पुणे-मतमोजणी होईल कोणाला किती मते मिळाली ,कोण जिंकले ,कोण हारले ..हे सारे उद्या अधिकृत रित्या जाहीर होईल ..पण भाजपच्या नगरसेवकांना निकाल अगोदरच ठाऊक झालेला आहे .. अर्थात हा निकाल म्हणजे काही विद्यापीठाची प्रश्नपत्रिका फुटण्याचा पराक्र म्हणता येणार नाही . पण साधारणतः प्रश्नपत्रिकेत येणारे 100 टक्के प्रश्न माहिती नसले तरी बहुतांशी प्रश्न अंदाजित असतातच .याच अनुषंगाने ..गुलाल तर आम्हीच उधळणार .. अशी मस्त भूमिका घेवून भाजपचे उत्साही कार्यकर्ते मैदानात वावरताना दिसताहेत .त्यातील कसब्यातून विधानसभेला इच्छुक असलेले हेमंत रासने यांचा उत्साह तर गगनी साद घालू लागला आहे. त्यांनी निवडणूक निकाल दाखविणारा स्क्रीन आणि बापटांच्या विजयी मिरवणुकीची आणि छोटेखानी सभेची जणू तयारी केली आहे .पहा हि त्याबाबतची छायाचित्रे …..
गुलाल आम्हीच उधळणार -भाजप नगरसेवकांची मिरवणुकीची तयारी …
Date: