Home Blog Page 2991

शिवसेना- युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

0
पुणे :शिवसेना- युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्या उपस्थितीत या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्र साहित्य कला व सांस्कृतिक विभाग अध्यक्ष सनी मानकर यांच्या वतीने झालेला कार्यक्रम बारामती हॉस्टेल, पुणे येथे शनिवारी सकाळी झाला.
दुर्गेश शेडगे, संकेत शेडगे, पुष्कर बोडके, शुभम माने, अनिल नाईक, शुभम मते, सुजीत कदम या पुणे शहर शिवसेना- युवासेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षाला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
या प्रवेश सत्रामुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे. निवडणुकीच्या पार्शवभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांचा हा प्रयोग बंडखोरीला प्रोत्साहन देणारा ठरण्याची शक्‍यता निर्माण करू शकतो, हे या पक्ष प्रवेशातून स्पष्ट दिसते. यावेळी स्वप्निल खवले, शुभम मातेले, आकाश म्होकर, श्रीकांत बालघरे, सनी पवार, सचिन भोसले, अनिकेत म्होकर, रोहित पळसकर, अक्षय मांडेकर, ओमकार ठोंबरे व रोहन रासकर उपस्थित होते.

मुळशीसाठी विकासाचा पुणे पॅटर्न राबवणार : गिरीश बापट

0

पुणे-पुण्यालगत असणाऱ्या मुळशी तालुक्यात विकास प्रकल्पांचे जाळे निर्माण करून मुळशी साठी विकासाचा पुणे पॅटर्न वापरणार असल्याचे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी व्यक्त केले. बंटाराभवन येथे ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या  समारंभात ते बोलत होते.  हिंजवडी, माण, बाणेर, नांदे, सूस, सुतारवाडी, महाळुंगे, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी येथील ग्रामस्थांनी हा समारंभ आयोजित केला होता.  माजी खासदार नानासाहेब नवले, प्रतापराव पवार, नगरसेवक अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील, उमेश गायकवाड, हिंजवडीच्या सरपंच स्मिताताई जांभुळकर,उपसरपंच राहुल जांभुळकर, माण गावच्या सरपंच स्मिताताई जांभूळकर, उपसरपंच सपनाताई वाडकर, नांदे सरपंच बाळासाहेब रानवडे, उपसरपंच कविता माकर, सुस सरपंच अपूर्वा निकाळजे, उपसरपंच गजानन चांदेरे,महाळुंगे सरपंच तुळशीराम भांडे, उपसरपंच पांडुरंग पाडाळे, कीर्तनकार चंद्रकांत महाराज वांजळे, हिंजवडी इंडस्ट्रीज असोशिएशनचे अध्यक्ष सतीश पै यावेळी  उपस्थित होते.

 बापट म्हणाले की , देशातील एक प्रमुख आय.टी केंद्र म्हणून हिंजवडीची ओळख आहे. हिंजवडी मधील ग्रामस्थ तसेच आयटीयन्स येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त होते. ती कोंडी कमी करण्यासाठी चांदे, नांदे,मान असे पर्यायी रस्ते करण्यात येत आहेत,  आम्ही  हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाची परवानगी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. आता ते काम सुरु झाले आहे. ही मेट्रो सुरु करणे हे माझे स्वप्न होते. या भागाचा शाश्वत विकास करण्याचा आमचा मानस आहे. मात्र हा विकास करताना शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही. असे आम्हाला वाटते. इथला शेतकरी उद्योजक व्हावा, बिल्डर व्हावा असा आमचा प्रयत्न आहे. शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे. या परिसराचा विकास आराखडा तयार करून त्याच्या अंमलबजावणीसाठी सिंगापूरच्या कंपनी सोबत करार झाला आहे. गावातील अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी, पाणीपुरवठा योजना सुरु करुन या भागाच्या विकासासाठी आम्ही  प्रयत्नशील  राहू.

ग्रामस्थांच्या वतीने येणाऱ्या सूचना तसेच आमचा कालबद्ध कार्यक्रम यांचा मेळ घालून या गावांचा विकास करण्याचा पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न राहील.

प्रतापराव पवार यांनी या भागात सुरु असलेल्या विकासकामांचे कौतुक केले. गिरीश बापट हे एक कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ता हा नेहमी समाजाचा विचार करत असतो. तो त्याच्या फायद्याचा विचार करत नसतो व असा विचार करणारे कार्यकर्तेच मोठे होत असतात असे मत त्यांनी  व्यक्त केले.

माजी खासदार नानासाहेब नवले यांनी या भागात सुरु असलेल्या विकासकामांबाबत समाधान व्यक्त करत, विकासासाठी बापट यांनी हाती घेतलेली कामे लवकर पूर्ण व्हावी.  अशी अपेक्षा व्यक्त केली.

हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे डॉ.सतीश पै यांनी  तीन वर्षांपूर्वी हिंजवडी असोसिएशनच्या वतीने आमच्या समस्या घेऊन पालकमंत्र्यांना भेटायला गेलो होतो, त्यातील बहुतांश समस्या सुटत आल्या आहेत. या साठी बापट यांनी प्रयत्न केल्याचे सांगून त्यांचे आभार मानले. या मुळे हिंजवडी आयटी क्षेत्रामध्ये 50 हजार नवीन नोकऱ्या तयार होतील असे ते म्हणाले .

 चंद्रकांत महाराज वांजळे यांनी ग्रामीण भागाचे शहरी भागात रूपांतर होत असताना कशा प्रकारे विकास झाला पाहिजे. याचे मूर्तिमंत उदाहरण या गावातून आपल्याला पाहायला मिळते असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमात 1000 कुटुंबियांना रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामस्थांच्या वतीने विकासाच्या दृष्टीने सूचना मागवण्यात आल्या.

सत्कार स्वीकारण्यास बापट यांचा नकार

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येणारा सत्कार स्विकारण्यास बापट यांनी नकार दिला. सत्कार समारंभाला फाटा देऊन या भागाचा विकास करण्यासाठी  भविष्यात आणखी काय करावे लागेल, याबाबत या बैठकीत ग्रामस्थांशी बापट यांनी चर्चा केली. यातून पालकमंत्र्यांची संवेदनशीलता अधोरेखित होते.

