Home Blog Page 2904

राज्‍यपाल राम नाईक लिखित “चरैवेति !चरैवेति!!”पुस्‍तकाचे प्रकाशन

0

पुणे दि. ३०-  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व फर्ग्‍युसन महाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने  येथील  फर्ग्‍युसन महाविद्यालयात उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक लिखित  “चरैवेति !चरैवेति!!”(जर्मन अनुवाद) या पुस्‍तकाचे प्रकाशन करण्‍यात आले.

            यावेळी  उत्‍तर प्रदेशचे राज्‍यपाल राम नाईक, महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्‍यसभा सदस्‍य खा. डॉ. विनय सहस्‍त्रबुध्‍दे, लोकसभा सदस्‍य खा.गिरिश बापट, महापौर मुक्‍ता टिळक,  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्‍ल पवार, डे.ए.सोसायटीचे अध्‍यक्ष डॉ. शरद कुंटे, प्राचार्य डॉ.चिं.ग.वैद्य,फर्ग्‍युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डे.ए.सोसायटीचे अध्‍यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कुलसचिव प्रफुल्‍ल पवार यांनी मानले.

प्रतापगडावर जाण्यासाठी होणार रोप वे – पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

0

मुंबई, : छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडावर पर्यटकांना पोहोचण्यासाठी जावळी गाव (ता. महाबळेश्वर) ते प्रतापगड असा रोपवे होणार आहे. पर्यटन धोरण 2016 अंतर्गत या रोपवे प्रकल्पाला विशाल प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या पुर्ततेनंतर पर्यटकांना किल्ले प्रतापगडावर जाणे सोपे होणार आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

हा रोपवे जावळी गाव (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथून सुरू होणार आहे. जावळी गाव ते लँडविक पॉईंट तसेच प्रतापगड असा हा 5.6 किमी लांबीचा विशाल रोपवे प्रकल्प असेल. या प्रकल्पामुळे भविष्यात प्रतापगडावर येणाऱ्या पर्यटकांना चढण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार असून गडावर जाणे सोयीचे होणार आहे. राज्यातील गडकोट किल्ले संवर्धनासाठी शासन व्यापक प्रयत्न करीत आहे. प्रतापगडावर होणारा रोपवे प्रकल्प हा आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा प्रकल्प असेल. या रोपवेमुळे महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवात भर पडणार आहे. यामुळे पर्यटकांची संख्याही वाढणार असून छत्रपती शिवरायांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे, असे पर्यटन मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.

स्वराज्याच्या इतिहासाचा किल्ले प्रतापगड हा दुर्ग महत्वाचा साक्षीदार आहे. इतिहास प्रेमी पर्यटकांची किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी नेहमीच मोठी गर्दी असते. प्रामुख्याने शनिवार आणि रविवारी आणि सुटीच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी जातात. प्रतापगडावर जाण्यासाठी घाटरस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र, गडावर जाण्यासाठी अरुंद घाटरस्ता असल्याने वाहतुकीची कोंडी होते. तसेच पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर पर्यटकांना प्रतापगडावर जाणे सोयीस्कर व्हावे यासाठी रोपवे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री श्री. रावल यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य संचालनायच्या निष्क्रियतेमुळे पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित..!

0

मुंबई – राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या  निष्क्रियतेमुळे फेब्रुवारीच्या  विधिमंडळ अधिवेशनात  आर्थिक तरतूद न केल्याने सुमारे तीस हजार वयोवृद्ध  लोककलावंतांना पाच महिन्यांचे मानधन मिळाले नाही.

ही चूक उशिरा लक्षात आल्याने संबंधितांनी अखेर सध्याच्या जूनच्या अधिवेशनात ४५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करून घेतली.

आज महाराष्ट्रातील हजारो  वयोवृद्ध लोककलावंताकडे एक वेळचे जेवायला ही पैसे नाहीत.काही कलावंत अपुऱ्या औषधोपचारमुळे  मृत्युमुखी पडलेच्या घटना घडल्या आहेत.यातच सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अशा भोंगळ कारभारामुळे राज्यातील सुमारे तीस हजार वयोवृद्ध लोककलावंतांना फेब्रुवारी पासून  ते आज जून महिना संपत आला तरी मानधन मिळाले नाही.

