Home Blog Page 2969

बालेवाडीतील ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलने महात्मा गांधी सेंटर ऑफ युनिव्हर्सल व्हॅल्यूजचे उद्घाटन करून गांधीवादी तत्त्वांचा केला प्रचार

0

पुणे ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलने बालेवाडीतील संकुलामध्ये, ग्लोबल स्कूल्स फाउंडेशनच्या महात्मा गांधी सेंटर्स अँड क्रिएटिव्ह डिझाइन प्रमुख प्रा. कीर्ती कुमार त्रिवेदी आणि सेंट्रल गांधी स्मारक निधीच्या विश्वस्त डॉ. शोभा सुपेकर या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत नुकतेच महात्मा गांधी सेंटर ऑफ युनिव्हर्सल व्हॅल्यूजचे उद्घाटन केले. महात्मा गांधी यांचे चरित्र व शिकवण याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये व शांत जीवन रुजवण्याच्या उद्देशाने हे सेंटर सुरू करण्यात आले आहे.

या निमित्त बोलताना, जीआयआयएस इंडियाच्या ऑपरेशन्सचे संचालक राजीव बन्सल यांनी सांगितले, जगभरातील सध्याच्या वातावरणामध्ये ग्लोबल इंडियन महात्मा गांधी सेंटर फॉर युनिव्हर्सल व्हॅल्यूज (एमजीसीयूव्ही) अत्यंत महत्त्वाचे आहे. आमच्या अभ्यासक्रमातील विशिष्ट उपक्रमांमार्फत, आम्हाला सलोख्याच्या, शांततामय वांशिक समानता राखण्यास विद्यार्थ्यांना उत्तेजन देतील, अशा शैक्षणिक पद्धती प्रकल्प यांना चालना देणे शक्य आहे. जगभर शांततेचे दूत ठरू शकतील, असे योग्य समतोल साधणारे जागतिक नागरिक निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

जीआयआयएसच्या नऊ जेम्स टीचिंग मेथडॉलॉडीपैकी एमजीसीयूव्ही हे एक जेम आहे. महात्मा गांधी यांनी ज्या प्रकारे अहिंसा, सत्य, प्रेम व दया यांचा मार्ग पत्करला, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच ही मूल्ये रुजवण्याचे जीआयआयएसचे उद्दिष्ट आहे.

या वेळी उपस्थित असणाऱ्या प्रिन्सिपल सविंदर कौर रूपराय यांनी सांगितले, महात्मा गांधी अंगिकारलेली मूल्ये प्रत्येक बालकाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. वाढत्या वयामध्ये मुलांच्या मनामध्ये सकारात्मक  रचनात्मक असे, तसेच व्यक्तीच्या जीवनावर एकंदर समाजावर परिणाम करतील असे विचार रुजवणे गरजेचे आहे. जीआयआयएसमध्ये आम्ही अष्टपैलू, भविष्यात नेतृत्व करण्यास सक्षम व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करतो. नव्या महात्मा गांधी सेंटर ऑफ युनिव्हर्सल व्हॅल्यूजमुळे हे साध्य केले जाऊ शकते.

एमजीसीयूव्हीच्या उद्घाटन समारंभानंतर जीआयआयएसमध्ये जीआयआयएस अॅप्रसिएशन अँड अॅवॉर्ड्स 2019चे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना को-स्कॉलस्टिक व अभ्यासाव्यतिरिक्तच्या उपक्रमांसाठी गौरवण्यात आले. तसेच, त्यांना 2018-19 शैक्षणिक सत्रातील उल्लेखनीय यशासाठी प्रमुख पाहुण्यांकडून गौरवण्यात आले. जीआयआयएस बालेवाडी स्कूलचे शिक्षक व पालक यांनी, ज्या विद्यार्थ्यांचा वर्षभरातील कामासाठी सन्मान करण्यात आला, त्यांचे कौतुक केले व त्यांना प्रोत्साहन दिले.

हजरत सय्यद मोहम्मद शाह रहे दर्गाहचा ४३९ वा उरूस उत्साहात साजरा

0

पुणे -लष्कर भागातील सोलापूर रोडवरील बंगला नंबर एकमधील पाचपीर दर्गाह मैदानमधील हजरत सय्यद मोहम्मद शाह रहे दर्गाहचा ४३९ वा उरूस उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी घूसूल , कुराणख्वानी , समाखानी आदी धार्मिक कार्यक्रम झाले . त्यानंतर लंगरचा कार्यक्रम झाला . यावेळी हजरत सय्यद मोहम्मद शाह रहे दर्गाहचे प्रमुख खादिम जयकुमार राघवाचारी , योगेश चव्हाण , माजी महापौर नगरसेवक प्रशांत जगताप ,मौलाना इकबाल  आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी मुंबईमधील प्रसिध्द कव्वाल मंजूर जानी यांचा कव्वालीचा कार्यक्रम झाला .त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभागाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त कविराज संघेलिया , शशिकांत म्हेत्रे , शशिधर पुरम , सुरेश आगुरेड्डी , चंद्रकांत मुलतानी , श्रीराम चौधरी आदींचा सन्मानचिन्ह , शाल व पुष्पगुछ देउन माजी महापौर नगरसेवक प्रशांत जगताप यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले .

या उरुसाचे आयोजनासाठी  हजरत सय्यद मोहम्मद शाह रहे दर्गाहचे प्रमुख खादिम जयकुमार राघवाचारी , योगेश चव्हाण , सोमेश खरात , विजयन जोसेफ , गणेश  राघवाचारी सूरज  राघवाचारी राहुल खरात , नासिर शेख , मनोहर पिल्ले , अमर पुणेकर , आरिफ शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले . 

