Home Blog Page 3030

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे यांचा ‘ती & ती’ १ मार्चला होणार प्रदर्शित

0

दोन मुलींच्या मधोमध दिसणारा म्हणजेच ‘ती’ आणि ‘ती’च्या मध्ये अडकलेल्या पुष्कर जोगचा एक फोटो काही दिवसां अगोदर सोशल मिडीयावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत होता. त्या दोन मुली नेमक्या कोण आहेत याचा प्रेक्षकांना अंदाज बांधायला लावणारे पोस्टर पुष्कर जोगच्या ‘ती & ती’ या आगामी मराठी चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर होते. आणि आता त्या दोन मुली कोण या गोष्टीचा खुलासा करण्याची वेळ आली आहे.

आता ‘वेट इज ओव्हर’ असे म्हणत पुष्कर जोगच्या ‘ती & ती’ या चित्रपटाचे आणखी एक नवे कोरे पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रेक्षकांनी जो अंदाच बांधला तो योग्यच होता; या चित्रपटात पुष्कर जोगसोबत सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे या दोघी ‘ती’ आणि ‘ती’ ची भूमिका साकारणार आहेत हे आपण पोस्टरमधून कळते.

आनंद पंडीत यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांनी केले असून अभिनयासोबत पुष्करने या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. पुष्करसह, आनंद पंडीत, मोहन नादर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर मोहित छाब्रा हे सहनिर्माते आहेत.

अर्बन रोमँटिक कॉमेडी असलेल्या ‘ती & ती’ चे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्यामुळे पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांच्या ‘ती & ती’ मधून एका आगळ्या-वेगळ्या-इंटरेस्टिंग आणि मनोरंजक कथेसोबत येत आहे.

आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत १४०० विद्यार्थ्यांचा सहभाग

0

पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी च्या इंग्लिश मिडीयम स्कुल ने आयोजित केलेल्या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत पुण्यातील ३२ शाळातील १४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . इयत्ता पहिली ते दहावी गटात या स्पर्धा झाल्या .

स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार रावसाहेब गुरव यांनी केले . यावेळी संस्थेचे सचिव लतीफ मगदूम ,मुख्याध्यापक रबाब खान ,हेमा जैन ,मुमताज सय्यद उपस्थित होते . लतीफ मगदूम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले . रुमाना शेख यांनी सूत्रसंचालन केले ,झुकिया पटेल यांनी आभार मानले

माझे आवडते खेळणे ,माझ्या स्वप्नातील जग ,मुलगी वाचवा ,सोशल मीडिया चे फायदे ,तंत्रज्ञानाचे तोटे असे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते .

जगातील सर्वात मोठ्या घुमटाला नेपाळच्या शिष्टमंडळाने दिली भेट

0

पुणे: धार्मिक व जातीय संतुलन एकत्रित करण्यासाठी सदभावना व देशातील सर्व धर्मातील लोकांना एकत्रित करण्यासाठी या अशा प्रकारच्या घुमटामुळे फार मोठा उपयोग होणार आहे. याचीच प्रेरणा घेऊन नेपाळमध्ये आम्ही पण अशा प्रकारचे कार्य करण्याचा प्रयत्न करू. असे उद्गार नेपाळच्या प्रदेश एकचे शिक्षण व आरोग्य मंत्री, सांस्कृतीक, युवक कल्याण, सामाजिक न्याय महिला बाल कल्याण मंत्री जीवन घिमिरे यांनी काढले.


नेपाळ येथील सरकारी अधिकार्‍यांच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व राजबाग लोणी काळभोर येथील जगातील सर्वात मोठा घुमट असलेल्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर विश्‍वशांती प्रार्थना सभागृह व विश्‍व शांती ग्रंथालय याला भेट दिली. यावेळी कनकाई नगरपालिकेचे महापौर राजेंद्र पोखरेला बरोबर ८ सदस्यांचा समावेश होता. यामध्ये केबीए ऊर्जाचे एमडी दिपक छपगैरी, आयओसीचे मेंबर राजकुमार कोटले, कंकई वड्रो दोनचे परशूराम गिरे, येनोंगी मेंबर जीबन श्रेष्ठ, डमक एनपी टाक बहाद्दूर थापा व इंजिनियर पवन गिमेरिया यांचा समावेश होता.
जीवन घिमिरे म्हणाले, डॉ. कराड या एकाच व्यक्ती ने जे उभे केले ते त्यांचे मोठे योगदान आहे. याचे उदाहरण आम्ही घेतलेच पाहिजे. त्यांचे व्हिजन उत्तम होते. सदभाव, धार्मिक आणि सहिष्णुता यातून निर्माण होईल. नेपाळमध्ये एक मोठी नदी आहे. तेथे सर्व धर्मांसाठी एकत्रित असे स्फूर्तीस्थान उभे करण्याचा आमचा मानस आहे.
शेजारधर्म निभावताना डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी यापूर्वी काठमांडू नगरपलिका हद्दीत भूकंपग्रस्तांसाठी ज्ञानेश्‍वर, तुकाराम व विवेकानंद यांच्या नावाने १२० घरे बांधून दिली आहेत. तेथे आमचे राज्य सरकार काही विकासात्मक सुधारणा करणार आहे. त्या विकास कार्यासाठी प्रा.डॉ.विश्‍वनाथ कराड यांचे मोलाचे योगदान असावे.
कनकाई नगरपालिकेचे महापौर राजेंद्र पोखरेला म्हणाले, डॉ. कराडांची दुरदृष्टी एकमेवाद्वितीय आहे. त्यांना देवाने एक विलक्षण शक्ती दिली आहे. म्हणूनच त्यांनी जगातले हे आठवे आश्‍चर्य उभे केले आहे. मानवता ही वास्तविक सर्वात मोठी गोष्ट आहे. मानवतेची सेवा हे सर्वात मोठे कार्य आहे. या अद्वितीय घुमटाच्या माध्यमातूत सर्व धर्म समभाव व मानवतेचा संदेश जगाला दिला जाईल.
तसेच, त्यांनी डॉ. कराड यांना विनंती केली की नेपाळ येथे उच्च तंत्रशिक्षण विद्यापीठ स्थापनेसाठी त्यांनी योग्य ते सहकार्य करावे.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत केले. या प्रसंगी शिष्टमंडळाला विश्‍वशांती केंद्राचे सल्लागार, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण यांनी विश्‍वशांती केंद्राच्या कार्याची माहिती दिली. तसेच, मिटसॉटचे प्रकल्प संचालक डॉ.मिलिंद पाडे यांनी डोम संदर्भातील विस्तृत माहिती दिली. यावेळी पर्यावरण शांती सूरज गायकवाड , राजेंद्र रणभोर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बजाज ऑटोने लाँच केली नवीन प्लॅटीना 110

