‘केरळीय गणिता’मध्ये माधवांचे बहुमोल योगदान -डॉ. सोलापूरकर
तिसऱ्या पूना क्लब फुटबॉल लीग स्पर्धेत रोनाल्डो नट्स, शुगर केन,रॉनी ट्यून्स, विझार्ड ऑफ ओझील,विझार्ड ऑफ ओझील संघांची आगेकुच
मेगाभरतीत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या जागा अनुकंपा निकषानुसार भराव्या – भाऊसाहेब पठाण
मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील विविध 72 हजार पदांच्या भरतीमध्ये 11673 जागा या अनुकंपा तत्वावरील राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गासाठी भरण्यात याव्यात आणि गेली अनेक वर्षांचा अनुशेष भरून काढण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी कामगार संघटेनेचे नेते भाऊसाहेब पठाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मराठा आरक्षणासाठी स्थगित करण्यात आलेली मेगा भरती आता पुन्हा सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्वाची घोषणा केली. राज्यातल्या विविध 72 हजार पदासांठी ही मेगाभरती राज्य सरकारनं घोषित केली होती मात्र त्यावर वाद झाल्याने ती थांबवण्यात आली होती. आता ही भरती सुरू होत असल्यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण अनेक चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गाची पदे रिकामी आहेत. मात्र नियमानुसार अनुकंपा तत्वावरील भरतीला प्राधान्य दिले गेले पाहिजे, अशी त्यांची इच्छा असल्याचेही भाऊसाहेब पठाण यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर संघटनेच्या अन्य मागण्यांदेखील पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्या मागण्या अशा – वैद्यकीय दृष्ट्या अपात्र कर्मचाऱ्यांच्या पाल्यास शासन सेवेत समाविष्ट करावे, चतुर्थश्रेणी कामगार निवृत्त झाल्यानंतर त्याच्या एका पाल्यास शासकीय सेवेत नोकरी मिळावी, सर्व खात्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे तत्काळ भरावीत, या कर्मचाऱ्यांना शासकीय वसाहत गृह खात्याप्रमाणे बांधून द्यावी, चतुर्थश्रेणीतून तृतीय श्रेणीत 25 ऐवजी 50 टक्के पदोन्नती करताना चतुर्थ श्रेणीची पदे निरसित करू नये, 6 जून 2017 रोजी महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले (भाग एक, एक – अ व एक – ल यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश या व्यतिरिक्त) नियम व आदेश रद्द करण्यात यावे, सातवा वेतन आयोग फरकासह तत्काळ मंजूर करावा, सन 2005 पासूनची चतुर्थश्रेणी कर्मचारी अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुन्या पद्धतीने लागू करावी, कृषी विभागात आकृतीबंध पदे निर्माण करताना 1998 प्रमाणे वाहन चालक व चतुर्थश्रेणी पदे निर्माण करावीत, महसूल विभागातील हवालदार, नाईक, दप्तरी, पदाचे मूळ वेतन लिपिकाप्रमाणे लागू करण्यात यावे व शैक्षणिक अर्हतेनुसार तलाठी या पदावर पदोन्नती मिळावी.
लीला पुनावाला फाउंडेशन तर्फे विविध अभ्यासक्रमांसाठी 600 हून अधिक मुलींना शिष्यवृत्ती
पुणे-आज लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) ने यूजी-पीजी शिष्यवृत्ती पुरस्कार समारंभाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम एसजी बर्वे हॉल, अल्प बचत भवन येथे आयोजित करण्यात आला होता. पुणे जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या ६०० मुलींना यावेळी शिष्यवृत्ती देण्यात आली. या मुली पोस्ट ग्रॅज्युएट्स, विज्ञान, प्रथम वर्ष अभियांत्रिकी, नर्सिंग, सेकंड इयर इंजिनिअरिंग आणि फार्मेसी सारख्या शाखांमध्ये शिकणाऱ्या आहेत.