महावितरणच्या कार्यालयात किरकोळ आग

0

पुणे : महावितरण कंपनीच्या रास्तापेठ येथील प्रशासकीय कार्यालयातील एका कक्षाला मंगळवारी (दि. 26) किरकोळ आग लागली. यात प्रशासकीय कागदपत्रांचे कोणतेही नुकसान झाले नाही. तर टेबल, संगणक, एसी ब्लोअर व खूर्ची इत्यादी साहित्य किरकोळ स्वरुपात जळाले.

याबाबत माहिती अशी, की रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमधील रास्तापेठ मंडलचे अधीक्षक अभियंता यांच्या केबिनमधून आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत तातडीने अग्निशामक दलास कळविण्यात आले. अग्निशामक दलाने त्वरीत येऊन या कक्षामध्ये लागलेली किरकोळ आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीमध्ये संगणक, टेबल, एसीचे दोन ब्लोअर इत्यादींचे सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र कक्षातील टेबलवर प्रशासकीय कागदपत्र नव्हती. त्यामुळे कोणत्याही कागदपत्रांचे नुकसान झाले नाही. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे.

‘एक होती राजकन्या’ मध्ये आस्ताद काळेंची नव्या पात्रासह एंट्री

0

सोनी मराठीवरील एक होती राजकन्या मधील अवनीने आता प्रेक्षकांच्या मनात चांगलेच घर केले आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या राजकन्येचा हा प्रवास दिवसेंदिवस रंगतदार होत चालला आहे. त्यामध्येच एका ‘खास’ नवीन पात्राने मालिकेत एंट्री केली आहे. पत्रकार असलेल्या या नव्या पात्राचे नाव आहे पुष्कराज. अभिनेते आस्ताद काळे ही भूमिका निभावताना दिसतील. पुष्कराजचीहटकेएंट्री आणि अवनीशी झालेल्या भेटीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता निश्चितच ताणली गेली आहे.

एक होती राजकन्या मालिका अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. कर्तव्यनिष्ठ, साधी, हळवी अशी बाबांची लाडकी राजकन्या अवनी सगळ्यांनाच भावली आहे. आतापर्यंत झालेल्या एपिसोड्स मधून अवनीचा स्वभाव, तिच्या घरचे वातावरण, तिचे पोलीस खात्यात वावरणे इ. प्रेक्षकांच्या चांगलेच ओळखीचे झाले आहे. अवनीच्या या छोट्याश्या जगात आता एका नवीन पात्राची भर पडली आहे. मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आस्ताद काळे साकारत असलेल्या पुष्कराजची एंट्री म्हणजे प्रेक्षकांसाठी सुखद धक्काच आहे. पुष्कराज पोलीस ठाण्यात बातमी शूट करत असताना अवनी अनवधानाने त्याच्या वाटेत येते. अवनी आणि पुष्कराजची ही प्रोमोत दिसलेली ओझरती भेट बरंच काही सांगून जाते. पुष्कराज पोलीसांशी बोलत असताना अवनीच्या वडिलांचा संदर्भ आलेला प्रोमोत दिसतो. त्यामुळे तो आणि अवनी त्यांची भेट व्हायच्या आधीच एका अदृश्य धाग्याने बांधले गेले आहेत असे प्रेक्षकांना वाटत आहे. वरवर पाहता साधी वाटणारी हि अचानक झालेली छोटीशी भेट कोणते वळण घेईल…, का ती एका नव्याच कथानकास सुरुवात करेल.., हे पाहणे मनोरंजक असणार आहे.

पुष्कराज आणि अवनीची भेट अचानक झाली असली तरी अवनीला पुष्कराजबद्दल आधीपासूनच आदरयुक्त कुतुहूल आहे. पण पुष्कराज नक्की कोण आहे, त्याचा भूतकाळ काय आहे आणि त्याच्या अचानक येण्याचा हेतू काय असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. मालिकेचे पदर जसे उलगडत जातील तसा पुष्कराज प्रेक्षकांना कळू लागेल. अवनी आणि पुष्कराज मध्ये कशा प्रकारचा संवाद होतो, त्यांच्यात कसे नाते निर्माण होते यावर प्रेक्षकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे अवलंबून आहेत. कदाचित पुष्कराजचा मालिकेतील प्रवेश मालिकेला एकदम कलाटणी देखील देऊ शकेल.

पुणे जिल्‍हा माध्‍यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची बैठक संपन्‍न

0

पुणे-जिल्‍हा माध्‍यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची बैठक जिल्‍हा माहिती कार्यालयात संपन्‍न झाली. जिल्‍ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरुर या लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर पेड न्‍यूज (प्रदत्‍त बातमी) आणि दृक-श्राव्‍य माध्‍यमातील जाहिरातींच्‍या प्रसारणपूर्व परवानगीबाबत बैठकीत चर्चा झाली.

यावेळी ज्‍येष्‍ठ पत्रकार अरुण खोरे, पत्र सूचना कार्यालयाचे महेश अयंगार, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी जगदीश राव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. योगेश बोराटे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्‍थेच्‍या सहसंचालक नंदिनी आवडे, उप जिल्‍हाधिकारी सुधीर जोशी, टी. पी. शर्मा, एस. बी. निकम, उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, जिल्‍हा माहिती अधिकारी व समितीचे सदस्‍य-सचिव राजेंद्र सरग आदी उपस्थित होते.

