नवी दिल्ली : मराठी भाषेतून कवी सुशीलकुमार शिंदे यांना ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतय’ या काव्य संग्रहासाठी ‘युवा पुरस्कार’ तर लेखक सलीम सरदार मुल्ला यांना ‘जंगल खजिन्याचा शोध’ या कादंबरीसाठी ‘बालसाहित्य पुरस्कार’ आज साहित्य अकादमीने जाहीर केला आहे.
साहित्य क्षेत्रातीत प्रतिष्ठीत संस्था म्हणून गौरव असणा-या साहित्य अकादमीने ‘साहित्य अकादमी पुरस्कार २०१९’ ची आज घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कांबर यांच्या अध्यक्षतेखाली अगरतळा येथे झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २३ भाषांकरिता ‘युवा पुरस्कार’ तर २२ भाषांकरिता ‘बाल साहित्य पुरस्कार’ विजेत्यांची घोषणा करण्यात आली.
युवा पुरस्कारासाठी २३ प्रादेशिक भाषांमधील ११ काव्य संग्रह, ६ लघु कथा, ५ कादंबरी आणि एका समीक्षात्मक पुस्तकाची निवड करण्यात आली. मराठी साहित्य मधून ठाणे (प.) येथील कवी सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतय’ या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. ५० हजार रूपये आणि कांस्यपदक असे पुरस्काराचे स्वरूप असून साहित्य अकादमीच्या विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी भाषेकरिता गणेश आवटे, प्रफुल्ल शिलेदार आणि श्रीकांत देशमुख यांचा परिक्षक मंडळामध्ये समावेश होता.
बाल साहित्य पुरस्कारासाठी २२ प्रादेशिक भाषांमधील साहित्य कलाकृतींची निवड करण्यात आली. मराठी साहित्यामधून सलीम सरदार मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या कादंबरीची बालसाहित्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ५० हजार रूपये आणि कांस्यपदक असे पुरस्काराचे स्वरूप असून यावर्षी १४ नोव्हेंबर या बालदिनी विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी भाषेकरिता रंधीर शिंदे, अतुल पेठे आणि मिना गवानकर यांचा परिक्षक मंडळामध्ये समावेश होता.
‘शहर आत्महत्या करायचं म्हणतय’ या काव्य संग्रहासाठी सुशीलकुमार शिंदे यांना ‘युवा पुरस्कार’ तर सलीम सरदार मुल्ला यांना ‘बाल साहित्य पुरस्कार’
मुथूट फायनान्सवर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न, गोळीबारात एकाचा मृत्यू तर तीन जखमी
नाशिक- दिवसेंदिवस नाशिकमध्ये चोरी, दरोडे आणि इतर गुन्हे वाढतच आहेत. यातच आता नाशिकमधून दरोड्याची आणखी एक घटना समोर आली आहे. सिटी सेंटर मॉल जवळच्या मुथूट फायनान्स कार्यालयाजवळ आज गोळीबार झाला. चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्याने हा गोळीबार केला, या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या ऑडिटरचा मृत्यू झाला आहे. तर वॉचमनसह तीन जण जखमी आहेत. या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.
नाशिकच्या उंटवाडी परिसरात असलेल्या मुथूट फायनान्स कंपनीवर दरोडा टाकण्यासाठी सशस्त्र दरोडेखोर आले होते. त्यांच्याकडे रिव्हॉल्वर होती. चोरट्यांना जे कोणी अडवेल, त्यांच्यावर ते फायरिंग करत होते. या फायरिंगमध्ये तीन जण जखमी झाले. यामध्ये वॉचमन आणि ऑडिटसाठी दक्षिणेकडून आलेल्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. या अधिकाऱ्याला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी आणले होते, पण त्यांचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे स्वत: घटनास्थळी दाखल झाले आहेत. पण दिवसा ढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी हा गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
विश्वास नांगरे पाटील यांच्या नियुक्तीनंतर नाशिकमधील गुन्हेगारी आटोक्यात येईल, अशी भावना नाशिककरांची होती. पण दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याने पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिक शहरात नेमकं काय चाललंय असा प्रश्न सध्या नाशिककरांना पडतोय. एकीकडे शहरांमध्ये गुन्ह्यांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे शहरातील गुंडांची मजल आता थेट पोलिस कर्मचाऱ्यांवर हात उचलण्यापर्यंत पोहचली आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील गुन्ह्यांचा आढावा घेतला, तर चोरी, घरफोडी, गाड्यांची तोडफोड, पोलिसांवरील हल्ले अशा घटना कधी नव्हे त्या शहरात घडत आहेत.
वीर चॊत्रानी, अभिषेक अगरवाल, तन्वी खन्ना, यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
अमनोरा मॉल ग्लास कोर्ट, आयस्क्वॅश अकादमी, चंचला संदीप कोदरे स्पोर्टस् क्लब, मुंढवा, आणि आरएसआय येथील स्क्वॅश कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पुरुष गटात महाराष्ट्राच्या वीर चॊत्रानी याने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत सर्व्हिसेसच्या पंधराव्या मानांकित संदीप जांगराचा 11-9, 6-11, 11-6, 11-5असा पराभव उपांत्य फेरीत धडक मारली. चुरशीच्या झालेल्या लढतीत तिसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या अभिषेक अगरवाल याने सहाव्या मानांकित सर्व्हिसेसच्या रणजित सिंगचा 11-9, 11-5, 9-11, 11-9 असा पराभव करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले
वीर चॊत्रानी(महाराष्ट्र)वि.वि.संदी
महिला गट:उपांत्यपूर्व फेरी:
तन्वी खन्ना(दिल्ली)[4]वि.वि.सुनीता पटेल(महाराष्ट्र) 11-4, 11-6, 11-6;
पुणेकारांचेच प्रश्न सोडविण्यासाठी दिल्लीत …खा. बापट
पुणे- ज्यांनी मला आशीर्वाद देवून प्रेमाने बहुमताने निवडून दिले त्या पुणेकरांचे प्रश्न , समस्या सोडविण्यासाठीच आपण संसदेत प्रवेश करतोय असे आज संसदीय कामकाजाला प्रारंभ करण्यापूर्वीच पहिल्या पत्रकार परिषदेत खा. गिरीश बापट यांनी म्हटले आहे. सोमवार पासून त्यांच्या प्रत्यक्ष खासदार म्हणून कामाला प्रारंभ होणार आहे … त्यापूर्वी त्यांनी आज पत्रकार परिषदेत केलेले हे निवेदन जसेच्या तसे …
पाटील प्लाझा बेकायदेशीर स्टॉल्स विरोधी गाळेधारकांची जोरदार निदर्शने व रस्ता रोको
महापौर आणि आयुक्तांनी लक्ष घालावे यासाठी विनंती
पुणे- मित्रमंडळ चौकाजवळील पाटील प्लाझा समोरील फूटपाथवर पुणे महानगरपालिकेने बेकायदा ठेवलेल्या स्टॉल्स विरोधात पाटील प्लाझातील सुमारे 217 गाळेधारक, मालक व कर्मचारी यांनी पाटील प्लाझा समोर जोरदार निदर्शने व रस्ता रोको केले. तसेच मित्रमंडळ ते शनिवारवाडा हा ‘नो हॉकर्स झोन’ असूनही पाटील प्लाझा समोर बेकायदा स्टॉल्स फूटपाथवर उभे करून तेथील वाहतूकीला व शांततेला बाधा आणण्याच्या पुणे महानगरपालिकेच्या कृतीला विरोध म्हणून मित्रमंडळ चौक परिसरातील नागरिकांनी देखील निदर्शनात सहभाग घेतला. तसेच काल महापौर मुक्ता टिळक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व प्रत्यक्ष पाहणीचा आग्रह धरला. त्यावेळी ‘हा स्टॉलचा प्रश्न मला माहीत असून येत्या सोमवारी अथवा मंगळवारी प्रत्यक्ष जागेला मी भेट देईन व त्यातील काही स्टॉल्स तरी तेथून हलवता येतील का याबद्दल अधिकार्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल’ असे त्या म्हणाल्या. तसेच पाटील प्लाझा गाळेधारकांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना पत्र देऊन तेथे प्रत्यक्ष भेटीची मागणी केली. आजच्या निदर्शनात सुमारे 200 हून अधिक गाळे धारक व कर्मचारी तसेच मित्र मंडळ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘या ठिकाणी प्रतिकात्मक रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करून पुणेकरांची गैरसोय आम्ही टाळली व त्यामुळे नागरीकांना मनस्ताप झाला नाही तसेच पोलिसांनी देखील सहकार्य केले प्रतिकात्मक रास्ता रोको बरोबरच शांततामय निदर्शने केली’ असे पाटील प्लाझा गाळे धारकांच्या वतीने अंकुश भोसले आणि रमेश शेट्टी यांनी सांगितले. तसेच पुणे महानगरपालिकेच्या या निर्णयाविरूद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याचे ते म्हणाले. या निदर्शनात महिला देखील सहभागी झाल्या होत्या. हातात घोषणा फलक व बॅनर घेऊन पुणे महानगरपालिकेच्या निषेध केला जात होता. हे शांततामय आंदोलन बघण्यासाठी देखील परिसरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली व या आंदोलनास पाठिंबा दिला. त्यामध्ये मित्र मंडळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्याने होते.
मॉलमध्ये ग्राहकांसाठी पार्किंग मोफतच- बेकायदा शुल्क घेणाऱ्यांवर कारवाई करा …अमोल बालवडकर
पुणे-पुणे शहरात मॉलमध्ये जाणाऱ्या ग्राहकांकडून त्या मॉलची पार्किंगची सुविधा वापरण्यासाठी शुल्क वसूल केले जात आहे . अनेक ठिकाणी दुचाकींसाठी 20 रुपये, तर चारचाकी वाहनांसाठी 40 रुपये असे शुल्क आकारले जात आहे . ही शुल्क आकारणी आता बेकायदा असल्याचे मनपाने जाहीर केले आहे.असून ती तातडीने थांबवावी अन्यथा पालिका प्रशासनाने कारवाई करावी अशा आशयाचा ठराव आज शहर सुधारणा समिती ने संमत केला आहे. समितीचे अध्यक्ष नगरसेवक अमोल बालवडकर यांनी हि माहिती दिली .
पुणे मनपाच्या शहर सुधारणा समितीची आज (शुक्रवार) बैठक झाली. त्यामध्ये या पार्किंग शुल्कावर चर्चा झाली. यापुढे मनपा हद्दीतील सर्व मॉलमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी शुल्क वसूल करणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले. यासंदर्भात सर्व मॉलला लवकरच नोटीसही पाठविली जाणार आहे. या विषयाचा ठराव आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला, अशी माहिती शहर सुधाणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी दिली.
मॉल, रुग्णालये , व्यापारी संकुले अशा विविध इमारतींना आपणाकडे येणाऱ्या ग्राह्कांसाठी वाहनतळ ठेवणे नियमानुसार बंधनकारक असून त्या अनुषंगानेच त्यांच्या बांधकामांचे नकाशे महापालिका नियमित करते .या मागे उद्देश एवढाच असतो कि संबधित इमारतीत येणाऱ्या व्हिजिटर ची वाहने रस्त्यावर येवू नयेत .आणि ती इमारतीच्या वाहनतळात सुरक्षित उभी करता यावीत . मात्र अशा इमारतीची वाहन तळे अनेक ठिकाणी ठेका पद्धतीने राकट इसमांना चालविण्यास देण्यात आली असून संबधित या द्वारे बेकायदेशीर रित्या नागरिकांकडून पैसे उकळत आहेत. या व्यव्हारात पुण्यात रोज कित्येक लाखांची उलाढाल होते. दरम्यान यापूर्वी काही वर्षांपूर्वी महापालिकेने आणि महापालिकेतील मुख्य सभेने यावर बंधने टाकून कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता . पण पुढे तो यशस्वी झाला नाही आणि विषय सोडून देण्यात आला. आता पुन्हा यापैकी मॉल चा विषय चर्चेला येणार आहे.