पाकिस्तानचा झेंडा जाळून केला पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध, कलम ३७० रद्दकरण्याची मागणी

0
मुंबई. भारतीय जनता पक्षाचे नेते मंगल प्रभात लोढा यांनी पंतप्रधानांशी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करावे, अशी मागणी करत मुंबईतील ग्रँट रोड येथील नाना चौकात पाकिस्तनचा झेंडा जाळला आहे. लोढा यांनी मुंबईतील जिन्ना हाउस येथेही पाकिस्तानचा झेंडा जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना थांबविले.
पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर आमदार मंगल प्रभात लोढा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्याची मागणी केली असून जम्मू-काश्मीरमधील भारतीय सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे समस्त देशवासीयांच्या मनात संतापाची भावना असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानाच्या या भ्याड कृत्याची निंदा करत संपूर्ण देश आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपल्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची एक मजबूत प्रतिमा निर्माण झाली असून हे सिद्ध झाले आहे की, भारत एक अतिशय बलवान देश आहे आणि सर्व प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहे.
ताजा घडामोडींचा विचार करता आपणास विनंती आहे की, काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून तिथे व्यावसायिक आणि औद्योगिक विकासासाठी विशेष पॅकेजची घोषणा करावी, जेणेकरून तेथील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होईल. कलम ३७० रद्द करणे ही काळाची मागणी आहे. या मागणीकडे विशेष लक्ष द्या अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली आहे. आपण आजवर देशाच्या हितासाठी अनेक कठीण निर्णय घेतले आहेत. ज्यामुळे देश अधिक बळकट आणि सक्षम झाला आहे. आपल्या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमधील तरुणांना रोजगार सोबतच विकासाची एक नवीन दिशा मिळेल, तसेच काश्मीर मधील ३७० कलम रद्द केल्याने कोट्यावधी भारतीयांची वर्षानुवर्षापासून असलेली मागणीला न्याय मिळणार असल्याचे ते म्हटले आहे.
पाकिस्तानी अतिरेक्यांच्या या भ्याड कृत्याचा निषेध करण्यासाठी आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नागरिक आपला रोष व्यक्त करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी जमलेल्या नागरिकांनी पाकिस्तान विरोधी घोषणा देत आपला रोष व्यक्त केला असून पंतप्रधानांना पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली आहे.

अपना टाईम आयेगा

0

बॉलीवूडच्या टिपीकल झगमगाटात न रमता आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न मोजकेच दिग्दर्शक करतात. यामध्ये झोया अख्तरचे नाव प्राधान्याने येते. तिने यावेळी आपल्या झोनच्या पलीकडे जात एक वेगळा, फुल्ल टू एनर्जी असलेला ‘गलीबॉय’ प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. रणवीर सिंह आणि आलीया भटने कमाल अभिनय केलेले हा‘गलीबॉय’ मनाला भावतो.

‘गलीबॉय’ ही कथा आहे, मुंबईतील धारावी १७ मध्ये राहणाऱ्या मुराद (रणवीर सिंह) या महावियायालीन मुलाच्या संघर्षाची आणि जिद्दीची. झोपडपट्टीत वास्तव्यास असलेल्या मुरादला आपल्या गरिबीवर मात करायची आहे, त्यासाठी काय करावं याबद्दल त्याला फारसं काही माहीत नाही. मात्र स्वतःचं अस्तित्व शोधताना त्याला व्यक्त होण्याचा एका मार्ग सापडतो तो म्हणजे लिखाण. ग्रज्युएशनच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या मुरादला एक मैत्रीण आहे सफीना (आलिया भट्ट), ती एका श्रीमंत घरातली मुलगी असून ती सर्जन होणार आहे. दरम्यान मुरादचे वडील (विजय राज) दुसरं लग्न करतात. आईची होणारी फडफड तो पाहतो. पण वडिलांसमोर बोलायची त्याची हिंमत नाही. दरम्यान, मुरादच्या कॉलेजमध्ये रॅपर एमसी शेर (सिद्धांत चतुर्वेदी) येतो. या दिवसापासून त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळायला लागते, कारण आपण जे लिखाण करतो ते म्हणजे रॅप असल्याची जाणीव त्याला होते. मग आपणही एमसी शेर सारखे व्हावे असे मुरादला वाटते. दरम्यान त्याची ओळख म्युझिक प्रोग्रामर स्कायशी (कल्की कोचलीन) होते. मात्र नोकरी की रॅप या द्विधा मनःस्थितीत तो असतो. मुराद त्याचं रॅपर व्हायचं स्वप्न कसं पूर्ण करतो का? हे जाणून घेण्यासाठी एकदा ‘गली बॉय’  पाहायला हवा.

झोया अख्तरचं दिग्दर्शन अप्रतिम झाल आहे’. ‘गलीबॉय’ साकारताना कुठेही केवळ ती एका मुलाची कथा रहात नाही तर ती अख्ख्या पिढीची गोष्ट होते. या चित्रपटाची कथा पक्की आहे. पटकथा तर इतकी नेमकी आहे की सिनेमाच्या सुरुवातीपासनं ते शेवटापर्यंत आपल्याला खिळवून ठेवते आणि संवादांची तर गोष्टच वेगळी. इतके सहज संवाद आहेत की चित्रपट कधी आपल्या मनात बोलका होतो ते कळतच नाही. या चित्रपटाचा गाभा म्हणजे त्याची संवेदनशीलता आणि ती फार सुंदर जपली आहे. त्याला साथ लाभलीय उत्तम कॅमेरावर्कची.

कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर  रणवीर सिंहने कमाल केली आहे,  त्याला  याला कुठच्याही भूमिकेत बसवलं तरीही तो त्या भूमिकेचाच होतो. रणवीर सिंगने ही बेभान भूमिका इतकी संयतपणे साकारली आहे की काही क्षण स्वतःला विसरावं आणि मनापासनं त्या व्यक्तिरेखेच्या पेमात पडावं. आलिया भटचा अत्यंत सहज, मोकळा वावर तिच्या प्रेमातच पाडतो. तिचा पेहराव, देहबोली आणि आक्रमक, क्रांतीकारी वृत्ती यातली तफावत अक्षरशः अचंबित करते.  एमसी शेर अर्थात सिद्धांत चतुर्वेदीही लक्षात राहतो. अनेक सीन्समध्ये रणवीरवर आलिया आणि सिद्धांत भारी पडलेले दिसतात. मिळालेल्या संधीचं सोनं कसं करावं हे सिद्धांतकडे पाहून कळतं. विजय राज, अमृता सुभाष, कल्की कोचलीन, विजय मौर्या यांनी आपली कामे चोख बजावली आहेत.

रॅपरच्या आयुष्यावर सिनेमा म्हटल्यावर त्यात उत्तम गाणी आणि कविता असणार यात शंका नाही, ‘शंकर- एहसान- लॉय’ यांच्या संगीताने सिनेमाला चार चाँद लावले आहेत. अपना टाईम आयेगा या गाण्याने  सिनेमाच्या रिलीजच्या आधीपासूनच तरुणांची मनं जिकंली आहेत. सिनेमाचे बॅकग्राऊंड स्कोर आणि विजुअल्स हॉलिवूडच्या तोडीचे आहेत.

थोडक्यात सांगायचे तर ‘कोई दुसरा अपुन को आके बोलेगा के मै क्या है… अपून भी कुछ है… अपुन की भी औकात है…असं ज्यांना वाटते त्या प्रत्येकाचा हा चित्रपट आहे.

चित्रपट – गलीबॉय

निर्मिती – रितेश सिधवानी,   फरहान अख्तर

दिग्दर्शक- झोया अख्तर

संगीत – शंकर – एहसान – लॉय

कलाकार- रणवीर सिंह, आलिया भट्ट, सिद्धांत चतुर्वेदी, विजय राज, अमृता सुभाष, कल्की कोचलिन, विजय मौर्या, ज्योती सुभाष

रेटिंग – ३.५

–     भूपाल पंडित

प्रेरणादायी ‘आनंदी गोपाळ’

0

एकोणीसाव्या शतकात भारतात सामाजिक सुधारणा होण्यास सुरुवात झाली. या काळात स्त्रियांना शिक्षण दिले जात नसे, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मोठ्या संघर्षातून मुलींसाठी शाळा सुरु केली होती, मात्र समाजाच्या मानसिकते मध्ये अजूनही फार बदल झालेला नव्हता अशा परिस्थितीत एका स्त्री ने डॉक्टर होण्याचे स्वप्न बघितले आणि तिच्या पतीने ते पूर्णत्वास नेले. स्त्री शिक्षण म्हणजे व्याभिचाराला निमंत्रण असे समजले जायचे त्या काळात सातासमुद्रापार जाउन डॉक्टरेट मिळविण्यासाठी एका महिनेने आणि तिच्या पतीने म्हणजेच आनंदीबाई आणि गोपाळराव यांनी जो सामाजिक संघर्ष केला त्याची कथा म्हणजे समीर विद्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट होय.

