मुलांना झेंडे, फुगे आणि खाऊ वाटप
पीएमआरडीएचा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी पीएमआरडीएचे महानगरआयुक्त किरण गित्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमास पीएमआरडीएचे पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी, अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त मुख्य
कार्यकारी अधिकारी मिलिंद पाठक, अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
प्रविणकुमार देवरे, महानगर नियोजनकार विजयकुमार गोस्वामी, उपजिल्हाधिकारी तथा
उपनियंत्रक सुहास मापारी, पोलीस निरीक्षक राजकुमार शेरे, मुख्य प्रशासन अधिकारी अर्चना
तांबे, मुख्य लेखा अधिकारी श्रीहरी खुर्द, अधीक्षक अभियंता चंद्रकांत जावळे, अग्निक्षमक विभाग
प्रमुख देवेंद्र पोटफोडे व सर्व कर्मचारी वृंद तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
पीएमआरडीए पोलीस विभाग व अग्निशमन विभाग यांनी ध्वजाला मानवंदना दिली.
26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान साजरा होणार लोकशाही पंधरवडा
पुणे :- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या सूचनांनुसार 26 जानेवारी 2019 ते 10 फेब्रुवारी 2019 या कालावधीत लोकशाही भक्कम होण्याच्या व नागरीकांना निवडणूकीच्याबाबत विविध स्वरुपातील माहिती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने “लोकशाही पंधरवडा” साजरा करण्यात येणार आहे. या पंधरा दिवसाच्या कालावधीत वेगवेगळ्या स्तरांवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
26 जानेवारी 2019 रोजी झेडावंदनाच्या वेळी ठिकठिकाणी होणाऱ्या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्याच्या भाषणांमध्ये लोकशाही, निवडणूक व सुशासन या विषयावर माहिती देण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिका, नगरपरिषद ग्रामपंचायतींमध्ये “लोकशाही निवडणूक व सुशासन” या विषयाचे होर्डिग्ज, बॅनर्स लावण्यात येणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र व बस स्टँड, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा इ. ठिकाणी पोस्टर्स, कापडी फलक लावण्यात येणार आहेत. स्थानिक टि.व्ही, केबल व रेडिओ चॅनलवर 30 सेकंदाची “लोकशाही निवडणूक व सुशासन” या विषयावर जिंगल्स प्रसारीत करण्यात येणार आहे. मतदार यादी जागृती अभियानाची व्यापक प्रसिध्दी करण्याण्यासोबतच अक्षम नोंदणीकृत राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली, NOTA ला सर्वाधिक मते पडल्यास अशा जागी फेरनिवडणूक घेणेबाबत सुधारणा करण्यात आली, याबाबत माहिती देण्यात येणार आहे.
18 व 19 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची निश्चिती करून त्यांचे नाव मतदार यादीत अंतर्भुत करण्यासंदर्भात महाविद्यालयात कक्ष उभारण्यात येणार आहेत. मतदार यादीत महिला मतदारांची टक्केवारी कमी आहे अशा मतदान केद्रांचा शोध घेऊन त्याठिकाणी महिला मतदारांचे नाव नोंदणीकरीता विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये (प्रामुख्याने शहरी भागातील) इतर भाषिक मतदारांना निवडणूकीचे महत्व पटवून देण्यासाठी व निवडणूकीतील त्यांचा सहभाग वाढवून निवडणूकीची टक्केवारी वाढविण्यासाठी संबंधीत ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत जनसामान्यांची “चुनाव पाठशाला” आयोजित करण्यात येणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये लोकशाही, निवडणूक व सुशासन या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. कार्यक्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने व सहकार्याने मतदार जागृती मोहिम राबविणेत येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
युतीचा तिढा जेवणाच्या टेबलवर सुटण्याची चिन्हे…
मुंबई : भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षाच्या आगामी निवडणुकीतील युतीचा तिढा जेवणाच्या टेबलवर सुटण्याचे संकेत मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्लीत येऊन सोबत भोजन घेण्याचे निमंत्रण दिले असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांकडून समजते. मात्र मोदी यांनी ‘मातोश्री’वर जेवणाकरिता यावे, असा शिवसेनेचा आग्रह असून कदाचित मोदी व उद्धव यांच्यातील ही भोजनबैठक राजभवन किंवा एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होण्याची शक्यता आहे.
भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षातील संबंध उभय बाजूच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे बरेच ताणले गेले असून मोदी यांना हा तिढा सोडवायचा आहे. त्यामुळे त्यांनीच पुढाकार घेऊन उद्धव यांना दिल्लीत भोजनाकरिता बोलावल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी रालोआच्या १० एप्रिल २०१७ रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरे, चंद्राबाबू नायडू आदींनी एकत्र भोजन केले होते. दीर्घकाळ झाला रालोआच्या या दोन नेत्यांनी सोबत भोजन घेतले नाही व चर्चा केलेली नाही. मोदी यांचे निमंत्रण मातोश्रीने फेटाळलेले नाही. उलट मोदी यांनी मातोश्रीवर जेवण्याकरिता यावे, असा आग्रह धरला आहे. मोदी हे मातोश्रीवर येणे अशक्य आहे. मात्र मोदी आणि ठाकरे यांच्यात मुंबईत भोजनबैठक होऊ शकते. ही बैठक राजभवन किंवा उभय नेत्यांना सोयीच्या पंचतारांकित हॉटेलात होऊ शकते. यामुळे मोदींना मुंबईत येण्यास भाग पाडल्याचे ठाकरे यांना समाधान तर युतीचा तिढा सोडवताना हिमालय सह्याद्रापुढे पूर्णपणे झुकला नाही, असे सांगायला भाजपाचे स्वयंसेवक मोकळे राहतील.
पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर शिवसेनेच्या मुखपत्रातून दररोज टीका केली जात असली तरी खा. संजय राऊत यांनी निर्मिती केलेल्या ‘ठाकरे’ चित्रपटाचा विशेष खेळ दिल्लीत आयोजित केला जाणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे हजर राहणार किंवा कसे ते स्पष्ट नाही. मात्र यावेळी पुढील भोजन बैठकीचे पक्के होऊ शकते. ठाकरे स्मारकाकरिता महापौर बंगला देणे, स्मारकाकरिता लागू होणारे १४ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करणे वगैरे निर्णय घेऊन भाजपाप्रणीत सरकारने शिवसेनेचे मन जिंकण्याकरिता दोन पावले पुढे टाकली आहेत. भोजन बैठक ही तिढा पूर्णपणे सोडवण्याच्या दिशेने टाकलेले अंतिम पाऊल असेल, असे सांगण्यात येते. यापूर्वी जून २०१८ मध्ये पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही मातोश्रीवर पायधूळ झाडली होती.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या तोंडावर या सर्व घडामोडी घडतील, असे सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी दोन्ही पक्षातील नेते जागावाटपाची चर्चा पडद्याआड सुरु करतील. युतीचा तिढा सुटल्याची घोषणा ऐनवेळी करुन कुणालाही कुठेही पळापळ करण्याची संधी द्यायची नाही, याची खबरदारी दोन्ही पक्ष घेणार आहेत, असे सांगण्यात आले.
प्रगत तंत्रज्ञानामुळे कर्करोगावर नियंत्रण शक्य- डॉ. अंजली शिरास
‘पै कॉलेज ऑफ वेदा ‘ मध्ये कलोत्सव- २०१९ ला प्रारंभ
बालाजी शिक्षण प्रसारक मंडळात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न
पुणे- जिल्हा परिषद, पंचायत समिती शिरुर व बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ शिरुर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2018-19 नुकतेच दि. 21, 22 आणि 23 जानेवारी या कालावधीत बालाजी इंग्लिश मिडीयम स्कुल शिरुर येथे संपन्न झाले.
या प्रदर्शनात दि. 21 जानेवारी रोजी विज्ञान दिंडी, शिक्षकांसाठी कार्यशाळा, जादुचे प्रयोग, कु.अंकिता नगरकर युवा शास्त्रज्ञ यांचे व्याख्यान, जल साक्षरतेचे पोस्टर प्रदर्शन, विज्ञान प्रश्न मंजुषा, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम संपन्न झाले.
तसेच प्रदर्शनात पाणी बचत, विज बचत, शेती तंत्रज्ञान, अन्नधान्य अधुनिक पध्दती, दळणवळण उर्जा बचत या विविध विषयांवरील विविध उपकरणे विद्यार्थ्यांनी सादर केली. शिरुर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रकल्प पाहण्यासाठी बहुसंख्य शाळांतील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.
तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाचा समारोप समारंभ दि. 23 जानेवारी 2019 रोजी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.सदाशिव(आण्णा) पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष श्री.दिलीपराव वळसेपाटील यांची कन्या कु.पुर्वा वळसेपाटील उपस्थित होत्या. या प्रसंगी मा.सभापती प्रकाश पवार, पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाच्या संचालिका सौ.केशरताई पवार, सी.टी.बोरा शिरुर कॉलेजचे प्राचार्य डॉ.सि.के.मोहिते, तहसिलदार भोसलेसाहेब, बी.डी.ओ. जठार साहेब, जि.प.सभापती सुजाताताई पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्री.मानसिंग पाचुंदकर, पंचायत समिती शिरुरचे सभापती श्री.विश्वासराव कोहकडे, जि.प.सदस्य श्री.राजेंद्र जगदाळे, जि.प.सदस्या स्वाती पाचुंदकर, उपसभापती कुसुमताई मांढरे, जि.प.सदस्या सविताताई बगाटे, मा.सभापती मोनिकाताई हरगुडे, पं.स.सदस्या सौ.सविता प-हाड, पं.स.सदस्या सौ.अरुणाताई घोडे, पं.स.सदस्य श्री.विजय रणसिंग, पं.स.सदस्य श्री.राजेंद्र गदादे, पं.स.सदस्य श्री.आबासाहेब सरोदे, पं.स.सदस्य डॉ.पोकळे, मा.पं.स.सदस्या दिपालीताई शेळके, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्याक्ष श्री.हरिश्चंद्र गायकवाड, मुख्याध्यापक संघ शिरुरचे अध्यक्ष श्री.शितोळे, सचिव श्री.मारुती कदम, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.रोहीदास एकाड, पुणे जिल्हा उपशिक्षणाधिकारी श्री.बाळासाहेब राक्षे, विज्ञान पर्यवेक्षीका श्रीमती दिंडे, पं.स.शिरुरचे गटशिक्षणाधिकारी श्री.बाळकृष्ण कळमकर, सौ.वंदनाताई पवार, पै.राहुल पवार व श्री.बाबुराव उमाप आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रदर्शनामध्ये ए.जे.मलगुंडे सर यांच्या नेतृत्वाखाली 11 परिक्षकांनी मुल्यमापण करण्याचे काम केले.
या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता 6 वी ते 8 वी या गटामध्ये प्रथम क्रमांक रोहन राजाराम बरडे (व्हिल हेक्स – जवाहरलाल विद्यालय केडगाव ता.दौंडे), द्वितीय क्रमांक राघव अतुल कुलकर्णी (मेट्रो कार पार्किंग – लक्ष्मणराव आपटे प्रशाला पुणे), तृतीय क्रमांक वंदना मारुती मेणे (स्मार्ट टोल नाका – ग्रा.वि.वि.भांबुर्डे ता.मुळशी), आदिवासी गट नरेंद्र दिनकर कारभळ (सौरभात झोडणी यंत्र – न्यु इंग्लिश स्कुल राजुन नं.1 ता.जुन्नर) यांनी विद्यार्थ्यांनी पटकावले.
तर इयत्ता 9 वी ते 12 वी या गटामध्ये प्रथम क्रमांक शुभम गणेश सोनार (चारचाकी वाहने चोरी रोखण्याचे यंत्र – भालचंद्र विद्यालय भांबोली, ता.खेड), द्वितीय क्रमांक अद्वैत गौरव बुरांडे (समुद्रातील पाण्याचे रुपांतरण – शिवराज विद्यामंदिर पुणे पुर्व), तृतीय क्रमांक आदित्य महेश शिरसाठ (घरगुती पाणी पंप – रामराव पलांडे माध्य. आश्रमशाळा मुखई ता.शिरुर) आदिवासी गट अंकिता नितीन खंडागळे (पाणी बचत स्मार्ट किट – आदर्श विद्यालय आंबोली ता.खेड) यांनी विद्यार्थ्यांनी पटकावले.
लोकसंख्या प्राथमिक गटामध्ये प्रथम क्रमांक सौ.योगिता रामचंद्र शिंगाडे (स्त्री पुरुष समानता – जि.प.प्रा.शाळा पाईट ता.खेड), द्वितीय क्रमांक सौ.सुनिता राजू वामण (लेक वाचवा देश घडवा – जि.प.प्राथ.शाळा कुसुर ता.जुन्नर), तृतिय क्रमांक श्रीमती मनिषा शशिकांत बारवकर (बेटी बचाव बेटी पढाओ – जि.प.प्राथ.शाळा पोम्बर्डी ता.भोर) यांनी पटकावले.
लोकसंख्या माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक श्री.महेंद्र दिक्षीत (लोकसंख्या शिक्षण – डी.ए.सातव हायस्कुल बारामती), द्वितीय क्रमांक श्री.दिलीप गंगाधर चौधरी (कशाला हवे आणखी मेल – महात्मा गांधी विद्यालय मंचर), तृतिय क्रमांक मनिषा श्रीरंग पवार लोकसंखेचे दुष्परिणाम – ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी ता.खेड) यांनी पटकावले.
