Home Blog Page 3024

बी दे चेंज वॉकथॉन पुण्यात

0

महिलारग्बीटीमच्याकप्तानवाहबिजभरुचा प्रमुखअतिथी

पुणे : आनंद संघाने आपली ५० वर्ष पुर्ण होण्याच्या औचित्यावर ६ जानेवारी रोजी बी द चेंज नावाच्या वॉकथॉनचे आयोजन केले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारती पासुन याची सुरूवात होईल होईल. ग्रामीण वैद्यकीय क्षेत्राचे प्रशिक्षित सर्जन, स्पिरिचुअल डायरेक्टर आनंद संघ डॉ.आदित्य गाइत आणि आरोग्य व वैद्यकीय चिकित्सक डॉ.अमर अगरवाल यांनी आज पत्रकार संघात झालेल्या पत्रकार वार्तेमध्ये याची माहिती दिली, पुढे पत्रकारांशी वार्तालाप करताना  त्यांनी चांगली आणि निरोगी जीवनशैली कशी जपावी यावर देखील भाष्य केले.
यावेळी राष्ट्रीय महिला रग्बी टीमच्या कप्तान वाहबिज भरुचा विशेष अतिथी आणि डॉ नितीन कर्मलकर (उप कुलपती, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी) प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होत्या आणि वॉकथॉनच्या वेळी देखील त्या उपस्थित राहून यात सहभागी होणार आहेत. वॉकेथॉननंतर लगेच आनंद संघातर्फे विनामूल्य योग आणि ध्यान कार्यशाळा अायोजित केली जाईल. भारतात, आनंद संघाची गतिशील शिक्षण केंद्रे आणि ध्यान केंद्रे एनसीआर पुणे, मुंबई, बंगलोर, चेन्नई व इतर शहरात देखील यशस्वीरित्या सुरु आहेत.
“बी द चेंज” शीर्षक असलेले हे वॉकथॉन  आरोग्य आणि निरोगीपणासाठी घेतलेला पुढाकार असून ते “हेल्थ क्वेस्ट २०१९” साठी उचललेले पहिले पाऊल आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात असे म्हटले आहे की ६३ टक्के जागतिक मृत्यु दर हा अस्वस्थ जीवनशैलीमुळे आहे. वॉकेथॉनचा उद्देश आहे शारीरिक क्रियाकलापांना प्रोत्साहन देणे आणि निरोगी जीवनशैली स्वीकारणे. या उद्दीष्ट पूर्ततेसाठी, आनंद संघ २०१९ मध्ये योग, ध्यान, आरोग्य, उपचार, शिक्षण, व्यवसाय अशाकार्यशाळांचेआयोजनकरणारआहे. ज्यातप्रत्येकजणसहभागघेऊशकतो . येथेयोगआणिआधुनिकसंशोधनासएकत्रआणलेजाईल. , यामधुनजमाहोणारेप्रवेशशुल्कहेगरजूंनादानकेलेजाईल. 
याआधी देखील आनंद संघाने वृन्दावनच्या विधवांसाठी अश्याच प्रकारे एका कार्यक्रमाच्या आयोजन केले होते व यातुन मिळालेला निधी त्यांना दान केला होता. 
वॉकथॉनचा उद्देश्य आहे लोकांना चालण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि चांगल्या आरोग्याचे महत्व सांगणे. पुढे  योगा, ध्यान, आरोग्य, शिक्षण अश्या प्रकारच्या वर्कशॉपचे देखील आयोजन करण्यात येईल. परमहंस योगानंद यांच्या प्रेरणेतुन सुरू असलेला आनंद संघाचे पश्चिम योग जगतामध्ये मोठे नाव आहे.

 

शानने गायले ‘वडिल-मुली’च्या नात्याला समर्पित करणारे गाणे !

0

असं म्हटलं जातं, वडिल हे त्यांच्या मुलींचे पहिले मित्र असतात. वडिल मुलींसाठी आदर्श असतात. वडिल-मुलीच्या ह्या सुंदर नात्याला डेडिकेट करणारे गाणे सुप्रसिध्द पार्श्वगायक शानने गायले आहे. शान ह्यांनी गायलेले ‘नो स्मोकिंग पापा’ हे सुंदर गाणे 1 जानेवारी 2019ला लाँच होणार आहे.

व्हिडियो पॅलेसची प्रस्तुती असलेला डॉ. दीपा सुरेंद्र देसाई आणि अनुराज फास्टनर्स प्राइवेट लिमिटेड, आणि एडलिब्स प्रॉडक्शन्सचे ‘नो स्मोकिंग पापा’ हे गाणे प्रितीश कामतने लिहिले आहे. शानने गायलेल्या ह्या गाण्याला मितेश-प्रितेशने संगीतबध्द केलेले आहे. ह्याचा टिझर नुकताच लाँच झाला आहे.

आपल्या गाण्याविषयी शान सांगतात, “मी नुकतेच हे गाणे पाहिले. हे गाणे जेवढे सुरेल झाले आहे. तेवढाच ह्याचा व्हिडीयोही मस्त झाला आहे. जेव्हा एखाद्या चांगल्या गाण्याचा तेवढाच सुंदर व्हिडीयो होतो, तेव्हा ते गाणे ऐकणे आणि पाहणेही खूप मजेदार असते. ह्या गाण्याच्या शेवटी एक छान ट्विस्ट आहे. जो मला अत्यंत आवडलाय. गाण्याचा टिझर नुकताच लाँच झालाय. ज्याचा मला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि मला पूर्ण विश्वास आहे, की जेव्हा हे गाणे रिलीज होईल, तेहा हे लोकांच्या पसंतीस उतरेल.”