लोकसभा निवडणुकीपूर्वी  लेखानुदान सादर करणारे विधिमंडळाचे अधिवेशन पार पडले.या अधिवेशनात नियमित योजनांवर सर्व खात्यांनी आर्थिक तरतूद करून घेतली होती. मात्र सांस्कृतिक कार्य संचालनालयाने त्या काळात आपल्या खात्याकडे वयोवृद्ध लोककलावंताच्या मानधनासाठी अधिकृत प्रस्तावच सादर न केल्याने मोठी गडबड झाली.हे संचालनालयाच्या उशिरा लक्षात आले. मात्र यामुळेपाच महिन्यापासून गरीब गरजू लोककलावंत मानधनापासून वंचित राहिला.

सध्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अनेक।वरिष्ठ अधिकारी “कार्यालयात कमी,आणि दौरे नेहमी” या प्रकारे काम करीत असल्याने अनेक योजना मध्ये अशाच अडचणी निर्माण झाल्याचे कळते.

चालू अधिवेशनात ४५कोटी रुपयांची तरतूद या मानधनासाठी करण्यात आली असून आता हे।मानधन साधारणपणे जुलै अखेर पर्यत मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील वयोवृद्ध कलावंतांना सध्या “अ-ब-क” या वर्गवारी नुसार अनुक्रमे २१००, १८०० आणि १५००रुपये दरमहा मानधन मिळते,परंतु या अधिवेशनात वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी मंत्री यांच्या एक प्रश्नाला उत्तर देताना लवकरच या मानधनात वाढ करण्यात येईल,असे आश्वासन विधानसभेत दिले.
महाराष्ट्रातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलाकारांना मानधन देण्याची योजना सन १९५४-५५ या वर्षांपासून राबविण्यात आली आहे. दि. आँगस्ट २०१४ रोजी दिड पटीने मानधनात वाढ करण्यात आली आहे.सन २०१६१७ पासून इबीटी प्रणालीव्दारे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांना थेट त्यांच्या खात्यात मानधन देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.परंतु चार -पाच महिने जर मानधन मिळत नसेल तर याचा उपयोग काय..! असे मानधनाचा लाभ घेणाऱ्या कलावंताचे म्हणणे आहे.
सध्या राज्यात लोककलावंताना संघटीत करण्याच्या नावाखाली शेकडो संघटना रजिस्टर झाल्या आहेत.पण फक्त वर्गणी घेवून पैसे गोळा करण्याचा धंदा काही लोककलावंताच्या संघटनांच्या नेत्यांनी सुरू केले आहे.कधी लोककलावंताच्या प्रश्नावर निदर्शन नाही..कधी रस्त्यावर उतरून आंदोलनं नाही.त्यामुळे सांस्कृतिक कार्य खातं केवळ आणि केवळ लोककलावंतावर अन्याय करीत असल्याचे एक तमाशा फड मालकाने स्पष्ट केले.

झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे वाटपाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

0

नागपूर: झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टेवाटप करण्यासाठी महसूल, नागपूर सुधार प्रन्यास, तसेच महानगरपालिका यांनी कालबध्द कार्यक्रम तयार करुन पात्र लाभार्थ्यांना मालकीहक्काचे नोंदणी झालेले पट्टे वाटप करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

रामगिरी येथे नागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे नोंदणीकृत पट्टे वितरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. त्याप्रसंगी पट्टे वाटपाच्या कार्यक्रमाला प्राधान्य देवून कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले.

मालकीहक्काचे पट्टे वाटपासंदर्भात शंभर झोपडपट्या महसूल विभागाच्या जागेवर आहे. त्यापैकी 52 झोपडपट्यांमध्ये मालकीहक्काने राहणारे पट्टेधारकांची माहिती पूर्ण झाली आहे. तसेच पट्टे वाटपासाठी शहराच्या विविध भागातून सुमारे चार हजार सातशे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी तीन हजार नऊशे लाभार्थी पात्र ठरले असून त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. महसूल विभागाच्या जागेवर असलेल्या झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाची प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करावी, तसेच त्यांना नोंदणी झालेले पट्टे वितरित करण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

