Home Blog Page 2913

आखाती देशातून पुण्यात स्मगलिंग -५२ लाखाची सोन्याची बिस्किटे विमानतळावर पकडली

0

पुणे : पुणे आंतराराष्ट्रीय विमानतळावर आखाती देशातून आलेल्या विमानातील प्रसाधनगृहात ५२ लाख रुपयांची १४ सोन्याची बिस्किटे आढळून आली. तस्करी करून आणलेले सोने बाहेर घेऊन जाताना अडथळा येण्याची शक्यता वाटल्याने प्रवासी प्रसाधनगृहात सोन्याची बिस्किटे लपवून पसार झाल्याचा संशय केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून विमान रविवारी पहाटे उतरले. आखाती देशातून तस्करी करून आणलेले सोने विमानातून आणल्याची माहिती कस्टमच्या पथकाला (एअर इंटलिजन्स युनिट) मिळाली. त्यानंतर कस्टमच्या पथकाने प्रवाशांची तपासणी केली. तेव्हा विमानतळावरून बाहेर पडलेल्या प्रवाशांकडे सोने आढळून आले नाही. पथकाने विमानाची तपासणी सुरू केली. तेव्हा प्रसाधनगृहातील वॉशबेसिनच्या खाली प्लास्टिकची पिशवी चिटकवून ठेवल्याचे निदर्शनास आले. पिशवीची पाहणी केली असता पिशवीत सोन्याची १४ बिस्किटे आढळून आली.

सोन्याच्या बिस्किटांचे वजन १६३३ ग्रॅम आणि किंमत ५२ लाख रुपये आहे. दुबईहून तस्करी करून आणलेले सोने विमानतळावरून बाहेर घेऊन जाताना पकडले जाण्याची शक्यता वाटल्याने प्रवाशाने सोने प्रसाधनगृहात लपवून ठेवल्याचा संशय आहे. या प्रकरणी भारतीय कस्टम कायदा १९६२ नुसार तस्करी करणाऱ्या प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्टमचे उपायुक्त महेश  पाटील, अधीक्षक सुधांशु खैरे, माधव पळणीटकर, विनिता पुसदेकर, निरीक्षक बाळासाहेब हगवणे, घनश्याम जोशी, अश्विनी देशमुख, जयकुमार रामचंद्रन, संदीप भंडारी, ए. एस. पवळे आदींनी ही कारवाई केली.

येरवडा शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरु-विनामुल्‍य निवास, भोजन, पुस्‍तके व स्‍टेशनरी,आर्थिक सहाय्य, दरमहा निर्वाह भत्‍ता

0

पुणे:  सामाजिक न्‍याय विभागांतर्गत मागसवर्गी गुणवंत मुलांचे शासकी वसतिगृह नवीन येरवडा पुणे  येथे कनिष्‍ठ ‍विद्यालयात प्रवेश घेतलेल्‍या इयत्‍ता १० वी ६० टक्‍के गुणादच्‍या वरील अनु. जाती प्रवर्गाच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी प्रवेश अर्ज वसतिगृहात उपलब्‍ध आहेत. तरी इच्‍छुक विदयार्थ्‍यांनी प्रवेशासाठी वसतिगृहात येऊन अर्ज घेवून जावे. वसतिगृहात प्रवेश हा प्रवर्गनिहाय गुणवत्‍तेनुसार राहील. शासकीय वसतिगृहात विनामुल्‍य निवास, भोजन, पुस्‍तके व स्‍टेशनरी इत्‍यादी करीता आर्थिक सहाय्य, दरमहा निर्वाह भत्‍ता इत्‍यादी  सुविधा पुरविण्‍यात येतात, असे वसतिगृह अधिक्षक रमेश कोरे यांनी प्रसिध्‍दीत्रकान्‍वये कळविले आहे.

कबीरवाणी घराघरात, मनामनात पोहोचावी- डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे

0
संत कबीर जयंतीनिमित्त सोनग्रा प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान
पुणे : “सार्वकालीन सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी कबीरांची वाणी कान उघाडणी करणारी आहे. संगीतरूपी दोह्यातून त्यांनी प्रबोधनात्मक विचार मांडले. कोणत्याही कोशात न अडकणार निधर्मी अशा त्यांच्या रचना आहेत. त्यांच्या अनमोल रचना मराठीत आणून आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी अलौकिक काम केले आहे. संत कबीरांची ही कबीरवाणी संगीताबरोबरच ग्रंथरुपातही घराघरात आणि लोकांच्या मनात पोहोचायला हवी,” असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक व समीक्षक डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी केले.
सुफी संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त आर. के. सोनग्रा प्रतिष्ठानच्या वतीने ‘मराठीत संत कबीर’ या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. सहस्रबुद्धे बोलत होते. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव व व्याख्याते डॉ. विकास आबनावे, ‘कबीरवाणी’चे अनुवादक आचार्य रतनलाल सोनग्रा, प्रकाशिका आरती सोनग्रा, दीपक चैतन्य, नागेश चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अनिल सहस्रबुद्धे म्हणाले, “जाती-धर्माच्या कोषातून मुक्त, कोणत्याही भेदभावाला स्पर्श न करणारे संत कबीर होते. त्यामुळेच आपल्याला कबीर प्रत्येकामध्ये सामावलेला दिसतो. कबीरांच्या साहित्यासारखे उन्नत, उदात्त, उत्तम आणि सात्विक साहित्य आपल्या मराठीमध्ये आले पाहिजे. त्यातूनच आपली भाषा अधिक समृद्ध होईल. संत कबीर पांडुरंगाच्या दरबारात आले हे आपले भाग्य आहे. प्रत्येकाच्या हृदयात प्रेम पेरण्याचा विचार कबीरांनी दिला. त्यांच्या प्रत्येक दोह्यात प्रेम ओतप्रोत भरलेले आहे. अशा कबीरांची वाणी प्रत्येक भाषेतून सर्वांपर्यंत पोहोचायला हवी.”
डॉ. विकास आबनावे म्हणाले, “कबीराला धर्मसत्ता अमान्य होती. जसे विचार तसेच आचरण हा एकच धर्म त्यांना मान्य होता. परमेश्वर आणि माणूस यांचे थेट नाते असावे. त्यामध्ये धर्ममार्तंडाचा हस्तक्षेप असू नये, असा त्यांचा आग्रह होता. खऱ्या अर्थाने ते मानवतेचे प्रेषित होते. वस्त्र विणता विणता त्यांनी जीवन जगण्याचा धागा विणला. प्रत्येकाला निःस्वार्थीपणे प्रेम वाटत चला, असा संदेश कबीरांनी आपल्या प्रत्येक रचनेत दिला आहे. आपण प्रत्येकाने कबीरांचा दोहा जगाला पाहिजे.”
आचार्य रतनलाल सोनग्रा म्हणाले, “संत कबीर हे अद्भुत रसायन आहे. जीवनाचा मार्ग दाखवणारा हा संत फार उशिराने मराठीत उलगडण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यांच्या रचना, प्रेमभाव प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नातूनच माझे काम सुरु आहे.” दीपक चैतन्य यांनीही आपले मनोगत मांडले. आरती सोनग्रा यांनी प्रास्ताविक केले.