देशात संतांचा ‘ब्रँड ‘होतोय ,संतत्व संपतेय ,’मी केलं ‘ ही भावना सोडा :डॉ . आनंद नाडकर्णी

0
पुणे :‘ देशात संतांचा ‘ब्रँड ‘होतोय ,आणि  एखाद्या गोष्टीचा ब्रँड बनला की त्यातील संतत्व संपते   ,’ड्रग ,फॅशन आणि स्पिरिच्युऍलिटी’  या मार्केट मानल्या गेलेल्या  क्षेत्रात सतत नवीन द्यावे लागते ,त्या नवनवीन पणाच्या नादात ब्रँड बनणाऱ्याचे संतत्व संपते ,त्यामुळे ‘ मी केलं ‘ ही भावना सोडा , स्वतःतील व्यापकतेचा विस्तार करून सहिष्णू व्हा  ‘ असा सल्ला ज्येष्ठ मानस शास्त्रज्ञ  डॉ . आनंद नाडकर्णी  यांनी दिला .
पुण्याच्या कार्पोरेट जगतातील मनुष्यबळ विकास व्यवस्थापकांची शिखर संस्था असलेल्या ‘ ओन्ली एच आर ‘ संस्थेचा  पाचवा वर्धापनदिन २७ डिसेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आला होता . हा कार्यक्रम २७ डिसेंबर रोजी, नेहरू सभागृह, (घोले रस्ता ) येथे  सायंकाळी  वाजता झाला , त्यावेळी ‘ संतांचे मानसशास्त्र ‘ या विषयावर डॉ. आनंद नाडकर्णी यांनी या  कार्यक्रमात व्याख्यान दिले . ओन्ली एच आर ‘ संस्थेचे संस्थापक आणि विश्वस्त प्रशांत इथापे,  जितेंद्र पेंडसे यांनी डॉ नाडकर्णी ,डॉ अनिल अवचट यांचे स्वागत केले .
डॉ . नाडकर्णी म्हणाले ,’स्व पणाचे विसर्जन ही भारताची अध्यात्मिक संत परंपरा आहे . ‘मी ‘ पणाकडून ‘आम्ही ‘ कडे भारतीय संस्कृती नेते . आपण जरी संत होऊ शकणार नसलो तरी प्रत्येकातील संतत्व जागे करण्याची संधी प्रत्येकाला असते . ‘स्व ‘च्या पलीकडे जाणे ही संतत्वाची पहिली पायरी आहे . हे संतत्व आपल्याला भेदाभेदांच्या पलीकडे दिव्यत्वाकडे नेते . प्रत्येक व्यक्तीत परमात्मा बनण्याची क्षमता असते ,ती विसरता कामा नये .
‘ मी केलं ‘ ही भावना आपल्या दैनंदिन कामातून घालवणे हेच अध्यात्म आहे . म्हणून मनुष्यबळ विकसक व्यवस्थापकांनी सहकाऱ्यांच्या प्रगत भावनांना उन्नत भावनांकडे नेले पाहिजे . देशात संतांचा ‘ब्रँड ‘होतोय ,आणि  एखाद्या गोष्टीचा ब्रँड बनला की त्यातील संतत्व संपते   ,’ड्रग ,फॅशन आणि स्पिरिच्युऍलिटी ‘ या मार्केट मानल्या गेलेल्या  क्षेत्रात सतत नवीन द्यावे लागते ,त्या नवनवीन पणाच्या नादात ब्रँड बनणाऱ्याचे संतत्व संपते ,त्यामुळे ‘मी केलं ‘ ही भावना सोडा स्वतःतील व्यापकतेचा विस्तार करून सहिष्णू व्हा  ‘
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ . अनिल अवचट म्हणाले ,’मनुष्य बळ विकासकांनी कर्मचाऱ्यांचा कामातील पुढाकार टिकविला पाहिजे . फक्त मेमो देत राहिलो ,तर कर्मचारी जीव ओतून काम करणार नाहीत . दुसऱ्याचे मन ओळखण्यासाठी परकाया प्रवेश करण्याची क्षमता मनुष्य बळ व्यवस्थापकात असली पाहिजे . मनाच्या चुकांकडे उदारतेने पाहता आले पाहिजे ‘ .
 ‘ ओन्ली एच आर ‘ संस्थेचे अध्यक्ष सुधीर फाटक, सचिव प्रशांत इथापे, खजिनदार जितेंद्र पेंडसे उपस्थित होते .
पुण्याच्या कार्पोरेट जगतात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या  मनुष्यबळ विकास  व्यवस्थापकांचा सत्कार ‘ एचआर प्रोफेशनल अॅवार्ड  देऊन यावेळी  डॉ. अनिल अवचट, डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला . त्यात विपुल दवे ,हेमांगी धोकटे यांचा समावेश होता .

उत्तर भारतीय महामेळावा पुण्यात संपन्न

0

पुणे-समाजवादी पार्टी पुणे शहराच्यावतीने भवानी पेठमधील लक्ष्मी बाजारमध्ये उत्तर भारतीय बांधवांचा महामेळावा उत्साहात संपन्न झाला . या महामेळाव्याचे उदघाट्न समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  , आमदार अबू असीम आझमी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले . यावेळी समाजवादी पार्टीचे  महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र बहादूर यादव , महासचिव झुल्फिकार आझमी , महासचिव दिनेशकुमार  यादव , मुंबई महासचिव रमाशंकर तिवारी , अलार्ड ग्रुप ऑफ इन्स्टियुटचे संचालक डॉ एल आर यादव , समाजवादी पार्टी युवजन सभाचे राष्ट्रीय सचिव रतन सोनकर , पुणे शहर अध्यक्ष दिनेश यादव , उपाध्यक्ष रामधनी यादव , महासचिव पवन यादव , पुणे शहर उपाध्यक्ष राधेशाम यादव , सचिव अशोक यादव , पर्वती विधानसभा अध्यक्ष विजय बहाद्दूर यादव , हडपसर विधानसभा अध्यक्ष कैलास बळीराम यादव , खडकवासला विधानसभा अध्यक्ष गोविंद यादव , वडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष लालबाबु यादव , पुणे शहर प्रवक्ते अध्याप्रसाद यादव , यादव समाज चॅरिटेबल  ट्रस्टचे प्रमुख गुलाबदार यादव , अध्यक्ष तहसीलदार यादव , कार्याध्यक्ष ओमप्रकाश यादव , सदस्य  रघुनाथ यादव आदी मान्यवर व पार्टीचे पदाधिकारी व कार्य्रकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

यावेळी उत्तर भारतीय बांधव आपण सर्वानी एकत्रित आले पाहिजे , तरच आपल्याला मान सन्मान मिळेल . शहराची नावे बदलून येथील राजकीय मंडळी आपल्या पोळ्या भाजत आहे . माणसाला महत्व न देता गाय बैलाला महत्व दिले जात आहे . हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये फूट पाडण्याचे काम भाजप सरकार करत आहे . नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वसनें अद्याप पूर्ण केलेली नाहीत . यासाठी समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव हे या सरकारला चितपट केल्याशिवाय राहणार नाही . समाजवादी पार्टी उपेक्षित ,शेतकरी , कामगार ,  पीडित बांधवाना न्याय देण्याचे काम करणार आहे . हिंदी भाषा हि आमची आई आहे तर मराठी भाषा हि आमची मावशी आहे . त्यामुळे आम्ही सर्वाना न्याय हक्क मिळवून देण्याचे काम समाजवादी पार्टीचे कार्य्रकर्ते काम करणार आहे .