0

बजाज ऑटो ही भारतातील अग्रगण्य अशा ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये गणली जात असून त्यांनी ग्राहकांच्या आरामदायक सफरीकरिता नव्या प्लॅटीना 110चा शुभारंभ केला आहे. नवीन प्लॅटीना 110 मध्ये आरामासोबतच वेगाचे गणितही पक्के होते. कारण या क्लासमधील इतर कोणत्याही बाईकच्या तुलनेत नव्या प्लॅटीना 110 मध्ये अधिक क्षमतेचे टॉर्क आहे. ज्यामुळे चढणही सहजतेने पार करता येते. सर्वोत्तम आराम आणि कामगिरी सोबतच या स्टाईलिश बाईकमध्ये अतिरिक्त सुरक्षाही समाविष्ट आहे.

नवीन प्लॅटीना 110 ही याप्रकारच्या श्रेणीमधील पहिली अशी बाईक आहे, ज्यामध्ये स्टँडर्ड अँटी-स्किड ब्रेक्स बसविण्यात आले आहेत. अँटी-स्किड ब्रेकिंग दोन्ही चाकांवर अधिक चांगला ब्रेक फोर्स देत असल्याने सर्वप्रकारच्या सफरींमध्ये आणि वेगात प्रवास अधिक सुरक्षित होतो.

प्लॅटीना 100 ईएसला यापूर्वीच या श्रेणीतील सर्वात आरामदायक प्रकारात येणारी बाईक म्हणून गौरविण्यात आले आहे, ज्यामध्ये 20% नी कमी झटके बसतात. नवीन प्लॅटीना 110 अधिक आरामदायक आहे: ज्यामध्ये सर्वप्रकारच्या रस्त्यांसाठी फर्स्ट-इन-क्लास स्प्रिंग-ऑन-स्प्रिंग सस्पेन्शन सोबत नायट्रॉक्स गॅस चार्ज्ड शॉक अॅबसॉर्व्हर आहेत. ज्यामुळे रायडर आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायक बनतो. याची सीट लांबलचक असून चांगल्या प्रतीच्या अपहॉल्स्ट्री आणि सर्वोत्तम दर्जाच्या फोमने तयार केल्याने ते वायब्रेशनला चांगल्या पद्धतीने शोषून घेते.

नवीन प्लॅटीना 110 ट्यूबलेस टायर्ससोबत येते, जे एक स्टँडर्ड फिटमेंट आहे. हे टायर्स देखील सर्वात मोठे आणि जाडे, 100 सीसी सेगमेंटमध्ये येतात. ज्यामुळे रायडरला कठीण रस्त्यांवर सर्वोत्तम आरामदायक सफर करता येते, सोबतच वजनही सुलभतेने न्यायला मदत होते.

खासदार काकडेंचा अघोषित बहिष्कार ? की, ‘काळाच्या उलट्या पावलांची चाहूल ‘ ?

