बीव्हीजी व डिक्की शेतकरी उद्योजक घडवणार : मिलिंद कांबळे
महाराष्ट्रासह ८ राज्यांत दहशतवादी हल्ला होण्याचा संशय-कर्नाटकच्या पोलिसांकडून अॅलर्ट
मुंबई-श्रीलंकेत इस्टर संडेला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या किनारी राज्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. समुद्रमार्गे दहशतवादी या राज्यांमध्ये प्रवेश करण्याची शक्यता लक्षात घेता ही खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान, कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रासह ८ राज्यांना पत्र लिहून दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेची सूचना देत अॅलर्ट दिला आहे.
कर्नाटक पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांना एका व्यक्तीने फोनवरुन सांगितले की, महाराष्ट्र, कर्नाटकसह इतर ६ राज्यांमध्ये हल्ला घडवून आणण्याचा कट रचला जात आहे. या माहितीनंतर कर्नाटकच्या पोलिसांनी महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, पुदुच्चेरी, गोवा या राज्यांच्या पोलीस प्रमुखांना पत्र लिहून अॅलर्ट राहण्यास सांगितले आहे.
ज्या व्यक्तीने कर्नाटक पोलिसांना फोन केला त्याने स्वतः एक ट्रक ड्रायव्हर असल्याचे सांगितले आहे. स्वामी सुंदर मुर्ती असे स्वतःचे नाव सांगताना शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता बंगळुरू शहर पोलिसांच्या कन्ट्रोल रुमला त्याने फोन केला होता. यामध्ये त्याने सांगितले होते की, देशातील आठ राज्यांमध्ये दहशतवादी स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत आहेत.
यावेळी दहशतवादी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट घडवून आणू शकतात असेही त्याने म्हटले आहे. तामिळनाडूच्या रानाथपुरम येथे १९ दहशतवादी असल्याचाही त्याने दावा केला आहे. या फोननंतर कर्नाटक पोलिसांनी सर्व संबंधीत राज्यांच्या पोलिसांना पत्र लिहून खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
दरम्यान, तामिळनाडूनच्या चेन्नई पोलिसांनाही एक फोन आला होता. यामध्ये रामेश्वरमधील प्रसिद्ध पंबन सी पुल उडवण्याची धमकी देण्यात आली होती. या फोन नंतर पोलिसांनी संबंधीत पुलावर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण केले होते. तसेच इतर महत्वाच्या ठिकाणांनाही त्यांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
आठ मे पर्यंत उष्णतेची लाट
पैसे दिले तर घ्या पण यांच्या ढुंगणावर लाथ मारून हाकलून द्या – राज ठाकरेंची नाशिक मध्ये विनंती
नाशिक -पैसे दिले तर घ्या पण यांच्या ढुंगणावर लाथ मारून हाकलून द्या,यंदाची निवडणूक ह्या देशात लोकशाही टिकणार आणि हुकूमशाही येणार हे ठरवणारी निवडणूक आहे हे विसरू नका. देश संकटात आहे म्हणून मी प्रचार करतोय असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.
राज ठाकरे यांची आज नाशिकमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले
राज ठाकरे म्हणाले ,’एचएल या कंपनीची क्षमता असतानाही फक्त मैत्री जपण्यासाठी अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेलसंदर्भातलं कंत्राट देण्यात आलं असाही आरोप राज ठाकरेंनी केला. तसंच एचएएल आणि जेट या कंपन्या डबघाईला आणण्याचं काम या सरकारने केलं. याच सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव देऊ असं आश्वासन दिलं होतं, बेरोजगारी हटवण्यात येईल. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊ, काळा पैसा भारतात आणू, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकू ही आणि अशी अनेक स्वप्नं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवली होती. मात्र यातलं एकही स्वप्न नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं नाही. एकही आश्वासन पूर्ण केलं नाही.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांपूर्वी काय आश्वासनं दिली होती? आणि अमित शाह म्हटले होते की पंधरा लाख रूपये हा जुमला आहे ती क्लिपही या भाषणात राज ठाकरेंनी दाखवली. देशाला मूर्ख बनवण्याचं काम अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गांधी परिवारातल्या सदस्यांनी भ्रष्टाचार केला. रॉबर्ट वढेराला तुरूंगात टाकण्याची भाषा भाजपाच्या नेत्यांनी २०१४ च्या आधी केली होती. आता मात्र या कोणत्याही गोष्टींचा उल्लेखही मोदी करत नाहीत. रॉबर्ट वढेरा यांच्या अटकेबाबत अमित शाह यांनी काय म्हटलं होतं त्याचीही क्लिप राज ठाकरेंनी दाखवली आणि देशाला हे लोक कसे मूर्ख बनवतात ते पहा असंही आवाहन राज ठाकरेंनी केलं.
