राष्ट्रवादी व मनसेच्या आघाडीला ४सभापतीपद तर शिवसेनेला १ अवघे सभापतीपद
माधुरी दीक्षितला फेव्हरेट अभिनेत्रीचं नामांकन
बॉलिवूडची मराठमोळी धकधक गर्ल माधुरी दीक्षित तिच्या चाहत्यांच्या मनात आजही तेवढाच मोठं घर करून आहे हे तिने मराठीत केलेल्या ‘बकेट लिस्ट’ या पहिल्याच सिनेमामुळे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी २५ मे रोजी हा सिनेमा हा प्रदर्शित झाला होता. याच सिनेमामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या माधुरीला झी टॉकीज प्रस्तुत ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्यात फेव्हरेट अभिनेत्री विभागातनामांकन मिळाले आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या नामांकनाची यादी नुकतीच झी टॉकीजने जाहीर केली. करण जोहरने बनवलेल्या बकेट लिस्ट मध्ये माधुरीने धमाकेदार बाईक रायडींग केली होती. योग्यवयानुसार आलेली तिची हि भूमिका चाहत्यांनाही आवडली होती. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?च्या नामांकनांमध्ये सोनाली कुलकर्णी हिला गुलाबजाम साठी, तेजस्विनी पंडिताला येरे येरे पैसे साठी, कल्याणी मुळे हिला न्यूडसाठी तर मृण्मयीला फर्जंद साठी नामांकनं मिळाली आहेत.
महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हे पुरस्कार नवव्या वर्षात पदार्पण करत असून, या पुरस्कारांनी नेहमीच नवोदित कलाकार आणि त्याच्या टॅलेंटला वाव दिली आहे. मराठी चित्रपट चाहते या अद्भुत पुरस्कारसोहळ्यात आपल्या लाडक्या कलाकारांना पुरस्कृत करण्यासाठी आपले मत २५ जानेवारी पर्यंत नोंदवू शकतात.
वन्यजीव छायाचित्रांचे तीन दिवस प्रदर्शन
कलवट ब्रीज विकसित करणे कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न
श्री क्षेत्र सम्मेद शिखरजीकडे पुण्यातील सहा जैन युवक सायकलवरून रवाना
पुणे -परिसरातील सहा जैन युवक सकाळी 5.30 वाजता सायकल वरून जैन धर्मियांचे झारखंड येथील तिर्थक्षेत्र श्री क्षेत्र सम्मेद शिखरजीकडे रवाना झाले. निगडी येथील जैन मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी सायकल यात्रेस प्रारंभ केला. प्रकाश शेडबाळे, सुदीन खोत, धनंजय शेडबाळे, संजय नाईक, धनंजय चिंचवाडे आणि अजित पाटील या सहा तरूणांनी ‘सद्भावना पर्यावरण सायकल यात्रे’चे आयोजन केले असून सुमारे 2100 किलोमीटरचा सायकल प्रवास करून हे तरूण दिनांक 1 फेब्रुवारी रोजी झारखंड येथील मधुबन – श्री सम्मेद शिखरजी येथे पोहचतील. पुणे येथून निघून अहमदनगर, औरंगाबाद, लोनार, कारंजा, वर्धा, भंडारा, राजनंदनगाव, पाटेवा, बारगड, सुंदरगड, गुमला, गोला आणि मधुबन (श्री सम्मेद शिखरजी) असा त्यांचा प्रवास असणार आहे. रोज सुमारे 150 किलोमीटर सायकल प्रवास करण्याची त्यांची योजना आहे. वाटेत प्रवासात ग्रामस्थांना जांभूळ व पेरूची रोपे ते देणार असून सर्व धर्मिय सद्भावना व अहिंसा यासाठी प्रार्थनाही करणार आहेत. पुणे व परिसरात दिगंबर जैन मुनिश्री पुलकसागर महाराज यांचा चार्तुमास आयोजित करणार्या सकल जैन वर्षायोग समितीचे हे तरूण सदस्य आहेत. मागील वर्षी त्यांनी पुणे ते श्रवणबेळगोळ (कर्नाटक) अशी सायकल यात्रा केली होती.
पुणे ते मधुबन (श्री सम्मेद शिखरजी – झारखंड) असा सायकल प्रवास करणार्या या सहा तरूणांना आदल्या दिवशी मॉडेल कॉलनीतील एचएनडी जैन बोर्डिंग येथे समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. सकल जैन वर्षायोग समितीच्या अध्यक्षा धर्मानुरागी शोभा धारीवाल यांच्या शुभहस्ते हा निरोप समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी जैन सहयोगचे अध्यक्ष व सकल जैन वर्षायोग समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ‘या सर्व तरूणांनी आपला व्यवसाय व संसार सांभाळत जैन तिर्थक्षेत्रांना सायकलवरून जाण्याचा केलेला हा संकल्प अनुकरणीय आहे.’ असे ते म्हणाले.