शैक्षणिक साहित्य प्राथमिक गटामध्ये सौ.मुलाणी झुबेदा मेहमुद (चौरस चेंडु बोर्ड – जि.प.प्रा.शाळा जे.पी.नगर इंदापूर), द्वितीय क्रमांक श्री.दिपक शिवाजी रेटवडे (ग्रीटींग टिचींग – जि.प.प्राथ.शाळा टाकळकरवाडी ता.खेड) यांनी पटकावले.
शैक्षणिक साहित्य माध्यमिक गटामध्ये श्री.अशोक बापुराव सोनवलकर (पेशींचे अंतरंग – सनब्राईट माध्य.विद्यालय आंबेगाव ता.हवेली), द्वितीय क्रमांक आर.एन.रांघवन (इलेक्ट्रॉनिक कॉन्फ्युगिरेशन – ग्यानबा सोपानराव मोझे प्रशाला येरवडा पुणे पुर्व) यांनी पटकावले.
प्रयोगशाळा परिचर गटामध्ये श्री.केशव तुकाराम पवळे (होपचे उपकरण – आर.आर. विद्यालय भोर), द्वितीय क्रमांक श्री.चंद्रकांत दादाभाऊ घाटगे (सौर उर्जेवर हायड्रोजन वायूची निर्मिती व उपयोग – न्यु इंग्लिश स्कुल कांदळी ता.जुन्नर) यांनी पटकावले. सर्व यशस्वी स्पर्धकांना परितोषिक देवून गौरवण्यात आले.
प्राचार्य श्री.सी.के.मोहिते यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यातील समस्यांचा वैज्ञानिक दृष्टीने विचार करुन नवनविन संकल्पना यावर विचार करावा व त्यातुनच उद्याचे वैज्ञानिक तयार होतील असा विश्वास तयार केला. विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण दडलेले असतात त्यांना अशा प्रदर्शनामधून आपले विचार व्यक्त करण्याचे व्यासपिट मिळते असे सांगितले.
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी बालाजी शिक्षण संकुलातील सर्व स्टाफ, शिरुर तालुका मुख्याध्यापक संघ, शिरुर तालुका गणित विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.संभाजी ठुबे, सचिव श्री.कल्याण कडेकर, खजिनदार श्री.दादाभाऊ घावटे, श्री.विलास कुरकुटे आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन उपप्राचार्या सौ.स्वाती चत्तर, सौ.राजश्री नेमाणे, श्री.निलेश काळे व श्री.अनिल साकोरे यांनी केले. बालाजी प्राथमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.विनायक म्हसवडे, बालाजी इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्राचार्य श्री.गणेश मिटपल्लीवार व सर्व स्टाफने विशेष परिश्रम घेतले.
हरियाणातील “सुरजकुंड मेळा 2019″मध्ये यंदा थीम स्टेट म्हणून महाराष्ट्र राज्याचा सहभाग
पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या होणार उदघाटन
मुंबई, 25 जानेवारी –
हस्तकलेच्या प्रदर्शनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या हरियाणातील “सुरजकुंड मेळा 2019″मध्ये यंदा थीम स्टेट म्हणून महाराष्ट्र राज्याचा सहभाग असणार आहे… यानिमित्ताने महाराष्ट्राची कला, संस्कृती, इतिहास, खाद्य संस्कृती देश-विदेशातील पर्यटकांच्या समोर सादर केली जाणार असून सुरजकुंडच्या ऐतिहासिक परिसरात यंदा स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला आणि पेशवाईतील शनिवार वाडा उभारला जाणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या मेळ्याचे उदघाटन केले जाणार आहे.
हरियाणा राज्य पर्यटन विभाग आणि सुरजकुंड मेळा समिती तर्फे 1987 पासून सुरजकुंड मेळा भरवण्यात येतो. दरवर्षी एका राज्याला थीम स्टेटचा दर्जा देऊन त्या राज्याची ओळख जगाला करून दिली जाते. यंदा पर्यटन मंत्री जयकुमार रावल, महाराष्ट्र पर्यटन मंत्रालय आणि एमटीडीसीच्या प्रयत्नातून महाराष्ट्राला या मेळ्यात थीम स्टेट होण्याची संधी मिळाली आहे.