पुणे- आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने राजकीय प्रचाराचा धुराळा उडविण्यासाठी भूमिपूजनांची मोहीम सुरु केली असली तरी या मोहिमेच्या प्रारंभीच..शिवसेनेचा बहिष्कार आणि पुण्यातील पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास  खासदार काकडे यांच्या  अनुपस्थितीने..म्हणजेच जणू  ‘अघोषित बहिष्कार’  पाहून ‘काळाच्या उलट्या पावलांची चाहूल ‘ अजूनही भाजपने समजावून घ्यावी असं मत व्यक्त करायला राजकीय समीक्षकांनी सुरुवात केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो ३ मार्गिकेचे आज (मंगळवार) भूमिपूजन झाले. मात्र,या कार्यक्रमातच आगामी निवडणुकीच्या राजकारणात भाजपच्या ‘ काळाच्या उलट्या पावलांची चाहूलं’  समीक्षकांना जाणवली . पहिल्यांदा महापौर टिळकांना त्यांचे नाव पत्रिकेत न छापता अवमानाला सामोरे जावे लागल्याची घटना सामोर येते ना येते तोच , पुण्यातील महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी ज्यांचं मुख्य सहाय्य घेतलं गेलं आणि त्यानंतर  ज्यांचा पुण्याचे दुसरे सुरेशभाई असा  पुण्यातील राजकारणात उल्लेख होऊ लागला त्या  ,राज्यसभा सदस्य असलेल्या भाजपचे  सहयोगी खासदार  संजय काकडे यांचे नाव देखील निमंत्रण पत्रिकेतून वगळल्याने ,त्यांची नाराजी त्यांच्या अनुपस्थितीतून स्पष्ट दिसून आली .  त्यांची ही नाराजी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या पथ्यावर पडून आगामी काळात भाजपची उलटी गणती सुरु  होऊन भाजपला मोठा झटका बसू शकतो असा राजकीय समीक्षकांचा दावा आहे. भाजपने काकडे यांना ‘सबसे बडा खिलाडी ‘ बनण्यापासून रोखण्याची प्रक्रिया सुरु ठेवली असताना पुण्याने आम्हाला तसं काही दिलं नाही सांगणारे शरद पवार हे आपल्या दुसऱ्या ‘खिलाडी’ ची निर्मिती करू शकतात याकडे लक्ष वेधले जाते आहे .

दरम्यान अगदी ‘कोती’ बुद्धी ठेऊनच ..राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले गेले नव्हते. त्यामुळे तेही या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने याचा निषेध केला आणि कार्यक्रमावर बहिष्कार टाकला . या पूर्वीच्या पुण्यातील पंतप्रधानांच्या कार्यक्रमात शिवसेनेचे मंत्री शिवतारे यांना डावलण्याचा प्रयत्न झाला तेव्हा त्यांनी ..बापटांची चरबी उतरवू .. अशी भाषा करत दम भरला होता . हा मागचा अनुभव असतानाही मुंबईतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या नेत्यांना निमंत्रण नसल्याने नाराजी असल्याचे वृत्त होते.पुण्यातही शिवसेनेने मोदी यांच्या कार्यक्रमावर आज बहिष्कार घातला .5 राज्यातील निवडणुकांचा कौल लक्षात घेऊन देखील भाजपची सुरु असलेली हि वाटचाल पायावर धोंडा पडून घेणारी ठरेल असा अनेकांचा दावा आहे .

डॉ. अनील अवचट , डॉ. आनंद नाडकर्णी करणार मनुष्यबळ विकास व्यवस्थापकांना मार्गदर्शन

0
पुणे :पुण्याच्या कार्पोरेट जगतातील मनुष्यबळ विकास व्यवस्थापकांची शिखर संस्था असलेल्या ‘ ओन्ली एच आर ‘ संस्थेचा  पाचवा वर्धापनदिन २७ डिसेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते , लेखक डॉ. अनील अवचट , डॉ. आनंद नाडकर्णी  मनुष्यबळ विकास  व्यवस्थापकांना मार्गदर्शन करणार आहेत.
हा कार्यक्रम २७ डिसेंबर रोजी, नेहरू सभागृह, (घोले रस्ता ) येथे  सायंकाळी  वाजता होईल, अशी माहिती ‘ ओन्ली एच आर ‘ संस्थेचे अध्यक्ष सुधीर फाटक, सचिव प्रशांत इथापे, खजिनदार जितेंद्र पेंडसे यांनी पत्रकाद्वारे दिली.
पुण्याच्या कार्पोरेट जगतात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या  मनुष्यबळ विकास  व्यवस्थापकांचा सत्कार ‘ एचआर प्रोफेशनल अवार्ड  देऊन यावेळी  डॉ. अनिल अवचट, डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे.
‘ संतांचे मानसशास्त्र ‘ या विषयावर डॉ. आनंद नाडकर्णी हे या कार्यक्रमात व्याख्यान देणार आहेत.

नैतिकता हेच टाटांच्या यशाचे गमक : प्रदीप भार्गव

0

पुणे : विनम्रता,साधेपणा, सामाजिक बांधिलकी आणि नैतिकता या जोरावरच जेआरडी. टाटा यांनी विश्वव्यापी उद्योगसमूह   वृद्धिंगत केला. असे मत मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे  अध्यक्ष प्रदीप भार्गव यांनी  व्यक्त केले. टाटा यांच्या स्मृतिदिनानिमित्त घोले रोड येथील महात्मा फुले वास्तुसंग्रहालयात ‘टाटा एडमारर’ ग्रुप च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट,  खासदार अमर साबळे,  किर्लोस्कर इंजिन ऑइलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र देशपांडे, माजी पोलीस महासंचालक अशोक धिवरे,यांच्यासह  ‘टेल्को’ मधील निवृत्त कर्मचारी यावेळी  उपस्थित होते.