आता राम मंदिरासाठी विलंब नको-शिवसेना

0

लोकसभा निवडणूक निकालात एनडीएला ३५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. ज्यापैकी ३०३ जागा एकट्या भाजपाने जिंकल्या. जनतेने दिलेला निर्णय म्हणजेच राम मंदिराचा जनादेश आहे. ज्या श्रीरामाने आम्हाला ३५० खासदार दिले, सत्ता दिली त्याच्या जन्मस्थानी आम्ही त्याला हक्काचे छप्पर देऊ शकत नाही? असा प्रश्न आता शिवसेनेने उपस्थित केला आहे. सामनाच्या अग्रलेखातून आता राम मंदिरासाठी विलंब नको ही साद शिवसेनेने पुन्हा एकदा घातली आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात?
श्रीरामाच्या कृपेनेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला भव्य यश लोकसभा निवडणुकीत मिळाले. हे यश फक्त अभूतपूर्वच नाही, तर विरोधकांना भुईसपाट करणारे आहे. ज्यांनी राममंदिरास विरोध केला ते नष्ट झाले. रामाच्या नावाने समुद्रात दगडही तरले. रामसेतू उभा राहिला. त्याच रामाच्या नावाने आजचे दिल्लीतील सरकारही तरले. प. बंगालात जाऊन अमित शहा यांनी ‘जय श्रीराम’चा नारा दिला आणि प्रभू श्रीरामाने कमाल केली. ममता बॅनर्जी यांना दुर्बुद्धी झाली. श्रीरामाचे नारे देणाऱ्यांना त्यांच्या सरकारने अपराधी ठरवले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. ममता बॅनर्जींनी श्रीरामास विरोध केला म्हणून प. बंगालच्या हिंदुत्ववादी जनतेने भाजपचे 18 खासदार निवडून दिले. प. बंगालात भाजपची ताकद तोळामांसाचीच, पण रामविरोधकांना धडा शिकविण्यासाठीच बंगाली जनतेने विजयाचा रसगुल्ला भाजप तोंडी भरवला.

उत्तर प्रदेशात अखिलेश-मायावती हे ‘बाबरी भक्त’ एक झाले. राममंदिरास या दोघांचा विरोध. त्यामुळे ‘जय श्रीराम’चा नारा देणाऱ्या 61 खासदारांना विजयी करून भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिले. हे प्रभू श्रीरामाचे भांडार आहे. ते भाजप-शिवसेनेला प्रसाद म्हणून मिळाले. आता वनवासातल्या रामास मुक्त करण्याची जबाबदारी कोणाची? ती शतप्रतिशत भाजप आणि शिवसेनेचीच आहे. नितीशकुमार व रामविलास पासवान यांनाही ‘सेक्युलर’वादाच्या नावाखाली राममंदिरापासून दूर पळता येणार नाही. त्यांच्या यशातही रामनामाचा वाटा आहेच. जो रामाचा नाही तो कामाचा नाही असा निर्णय आता जनतेनेच दिला आहे. राममंदिराचा विषय कोर्टात अडकला आहे. आमच्यासाठी राममंदिर हा राजकारणाचा नसून अस्मितेचा विषय आहे. कोर्टाचा निकाल लागायचा तो लागेल, पण संपूर्ण देश राममंदिराच्या बाजूने आहे. जनतेने लोकसभा निवडणुकीतून निकाल दिला आहे. राममंदिराबाबत सर्वोच्च न्यायालय काय तो निर्णय देईल ते नंतर पाहू.

कायद्याच्या चौकटीत राहून राममंदिराचा प्रश्न सोडवू, असे पंतप्रधान मोदी सांगतात. पंतप्रधान म्हणून त्यांना कायद्याचीच भाषा करावी लागेल हे समजून घेतले पाहिजे, पण मोदी हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत. ते छुपे हिंदुत्ववादी नसून उघड हिंदुत्ववादी आहेत. निवडणुकीआधी ते केदारनाथला जाऊन गुहेत तपासाठी बसले. देशातल्या ढोंगी निधर्मीवाद्यांना काय वाटेल याची पर्वा न करता ते केदारनाथच्या गुहेत बसले. दोन दिवसांपूर्वी ते केरळातील गुरुवायूर मंदिरात गेले. तेथे ते पितांबर नेसून पूजा-अर्चा करीत होते. हे त्यांचे रूप देशातील हिंदू जनतेस भावले. त्याचे पडसाद मतपेटीत उमटले. त्यामुळे मोदी-शहा यांच्या धमन्यांत राममंदिराचा विषय उसळत असेल याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही. मंदिर कसे होईल, कोणत्या मार्गाने होईल याचा निर्णय आता घेतला पाहिजे.

