Home Blog Page 2966

घडवली टाकावूतून टिकाऊ विज्ञान उपकरणे’

0
पुणे-न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेतील १८०० विद्याथ्यारनी हॅन्डस ऑन ऍक्टिव्हिटी
व्दारे टाकाऊ पदार्थापासून विविध टिकाऊ वैज्ञानिक उपकरणांची निर्मिती केली. तसेच
पद्मश्री डॉ अरविंद गुप्ता यांचीही विविध वैज्ञानिक खेळणी निर्माण केली. विज्ञानदिनाप्रित्यर्थ
या उपकरणांचे देखणे प्रदर्शन ही प्रशालेत आयोजित करण्यात आले. त्याच बरोबर विज्ञान
निबंध स्पर्धा, विज्ञान चित्रकला स्पर्धा, वैज्ञानिकांची व्या‘याने यांचे ही आयोजन
विद्याथ्यारसाठी करण्यात आले होते. या उपक‘मात सहभागी झालेल्या विद्याथ्यारपैकी
वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणा-या निवडक ४८ विद्याथ्यारचा बक्षिस समारंभ बुधवार दि. २७ मार्च
२०१९ रोजी डे ?न एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. शरद कुंटे
यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. विज्ञान अभ्यासाची आवड विद्याथ्यारनी जोपासली तरच
स्वत:स, समाजास व देशास सुख शांती, समृध्दी व सामर्थ्य प्राप्त करून देणारे भावी
वैज्ञानिक तयार होतील असे विचार या प्रसंगी त्यांनी विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेतरांसमोर
मांडले. या कार्यक‘मास मा. शालाप्रमुख श्रीम तिलोत्तमा रेड्डी यांचे मार्गदर्शन लाभले. मा
उपप्रमुख श्रीम जयश्री रणखांबे उपस्थित होत्या. या कार्यक‘माचे सूत्रसंचालन श्रीम राधिका
देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका श्रीम. रजनी कोलते यांनी केले.

रांगडी प्रेमकथा “जीव झाला येडापिसा” कलर्स मराठीवर !

0

दोन समांतर रेषा कधीही जुळू शकत नाहीत, त्याचप्रमाणे एकमेकांचा तिरस्कार करणारी, भिन्न स्वभावाची दोन माणसं कधीही एकत्र येऊ शकत नाहीत… पण प्रेम अशक्य गोष्ट शक्य करू शकतं असं म्हणतात. पराकोटीच्या तिरस्कारातूनसुद्धा सरतेशेवटी प्रेमाचा अंकुर फुटतो इतकी ताकद प्रेमात असते. ती व्यक्ती समोर आली की नकोशी वाटते पण नजरेआड होताच जीवाची घालमेल होते. सिद्धी आणि शिवाच्या बाबतीत असच काहीसं घडणार आहे. दोघेही एकमेकांचा तिरस्कार करतात,पण नियती आपला डाव खेळतेच. अशी परिस्थिती उदभवते की सिद्धी – शिवा यांना बेसावधपणे लग्नाच्या बंधनात अडकवलं जातं आणि मग कसोटी लागते प्रेमाची. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या या दोघांमध्ये प्रेम भावना निर्माण होईल का ?तिरस्काराच्या धगधगत्या निखाऱ्यावर शिवा आणि सिद्धीमध्ये प्रेम फुलू शकेल सिद्धी आणि शिवा ह्या दोन धगधगत्या निखाऱ्यांच्या नातेसंबंधाची रांगडी प्रेमकथा “जीव झाला येडापिसा” १ एप्रिलपासून सोम ते शनि रात्री ८.०० वा. फक्त कलर्स मराठीवर. चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेल्या या कथेची निर्मिती पोतडी प्रॉडक्शन्सने केली आहे. मालिकेचे विशेष म्हणजे संपूर्ण मालिका सांगलीमध्ये शूट होणार आहे. नवोदित विदुला चौघुले सिद्धीची भूमिका आणि अशोक फळदेसाई शिवाची भूमिका साकारणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, चिन्मयी सुमित देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.    

