Home Blog Page 3020

आरक्षणामध्ये गुणवत्तेचा विचार होणे गरजेचे-भास्करराव आव्हाड

0

पुणे : डॉक्टर पेशंटच्या किंवा पेशंट डॉक्टरच्या जातीचा विचार करत नाही. मात्र, शिक्षणात जात पहिली जाते. आरक्षण म्हणजे जातीचा लढा नाही, तर दुर्बल घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आरक्षणापेक्षा गुणवत्तेला अधिक महत्व दिले गेले पाहिजे. राजकीय मंडळींनी हा प्रश्न सामाजिक, बौद्धिक नेतृत्वाकडे दिला पाहिजे,” असे मत ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. भास्करराव आव्हाड यांनी व्यक्त केले.

भोसरी येथील प्रितम-प्रकाश महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन व प्रकाश पगारिया व्याख्यानमालेत बोलत होते. ‘संविधानिक आरक्षण व विद्यमान आरक्षण समस्या’ या विषयावर आव्हाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जेष्ठ शिक्षणतज्ञ हरिश्चंद्र गडसिंग, डॉ. अशोककुमार पगारिया, प्रकाश रोकडे, प्रकाश जवळकर, जे.पी देसाई प्रितम प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक शिंदे, कैलास रोकडे, प्रशांत गादीया, विनायक वाळके, रावसाहेब नागरगोजे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी डॉ. अशोककुमार पगारिया यांची शंकर आथरे यांनी प्रकट मुलाखत घेतली.

ऍड. भास्करराव आव्हाड म्हणाले, “आज स्त्रियांना आरक्षण आहे. पण वास्तवात परिस्थिती वेगळी आहे. काही भागात स्त्री केवळ नामधारी असून, सगळा व्यवहार पुरुष हाकतो. त्यामुळे स्त्रियांना निर्णय प्रक्रियेत आणावे लागेल. न्यायालयीन निकषांमध्ये एकदा एक जात किंवा संवर्ग मागासलेला म्हटले की तो कायम मागासलेलाच धरला जावा, हे योग्य नाही. सामाजिक, आर्थिक परिस्थितीवर मागासलेपण अवलंबून आहे. त्यामुळे वास्तव लक्षात घेऊन संविधानिक बदल करावे लागतील.”

डॉ. अशोककुमार पगारिया म्हणाले, “दहावीपर्यंत मराठीतुन शिक्षण झाल्याने इंग्रजी माध्यमातून शिक्षण कठीण गेले. गरिबीची परिस्थिती होती. पण जिद्दीने प्रयत्न केले आणि उभा राहिलो. बंधुता परिवाराने अनेक व्यक्तीशी नाते जोडले. विचारांची मेजवानी मिळत गेली आणि यशाच्या दिशेने वाटचाल होत गेली. आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहून कष्ट, सातत्य ठेवले की यश हमखास मिळते.”

यावेळी नवजीवन शिक्षण संस्थेचे रामचंद्र गायकवाड विद्यालय दिघी आणि भैरवनाथ विद्यालय भोसरी यांना ‘शामची आई संस्था पुरस्कार’ देऊन सन्मानित काण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना भुमीपुत्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

‘रेडीमिक्स’ ८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात!

0

‘एव्हीके फिल्म्स’, ‘कृती फिल्म्स’ आणि ‘सोमिल क्रिएशन्स’ प्रथमच एकत्र!
प्रस्तुतकर्ते एव्हीके फिल्म्सचे अमेय विनोद खोपकर, चित्रपट निर्माते प्रशांत घैसास,निर्माते सुनिल वसंत भोसले,  लेखक शेखर ढवळीकर आणि सर्जनशील दिग्दर्शक जालिंदर कुंभार येत्या ८ फेब्रुवारीला प्रदर्शित होतो आहे ..

जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘रेडीमिक्स’मध्ये समीर चिटणीस या उमद्या तरुण इंटिरियर डेकोरेटरच्या आयुष्यात वेगळं काही करू पाहणारी नुपूर ही सुंदर तरुणी येते, आणि त्यानंतर त्याचे आयुष्य वेगळेच वळण घेते. इथूनच त्याची रोमांटिक कथा सुरु होते. आजचा आघाडीचा युथ आयकॉन – अर्थात लव्हरबॉय वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरे आणि हरहुन्नरी अभिनेत्री नेहा जोशी यांच्या अफलातून अभिनयाचं रसायन नक्कीच प्रफुल्लीत करणारं आहे. त्यांच्या जोडीला अभिनेते सुनिल तावडे, आनंद इंगळे, नेहा शितोळे, गिरीश परदेसी, आशा पाटील, रमा नाडगौडा, अश्विनी कुलकर्णी, उदय नेने, राजू बावडेकर, आशिष गोखले इत्यादी सहकलाकारांनी भरलेले रंग म्हणजे खरंच एक धमाका आहे.

संदिप पाटील यांच्या व्हिजनरी कॅमेऱ्यातून ‘रेडीमिक्स’चं सौंदर्य अधिकच खुललं आहे. चित्रपटात एकूण चार गाणी असून ती गुरु ठाकूर, अश्विनी शेंडे, अभय इनामदार यांनी शब्दबद्ध केली आहेत. त्यावर लोकप्रिय संगीतकार अविनाश–विश्वजित यांनी संगीतसाज चढवला असून हे संगीत प्रेक्षकांवर गारुड घालण्यासाठी सज्ज आहे. आजची लोकप्रिय युवा गायिका आर्या आंबेकर, मुग्धा कऱ्हाडे, शिखा जैन, गायक आशिष शर्मा, फराद भिवंडीवाला, विश्वजित जोशी यांनी स्वरसाज चढवीत माधुर्य वाढविले आहे. कोरिओग्राफर दिपाली विचारे यांनी साजेशी नृत्यरचना केली आहे. संतोष गोठस्कर यांनी वेगवान संकलन केलं आहे तर कार्यकारी निर्मितीची सूत्रे प्रवीण वानखेडे यांनी सांभाळली आहेत. पूजा कामत यांनी केलेल्या वेशभूषेला अनुसरून सुहास गवते यांनी रंगभूषा केली आहे.