हा कार्यक्रम 2 सत्रांमध्ये आयोजित करण्यात आला होता . सकाळच्या सत्रातील कार्यक्रमासाठी मिनू दस्तूर (अध्यक्ष आणि सीईओ, निहिलेंट लिमिटेड) चे मुख्य पाहुणे आणि रश्मि दवे (१९८९ मधील एलपीएफ पीजी शिष्यवृत्ती प्राप्तकर्ता, आणि टेक्नीशियन एक्सपर्ट, पर्सिस्टेंट सिस्टम्स लिमिटेड) उपस्थित होते. त्यांना यावेळी सन्माननीय पाहुण्यांच्या रुपात सन्मानित करण्यात आले.
दुपारच्या सत्रामध्ये विक्रांत गांधी (सीएस आणि हेड, कॉरपोरेट सस्टेनेबिलिटी, टाटा टेक्नोलॉजीज) हे मुख्य अतिथी आणि वृषाली गौड़ (२००० मधील एलपीएफ पीजी शिष्यवृत्ती प्राप्तकर्ता आणि भारत सलाहकार, आंतरराष्ट्रीय एकीकृत रिपोर्टिंग काउंसिल) उपस्थीत होते त्यांना यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून सम्मानित केले गेले.
यावेळी सर्व मुख्य आणि सन्माननीय अतिथींनी उपस्थीत पालकांना त्यांच्या मुलांना शिक्षित करण्याचे महत्त्व सांगितले. जेणेकरुण भविष्यात ही मुले आत्मविश्वासू व मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनू शकतील.
आपले विचार व्यक्त करताना पद्मश्री लीला पुनावाला यांनी सर्व पालकांना संबोधित केले, त्या म्हणाल्या शिक्षित मुली बहुआयामी आसतात आणि त्यांच्याकडे सर्व जवाबदाऱ्या हाताळण्याची क्षमता असते. यावेळी त्यांनी मुलींना त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी तसेच त्यांनी निवडलेले आयुष्य जगण्याची परवानगी देण्याची पालकांना विनंती केली.
विद्यार्थ्यांना घडवण्यात वात्सल्य, प्रेमभाव महत्वाचा सिस्टर मबिलिया
पुणे : “युवापिढी देशाचे भवितव्य असते. या पिढीला घडविण्यासाठी त्यांच्यावर शालेय वयातच चांगले संस्कार होणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात चांगले नाते असायला हवे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवताना वात्सल्य, प्रेमभाव जपणे महत्वाचे आहे,” असे प्रतिपादन सिस्टर मबिलिया ए. सी. यांनी केले. मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या लुल्लानगर येथील माउंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कुलच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी सिस्टर मबिलिया बोलत होत्या.
प्रसंगी बिशप थॉमस डाबरे, शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, माजी महापौर प्रशांत जगताप, हायस्कुलच्या प्राचार्या सिस्टर मरिसा ए. सी. यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्यामध्ये शाळेतील जवळपास १३०० विद्यार्थिनींनी नृत्य, नाटक, गायन आदी कार्यक्रम सादर केले. अॅपोस्टॅलिक कार्मेलमधील सिस्टर्सचा समूह यासाठी स्वयंप्रेरणेने आणि नि:स्वार्थी भावाने प्रयत्न करीत आहे. अल्पसंख्याक ख्रिस्ती समाजातील मुलींची ही शाळा आहे. प्रामुख्याने इंग्रजी माध्यमातून येथे शिक्षण दिले जाते. इतर समाजातील मुलींनाही त्यांच्या धार्मिक भावना आणि वैचारिक भूमिकेचा आदर ठेवून प्रवेश दिला जातो. मुलींच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठी त्यांच्यात सामाजिक जाणीव रुजवण्यात संस्थेचे योगदान उल्लेखनीय आहे.
सिस्टर मबिलिया म्हणाल्या, “माउंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कुलने स्थापनेपासूनच विद्यार्थ्यांतील माणूस घडविण्याची परंपरा जपली आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय अभ्यासाबरोबरच त्यांना प्रेम, वात्सल्य, आदरभाव शिकवला पाहिजे. राष्ट्रभक्तीची भावना त्यांच्यात रुजवायला हवी. मूल्याधिष्ठित शिक्षण देऊन मुलांना आनंददायी, निरोगी जीवन जगण्यासाठी प्रेरित करणे शिक्षकाचे कर्तव्य आहे. ईश्वरी संदेशाला समोर ठेवून नि:स्वार्थीपणे सर्वच सिस्टर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काम करीत आहेत, ही संस्थेच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.”