छात्र भारती विद्यार्थी संघटना आक्रमक शिक्षणमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे
एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे २० गुण कमी केल्याप्रकरणी असंतोष
मुंबई (प्रतिनिधी) –शिक्षणमंत्री होश मे आओ, विनोद तावडे गो बॅक, विनोद तावडे खुर्ची खाली करा अशा घोषणा देत छात्र भारती
विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिराचा परिसर आज दणाणून सोडला. १०वी, १२वी
करिअर मार्गदर्शन कार्यशाळेच्या उदघाटनाला शिक्षणमंत्री विनोद तावडे आज रविंद्र नाट्य मंदिर येथे आले होते.
त्यावेळी एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे २० गुण कमी केल्याप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत छात्र
भारतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष रोहीत ढाले, उपाध्यक्ष विशाल
कदम, सुनिल राठोड, विकास पटेकर, सचिन काकड, जितेश किर्दकुडे, अविनाश बनसोडे, आशिष जाधव, निकेत
वाळके, समीर कांबळे, निलेश झेंडे, दिपाली आंबे, रेवत थोरात आदींनी आंदोलनात सहभाग घेतला होता.
तुकडी वाढीने प्रश्न मिटणार नाही
आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करताना तुकड्या वाढवत आहोत आणि लेखी परीक्षांचे गुण धरावेत यासाठी
केंद्राशी बोलणी सुुरु आहे, असं शिक्षणंत्री विनोद तावडे यांनी यावेळी सांगितलं. त्यावर आक्षेप घेत छात्रभारतीचे मुंबई
अध्यक्ष रोहीत ढाले यांनी, तुकडी वाढीने प्रश्न मिटणार नाही. सर्व अनुदानित तुकड्या आणि कॉलेजेस आधी
एसएससी बोर्डासाठी राखून ठेवावेत. आधी एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची अॅडमिशन करा मगच इतरांची
अॅडमिशन. विनाअनुदानित तुकडीतील अकरावी प्रवेश गरीब मुलांना महाग पडेल. तसेच अंतर्गत गुण न
मिळाल्यामुळे एसएससी बोर्डांचे जे विद्यार्थी नापास झाले आहेत त्यांना प्रमाणशीर अंतर्गत गुण देऊन पास करावे,
असा आग्रह धरला. त्यानंतर याविषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी छात्र भारतीच्या शिष्टमंडाळासोबत बैठकीचे
आश्वासन तावडे यांनी दिले.
एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षांचे अंतर्गत २० गुण रद्द करत १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा
निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला होता. या निर्णयामुळे एसएससी बोर्डाची जवळपास ४ लाख मुलं नापास झाली आहेत.
याउलट सीबीएसई आणि आयसीएससी बोर्डांनी तोंडी परीक्षांचे गुण विद्यार्थ्यांना देऊ केले आहेत, त्यांचा निकालही
चांगला लागला आहे. या सगळ्याचा फटका अकरावी प्रवेशावेळी एसएससी बोर्डांच्या मुलांना बसणार आहे. नामांकित
कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही, विनाअनुदानित तुकड्यांमध्ये जादा फी देऊन प्रवेश घ्यावा लागेल अशा अनेक
अडचणींचा सामना एसएससी बोर्डांच्या मुलांना करावा लागणार आहे. यामुळे एसएससी बोर्डांच्या विद्यार्थी व
पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
महापालिकेवर कंट्रोल माझाच;लबाड अधिकाऱ्यांची खैर नाही-खा. बापट (व्हिडिओ)
महाराष्ट्राच्या माथ्यावरून दुष्काळाचा डाग पुसणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरच राज्याचे मार्गक्रमण सुरू असून शेतकरी हाच विकासाचा केंद्रबिंदू आहे. शेती आणि शेती संलग्न कामावर आतापर्यंत दीड लाख कोटी रुपयांचा निधी सरकारने खर्च केला आहे. साताऱ्यासह राज्यातील दुष्काळी भागात जलयुक्त शिवार योजनेसह नियोजनबद्ध इतर जलसंधारणाची कामे करून महाराष्ट्राच्या माथ्यावरचा दुष्काळाचा डाग कायमचा पुसणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय शिवनगर (रेठरे बुद्रुक) ता. कराड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या शेतकरी मेळाव्यात श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल-रुकिमणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील, आमदार शंभूराज देसाई, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार पृथ्वीराज देशमुख, कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, मदनराव मोहिते, नीता केळकर आदी उपस्थित होते.
शेतीमध्ये नवे तंत्रज्ञान आणण्याचे काम सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री.फडणवीस पुढे म्हणाले, कृत्रिम बुध्दिमत्तेसारख्या अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेती क्षेत्रात आणण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. याच तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल पद्धतीचा वापर केल्यास पिकांवरील कीड नियंत्रणासाठी त्याचा उपयोग होणार आहे. याचे काम प्रायोगिक तत्वावर राज्यातील सहा जिल्ह्यात सुरु आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या सेवा सोसायट्या ॲग्री बिझनेस सोसायट्यांमध्ये परावर्तित करण्याचे काम राज्यातील 10 हजार गावांमध्ये सुरू आहे.
साखर कारखानदारी हा शेतकऱ्यांचा कणा आहे, त्यामुळे या साखर उद्योगाला उर्जितावस्था देण्यासाठी केंद्रासह राज्य शासनाने अत्यंत सकारात्मक निर्णय घेतले असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, साखरेला मिनिमम सेलिंग प्राईज सारखा महत्वाचा कायदा केंद्र शासनाने लागू केल्यामुळेच साखर कारखाने ऊस उत्पादकांना संपूर्ण एफआरपीची रक्कम देऊ शकले. यावर्षीही राज्यातील 96 टक्के कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे पेमेंट शेतकऱ्यांना दिले असून याबाबतीत महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. त्याचबरोबर इथेनॉलचे नवीन धोरण आखल्यामुळे आज इथेनॉलला मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. या धोरणामुळे देशासमोरील इंधनाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच इथेनॉलवरील जीएसटी केवळ पाच टक्के आकारल्यामुळे साखर कारखान्यांना त्याचा फायदा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देणेही कारखान्यांना शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्याचे काम सुरू आहे. राज्यातील तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत विविध विकासाची कामे पोहोचवून त्यांचे जीवन सुखकर करण्याचे काम सरकारने केले आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसारख्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब जनतेला कोट्यवधी रुपयांची मदत मिळाली आहे.
