आला रे आला… ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर सिंबा आला
आतापर्यंत सोनी मराठी वरील ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर अनेक कलाकारांनी स्पर्धकांचे सुपर
परफॉर्मन्सेस पाहण्यासाठी हजेरी लावली आहे. पण या मंचावर नुकतीच एक आश्चर्यकारक घटना अशी घडली
की, बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने हक्काने सुपर एण्ट्री करुन ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या सेटवर सर्वांना
सरप्राईज केले.
‘आला रे आला सिंबा आला’ असा आवाज ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर घुमला कारण या मंचावर सिंबाने
सरप्राईज एण्ट्री करुन सर्वांना आश्चर्यचकीत केले होते.
नेहमीच उत्साही असणारा संग्राम भालेराव उर्फ रणवीर सिंह याने कळत-नकळतपणे ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या
सेटवर जाऊन सर्वांना सरप्राईज करण्याचे ठरविले होते आणि तो सेटवर येणार याचा त्याने कोणाला थांगपत्ताही
लागू दिला नव्हता. आपण ज्या ठिकाणी शूट करतोय, त्याच ठिकाणी ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चे ही शूट चालू आहे
असे जेव्हा त्याला कळले तेव्हा त्याने लगेच ‘सरप्राईज एण्ट्री’चा प्लॅन तयार केला. या निमित्ताने त्याची चाहती
अमृता खानविलकरलाही भेटणं होईल आणि स्पर्धकांना सरप्राईज देता येईल असं ठरवूव सिंबाने ‘सुपर डान्सर
महाराष्ट्र’च्या मंचावर एण्ट्री मारली.
आपल्या सर्वांनाच माहित आहे की अमृता खानविलकर रणवीर सिंहची खूप मोठी चाहती आहे आणि प्रत्येकवेळी
रणवीरला सपोर्ट करुन अमृताने हे दाखवूनही दिले आहे. त्यामुळे अचानकपणे, कसलीही पूर्व कल्पना न देता
रणवीर सिंह थेट समोर उपस्थित राहणे यासारखे सुंदर सरप्राईज अमृतासाठी कोणतेही नसेल. अमृताशी गप्पा-
गोष्टी रंगल्या नंतर, आपल्या सुपर स्पर्धकांच्या उत्साहाला दाद देत रणवीरने त्यांच्यासोबत सेल्फी-फोटो काढले.
अशाप्रकारे काही मिनिटांचे हे सरप्राईज एक कायमस्वरुपी आठवण भेट म्हणून रणवीर याने सोनी मराठी
कुटुंबाला दिली.
रणवीरने मारली ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर एण्ट्री
सोनिया पाटील यांना ‘वॉव पर्सनॅलिटी पुरस्कार’ जाहीर
संभाजी ब्रिगेडचा ‘सनबर्न’ला विरोध
पुणे : गोव्यातून पुण्यात आलेल्या सनबर्न फेस्टिव्हलला आता संभाजी ब्रिगेडने देखील आपला विरोध दर्शवला आहे. दोन वर्षांपासून पुण्यात होत असलेल्या सनबर्न फेस्टिव्हल हा दारूड्या संस्कृतीचा व अमली पदार्थांचा खुला बाजार आहे, असे म्हणत संभाजी ब्रिगेडकडून विरोध करण्यात आला आहे.
अनेक वर्षांपासून डिसेंबरमध्ये गोव्यात होणारा सनबर्न फेस्टिव्हल गेल्या दोन वर्षांपासून पुण्यात होत आहे. पुण्यात हा फेस्टिव्हल सुरू झाल्यापासून वादात सापडला आहे. पुण्यात पहिल्या वर्षी हा फेस्टिव्हल केसनंद येथे झाला होता. त्या वेळी टेकडी फोडून रस्ता तयार केल्याचा आरोप करण्यात आला होता. दुसऱ्या वर्षी हा फेस्टिव्हल पिंपरी-चिंचवड येथे भरविण्यात आला होता.
सनबर्न फेस्टिव्हलला वेळेची मर्यादा नसते; मात्र शिवजयंती, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्रोत्सव कायद्याचा बडगा दाखवून रात्री १० वाजता बंद केले जातात. सनबर्न फेस्टिव्हलला आर्थिक गणिते बघून रात्रभर चालवण्यास परवानगी दिली जाते. सनबर्न फेस्टिव्हलमध्ये रात्रभर अमली पदार्थांचे प्रचंड सेवन होते. यामुळे तरुण पिढीवर प्रचंड वाईट परिणाम होतात. या वाईट संस्कृतीमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे. रात्रभर तरुण मुले-मुली दारू पिऊन व अमली पदार्थांचे सेवन करून दररोज धिंगाणा घालत फिरतात.
समता, समानता व बंधुता प्रस्थापित करणारे व महाराष्ट्राला चांगली दिशा देणारे शहर आहे. पुणे जिजाऊ-शिवरायांचे, महात्मा फुले व जेधे-जवळकरांचे पुरोगामी शहर आहे. शिक्षणाचे हब असून सर्व धर्मांची संस्कृती जपणारे शहर आहे. याच पुण्यात हा धर्मद्रोही उत्सव चालणार नाही, असे ब्रिगेडकडून ठणकावून सांगण्यात आले आहे. तसेच, प्रशासनाने या फेस्टिव्हलला परवानगी नाकारावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.
सनबर्न फेस्टिव्हल हा पाश्चिमात्य संस्कृतीचे समर्थन करणारा तसेच या फेस्टिव्हलमध्ये अमली पदार्थांचे सेवन केले जाते, असा आरोप याआधी हिंदू जनजागृती समितीकडून गेली दोन वर्षे करण्यात आला आहे. आता संभाजी ब्रिगेडनेसुद्धा या फेस्टिव्हलला विरोध दर्शविला आहे. सनबर्न फेस्टिव्हल हा दारूड्या संस्कृतीचा व अमली पदार्थांचा खुला बाजार आहे. हा सरकार पुरस्कृत अश्लील पाश्चात्त्य संस्कृतीचा नंगा नाच, अशी टीका संभाजी ब्रिगेडकडून करण्यात येत आहे.
चित्रकार व शिल्पकारांकडून पवारांना वाढदिवसाची अनोखी भेट!
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त 14 डिसेंबरपर्यंत कलाप्रदर्शन
कलाकृतींच्या विक्रीतून येणाऱ्या पैशांतील 50 टक्के रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देणार
शरद कला क्रीडा प्रतिष्ठान पुणे आणि अक्षय शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने कलाप्रदर्शनाचे आयोजन
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना 78 व्या वाढदिवसानिमित्त 12 चित्रकार व शिल्पकारांनी अनोखी भेट दिली आहे. त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात भरविण्यात आले आहे. त्यांच्या कलाकृतींच्या विक्रीतून येणाऱ्या पैशांतील 50 टक्के रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार असून हीच पवारांना वाढदिवसाची खास भेट असणार आहे.
शरद कला क्रीडा प्रतिष्ठान पुणे आणि अक्षय शिंदे फाउंडेशनच्या यांच्या वतीने या कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 14 डिसेंबरपर्यंत बालगंधर्व रंगमंदिर कलादालन येथे नागरिकांना हे कलाप्रदर्शन पाहण्यासाठी खुले असणार आहे. या कलाप्रदर्शनाचे उद्घाटन अक्षय शिंदे फाउंडेशन सोमेश्वर बारामतीचे अध्यक्ष आर. एन. शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, माजी आमदार कमल ढोले पाटील, राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हा सरचिटणीस निलेश खाबिया, आयर्न मॅन सतीश ननावरे, व्यापारी सेलचे अध्यक्ष राजेंद्र फुलपगर, ज्येष्ठ चित्रकार तु. का. जाधव, चित्रकार श्रीकांत कदम, प्रा. सतीश काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कलाप्रदर्शनात श्रीकांत कदम, प्रा. सतीश काळे, तु. का. जाधव, बाळासाहेब अभंग, प्रा. संतोष शिर्के, जितेंद्र सुतार, प्रशांत बंगाळ, सयाजी वाघमारे, दीपक वानखेडे, प्रा. मंगेश शिंदे, राम खरटमल व बापुसाहेब झांजे या चित्रकार व शिल्पकारांच्या कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत.
शरद पवार हे भारतीय राजकारण, समाजकारण, अर्थकारण व ग्रामीण तसेच शहर विकासाच्या क्षेत्रातील अग्रगण्य व सर्वांनाच आदरणीय असे व्यक्तिमत्व आहे. याच कारणास्तव त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्याबरोबरच वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने या कलाकारांनी त्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शेती व शेतकरी हा पवार यांचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने आणि सध्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाल्याने यामाध्यमातून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न राहणार आहे
विश्वनाथन आनंद खेळले एकाचवेळी बारा विद्यार्थ्यांबरोबर बुद्धीबळ
- या स्पर्धेत ५ ते १६ या वयोगटातील स्पर्धकांचा सहभाग
- अंतिम फेरीसाठी ४८६ पैकी १२ विद्यार्थांची निवड
- स्पर्धेच्या प्रथम बारा स्पर्धकांना रोख बक्षीस, पारितोषिक व प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले.