‘येरे येरे पैसा’ या सुपरहिट चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या अमेय विनोद खोपकर यांच्या ‘एव्हीके फिल्म्स’ने ‘रेडीमिक्स’ची प्रस्तुती केली आहे तर प्रशांत घैसास यांची ‘कृती फिल्म्स’ ही अनुभवी निर्मिती संस्था रेडीमिक्सच्या निमित्ताने पुन्हा निर्मितीत सक्रीय झाली असून त्यांनी यापूर्वी ‘अनुभूती आर्ट्स’ व ‘कृती फिल्म्स’च्या माध्यमातून ‘रास्ता रोको’, ‘गैर’ आणि ‘साडे माडे तीन’ या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘रात्रीस खेळ चाले’, ‘तुझं माझं ब्रेकअप’, ‘गर्ल्स हॉस्टेल’ आणि अमीर खान सोबत ‘तुफान आलंय’ अश्या अल्पावधीतच छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या काळजात घर करून आपलं अढळ स्थान तयार करण्यात यशस्वी झालेल्या सुनील वसंत भोसले यांच्या ‘सोमिल क्रिएशन्स’ने चित्रपट निर्मितीत पहिलं दमदार पाऊल टाकलं आहे.

‘सावित्रीच्या लेकी’ या वेगळ्या चित्रपटाद्वारे जालिंदर कुंभार यांनी रुपेरी पडद्यावर आपली छाप सोडली होती त्यानंतर मात्र ते छोट्या पडद्यावर सक्रीय होत ‘आयुष्यमान भव:’, ‘कालाय: तस्मैनम:’, ‘मधु इथे आणि चंद्र तिथे’, ‘लज्जा’, ‘अनामिका’, ‘अनुबंध’ ‘का रे दुरावा’, अश्या लोकप्रिय मालिकांच्या लेखन दिग्दर्शनात आपलं वेगळं स्थान सिद्ध केल्यानंतर ते पुन्हा रुपेरी पडद्याकडे वळत त्यांच्या फेवरेट ‘रॉम कॉम’ विषयाचं ‘रेडीमिक्स’ मिक्श्चर घेऊन येत आहेत.

” मराठी पत्रकार दिन ” सोहळ्याचे आयोजन

0

पुणे-मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पणहे बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२  रोजी सुरू केले. हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिनही आहे. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. त्यानिमित्ताने पुणे मीडिया वॉच व सिध्दार्थ वाचनालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या वर्षी ” मराठी पत्रकार दिन ” सोहळा आयोजित करण्यात आला आहे . यंदाच्या सोहळ्याचे चौदावे वर्ष आहे . अशी माहिती पुणे मीडिया वॉचचे संचालक महेश जांभुळकर व सिध्दार्थ वाचनालय व ग्रंथालयचे ग्रंथपाल दिलीप भिकुले यांनी दिली.

 नवी पेठमधील गांजवे चौकाजवळील पुणे श्रमिक पत्रकार भवनमध्ये येत्या रविवारी ६ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता व्याख्यान व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे . व्याख्यानामध्ये ” बदलते तंत्रज्ञानांचे माध्यमासमोरील आव्हाने ” या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्रविदया विभागाचे सहाय्यक प्राध्यापक संजय विष्णू तांबट यांचे व्याख्यान होणार आहे .

पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यामध्ये नामदेव ढसाळ पत्रकारिता पुरस्कार हा सुगावा प्रकाशनचे प्रकाशक व दै. बहुजन महराष्ट्र वृत्तपत्राचे संपादक विलास वाघ , बाळासाहेब ठाकरे प्रभावशाली व्यंगचित्रकार  पुरस्कार हा पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग , पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार हा गेली ५० वर्षापासून दै . आज का आनंदचे व दै संध्यानंदचे संस्थापक संपादक श्याम अग्रवाल उत्कृष्ट जनसंपर्क पुरस्कार हा गेली ३० वर्षांपासून जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असलेले ” अक्षरकला  ” या जनसंपर्क संस्थेचे संचालक  प्रविण वाळिंबे , उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार दै. इंडियन एक्सप्रेसचे  वृत्तपत्र छायाचित्रकार आरुल होरायझन , उत्कृष्ट इलेट्रॉनिक माध्यम पुरस्कार माय मराठी वेब मीडियाचे संपादक शरद लोणकर , उत्कृष्ट उपसंपादक हा दै. पुण्यनगरीचे उपसंपादक अशोक बालगुडे , उत्कृष्ट गुन्हे वार्तांकन पुरस्कार हा  दै. पुणे मिररच्या पत्रकार अर्चना मोरे प्रदीप रणपिसे राजकीय पत्रकारिता पुरस्कार हा दै आज का आनंदचे पत्रकार शैलेश काळे , उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दै. केसरीचे पत्रकार स्वप्नील पोरे , उत्कृष्ट क्रीडा पत्रकारिता पुरस्कार हा दै. सकाळ टाइम्सचे अश्व शर्यतीचे पत्रकार व पुणे रेसिंग जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मुनीर सय्यद , उत्कृष्ट उपनगर वार्ताहर हा दै. लोकमतचे उपनगर वार्ताहर प्रमोद गव्हाणे , सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय पुरस्कार हा भवानी पेठमधील सापिका येथील हिंद बाल समाज मंडळ ट्रस्ट संचालित ज्योती वाचनालय , उत्कृष्ट वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार हा वानवडी येथील श्रीगणेश न्यूज पेपर एजन्सीचे संचालक अतुल भुजबळ आदींचा सन्मान स्मृतिचिन्ह , शाल व पुष्पगुछ देउन सन्मानित करण्यात येणार आहे . 

छायाचित्रकार संजय मेमाणे यांची मुलगी पायल आहे ‘अप्सरा आली’ची स्पर्धक

0

महाराष्ट्राची लावणीची परंपरा जिवंत ठेवत, युवा पिढीला या पूर्वापार चालत आलेल्या लोकप्रिय नृत्याची ओळख करून देण्यासाठी झी युवा वाहिनीने ‘अप्सरा आली’ हा बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रमनुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आणला. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध लोकनृत्य ‘लावणी’ला मंच उपलब्ध करून देणाऱ्या अप्सरा आली या कार्यक्रमातबुधवार ते शुक्रवार प्रेक्षक महाराष्ट्रातील लावण्यवतींची अदाकारी अनुभत आहेत.

