Home Blog Page 3037

दुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेचे 9डिसेंबरपासून आयोजन

0

पुणे,: साई9स्पोर्ट्स यांच्या तर्फे दुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक  क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा नेहरू स्टेडियम, व्हिजन क्रिकेट अकादमी येथील क्रिकेट मैदानावर 9 ते 12 डिसेंबर 2018 या कालावधीत होणार आहे.

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक अनिल वाल्हेकर साई9स्पोर्ट्सचे संस्थापक साईराज गायकवाड, माजी रणजीपटू शंतनु सुगवेकर यांनी सांगितले कि, स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून या स्पर्धेला गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेत डी. बी.देवधर इलेव्हन, भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन, राजू भालेकर इलेव्हन आणि वसंत रांजणे इलेव्हन हे 4 संघ सहभागी झाले आहेत.

तसेच, हि स्पर्धा साखळी बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या संघाला करंडक आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, सामनावीर या खेळाडूंना करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्पर्धेचे उदघाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते रविवार, दि.9डिसेंबर रोजी सकाळी 7.30वाजता व्हिजन क्रिकेट अकादमी येथे होणार आहे.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन यांना सीएसआर उपक्रमांसाठी दोन प्रतिष्ठित पुरस्कार

0

इंडीवूड सीएसआर एक्सलन्स अवॉर्ड्स २०१८ मध्ये बेस्ट सीएसआर प्रॅक्टिसेस इन स्पेशॅलिटी हेल्थकेयर पुरस्कार

गुजरात सीएसआर एक्सलन्स अवॉर्ड – २०१८ मध्ये बेस्ट वॉटर कर्न्झव्हेशन अँड वॉटरशेड पुरस्कार

 पुणे-– फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (एफआयएल), या पीव्हीसी पाइप्स आणि फिटिंग्जच्या भारतातील आघाडीच्या उत्पादकाने मुकुल माधव फाउंडेशन या आपल्या सीएसआर भागिदारासह नुकतेच इंडीवूड सीएसआर एक्सलन्स अवॉर्ड्स २०१८ मध्ये बेस्ट सीएसआर प्रॅक्टिसेस इन स्पेशॅलिटी हेल्थकेयर पुरस्कार आणि गुजरात सीएसआर एक्सलन्स अवॉर्ड – २०१८ मध्ये बेस्ट वॉटर कर्न्झव्हेशन अँड वॉटरशेड पुरस्कार हे दोन प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले. कंपनी स्थापन झाल्यापासूनच हाती घेण्यात आलेल्या उल्लेखनीय समाजसेवी उपक्रमांसाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडला हे पुरस्कार देण्यात आले. गुजरात सीएसआर एक्सलन्स अवॉर्ड – २०१८ हा पुरस्कार श्री. नितुल बरोट, वरिष्ठ सीएसआर अधिकारी – फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि इंडीवूड सीएसआर एक्सलन्स अवॉर्ड्स २०१८ हा पुरस्कार श्री. अनुराग दीपांकर, सहाय्यक व्यवस्थापक, मार्केटिंग कम्युनिकेशन्स, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी स्वीकारला.

 दोन हजार भारतीय कॉर्पोरेट्स आणि कोट्यधीशांचा समावेश असलेल्या परिषेदेने हाती घेतलेल्या १० अब्ज डॉलर्सच्या इंडीवूड प्रकल्पाचाच एक भाग म्हणून इंडीवूड सीएसआर एक्सलन्स अवॉर्ड्स २०१८ चे हिटेक्स एक्झिबिशन सेंटर, हैद्राबाद येथे ३ डिसेंबर २०१८ रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने हा पुरस्कार छायाचित्रणाच्या रशियन सांस्कृतिक मंत्रालयाच्या प्रमुख श्रीमती व्हलेरिया व्ही. कोलेस्निक यांच्या हस्ते स्वीकारला. हॉस्पिटॅलिटी उद्योग व्यावसायिकांच्या प्रयत्नांची आणि या क्षेत्राच्या विकासासाठी काम करणाऱ्या संघटनांची दखल घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

अहमादाबाद- गुजरात येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनला गुजरात सीएसआर समिट २०१८ दरम्यान बेस्ट वॉटर कर्न्झव्हेशन अँड वॉटरशेड पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार श्री. धर्मेद्र प्रधान (माननीय मंत्री, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच कुशल विकास आणि औदयोजिकता) आणि श्री. गणपतभाई वासावा (माननीय मंत्री, आदिवासी विकास, पर्यटन, वन, महिला व बालकल्याण) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या पाणी प्रकल्पांचे कौतुक करत श्री. धर्मेंद्र प्रधान यांनी येत्या काळात जल संवर्धनाची तीव्र गरज भासणार असल्याचे नमूद केले. या पुरस्कार समिटसाठी संसद सदस्य, आमदार, महापौर, जिल्हाधिकारी आणि सरकारी अधिकारीही उपस्थित होते.

याप्रसंगी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नॉन- इंडिपेंडंट संचालक आणि सीएसआर प्रमुख, सौ रितू छाब्रिया, म्हणाल्या, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनने सामाजिक जबाबदारीप्रती केलेल्या कामाची दखल घेतली जाण्याचा हा क्षण अभिमानाचा आहे. समाजसेवा हा फिनोलेक्स इंडस्ट्रीजचा प्रमुख आधारस्तंभ आहे आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या मदतीने कंपनीने या क्षेत्रात मोठी उंची गाटली आहे. कंपनी सातत्याने आपण राहातो त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रयत्न करत असते आणि लोक व पर्यावरणाला संतुलित यंत्रणा पुरवण्यासाठीही कंपनीचा प्रयत्न सुरू असतो. भविष्यातही आमचा हाच दृष्टीकोन कायम राहाणार आहे. आमच्या कामाचा गौरव केल्याबद्दल आम्ही कंपनीचे आभारी आहोत. यापुढेही आम्ही अशीच प्रगती करत राहू आणि इतरांसाठी अनुकरणीय मापदंड प्रस्थापित करत राहू.