पुणे-एडिफाय इंटरनॅशनल स्कूलने पुणे जिल्हा चेस असोसिएशनच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी एक अनोख्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी आपली हजेरी लावली. या स्पर्धेची खासियत अशी होती की अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या १२ विद्यार्थ्यान बरोबर विश्वनाथन आनंद यांनी बुद्धिबळचा सामना खेळला. हा खेळ एडिफाय इंटरनॅशनल स्कूल, हिंजवडी पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.
या स्पर्धेत ५ ते १६ या वयोगटातील एकून ४८६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेची प्रारंभिक फेरी ही दि. १७ व १८ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आली होती. अंतिम १२ स्पर्धकांनमध्ये अद्वैत पाटील, कशिष जैन, शिवराज पिंगळे, जेल दिगंबर, निर्गुण केवल, प्रेम मेहेत्रे, साहिल ढोबळे, युवराज पाटील , सिंगला आर्यन, धीरेन मोर, अथर्व बागुल, छवी बाफना यांचा समावेश होता.
यावेळी मिडियाशी बोलताना विश्वनाथन आनंद म्हणाले की “ मला सांगण्यास अतिशय आनंद होतोय की एडिफाय इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थांच्या कौशल्यपूर्ण खेळाला वाव देत आहे. अभ्यासा प्रमाणाने खेळालाही तेवढेच महत्व देणे गरजेचे आहे, तरच त्यात उत्तम यश नक्की मिळेल.” त्याच बरोबर ते म्हणाले की “ प्रत्येक वेळी स्वतःला आव्हान देणे आवश्यक आहे तसेच बुद्धिबळात आणि आयुष्यात यश व अपयश पचवण्याची ताकद निर्माण केली पाहिजे.”
शाळेच्या मुख्याधापिका प्रिया आनंद म्हणाल्या की “अंतिम १२ स्पर्धकांना विश्वनाथन आनंद यांच्या बरोबर बुद्धिबळ खेळण्याची खूप मोठी संधी मिळाली. यातून त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, विश्वनाथन यांच्या कडून मिळालेल्या टिप्स स्पर्धकांना आयुष्यभर नक्कीच उपयोगी पडतील हा मला विश्वास आहे.”
त्याच बरोबर पुणे जिल्हा चेस असोसिएशनचे अध्यक्ष जोसेफ डिसूझा म्हणाले की, “या स्पर्धेत सहभाग झालेल्या पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी होती स्पर्धकांना विश्वनाथन आनंद यांच्या कडून बुद्धिबळाच्या खेळातील विविध टिप्स व प्रेरणा मिळाली.”
या वेळी विश्वनाथन आनंद यांच्या हस्ते एडिफाय इंटरनॅशनल स्कूलच्या आयबी अभ्यासक्रमाचे उद्घाटन झाले तसेच त्यांच्याच हस्ते बुद्धिबळ स्पर्धेच्या प्रथम बारा स्पर्धकांना रोख बक्षीस, पारितोषिक व प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रथम बारा स्पर्धकांची नावे पुढील प्रमाणे आहेत, कशिष जैन, शिवराज पिंगळे , जेल दिगंबर , निर्गुण केवल , अद्वैत पाटील , प्रेम मेहेत्रे, साहिल ढोबळे, युवराज पाटील, सिंगला आर्यन, धीरेन मोर, अथर्व बागुल, छवी बाफना. या बारा स्पर्धकांना पुढील प्रमाणे बक्षीस प्रदान करण्यात आली. (१) १०,०००/- (२) ६,०००/- (३) ४,०००/- (४) २,५००/- (५) २,५००/- (६) २,०००/- (७) २,०००/- (८) २,०००/- (९) २,०००/- (१०) २,०००/- (११) पारितोषिक व प्रशस्तिपत्रक (१२) पारितोषिक व प्रशस्तिपत्रक.
यशवंतराव गडाख, प्रा. तेज निवळीकर यांना राष्ट्रीय बंधुता पुरस्कार
नव्या प्रतिभाशाली तरुण गायकांच्या गाण्यांचा ‘पेहली गूंज’ हा आल्बम सादर
बांधकाम क्षेत्रात आपले नाव प्रस्थापित केल्यानंतर आता पुण्याच्या ‘पुष्पगंगा व्हेंच्युअर्स’ने संगीत जगतात पदार्पण केले असून ‘पेहली गूंज’ हा आपला पहिला हिंदी गाण्यांचा आल्बम सादर केला आहे. प्रशंसनीय वैशिष्ट्य म्हणजे या आल्बममधून नव्या प्रतिभाशाली तरुण गायकांना प्रसिद्धी देण्यात आली आहे. त्यातील दोन गायकांनी टीव्हीवरील ‘व्हॉईस इंडिया किड्स’ आणि ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय संगीत कार्यक्रमात आपल्या यशस्वी कामगिरीने नाव व प्रसिद्धी मिळवली आहे.