या कार्यक्रमात फक्त महाराष्ट्रच नव्हे तर चक्क परदेशातूनदेखील लावण्यवतींनी सहभाग घेतला आहे. त्यातील एक लावण्यवती म्हणजे पुण्याची पायल मेमाणे. पायल ही एक अत्यंत टॅलेंटेड लावणी नृत्यांगना असून ती अप्सरा आली कार्यक्रमातील इतर स्पर्धकांसाठी टफ कॉम्पिटिशन आहे. सर्व परीक्षक तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात. तिची लावणी बघून परीक्षक सोनाली कुलकर्णी हिने तिला ‘तुझ्यासाठी प्रेक्षकांनी हा कार्यक्रम बघावा’ असं म्हणून कौतुकाची थाप देखील दिली. पायल ही मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध आणि अवॉर्ड विनिंग छायाचित्रकार संजय मेमाणे यांची कन्या आहे. कलेचा वारसा तिला तिच्या वडिलांकडून मिळाला असेल असं म्हणणं खोटं ठरणार नाही. वयाच्या १९व्या वर्षी पायलला हा मंच मिळाला असून ती या संधीचं पुरेपूर सोनं करेल आणि अप्सरा आलीची ट्रॉफी घरी घेऊन जाण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करेल यात शंकाच नाही.

 पायलचे अप्रतिम लावणी नृत्य  अप्सरा आली या कार्यक्रमात बुधवार ते शुक्रवार रात्री .३० वाजता फक्त झी युवावर रसिकांना पाहायला मिळेल

वीजयंत्रणेजवळील कचरा पेटल्याने महावितरणचे लाखोंचे नुकसान

0

पुणे : वारंवार आवाहन करूनही वीजयंत्रणेजवळ कचरा टाकण्याचे व हा कचरा जाळण्याचे, पेटण्याचे प्रकार सुरु आहे. यामुळे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून वीजग्राहकांना सुद्धा खंडित वीजपुरवठ्याला नाहक सामोरे जावे लागत आहे.

शहरी भागात सध्या अनेक भागात वीजयंत्रणेजवळ कचरा टाकण्याचे व तो जाळण्याचे, पेटण्याचे प्रकार दिसून येत आहेत. यामध्ये रविवारी (30 डिसेंबर) दुपारी एक वाजताच्या सुमारास बाणेर रोडवरील रामनदी पुलाच्या बाजूने लोखंडी ट्रेन्चमध्ये असलेल्या केबलवर टाकलेला कचरा पेटला. पुलावर लोखंडी जाळी लावली असली तरी त्यावरून नदीत कचरा टाकण्याच्या प्रयत्नात हा कचरा केबलवर पडत होता व साठलेल्या कचर्‍याला आग लागली. यात महावितरणच्या उच्चदाबाच्या तब्बल 6 वीजवाहिन्या जळाल्याने बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस रोड परिसरातील सुमारे 35 हजार ग्राहकांचा सुमारे अडीच ते तीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला व महावितरणला वीजविक्रीमध्ये नुकसान तसेच जळालेल्या वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचा सुमारे साडे तीन लाख रुपयांचा खर्च सहन करावा लागला.

शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, रोहित्र, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स, डीपी आदी वीजयंत्रणेजवळील उघड्यावर असलेल्या जागेत घरातील कचरा टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. वीजयंत्रणेजवळ साठवलेला कचरा पेटविल्याने किंवा जळाल्याने जवळच असलेल्या विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडत आहेत. ओव्हरहेड वीजतारांखाली असलेल्या कचर्‍याच्या ढिगारा पेटविल्यामुळे किंवा त्यास आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका आहे. अशा घटनांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत आहेत.

महावितरणकडून सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांना संरक्षक जाळ्या, कपाऊंड लावलेले आहे. परंतु अनेक ठिकाणी कंपाऊंडच्या आतमध्ये कचरा व शिळे खाद्यपदार्थ टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. खाद्यपदार्थामुळे छोटे प्राणी तेथे येतात व वीजयंत्रणेच्या संपर्कात आल्यावर वीजपुरवठा खंडित होतो किंवा प्राण्याचा नाहक जीवही जातो. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांसह वीजयंत्रणेपासून सावध व सतर्क राहावे तसेच वीजयंत्रणेच्या परिसरात किंवा कपाऊंडमध्ये ओला व सुका कचरा टाकण्याचे टाळावे. नागरिकांनी उघड्यावर असलेल्या वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये. अशा घटनांतून वीजयंत्रणेला आग लागल्याचे किंवा संभाव्य धोका असल्याचे दिसताच टोल फ्री असलेल्या 1912 किंवा 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

0
पुणे- पुणे महानगर पालिका यांच्या तर्फे व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 5 जानेवारी ते 20 जानेवारी 2019 या कालावधीत डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडणार आहे.
 
शहरातील 10 वर्षाखालील, 12 वर्षाखालील व 14 वर्षाखालील एकूण 350 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. अशी माहिती डेक्कन जिमखान्याचे टेनिस विभागाचे सचिव व स्पर्धा संचालक अश्विन गिरमे यांनी दिली. 
 
स्पर्धेतील प्रत्येक वयोगटीतील विजेत्या खेळाडूंना 15 हजार रुपये व करंडक तर उपविजेत्या खेळाडूंना 10 हजार रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. 
 
स्पर्धेचे उद्घाटन 5 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता पुणे महानगर पालिकेच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे करण्यात येणार आहे. यावेळी स्पर्धेचे संयोजक व स्थानिक नगरसेवक सिध्दार्थ शिरोळे उपस्थित असणार आहेत. 

मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळाच्या वतीने तीन दिवसीय फन-फूड महोत्सव

