Home Blog Page 2965

निवडणूक‍ आयोगाकडून राजकीय पक्षांना प्रक्षेपण आणि प्रसारण तासांचे वाटप

0
मुंबई – लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांसाठी दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रचारासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत प्रक्षेपण आणि प्रसारण तासांचे वाटप करण्यात आले आहे. आयोगामार्फत 7 राष्ट्रीय आणि 52 राज्यस्तरीय पक्षांसाठी दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रचाराचे तास कसे असतील हे ठरवून देण्यात आले आहेत. 2014 या लोकसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना मिळालेल्या जागांनुसार आयोगाने दूरदर्शन आणि आकाशवाणीसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांना वेळ आखून दिला आहे.

राजकीय पक्षांना प्रचारासाठी मिळणार 520 ते 180 मिनिटांपर्यंतचा अवधी
7 राष्ट्रीय पक्षांना प्रचारासाठी राष्ट्रीय वाहिनीवरील प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी एकूण 600 मिनिटे मिळतील. तर प्रादेशिक वाहिनीवरील प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी एकूण 900 मिनिटे मिळतील. 52 राज्यस्तरीय पक्षांना प्रचारासाठी प्रादेशिक वाहिनीवरील प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी एकूण 1 हजार 800 मिनिटे मिळतील तर राष्ट्रीय वाहिनीवरील प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी एकूण 520 मिनिटे मिळतील.

राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक वाहिनीवर प्रचार करताना त्यांना दिलेला कालावधी लक्षात घ्यावा लागेल. राष्ट्रीय पक्षाला दूरदर्शनवर प्रचारासाठी राष्ट्रीय वाहिनीवर 10 तास टप्प्या-टप्प्याने मिळतील तर 15 तास प्रादेशिक वाहिनीवर मिळतील. राज्यस्तरीय पक्षाला प्रादेशिक वाहिनीवर 30 तास प्रचारासाठी मिळतील. राज्यस्तरीय पक्षांना प्रादेशिक उपग्रह केंद्राचे 8 तास 40 मिनिटेही प्रचारासाठी मिळतील. राष्ट्रीय पक्षाला आकाशवाणीच्या मुख्य केंद्रावर प्रचारासाठी 10 तास तर प्रादेशिक वाहिनीवर 15 तास मिळतील. तर राज्यस्तरीय पक्षाला आकाशवाणीच्या प्रादेशिक वाहिनीवर 30 तास प्रचारासाठी मिळतील. याशिवाय राज्यस्तरीय पक्षांना प्रादेशिक उपग्रह केंद्राचे 8 तास 40 मिनिटेही प्रचारासाठी मिळतील.

नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस ते शेवटच्या टप्प्यातील निवडणुका होईपर्यंत पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन प्रचार करता येईल. भारत निवडणूक आयोगाकडून मान्यता प्राप्त असलेले पक्ष जेव्हा आपल्या पक्षाचा प्रचार व प्रसार दूरदर्शन किंवा आकाशवाणीवरुन करतील तेव्हा त्यांनी त्या संबंधित माहितीची किंवा भाषणाची एक लिखित प्रत दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्याकडे देणे आवश्यक आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्यामार्फत ती माहिती पडताळून पाहिली जाईल. या माहितीमध्ये निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांविरुद्ध लिखाण असल्यास त्यातील काही वाक्य, संदर्भ किंवा परिच्छेद वगळावे लागतात.

राष्ट्रीय आणि राजकीय पक्षांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन प्रचार करीत असताना प्रसारभारती महामंडळाला त्यांच्या प्रचारासाठी देण्यात आलेला वेळ, प्रचार साहित्य यांचे वेळापत्रक देणे आवश्यक असून त्याबाबत मान्यता घ्यावी लागेल. याशिवाय या पक्षांनी देश, जात-धर्म तसेच न्यायालय किंवा व्यक्तीविरोधात टीका करु नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेत.

कुर्डुवाडी मध्ये उच्चशिक्षित घुगे आणि राऊत यांचा पहिला सत्यशोधक विवाह संपन्न….

0

कुर्डुवाडी– पुणे येथील फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्र तर्फे  उच्चशिक्षित सचिन नवनाथ घुगे (BE.MECH.) आणि सृष्टी अशोक राऊत (M.COM.) यांचा रविवार दि.31 मार्च 2019 रोजी कुर्डुवाडी येथील कुबेर मंगल कार्यालयात दु.12.30वा. नवदाम्पत्यांचे शुभहस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे अर्ध पुतळ्यांना पुष्प हार अर्पण करून महात्मा फुले साहित्य प्रकाशन समिती ,महाराष्ट्र शासन चे सदस्य रघुनाथ ढोक यांनी थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक विवाह पद्धतीने सत्यशोधक विवाह रजिस्टरमध्ये नोंदणी करून महात्मा फुले यांचे वेशभुषेत लावला.या वेळी मान्यवरांचे शुभहस्ते नवदाम्पत्यांना सत्यसोधक विवाह प्रमाणपत्र आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा रघुनाथ ढोक यांनी भेट दिली.