यासंदर्भात ‘पुष्पगंगा व्हेंच्युअर्स’चे व्यवस्थापकीय संचालक अम्मुल गोएल म्हणाले, “आम्ही असामान्य प्रतिभाशाली अशा तीन तरुण गायकांना सादर करत आहोत. त्यांची गाणी या आल्बमद्वारे सादर करुन आम्ही त्यांच्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचे ठरवले आहे. यापुढची पायरी म्हणजे या गायकांच्या संगीत मैफलींचे देशभरातील सर्व प्रमुख शहरांत, तसेच परदेशांतही आयोजन करणे. यामध्ये पुणे, मुंबई, बंगळुरू, लखनौ, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा, नागपूर, चंडीगड व जयपूर या प्रमुख शहरांचा समावेश असेल, जेथे हे तरुण आपली संगीताप्रतीची आकांक्षा पूर्ण करु शकतील.”
हे तीन गायक म्हणजे अक्षता संब्याल (वय १५), प्रशांत सिंग कलहंस (वय १७) व जसु खान मीर (वय १४)
अक्षता संब्याल : अक्षता ही बंगळुरुची रहिवासी असून ती ‘व्हॉईस इंडिया किड्स’ स्पर्धेतील स्पर्धक आहे. तिच्या नादमधुर आवाजाने याआधीच ‘गुंजाइश’ या लघुपटाद्वारे चित्रपट क्षेत्रात तरंग उमटवणे सुरू केले आहे. बॉलिवूडसाठी गायचे तिचे स्वप्न आहे.
प्रशांत सिंग कलहंस : प्रशांतने लोकप्रिय चित्रपटगीते दमदारपणे सादर करुन याआधीच आपले राहते शहर लखनौतील रसिकांचे मन जिंकले आहे. या होतकरु प्रतिभावान गायकालाही बॉलिवूडमध्ये पार्श्वगायन करण्याची आकांक्षा आहे.
जसु खान मीर : राजस्थानातील या बासरीप्रेमी किशोराने वयाच्या पाचव्या वर्षी संगीत शिकण्यास सुरवात केली असून ‘व्हॉइस इंडिया किड्स’ व ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या दोन्ही स्पर्धांत लोकप्रियता मिळवून भारतीय दूरचित्रवाणी जगतात याआधीच आपला ठसा उमटवला आहे.
पेहली गूंज या आल्बममध्ये मैत्री, प्रेम, इमानदारी व देशभक्ती अशा विविध भावभावनांचा आविष्कार घडवणारी गाणी आहेत. हे गीतलेखन ‘बाजीराव मस्तानी’, ‘मेरी कोम’, ‘रेस २’व अशा अनेक चित्रपटांचा प्रसिद्ध गीतकार प्रशांत इंगोले याने केले आहे. आल्बममधील पाच गाण्यांपैकी दोन गाण्यांचा व्हिडिओ आज सादर करण्यात आला. यातील ‘कुछ भी नही’ या गाण्याला श्रेयस पुराणिक याने संगीत दिले असून ‘यारा तेरी यारी’ या गाण्याला विक्रम माँट्रोज याने संगीत दिले आहे.
या आल्बमचा व्हिडिओ सादर करण्याची पुष्पगंगाची योजना असून तो लवकरच सर्व रेडिओ, टीव्ही व ऑनलाईन मीडियावर सादर केला जाईल.
या प्रतिभाशाली गायकांना मैफली आणि खासगी कार्यक्रमांत गाणी सादर करण्यास आमंत्रित केल्यास त्यांचे कौशल्य सर्व वयोगटांना भावेल. सध्या केवळ लोकप्रिय पार्श्वगायकांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा प्रघात आहे, पण या गायकांना संधी देण्यासाठी प्रायोजक पुढे आले तर हे गायक नक्कीच हा प्रघात बदलतील.
‘स्वॅगलिव्ह’ ॲपचे सादरीकरण
अम्मुल पुढे म्हणाले, “आम्ही केवळ टीव्हीवरील तरुणांनाच निवडत नाही. भारतात खूप बुद्धिमान युवक आहेत, पण त्यांना कुणाशी संपर्क साधायचा, कुठे जायचे याबाबत काहीच ठाऊक नाही. त्यामुळे ते आपली स्वप्ने साकारु शकत नाहीत अथवा प्रसिद्धीच्या झोतात येऊ शकत नाहीत. यासाठीच आम्ही आता आमचे ‘स्वॅगलिव्ह’ हे ॲप सादर करत आहोत. हे ॲप म्हणजे ऑनलाईन व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे, जेथे भारतातील प्रत्येकजण आपले बुद्धिकौशल्य प्रदर्शित करु शकेल. हे कौशल्य केवळ संगीतापुरते मर्यादित नसेल तर नकला, विनोद, नृत्य, आरजे, एमजे, व्हीजे अशा क्षेत्रांतील व सर्व वयोगटांसाठी असेल. यातून या कलाकारांना आघाडीच्या रिअलिटी शोंचा भाग बनण्याचीही संधी मिळेल व त्यांची ज्यासाठी खरोखर पात्रता आहे ते नाव व प्रसिदधीही मिळवू शकतील.”
हे ॲप पुढील महिन्यात सादर होण्यासाठी सज्ज आहे. हा संपूर्णपणे स्वदेशात विकसित झालेला सोशल व्हिडिओ/ऑडिओ/चॅटिंग प्लॅटफॉर्म आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा स्वॅगलिव्ह ॲप बनावट वापरकर्त्यांना वगळून या प्लॅटफॉर्मला विश्वसनीय व स्पर्धात्मक बनवेल.
‘इंटर्नशाला’मुळे विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास -कल्याण जाधव
पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाचा अंतिम फेरीत प्रवेश
पुणे: साई9स्पोर्ट्स यांच्या तर्फे दुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाने राजू भालेकर इलेव्हन संघाचा 33 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
नेहरू स्टेडीयम क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात आनंद दळवीच्या जलद 61 धावांच्या बळावर भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाने राजू भालेकर इलेव्हन संघाचा 33 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा खेळताना भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाने 15 षटकात 4 बाद 125 धावा केल्या. यात आनंद दळवीने 45 चेंडूत 61 धावा करून संघाचा डाव भक्कम केला. रणजीत खिरीदने 20 व अनिरूध्द ओकने 16 धावा करून आनंदला सुरेख साथ दिली. 125 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किरण आढाव , भुषण देशपांडे , अनिरूध्द ओक व विश्वास गवते यांच्या अचूक व आक्रमक गोलंदाजीपुढे राजू भालेकर इलेव्हन संघ 15 षटकात 8 बाद 92 धावांत गारद झाला. किरण आढावने 21 धावांत 3 गडी तर षण देशपांडे व अनिरूध्द ओक यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. 45 चेंडूत 61 धावा करणारा आनंद दळवी सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन- 15 षटकात 4 बाद 125 धावा(आनंद दळवी 61(45), रणजीत खिरीद 20(13), अनिरूध्द ओक 16(14), नितिन सामल 2-25, शाम ओक 1-21, मंदार दळवी 1-22) वि.वि राजू भालेकर इलेव्हन- 15 षटकात 8 बाद 92 धावा(देवेंद्र मेधी 28, श्रीकांत काटे 22, नितिन सामल 16, किरण आढाव 3-21, भुषण देशपांडे 2-14, अनिरूध्द ओक 2-7, विश्वास गवते 1-14) सामनावीर- आनंद दळवी
भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाने 33 धावांनी सामना जिंकला.
कौशल्ये प्रशिक्षणानंतर महिला स्वतःचा ब्रँड निर्माण करू शकतात : डॉ. हर्षा जोशी
अॅक्सिस बँकेने दाखल केले क्विकपे होम लोन
घर ग्राहकांना मोठी बचत करण्याची संधी देणारा या क्षेत्रातील पहिला रिड्युसिंग मंथली इन्स्टॉलमेंट्स प्लान
- सुरचित पद्धतीने दरमहा अधिक मुद्दलाची परतफेड करून ग्राहक व्याजाच्या रकमेत बचत करू शकणार
- क्विकपे होम लोनमुळे, ग्राहकांना 20 वर्षांसाठीच्या, 50 लाख रुपयांच्या कर्जावर 11.7 लाख रुपये वाचवू शकतात
- ईएमआयऐवजी (इक्वेटेज मंथली इन्स्टॉलमेंट्स) ग्राहक रिड्युसिंग मंथली इन्स्टॉलमेंट्स भरणार
मुंबई: अॅक्सिस बँक या भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या खासगी बँकेने ‘क्विकपे होम लोन’ हे या क्षेत्रातील पहिलेवहिले गृहकर्ज दाखल केले असून, या कर्जामुळे घर ग्राहकांना कर्जावरील व्याजाच्या रकमेमध्ये मोठी बचत करणे शक्य होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या क्षेत्रातील चाकोरी मोडून, क्विकपे होम लोन परतफेडीचे पर्यायी नियोजन देणार असून, त्यामध्ये ग्राहकांना बाकी असलेल्या बॅलन्सवरील व्याजासह, समान रकमेची मुद्दल फेडायची असेल. त्यामुळे, इक्वेटेड प्रिन्सिपल रक्कम व रिड्युसिंग इंटरेस्ट रक्कम यातून रिड्युसिंग मंथली इन्स्टॉलमेंट्स तयार होईल. परिणामी, गृहकर्जाच्या संपूर्ण कालावधी भराव्या लागणाऱ्या एकूण व्याजाच्या रकमेमध्ये घट होईल आणि त्याचा फायदा ग्राहकांना मिळेल.
ग्राहक ईएमआयऐवजी (इक्वेटेज मंथली इन्स्टॉलमेंट्स) रिड्युसिंग मंथली इन्स्टॉलमेंट्स भरणार आहेत. सुरुवातीचे इन्स्टॉलमेंट्सअधिक असतील (याच कालावधीच्या, याच कर्जाच्या रकमेवरील ईएमआयपेक्षा), पण कर्जाच्या संपूर्ण कालावधीदरम्यान इन्स्टॉलमेंटची रक्कम कमी होत जाईल.
यानिमित्त बोलताना, अॅक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक (रिटेल बँकिंग) राजीव आनंद यांनी सांगितले, “ग्राहकांच्या फायद्याच्या दृष्टीने आम्ही क्विकपे होम लोन हे नावीन्यपूर्ण उत्पादन दाखल केले असून, त्यामुळे ग्राहकांवरील एकंदर व्याजाचा भार कमी होणार आहे.‘रिड्युसिंग मंथली इन्स्टॉलमेंट्स’ ही विशेष संकल्पना आणि व्याजावर मोठी बचत, यामुळे घर ग्राहकांना निश्चत आकृष्ट केले जाईल.”
हे उत्पादन अधिक स्पष्ट करण्यासाठी, 50 लाख रुपयांच्या, 20 वर्षे कालावधीच्या व वार्षिक व्याजदर 9.00% असणाऱ्या एका गृहकर्जाचे उदाहरण घेऊ. ग्राहकांना या कर्जासाठी 20 वर्षांमध्ये एकूण 57.96 लाख रुपये व्याज भरावे लागेल. परंतु, अॅक्सिस बँकेच्या क्विकपे होम लोनसाठी, 50 लाख रुपयांच्या, याच कालावधीसाठीच्या व 9.20% इतका थोडासा अधिक व्याजदर असणाऱ्या कर्जासाठी केवळ 46.19लाख रुपये व्याज भरावे लागेल व त्यामुळे ग्राहकांना व्याजामध्ये 11.77 लाख रुपये वाचवता येतील.
महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत याशीना इक्तेरीना, मरियम बोलकवडझ, ची-यु सु यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
- भारताच्या महक जैनचे आव्हान संपुष्टात
पुणे: डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 18व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीच्या दुसऱ्या फेरीत रशियाच्या याशीना इक्तेरीना, जॉर्जियाच्या मरियम बोलकवडझ, तैपेईच्या ची-यु सु या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत रशियाच्या याशीना इक्तेरीना हिने पाचव्या मानांकित जपानच्या जुनरी नमिगताचा 6-3, 6-1असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. तैपेईच्या ची-यु सु हिने पोलंडच्या सातव्या मानांकित कॅटरझायना पीटरचे आव्हान 6-3, 6-3असे मोडीत काढले. जॉर्जियाच्या मरियम बोलकवडझने सहाव्या मानांकित युक्रेनच्या व्हॅलेरिया स्ट्राकोवाचा टायब्रेकमध्ये 6-1, 6-7(2), 6-4असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत मारली. चीनच्या अव्वल मानांकित जिया-जिंग लू हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या महक जैनचा6-3, 7-5असा पराभव करून आगेकूच केली. चुरशीच्या झालेल्या लढतीत चौथ्या मानांकित लातवियाच्या डायना मर्सीकेविचा
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी
जिया-जिंग लू(चीन)(1)वि.वि.
डायना मर्सीकेविचा(लातविया)(4)
मरिना मेलनिकोवा(रशिया)वि.वि.
याशीना इक्तेरीना(रशिया)वि.वि.
व्हॅलेरिया सवयिंख(रशिया)वि.वि.
कॅटरझायना कावा(पोलंड)(3)वि.वि.