याप्रसंगी सर्वांना शुभेच्छा देताना शोभा धारिवाल म्हणाल्या की, सर्व सुखसोयी उपलब्ध असताना ही सायकल वरून जैन तिर्थक्षेत्रांकडे जाण्याचा या तरूणांचा हा संकल्प निश्चितच प्रेरणादायी आहे. याबरोबरच सद्भावना आणि पर्यावरण याचा संदेशही ते प्रवासात देणार आहेत ही आनंदाची बाब आहे. धर्मश्रद्धा आणि साहस याचा आदर्श मिलाफ असणार्या या सायकल यात्रेपासून प्रेरणा घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी सुजाता शहा, जितेंद्र शहा, अतुल शहा, विरकुमार शहा, सुरेंद्र गांधी, डॉ. कल्याण गंगवाल आदी उपस्थित होते. तसेच एचएनडी जैन बोर्डिंगचे सुमारे 100 विद्यार्थी उपस्थित होते.
दत्तगुरुंची आराधना – माझे अध्यात्म आणि बालसंस्कार
रोज होणारी सकाळ ही प्रत्येकासाठी खुप महत्त्वाची, आशादायी आणि प्रसन्न असावी लागते. रोज सकाळी उठल्यावर प्रथम आपल्या दोन्ही हातांचे दर्शन घ्यावे, म्हणजे दोन्ही हात जोडून त्यांना विनम्र अभिवादन करावे. हे आपल्या आजी- आजोबांनी लहाणपणी शिकवलेले संस्कार. त्यावेळी त्याचे महत्त्व तितकेसे कळत नव्हते पण आज मोठं झाल्यावर मात्र त्याची जाणीव होते आहे. आज आपण जे काही आहोत ते या संस्कार आणि दत्तगुरुंच्या कृपेमुळेचं.
रोज सकाळची सुरवात होते ती दोन्ही हातांचे दर्शन घेत आणि त्याचवेळी …
कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती।
करमूले तु गोविंदः प्रभाते करदर्शनम्॥ … हा श्लोक म्हणतच.
या श्लोकाचा अर्थही खूप परिपूर्ण आहे. आपल्या बोटांच्या अग्रामध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो म्हणजेच त्या बोटांचा उपयोग करुन आपण आपली रोजची कामे करतो, याच बोटांमधल्या ताकदीने आपण लेखणी हातात धरतो आणि बोटे एकमेकांना जुळवून आपण अन्नाचा घास घेतो. खरंच आपल्या ह्या हातांना खूप महत्त्व आहे आणि त्यांना वंदन हे रोज करायला हवे.
देवाजवळ मग प्रार्थना केली जाते हा आजचा दिवस माझ्यासाठी खूप सुंदर असणार आहे. मी योजलेली कामे आज पूर्ण होणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी पार पाडण्यासाठी लागणारे बळ, शक्ती आणि चांगले विचार करण्याची बुद्धी मला दे. गुरुमाऊली तू सदा माझ्या पाठीशी रहा, मग मला कशाचीही भीती वाटणार नाही, अशी प्रार्थना मी देवाजवळ करते आणि माझा दिवस सुरु होतो.
माझ्या कम्प्युटर टेबल वर तीन फोटो आहेत – 1. ज्ञानेश्वर महाराज, 2. सिद्धीविनायक, 3. सूर्याची प्रतिमा
मी माझ्या मनाने या तिघांची सांगड घातली आहे, हे माझे विचार आहेत.
ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सरस्वती देवीचे उपासक. मनोभावे त्यांनी सरस्वती देवीची उपासना केली त्यातील एक कणभर तरी मला समजू दे. गणपती म्हणजे विद्येचे आराध्य दैवत. मला जे समजले आहे ते माझ्या कृतीतून आणि विचारातून लोकांपर्यंत पोहचू दे आणि सूर्याची किरणे ज्या प्रमाणे सगळीकडे पसरतात त्याप्रमाणे त्याचप्रमाणे चांगल्या विचारांच्या लहरी सगळीकडे पसरु दे आणि आजूबाजूचे वातावरण मंगलमय होऊ दे.