मुंबईतील डबेवाल्यांचा सत्कार

0
पुणे :मुंबईकर ग्राहकांचे डबे अचूक आणि वेळेवर पोहोचविणाऱ्या, आयएसओ आणि सिक्स सिग्मा प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांचे ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट ‘ ,’इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ‘या विषयावरचे मार्गदर्शन व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते .
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस ‘मध्ये ३० मार्च रोजी हा कार्यक्रम   झाला. ‘नूतन  मुंबई टिफिन सर्व्हिसेस चॅरिटी  ट्रस्ट  ‘चे सचिव किरण  गवंडे , बाळासाहेब भालेराव यांनी व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांशी संवाद साधला .
 आझम कॅम्पस (पुणे कॅम्प ) मधील हाय टेक हॉल येथे हा कार्यक्रम ३० मार्च सकाळी १० वाजता झाला.
. ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस ‘चे संचालक डॉ . आर गणेसन यांनी स्वागत केले.
या कार्यक्रमात त्यांचा सत्कार महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांच्याहस्ते करण्यात आला .
किरण गवंडे यांनी  त्यांच्या डब्यांची वितरण व्यवस्था, कोडींग, इतिहास,नीतीमूल्ये यांची माहिती दिली. २ लाख मुंबईकरांना दररोज वेळेत, अचूक डबे पोचवले जातात. उन, पाऊस, अतिवृष्टी, गाडयांचा संप अशा अडचणींना तोंड देऊन सेवा दिली जाते, असे त्यांनी सांगीतले.

पुणे जिल्‍ह्यात निवडणूक विषयक 444 तक्रारी प्राप्त

0

पुणे-जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात सध्या निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातारणात पार पाडण्यासाठी  भारत निवडणूक आयोगाने सिटीजन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे नवे मोबाईल ॲप विकसित केले आहे. पुणे जिल्‍ह्यातून या अॅपवर आतापर्यंत 444 तक्रारी प्राप्‍त झाल्‍या असून त्‍यावर योग्‍य ती कार्यवाही केली जात आहे. हे सी-व्हिजिल’ ॲप उत्तमरित्या काम करत असून त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत, असे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

निवडणूक आयोगाकडून प्रथमच हे नावीन्‍यपूर्ण अॅप देशातील नागरिकांना उपलबध करुन देण्‍यात आले आहे. या ‘सी-व्हिजील’ ॲपमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत. या ॲपचा वापर करणाऱ्या नागरिकांकडील मोबाईल हॅण्डसेटचा प्रकार, मोबाईल इंटरनेट सेवेची गती (इंटरनेट स्पीड- उदा. 3जी, 4जी), मोबाईल नेटवर्क पुरवठादार कंपनी, स्थाननिहाय नेटवर्क कव्हरेज आदी घटकांवर इंटरनेट स्पीड अवलंबून असतो. या घटकांमुळे तेथील परिस्थितीनुसार ॲपवर छायाचित्र, चित्रीकरण अपलोड करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत फरक असू शकतो. यामध्ये ॲपचा कोणताही तांत्रिक दोष नाही. याउलट ‘सी-व्हिजील’ ॲपला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्‍याचे दिसून येत आहे, ही आनंदाची बाब आहे. या तक्रारीवर अवघ्या 100 मिनिटात कार्यवाही होत असल्‍याने हे ॲप नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र तर निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा ठरत आहे.  कोणताही नागरिक निवडणुकी दरम्यान होणाऱ्या आदर्श आचार संहिता उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाईन करू शकतो.           ‘सी-व्हिजिल’ हे ॲप निवडणुकांदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी एक नावीन्‍यपूर्ण अस्त्र असून या माध्यमातून नागरिकांनी स्वतंत्र व नि:पक्षपाती  निवडणुकांच्या संचालनासाठी सक्रिय आणि जबाबदार भूमिका बजवावी, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान

0

पुणे-सिग्मा इव्हेंट्सच्या समाजामधील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला . वानवडीमधील महात्मा फुले सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या या महिला सन्मान सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द निर्माता व दिग्दर्शक योगेश वनवे , तकवा ज्वेलर्सचे संचालक मुफजर शेख , सिग्मा इव्हेंट्स संचालक ब्रायन स्वामी , बेइंग मी या ब्युटी सलूनच्या संचालिका अश्विनी बोधी , जेष्ठ सामाजिक कार्य्रकर्ते सुदामराव जगताप आदी मान्यवर उपस्थित होते .