याप्रसंगी काशीनाथ तळेकर (पोलिस उप आधिक्षक),रामचंद्र घुगे (पोलिस निरीक्षक )

सुहास  शहा (पश्चिम महाराष्ट्र उप अध्यक्ष,भाजपा उद्योग आघाडी),धनराज दादा शिंदे (अध्यक्ष माढा वेलफेयर फाउंडेशन) तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी रघुनाथ  ढोक म्हणाले की या उच्चशिक्षित वधु वर पालकांनी  योग्य निर्णय घेऊन अनिष्ठ प्रथांना फाठा देत कोणताही मुहर्थ,पत्रिका  न पाहता सुट्टीचा  दिवस सोयची वेळ पाहून हा पहिला कुर्डूवाडीतील विवाह सर्व समाजाला दिशा देणारा ठरला त्याबद्दल अभिनदन केले .तसेच या पुढे असे सामुदायीक सत्यसोधक विवाह लावनेसाठी इतरांना प्रेरीत करा म्हणजे खर्या अर्थाने महात्मा फुले ,छत्रपती शाहू महाराज ,डॉ आंबेडकर यांचे विचार सर्व स्थरात पोचेल व नाहक होणारा  खर्च  वाचेल असे सांगितले . पुढे असे देखील ढोक म्हणाले की आमचे संस्थेने पुणे येथे १९ मे २०१९ रोजी मोफत सत्यसोधक विवाह सोहळा आयोजित केला आहे.तरी आपण  सर्व जाती धर्माचे बांधवाना ही माहिती द्यावी .

यावेळी महात्मा फुले रचित मंगलाष्टकं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ,पश्चिम महाराष्ट्र चे अध्यक्ष दत्तात्रय घाडगे ,सांगली यांनी म्हंटले तर वधु वर यांना बारामती चे शारदानगर सायन्स कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.राजाराम ढोक यांनी  योग्य वैवाहिक जीवनाचे सूत्रे सांगून नऊ प्रतिज्ञा  असलेली शपथ वदवून घेऊन जीवनसाथी म्हणून संसार करताना दीनदुबळ्या ची सेवा करा असे म्हणाले .

या विवाहातील नासाडी होणारे अक्षताचे तादूळ अधिक तांदूळ एकत्र करून कुर्डूवाडीतील एडस ग्रस्थ उमीद संस्थेला नवदाम्पत्यांचे शुभहस्ते पूजेचे दिवशी वराचे बंधू सामाजिक कार्यकर्ते गणेश घुगे यांनी देणार असलेचे सांगून सर्वांचे आभार मानले.या वेळी मोठ्या संख्येने हा सत्यसोधक विवाह पाहणेसाठी सर्व जाती धर्माचे समाज बांधव उपस्थित होते.

हा विवाह  यशस्वी करण्यासाठी संत जनाबाई सावता माळी देवस्थान ट्रस्ट ,भेंड आणि युवा सामाजिक संस्था, कुर्डुवाडी यांनी मोलाचे सहकार्य केले.

बँक ऑफ बडोदा आता 3 बँकांची क्षमता एकत्र झाल्याने ठरली दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक बँक

भारतातील पहिले बँकांचे थ्री-वे कन्सॉलिडेशन

  • एकत्रित बँकेच्या 9,500+ शाखा, 13400+ एटीएम, 85,000+ कर्मचारी 120 दशलक्षहून अधिक ग्राहकांना सेवा देणार व बिझनेस मिक्स असेल 15 लाख कोटी रुपयांहून अधिक
  • ग्राहकांना व्यापक सेवा व वैविध्यपूर्ण उत्पादने व सेवा यांचा लाभ मिळणार
  • खर्च व उत्पन्न यांचा लक्षणीय सहयोग
  • सर्व कर्मचाऱ्यांचे हित जपणार

 

पुणे, एप्रिल 1, 2019: एप्रिल 1, 2019 पासून, बँक ऑफ बडोदा, विजया बँक व देना बँक यांचे विलिनीकरण लागू होणार असून, यामुळे भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक उदयास येणार आहे. तिन्ही बँकांच्या संचालक मंडळाने सप्टेंबर 2018 च्या अखेरीस दिलेल्या तत्त्वतः मंजुरीपासून, विलिनीकरणाची पुढील प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली.

भारतीय रिझर्व्ह बँकेने मार्च 30, 2019 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, विजया बँक व देना बँक यांच्या सर्व शाखा एप्रिल 1, 2019 पासून बँक ऑफ बडोदाच्या शाखा म्हणून काम करणार आहेत. विजया बँक व देना बँक यांच्या ठेवीदारांसह सर्व ग्राहकांना सदर तारखेपासून बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असे समजले जाईल.

कन्सॉलिडेटेड बँक

ही कन्सॉलिडेटेड बँक देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक असेल. बँकेची भौगोलिक व्याप्ती अधिक व्यापक होईल व त्यामध्ये 9,500+ शाखा, 13400+ एटीएम, 85,000+ कर्मचारी 120 दशलक्षहून अधिक ग्राहकांना सेवा देतील आणि बिझनेस मिक्स 15 लाख रुपयांहून अधिक असेल. त्यामध्ये ठेवी व अॅडव्हान्सेस यांचे प्रमाण अनुक्रमे अंदाजे 8.75 लाख कोटी रुपये व अंदाजे 6.25 लाख कोटी रुपये असेल.

बँकेने तिन्ही बँकांच्या क्षमता, त्यांचा सहयोग यांचे बळ एकत्रित करायचे आणि व्यापक ग्राहक वर्गाशी गहिरे नात निर्माण करून कार्यभार वाढवण्याचे ठरवले आहे. पूरक शाखांमुले पश्चिमेकडील व दक्षिणेकडील राज्यांतील जाळे वाढणार आहे – महाराष्ट्र, गुजरात, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक व आंध्र प्रदेश. बँकेचा गुजरातमध्ये बाजारहिस्सा 22% असेल आणि महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान व उत्तर प्रदेश या महत्त्वाच्या राज्यांत 8 ते 10% असेल.

ग्राहकांना फायदे

या प्रक्रियेमुळे तिन्ही बँकांच्या ग्राहकांना फायदा होणार आहे. 120+ दशलक्ष ग्राहकांना दर्जेदार बँकिंग सेवा मिळेल आणि विविध प्रकारच्या उत्पादनांचा लाभ घेता येईल – कॅश मॅनेजमेंट सोल्यूशन, सप्लाय चेन फायनान्सिंग, वित्तीय नियोजन, संपत्ती व्यवस्थापन सेवा. या फायद्यांबरोबरच, भौगोलिक विस्तार साधला जाईल व टच पॉइंटची संख्या 22,000+ पर्यंत वाढवली जाईल. या तिन्ही बँकांच्या अनिवासी भारतीय ग्राहकांना आता भारतात अधिक मोठे जाळे उपलब्ध होणार आहे.

बँक ऑफ बडोदाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स अँड अॅनालिटिक्स अँड एआय अँड टेक्नालॉजीमुळे प्रक्रियांमध्ये सुधारणा करणे व क्रॉस-सेलिंगमध्ये वाढ करणे शक्य होणार आहे.

देना बँकेच्या ग्राहकांना कर्जाची सुविधा तातडीने उपलब्ध केली जाईल. बँक ऑफ बडोदाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील 101 कार्यालयांच्या माध्यमातून, विजया बँक व देना बँक यांच्या ग्राहकांना परकीय चलनातील निधी उपलब्ध होऊ शकेल. एसआरटीओ फंडिंग प्लांटेशन फायनान्सिंग या विजया बँकेच्या विशेष कार्यक्रमांचा लाभ अन्य दोन बँकांच्या ग्राहकांना घेता येणार आहे.

ग्राहकांना अनुभव

तंत्रज्ञानाचा समावेश ही टू-स्टेज प्रक्रिया आहे. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवेच्या प्रक्रियांबाबत एकसमानता साध्य करून, ग्राहकांना मिळणाऱ्या अनुभवामध्ये लवकरच सातत्य आणले जाईल. एप्रिल 2019 च्या अखेरीस सर्व शाखांमध्ये महत्त्वाच्या बँकिंग सुविधांची उपलब्धता केली जाईल व त्यांची व्याप्ती हळूहळू वाढवली जाईल. आयटी एकात्मिकरण 12-18 महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत तिन्ही बँकांच्या ग्राहकांची खाती एका कोअर बँकिंग सिस्टीममध्ये समाविष्ट केलेली असतील.

खर्च व उत्पन्न याबाबतचा सहयोग

या एकत्रिकरणामुळे खर्च व उत्पन्न या बाबतीत सहयोग साधला जाणार आहे. वैविध्यपूर्ण उत्पादने, क्रॉस-सेलिंगमधील वाढ, शाखांच्या जागांतील बदलांमुळे सूक्ष्म बाजारात अधिक विस्तार, फी इन्कममध्ये वाढ यामधून उत्पन्नाच्या बाबतीत सहयोग व फायदे वाढणार आहेत. शाखा व प्रशासकीय कार्यलयांमध्ये सुसूत्रता आणि टेक स्पेंड ऑप्टिमायझेशन यामुळे खर्चाच्या बाबतीत सहयोग साधला जाईल. हा सहयोग प्रत्यक्षात साधण्यासाठीचे नियोजन अमलात आणले जात आहे.

कर्मचाऱ्यांच्या हिताचे संरक्षण

बँक ऑफ बडोदाला पीपल कॅपिटल इंडेक्समध्ये (पीसीआय) आघाडीच्या 50 कंपन्यांमध्ये स्थान मिळाले आहे. बँकेच्या मते, मनुष्यबळामुळे कार्यपद्धतीवर लक्षणीय परिणाम साधला जातो व बँकेचे वेगळेपण अधोरेखित होते.

विलीन झालेल्या बँकांच्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून त्यांना बँकाचा आकार व व्याप्ती वाढल्याने एका मोठ्या बँकेकडून विविध प्रकारच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या कामाच्या बाबतीतील संधी व अनुभव यामध्ये वाढ होईल. त्यामध्ये जागतिक स्तरावरील संधींचाही समावेश असेल. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या बाबतीतील शर्ती बदलणार नाहीत आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचे पूर्णतः रक्षण केले जाईल. प्रत्येक बँकेने अवलंबलेल्या सर्वोत्तम एचआर पद्धतींचे परीक्षण करून त्याचा अवलंब केला जाईल.

सक्षम ब्रँड

बँक ग्राहकांसाठी एक सक्षम ब्रँड निर्माण करण्यावर भर देणार आहे. ब्रँड सर्वांच्या लक्षात राहावा, यासाठी बँकेने विविध प्रकारचे उपक्रम आखले आहेत. इंटरब्रँड बेस्ट इंडियन ब्रँड्स 2019 नुसार, “बँक ऑफ बडोदा” या ब्रँडला 23वे स्थान मिळाले आहे. विजया बँक व देना बँक यांच्या क्षमतेमुळे हा ब्रँड अधिक सक्षम होणार आहे.