आजच्या सारखं माझ्या लहाणपणी कॉम्प्युटर, टीव्ही किंवा फेसबुक नव्हतं. शाळेतून आल्यावर थोडावेळ खेळून झालं की दिवेलागणीला हातपाय धुवून देवासमोर प्रार्थना आणि परवचा म्हणण्याचा नित्यनेम होता. त्यात शुभं करोती बरोबर रामरक्षाही म्हटली जाई. त्यानंतर पाढे. दर गुरुवारी एकमुखी दत्ताच्या तसबिरीला हार व नैवेद्य. दत्तगुरुंच्या आराधनेचे संस्कार लहानपणापासूनच मनावर झालेत. पण खरच या सर्व नित्यनेमाचा म्हणा किंवा नकळत झालेल्या संस्काराचे महत्त्व आणि त्यामागील शक्ती अद्भूत आहे याचा आता वेळोवेळी प्रत्यय येत आहे.
आजच्या या धकाधकीच्या जीवनात थोडावेळ तरी मनापासून देवाची आराधना करावी. चांगलं काम करण्याचीभावना मनात ठेवावी. शेवटी आपण जे काही काम मनात स्वार्थी भाव न ठेवता करतो त्याचे आपल्याला कधी तरी चांगले फळ मिळतेच आणि आपल्याला मिळालेले आशीर्वाद, शुभेच्छा हे आपल्यासाठी कवचकुंडल्याचे काम करतात. या विश्वात ज्या चांगल्या लहरी संचारत असतात तशा वाईट लहरीपण संचारत असतात त्यांच्यापासून ही कवच कुंडले आपले रक्षण करतात. म्हणून नेहमी जेवढं होईल तेवढं चांगल घडेल ही भावना ठेवावी.
शेवटी संपूर्ण ब्रह्मांड म्हणजेच दत्तगुरु. आणि दत्तगुरुंच्या आराधनेमुळेच यश प्राप्त होते. हे संस्कार मला बालपणी मिळाले आणि या बालसंस्कारात प्रचंड शक्ती आहे याची प्रचिती आता मोठं झाल्यावर होते आहे. आज जे काही यश, प्रसिद्धी मिळते आहे ती दत्तगुरुंच्या आशीर्वादाने. या दत्तगुरुंच्या चरणी माझा मनोभावे साष्टांग प्रणिपात.
॥ श्री गुरु दत्त गुरु॥
॥दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा॥
– पुर्णिमा नार्वेकर, दहिसर
स्मार्ट शहराच्या संकल्पनेत पादचाऱ्यांसाठी प्रशस्त आणि मोकळे पदपथ निर्मिती – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर.
पुणे-नागरिकांना अनेक प्रश्न भेडसावत असतात मात्र या सर्व नागरी प्रश्नांची सोडवणूक ही नागरिक व लोकप्रतिनिधींमधील सुसंवादानेच होवु शकते असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी शहर संघचालक बापूसाहेब घाटपांडे यांनी व्यक्त केले.
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या विकासनिधीतून ताथवडे उद्यान मार्गावर करण्यात येणाऱ्या पदपथाच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,प्रभाग १३ चे सरचिटणीस बाळासाहेब धनवे व भाजपचे पदाधिकारी मयुर देशपांडे,विकी धडफळे,जगदीश डिंगरे,सुयश गोडबोले,प्रवीण जोशी,सुलभा जगताप,रुपालीताई मगर,सुवर्णाताई काकडे,समीर ताडे इत्यादीनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या समजून घेतल्या.
गुरुद्वारा गुरुनानक दरबारास मदत करणार-खासदार सुप्रिया सुळे
पुणे -लष्कर भागातील रेसकोर्स जवळील गुरुद्वारा गुरुनानक दरबार या गुरुद्वारास खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली . या भेटीमध्ये त्यांनी गुरुद्वारा गुरुनानक दरबारमध्ये दर्शन घेतले . त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचा गुरुद्वाराचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी , हरमिंदरसिंग घई व संतसिंग मोखा यांच्याहस्ते सरोफा , सन्मानचिन्ह व भेटवस्तू देउन सन्मानित करण्यात आले . यावेळी त्यांनी प्रसाद घेतला . त्यानंतर त्यांनी गुरुद्वाराची सर्व माहिती घेतली . गुरुद्वाराचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी यांनी गुरुद्वारामार्फत चालणाऱ्या शाळा , दवाखाना , गुरुद्वाराच्या कामकाजाची माहिती घेतली . यावेळी इंदरजितसिंग सहानी , चार्टर्ड अकौंटंट एल. आर. भोजवानी , रामेदरसिंग राणा , चरणजितसिंग चंढोक ,कालमजितसिंग आनंद , नेपाळसिंग कल्याणी , मोहिंदरसिंग कंधारी आदी मान्यवर उपस्थित होते .