प्रदीप भार्गव यांनी आपल्या भाषणात भारतीय उद्योग आणि औद्योगिक नीतिमत्ता याविषयी भाष्य केले. त्यात टाटा उद्योग आणि ओद्योगिक समूह आणि किर्लोस्कर या दोन उद्योगसमूहातील सामाजिक बांधिलकी व नीतिमत्ता या मुद्द्यांचा परामर्ष घेतला. यावेळी ते म्हणाले, मी माझी अभियंत्याची पदवी ‘इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेमधून घेतली आहे. ही संस्था स्थापन करण्यापाठीमागे टाटांच्या मोठा वाटा होता. जे आर डी टाटा या संस्थेच्या कारभारात स्वतः लक्ष घालत असत. माझ्या विद्यार्थी दशेत जेआरडी टाटांनी काही वेळा जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला जे.आर.डी टाटा यांची नम्रता आणि साधेपणाचे दर्शन घडले. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हेच पैलू टाटा उद्योग समूहाच्या नैतिक तत्वामध्ये दिसून येते असे भार्गव म्हणाले.  हरित ऊर्जा संबंधी बोलताना महाराष्ट्रातील लोडशेडिंग बंद करण्यासाठी केले गेलेले प्रयत्न व त्यामध्ये किर्लोस्कर व टाटा समूह यांनी  फायद्या तोट्याचा विचार न करता केलेल्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला.

टेल्कोतल्या अनुभवाविषयी बोलताना पालकमंत्री बापट म्हणाले, टेल्कोमध्ये मला खूप शिकायला मिळालं. मंत्र्यांनी आपल्या कामकाजात कसं पुढं जावं आणि आपली वागणूक किती नम्रतेची असावी याच शिक्षण मला टेल्कोमध्ये मिळाले. टेल्को माझ्या जीवनातून वजा केल्यास मी शून्य आहे. टेल्कोमध्ये मी कार्डेक्समध्ये काम करायचो. तेथे प्रत्येक वस्तूला कोड नंबर होता. त्यामुळे कार्डाप्रमाणे कोड नंबर पाठ होते. त्या पाठांतराची सवय लागली. जशी वस्तू कार्ड वाचून आम्ही ओळखु लागलो तसा समाजात फिरताना माणस वाचून त्यांची नावं ओळखू लागलो. ‘टेल्को’मधल्या उपहार गृहात अधिकाऱ्यांपासून कामगारापर्यंत सर्वांना एकाच ठिकाणी नाष्टा करावा लागत असे. ते ही नाष्टा घेण्यापासून ताट ठेवण्यापर्यंत सर्व कामे स्वतःला करावी लागत हीच सवय आम्हाला लागली. आज मंत्री म्हणून मी समाजात वावरत असताना एखाद्या कार्यक्रमात गेलो कोणी चटणी भाकरी खात असेल तर ती चटणी भाकरी हातात घेऊन मी खातो. टेल्को मध्ये काम केल्यानंतर सामान्य माणसांच्यात काम करताना माझी निर्णय घेण्याची क्षमता वाढली. यावेळी काम करताना त्या शिफ्ट मधील काम त्याच वेळी पूर्ण करावे लागत होते. या सवयी मुळे आज मंत्री म्हणून काम करताना काम प्रलंबित न ठेवता ज्या त्या दिवशी त्या कामाचा निपटारा करण्याची  म्हणजेच झिरो पेंडंसीची सवय लागली.

सत्तेत आल्यानंतर राज्यात आम्ही अनेक महत्त्वाच्या विषयावर काम करत आहोत. शेती आणि औद्योगिकरण हे त्यातील दोन महत्वाचे विषय आहेत. सरकार म्हणून या दोन विषयात लक्ष घालत आहोत. आज देशात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. मुख्यमंत्री तसेच उद्योग मंत्र्यांच्या प्रयत्नातून राज्य औद्योगिकरणामध्ये प्रगती करत आहे. त्यांच्या प्रयत्नांना प्रदीप भार्गव व राजेंद्र देशपांडे यांच्यासारख्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी ही असे कार्यक्रम करणे आवश्यक आहे. असेही श्री बापट म्हणाले.

कामगार आणि व्यवस्थापन यांच्या मधील संबंध या विषयावर बोलताना राजेंद्र देशपांडे यांनी कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यातील समन्वय साधने आवश्यक असते. मत व्यक्त केले. पाहुण्यांचे स्वागत  बाबा राणे यांनी केले.सूत्र संचालन सुनील शिरोडकर यांनी तर आभार प्रदर्शन आणि समारोप श्रीकांत देव यांनी केले.

पुणे शहराला स्वच्छ भारत सर्वेक्षणात प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी जनतेने सहकार्य करावे- ज्ञानेश्वर मोळक

पुणे – गेल्या चार वर्षापासून केंद्र सरकार स्वच्छ सर्वेक्षणाद्वारे देशातील शहरांमध्ये स्वच्छता अभियानांतर्गंत स्पर्धा घेत असून, 2019 च्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे शहराला प्रथम क्रमांक प्राप्त करुन देण्यासाठी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी जनतेने सहकार्या करावे, असे आवाहन पुणे महानगर पालिका घन कचरा व्यवस्था विभागचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी केले.

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुणे येथील रीजनल आऊरिंच ब्युरो द्वारे हडपसर, पुणे येथील साधना विद्यालयात आयोजित स्वच्छ भारत अभियान शहरी  विशेष जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी पुणे महानगर पालिका सहायक आयुक्त सुनील यादव, साधना विद्यालयाचे प्राचार्य अजित अभंग, आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाडके आणि फिल्ड आऊटरिच ब्युरोचे क्षेत्रीय अधिकारी माधव जायभाये, महानगरपालिकेचे अधिकारी , कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी  आदि उपस्थित होते.