यानिमित्त बोलताना, बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एस. जयकुमार यांनी सांगितले, “बँक ऑफ बडोदा, विजया बँक व देना बँक एकत्र येत आहेत आणि त्यातून जाळे व ग्राहक वर्ग या बाबतीत भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक निर्माण होणार आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. एक सक्षम बँक निर्माण करण्यासाठी आणि एकेका बँकेपेक्षा एकत्रितपणे सर्व संबंधित घटकांना उत्तम सेवा देण्यासाठी, सर्व आवश्यक बाबींची परिणामकारक अंमलबजावणी करून, आम्ही या विलिनीकरणाच्या यशस्वितेसाठी योगदान देणार आहोत. तिन्ही बँकांची वैविध्यपूर्ण उत्पादने, तंत्रज्ञानातील लक्षणीय गुंतवणूक आणि सेंटर ऑफ एक्सलन्स अँड अॅनालिटिक्स अँड एआय अँड टेक्नालॉजी हे व्यापक ग्राहक वर्गासाठी फायदेशीर ठरणार आहे. देना बँकेच्या ग्राहकांना तातडीने कर्ज सुविधा मिळू शकते. आमचे ग्राहक, कर्मचारी, भागीदार व अन्य भागधारक यांच्यासाठी आधुनिक व जागतिक दर्जाची बँकिंग संस्था निर्माण करण्यासाठी आम्ही तिन्ही शाखांच्या समृद्ध परंपरेचा लाभ घेण्याच्या संधीचे सोने करणार आहोत. हा व्यवार सुरळीत होण्यासाठी, विलीन होत असलेल्या दोन बँकांचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर नारायणन व कर्नम शेखर यांचे आभार.”

बँक ऑफ बडोदाविषयी

बँक ऑफ बडोदाची स्थापना (“बँक”) जुलै 20, 1908 रोजी झाली असून ही एक भारतीय सरकारच्या मालकीची बँकिंग व वित्तीय सेवा कंपनी आहे. तिचे मुख्यालय भारतातील गुजरातमधील वडोदरा (आधीचे नाव बडोदा) येथे आहे.

बँक ऑफ बडोदा ही भारतातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असून, तिचे देशांतर्गत जाळे सक्षम आहे व त्यास सेल्फ-सर्व्हिस चॅनलचे पाठबळ आहे. बँक आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्षणीय विस्तारली असून, 21 देशांमध्ये 101 शाखा/कार्यालये उपकंपन्या आहेत. बँकेच्या पूर्ण मालकीच्या उपकंपन्या आहेत – बीओबी फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड (पूर्वीची बीओबी कार्ड्स लि.) व बीओबी कॅपिटल मार्केट्स. बँक ऑफ बडोदाने आयुर्विम्यासाठी इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्सशी आणि अॅसेट मॅनेजमेंटसाठी बडोदा पायोनिअर अॅसेट मॅनेजमेंटशी संयुक्त भागीदारी केली आहे. नैनिताल बँकेमध्ये बँकेचा 98.57% हिस्सा आहे. बँकेने तीन प्रादेशिक ग्रामीण बँकाही प्रायोजित केल्या आहेत – बडोदा उत्तर प्रदेश ग्रामीण बँक, बडोदा राजस्थान ग्रामीण बँक व बडोदा गुजरात ग्रामीण बँक.

माणिकडोह धरण पाणी सोडल्याप्रकरणी आमदार शरद सोनवने यांचे ठिय्या आंदोलन

0
जुन्नर-मणिकडोह धरणातुन   पाणी सोडण्यात येणार असल्याने  आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात ठिय्या  आंदोलन केले. आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात  रात्री 12 पासुन 4 वाजेपर्यंत   ठिय्या आंदोलन  केले.
 शिवसेनेचे  माजी जिल्हाप्रमुख  सुनील मेहेर,जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, नगराध्यक्ष शाम पांडे,  जुन्नर  शहरप्रमुख  शिवा खत्री, अविनाश करडीले पाडळी चे सरपंच संतोष केदारी ,संतोष घोटणे, तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्यातुन पाणी बाहेर जाऊन देणार नाही  असा इशारा सोनवणे यांनी दिला.
त्यांनी       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी  मध्यरात्री    चर्चा केली.पाणी येडगाव धरणात सोडण्यात येत असून  सोडलेले पाणी तालुक्यात रहाणार आहे .
येडगाव धरणाची (लेव्हल)राखण्यासाठी  पाण्याचा विसर्ग  करण्यात आला  आहे .यासंदर्भात सर्व आंदोलकांच्या  आपण पाठीशी आहोत.असे  आमदार शरद सोनवणे यांनी  यावेळी सांगितले.

कॉंग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटला …

पुणे :  पुणे लोकसभेसाठी काँग्रेसने आपल्या प्रचाराचा नारळ कसबा गणपती मंदिरात फोडला. यावेळी फटाक्यांची आताषबाजी, बँड वादन, पक्षाचे झेंडे,  गली गली में शोर हे चौकीदार चोर है सारख्या घोषणा यांनी काँग्रेसच्या प्रचाराचा सुरुवात झाली. पक्षाकडून कुणाही उमेदवाराची घोषणा न झाल्यामुळे विना उमेदवार आणि सर्व इच्छुक उमेदवारांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह रविवारी सायंकाळी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन पक्षाच्या वाटचालीस सुरुवात केली. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे,बाळासाहेब शिवरकर , मोहन जोशी, दीप्ती चौधरी,कमल व्यवहारे,प्रवीण गायकवाड , अरविंद शिंदे,अभय छाजेड ,अविनाश बागवे, डॉ. सतीश देसाई ,काका धर्मावत,रवी धंगेकर ,बाळासाहेब अमराळे ,द.स. कोळेकर,सोनाली मारणे   यांच्यासह राष्ट्रवादीकडून खासदार वंदना चव्हाण, चेतन तुपे पाटील ,कमल ढोले पाटील ,अंकुश काकडे, रविंद्र माळवदकर ,डॉ. सुनिता पवार आदी नेते उपस्थित होते.अरविंद शिंदे आणि प्रवीण गायकवाड या दोहोंच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती .

काँग्रेस नेतृत्वाने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही.तरीही  काँग्रेसचा प्रचाराचा नारळ उमेदवाराशिवाय फोडण्यात आला आहे. उमेदवार जाहीर झाला नसला तरी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन पदयात्रा काढण्यात येईल, असे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी स्पष्ट केले होते.  
पुणे लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार शनिवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यानुसार शहर काँग्रेसने रविवारी सुट्टीची संधी साधून प्रचाराचा नारळ फोडण्याचे नियोजन केले होते. दुपारी ४.१५ वाजता कसबा गणपतीचे दर्शन घेऊन पदयात्रा काढली गेली मात्र  दिल्लीतून उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नव्हती. कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. याच ठिकाणी भाजपचे गिरीश बापट यांचे कार्यालय देखील आहे.या बालेकिल्यातूनच प्रचाराचा नारळ फोडला गेला . त्वष्टा कासार मंदिर, पवळे चौक, साततोटी चौक, फडके हौद, आरसीएम गुजराथी हायस्कूल या मागार्ने पदयात्रा काढण्यात आली नगरसेवक रविंद्र धंगेकर यांच्या कार्यालयाजवळ समारोप झाला . पदयात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन केले गेले  आहे. त्यासाठी काँग्रेसकडून नियोजन करण्यात आले होते . राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकतेर्ही या पदयात्रेत सहभागी झाले होते .

माणिकडोह धरणातून पाणी सोडण्यास विरोध करणाऱ्या विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांना अटक व सुटका

0
जुन्नर /आनंद कांबळे
माणिकडोह (ता.जुन्नर )येथील शहाजी सागर जलाशयातून पाणी सोडण्यास विरोध करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचेसह 87 जणांना जुन्नर पोलिसांनी धरणाच्या गेटवरच ताब्यात घेतले नंतर त्यांना सोडून देण्यात आले.
माणिकडोह धरणातून पाणी सोडण्यास कुकडी नदीकाठच्या बावीस गावातील स्थानिक शेतकऱ्यांचा कडाडून विरोध असल्याने आज येथील पाणीप्रश्न चिघळला आहे. यावर्षी माणिकडोह 72 टक्के भरले सद्या दहा टक्केच पानी शिल्लक आहे व अजून उन्हाळ्याचे तीन महिने जायचे आहेत. पहिल्या जम्बो आवर्तनात जवळपास 52 टक्के पाणी  सोडल्यात आले असून आता पाणी सोडले तर ऐन उन्हाळ्यात पिके जळून जातील तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. शेतक-यांना पुढील ३ महिने पिण्याचे पाण्याच्या बराेबरच चा-याच्या पाण्याच्या सुद्धा नियाेजन करावे लागणार आहे. शेतीमालाला बाजारभाव नाही त्यातच हाताताेंडाशी आलेल्या पिकांना पाणी नसल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. कुकडी पाटबंधारे विभागाने यापुढील काळात जुन्नर शहर व लगतच्या २२ गावांच्या शेतक-यांचा विचार करून पाणी राखीव ठेवावे.
प्रशासनाने ता 31 रोजी पहाटे 3 वाजता कडक पोलीस बंदोबस्तात 1300 क्यूसेक्स ने नदीपात्रात पाणी सोडले आहे.
दरम्यान काल ता.३० राेजी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना  माणिकडाेहचे साेडण्यात येणारे पाणी अडविण्यास विरोध करू नये, आंदाेलनाचा पवित्रा घेऊ नये  म्हणून पोलिसांनी नाेटीस दिली हाेती. शेरकर यांना यासंदर्भात नोटीस आल्याने शिरोली बुद्रुक येथे सकाळी 10 वाजता सोसायटीच्या परिसरात शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव जमला होता. परंतू आपल्या तालुक्यात पाण्याचा गंभीर प्रश्न असताना पुढील तीन महिने शेतक-यांना अडचणीचा सामना करावा लागणार असल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहीजे या भूमिकेतुन आंदोलन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विघ्नहरचे व्हाईस चेअरमन अशाेक घाेलप, मा. नगराध्यक्ष दिनेश दुबे, विघ्नहरचे संचालक देवेंद्र खिलारी, सचिन टाव्हरे, धनेश पडवळ, वैभव काेरडे, प्रदिप थाेरवे, जयवंत डाेके, जितेंद्र बिडवई, नितीन दांगट, अंकुश खंडागळे, सचिन हाडवळे, संताेष साेमाेशी, लक्ष्मण शेरकर, सचिन विधाटे, संदिप शिंदे, सुभाष डाेके, व हजाराे शेतकरी बांधव उपस्थित हाेते..

लेखापालन क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध -सीए चंद्रशेखर चितळे

0
पुणे : सनदी लेखापाल झाल्यानंतर नोकरी, स्वतंत्र व्यवसाय आणि इतर अनेक क्षेत्रात काम करता येते. लेखापालन क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कठोर मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर ‘सीए’सारख्या आव्हानात्मक परीक्षेत यश संपादन करू शकतो,” असे मत ज्येष्ठ सनदी लेखापाल आणि दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांनी व्यक्त केले.
आयसीएआय पुणे शाखा आणि वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन (डब्ल्यूआयसीएएसए-विकासा) पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आयोजित  ‘सीए करिअर काउंसलिंग’ कार्यक्रमात ते बोलत होते. बीएमसीसी रस्त्यावरील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या काळे सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत आयसीएआयच्या पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे, उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे, सीए समीर लड्डा यांनी मार्गदर्शन केले. मोठ्या संख्येने पालक व दहावी-बारावी उत्तीर्ण, परीक्षा दिलेल्या आणि सीए होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला उपस्थिती लावली.
सीए ऋता चितळे म्हणाले, “कला, वाणिज्य, विज्ञान या कोणत्याही शाखेचा विद्यार्थी सनदी लेखापाल ची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो. सनदी लेखापाल साठीची परीक्षा अवघड असते हा विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनातील एक गैरसमज आहे. सीए वाणिज्य व्यापाराच्या सर्व मार्गांमध्ये सेवा देऊ शकते. त्यासाठी लागणार अभ्यासक्रम आणि संरचना, परीक्षांची माहिती आपण समजून घ्यावी.”
सीए संकेत शहा, सीए श्वेता पुजारी, सीए पुष्कराज बेडेकर, सीए रिद्धी चांडक, सीए शीतल धूत यांनी कारशालेत मार्गदर्शन केले. सीए बनण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टी, अभ्यासक्रम, या सर्व गोष्टी पॉवर-पॉईंट सादरीकरनाद्व्यारे दाखविल्या. तसेच सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ‘विकासा’कडून नियमित उपक्रम, सेमिनार, परिषदा, मूलभूत कोर्सेसची देखील माहिती या मार्गदर्शन शिबिरात देण्यात आली. खडतर प्रयत्न करून, कौटुंबिक संकटाना सामोरे जाऊन सीए  झालेल्या विद्यार्थ्यांची उदाहरण देखील देण्यात आले.

मुलांच्या बुद्धीक्षमतेविरुद्ध निर्णय लादु नयेत- डॉ. श्रुती पानसे

0
पुणे : “विविध वयोगटानुसार शरीरासोबत बुद्धीचीदेखील वाढ होते. त्यामुळे त्यांच्या बुद्धीक्षमतेविरुद्ध त्यांच्यावर निर्णय लादु नयेत. त्यांच्या क्षमता ओळखून त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे,” असे मत बाल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘मेंदू आणि व्यक्ती विकास’ या विषयावर आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर डॉ. श्रुती पानसे बोलत होत्या. मयूर कॉलनीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या सभागृहात झालेल्या या कट्टयावेळी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र. उपस्थित होते.
डॉ. श्रुती पानसे म्हणाल्या, “शरीरासोबत मेंदूचीदेखील वाढ होत असतेआणि सर्वात जास्त स्ट्रेस हा लहान वयोगटात आढळून येतो. त्यामुळे विनाकारण त्यांच्यावर निर्णय लादल्याने किंवा त्यांच्या क्षमतेविरूद्ध जबाबदारी टाकल्याने त्यांच्यातील  अस्वस्थता  वाढीस लागते. म्हणून पालकांनी देखील काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. मुलांना त्यांच्या बुद्धीनुसार वाढण्यास मदत करणे गरजेचे आहे. आपल्या मेंदूत ‘कॉर्टिसोल’ नावाचे रसायन असते, जे ताण निर्माण करते. तसेच  ‘सेरेटोनीन’, ‘इंडोफिन’, ‘ऑक्सिडीसीन’, आणि ‘ट्रियुन’ हे चार आनंदी ठेवणारे रसनदेखील असतात. त्यामुळे कॉर्टिसोल ऐवजी इतर चार रसायनांच्या वाढीसाठी आपण प्रेत केला पाहिजे. मुलांच्या आतील अस्वस्थेतेच्या मुळाशी जाणून घेऊन त्यावर काम केले पाहिजे. मुले लवकरात लवकर मोठे  होण्यापेक्षा, योग्य पद्धतीने आणि बुद्धीक्षमतेने कशी होईल या गोष्टीवर  भर दिला पाहिजे.”
विनय र.र. यांनीही मनोगत व्यक्त केले.

पालकमंत्री ;महापौर आणि मुख्यमंत्री कोण याचा विचार करा : प्रवीण गायकवाड

पुणे : पुण्यातील पालक मंत्री कोण आहे, महापौर कोण आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत याचा विचार व्हावा असे सुचक वक्तव्य करत पुण्यातील कॉँग्रेसकडून इच्छुक उमेदवार संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. कॉँग्रेसचा प्रचाराचा नारळ फुटण्याच्या अगोदरच गायकवाड यांनी लाल महाल येथे समविचारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
रविवारी सकाळपासूनच कार्यकर्त्यांना विविध माध्यमांद्वारे संपर्क साधून दुपारी दोन वाजता लाल महाल येथे बोलाविण्यात आले होते. ‘आता पुण्याचा कारभार शनिवारवाड्यातून नाही तर लाल महालातून चालणार. बहुजनांचा आवाज लोकसभेत जाणार‘ अशा आशयाचे संदेश पाठविण्यात आले. माध्यमांच्या प्रतिनिधींना मात्र सभेला परवानगी नाकारल्याची माहिती देण्यात आली होती.


दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गायकवाड लाल महाल येथे आले. ज्या टप्यावर आपण चर्चा करतोय, ज्या टप्यावर ही चर्चा आहे. अद्याप आपली उमेदवारी निश्चित झालेली नाही असे सांगुन गायकवाड म्हणाले, ‘‘ या देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या निमित्ताने राजकीय व्यवस्था निर्माण झाली आहे. हुकूमशाही प्रवृत्तीचे लोक काम करत आहेत. संघ परिवाराचा प्रवाह वाढला आहे. पुण्यातील महापौर कोण, पालक मंत्री कोण, राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत याचा विचार करायला हवा. केवळ प्रबोधनाने आपल्याला त्यांना हटविता येणार नाही. म्हणनू जस्टीस पी. बी. सावंत यांच्यासारख्या माझ्या मार्गदर्शकांनी मला सांगितले की मोदींची ताकद सत्तेतून वाढलेली आहे. त्यामुळे मोदींना सत्तेतून घालविणे गरजेचे आहे. भारतीय संविधानाला, लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. माझ्या उमेदवारीच्या प्रश्नापेक्षा हा धोका महत्वाचा आहे. त्याविरोधात आपण लढले पाहिजे. पुढील पाच वर्षानंतर पुन्हा निवडणुका होतील की नाही ही भीती आहे. ‘‘
गायकवाड म्हणाले, ‘‘कॉँग्रेस हा पुरोगामी, बहुजन समाजाचा पक्ष आहे. सगळ्या विचारधारांना सामावून घेणारा पक्ष आहे. अशा पक्षामध्ये जात असताना तुमच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. गेल्या एक महिन्यामध्ये कॉँग्रेस, राष्टवादी आणि आपल्या बहुजन समाज पक्षाच्या लोकांशी ओळखी करून घेत होतो.‘‘

उमेदवार कोणी का असेना बापटांना घरी पाठविणार ..कॉंग्रेस इच्छुकांचा सुरात सूर ..

पुणे- कॉंग्रेसने पुणे लोकसभेसाठी उमेदवारी अजूनही घोषित केली नाही याम्गे नेमके काय दडलय ? या प्रश्नाची उकल होत नसताना दुसरीकडे आज शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे यांनी लोकसभा प्रचाराचा नारळ कसबा गणपती मंदिरात फोडून प्रचाराला प्रारंभ केला . उमेदवार घोषित नसताना बागवे यांनी प्रचाराचा नारळ फोडल्याने राजकीय स्तरावर अचंबित होण्याची वेळ अनेकांवर आली असताना   या मंदिरात प्रचाराचा शुभारंभ करताना इच्छुक  उमेदवारांनी आपले हातात हात असल्याचे दर्शविले तर तुडुंब गर्दी केलेल्या कार्यकर्त्यांनी मात्र प्रत्यक्षात येथील भाजपच्या गिरीश बापटांच्या कार्यालयासमोर फटाक्यांचा धूर काढला आणि घोषणांचा पाऊस पाडला .बागवे यांच्या सह कॉंग्रेस चे सर्व पदाधिकारी नगरसेवक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण ,शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील आदींनी यावेई माध्यमांपुढे आपापली मते मांडली .

काँग्रेसच्या इच्छुकांसह 49 जणांनी नेले उमेदवारी अर्ज

0

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसच्या इच्छुक असलेल्या तिघा उमेदवारांच्या वतीने चार अर्ज निवडणूक कार्यालयातून नेण्यात आले आहेत. तर, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट यांच्या वतीनेही उमेदवारी अर्ज नेला आहे. या मतदारसंघातून ४९ जणांनी अर्ज घेतले असल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली. बारामती मतदारसंघातून ५४ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले.
पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज देण्यास गुरुवारपासून (दि.२८) सुरुवात झाली. पुणे लोकसभा मतदार संघात भाजपने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट करीत गिरीष बापट यांनी उमेदवारी देखील जाहीर केली. मात्र, कॉंग्रेसला अजूनही आपला उमेदवार ठरविता आलेला नाही. कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा झालेले प्रवीण गायकवाड यांच्या वतीने उमेदवारी अर्ज नेण्यात आला आहे. कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या वतीने दोन उमेदवारी अर्ज नेल्याची नोंद निवडणूक शाखेकडे झाली आहे. तर, आणखी एक चचेर्तील उमेदवार अरविंद शिंदे यांच्या वतीने देखील उमेदवारी अर्ज नेण्यात आला आहे.
महाराष्ट्र नव निर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे प्रक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मात्र, मनसेच्या सुहास निम्हण यांच्या वतीने उमेदवारी अर्ज घेण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या अनिल जाधव यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे. गेल्या दोन दिवसांत ४९ उमेदवारांनी अथवा त्यांच्या वतीने ८० अर्ज नेण्यात आले आहेत. यातील २५ जणांनी अपक्ष म्हणून अर्ज घेतले आहेत.
बारामतील लोकसभा मतदारसंघात गेल्या ५४ जणांनी अर्ज घेतले आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांनी शुक्रवारीच अर्ज नेले आहेत. शुक्रवारी सोळा जणांनी अर्ज नेले असून, त्यात ९ अपक्ष इच्छुक उमेदवारांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीच्या अजित पानसरे यांच्या वतीने उमेदवारी अर्ज नेला आहे.

 

लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी सुट्टी जाहीर

0

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी कामासाठी आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्राबाहेर असतील अशा कर्मचाऱ्यांनाही लागू असेल. राज्य व केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम तसेच अकृषी, कृषी आणि अन्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, शिक्षण संस्था आदींनाही ही अधिसूचना लागू राहील.

पहिल्या टप्प्यात गुरुवार दि. 11 एप्रिल 2019 रोजी वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार असून त्यादिवशी संबंधित मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी राहील. बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या दुसऱ्या टप्प्यातील दहा मतदारसंघांसाठी गुरुवार दि. 18 एप्रिल या मतदानाच्या दिवशी सुट्टी राहील.

तिसऱ्या टप्प्यातील जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या 14 मतदारसंघांमध्ये मंगळवार दि. 23 एप्रिल या मतदानाच्या दिवशी सुट्टी राहील. राज्यातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर आणि शिर्डी या 17 मतदार संघात सोमवार दि. 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार असून या‍ दिवशी सार्वजनिक सुट्टी राहील.

केंद्र शासनाच्या अखत्यारितीतील स्वायत्त महामंडळे, प्रतिष्ठाने आदींनाही या अधिसूचनेनुसार सुट्टी लागू राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मतदान सामग्री सीलबंद करण्यासाठी लाखेच्या सहा लाख कांड्‌या, चार लाख मेणबत्या

0

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर विविध उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात सील होईल. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, त्याचे कंट्रोल युनिट आणि यंदा वापरण्यात येणारे व्हीव्हीपॅट यंत्रासह इतर सामग्री सीलबंद ठेवण्याची ‘लाख’ मोलाची कामगिरी बजावायला ‘लाखे’चा वापर केला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी 6 नग या प्रमाणे लाखेचे 6 लाख 81 हजार नग कांडी लागणार आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात लाख वापरण्याची निवडणूक काळातील ही पहिलीच वेळ असावी.

जप्ती असो अथवा कागदपत्रे, पुरावे सीलबंद करायचे असो शासकीय कारवाईत ‘लाखे’ची लालभडक मोहोर महत्त्वाची ठरते. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानानंतर मतदान यंत्रे व त्याच्याशी निगडित साहित्य मतमोजणीपर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी ती सीलबंद केली जातात. त्यासाठी मोलाची कामगिरी लाखेकडून बजावण्यात येते. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबरोबरच त्याचे कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्र, मतदारांची नावे व स्वाक्षरी असलेली यादी आदी साहित्य मतदानाची वेळ संपल्यानंतर सीलबंद केली जाते. मतमोजणीच्या दिवशी हे सील काढले जाते.

यापूर्वी कागदी मतपत्रिकेद्वारे मतदान होत असल्यामुळे मतपेटी व इतर साहित्य सीलबंद केली जात. मात्र, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आल्यानंतर या यंत्राबरोबरच त्याचे कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्र यांनाही सील केले जाते. मतदान यंत्रे व इतर अनुषंगिक साहित्य सीलबंद करण्याची कामगिरी ही मतदान प्रक्रियेतील ही सर्वात मोठी जबाबदारी असते. हे सर्व साहित्य ठेवण्यासाठी आऊटर पेपर, ग्रीन पेपर व व्हीव्हीपॅटसाठी पिंक पेपरचा वापर केला जातो. त्यावर लाख लावून सीलबंद केले जाते. यासाठी यंदा प्रत्येक मतदान केंद्रासाठी 6 नग या प्रमाणे राज्यासाठी 6 लाख 81 हजार 800 नग लाख मागविण्यात आले आहेत. भारतीय सुरक्षा मुद्रणालयाकडून ही लाख केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत राज्याकडे पाठविण्यात येते.

ही लाख वितळवून मतदान यंत्रे सीलबंद केली जातात. ती वितळविण्यासाठीची मेणबत्ती निवडणूक आयोगाकडून पुरविली जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाख वितळविण्यासाठी सुमारे 4 लाख 55 हजार मेणबत्त्यांची मागणी राज्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. याबरोबर कागदे, पेन्सिल, खोडरबर, शाई आदी साहित्य मोठ्या प्रमाणात मागविण्यात आले आहेत.

पुढील लोकप्रतिनिधी कोण होणार याचे भवितव्य या मतदान यंत्रात सुरक्षितपणे ठेवण्यासाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत या ‘लाखे’ला मोठे मोल आहे.

मोदी मुक्त भारतासाठी मनसे करणार काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार!

0

मुंबई-महाराष्ट्र नव निर्माण सेना अर्थात मनसे लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करणार या निर्णयावर आज राजगडावर झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. आज राजगडावर मनसे विभाग अध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत बाळा नांदगावकर यांनी या संदर्भातल्या स्पष्ट सूचना दिल्या. मनसे कार्यकर्त्यांनी उघडपणे शिवसेना आणि भाजपा विरोधात बिनधास्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करावा असे नांदगावकर यांनी सांगितले.

मनसेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी आणि त्यानंतर झालेल्या भाषणात राज ठाकरेंनी आपली लढाई मोदींविरोधात आहे. शाह आणि मोदी यांना हटवण्यासाठी पक्ष कोणता ते पाहणार नाही. जे पक्ष मोदींचा विरोध करत आहेत त्यांना साथ देणार असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे.

मोदी मुक्त भारत हेच माझे आणि माझ्या पक्षाचे धोरण आहे. मोदींच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे हे मागच्याच वर्षी बोललो होतो. आता जे पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत तेच पक्ष माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. मोदी विरोध हीच माझी भूमिका आहे. जे काही करायचं ते मोदी आणि भाजपाच्या विरोधात करायचं आहे. काहीही झाले तरीही भाजपाला, नरेंद्र मोदींना आणि अमित शाह यांना मतदान करू नका असंही आवाहन राज ठाकरेंनी केलं  होतं.

तसंच एअर स्ट्राईकबाबत धादांत खोटी माहिती पसरवली जाते आहे. खोट्या फोटोंच्या आधारे प्रचार केला जातो आहे आणि मतं मागितली जात आहेत. खोट्या प्रचाराला भुलू नका. नरेंद्र मोदी हा अत्यंत खोटारडा माणूस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मुळीच विश्वास ठेवू नका असंही राज ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यांच्या भाषणाच्या वेळी त्यांनी काही व्हिडिओ क्लिप्स दाखवल्या आणि मोदींवर निशाणा साधला होता.

जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांची मिडीया सेंटरला भेट

0

पुणे,- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज जिल्‍हास्‍तरीय माध्‍यम देखरेख नियंत्रण कक्षास    (मिडीया सेंटर) भेट देऊन पहाणी केली. यावेळी जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग तसेच विविध माध्‍यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्‍ह्यातील माध्‍यम प्रतिनिधींना लोकसभा निवडणुकीविषयीची माहिती या कक्षातून दिली जाणार असून जिल्‍हाधिकारी राम यांनी तेथील सेवा-सुविधांची पहाणी केली.