महानगर पालिकेच्या जागेवर 13 झोपडपट्या असून त्यापैकी 13 झोपडपट्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. खाजगी जागेवर असलेल्या झोपडपट्या संदर्भात शासनस्तरावर धोरण ठरविण्यात येत असून संबंधित खाजगी जागा मालकांना टीडीआर देवून पट्टे वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भातही प्राधान्य देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शासकीय जागा, महानगर पालिका व सुधार प्रन्यास आदी जागेवर बसलेल्या झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही करताना यासंदर्भात महानगर पालिकेला जागेची मालकी देवून येथील पट्टे वाटप महानगर पालिकेने पट्टे वाटप पूर्ण करावे यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेन सादर करावा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

पट्टेधारकांना मालकीहक्काचे पट्टे वितरीत करताना प्रत्येक नागरिकांना नोंदणी करुन पट्टे वितरीत करण्यासाठी नोंदणी विभागातर्फे वेगळी व्यवस्था करण्यात आली असून या कामाला अधिक गती देण्यात येईल. मालकीहक्काचे पट्टे वाटपासंदर्भात ज्या पट्टेधारकांना पट्टे वाटपाची डिमांड मिळाली आहे. अशा नागरिकांनी तात्काळी डिमांड भरुन भूखंडाची मालकी आपल्या नावाने करुन घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. विकासनगर, मोठा इंदोरा, शीव नगर, चुन्नाभट्टी आदी वस्त्याचे मालकीहक्काचे पट्टे वाटपाचे काम प्राधान्याने पूर्ण करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे वितरणाच्या कामासंदर्भात महानगर पालिका आयुक्त यांनी महसूल व सुधार प्रन्यास आदी विभागाचा समन्वयाचे काम करावे. तसेच पट्टे वाटपासंदर्भात येत्या 15 दिवसानंतर आढावा घेवून पट्टे वाटपाची माहिती सादर करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. बैठकीस महानगर पालिका आयुक्त अभिजीत बांगर, नगरसेवक संजय बंगाले, सेंटर फार सस्टेनेबल डेव्हल्पमेंट या संस्थेच्या प्रमुख श्रीमती लिना बुधे आदी उपस्थित होते.

देशाच्या चित्रपट ठेव्याचे जतन करण्यासाठी सरकार कटिबद्ध – प्रकाश जावडेकर

0

पुणे-देशाच्या राष्ट्रीय चित्रपट ठेव्याचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन अर्थात राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान हा माहिती अणि प्रसारण मंत्रालयाचा महत्त्वाचा उपक्रम आहे. या उपक्रमाची कालबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे, केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. पुण्यातल्या एनएफएआय अर्थात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला त्यांनी आज भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

मंत्रालयाच्या नॅशनल फिल्म हेरीटेज मिशन अर्थात राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान या महत्वाच्या प्रकल्पाचा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यक्रमांचाही त्यांनी आढावा घेतला. सुमारे 1.32 लाख चित्रपट रिळांच्या स्थितीच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे आणि प्रतिबंधात्मक संवर्धनाचे काम सुरु आहे, असे सांगून चित्रपट डिजिटायझेशनचे काम लवकरच सुरु होईल, असे जावडेकर म्हणाले. सुमारे तीन एकर जमिनीवर सरकार जतनविषयक नव्या सुविधा (वज्रकक्ष) उभारत आहे, याशिवाय एनएफएआयमधे विविध गटातल्या मुलांसाठी बाल चित्रपट क्लबही राहील, असे ते म्हणाले. नुतनीकरण केलेल्या जयकर बंगल्यात नवी डिजिटल लायब्ररी आणि चित्रपट संशोधकांसाठी विशेष कक्ष राहिल, असेही त्यांनी सांगितले.

या भेटीदरम्यान जावडेकर यांनी चित्रपट संघटनेतील मान्यवरांसमवेत बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत चित्रपटाची प्रत कोणत्या स्थितीत आहे, याचे मूल्यांकन, सुमारे 1,50,000 चित्रपट रिळांचे जतन, सुमारे 3500 चित्रपटांचे डिजिटायझेशन, भारतीय चित्रपट क्षेत्रात मानाचे स्थान मिळवलेल्या सुमारे 2000 चित्रपटांच्या ध्वनी मूळ स्थितीत आणणे, जतन आणि संरक्षण कप्पे निर्मिती, प्रशिक्षण आणि कार्यशाळा, समावेशक वेब आधारीत माहिती तंत्रज्ञान प्रणाली निर्मिती यांचा समावेश आहे.

1 जुलैपासून होणार हे मोठे बदल; या बदलांचा ऑनलाइन व्यवहार, गृहकर्जावर होणार परिणाम

0

नवी दिल्ली – 1 जुलैपासून बँकिंग, रेल्वे आणि गाड्यांच्या किमतींसह अनेक मोठे बदल होणार आहे. यातील काही बदल दिलासा देणारे तर काही अडचणी वाढवणारे असतील. 1 जुलैपासून रेल्वेने अनेक गाड्यांचा वेळ आणि नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. तर बँक खात्यातून ऑनलाइन व्यवहारांवर आकारले जाणारे शुल्क बंद करण्यात येणार आहे.

बँकिंग क्षेत्रात होणारे बदल
रिझर्व्ह बँकेच्या आदेशावरून ऑनलाइन व्यवहारांवर आकारण्यात येणारे एनईएफटी, आरटीजीएस शुल्क 1 जुलैपासून बंद होणार आहेत. यामुळे ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांनी दिलासा मिळणार आहे.

एसबीआयने आपल्या गृह कर्जवारील व्याज दर रेपो रेटशी जोडणार आहे. यामुळे रेपो रेटच्या बदलानुसार गृह कर्जाच्या व्याजात वाढ किंवा घट होणार आहे.

वाहनांबाबत होणारे बदल
1 जुलैपासून अनेक रेल्वे गाड्यांचे वेळपत्रकात बदल होणार आहे. तसेच काही गाड्यांची नावे देखील बदलण्यात येणार आहे.

सुरक्षा मान लागू केल्यामुळे महिंद्राच्या पॅसेंजर कार 36 हजार तर मारुती डिझायर 12 हजार 700 रूपयांपर्यंत महाग होणार आहे.

बजत योजनांबाबत होणारे बदल
1 जुलैपासून तीन महिन्यांपर्यंत सुकन्या समृद्धि, पीपीएफ सारख्या लहान बचत योजनांवरील व्याजदरांत 0.1 टक्क्याची कपात करण्यात येणार आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कुलकर्णी ,सरचिटणीसपदी हंचाटे

0

पुणे श्रमिक पत्रकार संघ

२०१९-२०२० निवडणूक निकाल हंचाटे

अध्यक्ष
प्रसाद कुलकर्णी

सरचिटणीस
चंद्रकांत हंचाटे

उपाध्यक्ष
अभिजित बारभाई
सुकृत मोकाशी

खजिनदार
सुनील जगताप

चिटणीस
लक्ष्मण मोरे
विजयकुमार म्हस्के

सदस्य

अभिजित पिसे

शिरीष रणदिवे

संदीप पाटील
प्रशांत बिडवे
तनिष्का डोंगरे
कुलदीप जाधव
राजा गायकवाड
विजयकुमार कुलकर्णी
अमोल कविटकर
संदीप मराठे

मेहेतर वाल्मिकी समाजाला काँग्रेस पक्षाने संधी द्यावी

0

पुणे-आगामी विधानसभा निवडणुकामध्ये मेहेतर वाल्मिकी समाजाला काँग्रेस पक्षाने संधी द्यावी , अशी मागणी मेहेतर वाल्मिकी समाजाच्या महत्वपूर्ण बैठकीत निर्णय घेण्यात आला . क्वीन्स गार्डनमधील इन्स्पेक्शन बंगलोमध्ये  मेहेतर वाल्मिकी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आयोजित करण्यात आली होती . या बैठकीस पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व माजी नगरसेवक करण मकवानी , राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष दीपक निनारिया , मीरा शिंदे , अक्षय चरण , सिध्दांत सारवान , कामगार नेते प्रताप सोळंकी , मेहेतर वाल्मिकी रुखी समाज सुरक्षा संघाचे अध्यक्ष राजन चंडालिया , पुणे शहर मेहेतर वाल्मिकी समाजाचे पंच प्रमुख सुनील चव्हाण , लष्कर बेडा पंचायतचे पंचप्रमुख विनोद परदेशी , किशोर साळुंके , महेंद्र लालबिगे , अखिल सफाई मजदूर काँग्रेसचे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष अरविंद सुसगोहेर , ससून रुग्णालयाचे इंटकचे अध्यक्ष प्रमोद निनारिया , हितेश मकवानी , जितेंद्र डिकाव, राजेश परदेशी , विशाल गोहेर , गौरव सारवान , सोमनाथ गाडे , जितीन परदेशी , राजेश मकवानी , नितीन चव्हाण , नितीन परमार , अमित छत्रे व मोठया संख्येने मेहेतर वाल्मिकी समाज बांधव उपस्थित होते .

यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व माजी नगरसेवक करण मकवानी यांनी सांगितले कि , मेहेतर वाल्मिकी समाज हा राजकारणापासून वंचित राहिलेला समाज आहे , या समाजाला लोकप्रतिनिधित्व देण्याची गरज आहे . आपण पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डात नगरसेवक म्हणून सर्व समाजाला बरोबर घेऊन काम केले आहे . पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डात अनेकांना नोकरी मिळवून दिली .  आपण कामाच्या जोरावर मेहेतर वाल्मिकी समाजाला आगामी विधानसभा निवडणुकामध्ये  काँग्रेस पक्षाने संधी द्यावी . येत्या ३ जुलै २०१९ रोजी आपण मेहेतर वाल्मिकी समाजाचे शिष्टमंडळ घेऊन मुंबई येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांना भेटणार आहोत . आपण कामाच्या व आत्मविश्वासाच्या जोरावर काँग्रेसने आपल्याला आगामी विधानसभा निवडणुकीत संधी द्यावी . तसेच समाजातील पंचायत प्रमुख , काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहोत . समाजानेदेखील   आपला स्वाभिमान जागा केला पाहिजे . समाजाने समाजाचा विचार केला तर समाजाला भवितव्य राहील अन्यथा आपल्या समाजाला मोठे राजकीय नुकसान होणार आहे . त्यामुळे समाजाने जागे झाले पाहिजे .

या बैठकीचे सूत्रसंचालन दीपक निनारिया यांनी केले तर आभार हितेश मकवानी यांनी मानले . 

विधानसभा निवडणुकीसाठी महिला काँग्रेसने सज्ज व्हावे : सुश्मिता देव

0
मुंबई : तीन महिन्यांनी होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महिला काँग्रेसने सज्ज व्हावे आणि राज्यात पुन्हा एकदा महिलांना न्याय देणारे काँग्रेसचे सरकार स्थापन करावे, असे आवाहन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुश्मिता देव यांनी केले आहे.

येथील टिळक भवनस्थित प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात आज आयोजित महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रभारी तसेच राजस्थानच्या महिला व बाल कल्याण मंत्री ममता भूपेश, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अॅड. चारुलता टोकस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस जेनेट डिसुझा, राष्ट्रीय सचिव नुरी खान, आकांक्षा ओला, संध्या सव्वालाखे, लिगल सेलच्या राष्ट्रीय समन्वयक सुशिबेन शहा, माजी प्रांताध्यक्ष कमलताई व्यवहारे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अजंता यादव, सोशल मीडिया राष्ट्रीय समन्वयक चित्रा बाथम, आमदार हुस्नबानो खलिफे आदी उपस्थित होते.

या बैठकीसाठी भरपावसातही संपूर्ण महाराष्ट्रातून महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या बैठकीला अॅड. चारुलता टोकस, सचिन

सावंत, ममता भूपेश यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्रामध्ये महिला काँग्रेस सक्षमपणे काम करीत असून, महिलांचे संघटन अधिक मजबूत करणार असल्याचे चारुलता टोकस यांनी सांगितले. निवडणुकीला सामोरे जात असताना महिलांनी सशक्त उमेदवार म्हणून स्वतःला सिद्ध केले पाहिजे, असे सचिन सावंत म्हणाले. तसेच परंपरागत पद्धतीने उमेदवारी न देता भविष्यात थेट जनतेशी संपर्क असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जावी आणि महिलांनी गांभिर्याने तळागाळापर्यंत संपर्क वाढवावा, असे ममता भूपेश म्हणाल्या.

अध्यक्षीय भाषणात माजी खासदार सुश्मिता देव यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे महिलांच्या हक्कासाठी सातत्याने लढत असून, महिला काँग्रेस त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे सांगितले. जास्तीत जास्त महिलांना प्रतिनिधीत्व देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत परंतु सध्याच्या काळात केवळ उमेदवारी किंवा पदाच्या मागे न जाता काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता म्हणून महिलांनी काम केले पाहिजे,असेही त्या म्हणाल्या.

बैठकीच्या प्रारंभी राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा आपला निर्णय मागे घेऊन यापुढेही अध्यक्ष म्हणून कायम रहावे, असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. या बैठकीचे सूत्रसंचालन अॅड. जयश्री शेळके तर आभार प्रदर्शन डॉ. संजिवनी बिहाडे यांनी केले.

‘अ‍ॅल्कॉन लँडमार्क्‌‌स’च्या विपुल अगरवाल आणि विवेक अगरवाल या दोन बिल्डर बंधूंना 2 दिवस पोलीस कोठडी

0

पुणे : अ‍ॅल्कॉन स्टायलस इमारतीची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा बांधकाम व्यावसायिकांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत (२ जुलै) पोलीस कोठडी दिली आहे. या दुर्घटनेत लहानग्यांसह १५ मजुरांचा मृत्यू झाला होता.
संरक्षक भिंत दुर्घटनेनंतर ‘अ‍ॅल्कॉन लँडमार्क्‌‌स’ आणि ‘कांचन ग्रुप’च्या आठ बिल्डरांसह इतरांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ‘अ‍ॅल्कॉन लँडमार्क्‌‌स’च्या विपुल अगरवाल आणि विवेक अगरवाल या दोन बिल्डर बंधूंना कालच अटक करण्यात आली होती. या दोघांना आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. रामदिन यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता दोघांचीही मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, अन्य आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
कोंढव्यात कांचन ग्रुपकडून ‘रॉयल एक्झॉटिक’ ही बहुमजली इमारत बांधण्यात येत आहे. सध्या पिलरचे काम सुरू असून जवळच कामगारांना राहण्यासाठी पत्र्यांचे शेड उभारून घरे तयार केली होती. दिवसभर काम केल्यानंतर कामगार या पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. काही महिन्यांपूर्वीच कॉन्ट्रॅक्टरने त्यांना या इमारतीच्या कामासाठी आणले होते. शनिवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास अचानक ‘अ‍ॅल्कॉन स्टाइलस’ या इमारतीची संरक्षक भिंत या १५ ते २० झोपड्यांवर कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकून यात चार चिमुकल्यांसह १५ जणांचा मृत्यू झाला. तर, दोघे जखमी झाले.

‘अॅल्कॉन स्टाइलस’,’रॉयल एक्झॉटिका’दोघांचा हलगर्जीपणा 15 जणांचे बळी घेवून गेला.

0

पुणे-अॅल्कॉन स्टाइलस’,’रॉयल एक्झॉटिका’दोघांचा हलगर्जीपणा 15 जणांचे बळी घेवून गेला असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे .’अॅल्कॉन स्टाइलस’ या इमारतीची सीमा  भिंत भराव थोपविण्यासाठी (रिटेनिंग वॉल) बांधली असली तरी, तिचे बांधकाम तुलनेने निकृष्ट दर्जाचे केल्याचे महापालिका आणि पोलिसांच्या तपासणीत आढळून आले आहे. ही भिंत ‘आरसीसी’ बांधकामाद्वारे बांधणे अपेक्षित असताना तिचे कच्चे बांधकाम केल्याचा दावा ‘रॉयल एक्झॉटिका’च्या पंकज व्होरा यांनी केला आहे. दरम्यान, बांधकाम साइटवर मजुरांना राहण्यासाठी धोकादायक पद्धतीने पत्र्याच्या खोल्या बांधण्यात आल्याचा दावा पोलिसांनी तक्रारीत केला आहे. अशा प्रकारे १५ मजुरांच्या मृत्यूला जबाबदार धरून पोलिसांनी दोन्हीही बांधकाम व्यावसायिकांसह त्यांच्या इंजिनीअर्सवर गुन्हा दाखल केला आहे. ‘अॅल्कॉन स्टाइलस’ या इमारतीची सीमा  भिंत पडल्याने ‘रॉयल एक्झॉटिका’च्या कामगारांना जीव गमवावा लागला.