नवीन मध्‍यवर्ती इमारतीतील तळमजल्‍यावर जिल्‍हा माहिती कार्यालयात माध्‍यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचा कक्ष स्‍थापन करण्‍यात आला आहे. राजकीय जाहिरातींची प्रसारणपूर्व परवानगी या कक्षातून दिली जाणार आहे, तसेच पेड न्‍यूजबाबतही कार्यवाही केली जाणार आहे. टीव्‍ही चॅनेल्‍स, केबल नेटवर्क, रेडिओ आणि सोशल मिडीयावरील दृक-श्राव्‍य (ऑडिओ-व्‍हीज्‍युअल) जाहिरातींच्‍या प्रसारणपूर्व परवानगीसाठी विहीत नमुन्‍यातील अर्ज सादर करणे आवश्‍यक आहे. अर्जासोबत जाहिरात चित्रफित अथवा ध्वनीफितीच्या दोन सिडी. प्रस्तावित जाहिरातीच्या साक्षांकीत अनुप्रमाणीत केलेला प्रतिलेख (ॲटेस्टेड ट्रान्सस्क्रीप्ट) दोन प्रतीत.  जाहिरात/मजकूर तयार करण्यासाठी आलेल्या खर्चाचा तपशील. जाहिरात प्रसारित करण्याचे माध्यम. जाहिरात प्रसारणाचा कालावधी, वेळ. (केबल टिव्ही, रेडीओ आणि इतर इलेक्ट्रॉनिक माध्यम असल्यास त्याच्यात प्रसारित करण्यात येणाऱ्या वेळेसह, किती वेळा प्रसारीत करणार त्याचा नेमका प्रसारणाचा तपशील) आणि जाहिरात प्रसारणाच्या खर्चाचा संभाव्य तपशील देणे आवश्‍यक आहे.

समितीच्‍या वतीने मुद्रीत माध्‍यमे, इलेक्‍ट्रॉनिक माध्‍यमे तसेच सामाजिक माध्‍यमांवर लक्ष ठेवण्‍यात येत असून त्‍यावर भारत निवडणूक आयोगाच्‍या निर्देशानुसार आवश्‍यक ती कार्यवाही केली जाणार असल्‍याचे बैठकीत स्‍पष्‍ट करण्‍यात आले.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या भागधारकांची भारत सरकारच्या 205 कोटी रुपयांच्या भागभांडवलासाठी संमती

पुणे: बँक ऑफ महाराष्ट्रच्या लोकमंगल पुणे येथे सोमवार दिनांक 25 मार्च 2019 रोजी संपन्न झालेल्या शेअरधारकांच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये बँकेच्या प्रती शेअर रुपये 13.25 दर्शनी मुल्याच्या 15,47,16,981 इक्विटी शेयर्सच्या माध्यमातून भारत सरकारकडून 205 कोटी रुपये प्राप्त करण्यासाठी संमती दिली गेली आहे. भारत सरकाने डिसेंबर 2018 मध्ये रुपये 4,498 कोटी तर फेब्रुवारी 2019 मध्ये 205 कोटी रुपयांचे भागभांडवल बँकेला दिलेले आहे.

या इक्विटी शेयर्सच्या संमतीमुळे आता भारत सरकारचा बँक ऑफ महाराष्ट्रमधील समभाग 87.01 टक्यांवरून वाढून 94.10 टक्के इतका होईल. भागभांडवलाच्या सरकारच्या या वाढीव गुंतवणुकीमुळे भांडवल पुरेसेपणाच्या गुणोत्तरामद्धे सुधारणा होवून बँकेची व्यावसायीक वृद्धी होईल.सभेला बँकेचे सरव्यवस्थापक आणि भागधारकांची उपस्थिती होती

गरिबांना दरवर्षी ७२ हजार देणार, 25 कोटी गरीबांना लाभ; राहुल गांधींचा वायदा

नवी दिल्ली: सत्तरच्या दशकात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘गरिबी हटाव’चा नारा दिला होता. इंदिरा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ‘न्याय स्किम’च्या माध्यमातून गरिबी हटावचा नारा दिला आहे. महिन्याला १२ हजार रुपयांहून कमी उत्पन्न असणाऱ्या देशातील २० टक्के गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देण्यात येईल, अशी घोषणाच राहुल गांधी यांनी केली. या स्किमबाबत अर्थतज्ज्ञांशी विचार विनिमय केला असून या योजनेचा देशातील ५ कोटी कुटुंबातील २५ कोटी लोकांना लाभ मिळणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. गेल्या पाच वर्षात देशातील गोरगरिबांची फसवणूक झाली आहे. देशातील जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. मात्र आता देशात आमचं सरकार आल्यास ‘न्याय स्किम’च्याद्वारे आम्ही देशातील २० टक्के गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देऊ. ज्यांचं मासिक उत्पन्न १२ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कमकुवत घटकातील लोकांचं मासिक उत्पन्न १२ हजार रुपये करण्यात येईल. म्हणजे एखाद्या व्यक्तिला महिन्याला ८ हजार रुपये पगार मिळत असेल तर सरकारच्यावतीनं त्याला आणखी ४ हजार रुपये दिले जातील. अशा तऱ्हेने त्यांचं मासिक उत्पन्न १२ हजार रुपयांवर नेलं जाईल. त्याचा देशातील २५ कोटी जनतेला थेट फायदा होईल, असं त्यांनी सांगितलं.

आम्हाला गरिबांना गरिबीतून बाहेर काढायचं आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आम्ही १४ कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढलं होतं, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना दररोज ३ रुपये देण्याचं वचन दिलं आहे. मात्र आम्ही तुम्हाला वर्षाला ७२ हजार रुपये देऊन न्याय देणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, यावेळी त्यांनी अन्य कोणत्याही राजकीय प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.