या महामेळाव्याचे सूत्रसंचालन अरविंद यादव यांनी केले तर आभार समाजवादी पार्टी  पुणे शहर अध्यक्ष दिनेश यादव यांनी मानले . या महामेळ्यामध्ये रावेत भागातील भारतीय जनता पार्टीचे सचिव अमित यादव व  भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी पिपरी काळेवाडी अध्यक्षा अमृता यादव यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह प्रवेश केला . 

सनबर्न फेस्टिव्हल रद्द करा: पालकमंत्र्यांना घेराव

0
पुणे :
 लवळे येथे होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हल विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषणादरम्यान बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री गिरीश बापट यांना सनबर्न विरोधी कृती समितीच्या  सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी  घेराव घालून सनबर्न फेस्टिव्हल रद्द करण्याची मागणी केली. 
गणेशोत्सव , दहीहंडी उत्साहावेळी जे निकष प्रशासनाकडून लावले जातात ते सनबर्न फेस्टिव्हलला आहे का ? , रात्री १० वाजता ध्वनिक्षेपण यंत्रणा बंद करणार का ? किती डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा या सनबर्नला घालण्यात आली आहे यासह या फेस्टिव्हलमध्ये अनधिकृत होणारी  मद्यविक्री , सुरक्षिततेचा प्रश्न आणि पाश्चिमात्य संस्कृतीमुळे तरुण पिढी व्यसनाधीन आदी विविध मुद्दे उपस्थित करून सनबर्न विरोधी कृती समितीने शासनाच्या कोणत्याही विभागाची परवानगी नसताना या सनबर्नची जाहिरात कशी काय ? असा सवाल उपस्थित करून सनबर्न फेस्टीव्हल रद्द करण्याची मागणी केली आहे.जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणादरम्यान पालकमंत्री गिरीश बापट यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी घेराव घातला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी आम्ही कीर्तन करणारी माणसे आहोत, आमचाही या सनबर्नला विरोध आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करून न्यायप्रविष्ट बाब असून न्यायालयच निर्णय घेईल अशी भूमिका मांडली .  या लाक्षणिक उपोषणात प्रशांत कनोजिया, समीर गांधी, केशव तेलंगी ,नितीन ननावरे ,राहुल म्हस्के,अनुप मारणे ,संतोष शिंदे ,दिलीप विश्वकर्मा,जांबुवंत मनोहर,सचिन पवार ,रुपेश घोलप ,रवि बनसोडे,शेखर काळे,अजय कदम ,बाळा अहीवळे,दत्ता माळी,अमोल शिंदे,केतन डोंगरे, शैलेंद्र दीक्षित आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. सनबर्न फेस्टीव्हल रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आले. 

दारू धंद्यावाल्यांकडून तक्रारदार महिलेचा छळ -पोलीस आयुक्तालयासमोर महिलेने घेतले पेटवून…

0

पुणे :दारू धंद्यांविरोधात तक्रार केली म्हणून छळ सुरु झालेल्या  एका महिलेने पुण्याच्या पोलीस आयुक्तालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलेला रोखल्याने अनर्थ टळला. या प्रकरणी दारू धंद्यावर आणि तिचा छळ करणाऱ्यावर व संबधित पोलीस ठाण्यातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली कि नाही हे समजू शकले नाही मात्र या तक्रारदार ३० वर्षीय महिलेवर मात्र बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर दुसऱ्या एका घटनेत गुरुवारी रात्रीच पिंपरीच्या  पोलीस आयुक्तालयासमोरच दोन जणांवर प्राणघातक हल्ला झाल्याचा  प्रकार घडला आहे.
बेकायदेशीर दारूविक्रीबाबत पोलिसांना माहिती दिल्याने या महिलेला मारण्याची धमकी देण्यात आली होती. संबंधित महिला सिंहगड रस्ता येथील तुकाईनगरमध्ये राहते. त्या राहत असलेल्या ठिकाणी काही महिलांकडून बेकायदेशीर दारूविक्री केली जात असल्याची माहिती त्यांनी नियंत्रण कक्षाला दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संंबंधित ठिकाणी छापा टाकला होता. त्यामुळे दारू विक्री करणाºया महिलांकडून संबंधित महिलेला मारण्याची धमकी देण्यात आली होती. या त्रासाला तसेच
येथील दारूविक्री बंद व्हावी यासाठी तक्रार देण्यासाठी त्या पोलीस आयुक्तालयात गेल्या होत्या. मात्र त्यांनी तक्रार न देता आत्महदनाचा प्रयत्न केला.पिंपरी- चिंचवडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर रुप धारण करत असून गुरुवारी रात्री पोलीस आयुक्तालयासमोरच दोन जणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. किरकोळ वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

गुरुवारी रात्री पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर अमोल वाल्हे आणि अप्पासाहेब कदम या तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ऍंथोजी फ्रान्सिस आणि रॉबिन फ्रान्सिस या दोघांनी हा हल्ला केल्याचे समजते. किरकोळ कारणावरुन झालेल्या वादानंतर आरोपींनी कोयत्याने दोघांवर हल्ला केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्तालयासमोरच कोयत्याने हल्ला करण्याची मजल आरोपींनी गाठल्याने शहरात पोलिसांचा धाक उरला की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

अखेर अतिरिक्त आयुक्त उगले यांची उचलबांगडी …

0

पुणे : पुणे महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या आणि एकूणच भाजपच्या सत्तेला नेहमी आव्हान देऊ पाहणाऱ्या अशी ज्यांची गणना होत होती त्या महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शितल उगले- तेली यांची बदली आज करण्यात आली. त्यांच्या जागी शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उगले यांच्याकडे नागपूर प्रदेश प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

रायगडच्या जिल्हाधिकारी पदावरून महापालिकेत अतिरिक्‍त आयुक्तपदी उगले यांची 11 मे 2017 ला नियुक्ती झाली  होती . त्यांच्यापूर्वी राजेंद्र जगताप यांनी ३ वर्षाचा कालावधी पूर्ण केला होता.
शितल उगले या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात पहिल्या आलेल्या  आहेत.  त्यांचे पती देखील आयपीएस अधिकारी असून पुण्याच्या पोलीसदलात कार्यरत आहेत .मात्र उगले यांचा स्वभाव हेकेखोर आणि लोकप्रतिनिधींना कमी लेखणारा ,त्यांच्यावर सातत्याने संशय घेणारा असल्याचा आरोप असंख्य महिला नगरसेविकांनी देखील मुख्य सभेत केला होता. महापालिकेतील बोगस कामगारांचा पर्दाफाश ‘मायमराठी ‘ने केल्यावर उगले यांनी त्यावर ठोस  पावले न उचलता  दुर्लक्ष करण्याचाच कारभार केला .या शिवाय सेवकांच्या बदल्या ,त्यांचे प्रमोशन आणि विविध विकासकामे याबाबत त्यांनी सातत्याने विषय प्रलंबित ठेवण्याची भूमिका ठेऊन प्रत्येक विषयावर वादंग निर्माण केल्याचा आरोप हि होत असत . यामुळे मुख्य सभेत अनेकदा  पालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि अन्य नगरसेवकांनी त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तंबी दिल्याचे वेळोवेळी स्पष्ट  झालेले आहे. भिमाले यांच्या नेतृत्त्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उगले यांच्या बदलीची मागणी 2 वेळा केली होती.मुख्यमंत्र्यांनी मात्र उगले आणि लोकप्रतिनिधी यांच्यात आज ना उद्या सुरळीत वातावरण होईल .यासाठी काही अवधी दिला .पण अखेर त्यांच्या कारकिर्दीची ३ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली .

शितल उगले यांच्या रिक्त होणाऱ्या अतिरिक्त आयुक्तपदावर रूबल प्रखेर- अगरवाल यांची राज्यशासनाकडून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या त्यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्थ व्यवस्था शिर्डी या पदाचा पदभार आहे. अगरवाल या 2008 च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील बॅचच्या अधिकारी असून रूबल यांनी या पूर्वी अहमदनगर जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर मार्च 2017 मध्ये त्यांची शिर्डी येथे बदली करण्यात आली होती.

तीन हत्ती चौकात सायकलमार्ग होणार पण …चौक अरुंद होणार नाही -महेश वाबळे

0

पुणे-धनकवडीतील क्रांतिसूर्य म. फुले चौकातील सुशोभीकरणात सायकल मार्गाचा समावेश असला तरी… आणि  कोणत्याही सुशोभीकरणासाठी पूर्वी असलेल्या चौकातील दुभाजकाची जागा वाढवलीजाणार नसल्याने या चौकाची , आणि वर्तुळाची प्रत्यक्षात असलेल्या वाहतुकीसाठीच्या जागेची रुंदी अजिबात कमी होणार नाही असा दावा या कामासाठी पुढाकार घेतलेले या भागातील भाजपचे नगरसेवक महेश वाबळे यांनी केला आहे. माजी उपमहापौर आबा बागुल यांनीही त्यास दुजोरा दिला आहे.
या चौकात अनेक वाहने लागत त्यावर अनेकदा चर्चा झाली कारवाई झाली मात्र हे कारण नसल्याचे सांगून वाबळे म्हणाले ५० लाख रुपये खर्च करून येथे अनेक कामे होतील आणि हा चौक अत्यंत सुंदर दिसेल .. तो कसा दिसेल ..हे दाखविणारी संकल्पित छायाचित्रे त्यांनी दिली .. पहा आणि ऐका नेमके वाबळे यांनी काय म्हटले आहे .

सुशोभिकरणाच्या चुकीच्या हट्टापायी -तीन हत्ती चौक होतोय अरुंद(व्हिडीओ)

