Home Blog Page 2980

मुकुल माधव फाउंडेशनतर्फे मानसोपचार प्रशिक्षण

0
पुणे : मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने मानसिक आरोग्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इंग्लंडमधील ‘कन्सर्न फॉर मेंटल हेल्थ’च्या टीमने या प्रशिक्षणात मार्गदर्शन केले. भारतीयांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशन गेल्या पाच वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन करत असून, यंदाच्या प्रशिक्षण शिबिरात 115 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेते आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे, लंडन येथून आलेल्या डॉ. गझला अफझल, मौडस्ली हॉस्पिटलच्या डॉ. मिलाविक, नॉर्थ ईस्ट लंडन फाउंडेशनचे डॉ. हॉर्ने आदी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील फिजिशियन्स, मनोविकारतज्ज्ञ, नर्सेस, विशेष शिक्षक आणि या क्षेत्रातील व्यावसायिक आदींनी सहभाग घेतला. प्रशिक्षणार्थ्यांना वर्ल्ड सायकिअ‍ॅट्रिक असोसिएशनतर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. गझला अफजल म्हणाल्या, “मानसिक आजारांबाबत प्रागतिक दृष्टिकोन असून, या उपचारांचे चांगल्या पद्धतीने वितरण होत आहे. परंतु, बालकांच्या मानसिक आजारांवर उपचार करणार्‍या मानसोपचार तज्ज्ञांची भारतात मोठी कमतरता आहे. त्यामुळेच अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून अद्ययावत प्रशिक्षण देणे आवश्यक वाटते.” लंडन येथील मौडस्ली हॉस्पिटलच्या डॉ. मिलाविक, नॉर्थ ईस्ट लंडन फाउंडेशनचे डॉ. हॉर्ने यांनीही मार्गदर्शन केले. मनोरुग्णांकडून आपण काय शिकतो, याची माहिती आपण केअरटेकर आणि या क्षेत्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. मानसिक आजारांवरील उपचारासाठी दृकश्राव्य माध्यमांचा वापर अधिक प्रभावी ठरतो. त्यामुळे त्याला पूरक अशा चित्रपटांचा आपण वापर केला पाहिजे, असे डॉ. मोहन आगाशे म्हणाले.
मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत नर्स, मानसोपचारतज्ज्ञ आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील इतर व्यावसायिकांसाठी हे प्रशिक्षण आहे. यामुळे रुग्णांचे मानसिक आरोग्य वेगाने सुधारण्यास मदत होते. हे लक्षात घेऊन 2014 पासून आम्ही सातत्याने अशा प्रकारचे प्रशिक्षण देत आहोत. त्यासाठी इंग्लंडमधून तज्ज्ञांना बोलावले जाते. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग येथील लोकांना होत आहे,” असे मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी सांगितले. मागील वर्षी ससूनच्या सहकार्याने 222 जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले होते. या शाळांमधील 40 विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आजाराची लक्षणे असल्याचे आढळून आले. त्या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयामार्फत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले. तसेच सिम्बायोसिस येथे आयोजिलेल्या प्रशिक्षणात 120 जणांनी सहभाग घेतला, असेही त्यांनी नमूद केले.

क्रेडाईचा पीएमएवाय पुरस्काराने सन्मान

0

पुणे :- आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या वर्गासाठी परवडणाऱ्या घरांच्या गृहनिर्मितीमध्ये  दिलेल्या असामान्य योगदानासाठी क्रेडाईला अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पीएमएवाय पुरस्काराने केंद्रीय राज्यमंत्री हरदीप पुरी यांच्या हस्ते दिल्ली येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले.

‘पी.एम.ए.वाय- एम्पॉवरिंग इंडिया अवार्ड्स २०१९’ची संकल्पना ही प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप (पीपीपी) आणि खासगी गुंतवणूकीच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला  प्रोत्साहन देण्यासाठी  खासगी विकसक,वित्तीय संस्था,ओद्योगिक संघटना यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना प्राधान्य देऊन पंतप्रधानांचे सर्वांना २०२२ पर्यत घरे मिळावीत  हे  ध्येय पूर्ण करणे असे होते.

क्रेडाईने केंद्र सरकारशी अहमदाबाद मध्ये ३९६ परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प देण्याचा सामंजस्य करार केला होता. तसेच महाराष्ट्रात येणाऱ्या ५ वर्षात ५ लाखांहून अधिक घरांची निर्मितीसाठी  देखील क्रेडाई – महाराष्ट्रने राज्य सरकारशी सामंजस्य करार केला आहे. महाराष्ट्रामध्ये ३० स्क्वेअर मीटरच्या  ४ लाख घरांची आणि ६०  स्क्वेअर मीटरच्या  ८ लाख घरांची कामे प्रगतीपथावर आहेत. या घरांचे काम येत्या २ ते ४ वर्षात पूर्ण होईल. या सर्व प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी क्रेडाई नैशनलच्या अफोर्डेबल हौसिंग कमिटीचे अध्यक्ष आणि क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला असून त्यात कामे योग्य पद्धतीने सुरु आहेत जी दिलेल्या वेळेत पूर्ण होतील अशी माहिती दिली.

विकसकांना प्रशिक्षित करण्यासाठी ‘अफोर्डेबल हौसिंग गाईडन्स फोरमची ’ क्रेडाई महाराष्ट्रने स्थापना केली असून त्याद्वारे राज्यस्तरावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विशेष कायदेशीर सहाय्य विभाग, बांधकाम खर्चाचे प्रशिक्षण,कामगारांचे कौशल्य प्रशिक्षण आणि २४x७ अफोर्डेबल हौसिंग संदर्भातील हेल्पलाईन देखील सुरु करण्यात आली आहे. त्याचबरोबर ही समिती देशभरातील  १२५०० सदस्यांना परवडणाऱ्या घरांच्या निर्मातीसंबंधी वेगवेगळ्या पैलूंची माहिती सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी  मागच्या ५२आठवड्यांपासून प्रत्येक रविवारी ई-बुलेटीन पाठविण्याचे कार्य सातत्याने करीत आहे.

तसेच परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीची संपूर्ण माहिती देणारे  “हौसिंग फॉर ऑल पॉलिसी ॲन्ड प्रैक्टिस” या पुस्तकाचे प्रकाशन १४ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडीअम येथे ‘क्रेडाई युथकॉन’मध्ये केंद्रीय राज्यमंत्री हरदीप पुरी यांच्या हस्ते देशातील ३००० विकसकांच्या उपस्थित झाले.

कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या सन १९६५ – ६६ / ६७ मधील बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न

0

पुणे-कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या सन १९६५ – ६६ / ६७ मधील बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला . वानवडीमधील केदारी गार्डनमध्ये झालेल्या या मेळाव्यास निवृत्त शिक्षिका डॉ. सुनीलिनी सत्तूर का. बा. पारखी के . बी . बुलबुले चंद्रकला सुबंध पतंगे शाळेच्या मुख्याध्यापिका मुळगावकर ,शाळेचे माजी विद्यार्थी उपस्थित होते .

यावेळी शाळेतील सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुलवामा मधील शहीद जवानांसाठी व स्वर्गीय माजी विद्यार्थ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली . त्यानंतर सुमारे ५३ वर्षांनंतर सर्व विद्यार्थी एकत्र आल्याने माजी विद्यार्थ्यांनी आपली माहिती देउन आपल्या स्वतःची ओळख करून दिली . यावेळी शाळेमधील निवृत्त शिक्षकांचा शाल ,श्रीफळ देउन सन्मानित करण्यात आले . यावेळी शालेय जीवनातील आठवणींना विद्यार्थ्यांनी उजाळा दिला . यावेळी शाळेतील जुने मित्र पुन्हा भेटल्याने शाळेत आल्याचा भास सर्वाना वाटला . त्यानंतर सर्वानी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला .यावेळी सर्व विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह भेट देण्यात आले . त्यानंतर सर्वानी ग्रुप फोटो काढला . त्यानंतर पुन्हा एकदा सर्वानी भेटण्याचा मनोदय व्यक्त केला .

कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे सेवा व त्याग  या ब्रीदवाक्यामुळे  आपल्या जीवनात संकटाना सामोरे जाऊन आपण सर्वानी आपले जीवन घडविले . त्यासाठी पोलीस खात्यामध्ये माझी सेवा मी समर्प्रित केली असे मनोगत शाळेचे माजी विद्यार्थी असलेले निवृत्त इन्स्पेक्टर जनरल एस. एम. सय्यद यांनी सांगितले .

या मेळाव्याच्या संयोजन निवृत्त इन्स्पेक्टर जनरल एस. एम. सय्यद केदारी गार्डनचे संचालक उत्तमराव केदारी प्रमोद भांबुरे चंद्रकांत काळे वसंत सावंत दिलीप वाघ मनोहर पालरेषा व अशोक हिरवे आदी माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले .

भारती विद्यापीठ ‘आयएमईडी ‘च्या विद्यार्थ्यांना ५४ लाखापर्यंतची प्लेसमेंट ऑफर !

0
पुणे :भारती विद्यापीठ   इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (  ‘आयएमईडी ‘) व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या (एमबीए )विद्यार्थ्यांना  कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये वार्षिक ७ ते ५४ लाखापर्यंतच्या  प्लेसमेंट ऑफर मिळाल्या आहेत !  ‘आयएमईडी ‘ संचालक डॉ . सचिन वेर्णेकर यांनी ही माहिती दिली . १७१ हून अधिक विद्यार्थ्यांना ‘ब्लू चिप ‘ कंपन्यात प्लेसमेंट ऑफर मिळाल्या आहेत .
६० पेक्षा अधिक कंपन्यांनी  इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट मध्ये फेब्रुवारी महिन्यात कॅम्पस इंटरव्यू घेतले . त्यात विद्यार्थ्यांना करियरच्या मोठ्या प्लेसमेंट ऑफर मिळाल्या . भारतीय कंपन्यात या विद्यार्थ्यांना १६लाख १० हजाराची वार्षिक ऑफर मिळाली तर आंतरराष्ट्रीय कंपन्यात  ५४ लाख रुपयांची   वार्षिक ऑफर मिळाली . या कंपन्यांमध्ये अमेझॉन ,रिलायन्स ,कॅपजेमिनी ,आयटीसी ,आदित्य बिर्ला कॅपिटल ,आयसीआयसीआय ,विप्रो ,टेक महिंद्रा ,अपोलो ,नोकरी डॉट कॉम ,उंनो मिंडा यांचा समावेश आहे .
 ‘आयएमईडी ‘ विद्यार्थ्यांना समर इंटर्नशिपच्या ऑफर्स देखील प्राप्त झाल्या आहेत . याआधी ५० विद्यार्थ्यांनी २ महिन्याची विंटर इंटर्नशिप  पूर्ण केली आहे . यामध्ये त्यांना किमान मासिक २५ हजार रुपयांचे विद्यावेतन मिळाले . इंटर्नशिप देणाऱ्या कंपन्यात  आदित्य बिर्ला कॅपिटल ,पतंजली ,बजाज फिनसर्व्ह अशांचा समावेश आहे ,असे डॉ वेर्णेकर यांनी सांगितले .
भारती विद्यापीठ   इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट  ही भारताच्या टॉप ५० बी -स्कुल मध्ये समावेश असलेली इन्स्टिट्यूट असून ‘कार्पोरेट रिसोर्स सेल ‘ द्वारे प्लेसमेंटसाठी विशेष प्रयत्न केले जातात . अनेक राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय परिषदा ,इंडस्ट्री –  इन्स्टिट्यूट  पार्टनरशिप समिट ,अल्युमनी मीट,कार्पोरेट डे ,जॉब फेयर ,मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ,फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम  सारखे उपक्रम वर्षभर आयोजित केले जातात

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘मशीन डिझायनिंग ‘ विषयावर कार्यशाळा

0
पुणे :भारती अभिमत विद्यापीठच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘मशीन डिझायनिंग ‘ या विषयावर कार्यशाळा तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती .  मोझिला कॅम्पस क्लबच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .
भारती अभिमत विद्यापीठच्या धनकवडी कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यशाळेचे उदघाटन प्राचार्य डॉ . आनंद भालेराव यांनी केले . मोझिला कॅम्पस क्लबचे आदर्श कुमार यांनी मार्गदर्शन केले . अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विभागांचे विद्यार्थी ,प्राद्यापक सहभागी झाले .