बिशप थॉमस डाबरे म्हणाले, “मानवतावादी शिक्षण देण्याचा आपण सर्वानी प्रयत्न करावा. कोणत्याही शाळेच्या यशस्वी वाटचालीत पालकांचे योगदान मोलाचे असते. धार्मिक आणि नैतिक मूल्याची जोपासना व्हावी. गुरु-शिष्याचे नाते दृढ असेल, तर विद्यार्थी चांगला नागरिक आणि चांगल्या समाजाची निर्मिती होईल.”
सिस्टर मरीसा म्हणाल्या, “मदर व्हेरोनिका यांनी मुलींच्या शिक्षणासाठी स्थापलेल्या या संस्थेचे काम पुढे नेताना आनंद वाटतो. सर्व ठिकाणी कुटुंबवत्सल भावना, टीम स्पिरिटने काम करणारी पिढी तयार करण्यासाठी माझा प्रयत्त्न असतो. समाज हितासाठी काम करणारे जबाबदार नागरिक घडविण्याचे ध्येय संस्थेचे असून, ते पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
ए एस राजीव यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा कार्यभार स्वीकारला
पुणे: ए एस राजीव यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दि. 2 डिसेंबर 2018 रोजी कार्यभार स्वीकारला. यापूर्वी ते 22.01.2016 पासून इंडियन बँकेचे कार्यकारी संचालक होते. ए एस राजीव यांना सिंडिकेट बँक, विजया बँक आणि इंडियन बँक मधील सुमारे तीन दशके व्यावसायिक बँकिंगचा अनुभव आहे. चार्टर्ड अकाउंटंट असन्यासोबतच त्याच्याकडे कॉर्पोरेट क्रेडिट, आंतरराष्ट्रीय बँकिंग, ट्रेझरी, जोखीम व्यवस्थापन, क्रेडिट देखरेख व पर्यवेक्षण, एनपीए व्यवस्थापन, नियोजन आणि विकास, मानव संसाधन, दक्षता, कॉर्पोरेट प्रशासन, तपासणी व लेखापरीक्षण, सायबर सुरक्षा, वित्त, खाती आणि कर यासह बँकिंगच्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये विस्तृत अनुभव आणि कौशल्य आहे. ए एस राजीव हे गणित पदवीधर असून सोबतच एफसीए, एमबीए, डीआयएसए आणि सीएआयआयबी पात्र आहेत.
स्मार्ट सिटीत पादचाऱ्यांसाठी उत्तम पदपथ असणे गरजेचे – एस आर कुलकर्णी
सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचा राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेने उत्साहात प्रारंभ
राजेंद्र निंबाळकरांची साडेतीन वर्षात सातवी बदली -पुणे महापालिकेला आश्चर्याचा दणका
पुणे- महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची अवघ्या आठ महिन्यातच येथून बदली करून शासनाने त्यांना उस्मानाबाद च्या जिल्हाधीकारीपदाची सूत्रे हाथी घेण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे . निंबाळकर यांनी या बदलीच्या वृत्तास दुजोरा दिलेला नसला तरी या वृत्ताने महापालिकेच्या राजकीय आणि तमाम शासकीय, निमशासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तुळात बदल्यांच्या राजकारणाबाबत एकच चर्चा उसळली आहे .
राज्यात वादग्रस्त म्हणून सर्व आणि सुपरिचित असलेल्या तुकाराम मुंडेंची 11 वर्षात 12 वी बदली झाली असे म्हणतात , मुंडेंनी नेमके काय काम साधले, केले … आपल्या आजवरच्या कारकिर्दीत मुंडेंनी कोणते यश संपादन केले ? यावर मंथने होतील … पण त्यांचा कायम जाईल तिथे लोकप्रतिनिधींशी वाद होत गेला ,आणि कोणतेही ठोस काम न करता उभी कारकीर्द वाया जाते कि काय अशी स्थिती असताना ..त्यांच्या बदल्यांचे समर्थन ना शासन, ना मुंडे करू शकतात अशी स्थिती निर्माण झाली. .