 समाजामधील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांमध्ये कायदा क्षेत्रामधील ऍड. शामला बेनजी , सामाजिक क्षेत्रामधील प्रा. मंजुषा मकासरे , संगीत क्षेत्रामधील  पूजा , शैक्षणिक क्षेत्रामधील  संगीता खेर , रेडिओ जॉकी  क्षेत्रामधील  स्मिता त्रिभुवन , पोलीस क्षेत्रामधील नीलिमा गायकवाड , क्रीडा क्षेत्रामधील  संध्या पानबुडे , सामाजिक क्षेत्रामधील  समिधा शेख , नृत्य क्षेत्रामधील मेघना केसकर , शरीरसौष्ठव क्षेत्रामधील  स्टेला गाडे , , वैद्यकीय क्षेत्रामधील  डॉ प्रीती सरदार , बालमानस शास्त्र क्षेत्रामधील  डॉ दीपालक्ष्मी पेशवे , स्त्री रोग तज्ञ क्षेत्रामधील  डॉ. मलिका गायकवाड स्केट डान्स क्षेत्रामधील  मिशेल भस्मे सामाजिक क्षेत्रामधील  शबाना शेख , सुपर अँकर क्षेत्रामधील  अफसाना शेख आदीचा सन्मानचिन्ह , शाल व श्रीफळ देऊन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमाचे आयोजन सिग्मा इव्हेंट्स संचालक ब्रायन स्वामी व मार्कस भस्मे यांनी केले होते . 

बापट यांनी साधला महायुतीच्या दहा हजार कार्यकर्त्यांशी संवाद-मोदी व्हिडिओद्वारे साधणार कार्यकर्त्यांशी संवाद

0
पुणे- भाजप, सेना, आरपीआय, रासप व शिवसंग‘ाम महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्ता व पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यांच्या माध्यमातून महायुतीच्या दहा हजार कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून कार्यकर्त्यांमध्ये जोष व उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, शिवसेनेचे रघुनाथ कुचीक, शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, रिपब्लीकन पार्टी ऑङ्ग इंडियाचे परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष अशोक कांबळे, शिवसंग‘ामचे भरत लगड, रासपचे सनी रायकर यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केले.
  • पंतप्रधान मोदी व्हिडिओद्वारे साधणार कार्यकर्त्यांशी संवाद
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मै हूँ चौकीदार’ या कार्यक‘माद्वारे आज (३१ मार्च) रोजी सायंकाळी पाच वाजता कार्यकर्त्यांशी व्हिडिओद्वारे संवाद साधणार आहेत. ‘शुभारंभ लॉन्स’ येथे हे प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे. महायुतीचे उमेदवार गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि पदाधिकारी या कार्यक‘माला उपस्थित राहणार आहेत.
काम करणारा कार्यकर्ता अशी महायुतीच्या कार्यकर्त्यांची ओळख आहे. गेल्या काही दिवसात शहरात महायुतीची ताकद वाढली आहे. महायुतीच्या विजय निश्‍चित आहे. परंतु कार्यकर्त्यांची गाङ्गील राहू नये. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना व विकास प्रकल्प सुरू केले आहेत. ही माहिती कार्यकर्त्यांनी मतदारापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यासाठी कामाचे नियोजन व नियोजनपप्रमाणे काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत श्री. बापट यांनी विविध मेळाव्यांमध्ये बोलताना व्यक्त केले. आहे.
निवडणुकीत महायुतीचा उमेदवार निश्‍चित विजयी होणार आहे. परंतु कार्यकर्त्यांनी गाङ्गील राहू नये. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे सूक्ष्म नियोजन करावे असे आवाहन खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केले. गिरीश बापट तीन लाखांहून अधिक मतांनी निवडून येतील असा विश्‍वास खासदार काकडे यांनी व्यक्त केला. भाजपची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी गेले काही महिने पक्षाने विशेष प्रयत्न केले आहेत. या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा असे आवाहन श्री. गोगावले यांनी केले.
आमदार विजय काळे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकार्‍यांनी मेळाव्यांचे संयोजन केले.

सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांचा सत्कार

0
पुणे :खवय्येगिरीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या चोखंदळ पुण्यात सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांचा सत्कार ‘महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी ‘ या शासकीय  संस्थेमध्ये शुक्रवारी करण्यात आला .
‘महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी ‘ च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त  अनोखा सोहळा आयोजित करण्यात आला होता . पूना गेस्ट हाऊस ‘चे किशोर सरपोतदार ,’दोराबजीज  ‘ ,गणेश भेळ यांच्यासह १५ व्यावसायिकांचा सत्कार ज्येष्ठ हॉटेल मॅनेजमेंट तज्ज्ञ राजन केळशीकर यांच्या हस्ते करण्यात आला . इन्स्टिट्यूट च्या प्राचार्य आणि सुवर्णमहोत्सव उपक्रमाच्या प्रमुख संयोजक  डॉ. अनिता मुदलियार  यांनी स्वागत केले .
इन्स्टिट्यूट संचालक मंडळाचे सदस्य नाना नलावडे, समीर गाजरे,  प्राध्यापक पुसेगावकर, प्रा. सचिन उपस्थित होते. इन्स्टिट्यूटच्या माजी प्राचार्य श्रीमती गंबुळी यांच्या योगदानाचा सर्वांनी भरभरून उल्लेख केला. माजी कर्मचाऱ्यांच्या वतीने दगडू मामा यांनी ह्रद्य मनोगत व्यक्त केले.
आजी -माजी विद्यार्थ्यांनी सुवर्णमहोत्सवानिमित्त फूड फेस्टिव्हल आयोजित केला .  त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आवारातून मॉडेल कॉलनीत आलेल्या या इन्स्टिट्यूटच्या दैदीप्यमान प्रवासाचा सर्व वक्त्यांनी उल्लेख केला.सर्व आयोजन आजी -माजी विद्यार्थ्यांनी  केले.

राजीव परीख क्रेडाई- महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी

0

पुणे :- क्रेडाई – महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे राजीव परीख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  क्रेडाई – महाराष्ट्रची निवडणूक आज  पुण्यातील कॉनरॅड हॉटेल येथे झाली. क्रेडाई महाराष्ट्रच्या सर्वसभासदांनी एकमताने  राजीव परीख  यांची २ वर्षाच्या कालावधीसाठी निवड केली.येत्या १ एप्रिल पासून ते पदभार स्वीकारतील.

यावेळी  क्रेडाई नॅशनलचे चेअरमन गीतांबर आनंद, क्रेडाई नॅशनलचे प्रेसिडेंट इलेक्ट सतीश मगर,क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष जक्षय शहा, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया तसेच ५१ शहरातील अनेक सदस्य उपस्थित होते.

२०१९ -२१ या कालावधीसाठी क्रेडाई- महाराष्ट्रच्या उपाध्यक्ष पदांच्याही निवडणुका सदरदिवशी झाल्या त्यात संघटनेची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात सुनील फुरडे  (सोलापूर), महेश साधवानी (नागपूर),रसिक चौव्हाण (नवी मुंबई), श्रीकांत परांजपे (पुणे), प्रफुल्ल तावरे (बारामती), रवी वट्मवार(औरंगाबाद) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. सुनील कोतवाल (नाशिक)यांची  सचिव पदी व गिरीश रायबागे (कोल्हापूर) यांची खजिनदारपदी नेमणूक करण्यात आली. संयुक्त सचिवपदी अनिश शाह (जळगाव),महेश यादव (कोल्हापूर),दीपक मोदी (माळेगाव),विकास लागू (सांगली), राज्य सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी  शैलेश वानखेडे (अमरावती) यांची नियुक्ती करण्यात आली.

बांधकाम व्यवसायात अधिकाधिक सुशासन,सुसूत्रता,झिरो डीले पॉलिसी, आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा उपयोग करून बांधकाम खर्च कमी करून नफा कसा वाढवता येईल यासर्व बाबींवर प्रामुख्याने लक्ष देण्यात येईल. याशिवाय तसेच प्लॉटिंग डेव्हपमेंट,स्कील डेव्हपमेंट, कर विषयक सुधारणा यांसारख्या मुद्द्यांवर देखील जास्तीत जास्त मार्गदर्शन विकसकांना मिळावे असा मानस असल्याची भावना परीख यांनी व्यक्त केली.

क्रेडाई नॅशनलचे चेअरमन गीतांबर आनंद यांच्या हस्ते क्रेडाई महाराष्ट्राच्या नवीन ऑफिसचे उदघाटन झाले यावेळी,क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष जक्षय शहा ,क्रेडाई नॅशनलचे प्रेसिडेंट इलेक्ट सतीश मगर, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यावेळी उपस्थित होते. बांधकाम व्यवसायाशी निगडित सर्व महत्वाची ऑफिसेस पुण्यातच असल्यामुळे पुण्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी क्रेडाई महाराष्ट्रचे ऑफिस होणे आवश्यक  होते हीच गरज लक्ष्यात घेऊन कँपमधील न्यूक्लियस जीजीभाय टॉवरच्या सहाव्या मजल्यावर हे ऑफिस घेण्यात आले. एकता हीच क्रेडाईची  सर्वात  मोठी ताकद आहे  असे मत गीतांबर आनंद यांनी यावेळी व्यक्त केले. 

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची वढु बुद्रूकला भेट

0
  पुणे- छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी आज वढुबुद्रूकला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पहाणी केली.  बलिदान दिनाच्या निमित्त मोठया प्रमाणावर भाविक येथे दर्शनासाठी येतात, हे लक्षात घेवून ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने येणाऱ्या भाविकांना सोई सुविधा पुरवाव्यात अशी सूचना जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी केली.
  यावेळी त्यांच्यासमवेत   सरपंच रेखा शिवले, उपसरपंच रमाकांत शिवले, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, समिती सदस्य, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला ..

मुंबई:काल पुण्याच्या कॉंग्रेस भवनात जावून पुणे शहर कॉंग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांची भेट घेतलेले  संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आज मुंबईत जे ष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत  काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.मुंबईमध्ये काँग्रेसची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यात ही घोषणा करण्यात आली आहे.दरम्यान, पुण्याच्या उमेदवारीची घोषणा संध्याकाळपर्यंत करण्यात येईल असंही मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केलं आहे.  रावेरमधून डॉ. उल्हास पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रात येणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. तर पुण्याच्या जागेचा तिढा अद्याप संपला नसल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे गायकवाड यांना पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार का, याबाबतची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे.

कोण आहे प्रवीण गायकवाड..

– शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवारबाई गायकवाड यांचे थेट वंशज.

– पुण्यातील मुंढवा हे मूळ गाव

– कराड गव्हर्नमेंट कॉलेजमधून सिव्हिल इंजिनीयरिंग

– प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक

– 65 पेक्षा जास्त देशांचे अभ्यास दौरे

– 29 पेक्षा जास्त देशात शिवजयंती साजरी करण्यात महत्वाचा वाटा

– गेली 25 वर्षं सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख

– संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष

– शेतकरी कामगार पक्षाचे सहचिटणीस

– मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक

प्रवीण गायकवाड यांचा गेल्या 25 वर्षातील प्रवास

– पुणे शहर आणि संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची मोठी फळी

– परदेशात intellectual class सोबत जिव्हाळ्याचे संबंध

– केवळ मराठा नाही तर मुस्लिम, दलित-ओबीसी आणि युवकांना आपलासा वाटणारा तरुण चेहरा

 

प्रवीण गायकवाड म्हणाले,उद्या माझा काँग्रेस प्रवेश..(व्हिडीओ)

