Home Blog Page 2889

दीड लाखात मिळणार उद्योग सामुग्री व प्रशिक्षण

0
अ‍ॅमस्टेड क्लोदिंग, एमपीएससी स्टुडंट्स राईट्स 
तरुणांना देणार व्यवसाय उभारण्याची संधी
निखिल सोंडकर, महेश बडे यांची माहिती; दीड लाखात मिळणार उद्योग सामुग्री व प्रशिक्षण

पुणे : ‘सरकारी नोकर्‍यांमधील वाढलेली स्पर्धा, समाजातील वाढती बेरोजगारी लक्षात घेऊन तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी एमपीएससी स्टुडंट्स राईट्स आणि अ‍ॅमस्टेड क्लोदिंग कंपनीने पुढाकार घेतला असून, अवघ्या दीड लाख रुपयांत स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची संधी शहरी व ग्रामीण तरुणांना मिळणार आहे. या दीड लाखामध्ये तरुणांना व्यवसायाची संपूर्ण सामग्री, प्रशिक्षण आणि उत्पन्नाची हमी देण्यात येणार आहे,“ अशी माहिती अ‍ॅमस्टेड क्लोदिंग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल सोंडकर व एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. नवी पेठेतील पत्रकारभवनात झालेल्या या पत्रकार परिषदेवेळी एमस्टेड कंपनीचे प्रमुख राकेश ओसवाल, स्टुडंट्स राईट्सचे किरण निंभोरे, विजय मते, साईनाथ डहाळे उपस्थित होते.

निखिल सोंडकर म्हणाले, “अ‍ॅमस्टेड क्लोदिंग कंपनीही 2004 पासून पुण्यात कार्यरत आहे. कापड उद्योगांमध्ये ही कंपनी काम करत असून, कंपनीचा पसारा संपूर्ण जगभर पसरलेला आहे. सामाजिक व्यावसायिक बांधिलकीच्या नात्याने व या तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी कंपनीने पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात कंपनीकडून शंभर ते दीडशे तरुणांना व्यवसाय उभारण्याची संधी देण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीला होणार्‍या नफ्यातून कंपनी त्यातील काही रक्कम स्पर्धा परिक्षा करणार्‍या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व व्यवसाय उभारणीसाठी देणार आहे. याशिवाय, दुष्काळग्रस्त भागातील उमेदवारांसाठी अभ्यासिका, अल्पदरात भोजनव्यवस्था, दिव्यांगांसाठी विशेष अभ्यासिका, स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन व सेमिनार्स, व्यवसाय मार्गदर्शन शिबिर, व्यवसाय उभारणीसाठी सहकार्य, गरीब-होतकरूंना शैक्षणिक मदत अशा प्रकारची विविध सामाजिक कामे या निधीमधून करण्यात येणार आहेत.”

निखिल सोंडकर म्हणाले, “कमी भांडवलात व्यवसाय उभारण्याची संधी तरुणांना देत असताना कंपनी त्यांना कपड्याच्या व्यवसायाबाबतचे सर्व प्रशिक्षण देणार आहे. तसेच त्यांची व्यवसायात वृद्धी व्हावी, यासाठी सर्व सहकार्य कंपनी करणार आहे. या नवीन तरुणांचे कसलेही आर्थिक नुकसान होणार नाही, याची संपूर्ण काळजी कंपनी घेणार आहे. राज्य सरकार विविध योजना राबवित असताना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून खाजगी कंपनीने या नात्याने या तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
महेश बडे म्हणाले, “स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍यांची संख्या लाखोंवर आहे. मात्र, जागा केवळ हजारांमध्येच आहेत. त्यामुळे जीवघेणी स्पर्धा आहे. चार-चार वर्षे अभ्यास करुनही स्पर्धा परिक्षेत अपेक्षित यश आले नाही, तर तरुणांमध्ये नैराश्य, ताणतणाव निर्माण होते. त्यातून अनेकदा आत्महत्येसारखे पाऊलही उचलले जाते. त्यामुळे स्पर्धा परिक्षेचे हे वास्तव समजून घेऊन वेगळ्या वाटा शोधायला हव्यात. स्पर्धा परिक्षेविषयी मार्गदर्शन करताना मान्यवर विद्यार्थ्यांना ‘बी प्लान’ आखण्याचा सल्ला देतात. मात्र, आम्ही विद्यार्थ्यांना थेट ’बी प्लान’ उपलब्ध करुन देत आहोत. स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थी, ग्रामीण भागातील तरुण स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी हा उपक्रम सुरू करत आहोत. एमपीएससी स्टुडंट्स राईट्स ही एक सामाजिक संघटना असून, गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेविषयी निगडित विषयांवर काम करत आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी चालवलेली ही एक चळवळ आहे.”

किरण निंभोरे म्हणाले, “जून महिन्यात गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या तीन दिवसीय स्पर्धा परीक्षा महोत्सवातच ‘उभारा दीड लाखात व्यवसाय’ या उपक्रमाचे अनावरण झाले. तरुणांनी व्यवसाय सुरू करावा, हाच हेतू यामागे आहे. आर्थिक समावेशन करून सामाजिक समावेशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या दोन संस्था करू पाहात आहेत. अशाच प्रकारे भविष्यात विविध व्यावसायिक कंपन्या, सामाजिक संस्थांना सोबत घेऊन तरुणांना कमी भांडवलात व्यवसाय उभा करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्र पातळीवर राबविण्यात येणार आहे.

बँक ऑफ बडोदाच्या पुणे झोनने कर्मचारी व ग्राहक यांच्याबरोबर साजरा केला 112 वा स्थापना दिन

0

पुणे:  बँक ऑफ बडोदाच्या पुणे झोनने ग्राहक व कर्मचारी यांच्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून बँकेचा 112वा स्थापना दिन साजरा केला.