आय ए एस अधिकारी आहोत, शासन पाठवेल तिथे जाऊ, तिथे ठेवेल तोवर ,जे करता येईल ते काम करू , हि भूमिका बहुतेक अधिकाऱ्यांची असतेच असते. वाद्ग्रस्तांची बदली होतेच होते , पण ‘ गाॅड फादर ‘ करवून काम करण्याची मानसिकता नसलेल्यांना हि या बदल्यांचा सामना करावा लागतो अशी अवस्था राज्यात असावी अशी स्थिती हि आता दिसून येते आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही .
राजेंद्र निंबाळकर सध्या पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आहेत . गेल्या मार्च 2018 मध्ये त्यांची येथे नियुक्ती झालेली आहे . खरे तर तीन वर्षाचा कालावधी आधिकाऱ्यांना द्यायला हवा ,पण किमान दोन वर्षाचा असेल तरी काहींना आवश्यक, कामासाठी पुरेसा भासतो.निंबाळकरांची अवघ्या 8 महिन्यात पुणे महापालिकेतून बदली होणे खरे तर खूपच आश्चर्यकारक आहे .इथे सध्या तीन अतिरिक्त आयुक्त आहेत . महापालिकेच्या सध्या तिघांमध्ये जुन्या असलेल्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांच्याबाबत राज्य शासनाकडे सातत्याने लोकप्रतिनिधी तक्रारी करत आहेत .त्यांच्या बदलीसाठी मोर्चा झाला, शिष्टमंडळेगेली. पण याबाबत लोकप्रतिनिधींचे सारे प्रयत्न अपयशी ठरले. अखेर महिन्यापूर्वीच इथले तिसरे रिक्त असलेले अतिरिक्त आयुक्तपद शासनाने भरले आहे आणि इथे विपिन शर्मा नावाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे.त्यांनी अजून नित कारभार हातही घेतला ना घेतला तोच ,अशा स्थितीत ज्यांच्याबाबत अजिबात तक्रार नाही, त्यांची बदली, म्हणजे मोठा धक्का मानला जातो आहे.
राजेंद्र निंबाळकर यांचा गेल्या साडेतीन वर्षातला बदलीचा इतिहास मोठ्ठा रंजक आहे . ना कुठे ते वादग्रस्त झाले , ना कुठे त्यांचा विशिष्ट एकाच राजकीय पक्षाशी ,ना लोकप्रतिनिधींशी वाद झाला . पूर्वी पुण्यात म्हाडा वर ,तत्पूर्वी पुणे महापालिका आयातकर प्रमुख अशा पदावर काम केलेले निंबाळकर अत्यंत शांत स्वभावाचे अधिकारी म्हणून ओळखले जातात .कोणताही एखादा राजकीय पक्ष,नेता,गट त्यांच्या बाजूने आहे किंवा विरोधात आहे अशी स्थिती नाही .
गेल्या जून २०१५ रोजी त्यांची भंडारा येथे नियुक्ती झाली भंडारा येथे शिक्षण क्षेत्रात त्यांनी लक्ष घातले तेव्हा 25 /२५ वर्षे शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत ,हेपाहून त्यांनी बदल्या सुरु केल्या आणि निविदा प्रकरणात नियम अमंलबजावनी साठी कठोर निर्णय घेतले यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव आला आणि .त्यानंतर ऑगस्ट २०१६ नागपूर येथे बदली करण्यात आली .नागपूर नंतर सप्टेंबर २०१६ रोजी उल्हासनगर येथे बदली झाली मार्च २०१७ ला त्यांना पनवेल ला पाठविण्यात आले . तेव्हा उल्हास नगर मध्ये त्यांच्या बदली विरोधात जन आंदोलन झाले .आणि जून 17 ला त्यांना पुन्हा उल्हासनगर येथे पाठविण्यात आले .आणि त्यानंतर मार्च 2018 ला त्यांची बदली पुण्यात झाली .म्हणजे साडेतीन वर्षात सहा बदल्या झाल्या . आता त्यांची बदली उस्मानाबाद चे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आल्याचे वृत्त आहे . या बदलीच्या वृत्ताने महापालिका प्रशासन आणि राजकीय वर्तुळातील अनेकांनाआश्चर्याचा धक्का बसला आहे .’असा यांनी काय केला गुन्हा ‘याचा उलगडा अनेकांना होईनासा झाला आहे. आता हा प्रश्न निंबाळकर हे स्वतःच शासनाला विचारतील काय ? असा सवाल हि महापालिका वर्तुळातून उपस्थित होतो आहे.