शिगमो उत्सव रद्द केल्यानंतर सरकार घेणार अंतिम निर्णय

0

कित्येक समित्यांनी शिगमो उत्सव रद्द केल्यानंतर अंतिम निर्णय सरकारतर्फे

 पणजी, 25 मार्च – मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांचे गेल्या आठवड्यात निधन झाल्यानंतर कित्येक मनपा कौन्सिल आणि शिगमो समित्यांनी उत्सव साजरा करण्याचे ठरवल्यानंतर राज्यात शिगमो साजरा करण्याविषयी राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार आहे.

फोंडा, वास्को, क्वेपे, मडगाव, सांगवे, वाल्पोई आणि कंकोना सोडून बाकीच्या मनपा कौन्सिलने त्या त्या भागात शिगमो मिरवणूक व उत्सव रद्द केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे.

श्री. पर्रीकर यांच्या दुःखद निधनानंतर सरकारने राज्यात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करत २१ ते २४ मार्चदरम्यानचा शिगमो उत्सव रद्द केला आहे.

आज पर्यटन विभागातर्फे माननीय पर्यटन सचिव श्री. जे. अशोक कुमार आणि पर्यटन संचालक श्री. संजीव गडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत मनपा कौन्सिल आणि शिगमो समित्यांकडून त्यांच्या मनपा परिसरात शिगमो उत्सव साजरा करण्याविषयी अंतिम निर्णय जाहीर करण्याबद्दल सूचना मागण्यात आल्या होत्या.

ज्या मनपा कौन्सिलने शिगमो मिरवणूक व उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे, त्यांचा या संबंधित प्रस्ताव सरकारकडे अंतिम निर्णयासाठी पाठवणार असल्याचे श्री. कुमार यांनी सांगितले. त्याचबरोबर गोव्यातील निवडणुकांसंदर्भात आचारसंहिता लक्षात घेता निवणणूक आयोगाची मंजुरीही त्यासाठी आवश्यक आहे.

ज्या मनपा कौन्सिल्सने शिगमो साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु त्याच्या तयारीसाठी याआधीच पैसे खर्च केले आहेत, त्यांना पर्यटन सचिवांनी समित्यांनी सुचवल्याप्रमाणे संबंधित प्रतिनिधींनी नुकसानभरपाईसाठी जमाखर्च दाखल करण्यास सांगितले आहे.

त्याचप्रमाणे ज्या मनपा कौन्सिल्सने आपल्या परिसरात शिगमो मिरवणुकांचे आयोजन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे त्यांना आचारसंहितेनुसार रात्री दहानंतर मिरवणूक सुरू न ठेवण्याचे व या संदर्भात पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

ज्या मनपा कौन्सिल्सने आपल्या परिसरात शिगमो मिरवणुकांचे आयोजन करण्याचे ठरवले आहे त्यांनी एप्रिल महिन्यात गोव्यात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता आचारसंहितेचे पूर्णपणे पालन करण्याची विनंती पर्यटन सचिवांनी केली आहे.

अंदाजे सात मनपा परिसरातील शिगमो मिरवणुका सरकारी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत – फोंडा (२८ मार्च), वास्को (२९ मार्च), क्वेपे (३० मार्च),  मडगाव, (३१ मार्च), सांगवे (१ एप्रिल), वाल्पोई (३ व ४ एप्रिल) आणि कंकोना (५ एप्रिल).

जया प्रदांनी भाजपमध्ये केला प्रवेश

0

लखनौ-अभिनेत्री आणि नेत्या जया प्रदा यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राजकीय वर्तुळातील माहितीनुसार नुसार, त्यांना भाजपकडून उत्तर प्रदेशच्या रामपूर लोकसभा मतदार संघाची उमेदवारी मिळणार आहे. याच ठिकाणी समाजवादी पक्षाने आजम खान यांना तिकीट दिले आहे. अशात रामपूर येथे जया प्रदा विरुद्ध आजम खान अशी लढत रंगण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, जया प्रदा समाजवादी पक्षाच्या नेत्या होत्या. परंतु, 2010 मध्ये त्यांना पक्षातून बाहेर पडावे लागले.

समाजवादी पक्षाचे आणखी एक माजी नेते अमर सिंह यांच्याशी त्यांनी हातमिळवणी केली होती. तसेच 2012 मध्ये राष्ट्रीय लोक मंच पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. परंतु, या पक्षाला विधानसभेत एकही जागा मिळाली नाही. जया प्रदा अमर सिंह यांना राजकारणात आपले गॉडफॉदर मानतात. गेल्या अनेक दिवसांपासून अमर सिंह भाजपचे समर्थन करताना दिसून येत आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या चौकीदार कॅम्पेनशी सुद्धा जोडले गेले. त्यांनी ट्विटरवर नुकतेच आपले नाव चौकीदार अमर सिंह असे केले आहे

पाकिस्तानने भारतातील ४० अतिरेकी मारले, दानवेंची जीभ हूकली

0

मुंबई -सतत वादात सापडणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. सोलापूरातील महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात दानवे यांनी पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देताना जवानांऐवजी अतिरेकी असा उल्लेख केला. दानवे म्हणाले की, ‘पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले. त्यामुळे देशात प्रचंड रोष तयार झाला.’ या वक्तव्यामुळे आता दानवे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सोशल मीडियावर कडाडून टीका केली जात आहे.

रावसाहेब दानवे यांचा हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रसने आपल्या अधिकृत ट्विटर वर पोस्ट केला आहे. हेच का भाजपाचे बेगडी देशप्रेम? असा सवाल राष्ट्रवादीने आपल्या ट्विटर उपस्थित केला आहे. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीर जवानांनाच भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अतिरेकी ठरवले आहे. असे म्हणच राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपाला लक्ष केले आहे.