0
एल्के केमिकल्सचे रवींद्र कुलकर्णी व युरोपा लॉक्सचे सलील जोशी मराठी उद्योजकांची खास मुलाखत
पुणे : मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ, पुणेच्या वतीने आयोजित ‘भारी भरारी २०१९’ जत्रेतून पुणेकर खवैय्यांना महाराष्ट्रीय खाद्यांची चव चाखता येणार आहे. शंभरपेक्षा जास्त पानांचे प्रकार आणि इतर अनेक पदार्थ व वस्तूंची रेलचेल या तीन दिवसीय ‘भारी भरारी’ फन-फूड महोत्सवात असणार आहे. येत्या ११ ते १३ जानेवारी २०१९ या तीन दिवशी शुभारंभ लॉन्स, डी. पी. रोड, म्हात्रे पूल, पुणे येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ, पुणेचे अध्यक्ष संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ग्राहक पेठेचे संचालक व मित्रमंडळाचे सल्लागार सूर्यकांत पाठक, सचिव प्रसाद पटवर्धन, विश्वस्त राहुल कुलकर्णी, माधव गोडबोले आदी उपस्थित होते.
संजय जोशी म्हणाले, “या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, दि. ११ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता  चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात महाराष्ट्रभरातून चवदार अश्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच गृहसजावट वस्तू, हस्तकला, रेडिमेड पदार्थ, वधु-वर सूचक, फॅशन फोटोग्राफी, कोकणी पदार्थ, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे असे विविध प्रकारचे स्टॉल्स असणार आहेत. लहानांसाठी खेळ, गृहिणींसाठी मेहंदी, टॅटू असणार आहे. नवीन वर्षातील या खाद्य जत्रेसह ग्राहकांना गेम्स आणि शॉपिंगचा आनंद घेता येईल.”
“कोल्हापुरी मिसळ, कटवडा, नागपुरी वडाभात, पुडाची वडी, खान्देशी शेवभाजी, कोकणी बिरड्याची उसळ, काळ्या रस्याची उसळ, घावन, विविध प्रकारचे थालीपीठे, विविध प्रकारचे मोदक, गुळपोळी, पुरणपोळी, खवापोळी अशा असंख्य पदार्थांची चव पुणेकरांना चाखता येईल. रोज संध्याकाळी चैताली माजगावकर भंडारी यांचा धम्माल हास्य व पपेट शोचा कार्यक्रम रसिकांना पाहता येणार आहे. लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्वांचे मनोरंजन व एकाच ठिकाणी एकाच वेळी खाद्ययात्रा, शॉपिंग आणि धम्माल गेम्स अनुभव येणार आहेत. जवळपास २०० च्यावर स्टॉल्स असणार आहेत,” असेही जोशी यांनी नमूद केले.
मराठी उद्योजकांची खास मुलाखत
श्रीपाद करमरकर, सुधीर गाडगीळ, सूर्यकांत पाठक यांच्यासह इतर समविचारी लोकांच्या मार्गदर्शनाखाली मराठी ब्राम्हण व्यावसायिक मित्रमंडळ नवनवीन उद्योजकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे. जास्तीत जास्त तरुणांनी नोकरीपेक्षा उद्योगाकडे वळावे, यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याचा मित्रमंडळाच्या उद्देश आहे. १९९० मध्ये सुरु केलेल्या या मंडळाला २६ वर्षे होत आहेत. यंदाच्या २७व्या वार्षिक संमेलनानिमित्त दोन मराठी उद्योगपतींच्या खास मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. एल्के केमिकल्सचे संस्थापक संचालक रवींद्र कुलकर्णी व युरोपा लॉक्सचे व्यवस्थापकीय संचालक सलील जोशी या दोन मराठी उद्योजकांची मुलाखत मुलाखतकार सुधीर गाडगीळ घेणार आहेत. तसेच पाच तरुण उद्योजकांचा सत्कार यावेळी केला जाणार आहे, असे माधव गोडबोले यांनी सांगितले.

टाटा कॅपिटल हाउसिंग फायनान्स लिमिटेडने सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडशी केला योजनाबद्ध सहयोग

0

या सहयोगाच्या माध्यमातून सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या ग्राहकांना गृहकर्ज उत्पादनांची विस्तृत मालिका उपलब्ध होणार

मुंबई: टाटा कॅपिटल हाउसिंग फायनान्स लिमिटेड या टाटा कॅपिटल लिमिटेडच्या पूर्णपणे मालकीच्या उपकंपनीने सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या १०० वर्षे जुन्या आघाडीच्या बँकिंग कंपनीशी योजनाबद्ध सहयोग केला आहे. या सहयोगाच्या माध्यमातून सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना टाटा कॅपिटल हाउसिंग फायनान्स लिमिटेडची (टीसीएचएफएल) विस्तृत उत्पादन मालिका उपलब्ध होईल.

सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ही भारतातील सर्वांत मोठी सहकारी बँक असून, भारतभरात बँकेच्या २८१ शाखा आहेत. या भागीदारीमुळे टीसीएचएफएलला आपले कार्यक्षेत्र विस्तारण्याची तसेच देशातील दुर्गम भौगोलिक प्रदेशातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे. टीसीएचएफएलच्या उत्पादनश्रेणीमध्ये गृहकर्जे, परवडण्याजोगी गृहनिर्माण (हाउसिंग) कर्जे आणि मालमत्ता तारण ठेवून दिली जाणारी कर्जे यांचा समावेश होतो

टीसीएचएफएलच्या गृहकर्जांच्या मदतीने ग्राहक खूप काही करू शकतात, उदाहरणार्थ, बांधकामासाठी भूखंड विकत घेणे किंवा घराचा विस्तार करणे आदी. नव्याने सुरू झालेले एसेल होम लोन कर्जाच्या सुरुवातीच्या काळातील हप्ता कमी ठेवून आर्थिक ओढाताण होणार नाही याची काळजी घेते आणि ग्राहकाचे उत्पन्न वाढते, तसे हळूहळू कर्जाचे हप्तेही वाढत जातात. याबरोबरच फ्लेक्झी (लवचिक) गृहकर्जाचे पर्यायही जलद व सुलभ मंजुरीसह उपलब्ध आहेत.

या सहयोगाबद्दल टाटा कॅपिटल हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कौल म्हणाले, “देशभरातील ३० लाख वैविध्यपूर्ण ग्राहकांना सेवा देण्याचे १००वे वर्ष पूर्ण केलेल्या सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेसोबत भागीदारी करताना आम्हाला खूपच आनंद होत आहे. घर खरेदी करू इच्छिणाऱ्या तसेच रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना आमची कल्पक मॉर्गेज उत्पादने देऊ करण्याची संधी यामुळे आम्हाला मिळणार आहे. जलद नागरीकरण, रेरासारखी पारदर्शक धोरणे तसेच २०२२ सालापर्यंत सर्वांसाठी घरे या सरकारच्या दृष्टिकोनामुळे गृहनिर्माण वित्तसहाय्याला सध्या चालना मिळत आहे.”

सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे अध्यक्ष गौतम ई. ठाकूर म्हणाले, “्राहकांकडून होणारी गृहकर्जाची वाढती मागणी पूर्ण करण्यात टाटा कॅपिटल हाउसिंग फायनान्ससोबत झालेला करार उपयुक्त ठरेल. यूसीबींना (शहरी सहकारी बँका) अस्तित्वात असलेली सारासार एक्स्पोजर मर्यादा लक्षात घेऊन निवासी एककाच्या (घराच्या) प्रत्येक लाभार्थीमागे ७० लाख रुपयांपर्यंत व्यक्तिगत गृहकर्ज देण्याची परवानगी आहे. त्यामुळे ७० लाखांहून अधिक गृहकर्जाची आवश्यकता व ग्राहक बँकेच्या कर्ज मंजुरी मर्यादेच्या पलीकडे जातात. अशा ग्राहकांना टीसीएचएफएलमार्फत गृहकर्जे मिळवून देता येतील.