विविध सामाजिक समस्यांबाबत जागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या वॉकेथॉनमध्ये अंदाजे 250 कर्मचारी सहभागी झाले होते. ग्राहक व कर्मचारी यांच्यासाठी रक्तदान शिबीर घेण्यात आले. महाराष्ट्र उच्च शिक्षण व माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या कार्यालयात वृक्षलागवड करण्यात आली, तसेच निवारा वृद्धाश्रमामध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी भोजन आयोजित केले होते.

सर्वांचे ऋण मानताना, बँक ऑफ बडोदाचे पुण्याचे झोनल हेड के. के. चौधरी यांनी सांगितले, “112 वर्षांच्या वाटचालीचा एक भाग असणे, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आमच्या ग्राहकांबरोबर व कर्मचाऱ्यांबरोबर स्थापना दिन साजरा करणे गौरवाचे आहे. आपण सर्वांनी इतकी वर्षे आमच्यावर दाखवलेला विश्वास अतिशय मोलाचा आहे आणि यापुढेही आम्हाला तुमची साथ हवी आहे. आम्ही यापुढेही सर्वोत्तम सेवा देणार आहोत आणि सर्व ग्राहकांना बँकिंगचा उत्कृष्ट अनुभव देणार आहोत.”

रमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी

0

पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीनिमित्त पुणे विद्यापीठाच्या अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राच्या सहाय्याने विशेष कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. चारुता प्रभुदेसाई यांनी लिहिलेल्या ‘समतेचे दीप अंतरी लावू’ या गीताचे गायन केले. संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक हर्षद गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णा भाऊंच्या विविध रचना सादर केल्या. नाट्य विभागाचे प्रमुख रविंद्र सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली मिहिर देशपांडे, मल्हार परळीकर, कार्तिक बहिरट यांनी ‘स्मशानातील सोनं’ या अण्णा भाऊंच्या कथेचे अभिवाचन केले.
डॉ. भंडगे आणि विद्यापीठ अधिसभेच्या सदस्या बागेश्री मंढाळकर यांनी मार्गदर्शन केले. मु‘याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका रजनी कोलते, वैशाली भोकरे, महेश जोशी यांनी संयोजन केले.

अजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले

0

पुणे- मुलगी शिकली, प्रगती झाली… नुसतं म्हणायचं नाही, तर मुलींसाठी काहीतरी करायचंच…या भावनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेविका आणि स्थायी समितीच्या माजी अध्यकशा अश्विनी आणि त्यांचे पती नितीन कदम या दाम्पत्याने गरीब घरातील ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व स्वीकारले . अजित पवारांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांनी घेतलेल्या एवढ्या मोठ्या जबाबदारीची प्रशंसा यावेळी ‘सकाळ’ चे संपादक ,ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी यांनी केली .

मुलींना सक्षम आयुष्य जगण्याच्या त्यांचा अधिकारापासून वंचित न राहण्याच्या प्रामाणिक उद्देशाने हे व्रत हाती घेऊन त्यांना त्यांचे भविष्य उज्ज्वल करता आलेच पाहिजे व त्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून अजित पवारांच्या  वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी,पोस्टरबाजी  टाळून पर्वती मतदारसंघातील ६० गरीब कुटुंबातील मुलींना दत्तक घेऊन त्यांची संपूर्ण शैक्षणिक फी, शालेय साहित्य, शालेय गणवेश, वार्षिक बस पास असा सर्व शैक्षणिक खर्च हे कदम दाम्पत्य करणार आहे. तळजाई परिसरातील १५ मुली व दत्तवाडीपरिसरातील ११ मुलींचा समावेश करत या  उपक्रमाची सुरुवात केली.

आयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी

मुंबई: आयडीबीआय बँक लिमिटेडने १४ जुलै २०१९ रोजी द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत बँकअश्युरन्स कॉर्पोरेट एजन्सी करार केला आहे.  यामुळे आता आयडीबीआय बँकेच्या १८५० पेक्षा जास्त शाखांच्या २० मिलियन ग्राहकांना न्यू इंडियाच्या सर्वसाधारण विमा उत्पादनांचा लाभ घेता येईल.  न्यू इंडियाच्या विमा योजना विविध प्रकारच्या जोखमींपासून आर्थिक संरक्षण मिळवून देण्याच्या दृष्टीने खास तयार करण्यात आल्या आहेत.

 या भागीदारीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना आयडीबीआय बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राकेश शर्मा यांनी सांगितलेआमच्या ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या आणि देशात तसेच जागतिक पातळीवर मजबूत स्थान असलेल्या नॉन-लाईफ इन्श्युरन्स कंपनीसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  सर्वसाधारण विमा क्षेत्रात या कंपनीचा बाजारपेठेतील हिस्सा १५% असून किंमत आणि सेवा या दोन्ही बाबतीत आयडीबीआय बँकेच्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यात ही कंपनी मोलाची भूमिका बजावेल.  सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या अशा विमा कंपनीची विश्वसनीयता आणि कार्यक्षम कॉर्पोरेट प्रशासन यामुळे आयडीबीआय बँकेच्या ग्राहकांना अनेक विविध सर्वोत्कृष्ट उत्पादनांचा लाभ घेता येईल तसेच फीच्या माध्यमातून बँकेच्या महसुलात लक्षणीय भर पडेल.” 

 द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडचे सीएमडी श्री. अतुल सहाय यांनी सांगितले, “भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पसरलेल्या विशाल नेट्वर्कमार्फत बँकिंग सेवा प्रदान करत असलेल्या कमर्शियल बँकांपैकी एक आयडीबीआय बँकेसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  उत्पादनाच्या किमतीबरोबरीनेच ग्राहकांचे लहान मोठे सर्व दावे तातडीने निकाली काढण्यावर आम्ही विशेष भर देतो.  आम्ही असे मानतो कीया दोन्ही कंपन्यांचे संपूर्ण भारतात पसरलेल्या विशाल नेटवर्कचा लाभ घेतमाहिती तंत्रज्ञानामार्फत ग्राहकसेवांना प्राधान्य देण्यासाठी दोन्ही संस्थांच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून घेता येईल.”

 करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाण्याच्या दिवशी “सुरक्षा कवच” ही खास तयार करण्यात आलेली वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी सुरु करण्यात आली.  व्यक्ती तसेच व्यवसायांच्या विविध गरजा भागवण्यासाठी सक्षम असलेल्या इतर उत्पादनांच्या बरोबरीनेच ही पॉलिसी देखील लवकरच उपलब्ध होईल.

 ग्रामीण व निम-शहरी भागांमध्ये आयडीबीआय बँकेने आपले मजबूत स्थान प्रस्थापित केले आहे.  आता या भागीदारीमुळे बँकेच्या सर्व ग्राहकांना न्यू इंडियाच्या विविध जोखीमांना समजून त्यानुसार तयार केलेल्या विविध संरक्षक कव्हर्सचा लाभ घेता येईल.  न्यू इंडियाचे विशाल वितरण नेटवर्कतत्पर सेवा व दावे निकाली काढण्याचा अतिशय उत्तम रेकॉर्ड यांचेही लाभ बँकेच्या ग्राहकांना मिळतील.  या भागीदारीमुळे न्यू इंडियाला आपली नाविन्यपूर्ण उत्पादने जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतील आणि जास्तीत जास्त ग्राहकांना कधीहीकोठूनही त्यांच्या जोखीम संरक्षण सेवांचा लाभ घेता येईल.

२०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत, महाराष्ट्र व राजस्थानात कृत्रिम शेततळी निर्माण करून साध्य केली किमया

0

२२ वर्षीय तरुणीने जल संवर्धनातून शेकडोंच्या जीवनामध्ये फुलविली आनंदाची बहार

पुणे-महाराष्ट्र व राजस्थान मधील विविध जिल्ह्यांमध्ये जल संवर्धनाच्या साध्यासोप्या पद्धतींचा अवलंब करून २०० अब्ज लिटरपेक्षा जास्त पाण्याचे संवर्धन केले गेले आहे. यामुळे आता शेकडो शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना उपजीविकेचे अधिक चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत.  अवानाच्या सीईओ मैथिली अप्पलवार यांनी गरजूंच्या मदतीसाठी जल संवर्धनाच्या अनोख्या पारंपरिक पद्धतींचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला.

 एम्बी इंडस्ट्रीज लिमिटेडचे एक स्ट्रॅटेजिक बिजनेस युनिट ‘अवाना’ च्या संस्थापक मैथिली अप्पलवार यांनी भारतातील शेतकऱ्यांना भूक व गरिबी या संकटांमधून बाहेर काढण्यासाठी परवडण्याजोगे उपाय शोधण्याचा निर्णय घेतला.  जलसंचय, अवानाचे प्रमुख उत्पादन, जगातील सर्वात जास्त किफायतशीर,सर्वसमावेशक जल संवर्धन उपाययोजना आहे.  जलसंचय ही अतिशय सहजसोपी आणि तरीही अतिशय उत्तम व प्रभावी संकल्पना आहे.  यामध्ये शेतात एक मोठा खड्डा खोदला जातो व त्यावर एक पॉलिमर अस्तर घातले जाते.  खड्ड्याचे अशाप्रकारे अस्तरीकरण झाल्यामुळे पाणी जमिनीमध्ये मुरून जात नाही.  अशाप्रकारे हे एक कृत्रिम शेततळे तयार होते, ज्यामध्ये पावसाचे पाणी, नदीमधून वाहून येणारे अतिरिक्त पाणी जमा करून ठेवले जाते.  जलसंचयसाठी दरवर्षी १ पैसा प्रति लिटर या दराने खर्च येतो.  ही रक्कम पाणी साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या याच आकाराच्या काँक्रीट टॅन्कच्या खर्चाच्या फक्त १/१० भागाइतकीच आहे.  म्हणूनच अगदी गरीब शेतकरीदेखील याचा लाभ घेऊ शकतात.  या उपाययोजनेमध्ये पुढे वाढविण्याची अत्याधिक क्षमता आहे – ३ वर्षांहूनही कमी काळात अवानाने ५००० शेतकऱ्यांसोबत भागीदारीमध्ये २०० अब्ज लिटर पाण्याची बचत केली आहे.

महाराष्ट्रात अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर,जळगाव, बुलढाणा, धुळे, वाशिम, हिंगोली आणि नाशिक तसेच राजस्थानातील जैसलमेर, बीकानेर, चुरु,श्रीगंगानगर, हनुमानगढ, नागौर आणि भीलवाडा याठिकाणी मिळून २०० अब्ज लिटर पाण्याचे यशस्वीपणे संवर्धन करण्यात आले आहे.

अवानाच्या सीईओ मैथिली अप्पलवार यांनी सांगितले, कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर यशस्वी होण्याची क्षमता असलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना मला प्रभावित करतात.  मी असे मानते कीहे समजून घेणे महत्त्वाचे आहे कीप्रत्येकवेळी नवीन तंत्रज्ञानासाठी खूप मोठी गुंतवणूक करणे आवश्यक नसते.  गंभीर समस्या सर्वात प्रभावी पद्धतीने सोडविल्या जाणे गरजेचे आहे.  अवानामध्ये आम्ही नेहमीच परवडण्याजोग्या खर्चात सहजसोप्या उपाययोजना देण्याचा प्रयत्न करतो.  आमच्या उपाययोजनांमध्ये सामाजिक परिवर्तन सगळ्यात महत्त्वाचे आहेजे समाजात मोठ्या प्रमाणात घडवून आणले जाऊ शकते.”

त्यांनी पुढे असेही सांगितले, सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची जी शक्ती युवापिढीमध्ये आहे ती मला नेहमीच प्रभावित करते.  भारतातील शेतकऱ्यांना सबळ व समृद्ध करणे हे माझे स्वप्न आहे.  मला वाटते कीसामाजिक बदल घडवून आणण्यासाठी युवाउत्साही लोकांनी मोठ्या संख्येने पुढे आले पाहिजे.”

२०१८ साली नीती आयोगाने सादर केलेल्या एका अहवालात असे नमूद केले आहे की, भारत आपल्या इतिहासातील आजवरच्या सर्वाधिक गंभीर जलसंकटाचा सामना करत आहे.  देशातील ६०% पेक्षा जास्त भाग दुष्काळी आहे व देशातील एक तृतियांशपेक्षा जास्त जिल्ह्यांनी गेल्या दशकात चारपेक्षा जास्त वेळा दुष्काळ सहन केला आहे.  पण सर्वात वाईट स्थिती भविष्यात निर्माण होणार आहे.  २०३० सालापर्यंत भारतात पाण्याची मागणी पाण्याच्या उपलब्ध पुरवठ्यापेक्षा दुपटीने वाढलेली असेल.

यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, शेतकऱ्यांनी पाण्याची बचत, संवर्धन आणि पाण्याच्या भूस्तरामध्ये पुन्हा पुन्हा भर घालत राहणे आवश्य आहे कारण त्यांची उपजीविका सर्वात जास्त पाण्यावर अवलंबून आहे.  परंतु काँक्रीट टँकसारख्या पारंपरिक जल संवर्धन उपाययोजना वापरणे हे बहुसंख्य भारतीय शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे.  या समस्येवर तोडगा सुचवण्यासाठी अनेक स्टार्ट-अप्स व स्वयंसेवी संस्था पुढे आल्या, त्यामध्ये २२ वर्षीय मैथिली अप्पलवार देखील होत्या.  या जॉर्जिया टेक इंजिनिअर भारतात परतल्या त्या एक विचार आणि प्रेरणा घेऊन की, भारतातील पाणी समस्येवर सहजसोपा उपाय केला जाऊ शकतो.

मैथिली अप्पलवार यांनी जल संसाधन मंत्रालयाने नुकत्याच आयोजित केलेल्या एका सेमिनारमध्ये भाग घेतला होता.  या कार्यक्रमातील त्या सर्वात कमी वयाच्या वक्त्या होत्या.  त्यांनी यावेळी सांगितले की,कशाप्रकारे टेक्निकल टेक्स्टाईल्सचा उपयोग भारतातील शेतीसाठी सहजसोप्या, पुढे वाढवता येण्याजोग्या उपाययोजना बनवण्यासाठी केला जाऊ शकतो.

अवाना

एम्बीच्या रिटेल उपक्रमाच्या एका विशेष डिव्हिजनच्या रूपाने अवानाची सुरुवात झाली.  संपूर्ण जगभरातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला अनिश्चिततेपासून वाचविणे हा अवानाचा उद्देश आहे.  जेन झेड व मिलेनियल्सची बुद्धिमत्ता, कौशल्ये यांना कंपनीकडे आकर्षित करण्यासाठी नावीन्यावर लक्ष केंद्रित करणारे आधुनिक कार्यस्थळ निर्माण करणे हे या डिव्हिजनचे प्रमुख काम आहे.  गेल्या दोन वर्षात अवानाने संपूर्ण भारतात ५००४ तलाव बनवले, ज्यामध्ये २०० अब्ज पाणी साठवले गेले आणि जवळपास ३०,००० लोकांच्या जीवनावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडत आहे.  या उपक्रमामुळे गेल्या दोन वर्षात १०,००० हेक्टरपेक्षाही जास्त भागात पिकांच्या सिंचनात मदत मिळाली आहे.

एम्बी इंडस्ट्रीज लिमिटेड

एम्बी इंडस्ट्रीज लिमिटेड (आधीची एम्बी पोलियर्न्स लिमिटेड) ही वुवन पॉलीथीन व पॉलिप्रॉपेलिन उत्पादने बनवणाऱ्या सर्वाधिक आघाडीच्या ब्रॅंड्सपैकी एक कंपनी आहे.  ही कंपनी एफआयबीसी (फ्लेक्सिबल इंटर्मीडिएट बल्क कंटेनर्स) आणि वुवन सॅक्स व कंटेनर लायनर्स, प्रोटेक्टिव्ह इरिगेशन सिस्टीम, कॅनॉल लायनर्स, फ्लॅक्सी टँक्स व कार कव्हर्स यासारख्या विविध पॉलिमर आधारित उत्पादनांची निर्मिती व विक्रीमध्ये कार्यरत आहे.  पहिल्या पिढीचे उद्योजक श्री. मकरंद अप्पलवार व श्रीमती रिंकू अप्पलवार यांनी नोव्हेंबर १९९४ मध्ये ही कंपनी स्थापन केली.

सुरुवातीपासून आजपर्यंत एम्बीने आपल्या क्षमता व प्रभाव वाढवत वुवन पॉलिमर उत्पादनांच्या क्षेत्रात आघाडीची कंपनी म्हणून ओळख निर्माण केली आहे.  जगभरातील प्रतिष्ठित ग्राहक एम्बीच्या उत्पादनांचा लाभ घेत आहेत.  या कंपनीला अनेक पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले आहे.  एम्बीची उत्पादन सुविधा गुजरातमधील सिल्वासा येथे आहे.

एकटेपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये-डॉ. सुरेखा पंडित

0
पुणे : ”आपल्याकडे लग्न हा फार प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. लग्न न करणाऱ्या, घटस्फोटित अथवा विधवा अशा एकट्या राहणाऱ्या स्त्रियांकडे समाजात वेगळ्या नजरेने पहिले जाते. त्यांना नानाविध समस्यांचा सामनाही करावा लागतो. पण महिलांनी आपल्या एकटेपणाचा न्यूनगंड न बाळगता मानसिकदृष्ट्या खंबीर राहून या आव्हानांचा सामना करायला हवा,” असे मत समुपदेशिका आणि मानसशास्त्र अध्यापिका डॉ. सुरेखा पंडित यांनी व्यक्त केले.
वंचित विकास संस्थेच्या अभया मैत्री गटातर्फे ‘एकटेपणा पेलताना’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन केले होते. या कार्यशाळेत मीना कुर्लेकर यांनी ‘एकटेपणा समजून घेताना’हे सत्र घेतले. डॉ. सुरेखा पंडित यांच्यासह उद्योजिका सिंधू महाडिक, डॉ. सागर पाठक यांनी मार्गदर्शन केले. सिंधू महाडिक यांनी आपले अनुभव कथन केले. त्यांची संघर्षमय कहाणी सांगितली. एकटेपणा घालविण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा नियमितपणे संस्थेच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे मीना कुर्लेकर यांनी सांगितले.
डॉ. सुरेखा पंडित म्हणाल्या, “एकटे आहोत म्हणून खचून जाऊ नका. वस्तुस्थितीचा स्विकार करून आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहा. दैनंदिनी लिहायला सुरवात करून त्या माध्यमातून व्यक्त व्हायला शिका. आपल्याला ज्यामध्ये समाधान वाटते, त्या गोष्टी शोधा आणि त्या करा. एकटेपणावर मात करण्यासाठी स्वतःला ओळखायला शिकणे आवश्यक आहे. तसेच तुमच्या क्षमता ओळखूण नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.”
‘एकट्या स्त्रिया आणि लैंगिकता या विषयावर बोलताना डॉ. पाठक म्हणाले, “एकट्या असणाऱ्या आणि लैंगिक समस्या जाणवणाऱ्या व्यक्तींचा गट मोठा आहे. लैंगिकता ही इतर भावनासारखी एक सर्वसामान्य भावना आहे. एकट्या व्यक्तीने आपल्या जवळच्या व्यक्तीशी या भावनेबद्दल बोलणे आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या आदर्श प्रतिमेचा बागुलबुवा करू नये. एकट्या महिलांनी सोशल सर्कल निर्माण करण्यासह सामाजिक नाते निर्माण करणे आणि या विषयावर त्या व्यक्तीशी बोलणे गरजेचे आहे. लैंगिक भावना दडपल्याने त्रास होतो.”
कार्यशाळेचा समारोप वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर यांच्या मार्गदर्शनाने झाला. ”आपण एकटेच जन्माला येतो आणि एकटेच मरतो. त्यामुळे एकटेपणाचे ओझे मानू नये. स्वतःला ज्या गोष्टीत आनंद वाटतो, त्या गोष्टी कराव्यात. आपले स्वतःचे आयुष्य आपणच सुखी केले पाहिजे. स्वतःवर प्रेम करायला शिकावे.”

अरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे

0

पुणे- जेष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांनी अनेक संशोधनात्मक लिखाण आणि कविता लिहिल्या. सांस्कृतिक,सामाजिक अशा सर्व क्षेत्रात त्यांनी आपल्या लिखणातून मोहोर उमटवली. त्यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले आहे असे गौरोद्गार ज्येष्ठ संत साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी काढले.
जय वैभवलक्ष्मी फाउंडेशन तर्फे ९२ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती अरूणा ढेरे यांना जय वैभवलक्ष्मी साहित्यिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. एक लाख एक हजार रूपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जेष्ठ पत्रकार व झी २४ तासचे संपादक विजय कुवळेकर, जय वैभवलक्ष्मी फाउंडेशनचे अध्यक्ष ज्येष्ठनेते उल्हासदादा पवार, माजी उपमहापौर आबा बागुल, उपाध्यक्ष अ‍ॅड.
शशिकांत पागे, सचिव प्रा. व्ही.एस. अंकलकोटे पाटील, नगरसेविका स्मिताताई वस्ते, विश्वस्त श्रीमती आशाताई काळे, मिथुन गुरव, स्वरूप एकलुरे, अॅड. सौरभ अंकलकोटे पाटील आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी राजर्षी शाहू विद्यालयाचे शिक्षक बाळासाहेब कासार यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व २१ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच गुणवंत विद्यार्थी आणि अध्यापकांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
या पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष असून यापूर्वी श्रीमती सिंधूताई सपकाळ, विवेकानंद नेत्रालय (मिरज), डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे, श्रीमती कृष्णा कश्यप (माताजी) पुण्यधाम आश्रम कोंडवा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. सदानंद मोरे म्हणाले, जय वैभवलक्ष्मी साहित्यिक पुरस्कारासाठी श्रीमती अरुणा ढेरे यांची अचूक व उचित निवड केली आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात अविरोध महिला अध्यक्षा म्हणून त्यांची नोंद झाली आहे. त्या ज्या परंपरेचा वारसा चालवत आहेत ती परंपरा महत्वाची आहे. त्यांचे वडील स्व. डॉ. रां.ची. ढेरे यांनी मधल्या काळात विस्मृतीत गेलेल्या मातब्बर लोकांना
समोर ठेवून लिखाण केले. तोच वारसा अरुणाताईंनी पुढे चालू ठेवला आहे.
मराठी साहित्यात स्रियांचे स्थान मोठे आहे. मदम्मा, मुक्ताई, जनाबाई यांना वारकरी संप्रदायाने लिहिते केले. १७५० पर्यंत संत परंपरेतील संत मानले जातात. पुढे मात्र, पेशवाईच्या काळात एकही स्री साहित्य लिखाण करताना दिसली नाही. पंडितीय वळणाचे आणि लावणी लेखन असे दोन प्रकार साहित्यात होते. पंडितीय वळणाचे लेखन स्रीयांकडून अपेक्षित नव्हते व लावणी साहित्य स्रिया लिहू शकत नव्हत्या. अशावेळी अरुणाताई ढेरे यांनी मधल्या काळातील विस्मृतीत गेलेल्या
मातब्बर लोकांना समोर ठेवून साक्षेपी लिखाण केले. त्यांच्या लिखाणामध्ये संयमित अभिव्यक्ती दिसते. त्यांच्या साहित्य लिखाणाने महाराष्ट्राला समृद्ध केले आहे असे गौरोवद्गार त्यांनी काढले.