काँग्रेसच्या काळात टू जी घोटाळा प्रकरणी ए राजा, कनिमोळी यांच्यासह अनेकांना तुरुंगात धाडलं होतं. ते सगळे भाजपाच्या काळात कसे सुटले ? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. मी खालच्या जातीचा आहे म्हणून माझ्यावर टीका होते असे वक्तव्य नरेंद्र मोदींनी केली होती. तुम्ही हे काय बोलत आहात? प्रश्न विचारल्यावर तुम्हाला जात आठवते का? असेही प्रश्न राज ठाकरेंनी विचारले. सगळी खोटी आश्वासनं देणाऱ्या आणि खोटं बोलणाऱ्या मोदींना कोणत्या निकषांवर मतं द्यायची? असा प्रश्न राज ठाकरेंनी पुन्हा एकदा विचारला.
आणखी काय म्हणाले राज ठाकरे –
१९३२ साली जे हिटलर ने केले.. तेच या देशात चालू आहे, न्यायालय , माध्यमे, तपास यंत्रणा साऱ्यांना दबावाखाली ठेवण्यात येते आहे…
कॉंग्रेस च्या काळात २ जी ..वगैरे भ्रष्टाचाराच्या आरोपावरून .ज्यांना तुरुंगात घातले ते भाजपच्या काळात बाहेर सुटले …
मला ५० दिवस द्या ,नोटबंदी..अयशस्वी वाटली तर पाहिजे त्या चौकात मला पाहिजे ती शिक्षा द्या म्हणाले होते .. आता चौक सांगा .. सुप्रीम कोर्टाचे निष्णांत वकील कपिल सिब्बल यांनी घेतलेली पत्रकार परिषद मिडिया ने प्रसिद्धीस दिलीच नाही ..कपिल सिब्बल यांनी नोट बंदी बाबत गौप्यस्फोट करणारी माहिती दिली . ती खोटी असेल तर त्याबाबत त्यांच्यावर भाजपने कारवाई का केली नाही ?
हि निवडणूक लोकशाही राहणार कि हुकुमशाही येणार याचा फैसला करणारी आहे …मी देशावर आलेले संकट दूर करण्यासाठी प्रचार करतोय ..माझी हाथ जोडून विनंती आहे पुन्हा फासले जावू नका ..
नृत्यातील पुण्याचे काम देशभर पोहोचण्यासाठी संस्थात्मक काम गरजेचे : शमा भाटे
अथर्व जोशी, अर्जुन वेल्लूरी यांचे सनसनाटी विजय
पुणे: पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत अथर्व जोशी, अर्जुन वेल्लूरी या खेळाडूंनी आपापल्या गटांतील मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आजचा दिवस गाजवला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात बिगरमानांकीत अर्जुन वेल्लूरी याने चौथ्या मानांकित क्रिशांक जोशीचा 6-5(8-6) असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. अथर्व जोशीने तेराव्या मानांकित अर्जुन खलाटेचा टायब्रेकमध्ये 6-5(5) असा पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 10 वर्षाखालील मुले:
सक्षम भन्साळी(1) वि.वि.वेदांत खानवलकर 5-0;
रोहन बजाज वि.वि.आश्रीत माज्जी 5-0;
सय्यम पाटील(3)वि.वि.ईशान ओक 5-0;
पृथ्वीराज दुधाने वि.वि.राघव सरोदे 5-1;
अर्जुन वेल्लूरी वि.वि.कपिल गडियार 5-1;
राम मगदूम(5)वि.वि.सुजल तांडगे 5-0;
12 वर्षाखालील मुले: दुसरी फेरी:
अभिराम निलाखे(1)वि.वि.आदित्य कामत 6-1;
कृष्णा शिंगाडे वि.वि.वीरेन चौधरी 6-0;
आदित्य ठोंबरे वि.वि.अनुज कदम 6-4;
अथर्व जोशी वि.वि.अर्जुन खलाटे(13) 6-5(5);
अर्जुन वेल्लूरी वि.वि.क्रिशांक जोशी(4) 6-5(8-6);
एसबीआय लाइफ इन्शुरन्सने वर्षामध्ये नोंदवले 13,792 कोटी रुपये
एसबीआय लाइफ इन्शुरन्स या देशातील एका आघाडीच्या लाइफ इन्शुरन्स कंपनीने 31 मार्च 2019 रोजी संपलेल्या वर्षामध्ये न्यू बिझनेस प्रीमिअममध्ये 26% म्हणजे 13,792 कोटी रुपयांपर्यंत वाढ साध्य केली आहे;या तुलनेत हे प्रमाण 31 मार्च 2018 रोजी संपलेल्या वर्षामध्ये 10,966 कोटी रुपये होते.संरक्षण यावर प्रामुख्याने भर देत, एसबीआय लाइफच्या प्रोटेक्शन न्यू बिझनेस प्रीमिअमचे संकलन 31 मार्च 2019 रोजी संपलेल्या वर्षामध्ये 1,643 कोटी रुपये झाले. 31 मार्च 2018 पर्यंतच्या वर्षातील 600 कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात 174% वाढ झाली. इंडिव्हिज्युअल न्यू बिझनेस प्रीमिअमचे संकलन 15% म्हणजे9,636 कोटी रुपयांपर्यंत वाढले, अगोदरच्या वर्षात ते 8,407 कोटी रुपये होते.31 मार्च 2019 पर्यंतच्या बारा महिन्यांत, एसबीआय लाइफचा करोत्तर नफा 15% वाढून 1,327 कोटी रुपये झाला, तर अगोदरच्या वर्षातील याच कालावधीत तो 1,150 कोटी रुपये होता.31 मार्च 2019 पर्यंत, कंपनीचा सॉल्व्हन्सी रेश्यो 2.13 होता, तर या तुलनेत नियमनात्मक आवश्यकता 1.50इतकी आहे.
31 मार्च 2019 पर्यंत एसबीआय लाइफच्या एयूएममध्ये 21% म्हणजे 1,41,024 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली.31 मार्च 2018 पर्यंत हे प्रमाण 1,16,261 कोटी रुपये होते आणि डेट्-इक्विटी प्रमाण 77:23 होते. 90% डेट् गुंतवणूक AAA व सोव्हिरिअन साधनांत केली आहे.
कंपनीकडे 184,452 प्रशिक्षित विमा प्रोफेशनलचे व देशात 908 कार्यालयांचे विस्तृत वितरण जाळे असून त्यामध्ये सक्षम बँकाश्युरन्स चॅनल, एजन्सी चॅनल व अन्य चॅनल – कॉर्पोरेट एजंट, ब्रोकर, मायक्रो एजंट, कॉमन सर्व्हिस सेंटर, इन्शुरन्स मार्केटिंग फर्म, वेब अग्रिगेटर्स व डायरेक्ट बिझनेस – यांचा समावेश आहे.
मार्च 31, 2019 पर्यंतच्या वर्षातील कामगिरी
- न्यू बिझनेस प्रीमिअममध्ये26% वाढ
- प्रोटेक्शनन्यू बिझनेस प्रीमिअममध्ये 174% वाढ
- इंडिव्हिज्युअल रेटेड प्रीमिअममध्ये15% वाढ व खासगी बाजारहिस्सा 22.3%
- ऑपरेटिंग एक्स्पेन्स रेश्योमध्ये6.8% वरून 6.4% पर्यंत घट
- करोत्तर नफ्यामध्ये15% म्हणजे 1,327 कोटी रुपयांपर्यंत वाढ
- इंडियन एम्बडेड व्हॅल्यूमध्ये (आयईव्ही)17% म्हणजे 22,402 कोटी रुपयांपर्यंत वाढ
- लागू कराच्या दरानुसार, व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेसमध्ये (VoNB) 22% म्हणजे 1,916 कोटी रुपयांपर्यंत वाढ
- लागू कराच्या दरानुसार,VoNB मार्जिनमध्ये 18.4% वरून 19.8% पर्यंत वाढ
डॉ.पी. ए. इनामदार यांना संचालकपदावरून दूर करण्याच्या निबंधक ( सहकारी संस्था ) यांच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती
16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत परी सिंग, अभया वेमुरी, अर्जुन कुंडू, सॅम चावला यांचा अंतिम फेरीत प्रवेश
पाचगणी: रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल नॅशनल सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात परी सिंग, अभया वेमुरी यांनी तर मुलांच्या गटात अर्जुन कुंडू, सॅम चावला या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात 16 वर्षाखालील मुलींच्या गटात हरियाणाच्या तिसऱ्या मानांकित परी सिंग हिने क्वालिफायर तामिळनाडूच्या लक्ष्मी अरूणकुमारचा 6-4, 6-3 असा संघर्षपूर्ण पराभव अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या फेरीच्या लढतीत तेलंगणाच्या चौदाव्या मानांकित अभया वेमुरी हिने मध्यप्रदेशच्या अमिशी शुक्लाचे आव्हान 7-5, 6-4 असे संपुष्टात आणले.