टीसीएचएफएल आणि सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मिळून आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा पुरवण्यासाठी भक्कम वारसा, विश्वास तसेच वचनबद्धतेचा मिलाफ साधू शकतात. दोन्ही बाजूंसाठी फायदेशीर ठरू शकेल असा हा प्रवास टाटा कॅपिटल हाउसिंग फायनान्स लिमिटेडसोबत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. ”

सारस्वत बँकेच्या ग्राहकांना अखंडित गृहकर्ज अनुभव मिळवून देण्याचे उद्दिष्ट टीसीएचएफएलपुढे आहे. डिजिटायझेशनुळे कर्ज वितरण प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व कमीत-कमी कागदपत्रांमध्ये होतात. ग्राहक सुलभतेने त्यांना सर्वांत अनुकूल ठरेल असे गृहकर्ज उत्पादन निवडू शकतात.  

टाटा कॅपिटल लिमिटेड विषयी

टाटा कॅपिटल लिमिटेड ही एक सर्वांगीण आर्थिक सेवा पुरवठादार कंपनी असून रिटेल, कॉर्पोरेट आणि संस्थात्मक ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजांची पूर्तता थेट किंवा आपल्या उपकंपन्यांच्या माध्यमातून करते. कंपनीच्या उत्पादनांच्या श्रेणींमध्ये ग्राहक वित्तसहाय्य, सल्लागार सेवा, व्यावसायिक वित्तसहाय्य, पायाभूत सुविधांसाठी वित्तसहाय्य, सिक्युरिटीज, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, खासगी शेअर सल्ला, क्रेडिट कार्ड्स आणि ट्रॅव्हल व फोरेक्स सेवा आदींचा समावेश होतो.

नव्या वर्षात सावनी रविंद्रचा नवा लूक

0

मराठीतली गोड गळ्याची गायिका आणि सध्या तरूणाईत आपल्या वैविध्यपूर्ण गाण्यांनी सुप्रसिध्द असलेल्या सावनी रविंद्रने 2019मध्ये आपल्या लूकमध्ये एक्सिपिरीमेंट केलेला दिसतोय. सावनीचे नवे फोटोशूट नूकतेच सोशल मीडियामधून बाहेर आले आहे. आणि त्यात नेहमी साडीत आणि इंडियन आऊटफिटमध्ये दिसणारी सावनी वेस्टर्न आणि कॅज्युअल वेअरमध्ये दिसून येतेय.

सावनी आपल्या ह्या फोटोशूटविषयी म्हणते, “खरं तर, माझ्या जवळच्या लोकांनी मला वेस्टर्न आटफिट्स आणि कॅज्युअल वेअरमध्ये नेहमीच पाहिलं आहे. पण सांगितिक कार्यक्रमांना मात्र मी नेहमीच भारतीय आउटफिटच घालण्यावर भर देत असल्याने माझ्या ब-याच चाहत्यांसाठी माझा हा अपिअरन्स नवा आहे. सध्या ह्या फोटोशूटविषयी चाहत्यांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. ह्याचा मला आनंद आहे.”

बॉलीवूडच्या सगळयाच आघाडीच्या गायिकांना कॉन्सर्ट्स, रिएलिटी शो आणि सोशल मीडियाव्दारे त्यांचे चाहते अशा कॅज्युअल लुक्समध्ये पाहत असतात. मात्र मराठीतल्या गायिकांना आपल्या लुक्सबाबत खूप एक्सपिरीमेन्ट करताना कमीच पाहिलं जातं. ह्याविषयी सावनी म्हणते, “मला माझे बरेच चाहते सोशल मीडियावरून माझ्या स्टाइल स्टेटमेंटविषयी विचारत असतात. म्हणून मी स्वत: ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहे. त्याच कपड्यांमध्ये हे नवे फोटोशूट केले. कारण आपण ज्यात जास्त कम्फर्टेबल आहोत, तीच फॅशन आणि स्टाइल आपण उत्तम कॅरी करू शकतो, असे मी मानते.”

सावनी पूढे सांगते, “माझी मैत्रीण सची पटवर्धनच्या ‘एबनी बाय आयवरी’चे कपडे मी नेहमी घालते. म्हणूनच हे फोटोशूट करण्याची कल्पना मला तिने दिली. मी जर वैयक्तिक जीवनात कॅज्युअल वेअर घालते. तर एकदा त्यामध्ये फोटोशूटही करावे, असे तिला वाटत होते.”

आपली सोय व स्वार्थासाठी अनुयायांनी राष्ट्रपुरुषांना जाती-धर्मात गोवले : डॉ. श्रीपाल सबनीस

0
विसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे भोसरी येथे उद्घाटन 
पुणे । प्रतिनिधी :
संत महात्म्ये किंवा राष्ट्रपुरुष कोणत्याच जाती धर्माचे नसतात. मात्र, अनुयायांनी आपल्या व्यावहारिक सोयीसाठी आणि स्वार्थासाठी त्यांना जाती धर्माच्या चौकटीत अडकून ठेवले. बंधुतेचे मारेकरी सर्व जाती धर्माचे लोकच आहेत. यामुळे माणसामाणसातील बंधुभावनेला मोडीत काढण्याचे पाप केले जात आहे, असे प्रतिपादन 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व 20 व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे आणि भगवान महावीर शिक्षण संस्था भोसरी यांच्या संयुक्तपणे भोसरी येथील प्रितम प्रकाश महाविद्यालयात आयोजित विसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन आणि प्रकाश पगारिया व्याख्यानमालेचे उद्घाटन अ‍ॅड. भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, प्रा.डॉ. अशोककुमार पगारिया, हाजी अफझलभाई शेख, प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, डॉ. अश्‍विनी धोंगडे, महेंद्र भारती, कवी चंद्रकांत वानखेडे, मधूश्री ओव्हाळ, संगीता झिंजुरके, शिवाजीराव शिर्के, हरिश्चंद्र गडसिंग आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी राष्ट्रीय एकात्मता संदेश यात्रा काढण्यात आली. यामध्ये साहित्यिक, कलावंत, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या हस्ते डॉ. श्रीपाल सबनीस यांना अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करण्यात आली.
डॉ श्रीपाल सबनीस म्हणाले, भारतीय लोकशाहीच्या गाभ्याचे अधिष्ठान स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या सुत्रावर आधारीत आहे. मात्र, या मूल्यात्मक सूत्रांना आपण समान पातळीवर स्वीकारले आहे का ? हा प्रश्‍नच आहे. स्वातंत्र्य व समता या दोन तत्वांना अति महत्त्व देऊन राज्यकारभार केला. प्रबोधनही याच मार्गाने केले जाते. पण बंधुता नसेल तर या दोन तत्वांना अर्थ नाही. फ्रेंच राज्यक्रांतीतही हेच दिसते. त्याचीच पुनरावृत्ती भारतीय लोकशाहीत कायम राहिलेली दिसते. बंधुता तिसर्‍या स्थानी आहे. मात्र, हे लक्षात घेतले पाहिजे, की बंधुताच शोषणमुक्त भारत निर्माण करु शकते. अर्थात भारतीय समाजाला सम्यक क्रांतीची गरज आहे, पण ती क्रांती सर्वांसाठी हवी. पण सर्वांमध्ये बंधुभाव असल्याशिवाय हे शक्य नाही. बंधुता ही भावना आणि विचार आहे. मुळात बंधुता ही संकल्पनाच भावना व विचार यांची एकात्मता सिद्ध करणारे मूल्य आहे. त्यामुळे बंधुतेच्या संकल्पनेत मानवता, करुणा, प्रेम, वात्सल्य, दया या मूल्यांचा अंतर्भाव आढळतो. समाजात परिवर्तन घडवायचे असेल, तर बंधुता अत्यंत आवश्यक आहे.
डॉ. सबनस पुढे म्हणाले, गुन्हेगारालाही माणूस म्हणून समजून घेण्याच्या भूमिकेत बंधुताच निर्णायक दिसते. सुडभावनेपेक्षा बंधुता श्रेष्ठ ठरते. जागतिक पेच सोडवतानाही राष्ट्रा-राष्ट्रातील संवाद महत्त्वाचा ठरतो. माणसाच्या जगातील सर्व प्रकारच्या भेदांना  नाहीसे करण्यासाठी बंधुता उपयोगी ठरते. त्यामुळे श्रीमंत-गरीबात बंधुता आणण्याची गरज आहे. बंधुतेशिवाय समता पेरली जाऊच शकत नाही. बंधुतेची उपेक्षा जगाला परवडणारी नाही. तिसर्‍या महायुद्धालाही बंधुताच तारु शकते, असेही डॉ. सबनीस यांनी सांगितले.
अ‍ॅड. आव्हाड म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्यावेळचे राज्यकर्ते आणि आजचे राज्यकर्ते यात खूप मोठा फरक आहे. त्यावेळचे राज्यकर्ते आपल्या संसाराची होळी करून देशाचा विचार करायचे. आज याउलट परिस्थिती झाली आहे. देशाची होळी करून स्वत:चा संसार फुलवणारांना आपण नमस्कार करतो.. त्यामुळे हे मुखवटे फाडण्याची गरज निर्माण झाली आहे. आज राष्ट्रपुरुष जातीजातीत विभागले गेले आहेत, ही चिंताजनक बाब आहे. राजकारण खुज्या विचारांच्या लोकांच्या हातात गेल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. वैचारिक विरोध वरचेवर नाहीसा होत चालला आहे. केवळ अर्थकारण बघितले जाते. त्यामुळे स्वातंत्र, समता, बंधुता, न्याय ही तत्वे समृद्ध केली पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, स्वागतपर मनोगत प्रकाश जवळकर यांनी व्यक्त केले. तसेच बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच, डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षीय भाषण पुस्तकाचे प्रकाशन, डॉ. नयनचंद्र सरस्वते यांच्या बंधुताचार्याची प्रकाशगाथा ग्रंथाचे प्रकाशन, बंधुताचार्य प्रकाश रोकडे संपादित अग्निकुंड समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन, मूल्याविष्कार या संमेलन स्मरणिकेचे प्रकाशन, पवनेचा प्रवाह साप्ताहिक विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर आथरे यांनी, तर हाजी अफझलभाई शेख यांनी आभार मानले.

