Home Blog Page 2932

देशातील कोटी-कोटी जनतेने फकीराची झोळी भरली; विजयानंतर मोदींची भावूक प्रतिक्रिया

दिल्ली – देशातील कोटी-कोटी जनतेने या फकीरची झोळी भरली अशी प्रतिक्रिया पीएम नरेंद्र मोदींनी आपल्या विजयी भाषणात दिली. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून नोंदवण्यात आलेला मतदानाचा हा सर्वात मोठा आकडा होता. 42 अंश सेल्सिअसच्या उन्हात सुद्धा लोक मतदानासाठी बाहेर पडले. ही मतदारांमध्ये झालेली जागरुकता आहे. लोकशाहीमध्ये विश्वास वाढवणारी व्यवस्था पुरवणे आणि अतिशय यशस्वीरित्या निवडणूक प्रक्रिया पार पाडल्याबद्दल निवडणूक आयोगासह यासाठी कामावर लागलेल्या प्रत्येकाचे धन्यवाद असे मोदींनी म्हटले आहे.

महाभारताचे दिले उदाहरण

मोदींनी आपल्या विजयाचे वर्णन करताना महाभारतातील एका प्रसंगाचे उदाहरण दिले. महाभारतात कृष्णला विचारण्यात आले होते की तुम्ही कोणत्या पक्षात आहात. त्यावेळी भगवान श्री कृष्ण म्हणाले होते की मी हस्तिनापूरच्या पक्षात आहे. त्याचप्रमाणे देशातील जनतेने कुठल्याही पक्षाच्या समर्थनात नव्हे, तर या देशाच्या समर्थनात आम्हाला मतदान केले. असे मोदींनी सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला विजय हे आमच्या सरकारने गेल्या 5 वर्षांपासून केलेल्या कामांची पावती आहे असे भाजप अध्यक्ष अमित शहा म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत असून यात भाजप आणि एनडीए जवळपास 300 जागा मिळवण्याकडे कूच करताना दिसून येत आहे. भाजपला सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळवून देणारे पीएम नरेंद्र मोदींनी दिल्लीत सभेचे आयोजन केले. या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा देखील उपस्थित झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाजपला सर्वात मोठा विजय पीएम मोदींनी मिळवून दिला. याबद्दल मोदींसह समस्त भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार असे शहा यांनी म्हटले आहे.

जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांनी पंतप्रधान मोदी यांचे केले अभिनंदन

जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करुन 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकींमध्ये त्यांच्या पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. शुभेच्छांबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान ॲबे यांचे आभार मानले.

दूरध्वनीवरील संवादात दोन्ही नेत्यांनी गेल्या पाच वर्षात झालेल्या द्विपक्षीय संबंधातील प्रगतीचा उल्लेख केला आणि शांती, प्रगती आणि समृद्धीबाबत असलेला समान दृष्टिकोन साध्य करण्यासाठी भारत-जपान विशेष धोरणात्मक भागीदारी आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठीच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.पुढल्या महिन्यात ओसाका इथे होणाऱ्या जी-20 देशांच्या परिषदेत होणाऱ्या भेटीसाठी दोन्ही पंतप्रधान उत्सुक आहेत.

यावर्षाच्या उत्तरार्धात होणाऱ्या भारत-जपान वार्षिक परिषदेसाठी भारतात येणाचे आमंत्रणही पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान ॲबे यांना दिले आहे.

जगनमोहन रेड्डींना दिल्या शुभेच्छा
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसचे नेते जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाने विजय मिळवला. त्याबद्दल भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे, जगनमोहन रेड्डींचा पक्ष वायएसआर काँग्रेस 147 ठिकाणी आघाडीवर आहे. 2014 मध्ये चंद्रबाबू नायडूंची तेलुगू देसम पार्टीला बहुमत मिळाले होते. राज्यात बहुमतासाठी 175 पैकी 88 जागेंची गरज आहे.

महायुतीचा महाविजय….

पुणे,ता.२३ / विकास वाळुंजकर

“ फिर एक बार मोदी सरकार ” मुद्दा उचलून धरुन तमाम पुणेकर मतदारांनी महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या गळ्यात गुरुवारी प्रचंड मताधिक्याने खासदारकीच्या विजयाची माळ घातली. बापट यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार नसल्याने एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत बापट यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी इंदिरा काँग्रेसचे मोहन जोशी यांचा विक्रमी मतांच्या फरकांनी पराभव केला. निवडणुक निर्णय अधिकारी नवल किशोर राम यांनी कोरेगाव पार्क येथील मतमोजणी केन्द्राच्या आवारात आज दुपारनंतर उशीराने निकाल जाहीर केला. त्यावेळी बापट यांच्या चाहत्यांसह भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय ( आठवले ), रासप, शिवसंग्राम व लोक जनशक्ती पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून पक्षाचे झेंडे फडकावीत शहरात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. जंगली महाराज रस्त्यावरील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात तसेच कसबा गणपतीसमोरील बापट यांच्या कार्यालयात या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोशपूर्ण वातावरणात विजयोत्सव साजरा केला. पुण्याची ताकद गिरीश बापट, हर हर मोदी घरघर मोदी अशा घोषणा देत बापट यांच्या चाहत्यांनी संपूर्ण परिसर दणाणून टाकला. बापट यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यासाठी तसेच त्यांना खासदारकीच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजपा कार्यालयात हितचिंतकांची दिवसभर रीघ लागली होती. बापट यांच्या हजारो अनुयायांनी त्यांच्या या लाडक्या नेत्याला खांद्यावर घेऊन विजयाच्या घोषणा दिल्या.