जिवंत प्राण्यांच्या निर्यातीवर बंदी घालावी

0
डॉ. कल्याण गंगवाल; आझाद मैदानावर प्राणीप्रेमींकडून मोर्चाचे आयोजन
पुणे : “आपला देश अहिंसा, जीवदया मानणारा आहे. प्राण्यांना जगण्याचा अधिकार असून, त्यांचा छळ होता कामा नये. जिवंत प्राण्यांचीही निर्यात करताना त्यांच्यावर अनन्य अत्याचार होतात. त्यांना उपाशी ठेवले जाते. अनेक प्राण्यांचा या निर्यातीवेळी जीव जातो. त्यामुळे सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे व सारासार विचार करून जिवंत प्राण्यांच्या निर्यातीवर त्वरित बंदी घालावी,” अशी मागणी प्राणीप्रेमी डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली.
मुंबईतील आझाद मैदानावर रविवारी विविध प्राणीप्रेमी संस्थांच्या वतीने जनजागृती अभियानाचे आयोजन केले होते. पुण्यातील सर्व जीव मंगल प्रतिष्ठान, ध्यान फाउंडेशन, इंडियन ऍनिमल प्रोटेक्शन फोर्स यांच्यासह इतर अनेक संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या. प्राणीप्रेमी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी झालेले पाहायला मिळाले. नव्याने निवडून आलेल्या मोदी सरकारचे संसदीय अधिवेशन सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला हे अभियान राबवून प्राणीप्रेमींनी प्राण्यांच्या निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी केली.
निसर्ग संवर्धन आणि प्राण्यांच्या आरोग्याबाबत काही सूचना आणि आक्षेप नुकत्याच मांडलेल्या मसुद्यात नोंदवले आहेत. शेती, पाणी टंचाई, ग्लोबल वार्मिंग, हवामान बदल, प्राण्याची घटती संख्या अशा अनेक समस्यांना आपल्याला समोरे जावे लागत आहे. त्यामुळे या गोष्टीला गांभीर्याने घेतले पाहिजे. प्राण्यांची निर्यात बंद करून शाकाहाराकडे आपण वळणे हेच भविष्यातील संकट टाळण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे, असेही डॉ. गंगवाल यांनी नमूद केले. अमेरिकेतील जैना संस्थेचे मनीष मेहता यांनीही या अभियानाला पाठिंबा दर्शविला आहे.

जेष्ठ पौर्णिमा व ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न

0

पुणे- लष्कर भागातील सुप्रिया बौध्द विहार व जमायत ए इस्लामी हिंद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ पौर्णिमा व ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला . या कार्यक्रमाची सुरुवात बुध्द वंदनेने झाली . त्यानंतर सविता साळवे यांनी ”  बुध्दाचे तत्वज्ञान  ” या विषयावर मार्गदर्शन केले .

यावेळी सुधाकर कांबळे यांनी सांगितले कि , भगवान बुद्धांनी मानव हा केंद्रबिंदू धरून धम्माचे  तत्वज्ञान जगासमोर मांडले . बुद्धाचे मानव कसा सुखी होईल याचा विचार केला . त्यासाठी पंचशील , आर्य अष्टांग मार्ग त्या काळातल्या समाजाला दिला व त्याचा अवलंब केल्यामुळे मानव दुःखमुक्त होते , ते पटवून दिले .

यावेळी जमायत ए इस्लामी हिंदचे महाराष्ट्रचे सचिव इम्तियाज शेख यांनी रोजाचे महत्व , रोजा हा का व कशाप्रकारे ठेवला जातो . या दिवसात व्यक्तीला दानाचे महत्व कळते आणि व्यक्ती दुसऱ्या प्रति प्रेम भावना बाळगतो . इस्लाम हा शांततेचा संदेश देतो . समाजात समता , बंधुता , न्याय ,स्वातत्र्याची शिकवण देतो . यानंतर करीमुद्दीन शेख यांनी इस्लामचा अर्थ शांतता आहे असे सांगितले .

यानंतर इम्तियाज शेख यांना संविधानाचा ग्रंथ देउन सुनील भोसले यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले . तसेच करीमुद्दीन शेख यांचा सन्मान डॉ सुरेश कठाणे यांनी बुध्द आणि त्यांचा ग्रंथ देऊन केला .

यावेळी उज्वला मोरे , बबिता मोरे , भगिरथी अहिरे , राजेंद्र मोरे , मल्लिकार्जुन सोनकांबळे , प्रल्हाद जाधव , दीपक कांबळे , निलेश कांबळे , सुशील भोसले ,  महेश चव्हाण , अरुण गायकवाड , प्रविण साळवे , बाळू सोनवणे , दादू कांबळे , भीमराव गंभीर , इरफान शेख , अब्दुल हमीद व बादशहा शेख आदी मान्यवर उपस्थित होते . 

गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना ‘सूर्यदत्ता’ संस्थेतर्फे मिळणार शिष्यवृत्ती

0
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात सूर्यदत्ता कनिष्ठ महाविद्यालय आणि सूर्यदत्ता पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. सूर्यदत्ता ज्युनिअर कॉलेजमधील विज्ञान शाखेत प्रणव संजय मरळ (९०.१०%), कला शाखेत आर्शिया अजय आतकर (९०.६०%), तर वाणिज्य शाखेत अनुष्का महेश उकिडवे (८७%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. सूर्यदत्ता पब्लिक स्कुलमधील विज्ञान शाखेत महेश संजयकुमार किंगे (८३.२०%), कला शाखेत साक्षी समर कामूलकर (८९.४०%), तर वाणिज्य शाखेत प्रीत शाह (८७.३८%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
द्वितीय क्रमांक विज्ञान- किंजल शिरीष देशपांडे व सेजल संदीप क्षीरसागर (८२.४६%), नील नार्वेकर (८०.७६%), कला शाखेत सोफिया विल्यम (९०.३०%), आयुष सुतार (८२.७०%), वाणिज्य शाखेत ममता भताने (८४.६१%), वीरेंद्र राजपुरोहित (८४.३०%), तर तृतीय क्रमांक विज्ञान शाखेतून ऋषिकेश चौघुले व अनिश सांगरुळकर (८१.५३%), शंतनू सुदामे (८०.६१%), कला शाखेतून जाई भिलारे (८५.६०%), निधी भाटिया (८७%), वाणिज्य शाखेतून दिपाली रमेश पाल (८३.०७%), बालजसजीत कौर सिंग (८३.०७%) पटकावला.