पुण्यात अ.भा. मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

0
पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे १२ वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन ४ ते ६ जानेवारी दरम्यान पुणे येथे होणार आहे . संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ विचारवंत  डॉ आ ह साळुंखे  यांच्या हस्ते ४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता आझम कॅम्पस येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती  स्वागताध्यक्ष  तसेच , महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ . पी ए इनामदार यांनी दिली .
प्रा . डॉ . अलीम वकील हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असून संमेलन स्थळाला प्रा . फक्रुद्दीन बेन्नूर साहित्यनगरी नाव देण्यात आले आहे . आझम कॅम्पस (पुणे) येथे मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे  अध्यक्ष   डॉ . शेख इकबाल मिन्ने यांच्या  अध्यक्षत्याखालील संयोजन समितीने तयारी पूर्ण  केली आहे .
महाराष्ट्रातील मुस्लिमांची बोलीभाषा दखनी असली तरी त्यांची व्यवहाराची आणि  अभिव्यक्त होण्याची भाषा मराठी आहे . मुस्लिम मराठी साहित्य चळवळ ही महाराष्ट्रातील मुस्लिमांनी मराठीत अभिव्यक्त व्हावे यासाठी २८ वर्षांपासून प्रयत्न करीत आहे . २३ वर्षांनी पुण्यात हे साहित्य संमेलन  पुन्हा होण्याचा योग्य जुळून आला असून आझम कॅम्पस (पुणे कॅम्प )येथे हे साहित्य संमेलन होत  आहे . या चळवळीची साहित्य संमेलने सोलापूर ,नागपूर ,रत्नागिरी ,नासिक ,जळगाव ,कोल्हापूर ,औरंगाबाद ,पनवेल ,नवी मुंबई,मुंबई ,पुणे  येथे झाली आहेत .
उदघाटन सोहळ्याला पालकमंत्री गिरीश बापट ,महापौर मुक्ता टिळक ,डॉ . विश्वनाथ कराड ,निवृत्त व्हाईस  एडमिरल निजाम नदाफ ,डॉ . जहीर काझी ,प्रा . फ  म शहाजिंदे  ,विलास सोनावणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
४ जानेवारी दुपारी अडीच वाजता ‘महाराष्ट्रातील बोलीभाषा आणि मुस्लिम मराठी साहित्य ‘ या विषयावर  परिसंवाद आयोजित केला आहे . त्यात डॉ  मुहम्मद आझम ,डॉ  आनंद काटीकर ,डॉ  प्रतिमा इंगोले , गुलाम ताहेर शेख ,डॉ  रज्जाक कासार आदी सहभागी होणार आहेत .
सायंकाळी साडेचार वाजता ‘राष्ट्रवाद कोणाची मिरासदारी ‘या विषयावर  परिसंवाद आयोजित केला आहे . त्यात  डॉ  कुमार सप्तर्षी ,डॉ  अब्दुल कादर  मुकादम ,प्रा  जावेद कुरेशी ,प्रा  रहमतुल्ला कादरी ,डॉ  भालचंद्र कांगो ,श्रीमंत कोकाटे , साहिल शेख सहभागी होणार आहेत . रात्री ८ वाजता ‘म्यूट ‘ ही एकांकिका सादर होईल .
४ जानेवारी रात्री ९ वाजता  कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून त्यात प्रा फ म शहाजिंदे ,सय्यद अल्लाउद्दीन ,डॉ  सुभाष माने ,डॉ रफिक सुरज ,दुर्गेश सोनार ,बादशाह सय्यद ,आरती धारप आदिंचा समावेश आहे .
५ जानेवारी शनिवारी सकाळी ९ वाजता ‘ सोशल मीडिया आणि नवलेखनाची परंपरा   ‘ या विषयावर  परिसंवाद आयोजित केला आहे . त्यात   प्रा फातिमा मुजावर ,डॉ मोईनुद्दीन मुतवल्ली , कलीम अजीज ,डॉ समाधान इंगळे ,राम जगताप ,हीना कौसर खान         दाहर मुजावर आदी सहभागी होणार आहेत .
सकाळी ११ वाजता ‘मुस्लिम तरुणापुढील आव्हाने  ‘या विषयावर  परिसंवाद आयोजित केला आहे . त्यात  डॉ एस एन पठाण ,गणी  आजरेकर ,चंद्रशेखर शिखरे ,डॉ फारुख  तांबोळी ,हलीमा कुरेशी ,अझीम शेख आदी  सहभागी होणार आहेत .
दुपारी दीड वाजता ‘प्रसारमाध्यमे  आणि  मुसलमान ‘  या विषयावर  परिसंवाद आयोजित केला आहे . त्यात  डॉ  जयदेव डोळे ,संजय आवटे , आमदार इम्तियाझ जलील ,बशीर मुजावर ,राज काझी ,अझीम शेख ,साजिद पठाण आदी  सहभागी होणार आहेत .
सायंकाळी ४ वाजता ‘ धार्मिक ध्रुवीकरण आणि  समतेच्या चळवळी  ‘ या विषयावर  परिसंवाद आयोजित केला आहे . त्यात  डॉ  रत्नाकर महाजन ,अन्वर राजन ,डॉ  बशरत अहमद ,निरंजन टकले ,डॉ सय्यद रफिक पारनेरकर , ह भ प डॉ  सुहास  फडतरे महाराज ,डॉ सुदाम राठोड आदी  सहभागी होणार आहेत .
सायंकाळी ७ वाजता ‘अनुवंशिक गैरसमज ‘ ही एकांकिका सादर होईल . रात्री साडेसात वाजता ‘मुस्लिम यशस्वी उद्योजकांशी संवाद ‘ हा कार्यक्रम आयोजित केला आहे . तर रात्री ९ वाजता ‘मिला जुला मुशायरा ‘  होईल .
६ जानेवारी (रविवारी ) सकाळी ९ वाजता कविसंमेलन होणार आहे . सकाळी ११ वाजता ‘मुस्लिम मराठी साहित्याचे सामाजिक योगदान  ‘या विषयावर  परिसंवाद आयोजित केला आहे . त्यात  फ म  शहाजिंदे ,डॉ विद्या बोरसे ,डॉ  विश्वास वसेकर ,डॉ  अक्रम पठाण ,डॉ   पांडुरंग कंद आदी  सहभागी होणार आहेत .
दुपारी दीड वाजता मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाची सर्वसाधारण सभा होणार असून खुले संमेलन होईल . दुपारी अडीच वाजता ‘इस्लाम आणि स्त्रियांचे हक्क ‘ हा परिसंवाद होईल . त्यात डॉ कादिरा शेख ,आबेदा इनामदार ,डॉ आयेशा पठाण ,सीमा देशपांडे, शरीफा बाले सहभागी होणार आहेत .
सायंकाळी साडेचार वाजता या तीन दिवसीय संमेलनाचा समारोप होणार असून  माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे ,सामाजिक  न्याय मंत्री दिलीप कांबळे ,उपस्थित राहणार आहेत .

संमेलन यशस्वी करण्यासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून त्यात डॉ . शेख इकबाल मिन्ने ,प्रा . लियाकत अली पटेल ,अन्वर जावेद शेख , डॉ . बशरत अहमद ,प्रा . आरिफ शेख ,युनूस आलम सिद्दीकी ,साजिद पठाण ,ए के शेख ,विलास सोनावणे ,इम्तियाझ शेख ,महमूद काझी ,अब्दुल अझीम शेख ,बशीर मिन्ने ,कलीम अझीझ ,दहार मुजावर ,डॉ केतकी भोसले ,अब्दुल लतीफ मगदूम ,नूरजहाँ शेख ,शहाजहान मगदूम ,डॉ पांडुरंग कंद ,कौसर मुजावर ,आय के शेख यांचा समावेश आहे .

खासदार काकडेंनी घेतली अर्थमंत्री जेटलींची भेट

कॅन्टोन्मेंटच्या आर्थिक प्रश्नांसंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री जेटली राज्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्याशी बोलणार

पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आर्थिक प्रश्न व विकासासंदर्भात राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. कॅन्टोन्मेंट परिसरातील विकासकामांसाठी निधी देण्यासंदर्भात आपण महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी लवकरात लवकर बोलून हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांनी यावेळी दिल्याचे खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या समस्या व प्रलंबित विकासकामांच्या संदर्भात खासदार संजय काकडे यांची नुकतीच नगरसेवकांसोबत बैठक झाली होती. त्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन अर्थमंत्री जेटली यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार आज ही भेट झाली. यावेळी पुणे कॅन्टोन्मेंटच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी, नगरसेवक अतुल गायकवाड, दिलीप गिरमकर, रुपाली बिडकर, किरण मंत्री, विवेक यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

अर्थमंत्री जेटली यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान खासदार संजय काकडे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डासमोरील एलबीटी रद्द होऊन जीएसटी सुरु झाल्यानंतर निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती, प्रलंबित विकासकामे तसेच महापालिकेप्रमाणे कॅन्टोन्मेंट बोर्डालाही राज्य व केंद्राकडून विविध विकास योजनांसाठी निधी मिळण्यासंदर्भात आग्रही भूमिका मांडली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत अर्थमंत्री जेटली यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाला येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन अर्थमंत्री जेटली यांनी खासदार संजय काकडे व शिष्टमंडळाला दिले.