मोळक पुढे म्हणाले की, पुणे शहरात जवळपास 2 हजार 200 मेट्रीक टन घणकचरा गोळा होतो, या कचऱ्याचे वर्गिकरण करुन आलो कचरा आणि सुका कचरा वेगळा करण्यात येत आहे, शहरातील जनतेने कचऱ्याच्या वर्गिकरणाबरोबरच प्लॉस्टीकचा वापर करने पुर्णपणे बंद करुन पर्यावरणाबरोबरच जीवनमान सुधारण्यासाठी सहकार्य करावे असे ते म्हणाले.

मुख्य कार्यक्रमापुर्वी हडपसर परिसरातून विद्यार्थींची स्वच्छ भारत संकल्पनेवर अधारित एक जनजागरण रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी  हातात फलक आणि ढोल ताशाच्या गजरात आपले शहर स्वच्छ व सूंदर ठेवण्याबरोबरच प्लॉस्टीक मुक्ती शहर, नद्यांचे प्रदूषण थांबवा, झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचओ बेटी पढावचा संदेश देत एक वातावरण निर्मिती केली.

रीजनल आऊटरीच ब्यूरोद्वारा आयोजित गीत व नाटक विभागाने सांस्कृतिक कार्यकरमातून आरोग्य आणि स्वच्छतेचा संदेश दिला. साधना विद्यालयाच्या विद्यार्थींनी स्वच्छ भारत – सूदर भारत व बेटी बचाओ बेटी पढाओ अशी दोन पथनाट्य सादर करुन उपस्थितांमध्ये  एक जागरुती निर्माण करत शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमापुर्वी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानावर अधारित चित्रकला स्पर्धेतील विजेत्या  स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेला साधना विद्यालय मुले आणि मुली अशा दोन शाळांमधून जवळपास 1 हजार 500 विद्यार्थांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव जायभाये यांनी केले यावेळी त्यांनी या कार्यक्रमाची रुपरेशा विषद करुन केंद्र सरकारद्वारे घेण्यात येत असलेल्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती दिली.

नवभारताच्या निर्माणात पुण्यासह महाराष्ट्राचे मोठे योगदान असेल- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

पुणे : पायाभूत सुविधांबरोबरच नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येत आहे. माहिती तंत्रज्ञानाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराला मेट्रो रेल्वेची सुविधा उपलब्ध होणार असल्याने भविष्यात हे शहर जागतिक स्तरावर ओळखले जाईल. मेट्रो देशातील शहरांची “जीवन वाहिनी” बनत असून ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे केंद्र हीच नव्या भारताची ओळख असणार आहे. या नवभारताच्या निर्माणात महाराष्ट्र आणि पुण्याचे मोठे योगदान असेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला.

महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मैदानावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो लाईन-३चे भूमीपूजन आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, खासदार अनिल शिरोळे, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, पुणे शहराची ओळख सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहर अशी असून माहिती तंत्रज्ञानच्या क्षेत्रातही पुण्याने मोठी प्रगती केली आहे. हिंजवडी हे माहिती तंत्रज्ञानाचे हब असून या‍‍ ठिकाणी काम करणाऱ्या लोकांनी देशाला नवी ओळख दिली आहे. या ठिकाणी होत असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे या ठिकाणी काम करत असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवकांसाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे. या मेट्रो मार्गामुळे वाहतुकीचा आणि प्रगतीचा वेग वाढणार आहे.

पुण्यातील पहिल्या दोन टप्प्यातील मेट्रोचे काम वेगाने सुरू असून पुढच्यावर्षी १२ किलोमीटरपर्यंत मेट्रो पुण्यात धावेल. पायाभूत सुविधांच्या विकासावर केंद्राचे आणि राज्याचे विशेष लक्ष आहे. देशातील गावे-शहरे एकमेकांना जोडण्याचे काम सुरू आहे. देशाच्या कोणत्याही भागात फिरताना या कामाचा वेग सहज लक्षात येईल.

विकासाच्या महामार्गापासून कोणीही वंचित राहू इच्छित नाही. त्यासाठी देशभरातील अनेक शहरांतून मेट्रोचे प्रस्ताव केंद्राकडे आले आहेत. देशात ५०० किलोमीटरचे मेट्रोचे काम पूर्ण झाले असून ६५० किलोमीटरचे काम प्रगतीपथावर आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात मेट्रोची सुरूवात झाली. त्यांच्या काळातच दिल्लीच्या मेट्रोचे काम पूर्ण झाले.

गावांपासून शहरांपर्यंत पायाभूत सुविधांवर भर देण्याचे सरकारचे धोरण आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी धोरणाचा पुरस्कार केंद्राने केला असून त्यामाध्यमातून देशातील पहिला मेट्रो प्रकल्प पुण्यात साकारत आहे. या नव्या धोरणामुळे मेट्रोच्या विकासाला गती मिळणार आहे. मेट्रो-रेल्वेचे चांगले धोरण केंद्र सरकारने विकसीत केले असून केंद्राच्या आणि राज्याच्या व्यापक दृष्टीचा हा परिणाम आहे.

“इज ऑफ लिव्हिंग आणि इज ऑफ डुईंग” हे केंद्र सरकारचे धोरण असल्याचे सांगत श्री. मोदी पुढे म्हणाले, पुण्यासह महाराष्ट्रातील ९ शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत १५०० कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले असून ३५०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. त्याच बरोबर देशात स्वच्छता आणि गरिबांना घरे देण्याबाबत मोठे काम सूरू असून रस्ते, वीज आणि पाणी यांच्याशी निगडीत अनेक प्रकल्प सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सामान्य लोकांना सरकारच्या सेवा वेगाने आणि चांगल्या प्रकारे उपलब्ध होण्यासाठी डिजीटल इंडियाचे काम सुरु आहे. या माध्यमातून देशातील गावे ऑप्टिकल फायबरने जोडली जात आहेत. लोकांसाठी सोपे आणि सुलभ नियम बनिवण्याचे सरकारचे धोरण आहे. नवे तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्यात स्वस्त मोबाईल आणि स्वस्त इंटरनेट डेटाचा मोठा वाटा आहे. जगातला सर्वाधिक मोबाईल बनविणारा दुसरा देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने गेल्या साडेचार वर्षात डिजीटल व्यवहार सहा पटीने वाढले आहेत. यामुळे लोकांच्या रोजच्या गरजा वेगाने पूर्ण होत आहेत. हार्डवेअर बरोबरच स्वस्त इंटरनेट डेटा लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात १ लाख एलईडी पदपथ दिवे लावण्याचे काम पूर्ण झाले असून या माध्यमातून मोठी विजेची बचत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्याकरिता अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन आज होत आहे. हा सर्वांकरिता आनंदाचा क्षण आहे. आयटी हब असलेले हिंजवडी जगाला मानव संसाधन पुरवते. याच ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाची निर्मिती केली जाते. हा भाग शिवाजीनगरशी मेट्रोच्या माध्यमातून जोडल्या गेल्यामुळे प्रगतीचे नवे दालन खुले झाले आहे. आयटी पार्कमध्ये लाखो लोक कामाच्या निमित्ताने येतात. प्रवासामध्ये त्यांचा वेळ जातो. त्यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

केंद्राच्या नव्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या या नव्या धोरणानुसार सर्वात पहिला मेट्रोचा प्रकल्प पुण्यात होत आहे. याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मेट्रो प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही. तसेच वेळेचे बचत होऊन गतिमानता आणि कार्यक्षमता वाढून देशाचा विकास होईल. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील तसेच देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पुणे  नावलौकिक मिळवेल, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरण (पीएमआरडीए)चे क्षेत्र महाराष्ट्रातील विकासाचे क्षेत्र होईल, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भागात सुरु करण्यात येणाऱ्या रिंग रोड, हायटेक सिटी, इलेक्ट्रिक बसेस आदी प्रकल्पांचा उल्लेख केला.  पीएमआरडीएच्या माध्यमातून तसेच लोकांच्या सहकार्यातून  या भागाचा सुनियोजित विकास साधण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, पुणे शहराबरोबर माझा जवळचा संबंध राहिला आहे. राज्यातीलच नव्हे तर देशातले सर्वात प्रगतशील शहर म्हणून पुण्याचा विकास होत आहे. पुणे ही सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी आहे. स्मार्ट सिटी आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे काम चांगले सुरू आहे.

पालकमंत्री गिरीश बापट  म्हणाले, कमी कालावधीत पुण्यात मेट्रोच्या कामाला गती मिळाली आहे. पुणे मेट्रो लाईन-३ मुळे हिंजवडीच्या आयटी पार्क मधील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांनां मोठा लाभ होणार आहे. या मेट्रोच्या कामामुळे प्रवासाला गती मिळणार आहे. हिंजवडी मेट्रोचा विस्तार वाढत राहणार असून शिवाजीनगर पर्यंतची ही मेट्रो हडपसर पर्यंत नेण्याची आवश्यकता आहे. पुण्याच्या विकासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी पुणे शहरासाठी आला आहे. स्मार्ट सिटी, जायका, मेट्रो यांसारखे मोठे प्रकल्पाबरोबर १६ हजार कोटी रुपयांचा राष्ट्रीय महामार्गाची कामे होणार आहेत. लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाबरोबच पुरंदर येथील विमानतळाच्या कामालाही गती मिळत आहे.

सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाला विजेतेपद

0

पुणे- पुणे जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या तर्फे आयोजित सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाने आर्या स्पोर्ट संघाचा 10 गडी राखून दणदणीत पराभव करत सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे विजेतेपद पटकावले. 

लिजेन्डस् क्रिकेट क्लब, मुंढवा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या लढतीत आसिफ शेखच्या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या बळावर पै. सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाने आर्या स्पोर्ट संघाचा 10 गडी राखून दणदणीत पराभव करत विजेतेपद पटकावले. नाणेफेक जिंकुन  पै. सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाने पहिले क्षेत्ररक्षण स्विकारले. पहिल्यांदा खेळताना आसिफ शेखच्या अचूक गोलंदाजीने आर्या स्पोर्ट शिवसैनिक संघाचा डाव 6 षटकात 2 बाद 47 धावांत रोखला. यात बालाजी पवारने नाबाद 19 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 47 धावांचे लक्ष  आसिफ शेखच्या  नाबाद 34 व स्वप्निल सातवच्या नाबाद 10 धावांच्या जोरावर पै. सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाने एकही गडी न गमावता केवळ 3.5 षटकात 48 धावांसह सहज पुर्ण करत विजेतेपद पटकावले. अष्टपैलु कामगिरी करणारा आसिफ शेख सामनावीर ठरला. 