दहा – बारा वर्षाच्या यमुना साठी  तिचे आईवडील वर संशोधन करत आहेत.  सोमण बुवा यमुनासाठी पोस्टात काम करणाऱ्या गोपाळराव जोशीचं (ललित प्रभाकर) स्थळ घेऊन येतात. बिजवर असलेल्या गोपाळरावांचा हुंडा, मानपान अशा गोष्टीना विरोध आहे. लग्नासाठी. फक्त त्यांची एक अट असते, ती म्हणजे मुलीला लिहिता वाचता यायला हवं. त्यानंतर गोपळरावाशी लग्न करून यमूना आनंदीबाई गोपाळराव जोशी बनते. यमुनाचे आई वडील मनातून मात्र स्त्री शिक्षण म्हणजे व्यभिचाराला आमंत्रण असे मानणारे आहेत यामुळे तिच्या शिक्षणात अडथळे निर्माण करतात. मात्र,गोपाळरावांच्या हट्टीपणापुढे त्यांचे काही चालत नाही आणि आनंदीचे प्राथमिक शिक्षण सुरू होते.

दरम्यान गोपाळरावांची अलिबागला बदली होते, येथे  दोघांचा संसार आणि अभ्यास दोन्ही सुरू होतो. मात्र, त्याचवेळी गोपाळरावांच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांचे  निधन होते. त्यामुळे ते त्यांच्या पहिल्या पत्नीपासूनचा मुलगा कृष्णा आणि सासूबाई (गीतांजली कुलकर्णी) यांना घरी घेऊन येतात. याच काळात या जोडप्याला मुल होते मात्र आजारपणामुळे ते दगावते, या घटनेतून सावरताना त्या डॉक्टर होण्याचा निर्णय घेतात, गोपाळराव त्यांना पाठिंबा देतात मात्र, त्यासाठी या जोडप्याला जो संघर्ष करावा लागतो तो जाणून घेण्यासाठी ‘आनंदी गोपाळ’ बघायला हवा.

या चित्रपटाची कथा वास्तव आहे, चित्रपटात १८६५  ते १८८७  चा काळ दिसतो. मुळातच ही गोष्ट फक्त आनंदीबाईंची नाही, तर ती त्यांना खंबीर आणि अमूल्य साथ देणाऱ्या त्यांच्या पतीची- गोपाळरावांचीही आहे. दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी या जोडप्याचा संघर्ष मांडण्याचा प्रयत्न केला असला तरी तो काहीसा वरवरचा वाटतो. चित्रपटात संवाद चांगले आहे, त्या काळातील बोली भाषेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी कथेचा वेग मंदावला आहे. मध्यंतरानंतर आनंदीबाईंचा अमेरिकेतील वास्तव्याचा भाग सविस्तरपणे आला असता तर चित्रपट अधिक प्रभावी ठरला असता. चित्रपटाची तांत्रिक बाजू भक्कम आहे.

कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर गोपाळरावांचा तऱ्हेवाईकपणा, संतापी वृत्ती, जिद्द हे सारं ललितने चांगले साकारले आहे. भाग्यश्री मिलिंदने आनंदीबाई व्यक्तिरेखांच्या जवळ जाण्याचा चांगला प्रयत्न केला आहे., गीतांजली कुलकर्णी यांची भूमिका लक्षवेधून घेते, इतर कलाकारांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

हृषीकेश – सौरभ – जसराज यांचे संगीत ही सुद्धा जमेची बाजू आहे, आनंदीबाईंचा प्रवास दाखवणारे  “रंग माळियेला”,नाचरे अवखळ “वाटा वाटा”, स्फूर्तिदायक “माझे माऊली” , शांत भासणारे  “मम पाऊली” आणि शेवटी येणारे  “तू आहेस ना” ही गाणी प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालतात.

एकंदरीत सांगायचे आजची स्मार्ट स्त्री विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करते. कुटुंब, पाल्यांची जडण-घडण करण्यात तिचा मोठा वाटा आहे. परंतु सुमारे १३० वर्षा पूर्वी स्त्री शिक्षण हा विचार करणे सुद्धा पाप मानले जायचे,अशा काळात गोपाळराव जोशी यांनी पत्नी आनंदीबाईचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेले. या यातून आजच्या पिढीला प्रेरणा मिळेल.

चित्रपट – आनंदी गोपाळ

निर्मिती – . झी स्टुडीओज, फ्रेश लाईम फिल्मस्, नमः पिक्चर्स

दिग्दर्शक – समीर विद्वांस

संगीत – हृषीकेश – सौरभ – जसराज

कलाकार – ललित प्रभाकर, भाग्यश्री मिलिंद, गीतांजली कुलकर्णी, क्षिती जोग, योगेश सोमण

रेटिंग – ***

-भूपाल पंडित

पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने मोर्चा

0

पुणे- ऑल इंडिया मुस्लिम ओ. बी. सी. ऑर्गनायझेशन व पुणे शहर मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे लष्कर भागात महात्मा गांधी रोडवरील गुरु वजीर भगत संघेलिया चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. या निषेध मोर्चामध्ये मुस्लिम समाजामधील सिया पंथीय मुस्लिम इराणी मुस्लिम बलुची तबलिक जमात बांधव व मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते .

या मोर्चामध्ये मुस्लिम बांधवानी काळ्या फिती बांधल्या होत्या . तसेच पाकिस्तान मुर्दाबाद ,दहशतवाद मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या . इस्लाम धर्म कोणत्याही दहशतवादाला समर्थन करत नाही हे दाखविण्याकरिता समस्त मुस्लिम समाज दशतवादाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त केला . या हल्ल्यामधील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी मुस्लिम समाज मस्जिद मधून आर्थिक निधी गोळा करणार आहे . हा निधी शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार आहेत अशी माहिती ऑल इंडिया मुस्लिम ओ. बी. सी. ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष इकबाल अन्सारी यांनी दिली 

या निषेध मोर्चामध्ये खासदार संजय काकडे ,इकबाल अन्सारी जावेद खान अमीन शेख मुस्ताक अलबुशरा माजी नगरसेवक मंजूर शेख ,बाप्पुसाहेब भोसले ,  भारत कांबळे माजी नगरसेवक मंजूर शेख ,अमानुल्ला खान मुस्ताक पटेल हाजी उस्मान तांबोळी अफसर कुरेशी हाजी नदाफ सादिक कुरेशी,वाहिद बियाबानी अतिक रियाझ खान रियाझ काझी सालेम खान आयमान दरबार ,मतीन मुजावर,  अली इनामदार रफीउद्दीन शेख मुन्नावर कुरेशी नईम शेख शेर अली शेख अबूशेठ तांबे सय्यद मुनीर मिर्झा रिझवान सय्यद वस्ताद अफझल शेख बशीर शेख जावेद शेख शाहरुख मिर्झा  बेग ,फुरकान शेख अझहर शेख मुझफर शेख अबिद शेख मज्जू शेख धनंजय उरुड व मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते .

यावेळी  डॉ.  बाबासाहेब आंबेडकर चौकात पाकिस्तानच्या ध्वजाचे दहन करून हल्ल्याचा निषेध करण्यात आला . पाकिस्तानविरोधात घोषणा देण्यात आल्या . या निषेध रॅलीचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आली . 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वतीने शिवजयंती महोत्सव

0
जुन्नर /आनंद कांबळे
  पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वतीने शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.  छत्रपती शिवरायांच्या जीवनावर  आधारित प्रसिद्ध शाहीर, रायगड भूषण वैभव घरत यांचा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी व प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देत कार्यक्रमाला दाद दिली. असा कार्यक्रम पंचायत समिती जुन्नरचे वतीने प्रथमच आयोजित केल्याबद्दल उपस्थितांनी गट विकास अधिकारी यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
      यावेळी वैभव घरत यांनी छत्रपती शिवरायांचे बालपण,  स्वराज्य निर्मितीची संकल्पना, छत्रपती संभाजी राजे यांचे स्वराज्य सरंक्षण कार्य, विविध पराक्रम व लढाईचे वर्णन, गड संवर्धन, पर्यावरण रक्षण, लेक वाचवा लेक शिकवा, स्त्री भ्रूण हत्या या विषयांवर पोवाडे सादर केले.
         यावेळी पंचायत समिती सदस्य शाम माळी, गट विकास अधिकारी विकास दांगट,  सहायक गट विकास अधिकारी हेमंत गरिबे,  पशुधन विकास अधिकारी डॉ अविनाश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ उमेश गोडे, गट शिक्षणाधिकारी पी एस मेमाणे, बाल विकास प्रकल्प अधिकारी एच एम हाके यांसह जुन्नर शहरातील हायस्कूल मधील विद्यार्थी, महाविद्यालयाचे विद्यार्थी व आशा वर्कर्स, पंचायत समितीचे कर्मचारी व जुन्नर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          गट विकास अधिकारी विकास दांगट यांच्या हस्ते चांदीची तलवार देऊन घरत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन गट शिक्षणाधिकारी पी.एस.मेमाणे, कक्ष अधिकारी रामचंद्र तळपे, विस्तार अधिकारी के बी खोडदे, सहाय्यक लेखाधिकारी बी डी गाडेकर, सतिश शिंदे, संतोष भुजबळ, नितीन शेंडे, मुकुंद नांगरे यांनी केले.k

मुख्यमंत्र्याची सभा  ओझर येथे होणार-आमदार शरद सोनवणे 

0
जुन्नर /आनंद कांबळे
 शिवजयंतीच्या कार्यक्रमात राजकारण  करू नये , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ओझर येथे होणाऱ्या  सभेच्या  ठीकानी कोणताही बदल होणार नाही असे प्रतिपादन  आमदार शरद सोनवणे यांनी केले.जुन्नर येथे शिवजयंतीच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती देताना ते बोलत होते.  केंद्र शासनाच्या भारतमाता रस्ते जोडणी योजनेच्या अंतर्गत राज्यातील अष्टविनायक क्षेत्रांच्या 10 किमी परिघातील रस्ते दुपदरी करण्याची कामे सध्या सुरु आहेत त्याचा शुभारंभ  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात  यावे यासाठी नोव्हेंबर महिन्यापासून पाठपुरावा सुरू होता.   परंतु  शिवजयंतीच्या कार्यक्रमाला  येणार आहे त्याचवेळी अष्टविनायक क्षेत्रांच्या रस्त्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात यावा अशा मुख्यमंत्र्यांच्या सूचना होत्या. अष्टविनायक क्षेत्रांच्या रस्त्याच्या कामांसाठी जुन्नर तालुक्यासाठी 230 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.तसेच ब वर्ग पर्यटन क्षेत्र असलेल्या ओझर व लेण्याद्री  देवस्तान क्षेत्र विकासासाठी प्रत्येकी 25 लाख रुपये निधी  देण्याचे मुख्यमंत्र्याकडे प्रस्तावित आहे.तालुक्याच्या विकासासाठीच हा निधी उपलब्ध होणार आहे,आशा वेळी संधीचे सोने करायचे  का माती करायची  याचा विचार ओझर येथे सभा नको  याची मागणी करणाऱ्या  विरोधकांनी करावा .शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या   शासकीय बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.त्यावेळी मुख्यमंत्र्याच्या सभा ओझर येथे घेण्यात येणार याबाबत  सर्वांना अवगत केले होते,त्यावेळी कोणीही विरोध केला नव्हता. शिवजयंती कोण्या एका पक्षाची नाही.यात सर्वांनी सहभागी व्हावे,आमच्याकडुन याबाबत कोणत्याही प्रकारचे राजकारण केले  जात नाही असेही आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले.   छत्रपती शिवराय व शिवभुमीचा सन्मान करण्यासाठी मुख्यमंत्री येत आहेत.  आमदार शरद सोनवणे यांचा प्रयत्न आहे. म्हणून अष्टविनायक     कार्यक्रमात कोणताही बदल होणार नाही.     असे प्रतिपादन आमदार शरद सोनवणे  यांनी केले. जुन्नरमध्ये     दिनांक 19 रोजी किल्ले शिवनेरी येथे साजरा होणाऱ्या शिवजयंती उत्सवात  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव ,सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, शिक्षण मंत्री विनोद तावडे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे  जलसंपदा मंत्री विजय शिवतारे सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, आदी मान्यवर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.किल्ले शिवनेरीवरील सोहळा सँप्पन झाल्यावर  श्री क्षेत्र ओझर येथे या सर्व मान्यवरांची उपस्थिती मध्ये जाहीर सभा व शिवनेरी भूषण पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे .शिवजयंतीच्या औचित्याने किल्ले शिवनेरी येथे येणाऱ्या राज्यभरातील शिवप्रेमी करिता विविध सुविधा  उपलब्ध करून देण्यासाठी    विविध शासकीय विभागांना यावेळी सूचना देण्यात आल्या. शिवजयंती सोहळ्यासाठी मुख्य शासकीय कार्यक्रमात जागेअभावी,तसेच सुरक्षेसाठी शिवप्रेमीना प्रवेशपत्र असल्यावरच गडावर सोडण्यात येते.परिणामी पायथ्याशी मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी गडावर जाण्यासाठी तिष्ठत असतात ही गैरसोय टाळण्यासाठी  यावेळी  शिवनेरीवरील शिवजयंती सोहळ्याचे तीन ठिकाणी थेट प्रक्षेपण करण्याबाबतचा निर्णय   या बैठकीत घेण्यात आला.

शिवनेर भूषण पुरस्कार जाहीर – विविध क्षेत्रातील ३० व्यक्तींचा उल्लेखनीय कार्याबद्दल होणार गौरव

0
जुन्नर /आनंद कांबळे
 शिवजयंतीच्या औचित्याने शिवजन्मभूमीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तीस व्यक्ती व संस्थांना शिवनेरभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात  येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवनेरभूषण पुरस्कार १९ फेब्रुवारीला ओझर (ता. जुन्नर) येथे प्रदान  करणार असल्याची माहिती आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवरील   शासकीय सोहळा  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, शिक्षण मंत्री विनोद तावडे ,ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे ,जलसंपदा मंत्री विजय शिवतारे ,सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे,खासदार शिवाजीराव आढळराव  आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे  . त्यानंतर ओझर येथे    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केंद्र शासनाच्या भारतमाता रस्ते जोडणी योजनेच्या अंतर्गत राज्यातील अष्टविनायक क्षेत्रांच्या 10 किमी परिघातील रस्ते दुपदरी करण्याच्या   २३० कोटी रुपयांच्या विकासकामांचा  शुभारंभ  करण्यात येणार  आहे. ओझर येथे  होणाऱ्या सभेत  शिवनेरभुषण     पुरस्कारांचे वितरण होणार आहे. मानचिन्ह व पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  शिवनेर भूषण पुरस्काराचे मानकरी.
१. वै. हभप. कोंडाजीबाबा डेरे
२. वै. हभप. सहादूबाबा वायकर
३. वै. हभप. रामदासबाबा मनसुख
४. वै. महंत मोहनानंद गिरी महाराज
५. कै. आप्पासाहेब गेनूजी शिंदे
६. कै. गोविंद मोगाजी गारे
७. कै. रावसाहेब अनाजी बुट्टे
८. कै. विठाबाई नारायणगावकर
९. कै. बापूसाहेब लामखेडे
१०. हभप. सुदाम महाराज बनकर
११. श्री. बाळासाहेब सिताराम औटी
१२. श्री. संतोष भास्कर निंबाळकर
१३. समर्थ रूरल इन्स्टिट्यूट (शेळके बंधू)
१४. प्रा. दत्तात्रय सदाशिव काकडे
१५. श्री. विकास दांगट
१६. श्री. किशोर गेनभाऊ दांगट
१७. श्री. राहुल बनकर
१८. श्री. जयवंत डोके
१९. श्री. मंगेश घोडेकर
२०. श्री. राजीव विष्णू औटी
२१. श्री. आदिनाथ ज्ञानेश्वर चव्हाण
२२. श्री. रविंद्र रामचंद्र पाटे सर
२३. श्री. उदय सखाराम निरगुडकर
२४. ओझर गणपती देवस्थान ट्रस्ट (अध्यक्ष व सर्व विश्वस्त)
२५. लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट (अध्यक्ष व सर्व विश्वस्त)
२६. वडज देवस्थान ट्रस्ट (अध्यक्ष व सर्व विश्वस्त)
२७. ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट (अध्यक्ष व सर्व विश्वस्त)
२८. श्री. नितीन वामन सोनवणे
२९. श्री. विश्वासराव ढोबळे
३०. श्री. रामनाथ मेहेर सर

ध्येयपूर्तीसाठी सातत्य, परिश्रम आवश्यक- शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी

0
पुणे : “आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम, सातत्य आणि प्रामाणिकपणे काम करणे महत्त्वाचे असते. यशाच्या मार्गावर चालताना माणुसकी विसरु नये. शैक्षणिक प्रगतीबरोबरच स्वत:ला चांगला नागरिक घडविण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. आपल्या जडणघडणीत शाळा, शिक्षक व पालकांनी दिलेले योगदान विसरता कामा नये,” असा सल्ला राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी व्यक्त केले.
अ‍ॅमनोरा स्कूलच्या वतीने आयोजित दहावीतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम समारोपावेळी विशाल सोळंकी बोलत होते. प्रसंगी अ‍ॅमनोरा पार्क टाऊनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जे. के. भोसले, पीअर्सन इंडियाच्या उपसरव्यवस्थापिका निधी थापर, शाळेच्या प्राचार्या मीरा नायर, उपप्राचार्या मधुलिका शर्मा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक, क्रीडा आणि कौशल्याधारित उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
मीरा नायर म्हणाल्या, “भविष्यात विद्यार्थ्यांसमोर संधी आणि आव्हाने आहेत. धैर्याने या आव्हानांना सामोरे जात उपलब्ध संधीचा लाभ घेत स्वत:ला घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत. अ‍ॅमनोरा स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित प्रयत्न करते. विविध संस्थांकडून शाळेचा गौरव झालेला आहे. 2016-17 यावर्षी अ‍ॅमनोरा स्कूलमध्ये दहावीत असलेल्या राज आर्यन अग्रवाल या विद्यार्थ्याने 2019 च्या जेईई परिक्षेत 100 टक्के गुण मिळवत देशात दुसरा येण्याचा मान मिळवला आहे.”
यावेळी नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. कॅप्टन श्रेया संदुरकर हिने अ‍ॅमनोरा स्कूलमध्ये झालेल्या तिच्या प्रगतीबद्दल सांगितले. तनिषा जैन हिने स्वागत केले. पालकांच्या वतीने नंदन शानबाग यांनी मनोगत व्यक्त केले. मधुलिका शर्मा यांनी आभार मानले.

लहानगा जय शूर पित्याला शेवटचा निरोप देत असताना अनेकांना अश्रू अनावर झाले…

0

हजारोंच्या उपस्थितीत १६ राज्यांत अंत्ययात्रा

दिल्ली- पुलवामा येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांवर त्यांच्या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशातील १६ राज्यांतील अंत्ययात्रांत या शहिदांना अंतिम निरोप देण्यासाठी लाखो लोक सहभागी झाले होते. भारतमाता की जय आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत हातात तिरंगा घेतलेल्या लोकांनी साश्रुनयनांनी या शहिदांना अंतिम निरोप दिला.

सर्व विरोधी पक्षांनी दहशतवादाच्या विरोधात एकत्र येत सुरक्षा दलांबरोबर खांद्याला खांदा लावून उभे असल्याचे म्हटले आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरसह देशातील अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेतला. या बैठकीत भारत-पाक सीमेवरील परिस्थितीबाबतही चर्चा झाली. काश्मिरात सक्रिय अतिरेक्यांच्या धरपकडीसाठी आवश्यक ती पावले टाकण्याचे आदेश राजनाथ सिंह यांनी लष्कराला दिले. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृह सचिव राजीव गौबा आणि आयबीचे संचालक राजीव जैन उपस्थित होते.

कपिल शर्मा शोमधून सिद्धूला डच्चू 
– पुलवामा हल्ल्यावरून पाकिस्तानच्या बाजूने नरमाई दर्शवणारे पंजाबमधील कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना सोनी वाहिनीवरील कपिल शर्मा शोमधून बाहेर काढण्यात आले.
– अनेक राज्ये व शहरांतील काश्मिरी युवकांना किरायाचे घर सोडण्याचे सांगण्यात आले. काश्मीरबाहेरील युवकांना मिळत असलेल्या धमक्यांमुळे सरकारने हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले.
– मुरादाबाद येथील एमआयटी फार्मसी कॉलेजमध्ये शिकत असलेल्या काश्मिरी विद्यार्थी मुदस्सीर गनी याने सोशल मीडियावर पाकच्या समर्थनार्थ पोस्ट टाकली. भाजयुमो कार्यकर्त्यांनी शनिवारी कॉलेजमध्ये गोंधळ घातला, विद्यार्थ्यांना मारहाण केली.
– बंगळुरू येथे काश्मिरी विद्यार्थी आबिद मलिक यानेही सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली. त्याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला.

राजौरी : आयईडी स्फोटात मेजर शहीद 
जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा येथे नियंत्रण रेषेवर शनिवारी झालेल्या आयईडी स्फोटात लष्करातील मेजर श्रेणीचे चित्रेश बिष्ट शहीद झाले. संरक्षण सूत्रांनी सांगितले, राजौरी जिल्ह्यातील लाम भागात नियंत्रण रेषेवर ही घटना घडली.

फुटीरवाद्यांची सुरक्षा हटवणार 
पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयच्या संपर्कातील काश्मिरी फुटीरवादी नेत्यांची सुरक्षा काढून घेण्यात येणार आहे. केंद्राच्या सल्ल्यानुसार या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा राज्याचे गृह सचिव घेतील.

जवानांना विमानाने पाठवण्याचा प्रस्ताव गृहमंत्रालयात पडून 
काश्मीरमध्ये तैनात दलास ने-आण करण्यासाठी १ जानेवारी २०१८ रोजी सुरू केलेली विमानसेवा ३१ जुलै २०१८ रोजी बंद झाली. ती पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव गृहमंत्रालयात चार महिन्यांपासून पडून आहे. ४ फेब्रुवारीला हिमवृष्टीमुळे जम्मूत अडकलेल्या जवानांना श्रीनगरला विमानाने पाठवण्याची परवानगी मागितली होती. मात्र, काहीच उत्तर न आल्याने १४ फेब्रुवारीला हा ताफा श्रीनगरला वाहनांनी रवाना झाला आणि हल्ला झाला.

शांघाय सहकार्य संघटनेची बैठक स्थगित :

दरम्यान या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शांघाय सहकार्य संघटनेच्या ८ देशांची २५ फेब्रुवारीला आयोजित बैठक रद्द करण्यात आली आहे. यात चीन व पाकिस्तान सदस्य आहेत.

प्रत्येक अश्रूचा हिशेब घेऊ : पंतप्रधान मोदी 
शहीद कुटुंबीयांच्या प्रत्येक अश्रूचे योग्य उत्तर दिले जाईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पांढरकवडा (जि. यवतमाळ) आणि धुळ्यात दिला. भारत आता नवी धोरणे, रीतींचा देश आहे. जगाला याचा अनुभव येईल. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही. भारताच्या वाटेला कोणी आलेच तर त्याला सोडत नाही.

शहीद संजयसिंग राजपूत, नितीन राठोड यांना हजारोंच्या उपस्थितीत अंतिम निरोप 
सिंदखेडराजा/ मलकापूर । पुलवामा जिल्ह्यात शहीद झालेले बुलडाणा जिल्ह्यातील चोरपांग्रा गोवर्धननगर येथील नितीन राठोड व मलकापूर येथील शहीद संजयसिंग राजपूत यांच्या पार्थिवावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन राठोड यांच्या चितेला मुलगा जीवनने मुखाग्नी दिला. तर, मलकापूर येथे शहीद संजयसिंग राजपूत यांच्या चितेला मुलगा जय याने मुखाग्नी दिला. या शूर सैनिकांना परिसरातील हजारो लोकांनी साश्रू निरोप दिला. या वेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील आदी उपस्थित होते.

मुंबईत दुकाने बंद, रेल रोको 
पुलवामा हल्ल्याच्या विरोधात शनिवारी निदर्शकांनी पालघर जिल्ह्यात नालासोपारा स्टेशनवर रेल रोको केला. यामुळे या मार्गावरील वाहतूक तीन तास बंद राहिली. निदर्शकांनी पाकिस्तानच्या विरोधात घोषणा दिल्या. मुंबईत बहुतांश दुकाने बंद राहिली.

सर्व राजकीय पक्ष लष्कराच्या पाठीशी 
सर्व राजकीय पक्षांनी दहशतवादाच्या विरोधातील लढ्यात एकी दाखवली. सरकारतर्फे आयोजित सर्वपक्षीय बैठकीला सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्यांनी अतिरेकी हल्ला व त्याला सीमेपलीकडून मिळत असलेल्या मदतीचा निषेध केला. सर्वांनी लष्करासोबत उभे असल्याची घोषणा केली.

वायुसेनेचा निर्धार : कोठेही जाऊन हल्ल्यास सज्ज 
– वायुसेना प्रमुख बीएस धनोआ म्हणाले, कोठेही जाऊन हल्ला करण्यास आम्ही सक्षम आहोत. आमच्या पायलटचा निशाणा अचूक आहे.
– वायुसेनेने पोखरण येथे युद्धसराव केला. अगदी दोन तासांत वायुसेना कोठेही हल्ला करू शकते या सरावात सिद्ध झाले.

जम्मू : संचारबंदी कायम 
जम्मूमध्ये शनिवारी दुसऱ्या दिवशीही संचारबंदी लागू होती. लष्कराने शहरातून संचलन केले. हेलिकॉप्टर आणि ड्रोनद्वारे गस्त घालण्यात येत आहे. दरम्यान, जम्मू विद्यापीठातील सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या. जम्मू परिसरातील मोबाइल, इंटरनेट सेवा बंद आहे. दरम्यान, जम्मू-श्रीनगर महामार्गावर दरड कोसळल्यामुळे रामबन येथे अडकलेली वाहने कडक सुरक्षा व्यवस्थेत श्रीनगरकडे रवाना करण्यात आली.

सत्ताधाऱ्यांचा आदर्श हिटलर आणि मुसोलिनी – पी.बी. सावंत

0

पुणे-देशातील सत्ताधारी पक्षाला हुकुमशाही आणायची आहे. त्यांचा आदर्श हिटलर आणि मुसोलिनी आहे. तर त्यांना मनुवादी हिंदू धर्माचे राज्य आणायचे असून या सरकारने केवळ भांडवलशाही मजबूत करायची कामे केली आहे. देशातील सर्वसामन्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष नाही. अशा शब्दात निवृत्त न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला. तसेच सत्ताधारी राजवटीला राज्यघटना अमान्य असल्याचेही ते म्हणाले. मतदार जागृती परिषद आयोजित ‘लोकसभा निवडणूक आणि देशासमोरचे आव्हान’ या विषयावरील सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी होते, तर स्वामी अग्निवेश, तीस्ता सेटलवाड, गिरीधर पाटील, निरंजन टकले यावेळी उपस्थित होते. यावेळी पी.बी. सावंत म्हणाले, आगामी निवडणूक लक्षात घेता विरोधकांनी एकत्र येऊन आपत्ती दूर केली नाही. विरोधी पक्षांनी योग्य उमेदवार निवडावे. असे सांगत त्यांनी विरोधी एकजुटीला मत देण्याचे आवाहन केले.