यावेळी डॉ. अतुल भोसले, मदनराव मोहिते यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरेश भोसले यांनी केले,तर आभार कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप यांनी मानले. यावेळी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारत स्वत:चा अवकाश स्थानक बनवणार-डॉ.के.सिवन
नवी दिल्ली-चांद्रयान-2 मोहिमेसह इस्रोच्या आगामी अंतराळ मोहिमांबाबत माहिती देण्यासाठी केंद्रीय ईशान्य राज्य विकास, पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन, अणु ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांच्याबरोबर पत्रकार परिषद घेतली.
यावेळी डॉ. सिंग यांनी वैज्ञानिक समुदायाच्या मेहनतीची प्रशंसा केली आणि सामान्य माणसाचे जीवनमान सुधारण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञानाच्या वापराचा लाभ अधोरेखित केला. चंद्रावर पाणी आहे हे सिद्ध करण्यास चांद्रयान-1 महत्त्वाचे होते, असे ते म्हणाले. आगामी गगनयान अभियानाबाबत सिंग म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होतील तेव्हा 2022 मध्ये भारत पहिले मानवी अंतराळ यान पाठवेल. या अभियानासाठी सरकारने 10 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत.
इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी चांद्रयान-2 मोहिमेसह गगनयान आणि अन्य मोहिमांची माहिती दिली. 2023 मध्ये शुक्र ग्रहावर एक मोहिम राबवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. तसेच स्वत:चे अवकाश स्थानक उभारण्यासाठी इस्रो प्रयत्नशील असल्याचे सिवन म्हणाले. यावेळी अंतराळ विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
काॅसमाॅस बँकेतून चाेरीला गेले 94 काेटी; परत मिळाले फक्त 10 लाख
पुणे – काॅसमाॅस बँकेचे मुख्यालय असलेल्या पुण्यातील शाखेतील एटीएम स्विच सर्व्हर सायबर भामट्यांनी हॅक करून बँकेच्या व्हिसा व रुपे डेबिट कार्डधारकांची माहिती आधी चाेरली. त्याआधारे व्हिसा डेबिट कार्डद्वारे ३० देशांत मिळून एकाच वेळी ९४ काेटी ४२ लाख रुपये काढून घेतल्याची घटना आॅगस्ट २०१८ मध्ये घडली हाेती. सायबर गुन्हे शाखेने आतापर्यंत १३ आराेपींना अटक करून त्यांच्याकडून केवळ १० लाख रुपयेच वसूल केले. वेगवेगळ्या देशांतील आंतरराष्ट्रीय हॅकर्सची टाेळी या गुन्ह्यात कार्यरत असल्याने त्यांच्यापर्यंत पाेहोचण्यात तपास यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे उर्वरित रक्कम परत मिळण्याची शक्यता आता धूसर बनली आहे.
परदेशातील बँकांशी आर्थिक व्यवहार सुरक्षित व्हावा या दृष्टीने ‘स्विफ्ट’ हे काॅम्प्युटर साॅफ्टवेअर तयार करण्यात आलेले आहे. एका देशातील बँकेतून दुसऱ्या देशातील बँकेत पैसे हस्तांतरित करण्यासाठी स्विफ्टद्वारे संबंधित खात्यांची खातरजमा करून आर्थिक व्यवहारासाठी मान्यता दिली जात असते व त्यानंतर बँका व्यवहार करून पैशांची देवाणघेवाण करतात. याकरिता गाेपनीय पद्धतीने ८ ते १२ आकडी स्विफ्ट काेड बँकांकडे असताे. युजरनेम व या पासवर्डशिवाय काेणी पैसे काढून घेऊ शकत नाही. स्विफ्टच्या मान्यतेनंतर बँकेत जे आर्थिक व्यवहार केले जातात त्यानुसार स्विफ्ट रिपाेर्ट दाेन्ही बँकाना पीडीएफ फाइलद्वारे जाऊन नेमके कशा प्रकारे व्यवहार पूर्ण झाला याची माहिती मिळत असते. मात्र, हॅकरने स्विफ्ट सिस्टिम हॅक केल्यानंतर अधिकृतरीत्या बँकेचा अधिकारी असल्याचे भासवून बँकेची व्यवहारास मान्यता मिळवली व परदेशात बसून आॅनलाइन व्यवहार करण्यात आले. बँकेला सुटी असेल त्या दिवशी अशा घटना झाल्याने हे प्रकार बँकेला समजण्यास उशीर हाेताे आणि हॅकर्स रक्कम काढतात.
व्हिसा-काॅसमाॅसमध्ये पैशांचा वाद : आंतरराष्ट्रीय व्यवहार हाेत असताना प्रत्येक बँकेची एक ठरावीक पत असते. तेवढ्या रकमेपर्यंतच दुसऱ्या बँकेतून किंवा एटीएममधून व्यवहार हाेणे अपेक्षित असते. सरासरी किती व्यवहार परदेशातील बँकेच्या एटीएमवरून ग्राहकांद्वारे व्यवहार हाेऊ शकतात त्यानुसार ही पत निश्चित केली जात असते. काॅसमाॅस बँकेची अशीच ठरावीक रकमेची मर्यादा असताना हॅकर्सने हजाराे ट्रान्झॅक्शन करून मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढली. व्हिसा डेबिट कार्डद्वारे सुमारे १२ हजार व्यवहारांद्वारे एकूण ७८ काेटी रुपये भारताबाहेर काढण्यात आले, तर रुपे डेबिट कार्डद्वारे २८४९ व्यवहारांद्वारे अडीच काेटी रुपयांचे व्यवहार भारतात झालेले आहेत. एकूण १४,८४९ व्यवहारांद्वारे ८० काेटी ५० लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार व्हिसा व एनपीसीआय यांनी पाठवलेल्या ट्रान्झॅक्शन रिक्वेस्ट्स व्हिसा व एनपीसीआय यांना काॅसमाॅस बँकेने अप्रूव्ह केल्याचे भासवून आराेपींनी ११ आॅगस्ट राेजी ही रक्कम काढली. नंतर १३ आॅगस्ट राेजी १३ काेटी ९२ लाख रुपये काढले. परदेशात पैसे काढण्याची पत असताना काॅसमाॅसच्या खात्यासंदर्भात व्हिसाकडून जादा पैसे कसे दिले गेले, यावरून आता वाद सुरू आहे.