0


पुणे- सुशोभीकरणाच्या नावान धनकवडी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौकाचा वर्तुळाचा परिसर अरुंद केला जात असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते आहे . एवढेच नव्हे तर मागणी नसताना आणि आवश्यक्यता नसताना येथील लोकबैठकी साठी असलेल्या पायऱ्यांंच्या पुढ्यात सायकल मार्ग आणि हिरवळीचा पट्टा तयर करून पुढील वाहतुकीचा रस्ता अरुंद केला जात असल्याचे स्पष्ट दिसते आहे . या बाबींकडे अद्याप कोणाचे लक्ष गेलेले नसले तरी येथील स्वीकृत नगरसेवक आणि या चौकाचे  शिल्पकार म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते त्या सुभाष जगताप यांनी मात्र ..या प्रकरणी ‘मायमराठी ‘ने विचारणा केल्यानंतर ताशेरे ओढले आहेत .सगळीकडे रस्त्यांचे रुंदीकरण होत असताना या ठिकाणी अशा प्रकारे चौकाची जागा अरुंद करणे म्हणजे निव्वळ उधळपट्टी करणे आहे . काही तरी करण्या ऐवजी आहे,होते तेच चौकाचे वैभव टिकवले असते तरी पुरे झाले असते असा टोमणा मारत त्यांनी या चौकाची विद्यमान नगरसेवकांनी दुर्दशा  करून आता उधळपट्टी सुरु केल्याचा आरोप केला आहे.
धनकवडी गावातून तळजाई वरून येणारा रस्ता ,गुलाबनगर हून येणारा आणि सातारा रस्त्यावरून अहिल्यादेवी येथून येणारा रस्ता आणि पद्मावती हून येणारा रस्ता या चौकात वाहतूक सुरळीत करू शकतो एवढा मोठा हा चौक आहे.पण रात्रीच्या वेळी केवळ काही वाहने येथे लागतात या निमित्ताने महापालिकेने येथे हा सुशोभीकरणाचा घाट घातला आणि सुशोभीकरणासाठी चारही बाजूने असलेले आयलंड्स थोडे थोडे पुढे सरकवून चौकातील वाहतुकीची जागा कमी करण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे सध्याचे काम पाहता लक्षात येते . काही दिवसापूर्वीच शनी मंदिरासमोरील गणपतीचे मंदिर महापालिकेने मध्यरात्रीनंतर पाडले .ते वाहतुकीस अडथला करणारे होते आणि बेकायदा होते असे कारण त्यासाठी दिलेले आहे .तेथून काही फुट अंतरावरच हा चौक आहे . या चौकात ५० लाख रुपये खर्च करून सुशोभीकरणाचे काम हातही घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे नेमके येथे काय कारणार कसे सुशोभिकरण करणार? हे सांगणारा तसेच महापालिका नियमानुसार कामाची माहिती देणारा फलक देखील येथे न लावता काम सुरु करण्यात आलेले आहे.
हे काम कोण करतंय,कधी पूर्ण होणार आहे याबाबत कोणतीही माहिती येथील नागरिकांना नाही .एवढेच नव्हे तर नेमके काय करणार आहे ,याबाबत नागरिकांना विश्वासात घ्यायला हवे होते असे लोकांचे म्हणणे आहे. चौकापासून पुण्याकडे आणि सातारा रोड कडे तसेच गुलाब नगर कडे जाणारे तिन्ही मार्ग नेहमीच वाहतुकीच्या कोंडीने त्रस्त असतात. आता चौकाची प्रत्यक्षात वाहतुकीसाठी असलेली रुंदी जागा ..कमी झाली तर हा चौक देखील वाहतुकीच्या कोंडीत गुदमरल्या शिवाय राहणार नाही . त्यामुळे येथे विनाकारण सुशोभीकरणाचा खर्च न करता आहे तो चौक स्वच्छ आणि प्रकाशमान असा ठेवावा त्याचे कारंजे उन्हाळ्यात आणि आवश्यक त्या वेळी सुरु ठेवावेत एवढे जरी महापालिकेने सांभाळले तरी या चौकाचे गेलेलं वैभव पुन्हा दिसू लागेल असे लोकांचे म्हणे आहे . पहा यावर एक व्हिडीओ रिपोर्ट …

पिस्तूल साफ करताना गोळी सुटली, पुण्यातील भाजपा नगरसेवक जखमी

0

पुणे : पिस्तुल साफ करताना चुकून गोळी सुटल्याने भाजपचे नगरसेवक गणेश बीडकर जखमी झाले आहेत . या घटनेत बीडकर यांच्या पायाला गोळी लागली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज (गुरुवार) सकाळी बीडकर स्वतःच्या घरात पिस्तुल साफ करत होते. त्यावेळी गोळी सुटून थेट त्यांच्या पायाला लागली आहे. जखमी बीडकर यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बीडकर हे सध्या पुणे महापालिकेत भाजपचे स्वीकृत नगरसेवक आहेत. यापूर्वी त्यांनी महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षपद तसेच भाजपचे गटनेतेपद भूषवले आहे. २०१७साली झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

‘बोला अलखनिरंजन’ चित्रपटगृहात दाखल

0

महाराष्ट्र सांस्कृतिक विविधतेने नटलेला आहे. विविध पंथ आणि संप्रदायांची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. महाराष्ट्रात उगम होऊनही केवळ महाराष्ट्रापुरता सीमित न रहाता संपूर्ण भारतभर ज्या संप्रदायाचे उपासक आपल्याला आढळतात तो संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय. नाथ संप्रदायाचा हा महिमा आता मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. उद्या २८ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या बोला अलखनिरंजनया चित्रपटाच्या माध्यमातून नाथसंप्रदायाचा महिमा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. मातृपितृ फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी घन:श्याम येडे यांनी सांभाळली आहे.

 नाथसंप्रदायाची शिकवण आणि सध्याची युगात त्यांची असलेली कालसुसंगता यांचा मेळ या चित्रपटात घालण्यात आला आहे. मराठी चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांच्या चरित्रावर आधारित चित्रपट निर्मित करण्यात आला आहे. मच्छिंद्रनाथांच्या आयुष्यातील चमत्कृतीपूर्ण घटनांचा प्रेक्षकांना अनुभव घेता यावा यासाठी या चित्रपटात व्हीएफएक्स चे तंत्र खुबीने वापरण्यात आले आहे. ‘इच्छाशक्तीला भक्तीची जोड मिळाली तर अशक्य काहीच नसतं’, याची प्रचीती हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना येईल.

नाथ संप्रदायाचे आद्य गुरु मच्छिंद्रनाथ आणि नवनाथांच्या आयुष्यातल्या चमत्कृतीपूर्ण घटना आणि एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चैतन्यची नवनाथांवरची भक्ती यांची अध्यात्मिक सांगड  ‘बोला अलखनिरंजन’  या चित्रपटात घालण्यात आली आहे.  अमोल कोल्हेसिया पाटीलनागेश भोसले,  दिपक शिर्केदिपाली सय्यदगायत्री सोहममिलिंद दास्ताने प्रफुल्ल सामंत, रोहित चव्हाण, भक्ति बर्वे आणि घन:श्याम येडे यांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