स्थापनेपासूनच फिनोलेक्स इंडस्ट्रीज आपल्या जवळच्या परिसरात म्हणजे रत्नागिरी, पुणे, उर्से आणि मासर, वडोदरा, गुजरात तसेच उर्वरित भारतातील आरोग्यसेवा, शिक्षण, समाजकल्याण आणि पाणी प्रकल्प अशा क्षेत्रात सक्रियपणे काम करत आहे.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि

पुण्यात मुख्यालय असलेली फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड पीव्हीसी पाइप्स आणि शेती तसेच गृहबांधणी, उद्योगक्षेत्र व बांधकामासारख्या विविध बिगरशेती क्षेत्रांना फिटिंग्ज पुरवण्याच्या उद्योगात आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि पुणे आणि गुजरातमध्ये मासर येथे असलेल्या अत्याधुनिक कारखान्यांच्या मदतीने कंपनीला आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देणे शक्य होते. रत्नागिरीमधील आमचा पीव्हीसी रेसिन उत्पादन कारखाना Uhde GmbH, जर्मनी यांच्या तांत्रिक सहकार्याने व होचेस्ट तंत्रज्ञानाने उभारण्यात आला असून त्याद्वारे सर्वोच्च दर्जाते रेसिन तयार करून ते आमच्या पाइप उत्पादन निर्मितीसाठी पुरवले जाते. समुद्राच्या दिशेने खुली असलेले क्रायोजेनिक बंदर भारतीय खासगी क्षेत्रात पहिल्यांदाच उभारण्यात आले असून ते कंपनीच्या पीव्हीसी कॉम्प्लेक्सचे वैशिष्ट्य आहे. आयएस/आयएसओ ९००१:२००८ प्रमाणपत्र मिळालेली फिनोलेक्स ही पहिली भारतीय पीव्हीसी पाइप उत्पादक कंपनी आहे.

कुशल मनुष्यबळ हे आमचे प्रमुख बलस्थान आहे. कामकाजातील असामान्यता आणि यशाचे श्रेय आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना देतो. देशभरात आम्ही सर्वत्र विस्ताक केला असून आमच्या १८ हजार रिटेल दालनांना सक्षम वितरक व उप- वितरकांचा पाठिंबा मिळालेला आहे. ग्राहकांना दर्जेदार उत्पादने पुरवण्यात ते आमची विस्तारित शाखा म्हणून काम करतात. दर्जा, विश्वास आणि सचोटी ही आमची मूलभूत तत्वे ग्राहक तसेच भागधारकांबरोबर अकंड नाते निर्माण करण्यास मदत करतात.

‘हेतूसह कामगिरी’वर आमचा विश्वास असून समाजाबद्दल आम्ही मनापासून चिंतित असतो. मुकुल माधव फाउंडेशन या आमच्या सीएसआर भागिदारासह आम्ही रत्नागिरी, पुणे आणि मासर येथील आमच्या कारखान्यांच्या परिसरातील समाजात असलेल्या वंचित घटकांच्या सामाजिक, आर्थिक विकाससाठी सक्रियपणे काम करत आहोत. आम्ही प्रामुख्याने महिला व लहान मुलांसाठी शिक्षण, आरोग्य सेवा, सामाजिक विकास, पर्यावरण आणि स्व- विकास यांवर भर देतो.

मुकुल माधव फाउंडेशनबदद्ल

मुकुल माधव फाउंडेशनची (एमएपएफ) स्थापना १९९९ मध्ये सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून करण्यात आली व आज हे फाउंडेशन आरोग्यसेवा, समाज कल्याण आणि शिक्षण क्षेत्रातील चॅरिटेबल उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. १९९९ पासून संस्था वंचित घटकांसाठी शिक्षण सहाय्य, तर गरजूंसाठी वैद्यकीय मदत करत आली आहे.

मुकुल माधव फाउंडेशनने आर्थिक सहाय्य आणि उपकरणांच्या रुपांने हॉस्पिटल्स तसेच अनाथालय, अपंग मुलांसाठी संस्थांना मजत केली आहे. ग्रामीण भागातील शाळांसाठी संस्थेने तेथील पात्र विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश, बूट व इतर साहित्य आणि शिष्यवृत्तीच्या देत उच्च शिक्षणासाठी मदत केली आहे.

बॉम्बे चॅरिटेबल कायदा ९५० अंतर्गत एमएमएफची चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून नोंदणी झालेली आहे. मुकुल माधव फाउंडेशनला दिलेली देणगी प्राप्ती कायद्याअंतर्गत ८० जी प्रमाणपत्रानुसार करमुक्त असते. एप्रिल २०१२ मध्ये एमएमएफने फॉरिन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अक्ट सर्टिफिकेट (एफसीआरए) मिळवले असून त्यामुळे मुकुल माधव फाउंडेशनला परदेशातूनही देणगी मिळवता येते.

जातीअंतासाठी सामाजिक समतेच्या अपेक्षित वातावरणाची गरज – प्रा.डॉ. देवानंद शिंदे

0

कर्वे समाजकार्य महाविद्यालयामध्ये महामानवास अभिवादन

पुणे- समाजामध्ये सातत्याने विसंगत वातावरण असल्यामुळे त्याच्यावर तोडगा म्हणून जातीअंत अपेक्षित असतानाही जातीयता संपुष्टात येत नसल्याने आजच्या समतेच्या काळात जातीअंतासाठी सामाजिक समतेच्या अपेक्षित वातावरणाची गरज असल्याचे मत कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रोफेसर व राष्ट्रीय समाजशील शिक्षण मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केले.

कर्वे समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने आयोजित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापारीनिर्वान दिन व महात्मा जोतीबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित संयुक्त अभिवादन कार्यक्रमामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डॉ. दीपक वलोकर हे होते तर प्रा. चेतन दिवाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांपासून ते आजच्या वंचित समाजाला जातीयतेचे चटके सहन करावे लागले व दुर्दैवाने आजही सहन करावे लागतच आहेत यातून मुक्तता हवी असेल तर समाजशील शिक्षण व संघर्ष याला प्राधान्य द्यावे लागेल असे सांगत या विभूतींच्या विचाराबरोबरच त्यांना सर्वार्थाने समजून घेऊन मार्गक्रमण केल्यास अपेक्षित सामाजिक परिवर्तन फार दूर असणार नाही असेही ते म्हणाले.राष्ट्रभक्ती, सौजण्याशिलता, संवेदनशीलता, उदात्तपणा, सामाजिक अद्सारांचे निर्मुलन, रोजगार, हक्क, लोकशाही, समाजवाद, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समता हे समाजशील शिक्षणाचे मुख्य घटक बळकट व्हायला हवेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

डॉ. वलोकर म्हणाले, समाजातील वर्ग व्यवस्था व जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे त्यासाठी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा अंगीकार केला पाहिजे.

अमोह साठे, विजया कावळे व विजय गावंडे या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. राहुल गिरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अक्षय शिंगारे यांनी सूत्रसंचालन केले तर रसिका शिंदे यांनी आभार मानले.

२६ जानेवारी पासून पुण्यात प्रवासी सेवेसाठी -ई बस धावणार (व्हिडीओ)

0

पुणे-कॉंग्रेस राष्ट्रवादी च्या गटनेत्यांचे सर्व आक्षेप निव्वळ राजकीय असल्याचा आरोप करत २६ जानेवारी पासून पुण्यात ई बससेवेला आम्ही प्रारंभ करीत आहोत अशी घोषणा आज महापौर मुक्ता टिळक,सभागृहनेते श्रीनाथ भिमाले,आणि पीएमपीएलचे संचालक नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषदेतून केली .यावेळी विरोधकांच्या आरोपांना त्यांनी राजकीय ठरविले.कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या काळात आलेल्या सीएनजी बस सेवेच्या खर्चाबाबत ताशेरे ओढले. आणि त्याहून अधिक चांगली ,कमी खर्चात ई बस सेवा उपलब्ध होत असल्याचा दावा केला.