यंदा 1 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान होणारा हा 33वा आंतरराष्ट्रीय सुरजकुंड मेळा आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने देशभरातील हस्तकलांचे प्रदर्शन एकाच ठिकाणी होईल. देशभरातले हस्तकला कारागीर, देशविदेशातील व्यापारी पर्यटक यात सहभागी होतील. गेल्या वर्षी या मेळ्याला देश आणि जगभरातील 8 लाख लोकांनी भेट दिली होती. यंदा ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
थीम स्टेट महाराष्ट्र असेल म्हणजे काय…?
30 एकरच्या परिसरात होणाऱ्या सुरजकुंड मेळ्यात यंदा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी राहिलेल्या रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली जाणार आहे. तसेच, मेळ्यातील दिल्ली गेट दिशेला पेशवाई संस्कृती दर्शवणारा शनिवार वाडा उभारला जातो आहे. या व्यतिरिक्त मेळा परिसरात शिवकालीन किल्ले, लोकसंस्कृती दाखवण्याची व्यवस्था केली गेली आहे. महाराष्ट्राची पारंपरिक कला, संगीत, लोककला, संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतील कोकणी, मालवणी, वर्हाडी, खान्देशी, पुणेरी खाद्यसंस्कृतीतील पुरणपोळी, थालीपीठ, मुंबईचा वडापाव आदी खाद्यपदार्थाची मेजवानीचा पर्यटकांना आस्वाद घेता येणार आहे. राज्यातील कलाकारांना आपले कलागुण सादर करता येतील तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील हस्तकला कारागिरांना आपली कला सादर करण्याची, वस्तू विक्री करण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.
या मेळाव्यामुळे महाराष्ट्राची लोकसंस्कृती, पर्यटन, इतिहास जगासमोर मांडला जाईल. महाराष्ट्राकडे जगभरातले पर्यटक आकृष्ठ होतील. महाराष्ट्राच्या हस्तकला कारागिरांना रोजगार उपलब्ध होईल. जगाच्या बाजारपेठेत महाराष्ट्र पोहचेल, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे.
सुरजकुंडचा इतिहास
दक्षिण दिल्लीपासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या या जागेचे सौंदर्य महत्व ओळखून राजा सुरजपालने इथे आपला गड बांधला. सुर्यमंदिर आणि सूर्य सरोवरची स्थापना केली. आता मंदिर अस्तित्वात नाही. पण सूर्य सरोवरचे अवशेष आहेत. यालाच सुरजकुंड म्हणून ओळखले जाते. या सुरजकुंडच्ये भोवताली हा मेळा 1987 पासून भरवला जातो आहे. जगभरातल्या पर्यटकांसाठी, हस्तकला प्रेमींसाठी हा मेळा म्हणजे पर्वणी असते.
लोककलावंत कडुबाई खरात यांना निवारा हक्क मिळवून देणार – मंत्री रामदास आठवले
मुंबई – लोककलावंत कडुबाई खरात यांचे औरंगाबाद चिकलठाणा येथील राहते घर आणि संपूर्ण झोपडपट्टी जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाने प्रशासनाने 21 जानेवारीला पहाटे अन्यायकारक कारवाई करून निष्कसित केली. या अन्यायकारक कारवाई विरुद्ध कडुबाई खरात यांनी नुकतीच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांची बांद्रा येथे संविधान निवासस्थानी भेट घेऊन आपल्यासह शेकडो झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळवून देण्याचे निवेदन दिले. त्यावर ना रामदास आठवले यांनी त्वरित औरंगाबाद
विभागीय आयुक्तांशी; तसेच उपायुक्तांशी संपर्क साधून लोकगायिका कडुबाई खरात यांच्या घरासह चिकलठाणा झाल्टा नाका येथील तोडण्यात आलेल्या सर्व झोपडपट्टीवासीयांच्या घराचे पुर्नवसन करण्याची सूचना केली.
लोकगायिका कडुबाई खरात यांना बेघर न ठेवता त्यांना निवारा हक्क मिळवून देणार असल्याचे आश्वासन ना रामदास आठवले यांनी दिले. यावेळी कडुबाई खरात यांनी भीमगित सादर केले. यावेळी औरंगाबाद चे नगरसेवक चेतन कांबळे ; अरुण लोखंडे आदि मान्यवर उपस्थित होते.