या विजयामुळे गिरीश बापट यांना पुण्यनगरीचे तेरावे खासदार होण्याचा मान मिळाला आहे. यापूर्वी हा मान इंदिरा मायदेव, काकासाहेब गाडगीळ, नानासाहेब गोरे, एस एम जोशी, शंकरराव मोरे, मोहन धारिया, बँ. विठ्ठलराव गाडगीळ, सुरेश कलमाडी, अण्णा जोशी, विठ्ठ्ल तुपे, प्रदीप रावत व अनिल शिरोळे यांना मिळाला होता. बापट हे पुणेकरांनी निवडून दिलेलेल भारतीय जनता पक्षाचे चौथे खासदार ठऱले आहेत. २३ एप्रिल २०१९ रोजी झालेल्या या निवडणुकीत दहा लाख चौतीस हजार पुणेकरांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांनी बापट यांना पसंती दिली. त्यामध्ये युवा व नवमतदारांचे प्रमाण लक्षणीय होते. बापट यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने अनिल जाधव यांना तर बहुजन समाज पार्टीने उत्तम शिंदे यांना उमेदवारी दिली होती. या दोन्ही पक्षाची या निवडणुकीत धुळधाण झाली. शहरातील शेकडो संघटना, ज्ञाती संस्था व स्वयंसेवी संस्थांनी बापट यांना समक्ष भेटून तसेच प्रचारात सक्रिय सहभागी होऊन पाठिंबा जाहीर केला होता. त्यामध्ये पुणे बार असोसिएशन, व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, दलित व अल्प संख्यांक संघटना, प्रवासी संघटना, मागासवर्गीय संघटना, कोळी महासंघ, कुंभार समाजोन्नती मंडळ, दिव्यांग संघ, अपंग बचत गट, वडार संघटना, नेपाळी कामगार सेना, संत नामदेव शिंपी समाज, धोबी परीट संघटना, लाँन्र्डी व्यावसायिक संघ, पान असोसिएशन अशांचा समावेश होता. बापट यांच्या विजयात त्यांचाही मोठा वाटा आहे. असे मानले जाते. पक्षांतर्गत गटबाजी आणि मोहन जोशी यांच्या विरोधातील नाराजी यामुळे काँग्रेसकडे मतदारांनी पाठ फिरविली. अशा भावना त्या पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. तर बापट यांचा शिस्तबद्ध नियोजित व प्रभावी प्रचार यापुढे काँग्रेसचे मोहन जोशी यांचा टिकाव लागला नाही. असा सूर राजकीय जाणकारांनी निकालानंतर लावला आहे. उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून काँग्रेसचा उमेदवार पराभवाच्या छायेत होता. त्यावर बापट यांच्या विजयामुळे शिक्कामोर्तब झाले. अशा प्रतिक्रियाही विरोधकांच्या वर्तुळात व्यक्त केल्या गेल्या. या निवडणुकीत मुख्यंमंत्री देवेन्द्र फडणवीस, केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुश गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, शहानवाज हुसेन, विजयाताई रहाटकर, डाँ. विनय सहस्त्रबुध्दे, माधव भांड़ारी, महादेव जानकर यासारखे नेते हिरीरीने उतरले होते. त्यांनी जाहीर सभातून महायुतीचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचविला. त्या तुलनेत विरोधकांकडे असे धडाडीचे नेते अभावानेच दिसले. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाचे राजकीय बलाबल या मुद्याचा विचार केल्यास या निवड़णुकीत काँग्रेस पक्ष पिछाडीवरच होता हे स्पष्ट होते. एक केन्द्रीय मंत्री, एक खासदार, सहा आमदार, महाराष्ट्राचे दोन मंत्री, चौसष्ठ नगरसेवक अशी ताकद गिरीश बापट यांच्या मागे उभी होती तर काँग्रेसचे मोहन जोशी यांच्या मागे विधान परिषदेचे दोन आमदार व नऊ नगरसेवक एवढी मर्यादित शक्ती होती. . इथेच ही लढाई एकांगी होणार हे स्पष्ट झाले होते. बापट यांच्या जमेच्या बाजूलाही खूप मुद्दे होते. पालकमंत्री म्हणून त्यांनी मेट्रो, पीएमआरडीए, रिंगरोड, विकास आराखडा, आंतरराष्ट्रीय विमानतळ, स्मार्टसिटी, आदी योजना पुणेकरांना मिळवून दिल्या. दांडगा जनसंपर्क, कार्यकर्त्यांचे नेटवर्क, घटक पक्षांशी चांगले संबंध, सतत उपलब्ध असणारा कार्यकर्ता अशी प्रतिमा या जमेच्या बाजू बापटांना मताधिक्य मिळवून गेल्या. पुणे लोकसभा मतदार संघात उज्वला गँस योजनेचा लाभ ९६०० महिलांना मिळाला. आयुष्मान भारत योजनेखाली सव्वा लाख कुटुंबांनी वैद्यकीय मदतीचा लाभ घेतला. मुद्रा योजनेतून त्र्याहत्तर हजार लोकांना रोजगार मिळाला. मातृवंदनेतून २५६४ स्त्रीया लाभार्थी झाल्या. व पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी म्हणून ९२ हजार पुणेकरांची नोंद झाली आहे. ही माहिती महायुतीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरात प्रचारात आणली. त्याचा फायदा बापट यांना झाला. मोहन जोशी हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते, पक्ष कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा भरपूर वावर. लोकसभा निवडणुकीचा यापूर्वीचा अनुभव. पुण्याच्या प्रश्नाची चांगली जाण. बहुजन मुस्लीम व दलित समाजाशी चांगला संपर्क हे जमा बाजूला असलेले मुद्दे मोहन जोशी यांना उपयोगी पडले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस या त्यांच्या मित्र पक्षाने त्यांना फारशी मदत केली नाही. हेही त्यांच्या अपयशाचे प्रमुख कारण मानले जाते. पक्षांतर्गत गटातटाला एकत्र करून प्रचाराला लावण्यात मोहन जोशी यांना यश मिळाले नाही. पक्षाची शहरातील झालेली पडझड. युवा आणि नव मतदारांशी संपर्क साधण्यात झालेली पीछेहाट हे मुद्दे जोशी यांच्या विरोधात गेले. त्यांना दारुण पराभव स्विकारावा लागला. आत्तापर्यंतच्या पुण्याच्या इतिहासातील हा सर्वात लांछनास्पद पराभव मानला जातो. या निवडणुकीत घसरलेली मतांची टक्केवारी हाही चर्चेचा विषय झाला होता. परंतु त्याचा महायुतीच्या मतांवर फारसा परिणाम झाला नाही. हे आज जाहीर झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. एकूणात विचार केला तर राज्यात ठिकठिकाणी कमी मतदान झाल्याचे समोर आले आहे. पुणे लोकसभा मतदार संघात मतदार याद्यांमधील त्रुटी, झोपडपट्यातील उदासीनता आणि कडक उन्हाळा ही तीन कारणे मतदानाची टक्केवारी घटण्यासाठी कारणीभूत ठरली असे म्हणता येईल. नरेन्द्र मोदी, अमित शहा, राहूल गांधी, प्रियांका गांधी असे राष्ट्रीय स्टार प्रचारक पुण्यात फिरकले नाहीत हेही एक कारण सांगितले जाते. ते खऱे असले तरी ४९.८४क टक्के इतके कमी मतदान हे महायुतीला त्रासदायक ठरू शकते असे भाकित माध्यमांनी केले होते. ते मात्र खऱे ठऱले नाही. प्रत्यक्षात तसे झाले नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे महायुतीच्या वाँर रुममधील तज्ञांनी या घटकाचा आधीच मागोवा घेतला होता. २०१४ च्या निवडणुकीत कँन्टोन्मेट, वडगाव शेरी व शिवाजीनगर मतदार संघात ज्या ठिकाणी पन्नास टक्यांपेक्षा कमी मतदान झाले होते अशा ४५५ केन्द्रांवर महायुतीने लक्ष केन्द्रीत केले होते. याच केन्द्रांवर काँग्रेस राष्ट्रवादी व मनसेला अधिक मते मिळाली होती. ही बाब लक्षात घेऊन महायुतीने या परिसरात व्यूहरचना केली होती. त्या परिसरातील मतदारांवर सर्वाधिक लक्ष केन्द्रीत करण्यात आले होते. त्याचा फायदा झाल्याने या केन्द्रांवर महायुतीला मताधिक्य मिळाल्याचे आज स्पष्ट झाले. पुणेकरांनी कंटाळा केला या आरोपातही फारसे तथ्य नसल्याने आजच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. टक्केवारीत मतदान घटल्याचे दिसत असले तरी संख्यात्मक विचार करता मागील निवडणुकीपेक्षा यावेळी तब्बल चाळीस हजारांनी अधिक मतदान झाल्याचे दिसत आहे. मागील निवडणुकीत नऊ लाख ९४ हजार ६२४ पुणेकरांनी मतदानाचा हक्क बजावला होता यावेळी त्यात भर पडली. दहा लाख चौतीस हजार मतदारांनी मतदानात भाग घेतला.

निवडणुक शांततेत पार पडली. हा सर्वात महत्वाचा मुद्दा पुण्याची राजकीय जाण दर्शविणारा ठरला. या कालावधीत आचारसंहिता भंगाच्या सुमारे साडेचारशे तक्रारी दाखल झाल्या. निवडणुक आयोगाने सी-व्हिजिल नावाचे अँप प्रथमच यावेळी सादर केले. मतदारांनीही त्याचा तक्रारी दाखल करण्यासाठी पुरेपूर वापर करून घेतला. हे या निवडणुकीचे वेगळे वैशिष्ठ्य ठरले. बापट यांच्यावर व्यक्तीगत पातळीवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न झाला. बापट यांनी त्याकडे दुर्लक्ष करून सबका साथ सबका विकास यावर भऱ दिला. बापट आणि जोशी यांच्या प्रचाराची तुलना करायची झाल्यास बापट यांच्या प्रचारात सुसंस्कृतपणा सभ्यता असल्याचे जाणवत होते तर जोशी यांच्या प्रचारात भ्रष्टाचार हा मुद्दा प्रचारात आणून व्यक्तीगत शिंतोडे उडविण्याची स्पर्धा असल्याचे जाणवत होते. जोशी यांच्या आरोपात नवीन काहीच नव्हते. त्यामुळे त्यांचा प्रचार हा पराभूत मानसिकता दाखवीत होता. असे राजकीय धुरीणांना पहिल्यापासूनच वाटत होते.

