळ्या झाडून हत्या केली.

चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान दोन तरुण दुचाकीवरून पॅशन किंवा स्प्लेंडर या गाडीवरून येऊन इंद्रायणी गृहरचना सोसायटीतील धनदीप या इमारतीतील पहील्या मजल्यावर घुसले. यानंतर एकता ब्रिजेश भाटी व यांचे पती घरात बसलेले होते. या दोन 2 तरुणांनी दरवाजा वाजवल्यानंतर एकता भाटी यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच महिलेच्या छातीवर गोळ्या झाडून तरुण पसार झाले. याबाबत चंदननगर पोलिस परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासत असून कशातून हा प्रकार घडला आहे याचा तपास करीत आहेत.

यावेळी एसीपी समीर शेख ,शिरीष सरदेशपांडे,उत्तरविभागाचे सुनिल फुलारी,एसीपी गणेश गावडे,अंजुमन बागवान,खंडणी विरोधी पथकाचे रघुनाथ जाधव, चंदननगरचे पोलीस निरिक्षक राजेंद्र मुळीक, गुन्हे अन्वेषण विभागाचे विठ्ठल दरेकर यांनी परिसराची तपासणी सरू केली असुन सोसायटीतील सर्व सीसीटिव्ही कॉमेर तपासणीचे काम सुरू आहे. भाटी यांची खानावळ होती. ते विमाननगरमधील एका खाजगी कंपनीला जेवण पुरवत होते. पोलिसांनी मेसमध्ये काम करणाऱ्यांचे कर्मचाऱ्यांसोबतच त्यांचे मोबाईल फोन ताब्यात घेतले आहेत.

सिनेमांमध्ये दाखवण्यात येताे तसा थरार अाज पुणे स्टेशनवरील प्लॅटफाॅर्म क्रमांक 3 च्या प्रवाशांना संध्याकाळी 5.15 च्या सुमारास पाहायला मिळाला. अाज सकाळी चंदननगर येथील इंद्रायणी गृहरचना साेसायटी मधील ज्ञानदीप इमारतीत राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी (वय 34) यांच्यावर गाेळीबार करणारे अाराेपी पळून चालले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दाेनच्या पथकाला मिळाली हाेती. या माहितीच्या अाधारे गुन्हे शाखेच्या युनिट 2 चे कर्मचारी अाराेपींचा पुणे स्टेशनवर शाेध घेत असताना अाराेपींनी पाेलिसांना पाहताच गाेळीबार केला. या गाेळीबारात पाेलीस निरीक्षक गजानन पवार गंभीर जखमी झाले अाहेत. दरम्यान तीन पैकी दाेन अाराेपींना पाेलिसांना पकडण्यात यथ अाले अाहे.

चंदननगर येथील इंद्रयणी गृहरचना साेसायटीत राहणाऱ्या एकता भाटी यांच्यावर सकाळी अाठ वाजून 15 मिनिटांनी दाेन तरुणांनी घरात घुसून गाेळीबार केला हाेता. यात भाटी यांचा मृत्यू झाला अाहे. या घटनेचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या युनिट दाेनच्या अधिकाऱ्यांना या गुन्ह्यातील अाराेपी हे झेलम एक्सप्रेसने पळून चालले असल्याची माहिती मिळाली. युनिट दाेनचे पाेलीस निरीक्षक पवार हे सहकाऱ्यांसह अाराेपींचा प्लॅटफाॅर्म 3 वर शाेध घेत हाेते. त्यावेळी अाराेपींनी पाेलिसांना पाहताच पळ काढला. यातील एका अाराेपीने पवार यांच्यावर गाेळी झाडली. पवारांच्या पाेटात गाेळी लागल्याने माेठा रक्तस्त्राव झाला. पवारांच्या साेबतच्या सहकाऱ्यांनी एका अाराेपीला पकडले तर रेल्वे पाेलिसांनी अाणखी एका अाराेपीला पकडले. तिसरा अाराेपी पळून गेला.

दरम्यान पवार यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले असून त्यांची प्रकृती गंभीर अाहे.

जीटीडीसीतर्फे त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने खास सहलीचे आयोजन

0

पणजी– गोवा पर्यटन विकास महामंडळाने गुरुवार २२ नोव्हेंबर २०१८ रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने विठ्ठलपूर, सांखळी येथे खास सहलीचे (बोट फेस्टिव्हल) आयोजन केले आहे.

गोवा पर्यटन विकास महामंडळ, कला व संस्कृती विभाग, पर्यटन विभाग आणि माहिती व प्रचार विभाग यांच्यातर्फे संयुक्तपणे विठ्ठलपूर, सांखळी येथे त्रिपुरारी पौर्णिमा आयोजित करण्यात आली आहे.

या उत्सवामागे एक रोमहर्षक कहाणी दडलेली असून दिवाळीचा शेवट म्हणून हा उत्सव साजरा केला जातो.

हा उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. यात उत्सवामध्ये पालन केल्या जाणाऱ्या परंपरेने एका अनोख्या स्पर्धेचे रूप घेतले आहे – ते म्हणजे बोट व जहाजांच्या छोट्या प्रतिकृती बनवणे. बोटींच्या मुख्य स्पर्धेशिवाय यादिवशी इतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि आतिषबाजी आयोजित केले जातात.

त्रिपुरारी पौर्णिमेची ही खास सहल सर्वव स्थानिक आणि पर्यटकांसाठी खुली आहे. तिकिट दर प्रती व्यक्ती १०० रुपये आहे. सहा वर्षापुढील आणि बारा वर्षांखालील मुलांसाठी तिकीट दर ५० रुपये आहे.

जीटीडीसी कोच सेवा सँटा मोनिका जेट्टी, पणजी येथून रात्री आठ वाजता, तर म्हापसा रेसिडेन्सीपासून रात्री ८.३० वाजता सुटेल आणि विठ्ठलपूर, सांखळी येथे प्रयाण करेल.

कार्यक्रमाचे तपशील पुढीलप्रमाणे

संध्याकाळी ७ – भगवान कृष्णाची मिरवणूक

संध्याकाळी ७.३० – वळवंटी नदीत दिवे सोडणे

रात्री ८ – सांस्कृतिक कार्यक्रम

रात्री १०.३० – विठ्ठल रखुमाईची पालखी मिरवणूक

रात्री १०.३० ते मध्यरात्री १२ – पारंपरिक बोटींचा उत्सव

रात्री ११ – त्रिपुरासुर – वध

रात्री ११.०५ – आकाशात ‘सारंग’ फुगा सोडणे

रात्री ११.१५ – फटाक्यांची आतिषबाजी

नोंदणी कृपया संपर्क करा -सँटा मोनिका जेट्टी पणजी रेसिडेन्सी – 0832-2223396 किंवा म्हापसा रेसिडेन्सी 0832- 2262694

माहेश्वरी समाजातर्फे गोवर्धन पूजन व अन्नकोट महोत्सव उत्साहात

0

पुणे : माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दिवाळी स्नेहमेळावा व अन्नकोट महोत्सव उत्साहात साजरा झाला. लोकांच्या रक्षणाकरिता करंगळीवर पर्वत उचलून धरणाऱ्या प्रसंगांची आठवण म्हणून गोवर्धन गिरिधारीचे पूजन आणि ५६ भोगाची (मिठाई व इतर पदार्थ) आरास करण्यात आली. या ५६ प्रकारच्या भोगामध्ये मिठाई, फळे, दिवाळी फराळ आदी पदार्थ ठेवण्यात आले होते.