मुलांच्या गटात गुजरातच्या मानांकित अर्जुन कुंडू याने आपल्या लौकिकाकाला साजेशी खेळता कर्नाटकच्या अर्जुन प्रेमकुमारचा टायब्रेकमध्ये 6-1, 7-6(2) असा पराभव अंतिम फेरी गाठली. दिल्लीच्या सॅम चावलाने छत्तीसगडच्या अजय सिंगचा 4-6, 6-1, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुहेरीत मुलांच्या गटात आकाश देबने यशराज दळवीच्या साथीत कुश अरजेरिया व आयुष्मान अरजेरिया यांचा 7-6(1), 6-4, असा तर, फरहान पत्रावाला व धन्या शहा यांनी शिवम कदम व निरव शेट्टी यांचा 6-3, 7-6(5) असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- एकेरी गट: उपांत्य फेरी- 16 वर्षाखालील मुली
परी सिंग(हरियाणा)(3) वि.वि. लक्ष्मी अरूणकुमार(तमिळनाडू)6-4, 6-3;
अभया वेमुरी(तेलंगणा)(14) वि.वि. अमिशी शुक्ला(मध्यप्रदेश)7-5, 6-4;
उपांत्य फेरी- 16 वर्षाखालील मुले
अर्जुन कुंडू(गुजरात)(1)वि.वि.अर्जुन प्रेमकुमार(कर्नाटक)6-1, 7-6(2);
सॅम चावला(दिल्ली)(12)वि.वि.अजय सिंग(छत्तीसगड)4-6, 6-1, 6-3.
दुहेरी गट: मुले: उपांत्यपूर्व फेरी:
आकाश देब/ यशराज दळवी वि.वि.कुश अरजेरिया/आयुष्मान अरजेरिया 7-6(1), 6-4;
फरहान पत्रावाला/धन्या शहा वि.वि.शिवम कदम/निरव शेट्टी 6-3, 7-6(5);
अनर्घ गांगुली/कार्तिक सक्सेना वि.वि.रोनीन लोटलीकर/मोनिन लोटलीकर 6-2, 6-2;
जितीन छेत्री/सुखप्रीत झोजे वि.वि.भूषण हॊबम/अजय सिंग 6-4, 6-4;
मुली:
काव्या खिरवाल/हनह नागपाल वि.वि.लक्ष्मी अरुणकुमार/कुमकुम नीला 7-5, 6-1;
चहाना बुद्धबती/तनुश्री पांडे वि.वि.माही पांचाळ/आरणी रेड्डी 6-3, 6-1;
मेखला मन्ना/पवित्रा रेड्डी वि.वि.पुनर्वा शहा/अमिशी शुक्ला 6-2, 3-6, 10-3;
अभया वेमुरी/अपूर्वा वेमुरी वि.वि.सई भोयर/इशिता जाधव 6-4, 7-6(5).
पुण्यातील पाणी कपाती बाबत पालकमंत्री गिरीश बापटांनी राजीनामा द्यावा – मोहन जोशी
पुणे-पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचा साठा सुमारे ७ टीएमसी एवढा राहिला असून २ मेनंतर पुणेकरांना दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे. पुण्याच्या पाणी पुरवठ्याचा खेळ खंडोबा करणाऱ्या पालकमंत्री गिरीश बापटांनी त्यांची अकार्यक्षमता लक्षात घेऊन त्वरीत राजीनामा द्यावा अशी मागणी कॉंग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी केली आहे.