माधुरीची पुडी कोणी सोडली ? पहा पालकमंत्री काय म्हणाले ….(व्हिडीओ)

पुणे- कालपासून ..पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने अभिनेत्री माधुरी दीक्षित ला उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या बातम्यांमुळे पुण्यातील भाजप नेत्यांची प्रतिक्रीया काय असेल याची अनेकांना उत्सुकता होती, खरे खोटे देव जाणे पण तर भाजपच्या वर्तुळात ‘ही पुडी’कोणी आणि का सोडली ? यावर हास्यविनोद होत होते… या पार्श्वभूमीवर आज झालेल्या एका अर्ध मॅरेथोन च्या पत्रकार परिषदेत याबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांना काही माध्यमांनी छेडले ..असता पहा आणि ऐका नेमके ते काय म्हणाले ……

बाबासाहेबांचे विचार देशाच्या प्रगतीला पूरक -बाळासाहेब जानराव

0

पुणे : “डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी देशाच्या विकासाला दिशा दिली. सर्व समाजाला एकसंध ठेवत समतेची वागणूक देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आजच्या घडीलाही बाबासाहेबांचे विचार देशाच्या प्रगतीला पूरक आहेत,” असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६२ व्या स्मृतिदिनानिमित्त (महापरिनिर्वाण दिन) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील आंबडेकर पुतळा येथे आयोजित अभिवादन सभेत बाळासाहेब जानराव बोलत होते.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, कामगार आघाडीचे महेश शिंदे, पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्क प्रमुख अशोक शिरोळे, नीलेश आल्हाट, विठ्ठल गायकवाड, शाम गायकवाड, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे, शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे, दादा वारभुवन, चित्रा जानुगडे, प्रियदर्शिनी निकाळजे, शिल्पा भोसले, किरण भालेराव, गुणवंत लोखंडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाळासाहेब जानराव म्हणाले, “बाबासाहेबानी आपल्या ज्ञानाचा, लेखणीचा उपयोग समाज आणि देशाच्या हितासाठी केला. त्यांनी केलेले कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. समाजातील भेदभाव विसरुन त्यांनी दिलेल्या विचारांवर आपण सर्वानी चालणे हेच त्यांना अभिवादन असेल.” परशुराम वाडेकर म्हणाले, “बाबासाहेब आपल्यातून लवकर गेल्याने देशाची प्रगती मंदावली. आणखी काही वर्षे बाबासाहेब जगले असते, तर कदाचित आजची परिस्थिती वेगळी असली असती. आरक्षणावरून सध्या सुरु असलेला घोळही आपल्याला पाहायला मिळाला नसता.” महेश शिंदे, ऍड. मंदार जोशी यांनीही आपले मत व्यक्त केले.

पुणे हाफ मॅरेथॉन स्पर्धा येत्या रविवारी -पालकमंत्री गिरीश बापट यांची माहिती

0

पुणे :-  ऍथलेटिक्‍सच्या स्पर्धांमध्ये नेहमी भाग घेणाऱ्या क्रीडापटूंना धावपटूंमधील भीष्माचार्य डॉ. जॅक डॅनियल आणि ऑलिंपिकपटू रायन हॉल यांच्यासोबत दहा तसेच एकवीस किलोमीटरच्या स्पर्धेत धावण्याची संधी… कधीतरी धावण्याचा व्यायाम घेणाऱ्यांपासून ते फक्त मॉर्निंग वॉकपुरताच व्यायाम करणाऱ्यांपर्यंतच्या इतरांना कुटुंबासमवेत सहा किलोमीटरच्या टप्प्यात चालण्याचा-धावण्याचा आनंद घेण्याचा योग. अशी दुहेरी धमाल येत्या रविवारी, ९ डिसेंबरला होणाऱ्या “बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन’मध्ये होणार आहे.
या स्पर्धेचे मुख्य समन्वयक आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली. “पुणेकरांची तंदुरूस्ती’ (वेलनेस) या कल्पनेतून या हाफ मॅरेथॉनची कल्पना पुढे आली.
ही स्पर्धा ९ डिसेंबरच्या पहाटे म्हाळुंगे-बालेवाडी संकुलापासून सुरू होईल. सुरुवातीला २१  आणि १०  किलोमीटरच्या टप्प्यासाठीची शर्यत पहाटे पाच वाजता सोडण्यात येईल. त्यावेळी अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित असतील. ढोल-ताशाच्या दणदणाटात या स्पर्धेची शानदार सुरूवात होईल. तसेच लष्कर आणि पोलिसांचा बँड हेही या उद्‌घाटन सोहळ्याचे आकर्षण असेल.
पहिल्या दोन टप्प्यांतील शर्यत सुरू झाल्यानंतर काही वेळातच सहा किलोमीटरचा तिसरा टप्पा सुरू होईल. पुणेकरांना त्यात आपल्या कुटुंबासमवेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेचे ब्रँड अँबेसेडर रॉयन हॉल, त्यांच्या पत्नी आणि अमेरिकेतील प्रसिद्ध धावपटू सारा आणि मंदिरा बेदी यांची उपस्थिती त्यावेळी असेल. बेदी या मॅरेथॉनचे सूत्रसंचालन करतील. तसेच अनेक नाट्य-चित्र अभिनेते, नामवंत व्यक्तींबरोबर चालण्याची-धावण्याची संधी पुणेकरांना मिळेल. “ऍथलेटिक्‍स फेडरेशन ऑफ इंडिया’ (एएफआय) आणि “एआयएमएस’ (एम्स) यांची या स्पर्धेला मान्यता मिळालेली आहे.
या अर्धमॅरेथॉन स्पर्धेत यशस्वी ठरणाऱ्या स्पर्धकांसाठी एकूण साडेएकवीस लाख रूपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
“तंदुरूस्ती’ (वेलनेस) या मध्यवर्ती संकल्पनेला उत्तेजन देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी, मान्यवर, नागरिक, विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. प्रत्येकाला त्यात सहभागी होता यावे, यासाठी पोलिस दलाने तसेच महापालिकेच्या प्रशासनाने त्याचे नियोजन केले आहे.
या स्पर्धेत पोलिस धावपटूंसाठी स्वतंत्रपणे पोलिस आयुक्त चषक जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यभरातील पोलिसांनी मोठ्या संख्येने नोंदणी केली आहे.
पुणेकरांच्या सेवेत तत्पर असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची विशेष दखल या स्पर्धेत घेण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांसाठी महापौर चषकाची घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी केली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा मॅरेथॉनमधील सहभाग हे या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य ठरेल. मॅरेथॉनमध्ये असे चषकही पहिल्यांदाच ठेवण्यात आले आहेत.