रोहीत पवार यांनी सृजन या अंतर्गत सुरु केलेले स्तुत्य असुन समाजाला दिशा देणारे आहेत, सामाजीक बांधीलकी जपताना रोहीत पवार सर्व घटकांना न्याय देत आहेत असे उद्गार सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनी काढले. या अंतिम सामन्याला 9 हजार पेक्षा जास्त क्रिकेटप्रेमी पुणेकरांचा प्रतिसाद लाभला.

स्पर्धेतील विजेत्या पै. सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाला 5 लाख रुपये व करंडक तर उपविजेत्या आर्या स्पोर्ट संघाला 2 लाख 50 हजार रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे आयोजक व पुणे जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार, बॉलिवुडस्टार रितेश देशमुख,खा.सुप्रिया ताई सुळे,मा. विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, आमदार डॉ.विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  लिजेंड्स क्रिकेट क्लबचे कैलास कोद्रे, मा.आमदार अशोक बाप्पू पवार, माजी आमदार बाप्पूसाहेब पठारे,प्रदेश उपाध्यक्ष रा.काँ.पार्टी सुरेश आण्णा घुले,प्रदेश उपाध्यक्ष रा.काँ.यु.अतुल बेनके,पुणे जि. म. स. बँक उपाध्यक्ष अर्चनाताई घारे, पुणे जि.प उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील ,जि. प.सदस्य अभिजित तंबीले,जि.प.सदस्य शंकर मांडेकर,जि. प.सदस्य मोहित ढमाले, नगरसेवक योगेश ससाणे,हाजिगफूर पठाण ,अशोक कांबळे, भैय्यासाहेब जाधव,हेमलताताई मगर,पूजा ताई कोद्रे, कॅन्टोनमेंटचे अध्यक्ष भोलासिंग अरोरा,फहिम शेख, हडपसरचे अध्यक्ष नारायण लोणकर,अतुल तरवडे, शिवाजीनगर अध्यक्ष निलेश निकम,अनिस सुंडके, रुपालीताई चाकणकर, मनाली भिलारे, मिलिंद बालवडकर, संदीप बालवडकर,कुणाल वेडेपाटील, निलेश नगर, संदिप कोद्रे,तेजस कोद्रे, धीरज जाधव,शैलेश लडकत, स्मिता लडकत, सुनील चांदेरे व अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट चे राजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे समालोचन नरेश ढोमे, ज्ञानेश्वर जगताप यांनी केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम फेरी   
आर्या स्पोर्ट – 6 षटकात 2 बाद 47 धावा (बालाजी पवार नाबाद 19, वौभव पांडूले नाबाद 11, आसिफ शेख 1-4) पराभूत वि  पै. सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली – 3.5 षटकात बिनबाद 48 धावा(आसिफ शेख  नाबाद 34, स्वप्निल सातव नाबाद 10) सामनावीर-  आसिफ शेख  

542 अनधिकृत धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी तोडगा काढू -महापौर (व्हिडीओ)

पुणे :  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांवर सुरु केलेल्या कारवाईबाबत महापालिकेच्या मुख्य सभेत आज सर्वपक्षीयांनी नाराजी ,निषेधाचे सूर आळवल्यानंतर १३५ धार्मिक स्थळांना आपण नियमित करून अभय देत आहोत ,६१ धार्मिक स्थळांचे स्थलांतर करून त्यांना नियमित करण्याचा प्रयत्न करत आहोत ,मात्र तरीही ५४२ धार्मिकस्थळे अशी आहेत कि ज्यांना  आपण नियमित  करू शकत नाही , आणि पुणे महापालिकेचे प्रशासन हे त्यांच्या विरोधात नाही पण सर्वोच्च न्यायालयाने हि कारवाई उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली करण्यास आदेश दिल्याने न्यायालय आणि गृह विभाग सातत्याने याबाबत पाठपुरावा करत असल्याने आपणास कारवाई करावी लागते आहे असे आज महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले . त्यानंतर महापौर मुक्ता  टिळकांनी मात्र हे ५४२ धार्मिक स्थळे सुद्धा इतरत्र जागा देवून वसविता येतील काय ? ती वाचविता कशी येतील याबाबत गटनेत्यांची आणि प्रशासनाची एकत्र बैठक आपल्या दालनात घेऊन यावर निर्णय घेवू असे सांगितल्यावर आज मुख्य सभेत या विषयावर पडदा पडला.   

अनधिकृत मंदिरे पाडण्याच्या कार्यवाहीवर भाजपची नाराजी(व्हिडीओ)

पुणे :  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांवर सुरु केलेल्या कारवाईबाबत महापालिकेच्या मुख्य सभेत बोलताना भाजपच्या आरती कोंढरे,धीरज घाटे, आदित्य माळवे,महेश वाबळे ,राजेश येनपुरे आदी नगरसेवकांनी आपापली नाराजी स्पष्ट करत अशा कारवाईचा निषेध केला. यावेळी भाजपचे  नगरसेवक महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे पहा आणि ऐका काय म्हणाले …..