ते म्हणाले कि, पुणे महानगरपालिकेत कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना पाण्याचे उत्तम नियोजन केल्यामुळे पुणेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले नाही. मात्र अकार्यक्षम पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाण्याच्या नियोजनाकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे आता दिवसाआड पाणीपुरवठ्याची वेळ पुणेकरांवर येणार आहे. गेल्या ५ वर्षात पालकमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द
पूर्णपणे अपयशी ठरली असून त्याचे दुष्परिणाम पुणेकरांना भोगावे लागत आहेत.
विशेष म्हणजे, पुण्यातील मतदान २३ एप्रिल रोजी झाले तर पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शिरूर लोकसभा मतदार संघात येतो, तेथे २९ एप्रिल रोजी मतदान आहे. पालकमंत्री बापट यांच्या निष्क्रियतेमुळे पुणेकरांवर पाणी कपात लादावी लागणार आहे व त्याचा मतदानावर प्रतिकूल परिणाम होईल हे लक्षात घेऊन पुण्याची पाणी कपात २ मेपासून करण्याची चलाखी या निष्क्रिय पालकमंत्रांनी केली आहे . पुणेकरांबद्दल त्यांना अजिबात आस्था नाही ,हे त्यांनी यावेळी देखील दाखवून दिले आहे. तूरडाळ खरेदी घोटाळ्यात भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही’हिरवा देठ’ सारखे संस्कृतीहीन जाहीर विधान करूनही आणि पुण्याच्या
प्रश्नांबाबत निष्क्रिय राहूनही मुख्यमंत्र्यांपुढे केलेल्या लांगुलचालनामुळेच स्वतःचे मंत्रीपद ते टिकवू शकले. आता मात्र पुणेकरांनी त्यांचा राजीनामा मागावा कारण अशा निष्क्रिय आणि झोपी गेलेल्या चौकीदाराचा पुणेकरांना काही एक उपयोग नाही हे निश्चित आहे.असे मोहन जोशी यांनी आहे .
संजय ताकसांडे महापारेषणच्या संचालक (संचालन) पदी रुजू
मुंबई : महापारेषण कंपनीचे संचालक (संचालन) म्हणून श्री. संजय ताकसांडे यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महावितरण कंपनीमध्ये पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होते.
वीजक्षेत्रातील महत्वाच्या पदांवर सुमारे 29 वर्षांचा अनुभव असलेले श्री. संजय ताकसांडे हे सन 2003 मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कार्यकारी अभियंता म्हणून मुंबई मुख्यालयात रूजू झाले. त्यानंतर ते अधीक्षक अभियंता पदावर वसई, बुलडाणा व मुख्य अभियंता म्हणून अमरावती परिमंडल, अकोला या ठिकाणी कार्यरत होते. ऑक्टोबर 2015 मध्ये थेट भरती प्रक्रियेतून श्री. संजय ताकसांडे यांची कार्यकारी संचालक (वितरण) पदी निवड झाली व त्यांच्याकडे वितरण, भारव्यवस्थापन, सामग्री व्यवस्थापन व वितरण फ्रॅचाइजी या विभागाच्या संपूर्ण जबाबदारींसह राज्यातील नागपूर, गोंदिया,चंद्रपूर, अमरावती, अकोला, पुणे, बारामती व कोल्हापूर ही परिमंडले सुध्दा त्यांच्या कार्यक्षेत्रात होती. पश्चिम महाराष्ट्राचे कार्यक्षेत्र असलेल्या महावितरणमधील पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून त्यांनी सव्वादोन वर्ष काम पाहिले आहे.
त्यानंतर नुकत्याच झालेल्या महापारेषण कंपनीच्या संचालक (संचालन) पदाच्या थेट भरती प्रक्रियेमध्ये श्री. ताकसांडे यांची निवड झाली व महापारेषण कंपनीच्या मुंबई येथील मुख्यालयात ते नुकतेच रुजू झाले. महापारेषण व महावितरणच्या सेवेत येण्यापूर्वी श्री. संजय ताकसांडे हे केंद्र सरकारच्या केंद्रीय विद्युत प्राधीकरण, नवी दिल्ली येथे तसेच पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई या ठिकाणी कार्यरत होते.
‘संगत संगोष्ठी’ :कथक नृत्य ,साथसंगत यावरील सप्रयोग चर्चासत्र उत्साहात
पुणे ः‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘संगत संगोष्ठी’ या कथक नृत्य,साथसंगत या विषयावर ‘संगत संगोष्ठी’या सप्रयोग चर्चासत्रचे आयोजन २५ एप्रिल २०१९ रोजी करण्यात आले होते .त्याला चांगला प्रतिसाद मिळाला .
शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था आणि नृत्यवेध कथक नृत्य संस्था यांनी हा कार्यक्रम सादर केला . दि. २५ एप्रिल, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता ‘भारतीय विद्या भवना’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे हा कार्यक्रम झाला .
निखिल फाटक,डॉ.चैतन्य कुंटे,सुनील अवचट,चिन्मय कोल्हटकर,मृण्मयी फाटक,आमोद कुलकर्णी,डॉ.माधुरी आपटे हे कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले . ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर झालेला हा ७४ वा कार्यक्रम होता .
डॉ चैतन्य कुंटे चर्चा सत्रात बोलताना म्हणाले ” नर्तकाला नृत्यातून जे सांगायचे त्याला पूरक अशीच संगीताची आणि साथसंगत करणार्यांची भूमिका असावी , अन्यथा संगीत नर्तकाच्या नृत्यावर वर्चस्व गाजवू शकते”
डॉ कुंटे पुढे म्हणाले,”नृत्य पुढे आले पाहिजे आणि संगीताने दुय्यम भूमिका घ्यावी. कोणत्याही देवतेची वंदना सादर करताना त्या इश्वराचे स्वरूप लक्षात घेऊन त्यानुसार रागांची, स्वरांची निवड वंदनेसाठी निवडावे लागते. शिववंदनेचे संगीत कृष्ण वंदनेला चालणार नाही. ‘
चिन्मय कोल्हटकर म्हणाले,'” नृत्याची साथसंगत करताना नृत्य प्रकार समजला पाहिजे, प्रत्यक्ष कार्यक्रमापूर्वी होमवर्क महत्वपूर्ण असून नर्तकाच्या पदन्यासाप्रमाणे ,लयीनुसार संगीत दिले गेले पाहिजे, नोटैशन स्वतः साथ करणार्याने काढल्या पाहिजेत” .
कार्यक्रमाला मनिषा साठे,शमा भाटे ,शर्वरी जमेनीस इ मान्यवर उपस्थित होते.मनिषा साठे यांची शिष्य वल्लरी आपटे यांनी तसेच डॉ. माधुरी आपटे यांनीही कथक सादर केले. डॉ माधुरी आपटे या कार्यक्रम सूत्रधार होत्या . ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले .
निखिल फाटक(तबला),चारूदत्त फडके( गायन),आमोद कुलकर्णी,मृण्मयी फाटक(संवादिनी),कुंटे,कोल्हटकर(
आशियाई मानांकन महिला टेनिस स्पर्धेत चुरस रंगणार
पुण्यात 28 एप्रिल ते 5 मे 2019 दरम्यान रंगणार स्पर्धा
पुणे-: पुण्यातील मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब या टेनिस कोर्टवर येत्या 28 एप्रिल ते 5 मे या कालावधीत पहिलीवहिली 3000डॉलर पारितोषिक रकमेची फिनआयक्यू एटीटी आशियाई मानांकन महिला टेनिस स्पर्धा रंगणार असून यामध्ये भारताच्या साई संहिता चमर्थी आणि मिहिका यादव या डब्लूटीए मानांकित खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
स्पर्धेला फिनआयक्यू यांनी प्रायोजित केले असून नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी यांच्या तर्फे एमएसएलटीए यांच्या सहकार्याने आशियाई टेनिस संघटना व अखिल भारतीय टेनिस संघटना आणि पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिसस संघटना यांच्या मान्यतेखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रोफेशनल टूर स्पर्धांविषयी अनिश्चितता निर्माण झाल्यामुळे या विभागातील टेनिस पटूंचे हित ध्यानात घेऊन आशियाई टेनिस संघटनेने आयोजित केलेल्या महिला आशियाई टेनिस टूर स्पर्धा मालिकेतील हि पहिलीच स्पर्धा ठरणार आहे.
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले कि, भारतातील व्यावसायिक स्पर्धांची संख्या कमी झाल्यामुळे तसेच, कॅलेंडरमध्ये अनेक अनपेक्षित बदल करण्यात आल्यामुळे कनिष्ठ स्तरावर खेळाडूंना मिळणाऱ्या एटीपी/डब्लूटीए गुणांच्या संख्येवरही मर्यादा आल्या आहेत, हे ध्यानात घेऊन आशियाई टेनिस संघटनेने आयोजित केलेल्या या नव्या महिला टेनिस टूर स्पर्धांमुळे उदयोन्मुख खेळाडूंना फायदा मिळणार आहे.