कोळसे पाटलांना एमआयएममधून विरोध; कोळसे पाटील म्हणाले..‘विरोध करणारे बच्चे ’

0

औरंगाबाद- जिल्ह्यात एमआयएमची मोठी शक्ती आहे. बी.जी. कोळसे पाटील यांच्यासारख्या अनोळखी उमेदवाराच्या मागे उभी करून ती वाया जाण्याचीच शक्यता आहे. म्हणून आगामी लोकसभा निवडणूक औरंगाबादेतून एमआयएमनेच लढवावी, असा प्रस्ताव पक्षाचे सर्वेसर्वा असुद्दीन ओवेसींकडे पाठवण्यात आला आहे. दोन-तीन दिवसांत त्यावर निर्णय अपेक्षित आहे. तर कोळसे पाटील यांनी एमआयएम मधील विरोध  म्हणजे बच्चे कंपनीचे ओरखडे , असे म्हटले आहे. प्रकाश आंबेडकरांनी मला बहुजन वंचित आघाडीचा नव्हे तर युतीविरोधातील सर्वपक्षीय उमेदवार, असे म्हटले होते. औरंगाबादमधून लढण्याची माझी तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तीन महिन्यांपूर्वी औरंगाबादेतील जबिंदा इस्टेटच्या मैदानावर बहुजन वंचित आघाडीची सभा झाली. त्यास भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, ओवेसी यांनी लोकसभेची दिशा स्पष्ट केली होती. आम्ही एकत्र लढणार. एकच उमेदवार देणार. त्यासाठी तयारीला लागा, असा त्यांचा सूर होता. त्यामुळे त्यांचे बोलणे औरंगाबाद जिल्ह्यातील उमेदवाराला उद्देशूनच असावे, अशी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना झाली होती. येथील मतदारांची संख्या लक्षात घेता एमआयएमच्या वाट्याला मतदारसंघ येणार, असेही ठामपणे सांगितले जात होते. गेल्या किमान पाच निवडणुकात औरंगाबाद मतदारसंघातून ताकदीचा मुस्लिम उमेदवार उभा ठाकलाच नाही. आता त्याची संधी असल्याचे काहीजणांनी  आमदार इम्तियाज जलील यांच्याकडे बोलूनही दाखवले होते.

प्रत्यक्षात गेल्या महिन्यात आंबेडकरांनी निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. पाटील यांचे नाव ऐकताच केवळ एमआयएमच नव्हे तर भारिप – बहुजन महासंघाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनाही धक्का बसला. अर्थात आंबेडकरांनी घोषणा केल्याने भारिपच्या गोटातून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. मात्र, एमआयएमचे कार्यकर्ते नाराज झाले, कोळसे पाटील, कहाँ से है. औरंगाबादशी त्यांचा काय संबंध? असा प्रश्न त्यांनी आमदार इम्तियाज यांना विचारला. तेव्हा प्रारंभी त्यांनी त्यांची समजूतही घातली. पण कोळसे पाटील यांच्या विरोधात सूर व्यापक होऊ लागला. त्यातच पाटील यांनी एकास एक लढत होणार असेल तरच लढण्यात स्वारस्य असल्याचे म्हटले. यामुळे तर संभ्रम अधिकच वाढला.

एकूण परिस्थिती लक्षात घेता मोठी गडबड होण्याची चिन्हे इम्तियाज यांना दिसू लागली. म्हणून त्यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील एमआयएमच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यात कोळसे पाटील यांना उमेदवारी देण्यास स्पष्ट विरोध पुन्हा एकदा नोंदवण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यात एमआयएमची शक्ती वाया घालवू नये, असेही त्यांचे म्हणणे होते. त्यानुसार त्यांनी ओवेसींकडे प्रस्ताव पाठवला आहे.

दरम्यान, कोळसे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मला जगभरातील मुस्लिम ओळखतात. ते सारेच माझ्यासोबत आहेत.  हा विरोध म्हणजे बच्चे कंपनीचे ओरखडे आहेत. त्याचे मला काही वाटत नाही. तो विरोध पुढे मावळेल. मुळात मी बहुजन वंचित आघाडीचा उमेदवार असे आंबेडकरांनी कधीच म्हटले नव्हते. शिवसेना-भाजप वगळता सर्व पक्षांनी कोळसे पाटील यांच्या नावाला पाठिंबा द्यावा, असे त्यांचे म्हणणे होते. काँग्रेस, राष्ट्रवादी त्याला अनुकूल आहे, असे म्हणतात. पण राजकारणात कोणाचा काही भरवसा नसतो. तेव्हा पुढचे पुढे पाहू सध्या माझी लढण्याची तयारी सुरू आहे.