पहिला दिवस शाळेचा …

0

  पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमध्ये पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रांगोळीच्या आकर्षक पायघड्या घालण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी ङ्गुगे, पताका आणि झिरमिळ्या लावून शाळांची सजावट करण्यात आली होती. छोटा भीम, डोरीमॉन, लिटिल कृष्णा, मोगली अशी कार्टून लक्ष वेधून घेत होती. सनई, चौघड्याच्या स्वरांनी वातावरण मंगलमय झाले होते. कुंकुम तिलक लावून विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले.

न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत मु‘याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांच्या कल्पनेतून ‘मुक्तागार’ हा अभिनव उपक‘म सुरू करण्यात आला. ‘मुक्तागार’मध्ये मातीकाम, रंगकाम, वाचन असे छंद जोपासताना विविध बैठे खेळ खेळता येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मनोरंजनाबरोबर व्यक्तिमत्त्व विकासासाठी हा उपक‘म सुरू करण्यात आला आहे. ‘मुक्तागार’ची क्षमता १५० इतकी आहे. पाचवीतील ३७५ विद्यार्थ्यांचे तुळशीची रोपे देऊन स्वागत करण्यात आले.

अहिल्यादेवी शाळेत बँड पथकाच्या वादनाने विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले. सरस्वती पूजनानंतर विद्यार्थिनींना खाऊवाटप करण्यात आले. संगीत, शारीरिक शिक्षण, संगणक या विशेष विषयांच्या शिक्षकांचा परिचय करून देण्यात आला.

न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड शाळेत प्रतिक देशमुख, आमोघ वैद्य या माजी विद्यार्थ्यांनी अनुभव कथन आणि नाट्यछटा सादर केल्या. लोकमान्य टिळक आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेषभूषेतील विद्यार्थ्यांनी स्वागत केले. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

नवीन मराठी शाळेत सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांची पुस्तक तुला करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त ही पुस्तके भेट म्हणून दिली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि खाऊ वाटप करण्यात आले.

न्यायमूर्ती रानडे बालक मंदिरात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘जंगल थीम’वर आधारावर वर्गखोल्यांची सजावट करण्यात आली होती. न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सरस्वती पूजन आणि विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. डीईएस पूर्व प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे सुवासिक अत्तर लावून औक्षण करण्यात आले.

माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात बालचमूंचा पहिला दिव आनंददायी ठरावा यासाठी आवडीच्या कार्टूनचे मुखवटे घालून शिक्षकांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या आवडीच्या पपेट शोचे आयोजन करण्यात आले होते.

घंटानाद करून ईव्हीएम चा केला निषेध

0
पुणे -वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने “ईव्हीएम हटाओ देश बचाओ” अंतर्गत पुणे शहराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  घंटानाद आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आला .देशभरात ईव्हीएम विरोधात संशयाचे वातावरण आहे .लोकसभेच्या मतमोजणीच्या बेरजेतील तफावत बऱ्याच ठिकाणी आढळल्याचे विरोधी पक्षानेही आरोप केले होते .त्यामुळे वंचित आघाडीचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील 48 मतदारसंघातील जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर आज तीव्र स्वरूपाचे “घंटानाद आंदोलन” करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्यां त्यासह महिला ,युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी” ईव्हीएम हटाव देश बचाओ ” घोषणांनी परिसर दणाणून गेला होता .
या वेळी भारीपचे पुणे शहराध्यक्ष व वंचितचे समनव्यक अतुल बहुले यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले .या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड ,लष्कर ए भीमा ,रिपब्लिकन परिवर्तन आघाडी यासह विविध संघटनांनी या आंदोलनास पाठींबा दिला .
         या आंदोलनात पुणे शहरातील आठही मतदारसंघातील युवक ,महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी झाले होते .तरी या लोकशाही विरोधी ईव्हीएम मुळे मतदार व जनतेची फसवणूक झाली आहे याचा निषेध  शहराध्यक्ष अतुल बहुले यांनी केला .
 या आंदोलनात अतुल बहुले अध्यक्ष ,जेष्ठ नेते वसंत साळवे ,महिला अध्यक्ष शहरअनिता चव्हाण ,महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई भालसेन,विलास वनशिव,नवनीत अहिरे ,अजित पानसरे,विकास चोरगे,प्रमोद कांबळे ,विकास चोरगे ,अजित वाघमारे ,सचिन शिंदे ,संदीप चौधरी ,सोमनाथ सर्वगौड ,गजेंद्र कांबळे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते

‘अवघाची संसार’ ची एमआयटीत रंगली मैफलः काव्यवाचन, गायनाने रसिक मंत्रमुग्ध

0

पुणे: ‘अरे संसार, संसार, दोन जीवांचा विचार, देतो सुखाला नकार, आणि दुःखाला होकार’, ‘अरे घडो न घडो’, ‘पहिली माझी ओवी’,अशा विविध गीतांमधून प्रत्येकाच्या संसाराच्या जीवनातील अनेक रूपं रसिकांना टप्याटप्यांवर भेटत गेले.
कवयित्री सौ. उर्मिला विश्‍वनाथ कराड यांच्या कविता संग्रहावर आधारित “अवघाची संसार” हा संगितमय कार्यक्रम कोथरूड येथील एमआयटी कॅम्पसमधील संत ज्ञानेश्‍वर सभागृहात पार पडला. कवयित्रीने लिहिलेल्या असे संसार संसार.., अनुभूती, वाटेवरच्या पाऊलखुणा, समीर आणि माझी माय दुधावरची साय.. या कविता संग्रहातील निवडक कवितांचे रसग्रहण करून त्यांना संगीतबध्द स्वरूपात मांडल्या गेले.
या कार्यक्रमाची निर्मिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड यांची आहे. कार्यक्रमात डॉ. माधवी वैद्य आणि डॉ. वृषाली पटवर्धन यांची संहिता आणि दिग्दर्शन असून त्यांनी काव्यवाचन केले. तसेच, संगीतकार राहुल घोरपडे यांनी संगीतबध्द केलेल्या या कार्यक्रमात गायक मीनल पोंक्षे व अमृता कोलटकर यांनी रसिकांवर शब्दसुरांची बरसात केली.
यावेळी नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ.विजय भटकर, प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, विश्‍वराज हॉस्पिटलच्या कार्याकारी संचालिका डॉ. अदिती राहुल कराड, माईर्स एमआयटीचे कार्यकारी संचालक प्रा.डॉ. सुनील कराड, ह.भ.प. गणपत महाराज जगताप आणि राष्ट्रीय कीर्तनकार ज्ञानेश्‍वर माऊली वाभळे हे उपस्थित होते.
संगीतकार राहुल घोरपडे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ‘दिंडी चालली पंढरीच्या वाटेवरी’ या गीताला स्वरसाज चढवत जणू पंढरपुच्या विठ्ठलाची अनुभूति दिली. त्यानंतर ‘आंब्याचा परस, केळाच’, ‘प्राजक्ताचा सडा अंगणी नकळत पडल्या रातराणी’ सारख्या कवितांना स्वरबध्द करून मांडल्यावर रसिकांना जणू रात्रीचा प्रवासच घडविला.
कवयित्रीने जीवनातील विविध पैलूंना स्पर्श केला आहे. पण खरा आनंद तो अध्यात्मातच असतो. वारकरी संप्रदायाच्या असल्याने कवयित्रीने रचलेल्या ‘दोन तिरावरी आज वारकरी आले, इंद्रायणीच्या तीरावर वारकरी सुखावले’, आणि ‘एकादशीबाई तुझ नाव, केवढ तुझ्या नावाची आवड माझ्या मनाला’ या कवितांना जेव्हा सप्तसुर देण्यात आले तेव्हा जणू पंढरपूरच्या विठोबाची अनुभूती रसिकांना झाली.
संगीतकार राहुल घोरपडे यांनी संगीतबध्द केलेल्या या कार्यक्रमात गायक मीनल पोंक्षे व अमृता कोलटकर यांनी काव्य गायन केल. तसेच, नीलेश श्रीखंडे, मिहीर भडकमकर आणि विनीत तिकोनकर यांनी साथ संगत दिली.
सौ. उर्मिला विश्‍वनाथ कराड यांनी आपले मनोगत पूर्ण केले.
सूत्रसंचालन डॉ. मिलिंद पांडे यांनी केले. श्री.शालिग्राम खंदारे यांनी आभार मानले.

तर 9 जुलै पासून पुणे पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालक बेमुदत संपावर

0
9 जुलै रोजी होणाऱ्या राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होण्याचा निर्णय रिक्षा चालकांनी एक मुखाने घेण्यात आला असल्याची माहिती कृती समिती सरचिटणीस आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली,
 सकाळी 11 वाजता पुणे येथील भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक (हॉल) येथे रिक्षा चालक मालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता,या वेळी हा निर्णय घेण्यात आला, मुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांना या बाबत निवेदन देण्यात आले असून, 30 जून पर्यंत रिक्षा चालक मालकांचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन  करण्यात आले आहे, 30 जून पर्यंत प्रश्न न सोडविल्यास 9 जुलै पासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे,
या वेळी मार्गदर्शन करताना कृती समिती अध्यक्ष कामगार नेते शशांक राव म्हणाले रिक्षा चालकांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत , ३० जून पर्यंत हे सर्व प्रश्न सोडवावेत या बाबत मुख्यमंत्री , परिवहनमंत्री यांना निवेदन दिले आहे , अन्यथा ९ जुलै पासून बेमुदत संप करण्यात येईल ,
या वेळी बाबा कांबळे म्हणाले रिक्षा चालकांच्या मागण्या सरकारने सोडवल्या नाही या मुळे रिक्षा चालकांन मध्ये तिव्र संताप आहे , या मुळे पुणे पिंपरी चिंचवड मधिल सर्व रिक्षा चालक संपत सहभागी होतील .
काय आहेत मागण्या ….
१)  महाराष्ट्र राज्यातील ऑटोरिक्षाचे मुक्त परवाने वाटप बंद करा.
२) ऑटोरिक्षा चालकांसाठी परिवहन विभागामार्फत स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा.
३) ऑटोरिक्षाचे थर्ड पार्टी इन्शुरन्स दर तात्काळ कमी करा.
४) ऑटोरिक्षा व टॅक्सी व्यवसायात घुसखोरी करणाऱ्या ओला -ऊबेरवर कार्यवाही करुन त्या ओला-ऊबेरला हद्दपार करा
५) राज्यातील अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कार्यवाही करा
   ६) ऑटोरिक्षा चालकास  पब्लिक सर्वन्ट हा  दर्जा देण्यात यावे
७) राज्यातील जिल्हास्तरीय RTO च्या समितीवर एक अशासकीय सदस्य म्हणून एक ऑटोरिक्षा चालकास प्रतिनिधित्व देण्यात यावे
या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे, मेळाव्यात कृती समिती अध्यक्ष कामगार नेते शशांक राव, सरचिटणीस बाबा कांबळे,उपाध्यक्ष  मारुती कोंडे, प्रमोद घोणे , विजय पाटील , पुणे जिल्हा अध्यक्ष आणि शिवनेरी रिक्षा संघटना अध्यक्ष  अशोक साळेकर,पुणे फेडरेशन अध्यक्ष  बाबा शिंदे , पर्यदर्शनी रिक्षा संघटना अध्यक्ष  आनंद तांबे , शिवाजी नगर एस टी स्टॅन्ड अध्यक्ष दत्ता पाटील , राष्ट्रवादी रिक्षा संघटना अध्यक्ष विजय रवळे , सावकाश रिक्षा संघटना अध्यक्ष प्रदीप भालेराव , पुणे स्टेशन रिक्षा संघटना अध्यक्ष सुरेश जगताप , श्री सेवा रिक्षा संघटना अध्यक्ष ठकसेन पोहरे, पि आशिर्वाद रिक्षा संघटना अध्यक्ष  अनिल यादव , पुणे कॅन्टोमेन्ट रिक्षा संघटनेचे साई मोटाडू ,  महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे राजू शिदगणे,  लखन लोंढे , सोमनाथ कलाटे , सम्राट मुंडे , आरिफ पठाण , आदी उपस्थित होते   शिला डावरे ,  प्रकाश झाडे ,  चंद्रकांत गोडबोले , आबा बाबर, यांनी मनोगत व्यक्त केले
अशोक साळेकर , यांनी प्रस्थाविक केले , दत्ता पाटील यांनी आभार मानले,
 कार्यक्रमाच्या संयोजनासाठी किशोर चिंतामणी , प्रतीक साळेकर,विलास बिराजदार , अशोक खानवरे , संजय देऊलकर , जयकुमार काची , गोरख पोहोरे  , यांनी संयोजन केले ,

एमएसआरए 76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत जोश्ना चिनप्पाला विक्रमी 17वे विजेतेपद

0
पुरुष गटात महाराष्ट्राच्या महेश माणगावकरला विजेतेपद 

पुणे: महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए) यांच्या तर्फे आयोजित व स्क्वॅश रॅकेटस्‌ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसआरए-76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात जागतिक क्रमवारीत 13व्या स्थानावर असलेल्या भारताच्या जोश्ना चिनप्पा हिने विक्रमी 17वे विजेतेपद पटकावत आजचा दिवस गाजवला. तर, पुरुष गटात महाराष्ट्राच्या महेश माणगावकर याने विजेतेपद संपादन केले. 

अमनोरा मॉल ग्लास कोर्ट, आयस्क्वॅश अकादमी, चंचला संदीप कोदरे स्पोर्टस्‌ क्लब, मुंढवा, आणि आरएसआय येथील स्क्वॅश कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत महिला गटात अंतिम फेरीच्या लढतीत तामिळनाडूच्या अव्वल मानांकित जोश्ना चिनप्पा हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत तिसऱ्या मानांकित सुनयना कुरुविलाचा 11-5, 11-4, 7-11, 11-5 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. जागतिक क्र. 13 असलेल्या जोश्ना हिने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व राखले. जोश्नाने पहिले दोनही 11-5, 11-4 गेम जिंकून सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर सुनयना हिने कमबॅक करत तिसरा गेम  11-7 असा जिंकून हि आघाडी 2-1 ने कमी केली. पण अनुभवी जोश्ना हिने सुरेख खेळी करत सुनयनाविरुद्ध चौथा गेम 11-5 असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. या विजेतेपदाबरोबरच जोश्ना चिनप्पा हिने  राष्ट्रीय स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत 17 वेळा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम नोंदविला. याआधी राजस्थानच्या भुवनेश्वरी कुमारी हिने 1977 ते 1992 या कालावधीत 16 वेळा राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद पटकावून विक्रम नोंदविला होता. जोश्नाने हा विक्रम मोडीत काढत नवा विक्रम आपल्या नावावर नोंदविला. 


विक्रमी विजेतेपद पटकवणारी चिनप्पा यावेळी म्हणाली कि, आज मिळविलेले विजेतेपद हे माझ्यासाठी अनेक अर्थाने विशेष ठरले आहे. कारण या विजेतेपदाबरोबरच मी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे . भुवनेश्वरी कुमारचा विक्रम मोडल्यामुळे मला आता नव्या विक्रमाचे लक्ष्य ठेवणे शक्य होईल. कोणताही विक्रम मोडण्याची खेळाडूंची कामगिरी अभिमानास्पदच असते. अर्थातच आजच्या कामगिरीमुळे माझ्या शिरपेचात एक नवा तुरा खोवला गेला आहे. या विजेतेपदाचे श्रेय मी माझे प्रशिक्षक व पालक यांना देते. आजची सुनयना विरुद्धची अंतिम फेरीची लढत चुरशीची झाली आणि स्पर्धेत सर्व प्रतिस्परध्यांनी अतिशय कसून खेळ केला. त्यामुळेच या स्पर्धेचा दर्जा उच्च होता. म्हणूनच या विजेतेपदाबद्दल मला विशेष आनंद होत आहे.

 
पुरुष गटात अंतिम फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित महेश माणगावकर याने आपली विजयी मालिका कायम ठेवत दुसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या अभिषेक प्रधानचा 12-10, 11-7, 11-9 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. यावेळी विजेतेपदानंतर आनंद व्यक्त करताना महेश म्हणाला की,    संपूर्ण स्पर्धेत दर्जेदार प्रतिस्पर्ध्यांवर मात करत या विजेतेपदापर्यँत पोहोचता आले. परंतु या विजेतेपदापेक्षाही अधिक मोठे लक्ष्य मी डोळ्यासमोर ठेवले आहे आणि ते लक्ष साध्य करण्यासाठी माझा प्रयत्न राहील.
 
प्रो कोच गटात अंतिम फेरीत राजस्थानच्या विकास जांगरा याने महाराष्ट्राच्या अभिनव सिन्हाचा 11-8, 11-5, 11-2 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. पुरुष 35 वर्षावरील गटात अंतिम फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित दिल्लीच्या अमितपाल कोहलीने दुसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या आदित्य माहेश्वरीचा 11-6, 11-8, 4-11, 11-3 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. 40 वर्षावरील गटात छत्तीसगडच्या अव्वल मानांकित सौरभ नायरने महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकित सचिन जाधवचा 11-8, 11-4, 11-9 असा तर, 45वर्षावरील गटात पश्चिम बंगालच्या अव्वल मानांकित दलिप त्रिपाठी याने छत्तीसगडच्या  तिसऱ्या मानांकित विकास नायरचा 7-11, 9-11, 12-10,11-8, 11-8 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद मिळवले. 
 