विकासाचा मुद्दा महायुतीने जितक्या जोरकसपणे प्रचारात आणला त्या तुलनेत काँग्रेसला तो पुढे आणता आला नाही. महायुतीने दोन जाहीरनामे मतदारांसमोर आणले. पहिल्या जाहीरनाम्यात शेतकरी कामगार वर्गाला महायुतीने भरभरून आश्वासने दिली. समान नागरी कायदा लागू करणार अशी घोषणा करून महायुतीने सर्व धर्मीयांना नवा संदेश दिला. एक लाख रुपयांचे कर्ज पहिल्या पाच वर्षांसाठी बिनव्याजी देऊ असा संदेश महायुतीने गरीबांपर्यंत पोहोचविला. दहशतवादाबाबत झिरो टाँलरन्सची भूमिका महायुतीने जाहीर केली. राम मंदिराचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडविण्याचा इरादा जाहीर केला. छोट्या व्यापा-यांसाठी पेन्शन योजना, शेतक-यांसाठी दरवर्षी सहा हजार रुपये सन्मान योजना, तिहेरी तलाक विरोधात कठोर कायदा, पाण्याच्या प्रश्नासाठी स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय, शेतीमध्ये तब्बल पंचवीस लाख कोटी रुपयांची गुंतवणुक, सिंचन क्षमतेत वाढ, मोठ्या शहरातून शेतक-यांसाठी बाजारपेठा, नल से जल योजना अशा मूलभूत समस्यांना हात घालून महायुतीने पुणेकर मतदारांसमोर विकासाचा अजेंडा मांडला. दुस-या जाहीरनाम्यात महायुतीने पुण्यातील नागरी प्रश्नांना प्राधान्य देत विकासाचा मुद्दा कँश केला. काँग्रेसला मात्र त्यांचा अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचविता आला नाही. हे बापट यांच्या विजयाचे आणखी एक रहस्य मानले जाते. काँग्रेसने पुण्यातील पाणीकपात हा मुद्दा कँश करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्यक्षात पाणीकपात झालीच नाही. पाटबंधारे खात्यानेही त्याबाबत सतत अपडेटस जाहीर केले. गिरीश बापट यांनी या प्रश्नाचे कुणी राजकारण करू नये असे आवाहन करून पाण्याच्या नव्या प्रकल्पाची माहिती वेळोवेळी जाहीर केली. चोवीस बाय सात आणि भामा आसखेडचे पाणी या दोन योजना महायुतीने पुणेकरांपर्यंत पोहोचविल्या. त्यामुळे विरोधकांना या निवडणुकीत फारसे मुद्देच हाती लागले नाहीत. असे स्पष्ट होत गेले. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे फार मोठा इतिहास असलेल्या काँग्रेस पक्षाला लागलेली घरघर या निवडणुकीत अधिकच खोलवर गेल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या त्रेसष्ट वर्षाचा इतिहास पाहाता तब्बल एकोणचाळीस वर्षे पुण्यात काँग्रेसचा खासदार होता. चौदा वर्षे इतर पक्षाच्या खासदाराला पुणेकरांनी संधी दिली. १९९१ मध्ये पहिल्यांदा पुण्यात कमळ फुलले. त्यानंतर १९९९ मध्ये प्रदीप रावत १२.४८ टक्के मताधिक्याने निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत अनिल शिरोळे यांनी पुण्यात भाजपाचा झेंडा फडकाविला. त्यानंतर बापट यांच्या आजच्या विजयाने पुणे हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला झाला आहे. या मुद्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पुण्यावरची काँग्रेसची पकड ढिली तर झालीच परंतु हा मतदार संघ त्यांच्या हातून कायमचा गेला की काय या चर्चेला या निमित्ताने सुरुवात झाली.

गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास १९७५ आणीबाणीपासून सुरु झाला असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. आणीबाणीत कारावास संपवून बापट पुण्यात आले. त्यानंतर त्यांनी शनिवार वाड्यावरील जाहीर सभेत अतिशय प्रभावी भाषण केले. दिल्लीत जाऊन मी पुणेकरांचे प्रश्न हिरीरीने मांडेन असे. या सभेत त्यांनी जाहीर केले होते. सुमारे त्रेचाळीस वर्षांपूर्वीचे त्यांचे ते भाषण पुणेकरांच्या आजही स्मरणात आहे. साडेतीन तपांची तपश्चर्या केल्यावर या सभेतील बापट यांचे शब्द आज खरे झाले आहेत. ते आता खासदार झाले आहेत. त्यांचे खास अभिनंदन आणि त्यांच्या भावी वाटचालीस पुणेकरांतर्फे शुभेच्छा.

महाराष्ट्रातील दोन माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव,प्रकाश आंबेडकर दोन्ही मतदारसंघातून पराभूत

पुणे- महाराष्ट्रातील दोन माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव झाला आहे. अशोक चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून, सुशीलकुमार शिंदे सोलापूरातून रिंगणात होते.

नांदेडमधून अशोक चव्हाणांचा पराभव
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवलेले अशोक चव्हाण यांचा भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पराभव केला. तर सोलापूरमधून काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा भाजपचे जयसिद्धेश्वर महाराज यांनी पराभव केला आहे. सोलापूरमध्ये काँग्रेस आणि भाजपसोबतच वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर रिंगणात होते. पण, जयसिद्धेश्वर महाराज यांनी बाजी मारली आहे.

वंचित बहुजन आघाडीने सोलापुरमध्ये चांगली मते मिळवली, त्यामुळे सुशीलकुमार शिंदेंना वंचित बहुजन आघाडीचा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोला या दोन्ही मतदारसंघातून पराभूत झाले आहेत.

पवारांना झटका देत सुजय विखे खासदार

लोकसभा निवडणुकीच्या नगर दक्षिण लोकसभामतदारसंघात कमळ फुलले आहे. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या नगरमध्ये डॉ. सुजय विखे पाटील यांनी ऐतिहासिक विजय मिळवून पवार कुटुबियांना झटका दिला. त्यांनी सव्वा दोन लाख मतांची आघाडी घेऊन विजयाची औपचारिकता बाकी ठेवली आहे.

नगरची जागा काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादीने स्पष्ट नकार दिल्यानंतर राज्यात नगर चर्चेत आले. त्यानंतर काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा नाराज झाले. त्यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी बंडखोरी भाजपमध्ये प्रवेश घेऊन उमेदवारी मिळवली. राष्ट्रवादीकडून कडवा विरोध होऊनही त्यांनी विजयश्री खेचून आणली

हातकणंगले: शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने जवळपास लाखाच्या घरात विजयी आघाडी घेत राजू शेट्टींना शिवारात पाठवले आहे. सांगलीतून स्वाभिमानीला पराभव स्वीकारावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह दारुण पराभवाला समोर जावे लागले आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांना भविष्यात राजकारण नव्याने विचार करावा लागणार आहे. हातकणंगलेमधून धैर्यशील माने ८७ हजार मताधिक्यांनी विजयासमीप पोहोचले आहेत.

 

राष्ट्रीय निकाल ( एकूण जागा – ५४३ )

 


पक्ष आघाडी विजयी एकूण
भाजप + 331 14 345
काँग्रेस + 106 1 107
तृणमूल काँग्रेस 25 0 25
बसप 11 0 11
समाजवादी पक्ष 6 0 6
तेलंगणा राष्ट्र समिती 9 0 9
बिजू जनता दल 13 0 13
तेलगु देसम पक्ष 3 0 3
इतर 9 0 9

 

 

 

महाराष्ट्राचा निकाल ( एकूण जागा – ४८ )

 


पक्ष आघाडी विजयी एकूण
भाजप 23 0 23
शिवसेना 18 0 18
काँग्रेस 1 0 1
राष्ट्रवादी काँग्रेस 5 0 5
वंचित बहुजन आघाडी 1 0 1
स्वाभिमानी शेतकरी संघटना 0 0 0
बहुजन विकास आघाडी 0 0 0
युवा स्वाभिमान पक्ष 0 0 0
इतर 0 0 0

 

एनडीए तपशील

 

पक्ष आघाडी विजयी एकूण
भाजप 288 14 302
शिवसेना 18 0 18
एआयएडीएमके 2 0 2
अकाली दल 2 0 2
जनतादल, संयुक्त 15 0 15
पीएमके 1 0 1
आसाम गण परिषद 1 0 1
लोकजनशक्ती पक्ष 6 0 6
इतर 6 0 6

 

मोदींच्या सुनामीत कॉंग्रेस राष्ट्रवादीची वाताहत – खा. संजय काकडे

हा तर, मोदी व फडणवीसांच्या नेतृत्वाचा व कर्तृत्वाचा विजय-खासदार संजय काकडे यांची प्रतिक्रिया

पुणे- देशात व महाराष्ट्रात भाजपा व राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेले यश हे सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व व कर्तृत्वाचा विजय आहे. मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल व पारदर्शक कारभाराबद्दल जनतेला विश्वास वाटल्यानेच लोकसभा निवडणुकीत देशभरातील जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भरभरून मतदान केले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज दिली.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीसाठी मजबूत पक्ष बांधणी केली. अनेक मातब्बर नेते भाजपामध्ये येण्यात फडणवीसांची भूमिका महत्वाची राहिली. याबरोबरच शिवसेनेबरोबरचे संबंध सुधारण्याबरोबरच ते अधिक मजबूत होण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. पंतप्रधान मोदी यांची लाट नव्हे तर, त्सुनामीच या निवडणुकीत पाहायला मिळाली. महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण संपुष्टात आले आहे. जनतेला या दोन्ही पक्षांविषयी आपलेपणा व विश्वास राहिला नाही, असेही खासदार काकडे म्हणाले.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र दिसेल आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातही भाजपा-शिवसेना मित्र पक्ष महायुतीचं सरकार स्पष्ट बहुमतात येईल.

*राजे, महाराज आणि राणीचा विजय!*
महाराष्ट्रात काँग्रेसची परिस्थिती तर, वाईट झाली परंतु, राष्ट्रवादीची स्थितीही पक्ष म्हणून गंभीर झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून कोणीच विजयी झाले नाही तर, साताऱ्यात उदयनराजे हे राजे, शिरुरमध्ये संभाजी महाराजांची भूमिका करीत असलेले डॉ. अमोल कोल्हे हे महाराज, बारामतीतून सुप्रिया सुळे या राजकीय संस्थानिक असलेल्या राणी आणि रायगडमधून सुनील तटकरे विजयी झाले आहेत.

*व्हिडिओ आता पवार व ठाकरेंनीच पाहवा*
‘लाव रे तो व्हिडिओ’ हा राज ठाकरेंचा डायलॉग या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रचंड प्रमाणात फेमस झाला होता. याविषयी बोलताना खासदार संजय काकडे म्हणाले की, राज ठाकरे यांनी तो व्हिडिओ आता घरातच लावावा व तो शरद पवारांना पाठवावा. त्यांनी असेच व्हिडिओ लावावेत. मात्र, जनता त्यांच्या खोट्या प्रचाराला भुलणार नाही.

पवारांच्या जातीयवादी राजकारणाला उत्तर – गिरीश बापट (व्हिडीओ)

पुणे- पुण्यातील आणि महाराष्ट्रातील भाजपचा विजय म्हणजे शरद पवारांच्या जातीयवादी राजकारणाला पुणेकरांनी, जनतेने दिलेले उत्तर आहे , मी कारभारी म्हणून डोक्यात हवा नसेल ,माझे सर्व कार्यकर्ते कारभारी असतील, आता दुसऱ्यांदा राज्यकारभाराची संधी मिळाल्याने पुण्याची स्वप्ने साकार करण्याची संधी मिळाली आहे जी आमच्यावर जबाबदारी आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे गिरीश बापट यांनी लोकसभा मतमोजणी च्या दरम्यान विजयी वाटचाल सुरु असताना ‘मायमराठी ‘ शी बोलताना दिली .
भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी हि यावेळी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले कि, कार्यकर्ता आणि पक्षाने गेल्या ५ वर्षात केलेल्या कामाची पावती आहे. बापट यांना शुभेछ्या देवून आपण पुणेकरांचे आणि तमाम देशभरातील नागरिकांचे आभार मानतो . 
यावेळी भाजपच्या कार्यालयासमोर भगवा गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

काँग्रेसला सर्वात मोठा झटका, अशोक चव्हाण 50 हजार मतांनी पराभूत

मुंबई – देशभरात 7 टप्प्यांमध्ये झालेल्या 17 व्या लोकसभेच्या मतदानाची मोजणी सुरू आहे. यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 48 पैकी 23 जागा जिंकल्या होत्या. तसेच शिवसेना 18 जागांसह राज्यातील दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर काँग्रेसला फक्त 2 आणि राष्ट्रवादीला 4 जागांवर समाधान मानावे लागले होते. यंदाचे प्राथमिक आघाड्या पाहता परिस्थिती काहीशी बदलणार असे चित्र दिसून येत आहे.

Maharashtra Live

– नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचा 50 हजार मतांनी पराभव, भाजपचे चिखलीकर विजयी

– नांदेडमध्ये काँग्रेसला वंचित आघाडीचा फटका, काँग्रेस पराभूत

– औरंगाबादः इम्तियाज जलील यांची 20,490 मताधिक्याने आघाडी

– अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव

– शिरुरमध्ये अमोल कोल्हेंचा विजय, शिवसेनेचा मोठ्या फरकाने पराभव

– औरंगाबादेत इम्तियाज जलील यांची आघाडी कायम, खैरे दुसऱ्या क्रमांकावर; जलील यांना 182747 तर खैरेंना 151150 मते

– जालन्यातून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विजयाच्या दिशेने

– पवार घराण्याची तिसरी पिढी पराभूत, पार्थ पवार यांचा मावळ येथून पराभव

– बारामती येथून सुप्रिया सुळे विजयी घोषित, भाजपच्या कांचन कुल यांचा 1.5 लाखांहून अधिक मतांनी पराभव

– हिंगोलीः शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील 68 हजार मतांनी पुढे, काँग्रेसचे सुभाष वानखेडे दुसऱ्या क्रमांकावर

– बारामतीः 16 व्या फेरीनंतर सुप्रिया सुळे लाख मतांनी आघाडीवर, सुळेंना 4,88,193 तर कांचन कुल यांना 3,80,785 मते

– जालनाः भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सातव्या फेरीअखेर 1 लाख 7 हजार मतांनी आघाडीवर

– नंदुरबारः भाजपच्या डॉ. हिना गावित यांची 79 हजार मताधिक्याने आघाडी

– हिंगोलीत शिवसेनेची आघाडी; सुभाष वानखेडे- 47220, हेमंत पाटील- 118371 तर मोहन राठोड यांना 35459 मते

– मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेली गोव्यातील पणजी सीटवरून काँग्रेस उमेदवार अतानासियो मोन्सेरात 1775 मतांनी विजयी

– औरंगाबादः खैरे दुसऱ्या क्रमांकावर; इम्तियाज जलील यांना 151290, खैरेंना 118373 तर जाधव यांना 111803 मते

– जालनाः रावसाहेब दानवेंची आघाडी; दानवे 122588, तर औताडेंना 53292 मते

– उस्मानाबादः सातव्या फेरीअखेर शिवसेनेचे उमेदवार ओमराजे 38 हजार 158 मतांनी आघाडीवर
– हिंगोलीः शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील 41 हजार मतांनी आघाडीवर

– औरंगाबादः सहाव्या फेरीअखेर चंद्रकांत खैरे- 80981, इम्तियाज जलील- 96759, हर्षवर्धन जाधव- 85344; जलील यांची 11415 मतांची आघाडी

– मावळः राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार 1.5 लाख मतांनी पिछाडीवर

– अकोला: सहाव्या फेरी अखेर भाजप- 102285, वंचित-61412 आणि काँग्रेस- 45770

– धुळे सहावी फेरी भाजपचे डॉ. सुभाष भामरे 95927 मतांनी आघाडीवर…

– माढाः चौथ्या फेरीअखेर रणजित निंबाळकर-109213, संजय शिंदे- 105878, विजय मोरे- 10760
– लातूरः सुधाकर शृंगारे (भाजप)- 71818; मच्छिंद्र कामत (काँग्रेस)- 31252; राम गारकर (वंचित आघाडी)- 11765

– औरंगाबादः चौथ्या फेरीच्या मतमोजणीनंतर खैरे मतमोजणीवर केंद्रावर

– औरंगाबादः हर्षवर्धन जाधव- 53,855; इम्तियाज जलील- 50,656 तर खैरेंना 46,344 मते

– जालनाः दुसऱ्या फेरी अखेर रावसाहेब दानवे यांना 38 हजार मतांची आघाडी

– बारामतीत सुप्रिया सुळे यांची 29913 मतांनी आघाडी, नवव्या फेरीनंतर 1,96,430 मते

– मावळः पार्थ पवार- 145140, श्रीरंग बारणे- 202363, बारणे आघाडी – 60223

– शिरूरः अमोल कोल्हे- 1,15,881; आढळराव पाटील- 98751
– पुणेः गिरीश बापट- 30,682, मोहन जोशी- 14,456; बापट 16,226 मतांनी पुढे

– बारामतीत कांचन कुल यांना 14,5502 तर सुप्रिया सुळेंना 15, 9962 मते; सुळेंची 14460 मतांनी आघाडी

– बारामतीत सुप्रिया सुळे 25 हजार मतांनी आघाडीवर
– शिरुरमध्ये राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे 20 हजार मतांनी पुढे

– अमरावतीमध्ये तिसऱ्या फेरीनंतर आनंदराव अडसूड यांना 67340 आणि नवनीत कौर राणा यांना 63109 मते, गुणवंत देवपारेंना फक्त 9341 मते

– चंद्रपूर: भाजपचे हंसराज अहिर यांना 16225 मते, तर बाळू धानोरकर यांना 16176 मते
– रावेरमध्ये पहिल्या फेरीत रक्षा खडसे यांची 14 हजार मतांनी आघाडी

– अमरावती तिसरी फेरी- आनंदराव अडसूळ- 67,340; नवनीत कौर राणा- 63,108

– उस्मानाबादमध्ये तिसऱ्या फेरीनंतर शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर 14 हजार मतांनी आघाडीवर

– औरंगाबादेत दुसऱ्या फेरीनंतर खैरे: 23565, झांम्बड: 6404, जलील: 36152, जाधव: 27915, जलील यांची 8237 मतांनी आघाडी

– गिरीश बापट 27330, मोहन जोशी 11601, गिरीश बापट यांची 15729 मतांनी आघाडी

– 8237 मतांनी इम्तियाज जलील दुसऱ्या फेरीत आघाडीवर

– नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण 9 हजार मतांनी मागे

– धुळे येथून सुभाष भामरे यांची आघाडी

– अकोल्यात प्रकाश आंबेडकर आघाडीवर… औरंगाबादेतून इम्तियाज जलील यांची अजुनही आघाडी

– रावेरमधून रक्षा खडसे यांची आघाडी, सांगलीतून विशाल पाटील पिछाडीवर

– उस्मानाबादेत ओमराजे निंबाळकर आघाडीवर

– परभणीत सेनेचे संजय जाधव यांची आघाडी

– सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदे पुन्हा आघाडीवर

– बारामतीत पुन्हा सुप्रिया सुळे यांची आघाडी, 4 हजार मतांनी पुढे

– बारामतीत कांचन कुल यांची 5 हजार मतांनी आघाडी

– पुण्यातून गिरीश बापट यांची आघाडी, नाशिकमधून गोडसे पिछाडीवर

– बीडमधून भाजपच्या प्रीतम मुंडे आघाडीवर, सांगलीतून विशाल पाटील यांची आघाडी

– इम्तियाज जलील 18 हजार मतांसह पहिल्या, तर हर्षवर्धन जाधव दुसऱ्या क्रमांकावर

– शिवसेनेचे चंद्रकांत खैरे चक्क तिसऱ्या क्रमांकावर घसरले

– दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा पिछाडीवर

– सुप्रिया सुळे 8 मतांनी मागे तर पार्थ पवार 9 हजार मतांनी पिछाडीवर

– नागपूर येथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आघाडीवर

– जालन्यातून रावसाहेब दानवे आणि परभणीतून शिवसेनेची आघाडी

– शिरुर येथून अमोल कोल्हे यांची 7 हजार मतांची आघाडी

– सोलापुरात भाजपची आघाडी, काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे मागे

– बारामती येथून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे मागे

– पुण्यात काँग्रेसच्या आक्षेपानंतर एका मतमोजणी केंद्रावर काउंटिंग थांबवली

– काँग्रेसचा बालेकिल्ला नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण पिछाडीवर
– औरंगाबादेत शिवसेनेला झटका, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे इमतियाज जलील पुढे

मोदींनी केली इंदिरांची बरोबरी, दोनदा लोकसभा जिंकणारा भाजप पहिलाच बिगर काँग्रेसी पक्ष

नवी दिल्ली – 17 व्या लोकसभा निवडणुकीत मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. यात सर्वप्रथम टपाल मतांची मोजणी करण्यात आली. 11 एप्रिल ते 19 मे पर्यंत 7 टप्प्यांमध्ये या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. देशभर सरासरी 67.11% मतदानाची नोंद झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात मतदानाचा हा सर्वात मोठा आकडा आहे. विशेष म्हणजे, 10 पैकी 9 एक्झिट पोलमध्ये भाजप आणि एडीएला स्पष्ट बहुमताचे भाकित वर्तवण्यात आले होते. प्राथमिक निकाल समोर आले त्यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे.

मोदींनी केली इंदिरा गांधींची बरोबरी
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तीन वेळा तर इंदिरा गांधी यांनी दोन वेळा काँग्रेसला बहुमत मिळवून सत्ता स्थापित केली होती. नेहरुंनी 1952, 1957 आणि 1962 ची निवडणूक जिंकली होती. तर इंदिरा गांधींनी 1967 आणि 1971 मध्ये बहुमत मिळवले होते. सलग दोनवेळा जिंकून नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधींची बरोबरी केली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मोदींच्या नेतृत्वात 282 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजप 300 चा आकडा पार करेल असे अंदाज आहेत.

Live Updates

– भाजप मुख्यालयात पोहोचले पक्ष प्रमुख अमित शहा, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

– गांधीनगर येथून अमित शहा 5 लाख 11 हजार मताधिक्याने पुढे
– यूपीत कन्नौज येथून डिंपल यादव 14,943 मतांनी पिछाडीवर

– तिरुवनंतपुरम येथून काँग्रेस उमेदवार शशि थरूर 13 हजार मतांनी पुढे

– वाराणसीत मोदी 1,44,860 मतांनी, अमेठीत स्मृती इराणी 7 हजार मतांनी आघाडीवर

– महाराष्ट्रात युती 37 जागांवर, हरियाणात सर्व 10 ठिकाणी भाजप आघाडीवर

– अमित शाह गुजरातच्या गांधीनगर सीटवरून 1 लाख 25 हजार मतांनी पुढे

– पाटणा हुजूर साहिब येथून रवीशंकर प्रसाद आणि गुरुदासपूर येथून सनी देओल आघाडीवर

– रायबरेलीतून यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आघाडीवर

– भोपाळमध्ये भाजपच्या प्रज्ञा सिंह ठाकूर 30 हजार मतांनी आघाडीवर

– अमेठीतून स्मृती इराणी 2000 मतांनी पुढे

– दिल्लीतील सर्व 7 जागांवर भाजप आघाडीवर, वाराणसीत आताच भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

– श्रीनगर येथून फारूक अब्दुल्ला आणि पंजाबच्या उधमपूर येथून केंद्रीय मंत्री जितेंद्र प्रसाद पुढे

– पाटणा हुजूर साहेबमध्ये काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा पुढे, रवीशंकर प्रसाद पिछाडीवर

– संगरूर येथून आपचे उमेदवार भगवंत मान आघाडीवर

– तिरुवनंतपुरममध्ये माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर मागे

– बेगुसराय येथून भाजपचे गिरीराज सिंह यांची आघाडी

– रायबरेलीतून यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी मागे, अमेठीत राहुल गांधी देखील पिछाडीवर

– दिल्लीतील 7 जागांपैकी 6 जागांवर भाजपची आघाडी, एका ठिकाणी काँग्रेस पुढे

– गुरुदासपूर येथून भाजप उमेदवार सनी देओल पिछाडीवर

– भोपाळमध्ये काँग्रेसचे दिग्विजय सिंह 10 हजार मतांनी पिछाडीवर

– वाराणसीतून नरेंद्र मोदी 11 हजार मतांनी आघाडीवर, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर

– एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी हैदराबाद येथून पुढे

– राहुल गांधींचा गड अमेठीतून स्मृती इराणी यांची आघाडी

– वायनाड येथून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आघाडीवर
– गांधीनगर येथून भाजप अध्यक्ष अमित शहांची 25 हजार मतांची आघाडी
– वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर

सुफी संगीत व भीमगीतांचा जलसा सादर करीत विनया-विजया जोडीची रसिकांवर मोहिनी

जाधव सिस्टर्सच्या गायनाने महोत्सवाची सांगता
पुणे : सुफी भीमगीतांसाठी प्रसिद्ध असलेल्या जाधव सिस्टर्सच्या बहारदार गायनाने सांस्कृतिक महोत्सवाची सांगता झाली. मिलिंद जाधव यांची सुफियान चालींची रचना आणि जाधव सिस्टर्सची प्रभावी गायनशैली यामुळे रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या दमदार गाण्याला लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विनया व विजया जाधव या सिस्टर्सचा हा सुफी जलवा पुणेकरांना मोहित करून गेला.
निमित्त होते, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे. या महोत्सवाची सांगता जाधव सिस्टर्सच्या सुफी अंदाजातील भीमगीतांच्या कार्यक्रमाने झाली. सांस्कृतिक महोत्सव समितीचे प्रमुख परशुराम वाडेकर यांच्या पुढाकारातुन झालेल्या या कार्यक्रमावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआयचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, नगरसेविका सुनीता वाडेकर, नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, निवेदक दीपक म्हस्के यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
‘हे बुद्ध मा करुणा करा, स्विकार करा हे अभिवादना” या वंदन गीताने गायनास सुरवात झाली. ‘माऊली दीनांची तू, दलितांची आई तू’, ‘फुलों की सरगम में छेडू में भीम का नाम’, ‘नव्या युगाची आणि संघर्षाची ही कहाणी ‘, ‘जीवनाचा असा दिन यावा, भीमासाठी म्हणे जीव जावा’, ‘जलवा है, जलवा है, भीमजी का जलवा है’ अशी एक से बढकर गाणी विनया-विजया यांच्या जोडीने जुगलबंदीतून सादर केली. सुफी संगीतात भीमगीते ऐकण्याची पर्वणी पुणेकरांना मिळाली. सूत्रसंचालन परशुराम वाडेकर, दीपक म्हस्के यांनी केले. कोरस मिलिंद जाधव, तुषार गायकवाड, ऑरगनवर देवदत्त मेकाले, गिटारवर अभिजित अंबाडे, तबलावर वैभव जाधव, प्रशांत राठोड, ढोलकवर बॉबी कनोजिया ऑक्टोपॅडवर सोहेल कुरेशी यांनी साथसंगत केली.
———–
लतादीदींनी भीमगीत गावे : वाडेकर
गेली कित्येक वर्ष आम्ही धम्मपहाटचा कार्यक्रम घेत आहोत.अनेक बडे गायक या मंचावर आले आणि शाहू, फुले  आंबेडकर यांना अभिवादन केले. भारताची गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी एक तरी भीमगीत गायला हवे, अशी तमाम भारतीयांची इच्छा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान बहाल केले. त्यांना मानवंदना म्हणून लतादीदींनी आमची ही विनंती स्वीकारून त्यांच्या मंजुळ आवाजात भीमगीत सादर करावे, अशी भावना महोत्सव समितीचे प्रमुख परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केली.

अनावश्यक खाण्याने वजन वाढीचा धोका : डॉ. जगन्नाथ दीक्षित

पुणे-

आवश्यकतेपेक्षा जास्त खाणे व शारीरिक श्रमाची कमतरता यामुळे शरीराचे वजन वाढते. अशा स्थितीत कमी आहार, वजन नियंत्रण औषधे वा चरबी काढण्याच्या शस्त्रक्रिया करूनही वजन कमी होत नाही. मात्र दिवसातून दोनदाच जेवणाचा नियम करून कमीतकमी ३ महिने यात सातत्य ठेवणे तसेच गोड कमी खाणे किंवा पूर्ण टाळणे आहारातील प्रथिने वाढवणे तसेच हवे ते पदार्थ खाऊन वजन नियंत्रित ठेवता येते. असे प्रतिपादन सुप्रसिध्द आहार तज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यानी केले. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक सुशिल मेंगडे यांनी केले.

कोथरूड येथील शिक्षकनगर मैदानवर श्री संकल्प सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध या विषयावर डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे आरोग्यदायी व्याख्यान झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रविण दबडघावकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे प्र-कुलगुरू एन. एस. उमारणी, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, शहर महिला आधाडीच्या अध्यक्षाशशिकला मेंगडे, नगरसवेक राजाभाऊ बराटे, किरण दगडे पाटील, दिलीप वेडेपाटील, जयंत भावे, दिपक पोटे नगरसेविका छाया मारणे हर्षाली माथवड, वासंती जाधव, मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्त्रबुध्दे, श्रध्दा प्रभुणे, अल्पना वरपे आदी मान्यवर उपस्थित होते. आजघ्या काळात ९९ टक्के लोकांनी लठ्ठपणा स्वत: कमवलेला असतो. चहा, नाष्टा ,जेवण , सतत खाणे यामुळे आपल्या शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त इंश्युलीन तयार होते, ज्या वेळेस आपण काही खातो, त्यावेळी इंन्शुलीन तयार होते. गरजेपेक्षा जास्त इंन्शुलीनमुळे मेद अर्थात चरबी वाढते. कमी इंन्शुलीन तयार झाले तर शरीरातील चरबी कमी होईल, असे सांगून डॉ. दीक्षित म्हणाले.दिवसातुन दोन वेळा जेवण करणे फायद्याचे आहे. मधल्या वेळात काहीही खाऊ नका. गरज वाटल्यास घरातील ताक अथवा पाणी प्या. त्याचबरोबर आठवड्यातले पाच दिवस ४५ मिनिटे भराभर चालणे अधिक चांगले ठरते, असा सल्ला त्यांनी दिला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी तर आभारप्रदर्शन उदय कड यांनी केले.

गुलाल आम्हीच उधळणार -भाजप नगरसेवकांची मिरवणुकीची तयारी …

पुणे-मतमोजणी होईल कोणाला किती मते मिळाली ,कोण जिंकले ,कोण हारले ..हे सारे उद्या अधिकृत रित्या जाहीर होईल ..पण भाजपच्या नगरसेवकांना निकाल अगोदरच ठाऊक झालेला आहे .. अर्थात हा निकाल म्हणजे काही विद्यापीठाची प्रश्नपत्रिका फुटण्याचा पराक्र म्हणता येणार नाही . पण साधारणतः प्रश्नपत्रिकेत येणारे 100 टक्के प्रश्न माहिती नसले तरी बहुतांशी प्रश्न अंदाजित असतातच .याच अनुषंगाने ..गुलाल तर आम्हीच उधळणार .. अशी मस्त भूमिका घेवून भाजपचे उत्साही कार्यकर्ते मैदानात वावरताना दिसताहेत .त्यातील कसब्यातून विधानसभेला इच्छुक असलेले हेमंत रासने यांचा उत्साह तर गगनी साद घालू लागला आहे. त्यांनी निवडणूक  निकाल दाखविणारा स्क्रीन आणि बापटांच्या विजयी मिरवणुकीची आणि छोटेखानी सभेची जणू तयारी केली आहे .पहा हि त्याबाबतची छायाचित्रे …..

मतमोजणी पूर्वीच बापट खासदार म्हणून झळकताहेत फ्लेक्स वर ..

पुणे-एकीकडे इव्हीएम वर संशय व्यक्त होत असताना ,आणि संशयाचे वातावरण असूनही इव्हिएम लादले जात असल्याचे दिसत असताना मतमोजणीपूर्वीच ‘गुड घ्या ला बाशिंग ‘बांधणे खरे तर योग्य नाही ,अशात मोजणी कर्मचार्यांमध्ये बापट अन्नधान्य मंत्री असल्याने त्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश नको अशी भूमिका कॉंग्रेसचे मोहन जोशी यांनी घेतली असताना दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्ताने २६ तारखेला होणाऱ्या एका कार्यक्रमाचे निमंत्रण देणाऱ्या फलकावर विशेष उपस्थिती म्हणून खासदार गिरीश बापट असा उल्लेख करण्यात आला आहे .विशेष म्हणजे अनिल शिरोळे यांच्या नावासमोर हि खा .अशी उपाधी लावलेली आहे .

आता मतमोजणीला काही तास शिल्लक राहिले आहेत. पुण्यात भाजपाकडून पालकमंत्री गिरीश बापट आणि आघाडीकडून मोहन जोशी यांच्यात लढत आहे. एकीकडे निकाल काय लागेल याची उत्सुकता असताना पुणे शहरात आधीच गिरीश बापट यांच्या नावे बॅनर झळकत असून त्यावर खासदार असा उल्लेख असल्याने शहरभर चर्चा सुरू झाली आहे.आम्हाला विजयाची खात्री असल्याने खासदार असा उल्लेख केल्याचा दावा भाजपचे नेते कार्यकर्ते करतील पण निवडणूक आयोग (अर्थात ते हि संशयाच्याच भोवऱ्यात आहे ) त्यावर कारवाई करेल काय ? केली तर कोणती कारवाई करू शकेल ? अशा मुद्द्यांवर नाहक चर्चा घडून येते आहे.एक्झिट पोल आणि असे प्रकार लोकांची मानसिकता तयार करण्याच्या कामाला जोरदार पाने लागल्याचेच यातून दिसते आहे .उद्या जर हे पोल खरे ठरले तर ते बढाया हि मारतील  यात शंका नाही.

देशभरात यंदा सात टप्प्यात निवडणूक पार पडली. तर या निवडणुकीदरम्यान भाजपा आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना पहावयास मिळाले. पुणे लोकसभा मतदारसंघातील लढाई भाजपा आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची केली असल्याने सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघातून भाजपाकडून पालकमंत्री गिरीश बापट आणि आघाडीकडून अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा झाल्यानंतर अखेर मोहन जोशी यांना संधी देण्यात आली होती.

या निवडणुकीच्या कालावधीत गिरीष बापट आणि मोहन जोशी यांनी आपणच मताधिक्याने निवडून येणार असे दावे केले. दरम्यान उद्या म्हणजेच गुरुवारी नेमकं कोण निवडून येणार हे स्पष्ट होईल. या मतमोजणीला काही तास शिल्लक राहिले असताना पुण्यात एका रक्तदान शिबिराचा लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर गिरीश बापट यांचा खासदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्या फ्लेक्सवरून शहरातील सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे.

ट्रिनिटी कॉलेजच्या विद्यार्थ्याचे घवघवीत यश

प्रा. पठाण ठरले पीएचडीचे पहिले विद्यार्थी; केजे शिक्षण संस्थेतर्फे विशेष सत्कार
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रीसर्च या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पठाण खिज़र अहमद नसीर खान यांना कर्षण बल (ड्रॅग फोर्स) या विषयासंबंधीत संशोधन कामाबद्दल पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. पीएचडीची पदवी मिळवणारे प्रा. पठाण ट्रिनिटी महाविद्यालयातील पहिले विद्यार्थी ठरले आहेत. पीएचडी करीत असताना प्रा. पठाण यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. परंतु, खंबीरपणे उभे राहत आपले ध्येय गाठले आणि कमीतकमी कालावधीत पीएचडी प्राप्त केली.
भारतासह अमेरिका, इंग्लंड, इराण, इटली, टर्की, मलेशिया आदी देशांतील इंटरनॅशनल जर्नल आणि परिषदांमध्ये प्रा. पठाण यांनी एकूण १५ शोधप्रबंध सादर केले. प्रा. पठाण हे ट्रिनिटी महाविद्यालयातून पीएचडी प्राप्त करणारे पहिलेच विद्यार्थी आहेत. याच महाविद्यालयाच्या यंत्र अभियांत्रिकी विभागात ते प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत. गाड्यांची इंधन क्षमता वाढविण्यासाठी ड्रॅग फोर्स कमी करण्यासंदर्भात हे संशोधन असून, त्यासाठी प्रा. डॉ. प्रकाश डबीर यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
प्रा. पठाण यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्द्ल केजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव यांनी त्यांचा विशेष सत्कार केला. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, संचालक डॉ. व्यासराज काखंडकी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ फाकटकर, यंत्र अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. भरत शिंदे, डॉ. एस. ए. काळे, डॉ. एम. एम. देशमुख,  जी. ए. देशमुख यांच्यासह महाविद्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एरोडायनेमिक ड्रॅग (कर्षण बल) ही सर्व प्रोजेक्टाइल, रॉकेट्स, मिसाईल आणि प्रक्षेपण वाहनांशी संबंधित एक सामान्य समस्या आहे. आधार दाब वाढवून बेस ड्रॅग कमी करणे आवश्यक आहे. सध्याची तपासणी बेस क्षेत्रामध्ये सक्रिय नियंत्रण यंत्रणा म्हणून चालणाऱ्या नियंत्रण जेट्सचा वापर करून बेस प्रेशरच्या नियंत्रणाशी संबंधित आहे. अंतराळ व संरक्षण उपकरणात कर्षण बल कमी होणे उपयुक्त ठरणार आहे, असे प्रा. पठाण यांनी नमूद केले.

मोबाईलच्या अतिवापराने विविध आजारांना निमंत्रण – मिलिंद बेंबळकर

पुणे : “मोबाईलच्या अतिवापरामुळे तसेच परिसरातील मोबाइल टॉवरमुळे विविध आजरांचे प्रमाण मोठया प्रमाणावर असल्याचे उघड झाले आहे. अनेक इन्स्टिट्युट्स व डॉक्टरांच्या संशोधनानुसार मोबाइल टॉवरच्या रेडिएशनमुळे कर्करोग, स्तनाचा कर्करोग, हृदयविकार आदी आजार उद्भवतात. मोबाइलच्या अतिवापरामुळे डीएनए तुटून फ्री रॅडिकल तयार होतात. इतर देशाच्या तुलनेत आपल्या देशातील मोबाइल वापराचे प्रमाण जास्त आहे आणि आजकालच्या टेलिकॉम कंपन्यांच्या विविध डेटा ऑफर्स आणि फ्री कॉलिंगमुळे अलीकडे हे प्रमाण अधिकच वाढले आहे. त्याचा परिणाम सर्व वयोगटातील व्यक्तींवर झाल्याचे स्पष्ट झाले आहे,” असे मत रेडिएशनचे तज्ञ मिलिंद बेंबळकर यांनी व्यक्त केले.

मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने शिवाजीनगर येथील दि इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्सच्या फिरोदिया सभागृहात आयोजित ‘मोबाइलला वापराचे परिणाम’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी मायक्रोवेव्ह रेडिएशनचे अभ्यासक सुरेश कर्वे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., राजेंद्र सराफ, संजय मालती कमलाकर आदी उपस्थित होते. कर्करोग, नपुंसकता  तसेच डोकेदुखी, थकवा, बधिरपण येणे, यांमुळे २० टक्के तरुण पिढी यामुळे ग्रासली आहे. उंदरांवर केलेल्या प्रयोगातुन रेडिएशनचे दुष्परिणाम सिद्ध झाले आहे. परंतु मोबाइलला मनुष्यांवर त्याच्या परिणाम होतो, हे सिद्ध नसल्याचे टेलिकॉम कंपन्या सांगतात. त्यामुळे मोबाईलचा वापर तारतम्यतेने करावा, असेही बेंबळकर यांनी सांगितले.

सुरेश कर्वे म्हणाले, “मानवीवस्तीत असलेल्या टॉवरमधून निघणाऱ्या रेडियेशमुळे आणि मोबाईलच्या अतिवापराने येत्या दहा वर्षात कर्करोगाची त्सुनामी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर बेताने करणे गरजेचे आहे. मोबाइल तसेच इतर इलेकट्रोनिक उपकरणे ‘शॉर्ट टर्म युज’ साठी आहे. ६ मिनिटापेक्षा जास्त वेळ मोबाइल वापरल्याने हिट वाढीस लागते. त्यामुळे त्याचा जास्त वापर टाळावा. मोबाईलवर बोलताना तो कानापासून दहा मिलीमीटर अंतरावर राहील याची काळजी घ्यावी. कानात घातले जाणारे हेडफोन्स तसेच ब्लु टूथ उपकरण म्हणजे कानात बसविलेला छोटा टॉवर, त्यामुळे आपण स्वःत हा आजरांना निमंत्रण देत आहोत. तसेच पालकांनी लहान मुलांना मोबाइल देणे सहसा टाळावे किंवा मोबाइल ऐरप्लेन मोड वर ठेवून द्व्यावा. त्यामुळे रेडिएशन चा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो. लहान मुलांबरोबरच गरोदर महिलांनी देखील मोबाइल वापर टाळावा.

मतमोजणीच्या पार्श्वभूमिवर महावितरणची यंत्रणा सज्ज

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी गुरुवारी (दि. 23) पुणे परिमंडलअंतर्गत सर्वच भागात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज आहे तसेच विविध भागात होणारे वीजयंत्रणेच्या पूर्वनियोजित व मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे कामे बंद ठेवण्यात येणार आहे.

लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया सुरु होत असल्याने महावितरणच्या सर्व अभियंता व कर्मचार्‍यांनी सुरळीत वीजपुरवठ्यासाठी दक्ष राहावे राहावे. वाढत्या उन्हामुळे किंवा अन्य कारणांमुळे वीजयंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्थेतून तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य देण्यात यावे तसेच बिघाड दुरुस्तीचे कामे युद्धपातळीवर करावेत अशा सूचना पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी दिल्या आहेत. यासोबतच पुणे परिमंडल अंतर्गत गुरुवारी होणारे विविध भागातील वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व व पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीचे कामे दि. 23 रोजी बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पीवायसीचा पूना क्लब संघावर 7 गडी राखून विजय

0

पुणे:  पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित  पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात गणेश गायकवाड याने केलेल्या अष्टपैलू कमगिरीच्या जोरावर केडन्स संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघावर 7 गडी राखून विजय मिळवला. तर, दुसऱ्या सामन्यात यश माने(17-3 व  24-5) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने पूना क्लब संघाचा 7 गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली

डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात पहिल्या डावात केडन्स संघ 35 षटकात 5बाद 183धावा अशा सुस्थितीत होता. तत्पूर्वी काल क्लब ऑफ महाराष्ट्र संघ पहिल्यांदा खेळताना 30.3षटकात 116धावावर संपुष्टात आला. याच्या उत्तरात केडन्स संघाने 40 षटकात 5बाद 199धावा करून 83धावांची आघाडी घेतली. यात निखिल पराडकर 57, गणेश गायकवाड नाबाद 70, अथर्व धर्माधिकारी 20, हर्षद खडीवाले 14, अजित गव्हाणे नाबाद 22 यांनी धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. दुसऱ्या डावात क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने 20षटकात 4बाद 135 धावा केल्या. पण त्यांचे 4 गडी बाद झाल्याने अंतिम धावसंख्या 115धावा(वजा20धावा) झाली. यात युवराज झगडे 35, यश क्षीरसागर नाबाद 29, देवदत्त नातू 22, नौशाद शेख 18, सुरज शिंदे 18 यांनी धावा केल्या. केडन्सकडून सिद्देश वरगंटी(26-1), हर्षद खडीवाले(17-1), अक्षय वाईकर(21-1), गणेश गायकवाड(19-1)यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. पहिल्या डावात 83धावांची आघाडी असलेल्या केडन्स संघाला निर्धारित षटकात विजयासाठी केवळ 32 धावांचे आव्हान होते. हे आव्हान जय पांडे 21धावा, अथर्व काळे नाबाद 14धावा यांनी केलेल्या धावांच्या जोरावर 8.3षटकात 3 गड्यांच्या बदल्यात 35धावा करून पूर्ण केले.

?

पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर काल पूना क्लबला 38.3षटकात 163धावापर्यंत मजल मारता आली. पीवायसीचा आज 22षटकांपासून खेळ सुरु झाला. यात अभिषेक परमारने 115 चेंडूत 63धावा व दिव्यांग हिंगणेकरने 22धावा यांनी संघाला सुरेख सुरुवात करून दिली. पण दोघेही बाद झाल्यानंतर रोहन दामले 12, साहिल मदन नाबाद 37, योगेश चव्हाण नाबाद 21, साहिल छुरी 20 यांनी छोटी खेळी करत पीवायसीला 40 षटकात 9बाद 201 धावाचे लक्ष उभारून दिले. पण त्यांचे 9 गडी बाद झाल्याने संघाची अंतिम धावसंख्या 156धावा(वजा45धावा) झाली व त्यामुळे पहिल्या डावात पुना क्लबने 7 धावांची नाममात्र आघाडी घेतली. दुसऱ्या डावात यश माने(24-5)याने केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे पूना क्लबला 20षटकात 9बाद 121 धावाच करता आल्या. 9 गडी बाद झाल्याने पूना क्लबची धावसंख्या 76धावा(वजा 45धावा)झाली. पीवायसीकडून यश माने 24 धावात 5 गडी बाद करून पूना क्लबचा निम्मा संघ बाद केला. यशला दिव्यांग हिंगणेकरने 23धावात 2 गडी, तर प्रदीप दाढेने 14 धावात 1 गडी बाद केला. पीवायसीला विजयासाठी 83 धावांची गरज होती. यात दिव्यांग हिंगणेकरने 33 चेंडूत 8चौकार व 3षटकारांसह नाबाद 59 धावा, अभिषेक परमारने 14धावा, प्रीतम पाटीलने 15धावा करून संघाला  सहज विजय मिळूवन दिला.  सामन्याचा मानकरी यश माने ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पहिला डाव: क्लब ऑफ महाराष्ट्र: 30.3षटकात सर्वबाद 116धावा(166-50धावा)(देवदत्त नातू 49(63,7×4), निकित धुमाळ 26(44), यश क्षीरसागर 25(40), नौशाद शेख 23(18), गणेश गायकवाड 4.3-20-3, सिद्देश वरगंटी 6-30-2, हर्षद खडीवाले 4-23-2, इझान सय्यद 6-45-2) वि.केडन्स: 40 षटकात 5बाद 199धावा(224-25धावा)(निखिल पराडकर 57(82,4×4) गणेश गायकवाड नाबाद 70(105,6×4), अथर्व धर्माधिकारी 20, हर्षद खडीवाले 14, अजित गव्हाणे नाबाद 22, नौशाद शेख 8-45-2, निकित धुमाळ 8-42-1, प्रज्वल गुंड 5-14-1, यश क्षीरसागर 6-33-1); पहिल्या डावात केडन्स संघाकडे 83धावांची आघाडी;

दुसरा डाव: क्लब ऑफ महाराष्ट्र: 20षटकात 4बाद 115धावा(135-20धावा)(युवराज झगडे 35(31), यश क्षीरसागर नाबाद 29(44), देवदत्त नातू 22(26), नौशाद शेख 18, सुरज शिंदे 18, सिद्देश वरगंटी 4-26-1, हर्षद खडीवाले 2-17-1, अक्षय वाईकर 4-21-1, गणेश गायकवाड 4-19-1)पराभूत वि.केडन्स: 8.3षटकात 3बाद 35धावा(50-15धावा)(जय पांडे 21(32), अथर्व काळे नाबाद 14, निकित धुमाळ 3-14-2);सामनावीर-गणेश गायकवाड; केडन्स 7 गडी राखून विजयी;

 

पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदान: पूना क्लब: 38.3षटकात सर्वबाद 163धावा(213-50धावा)(ऋषिकेश मोटकर 84(107,11×4), विश्वराज शिंदे 48(77,8×4), यश नाहर 30(34), प्रीतम पाटील 6-48-3, यश माने 3.3-17-3, रोहन दामले 8-41-2, दिव्यांग हिंगणेकर 7-47-2) वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 40 षटकात 9बाद 156धावा(201-45धावा)(अभिषेक परमार 63(115,7×4,1×6), दिव्यांग हिंगणेकर 22, रोहन दामले 12, साहिल मदन नाबाद 37, योगेश चव्हाण नाबाद 21, साहिल छुरी 20, आशिष सूर्यवंशी 7-37-1, दर्शित लुंकड 4-19-1, सौरभ यादव 8-35-1, विश्वराज शिंदे 5-23-2, ओंकार आखाडे 8-47-2); पहिल्या डावात पूना क्लबकडे 7 धावांची आघाडी;

दुसरा डाव: पूना क्लब: 20षटकात 9बाद 76धावा(121-45धावा)(यश नाहर 42(49,4×4,2×6), आशिष सूर्यवंशी नाबाद 18, दर्शित लुंकड 16, यश माने 4-24-5, दिव्यांग हिंगणेकर 3-23-2, प्रदीप दाढे 3-14-1)पराभूत वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 9.1षटकात 3बाद 85धावा(100-15धावा)(दिव्यांग हिंगणेकर नाबाद 59(33,8×4,3×6), अभिषेक परमार 14(24), प्रीतम पाटील 15, धनराज परदेशी 3-16-1, ओंकार आखाडे 3-40-1, आशिष सूर्यवंशी 2.1-33-1);सामनावीर-यश माने; पीवायसी 7 गडी राखून विजयी.

आगामी सामने: शुक्रवार 24 व शनिवार 25, 2019

डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदान: डेक्कन जिमखाना वि.पूना क्लब