‘अॅल्कॉन लँडमार्क्स’यांनी कोंढवा येथे ‘अॅल्कॉन स्टाइलस’ या इमारतीचे बांधकाम २०११ मध्ये सुरू करून २०१९मध्ये पूर्ण करण्यात आले. या ठिकाणी पार्किंगच्या जागेत भराव टाकण्यात आला असून, हा भराव बंदिस्त करण्यासाठी सीमा भिंत (रिटेनिंग वॉल) बांधण्यात आली. ही भिंत ‘आरसीसी’ बांधकामाद्वारे चांगल्या पद्धतीने बांधणे अपेक्षित होते. मात्र, तिचे बांधकाम तुलनेने चांगल्या दर्जाचे झाले नाही, असा प्राथमिक अंदाज पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी ‘रॉयल एक्झॉटिका’च्या व्होरा यांनी ‘अॅल्कॉन लँडमार्क्स’वर आरोप करून सीमा भिंतीचे बांधकाम कच्च्या स्वरुपात असल्याचा दावा केला आहे. ‘या भिंतीजवळ आम्ही कोणतेही खोदकाम केलेले नाही. ही भिंत रिटेनिंग वॉल असल्याने ती कच्च्या बांधकामाची असेल, अशी आम्हाला कल्पना येणे शक्य नाही. त्यामुळे त्या भिंतीच्या पलीकडे माझे कामगार राहत होते. ही भिंत कच्च्या बांधकामामुळे पडून दुर्घटना घडली आहे,’ असाही दावा व्होरा यांनी केला आहे.

भिंतीलगत ‘रॉयल एक्झॉटिका’ या इमारतीचे बांधकाम सुरू असून तेथील कामागारांसाठी पत्र्याच्या शेडमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. महापालिकेच्या नियमानुसार या मजुरांची राहण्याची सोय सुरक्षा भिंतीलगत करणे योग्य नव्हते. तरीही ‘कांचन’ या बांधकाम व्यावसायिक फर्मने त्या ठिकाणी मजुरांची राहण्याची व्यवस्था केली. ही व्यवस्था भिंतीपासून सध्यापेक्षा १० फूट लांब करण्यात असती, तर अशा प्रकारच्या घटनेला सामोरे जावे लागले नसते. मात्र, या बांधकाम व्यावसायिकांनी निष्काळजीपणा दाखविल्याने त्यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला .

२ जुलैपासून तलाठी पदासाठी १२२ केंद्रांवर परीक्षा

0
मुंबई : महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी येत्या दि. 2 जुलै ते 26 जुलै 2019 या कालावधीत ई महापरीक्षा मार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यातील 122 केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसंदर्भात अधिक माहिती अथवा तक्रारींसाठी 1800 3000 7766 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला असल्याची माहिती मुंबई शहर व मुंबई जिल्हा उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कळविली आहे.
राज्य शासनाने सर्व विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार महसूल विभागातील तलाठी संवर्गातील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या पदासाठी 2 जुलैपासून राज्यातील विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे पूर्ण संचलन व कार्यान्वयन महा-आयटी (माहिती तंत्रज्ञान) विभागाच्या माध्यमातून ई-महापरीक्षा मार्फत होणार आहे. उमेदवारांच्या पसंतीच्या जिल्ह्यात परीक्षा देण्यासाठी संगणक विषय पायाभूत सोयी असणाऱ्या शाळा / कॉलेजची निवड महा-आयटीकडून करण्यात येऊन राज्यभरात एकूण-122 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षेसंदर्भात महाआयटीकडून परीक्षार्थींना सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर उमेदवाराने खालील सहापैकी एक मूळ फोटो ओळखपत्र  आणणे अत्यावश्यक आहे. यामध्ये 1. पॅन कार्ड 2. पासपोर्ट 3. वाहन अनुज्ञप्ती (Driving Licence) 4. मतदान ओळखपत्र 5. मूळ फोटोसह राष्ट्रीयकृत बॅक पासबुक 6. आधार कार्ड यांचा समावेश आहे. ओळखपत्र फेरफार करुन तोतया उमेदवार येऊ नये यासाठी फोटो ओळखपत्राची रंगीत झेरॉक्स, ई आधार कार्ड आणि फोटो ओळखपत्राची सॉफ्ट कॉपी वैध ओळखपत्र पुरावा म्हणून स्वीकारली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना उमेदवारांच्या हॉल तिकिटावर देण्यात आल्या आहेत.
महापरीक्षा पोर्टलवरून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा सुरू असतांना नियमांचे पालन केले जात आहे ना, काही गैरप्रकार होत नाही ना, यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा नियंत्रक (Observer) म्हणून व महा-आयटीच्या मुंबई येथील कमांड रुममध्ये परीक्षा नियंत्रक (Controller) म्हणून प्रत्येकी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
महापरीक्षा पोर्टलवरील तसेच परीक्षा प्रवेश पत्रावरील सूचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करावे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी/तक्रारी नोंदविण्यासाठी महापरीक्षा 1800 3000 7766 हा टोल फ्री तसेच enquiry@mahapariksha.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वांसाठी घरे : स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गृहनिर्माण व बांधकाम क्षेत्राशी निगडीत विषयांसंदर्भात बैठक
मुंबईदि.29 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘सर्वांसाठी घरे आणि परवडतील अशी घरे‘ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीमुंबईतील गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
गृहनिर्माण व बांधकाम क्षेत्राशी निगडीत विविध विषयांसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस केंद्रीय रेल्वेवाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयलकेंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलनगरविकास राज्यमंत्री योगेश सागरक्रिडाई व नारडेको या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांचे पदाधिकारीसदस्य आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घरे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीमुंबईतील गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर निश्चितच ठोस उपाय शोधले जातील. यात त्यासाठी केंद्रीय मंत्री आणि केंद्र शासनाकडून मिळणारे सहकार्य महत्त्वाचे आहे.
बैठकीत गृहबांधणी प्रकल्प तसेच झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्राशी निगडीत विविध विषयांसंदर्भात चर्चा करण्यात आली.