घरच्या व मायदेशातील मैदानावर होणाऱ्या या स्पर्धांमुळे मिळणाऱ्या गुणांचा उपयोग करून खेळाडूंना परदेशातील स्पर्धांमध्ये प्रवेश मिळविता येणार आहे. त्यामुळेच एटीटी महिला मानांकन स्पार्धा अधिकच महत्वाच्या बनल्या असून या स्पर्धांमध्ये मिळणाऱ्या गुणांच्या आधारावर आशियाई चॅलेंजर स्पर्धांसारख्या वरिष्ठ किंवा व्यावसायिक स्पर्धांमध्ये वाईल्ड कार्ड देणे शक्य होणार असल्याचे सुंदर अय्यर यांनी सांगितले.
या पद्धतीने देण्यात येणाऱ्या वाईल्ड कार्ड प्रवेशांना 2020 मध्ये सुरुवात होणार असून यंदाच्या वर्षाअखेरच्या मानांकन यादतीतील अव्वल 10 खेळाडूंना ही संधी मिळणार आहे.त्यामध्येही आशिया खंडात 2020 मध्ये होणाऱ्या एटीपी चॅलेंजर स्पर्धांमध्ये 10 पुरुष मानांकित खेळाडूंना हा मान मिळणार असून महिला गटातील 25000डॉलर किंवा त्यावरील दर्जाच्या आयटीएफ स्पर्धांमध्ये 10 अव्वल महिला खेळाडूंना वाईल्डची संधी मिळणार असल्याचे स्पर्धा संचालक नवनाथ शेटे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले कि, हि पहिलीवहिली स्पर्धा 3000डॉलर पारितोषिक रकमेची असून केवळ एकेरी गटात होणाऱ्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये 32 व पात्रात फेरीत 64 खेळाडूंना प्रवेश देण्यात आला आहे.यातील भारतीय खेळाडूंचा सहभाग पाहताना या महिला खेळाडू उच्च दर्जाच्या स्पर्धेतही स्वतःला सिद्ध करण्यासाठी उत्सुक असल्याचे यावरून दिसून येते.
या स्पर्धेतील विजेत्या महिला खेळाडूला एटीपी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 50,75 व 100 गुणांची कमाई करता येणार आहे. तसेच या गुणांचे रुपन्तर एआयटीए गुणांमध्ये थेट करता येणार आहे. मुख्य ड्रॉमध्ये 24 थेट प्रवेशिका, 4 वाईल्ड कार्ड प्रवेशिका आणि पात्रता फेरीतून 4 स्पर्धकांचा समावेश असणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला 31हजार रुपये व करंडक, तर उपविजेत्या खेळाडूला 20हजार रुपये व करंडक देण्यात येणार आहे. याशिवाय उपांत्य फेरीतील खेळाडूला 12हजार रुपये, उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूंना 8500रुपये, पहिल्या फेरीतील खेळाडूंना 5000रुपये आणि मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश करणाऱ्या खेळाडूला 3500 रुपये देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने रविवार व सोमवार या दिवशी होणार आहे.
स्पर्धेतील मानांकित खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे:
1.साई संहिता चमर्थी, 2. मिहिका यादव, 3. भुवना कलवा, 4.निधी चिलूमुला, 5. काव्या सव्हानी, 6 प्रेरणा विचारे, 7. श्रीवल्ली रश्मीका भामिदिप्ती, 8. रिया उबवेजा.
लोकसभा निवडणूक मतदानाचा शेवटचा टप्पा : 17 मतदारसंघात 33 हजार 314 मतदान केंद्र 3 कोटी 12 लाख मतदार
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये 29 एप्रिल रोजी राज्यातील 17 मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. 3 कोटी 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात 1 कोटी 66 लाख 31 हजार पुरुष तर 1 कोटी 45 लाख 59 हजार महिला मतदार आहेत. मुंबई उत्तर मतदारसंघात सर्वाधिक 332 तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
या लोकसभा मतदारसंघांमध्ये 102 विधानसभा मतदारसंघ असून 33 हजार 314 मतदान केंद्र आहेत. सुमारे 1 लाख 7 हजार 995 ईव्हीएम (बीयू आणि सीयू) तर 43 हजार 309 व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण तीन टप्प्यांमध्ये 31 मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले. शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी तयारी सुरु आहे. मतदान केंद्रांवर आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. ‘सखी’ मतदार केंद्र, दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सावलीसाठी मंडप अशा सोयी यापुर्वी झालेल्या मतदान प्रक्रियेत पुरविण्यात आल्या आहेत.
