पुणे :पुण्याच्या कार्पोरेट जगतातील मनुष्यबळ विकास व्यवस्थापकांची शिखर संस्था असलेल्या ‘ ओन्ली एच आर ‘ संस्थेचा पाचवा वर्धापनदिन २७ डिसेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते , लेखक डॉ. अनील अवचट , डॉ. आनंद नाडकर्णी मनुष्यबळ विकास व्यवस्थापकांना मार्गदर्शन करणार आहेत.
हा कार्यक्रम २७ डिसेंबर रोजी, नेहरू सभागृह, (घोले रस्ता ) येथे सायंकाळी ७ वाजता होईल, अशी माहिती ‘ ओन्ली एच आर ‘ संस्थेचे अध्यक्ष सुधीर फाटक, सचिव प्रशांत इथापे, खजिनदार जितेंद्र पेंडसे यांनी पत्रकाद्वारे दिली.
पुण्याच्या कार्पोरेट जगतात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनुष्यबळ विकास व्यवस्थापकांचा सत्कार ‘ एचआर प्रोफेशनल अवार्ड ‘ देऊन यावेळी डॉ. अनिल अवचट, डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे.
‘ संतांचे मानसशास्त्र ‘ या विषयावर डॉ. आनंद नाडकर्णी हे या कार्यक्रमात व्याख्यान देणार आहेत.