सोशल मीडियावर नेटीझन्सनी दानवे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. एक युझर्स म्हणाला की, तुम्ही मागे शेतकऱ्यांना “साले” बोललात आणि आता शहीद सैनिकांना अतिरेकी म्हणालात.. तुमच्या घाणेरड्या मानसिकतेचा जाहीर निषेध !!दुसरा एका युझर्सने रावसाहेब दानवे यांना प्रदेक्षाध्यक्ष कोणी केलं असा थेट सवाल उपस्थित केला.

दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी याआधीही अशी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. दोन वर्षांपूर्वी तूरखरेदीवरून शेतकऱ्यांना ”साले”संबोधल्याने दानवे वादात सापडले होते. ”एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले, असे वादग्रस्त आणि शेतकऱ्यांची अवहेलना करणारे वक्तव्य दानवेंनी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर चौफैर टीका झाली होती.

पांडे डिझाईन्सच्या ब्रिजेश दमानीचा सिक्स रेड स्नूकरमधील 77 गुणांचा विक्रमी ब्रेक

0

पुणे,दि.25 मार्च 2019: पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2019 स्पर्धेत गटसाखळी फेरीत पांडे डिझाईन्स, पंडित जावडेकर असोसिएट्स, कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून बाद फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत इ गटात पांडे डिझाईन्स संघाने क्यू मास्टर्स अ संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करून बाद फेरीत धडक मारली. सामन्यात पांडे डिझाईन्सच्या दिग्विजय केडियन याने क्यू मास्टर्स अ संघाच्या सतीश कराडचा 38-05, 66-20, 41-30 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. दुसऱ्या सामन्यात पांडे डिझाईन्सच्या ब्रिजेश दमानीने आकाश पाडाळीकरचा 85(77)-00, 76-17, 52-11 असा पराभव करून विजयी आघाडी मिळऊन दिली. यात विशेष म्हणजे पांडे डिझाईन्सच्या ब्रिजेश दमानीने आपल्या खेळीत पहिल्या फ्रेममध्ये सिक्स रेड स्नूकरमधील 77 गुणांचा विक्रमी ब्रेक नोंदविला. सिक्स रेड स्नूकरमध्ये सर्वाधिक 75 गुणांचा ब्रेक होऊ शकतो, पण ब्रिजेशला सामन्यात फ्री बॉल मिळाल्यामुळे त्याने या संधीचा फायदा घेत स्पर्धेतील सर्वाधिक 77 गुणांचा ब्रेक नोंदवून एक नवा विक्रम आपल्या नावावर रचला. तिसऱ्या लढतीत पांडे डिझाईन्सच्या अनुज उप्पल याने सिद्धार्थ टेंबेचा 73(73)-00, 86(53)-12, 67-00) असा पराभव करून संघाचा विजय सुकर केला.

ग गटात अमनोरा द फर्न क्लब संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत पूना क्लब ब व 147 पूल अँड स्नूकर या संघांचा  3-0 अशा सारख्याच फरकाने पराभव करून बाद फेरी गाठली. ब गटात फैजल खान, लक्ष्मण रावत आणि लकी वटनानी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स संघाने डेक्कन रुकीजचा 3-0 असा सहज पराभव करून आगेकूच केली. ड गटात पहिल्या सामन्यात पंडित जावडेकर असोसिएट्स संघाने ठाणे टर्मिनेटर्सचा 3-0 असा तर, दुसऱ्या सामन्यात एसआरके मास्टर्स संघाचा 3-0 असा पराभव करून सलग तिसरा विजय नोंदविला.

याचबरोबर अ गटातून पीवायसी वॉरियर्स, खार जिमखाना, फायर बॉल्स, क गटातून कॉर्नर पॉकेट क्युइस्ट, ई गटातून कॉर्नर पॉकेट वॉरियर्स,केएसबीए, ऑटो पॉट्स, ह गटातून वाडेश्वर विझार्डस, कॉर्नर पॉकेट शूटर्स, एमपी स्ट्रायकर्स या संघानी बाद फेरीत प्रवेश केला.   

स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:
गट ब: कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स वि.वि.डेक्कन रुकीज 3-0(फैजल खान वि.वि.अश्विन पळणीतकर 29-26, 63-41, 34-27; लक्ष्मण रावत वि.वि.राजेंद्र आढाव 37-12, 80-11, 60-01; लकी वटनानी वि.वि.श्रीवत्स शेवडे 26-30, 100(64)-01, 17-36, 67-22, 55-08);

गट क: एलसीएसए वि.वि.केव्हीडी स्कवाङ 2-1(अक्षय कुमार वि.वि.गौरव जयसिंघानी 38-21, 78-44, 35-22; आयुश मित्तल वि.वि.जयेश साळवी 50-25, 65(57)-20, 00-47, 67-33; शोबीत चंद्रा पराभूत वि.अभिनय एडके 20-43(42), 07-65, 00-44(44));

गट ड: ठाणे टर्मिनेटर्स वि.वि.वायएमएसए यंगस्टर्स 2-1(निखिल पटेल पराभूत वि.क्रिश गुरबयानी 16-45, 40-52, 33-01, 39-80; अरुणकुमार व्हीएन वि.वि.आयुश सिन्हा 36-00, 52-42, 44-23; अभिषेक सरकार वि.वि.अनमोल पंडिता 45-17, 54-43,47-11);

गट ड: पंडित जावडेकर असोसिएट्स वि.वि.ठाणे टर्मिनेटर्स 3-0(सिद्धार्थ पारीख पुढे चाल वि.अरुणकुमार व्हीएन; कमल चावला वि.वि.अभिषेक सोपरकर 49-08, 73-14, 67-00; मोहम्मद हुस्सेन वि.वि.निखिल पटेल 47-09, 56-22, 24-40, 49-48);