विजय कुवळेकर म्हणाले, स्वागतशील परंपरा असलेल्या स्वागतशील महासमन्वयाचा हा गौरव आहे. भाषा ही संस्कृतीची वाहक असते. संस्कृतीने आपल्याला काय दिले त्याचे संचित देण्याचे काम अरुणाताईंनी केले आहे. रां.ची. ढेरे यांच्या कन्या म्हणून अरुणाताई मोठ्या नाहीत. ते काही राजकीय क्षेत्र नाही. साहित्य, कलेच्या क्षेत्रात स्वत:च्या बुद्धीच्या जोरावर यश मिळवावे लागते.
त्याच ताकदीच्या जोरावर अरुणाताई एकेक गोष्टी पेलत गेल्या. डॉ. रां. ची. ढेरे यांनी सुरु केलेल्या परंपरा अरुणाताईंनी अधिक समृद्ध केल्या. कशाशीही तडजोड केली नाही. त्यांच्या लिखाणातील कस कमी झाला नाही असा गौरव त्यांनी केला.
उल्हासदादा पवार म्हणाले, अरुणाताई या साहित्यातील विदुषी आहेत. डॉ. रां. ची. ढेरे यांचा उतुंग वारसा त्यांना लाभला आहे.देशात सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात समन्वयाची आवश्यकता आहे. मराठी भाषा आणि साहित्याची उंची खूप मोठी आहे. अनेक मोठी माणसे मराठी शाळेत गेली म्हणून मोठी झाली नाहीत असे नाही. इंग्रजी भाषेला विरोध नाही. परंतु मातृभाषेला तिलांजली देऊन इतर भाषा शिकू नका हे विनोबा भावे यांचे सांगणे होते. त्याचे पालन आपण करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.
आबा बागुल म्हणाले, शिक्षण हे मातृभाषेतूनच घेणे आवश्यक आहे. संस्कार किती महत्वाचे असतात हे अनेक उदाहरणावरून आपल्याला दिसतात. अरुणाताईंचे साहित्य क्षेत्रातील काम हे इतके मोठे आहे की त्या या क्षेत्रातील राष्ट्रपती आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अरुणाताई या आपल्या प्रभागात राहतात हा आपला सन्मान आहे व त्याचा मला अभिमान आहे असे त्यांनी नमूद केले.
सत्काराला उत्तर देताना अरुणाताई म्हणाल्या, मला अनेक पुरस्कार मिळाले. फार झाले पुरस्कार असे वाटत असतानाच आणि एक एक टप्पा पार करत असतानाच वारीमध्ये जसा मुक्काम करताना कोणीतरी येऊन दमलीस का विचारते आणि हा घे भाजी-भाकरीचा प्रसाद असे म्हणते तसा हा पुरस्कार आहे.
शब्द वापरणे वाटते तितके सोपे नाही असे सांगून त्या म्हणाल्या, संवेदनाक्षम जागा शोधणे हे फार महत्वाचे असते. वेगवेगळ्या वाटेवरती पावले पडत गेली व त्या वाड्मयीन वंशाचे आपण वारसदार आहोत याची जाणीव होत गेली. आतापर्यंत मिळालेले पुरस्कार ज्या स्रिया लिहित्या झाल्या, ज्या लढल्या, जीवनात खंबीरपणे उभ्या राहिल्या त्यांच्या सर्वांचे हे पुरस्कार आहेत. वाड्मयीन भूतकाळ आपल्या बरोबर आहे. त्याचे संचित घेऊन आपण पुढे चाललो आहोत. जुन्या
लोकांनी जी दृष्टी दिली, जीवनविषयक दृष्टीकोन दिला या सर्वांचा विवेक आपल्याला ठेवायला पाहिजे असे त्या म्हणाल्या. कुठल्याही एकांतिक टोकला न जाता त्या- त्या गोष्टींमधली परंपरा जपत व समन्वय साधत पुढे जाणे हेच महत्वाचे आहे असे त्यांनी नमूद केले.

विधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण

0

मुंबई – आगामी विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना युती एकत्र लढणार असून मुख्यमंत्री म्हणून मी पुन्हा राज्यात येतोय, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या प्रदेश कार्य समितीच्या बैठकीत केला. मी केवळ भाजपचाच मुख्यमंत्री नसून भाजपबरोबर शिवसेना, रिपाइं आणि रासपचाही मुख्यमंत्री असल्याचे स्पष्ट करत फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदावर दावा करणाऱ्या शिवसेनेला या वेळी जोरदार टोला लगावला.

मुख्यमंत्री म्हणाले, युतीबाबत संभ्रम नाही. कोणी कोणत्या जागा घ्यायच्या याचा निर्णय लवकरच होईल. मित्रपक्षात खुमखुमी असणारे बरेच नेते आहेत. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. त्यांच्या ट्रॅपमध्ये येऊ नका. मुख्यमंत्री कोणाचा या वादात पडण्याचे कारण नाही. माध्यमे व काही लोक हा वाद उभा करत आहेत. भाजपमधील पक्षप्रवेशाने घाबरून जाऊ नका, असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. इतर पक्षातले चांगले लोक घेण्यात गैर नाही. भाजप पब्लिक अनलिमिटेड पक्ष असून काही झाले तरी ८५ टक्के तिकीट पक्षातील जुन्यांना दिले जाईल, असा विश्वास त्यांनी जुन्या भाजपाईंना दिला. तसेच तिकिटाबाबत कुणालाही आश्वासन कुणी देऊ नये, अशी तंबी त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना दिली. विधानसभेला पराभूतांशी आपला सामना आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेची लढाई वेगळी आहे. लढाई बदलली की शस्त्रे बदलावी लागतात. क्षेत्र बदलले की रणनीतीतही बदल करावा लागतो, असे स्पष्ट करत मागची १५ वर्षे कुशासनाची होती. पुढची ५ वर्षे महाराष्ट्रासाठी उंच उंच उडण्याची असतील, असे सूतोवाचही फडणवीसांनी या वेळी केले.