एक मंदिर पाडलं तेव्हा धीरज घाटेंनी मोर्चा काढला होता ..चेतन तुपे पा. (व्हिडीओ)

पुणे :  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांवर सुरु केलेल्या कारवाईबाबत महापालिकेच्या मुख्य सभेत बोलताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे पा. यांनी … पहा आणि ऐका काय म्हटले आहे …

स्पेशल मुलांसाठी फॅशन शो!

0
लिओ क्लब आणि लायन्स क्लब ऑफ जुहूतर्फे स्पेशल मुलांसाठी फॅशन शो हा नवीन उपक्रम आयोजित करण्यात आला होता. स्पेशल मुले आणि युवक हे जुहू येथील लायन्स क्लबच्या अगदी जवळीकतेचा विषय आहेत.
ऑडियोलॉजिस्ट-स्पीच थेरेपिस्ट लायन देवंगी दलाल ह्यांनी हयात रेजेंसी, मुंबई, द्वारे समर्थित या विलक्षण अशा कार्यक्रमाच्या आयोजन आणि अमंलबजावणीची महत्त्वाची धुरा हाती घेतली होती. जोश फाऊंडेशनने पाठबळलेली साधना विद्यालयातील कर्णबधिर मुले, दिलकुश मधील मानसिक अपंग मुले, लिटल एंजेल स्कूलमधील शारीरिक अपंग मुले(खार) एनएबीद्वारा समर्थित अंध मुलींनी आदिती शर्मा, राहुल शर्मा, रिषिना कंधारी, शादाब फरीदी, मनीषा सक्सेना, किरण राजपूत यांसारख्या ख्यातनाम व्यक्ती आणि क्लबच्या सदस्यांबरोबर रॅम्प वॉक केला. ख्यातनाम डिझायनर आशिष ड्वायर याने या  रॅम्प वॉकचे दिग्दर्शन व कपडे डिझाईन केले होते.
“चला त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्याशी निगडित मिथक आणि गैरसमज दूर करूया. त्यांची क्षमता वाढवून त्यांना एक गुणवत्तापूर्ण जीवन देऊया. त्यांच्याकडून जीवन आनंदाने जगण्याचे धडे शिकून त्यांच्यासारखे आव्हानांचा सामना करण्यास शिकूया. ते आपल्या समाजाचा एक भाग आहेत आणि त्यांच्यासाठी चांगले भविष्य निर्माण करण्यासाठी आपण एकत्र येऊ या.” – अध्यक्ष लायन राज वंकावाला , लायन राजेश रसानिया, ममता पारेख आणि ऋषिश शाह.
या स्पेशल मुलांनी सर्व विषमतांचा त्याग केला आहे आणि समाजातील अडथळे व मर्यादा दूर केल्या आहेत. या फॅशन शोद्वारे एक सामाजिक संदेश दिला जाईल जो या विलक्षण मुलांद्वारे परावर्तीत होईल. सेलिब्रिटीज आणि क्लबच्या सदस्यांबरोबर हातात हात घालून रॅम्प वॉक करणारी ही मुले कोनापेक्षाही कमी नसल्याचे हा फॅशन शो पाहिल्यावर जाणवते.
प्रत्येक व्यक्तीत,  मग ती सामान्य असो वा अपंग तिच्यात क्षमता असते. आपल्याला त्यांना फक्त पारखण्याची गरज असते जेणेकरून ते सामान्य व्यक्तींप्रमाणे जगू शकतील. आजच्या जगात नैतिक समर्थन आणि सुरक्षा महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्तीला ‘आपल्यासाठी कोणीतरी आहे. ही भावना अधिक आत्मविश्वास वाढविणारी असते. हीच माझी विचार प्रक्रिया आहे.” – देवंगी दलाल.

मुख्यमंत्र्यांबाबतच्या विधानाने भाजप सदस्य संतापले सुभाष जगतापांवर (व्हिडीओ)

पुणे :  महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांवर सुरु केलेल्या कारवाईबाबत बोलायला उभे राहताच राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी ‘मुख्यमंत्री साईबाबांकडे भिकेचा कटोरा घेऊन गेले होते .. अशा विधानाने आपल्या भाषणाची सुरुवात केली आणि भाजप सदस्यांचा आगडोंब उसळला ..  यांना बाहेर काढा , यांना बोलायला बंदी घाला ,यांना माफी मागायला लावा … अशा विविध मागण्या करत हा संताप त्यांनी व्यक्त केला . मला बोलून द्या, मी माफी मागणार नाही, हि वाक्ये मिडिया मध्ये प्रसिद्ध झालेली आहेत ..असे यावेळी सांगण्याचा प्रयत्न जगताप यांनी केला . पण भाजप सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते . मंदिरांवर कारवाई करण्यापूर्वी ,फुटपाथवर असलेल्या राजकीय पक्षांची कार्यालये देखील हायकोर्टाने काढण्याचे आदेश दिले होते त्याबाबत का बोलत नाहीत असा सवाल यावेळी जगताप यांनी केला . त्यांचे मुख्यमंत्र्यांबाबत चे वाक्य महापौरांनी कामकाजातून वगळले मात्र भाजप सदस्यांनी , जगतापांनी माफी मागितलीच पाहिजे असा आग्रह धरल्याने अखेर त्यांना बोलण्याची संधी काढून घेऊन महापौरांनी पुढील सदस्यास बोलण्यास सांगितले. ..पहा यावेळी कसा झाला महापालिकेच्या मुख्य सभेत गोंधळ ….