Home Blog Page 3044

आचारसंहितेपूर्वी मराठा आरक्षण द्या; अन्यथा जागा दाखवू छावा मराठा संघटनेतर्फे सरकारला इशारा

0
पिंपरी –
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. परंतु भाजप-शिवसेनेकडे आरक्षण देण्यासाठी इच्छाशक्तीचा अभाव दिसत आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत तारखांवर तारखा देऊन वेळ मारून नेली जात आहे. निवडणूकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. अन्यथा सत्ताधार्‍यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशारा छावा मराठा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
छावा मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी भाजप-सेनेने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
सत्ताधारी पुढार्‍यांनी मराठा आरक्षणाचा खेळ मांडला असून, हा खेळ संपविण्यासाठी सर्वांनी एकत्र येत उभारलेल्या लढ्याला मूर्त रुप यावे. निवडणुकीपूर्वी समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर सत्ताधारी भाजप-शिवसेनेने होणार्‍या परिणामांना तयार रहावे, असा इशारा राम जाधव यांनी दिला आहे.
मराठा समाजाला आज खर्‍या अर्थाने आरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. मराठा समाज पिढ्यान्पिढ्या शेती व्यवसाय करत आला आहे. समाजातील कोणत्याही नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी समाजाच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. समाजातील बोटावर मोजण्याएवढ्याच लोकांकडे शेकडो एकर जमिनी व संपत्ती आहे. 90 टक्के समाज आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. आपल्या जातीसाठी कोणत्याही नेत्याने ठोस भूमिका घेतलेली नाही. समाजाची शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पीछेहाट झालेली आहे. त्यामुळे मराठा समाजास आरक्षण मिळाले पाहिजे. ते मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. अधिवेशनापूर्वीच आरक्षणावर निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याअगोदर यावर ठोस निर्णय होणे गरजेचे आहे. अन्यथा राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध स्तरांवर आंदोलन सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. यासंदर्भात सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असली, तरी सर्व समाजाने दबाव आणल्याशिवाय आरक्षण मिळेल, असे वाटत नाही. त्यामुळे येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ते न मिळाल्यास राज्यातील मराठा समाज वेळप्रसंगी सत्ताधार्‍यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा राम जाधव यांनी दिला आहे.

स्थायी समिती आणि अधिकारी यांच्यात जोरदार वादंग – १२ आधिकाऱ्यांना केले दरवाजे बंद….

0

पुणे- महापालिकेतील स्थायी समिती आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यातील सुप्त संघर्ष आज अचानक उफाळून आला . आणि स्थायी समिती ने नगरअभियंता ,पाणीपुरवठा प्रमुख यांच्यासह १२ आधिकाऱ्यांना स्थायी सभागृहाचे दरवाजे बंद केले .स्थायी समितीची बैठक सुरु असताना हे दरवाजे बंद करण्यात आले त्यामुळे थोडा वेळ प्रतीक्षा करून अखेर या अधिकाऱ्यांनी आपआपल्या कार्यालयात माघारी पावले वळविली .
आज महापालिकेतील स्थायी समितीची बैठक सुरु झाल्यावर अनेक अधिकारी अनुपस्थित होते ते पाहून स्थायी समिती अध्यक्ष आणि नगरसचिव यांनी दोहोंनी हे दरवाजे बंद केले . आधिकाऱ्यांना वेळेची किंम्मत कळली पाहिजे . वेळेवर त्यांनी बैठकांना हजर राहिले पाहिजे असा सूर लावला गेला .
तर दुसरीकडे अधिकाऱ्यांना दरवाजे बंद केल्याने अधिकाऱ्यांमध्ये देखील रोष पसरला . वेळेवर येवून आम्ही  2 / 2 तास बसून राहतो ,तरी स्थायी ची बैठक सुरु होत नाही .अनेक वेळा स्थायी अध्यक्षांच्या अँटीचेंबर मधील बैठकीपुर्वीची खलबते लांबतात आणि अधिकाऱ्यांना प्रतीक्षेत ताटकळत बसावे लागते .येथे हवे तर चालू स्थितीतील  सीसीटीव्ही लावा. बैठका नेमक्या किती वाजता सुरु होतात ते पहा . आणि शासनाचे आदेश हि तपासा , शासनाने याबाबत काढलेल्या आदेशाकडे अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे ,अर्धा  तास उशीर झाला की नगरसचिवांनी बैठक तहकूब करावी असे म्हटले आहे. पण नगरसचिव हे स्थायी अध्यक्षांच्या दबावाखाली काम करतात .असा सूर आज अधिकाऱ्यांमध्ये होता.
एकंदरीत स्थायी समिती आणि महापालिका अधिकारी यांच्यात असलेला वर्षानुवर्षांचा हा सुप्त संघर्ष आज स्थायी समिती ने घेतलेल्या ‘दरवाजे बंद ‘ च्या निर्णयाने उफाळून आला आहे .
आज दरवाजे बंद झाल्यानंतरही आयुक्त बैठकीला गेले मात्र त्यांच्यासाठी दरवाजे उघडले गेले .

महाराष्ट्राचा गाडा नीटनेटका चालविण्यासाठी पुन्हा हातात हात घालून काम करावे लागेल ; आबा बागुलांसारख्या कर्तृत्वान व्यक्तींना प्रोत्साहन दिलेच पाहिजे :शरद पवार

पुणे
समाजाप्रती आस्था असणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन दिलेच पाहिजे. कर्तृत्वान असणाऱ्या आबा बागुल यांना कसे सहाय्य करायचे हे आम्ही ठरविले आहे. काँग्रेस कि राष्ट्रवादी पक्ष न पाहता चांगल्या व्यक्तींना प्रोत्साहन दिले जाईल अशी ग्वाही देताना महाराष्ट्राचा गाडा पुन्हा नीटनेटका चालविण्यासाठी आता हातात हात घालून काम करावे लागेल असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी येथे केले.
माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक आबा बागुल यांच्या संकल्पनेतून आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून तळजाई टेकडी येथे साकारलेल्या क्रिकेटपटू कै. सदू शिंदे क्रिकेट स्टेडियमचा लोकार्पण सोहळा शरद पवार यांच्या हस्ते आणि कै. सदू शिंदे यांच्या कन्या व शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार व कुटुंबियांच्या विशेष उपस्थितीत तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील , खासदार सुप्रिया सुळे ,आमदार विश्वजित कदम, क्रिकेटपटू चंदू बोर्डे , सदानंद मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण , विठ्ठलशेठ मणियार , माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार उल्हास पवार , मोहन जोशी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे , काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, विरोधीपक्षनेते चेतन तुपे, नगरसेवक महेश वाबळे, संयोजक व माजी उपमहापौर व स्थानिक नगरसेवक आबा बागुल आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले कि, आबा बागुल यांच्या पुढाकारातून चांगला प्रकल्प झाला आहे. सर्व घटकांचा विचार करून पर्यावरणपूरक प्रकल्प ते येथे राबवित आहेत ,ही चांगली बाब आहे. पुण्याचे स्थान क्रिकेटमध्ये मोठे होते. ज्या देवधरांच्या पुण्याने अनेक खेळाडू दिले त्या पुण्यात कै सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम साकारले आहे. मात्र या स्टेडियममध्ये प्रशिक्षक नियुक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत ;पण सामान्य आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना वाव देण्यासाठी या स्टेडियममध्ये प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारू नये अशी सूचनाही त्यांनी केली. आज क्रिकेट क्षेत्रात महिलांचे स्थान अव्वल आहे,त्यांनाही चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे असे स्पष्ट करून शरद पवार म्हणाले , माझ्या कारकिर्दीत मी अनेक खेळांना प्रोत्साहन दिले. जुन्या खेळाडूंकडून मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. इतकेच नाहीतर निवृत्त खेळाडूंना पेन्शन योजनाही राबविली. सदू शिंदे यांनी क्रिकेट क्षेत्रात नाव केले. मी त्यांचा खेळ पाहिला नाही पण चंदू बोर्डे यांच्या पुस्तकात त्यांच्याविषयी असलेला उल्लेख खूप महत्वपूर्ण आहे. आज त्यांच्या नावाने साकारलेल्या या स्टेडियमध्ये इनडोअर क्रिकेट अकेडमी सुरु करावी त्यासाठी सर्व नगरसेवकांनी मुंबईत आम्ही सुरु केलेले इनडोअर स्टेडियम पाहावे असे आवाहनही त्यांनी केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आबा बागुल यांच्याविषयी उपस्थित केलेल्या मुद्द्याचा धागा पकडत शरद पवार म्हणाले, आबा बागुल यांचे काम हे चांगलेच असते, असे म्हणत त्यांनी आबा बागुलांकडे पाहत कितीवेळा निवडून आला पाच कि सहा , आता कंटाळा नाही का आला. पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या भाषणात म्हणाले, आबा बागुल यांना नव्या क्षेत्रात संधी दिली पाहिजे. त्यांना सहाय्य केले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे त्यावर आमची कर्तृत्वान व्यक्तींसाठी नेहमीच प्रोत्साहनाची भूमिका आहे असे स्पष्ट करून पवार यांनी आबांना साहाय्य केले जाईल . काँग्रेस कि राष्ट्रवादी पक्ष हे आम्ही पाहणार नाही असे स्पष्ट केले आणि महाराष्ट्राचा गाडा पुन्हा नीटनेटका चालविण्यासाठी आता हातात हात घालून काम करावे लागेल अशी भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि , देशातील सर्व महापालिकांनी आदर्श घ्यावा असे प्रकल्प , स्टेडियम आबा बागुल यांनी साकारले आहेत. केवळ कागदावर नाही तर प्रत्यक्षात अनेक प्रकल्प उभे केले आहेत. त्याचा मी साक्षीदार आहे. ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प असो किंवा राजीव गांधी ई – लर्निग स्कुल हे मी पाहिले आहे. जैव वैविध्य उद्यानामुळे पर्यावरण शास्त्राचा लाभ पुणेकरांना होणार आहे. कै. सदू शिंदे क्रिकेट स्टेडियममुळे चांगले खेळाडू निर्माण होतील असा आशावाद व्यक्त करताना आता नगरसेवक बास , पवार साहेबांचा आशीर्वाद मिळाला तर चांगला लोकप्रतिनिधी पुढे जाईल असे साकडे त्यांनी घातले.
विश्वजित कदम म्हणाले ,कै. पतंगराव कदम यांच्यासमोर आबा बागुल यांनी जैव वैविध्य उद्यानाचा आराखडा मांडला होता. जिद्द आणि कल्पकतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आबा बागुल असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
माजी आमदार उल्हास पवार यांनी शहराचा विकास सर्वांनी मिळून करण्याची अपेक्षा व्यक्त केली. तर माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांनी आजच्या काळात जुन्या खेळाडूंना कुणी विचारत नाही असे असताना आबा बागुल यांनी मात्र जुन्या खेळाडूंना लक्षात ठेवले आहे. आज सदू शिंदे क्रिकेट स्टेडियमच्या लोकार्पण सोहळ्यात टॉस झाल्यावर शरद पवारांनी बॉलिंग घेतली कारण त्यांना खेळपट्टीची चांगली माहिती आहे. असे मिश्कीलपणे नमूद करताना स्टेडियमची देखभाल दुरुस्तीकडे लक्ष दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

संयोजक आबा बागुल म्हणाले कि, २५ वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले आहे. पक्षहित न पाहता आजवर कार्यरत आहे. लोकांना उपयोगी पडणाऱ्या प्रकल्पामुळेच आज सलग सहावेळा निवडून येत आहे. जैव वैविध्य उद्यानाचा आराखडा सर्वप्रथम माजी वनमंत्री कै. पतंगराव कदम यांच्यासमोर मांडला होता याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
प्रास्ताविक उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांनी तर सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केले. आभार नगरसेवक अविनाश बागवे यांनी मानले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0

पुणे, दि.27: संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती इमारतीजवळील पुतळयास पुष्पहार अर्पण करुन  त्यांना अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांना शुभेच्छा देवून भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

      यावेळी समाजकल्याणचे भिमराव खंडाते, समाज कल्याणचे प्रादेशिक उप आयुक्त संजय दाने, प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे, समाज कल्याणचे सह आयुक्त माधव वैद्य, विजयकुमार गायकवाड, विशाल लोंढे, मल्लीनाथ हारसुरे, लोखंडे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, समाज कल्याण अधिकारी हरिष डोंगरे कर्वे समाज सेवा संस्थेचे दिपक कर्वे, अंजली मायदेव, प्रीती शेलार, अंकिता खडके, प्रज्ञा जाधव, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

सॅमसंगने केली युनेस्को एमजीआयईपी आणि नवोदय विद्यालयांबरोबर माय ड्रीम प्रोजेक्टची घोषणा, आंध्र प्रदेशात 14 सॅमसंग स्मार्ट क्लासची घोषणा

0
  • विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक परिणामकारक कसे ठरू शकते व त्यांचा तणाव कसा कमी होऊ शकतो, हे शोधण्यासाठी माय ड्रीम हा दोन वर्षे कालावधीचा संशोधन अभ्यास
  • आंध्र प्रदेश सरकारबरोबरच्या भागीदारीमध्ये राज्यातील 14 बी.एड व डी.एड कॉलेजांचा समावेश

 

विशाखापटणम, भारत सॅमसंग इंडियाने भारतातील पूर्व-माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक परिणामकारक कसे ठरू शकते आणि विद्यार्थ्यांवरील ताण कसा कमी करता येऊ शकतो, हे शोधण्याच्या हेतूने, युनेस्को एमजीआयईपी (महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन फॉर पीस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट) व नवोदय विद्यालय समिती यांच्या सहयोगाने माय ड्रीम प्रोजेक्ट या संशोधन अभ्यासाची घोषणा केली आहे.

आंध्र प्रदेश सरकारशी केलेल्या स्वतंत्र भागीदारीनुसार, सॅमसंगने आंध्र प्रदेशमधील बॅचलर्स ऑफ एज्युकेशन (बी.एड) व डिप्लोमा इन एज्युकेशन (डी.एड) कोर्सेस चालवणाऱ्या 17 सरकारी कॉलेजांमध्ये सॅमसंग स्मार्ट क्लास स्थापन करण्याचे जाहीर केले आहे.

14 सॅमसंग स्मार्ट क्लास 200 तासांचा अभ्यासक्रम शिकवणार असून, हा अभ्यासक्रम युनेस्को एमजीआयईपी उपक्रम असणाऱ्या ‘टीचिंग फॉर टेक्नालॉजी’ अंतर्गत, आंध्र प्रदेशसाठी तयार करण्यात आला आहे. हा कोर्स युनेस्को एमजीआयईपीने तयार केला आहे, जेणे करून भविष्यातील शिक्षकांना विद्यार्थ्यांना कसे शिकवावे, याचे प्रभावी प्रशिक्षण डिजिटल माध्यमांच्या मदतीने व नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून देता येऊ शकते.

माय ड्रीम प्रोजेक्टअंतर्गत, सॅमसंग आणि युनेस्को एमजीआयईपी हे भारतभरातील जवाहर नवोदय विद्यालय (जेएनव्ही) या शाळांमध्ये दोन वर्षे कालावधीच्या संशोधन अभ्यासाचे आयोजन करणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी जवाहर नवोदय विद्यालयाकडून मूल्यमापन केल्या जाणाऱ्या गणित व विज्ञानाच्या गुणांनी ठरवली जाणारी शिक्षणाची परिणामकारक वाढवण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी प्रोजेक्ट-बेस्ड आणि सोशो-इमोशनल लर्निंग (एसईएल) यांचा वापर कशा प्रकारे करता येऊ शकतो, हे समजून घेण्याच्या दृष्टीने या अभ्यासाची रचना करण्यात आली आहे.

माय ड्रीम प्रोजेक्ट या प्रकल्पाद्वारे, युनेस्को एमजीआयईपीला बौद्धिक व भावनिक बाबतीत सक्षम तरुण व्यक्ती घडवायच्या आहेत. शिक्षण हे धमाल व ताणमुक्त असावे, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर, युवा वर्गाला जागृत, दयापूर्ण व सहानुभूतीमय बनवायचे आहे. या संशोधन प्रकल्पामुळे आम्हाला विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची परिणामकारकता कशी वाढवता येईल आणि त्यांचा ताण कसा कमी करता येईल, हे समजून घेण्यासाठी मदत होणार आहे. युनेस्को एमजीआयईपी, नवोदय विद्यालय समिती सॅमसंग यांच्यातील भागीदारी केवळ भारताच्या दृष्टीनेच नाही, तर जागतिक स्तरावर परिणाम करणारी ठरणार आहे,” असे युनेस्को एमजीआयईपीचे संचालक डॉ. अनंथा के. दुरईअप्पाह यांनी सांगितले.

अभ्यासासाठी, सॅमसंग आधीपासूनच सॅमसंग स्मार्ट क्लास चालवत असलेल्या 64 जवाहर नवोदय विद्यालय शाळांची निवड करण्यात आली आहे.

एमजीआयईपीसॅमसंग यांच्या सहयोगाने राबवल्या जाणाऱ्या माय ड्रीम प्रोजेक्टमुळे, भारतात शिक्षणामध्ये डिजिटल पद्धतीचा अवलंब करण्याच्या दृष्टीने व डिजिटल बाबतीतील स्पर्धात्मकता वाढवण्याच्या दृष्टीने चालना देण्यासाठी मदत होणार आहे. नवोदय विद्यालय ही निवासी व्यवस्था असल्याने, सॅमसंग स्मार्ट क्लास डिजिटल सुविधेमार्फत प्रोजेक्ट-बेस्ड आणि सोशो-इमोशनल लर्निंग (एसईएल) सुरू केल्याने विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्याच्या संदर्भात एक दिशा मिळणार आहे,” असे नवोदय विद्यालय समितीचे आयुक्त बी. के. सिंग म्हणाले.

 विद्यार्थ्यांना 21व्या शतकामध्ये टिकण्यासाठी गरजेची असणारी कौशल्ये बहाल करून, त्यांना सबल करण्याचा प्रयत्न करणारे अपूर्व संशोधन करण्यासाठी युनेस्को एमजीआयईपी नवोदय विद्यालय समिती यांच्याशी भागीदारी करताना सॅमसंगला अतिशय अभिमान वाटत आहे,” असे सॅमसंग इंडियाचे कॉर्पोरेट उपाध्यक्ष पीटर ऱ्ही यांनी नमूद केले.  