कुणासाठीही पक्षात येण्याचा मार्ग खुला, पण जाण्याचा बंद
पुढच्या पिढ्यांच्या वाट्यास दुष्काळाचे दु:ख येऊ नये म्हणून पुढची पाच वर्षे राज्य सरकारचा मुख्य भर नदीजोड प्रकल्प आणि समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवण्यावर असणार आहे. आपले आराध्य दैवत जनता असून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आगामी १ आॅगस्टपासून आपण राज्यभरात महाजनादेश यात्रा काढणार आहोत. अन्य
पक्षातून भाजपमध्ये येण्याचा मार्ग खुला आहे. येणाऱ्यास कायमचे पक्षात राहावे लागेल. बाहेर जाण्याचा कोणताही मार्ग नाही. कुणी, कुणाच्या जवळचा म्हणून विधानसभेची उमेदवारी मिळणार नाही. योग्य त्यालाच तिकीट देण्यात येईल.

फडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील

0

मुंबई – ‘काँग्रेस-राष्ट्रवादी आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढल्यास १० जागांवर थांबतील.  युतीला मात्र 220जागा मिळतील,’ असा दावा भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दैवी शक्ती असून युतीबाबतचा मुख्यमंत्रिपदाचा व खातेवाटपाचा निर्णय तेच घेतील, असेही ते म्हणाले. गोरेगाव येथे आयोजित केलेल्या पक्षाच्या विशेष कार्य समितीच्या बैठकीत बोलत होते. या वेळी पाटील यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना विधानसभेच्या सर्व २८८ जागांची तयारी करण्याचे आदेश दिले.

उपस्थित पदाधिकाऱ्यांसमाेर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘भाजपत मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले तरी पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये. इतर पक्षांतले २०-२२ आमदार आले म्हणून बिघडत नाही. हा पक्ष प्रत्येकाला त्याच्या गुणाप्रमाणे काम देतो. त्यामुळे गुणात्मक संघटन मजबूत करा. अापल्या कार्यकाळात संघटनेचं कल्चर मजबूत करण्याला आपण प्रदेशाध्यक्ष म्हणून प्राधान्य देणार आहाेत.’

‘ईव्हीएमध्ये घोटाळा होता तर बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा विजय कसा झाला?’, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. लोकसभेत युतीला राज्यात ५१ टक्के मते मिळाली असून वंचित बहुजन आघाडीमुळे युतीच्या अधिक जागा निवडून आल्याच नाहीत. बूथरचना व पन्ना प्रमुखांमुळे या निवडणुकीत युतीने बाजी मारल्याचे पाटील म्हणाले. विधानसभेसाठीच्या युतीच्या बाेलणीसंदर्भात चौकट निश्चित झाल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, पक्षाचा झेंडा नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हाती देत मावळते प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.’

आता काँग्रेसची अवस्था बर्म्युड्यासारखी झाली : रावसाहेब दानवे

‘नाथसागराची खोली अन् दानवेंची बोली मराठवाड्याची ओळख आहे,’ असे सांगत आपल्या बोलण्याने कितीही वाद उद॰भवले तरी आपण आपली मराठवाड्याची भाषा सोडणार नाही, असे भाजपचे मावळते प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी स्पष्ट केले. मी गंभीर झालो तर पक्षात मी नाराज असल्याचा निरोप जाईल, त्यामुळे आपण गंभीर होत नसल्याचे ते म्हणाले. काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला होता, पण गरिबांनी काँग्रेसलाच हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजप २ वरून ३०३ गेली तर काँग्रेसचा मात्र आज बर्म्युडा झाला आहे, अशी टीका दानवे यांनी केली.

बैठकीला गडकरी, पंकजा मुंडे, मुनगंटीवारांची अनुपस्थिती
गोरेगाव येथे रविवारी भाजपच्या विशेष कार्य समितीच्या बैठकीला भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, राज्य प्रभारी सरोज पांडे, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, मावळते प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, खासदार विनय सहस्रबुद्धे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, एकनाथ खडसे, मंत्री आशिष शेलार, मंत्री विनाेद तावडे हजर होते, तर नितीन गडकरी, पंकजा मुंडे व सुधीर मुनगंटीवार अनुपस्थित होते. गडकरी अनुपस्थित असल्याने ते नाराज आहेत काय, अशी चर्चा या वेळी होती.

गोळवलकर प्रशालेत निवडणुकीचा अनुभव

0

पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाधिव गोळवलकर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी लोकशाही प्रकि‘येतील महत्त्वाच्या निवडणुकीचा अनुभव घेतला. लोकशाहीला पोषक असणारे शिक्षण विद्यार्थी दशेत मिळावे या उद्देशाने या उपक‘माचे आयोजन करण्यात आले होते. ओजस करवंदे आणि मृणाल महाजन यांची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड झाली.
आदर्श आचारसंहिता, उमेदवारी अर्ज भरणे, सूचक, अनुमोदक, प्रचार, गुप्त मतदान आदी निवडणुकीतील प्रकि‘या विद्यार्थ्यांना अनुभवता आल्या. नोटाचा पर्याय देण्यात आला होता. मु‘याध्यापिका लीना तलाठी यांनी मु‘य निवडणुक अधिकारी म्हणून काम पाहीले. दीप्ती यादव, प्रशांत जाधव, सुभाष निंबाळकर, वासंती बनकर, प्रिया जोशी यांनी उपक‘माचे संयोजन केले.

ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील

0

पुणे : ‘आगामी विधानसभेची निवडणूक ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेऊन दाखवा; मग खरी ताकद कोणाच्या पाठीमागे हे महाराष्ट्र ठरवेल’ अशा थेट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले. विधानसभा निवडणुकीत युतीच्या २२० जागा निवडून येतील, असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मतपत्रिकांवर निवडणूक घेऊन पहावे सरकार येते की नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. ‘निवडणूक मतपत्रिकांवर घेण्याची मागणी भाजप वगळता सर्वच राजकीय पक्ष करत आहेत. शिवसेनेच्या मनातही तेच आहे, फक्त दबाव असल्याने ते बोलत नाहीत,’ असा टोला लगावून पाटील म्हणाले, ‘इलेक्ट्रॉनिक मतयंत्रांमध्ये (ईव्हीएम) फेरफार करता येतात. त्यामुळे जर्मनीनेही ईव्हीएमवर बंदी घातली आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष मतपत्रिकांवर निवडणुकीची मागणी करत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी याबाबत खुलेपणाने निर्णय घ्यावा.’