पुणे-संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष म्हणून लौकिक मिळविलेले प्रवीण गायकवाड उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी १० वाजता मुंबईत प्रवीण गायकवाड काँग्रसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गायकवाड यांना पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार का याबाबतची चर्चा पुन्हा जोर धरु लागली आहे.प्रवीण गायकवाड हे काँग्रेसच्या तिकीटावर पुण्यातून लढतील ही चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. पण निवडणूक जवळ आली तरी काँग्रेसने त्यांचा उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे आपण उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेतून बाहेर पडत असल्याचे गायकवाड यांनी नुकतेच जाहीर केले होते.पुण्यातल्या उमेदवारीवरून काँग्रेसचा घोळ अजुनही संपेलेला नाही.आज कॉंग्रेस भवनात येवून गायकवाड यांनी शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे यांची भेट घेतली आणि त्यानंतर माय मराठीशी संवाद साधला ..पहा आणि ऐका ते काय म्हणाले ….

मसाला ,कांदा तयार ; उमेदवार आल्याआल्या त्याचे जोरात काम -अजित पवार (व्हिडिओ)

0
पुणे-पुण्याची उमेदवारी दिल्लीतून ठरेल असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले तर याच वेळी ,पुण्याचा उमेदवार आल्या आल्या त्याचे जोरात काम सुरु होईल अशी ग्वाही देताना, ‘आपण कोंबडी लगेच शिजायला टाकतो काय ,आधी  तयारी करतो , आम्ही मसाला ,कांदा सगळा तयार करून ठेवलाय .. आल्या आल्या जोरात काम करू’ अशा विनोदी शैलीत पुण्याच्या उमेदवाराच्या  नावास होत असलेल्या विलंबा बाबत टिप्पणी केली .
आज पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कामांबाबत ,अडचणीबाबत कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील घरी पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार ,विश्वजित कदम ,संग्राम थोपटे ,संजय जगताप,उल्हास पवार आदी नेत्यांची संयुक्त बैठक झाली . आघाडीतील दोन्ही पक्षांच्या मधील मतभेदाचे ,चढाओढी चे राजकारण थांबवून भाजपचा सामना करायचा हा त्यामागील उद्देश होता .बारामती लोकसभेमध्ये आगामी विधानसभेची गणिते दडली असून इंदापूर, पुरंदर आणि भोर हे मतदारसंघ विधानसभेसाठी काँग्रेसला सोडण्याबाबतचा निर्णय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेणार आहेत. हा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल, असा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत काँग्रेसच्या इच्छुकांची समजूत काढण्यात पवार यशस्वी ठरल्याची चर्चा आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, हर्षवर्धन पाटील, आमदार विश्वजित कदम, संग्राम थोपटे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप आदी बैठकीस उपस्थित होते. पाटील यांच्या निवासस्थानी अडीच तास चाललेल्या बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व शक्यतांवर जोरदार चर्चा झडली. आघाडीमध्ये इंदापूर आणि भोरची जागा काँग्रेसकडे आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून आला. त्यामुळे आघाडीचा निर्णय घेताना इंदापूरची जागा कोणाला सोडण्यात येणार, याबाबत स्पष्टता असली पाहिजे अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. पुरंदरला राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार सलग दोन वेळा पराभूत झाल्याने ही जागा काँग्रेसला सोडावी, अशी मागणी जगताप यांनी केली. भोरची जागा काँग्रेसचीच असून, ती जागाही आगामी निवडणुकीत काँग्रेसकडेच राहील, याची हमी देण्यात यावी अशीही मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली.

इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे, अशी गळ हर्षवर्धन पाटील यांनी राहुल गांधी यांना घातली आहे. गांधी यांच्याशी इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. ही जागा काँग्रेसची होती आणि तेथून काँग्रेसच निवडणूक लढेल, असे आश्वासन गांधी यांनी दिल्याचे पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. पाटील यांनी पक्ष नेतृत्वाकडे इंदापूरच्या जागेबाबत चर्चा केल्यानंतर त्यांनी आता पवारांकडूनही शब्द सोडवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट शब्द दिला नसला, तरी यापुढे भविष्यात इंदापूरमध्ये आघाडीवरून राष्ट्रवादीकडून वक्तव्ये होऊ नयेत, याचा बंदोबस्त पाटील यांनी केल्याची चर्चा आहे.

यावेळी पाटलांचे स्नेहभोजन उरकल्यावर या नेत्यांनी माध्यम प्रतीनधींशी  संवाद साधला ,यावेळी पहा हे नेते काय म्हणाले …
(संपूर्ण अनकट संवाद https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/2445556109022326/        या आमच्या फेस बुकच्या mymarathi.net च्या पेजवर लाइव्ह केलेला आहे )

पुणे शहर पोलिसांना होंडा मोटारसायकल यांच्याकडून १०० दुचाकी

0

पुणे : शहरातील पोलिसांना होंडा मोटारसायकल यांच्याकडून १०० नवीन होंडा (लिवो) या दुचाकी देण्यात आल्या आहेत. सी एस आर अंतर्गत देण्यात आल्या असून, लवकरच बीट मार्शल आणि ट्रॅफिक कॉन्स्टेबल यांना देण्यात येणार आहेत.
पुणे शहरात १०२ पोलीस चौक्या असून, सर्वजण कामात सुलभता आणण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत भविष्यात आणखी ८० दुचाकी पोलिसांना देण्यात येणार आहेत. त्याच बरोबर पोलीस कॉन्स्टेबल यांना १३८ क्वार्टर मिळुन देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यासाठी वेगळी नियमावली बनवली असून लवकरच कॉन्स्टेबल यांना क्वार्टर देण्यात येणार आहेत.त्याचबरोबर ज्या महिला कर्मचाऱ्यांना लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी पाळणाघर सुरू करणार असल्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी याप्रसंगी सांगितले.
होंडाचे हरभजन सिंग म्हणाले,  पोलिसांचे काम खरच कठीण असते, असे कुठलेच काम नाही की ते पोलिसांना करावे लागत नाही. काहीही झालं तरी पोलीस येईपर्यंत नागरिक काहीच करत नाहीत.
यावेळी होंडा चे डेप्युटी डायरेक्टर जनरल हरभजन सिंग, मि. मॅनो, विवेक तनेजा, सरहद प्रधान, अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, स्वप्ना गोरे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.

मेट्रोच्या कामादरम्यान पुण्यात सापडली दोन भुयारं

0

 

पुणे-मेट्रोच्या कामासाठी सुरु असलेल्या खोदकामांदरम्यान पुणे शहरातील स्वारगेट भागात दोन भुयारी मार्ग आढळून आले आहेत. स्वारगेट ते अॅग्रीकल्चर कॉलेज या मार्गावरील मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम सध्या पुण्यात सुरु आहे. दरम्यान, स्वारगेटला मल्टीमोड हब उभारण्यात येत असल्याने त्यासाठी पायलिंग मशीनच्या सहाय्याने खोदकाम सुरु आहे. हे काम सुरु असताना जमिनीखाली सुमारे १५ फुटांवर हा भुयारी मार्ग आढळून आला आहे. पूर्व-पश्चिम दिशेकडे जाणारे असे हे भुयार असून उत्तर दिशेलाही एक भुयार जाते.ही भुयारं दगडी बांधकाम केलेल्या पक्क्या स्थितीत आहे. ५० ते ६० मीटर इतकी या भुयारांची लांबी आहे. यामुळे मेट्रोचे काम थांबवण्यात आले आहे.काही दिवसांपूर्वी शहरात सावित्रीबाई पुणे विद्यापीठात अशाच प्रकारचा सुस्थितीतील ब्रिटिशकालिन भुयारी मार्ग सापडला होता. त्यानंतर आता स्वारगेटलाही भुयारी मार्ग सापडल्यानेयाबाबत काही लोकांमध्ये उत्सुकता दिसून येते आहे.