कोंढवा येथील महेश सांस्कृतिक भवनात झालेल्या या अन्नकोट महोत्सवात शहर व जिल्ह्यातील जवळपास साडेसात हजार माहेश्वरी बांधवांसह इतर समाजातील मान्यवर व भक्तगण सहभागी झाले होते. माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज राठी, सचिव संजय चांडक, कोषाध्यक्ष श्रीप्रकाश बागडी, सल्लागार हिरालाल मालू, संजय बिहानी, अशोक राठी, हरी भुतडा, बालाप्रसाद बजाज, राजेंद्र भट्टड, मदनलाल भुतडा, शामसुंदर कलंत्री, दिलीप धूत, संतोष लढ्ढा, विजयराज मुंदडा, भंवरलाल पुंगलिया, रामबिलास तापडिया यांच्यासह इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. तसेच या महोत्सवाला राजकारण, उद्योग व समाजकारणातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

सचिव संजय चांडक म्हणाले, “गोवर्धन गिरिधारी यांच्या आठवणीतील पवित्र दिवस म्हणून अन्नकोट महोत्सव साजरा होतो. दरवर्षी माहेश्वरी समाजबांधव एकत्र येऊन दिवाळी स्नेहमेळावा व अन्नकोट महोत्सव साजरा करतात. माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पुण्यात औषधोपचार व अन्य कामांसाठी बाहेरून येणाऱ्या समाजबांधवांच्या सोयीसाठी शहराच्या मध्यवर्ती मुकुंदनगर या भागात अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त सॅनेटोरियम, अतिथीगृह आणि बहुउद्देशीय प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे.”

इंडो शॉटले पीपीएल क्रिकेट 2016 स्पर्धा पुण्यात

0

पुणे- कारा इंटलेक्ट यांच्या व्यवस्थापन आणि संकल्पनेतून व पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संलग्नतेने सहावी इंडो शॉटले पीपीएल क्रिकेट 2018 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि.25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2018 या कालावधीत पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर होणार आहे.

पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे आणि क्लबचे सचिव आनंद परांजपे, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड यांनी सांगितले की, स्पर्धेचे सलग हे सहावे यशस्वी वर्ष असून सर्व सामने विद्युताप्रकाश झोतात होणार आहे.  या स्पर्धेत 15 संघ सहभागी झाले असून घेण्यात आलेल्या लिलावात कर्ना मेहता(5000रूपये) आणि  हर्षल गंद्रे(5000रूपये) हे सर्वाधिक महागडे खेळाडू ठरले. याशिवाय रवी कासट(4800रूपये), रोहन छाजेड(4700रुपये), अभिषेक ताम्हाणे(4700रुपये) या खेळाडूंना चांगले मुल्य मिळाले आहे.

विविध क्रिडाप्रकारांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्यासाठी पीवायसी क्लब नेहमीच आघाडीवर असतो. स्पर्धेला इंडो शॉटलेचे विजय पुसाळकर यांचे प्रायोजकत्व लाभले असून होडेक व्हायब्रेशन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड व ब्रिहंस ग्रीनलीफ यांचे सहप्रायोजकत्व मिळाले आहे.

ते पुढे म्हणाले की, स्पर्धेत प्रत्येक संघात एकुण 9 खेळाडूंचा समावेश असणार आहे. स्पर्धेचे सामने हे 6 षटकांचे होणार आहेत. स्पर्धेसाठी क्रिकेट टेनिस बॉलचे सर्व नियम लागू असून सर्व सामने सायंकाळी 4.30 ते रात्री 10.30 या वेळेत होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना दि.1 डिसेंबर 2018 या दिवशी होणार आहे.

स्पर्धेत   अंजेनेयज्‌ ब्रेव्ह बेअर्स, आर्यन स्कायलार्क्स, गोखले सिनर्जी कोब्राज, गोल्डफिल्ड डॉल्फीन्स्‌,गुडलक हॉग्स लिमये, ट्रूस्पेस जॅगवॉर्स, सुपर लायन्स्‌,  जीएससी पँथर्स्‌, रेड बुल्स्‌, स्वोजस टायगर्स्‌, ओव्हन फ्रेश टस्कर्स्‌, एनएच वुल्वस्‌, डी-एच लिंक चिताज्‌, आर स्टॅलियन्स्‌, कासट ड्रॅगन्स  हे 15 संघ झुंजणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पर्धेतील संघांची 3 गटात विभागणी करण्यात आली असून यामध्ये प्रत्येक 5 आणि 6 संघांचा समावेश असणार आहे. तसेच, या तीनही गटांतील अव्वल संघ उपांत्यपुर्व फेरीसाठी पात्र ठरणार असून आणखी दोन संघ गुणसरासरी आणि नेटरनरेटच्या आधारावर पात्र ठरणार आहेत.

