पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत अटलाव डेबेड विजेता

Date:

पुणे-

३३वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आज (रविवार) उत्साहत पार पडली. यामध्ये नेहमीप्रमाणेच अफ्रिकन खेळाडूंचे वर्चस्व राहिले. इथोपियाचा धावपटू अटलाव डेबेड हा या स्पर्धेचा विजेता ठरला. त्याने ४२ किलो मीटरची मुख्य फुल मॅरेथॉन स्पर्धा जिंकली. यामध्ये एकूण १५ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये १०२ परदेशी स्पर्धकांचा समावेश आहे.

सारसबागेजवळील बाबुराव सणस मैदानापासून सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते या मॅरेथॉनला सुरुवात झाली. यावेळी राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, परालम्पिकमध्ये पाहिले सुवर्णपदक जिकणारे पद्मश्री मुरलीकांत पेटकर, मिलिटरी इंटेलिजन्स स्कुलचे कमांडंट लेफ्टनंट जनरल आर. के. बन्सीवाल उपस्थित होते.

सारस बागेजवळील सणस क्रीडांगणापासून  या मॅरेथॉनला पहाटे पावणेपाचच्या सुमारास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते  मॅरेथॉनला प्रारंभ झाला..

मॅरेथॉन (४२.१९५ किमी), अर्धमॅरेथॉन (२१ किमी), ५ आणि १० किलोमीटर शर्यत, व्हिलचेअर शर्यत, प्रल्हाद सावंत चॅरिटी रन; तसेच १४ आणि १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या शर्यती झाली . ‘यंदाच्या पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनला पोल्ट्री उद्योगातील आघाडीच्या वेंकटेश्वरा हॅचरीज ग्रुपचे संस्थापक पद्मश्री बी. व्ही. राव यांचे नाव देण्यात आले असून,  शर्यतींत १५ हजार धावपटू  यात सहभागी झाली आहेत. यामध्ये 102 परदेशी स्पर्धकांचाही समावेश आहे. सण १९८४ पासून हि आंतरराष्ट्रीय पुणे मॅरेथॉन होत  आहे तसेच यंदा या मॅरेथॉन मध्ये १५ हजारहुन अधिक धावपटू स्पर्धेत सहभागी झाले आहेत  अशी माहिती पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ट्रस्टचे ट्रस्टी अभय छाजेड यांनी दिली. यावेळी खासदार वंदना चव्हाण, भारतकडून पॅरालिम्पिक मध्ये पाहिलं सुवर्णपदक जिकणारे पदमश्री मुरलिकांत पेटकर,मिलिटरी इंटेलिजन्स स्कुल कममंडट लेफ्टनंट जनरल आर.के. बन्सीवाल उपस्थित होते. रेस डायरेक्टर सुमंत वाईकर, जॉइंट रेस डायरेक्टर रोहन मोरे, बाप्टिस्ट डिसूझा आदी उपस्थित होते. तसेच पहाटे ५ वाजल्यापासून पुण्याच्या रस्त्यांवर पुणेकरांनी मोठी गर्दी करत या पुणे मॅरेथॉनचा आनंद लुटला

‘पुणे महापालिकेच्या शाळांतील शेकडो विद्यार्थीही विविध गटांतील शर्यतीत सहभागी झाले होते . दरवर्षीप्रमाणे पुणे महापालिकेच्या शाळेतील मुला-मुलींना; तसेच सेनादलातील धावपटूंना विविध शर्यतींमध्ये मोफत प्रवेश देण्यात येत असतो . या वेळी ८, १० आणि १२ वर्षांखालील गटाच्या शर्यती पार पडल्या असून, या मुलांना टि-शर्ट, खाऊ, प्रमाणपत्र आणि मेडल देण्यात आले.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावना पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे...

सोशल मीडियावर औरंगजेबाचं समर्थन: पुण्यात दोघांवर कारवाई

पुणे-राज्यभरात औरंगजेबच्या कबरवरुन राजकीय वाद सुरु असतानाच त्याचे गंभीर...