हरी ईश्वरन म्हणाले, “या क्षेत्रात प्रात्यक्षिक ज्ञान घेण्याची खूप गरज आहे. शिकतानाच प्रत्यक्ष कामाचा अनुभव असेल, तर नोकरी करताना विद्यार्थ्यांना त्याचा जास्त फायदा होतो. आज उद्योगांना मोठ्या प्रमाणात कुशल अभियंत्यांची गरज आहे. त्यामुळे अभियांत्रिकीची पदवी मिळवण्याबरोबरच आवश्यक कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा.”
कुशल अभियंता घडण्यासाठी महाविद्यालयांची स्वायत्ता पूरक
आज जावडेकरांचे पुण्यात शाही स्वागत ..
पुणे-कलमाडी राज गेल्यानंतर बऱ्याच वर्षांनी आज पुणे-लोहगाव विमान तळावर आज आपल्या केंदीय मंत्री असलेल्या नेत्याच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची गर्दी दिसली .अर्थात आता ती भाजपच्या कार्यकर्त्यांची होती .आणि मोदी सरकारच्या द्वितीय कारकिर्दीत पुन्हा केंदीय मंत्री झालेले प्रकाश जावडेकर यांच्या स्वागतासाठी हि गर्दी झाली होती आज पुणे विमानतळावर त्यांचा पुणेरी पगडी ,पुष्पहार व शाॅल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी खासदार गिरीश बापट, पुणे महानगरपालिका सभागृह नेते श्रीनाथ भिमाले ,राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते ,नगरसेवक आणि विधान सभे साठी इच्छुक असलेले नेते उपस्थित होते. आणि जावडेकरांच्या छबी बरोबर आपला सेल्फी काढण्यासाठी काहींची लगबग सुरु होती .
खासदार गिरीश बापट यांच्या अभिवादन रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : लोकसभेच्या निवडणुकीत एेतिहासिक मताधिक्याने विजयी झाल्यानंतर मतदारांना अभिवादन करण्यासाठी खासदार गिरीश बापट यांच्या आज वतीने शहरात अभिवादन रॅली काढण्यात आली. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लोकसभा निवडणुकीत तब्बल 3 लाख 24 हजार 628 मतांनी निवडून आल्यानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी खासदार बापट यांच्या मार्फत शहरातील सहाही विधानसभा मतदार संघात अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे. आज कसबा आणि पर्वती मतदार संघातून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. कसबा गणपती समोरून या रॅलीची सुरुवात झाली. कसबा गणपती पासून फडके हौद चौक, लक्ष्मी रोड, केसरीवाडा, कुमठेकर रस्ता नवी पेठ ते स्वारगेट रस्त्यावरून मार्केट यार्ड, बिबवेवाडी, इंदिरा अप्पर, सुपर, सहकार नगर मार्गे सिंहगड रस्त्यावर या रॅलीचा शेवट करण्यात आला.
जनतेच्या प्रेमामुळेच आजवर नगरसेवक,आमदार,मंत्री आणि आता खासदार या पदापर्यंत पोहचू शकलो. लोकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी ही अभिवादन रॅली काढण्यात आली आहे असे खासदार बापट यावेळी म्हणाले. मतदारांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून शहरातील केंद्रातील प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न असेल. नागरिकांच्या भारतीय जनता पक्षाकडून अपेक्षा असून या निश्चितच या अपेक्षा आम्ही पूर्ण करू. जनतेच्या विकासाच्या कामाला पैसे कमी पडणार नाहीत असे वचन खासदार बापट यांनी यावेळी दिले.
खासदार बापट यांच्या पत्नी गिरीजा, स्नुषा स्वरदा यांच्या सह या अभिवादन रॅलीत सहभागी झाले होते.
आमदार माधुरी मिसाळ, महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक राजेश येनपुरे,सरचिटणीस दीपक मिसाळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले हे उपस्थित होते
8 दिवस उशीरा केरळमध्ये धडकला मान्सून, 12 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
नवी दिल्ली- मान्सूनने आठ दिवसांच्या उशीराने शनिवारी केरळमध्ये धडक मारली आहे. साधरणपण 1 जूनला केरळमध्ये मान्सून धडकतो. हवामान विभाग (आयएमडी)नुसार, दक्षिणमध्ये लक्षद्वीपमध्ये चक्रवाती वादळ तयार झाले आहे. दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात लो प्रेशर तयार झाले आहे. मान्सून पुढील 24 तासात पूर्वेच्या त्रिपुरामध्ये धडकणार आहे. स्कायमेटने या वर्षी 93% आणि हवामान विभागाने 96% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने 9 जूनला येणाऱ्या पाऊसामुळे केरळच्या तिरुवनंतपुरम, कोल्लम, अलपुझा, कोट्टयम, एर्नाकुलम, त्रिशूर, मल्लाप्पुरम आणि कोझिकोडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. तर, 10 जूनला त्रिशूरमध्ये रेड अलर्ट असेल. एर्नाकुलम, मलाप्पुरम आणि कोझिकोड जिल्ह्यांमध्ये 11 जूनला रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊसाचा इशारा दिला आहे.
मान्सून 13 जूनपर्यंत कर्नाटकमध्ये पोहचले
मान्सून श्रीलंकेला कव्हर केल्यानंतर भारताकडे वळला आहे, बंगालच्या खाडीत विक्षोभपासून नॉर्थ-ईस्ट आणि पश्चिम बंगालमध्ये हलका पाऊस पडला आहे. कर्नाटक सरकारने पाउसासाठी मंदिरात पुजा करण्याचे आदेश दिले आहेत. बेलगामच्या सवादत्ती (सौंदत्ती) येलम्मा मंदिरमध्ये पाऊसासाठी पुजा करण्यात येत आहे. या विशेष पुजेसाठी धार्मिक विभाचे मंत्री पीटी परमेश्वर नाईकसहित अनेक मंत्री सामील झाले आहेत.
‘अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुल ‘चा १०० टक्के निकाल
पुणे:‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या शाळांनी माध्यमिक शालान्त परीक्षा (दहावी)च्या परीक्षेत चांगले यश मिळवले आहे .‘अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल’ चा शंभर टक्के निकाल लागला आहे .रुकैय्या शमीम शेख ९३ टक्के मिळवून शाळेत प्रथम आली .एमसीईएस इंग्लिश मिडीयम स्कुल ‘चा निकाल ७८ टक्के लागला.फईका इम्तियाझ अन्सारी ८५ टक्के गुण मिळवून प्रथम आली .अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल चा इंग्रजी माध्यमाचा निकाल ९५ टक्के निकाल लागला . मोहम्मद झकी सांगे ८९ टक्के गुण मिळवून प्रथम आला .सेमी इंग्लिश माध्यमाचा निकाल १०० टक्के लागला .महमद अब्दुल चौधरी ७८ टक्के गुण मिळवून प्रथम आला .उर्दू माध्यमा चा निकाल ९० टक्के लागला . अयाज शेख ८४ टक्के गुण मिळवून प्रथम आला .
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार, मुख्याध्यापक आएशा शेख,( अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुल )मुख्याध्यापक परवीन शेख(‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल’) ,मुख्याध्यापक रुमाना शेख,रबाब खान (एमसीईएस इंग्लिश मिडीयम स्कुल) यांनी यशस्वी विध्यार्थी -विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये 3डी प्रिंटींग व रोबोटिक्सचे शिक्षण
पुणे-विविध अभिनव उपक्रमांमुळे देशात मॉडेल बनलेली व गेले आठ वर्षे उत्तम शैक्षणिक गुणवत्ता राखत शंभर टक्के निकालाची परंपरा जोपासणार्या शिवदर्शन येथील पुणे महानगरपालिकेच्या ‘राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई-लर्निंग’मध्ये शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत 3डी प्रिंटींग आणि रोबोटिक्स प्रशिक्षणाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिका शाळेच्या माध्यमातून असे आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणारी राजीव गांधी अकॅडमी ई-लर्निंग ही पुन्हा देशात अग्रेसर शाळा बनली आहे.
या संदर्भात या प्रकल्पाचा पाठपुरावा करून महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करणारे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सांगितले की, 3डी प्रिंटीग आणि रोबोटिक्स ही नव्या युगाची शैक्षणिक गरज बनली आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देत असतानाच त्यांना प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करता यावा यासाठी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई-लर्निंग मध्ये 3डी प्रिंटीग व रोबोटिक्सच्या 2 स्वतंत्र लॅब उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रथम शिक्षकांना 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार असून त्यानंतर हे प्रशिक्षित शिक्षक इयत्ता 6वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांना रोज एक तास प्रशिक्षण देतील. विद्यार्थ्यांच्या एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत विविध प्रकारचे प्रकल्प त्यांच्याकडून करून घेतले जातील. सध्या 3डी प्रिटींग व रोबोटिक्सचे प्रशिक्षण केवळ इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्येच दिले जाते. मात्र इयत्ता 6वी पासूनच विद्यार्थ्यांना याचे शिक्षण दिल्यास त्यांचा पाया मजबूत होऊन भविष्यात इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल, मेडिसिन, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी क्षेत्रात हे विद्यार्थी अधिक चमकतील तसेच विज्ञानशास्त्र, शरीरशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल अशा प्रत्येक क्षेत्रात हे विद्यार्थी 3डी प्रिंटीगच्या माध्यमातून प्रत्यक्ष नकाशा साकारणे, शरीराचे विविध अवयव साकारणे इत्यादी प्रयोग करून त्याचे 3डी प्रिंटिंग करतील. त्यामुळे पारंपारीक पुस्तकी अभ्यासाला प्रत्यक्ष मॉडेलची जोड देत विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच त्या विषयाचे त्यांचे ज्ञानही अधिक वाढेल असे आबा बागुल म्हणाले.
पुण्यातील स्निकपिक 3डी या कंपनीतर्फे शाळेतील शिक्षकांना याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे असे सांगून आबा बागुल म्हणाले की, यासाठी राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई-लर्निंगमध्ये दोन सुसज्ज वातानुकूलीत लॅब उभारण्यात आल्या असून राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई-लर्निंगमधील विद्यार्थ्यांप्रमाणेच पुणे महानगरपालिकेच्या अन्य शाळांमधील विद्यार्थ्यांना देखील येथे 3डी प्रिंटिग व रोबोटिक्सचे प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहिल. या प्रकल्पातील प्रशिक्षणांतर्गत विद्यार्थ्यांना बहुपयोगी रोबो तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करता येईल. तसेच घरगुती वापरासाठीचे अनेक प्रकारचे छोटे रोबोट देखील विद्यार्थी तयार करू शकतील त्यासाठीचे सर्व साहित्य शाळेतर्फे उपलब्ध करून दिले जाईल. विद्यार्थ्याने तयार केलेल्या या रोबोटचे अनोखे प्रदर्शनही शाळेत भरवले जाईल व त्यातून अन्य विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे आबा बागुल म्हणाले. या प्रकल्पामुळे केवळ राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई-लर्निंगच्याच नव्हे तर पुणे महानगरपालिकेच्या शाळांच्या शैक्षणिक वैभवात मोलाची भर पडली आहे. पुणे महानगरपालिकेच्या शाळा व त्यातील विद्यार्थी देखील अशा प्रगत तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणात मागे नाहीत ही प्रत्येक पुणेकराला अभिमानाची बाब वाटेल हे निश्चित असे आबा बागुल शेवटी म्हणाले.
विश्वशांती डोम ला आयर्लंडच्या माजी पंतप्रधानांची लवकरच भेट
पुणेः “जी२० आंतरपंथिय परिषद २०१९” टोकियो येथे सुरू आहे. यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी आयर्लंडचे माजी पंतप्रधान एन्डा केनी यांची भेट घेऊन त्यांच्याशी विश्वशांती विषयावर विस्तृत चर्चा केली.
याप्रसंगी डॉ. विश्वनाथ कराड यांनी माजी पंतप्रधान एन्डा केनी यांना ‘विश्वशांती डोम’ (तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर – तुकाराम विश्वशांती प्रार्थना सभागृह) ची प्रतिमा भेट दिली. ही प्रतिमा पाहताच त्यांनी आश्चर्य व्यक्त केले व म्हणाले की मानवतेसाठी निर्मित हा घुमट पाहण्यासाठी मी पुण्यात येईल. तसेच त्यांनी भारतीय संस्कृती व भारतीय लोकांबद्दल गौरवोद्गार काढले.
यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूच्या शिष्टमंडळातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण आणि मिटसॉटचे प्रकल्प संचालक डॉ.मिलिंद पांडे हे उपस्थित होते.
चाटेंच्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेतही उत्तुंग यश (व्हिडिओ)
महिलांना शिक्षण, रोजगार देण्याला प्राधान्य-चंद्रकांतदादा पाटील
अमृता फडणवीसांच्या’जय हो’ला लॉस ऐंजलिस मध्ये उत्स्फूर्त दाद
अमेरिकेतील लॉस एंजिलस,कॅलिफोर्निया येथे एक म्युजिक कॉन्सर्ट मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सहभाग घेतला होता. या कॉन्सर्टमध्ये अमृता फडणवीस यांचा हॉट आणि रॉक लुक पाहायला मिळाला.अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियन ओरिजिन यांनी ‘जय हो’ या चॅरिटी शो चे आयोजन केले होते.या शो ला येथे उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली
भारतासह अमेरिकेत असलेल्या कर्करोग व हृदयविकार यासारख्या रुग्णांना मदत मिळावी यामुळे या शोचं आयोजन केले होते.’जय हो’ या शोमधून येणारे सर्व पैसे हे रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार आहेत.
दुसऱ्यांदा पीएम झाल्यावर मोदींचा पहिला विदेश दौरा आज मालदीवला….
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी मालदीव दौऱ्यावर आहेत . दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरचा त्यांचा हा पहिला परदेश दौरा आहे. ते मालदीवची संसद मजलिसलादेखील संबोधित करतील. ९ जून रोजी मोदी श्रीलंकेलाही भेट देतील. १ एप्रिल रोजी श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेला भेट देणारे ते पहिलेच राष्ट्रप्रमुख ठरतील. पहिल्यांदा ट्विट करून मोदी यांनीच ८ व जून रोजी मालदीव व श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती दिली. हा दौरा शेजाऱ्यांना प्राधान्य धोरणाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्ही आपल्या सागरी शेजारी राष्ट्रांसोबतचे संबंध बळकट करणार आहोत. मालदीव व भारत नेहमीच चांगले भागीदार राहिले आहेत. दोन्ही देशांत ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध आहेत. दौऱ्याचे निमंत्रण दिल्याबद्दल राष्ट्रपती इब्राहिम मोहंमद सोलिह यांचे मी आभार व्यक्त करतो. एप्रिलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करतो. आम्ही सर्व भारतीय श्रीलंकेसोबत खंबीरपणे उभे आहोत. दहशतवादाच्या विरोधातील लढाईत श्रीलंकेच्या सोबत आहोत.
कम्पोझिट ट्रेनिंग सिस्टिम
मोदी मालदीवमध्ये राष्ट्रपती सोलिह यांच्यासोबत भारताच्या तटरक्षकसंबंधी रडार प्रणालीची सुरुवात करतील. त्याचा फायदा भारतीय नौदलास हिंदी महासागरात निगराणीसाठी होईल. मोदी मालदीवच्या नॅशनल डिफेन्स सर्व्हिससाठी कंपोझिट ट्रेनिंग सिस्टिमही सुरू करतील. त्याशिवाय सैन्याला प्रशिक्षणासाठीदेखील मदत होणार आहे. परराष्ट्र सचिव विजय गोखले म्हणाले, मोदी मालदीव व श्रीलंकेच्या दौऱ्याद्वारे शेजाऱ्यास प्राधान्य धोरण व सागर सिद्धांत या दृष्टीने भारत कटिबद्धता दर्शवत आहे. सागर सिद्धांत याचा अर्थ हिंद क्षेत्रात सर्वांसाठी सुरक्षा तसेच विकास होय.
मालदीवची एकूण लोकसंख्या सुमारे ५ लाख, पैकी ३० हजार भारतीय वंशाचे
भौगोलिक व लोकसंख्येच्या दृष्टीने मालदीव आशियातील सर्वात लहान देश आहे. मालदीवची एकूण लोकसंख्या सुमारे ५ लाख आहे. पर्यटन हाच उदरनिर्वाहाचे साधन आहे. दरवर्षी सुमारे दहा लाखाहून जास्त पर्यटक देशाला भेट देतात. मालदीवमध्ये सुमारे ३० हजार लोक भारतीय वंशाचे आहेत.
मालदीवचा दौरा का ?: चीनचा प्रभाव कमी करण्याचा उद्देश
सामरिक: मालदीव अरब सागरात महत्त्वाचे
मोदींनी शपथग्रहण समारंभात बिमस्टेक देशांच्या समूहाच्या नेत्यांना निमंत्रण दिले होते. या संघटनेने थायलंड व म्यानमारसारख्या देशांचा समावेश होता. या राष्ट्र गटात मालदीव नाही. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान मोदींच्या मालदीव दौऱ्याची आखणी केली. आपल्याला महत्त्व दिले जात नाही, असे मालदीवला वाटू नये, असा उद्देश आहे. मालदीव दक्षिण आशिया व अरब सागरातील अशा ठिकाणी वसलेले आहे. म्हणूनच सुरक्षेच्या दृष्टीने भारतासाठी महत्त्वाचा ठरतो.
आर्थिक: मोदींनी मालदीवला ९७०० कोटी रुपये दिले
मभारतात आयात होणारे तेल-गॅस मध्य-पूर्वेतून मालदीवच्या जवळून येते. गेल्या वर्षी राष्ट्रपती सोलिह भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा मोदींनी मालदीवला ९७०० कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. गेली काही वर्षे सोडल्यास मालदीव नेहमीच भारताचा अत्यंत विश्वासू असा भागीदार राहिलेला आहे. २०१८ मध्ये मालदीवमध्ये सत्ता परिवर्तन झाले होते. तेव्हा मोदींनी नवे राष्ट्रपती सोलिह यांच्या शपथ समारंभात सहभागी होत कूटनीतीच्या दृष्टीने संदेश दिला होता.
चिनी धाेरण: मालदीववर २२ हजार कोटींचे कर्ज
मालदीवला पंतप्रधान मोदी यांच्या पहिल्या दौऱ्यासाठी मालदीवची निवड करण्यामागे मोठे कारण आहे. चीन एक दशकापासून हिंदी महासागरात आपले वर्चस्व वाढवू पाहत आहे. गेल्या पाच वर्षांत चीनने मालदीवमध्ये व्यापार, आर्थिक मदत, पायाभूत सुविधांचा आराखडा इत्यादी माध्यमातून आपले पाय रोवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. चीनने मालदीवला २२ हजार कोटी रुपयांचे कर्ज लादले आहे. त्यानुसार मालदीवमधील प्रत्येक व्यक्तीवर चीनचे ५.६ लाख रुपये कर्ज होते.
पाकिस्तानने परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना पत्र पाठवून चर्चेचा प्रस्ताव मांडला
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री एस.एम. कुरेशी यांनी पररराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र पाठवून अभिनंदन केले. भारत व पाकिस्तान यांच्यात चर्चेद्वारे संबंध सुधारायला हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. परस्पर सहकार्य, शांती, सुरक्षेसाठी हे गरजेचे आहे. परराष्ट्र सचिवांच्या भारत दौऱ्यानंतर कुरेशी यांनी हे पत्र पाठवले.
राष्ट्रवादी नकोच, वंचित चालेल! काँग्रेस बैठकीत पदाधिकाऱ्यांची मागणी
मुख्यमंत्री काँग्रेसच्या नेत्यांना फोन करताहेत : चव्हाण
माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील हे आपल्यासोबत अनेक काँग्रेस आमदार भाजपमध्ये आणण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्षाचे आमदार फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत . इतकेच नव्हे तर ते आमच्या अनेक आमदारांना फोन करत आहेत. मात्र आता कोणीही पक्ष सोडेल, असे वाटत नसल्याचेही ते म्हणाले.
बैठकीत अनेक विषयांवर पदाधिकाऱ्यांनी केला काथ्याकूट
बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल, राज्यातील वर्तमान राजकीय परिस्थिती, दुष्काळ व इतर प्रश्न, त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. बैठकीला उपस्थित सूत्रांनी माहिती देताना सांगितले की, बैठकीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मदत करीत नसल्याचा आरोप केला आहे. तसेच राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीबाबत विचार करावा, असेही म्हटले आहे. खर्गे आणि अन्य नेत्यांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि यावर विचार केला जाईल असे सांगितले.
भाजपने हुरळून जाण्याची गरज नाही
अशोक चव्हाण म्हणाले, लोकसभेतील यशाने भाजपने हुरळून जाऊ नये. या सरकारवर लोक नाराज आहेत, ही वस्तुस्थिती आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे निकाल वेगवेगळे असू शकतात, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. विधानसभा निवडणुकीतही तेच दिसून येईल.
विखेंचा फाजील आत्मविश्वास
अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस आघाडी शिल्लक ठेवणार नाही, या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले, लोकसभेचा एक विजय मिळाला म्हणून विखे पाटील यांनी फाजील आत्मविश्वास बाळगणे योग्य नाही.
यंदाही मुलींची भरारी..दहावीचा निकाल जाहीर ; राज्याचा ७७.१० तर पुण्याचा ८२.४८ आणि कोकणाचा ८८.३० टक्के निकाल
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. याबाबत शिक्षण मंडळ अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. १ मार्च २०१९ ते २२ मार्च २०१९ दरम्यान परीक्षा पार पडली.यावषीर्ही राज्यात मुलींनी बाजी मारली.यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
या परीक्षेला १७ लाख ८१३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये ९ लाख २७ हजार ८२२ विद्यार्थी तर ७ लाख ७२ हजार ८४२ विद्यार्थिनींचा समावेश होता. विभागवार सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला होता.
मुलीं – 82.82, मुले 72.18
दिव्यांग 83.05
एकून उत्तीर्ण – 1247903
परीक्षा दिलेले- 1618602
100 टक्के गुण – 20 विद्यार्थी ( 16 लातूर, 1 अमरावती, औरंगाबाद 3 )
1794 – 100 टक्के निकाल शाळा
कोकण विभाग अव्वल, मुंबईचा निकाल ७७ टक्के
विभागानुसार निकाल खालीलप्रमाणे :
– पुणे :82.48
– नागपूर :67.27
– औरंगाबाद :75.20
– मुंबई :77.04
– कोल्हापुर :86.58
– अमरावती 71.98
– नाशिक :77.58
– लातूर :72.87
– कोकण :88.30
* निकालाची वैशिष्ट्ये
एकूण 71 विषयांवर घेतल्या गेल्या परीक्षा
विद्यार्थ्यांना 1 वाजता ऑनलाइन बघता येणार निकाल
19 विषयांचा निकाल 100 टक्के
1हजार पेक्षा अधिक शाळांचा निकाल 100 टक्के
विद्यार्थ्यांना 1 वाजता ऑनलाइन बघता येणार निकाल
* असा पहा निकाल
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.mahresult.nic.in
‘जेआरव्हीजीटीआय’मध्ये फॅशन शो
पुणे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘जगन्नाथ राठी व्होकेशनल गायडन्स ऍन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’च्या (जेआरव्हीजीटीआय) वतीने ‘ङ्गॅशन शो’चे आयोजन करण्यात आले होते. ङ्गॅशन डिझाईनिंगच्या विद्यार्थ्यांनी वर्षभरात तयार केलेल्या पोशाखांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
चित्रपट किंवा नाटकात अभिनयासाठी फॅशन डिझायनरची भूमिका महत्त्वाची असते. आपल्या देशातील विविध प्रांतात वैविध्यपूर्ण पेहराव आहेत. अशा विविधतेत नाविन्याचा शोध घेण्याचा यशस्वी प्रयत्न डिझायनर करीत असतात. त्यांच्या कल्पकता दाद देण्यासारखी आहे. असे मत अभिनेत्री पर्ण पेठे यांनी यावेळी व्यक्त केले.
सोसायटीचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, डॉ. सविता केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रध्दा कानेटकर यांनी संयोजन केले.