आराेपींना शाेधण्यात विदेशी यंत्रणांचे साहाय्य
या प्रकरणाचा तपास करणारे पाेलिस निरीक्षक दीपक पायगुडे म्हणाले, आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. सायबर क्राइमने पाच लाख ५५ हजार रुपये राेख, १४ माेबाइल, २४ हार्डडिस्क, तीन सीडी, एक डीव्हीडी, तीन पेनड्राइव्ह, एक सिमकार्ड, दहा डेबिट कार्ड, एक लॅपटाॅप जप्त केला आहे. तर, आराेपींच्या बँकेतील ९८ हजार रुपये गाेठवण्यात आले आहेत. ज्या ३० देशांतून पैसे काढण्यात आले त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी हे देश तपासात सहकार्य करत आहेत. परदेशातील दाेन आराेपी आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपुष्प: ताम्हण, पुण्यातून झाले आहे काय हद्दपार …?
ताम्हण (किंवा तामण, जारूळ बोंद्रा / बुंद्रा या नावांनीही परिचित) (शास्त्रीय नाव : Lagerstroemia speciosa किंवा Lagerstroemia reginae) हा मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा हा वृक्ष आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात नदीनाल्याच्या काठाने व विदर्भातही सर्वत्र दिसतो. चांगली उंच वाढणारी झाडे फणसाडच्या व रत्नागिरीच्या जंगलात दिसतात. मुंबईत अनेक ठिकाणी ही झाडे दिसतात. हा फुले देणारा वृक्ष आहे. या वनस्पतीला फुले साधारणपणे १ मे च्या सुमारास म्हणजेच महाराष्ट्र दिना काळात येत असल्याने याचे फूल महाराष्ट्राचे राज्यपुष्प आहे. तामणाचे फूल लालसर-जांभळ्या रंगामुळे ओळखले जाते. मूळचे उपखंडातील असणारे हे फूल आपल्या लावण्यगुणांमुळे आता युरोप-अमेरिकेतही पोचले आहे कोकणात या वृक्षाला ‘मोठा बोंडारा’ असे म्हणतात.
कोकणात सर्वत्र नदी-नाल्यांच्या काठांवर, बंगाल, आसाम, म्यानमार, दक्षिण भारत, अंदमान निकोबार आणि श्रीलंकेतील जंगलांमध्येही ते आढळतात. सर्वसाधारणपणे हा वृक्ष मध्यम आकाराचा, गोलसर, डेरेदार, पर्णसंभाराने शोभिवंत दिसतो.लहान झाडालाही फुले येतात. तामण हा रस्त्याच्या कडेने सावलीसाठी लावण्यास उत्तम वृक्ष आहे. बियांपासून सहज रोपे तयार करता येतात. झाडाची वाढ लवकर आणि जोमाने होते.
झाडाची अन्य नावे
इंग्रजी – क्वीन्स क्रेप, प्राइड ऑफ इंडिया, जायंट क्रेप
हिंदी – जरूल, अर्जुन
बंगाली – जारूल, अजहार
लॅटिन – लॅगस्ट्रोमिया रेजिनी/फ्लॉस रेजिनी
बहरण्याचा हंगाम
पानगळीचा वृक्ष असल्याने पानगळ फेब्रुवारी, मार्च महिन्यात होते. एप्रिलपासून नवीन पालवी फुटायला सुरुवात होते, त्यानंतर फुलोरा येतो कधी कधी तर पालवी व फुलोरा एकदमच येतो. फुले नाजूक मुलायम असतात. खालून वर टोकाकडे उमलत जातात. फुलोरा फांद्याच्या टोकाला येतो. एक फुल ५-७ सेमी आकाराचे. झालरीसारख्या पाकळ्या असणारे असते. पाकळ्यांचा रंग जांभळा, लव्हेंडर असतो. गुलाबी किंवा फिकट गुलाबी रंगाची फुले असणारे तामण वृक्षही आढळून येतात. फूल दिसायला सुंदर असल्यामुळे त्याला महाराष्ट्राचे राज्यपुष्प हा मान मिळाला असावा. फुलांचा बहर उन्हाळ्यात सुरू होतो. दोन, तीन महिने टिकतो. जर झाडाला व्यवस्थित पाणी मिळाले तर फुलांचा बहर वर्षातून दोनदा येऊ शकतो. एप्रिल ते जून महिन्याच्या रखरखत्या ऊन्हातही हे फूल सर्वांचे लक्ष वेधून घेते.
फुलाचे वैशिष्ट्य
हे फूल पूर्ण उमलल्यावर सहा-सात सेंटिमीटर व्यासाचे होते. झालरीसारखी दुमड असणाऱ्या सहा किंवा सात नाजूक, तलम चुणीदार पाकळ्या हे या फुलाचे वैशिष्ट्य. फुलातील रंगसंगती अप्रतिम असते. शांत, शीतल, प्रसन्न रंगाच्या पाकळ्या, त्यांच्या मध्यभागी विरुद्ध रंगाचे (काँट्रास्ट कलर) पिवळेधमक नाजूक पुंकेसर, पुंकेसरांची संख्या अनिश्चित पण २० पेक्षा जास्त असते. फुलांची रंगछटा जमीन, पाणी हवामान अशा घटकांनुसार बदलू शकते
झाडाची संरचना
खोडा-फांद्यांची साल पिवळसर, करड्या रंगाची, गुळगुळीत असते. पेरूच्या झाडाच्या सालीसारखी ती दिसते. सालीचे पातळ, अनियमित आकाराचे पापुद्रे निघून गळून पडतात. त्या ठिकाणी फिकट रंगाचे चट्टे पडतात. पाने संमुख, साधी, मोठी, लांबट, लंबगोल; पण टोकदार असतात. ती वरच्या बाजूने गडद हिरवीगार; तर खालून फिकट हिरवी दिसतात. हिवाळ्यात पानगळ होताना ती तांबट रंगाची होतात. झाडाचे हे रूपही अत्यंत मनोहारी असते. वसंत ऋतूची चाहूल लागताच नवीन पालवी फुटू लागते. साधारणपणे पालवीबरोबर किंवा आगेमागे फुलांचा बहर सुरू होतो. २५-३० सेंटिमीटर लांबीचे फुलोरे फांद्यांच्या शेंड्यांजवळ येऊ लागतात. फुले खालून वर टोकाकडे उमलत जाणारी जांभळ्या रंगाची; अतिशय देखणी दिसतात.
उपयोग
झाडाचे लाकूड उंच, मजबूत, टिकाऊ, चमकदार लाल रंगाचे असून सागाला पर्याय म्हणून वापरले जाते. लाकडावर उत्तम प्रकारे कोरीवकाम करता येते. समुद्राच्या खार्या पाण्याचा लाकडावर परिणाम होत नाही. ते लवकर कुजतदेखील नाही त्यामुळे बंदरामध्ये खांब रोवण्यासाठी व बोटीसाठी वापरतात. त्याचा वापर इमारती, पूल आणि विहिरीचे बांधकाम, जहाजबांधणी, रेल्वे वॅगन; तसेच विविध प्रकारच्या वस्तू बनविण्यासाठी होतो. झाडाचे साल औषधी असते. ताप आल्यास याच्या सालीचा काढा दिला जातो.
पर्धेत नमिश हूड, रुमा गायकवारी ठरले महागडे खेळाडू – स्पर्धेत 133 खेळाडूंचा सहभाग
पुणे- पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसीठी झालेल्या लिलावात नमिश हूड, रुमा गायकवारी हे सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर 16 जूनपासून सुरू होणार आहे.
या लीगमध्ये 6 संघांमध्ये 8,10, 12 व 14 वयोगटाखालील एकुण 133 खेळाडू आपले कौशल्य पणाला लावतील.
8 वर्षाखालील गटात नमिश हूडने 4000 गुण मिळवत सर्वात महागड्या खेळाडूचा मान मिळवला असून त्याला विपार स्पिडिंग चिताज संघाने विकत घेतले आहे. त्यापाठोपाठ रुमा गायकवारी(3,900गुण, कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स), पार्थ देवरुखकर (3,500गुण, फ्लाईंग हॉक्स), रित्सा कोंडकर(3,500गुण, इंटेन्सिटी टेनिस अकादमी रायजिंग इगल्स), समृद्धी भोसले(3,300गुण, पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स हे खेळाडूही लिलावमध्ये सर्वाधीक महाग विकले गेले.
याआधीच्या ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेमुळे शहरांतील कुमार टेनिसपटुंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली आणि यामुळे त्यांच्या कामगिरीत सुधारणा होऊन हे खेळाडू राज्यभरातच नव्हे तर देशातही आपल्या क्रमवारीत आघाडीवर आहेत. यामध्ये सालसा अहेर, ऋतुजा चाफळकर, गार्गी पवार, वैष्णवी आडकर, मानस धामणे यांच्यासारख्या राष्ट्रीय खेळाडूंना या लीग स्पर्धेचा फायदा झाला असून या माध्यमातून त्यांना आपले खेळाचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली, असे पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले.
पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेचे आयुक्त कौस्तुभ शहा व पीएमडीटीएचे सचिव अभिषेक ताम्हाणे म्हणाले की, स्पर्धेमध्ये विविध टेनिस अकादमी व क्लब मधुन खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. लिलावासाठी एकूण 203 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता यामधून 6 संघांसाठी 133 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
लीगमध्ये 6 संघांसाठी 6 प्रशिक्षक सहभागी झाले आहेत. यामध्ये विपार स्पीडिंग चिताज् – आश्विन गिरमे, कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स्-विक्रम देशमुख, मेट्रोसिटी रेजिंग्ज् बुल्स- शिवाजी चौधरी, पुणे ओपन स्ट्राईकिंग जॅगवार्स- नवनाथ शेटे, इंटेन्सिटी टेनिस अकादमी रायझिंग इगल्स्- अतुल देवधरे आणि फ्लाईंग हॉक्स- रोहित नाटेकर व निशित शहा, यांचा सहभाग आहे.
कौस्तुभ शहा पुढे म्हणाले की, स्पर्धेत 8 वर्षाखालील मिश्र गटाचा एकेरी सामना, 10 वर्षाखालील मुले व 10 वर्षाखालील मुली एकेरी, 12 वर्षाखालील मुले व 12 वर्षाखालील मुली एकेरी, 14 वर्षाखालील मुले व 14 वर्षाखालील मुली एकेरी, 10 वर्षाखालील मुले दुहेरी, कुमार दुहेरी गट(14 वर्षाखालील मुले), 14 वर्षाखालील मुले दुहेरी, मिश्र दुहेरी गट(14 वर्षाखालील मुली व 12 वर्षाखालील मुले) अशा एकूण 11 लढती होणार आहेत. सर्व सामने बेस्ट ऑफ 11 गेम(6 गेम मध्ये विजय) टायब्रेक 5 ऑल असे असणार आहेत. टायब्रेक विजेता संघ हा ज्या संघाने जास्तीत जास्त गेम जिंकल्या आहेत तो संघ विजेता ठरणार आहे.
पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे म्हणाले की, या स्पर्धेमुळे कुमार खेळाडूंमधील गुणवत्ता सिद्ध होणार असून लहान वयात व्यावसायिक दृष्ट्या विचार करण्यासाठी मदत होणार आहे. यांसारख्या लीग स्पर्धांमुळे खेळाडूंना आपल्या खेळात सुधारणा करण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची प्रेरणा मिळेल आणि पुण्यातील टेनिस खेळात कौटुंबिक भावना निर्माण होण्यासाठी मदत होईल.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 40,000/-,रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व 25,000/- अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेतील संघातील खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे
कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स:
श्रावी देवरे, वीरा हरपुडे, नील केळकर, स्वर्णीम येवलेकर, समीहन देशमुख, आर्यन कीर्तने, मृणाल शेळके, काव्या देशमुख, रिआन मुजगुळे, शिवम पाडिया, अथर्व जोशी, आरुष मिश्रा, रितिका मोरे, ख़ुशी पाटील, अर्जुन अभ्यंकर, अनमोल नागपुरे, ऋषिकेश बर्वे, प्रणव इंगोळे, रुमा गायकवारी, कनिका बाबर, डेलिशा रामघट्टा, वेदांत ससाणे;
पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स: अचिंत्य कुमार, शौर्य गदादे, मनन अगरवाल, दक्ष पाटील, राम मगदूम, सय्यम पाटील, प्रज्ञेश शेळके, आस्मि आडकर, अभिराम निलाखे, अर्णव बनसोडे, अमन शहा, वैष्णवी सिंग, अभिनित शर्मा, अनन्या देशमुख, आदित्य राय, सार्थ बनसोडे, आदित्य भटवेरा, मोक्ष सुगंधी, अमोद सबनीस, सिमरन छेत्री, ईशान्य हटनकर, समृद्धी भोसले;
इन्टेंसिटी टेनिस अकादमी रायजिंग इगल्स: रित्सा कोंडकर, स्मित उंडरे, वरद उंडरे, शिवतेज श्रीफुले, आरोही देशमुख, प्रेक्षा प्रांजल, शौर्य घोडके, अहान सारस्वत, पृथ्वीराज हिरेमठ, अर्जुन खलाटे, हिमनेश बांगीया, पार्थ काळे, देवांशी प्रभुदेसाई, सहाना कमलाकन्नन, आर्यन हूड, अनिश रांजलकर, अनन्मय उपाध्याय, दिव्यांक कवितके, सिद्धी खोत, राजलक्ष्मी देसाई, सानिका लुकतुके, क्रिशय तावडे;
फ्लाईंग हॉक्स: अंशुल पुंजारी, सृष्टी सूर्यवंशी, सक्षम भन्साळी, देव घुवालेवाला, निव गोजिया, केया तेलंग, रोहन बजाज, जसलीन कटरिया, अर्जुन कीर्तने, अवनीश गवळी, तेज ओक, साईराज क्षोत्री, श्रावणी देशमुख, चिराग चौधरी, सुधांशु सावंत, पार्थ देवरुखकर, श्लोक गांधी, तनिश बेलगलकर, कौशिकी समंथा, एंजल भाटिया, माही ग्यान, अंजली निंबाळकर;
मेट्रोसिटी रेजिंग बुल्स: नील देसाई, स्वराज भोसले, शार्दूल खवळे, वरद पोळ, वीरेन चौधरी, अथर्व येलभर, प्रिशा शिंदे, स्वनिका रॉय, जश शहा, अद्विक नाटेकर, अभय नागराजन, आदित्य ठोंबरे, दुर्गा बिराजदार, निशिता देसाई, अर्णव कोकणे, जय पवार, मानस गुप्ता, देवेन चौधरी, शौर्य राडे, संचिता नगरकर, याशिका बक्षी, अवंती राळे, आरुष देशपांडे;
विपार स्पिडिंग चिताज: नमिश हूड, स्वराज जावळे, क्रिशांक जोशी, वेद मोघे, नीरज जोर्वेकर, रियान माळी, ध्रुवी अद्यांता, ह्रितिका कापले, अर्चित धूत, वेदांग काळे, विश्वजित सणस, राज दर्डा, सलोनी परिदा, अनुष्का , ईशान देगमवार, अदनान लोखंडवाला, ऐतरेत्या राव, केयूर म्हेत्रे, कृष्णा घुवालेवाला, अलिना शेख, नाव्या भामिदिप्ती, श्रावणी पत्की.
एमएसआरए 76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत वीर चॊत्रानी, सुनीता पटेल यांनी उदघाटनाचा दिवस गाजवला
पुणे: महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए) यांच्या तर्फे आयोजित व स्क्वॅश रॅकेटस् फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसआरए-76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राच्या सुनीता पटेल हिने तर, पुरुष गटात वीर चॊत्रानी या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत आजचा उदघाटनाचा दिवस गाजवला.
अमनोरा मॉल ग्लास कोर्ट, आयस्क्वॅश अकादमी, चंचला संदीप कोदरे स्पोर्टस् क्लब, मुंढवा, आणि आरएसआय येथील स्क्वॅश कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत पुरुष गटात महाराष्ट्राच्या वीर चॊत्रानी याने महाराष्ट्राच्या अकराव्या मानांकित ऐश्वर्य सिंगचा 9-11, 11-5, 10-12, 11-3,11-3 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.
महिला गटात पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या बिगरमानांकीत सुनीता पटेल हिने पाचव्या मानांकित मध्यप्रदेशच्या राधिका राठोरचा 11-5,12-10, 9-11, 11-4 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. सहाव्या मानांकित महाराष्ट्राच्या सानिका चौधरी हिने आपलीच राज्य सहकारी दिया मुलाणीचा 13-11,11-6, 11-2 असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दिल्लीच्या चौथ्या मानांकित तन्वी खन्नाने महाराष्ट्राच्या योश्ना सिंगला 11-9, 11-3, 12-10 असे पराभूत करून आगेकूच केली.