कोंढवा मृत्यू चे थैमान – बिल्डर बरोबर प्रशासकीय अधिकारी हि दोषी -राष्ट्रवादी चा दावा (व्हिडिओ)

0

पुणे-कोंढवा येथे अल्कोन स्टायलस च्या इमारतीची सीमाभिंत कोसळून लगतच्या बांधकाम प्रकल्पाच्या मजुरांच्या झोपड्यांवर कोसळून 15 जणांचे मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी जरी बिल्डर आणि संबधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली असली तरी,या बरोबर प्रशासकिय अधिकारी यांची हि जबाबदारी होती ,त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला हवी असा पवित्रा राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला आहे. महापालिकेतील विरोधी पक्ष नेते दिलीप बराटे यांनी पत्रकार परिषद घेवून याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र द्वारे मागणी केल्याचे सांगितले .तर खासदार सुप्रिया सुळे ,वंदना चव्हाण यांनी हि स्मार्टसिटी म्हणविणाऱ्या पुण्यातील अशा घटना म्हणजे प्रशासनाचे अपयश असल्याचे म्हटले आहे .पहा हा एक व्हिडिओ रिपोर्ट

कोंढव्यातील बोगस गुंठेवारी बांधकामांची चौकशी करा -समीर शेख

0

पुणे :पुण्यात कोंढवा भागात इमारतीची सीमा भिंत कोसळून सतरा जणांचा बळी गेला,हि घटना गंभीर असून ज्या इमारतीचे बांधकाम चालू होते त्या इमारती ला बांधकाम परवाना होता का याची सर्वप्रथम चौकशी झाली पाहिजे. कोंढव्यातील बोगस गुंठेवारीच्या सर्व बांधकामांची चौकशी झाली पाहिजे ,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे प्रदेश सचिव समीर शेख यांनी पत्रकाद्वारे केली आहे .
‘बिल्डिंग 2019 साली बांधायची आणि 2007 सालचा बांधकाम पुर्ण झाल्याचा “गुंठेवारी” दाखला लावायचा अशी बोगस गुंठेवारी केलेली बांधकामे कोंढवा येथे सर्वत्र आहेत.
ज्या इमारतींच्या पाया खोदाईची कामे सुरु आहेत , अशांकडे देखील चक्क 2007 किंवा 2008 चा बांधकाम पुर्ण झाल्याचा दाखला असू शकतो किंबहुना असतोच,असा आरोप एड . शेख यांनी केला आहे .
पार्किंगच्या जागेत दुकाने बनवून विकल्याने पार्किंगला जागाच नाही, अनेक भागात अग्निशामक दलाची वाहने देखील जाउ शकत नाहीत..
दोन चार गुंठ्यात पाच सहा मजले ठोकून टोलेजंग इमारती उभ्या आहेत पण पार्किंग ला जागा नाही,अशी परिस्थिती या भागात आहे .अनेक लोकांनी या पूर्वी या विषयाला हात घालायचे टाळले आहे. पण कुठवर आणि किती बळी देऊन या गडगंज असलेल्या मोठ्या लोकांच्या तिजोऱ्या भरायच्या? असा प्रश्नही त्यांनी पत्रकात विचारला आहे .