तळजाई टेकडीवर गोळा झाला एक पोते पतंग-मांजा
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न
पुणे-युवा माळी संघटना व तुकाई माता ट्रस्ट यांच्या सयुंक्त विद्यमाने महात्मा फुले पेठ येथील सावित्रीबाई फुले स्मारकमध्ये मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले . यावेळी युवा माळी संघटनेच्या अध्यक्षा सुनीता भगत , तुकाई माता ट्रस्टचे अध्यक्ष नितीन बोराटे , वृषाली शिंदे , सचिन कचरे , मृणाल ढोलेपाटील , ऍड. मंगेश ससाणे , राकेश नामेकर , पंकज दर्शिले , श्वेताली नवले , संतोष जगताप . नाना गार्डे आदी मान्यवर उपस्थित होते . या शिबिरात माजी असिस्टंट कमांडर डॉ. प्रशांत जगताप , मिलिंद सोसे यांनी विशेष मार्गदर्शन केले .
विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून स्पर्धा परीक्षेस सामोरे जावे . त्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन घ्यावे . महाविद्यालयीन जीवनापासून स्पर्धा परीक्षेच्या तयारीस लागावे . यु पी एस सी साठी दिल्ली येथे कोचिंग क्लासेसमध्ये शिकण्याची विद्यार्थ्यांनी तयारीत राहावे .असे माजी असिस्टंट कमांडर डॉ. प्रशांत जगताप यांनी सांगितले .
मोहिनी घालणाऱ्या गायन-वादन-नृत्याचा मिलाफ
हुकूमशाहीविरुद्धचा शेवटचा लढा यशस्वी करा : डॉ.कुमार सप्तर्षी
इतकी वर्षे राष्ट्रपिता, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज न मानणाऱ्याना देशद्रोही मानायचे नाही तर काय मानायचे ? असा सवाल डॉ चौधरी यांनी केला.
… तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल -डॉ. नरेंद्र जाधव
भारती विद्यापीठ येथे ‘स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ‘
पंतप्रधान मोदी बारामतीतील भाजप कार्यकर्त्यांशी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलणार
शरद पवार यांना आव्हान
पुणे–राजकारणातले गुरु ..शरद पवार असल्याचे सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी आता थेट बारामतीवरदेखील चाल करण्यासाठी व्यूहरचना केली आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी (दि.23) बारामती लोकसभा मतदार संघातील बूथ प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार असल्याचे भाजपाचे बारामती लोकसभा मतदार संघाचे विस्तारक शिवाजीराव भुजबळ यांनी येथील पत्रकार परिषदेत सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून शरद पवारांना त्यांच्याच होमपीचमध्ये बाद करण्याचा डाव आखला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसला थेट आव्हान दिले असल्याचे यावरून दिसून येत आहे.
यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष वासुदेव काळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस तानाजीराव दिवेकर, भाजपा सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष धीरज भळगट, तालुकाध्यक्ष गणेश आखाडे उपस्थित होते. भुजबळ म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नरेंद्र मोदी हे राज्यात बारामती लोकसभा मतदार संघातील बूथ प्रमुखांशी प्रथमतः व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सवांद साधत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हा व्हिडिओ कॉन्फरन्सचा कार्यक्रम बारामती येथे बुधवारी (दि.23) दुपारी 03:00 वाजता होणार असून या कार्यक्रमाला लोकसभा मतदार संघातील जवळपास 2070 बूथ प्रमुख उपस्थित राहणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
लोकसभा 2014च्या निवडणुकीत बारामती मतदारसंघ भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या रासपला देण्यात आला होता. त्यावेळी रासपच्या महादेव जानकर यांनी ही निवडणूक लढवली होती. जानकर यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यापुढे कडवे आव्हान दिले होते. मात्र, त्यावेळी महादेव जानकर यांचा पराभव झाला होता. त्यावेळी जानकर यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढली असती तर त्यावेळचे चित्र वेगळे असते. त्यामुळे आताच्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपाचे कमळ चिन्ह असलेला उमेदवार देण्यात येणार आहे, अशी माहिती भुजबळ यांनी दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव निश्चित असून भाजपाच्या वतीने सुळे विरोधात कोण उमेदवार असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.