अभ्यासाच्या शेवटी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे अंतिम अहवाल व शिफारसी सादर केल्या जाणार आहेत.

आंध्र प्रदेशातील 14 सरकारी बी.एड व डी.एड कॉलेजांमध्ये सॅमसंग स्मार्ट क्लास स्थापन करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारशी केलेल्या भागीदारीमार्फत, डिजिटल तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होईल अशी ट्रान्समिसिव्ह शिक्षणपद्धती अवलंबण्यासाठी आणि तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या नव्या शक्यतांची सांगड अभ्यासक्रमाशी व धड्यांशी घालण्यासाठी वर्तनात व दृष्टिकोनात बदल करण्यासाठी शिक्षकांना मदत केली जाणार आहे.

युनेस्को एमजीआयईपीने तयार केलेल्या 200 तासांच्या अभ्यासक्रमाच्या मदतीने, आंध्र प्रदेश सरकार बी.एड कोर्सचा भाग म्हणून डिजिटल इन्स्ट्रक्शन डिझाइन व प्रशिक्षण सुरू करणार आहे. ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी, सॅमसंग सर्व सरकारी बी.एड व डी.एड कॉलेजमध्ये सॅमसंग स्मार्ट क्लास स्थापन करून सहकार्य करत आहे,” असे आंध्र प्रदेश सरकारचे शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुक्त सचिव आदित्यनाथ दास यांनी सांगितले.

सॅमसंग स्मार्ट क्लास सध्या 652 जवाहर नवोदय विद्यालय शाळांमध्ये, तामिळनाडूतील 28 सरकारी शाळांमध्ये आणि तीन दिल्ली पोलीस पब्लिक स्कूल्समध्ये उपलब्ध असून, भारतातील एकूण सॅमसंग स्मार्ट क्लासची संख्या 683 आहे.

सन 2013 मध्ये, नवोदय विद्यालय समितीच्या सहयोगाने पहिल्यांदा सॅमसंग स्मार्ट क्लास सुरू झाला व तेव्हापासून 2.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे. याबरोबरच, 8,000 हून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांना परिणामकारकपणे शिकवण्यासाठी, शिकवण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी व सरकारी शाळांमध्ये क्षमता विकास करण्यासाठी संवादात्मक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, हे सांगण्यात आले. या उपक्रमामुळे, विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची अधिकाधिक ओळख होत आहे आणि विद्यार्थ्यांना कठीण संकल्पना सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी मदत झाली आहे.

प्रत्येक सॅमसंग स्मार्ट क्लासमध्ये इंटरॅक्टिव्ह सॅमसंग स्मार्टबोर्ड्स, सॅमसंग टॅब्लेट्स, प्रिंटर, वायफाय कनेक्टिविटी व पॉवर बॅकअप आहे.

बोलीभाषा वाढवते प्रमाणभाषेची समृद्धी- डॉ. रामचंद्र देखणे

0

पुणे : “बोलीभाषा या प्रमाणभाषेच्या पूरक नाही, तर प्रेरक भाषा आहेत. टप्प्याटप्प्यांवर बोलल्या जाणाऱ्या या बोलीभाषा प्रमाणभाषेची समृद्धी वाढवत असतात. त्यामुळे बोलीभाषा टिकवणे आवश्यक आहे. राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनामुळे तत्वदर्शन आणि साहित्यदर्शन घडण्याबरोबरच बोलीभाषांच्या संवर्धनास मदत होणार आहे,” असे प्रतिपादन लेखक आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी डॉ. देखणे बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील श्री वर्धमान प्रतिष्ठान येथे भरलेल्या या संमेलनाच्या समारोपावेळी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल कराड, ज्येष्ठ लेखक भारत सासणे, कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, संमेलनाध्यक्ष रंगनाथ नाईकडे, स्वागताध्यक्ष कवयित्री मंदाताई नाईक, कार्याध्यक्ष चंद्रकांत शहासने, संमेलन दिंडी प्रमुख उर्मिलाताई कराड, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे ज्योतिराम कदम, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त मंजिरी शहासने, अॅड. नंदिनी शहासने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मराठी-अहिराणी-झाडी बोलीभाषा यावर परिसंवाद झाले. सैनिकीकरणाच्या कार्यासाठी बहादूरवाडी येथील मामा देसावळे, स्वातंत्र्यसेनानी कै. मोरेश्वर गोपाळ बवरे व सुशीलाबाई बवरे (मरणोत्तर) जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मराठीच्या बोलीभाषेतून रंगलेल्या आद्यकवी मुकुंदराज कवी संमेलनाला श्रोत्यांच्या उत्तम प्रतिसाद मिळाला. डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्व विशद केले.

डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, “अनेक प्रकारची साहित्य संमेलने होतात. पण राष्ट्रभक्ती जागविणारे हे पहिलेच संमेलन असावे. पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवड, तसेच बोलीभाषांचे संवर्धन करण्याचा विचार मांडू पाहणारे हे संमेलन वेगळी उंची गाठेल. आज समाजात राष्ट्रीय जाणिवेचा अभाव दिसून येतो. अशावेळी हे संमेलन उपयुक्त ठरेल.”

प्रा. राहुल कराड म्हणाले, “जागतिक पातळीवर तापमान वाढ आणि पर्यावरणाचा ऱ्हास या दोन समस्या भेडसावत आहेत. यावर उपाय म्हणून वृक्षलागवड करणे अत्यावश्यक आहे. त्याची सुरुवात शाळा-महाविद्यालयातून होणे गरजेचे आहे. एमआयटीने आपल्या सर्वच संस्थांच्या परिसरात वृक्षलागवडीवर भर दिलेला आहे. युवा पिढीला घडविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यायला हवा.

चंद्रकांत शहासने म्हणाले, “या संमेलनाला मिळालेला प्रतिसाद आनंददायी आहे. राष्ट्रभक्तीचा वेगळा विचार पेरण्याचे सामर्थ्य या संमेलनाने दाखवून दिले आहे. झाडे लावणे, जगवणे आणि पर्यावरण रक्षण ही राष्ट्रभक्ती समजून आपण काम करावे.”

ऍड. नंदिनी शहासने, उत्तम पवार, साधना जोशी, भंडारा येथील डॉ. हरिश्चंद्र बोरकर, प्रा. ना. गो. थुटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. नीना देसाई, संजय बोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. मंजिरी शहासने यांनी आभार मानले.

महावितरणमध्ये संविधान दिन उत्साहात

0

पुणे : रास्तापेठ येथे महावितरण व महापारेषणच्या पुणे परिमंडल कार्यालयात सोमवारी (ता. 26) संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते सर्वश्री सुंदर लटपटे, विजय भाटकर, सतीश गायकवाड, सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर) श्री. राजेंद्ग म्हंकाळे, प्रशांत चौधरी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, अभियंते, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. भागवत थेटे यांनी केले.

शबरीमलाला पुन्हा जाणारच! – तृप्ती देसाई

0
पुणे- केरळ प्रशासनाने मला कोची विमानतळावरुनच परतायला भाग पाडले असले तरी मी पुन्हा केरळला जाणार असून शबरीमला देवस्थानात प्रवेश करुन अय्यप्पाचे दर्शन घेणारच. कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळात स्त्रीयांना प्रवेश नाही असे कोणत्याही देवाने सांगितलेले नाही. घटनेने दिलेल्या मानवी स्वातंत्र्याच्या कक्षेत स्त्रीयांचे प्रार्थनास्वातंत्र्य परंपरेच्या नांवाखाली नाकारले जाणे हा केवळ न्यायालय व घटनेचा अवमान नाही तर खुद्द देवांचाही अवमान आहे असे मत शबरीमला आंदोलनात सहभागी असलेल्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले. त्या आदिम हिंदू महासंघाने आयोजित केलेल्या “शबरीमला: महिला स्वातंत्र्य आणि संविधान” या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात बोलत होत्या. या परिसंवादात ज्येष्ठ लेखक-संशोधक संजय सोनवणी, युवा विचारवंत सतीश पानपत्ते, गायत्री पाठक, स्नेहल ठाणगे व अनन्या कडले यांनी सहभाग घेतला.
केवळ केरळ प्रशासनाने पुकारलेल्या असहकाराच्या धोरणामुळे आपल्याला कोची विमानतळावरुनच कसे परतावे लागले याचे अनुभव सांगत देसाई म्हणाल्या की हा आस्थेचा विषय नसून त्या नांवाखाली राजकारणाचा विषय बनवला गेला आहे आणि संघाची पुरुषसत्ताकवादी सनातनी विचारधारा त्यामागे काम करत आहे. आपण या प्रवृत्तीविरुद्ध संघर्ष करणारच असून आदिम हिंदू महासंघाने घेतलेल्या स्त्रीस्वातंत्र्यवादी भुमिकेचे त्यांनी स्वागत केले.
संजय सोनवणी म्हणाले की आठशे वर्षांपुर्वी ज्या दैवताचे अस्तित्वही नव्हते त्या देवाचे मार्केटिंग करण्यासाठी वैदिक पुरोहितांनी भाकडकथा रचत महिलाबंदी लादली आणि भोळ्या भाविकांनी ती स्विकारली. वैदिक अथवा हिंदू धर्मशास्त्रांत रजोदर्शनास अपवित्र अथवा त्या काळात अस्पृष्य मानले गेलेले नाही. हिंदू धर्मात प्रथमपासून स्त्रीयांना समतेचे स्थान आहे, पण ते पुरुषप्रधान वैदिक संस्कृतीच्या प्रभावात खालावले गेले आणि स्त्रीयांवर अतोनात बंधने लादली गेली. या वैदिक प्रभावातून मुक्त होत हिंदूंनी स्त्रीयांचे बरोबरीचे स्थान मान्य केले पाहिजे आणि त्यांच्या स्वातंत्र्याची महत्ता जपली पाहिजे.
सतीश पानपत्ते यांनी शबरीमला मंदीरांत महिलांना प्रवेश द्यावा या सुप्रिम कोर्टाच्या घटनात्मक भुमिकेचे स्वागत केले आणि म्हणाले की महिला स्वातंत्र्य हा केवळ सामान्य समजदारीचा विषय असून सामान्य धर्मस्थानांच्या कथित परंपरागत नियमांना संविधानिक मुल्ये व कायदे बाद ठरवत असतात. “परिवर्तनशील आणि कालसुसंगत हिंदूहितवाद” या प्रवाही विचारात आपण भेदभाव सोडुन बदल स्वीकारले पाहीजे. “सतिप्रथा, बालविवाह” या परंपराच होत्या पण आपण त्या सोडल्या! हा प्रवाहीपणा जतन झाला नाही तर हिम्दू धर्माचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नुकसान होईल.
गायत्री पाठक, स्नेहल ठाणगे, व अनन्या कडले यांनीही स्त्रीयांचे खालावलेले सामाजिक स्थान, त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा लिंगभेदाच्या जाणीवांतून केला गेलेला संकोच आणि त्यातून होत असनारी घुसमट आपल्या भाषणांतुन व्यक्त केली. गणेश अटकाळे यांनी प्रास्तविक व सुत्रसंचालन केले.