ची-यु सु(तैपेई)वि.वि.कॅटरझायना
मरियम बोलकवडझ(जॉर्जिया)वि.वि.
दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी:
बेरफू सेंगीज(टर्की)/जेस्सी रॉ
पोलीना लेकीना(रशिया)/डायना मर्
शेरॉन फिचमन(कॅनडा)/व्हॅलेरिया
बिट्राईस गुमूल्या(इंडोनेशिया)/
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी सुधारित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीस शासनाची अंतिम मान्यता
पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी (पीएमआरडीए ) ‘सुधारित विकास नियंत्रण व प्रोत्साहन
नियमावली’स शासनाची अंतिम मान्यता मिळाली असून दि.११/१२/२०१८ रोजी महाराष्ट्र शासनाच्या
नगरविकास विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नेमके यात हे आहेत प्रमुख मुद्दे …
1. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण रिंग रोड सह प्रादेशिक योजना आराखड्यातील रस्त्यांचा
भूसंपादनासाठी TDR संकल्पना; प्रादेशिक योजनेसाठी TDR लागू करण्याची राज्यातील पहिलीच
घटना.
2. सर्वांसाठी घरे (Inclusive Housing) बद्दलची नियमावली लागू; पुणे महानगर पालिका व पिंपरी
चिंचवड महानगर पालिका हद्दीपासून १० कि.मी. अंतरापर्यंत १०,००० चौ.मी. पेक्षा अधिक
क्षेत्रासाठी Inclusive Housing बंधनकारक; २०% बांधीव क्षेत्र आरक्षित.
3. ०.२ हे. (२०००.०० चौमी.) पेक्षा कमी क्षेत्राच्या मिळकती विकसनक्षम होणार; लहान भूखंडावरील
अन्याय दूर होणार; अशा मिळकतीवर FSI ०.७५ मर्यादित होऊन विकास शक्य; मागील २०
वर्षापासून प्रलंबित बाब मार्गी लागणार.
4. पुणे महानगर पालिका व पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीपासून ५.०० कि.मी. अंतरापर्यंत
औद्योगिक वापर अनुज्ञेय होणार; पर्यायाने शहरांच्या / वस्त्यांच्या जवळपास उद्योगांची उभारणी
शक्य होणार. मागील २० वर्षांपासून सदरची बाब प्रलंबित होती.
5. शासनाच्या Flagship Program PMAY ला चालना देणेसाठी सवलतीची N A Primium आकारणी;
सदरची आकारणी ३०% वरून केवळ १०% दराने होणार.
6. शहराची गरज विचारात घेऊन Working Women व Students Hostel साठी विशेष तरतूद.
7. बांधकाम क्षेत्रात Ease of Doing Business संकल्प साध्य करण्यासाठी Plinth Checking व भोगवटा
पत्र अदा करणेची कालमर्यादा 7 व ८ दिवसांची राहील. (पूर्वी ती १५ व २१ दिवस अशी होती.)
8. विविध रुंदीच्या रस्त्यांच्या सर्वसमावेशक वापराचा विकास होणेच्या दृष्टीने (Eg. NMT) रस्त्यांचे
प्रमाणीकरण समाविष्ट करणेत आले आहे; त्यानुसार विकास बंधनकारक.
9. विकास योजना आराखडा तयार करताना सार्वजनिक वापरासाठी पुरेशा जागा उपलब्ध होणेसाठी
Amenity Space (सुविधा क्षेत्र ) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास वर्ग करणे बंधनकारक. त्या
जगावर आरक्षणे ठेवल्यास विकास योजना अंमलबजावणी शीघ्रतेने होणार.
10. शहरांच्या १० किमी हद्दीमध्ये ७० मी पर्यंत उंच इमारती व १० कि मी बाहेरील क्षेत्रासाठी ३६.००
मी. पर्यंत उंच इमारती अनुज्ञेय करण्यात आल्या आहेत.
11. चटई क्षेत्राची कमाल मर्यादा १.६ (सध्याच्या १.४ वरून) पर्यंत वाढविण्यात आली असून त्यामध्ये
TDR पोटीच्या चटईक्षेत्रास प्राधान्य देण्यात आले आहे.
खासदार संजय काकडेंकडून भाजपला घरचा आहेर (पहा काकडे ,बागवे ,अमराळे,गुजर काय म्हणाले )व्हिडीओ
पुणे- भाजपने मंदिर आणि जातीय समीकरणे सोडून विकासावर बोलले पाहिजे असा घरचा आहेर राज्यसभा सदस्य आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी 5 राज्यातील निवडणूक निकाल लागताना दिला आहे .तर भाजपची फसवेगिरी आणि त्याखाली दडलेला मनुवादी चेहरा उघडा झाल्याने जनतेने त्यांना झिडकारले आहे असे पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी म्हटले आहे .