जीएसटी सुरु होण्यापूर्वी एलबीटीच्या माध्यमातून सुमारे 150 कोटी रुपये मिळायचे. जीएसटी सुरु झाल्यापासून एलबीटीचे 150 कोटी रुपये बंद झाले. आता कॅन्टोन्मेंट बोर्डाला विकास कर व इतर सर्व कर मिळून 97 कोटी रुपये वार्षिक उत्पन्नापोटी मिळतात. तर, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा वार्षिक खर्च 131 कोटी रुपये होत आहे. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाला 34 कोटींचा तोटा होत आहे. एलबीटीपोटी मिळणारी रक्कम बंद झाल्याने कॅटोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती बिकट झाली. दोन वर्षांत विकास कामांसाठी बोर्डाच्या 100 कोटीच्या मुदत ठेवीतील सुमारे 70 कोटी रुपये खर्च झाले असून सुमारे 30 कोटी रुपयेच शिल्लक आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी व येथील मुलभूत सुविधांच्या विकासासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाला दरवर्षी केंद्राकडून 100 कोटी रुपये मिळायला हवेत. अर्थमंत्री जेटली यांच्यासोबत झालेल्या आजच्या बैठकीत ही सर्व परिस्थिती खासदार काकडे यांनी अर्थमंत्री जेटली यांच्या निदर्शनास आणून दिली.

नेता असावा तर, असा…
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. हे प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चालले होते. याचे गांभिर्य लक्षात घेऊन खासदार संजय काकडे यांनी थेट केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी तत्काळ भेट घडवून आणली. पुणे शहराला अशाच आत्मियतेने प्रश्न समजून घेणाऱ्या व त्या प्रश्नांची तत्काळ उकल करणाऱ्या नेतृत्वाची गरज असल्याचे सांगून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी खासदार काकडेंप्रती याविषयी आभार व्यक्त केले.

पुण्यातील हेल्मेट सक्ती हे पोलिसांचे नाही तर पालकमंत्र्यांचे कारस्थान-(व्हिडीओ)

0

पुणे-हेल्मेट सक्ती हे पोलिसांचे नाही तर पालकमंत्र्यांचे  कारस्थान असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष चेतन तुपे पाटील,कॉंग्रेसचे नेते मोहन जोशी ,आणि मनसे महिला अध्यक्ष रुपाली पाटील यांनी आज पोलीस आयुक्तालया पुढे माध्यमांशी बोलताना केला .
हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीतर्फे हेल्मेट सक्तीच्या निर्णयाविरोधात आणि दंडवसुलीविरोधात पुण्यातील गांजवे चौक ते पोलीस आयुक्त कार्यालयावर सविनय कायदेभंग रॅली काढण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्तांना निवेदन देवून आल्यानंतर माध्यमांशी बोलतना पहा या नेत्यांनी नेमके काय म्हटले आहे …

हेल्मेट सक्ती विरोधात पोलीस आयुक्तालयासमोर यल्गार …

0

पुणे- हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीतर्फे हेल्मेट सक्तीच्या निर्णयाविरोधात आणि दंडवसुलीविरोधात पुण्यातील गांजवे चौक ते पोलीस आयुक्त कार्यालयावर सविनय कायदेभंग रॅली काढण्यात आली.
रॅलीच्या प्रारंभी समितीतर्फे सरकार व पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हेल्मेट सक्ती रद्द करा, पुणेकरांचे हाल, पोलीस झाले मालामाल, हेल्मेट हटाव पुणेकर बचाव अशा घोषणा देत समितीच्या कार्यकर्त्यानी सत्ताधारी व पोलीस प्रशासनाच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या. या वेळी समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक, समन्वयक अंकुश काकडे, मोहन जोशी, रुपाली पाटील, धनंजय जाधव, मंदार जोशी आदी उपस्थित होते. या प्रसंगी समितीच्या कार्यकर्त्यांनी , फुले पगडी, शिंदेशाही पगडी, पुणेरी पगडी ,फेटे, गांधी टोपी परिधान करून निषेध नोंदविला.पोलीस आयुक्तांनी या कायदेभंग करून आलेल्या सर्व आंदोलकांना सामोरे जाण्याऐवजी त्यांना आयुक्तालया पासून काही अंतरावरच रोखून निवडक आंदोलकांना कार्यालयात येण्यास परवानगी दिली आणि त्यांच्याकडून निवेदन स्वीकारले . यावेळी पोलीस आयुक्तालया समोर असा यल्गार सुरु होता ..

आम्ही आलोय ..हेल्मेट न घालता -आंदोलक गेले पोलीस कमिशनरांना भेटायला …

0

पुणे- येथील पत्रकार भवनातून सुरु झालेली हेल्मेट विरोधी कृती समितीच्या हेल्मेट सक्ती विरोधी रॅलीला सामोरे जाण्याची हिम्मत तर पोलीस आयुक्तांनी दाखविली नाही पण ती आयुक्तालया पासून काही अंतरावरच रोखली ..आंदोलकांच्या संख्येहून अधिक संख्यचे पोलीस संरक्षण यावेळी लाभलेल्या आयुक्तालयात जाऊन सर्वच कायदाभंग करू पाहणाऱ्या दुचाकीस्वारांनी थेट कमिशनरांना भेटू द्या ..सांगितले ..पण त्यातील केवळ काही मान्यवर आंदोलकांना ..म्हणजेच हेल्मेट न घालता तिथवर दुचाकीवरून गेलेल्या ना आयुक्त भेटले . आणि त्यांनी म्हणजे सुर्यकांत पाठक ,अंकुश काकडे ,मोहन जोशी ,चेतन तुपे पाटील आदी मान्यवरांकडून हेल्मेट सक्तीला विरोध असणारे   निवेदन घेतले .त्यांच्या शी चर्चा केली आणि हे मान्यवर बाहेर आल्यावर .. नेमके भेटीत काय झाले याबाबत पहा माध्यमांशी बोलताना काय म्हणाले..