या चित्रपटाचे सहनिर्माते सतु कृष्णा केणी (बिजांकुर ग्रुप ऑफ कंपनी), शिवाजी घमाजी दडस (अनमोल निर्मिती सहकार्य) आहेत. अमोल येवले, विष्णुपंत नेवाळे प्रसिद्धी निर्मिती सहाय्यक आहेत. कथा, पटकथा व संवाद घन:श्याम येडे यांनी लिहिले आहेत. संगीत विशाल बोरूळकर तर पार्श्वसंगीत सुरज यांचे आहे. छायांकन सरफराज खान तर संकलन दिपक विरगुट आणि विलास रानडे यांचे आहे. सुरेश वाडकर, रविंद्र साठे, नेहा राजपाल, बेला शेंडे यांनी  भक्तीमय गीतांना स्वरसाज दिला आहे. वेशभूषा, कार्यकारी निर्मात्या चैत्राली डोंगरे आहेत. रंगभूषा किरण सावंत यांची आहे. नृत्यदिग्दर्शन  बॉबी खान , संग्राम  भालेकर  यांनी  केले आहे. ध्वनी  संयोजनाची  जबाबदारी  अनिल निकम व कैलास पवार यांनी सांभाळली असून व्हि.एफ.एक्स रितेश दप्तरी यांचे आहे. सहदिग्दर्शन चार्ल्स गोम्स, संदीप शितोळे यांनी केले आहे.देवदास भंडारे, दिपक साळुंखे यांचे कलादिग्दर्शन आहे. शिवाजी दडस आणि नारायण माळशिकारे कार्यकारी निर्माते आहेत. निर्मिती सहाय्यक संजय कोळीयोगेश टेंमगिरे आहेत. निर्मिती व्यवस्था अनिरुद्ध दुभाषी, श्रीकांत बडवे (महाजन) यांची आहे.उद्या २८ डिसेंबरला ‘बोला अलखनिरंजन’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

 

गुरू ठाकूरने ‘कृतांत’साठी गायलं गाणं…

0

मागील काही वर्षांपासून गीतकार गुरू ठाकूर हे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारताबाहेरही चांगलंच गाजत आहे. गुरूच्या लेखणीतून अवतरलेली मराठमोळी गाणी सातासमुद्रापार रसिकांचं मनोरंजन करीत आहेत. गुरूने लिहिलेलं एखादं गाणं अमेरिकेतील रेडिओ स्टेशनवर वाजणं आणि तिथल्या मराठी बांधवांनी ताल धरणं ही मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब आहे. शब्दांवर प्रभुत्व असल्याने रसिकांचा आवडता गीतकार बनलेला गुरू आता पार्श्वगायनाकडे वळला आहे. ‘कृतांत’ या आगामी मराठी सिनेमासाठी गुरूने पार्श्वगायन केलं आहे.

मुख्य भूमिकेतील अभिनेता संदिप कुलकर्णाच्या काहीशा वेगळया गेटअपमुळे चर्चेत आलेला ‘कृतांत’ हा आगामी सिनेमा गुरू ठाकूरच्या पार्श्वगायनामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. ‘रेनरोज फिल्म्स’च्या बॅनरखाली मिहीर शाह यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन दत्ता मोहन भंडारे यांनी केलं आहे. फर्स्ट लूकवरून ‘कृतांत’ हा काहीसं वेगळं कथानक असलेला सिनेमा असल्याची ग्वाही देणा-या या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखनही दत्ता भंडारे यांनीच केलं आहे. गीतलेखनापासून पटकथालेखनापर्यंत लेखनाच्या सर्वच बाजू शैलीदारपणे मांडणा-या गुरूने या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच एखाद्या सिनेमातील नवं कोरं गीत गायलं आहे.

कोणत्याही गीतकारासाठी गायन ही नवखी गोष्ट नसतेच. काव्यवाचनासाठी जो लहेजा लागतो त्या आधारे गीतकार सहजपणे गायनही करू शकतो. याच न्यायाने गुरूनेही यापूर्वा स्टेजवर परफॉर्म करत एखाद दुसरं गीत गात रसिकांची दाद मिळवली आहे, पण सिनेमासाठी पार्श्वगायन करण्याची गुरूची ही पहिलीच वेळ आहे. या सिनेमाचं प्रमोशनल साँग गुरूच्या आवाजात ध्वनीमुद्रीत करण्यात आलं आहे. गुरूने स्वतःच हे गीत लिहिलं आहे. “थांब, किंचित थांब…’’ असा मुखडा असलेल्या या गीताला संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिलं आहे. पार्श्वगायनाचा हा पहिला वहिला अनुभव बरंच काही शिकवणारा असल्याची भावना नम्रपणे व्यक्त करीत गुरू म्हणाला की, ‘कृतांत’ या चित्रपटाचा विषय खूपच वेगळा आहे. अशा प्रकारच्या सिनेमाच्या निमित्ताने पार्श्वगायनात पदार्पण करण्याची संधी मिळाली हे खूप महत्त्वाचं मानतो. आम्ही हे ठरवून केलं नसून, प्रथम मी गीतलेखन केलं आणि नंतर अगदी सहजपणे पार्श्वगायन करण्याचाही योग जुळून आला. रसिकांना हे गीत नक्कीच आवडेल अशी आशाही गुरूने व्यक्त केली.

मराठीसह हिंदीतही विविधांगी भूमिका साकारणाNया संदिप कुलकर्णाच्या वेगळया लूकमुळे ‘कृतांत’बाबत उत्सुकता वाढलेली असताना गुरू ठाकूरच्या आवाजातील गीतही ऐकायला मिळणार असल्याने चित्रपट चाहत्यांसाठी या सिनेमाच्या निमित्ताने दुग्धशर्करा योगच जुळून आल्याची भावना दिग्दर्शक दत्ता भंडारे यांनी व्यक्त केली आहे. ‘कृतांत’ची कथा वर्तमान काळातील लाईफस्टाइलवर भाष्य करणारी आहे. जगण्याच्या तत्त्वज्ञानाची आजच्या जीवनशैलीशी अचूक सांगड घालत दत्ता भंडारे यांनी एक असं कथानक लिहिलं आहे, जे आजच्या पिढीतील सर्वांनाच आपलं प्रतिबिंब दाखवणारं ठरेल. आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या, इंटरनेटच्या आणि नातेसंबंधांपासून दूर नेणा-या व्यावहारिक जीवनातील तात्त्विकतेचा संबंध या सिनेमात अधोरेखित करण्यात आला आहे. या चित्रपटात संदिप कुलकर्णा, सुयोग गो-हे, विद्या करंजीकर, सायली पाटील, वैष्णवी पटवर्धन यांच्या भूमिका आहेत. कॅमेरामन विजय मिश्रा यांनी ‘कृतांत’चं छायालेखन केलं असून, दत्ताराम लोंढे यांनी कार्यकारी निर्मात्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे.