पुरुष  50 वर्षावरील गटात दिल्लीच्या अव्वल मानांकित विवान खुबचंद याने कर्नाटकाच्या सहाव्या मानांकित सौरभ देवकुळीयरचा 7-11, 11-4, 8-11, 11-9, 11-4 असा तर, पुरुष  55 वर्षावरील गटात अंतिम फेरीच्या सामन्यात दिल्लीच्या दृश्यांत जामवालने महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित अंशूण बहलला 11-5, 11-5, 11-4 असे पराभूत करून या गटाचे विजेतेपद मिळवले. 60 वर्षावरील गटात हरियाणाच्या दुसऱ्या मानांकित विजय जैनीने तेलंगणाच्या तिसऱ्या मानांकित रवीकृष्णा बुर्लाचा 11-6, 9-11, 11-3, 11-6 असा, तर 65 वर्षावरील गटात तामिळनाडूच्या अव्वल मानांकित राजीव रेड्डी याने महाराष्ट्राच्या तिसऱ्या मानांकित किशन लालचा 11-6, 11-9, 12-10 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 
स्पर्धेत एकूण 12 लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला रोलिंग ट्रॉफी व रोख रकमेची पारितोषीक देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अभिनेता जॅकी श्रॉफ,  स्क्वॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष देवेंद्रनाथ सारंगी,  महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटनेचे अध्यक्ष डॉ.प्रदीप खांड्रे, महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटनेचे सचिव डॉ. ए. दयानंद कुमार, पीएसआरएचे अध्यक्ष कालिदास मगर, सचिव आनंद लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले.  
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पुरुष गट: अंतिम फेरी:

महेश माणगावकर(महाराष्ट्र)[1]वि.वि. अभिषेक प्रधान(महाराष्ट्र)[2]  12-10, 11-7, 11-9;

 
महिला गट:अंतिम फेरी:
जोश्ना चिनप्पा(तामिळनाडू)[1]वि.वि.सुनयना कुरुविला(तामिळनाडू)[3]11-5, 11-4, 7-11, 11-5;  
 
प्रो कोच: अंतिम फेरी:
विकास जांगरा(राजस्थान)वि.वि.अभिनव सिन्हा(महाराष्ट्र)11-8, 11-5, 11-2; 
 
पुरुष 35 वर्षावरील गट: अंतिम फेरी:
अमितपाल कोहली(दिल्ली)[1]वि.वि.आदित्य माहेश्वरी(महाराष्ट्र)[2] 11-6, 11-8, 4-11, 11-3;   
 
पुरुष 40 वर्षावरील गट: अंतिम फेरी: 

सौरभ नायर(छत्तीसगड)[1]वि.वि.सचिन जाधव(महाराष्ट्र)[4]11-8, 11-4, 11-9;


पुरुष 45वर्षावरील गट: अंतिम फेरी: 
दलिप त्रिपाठी(पश्चिम बंगाल)[1]वि.वि.
विकास नायर(छत्तीसगड)[3] 7-11, 9-11, 12-10,11-8, 11-8; 
 
पुरुष  50 वर्षावरील गट: अंतिम  फेरी:
विवान खुबचंद(दिल्ली)[1]वि.वि.सौरभ देवकुळीयर(कर्नाटक)[6] 7-11, 11-4, 8-11, 11-9, 11-4;
 
पुरुष  55 वर्षावरील गट: अंतिम फेरी:
दृश्यांत जामवाल(दिल्ली)[2]वि.वि.अंशूण बहल(महाराष्ट्र)[1]11-5, 11-5, 11-4; 
 
पुरुष 60 वर्षावरील गट: अंतिम फेरी:
विजय जैनी(हरियाणा)[2]वि.वि.रवीकृष्णा बुर्ला(तेलंगणा)[3]11-6, 9-11, 11-3, 11-6;
 
पुरुष 65 वर्षावरील गट: अंतिम फेरी:
राजीव रेड्डी(तामिळनाडू)[1]वि.वि.किशन लाल(महाराष्ट्र)[3] 11-6, 11-9, 12-10 . 

स्पर्धा परीक्षा महोत्सवाचे मंगळवारी उद्घाटन

0

पुणे : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या तरुणाईला योग्य मार्गदर्शन व करिअरला दिशा मिळण्यासाठी आयोजिलेल्या स्पर्धा परिक्षा महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार, दि. १८ जून २०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडामंच येथे होणार आहे. मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव भूषण गगराणी, माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे, स्टडी सर्कलचे संचालक डॉ. आनंद पाटील, बारामती ऍग्रो लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना करणार आहेत.

सृजन फौंडेशनच्या व एमपीएससी स्टुडंट्स राईट्स यांच्या संयुक्त विद्यमाने वास्तव, भवितव्य व दिशा या संकल्पनेवर आधारित हा स्पर्धा परिक्षा महोत्सव १८ ते २० जून २०१९ या तीन दिवशी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत होत आहे. केंद्रीय-राज्य लोकसेवा आयोग, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे अशा स्पर्धा परीक्षांविषयी विद्यार्थ्यांना या महोत्सवात माहिती उपलब्ध करुन दिली जाणार आहे. उद्घाटनानंतर ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, गिरीश कुबेर व लेखक अच्युत गोडबोले यांची व्याख्याने होणार आहेत.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, यूपीएससी टॉपर तृप्ती धोडमिसे, स्वाती दाभाडे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर एमकेसीएलचे संचालक विवेक सावंत, बीव्हीजीचे हनुमंतराव गायकवाड, रूरल रिलेशन्सचे प्रदीप लोखंडे, पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते विविध विषयांवर विद्यार्थ्यांना संबोधित करतील. तिसऱ्या दिवशी (गुरुवारी) लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष विठ्ठल मोरे, माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, अपंग कल्याण आयुक्त बालाजी मंजुळे, सनदी अधिकारी रमेश घोलप, स्नेहल धायगुडे मार्गदर्शन करतील.

महोत्सवाचा समारोप गुरुवार, दि. २० जून २०१९ रोजी सायंकाळी ६.०० वाजता होणार आहे. यावेळी उद्योजक सतीश मगर, माजी प्रधान सचिव महेश झगडे, तामिळनाडूतील जिल्हाधिकारी आनंद पाटील, सीईओ राजेंद्र भारूड व रोहित पवार उपस्थित असणार आहेत. याबरोबरच प्रत्येक दिवशी दुपारच्या सत्रात क्लासेसचे मार्गदर्शन ठेवण्यात आले आहे.