प्रत्यक्ष मैदानावर खेळण्याचा व क्रिकेटवरचे प्रेम व्यक्त करण्याचा अनुभव या माध्यमांतून सभासदांना मिळणार आहे. या उपक‘माचे स्वरूप जरी स्पर्धात्मक असले, तरी पण प्रत्यक्षात सभासदांना या खेळाची मजा लुटता येणार आहे. विजेत्या संघाला ज्ञानेश्वर आगाशे स्मृती करंडक देण्यात येणार असून याशिवाय वैयक्तिक पारितोषिकेहि दिली जाणार आहे.

स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे आणि क्लबचे सचिव आनंद परांजपे, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड , इंडो शॉटलेचे संचालक अनिल जलीहाल, ब्रिहांसचे सीएमडी अशुतोष अगाशे, रणजीत पांडे, इंद्रजीत कामटेकर, निरंजन गोडबोले, , शिरिष गांधी,  तुषार नगरकर, सारंग लागु, अभिषेक ताम्हाणे, देवेंद्र चितळे, निखिल शहा, अंजनेय साठे व कपिल खरे यांचा समावेश आहे.

गोयल गंगा फाऊंडेशनतर्फे गुरुवर्य पुरस्काराचे वितरण

0
क्षणिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान
पुणे- सध्याच्या शैक्षणिक प्रणालीतील त्रुटी लक्षात घेऊन त्यात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने कार्यरत असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांना नुकतेच गोयल गंगा फाऊंडेशनतर्फे गुरुवर्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला.
 केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता मुलांच्या अंगभूत गुणांना वाव देत वेगळाच आदर्श प्रस्थापित केलेल्या राळेगणसिद्धी येथील संत  निलोबराय विद्यालयाचे मुख्याध्यापक तुकाराम वाघचौरे, ग्रामीण भागातही शहरी दर्जाचे शिक्षण पोहोचण्याच्या तळमळीने कार्यरत असलेले रणजितसिंग देसले, भारतीय शिक्षण पद्धतीतील मूल्यांचे महत्व पटवून देण्यासाठी झटणारे इस्कॉन फाऊंडेशन, विशेष शिक्षण पद्धतीचा आग्रह धरत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
करणाऱ्या मंजुश्री पाटील आणि मुलांना शिक्षण जबरदस्तीचे न वाटता त्यात त्यांना गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने नाविन्यपूर्ण कल्पनांचा ध्यास घेतलेल्या विपुल शहा यांना यावेळी गुरुवर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गौरांग प्रभूजी, कर्नल संभाजी पाटील, स्वाती चाटे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी गोयल गंगा फाऊंडेशनचे विश्वस्त अमित गोयल, गीता गोयल, गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सोनू गुप्ता, मुख्याध्यापिका भारती भागवाणी, हे देखील उपस्थित होत्या.
गुरुवर्य पुरस्काराच्या निमित्ताने इतरही भरगच्च कार्यक्रमांचे यावेळी गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या आवारात आयोजन करण्यात आले होते. डॉ. दीपक शिकारपूर यांच्या हस्ते उदघाटन झाल्यानंतर ‘बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात होणारे बदल वा त्यात येणारे अडथळे’ याविषयी देशभरातील शिक्षण तज्ज्ञांनी आपली मते मांडली. तसेच शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एस बी मंत्री, डॉ अश्विनी कुलकर्णी,विजय गुप्ता, संजीव सोनावणे यांच्यातही याविषयी चर्चासत्र पार पडले. दुसऱ्या पर्वात चारित्र्य व विकासाचे महत्व याविषयी गौरांग प्रभूजी यांनी आपले मत मांडले. शाळेच्या विद्यार्थ्यानी मनोरंजनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध कलागुणांचे उपस्थितांना दर्शन घडविले. तर अखेरच्या सत्रातील पुरस्कार वितरण सोहळ्याने या कार्यक्रमाची सांगता झाली.