सनबर्न साठी डोंगर फोडण्यास काँग्रेसचा विरोध

0

पुणे :सनबर्न फेस्टिव्हल हा सांस्कृतिक आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करायचा असल्यास आमचा विरोध नाही ,पण त्यांना पायघड्या घालण्यासाठी डोंगर फोडून पर्यावरणाचे अपरिमित नुकसान करण्यास काँग्रेस पर्यावरण विभागाचा ठाम विरोध आहे . संवैधानिक मार्गाने आंदोलन करून या डोंगरफोडीविरोधात ,कारवाईसाठी महसूल विभागाचे आदेश मिळवले असल्याची माहिती आज पुणे श्रमिक पत्रकार संघात दिली .कारवाईसाठी बारकाईने पाठपुरावा चालू असून या डोंगरफोडीविरुद्ध सनबर्न फेस्टीव्हल मध्ये आंदोलन करणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला .

पत्रकार परिषदेत काँग्रेस च्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे ,प्रदेश सरचिटणीस पराग आठवले ,प्रदेश सरचिटणीस अमर नाणेकर, जिल्हा पर्यावरण विभागाचे अध्यक्ष गिरीश खाटपे ,अस्लम शेख (पर्यावरण विभाग ,जिल्हा उपाध्यक्ष )यांनी शासकीय अनागोंदी आणि पर्यावरणविषयक अनास्थेचा पर्दाफाश केला . महसूल विभागाचे कारवाईचे आदेश मिळवल्याचे कागद सादर केले.

जीजेसीने आयोजित केले 8वे नॅशनल ज्वेलरी अॅवॉर्ड्स 2018

0
  • जेम्स अँड ज्वेलरी सेक्टरमधील एक सर्वात प्रतिष्ठेचे पुरस्कार
  • 5 श्रेणींमध्ये 36 हून अधिक पुरस्कार
  • जेम्स अँड ज्वेलरी उद्योगात पहिल्यांदाच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी व विमेन आंत्रप्रिन्युअरशिप अॅवॉर्डचा समावेश
  • विजेत्या विद्यार्थ्यांना देणार 10,00,000 रुपये मूल्यांच्या शिष्यवृत्ती
  • पुरस्कारांसाठी अर्न्स्ट अँड यंग प्रक्रिया सल्लागार
  • कार्यक्रम सीएनबीसी आवाजवर दाखवणार

मुंबई,- देशातील सर्वात मोठे असणारे व सर्वांना प्रतीक्षा असणारे जेम्स अँड ज्वेलरी पुन्हा आयोजित केले जाणार आहेत. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचा (जीजेसी) उपक्रम असणाऱ्या नॅशनल ज्वेलरी अॅवॉर्ड्स (एनजेए) 2018ने 2018 या वर्षासाठीच्या पुरस्कारांसाठी नामांकन प्रक्रिया सुरू केली आहे. जेम्स अँड ज्वेलरी उद्योगातील भारतीय कलाकुसर, सर्जनशील डिझाइन यांचा, तसेच भारतातील ज्वेलरी उत्पादक, घाऊक व किरकोळ विक्रेते यांचा व्यवसाय व मार्केटिंग कौशल्य यांचा गौरव करणे, हे या पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे.

या वर्षी, एनजेए पुरस्कारांमध्ये ज्वेलरी अॅवॉर्ड्स (16 श्रेणी), एक्सलन्स अॅवॉर्ड्स (3 श्रेणी), स्टोअर अॅवॉर्ड्स (5 श्रेणी), डिझाइनर अँड आर्टिसन अॅवॉर्ड्स (3 श्रेणी) आणि स्टुडंट ऑफ द इयर अॅवॉर्ड अशा 5 श्रेणींमध्ये 36 पुरस्कार दिले जाणार आहेत. या वर्षी एनजेए अॅवॉर्ड्समध्ये सीएसआर उपक्रम व महिला उद्योजकता या नव्या श्रेणीचा समावेश करण्यात आला आहे.

एनजेए 2018 अॅवॉर्ड्समध्ये, आघाडीचे डिझाइनर्स, प्रोफेशनल्स व सेलिब्रेटी यांचा समावेश असणारे परीक्षक मंडळ समाविष्ट असणार आहे. या वर्षी पुरस्कारांसाठी प्रक्रिया सल्लागार म्हणून अर्न्स्ट अँड यंग काम पाहणार आहे आणि पुरस्कारांची छाननी व गुप्तता वाढवणार आहे. अंतिम फेरी 11 फेब्रुवारी 2019 रोडी, मुंबईतील ग्रँड हयात येथे होणार आहे आणि त्यासाठी सीएनबीसी आवाज ब्रॉडकास्ट पार्टनर आहे.

या पुरस्कारांविषयी बोलताना, जीजेसीचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी सांगितले, “अनेक वर्षांपासून भारत समृद्ध डिझाइन व गुणवान कलाकारांसाठी लोकप्रिय आहे आणि हा जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्राचा कणा आहे. प्रत्येक प्रदेश विशिष्ट डिझाइनसाठी लोकप्रिय आहे आणि त्याने जगभरातील ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. जीजेसीने सुंदर ज्वेलरी डिझाइन व कुशल कलाकार यांच्या परंपरेची दखल घेण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. एनजेए अॅवॉर्ड्सच्या 8व्या वर्षामध्ये सहभागी होण्यासाठी पुढे यावे व या प्रतिष्ठित पुरस्कार समारंभासाठी स्वतःची नोंदणी करावी, असे आवाहन आम्ही देशभरातील ज्वेलरना जीजेसीच्या वतीने करत आहोत.”

जीजेसीचे उपाध्यक्ष व एनजेएचे समन्वयक अनंथा पद्मनाभन यांनी सांगितले, एनजेएने आमच्या सदस्यांसाठी व उद्योगासाठी मोठे व्यासपीठ व प्रचंड संधी निर्माण केल्या आहेत. जेम्स अँड ज्वेलरी उद्योगातील प्रत्येक घटकाची दखल घेतली जाईल व प्रसिद्धी मिळेल, याची दक्षता एनजेए घेईल. तसेच, अशा उपक्रमांमुळे या उद्योगाला एकत्र आणण्यासाठी आणि उत्कृष्टता व गुणवत्ता साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

एनजेएचे सह-समन्वयक आशीष पेठे यांनी सांगितले, एनजेए ज्वेलरी उद्योगातील उत्कृष्ट व नावीन्यपूर्ण कार्याचा गौरव करणार आहे. स्पर्धा वाढते आहे आणि पुरस्कारांच्या यंदाच्या आठव्या वर्षात एनजेएने नवे पुरस्कार व नव्या श्रेणी यांचा समावेश केला आहे. जेम्स अँड ज्वेलरी उद्योगाचा प्रत्येक भाग करत असलेल्या कठोर परिश्रमाचा गौरव व्हायला हवा, असे आम्हाला वाटते. त्यामुळे, आम्ही युनिक ज्वेलरी, बेस्ट स्टोअर्स, इनोव्हेटिव्ह डिझाइन्स, आर्टिसन्स व स्टुडंट्स अशा श्रेणींनाही आम्ही संधी देत आहोत.

पुरस्काराच्या नामांकनामध्ये भारतभरातील ज्वेलर्स सहभागी होऊ शकतात आणि नामांकन सादर करण्याची शेवटची तारिख 10 जानेवारी 2019 आहे.

जीजेसीविषयी: ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (जीजेसी) हे देशांतर्गत जेम्स अँड ज्वेलरी उद्योगातील उत्पादक, घाऊक व किरकोळ विक्रेते, वितरक, प्रयोगशाळा, जेमॉलॉजिस्ट, डिझाइनर व संबंधित सेवा यांचा समावेश असणाऱ्या 6,00,000 हून अधिक जणांचे प्रतिनिधीत्व करते. या क्षेत्राला चालना मिळावी व प्रगती व्हावी, तसेच उद्योगाचे हीतरक्षण व्हावे, या हेतूने हा उद्योग, त्याची कार्यपद्धती व उद्देश यासंबंधी परिपूर्ण दृष्टिकोन अंगिकारून हे कौन्सिल काम करते. गेली 14 वर्षे, जीजेसी या उद्योगासाठी व उद्योगाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करून सरकार व व्यापार यांच्यामध्ये पूल बांधण्याचा प्रयत्न करत आहे. जीजेसी देशभरातील 6 लाखांहून अधिक जेम व ज्वेलरी व्यवसायांचे हित जपते.

 

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्‌घाटन

0

पुणे : महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून उद्‌घाटन करण्यात आले. राज्यातील 16 परिमंडलाचे एकूण 8 संयुक्त संघांचे 592 पुरुष व 176 महिला असे एकूण 768 खेळाडू या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

स्वारगेट येथील कै. बाबुराव सणस क्रीडांगणावर गुरुवारी (दि. 27) सकाळी 9 वाजता या स्पर्धेला थाटात सुरवात झाली. यावेळी सर्व खेळाडूंनी संचलन करीत पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी पोलिस बॅण्डनेही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. उद्‌घाटन कार्यक्रमाला पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता व स्पर्धेचे मुख्य समन्वयक श्री. सचिन तालेवार, मुख्य अभियंता श्री. अनिल भोसले (कोल्हापूर), श्री. सुरेश गणेशकर (औरंगाबाद), श्री. सुनील पावडे (बारामती), श्री.भूजंग खंदारे (मुख्यालय), श्री. ब्रिजपालसिंह जनवीर (नाशिक), श्री. शंकर तायडे (गुणवत्ता चाचणी) श्री. वंदनकुमार मेंढे (महापारेषण), सौ. रंजना पगारे (रत्नागिरी) यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धेचे उद्‌घाटक प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे म्हणाले की, खेळ हा प्रत्येकासाठी महत्वाचा आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक होतो. अपयश पचविण्याची व नव्याने उभारी घेण्याची मानसिक शक्ती मिळते. खिलाडूवृत्ती व सांघिक भावना वृद्धींगत होते. संधी मिळाली की त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची उर्जा प्राप्त होते. त्यामुळे ही स्पर्धा महावितरणमधील खेळाडूंसाठी अतिशय महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर श्री. कमलाकर चौधरी व सौ. मृदुला शिवदे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते सर्वश्री सुंदर लटपटे, राजेंद्र पवार, पंकज तगडपल्लेवार, वादिराज जहागिरदार उपस्थित होते.

उद्‌घाटनानंतर लगेचच झालेल्या पुरुष व महिला गटातील 100 मीटर धावस्पर्धेत पुणे-बारामती संघाचे गुलाबसिंग वसावे आणि मुंबई-भांडूप-रत्नागिरी संघाच्या प्रिया पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकविला. तर टेनिक्वाईटमध्ये भांडूपच्या प्रियांका उगले प्रथम तर पुण्याच्या शितल नाईक यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.

कबड्डीच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये मुंबई-भांडूप-रत्नागिरी संघाने अकोला-अमरावती संघावर 36 विरुद्ध 6 गुणांनी विजय मिळविला. यामध्ये विजयी संघाचे परिक्षित शिंदे व नीलेश ठाकूर यांनी चमकदार कामगिरी केली. कबड्डीच्या दुसऱ्या सामन्यात कल्याण-नाशिक संघाने औरंगाबाद-जळगाव संघावर 31 विरुद्ध 26 गुणांनी मात केली. विजयी संघासाठी सचिन कदम व दीपक गुंड यांची कामगिरी महत्वाची ठरली.

बॅडमिंटनच्या पहिल्या फेरीतील सामन्यात लातूर-नांदेड संघाने कल्याण-नाशिक संघावर तर नागपूर-चंद्रपूर-गोंदिया संघाने औरंगाबाद-जळगाव संघावर मात केली व दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.

चौकट -क्रिकेटमध्ये कोल्हापूर सुपर ओव्हरमध्ये विजयी – नेहरू स्टेडीयम येथे झालेल्या रोमहर्षक सामन्यात कोल्हापूर विरुद्ध मुंबई-भांडूप-रत्नागिरी संघांनी प्रत्येकी 115 धावा काढून बरोबरी साधली. अत्यंत चुरशीच्या या सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हरचा आधार घेण्यात आला. यामध्ये मुंबई-भांडूप-रत्नागिरी संघाने 6 चेंडूवर 6 धावा काढल्या. तर कोल्हापूर संघाने 5 चेंडूतच 7 धावा काढून विजय मिळविला. कोल्हापूर संघाकडून 4 षटकांत 23 धावा देत 3 गडी बाद करणारा राजेश पास्ते सामनावीर ठरला.