कडुबाई खरात या एकतारीवर सुरेल कर्णमधुर प्रबोधनकारी भीमगित गात असून त्यांची भीमगिते समाजमाध्यमांवर लोकप्रिय झाली आहेत. कडुबाई खरात यांच्या पतीचे निधन झाले असून त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हालाकीची असून एक मुलगा आणि दोन मुलींचा सांभाळ करताना त्यांच्या जीवनसंघर्षात हक्काचा निवाराही प्रशासनाच्या कारवाईमुळे गेला आहे. या लोकप्रिय लोककलावंत
कडुबाई खरात यांना शासनाने हक्काचे घर दिले पाहिजे अशी मागणी पुढे अली आहे .महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देऊन लोककलावंत कडुबाई खरात यांना चांगले घर मिळवून द्यावे या मागणीचे निवेदन ना रामदास आठवले यांना देण्यात आले आहे. लोककलावंत गायिका कडुबाई खरात यांच्या घराच्या पुनर्वसनासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी ना रामदास आठवलेंनी कडुबाई खरात यांना दिले.
लोकशाहीच्या बळकटीसाठी प्रत्येकाने मतदान करावे- विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे :- लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरिकांना मतदानाचा अमुल्य अधिकार प्राप्त झाला आहे. या अधिकाराचा वापर करुन लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदान करावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज येथे केले.

भारत निवडणूक आयोगाच्याच्यावतीने मतदान प्रक्रियेच्या जनजागृतीसाठी दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,पुणे, मतदार नोंदणी अधिकारी 209-शिवाजीनगर,211-खडकवासला आणि 214-कँटोनमेंट मतदार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथालय इमारतीमध्ये आयोजित कार्यक्रमात विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, उपजिल्हानिवडणूक अधिकारी मोनिका सिंग, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.बी.आहुजा, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, जलतरणपटू सुयश जाधव, अभिनेता रमेश परदेशी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.म्हैसेकर यांनी, सुशिक्षीत मतदार, निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन मतदानाची टक्केवारी वाढवावी असे सांगितले. खऱ्या अर्थाने प्रातिनिधिक सरकारसाठी शंभर टक्के मतदान होणे आवश्यक असून मतदान जागृतीसाठी भविष्यात मोहिम राबविण्याची वेळ येणार नाही, अशा पध्दतीने प्रत्येक नागरिकाने स्वयंजबाबदारीने मतदान करायला हवे, असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी, मोठया संघर्षानंतर नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला असून लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी सर्वांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडावे असे सांगितले. मतदानातील उदासीनता टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भरघोस मतदान होते, त्याचप्रमाणे नागरिकांनी विधानसभा व लोकसभा निवडणूकीत भरघोस मतदान करावे असे आवाहन केले.
जलतरणपटू सुयश जाधव, अभिनेता रमेश परदेशी यांनी युवकांनी मतदानाविषयी जागृत रहावे असे सांगितले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी प्रास्ताविकात, जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात आलेल्या मतदार नेांदणी मोहिमेची माहिती दिली. मतदार यादीमध्ये नांव नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी जागरुक राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मतदार नोंदणी मोहिमेमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मतदार नोंदणी अधिकारी स्नेहल बर्गे, सुषमा चौधरी, रोहिणी घाडगे, वर्षा सकपाळ यांच्यासह सानिका कुलकर्णी, तीर्थ पुराणिक, संस्कृती माटे, प्रणव चाळके व रेणूका पाटील या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्व या विषयावर माहिती दर्शविणाऱ्या फलकांसह बोट क्लब सभागृह-जुना मुंबई पुणे महामार्ग-गुन्हे अन्वेषण विभाग कार्यालय-अभियांत्रिकी महाविद्यालय या दरम्यान रॅली काढून प्रबोधन केले. कार्यक्रमाला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम प्राधान्याने करणार – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर.
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी द्यावी – ऊर्जामंत्री
मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन, वीजजोडणीसाठी २ हजार शेतकऱ्यांचे अर्ज
मुंबई -मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी द्यावी. आदिवासी भागात वीजजोडणीची मागणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्राधान्याने वीजजोडणी द्यावी. तसेच या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्री, जिल्हापरिषद अध्यक्ष व स्थानिक लोकप्रतिनिधींशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे निर्देश ऊर्जामंत्री . चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे दिले. यावेळी त्यांच्याहस्ते शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. ही मार्गदर्शन पुस्तिका शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केला.
या प्रकाशन समारंभात प्रधान सचिव (ऊर्जा) श्री. अरविंद सिंह व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार व्हिडीओ कॉन्फेरेसिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. याप्रसंगी श्री. संजीव कुमार यांनी योजनेच्या यशस्वीतेसाठी व शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्जाच्या संदर्भात मदत करण्यासाठी स्थानिक कार्यालयात एका पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे निर्देश सर्व मुख्य अभियंत्यांना दिले.
शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शन पुस्तिकेत योजनेबाबतची संपूर्ण माहिती, पात्र लाभार्थ्यांसाठी अर्ज करण्याची पध्दत, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची माहिती, कृषिपंप लावण्यासाठी जागेच्या निवडीबाबतची माहिती, सौर कृषीपंप लावण्याचे फायदे तसेच त्यासाठी अर्जदाराने भरावयाची रक्कम इत्यादि महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या मनात आलेल्या विविध शंकांचे निरसन माहिती पुस्तिकेद्वारे करण्यात येईल.
राज्यातील शेतकऱ्यांना दिवसाही सिंचनासाठी वीज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना जाहीर केली असून या योजनेची अंमलबजावणी महावितरणतर्फे करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा लाभ घेत दि. २३ जानेवारी २०१९ पर्यन्त राज्यातील सुमारे २ हजार १९० शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
सरकारने रेडीरेकनर दरांमध्ये कृत्रिम वाढ करू नये – क्रेडाई
पुणे – बांधकाम व्यवसाय विविध कारणांमुळे गंभीर अडचणींना सामोरे जात असल्याने महराष्ट्र सरकारने यंदा रेडी रेकनरचे दर वाढवू नयेत. उलट काही ठिकाणी ते कमी केले पाहिजेत. रेडी रेकनरचे दर कायम ठेवल्यामुळे महसुलात तोटा येणार नाही, असे क्रेडाई महाराष्ट्र म्हटले आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने धोरण निर्माते व विधिमंडळ सदस्यांपुढे सादरीकरण करण्यात आले. क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी संघटनेच्या वतीने या संदर्भात निवेदन प्रसिद्ध केले आहे.
“राज्य सरकारसहित सर्वांना माहीत आहे, की बांधकाम उद्योग सध्या विविध कारणांमुळे कठीण काळातून जात आहे. यात रेरा, जीएसटीचा चढा दर, आर्थिक सुधारणा, गैरबॅंकिंग वित्तीय कंपन्यांच्या अडचणी,बाजारातील मागणी व पुरवठा यातील फरक इत्यादी कारणांचा समावेश आहे. त्यामुळे यंदा रेडीरेकनरमध्ये वाढ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सरकार कृत्रिमपणे वाढ करू शकत नाही. खरे तर क्रेडाईने सध्याचा एएसआर दर (ॲन्युअल शेड्यूल ऑफ रेट्स) कायम ठेवण्याचीच नव्हे, तर गेल्या वर्षी कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीद्वारे मिळालेल्या अधिकारांचा वापर करून त्यात योग्य ठिकाणी कपात करण्याचीही मागणी केली आहे,”असे या निवेदनात म्हटले आहे.
एएसआरमधील वाढीमुळे केवळ मुद्रांक शुल्क वाढते असे नव्हे तर त्यामुळे प्रीमियम, कामगार अधिभार, लेव्ही आणि इतर करही वाढतात. निष्पक्ष आणि न्याय प्रणालीच्या दृष्टीने जिथे व्यवहार होत नाहीत किंवा कमी दराने व्यवहार होतात अशा विशिष्ट ठिकाणी खास लक्ष देऊन एएसआरचे दर कमी करायला हवेत.त्यामुळे घरांच्या किंमती अवाक्यात येऊन त्यांची विक्री वाढेल तसेच राज्याला महसूलही मिळेल. एएसआरच्या चढ्या दरामुळे सध्या हे घडत नाही,असे क्रेडाईचे म्हणणे आहे.
संघटनेच्या वतीने एएसआरच्या फूटनोट्सकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. “फूटनोट्स हे अप्रत्यक्षरीत्या एएसआरमध्ये वाढ करण्याचे दुसरे साधन असून संघटनेने सतत मागणी आणि पाठपुरावा केल्यानंतरही सरकारने यात आवश्यक ते बदल केलेले नाहीत.संघटनेने याबाबत आधीच सरकारपुढे आपले म्हणणे मांडलेले आहे आणि यावेळी सरकारने त्यात निश्चित लक्ष घालायचे मान्य केले आहे.फूटनोट्समुळे होणाऱ्या अन्यायकारक दीर्घकाळापासून प्रलंबित मुद्द्याचे यावेळी निराकरण होण्याची अपेक्षा आहे,” असे क्रेडाईने म्हटले आहे.
संघटनेच्या वतीने इतर काही मागण्याही करण्यात आल्या आहेत.