त्यांनी असे म्हटले आहे कि ,राजस्थान मध्ये भाजपला फटका बसेल हे मला ठाऊक होते पण मध्यप्रदेश मध्ये बसलेला झटका पाहता नक्कीच विचार करण्याची गरज आहे.आणि ३ राज्यात ६५ खासदारांपैकी ६२ खासदार भाजपचे असताना अशी राज्ये भाजपच्या हातून निसटत असतील तर नक्कीच हि धोक्याची घंटा आहे.आतापर्यंत भाजपने सुरु ठेवलेल्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत ,ती म्हणजे जातीय समीकरणे,किंवा मंदिर ,मस्जिद ,नामकरण ,पुतळे,हे सर्व सोडून २०१४ साली नरेंद्र मोदींनी जो विकासाचा नारा दिला होता ,त्याबद्दल बोलले पाहिजे . छत्तीसगड आणि राजस्थान भाजपच्या हातून जाईल हे ठाऊक होते पण मध्यप्रदेशची पीछेहाट पाहता विचार केला पाहिजे असे काकडे यांनी म्हटले आहे.
पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी , भाजपचा मनुवादी चेहरा लोकांसमोर उघडा झाल्याने आणि भाजपने निव्वळ भूलथापा दिल्याचे लक्षात आल्याने कॉंग्रेस शिवाय पर्याय नसल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे असे म्हटले आहे .
तर या शिवाय व्यापारीसेलचे अध्यक्ष बाळासाहेब अमराळे यांनी जीएसटी आणि नोटबंदी ने व्यापाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागला . आणि तो सहन करूनही प्रत्यक्षात फायदे काहीच दिसून आले नाही याचा फटका भाजपला बसला . खोटे बोल आणि रेटून बोल हि भाजपची पद्धत लक्षात आल्याने आता २०१९ मध्ये भाजपला त्याचा फटका बसेलच असेही ते म्हणाले . या शिवाय यावेळी शिरूर कॉंग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ गुजर यांनी हि आपल्या भावना व्यक्त केल्या …. पहा आणि ऐका ..नेमके कोण काय म्हणाले …
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील स्टेनो विकास देसाईंचे वॉटर पोलो क्रीडा प्रकारात महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात योगदान
पुणे- अखिल भारतीय नागरी सेवा जलतरण स्पर्धा 2018-19 या स्पर्धेत विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास देसाई यांनी महाराष्ट्र संघाबरोबर वॉटर पोलो क्रीडा प्रकारात अंतिम सामन्यामध्ये केंद्रीय सचिवालय, नवी दिल्ली संघाचा 10/5 गुणांच्या फरकाने धुव्वा उडवून महाराष्ट्र संघाला विजेतेपद मिळवून दिले.
गांधीनगर,गुजरात येथे दि.27 नोव्हेंबर, ते 29 नोव्हेंबर,2018 मध्ये झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेंतर्गत अखिल भारतीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा सहभाग होता. महाराष्ट्राच्या संघामध्ये विकास देसाई यांची निवड झाली होती. त्यामध्ये या संघाने विजय प्राप्त केला. विकास देसाई यांनी वॉटर पोलो क्रीडा प्रकारा शिवाय 50 मी. ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात रौप्यपदक व 4 बाय 100 मिडले प्रकारात कास्यपदक मिळविले. त्यांनी महसूल विभागाच्या होणा-या विभागीय क्रीडा स्पर्धेत तसेच राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेत जलतरण प्रकारात अनेकवेळा सुवर्ण पदके मिळविली आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेवून त्यांना अनेक वेळा गौरविण्यात आले आहे.
त्यांनी आत्तापर्यंत मालवण येथील राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा (3 कि.मी.), संकरॉक टू गेट वे ऑफ इंडिया येथील (5.कि.मी.) स्पर्धेत तसेच गोवा येथील बंबोलीम बिचवर झालेल्या 5 कि.मी.सागरी जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करुन विभागीय आयुक्त कार्यालयाचा नावलौकिक केला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त पुनर्वसन श्री. दीपक नलवडे, उपसचिव तथा प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी श्री. भ.सं.वानखेडे, तहसिलदार श्री.विवेक साळुंके, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी, डॉ जयश्री कटारे, श्री. विकास भालेराव, तहसिलदार, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष श्री.दिपक चव्हाण, पुणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. विनायक राऊत व स्वाती मुरदाळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.