सर्कस कलावंतांनी नवीन कला आत्मसात कराव्यात – पी.टी. दिलीप

0

पुणे-भारतीय सर्कसमध्ये आता प्राणी नसले तरी सर्कसला अजूनही लोकप्रियता तेवढीच आहे. त्याचे सारे श्रेय मी सर्कस कलावंतांना देतो. आता बदलत्या युगात सर्कस कलावंतांनी परदेशी सर्कसचा अभ्यास करावा व त्यांचे कलाप्रकार आत्मसात करावे. त्याशिवाय आधुनिक तंत्रज्ञान, लाईट इफेक्टस्, म्युझीक यांचा कल्पकतेने वापर करावा. त्यामुळे भारतीय सर्कस देशात अधिक लोकप्रिय होईलच शिवाय परदेशातही भारतीय सर्कशींना मागणी राहील हीच भारतीय सर्कसचे जनक विष्णुपंत छत्रे यांना श्रद्धांजली ठरेल असे मत रॅम्बो सर्कसचे मालक पी.टी. दिलीप यांनी व्यक्त केले. भारतीय सर्कसचे शिल्पकार विष्णुपंत छत्रे यांनी 26 नोव्हेंबर 1882 मध्ये मुंबईत बोरीबंदर येथे आपल्या सर्कसचा पहिला शो केला. त्यास 136 वर्ष पूर्ण झाली. तसेच जागतिक सर्कसचे ही यंदाचे 250वे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर मगरपट्टा सिटीजवळील मुंढवा रेल्वे ओव्हरब्रीज जवळ चालू असणार्‍या रॅम्बो सर्कसमध्ये भारतीय सर्कसचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी प्रथम विष्णुपंत छत्रे यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. विष्णुपंत छत्रे यांचे वारस अजय व सौ. कल्पना छत्रे, आंतरराष्ट्रीय सर्कसपटू दामू धोत्रे यांचे पणतू आनंद धोत्रे, ‘सर्कसविश्व’ व ‘वर्ल्ड ऑफ सर्कसचे’ लेखक प्रवीण प्र. वाळिंबे यांचा सर्कसमधील विदूषकांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच रॅम्बो सर्कसचे चालक पी.टी. दिलीप व त्यांचे सुपुत्र सुजीत दिलीप यांच्या रॅम्बो सर्कसला 25 वर्ष होऊन गेल्याबद्दल त्यांचा पुणेरी पगडी, शाल व पुष्पगुच्छ देऊन सर्कसमधील विदुषकांनी सत्कार केला. यावेळी सर्कस तंबूमध्ये सर्व सर्कस कलावंत तसेच फ्रेंडस् ऑफ सर्कसचे प्रवीण तरवडे, अ‍ॅड. प्रदीप अगरवाल, बाळासाहेब शिंदे, अब्राल, मुन्नाभाई, सिद्धार्थ जांभूळकर, वाजिद आदी उपस्थित होते.

याप्रसंगी सुजीत दिलीप म्हणाले की, सर्कस हेच आमचे कुटुंब असून देशभर सर्कस घेऊन फिरताना सर्कसबद्दलचे जनतेतील प्रेम दिसून येते. केंद्र व राज्य सरकारची मदत मिळणे आवश्यक असून प्रत्येक पर्यटनस्थळी सर्कसला जागा द्यावी, परदेशी सर्कस भारतात आणून भारतीय सर्कसबरोबर एकत्रीत सर्कस शो करण्यास प्रोत्साहन द्यावे. त्यातून सर्कस कलावंतांना चांगले दिवस येतील व भारतीय सर्कसचा वारसा देखील जोपासला जाईल.

सत्काराला उत्तर देताना विष्णुपंत छत्रे यांच्या नातसून कल्पना छत्रे म्हणाल्या, विष्णुपंत छत्रे यांनी भारतीय सर्कसची मुहुर्तमेढ रोवून नवा इतिहास रचला. आता प्राण्याविना सर्कस असणार हे गृहीत धरून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या कलाप्रकारांसह सर्कस अधिक जोमाने चालवली पाहिजे.

आंतरराष्ट्रीय सर्कसपटू दामू धोत्रे यांचे पणतू आनंद धोत्रे यांनी सर्वच सर्कस कलावंतांना शुभेच्छा देऊन भारतीय सर्कस कलावंतांचा दर्जा कोठेही कमी नाही असे सांगितले.

यावेळी प्रवीण प्र. वाळिंबे यांनी सर्कसला अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पुण्यासह मोठ्या शहरात मध्यवर्ती भागात कमी भाड्याने सर्कस ग्राउंड मिळाले पाहिजे व त्यासाठी जिल्हाधिकारी व महापौर यांनी पुढाकार घ्यावा, तसेच सर्कस, अ‍ॅम्युजमेंट पार्क, जत्रा, हॅन्डलूम एक्झिबिशन अशांसाठी शहरातील मध्यभागात कमी दरात कायम स्वरूपी मैदान उपलब्ध होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांनी एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी 26 नोव्हेंबरच्या मुंबई वरील अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण प्र.वाळिंबे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवीण तरवडे यांनी केले.

टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे ‘जीएसटी’वर प्रमाणपत्र अभ्यासक्रम

0
पुणे : दि वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे (डब्ल्यूएमटीपीए) वस्तू व सेवा कर (जीएसटी) या विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहे. हा अभ्यासक्रम दोन महिन्यांचा असून, त्याची सुरुवात ८ डिसेंबर २०१८ पासून होत आहे. कर प्रणाली अधिक सुकर व्हावी, याकरिता असोसिएशनतर्फे सवलतीच्या दरात महसूल कायद्याच्या जागृतीसाठी नियमित अभ्यासक्रम चालवले जातात. गेल्या वर्षीपासून जीएसटी कायदा लागू झाला असून, हा कायदा नवीन असल्याने सर्वांनाच यामध्ये असंख्य अडचणी येत आहेत. त्यामुळेच वारंवार या कायद्यात शासनाकडून बदल होत आहेत. या कायद्याविषयी माहिती व्हावी, यासाठी हा अभ्यासक्रम महत्वाचा ठरणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे मुख्य संयोजक व माजी अध्यक्ष नरेंद्र सोनावणे, अध्यक्ष नवनीतलाल बोरा, शरद सूर्यवंशी, विलास आहेरकर, अनिरुद्ध चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नरेंद्र सोनावणे म्हणाले, “‘डब्ल्यूएमटीपीए’ ही संस्था १९५० पासून कार्यरत असून, आज संस्थेचे महाराष्ट्राच्या पश्चिम विभागात १२०० पेक्षा अधिक सभासद आहेत. कर सल्लागार, वकील, सीए, कंपनी सेक्रेटरी आदींचा समावेश आहे. हा एक वेगळा आणि महत्वाचा असा अभ्यासक्रम आहे. ज्यामध्ये आम्ही महसूल कायद्यातील कर रचनेविषयी मार्गदर्शन करतो. हे या अभ्यासक्रमाचे १२ वे वर्ष आहे. हा अभ्यासक्रम करून कार्यरत असलेले १००० पेक्षा जास्त कर सल्लागार आहेत. सध्या जीएसटी कायद्यामुळे अनेकजण संभ्रमात आहेत. हा संभ्रम दुर करण्यासाठी हा अभ्यासक्रम महत्वाचा ठरणार आहे. जीएसटी कायद्यातील सर्व तरतुदींचा अभ्यास या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला असून, तीस वर्षांपेक्षा अधिक जास्त अनुभव असलेल्या तज्ज्ञांना यासाठी बोलावले जात आहे.”
दोन महिन्यांचा हा अभ्यासक्रम असून, शनिवारी व रविवारी सकाळी ९ ते १ या वेळेत संस्थेच्या शिवाजी रस्त्यावरील यादव व्यापार भवन या इमारतीतील सभागृहात याचे वर्ग होतील. त्यामध्ये कर सल्लागार, सीए, वकील, सीएस मार्गदर्शन करतील. जीएसटी कायदा, लेखापालन, प्राप्तिकर, ऑडिट, प्रोफेशनल टॅक्स, बँकिंग यासह मूलतत्त्वे यावरही मार्गदर्शन केले जाणार आहे. अभ्यासक्रमाच्या शेवटी परीक्षा घेऊन प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. या अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठी ०२०-२४४७०२३७ या क्रमांकावर किंवा www.thewmtpa.org या संकेस्थळावर भेट द्यावी, असे नवनीत बोरा यांनी सांगितले.

पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा मोठा विजय

0

पुणे- पीवायसी हिंदु  जिमखाना क्लब यांच्या  तर्फे  पीवायसी करंडक 14वर्षाखालील   निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत  पीवीयसी हिंदू जिमखाना  संघाने आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखत  क्लब ऑफ महाराष्ट्र   संघाचा  10 गडी राखून पराभव करत स्पर्धेत मोठा विजय मिळविला. 

पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात घरच्या मैदानावर खेळताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाने आपल्या विजयी मालिकेत सातत्य राखत क्लब ऑफ महाराष्ट्र   संघाचा सर्व 10 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना कुश पाटीलच्या आक्रमक व अचूक गोलंदाजीपुढे क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव 44.3 षटकात सर्वबाद 173 धावांत गारद झाला. यात विवेक टिपरेने 43 तर साहिल कडने 40 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. कुश पाटीलने केवळ 25 धावा देत 5 गडी बाद करून क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव खिळखीळा केला. 173 धावांचे लक्ष समर्थ काळभोरच्या 78 व सुफियान सय्यदच्या 60 धावांसह पीवायसी हिंदू जिमखाना संघाने एकही गडी न गमावता केवळ 37.1 षटकात 174 धावा करून सहज पुर्ण केले. 25 धावांत 5 गडी बाद करणारा कुश पाटील सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

क्लब ऑफ महाराष्ट्र – 44.3 षटकात सर्वबाद 173 धावा(विवेक टिपरे 43, साहिल कड 40, प्रणव केळकर 31, कुश पाटील 5-25, निखिल लुणावत 1-39, प्रणित अठवले 1-14, सुफियान सय्यद 1-11) पराभूत वि पीवायसी हिंदू जिमखाना- 37.1 षटकात बिनाबाद 174 धावा(समर्थ काळभोर 78(109), सुफियान सय्यद 60(114)) सामनावीर- कुश पाटील 

पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 10 गडी राखून सामना जिंकला.

आळंदी कार्तिकी यात्रेच्‍या यशस्‍वीतेसाठी दक्ष रहावे- जिल्‍हाधिकारी राम

0

पुणे- श्री संतश्रेष्‍ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराजांच्‍या  723 व्‍या  संजीवन समाधी सोहळ्यानिमित्‍त आळंदी कार्तिकी यात्रा संपन्न होणार आहे. या यात्रेच्‍या यशस्‍वीतेसाठी सर्व संबंधित विभागांनी जबाबदारीने काम करावे, अशा सूचना जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्‍या. जिल्‍हाधिकारी कार्यालयात श्री क्षेत्र आळंदी कार्तिकी यात्रेबाबत आढावा बैठक झाली. त्‍यावेळी ते बोलत होते. बैठकीस निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, सहायक पोलीस आयुक्‍त निलीमा जाधव, अतिरिक्‍त आयुक्‍त दिलीप गावडे, सहायक आयुक्‍त अण्‍णा बोदडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी दिलीप माने, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, उप विभागीय अधिकारी ज्‍योती कदम, अन्‍न धान्‍य वितरण अधिकारी अस्‍मिता मोरे, खेडच्‍या तहसिलदार सुचित्रा आमले, आळंदी नगर पालिकेचे मुख्‍याधिकारी समीर भूमकर, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्‍थान कमिटीचे अॅड. विकास ढगे पाटील, अभय टिळक, ज्ञानेश्‍वर वीर, सुरेश देशमुख, मारुती कोकाटे यांच्‍यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आळंदी कार्तिकी यात्रा 30 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या काळात होणार असून असंख्‍य भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच यात्रा निर्विघ्‍नपणे पार पडावी, यासाठी जिल्‍हाधिकारी राम यांनी विस्‍तृत आढावा घेतला. कोणत्‍याही यात्रा, सोहळ्याचे नियोजन करतांना सर्व संबंधित यंत्रणांनी दक्ष रहायला हवे.  परस्‍पर समन्‍वय राहण्‍यासाठी प्रत्‍येक विभागाने आपला एक नोडल अधिकारी नेमावा, त्‍यांचे संपर्क क्रमांक देण्‍यात यावेत. तसेच आपत्‍ती निवारण कक्ष स्‍थापन करण्‍यात यावा, अशा सूचना त्‍यांनी केल्‍या. टँकरने पाणीपुरवठा, वारक-यांसाठी रॉकेल, गॅस, धान्‍य उपलब्‍ध करणे, अतिक्रमणे काढणे,  तीर्थक्षेत्रातील प्रमुख भागांमध्‍ये विद्युत व्‍यवस्‍था, पालखी तळावरील स्‍वच्‍छता आणि सपाटीकरण, तात्‍पुरती शौचालये, रुग्‍णवाहिका, औषधे यांची उपलब्‍धता, अग्निशामक व्‍यवस्‍था आदींबाबतही त्‍यांनी आवश्‍यक त्‍या सूचना केल्‍या. आळंदी येथे कार्तिकी एकादशीनिमित्‍त होणा-या यात्रा सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होत असतात. भाविकांच्या  सुविधांबाबत दरवर्षीप्रमाणे प्रशासनाच्‍या सर्व विभागाच्‍या यंत्रणांनी दक्ष रहावे, असेही जिल्‍हाधिकारी राम यांनी सांगितले.