पुरुष 45वर्षावरील गटात पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या विनय रौथन,आशुतोष पेडणेकर, कर्नाटकाच्या अनुप कबडवाल, नवीन शेनॉय यांनी तर, प्रो कोच गटात महाराष्ट्राच्या महेश कदम, जयनेंद्र भंडारी, सर्व्हिसेसच्या जय सिंग थोरी, उत्तरप्रदेशच्या शादाब आलम,राजस्थानच्या विकास जांगरा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचे उदघाटन संयोजन समितीचे अध्यक्ष व पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट, कैलाश कोद्रे, जहांगीर हॉस्पिटलचे सर कावसजी जहांगीर आणि लेडी जास्मिन जहांगीर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसआरएचे अध्यक्ष डॉ.प्रदीप खांड्रे, सचिव डॉ. ए. दयानंद कुमार, पीडीएसएचे अध्यक्ष कालिदास मगर, सचिव आनंद लाहोटी, पवन राऊत, गणेश तांबे, आनंद सुरोडकर, ज्ञानेश भावसार, डॉ. संदीप जगताप, डॉ. आकाश शहा, मरीशा जिल्का आणि आसिफ सय्यद आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पुरुष गट: पहिली फेरी(मुख्य ड्रॉ):
गौरव नंदराजोग(दिल्ली)[5] वि.वि.यश भार्गवा(दिल्ली)[10]11-7, 5-11, 11-8, 11-1;
वीर चॊत्रानी(महाराष्ट्र)वि.वि.ऐश्
संदीप जांगरा(सर्व्हिसेस)[15] वि.वि.विजय कुमार(सर्व्हिसेस)[4]11-3, 4-0सामना सोडून दिला;
अभिषेक अगरवाल(महाराष्ट्र)[3]वि.वि.रवी दिक्षित(सर्व्हिसेस)[41] 12-10, 11-7, 4-11, 11-9
रणजित सिंग(सर्व्हिसेस)[6] वि.वि.राहुल बैठा(महाराष्ट्र)[13] 11-8, 11-3, 11-6
जमाल साकिब(सर्व्हिसेस)[7]वि.वि. अवदेश यादव(सर्व्हिसेस)[25] 11-5,13-11,11-5
महिला गट:पहिली फेरी(मुख्य ड्रॉ):
सानिका चौधरी(महाराष्ट्र)[6]वि.वि.दिया मुलाणी(महाराष्ट्र)13-11,11-6, 11-2;
सुनीता पटेल(महाराष्ट्र)वि.वि.राधिका राठोर(मध्यप्रदेश)[5]11-5,12-
तन्वी खन्ना(दिल्ली)[4]वि.वि.योश्ना सिंग(महाराष्ट्र)11-9, 11-3, 12-10;
अंजली सेमवाल(महाराष्ट्र)वि.वि.सुनयना कुरुविला(तामिळनाडू)[3]
अपरजिथा बालमुरुकन(तामिळनाडू)[7] वि.वि.अन्वेषा रेड्डी(तामिळनाडू)
सान्या वत्स(दिल्ली)[8]वि.वि.ऐश्वर्या खुबचंदानी(महाराष्ट्र)[16]11-4, 11-1, 4-11, 11-9;
पुरुष 45वर्षावरील गट: पहिली फेरी:
अनुप कबडवाल(कर्नाटक)वि.वि.विराज मडकवी(महाराष्ट्र)11-8, 12-14, 11-2, 11-3;
विनय रौथन(महाराष्ट्र)वि.वि.विजय सोनावणे(महाराष्ट्र)11-9, 11-6, 11-6;
आशुतोष पेडणेकर(महाराष्ट्र)वि.वि.शिशिर गुप्ता(महाराष्ट्र)11-7, 11-2, 11-4;
नवीन शेनॉय(कर्नाटक)वि.वि.आशिष मेहता(महाराष्ट्र)11-9, 8-11, 5-11, 16-14, 11-9;
प्रो कोच: पहिली फेरी:
महेश कदम(महाराष्ट्र)वि.वि.अभिषेक गमरे(महाराष्ट्र)8-11, 11-3, 10-12, 11-7, 11-7;
शादाब आलम(उत्तरप्रदेश)वि.वि.नरेश बानोधा(मध्यप्रदेश)12-10, 11-2, 12-10;
विकास जांगरा(राजस्थान)वि.वि.आकाश बानोधा(मध्यप्रदेश)11-3, 11-5, 9-11, 11-7;
जय सिंग थोरी(सर्व्हिसेस)वि.वि.साईराज मरावर(महाराष्ट्र)11-7, 11-6, 5-11, 10-12, 11-3;
जयनेंद्र भंडारी(महाराष्ट्र)वि.वि.तथागत मल्हारे(महाराष्ट्र)11-7, 11-3, 11-6;
पुणे शहरातील अडीच लाख ग्राहकांची वीज दोन तास खंडित
पुणे, दि. 13 जून 2019 : महापारेषण कंपनीच्या 220 केव्ही पर्वती अतिउच्चदाब उपकेंद्रांमधील तांत्रिक बिघाडामुळे पुणे शहरातील सुमारे अडीच लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा बुधवारी (दि. 12) मध्यरात्रीनंतर दोन तास खंडित होता तर सुमारे 50 हजार वीजग्राहकांना महावितरणकडून पर्यायी व्यवस्थेतून तात्काळ वीजपुरवठा करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या 220 केव्ही पर्वती उपकेंद्रातील पोटॅन्शियल ट्रान्सफॉर्मर (पीटी)मध्ये बुधवारी (दि. 12) मध्यरात्रीनंतर 1.23 वाजता बिघाड झाला व तो फुटला. पर्वती उपकेंद्रातून 132 केव्ही रास्तापेठ जीआयएस उपकेंद्राला वीजपुरवठा होतो. परंतु या बिघाडामुळे पर्वतीसोबतच रास्तापेठ उपकेंद्राचाही वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे महावितरणच्या पर्वती, बंडगार्डन, पद्मावती व रास्तापेठ विभाग अंतर्गत पुणे शहराच्या मध्यवस्तीमधील रास्तापेठ, कसबा पेठ, भवानी पेठ, रविवार पेठ, सदाशिव पेठ, बुधवार पेठ, गंज पेठ आदी सर्व पेठा तसेच लक्ष्मी रोड, गुलटेकडी, लुल्लानगर, कॅम्प, मंडईचा काही भाग, हाईडपार्क, स्वारगेट, मार्केट यार्ड, शंकरसेठ रोड, सिंहगड रोड, वडगाव धायरी, सेंट मेरी आदी परिसरातील सुमारे 3 लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुद्धा खंडित झाला होता. त्यामधील सुमारे 50 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा मध्यरात्री दीडपर्यंत महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रयत्न करून पर्यायी व्यवस्थेतून उपलब्ध करून दिला.
महापारेषणकडून 220 केव्ही पर्वती उपकेंद्रातीलतील नादुरुस्त पोटॅन्शियल ट्रान्सफॉर्मरवरील वीजभार त्याच ठिकाणी अतिरिक्त स्वरुपात असलेल्या दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरवर घेण्याचे काम तातडीने सुरु करण्यात आले. मात्र त्यात काही तांत्रिक अडचणी आल्याने दोन तासांचा कालावधी लागला. काम पूर्ण झाल्यानंतर 220 केव्ही पर्वती व 132 केव्ही रास्तापेठ उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला. त्यानंतर बंद असलेले 13 उपकेंद्र व 34 वीजवाहिन्यांवरील 2 लाख 50 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पहाटे 3.15 वाजेपर्यंत महावितरणकडून पूर्ववत करण्यात आला.