बाराशे विद्यार्थ्यांना अरविंद एज्युकेशन सोसायटीत रुबेला लसीकरण
पिंपरी-रुबेला व गोवर लसीकरण मोहिमेअंतर्गत जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात रुबेला लसीकरण राबविण्यात आले. यावेळी नर्सरी ते दहावी पर्यंतच्या बाराशे विद्यार्थ्यांना लस टोचण्यात आली.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे आदींसह शिक्षकवृंद, महापालिका रुग्णालयाच्या आरोग्य सेविका आदी उपस्थित होते.
हाती इंजेक्शन घेतलेल्या परिचारिका आणि नियोजनात रमलेल्या शिक्षिका यामुळे शाळेच्या वर्गखोल्यांना रुग्णालयाचे स्वरूप आले होते. लहानग्या विद्यार्थ्यांना लस देण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर होते. यावेळी सुई पाहताच चेहरा कावराबावरा करत विद्यार्थी नकार दर्शवित होते. मात्र, पालक, वर्गशिक्षिका आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने अवघ्या काही सेकंदात लस टोचण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत होती, तर अनेक विद्यार्थी हसतमुखाने या प्रक्रियेला समोरे गेले. इंजेक्शन दिल्यानंतर पुढील पंधरा ते वीस मिनिटे विद्यार्थ्यांचे निरीक्षण केले जात होते. ज्या 1200 विद्यार्थ्यांना लस देण्यात आली, त्यापैकी एकाही विद्यार्थ्याला साईड इफेक्ट झाला नाही.
दरम्यान, शाळेने पालकांनाही शाळेत बोलावून घेतले होते. त्यांना लसीकरणाविषयी आणि रुबेला रोगाविषयी माहिती देण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या टीमच्या माध्यमातून शाळेमध्ये लसीकरणाचा कार्यक्रम सुरळीत पार पडला. त्यामुळे या लसीकरणाचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याची पालक आणि विद्यार्थ्यांची मनातील भीती दुर झाली.
या लसीकरणाबाबत आरती राव म्हणाल्या, की पालक सकारात्मक असल्याने लस देण्यात कोणतीही अडचण आली नाही. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास जाणवला नाही. आरोग्य सेविकांच्या मदतीने विद्यार्थ्यांची पाहणी केली जात होती. पालकांनी शाळेवर पूर्ण विश्वास ठेवल्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली.
विकासकामांचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा पोरकटपणा-खा. शिवाजीराव आढळराव पाटील
हांडेवाडी रस्त्यावरील विकासकामांचा शुभांरभ
पुणे-– लुल्लानगर येथील उड्डाणपूल शिवसेनेच्या प्रयत्नामुळे मंजूर झाले असून या कामांचे श्रेय घेण्याचा पोरकटपणा भाजपचे आमदार करत आहे, अशी टीका सेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.नगरसेवक नाना भानगिरे, नगरसेविका प्राची आल्हाट यांच्या विकासकामांचा शुभारंभ आढळराव यांच्या हस्ते झाला.
यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार महादेव बाबर, उपशहर संघटक विजय देशमुख, उपशहर प्रमुख समीर तुपे, नगरसेविका संगीता ठोसर, शहर संघटक अमोल हरपळे, बाळासाहेब भानगिरे, विभागप्रमुख जयसिंग भानगिरे, अभिमन्यू भानगिरे, आशिष आल्हाट, विभागप्रमुख पोपट आंबेकर, प्रभाग अध्यक्ष शिवा शेवाळे, वैष्णवी घुले, विकास भुजबळ, विशाल वाल्हेकर, नाना तरवडे, अनिल जाधव, योगेश सातव, प्रकाश तरवडे, अंकुश घुले, सोपान लोंढे, लहू शिंदे, सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आयोजक नगरसेवक नाना भानगिरे यांनी बोलताना यावेळी सांगितले की, कोट्यवधी रुपयांची विकासकामे सेनेने सुरू केलेली आहेत. हांडेवाडी रस्त्याचे रुंदीकरण, फुटबॉल ग्राउंड, रुग्णालय, व्यायामशाळा, जलतरण तलाव, विविध भागांत पाण्याच्या टाक्या, भुयारी मार्ग आदी विकासकामांमुळे प्रभाग क्रमांक 26 चा कायापालट होणार आहे. महापालिकेत सत्तेत नसताना सेनेने विरोधकांपेक्षा जास्त विकासकामे करून दाखवली आहेत, त्यामुळे सर्व जनतेने शिवसेनेच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जयसिंग भानगिरे यांनी आभार मानले.
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत अटलाव डेबेड विजेता
पुणे-
३३वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आज (रविवार) उत्साहत पार पडली. यामध्ये नेहमीप्रमाणेच अफ्रिकन खेळाडूंचे वर्चस्व राहिले. इथोपियाचा धावपटू अटलाव डेबेड हा या स्पर्धेचा विजेता ठरला. त्याने ४२ किलो मीटरची मुख्य फुल मॅरेथॉन स्पर्धा जिंकली. यामध्ये एकूण १५ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये १०२ परदेशी स्पर्धकांचा समावेश आहे.
सारसबागेजवळील बाबुराव सणस मैदानापासून सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते या मॅरेथॉनला सुरुवात झाली. यावेळी राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, परालम्पिकमध्ये पाहिले सुवर्णपदक जिकणारे पद्मश्री मुरलीकांत पेटकर, मिलिटरी इंटेलिजन्स स्कुलचे कमांडंट लेफ्टनंट जनरल आर. के. बन्सीवाल उपस्थित होते.
मॅरेथॉन (४२.१९५ किमी), अर्धमॅरेथॉन (२१ किमी), ५ आणि १० किलोमीटर शर्यत, व्हिलचेअर शर्यत, प्रल्हाद सावंत चॅरिटी रन; तसेच १४ आणि १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या शर्यती झाली . ‘यंदाच्या पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनला पोल्ट्री उद्योगातील आघाडीच्या वेंकटेश्वरा हॅचरीज ग्रुपचे संस्थापक पद्मश्री बी. व्ही. राव यांचे नाव देण्यात आले असून, शर्यतींत १५ हजार धावपटू यात सहभागी झाली आहेत. यामध्ये 102 परदेशी स्पर्धकांचाही समावेश आहे. सण १९८४ पासून हि आंतरराष्ट्रीय पुणे मॅरेथॉन होत आहे तसेच यंदा या मॅरेथॉन मध्ये १५ हजारहुन अधिक धावपटू स्पर्धेत सहभागी झाले आहेत अशी माहिती पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ट्रस्टचे ट्रस्टी अभय छाजेड यांनी दिली. यावेळी खासदार वंदना चव्हाण, भारतकडून पॅरालिम्पिक मध्ये पाहिलं सुवर्णपदक जिकणारे पदमश्री मुरलिकांत पेटकर,मिलिटरी इंटेलिजन्स स्कुल कममंडट लेफ्टनंट जनरल आर.के. बन्सीवाल उपस्थित होते. रेस डायरेक्टर सुमंत वाईकर, जॉइंट रेस डायरेक्टर रोहन मोरे, बाप्टिस्ट डिसूझा आदी उपस्थित होते. तसेच पहाटे ५ वाजल्यापासून पुण्याच्या रस्त्यांवर पुणेकरांनी मोठी गर्दी करत या पुणे मॅरेथॉनचा आनंद लुटला
डीईएस सेकंडरी स्कूलचे स्नेहसंमेलन संपन्न
पुणे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘डीईएस सेकंडरी स्कूल’च्या ३३ व्या वार्षिक स्नेहसंमेलनात पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘शतसुमने’ या संगीत, नृत्य आणि अभिनयनाचे सादरीकरण करणार्या कार्यक‘मांचे आयोजन करण्यात आले होते.