डिक्कीची महिला उद्योजकता विकास परिषद

0

पुणे :- जागतिक महिला दिनाच्या औचित्याने दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, सिडबी आणि एनएसआयसी यांच्यावतीने महिला उद्योजकांसाठी येत्या ८ मार्चला पुणे स्टेशन जवळील हॉटेल लेमन ट्री येथे एक दिवसीय ‘उद्योजकता विकास परिषदेचे’ आयोजन करण्यात आले आहे.ही परिषद १० ते ५ या वेळेत होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार, टाटा मोटर्सच्या (इनडायरेक्ट मटेरियल) सरव्यवस्थापक सतरुपा रॉय सरकार यांच्या हस्ते होणार आहे.सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे देखील यावेळी उपस्थित असणार आहेत. यावेळी डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे, डिक्कीचे पश्चिम भारत अध्यक्ष निश्चय शेळके, डिक्की नॅशनल वुमन विंगच्या मेंटॉर सीमा कांबळे, महाराष्ट्राच्या वुमन विंग अध्यक्षा स्नेहल लोंढे, विदर्भाच्या विनी मेश्राम व डिक्की महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अविनाश जगताप उपस्थित असणार आहेत.

या परिषदेत महिला उद्योजिकांसमोरील आव्हाने,व्यक्तिमत्व विकास, महाराष्ट्राचे महिला उद्योग धोरण,राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना,महिलांसाठी विविध क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे याशिवाय विविध बँकाचे अधिकारी, टॅक्स कन्सल्टंटस यांना ऐकण्याची संधी देखील यावेळी मिळणार आहे.

हा कार्यक्रम सशुल्क असून अधिकाधिक महिला उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन डिक्कीच्या वतीने करण्यात आले आहे.

132 केव्ही उपकेंद्र बंद असताना 80 मेगावॉट विजेचे भारव्यवस्थापन; वीजपुरवठा सुरळीत

0

पुणे : खोदकामामध्ये 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तोडल्यामुळे महापारेषणचे 132 केव्ही रास्तापेठ जीआयएस उपकेंद्र तीन दिवसांपूर्वी बंद पडले असले तरी महावितरणने इतर उपकेंद्रांद्वारे पर्यायी व्यवस्थेतून व तब्बल 75 ते 80 मेगावॉट विजेचे यशस्वी भारव्यवस्थापन केले व सुमारे 250 वीजग्राहक वगळता उर्वरित सर्व परिसरात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यश मिळविले.

खोदकामात तोडलेल्या भूमिगत वाहिनीच्या दोन केबलच्या दुरुस्तीचे काम महापारेषणकडून युद्धपातळीवर सुरु आहे. त्यासाठी चेन्नईवरून तज्ञ कर्मचाऱ्यांसह खास टीम पुण्यात दाखल झाली आहे व चेन्नईवरून आणलेले जॉईंट या नादुरुस्त वाहिनीला चार ठिकाणी लावण्याचे काम सुरु आहे. हे काम बुधवारी (दि. 6) रात्री उशिरापर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर या वाहिनीद्वारे 132 केव्ही रास्तापेठ जीआयएस उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्ववत सुरु करण्यात येईल.

पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात पुणे महानगरपालिकेकडून सुरु असलेल्या खोदकामात महापारेषण कंपनीची 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तोडल्याने रास्तापेठ जीआयएस 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा शनिवारी सकाळी 11.33 वाजता बंद पडला आहे. त्यामुळे महावितरणच्या 6 उपकेंद्रांचाही वीजपुरवठा खंडित झाल्याने पर्वती, बंडगार्डन, शिवाजीनगर, पद्मावती व रास्तापेठ विभागातील सुमारे 2 लाख वीजग्राहकांना फटका बसला होता. यात प्रामुख्याने शहराच्या मध्यवर्तीमधील सर्व पेठांसह लुल्लानगर, कोंढवा, गुलटेकडी, कॅम्प, स्वारगेट, मंडई, लक्ष्मी रोड, सिंहगड रोड आदी परिसरातील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

परंतु दहावी, बारावीच्या परीक्षा सुरु असल्याने मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे यांच्यासह सुमारे 60 ते 70 अभियंते व कर्मचाऱ्यांनी बाधीत झालेल्या भागांत इतर उपकेंद्रांद्वारे पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यास प्राथमिकता दिली. यात शनिवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 99 टक्के भागात तर रास्तापेठ विभागातील नाना पेठ, रास्तापेठ, भवानी पेठ, दारुवाला पुल, रविवार पेठ, गणेश पेठ आदी परिसरात रात्री 12 वाजता पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला. यासाठी थेट मुंढवा व फुरसुंगी 132 केव्ही उपकेंद्राद्वारे सेंट मेरी, रास्तापेठ, लूल्लानगर आदी उपकेंद्रांना पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तथापि पद्मावती विभागात सोमवारी (दि. 4) भारव्यवस्थापन शक्य झाले नाही. त्यामुळे सेवन लव चौकातील तीन रोहित्रांवरील सुमारे 250 ग्राहकांचा तसेच पद्मावती व पर्वती विभागातील तीन उच्चदाब वीजग्राहकांचा वीजपुरवठा भारव्यवस्थापन शक्य न झाल्याने दोन ते अडीच तासांसाठी बंद ठेवावा लागला.

भारनियमनाची शक्यता असलेल्या सर्व पेठांसह इतर परिसरातील वीजग्राहकांना वीजवापर कमीत कमी व नियंत्रित करण्याची विनंती ‘एसएमएस’द्वारे महावितरणकडून करण्यात आली होती. वीजग्राहकांच्या सहकार्याने तसेच सध्या उन्हामुळे विजेची मागणी वाढत असताना सुद्धा महावितरणने सुमारे 75 ते 80 मेगावॉटचे यशस्वी भारव्यवस्थापन करून भारनियमन टाळण्यात यश मिळविले. महापारेषणकडून बुधवारी (दि. 6) रात्री उशिरापर्यंत वाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत महावितरणकडून शहराच्या बाधीत मध्यवर्ती व इतर परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात येत आहे. या कालावधीत वीजग्राहकांनी कमीत कमी विजेचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

अनंतराव गाडगीळ यांच्या आमदार निधीतून पंधरा लाख रुपयांचे संगणक व प्रिंटर शाळांना भेट

0

पुणे-दि मुस्लिम वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीच्या प्रयत्नातून विधानपरिषदेचे आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या आमदार निधीतून पंधरा लाख रुपयांचे संगणक व प्रिंटर शाळांना  भेट देण्यात आले . पुणे लष्कर भागातील ईस्ट स्ट्रीटवरील तय्यबिया अनाथ आश्रमातील हाजी साले मोहम्मद उर्दू प्राथमिक शाळेत हा संगणक भेट देण्याचा कार्यक्रम झाला . यावेळी दि मुस्लिम वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीचे सचिव व  हाजी साले मोहम्मद उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका वाहिद बियाबानी राजाभाऊ चव्हाण राजेंद्र म्हस्के पाटील काका पायगुडे व शिक्षक वर्ग  उपस्थित होते .