एमएसआरए 76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात सुनयना कुरुविला व जोश्ना चिनप्पा यांच्यात अंतिम लढत

0
  • पुरुष गटात  महेश माणगावकर  व  अभिषेक प्रधान यांच्यात विजेतेपदासाठी लढत    
पुणे, दि.16 जून 2019: महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए) यांच्या तर्फे आयोजित व स्क्वॅश रॅकेटस्‌ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसआरए-76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात तामिळनाडूच्या जोश्ना चिनप्पा,  सुनयना कुरुविला यांनी तर, पुरूष गटात महाराष्ट्राच्या महेश माणगावकर, अभिषेक प्रधान या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.     
 
अमनोरा मॉल ग्लास कोर्ट, आयस्क्वॅश अकादमी, चंचला संदीप कोदरे स्पोर्टस्‌ क्लब, मुंढवा, आणि आरएसआय येथील स्क्वॅश कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत महिला गटात  अव्वल मानांकित तामिळनाडूच्या जोश्ना चिनप्पा हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत दिल्लीच्या चौथ्या मानांकित तन्वी खन्नाचा 11-4, 12-10, 11-8 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत तिसऱ्या मानांकित तामिळनाडूच्या सुनयना कुरुविला हिने दिल्लीच्या पाचव्या मानांकित  सान्या वत्सचा 10-12, 5-11, 11-6, 11-7, 11-7 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली गाठली. अंतिम फेरीत सुनयना कुरुविला अव्वल मानांकित जोश्ना चिनप्पाचे आव्हान असणार आहे.
पुरुष गटात उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित महेश माणगावकर याने आपली विजयी मालिका कायम ठेवत आपलाच राज्य सहकारी वीर चॊत्रानीचा 11-6, 11-4, 11-2असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. दुसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या अभिषेक प्रधान याने तिसऱ्या मानांकित अभिषेक अगरवालचा 11-3, 11-7, 11-9 असा पराभव करून आगेकूच केली.
????????????????????????????????????
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: महिला गट: उपांत्य फेरी: 

जोश्ना चिनप्पा(तामिळनाडू)[1]वि.वि.तन्वी खन्ना(दिल्ली)[4] 11-4, 12-10, 11-8;

सुनयना कुरुविला(तामिळनाडू)[3]वि.वि. सान्या वत्स(दिल्ली)[5]10-12, 5-11, 11-6, 11-7, 11-7;
 
पुरुष गट: उपांत्य फेरी:
महेश माणगावकर(महाराष्ट्र)[1]वि.वि.वीर चॊत्रानी(महाराष्ट्र)  11-6, 11-4, 11-2;
अभिषेक प्रधान(महाराष्ट्र)[2]वि.वि.अभिषेक अगरवाल(महाराष्ट्र)[3]11-3, 11-7, 11-9

सेवापूर्ती गौरव सभारंभ निमित्ताने सामाजिक उपक्रम संपन्न

0
जुन्नर /आनंद कांबळे
पारुंडे (ता-जुन्नर) येथील श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिराचे मुख्याध्यापक फकीर आतार हे ३४ वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाले.
त्या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील विविध सेवाभावी सामाजिक संस्थेच्यावतीने सेवापूर्ती गौरव सभारंभचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी मार्च  २०१९ मधील एस.एस.सी. तील गुणवंत विद्यार्थाचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करताना जिल्हा परिषद जेष्ठ सदस्या आशाताई बुचके म्हणाल्या कि, सामाजिक संस्थेच्या  माध्यमातून शिक्षक सेवापूर्ती निमित्त गौरव होतो, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. अजूनही पौराणिक काळानंतर ही गुरुचे स्थान  आई-वडील इतके महत्वाचे आहे.
या वेळी शिवांजली साहित्य पीठाच्या माध्यमातून संकलित केलेल्या “आई-बाप” या कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते, तालुक्यातील शाळांना मोफत  ‘प्रथोमपचार पेटीचे’ वाटप करण्यात आले. यावेळी शुभेच्छा देताना सोनवणे म्हणाले कि  संघर्षमय जीवन जगून शून्यातून अस्तित्व निर्माण करणे हे व्यक्तिमत्त्व, दातृत्वातून आरोग्य जपण्यासाठी शाळांना प्रथोमपचार पेटी आईच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात आल्या.
वेगवेगळ्या  क्षेत्रातील अनेकांना सुसंस्कारितपणे घडविल्याचे चित्र, समोर बसलेल्या जनतेमध्ये बघावयास सरांच्या माध्यमातून मिळत आहे.
या प्रसंगी अनेक पालक , माझी विद्यार्थी यांच्यावतीने आतार यांचा सपत्नीचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्री, पुष्पांजलीचे चेअरमन ज्ञानेश्वर पुंडे, मार्तंड देवस्थान चिंचोलीचे अध्यक्ष भाऊसाहेब काशीद, श्री कुलस्वामी देवस्थान वडजचे अध्यक्ष विजय चव्हाण, सरपंच विजया चव्हाण,अजित चव्हाण प्रा. भालवणकर, माजी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पवार, श्री ब्रम्हनाथ सेवा मंडळाचे उपाध्यक्ष अविनाश पुंडे, रुपाली बोकरीया,प्रशांत केदारी, वसंतराव पवार, लेण्याद्री देवस्थानचे माजी अध्यक्ष जयवंत डोके, विठ्ठलवाडीचे सरपंच आदिनाथ चव्हाण ,सुफी संत लतीफ भाई, रामभाऊ सातपुते आदि मान्यवर प्रसंगी उपस्थित होते.
हा गौरव सभारंभ डिसेंट फाउंडेशन , पुणे. राजाराम पाटील वृद्धाश्रम,  बल्लाळवाडी
मतिमंद मुलांची संस्था ( नंदनवन ) धामणखेल , जुन्नर तालुका शिक्षक-पालक संघ (रजि.), शिवांजली साहित्य पीठ – चाळकवाडी. समर्थ रुरल, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनस – बेल्हे, गुरुवर्य वै. कोंडाजी बाबा डेरे वारकरी संस्था पर्णकुटी वैष्णवधाम, मार्तंड देवस्थान ट्रस्ट, चिंचोली आदि संस्थांनी आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक जितेंद्र बिडवई यांनी केले. सूत्रसंचालन मेघनाथ जाधव  तर आभार संदीप पानसरे यांनी व्यक्त केले.