गट ड: पंडित जावडेकर असोसिएट्स वि.वि.एसआरके मास्टर्स 3-0(कमल चावला वि.वि.वाहीद खान 43-01, 03-54, 26-40, 53-13, 52-04; सिद्धार्थ पारीख वि.वि.मोहम्मद सलमान 33-25, 47-56, 67-21, 70-14; मोहम्मद हुस्सेन वि.वि.कृष्णराज अरकोट 36-28, 62-33, 34-29);

गट ड: एसआरके मास्टर्स वि.वि.वायएमएसए यंगस्टर्स 3-0(कृष्णराज अरकोट वि.वि.आयुश सिन्हा 28-16, 70-39, 41-32; वाहीद खान वि.वि.क्रिश गुरबयानी 39-09, 36-63, 34-31, 33-77, 30-19; मोहम्मद सलमान वि.वि.जीत भोजनी 29-19, 58-01, 44-42);

गट इ: पांडे डिझाईन्स वि.वि.कॉर्नर पॉकेट टायगर्स 3-0(ब्रिजेश दमानी वि.वि.मनोज बारी 34-27, 55-46, 57(57)-00; दिग्विजय केडियन वि.वि.चिंतामणी जाधव 35-38, 33-79, 43-04, 65-27, 40-15; अनुज उप्पल वि.वि.माधव जोशी 02-26, 59-14, 54-00, 89-19);

गट इ: पांडे डिझाईन वि.वि.क्यू मास्टर्स अ 3-0(दिग्विजय केडियन वि.वि.सतीश कराड 38-05, 66-20, 41-30; ब्रिजेश दमानी वि.वि.आकाश पाडाळीकर 85(77)-00, 76-17, 52-11; अनुज उप्पल वि.वि.सिद्धार्थ टेंबे 73(73)-00, 86(53)-12, 67-00);

गट ग: अमनोरा द फर्न क्लब वि.वि.पूना क्लब ब 3-0(पांडुरंगा वि.वि.कुणाल वासवानी 16-31, 72-00, 43-00, 64-35; विजय निचानी वि.वि.पंकज परमार 38-01, 85(73)-15, 45-24; दिलीप कुमार वि.वि.कुमार शिंदे 58-00, 78-38, 16-42, 92-52);

गट ग: अमनोरा द फर्न क्लब वि.वि.147 पूल अँड स्नूकर 3-0(विजय निचानी वि.वि.जवाहर मानकर 36-25, 67-08, 41-13; दिलीप कुमार वि.वि.मनोज गाडगीळ 55-05, 65-34, 04-48, 78-24; पांडुरंगा वि.वि.चैतन्य हळबे 57-11, 70(55)-55, 47-13).

कोथरूड, वारजे, डेक्कनमधील विस्कळीत वीजपुरवठा सुरळीत

0

महापारेषणच्या वीजवाहिनीत बिघाड

पुणे, दि. 25 मार्च 2019 : महापारेषण कंपनीच्या 132 केव्ही फुरसुंगी-कोथरूड टॉवर लाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे कोथरूड, वारजे, डेक्कन परिसरात सोमवारी (दि. 25) दुपारी एक वाजता वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. सुमारे 35 हजार वीजग्राहकांना त्याचा फटका बसला. टॉवर लाईनच्या दुरुस्तीनंतर दुपारी 3.30 वाजता सर्वच परिसरातील वीजपुरवठा सुरळीत व पूर्ववत झाला.

याबाबत माहिती अशी, की महापारेषणच्या फुरसुंगी 220/132 केव्ही उपकेंद्रातून 132 केव्ही कोथरूड या टॉवर लाईनद्वारे कोथरूड येथील 132 केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा केला जातो. अप्पर इंदिरानगर परिसरात या टॉवर लाईनखाली असलेल्या एका घराचा पत्रा इंडक्शन झोनमध्ये आल्याने टॉवर लाईनमध्ये स्पार्कींग होऊन वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे 132 केव्ही कोथरूड उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी महावितरणच्या कोथरूड विभाग अंतर्गत येणाऱ्या कोथरूड, वारजे, डेक्कन, एरंडवणे, लोकमान्यनगर, डहाणूकर कॉलनी, शिवणे, कर्वेनगर, आदित्य गार्डन, वारजे गावठाण आदी परिसरातील सुमारे 1 लाख 25 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी एकच्या सुमारास खंडित झाला होता.

महावितरणकडून तातडीने पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात आले. यामध्ये महापारेषणच्या 132 केव्ही नांदेड सिटी व पर्वती या दोन उपकेंद्रातून महावितरणचे उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला व अर्ध्या तासात टप्प्याटप्प्याने सुमारे 90 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात आला. मात्र उन्हामुळे विजेची मागणी वाढल्याने भार व्यवस्थापन शक्य झाले नाही. त्यामुळे सुमारे 35 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा सव्वादोन तास खंडित राहिला. दुपारी 3.20 वाजता महापारेषणकडून दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर 132 केव्ही कोथरूड उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरु झाला. त्यानंतर सर्वच परिसरात या उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा पूर्ववत व सुरळीत करण्यात आला.

‘नॉक! नॉक! सेलिब्रिटीं’ मध्ये सुमीत राघवन व क्षिती जोग!