     यामध्ये हाजी साले मोहम्मद उर्दू प्राथमिक शाळेस चार संगणक व एक प्रिंटर कॅम्प एजुकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेस दोन संगणक व एक प्रिंटर मोलेदिना टेक्निकल हायस्कुलस चार संगणक व एक प्रिंटर बी. टी. शहांनी नवीन हिंद हिंदी माध्यमिक शाळेस पाच संगणक सेंट अँथोनी इंग्रजी माध्यमिक शाळॆस दोन संगणक व एक प्रिंटर डब्लू. आर. खान उर्दू शाळेस दोन संगणक व एक प्रिंटर अंजुमन ए इस्लाम उर्दू माध्यमिक शाळेच्या मुलींच्या अनाथ आश्रमास चार संगणक व एक प्रिंटर भेट देण्यात आले .

विधानपरिषदेचे आमदार अनंतराव गाडगीळ यांनी प्रत्येक शाळेत जाऊन संगणक कक्षाचे उदघाटन केले .         यावेळी  आमदार अनंतराव गाडगीळ यांनी सांगितले कि आपल्या आमदार निधीतून आपण शैक्षणिक कामासाठी जास्तीत जास्त निधी दिला आहे . त्या माध्यमातून आपण पंधरा लाख रुपयांचे संगणक व प्रिंटर देण्यात आले. यासाठी आपण विद्यार्थ्यांनी संगणकाचे ज्ञान आत्मसात करावे व शाळांचा निकाल शंभर टक्के लागला तर आपण आणखी भरीव मदत करू असे आश्वसन दिले . वाहिद बियाबानी यांच्या परिश्रमामुळे व सातत्याने पाठ पुरावा केल्याने हे संगणक व प्रिंटर आपल्याला मिळवून दिले . त्यामुळे वाहिद बियाबानी यांचे कौतुक केले .

यावेळी दि मुस्लिम वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीचे सचिव व  हाजी साले मोहम्मद उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका वाहिद बियाबानी  यांनी सांगितले कि विधानपरिषदेचे आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या आमदार निधीतून पंधरा लाख रुपयांचे शाळांना संगणक व प्रिंटर हे मराठी उर्दू हिंदी व इंग्रजी माध्यमांमधील पुणे लष्कर भागातील शाळांना भेट देण्यात आले . 

सेवानिवृत्त कर्मचारी वेतन व इतर सर्व बिले अदा केल्याने सेवानिवृत्त कर्मचारी आनंदात.

0
जुन्नर /आनंद कांबळे 
भविष्य निर्वाह निधी व वेतनपथक(प्राथमिक) पुणे कार्यालयाच्या कामकाजाबाबत  सेवानिवृत्त कर्मचारी यांनी समाधान व्यक्त  केले.
    पेन्शन , रजारोखीकरण असे अनेक प्रश्नांना कर्मचारी सेवा निवृत्त झाला की त्याला सामोरे जावे लागते कधी कधी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याला या सर्व गोष्टी साठी  अनेक वेळा सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात .
त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी वैतागलेला असतो
परंतू    पुणे जिल्हा परिषदेचे भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक (प्राथमिक) खाजगी हे कार्यालय अपवाद आहे ,असे मत प्राचार्य  सबनीस प्राथमिक  विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आनंद  कांबळे यांनी व्यक्त  केले.
 या कार्यालयाचे अधीक्षक  राजेंद्र साठे यांनी सेवानिवृत्त कर्मचारी   यांचे सेवा समाप्तीच्या शेवटच्या दिवशी भविष्य निर्वाह निधी ,निवृत्त कर्मचाऱ्यांना  पहिल्याच महिन्यात पेन्शन मिळावी ,व त्याच महिन्यात रजा रोखीकरणाची रक्कम मिळावी यासाठी त्यांचा कटाक्ष असतो . त्यामुळे कर्मचाऱ्यांना सर्व लाभ वेळेत मिळाले आहेत.
       सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रश्नाबाबत   सुनील कुऱ्हाडे (शिक्षणाधिकारी प्राथमिक) पुणे जिल्हा परिषद  यांचे या कामी वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. तर कार्यालयातील कर्मचारी शिंदे जगन्नाथ व नेटवटे यांचे सहकार्य केले.
 अधीक्षक राजेंद्र साठे यांनी   सेवानिवृत्त कर्मचारी यांच्याबाबत  लक्ष घातल्याने ,  वेळेवर पेन्शन व इतर फायदे मिळत असल्याने सेवानिवृत्ती कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे

तळजाई वर नव्याने सात लाख वृक्षांची होणार लागवड ;वाढत्या रहदारीमुळे सोलर रूफ पार्किंग -आबा बागुल

0

नक्षत्र ,बांबू उद्यानासह सात संकल्पनाधारित  उद्याने ,महिलांसाठी स्वतंत्र क्रीडा केंद्र

पुणे 
वन्य जीवांच्या अधिवासाचे पुनरुजीवन व दुर्मिळ वनस्पती, वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी पर्यावरण अभ्यासक, पर्यावरणप्रेमी नागरीक यांच्या सहभागाने  तळजाई टेकडी परिसरात पर्यावरणपूरक विकासाचा पथदर्शी प्रकल्प  पर्यावरणाच्या निकषानुसारच  पुणे महानगरपालिका व माझ्या संकल्पनेतून  साकारला जात आहे.  या प्रकल्पासाठी कोणतीही वृक्षतोड होणार नाही . उलट नव्याने सात लाख वृक्षांची लागवड होणार आहे. मात्र आगामी निवडणूका आणि व्यक्तिगत स्वार्थासाठी काही विघ्नसंतोषी लोकं या प्रकल्पाबाबत दिशाभुलीचे राजकारण करीत आहेत,त्याला नागरिकांनी थारा देऊ नये असे आवाहन माजी उपमहापौर व स्थानिक नगरसेवक आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत केले. 
 