पु. ल. देशपांडे यांच्या ‘असामी असामी’ व ‘वार्यावरची वरात’ या नाटकांतील निवडक नाट्यछटा, गीतरामायणातील महत्वाचे प्रसंग, बालगीते, लावणी नृत्य आदी कार्यक‘मांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, संचालक किरण शाळिग्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापिका सुजाता नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका ज्योती बोधे, मंजुषा बोरावके, गौरी देवळणकर, दीप्ती देवधर या शिक्षिकांनी संयोजन केले.
आम्हालाही आरक्षण द्या .! ब्राह्मण महासंघाची मागणी
पुणे – मराठा समाजाच्या आरक्षणानंतर आता ब्राम्हण समाजाने देखील आरक्षणाची मागणी केली आहे. पुण्यात ब्राह्मण महासंघाने देखील आरक्षण देण्याची मागणी केली आहे. ज्याप्रमाणे मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचे सर्वेक्षण करून मराठा समाजाला आरक्षण दिले त्याच प्रमाणे ब्राम्हण समाजाचे देखील सर्वेक्षण करून ब्राम्हण समाजाला आरक्षण द्यावे. या सर्वेक्षण अहवालानंतर आम्ही आमच्या मागण्या सरकारकडे करू असे यावेळी सांगण्यात आले .
मराठा समाजानंतर इतर समाज देखील आरक्षण मागत आहेत.आता खुल्या वर्गात २५ टक्के आरक्षण राहिले आहे .आता बाकी समाजाने या आरक्षणात आरक्षण मागू नये हा पुरेपूर अन्याय आहे असे देखील यावेळी ब्राह्मण महासंघाच्या सदस्यांकडून सांगण्यात आले.
तथाकथित ब्राम्हण समाज म्हणजे पौरोहित्य करणारा वर्ग अशी मान्यता पूर्वीपासून होती पण आता खरोखरच पौरोहित्य करणारे किती टक्के आहेत? आता समाजात पौरोहित्य करणारा वर्ग असा किती उरला आहे ? त्यामुळे आता मागासवर्ग आयोगाने ब्राह्मण समाजाचे सर्वेक्षण करावे त्यांच्या अहवालानंतर आम्ही ब्राह्मण समाजाच्या मागण्या शासनाकडे मांडू असे यावेळी सांगण्यात आले.
तसेच ब्राह्मण समाजाच्या स्थितीचे सर्वेक्षण करुन समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण द्या, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे. त्यामुळे गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ब्राह्मण आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. ब्राह्मण समाजाला जातीच्या आधारे नव्हे तर आर्थिक निकषाच्या आधारे आरक्षण द्यावे, अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केली आहे.
मराठा समाजाच्या १६ टक्के आरक्षणाच्या विधेयकाला विधीमंडळात मंजुरी मिळाली असून राज्यपालांचीही त्यावर स्वाक्षरी झाली आहे. त्यानंतर मुस्लीम आणि धनगर आरक्षणासह ब्राह्मण समाजाकडूनही आरक्षणाची मागणी होत आहे.
पत्नीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या…..
पुणे : राहते घर नावावर करुन द्यावे यासाठी पत्नीकडून केलेल्या जात असलेल्या भांडणाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. किसन वाघमारे (वय ३५, रा़ आंबेगाव बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या सूनविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, किसन वाघमारे यांचा २०१० मध्ये विवाह झाला होता. ते एका ड्रायव्हिंग स्कुलमध्ये गाड्या शिकविण्याचे काम करीत होते. लग्नानंतर त्यांची पत्नी सतत वेगवेगळ्या कारणावरुन त्यांच्याशी वाद घालत होते. राहते घर माझ्या नावावर करुन दे, असे तिचे म्हणणे होते. यामुळे घरात नेहमी भांडणे होत होती. या मानसिक त्रासाला कंटाळून १६ नोव्हेंबर रोजी किसन यांनी दुपार तीनच्या सुमारास घरात कोणी नसताना सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर अंतिम संस्कार केल्यानंतर त्यांच्या वडिलांनी फिर्याद दिल्यावरुन पोलिसांनी सूनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस़ पी़ यादव अधिक तपास करीत आहेत.