जमिनीखाली पाहणी केल्यानंतर आढळून आलेल्या भुयाराला तीन दिशांना वळविण्यात आल्याचे निदर्शनास आलेले आहे.. या भुयाराची कालव्यापासूनची लांबी 35 ते 40 मीटर आहे. तर ज्याठिकाणी हे भुयार आढळून तेथील लांबी 55 मीटर आहे. या भुयाराची एक बाजू सारसबागेच्या (पर्वती) दिशेने वळविण्यात आलेली आहे. तर दुसरी बाजू पूर्व दिशेला गुलटेकडीच्याबाजूला वळविण्यात आलेली आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी ‘टोटल स्टेशन’ मशीनच्या सहाय्याने सर्वेक्षण केले असून भुयाराचा अंदाजे नकाशाही तयार केला आहे. हे भुयार एवढे मोठे आहे की सहा फुट उंचीची व्यक्तीही आरामात त्यामधून चालत जाऊ शकेल. भुयाराच्या तळाशी पाण्याने वाहून आणलेला सुकलेला गाळ आढळून आला आहे.
२००४ मध्ये पेशव्यांनी कात्रजच्या तलावामधून पुण्यात पाणी आणलेल्या जलवाहिनीची आम्ही  पाहणी केली होती. स्वारगेटला आढळून आलेले हे भुयार त्याचाच तर एक भाग आहे  कारण स्वारगेटला आढळून आलेल्या भुयाराचे बांधकाम दगडी आणि जुन्या धाटणीचे दिसून येते आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याला 40 दिवस पुर्ण सर्वधर्मिय प्रार्थनेस प्रतिसाद

0

पुणे-काश्मिरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 40 दिवस झाले.या पार्श्वभूमीवर  पुणे ख्रिश्चन फोरमतर्फे सर्वधर्मिय प्रार्थनेचे आयोजन नाना पेठेतील वायएमसीए हॉल येथे करण्यात आले होते.. याप्रसंगी शांततेचे प्रतिक म्हणून आठ कबूतरे सोडली गेली. त्यानंतर दीप्रप्रज्वलन व उपस्थित सहभागी सर्व नागरिकांसह सामुहिक प्रार्थना केली गेली. याप्रसंगी पुण्याचे बिशप डॉ. थॉमस डाबरे, वेदमुर्ती मोरेश्वर घैसास गुरूजी, बिशप पॉल दुपारे, मौलाना निजामुद्दीन, शिख समाजाचे राजसिंग आरोरा, बौद्ध भंत्ते सुदासन, कारगिल युद्धात सहभागी झालेले व पुणे सैनिक बोर्डाचे संचालक मेजर मिलिंद तुंगार आणि साधू वासवानी मिशनच्या श्रीमती सीमा मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमास सर्व जाती धर्मातील हजारहून अधिक नागरिक सहभागी झाले होते.

याप्रसंगी सर्व धर्मगुरूंनी विश्वशांती व्हावी तसेच दहशवादाचा कायमचा बिमोड होऊन शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी आपापल्या धर्मानुसार प्रार्थना व मंत्रपठण केले. तसेच सिस्टर बिंदू व सेंट जॉन द बॅप्टीस्ट सिस्टर्स यांनी नृत्याविष्कार सादर करून शांततेचा संदेश दिला. फादर रॉक ग्रीन यांनी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. कारगिल युद्धात सहभागी झालेले मेजर मिलिंद तुंगार यांनी सेनादलात सर्व धर्माचे पालन अतिशय आनंदाने एकत्रित व खेळीमेळीने केले जाते व सर्व धर्मांचा आदर केला जातो हे आवर्जून सांगितले. सर्वच धर्मगुरूंनी दहशतवादाचा बिमोड व्हावा व शांततामय जीवन निर्माण व्हावे याबद्दल आपापले विचार मांडले आणि दहशतवादाचा निश्चित पराभव होईल असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र शालू यांनी केले. अमलराज फँ्रसिस यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या आयोजनात एडविन रॉबर्टस्, अमलराज फ्रान्सीस, डॉमनिक फर्नांडिस, अन्थोंनी जेकब, पिटर इनसोल, सुधीर मॉरीस, फ्रँकी मेन्डोझा, स्टॅन्ली मोजेस, केविन विलीयम, सॅम्युअल नेगल, मोझेस हेरेकेरूर, दिलरात पिल्ले, पिटर डिसूजा, बेंजामिन डिसूजा, जॅकलिन फॉरेस्टर, आशिष जाधव, सतिश चांदेकर, मायकल सेलवम व सॅमसन नायडू आदींनी विशेष प्रयत्न केले.