प्रशिक्षण सत्राला भरभरून प्रतिसाद
हाफ मॅरेथॉनच्या प्रशिक्षण सत्राला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने पुणे शहराने “देशातील सर्वात फिट शहर’ हा लौकिक कायम राखला. बजाज अलियांझ पीएचएम ही देशातील एकमेव लांब पल्ल्याची शर्यत असून त्यामध्ये सहभागींना कस्टमाईज्ड प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम “रन स्मार्ट’ प्रकल्पातील जगातील सर्वोत्तम प्रशिक्षक डॉ. जॅक डॅनियल यांनी आखला आहे.
या स्पर्धेतील या तीनही टप्प्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. नोंदणीच्या अखेरच्या वेळेपर्यंत ही नोंदणी होत होती. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, महापालिकेचे कर्मचारी, विविध क्षेत्रांत काम करणारे अधिकारी-कर्मचारी आदी या स्पर्धेत सहभागी होत आहेतच, पण त्याचबरोबर अनेक कुटुंबे तसेच सोसायट्यांमधील नागरिक, हास्य क्‍लब, ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. लष्कराचे अधिकारी आणि जवानही या स्पर्धेत सहभागी होताना दिसणार आहेत.

असा असेल मार्ग…
सहा किलोमीटरच्या फॅमिली रनसाठी
सुरूवात म्हाळुंगे-बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुलापासून. राधा चौक, बालेवाडी फाटा, हाय स्ट्रीट. त्याला वळसा घालून पुन्हा क्रीडा संकुलात परत.

दहा किलोमीटरच्या स्पर्धेसाठी मार्ग
सुरूवात म्हाळुंगे-बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुलापासून. राधा चौक, बालेवाडी फाटा, बाणेर रस्ता, व्हेरिटास चौकातून पुन्हा याच मार्गाने क्रीडा संकुलात परत.

एकवीस किलोमीटरच्या स्पर्धेसाठी मार्ग
सुरूवात म्हाळुंगे-बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुलापासून. राधा चौक, बालेवाडी फाटा, बाणेर रस्ता, व्हेरिटास चौक, विद्यापीठ चौक, तेथून वळून औंध रस्त्याने ब्रेमेन चौकात. तेथून औंधच्या परिहार चौकातून आयटीआयमार्गे पुन्हा बाणेर फाटा. बाणेर रस्त्याने क्रीडा संकुलात परत.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना ‘पद्मा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर

0
महेश लांडगे यांना ‘पद्मा युवा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’
पुणे : पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘पद्मा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’ यंदा देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना, तर ’पद्मा युवा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’ भारतीय जनता पक्ष पुरस्कृत आमदार महेश लांडगे यांना जाहीर झाला आहे.
रविवार, दि. 9 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी 7 ते 10 या वेळेत गणेश कला क्रीडामंच, स्वारगेट, पुणे येथे हा पुरस्कार सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून ऑल इंडिया अ‍ॅन्टी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष मनिंदरसिंग बिट्टा, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले, पुण्याचे पालकमंत्री गिरीशजी बापट, राज्यमंत्री दिलीपभाऊ कांबळे, खासदार श्रीरंगअप्पा बारणे व पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक उपस्थित राहणार आहेत.
ज्या व्यक्तींनी संघर्षातून आपले आयुष्य घडवले, अशा व्यक्तिंना पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीतर्फे हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा पुरस्काराचे आठवे वर्ष असून, खडतर परिस्थितीचा सामना करीत पुढे आलेल्या प्रतिथयश व्यक्तींचा सत्कार करुन युवकांपुढे आदर्श निर्माण करण्याचा उद्देश या पुरस्कारामागे आहे.
या पुरस्कार प्रदान सोहळ्याबरोबरच ‘युवकांच्या मनातील उद्याचा महाराष्ट्र’ या विषयावर राज्यातील युवानेत्यांचा परिसंवाद आयोजिला आहे. राज्याचे कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार डॉ. विश्वजीतजी कदम, आमदार संतोषजी दानवे, आमदार राहुलदादा कुल, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहितदादा पवार हे युवानेते सहभागी होत आहेत. यासह संगीतसम्राट फेम अभिजित कोसंबी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
अशी माहिती पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे, सल्लागार समितीचे जवाहर चोरगे, ऍड. मंदार जोशी व निखिल निगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारती विद्यापीठ ‘ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ‘ तर्फे ‘एथिकल हॅकिंग आणि सुरक्षितता ‘ विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम

0

पुणे :भारती विद्यापीठ ‘कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ‘ तर्फे ‘एथिकल हॅकिंग  आणि सुरक्षितता ‘ विषयावर तीन दिवसिय फॅकल्टी डेव्हेलपमेंट प्रोग्राम  आयोजित करण्यात आला होता . भारती विद्यापीठाच्या कात्रज कॅम्पस मध्ये ३ ते ५ डिसेंबर रोजी झालेल्या या चर्चासत्राचे उदघाटन प्राचार्य डॉ . आनंद भालेराव यांनी केले . डॉ .संदीप वांजळे यांनी स्वागत केले .   ५ विद्यापीठातील २१ इन्स्टिट्यूट चे ३८ प्राध्यापक ,संशोधक या चर्चासत्रात सहभागी झाले . एकूण सहा प्रशिक्षण सत्रांमध्ये  सायबर हल्ले  आणि ‘एथिकल हॅकिंग ‘ विषयी सर्वंकष माहिती देण्यात आली .

उदघाटन सत्रात बोलताना डॉ . आनंद भालेराव म्हणाले ,’६५ हजार प्रशिक्षित हॅकर्स या क्षेत्रात कमी आहेत . आताच्या डिजिटल युगात सायबर हल्ल्यांमुळे कार्पोरेट क्षेत्राचे  दरवर्षी अब्जावधींचे नुकसान होत आहे . हे सायबर हल्ले थोपविण्यासाठी चांगले काम करणाऱ्या एथिकल हॅकर्स ची गरज उद्योग क्षेत्राला भासत आहे . अजूनही ७८ टक्के आस्थापना आणि उद्योगांकडे सायबर हल्ल्याविरुद्ध करण्याच्या उपाययोजनासाठी नियोजन तयार नाही . त्यामुळे इथिकल हॅकर्स इथून पुढे मोठी मागणी असणार आहे . उद्योग जगात सायबर हल्ल्याबद्दलचे प्रशिक्षण ,उपाययोजना साठी मोठी गुंतवणूक करण्याच्या मनःस्थितीत आहे .

नॅसकॉम च्या अभ्यासानुसार भारतात ८० हजार एथिकल हॅकर्स ची आवश्यकता भासणार आहे ,मात्र ,आज केवळ १५ हजार प्रशिक्षित हॅकर्स उपलब्ध आहेत . या धोक्याविषयी जागृती घडवून आणण्याच्या हेतूने या फॅकल्टी फॅकल्टी डेव्हलपमेंट  प्रोग्राम चे आयोजन करण्यात आले होते .