पुण्यातील पाणीवाटपा संदर्भात लवकरच धोरण ठरवणार – पालकमंत्री गिरीश बापट

0
मुंबई :- मागील वर्षापेक्षा या वर्षी  15 % पाऊस कमी झाला असून  यावर्षी खडकवासला संयुक्त प्रकल्पात 21.39 टीएमसी (73.39टक्के) पाणीसाठी असून तो मागील वर्षाच्या तुलनेत 4.26 टीएमसी कमी आहे. पुण्यातील पाणीप्रश्न आगामी काळात उद्भवु शकतो यामुळे पुण्यातील पाणीकपातीबाबत लवकरच धोरण ठरवणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
विधानभवनात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कालवे सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सद्यस्थितीला उपलब्ध पाणीसाठा व येणाऱ्या काळातील गरज याविषयी आढावा घेण्यात आला. खडकवासला संयुक्त प्रकल्पात सध्या 21.39 टीएमसी पाणीसाठा असून तो पुढील 234 दिवस पुण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळेचे येणाऱ्या काळात पाणी काटकसरीने व जपून वापरावे याबाबत धोरण ठरवण्यात आले. जलसंपदा विभागाची पुणे महानगर पालिकेकडे असलेली 72 कोटी पाण्याची थकबाकी लवकरात लवकर देण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या.
मा. मंत्री बापट पुढे म्हणाले की, बेबी कॅनॉलबाबत त्वरीत दुरुस्ती करावी धरणक्षेत्रातील गाळ काढावा. धरणक्षेत्रात आलेले गवत काढण्यात यावे. खडकवासला धरणातून होणारी पाण्याची गळती कमी करावी. पंप लावणाऱ्यावर कडक कारवाई करावी. पुणे महानगरपालिकेबाबत सूचना करताना ते म्हणाले महानगरपालिकेने वेळेत कामे पूर्ण करावीत. पाण्याचा होणार अपव्यय टाळावा. बांधकासाठी लागणाऱ्या पाण्याबाबत योग्या निर्णय घ्यावा. बेकायदेशीर नळजोडणी बाबत कडक कारवाई करावी. उपलब्ध पाणीसाठा पुनर्जिवीत करावा. अशा सूचना करण्यात आल्या या बैठकीस  सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यंत्री विजय शिवतारे, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, पुण्याचे महापौर मुक्ता टिळक, पुण्यातील आमदार  व राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार व सर्व आमदार उपस्थित होते.
पुणे महानगरपालिकेचा दैनंदिन पाणीवापर 1150 एमएलडी पेक्षा अधिक होत असून तो सरासरी 1326 एमएलडी इतका येतो. लोकसंख्येच्या प्रमाणात हा पाणीवार जास्त असल्याचे मत मांडण्यात आले. त्याचबरोबर पुण्याला पाणापुरवठा करणारे खडकवासला वारजे या धरणातून पाईपलाइनद्वारे पाणापुरवठा करण्यात येतो.  यामुळेच येणाऱ्या उन्हाळी हंगामामध्ये सिंचन आवर्तने देणे शक्य होणार नाही. असे मत मांडण्यात आले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येणाऱ्या काळात गंभीर होऊ नये म्हणून पाणीकपातीबाबत धोरण ठरवण्यात येणार आहे.

आजारांना दूर ठेवण्यासाठी लठ्ठपणा कमी करावा- मेधा कुलकर्णी

0

पुणे : “बदलती जीवनशैली, जंक फूडचे सेवन यामुळे लठ्ठपणा वाढत आहे. परिणामी, मधुमेह, रक्तदाब आणि इतर गंभीर स्वरूपाचे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे अशा आजारांना दूर ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार घेऊन लठ्ठपणा कमी राहील, यासाठी आपण प्रयत्न करावेत,” असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त पुण्यातील वाईब्स या संस्थेच्या वतीने लठ्ठपणाबाबत जागृती करण्यासाठी रविवारी सकाळी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी उद्घाटन करताना मेधा कुलकर्णी बोलत होत्या. ‘वाईब्स’च्या पश्चिम विभागीय प्रमुख सोनिया कुमार, वैशाली दवे आदी उपस्थित होते. वाईब्सच्या कल्याणीनगर शाखेच्या वतीनेही रॅली काढण्यात आली. माजी आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले.

भांडारकर रस्त्यावरील वाईब्सच्या कार्यालयापासून ही रॅली निघाली. गुडलक चौक, गोखले रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालयात, तुकाराम पादुका चौक, जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, डेक्कन जिमखाना, गुडलक चौक ते वाईब्ज कार्यालय अशी ही रॅली झाली. ‘व्यायाम करा, लठ्ठपणा दूर ठेवा’, ‘लठ्ठपणा हटवा, निरोगी रहा’ अशा घोषणा देत जागृती करण्यात आली. संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सोनिया कुमार म्हणाल्या, “लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक लठ्ठपणाला बळी पडत आहेत. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत असून, ते थांबवण्यासाठी आपल्याला लठ्ठपणा कमी करावा लागेल.”

आज शहराच्या राजकारणात भिमालेंची हवा -मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छ्या (व्हिडीओ)


पुणे- महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांचा आज वाढ दिवस ,आणि त्यांच्या लग्नाचाही 25 वा वाढदिवस …या निमित्ताने शहराच्या राजकारणात आज भिमालेंची ‘हवा ‘ दिसून आली. त्यांना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छ्या दिल्याने भिमालेंच्या कार्यकर्त्यांमध्ये विशेष चैतन्य पसरले होते .अनेक कार्यकर्ते त्यांना भावी आमदार संबोधित असताना , भिमालेंच्या वाढदिवसानिमित्त शहराच्या राजकारणात आज पसरलेली हवा पुढील राजकारणाला वेगळी दिशा तर देणार नाही ना ? या प्रश्नावर काही समीक्षकांच्या भुवया उंचावलेल्या  दिसल्या .