नंदुरबार (अ.ज.), धुळे, दिंडोरी (अ.ज.),नाशिक, पालघर (अ.ज.), भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण,मावळ, शिरुर आणि शिर्डी (अ.जा.) या लोकसभा मतदारसंघत मतदान होणार आहे.
मतदारसंघनिहाय मतदार आणि मतदान केंद्रांची संख्या :
नंदुरबार- 18 लाख 70 हजार 117 ( पुरुष-9 लाख 43 हजार 745, महिला- 9 लाख 26 हजार 350), (मतदान केंद्र-2115) ;
धुळे- 19 लाख 4 हजार 859 (पुरुष-9 लाख 93 हजार 903, महिला-9 लाख 10 हजार 935), (मतदान केंद्र-1940) ;
दिंडोरी- 17 लाख 28 हजार 651 (पुरुष- 9 लाख 1 हजार 82, महिला-8 लाख 27 हजार 555), (मतदान केंद्र-1884) ;
नाशिक- 18 लाख 82 हजार 46 (पुरुष- 9 लाख 88 हजार 892, महिला- 8 लाख 93 हजार 139), (मतदान केंद्र-1907) ;
पालघर- 18 लाख 85 हजार 297(पुरुष- 9 लाख 89 हजार, महिला- 8 लाख 96 हजार 178), (मतदान केंद्र-2170) ;
भिवंडी- 18 लाख 89 हजार 788 (पुरुष- 10 लाख 37 हजार 752, महिला- 8 लाख 51 हजार 921), (मतदान केंद्र-2200) ;
कल्याण- 19 लाख 65 हजार 131 (पुरुष- 10 लाख 61 हजार 386, महिला 9 लाख 3 हजार 473), (मतदान केंद्र-2063) ;
ठाणे- 23 लाख 70 हजार 276 (पुरुष- 12 लाख 93 हजार 379, महिला-10 लाख 76 हजार 834), (मतदान केंद्र-2452) ;
मुंबई उत्तर- 16 लाख 47 हजार 208 (पुरुष- 8 लाख 90 हजार, महिला – 7 लाख 56 हजार 847), (मतदान केंद्र- 1715) ;
मुंबई उत्तर-पश्चिम- 17 लाख 32 हजार (पुरुष- 9 लाख 50 हजार 302, महिला- 7 लाख 81 हजार 765), (मतदान केंद्र-1766) ;
मुंबई उत्तर-पूर्व- 15 लाख 88 हजार 331 (पुरुष- 8 लाख 64 हजार 646, महिला- 7 लाख 23 हजार 542), (मतदान केंद्र-1721) ;
मुंबई उत्तर-मध्य- 16 लाख 79 हजार 732 (पुरुष-9 लाख 16 हजार 627 महिला- 7 लाख 63 हजार), (मतदान केंद्र-1721);
मुंबई दक्षिण-मध्य- 14 लाख 40 हजार 142 (पुरुष- 7 लाख 77 हजार 714, महिला- 6 लाख 62 हजार 337), (मतदान केंद्र- 1572) ;
मुंबई दक्षिण- 15 हजार 53 हजार 925 (पुरुष- 8 लाख 54 हजार 121, महिला- 6 लाख 99 हजार 781), (मतदान केंद्र-1578) ;
मावळ- 22 लाख 97 हजार 405 (पुरुष- 12 लाख 2 हजार 894, महिला- 10 लाख 94 हजार 471), (मतदान केंद्र- 2504) ;
शिरुर- 21 लाख 73 हजार 527 (पुरुष- 11 लाख 44 हजार 827, महिला- 10 लाख 28 हजार 656), (मतदान केंद्र-2296);
शिर्डी- 15 लाख 84 हजार (पुरुष- 8 लाख 21 हजार 401, महिला- 7 लाख 62 हजार 732), ( मतदान केंद्र-1710).
आपुलकीचे पोहे (लेखिका –पूर्णिमा नार्वेकर)
-पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ, दहिसर (प.), मुंबई – 400068