0

मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याबद्दल नेहमीच सर्वसामान्यांच्या मनात कुतूहल असतं. सध्याच्या काळात हे कुतूहल शमवण्याचं काम वेगवेगळी समाजमाध्यमं आणि स्वतः सेलिब्रिटी सातत्यानं करत असतात. अशाच एका ‘सेलिब्रिटी’ हे बिरुद मिरवणाऱ्या एका अभिनेत्याच्या आयुष्याबद्दलचे दोन टोकाचे दृष्टिकोन उलगडणारं ओंकार अरविंद कुळकर्णी लिखित आणि मंदार देशपांडे दिग्दर्शित ‘नॉक! नॉक! सेलिब्रिटी’ हे नवं नाटक. या अत्यंत वेगळ्या विषयावरील नाटकाची निर्मिती संतोष रत्नाकर गुजराथी, मनोज पाटील, विजय केंकरे यांच्या ‘विप्लवा’ + ‘प्रवेश निर्मित’ केले असून या नाटकाचे सादरकर्ते संतोष रत्नाकर गुजराथी आहेत. लोकप्रिय अभिनेते सुमीत राघवन आणि क्षिती जोग यांच्या अप्रतिम अभिनयाने सजलेल्या या नाटकातील त्यांच्या या भूमिका विलक्षण नाट्यानुभव देणाऱया आहेत.

‘विप्लवा’ या संस्थेद्वारे मनोरंजन निर्मितीत पाऊल टाकलेल्या संतोष रत्नाकर गुजराथी यांनी दर्जेदार कलानिर्मिती निर्माण करण्याचे प्रमुख उद्दिष्ठ ठेऊन ‘ॲब्सोल्युट’ या त्यांच्या पहिल्या नाटकाची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी मालिका निर्मितीत प्रवेश करीत ‘रुद्रम’ आणि ‘कट्टी बट्टी’ या मालिकांची सहनिर्मिती केली आहे.  तसेच व्यावसायिक रंगभूमीवर संजय नार्वेकर अभिनीत ‘घरात मॅरीड बाहेर बॅचलर’ या आगल्या वेगळ्या नाटकाची निर्मिती केली असून विविध विषयांवरील दर्जेदार नाट्यनिर्मितीसाठी त्यांच्या सोबत दिग्दर्शक मंदार देशपांडे हे क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून कार्यरत आहेत.

लिखाण, दिग्दर्शन, अभिनय यासह सर्वच बाबतात ‘नॉक! नॉक! सेलिब्रिटी’ हे नाटक उजवं ठरत असून मराठी कला क्षेत्रातील विविध मान्यवरांनी हे नाटक अभिरुची संपन्न असल्याची पावती दिली आहे. या नाटकाचे मोजकेच प्रयोग सादर झाले असून त्या प्रयोगांना मान्यवरांनी विशेष प्रतिसाद दिल्याने आता हे नाटक सर्वसामान्य रसिकांसाठी सादर करण्याचा निर्णय घेत निर्मात्यांनी येत्या 28 व 29 मार्च रोजी बोरीवली, दादर तसेच ६, १३ एप्रिल रोजी प्रभादेवी – दादर येथील नाट्यगृहांमध्ये  या नाटकाचे प्रयोग जाहिर केले आहेत.

ओंकार कुळकर्णी आणि मंदार देशपांडे या नव्या दमाच्या लेखक दिग्दर्शक जोडगोळीचं ‘नॉक नॉक सेलिब्रिटी’ हे नाटक नुकतंच रंगमंचावर रुजू झालं आहे. या नाटकाचा आजच्या काळाशी सुसंगत वेगळा विषय आणि नव्या पठडीतील सादरीकरण सामान्य प्रेक्षकालाही भुरळ घालणारं असून ते प्रत्येकाने पहावं म्हणजे एका सेलिब्रिटींचं काय आयुष्य असतं? आणि सामान्य प्रेक्षक त्यांच्याकडे कसं पाहतो? याचं झक्कास मिश्रण लेखक – दिग्दर्शकाने या नाटकात केले आहे. आजचं सोशल मीडियाचं जग कसं आहे? आणि त्याचा सर्वांवर होणारा परिणाम – दुष्परिणाम याचं यथार्थ दर्शन आपल्याला ‘नॉक नॉक सेलिब्रिटी’ पहाताना अंतर्मुख करते. या नाटकाचं नेपथ्य-प्रकाश प्रदीप मुळ्ये यांचं असून संगीत राहुल रानडे यांनी दिले आहे. वेशभूषा श्वेता बापट यांनी केली असून प्रसिद्धी जाहिरात संकल्पना सचिन सुरेश गुरव यांची आहे.

‘नॉक! नॉक! सेलिब्रिटी’ हे नाटक प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश म्हापुस्कर, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, शुभांगी गोखले, सुचित्रा बांदेकर, चिन्मयी सुमीत, सुहिता थत्ते, माधवी पुरंदरे, समर नखाते, समीर विद्वांस, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, सागर देशमुख, अभिजित खांडकेकर, आरती वाडगबाळकर, ओमप्रकाश शिंदे, संकर्षण कऱ्हाडे, उज्वला जोग, कौशल इनामदार, ऋतुजा बागवे इत्यादी मान्यवरांनी हे नाटक त्यांना आवडलं असल्याची पावती दिली आहे.

अलका भुजबळ यांना जाणीव पुरस्कार प्रदान

0

मुंबई-अलका भुजबळ यांना जाणीव पुरस्कार प्रदान कॅन्सरवर मात करून,त्यावर “कॉमा”पुस्तक लिहीणाऱ्या,कँसर रुग्ण,त्यांचे नातेवाईक यांचं समुपदेशन करणाऱ्या अष्टपैलू अलका भुजबळ यांना जाणीव पुरस्कार देऊन आज गौरविण्यात आलं.

यावेळी अलका भुजबळ यांनी कँसरशी लढा देताना आलेले अनुभव भावुकपणे विषद केले. तसंच प्रत्येक महिलेने घराकडे लक्ष देताना,स्वतःची आरोग्य तपासणी नियमितपणे करावी,असे आवर्जून सांगितले. यावेळी विविध महिलांनाही गौरविण्यात आलं. त्यांनीही आपलं समयोचित मनोगत व्यक्त केलं.

तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत यांनी सांगितलेले अनुभव आणि केलेले आवाहन सर्वांना अंतर्मुख करून गेले.यावेळी “नानी का घर ” साठी त्यांच्याकडे मदत सुपुर्द करण्यात आली. अभिनेत्री सुप्रिया पाठारे,अश्विनी कासार विशेष पाहुण्या तर अध्यक्ष जेष्ट साहित्यिक डॉ. विजया वाड होत्या. सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी बहारदारपणे केलं. यावेळी आदी अमित खामकर यांच्या आदी नृत्यालयतर्फे नृत्याविष्कार झाले. शिवाजी नाट्य मंदिरात झालेल्या या शानदार कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर,रसिक उपस्थित होते.

पंडित जावडेकर असोसिएट्स संघाची वायएमएसए यंगस्टर्स संघावर मात

0

पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2019 स्पर्धेत गटसाखळी फेरीत  मोहम्मद हुस्सेन खान, सिद्धार्थ पारीख आणि कमल चावला यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पंडित जावडेकर असोसिएट्स संघाने वायएमएसए यंगस्टर्सचा 3-0 असा सहज पराभव करून विजयी सलामी दिली. 

पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत ड गटात पंडित जावडेकर असोसिएट्स संघाने वायएमएसए यंगस्टर्सचा 3-0 असा पराभव केला. सामन्यात पंडित जावडेकर असोसिएट्सच्या मोहम्मद हुस्सेन खान याने अनमोल पंडिताचा 40-00, 95-06, 48-27 असा, तर पंडित जावडेकर असोसिएट्सच्या सिद्धार्थ पारीख याने क्रिश गुरबयानीचा 31-36, 65-66, 40-14,103(47,36)-00 असा पराभव केला. सिद्धार्थ पारीखने आपल्या खेळीत चौथ्या फ्रेममध्ये 47 व 36 गुणांचा ब्रेक नोंदविला. तिसऱ्या लढतीत कमल चावला याने जीत भोजनीचा  44-00, 35-61, 38-22, 74-08 असा पराभव केला. 

 ब गटात लक्ष्मण रावत, लकी वटनानी व फैजल खान यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स संघाने पीवायसी जायंट्सचा 3-0 असा पराभव करून आगेकूच केली. सामन्यात फैजल खान याने आपल्या खेळीत दुसऱ्या व चौथ्या फ्रेममध्ये अनुक्रमे 61 व 50 गुणांचा ब्रेक नोंदविला. क गटात कॉर्नर पॉकेट क्युईस्ट संघाने पॉट ब्लॅक संघावर 3-0 असा सनसनाटी विजय मिळवला.

अन्य लढतीत क गटात एलसीएसए संघाने क्यू क्लब एसेस संघाला 3-0 असे नमविले. विजयी संघाकडून शोएब चंद्रा, आयुश मित्तल, अक्षय कुमार यांनी अफलातून कामगिरी बजावली. ग गटात बीएसएए मास्टर्स संघाने 147 पूल अँड स्नूकर संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
गट ब: कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स वि.वि.पीवायसी जायंट्स 3-0(लक्ष्मण रावत वि.वि.रोहित नारगोलकर 50-00, 73(60)-09, 36-09; लकी वटनानी वि.वि.सलील देशपांडे 42-18, 78-18, 11-34, 56-43; फैजल खान वि.वि.अरुण बर्वे 49-05, 93(61)-15, 18-38, 69(50)-16);

गट क: केव्हीडी स्क्वाड  वि.वि.क्यू क्लब एसेस 2-1(गौरव जयसिंघानी वि.वि.अभिषेक बोरा 26-32, 73-24, 47-13, 64-24; जयेश साळवी वि.वि.निलेश पाटणकर 57-19, 49-28, 42-22; अभिनय एढे चाल पुढे चाल वि.सचित जामगावकर);

गट क: कॉर्नर पॉकेट क्युईस्ट वि.वि.पॉट ब्लॅक 3-0(हसन बदामी वि.वि.कैवल्य जाधव 12-38, 60-01, 36-24, 59-09; मुकुंद भराडिया वि.वि.विपुल सोनटके 58-20, 73-08, 39-07; राहुल सचदेव वि.वि.हरीश गायकवाड 33-18, 69-54, 18-14);

गट क: एलसीएसए वि.वि.क्यू क्लब एसेस 3-0(शोएब चंद्रा वि.वि.अभिषेक बोरा 01-65(54), 57-41, 46-09, 66-46; आयुश मित्तल वि.वि.निलेश पाटणकर 41(41)-01, 73(52)-42, 34-14; अक्षय कुमार वि.वि.सचित जामगावकर 27-28, 53-06, 28-15, 59-45);

गट ड: पंडित जावडेकर असोसिएट्स वि.वि.वायएमएसए यंगस्टर्स 3-0(मोहम्मद हुस्सेन खान वि.वि.अनमोल पंडिता 40-00, 95-06, 48-27; सिद्धार्थ पारीख वि.वि.क्रिश गुरबयानी 31-36, 65-66, 40-14,103(47,36)-00; कमल चावला वि.वि.जीत भोजनी  44-00, 35-61, 38-22, 74-08; 

गट ग: बीएसएए मास्टर्स वि.वि.147 पूल अँड स्नूकर 2-1(आनंद रघुवंशी पराभूत वि.चैतन्य हळबे 30-27, 54-59, 23-35, 79-42, 05-31; रोविन डिसुझा वि.वि.जवाहर मानकर 44-16, 91-21, 68-14; अभिमन्यू गांधी वि.वि.मनोज गाडगीळ 54-00, 37-62, 22-36, 64-24, 72(72)-00);