१. सरकारने प्रत्येक मालमत्तेचे एएसआर दर ठरविण्यासाठी शास्त्रीय सूक्ष्मयंत्रणा पद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलावीत.
२.सरकारने सरासरी दर प्रणाली पूर्णपणे रद्द करून ती सर्वात कमी दराच्या आधारे निश्चित करावी.
३. एएसआरचे दर तीन वर्षांनीच ठरविण्यात यावेत.
४. दर निश्चित करण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक असावी
५. जीएसटी अस्तित्वात आल्यामुळे स्थानिक संस्था कर रद्द व्हावा, यामुख्य मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
गेल्या ६ वर्षात ५ वेळा एएसआरचे दर वाढले आहेत, परिणामस्वरूप एकंदरीत एएसआरमधील दर दुप्पट झाले आहेत. प्रत्यक्षात परिस्थिती तशी नसून गेल्या ६ वर्षात घरांचे दर स्थिर असून मागणीत घट झाली आहे.
वर्ष २०१८-२०१९ दरम्यानच्या महसुलाचा हवाला देत वरील बाबींची अंमलबजावणी केल्याने राज्य सरकारचा महसूल कमी होणार नाही, असे क्रेडाईने म्हटले आहे. वर्ष २०१८-२०१९ मध्ये एएसआरचे दर कायम असतानाही सरकारचे उत्पन्न वाढले आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
असा ही आदर्शपणा.
हेल्मेट सक्ती -लोकप्रतिनिधींसह पोलीसांविरोधात वाढता असंतोष (व्हिडीओ)
पुणे-आज पत्रकार भवन शेजारील ब्लड बँकेच्या आवारात झालेल्या हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीच्या बैठकीत विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात मोठा असंतोष व्यक्त करण्यात आला. आणि येत्या 1 तारखेला टिळक पुतळयानजीक तीव्र निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला . या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना संभाजी ब्रिगेड ने ..आता या लोकप्रतिनिधींना ब्रिगेडी हिसका दावण्याची वेळ आल्याचा इशारा दिला तर मराठा नेते राजेंद्र कोंढरे यांनी आमदारांनी अजूनही वेळीच शहाणे व्हावे अन्यथा त्यांना फिरू देणार नाही असा इशारा दिला .
अंकुश काकडे,शांतीलाल सुरतवाला, संदीप खर्डेकर ,संतोष शिंदे ,विवेक वेलणकर ,रुपाली पाटील,मनीषा कावेडिया ,शिवा मंत्री ,बाळासाहेब रुणवाल ,बाळासाहेब अमराळे ,एडविन रॉबर्ट,धनंजय जाधव आदी शंभरावर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .
बैठकीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नगरसेवक,आमदार ,खासदार हे लोकप्रतिनिधी हेल्मेट सक्ती च्या विरोधात काहीही करत नसून निव्वळ चापलुसी चे धोरण स्वीकारत असल्याची टीका सर्वांनी केली . भाजपच्या गिरीश बापट, योगेश गोगावले यांच्यासह सर्व पक्षांच्या नगरसेवकांवर जोरदार आसूड ओढण्यात आले. तर अंकुश काकडे यांनी लोकांनी स्वतः हून आंदोलनात आले पाहिजे . निव्वळ राजकीय प्रतिनिधींवर अवलंबून राहता कामा नये .आणि आपल्याला अटक झाली तर होऊ द्यात पण एकदाचे वाहतूक पोलीस उपायुक्तांपुढे ठिय्या धरून बस अशी सूचना केली .शान्तिलाला सुरतवाला यांनी आंदोलनाचे भय जोवर वाटत नाही तोवर सरकार हलणार नाही ,आंदोलन करायचेच असेल तर शासन हलेल असे आंदोलन केले पाहिजे अशी सूचना केली.व्विवेक वेलणकर ,राजेंद्र कोंढरे ,एडविन रॉबर्ट,मनीषा कावेडिया यांच्यासह येथे आलेल्या अनेकांनी पोलिसांकडून होणाऱ्या जाचाची माहिती यावेळी दिली. तर एका तरुणाने आपल्याला , पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केली .या साऱ्या बैठकीचा वृत्तांत साध्या वेशातील पोलिसांच्या करवी याठिकाणी लिहून घेण्यात येत होता .
बैठकीनंतर मराठा नेते राजेंद्र कोंढरे ,संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे ,कॉंग्रेसच्या व्यापारी सेलचे बाळासाहेब अमराळे ,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शिवा मंत्री आदींनी माध्यमांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला .


