Home Blog Page 2921

फिनोलेक्स, मुकुल माधव फाउंडेशनतर्फे ‘कृषी’च्या ५९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

पुणे : कृषी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्यात नुकताच याबाबतचा सामंजस्य करार झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, संचालक डॉ. ए. एल. फरांदे, पुण्यातील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, मुकुल माधव फोंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे कंपनी सेक्रेटरी देवांग त्रिवेदी यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
कृषी विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या एकूण ५९ गरजू विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार असून, त्यामध्ये पदवीसाठी ३६, पदव्युत्तर पदवीसाठी २०, तर पीएचडी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना दरवर्षी ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रासाठी प्रोत्साहन मिळण्यासह त्यातील तज्ज्ञता प्राप्त करण्यास हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. ‘फिनोलेक्स’कडून गेल्या आठ वर्षांपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना सन्मानित केले जात आहे.
शिष्यवृत्तीच्या उपक्रमाबरोबरच फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशन कृषी विद्यापीठाच्या ‘रूरल ऍग्रीकल्चर वर्क एक्सपीरियन्स’ (रावे) अर्थात ग्रामीण कृषी कार्यानुभव अभियानात सहभागी होणार आहे. ‘रावे’ अंतर्गत विद्यार्थी ग्रामीण भागात राहून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेणार आहेत. यामध्ये विद्यार्थी तेथील बाबींचा अभ्यास करून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टींची माहिती फाउंडेशनला पुरवतील. त्यानुसार शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना लागणारे साहाय्य, उपकरणे पुरवले जाणार आहेत. २२ आठवड्यांच्या या प्रशिक्षण काळात विद्यार्थ्यांना सहकार्य मिळणार आहे.
रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनने २०१४ पासून जल संवर्धनाचा प्रकल्प हाती घेतला आहे. आजवर सोलापूर, सांगली, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात जवळपास २३ प्रकल्प पूर्ण झाले असून, याचा तीन लाखाहून अधिक लोकांना लाभ झाला आहे. याशिवाय, विदर्भ-मराठवाड्यातून उच्च शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या १३० मुलांना दोन वेळचे जेवण दिले जात आहे. आरोग्य, शिक्षण, जलसंवर्धन, पर्यावरण, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासासाठी काम करून गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचे काम करण्याचा प्रयत्न मुकुल माधव फाउंडेशन अविरत करीत आहे.”

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे आचरणात आणावे लागेल

पुणे- सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे देशातील प्रत्येक नागरिकाला आचरणात आणावे लागेल तरच माणूस माणसाला जोडला जाईल आणि त्यातून देश जोडला जाईल असे मत विमुक्त, घुमंतू जनजाती विकास परिषदेचे अध्यक्ष दादा इदाते यांनी व्यक्त केले.

अॅस्पायर नॉलेज अँड स्किल्स (इंडिया) प्रा. लि. ,पुणे यांच्या वतीने सन्मान गुणवत्तेचा… गौरव जीवनाचा..या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

जेष्ठ अभिनेते पद्मश्री मनोज जोशी, खादी ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष यशोवर्धन बारामतीकर, टेलेकॉम सेक्टर स्किल कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी ले. जनरल डॉ. एस. पी. कोचर, एआयसीटीईच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ. दीपक शिकारपूर, स्ट्रॅटेजीक फोरसाईट ग्रुपचे सिनिअर प्रोग्रामअॅडवायजर सचिन इटकर,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. शंकर देओस्कर, हिरवाल प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया, पुणे मॅनजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप तुपे, व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंगचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे, भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्रचे मुख्य समन्वयक यशवंत मानखेडकर, ग्रीन थंबचे सल्लागार आणि राष्ट्रीय समन्वयक डॉ. प्रशांत पगारे, डॉ. दयानंद सोनसालेआदी यावेळी उपस्थित होते. डॉ. गजानन एकबोटे यांना शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅस्पायर जीवन गौरव पुरस्कार, डॉ. जयंत अभ्यंकर (शारंगधर ग्रुप) यांना आरोग्य क्षेत्रातउल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅस्पायर हॉल ऑफ फेम पुरस्कार, श्री विनायक निम्हण (सनी वर्ल्ड) यांना हॉटेल व रिसोर्ट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅस्पायर प्रॉमिसिंग ब्रँड पुरस्कार, गीतराम कदम यांना अन्न प्रक्रिया क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅस्पायरब्रँड टू वॉच २०१९, शेखर मुंदडा यांना स्वयंसेवी संस्था क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅस्पायर एनजीओ पुरस्कार, डॉ. सुभाष मारलेवार यांना होलेष्टीक औषध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅस्पायर सर्व्हिस टू सोसायटी पुरस्कार, पांडुरंग शेलार यांना पाणी व्यवस्थापन क्षेत्रातउ ल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आणि संतोष राऊत यांना सामाजिक सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅस्पायर प्रॉमिसिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मनिष भांदवे, अविनाश तरवडे, अतुल निकम यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

दादा इदाते म्हणाले, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे अशी प्रतिज्ञा रोज म्हटली जाते. परंतु आपल्याला खरोखर भारत व त्यातील लोक यांची माहिती असते का? कारण देश आणि लोक यांच्यामध्ये खूप मोठे अंतर आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे देशातील प्रत्येक नागरिकाला आचरणात आणावे लागेल त्यातूनच माणूस आणि देश जोडला जाईल असे ते म्हणाले.  विद्याविभूषित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावात फक्त चौथी पर्यंत शाळा होती. मात्र, बाबासाहेबांनी देशाची घटना लिहिली. त्या गावात काम सुरु केले. आज त्याठिकाणी मॉडर्न कॉलेज आहे. देशाला वैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी, त्याच्या उन्नतीसाठी अनेकांचे योगदान असते. त्यांचे कार्य समाजासमोर येणे महत्वाचे असते. त्यासाठी त्यांचा सन्मान होणे उचित ठरते असे त्यांनी नमूद केले.

मनोज जोशी म्हणाले, गावाकडून येऊन तळागाळातल्या मुलांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम संजय गांधी अॅस्पायर नॉलेज अँड स्किलच्या माध्यमातून करत आहेत. जे जीवनात यशस्वी होऊ इच्छितात त्यांच्यासाठी अॅस्पायर झटत आहे, ही अभिनंदनीय गोष्ट आहे.

डॉ. एकबोटे म्हणाले, मी पेशाने डॉक्टर असलो तरी अपघाताने गुरूंच्या सांगण्यावरून शिक्षण क्षेत्रात आलो. आपल्या हातून चांगली पिढी घडविण्याचे पुण्य मिळेल या हेतूने शैक्षणिक संस्था सुरु केली. आज संस्थेच्या ६८ शाखा आणि ५५ हजार  विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तळागाळातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देणे हा हेतू ठेवून आजपर्यंत वाटचाल चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

विनायक निम्हण म्हणाले, गेली ३०-३५ वर्षे राजकारण, समाजकारण करतो आहे. त्या क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळाले परंतु व्यवसायामधला हा पहिला पुरस्कार आहे. तो मला सर्वात जास्त महत्वाचा वाटतो. राजकारण, समाजकारण किंवा व्यवसाय असे कोणतेही काम मनापासून केले तर ते सोपे होते आणि त्यात यश नक्की मिळते असे त्यांनी नमूद केले.

यावेळी डॉ. जयंत अभ्यंकर, गीतराम कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

आपल्या प्रास्ताविकपर भाषणामध्ये संजय गांधी यांनी  अॅस्पायर नॉलेज अँड स्किल संस्था करत असलेल्या कार्याची माहिती दिली. तरुणांना त्यांचे कौशल्य विकसित करून त्यांच्या पायावर उभे करण्याबरोबरच सर्वांना एकत्र करून एक नवा भारत निर्माण करण्याच्या उद्देशाने अॅस्पायर काम करीत आहे असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. समिधा गांधी आणि समिरा गुजर यांनी केले तर आभार हुसेन हाजिते यांनी मानले. त्यानंतर अभिनेते मनोज जोशी यांची प्रमुख भूमिका असलेले ‘चाणक्य’ हे महानाट्य सादर करण्यात आले.

गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने विशेष मुलांसाठी आंबा फेस्टचे आयोजन

पुणे :- आंब्याचा गोडवा समाजातील वंचित मुलांना चाखता यावा यासाठी  नगर रोड येथील चोखी दाणी येथे गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने ‘आंबा फेस्ट’चे आयोजन करण्यात आले होते. ४५०पेक्षा जास्त चिमुरडयांनी यावेळी आंब्याचा मनमुराद आनंद लुटला.

यावेळी समाजसेवक प्रदीप लोखंडे ,गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त अतुल गोयल ,अमित गोयल, चोखी दाणीचे अध्यक्ष अमित कुमार याप्रसंगी उपस्थित होते.

चोखी दाणी मधील रुचकर जेवणाबरोबरच मॅजिक शो,पपेट शो, गाणे,नृत्यकला, राजस्थानी गाणी-नृत्य आणि एकूणच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा बच्चेकंपनीने मनमुराद आस्वाद घेतला.

रॉबिन हूड आर्मी संस्थेने शहरातील अनेक वेगवेगळ्या भागांमधून ४०० हून अधिक वंचित मुलांना या ठिकाणी आंब्याचा आस्वाद घेता यावा यासाठी एकत्र आणले याशिवाय सोफोश मधील ४० हून अधिक विशेष मुलांनी देखील या आंबा फेस्टचा भरघोस आनंद लुटला. रॉबिन हूड आर्मीच्या स्वयंसेवकांनी देखील या मुलांना सांभाळण्यासाठी हातभार लावला.

समाजसेवक प्रदीप लोखंडे यांनी यावेळी मुलांशी संवाद साधला ते म्हणाले कि, भविष्यात आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रातच काम करा त्यात काम करताना तुमचं स्वतःचं वेगळेपण जोपासा आणि नेहमी लक्षात ठेवा आपल्यातील प्रत्येकजणाचे  समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा आपल्या कमाई मधील काही भाग गरजू लोकांच्या आयुष्य बदलण्यासाठी सत्कारणी लावा.

76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत देशभरांतून एकूण 474 खेळाडू सहभागी

अमनोरा मॉल येथे स्क्वॅश ग्लास कोर्टहा मान मिळविणारे देशातील दुसरे 
 

पुणे- महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए) यांच्या तर्फे आयोजित व स्क्वॅश रॅकेटस्‌ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखालीहोत असलेल्या 76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत 25राज्यांतील एकूण 474  खेळाडूंमध्ये जोश्ना चिनप्पा, महेश माणगावकरयांसारखे अव्वल मानांकित भारतीय खेळाडू झुंजणार आहेत. ही स्पर्धा दि.10 ते 16 जून 2019 या कालावधीत आयस्क्वॅश अकादमी, चंचला संदीप कोदरे स्पोर्टस्‌ क्लब, मुंढवा, आरएसआय आणि अमनोरा मॉल ग्लास स्क्वॅश कोर्टवर होणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए)चे अध्यक्ष डॉ.प्रदीप खांड्रे आणि सचिव डॉ. ए. दयानंद कुमार यांनी सांगितलेकी, राजस्थान, चेन्नई, चंदीगढ, गुजरात, दिल्ली आणि महाराष्ट्र अशा 25राज्यांतील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये 115महाराष्ट्रातील खेळाडूंचा समावेश आहे. स्पर्धेला पंचशील आणि जहांगीर हॉस्पिटल यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.

तसेच, या स्पर्धेला एसआरएफआय 7 स्टारची मान्यता मिळाली असून ही स्पर्धा स्क्वॅश रॅकेटस्‌ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होतआहे. स्पर्धेत एकुण 12लाख रूपयांची पारितोषिके देण्यात असून विजेत्या खेळाडूंना मानांकन गुण मिळणार आहेत.

यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष व पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट म्हणाले की, इतक्या उच्च दर्जाची स्पर्धा आयोजित करण्याचा मान पुणेशहराला अभिमान व आनंद वाटत आहे. स्क्वॅश या खेळामुळे पुणे शहर हे नेहमीच आघाडीवर राहिले आहे या स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यातआल्यामुळे शहरातील आणि राज्यातील गुणवान स्क्वॅशपटुंना प्रोत्साहन देण्याबरोबरच पुणे शहरातील स्क्वॅश विश्वाला पुन्हा एकदा राष्ट्रीयस्तरावर स्थान मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.

महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए)चे अध्यक्ष डॉ.प्रदीप खांड्रे म्हणाले की, ही स्पर्धा एकुण 9 वयोगटात होणार असून यामध्ये पुरुष व महिलागट, 35वर्षावरील, 40वर्षावरील, 45वर्षावरील, 50वर्षावरील, 55वर्षावरील, 60वर्षावरील, 65वर्षावरील पुरुष गट आणि प्रोफेशनल गट यांचा समावेश आहे.यातील पुरुष व महिला गटातील सामने अमनोरा मॉल येथे उभारण्यात आलेल्या ग्लास कोर्टवर होणार असून इतर गटातील सामने आयस्क्वॅश अकादमीयेथे होणार आहेत. अमनोरा मॉल येथे नव्याने उभारण्यात हे  खास  स्क्वॅश ग्लास कोर्टमुळे पुण्याला देशातील अशा प्रकारचे स्क्वॅश ग्लास कोर्ट असलेलेकेवळ दुसरे बनण्याचा मान मिळाला आहे. स्पर्धेत महेश मानगावकर, उर्वशी जोशी, जोश्ना चिनप्पा यासांरखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, आशियाई पदकविजेते खेळाडू व राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेते खेळाडूंच्या सहभागामुळे ही स्पर्धा अधिकच चुरशीची होणार असल्याचे त्यांनी नमुद केले.

स्पर्धेत अमितपाल कोहली(35वर्षावरील),सौरभ नायर(40वर्षावरील), दिलीप त्रिपाठी(45वर्षावरील), आशिष कामत(50वर्षावरील), आशूनबेहल(55वर्षावरील), ललित कुमार अग्निहोत्री(60वर्षावरील), राजीव रेड्डी(65वर्षावरील) हे अव्वल मानांकित खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणारआहेत, तसेच याशिवाय या वरिष्ठ खेळाडूंसह अर्णव सरीन, अनिका दुबे, रौनक सिंग आणि तीर्थ झिल्का हे मानांकित कुमार झुंजणार असल्याचेएमएसआरएचे सचिव डॉ. ए. दयानंद कुमार  सांगितले.

पुण्याच्या विकासप्रकल्पांना अधिक वेगाने पूर्णत्वास न्या-

खासदार काकडेंनी नवनियुक्त पालकमंत्र्यांना भेटून दिल्या शुभेच्छा!

पुणे : पुण्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाची घोषणा होताच भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी आज मुंबईत त्यांची भेट घेतली. नवनियुक्त पालकमंत्र्यांना शुभेच्छा देतानाच पुणे शहर व परिसराशी संबंधीत असलेल्या चोवीस तास समान पाणी पुरवठा योजना, नदीसुधार योजना, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक आणि पीएमआरडीए संबंधीत विकास प्रकल्पांना अधिक वेगाने पूर्णत्वास नेण्यासंदर्भात पालकमंत्री पाटील यांच्याकडे खासदार काकडे यांनी विनंती केली.

पुणे शहराच्या संदर्भात चोवीस तास पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा व जिव्हाळ्याचा राहिला आहे. मेट्रोचे काम सुरु असले तरी ते अधिक वेगाने पूर्णत्वास नेण्याची आवश्यकता आहे. मुळा व मुठा नदीसुधार कार्यक्रम राबविण्याबरोबरच शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि पीएमआरडीए संदर्भातील विकास प्रकल्पांना अधिक वेगवान करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्राधान्य द्यावे. त्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदी संबंधीत अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक बोलवावी अशी विनंतीही खासदार काकडे यांनी पालकमंत्री पाटील यांना या भेटीदरम्यान केली आहे. त्यावर पदभार स्वीकारताच आपण या कामांसंदर्भात त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिले.

महाराष्ट्रात 2014 मध्ये भाजपप्रणित महायुतीचे सरकार आल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री म्हणून गिरीश बापट यांनी काम पाहिले. बापट हे खासदार झाल्यामुळे त्यांनी मंत्रिपद व आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आज पुण्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा झाली. त्यानंतर खासदार संजय काकडे यांनी नवनियुक्त पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देतानाच पुण्याच्या विकासप्रकल्पांना गतिमान करून पूर्णत्वास नेण्यासंदर्भात विनंती केली.

बँक ऑफ महाराष्ट्रकडून व्याजदरामध्ये कपात

0

पुणेबँक ऑफ महाराष्ट्रने दिनांक 7 जून 2019 पासून विविध कालावधीतील कर्जाच्या व्याजदरामध्ये (एमसीएलआर) पुनरावलोकन करून त्यात घट केली आहेत.

नवे कमी केलेले व्याजदर (एमसीएलआर) खालील प्रमाणे आहेत;

 

कालावधी अविशिष्ट परिपक्वता सदयाचा एमसीएलआर एमसीएलआर प्र. व.
ओव्हरनाईट एमसीएलआर 1 दिवस 8.20% 8.15 %
एक महिना एमसीएलआर 1 दिवसापेक्षा अधिक ते 1 महिना 8.25 % 8.25 %
तीन महीने एमसीएलआर 1 महिन्यापेक्षा अधिक ते 3 महीने 8.45 % 8.40 %
सहा महीने एमसीएलआर 3 महिन्यापेक्षा अधिक ते 6 महीने 8.50 % 8.50 %
एक वर्ष एमसीएलआर 6 महिन्यापेक्षा अधिक 8.70 % 8.60 %

 

‘ई-पाठशाळा’तून मिळणार सीएच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

आयसीएआय’च्या सीए नंदकिशोर हेगडे यांची माहिती; सनदी लेखापालांना ‘युआयडीएन’ क्रमांक अनिवार्य
पुणे : “सनदी लेखापाल परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. मात्र, खासगी कोचिंग क्लासेसच्या खर्चामुळे अनेकांच्या मनात सीए परीक्षा खूप खर्चिक असल्याचा समज असतो. प्रत्यक्षात ही परीक्षा अतिशय कमी खर्चात आणि लगेच काम मिळवून देणारी आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील विद्यार्थी देखील सीए होऊ शकतात, हे आपल्याला ज्ञात आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि पूरक साहित्य देण्यासाठी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) ‘ई-पाठशाळा’ उपक्रम सुरु केला आहे. त्यामुळे सीएच्या विद्यार्थ्यांना अद्ययावत आणि लाईव्ह शिक्षण मिळणार आहे,” अशी माहिती ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए नंदकिशोर हेगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बिबवेवाडी येथील आयसीएआय भवनमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेला ‘आयसीएआय’च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्या अध्यक्षा सीए प्रीती सावला, उपाध्यक्ष सीए उमेश शर्मा, सचिव सीए राकेश आळसी, खजिनदार सीए यशवंत कासार, विभागीय समितीचे सदस्य सीए आनंद जाखोटिया, आयसीएआय’च्या पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे, उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे, सचिव समीर लड्ढा, सीए काशिनाथ पाठारे आदी उपस्थित होते. सनदी लेखापालांकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रमाणपत्रावर ‘युनिक आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट नंबर’ (युआयडीएन) असणे अनिवार्य आहे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
सीए नंदकिशोर हेगडे म्हणाले, “सीए अभ्यासक्रम कमी खर्चात करता येण्यासारखा आहे. गरीब कुटुंबातील मुलेही सीए करण्यासाठी आशावादी आहेत. सगळ्यांनाच क्लासेस लावणे शक्य होत नाही. शिवाय ग्रामीण भागात अशा प्रकारची सुविधाही नाही. त्यामुळे या मुलांना चांगले, अद्ययावत शिक्षण मिळावे, यासाठी ई-पाठशाळा उपयुक्त आहे. घरबसल्याही विद्यार्थी या आभासी क्लासचा शिकण्यासाठी उपयोग करू शकतो. चार ते सहा महिन्यांचे हे प्रशिक्षण असून, देशभरातील १०६४ शाखांमार्फत विद्यार्थी आणि प्रॅक्टिसिंग सीएंसाठी नियमित मार्गदर्शन, चर्चासत्रे, नव्या तंत्रज्ञान, तरतुदींविषयीची माहिती पुरविली जाते.”
सीए प्रीती सावला म्हणाल्या, “महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यात १ लाख १६ हजार सीए काम करत आहेत. तर येथून सीए शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सतत अद्ययावत ज्ञान देण्यासाठी आम्ही पुढाकार घेत असतो. सीएच्या काही परीक्षा डिझिटलायझ होत आहेत. पेपरचा पॅटर्नही बदलत आहे. शासन स्तरावर कर प्रणालीत होत असलेले बदल सनदी लेखापालांपर्यंत पोहोचावेत, यासाठी वर्षभर विविध उपक्रम रिजनतर्फे आयोजिले जातात. युडीआयएन क्रमांक प्रत्येक सीएने वापरने बंधनकारक असून, त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.”
सीए उमेश शर्मा म्हणाले, “वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) कायद्यामुळे कर प्रणालीत सुसूत्रता आली आहे. कर भरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. सुरुवातीला हा कायदा काही लोकांना जाचक वाटत होता. मात्र, त्यातील सकारात्मक बदलांमुळे तो अधिक सुलभ होत आहे. येत्या काळात ‘ई-इन्व्हाईस’ चालू होणार आहे. त्यातून सर्व देयके संगणकीकृत होतील. व्हॅट आणि इतर जुने कर चुकता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘सेटलमेंट ऑर्डीनन्स’ अर्थात व्हॅट करमाफी योजना आणली आहे. त्याचा फायदा अनेकांना होईल.”
सीए राकेश आळसी म्हणले, “बहुतांश सीए हे इंडस्ट्रीमध्ये काम करतात. सीएच्या अभ्यासक्रमात वेळोवेळी बदल होत असतो, यात केस स्टडी, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, आयटी ट्रेनिंग, कॅम्पस मुलाखत अशा प्रकारचे उपक्रम घेतले जातात. यामुळे कंपन्यांना खूप फायदा होतो. कारण निवड झालेल्या विद्यार्थाना स्पेशल कोर्सेस, सेमिनार आणि ग्रुप डिस्कशन घेण्यात येतात. यामुळे विद्यार्थी पूर्णतः प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करू शकतो.”

सीए यशवंत कासार यांनी सीएंसाठी राबविण्यात येत असलेल्या तांत्रिक मार्गदर्शन सत्रांविषयी सांगितले. सीए ऋता चितळे यांनी प्रास्ताविक केले. सीए अभिषेक धामणे यांनी आयसीएआयच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. सीए समीर लड्ढा यांनी आभार मानले.

कर्मचा-यांच्या कठोर परिश्रमामुळेच महावितरण यशस्वी

पुणे-महावितरणने गेल्या १४ वर्षात यशस्वीपणे वीजेच्या क्षेत्रातील अनेक आव्हाने झेलली असून यासाठी कंपनीच्या कर्माचा-यांनी कठोर परिश्रम करून ग्राहकांना दर्जेदार सेवा देऊन महावितरणाला विद्युत क्षेत्रात नावलौकिक मिळवून दिला आहे, असे मत पुणे प्रादेशिक विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री सुनील पावडे यांनी आज महावितरणच्या १४ व्या वर्धापन दिनाच्या आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.

महावितरणच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे प्रादेशिक विभागाच्या प्रकाश भवन स्थित कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री सचिन तालेवार, अधीक्षक अभियंते सर्वश्री शंकर तायडे (संचालन, प्रादेशिक कार्यालय), उत्क्रांत धायगुडे ( पायाभूत आराखडा, प्रादेशिक कार्यालय), पंकज तगलपल्लीवार (गणेशखिंड मंडळ), उपमहाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) श्री एकनाथ चव्हाण, प्रभारी उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री प्रदीप सातपुते, इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारनियमनाचा प्रश्न निकाली काढत असतांना वितरण यंत्रणेत सुधारणा करून ग्राहकाला दर्जेदार वीज पुरवठा करण्यासह अनुषंगिक सेवाही चांगल्या पद्धतीने मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सर्व अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करण्यात आलेली आहे. माहिती तंत्रज्ञाचा वापर करून ग्राहकांना घरबसल्या सेवा पुरविण्यात येत आहे. महावितरणकडे पुरेशी वीज उपलब्ध असून मागेल त्याला वीज देण्यासाठी महावितरण सज्ज आहे. महावितरणला गेल्या १४ वर्षाच्या कालखंडात अनेक अडचणीतून मार्ग काढावा लागला. त्यासाठी कर्मचारी व अधिकारी यांना प्रचंड मेहनत करावी लागली, असे मत श्री पावडे यांनी व्यक्त केले.

तत्कालीन महाराष्ट्र वीज मंडळाच्या पुनर्रचनेच्या नंतर अस्तित्वात आलेल्या महावितरणने भारनियमनावर मात करीत देश्यातील सर्वात मोठी वितरण कंपनी व आशिया खंडातील दुस-या क्रमांकाची वितरण कंपनी होण्याचा मान प्राप्त केला असून भविष्यातील सर्व आह्वाने पेलण्यास महावितरण सक्षम असून ग्राहकांना योग्य व दर्जेदार सेवा देण्यात यशस्वी झाली आहे, असे मनोगत श्री तालेवार यांनी यावेळी व्यक्त केले.उपकार्यकारी अभियंता श्री संतोष पाटनी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले व सर्व उपस्थितांचे आभार मानले.

खासदार गिरीश बापट यांची अभिवादन रॅली

पुणे : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ऐतिहासिक मताधिक्याने विजयी झाल्यानंतर मतदारांना अभिवादन करून आभार मानण्यासाठी खासदार गिरीश बापट यांच्या वतीने शहरात अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार मोहन जोशी यांना पराभूत करत गिरीश बापट यांनी 3 लाख 24 हजार 628 मतांनी विजय मिळवला. शहरातील जवळपास सर्वच विधानसभा मतदार संघातून बापट यांना मताधिक्य मिळाले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना  नगरसेवक, पाच वेळा आमदार, मंत्री आणि आता खासदार म्हणून निवड झाली. हे किर्तीमान केवळ  जनतेच्या प्रेमामुळे मिळाले आहे.

हे यश माझे नसून माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या असंख्य कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे आहे. म्हणूनच जनतेचे आभार मानण्यासाठी, मतदार संघातील नागरिकांना अभिवादन करण्यासाठी ही अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे. असे बापट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. उद्यापासून या रॅलीला सुरुवात होणार आहे. उद्या (दि. 7) कसबा आणि पर्वती, रविवारी (दि 9) कॅन्टोन्मेंट व वडगाव शेरी तर मंगळवारी (दि 11) शिवाजीनगर आणि कोथरूड मतदार संघात अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे. सांयकाळी पाच वाजल्यापासून या अभिवादन रॅलीला सुरुवात करण्यात येणार आहे

श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान विकास आराखड्यासाठी  148 कोटी रु चा निधी – सुधीर मुनगंटीवार

0

मुंबई: श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान आणि परिसर विकासासाठी 148.37 कोटी रु चा आराखडा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात आज त्यांनी या विषयाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या आराखड्यातील कामे दर्जेदार पद्धतीने आणि वेगाने  पणे पूर्ण व्हावीत अशा सूचना देऊन श्री. मुनगंटीवार म्हणाले, आराखड्यातील जी कामे पूर्णत्वाला  आली आहेत ती श्रावणापूर्वी पूर्ण होतील असे पाहावे.  आराखड्यात सामूहिक सेवा केंद्र, प्रवेशद्वार, पायरीमार्ग, सार्वजनिक स्वच्छतागृहे, रस्ते विकास, मंदिर परिसर संवर्धन, भाविकांसाठी पायाभूत सोयी सुविधा, पाणी पुरवठा योजना, भुयारी गटर योजना ,घन कचरा व्यवस्थापन, वीजपुरवठा, महादेव वन, विश्रामगृह, अशा विविध कामांचा समावेश आहे अशी माहिती देऊन श्री. मुनगंटीवार म्हणाले,  येथे उभारण्यात येत असलेल्या महादेव वन प्रकल्पांतर्गत विविध 12 कामांना मंजुरी देण्यात आली आहे. येथे बेलाची 150 तर रुद्राक्षाची 100 झाडे लावली गेली आहेत. आराखड्यातील 14 कामे प्रगतीपथावर आहेत. भाविकांसाठी 20 मिडी बसेसची सेवा लवकरच सुरू होत आहे. पर्यटन विभागाकडून खरेदी करण्यात आलेल्या बॅटरी ऑपरेटेड गाड्या ही श्रावणापूर्वी  सुरू होतील अशी अपेक्षा आहे. मंदिराला साजेशी कामे करताना ती उत्तम दर्जाची होतील याची काळजी घेतली गेली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. मंदिराला लाखो भाविक भेट देतात हे लक्षात घेऊन  करण्यात येणारी कामे नावीन्यपूर्ण रितीने  केली जावीत. डमरू, वाहनतळ, लॉकर, कापडी पिशव्या तयार करण्याची कामे , बेलाच्या पानाच्या खताचा प्रकल्प अशी विविध कामे यात केली जावीत. भक्तांना जप आणि आराधना करण्यासाठी एक हॉल तयार केला जावा, यज्ञ करू इच्छिणाऱ्या भाविकांसाठी एक यज्ञकुंड तयार केले जावेत, ओम नमः शिवाय चा जप करणारा नंदी उभारला जावा, दिव्यांगासाठी, जेष्ठ नागरिकांसाठी दर्शनाला जाण्याची व्यवस्था निर्माण केली जावी. रोजगार निर्मितीबरोबर नाविन्यपूर्ण कल्पनांच्या अंमलबजावणीत स्थानिकांचा सहभाग घेतला जावा, अशा सूचना ही वित्त मंत्र्यांनी दिल्या.

वडवणीत पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

0

पालकमंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री एकनाथ शिंदे, जयदत्तआण्णा क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती

वडवणी : मराठी पत्रकार परिषदेच्या आदर्श जिल्हा आणि आदर्श तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण रविवार दिनांक ९ जून रोजी दुपारी 2 वाजता बीड जिल्हयातील वडवणी येथे महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या हस्ते होत आहेत.. या कायॅक़माचया अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख असणार आहेत.या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष युवा नेते अमोल दिनकरराव आंधळे आहेत.
नराठी पत्रकार परिषदेच्यावतीने ग्रामीण महाराष्ट्रात उल्लेखनिय कायॅ करणारया तालुका आणि जिल्हा पत्रकार संघाचा सन्मान केला जातो.. परिषदेचे दिवंगत अध्यक्ष वसंत काणे आणि रंगाअण्णा वैद्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे पुरस्कार दिले जातात.. स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.. यावर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा मराठी पत्रकार संघ पुरस्कार नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाला जाहीर झाला आहे तर वसंत काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार करमाळा, वाडा, तळोदा, कागल, कळमनुरी, आष्टी, मालेगाव, चामोर्शी आदि तालुक्यांना जाहीर झाला आहे.. या जिल्हा आणि तालुका संघांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.. गेल्या वर्षी हा सोहळा पाटण येथे झाला होता.. यंदा वडवणीत हा सोहळा होत आहे.. ग्रामीण भागातच पुरस्कार वितरण सोहळे व्हावेत असा परिषदेचा प्रयत्न आहे..
वडवणी सारख्या ग्रामीण भागात प्रथमच एवढा भव्य दिव्य काय॓क़म होत असल्याने बीड जिल्हयात या काय॓कंमाबददल मोठी उत्सुकता आहे..या काय॓क़मास आ. आर. टी देशमुख, आ. सुरेश अण्णा धस, माजी आ. प़काश सोळुंके, केशवराव आंधळे, रमेश राव आडसकर, मोहनराव जगताप, विमल शिंदे, नगराध्यक्षा मंगलाताई मुंडे, श्रध्दा उजगरे, दिनकरराव आंधळे, वैशालीताई सावंत, विनायक बाप्पा मुळे, ह. भ. प. अण्णा महाराज दुटाळ, आदि उपस्थित राहणार आहेत..
दरम्यान सकाळी १० वाजता तालुका अध्यक्षांचा मेळावा होत असून मेळाव्याचे उद्घाटन सकाळ औरंगाबादचे कायॅकारी संपादक संजय वरकड आणि आज तकचे मुंबई संपादक साहिल जोशी यांच्या हस्ते होत आहे..
या काय॓क़मास उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, काया॓धयक्ष गजानन नाईक, सरचिटणीस अनिल महाजन, कोषाध्यक्ष शरद पाबळे, बीड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष चौरे, काया॓धयक्ष दत्तात्रय अंबेकर, सरचिटणीस विलास डोळसे, परिषद प्रतिनिधी, विशाल सोळुंके, प्रसिध्दी प्रमुख संतोष स्वामी,संयोजक वडवणी तालुका पत्रकार संघाचे जानकीराम उजगरे, अध्यक्ष बाबुराव जेधे, सचिव अविनाश मुलमुले,अधिस्वीकृती समितीचे अनिल वाघमारे यांनी केले आहे..
या काय॓क़मात परिषदेच्या सोशल मिडिया सेलची विस्तारित कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.. तसेच तालुक्यातील देवडी येथील नदीवर सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून बंधारा बांधून देवडी गावचा दुष्काळ कायमस्वरूपी हद्दपार करणारे गावचे माजी सरपंच श्री. माणिकराव देशमुख यांचा सन्मान करण्यात येणार आहे.. काय॓क़म यशस्वी करण्यासाठी बीड जिल्हा पत्रकार संघ, तसेच वडवणी तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत..

कोर्टाने दिला होता हजर होण्याचा आदेश,साध्वी प्रज्ञा ठाकूर रूग्णालयात भर्ती झाल्या

0

मुंबई- मालेगाव ब्लास्टच्या आरोपी आणि भाजपच्या नवनिर्वाचीत खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना बुधवारी ५ तारखेला  रात्री प्रकृती खराब झाल्यामुळे भोपाळच्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 3 जूनला मुंबईच्या एनआयए कोर्टाने प्रज्ञा यांना दर आठवड्याला हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे प्रज्ञा यांना 7 जूनला हजर राहायचे होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आतड्यातील संक्रमण, कंबरेमध्ये त्रास आणि हाय ब्लड प्रेशरमुळे रूग्णालयात दाखल करावे लागले. रूग्णालायातील डॉक्टर अजय मेहता यांनी सांगितले की, प्रज्ञा यांच्या आतड्यात सुज आणि ब्लड प्रेशर वाढले होते, त्यामुळे एक किंवा दोन दिवस त्यांना डॉक्टरांच्या निगराणीत राहावे लागेल.

कोर्टात दर आठवड्याला हजेरी लावण्याचे आदेश
3 जूनला मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाने मालेगाव बॉम्ब ब्लास्टच्या मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना आठवड्यातून एक वेळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. प्रज्ञा यांना आजारपण आणि संसदेतील औपचारिकता पूर्ण करण्याचे कारण देत हजेरीपासून सुट मागितली होती, मात्र विशेष न्यायालयातील न्यायाधिशांनी ही मागणी अमान्य केली.

मालेगाव ब्लास्टमध्ये 7 लोकांचा मृत्यू झाला होता
29 सप्टेंबर 2008 मध्ये मालेगाव बॉम्ब ब्लास्टमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता तर 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. सरकारने या प्रकरणाचा तपास एटीएसला दिला होता. 24 ऑक्टोबर, 2008 या प्रकरणात स्वामी असीमानंद, कर्नल पुरोहित आणि प्रज्ञा सिंह यांना अटक करण्यात आली होती, तर 3 आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले होते. नंतर हा तपास एनआयएकडे देण्यात आला. एप्रिल 2017 मध्ये साध्वी प्रज्ञा यांना 9 वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर सशत्र जामीन मिळाला होता.

आरबीआयने 0.25% नी घटवला रेपो रेट, 30 लाखांच्या गृहकर्जावर दर महिन्याला होणार 474 रूपयांची बचत

0

मुंबई– भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिस कमिटी(एमपीसी)ने गुरुवारी व्याज दरांची घोषणा केली. यावेळी रेपो रेटमध्ये 0.25% घट करण्यात आली आहे. यामुळे रेपो रेट 6% वरून 5.75% टक्के झाला आहे. पण ग्राहकांना रेटो रेटचा फायदा केव्हा आणि किती मिळणार हे बँकांवर अवलंबून आहे. या रेपो रेटवरच आरबीआय व्यावसायिक बँकांना कर्ज देत असते.

रेपो दर कमी होणे अपेक्षित होते

आर्थिक विकासाचा वेग मंदावल्यामुळे आरबीआयवर व्याज दर कमी करण्याचा दबाव वाढला होता. मार्च तिमाहीत जीडीपीचा विकास दर कमी होऊन 5.8% राहिला. तर 2018-19 या संपूर्ण वर्षात विकास दर 6.8% होता. गेल्या पाच वर्षांतील सर्वांत कमी विकास दर आहे. अशातच स्वस्त कर्जाद्वारे बाजारात व्यवहार वाढवून अर्थव्यवस्थेचा वेग वाढवण्याचा राष्ट्रीयकृत बँकांचा प्रयत्न आहे.

20 लाखांच्या गृहकर्जावर लागणार ईएमआय

कर्ज रक्कम जुना ईएमआय दर नवीन ईएमआय दर दर महिन्याची बचत
20 लाख 17,483 रूपये 17,167 रूपये 316 रूपये
30 लाख 26,225 रूपये 25,751 रूपये 474 रुपये
50 लाख 44,505 रूपये 43,708 रूपये 797 रूपये

> 30 लाखांपर्यंतच्या कर्जावरील जुना दर 8.60% आणि नवीन दर 8.35% च्या आधारावर गणना
> 50 लाखांपर्यंतच्या कर्जावरील जुना दर 8.85% आणि नवीन दर 8.60% च्या आधारावर गणना
> बँक देखील व्याजदरात 0.25% कपता केली तर नवीन दरांवर केलेली गणना लागून होणार

पाच वर्षांच्या कार लोनसाठी लागणार ईएमआय

कर्ज रक्कम जुना ईएमआय नवा ईएमआय दर दर महिन्याला बचत
3 लाख 6,286 रूपये 6,249 रूपये 37 रूपये
5 लाख 10,477 रूपये 10,416 रूपये 61 रूपये
10 लाख 20,953 रूपये 20,831 रूपये 122 रूपये

(जुना व्याजदर 9.40% आणि नवीन दर 9.15%च्या आधारावर गणना)
बँकांनी व्याज दरात 0.25% कपात केल्यावरच ईएमआयमध्ये कपात होणार

नीट २०१९ च्या परीक्षेत चाटेंच्या विद्यार्थ्यांची बाजी (व्हिडिओ)

0

पुणे-नुकत्याच झालेल्या नीट च्या परीक्षेमध्ये चाटे स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ,चाटे क्लासेस ,चाटे  शिक्षण  समूह या सर्व विद्यार्थ्यांनी नीट च्या परीक्षेत उत्तुंग असे यश मिळविले .या परीक्षेला भारतातून सुमारे 14 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात .आणि प्रत्येक विद्यार्थी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्नशील असतो .यासाठी दहावीच्या परीक्षेनंतर निकालाची वा अन्य कसलीही वाट  न पहाता ,विद्यार्थी अकरावीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करतो. अकरावी आणि बारावी या २ वर्षामध्ये विद्यार्थ्याला प्रवेश प्रक्रियेची तयारी करावी लागते ,एमसीक्यू ची तयारी करावी लागते .आणि तो विद्यार्थी २ वर्षे सतत देश पातळीवरच्या परीक्षांची तयारी करत असतो .आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना आज हे यश येथे संपादन करता आले आहे. आज चाटे स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज (निवासी महाविद्यालय )मधील आकाश कोल्हेयाने ६३० गुण मिळवून  उत्तुंग यश संपादन केले आहे. आकाश कोल्हे याचे आई वडील निशा आणि डॉ.प्रशांत कोल्हे  यांनी तसेच आज चाटे शिक्षण समुहाचे प्राध्यापक फुलचंद चाटे यांनी आज सातारा रस्त्यावरील चाटे क्लासेस येथे एकमेकांचे अभिनंदन केले . आणि यावेळी कोळे दाम्पत्यांने चाटे सर यांना धन्यवाद दिले . सायली निकम, आदी यशस्वी विद्यार्थी आणि विद्यार्थी यांनी व त्यांच्या पालकांनी येथे आज प्रत्यक्षात चाटे शिक्षण समूहाच्या कार्यालयात शिक्षक व मान्यवरांना भेटून आनंद व्यक्त केला .या सर्वांना पुढील वाटचालीस चाटे समूहाच्या वतीने शुभेछ्या देण्यात आल्या .

सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्सने मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्स असे केले कंपनीचे नामकरण

मुंबई  – सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्स या अमेरिकेतील जागतिक आरोग्यसेवा कंपनी सिग्ना कॉर्पोरेशन (NYSE:CI) आणि भारतातील समूह टीटीके समूह व मणिपाल समूह यांची संयुक्त भागीदारी असणाऱ्या कंपनीने आवश्यक त्या सर्व मंजुरी मिळाल्यानंतर, आपले नामकरण मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड असे केले आहे. नव्या संरचनेनुसार, सिग्ना कॉर्पोरेशनचा हिस्सा 49 टक्के कायम राहणार आहे, तर मणिपाल समूहाचा हिस्सा 51 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे व टीटीके समूहाने इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून (“आयआरडीएआय”) आवश्यक ती नियामक मंजुरी मिळाल्यावर या संयुक्त भागीदारीतून बाहेर पडण्याचे ठरवले आहे.

नावातील बदलाप्रमाणेच, कंपनीने नवी कॉर्पोरेट ओळखही अवलंबली आहे. त्यामध्ये नव्या लोगोचा व या वेबसाइटचा समावेश असून, ही माहिती www.manipalcigna.com येथे मिळेल. बदल तातडीने लागू होतील आणि भविष्यातील सर्व व्यवसाय कंपनीच्या नव्या नावाअंतर्गत केले जातील.

सिग्ना इंटरनॅशनल मार्केट्सचे अध्यक्ष जेसन सॅडलर यांनी सांगितले, “भारतातील विमा क्षेत्रामध्ये वाढीची प्रचंड क्षमता आहे – हे क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे, आणि सिग्नासाठी ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. गेल्या पाच वर्षांत, आम्ही या वाढत्या बाजारपेठेत लक्षणीय प्रगती केली. भारतातील आमचे स्थान सक्षम होण्यासाठी टीटीके समूहाने बजावलेली भूमिका उल्लेखनीय आहे. मणिपाल समूहाबरोबरच्या आमच्या नव्या संयुक्त भागीदारीमुळे आम्हाला आता सध्याचे नाते अधिक सक्षम करता येईल, नव्या बाजारांचा वेध घेता येईल आणि आमचे ग्राहक, कर्मचारी, क्लाएंट व भागीदार यांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी नावीन्यपूर्ण क्षमता व सेवांना चालना देता येईल.”

मणिपाल एज्यु अँड मेडिकल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. रंजन पै यांनी सांगितले, “मणिपाल समूहाचे एकात्मिक आरोग्यसेवा कौशल्य व मल्टि-स्पेशालिटी रुग्णालयांचे जाळे आणि सिग्नाचे आरोग्य व वेलनेस यातील जागतिक कौशल्य यांची सांगड घातली गेल्याने मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्स कंपनीला भारतातील लोकांना खऱ्या अर्थाने वैविध्यपूर्ण सेवा देणे शक्य होणार आहे. दोन्ही कंपन्या एकमेकांना साजेशा आहेत आणि दोन्ही कंपन्यांच्या क्षमता एकत्र केल्यास आम्हाला भारतातील लोकांना सहजपणे व आयुष्यभर दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करता येणार आहेत. तसेच, भविष्यातील वाढीसाठी मार्ग आखता येणार आहे.”

ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मणिपाल समूहाकडे वैविध्यपूर्ण व प्रस्थापित बिझनेस मॉडेल आहे. यामध्ये जागतिक दर्जाची रुग्णालये बांधणे, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा प्रक्रियांना चालना देणे व शैक्षणिक संस्थांद्वारे सर्वोत्तम वैद्यकीय फॅकल्टी जोपासणे, यांचा समावेश आहे. 200 वर्षांहून अधिक अनुभव असणारी सिग्ना कॉर्पोरेशन 30 देशांत व कार्यकक्षांमध्ये कार्यरत आहे आणि जगभर 16 कोटींहून अधिक ग्राहक आहेत.  कंपनीने भागीदारीच्या अनुषंगाने, तसेच भारतात आरोग्यसेवांची उपलब्धता व आरोग्यसेवा फायनान्सिंग यातील तफावत भरून काढण्याच्या दृष्टीने नवे नाव स्वीकारले आहे.

 मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसुन सिकदर यांनी सांगितले, “आमच्या कंपनीचे नाव बदलले असले तरी कंपनीचे मूलभूत घटक तसेच कायम राहणार आहेत. आम्ही ज्या ग्राहकांना सेवा देतो त्यांचे आरोग्य, कल्याण व मनःशांती यामध्ये वाढ करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मणिपाल समूहाबरोबरच्या या नव्या संयुक्त भागीदारीमुळे आम्हाला स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याच्या हेतूने ग्राहकांना दर्जेदार अनुभव देण्यासाठी व भारतातील लाखो ग्राहकांना उत्कृष्ट आरोग्यसेवा देण्याच्या हेतूने विस्तार करण्यासाठी मदत होणार आहे.”

रिब्रँडिंग व नावातील बदल यामुळे कंपनीचे सध्याचे बिझनेस मॉडेल, एजंट, बँकाश्युरन्स भागीदारी किंवा ग्राहकांच्या सध्याच्या हेल्थ इन्शुरन्स योजना यावर परिणाम होणार नाही. कंपनीचे व्यवस्थापन व कर्मचारीवर्ग कायम राहणार आहे.

मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडविषयी

मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (पूर्वीचे नाव सिग्नाटीटीके  हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड) ही भारतीय समूह टीटीके समूह, भारतातील आरोग्यसेवा व उच्च शिक्षण क्षेत्रातील आघाडीचा मणिपाल समूह आणि 200 वर्षांहून अधिक अनुभव असणारी जागतिक आरोग्य सेवा कंपनी सिग्ना कॉर्पोरेशन यांची संयुक्त भागीदारी कंपनी आहे. मणिपालसिग्नाचे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि महत्त्वाच्या शहरांत व महानगरांत 28 हून अधिक शाखा आहेत. कंपनीने 20,000 हून अधिक एजंट, 250+ प्रमुख ब्रोकर यांचे जाळे निर्माण केले आहे आणि या वितरण जाळ्याद्वारे कंपनी देशभरातील 7,000 हून अधिक पॉइंट ऑफ सेल्स ठिकाणी कार्यरत आहे. मणिपालसिग्नाने हेल्थ इन्शुरन्स उत्पादनांच्या विक्रीसाठी 17 आघाडीच्या बँका, एनबीएफसी व एमएफआय यांच्याशी सहयोगही केला आहे आणि कंपनीकडे भारतातील टिअर 2 व 3 शहरांत 6500 हून अधिक विश्वासार्ह रुग्णालयांचे जाळे आहे.