साहित्य व संस्कृती मंडळ आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पुण्यात पहिले राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन

0
पुणे : महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. रविवार, दि. 25 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 8.00 ते रात्रौ 8.00 या वेळेत श्री वर्धमान प्रतिष्ठान, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे हे संमेलन होत आहे. भारतीय वन सेवेतील उच्चाधिकारी व पुणे विभागाचे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत शहासने, स्वागताध्यक्षा मंदाताई नाईक, ज्योतीराम कदम व दिंडीप्रमुख उर्मिलाताई कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चंद्रकांत शहासने म्हणाले, “या संमेलनाचे उद्घाटन रविवारी (दि. 25) सकाळी 9.35 वाजता होणार आहे. स्वातंत्र्यसेनानी, माजी सैनिक, त्यांचे वारस, निमंत्रित संत व विचारवंत, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते दीपोत्सवाने व अजानवृक्षाचे पूजन करून या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला पुण्याच्या प्रथम नागरिक महापौर मुक्ताताई टिळक, संत अचलस्वामी, पद्मविभूषण डॉ. विजय भटकर, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्यकारी अधिकारी प्रा. राहुल विश्वनाथ कराड, अ‍ॅड. नंदिनी शहासने, सेनादलाचे निवृत्त अधिकारी, वीरमाता, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे ज्योतिराम कदम, आनंद हर्डीकर, मनस्विनी प्रभुणे, वन विभागाचे उच्चाधिकारी अनुराग चौधरी आदी उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी, सकाळी 8.00 वाजता गोखलेनगरमधील वन विभागाच्या मुख्य कार्यालयाच्या पटांगणात  महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार हभप मणीलालकाका कडघेकर यांच्या शुभहस्ते ग्रंथ व वृक्ष दिंडी पूजनाने दिंडीचा शुभारंभ होईल. या भव्य दिंडीत प्रामुख्याने युवक, विद्यार्थी-विद्यार्थीनी, विविध सेवाभावी संस्था, माजी सेनाधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, वारकरी मंडळे व स्थानिक रहिवाशांचा सहभाग असेल. दिंडीचा उद्देश वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धनातून राष्ट्रभक्तीचा संदेश देण्याचा असून, तशी प्रतिज्ञा व गीत गायन होईल. दिंडी मार्गावर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीचे पूजन होईल.”
सकाळी 9.00 वाजता साहित्य संमेलनाच्या ठिकाणी साधु वासवानी मंडपात ग्रंथदालन, क्रांतीकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रदर्शन व परमवीरचक्र चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. त्यावेळी साहित्य व संस्कृती मंडळाचे ज्योतीराम कदम बीजभाषणातून साहित्य संमेलनाची भूमिका मांडतील. संमेलनात राष्ट्रभक्तीचा अविष्कार, संविधानिक स्वातंत्र्य-स्वैराचार-कर्तव्ये, राष्ट्रभक्ती व  प्रसारमाध्यमे, मराठीच्या विविध बोलीभाषांचे राष्ट्रभक्तीसंदर्भात योगदान, सैनिकीकरणात महिलांचे योगदान, वृक्ष लागवड व पर्यावरण रक्षण ही देखील राष्ट्रभक्ती आहे, अशा विविध सत्रातून जाणकारांची व्याख्याने होणार आहेत.
संमेलनाच्या समारोपावेळी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. दिनेशकुमार त्यागी, ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध सत्रांतून राष्ट्रभक्ती, पर्यावरण संवर्धन, मराठी-कोकणी-अहिराणी-झाडी बोलीभाषांची ओळख होईल. बोलीभाषेतील कवी संमेलनाच्या प्रारंभी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पूजन घोलेरोड प्रभाग समितीच्या अध्यक्षा सौ. स्वाती अशोक लोखंडे यांचे शुभहस्ते होणार आहे.
या संमेलनात सैनिकीकरणाच्या कार्यासाठी बहादूरवाडी येथील मामा देसावळे, स्वातंत्र्यसेनानी कै. मोरेश्वर गोपाळ बवरे व सुशीलाबाई बवरे (मरणोत्तर )जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, असे शहासने यांनी नमूद केले.
स्वातंत्र्याचे सुराज्य करण्यासाठी वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, जागतिक तापमान वाढ याविषयी युवकांमध्ये जनजागृती करून जीवसृष्टीला जगण्यालायक वातावरण निर्मिती प्रचार करणे, हे साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट आहे. वृक्ष-पर्यावरण दिंडी व सामाजिक वनीकरणाचा संदेश, स्वातंत्र्यसेनानी व त्यांच्या उत्तराधिकार्यांच्या हस्ते दीपोत्सव, राष्ट्रभक्ती-पर्यावरण-संस्कार-बोलीभाषा विषयक स्मरणिका, पुस्तकांचे प्रकाशन, प्रत्येक विद्यार्थ्यास एक पुस्तक भेट, मराठीच्या बोलीभाषांची ओळख, सांस्कृतिक ग्रंथदालन, मराठीच्या बोलीभाषेतून कवी संमेलन आदी या संमेलनाची वैशिष्ट्य आहेत.
चंद्रशेखर कोरडे, दिवाकर घोटीकर, दत्तात्रय उभे, विजय जोग, पंढरीनाथ बोकारे, प्रा. रेखा पाटील या संमेलनात समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. हे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन पुर्णत: नि:शुल्क असून संमेलनस्थळी अल्पोपहार/भोजन व्यवस्था नि:शुल्क करण्यात आलेली आहे.

जीटीडीसीतर्फे टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबईतील कर्करोगग्रस्त लहान मुलांसाठी बोट क्रुझ सहलीचे खास आयोजन

0

पणजी – टाटा कॅन्सर रिसर्च मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे कर्करोगावर उपचार घेत असलेल्या लहान मुलांनी गोवा पर्यटन विकास महामंडळाने आयोजित केलेल्या मांडवी नदीवरील सँटा मोनिका येथील खास क्रुझचा आनंद लुटला.

कर्करोग झालेल्या व त्यावर टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे उपचार घेणारी २८ मुले गुरुवारी आपल्या पालकांसह मडगाव येथे तीन दिवसीय सहलीसाठी दाखल झाली.

सुट्टीचा एक भाग म्हणून त्यांनी देवळे, चर्च, समुद्रकिनारे यांना भेट दिली आणि मांडवी नदीतील बोट क्रुझचा आनंद घेतला.

केंद्रीय मंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्या खास विनंतीवरून जीटीडीसीने या क्रुझचे आयोजन केले होते.

जीटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि पीआरओ दीपक नार्वेकर यांनी मुले व त्यांच्या पालकांचे सँटा मोनिकावर स्वागत केले. केंद्रीय मंत्री, ओएसडी श्री. सुरज नाईक, जीटीडीसीचे सहाय्यक व्यवस्थापक – क्रुझएस, श्री. सुरेंद्र सावंत, जीटीडीसीच्या अधिकारी श्रीमती मनिषा शिरोडा आणि श्री. निलेश नाईक देसाई यांनी याप्रसंगी उपस्थित राहून सँटा मोनिकावरील उपक्रमांचे समन्वय केले. टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे कर्मचारी आणि स्वयंसेवकही यावेळेस हजर होते.

श्रीमती स्वाती म्हात्रे, ज्यु. पीआरओ आणि श्री. संतोष शेरवडे, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पब्लिक रिलेशन्स टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि हॉस्पिटलचे इतर अधिकारीही यावेळेस उपस्थित होते.

मुलांसाठी जीटीडीसीने सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या.

जीटीडीसीचे अध्यश्र श्री. दयानंद सोपटे यांनी ही आपला पूर्ण पाठिंबा देत मुलांना आरामदायी आणि आनंदी वास्तव्याचा अनुभव घेता येईल याकडे पूर्ण लक्ष दिले.