याबाबत माजी उपमहापौर  व स्थानिक नगरसेवक आबा बागुल म्हणाले कि, तळजाई टेकडी येथे सिमेंट रस्त्यामुळे वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे, परिणामी प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला आळा बसावा आणि शहराची फुफ्फुसे असलेल्या टेकड्या आणि त्यावरील जैववैविध्य ,वन्यजीव अधिवासासह पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी  जैववैविध्य उद्यानाचा महत्वपूर्ण प्रकल्प नियमानुसार  होत आहे.  त्यानुसार नुकतेच पर्यावरणपूरक सदू शिंदे क्रिकेट स्टेडियमचे उदघाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी नियोजित नक्षत्र उद्यान, बांबू उद्यान, सोलर रूफ पार्किंगचे भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले होते. त्यानुसार या प्रकल्पाचे कामही सुरु झाले आहे;पण निवडणुका आणि वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोकं पर्यावरणाच्या नावाखाली या प्रकल्पाच्या  कामाला अडथळा निर्माण करीत आहे.पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असलेल्या या प्रकल्पावरील कामगारांना मारहाण करीत आहेत. सीसीटीव्हीच्या फुटेजनुसार प्रशासनाने कारवाई केली आहे.  त्यामुळे संबंधित कथित पर्यावरण प्रेमी  त्यातून वृक्षतोड होत असल्याचा आरोप करीत असून फ्लेक्सबाजीतून अन्य ठिकाणाचे छायाचित्र टाकून नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. असेही आबा बागुल यांनी स्पष्ट केले.  
 सुमारे १०७ एकर क्षेत्रावर आणि महापालिकेच्या ताब्यात असलेल्या डोंगर माथा, डोंगर उताराच्या जागेवर  जैववैविध्य उद्यान साकारले जात आहे. मात्र    त्यासाठी कोणत्याही वृक्षाला इजा न पोहोचविता आणि पर्यावरणाला बाधा न आणता पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी कायद्यातील तरतुदीनुसारच होत आहे. प्रकल्पाच्या क्षेत्रात वाहनांचा वापर टाळण्यासाठी स्वतंत्र वाहनतळ असणार आहे. तेथेच सौर ऊर्जा प्रकल्प  उभारण्यात येणार आहे. तेथून सर्वत्र सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. ३०० किलोवॉट वीजनिर्मिती होणार असून वाहनतळात अंदाजे १४४ चारचाकी, २०१ दुचाकी , १०० सायकल आणि दोन बस पार्क होतील अशी क्षमता आहे.या सोलर रूफ पार्किंग येथे नागरिकांनी वाहने लावायची आणि तिथून व्यायामासाठी, फिरण्यासाठी जावे असे नियोजन वन्यजीव अधिवासाच्या संरक्षणासाठी आहे. 
 नक्षत्र उद्यान, बांबू उद्यान, रानमेवा उद्यान, मसाल्याच्या वनस्पतींचे उद्यान, वनौषधी उद्यान, पुष्प उद्यान आणि सुगंधी वनस्पतींचे उद्यान असे सात संकल्पनाधारित उद्याने हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यात नक्षत्र आणि बांबू उद्यान, सोलाररुफ पार्किंग  याचे काम सुरु होत आहे. या प्रकल्पांच्या विकासकामांना आणि टेकडीवरील झाडांना कै. वसंतराव बागुल उद्यान येथे सुरु केलेल्या देशातील पहिल्या ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्पातून दररोज  पाच लाख लिटर पाण्याचा वापर होत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य असलेल्या या पाण्यामुळे आता तळजाई टेकडी वर्षभर हिरवीगार राहणार आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याची बचतही  होत आहे. [यापूर्वी येथे पिण्याच्या पाण्याच्या टँकरद्वारे पाणी पुरविले जात होते.] त्याचबरोबर मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी ऍडव्हेंचर स्पोर्ट्स,  महिलांसाठी स्वतंत्र क्रिडांगण , सांस्कृतिक क्षेत्राला वाव देण्यासाठी अँफी थिएटर,  रेन वटर हार्वेस्टिंगद्वारे तळ्यांची निर्मिती, वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी वाचनालय, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वर्क स्टेशन्स, रोजगार निर्मितीसाठी तसेच महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू; अथवा अन्य उपक्रमांसाठी खुले प्रदर्शन केंद्र, रासायनिक शेतीऐवजी सेंद्रीय शेतीला चालना देणारा  प्रकल्प होणार आहे आणि उत्पादित शेतमालासाठी तेथेच विक्री केंद्र, मध्यवर्ती भागात पर्यटकांसह नागरिकांसाठी ’मार्केट प्लेस’, पक्ष्यांच्या अभ्यास व निरीक्षणासाठी ’गाईड विथ टूर’ हा महत्वाचा प्रकल्पही या आराखड्यात आहे. असे असताना काही विघ्नसंतोषी लोकं नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी वृक्षतोड होत असल्याचा आरोप करून विकासकामांना अडथळा आणण्याचे षडयंत्र करीत आहेत. केवळ शहरच नाही तर राज्याला तळजाईवरील जैववैविध्य उद्यान प्रकल्प  आदर्शवत  ठरणार आहे. असेही आबा बागुल यांनी नमूद केले. 
  आता वर्षभर तळजाई टेकडी राहणार हिरवीगार 
आबा बागुल पुढे म्हणाले,’या प्रकल्पासाठी कै. वसंतराव बागुल उद्यानात साकारलेल्या  देशातील पहिल्या ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्पातील शुद्ध पाणी येथे आणण्यात आले आहे. आता वर्षभर तळजाई टेकडी हिरवीगार राहणार तर आहे तसेच यापूर्वी पिण्याच्या पाण्याच्या टँकरचा होणारा वापर पूर्णतः थांबला आहे. एकप्रकारे पिण्याच्या पाण्याची बचत खऱ्या अर्थाने होणार आहे आणि वन्यजीव अधिवासासह पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे.