स्वामी अग्निवेश म्हणाले, ‘ आतंकवादाच्या मुळाशी गेले पाहिजे. जो निष्काळजीपणा झाला त्याची चौकशी झाली पाहिजे. मोदींनी सुरक्षिततेबाबत जे दावे गेले ते खोटे ठरले. शहीद जवानांमध्ये शेतकऱ्यांची मुले आहेत. नेत्यांची मुले नाहीत . देश रक्षणाची जबाबदारी फक्त शेतकरी, गरीब कुटुंबांची आहे का ?
या संघर्षाला धार्मिक रंग देता कामा नये.विरोधी पक्षांना घेऊन सिक्युरिटी कौन्सिल स्थापन करुन एकत्रितपणे मुकाबला केला पाहिजे.एल्गार परिषदेनंतर पंतप्रधान हत्येचा कट रचल्याची आवई उठविण्यात आली. न्या.पी.बी. सावंत यांच्यासारख्या आदरणीय व्यक्तिमत्वाला एल्गार परिषदेशी जोडण्याचा प्रयत्न झाला. अखलाख ची हत्या,मॉब लिंचिंग हा दहशतवाद नाही का ? अशा घटनातील कोणालाच शिक्षा झाली नाही.गोहत्या विरोधात हिंसा करणाऱ्याना मोकळे सोडले जाते. हा दहशतवाद नाही का ? दलित, आदिवासीना माओवादी ठरवून तुरूंगात डांबणे हा दहशतवाद नाही का ?  घृणा, द्वेशाचे राजकारण करण्यातूनच दहशतवाद जन्म घेतो. स्त्री भ्रूणहत्या हा दहशतवाद नाही का ? असे सवालही त्यांनी केले. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा खरा चेहरा पुढे आणण्याची गरज आहे. दहशतवादाविरूध्दची ढोंगी लढाई हा देशद्रोह ठरेल.मजुरांना किमान वेतन मिळत नाही.स्वपक्षीयांना, न्यायमूर्तिंना मारल्याचे आरोप असलेले लोक सत्तेत , सत्ताधारी पक्षात असतील , तर दहशतवादाविरुध्द कशी लढली जाईल , याची शंका आमच्या मनात आहे.
मतदारांना जागृत करणे हा महत्वाचा उपक्रम आहे. काही पक्ष केवळ मतविभागणी साठी नि वडणूक लढवतात, त्यांच्यापासून सावध राहून प्रत्येक मत योग्य ठिकाणी जाईल याची खातरजमा केली पाहिजे, असेही अग्नीवेश यांनी सांगीतले.

लोकशाहीतील हिटलरचा अनुभव येतोय : श्रीपाल सबनीस

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून आजअखेर कोट्यवधी रुपयांचे कर्ज काहींनी बुडवले. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या घटनांवर हे सरकार काहीही ठोस करताना दिसत नाही. मात्र न्यायव्यवस्था, सीबीआय यांच्या कामामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारंवार हस्तक्षेप असतो. या माध्यमातून लोकशाहीतील हिटलरचा अनुभव येतो. अशा शब्दात साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. मागील ७० वर्षात ज्या पक्षांची सत्ता होती त्यांच्या कार्यकाळातही अशा घटना घडल्या. मात्र त्याहून सर्वाधिक घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात घडल्याचेही ते म्हणाले.

निरंजन टकले म्हणाले, ‘ तटस्थता  बाळगून चालण्याची परिस्थिती नाही.आज स्पष्टपणे बोलणे अत्यंत जरुरी आहे. जवानांच्या हौतात्म्याचे राजकारण केले जात आहे. प्रचारसभेच्या शेजारच्या जिल्हात शहीदावर अंत्यसंस्कार असताना पंतप्रधान तेथे जात नाहीत, सर्व पक्षीय बैठकीला पंतप्रधान  उपस्थित राहत नाहीत, याचे प्रश्न का उपस्थित केले जात नाहीत ?  हे देशभक्त नाहीत, द्वेशभक्त आहेत. प्रत्येक आघाडीवर ते अपयशी ठरले आहेत.
सय्यद शुजाच्या पत्रकार परिषदेला सर्व राजकीय पक्षांना बोलाविण्यात आले होते.जे पक्ष आले नाहीत, त्या राजकीय पक्षांना प्रश्न विचारायचे की जे पक्ष उपस्थित होते,त्यांना विचारायचे ?
न्या.लोया हेही देशासाठी शहीद झाले आहेत,असेही टकले म्हणाले.
तिस्ता सेटलवाड म्हणाल्या, ‘ दहशतवादी हल्ल्यानंतर धार्मिक उन्माद निर्माण केला जात आहे. पत्रकारदेखिल यात मागे नाहीत.
‘ या सरकारने भयग्रस्त वातावरण निर्माण केले आहे. मजूर, शेतकरी, बेरोजगारीचे प्रश्न संपले नाहीत. मागील दहा वर्षात जे लोकशाहीवादी कायदे बनले, ते कमकुवत करण्याचे, रद्द करण्याचे काम या सरकारने केले आहे. भाजप सरकारविरुद्ध ‘ एकास एक ‘ उमेदवार उभे केले पाहिजेत.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले. ‘ घोषित आणीबाणी विरुद्ध  लढल्यानंतर ४२ वर्षांनी अघोषित आणीबाणी विरुध्द लढण्याची वेळ आली आहे. इथली लोकशाही जिवंत राहावी, विचारवंत जिवंत राहावेत, विचार जागृत राहावेत यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यरत राहण्याची गरज आहे. हे मतदार जागृती ध्येय यशस्वी केले पाहिजे.
जांबुवंत मनोहर यांनी प्रास्ताविक केले. संदिप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.
प्रारंभी काश्मीर हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली अर्पण करून आणि भारतीय घटनेच्या उद्देशिकेच्या प्रतिमेला अभिवादन करून ‘मतदार जागृती परिषद ‘ आयोजित जाहीर सभेला प्रारंभ झाला.

माफी नाहीच, बदला घे‌ऊ; सीआरपीएफची गर्जना; मोदींचा इशारा..रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब घेऊ

0

श्रीनगर- पुलवामा अतिरेकी हल्ल्यात ४० जवानांच्या हौतात्म्यानंतर सीआरपीएफ व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्वाणीचा इशारा दिला. शहिदांना श्रद्धांजली अर्पण करत सीआरपीएफने म्हटले की, ही घटना विसरणार नाही, माफी नाहीच. या भ्याड हल्ल्याचा बदला घेऊ. मोदी म्हणाले, अतिरेकी व त्यांना पोसणाऱ्यांनी मोठी चूक केली आहे. याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागेल. जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ.अतिरेक्यांना संपवण्याचे ठिकाण, वेळ व स्वरूप ठरवण्याचे सर्वाधिकार आता लष्कराला देण्यात आले आहेत. सरकारने १९९६ मध्ये पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. यामुळे पाकिस्तानातून आयात वस्तूंवरील अबकारी शुल्क भारत वाढवू शकतो.

– गुरुवारी शहिदांची संख्या ४४ सांगण्यात आली होती. आता सीआरपीएफने स्पष्ट केले की, ४० जवान शहीद झाले आहेत.सूत्रांनुसार, घटनास्थळी दोन मृतदेह सापडले. एक बसचालकाचा असून दुसऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

अतिरेकी हल्ल्याविरुद्ध २० राज्यांत निदर्शने, जम्मूतील बंददरम्यान हिंसाचार व तोडफोड, ६ भागांत संचारबंदी 
जम्मूतील परिस्थिती तणावपूर्ण होती. बंद काळात निदर्शकांनी १२ वाहनांना आग लावली. अनेक गाड्या फोडल्या. शहरात संचारबंदी लागू केली. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. विविध घटनांत पोलिसांसह आठ लोक जखमी झाले. रस्त्यांवर अनेक ठिकाणी टायर जाळण्यात आले. त्यामुळे वैष्णोदेवीला जाणारे भाविक आणि पर्यटकांना अडचणी आल्या.काही काश्मिरी प्रवाशांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ केलेल्या घोषणाबाजीमुळे शहरांत तणाव होता.

अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन, फ्रान्ससह २५ देशांच्या राजदूतांशी भेटून पाकिस्तानच्या नाकेबंदीस सुरुवात
गरज : लष्करी ताफ्याबरोबर इतर वाहने चालवण्यावर बंदी 

– सुरक्षा दलांनी श्रीनगरमध्ये तपासणी कडक केली. अनेक ठिकाणी चौक्या लावल्या. पोलिसांनी या हल्ल्याच्या धाग्यादोऱ्यांबाबत स्थानिकांना मदतीचे आवाहन केले आहे.
– शुक्रवारी खोऱ्यात सुरक्षा दलांच्या ताफ्याची वाहतूक बंद राहिली. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या वाहनांसह सामान्य नागरिकांना वाहन चालवण्यास बंदी घालण्यात आली.

जबाबदारी : पाक वकिलातीपुढे निदर्शने, सीआरपीएफचा बंदोबस्त 
– पुलवामा हल्ल्यानंतर देश संतप्त झाला आहे. शुक्रवारी दिल्लीसह अनेक शहरांत निदर्शने झाली. दिल्लीत अनेक संघटनांनी पाक वकिलातीसमोर निदर्शने केली. या वेळी निदर्शक संतप्त झाले होते. निदर्शकांची संख्या सातत्याने वाढत होती. या वेळी पाक वकिलातीसमोर केंद्रीय राखीव पोलिस दलाचेच (सीआरपीएफ) जवान बंदोबस्ताला होते. या जवानांनीच संतप्त निदर्शकांना पांगवले.

तपास : हल्ल्यात ८० किलो आरडीएक्सचा वापर झाला 
– पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतले. पाक नागरिक कामरानने हल्ल्याचा कट रचल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी गाझीचे नाव आले होते.
– एनआयएच्या तपासानुसार, स्फोटासाठी ६० ते ८० किलो आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. गुरुवारी ३५० किलो आरडीएक्सची बाब समोर आली होती. अतिरेक्याने वाहन बसला धडकवले होते.

आडमुठेपणा : मसूद अझहरला अतिरेकी घोषित करण्यावरून चीनचा आडमुठेपणा कायम 
– अतिरेकी मौलाना मसूद अझहरच्या जैश-ए-मोहंमद या संघटनेने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, चीन आता अझहरच्या बाजूने उभा राहिला आहे. चीनच्या परराष्ट्र विभागाचा प्रवक्ता म्हणाला, अझहरला अतिरेकी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नाप्रति चीनच्या भूमिकेत बदल होणार नाही. चीनचा आडमुठेपणा कायम आहे.

‘त्या’ चेकपोस्ट सुरू असत्या तर घटना घडली नसती..सीआरपीएफचे माजी अधिकारी राणा यांची खंत

0

नाशिक -ठिकठिकाणी पूर्वीप्रमाणे चेकपोस्ट राहिल्या असत्या तर कदाचित ही घटना टळली असती. पुलवामामध्ये गुरुवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या कारणांचा शोध घेतला जात असताना श्रीनगरमध्ये केंद्रीय राज्य राखीव दलात १३ वर्षे उच्च पदावर जबाबदारी सांभाळलेले आणि तब्बल ३३ वर्षे विशेष सुरक्षा दलात शाैर्य गाजवलेले अॅड. दिलीपसिंग राणा यांनी माध्यमांना  ही माहिती दिली.

श्रीनगरपासून ते काझीगुंडपर्यंत पूर्वी अनेक चेकपोस्ट होत्या. त्यामुळे कोणीही तेथे संपूर्ण तपासणीशिवाय येणे शक्य होत नव्हते. काही वर्षांपूर्वी श्रीनगर येथील पंथ चौकाजवळ एका भरधाव वाहनाबाबत संशय आल्यानंतर चेक पोस्टवरील एका जवानाने टायरवर गोळी झाडून ती गाडी थांबवली होती. मात्र वाहनात स्थानिक नागरिक होते. हे प्रकरण थेट न्यायालयापर्यंत गेले आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी गोळी झाडणाऱ्या जवानाविरुद्धच खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. याच संवेदनशील प्रकरणाची दखल घेत स्थानिक सरकारने या ठिकाणी असलेल्या सर्व चेक पोस्ट हटवल्या. या निर्णयास तेव्हाही तीव्र शब्दांत सैन्य दलाने विरोध केला होता. मात्र तत्कालीन सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले होते. तेव्हापासून तेथे वाहनांची कसून तपासणी होत नाही. त्यामुळे पुलवामापर्यंत सहज वाहन घेऊन जात हल्ला करणे दहशतवाद्यांना सोपे गेले, असे राणा यांनी सांगितले.

स्थानिकांशी संपर्क महत्त्वाचा 
आपल्या कार्यकाळातही असाच कट दहशतवाद्यांनी अनेकदा आखला. मात्र, श्रीनगरच्या रहिवाशांशी असलेल्या संबधांमुळे हल्ल्यापूर्वीच माहिती मिळून आम्ही सजग व्हायचो. त्यामुळे अनेक हल्ले होण्यापूर्वीच त्याची माहिती मिळत असे. म्हणून जवानांनी स्थानिक लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवायला हवेत, असे राणा म्हणाले.

नगरसेवक रवींद्र धंगेकरांसह तिघांची कोठडीत रवानगी

0

पुणे-महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात नगरसेवक रवींद्र धंगेकरसह तिघांना शुक्रवारी कोर्टाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी पी. डी. सावंत यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांच्यासह तिघेजण पोलिसांसमोर हजर झाले. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. धंगेकर यांच्यासह मंदार हेमंत पुरोहित (वय २४), अमित मोहन देवकर (३८, दोघेही रा. कसबा पेठ) या तिघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पाषाण आणि कात्रज येथील तलावांमध्ये जलपर्णी नसतानाही २३ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्याची टीका करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात आंदोलन केले होते. महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की होऊन त्यांच्या अंगावर चप्पल भिरकविण्यात आली होती. सरकारी कामात अडथळा आणल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या तिघांना कोर्टात हजर करण्यात आले. आरोपींनी ही निविदा भरली होती का, गुन्ह्याचा सूत्रधार कोण आहे, याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील हेमंत मेंडकी यांनी केली. आरोपींचे वकील अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे, अ‍ॅड. विपुल दुशिंग, अ‍ॅड. मनिष पाडेकर यांनी पोलिस कोठडीला विरोध केला. धंगेकर गेली २० वर्षे नगरसेवक आहेत. भ्रष्टाचार उघडकीस आणला म्हणून खोटी तक्रार करून धंगेकर यांना अडकविण्यात आले आहे, असा युक्तिवाद या वेळी करण्यात आला.