निराधार आश्रमातील मुलींना ब्लँकेट व शालेय साहित्य भेट

0

पुणे-आजही मुलींच्या जन्माचे दुःख बाळगले जाते. मुला-मुलींमधील भेदभाव केला जातो मात्र त्याला अपवाद ‘ शिंदे ‘ कुटुंबीय ठरलं आहे..आपल्या घरी जन्माला येणाऱ्या मुलीचे स्वागतच या कुटुंबीयांनी वेगळ्या पद्धतीने केलंय..नुकतीच जन्मलेली ‘ मनश्री ‘ हिच्या जन्मानिमित्त तिचे वडील श्रीकांत शिंदे व आई सौ मनीषा शिंदे यांनी वडगाव बुद्रुक ( ता.हवेली जि. पुणे ) येथील निराधार महिला व मुलींसाठी असलेल्या निराश्रित बालकाश्रमात एक वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले..या निराधार आश्रमातील मुलींना थंडीमध्ये मायेची ऊब देणारे ब्लँकेट व शालेय साहित्य भेट देत अनोख्या पद्धतीने ‘ मनश्री ‘ च्या जन्माचे स्वागत केले.एकीकडे मुलींच्या नावाने नाक मुरडणाऱ्यांची संख्या कमी नाही पण दुसरीकडे मुलीच्या जन्माचे स्वागत आमच्या अनाथ निराधार मुलींमध्ये येऊन साजरे केले..नव्हे नव्हे या मुलींना थंडीमध्ये मायेचं पांघरूण म्हणून ब्लँकेटचे वाटप देखील केले..हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही असे प्रतिपादन संस्थेचे समुपदेशक बुधा बिऱ्हाडे यांनी केले..ते पुढे म्हणाले की,गर्भनिदान न करता मुलीच्या जन्माचे स्वागत करा,बेटा बेटी एक समान हा आपला मंत्र असला पाहिजे, स्त्री -पुरुष यामध्ये भेद बाळगू नका.मुलगीही वंशाचा दिवा होऊ शकते हे महिलांनी यापूर्वीच सिद्ध केल्याचे त्यांनी यावेळी उदाहरणासह स्पष्ट करत सौ.मनीषा व श्री.श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करत इतरांनीही असे उपक्रम करून मुलीच्या जन्माचे स्वागत करावे असे आवाहन केले..या स्तुत्य उपक्रमास आरती गायकवाड, रवींद्र टकले, सूर्यकांत लांडगे आदीसह निराश्रित बालकाश्रमातील कर्मचारी उपस्थित होते.

इन्सपेक्टर ‘माऊली’ सर्जेराव देशमुखच्या येण्याने सुपर मंचावर होणार धमाल आणि मस्ती

0

सोनी मराठी वाहिनीवरील ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली आहे. कलाकारांच्या येण्याने सुपर डान्सर्सच्या परफॉर्मन्सला चारचाँद लागले. आता पुन्हा प्रेक्षकांचे लाडके कलाकार या मंचावर धमाकेदार एण्ट्री करणार असून त्यापैकी एका कलाकाराच्या येण्याने ‘आपल्या सारखा Terror नाय’ असं नक्कीच सर्वांना वाटणार आहे. या एका डायलॉगमुळे प्रेक्षकांनी त्या पाहुणे कलाकाराचे अचूक नाव नक्कीच ओळखले असेल. तर ‘माऊली’ या आगामी मराठी चित्रपटातला इन्सपेक्टर माऊली सर्जेराव देशमुख उर्फ महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुखने या सुपर मंचावर सुपर एण्ट्री मारली आहे. रितेशसह अभिनेत्री सैयामी खेर, सिध्दार्थ जाधव, जितेंद्र जोशी आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार देखील विशेष उपस्थिती होती.

रितेश देशमुख, सिध्दार्थ जाधव यांचे अमेय वाघकडून मंचावर होणारे स्वागत, रितेश देशमुखने अमेयची केलेली नक्कल, फास्टर फेणेच्या शीर्षक गाण्यावर अमेय, रितेश आणि सिध्दार्थने केलेला डान्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पाहुणे कलाकारांच्या येण्याने सुपर डान्सर्समध्ये आलेला उत्साह या सर्व गोष्टीने परिपूर्ण आणि मनोरंजक असा खास एपिसोड प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.

‘माऊली’मधून मराठी सिनेमात पदार्पण करणारी अभिनेत्री सैयामी खेर, रितेश देशमुख, सिध्दार्थ जाधव आणि आदित्य सरपोतदार यांनी छोट्या स्पर्धकांच्या परफॉर्मन्सला दाद देऊन प्रत्येकाचे विशेष कौतुक केले. आणि मान्यवर व्यक्तींकडून कौतुक होण्यासारखा सुंदर अनुभव आपल्या स्पर्धकांनी अनुभवला आहे.

‘माऊली’च्या उपस्थितीत रंगलेला हा ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चा खास एपिसोड प्रेक्षकांना १० आणि ११ डिसेंबरला रात्री ९ वाजता सोनी मराठी वर पाहायला मिळणार आहे.

जिल्हा परिषद शिक्षिका अनुराधा काजळे यांनी फडकवला किलीमांजारो शिखरावर झेंडा

0

सोलापूर: जिल्हा परिषदेच्या शिक्षिका अनुराधा काजळे  यांनी दक्षिण आफ्रिकेतील किलिमांजारो शिखर सर केले आहे.या शिखरावर जाणाऱ्या त्या सोलापुरातील पहिल्या महिला व जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या आहेत.

आफ्रिकेतील टांझानिया  देशातील हे शिखर असून याची उंची समुद्र सपाटी पासून 19,341फूट आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी हे शिखर सर करून त्यावर भारताचे राष्ट्रगीत वाजवून विश्वविक्रम केला होता. गेल्या 6 वर्षात सोलापूरमधील जवळपास 250 प्रोफेशनल गिर्यारोहक व ट्रेकर्स आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत. गेल्या 3 वर्षात तब्बल 12 लोकांनी आनंद बनसोडेच्या मार्गदर्शनाखाली माउंट किलीमांजारो हे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर सर केले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गेले 1 वर्ष सराव करून अनुराधा काजळे यांनी ही मोहीम यशस्वी केली. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता किलीमांजारो शिखराच्या गिलमन्स पॉइंट याठिकाणी भारताचा तिरंगा फडकवला.

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेने स्थापन केलेल्या 360एक्सप्लोरर मार्फत साहसी खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी वेगवेगळ्या जागतिक मोहीम आखल्या जात आहेत त्या मध्ये वेगवेगळ्या खंडातील गिर्यारोहण, स्काय डायविंग, स्कुबा डायविंग हे सर्व समाविष्ट आहे.

२६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथून निघून आफ्रिकेतील टांझानिया या देशातील किलीमांजारो हे शिखर सर करून ४ डिसेंबर रोजी अनुराधा काजळे या सोलापूरमध्ये दाखल झाल्या. 360 एक्सप्लोरर टीम मार्फत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी 360 एक्सप्लोरर चे आनंद बनसोडे, अक्षया बनसोडे, रोहित शेंडे, सागर जानराव, कलशेट्टी सर, उमेश डूमने, कैलास जानराव उपस्थित होते.

-360 एक्सप्लोरर टीचर्स ट्रेकिंग क्लबचे यश

सोलापूर मधील सर्वच शिक्षकाना ट्रेकिंग ची आवड निर्माण व्हावी तसेच त्याच्यामार्फत विद्यार्थ्यांना या क्षेत्राची ओळख निर्माण व्हावी म्हणून आनंद बनसोडे व इतर गिर्यारोहकांनी “360 एक्सप्लोरर टीचर्स ट्रेकिंग क्लब” सोलापूरमध्ये सुरू केले आहे. त्याची अध्यक्ष म्हणून अनुराधा काजळे यांची नुकतीच निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी मिळवलेले हे पहिलेच यश आहे. ज्यांना या ट्रेकिंग क्लब मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी ९०६७०४५५००/ ९०६७०३५५०० वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अनुराधा काजळे यांची माहिती-

अनुराधा काजळे या सोलापूर जिल्हा परिषद   विडी घरकुल शाळेतील शिक्षिका आहेत. त्या कवयित्री असून त्यांचे ‘मनीचे गुज’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यांनी यापूर्वी स्वर्गारोहिणी व कळसुबाई यासह विविध शिखर सर केले आहेत. त्यांचा स्वकुळरत्न यासह विविध पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

– आनंद बनसोडे – 

“सोलापूरमधील प्रथम शिक्षिका व महिला गिर्यारोहक म्हणून अनुराधा काजळे यांनी मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. किलीमांजारो सर करून जिल्हापरिषद शिक्षकांपुढे एक आदर्श निर्माण केला. 360 एक्सप्लोरर मार्फत अनेकांना जागतिक मोहिमांसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्यांना गिर्यारोहणामध्ये काहीतरी भव्य-दिव्य करायचे आहे त्यांनी नक्कीच मला संपर्क करावा.”

-अनुराधा काजळे-

“हे यश माझ्या कुटुंब व मित्रपरिवाराला समर्पित आहे. पहिलाच आंतरराष्ट्रीय प्रवास तेही आफ्रिकेत असल्यामुळे खूप भीती वाटत होती परंतु एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी मुंबई विमानतळापासूनच अतिशय योग्य असे मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाच्या जोरावरच मी हे यश मिळवू शकले. अतिशय त्रास होत असताना अंतिम चढाई पूर्ण करू शकले याचा मला खूप आनंद आहे.”

झोमॅटोचा वेगाने विस्तार – खाद्यपदार्थ वितरण व्यवसाय देशातील आणखी १०० शहरांत विस्तारणार, मनिला व जकार्तामध्ये गोल्डचा विस्तार – आता ५ देश आणि २६ शहरांत कार्यरत

0

●        फूड डिलीव्हरी रेस्टॉरंट असोसिएशन्सची भारतात केवळ दोन महिन्यांत ५४ हजारांवरून ७५ हजारांपर्यंत व्याप्ती, वितरण भागिदारांच्या संख्येत मोठी वाढ; जानेवारी २०१८ पासून आतापर्यंत नोंदणीकृत भागिदारांची संख्या ५४०० पासून १,५०,००० पर्यंत

●        झोमॅटोद्वारे भारतात ऑक्टोबर २०१८ मध्ये २१ दशलक्ष ऑर्डर्स साध्य, जानेवारी २०१८ पासून ३.५ दशलक्ष ऑर्डर्सच्या संख्येत मोठी वाढ

●        कंपनीच्या एकूण उत्पन्नात खाद्य वितरण व्यवसायाचा सध्याचा वाटा ६५ टक्के, जानेवारी २०१८ मधील ३५ टक्क्यांशी तुलना

●        कंपनीचा प्रीमियम सबस्क्रिप्शन उपक्रम झोमॅटो गोल्डची सबस्क्रिप्शन संख्या सहा लाख ग्राहक आणि भारतात चार हजार रेस्टॉरंट भागीदार

●        चांगल्या प्रतिसादासाठी झोमॅटोतर्फे या महिन्याच्या सुरुवातीलाच मनिला व जकार्ता येथेही गोल्डचे लाँच

●        कंपनी आपला व्यवसाय आणखी विस्तारण्यासाठी सज्ज, या डिसेंबरमध्ये दिल्ली/एनसीआरमध्ये लाँच होणार हायप्युअर

 भारतातील डिजिटल माध्यमातून खाद्यपदार्थांची नोंदणी (फूड ऑर्डरिंग) करण्याचा व्यवसाय विस्तारण्यासाठी झोमॅटो या आठवड्यात आणखी तीस शहरात ऑनलाइन ऑर्डरिंग आणि खाद्यपदार्थ वितरण सेवा लाँच करणार असून कंपनी लवकरच देशातील शंभर शहरांत कार्यरत होईल.

 या अतिरिक्त सेवेमुळे झोमॅटोचा खाद्य वितरण सेवा सध्या देशात ९३ शहरांत कार्यरत होणार असून या व्यासपीठावर ७५ हजार रेस्टॉरंट्स नोंदलेली आहेत. शेवटच्या टप्प्यापर्यंत वितरण करण्यासाठी झोमॅटो या नव्या शहरांत पाच हजार वितरण भागीदार नेमण्यात आले असून त्यामुळे कंपनीची आताची १.५ लाख भागीदारांची संख्या आणखी मजबूत होणार आहे. या नव्या शहरांत पुद्दुचेरी, जमशेदपूर, अंबाला, मीरत, हरिद्वार, भावनागर, उज्जैन, पुरी या व इतर शहरांचा समावेश आहे.

 नव्या घडामोडींविषयी झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक दीपिंदर गोयल म्हणाले, आमचा व्यवसाय – गोल्ड, खाद्यपदार्थांचे वितरण आणि पुरवठा या आमच्या व्यवसायाच्या विस्ताराला सगळीकडूनच जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मनिला व जकार्तामध्ये एकाच आठवड्यात विक्री झालेल्या गोल्ड सदस्यत्वांची संख्या ही दिल्ली व मुंबईत झालेल्या प्राथमिक विक्रीपेक्षाही जास्त आहे. हायपरप्युअरलाही खूप चांगला प्रतिसाद आहे आणि आम्ही पुढील काही आठवड्यांत एनसीआर येथेही नवे केंद्र सुरू करणार आहे. द फूडअटवर्क व्यवसायचाही नव्या बाजारपेठांमध्येही विस्तार केला जाणार आहे. आणि अर्थातच, खाद्यपदार्थ वितरण व्यवसायही प्रमुख शहरांसह दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्येही वेगाने विस्तारत आहे.

 नुकत्याच लाँच झालेल्या ऑनलाइन ऑर्डरिंग आणि खाद्य पदार्थ व्यवसायाबद्दल झोमॅटोच्या खाद्य वितरण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित गुप्ता म्हणाले, दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये मिळत असलेल्या मागणीने आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे आणि म्हणूनच भारतातील छोट्यातल्या छोट्या शहरातल्या प्रत्येक शेवटच्या ग्राहकाला सेवा देण्यावर आमचा भर आहे. शंभर शहरांचा टप्पा पार करणारे आम्ही पहिलेच असू आणि यापुढेही आम्ही भारतातील खाद्यपदार्थ वितरण क्षेत्रात भौगोलिक व्याप्ती वाढवण्यासाठी मोठी गुंतवणूक करत राहाणारच आहोत. सणासुदीच्या काळात आमच्या प्रमुख बाजारपेठेतील आमचा हिस्सा वाढताना पाहिला असून डिसेंबरमध्येही विस्ताराचे आमचे नियोनन आहे.

 भारतातील दीर्घ काळापासून सुरू असलेले खाद्यपदार्थ- तंत्रज्ञान व्यासपीठ झोमॅटो आपल्या ग्राहकांना दर्जेदार खाद्यपदार्थ आणि सेवा पुरवण्यासाठी तसेच त्यांना खाद्यपदार्थांची योग्य निवड करण्यासाठी बांधील आहे.

 पुरवठ्यामध्ये वाढ (७५ हजार रेस्टॉरंट पार्टनर्स), आक्रमक, भौगोलिक विस्तार (भारतातील १०० शहरांपर्यंत पोहोचणारी पहिली कंपनी) आणि शेवटच्या टोकापर्यंत वितरण सेवा देण्याची दमदार क्षमता (१.५ लाख रायडर्सचा समावेश असलेली सर्वात मोठी वितरण सेवा) इत्यादी घटकांनी व्यवसायाच्या एकंदर विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आम्ही खाद्यपदार्थ वितरण व्यवसायातील या तिन्ही विभागांमध्ये आघाडीवर असून केवळ पदार्थांबाबतीच नव्हे, तर चांगले अनुभव देण्याबद्दलही आम्ही आमची सेवा सातत्याने विकसित करत राहू.

 ऑर्डर नोंदवण्याच्या आधी आणि नंतर दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक ग्राहक सेवेसह – आम्ही नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या शहरांतही ग्राहकांना विना- अडथळा वितरणाचा लाभ मिळवून देणार आहोत. सध्या ही सेवा आठवड्याचे सातही दिवस (सकाळी ११ ते रात्री ११) उपलब्ध आहे आणि लवकरच सकाळचा नाश्ता व मध्यरात्रीच्या जेवणासाठीही वितरण सेवा पुरवली जाणार आहे.

 झोमॅटोबद्दल

दिपिंदर गोयल आणि पंकज चढ्ढा यांनी २००८ मध्ये रेस्टॉरंट शोधण्याची सेवा देणारे झोमॅटो हे व्यासपीठ स्थापन केले होते. या व्यासपीठावर २४ देशांतील १.४ दशलक्ष रेस्टॉरंट्सची संखोल माहिती असून त्याद्वारे दरमहा ५० दशलक्ष ग्राहकांना सेवा दिली जाते.

रेस्टॉरंट शोधाबरोबरच झोमॅटोने ऑनलाइन ऑर्डरिंग (खाद्यपदार्थ वितरण), टेक अवे सेवा (झोमॅटो पिकअप), टेबल आरक्षण, रेस्टॉरंट्ससाठी बीटुबी खाद्यपदार्थ घटक पुरवठा, झोमॅटो पिगीबँक इत्यादी सेवा लाँच करत ग्राहक व रेस्टॉरंट व्यवसाय यांना जोडण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती केली. या सेवांबरोबरच झोमॅटोचा वापर ग्राहकांकडून रेस्टॉरंट शोधण्यासाठी, त्याला श्रेणी देण्यासाठी, त्याचे परीक्षण करण्यासाठी, विश्वासार्ह शिफारशी मिळवण्यासाठी इतर खवैय्यांशी जोडले जात स्वतःचे नेटवर्क तयार करण्यासाठी केला जातो.

‘आयसीसी टॉवरची जागा स्मार्ट सिटी कंपनीला फुकटात कशाला ?-नीलेश निकमांचा सवाल

0

पुणे’आयसीसी’ टॉवर येथे महापालिकेला मिळणारी ३१ हजार ५०० चौरस फूट जागा ही स्मार्ट सिटी कंपनीला न देता निविदा काढून भाड्याने द्यावी. त्यामधून वर्षाकाठी किमान पाच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल,’ अशी मागणी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नीलेश निकम यांनी केली आहे. या उत्पन्नातून सेनापती बापट रस्त्यावर ‘एलिव्हेटेड’ रस्ता बांधून वाहतूक सुरळीत करावी, असे निकम यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

पालिकेच्या बांधकाम नियमावलीनुसार ‘आयसीसी टॉवर’मधील ३१ हजार ५०० चौरस फूट जागा पालिकेच्या ताब्यात देण्यात आली आहे. ही जागा स्मार्ट सिटी कंपनीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या रेडिरेकनरचा विचार करता या जागेपोटी किमान पाच कोटी रुपये वार्षिक उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामध्ये दर तीन वर्षांनी किमान पाच टक्के वाढ अपेक्षित आहे. पालिकेला याच ठिकाणी यापूर्वी ४२ हजार चौरस फूट जागा मिळाली असून, तीही भाड्याने देण्यात आली आहे. त्यावेळीही ही जागा निविदा काढून देण्यात आली आहे. २००७ ते २०१६ या काळात पालिकेला २६ कोटी १९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या जागेपोटी महापालिकेला ३० वर्षांत १६३ कोटी रुपये भाड्यापोटी मिळणार आहेत. त्याचप्रमाणे नव्याने मिळणाऱ्या जागेचा विचार करता पुढील ३० वर्षांत भाड्यापोटी अतिरिक्त २०० कोटी रुपये उत्पन्न मिळेल. त्यामुळे ही जागा भाड्याने देणे महापालिकेच्या हिताचे असल्याचा दावा निकम यांनी केला आहे.

बजाज अॅलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनचे आयोजन

0
  • रेसच्या तीन श्रेणी आहेत: हाफ मॅरेथॉन (21.1 किमी), 10 किमी रन आणि फॅमिली रन (6 किमी)
  • त्या दिवशी कमिशनर्स कप व मेयर्स कप असे विशेष उपक्रम
  • 21 लाख रुपयांहून अधिक रकमेची एकूण बक्षीसे
  • ही रेस एएफआय मान्यताप्राप्त आहे व कोर्स एम्स प्रमाणित आहे
  • मॅरेथॉनचे ब्रँड अम्बेसेडर रायन हॉल व मंदिरा बेदी उपस्थित राहणार

पुणे: पुणे शहर 9 डिसेंबर, 2018 (रविवार) रोजी आयोजित केलेल्या उद्घाटनपर बजाज अॅलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनसाठी (पीएचएम) सज्ज झाले आहे. हा उपक्रम म्हणजे वैयक्तिक प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव लांब पल्ल्याची रेस ठरावी, या हेतूने रन स्मार्ट (S.M.A.R.T.) प्रकल्पाबरोबर पुणेकर व देशभरातील अन्य व्यक्ती या दिवसासाठी खडतर प्रशिक्षण घेत आहेत. “वेलनेस” या कार्यक्रमाच्या मध्यवर्ती संकल्पनेला उत्तेजन देण्यासाठी सेलिब्रेटी, अन्य मान्यवर व नागरिक यांनी सहभाग घेतला आहे. रविवारी प्रत्येकाला सुरळितपणे रेसमध्ये सहभागी होता यावे, यासाठी पोलीस विभागाने व शहरातील महापालिकेने नियोजन केले आहे.

बजाज अॅलियान्झ पीएचएम ही काही अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाची (एएफआय) मान्यताप्राप्त रेस आहे आणि रेसकोर्स एम्सकडून प्रमाणित आहे, त्यामुळे अन्य मुख्य रेसेसच्या टायमिंग सर्टिफिकेट मीट गरजा पूर्ण केल्या जातात.

श्रेणी

हाफ मॅरेथॉन (21.1 किमी) 10 किमी रन या रेस नियमितपणे धावत असणाऱ्यांसाठी आहेत. 6 किमीची फॅमिली रन हे या कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्य आहे. यामध्ये, एकत्र येण्यासाठी आणि एकत्र धावण्यासाठी कुटुंबांना उत्तेजन दिले जात आहे. आयोजकांनी विशेषतः बालके व युवक यांच्यासाठी फॅमिली रनचे आयोजन केले आहे आणि कुटुंबे व बालकांमध्ये वेलनेसची सवय रुजवणे, हा त्यामागील हेतू आहे. सहभागींना त्यांच्या आवडीचा पोशाख करणे, प्रॉप्स वापरणे, मुख्य संकल्पनेशी संबंधित कपडे घालणे शक्य होणार असल्याने फॅमिली रन अधिक धमाल ठरणार आहे. त्यामुळे ही खऱ्या अर्थाने कार्निव्हल-थीम्ड रन ठरणार आहे.

पोलीस आणि पालिका विभागांना सहभागी होण्यासाठी दोन विशेष श्रेणी आहेत – अनुक्रमे कमिशनर्स कप व मेयर्स कप.

“पोलीस व महापालिकेचे विभाग यांमध्ये वेलनेस ही संकल्पना प्रसृत करणे, हा कमिशनर्स कप व मेयर्स कप यांचा उद्देश आहे. समाज सुरळीतपणे चालण्यासाठी ते देत असलेल्या प्रचंड योगदानाची दखल घेणे व गौरव करणे, हाही हेतू आहे. आपण प्रेक्षकांमध्ये बसलो आणि शहर सुरळीत चालण्याची जबाबदारी उचलणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले तर?” असे कार्यक्रमाचे आयोजक एपीजी रनिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास सिंग यांनी नमूद केले.

बजाज अॅलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनच्या यशाविषयी बोलताना, बजाज अॅलियान्झचे चीफ मार्केटिंग ऑफिसर चंद्रमोहन मेहरा यांनी सांगितले, “बजाज अॅलियान्झ हाफ मॅरेथॉनच्या उद्घाटनपर पर्वाला मिळालेला भरभरून प्रतिसाद, समावेशक फिटनेस चळवळीला चालना देणे, या आमच्या उद्देशाला अनुसरून आहे. सहभागींना धावण्याचा अविस्मरणीय अनुभव मिळावा आणि या कार्यक्रमानंतरही फिटनेसमध्ये सातत्य राहावे, यासाठी आनंदी सुरुवात व्हावी, अशी आमची इच्छा आहे.”

बक्षीसाची रक्कम

गेल्या अनेक वर्षांमध्ये धावण्याचे प्रमाण फार वाढले आहे. अनेकानेक खेळाडू देशाचा अभिमान वाढवत आहेतच, शिवाय शहर-स्तरावरील लांब पल्ल्याच्या रन्समध्ये मोठी वाढ होत आहे. देशात धावण्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनेबजाज अॅलियान्झ पीएचएमच्या निमित्ताने योगदान मिळाले आहे. या कार्यक्रमामध्ये देशभरातील स्पर्धक सहभागी होणार आहेत आणि ग्रामीण भागातूनही त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विजेत्यांना 21.5 लाख रुपयांची रोख बक्षीसे दिली जाणार आहेत.

 प्रशिक्षण सत्राला प्रचंड प्रतिसाद

प्रशिक्षण सत्राला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने, पुणे शहराने भारतातील सर्वात फिट शहर, हे नाव कायम राखले. जसजसा रविवार जवळ येत आहे, तसतशी यामध्ये वाढ होणार आहे. अगोदर नमूद केल्याप्रमाणे, बजाज अॅलियान्झ पीएचएम हीदेशातील एकमेव लांब पल्ल्याची रेस असून त्यामध्ये सहभागींना कस्टमाइड्ड प्रशिक्षण नियोजन उपलब्ध केले आहे.

हा कार्यक्रम, रन स्मार्ट प्रकल्पातील, धावण्यासाठीचा जगातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून लोकप्रिय असलेले डॉ. जॅक डॅनिअल्स यांनी आखला आहे. डॉ. डॅनिअल्स यांनी भारतातील सहभागींना व्यक्तिशः संबोधित केले होते आणि ऑक्टोबर महिन्यात कार्यक्रमाचे अनावरण केले. अमेरिकेतील प्रसिद्ध लाँग-डिस्टन्स रनर रायन हॉल हे या कार्यक्रमाचे ब्रँड अम्बेसेडर आहेत. ते पत्नी व अमेरिकेतील चॅम्पिअन रनर सारा यांच्यासह कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. मंदिरा बेदी मॅरेथॉनचे सूत्रसंचालन करणार आहेत.

पुणे हाफ मॅरेथॉनविषयी

पीएचएम या कार्यक्रमाचे आयोजन एपीजी रनिंगने (एपी ग्लोबेल ग्रुप) केले आहे आणि टायटल स्पॉन्सर म्हणून बजाज अॅलियान्झने सक्षम पाठिंबा दिला आहे. पुणेकरांचा वेलनेस यातून पीएचएमचा उगम झाला. भारताच्या रनिंग उपक्रमांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. 2018 या उद्घाटनपर पर्वाचे आयोजन रविवारी, 9 डिसेंबर रोजी केले जाणार आहे. सहभागींना अविस्मरणीय अनुभव मिळावा, या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जागतिक दर्जाचा क्रीडा उपक्रम त्यांच्याच शहरात सादर केला जाणार आहे.