मासिक पाळी ही अतिशय नैसर्गिक व स्वाभाविक प्रक्रिया आहे

0

सोशल मीडियावर पहिल्यांदाच दाखल झालेल्या मासिक पाळीबद्दलच्या इमोजीला स्त्रियांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.  ४७% स्त्रिया असे म्हणत आहेत की, या इमोजीमुळे त्यांना मासिक पाळीबद्दल अधिक उघडपणे बोलता  येईल. स्त्रियांच्या मनातल्या गुजगोष्टींना, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, महत्त्वाकांक्षांना संवादाचे खुले आकाश मिळावे यासाठीच्या उपक्रमांमध्ये या इमोजीला गणले जात आहे.

मासिक पाळी किंवा पिरियड इमोजी हे त्याविषयीच्या संवादाचे प्रतीक आहे.  जगातल्या एकूण लोकसंख्येपैकी अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येचे प्रत्यक्ष जीवनानुभव या इमोजीमधून व्यक्त होतील.  स्त्रियांच्या शारीरिक, आरोग्यविषयक समस्यांवर अधिक गंभीरपणे चर्चा होईल.  खरेतर ही इमोजी सोशल मीडियावर यायला बराच उशीर झाला आहे.  याबाबतीतल्या सोशल मीडियावरील संवादामध्ये भारतीय बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू सारखे अनेक सेलिब्रेटीज बऱ्याच काळापासून आपापली भूमिका मांडत आहेत.

मासिक पाळीकडे बघण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलला आहे.  आजच्या आधुनिक मुली व स्त्रिया पीरियड्सबद्दल न डगमगता बोलतात, युट्युबवर आपले अनुभव सांगतात, सल्ले देतात.  गेल्या वर्षी पी व्ही सिंधुच्या मुलींना उद्देशून लिहिलेल्या, प्रगतीची स्वप्ने #dreamsofprogress इतरांसमोर मोकळेपणाने मांडण्याचे आवाहन करणाऱ्या खुल्या पत्राला ग्राहकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला होता.  देशभरातील मुलींनी सिंधूच्या या आवाहनाला साथ दिली.  कितीतरी मुलींनी आपली स्वप्ने व महत्त्वाकांक्षा सांगितल्या आणि त्या पूर्ण करण्याच्या मार्गात मासिक पाळीचा अडसर येऊ नये अशी इच्छादेखील व्यक्त  केली. पी. व्ही. सिंधूने फक्त तिचा स्वतःचा अनुभव सांगितला आणि तिच्या रूपाने युवा मुलींना त्यांची व्हर्च्युअल गुरु  भेटली.

एकीकडे मुली, महिला मासिक पाळीबद्दल कोणताही आडपडदा न  मोकळेपणाने बोलू लागल्या आहेत तर त्याचवेळी पुरुषदेखील अधिकाधिक समजूतदारपणे या संवादात सहभागी होताना दिसत आहेत.  याच विषयावरील खऱ्याखुऱ्या जीवनकथेपासून प्रेरणा घेऊन बनवलेला अक्षय कुमारचा पॅडमॅन हा सिनेमा याचे उत्तम उदाहरण आहे.  मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर संवादाला चालना देण्यात या सिनेमाने मोलाची भूमिका  बजावली.

मासिक पाळीबद्दलचा संवाद हा पारंपरिक गैरसमजुती, रूढी, परंपरा यापासून दूर जात स्त्रीत्वापर्यंत येऊन पोहोचला आहे.  बराच दीर्घ पल्ला गाठला असला तरी अजूनही खूप काही करणे शिल्लक आहे.  या महिला दिनाच्या निमित्ताने आपण अशी काही  उचलली पाहिजेत जेणेकरून मासिक पाळीमुळे मुलींच्या, महिलांच्या शिक्षणात किंवा नोकरी, व्यवसायात काही अडचणी येणार नाहीत. वंचित वर्गातील महिलांना सॅनिटरी उत्पादने उपलब्ध करवून देऊन त्यांच्यासाठी मोठी सुविधा निर्माण केली जाऊ शकते. सोशल मीडिया यासंदर्भात लक्षणीय पावले उचलत आहे.

नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर.

0
पुणे-विविध संस्थांसोबत नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवत असताना माझ्या लक्षात आले की नागरिक जाता येता सहजपणे नदीत व नदीपात्रात कचरा ,निर्माल्य,देवाच्या फ्रेम सह इतर साहित्य भिरकावून जातात असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.यातूनच नदी प्रदूषित होत असून पात्र अत्यंत गलिच्छ अवस्थेत आहे,त्याच वेळेस यावर उपाययोजना करायचे ठरविले व माझ्या विकास निधीतून म्हात्रे पुलावर जाळ्या बसविण्यासाठी निधीची तरतूद केली असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.
त्याप्रमाणे नदीपात्रात राजपूत वीटभट्टी जवळ जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण झाले असून संपूर्ण म्हात्रे पुलावर ही संरक्षक जाळ्या बसविण्यात येत आहेत.आता नागरिकांना सहजपणे नदीत कचरा भिरकावता येणार नाही मात्र नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी आणि आपली नदी व नदीपात्र स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ही सौ मंजुश्री खर्डेकर यांनी केले आहे.तसेच या ठिकाणी नागरिकांना आवाहन करणारे व नदीचे माहात्म्य विषद करणारे फलक लावण्यात येतील व निर्माल्य कलश ठेवून त्यांच्या वेळोवेळी सफाईची व्यवस्था ही केली जाईल असे ही त्यांनी स्पष्ट केले.

‘शिक्षक गौरव ‘ पुरस्कारांचे लखनौ महापौरांच्या हस्ते वितरण

0
पुणे :’अवध शिक्षक गौरव ‘ पुरस्कारांचे वितरण लखनौच्या महापौर संयुक्ता भाटिया आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स ,डिझाईन अँड आर्ट ‘चे प्राचार्य डॉ . ऋषी आचार्य यांच्या हस्ते करण्यात आले .
लखनौमध्ये झालेल्या अखिल भारतीय कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या  २२ प्राचार्यांचा  आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला .  ‘पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स ,डिझाईन अँड आर्ट ‘  आणि युनिटी कॉलेज लखनौ यांनी संयुक्तपणे या उपक्रमाचे आयोजन केले . ऋषी आचार्य ,नजमूल रिझवी यांनी मार्गदर्शन केले . सईद मेहदी सलीम सर्फानी आणि मान्यवर उपस्थित होते .

टॉप ५ अप्सरा मध्ये होणार नृत्याची जबरदस्त जुगलबंदी !!!

0

संपूर्ण भारतात छोटा पडदा म्हणजेच टीव्ही पाहणारा प्रेक्षक वर्ग खूप मोठा आहे , त्यात डेलीसोप बरोबर रिऍलिटी शोज सुद्धातितक्याच चवीने पाहिले जातात. झी युवावरील सर्वच शो प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या वाहिनीवरील संगीत व नृत्यावरआधारित ‘अप्सरा आली’ या कार्यक्रमाने तर संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले आहे. महाराष्ट्राची लोककला लावणी आणि इतरनृत्य प्रकारांवर आधारित १४ अप्सरांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम आता त्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे . येत्यारविवारी १० मार्च ला संध्याकाळी ७ वाजता कार्यक्रमातील टॉप ५ अप्सरा महा अंतिम फेरीत एकमेकींशी स्पर्धा करणार आहेत. सुरेखाताई पुणेकर, दीपाली सय्यद, सोनाली कुलकर्णी या महा अप्सरांबरोबरच महागुरू सचिन पिळगावकर सुद्धा महा अंतिमफेरीच परीक्षण करतील .

तीन महिन्यांच्या प्रवासानंतर १४ अप्सरामधून केवळ टॉप पाच अप्सरा या कार्यक्रमात टिकल्या आणि त्यांनी त्यांच्या नृत्यानेअक्ख महाराष्ट्र गाजवलं . मालवणची लाडूबाई ऋतुजा राणे , साताऱ्याची गुलछडी माधुरी पवार , डोंबिवली फास्ट  किन्नरीदामा व पुण्याची ऑलराउंडर ऐश्वर्या काळे आणि पुण्याची मैना श्वेता परदेशी , या ५ जणी त्यांचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देत महाअंतिम फेरीपर्यंत धडक मारली . पारंपरिक लावणीचा साज, आणि अस्सल मातीची लावणी करत अनेक परफॉर्मन्स मधून बंदारुपया परफॉर्मन्सचा मान मिळवत साताऱ्याची गुलछडी माधुरी पवारने अख्या महाराष्ट्राला लावणीच्या ठेक्यावर नाचवले. लावणीचा अस्सल ठसा जपून वेगवेगळ्या फॉर्म मधून लावणी मंचावर सादर करताना ऑल राउंडर ही पदवी मिळवणारी ऐश्वर्याकाळेने या मंचाला एका वेगळ्या उंचीवर नेले. वयाने लहान असल्याने सगळ्यांचे लाड करून घेणारी मालवणची लाडूबाई तिच्यापरफॉर्मन्स मधून सगळ्यांनाच खुश केले. गश्मीर महाजनी, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, ललित प्रभाकर, स्वप्नील जोशी यासगळ्याच कलाकारांना आपल्यासोबत परफॉर्म करण्यासाठी जिने भुरळ घातली अशी ग्लॅमरस किन्नरी दामाने आपल्यापरफॉर्मन्सने सगळ्यांचे मन जिंकले. वडिलांचा नृत्याचा वसा चालवून प्रत्येक परफॉर्मन्स एकदम परफेक्ट करणारी श्वेतापरदेशी. या पाचही जणींची लावणीची जुगलबंदी महा-अंतिम फेरीची चुरस वाढवेल. या पाचही जणींपैकी कोण बनेलमहाराष्ट्राची पहिली अप्सरा? या अप्सरांमध्ये मुख्य गोष्ट अशी कि एकमेकींसमोर स्पर्धक म्हणून उभ्या ठाकलेल्याअसतानाही, सगळ्यांच्यात असलेला जिव्हाळा मात्र एखाद्या कुटुंबाप्रमाणे आहे. प्रेम, आपुलकी व खिलाडूवृत्तीने या पाचहीअप्सरा अंतिम सोहळ्यात त्यांचा उत्कृष्ट परफॉर्मन्स देतील . महाअंतिम सोहळयाचे मुख्य आकर्षण टॉप ५ अप्सरांचीजुगलबंदी असेलंच पण त्याच बरोबर  महाअप्सरा सुद्धा  स्पेशल नृत्य परफॉर्म करणार आहेत .

अंतिम सोहळ्यात टॉप ५ अप्सरांची ही अंतिम टक्कर पाहायला विसरू नका, रविवार १० मार्च, रोजी संध्याकाळी ७ वाजता, झीयुवावर!!! झी युवा वाहिनीवरील सर्व कार्यक्रम बघत राहण्यासाठी ३९ रुपयांचा ‘ झी फैमिली पॅक’   नक्की निवडा…या मध्येतुमचे मनोरंजन करण्याऱ्या २० झी वाहिन्या आपल्याला पाहायला मिळतील.