स्पर्धा परीक्षा देताना हवा आत्मविश्वास , कष्ट करण्याची सवय, प्रामाणिकपणा आणि संयम – मच्छिंद्र गळवे

0
पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी मध्ये  स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी  ‘पी ए इनामदार आयएएस  कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेंटर  ‘ सुरु करण्यात आले असून   सोसायटीचे  अध्यक्ष  डॉ  पी ए इनामदार  यांच्या हस्ते झाले.
 आयकर विभागाचे उपायुक्त डॉ . उज्वलकुमार चव्हाण ,केंद्रीय लोकसेवा  आयोगाच्या परीक्षेतील  यशस्वी व्यक्तिमत्व असलेले मच्छिन्द्र गळवे हे प्रमुख पाहुणे म्ह्णून उपस्थित होते
.या सेंटरचे कार्यकारी संचालक प्रशांत चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.विधी महाविद्यालयाचे प्राचार्य रशीद शेख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
हा  कार्यक्रम आझम कॅम्पस (पुणे  कॅम्प ) च्या असेम्ब्ली हॉल मध्ये झाला. केंद्रीय  लोकसेवा आयोग ,महाराष्ट्र  लोकसेवा  आयोग ,बँक ,आरआरबी , स्टेट सर्विस बोर्ड,महा ऑनलाईन  अशा  परीक्षांना बसणाऱ्या  विद्यार्थ्यांना येथे  तज्ज्ञांचे  मार्गदर्शन उपलब्ध करून दिले  आहे .
विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत वाचनालय व अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली  आहे.
पुण्याच्या  मध्यभागी असलेल्या पुणे कॅम्प भागात २४ एकर जागेत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमध्ये केजी  टू पीजी शिक्षणाची सुविधा उपलब्ध असून ३२ आस्थापनांमध्ये ३० हजार विद्यार्थी शिकतात . सर्व विद्या शाखा ,डीएड ,बीएड ,विधी ,दंत चिकित्सा ,युनानी ,फिजिओथेरपी ,व्यवस्थापन ,माहिती तंत्रज्ञान ,संगणक  दुरुस्ती ,चित्रकला अशा सर्व प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत .भव्य क्रिकेट मैदानासह स्पोर्ट्स अकेडमी आहे .  स्पर्धा परीक्षा केंद्र हे या शैक्षणिक  सुविधांमध्ये महत्वाचे पाऊल आहे .
‘ स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी आपण इंग्रजी माध्यमातून, शहरात शिकलो पाहिजे असे नाही. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांचे प्रमाण ९० टक्के आहे.  स्पर्धा परीक्षा वाटतात तितका अवघड नाहीत,अभ्यासासोबत इतर उपक्रमात,स्पर्धात सहभागी व्हा आणि व्यक्तिमत्व विकसित करा . आपल्याला समजलेला अभ्यास सहकाऱ्यांना समजावून सांगीतल्याने अधिक फायदा होतो.’, असा सल्ला मच्छिंद्र गळवे यांनी यावेळी बोलताना दिला.
स्पर्धा परीक्षा देताना आत्मविश्वास , कष्ट करण्याची सवय, प्रामाणिकपणा, आणि संयम या गुणांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन श्री. गळवे यांनी केले.
‘ स्पर्धा परीक्षा पध्दती ही देशाचा गाडा चालविण्यासाठी सक्षम युवक -युवती शोधणारी सर्वोत्तम पध्दती असून यशापयशापेक्षा व्यक्तीमत्व विकसनाची सुवर्णसंधी आहे. ‘ असे डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगीतले.
अध्यक्ष स्थानावरुन बोलताना डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले, ‘ १०० विद्यार्थ्यांना दीड वर्षाचे निवासी सुविधांसह ना नफा -ना तोटा तत्वावर  प्रशिक्षण दिले जाईल. गरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाईल.
गरीबी आणि मागासलेपण हा गुन्हा नाही, तर त्याविरुद्ध संघर्ष न करणे हा गुन्हा आहे.स्वतःच्या क्षमता न वापरणे, हा गुन्हा आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करावा. ‘

भा.ज.पा विधार्थी आघाडी तर्फे गुरुजनांचा सन्मान सप्ताह

0
पुणे-भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा , विद्यार्थी आघाडी तर्फे पुण्यातील सर्व महाविद्यालयातील मुख्याध्यापकांच्या सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला , सदर कार्यक्रमाची सुरवात गुरू पौर्णिमेपासून करण्यात आला, आयोजिती केलेल्या उपक्रमाचा
एम आय टी महाविद्यालयातील  विश्वनाथ कराड म्हणाले की हा उपक्रम हा सर्व युवा पिढीला प्रेरणा देणारे आहे , युवा मोर्चाचा हा उपक्रम आमच्या साठी खूप मोलाचा आहे .
गरवारे महाविद्यालयाचे मुख्याध्यापक लेले सर यांनी मनापासून कौतुक केले , हा उपक्रम पक्षातील कार्यकर्त्यांकडून शिक्षकांना दिलेला बहुमूल्य सन्मान आहे , आणि सर्व युवा मोर्चा टीम ला पुढील वाटचालीस खूप शुभेच्या दिल्या ,
प्रतिक गुजराथी म्हणाले “ हा उपक्रम करत असताना प्रत्येक महाविद्याल च्या प्राध्यापकांडून सुद्धा आमच्या कार्याचे कौतुक होत आहे  या सगळ्यामुळे पुढील जीवनांत काम करण्याची नवी नवीन ऊर्जा मिळाली आहे व अभिमान सुद्धा वाटत आहे कि मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचा पदाधिकारी आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन भाजप युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे शहर संपर्क प्रमुख प्रतीक नितीन गुजराथी यांनी केले होते, सदर कार्यक्रमास युवा मोर्चाचे अध्यक्ष , नगरसेवक दीपक पोटे ,पुनीत जोशी , प्रतीक देसरडा ,सुनील मिश्रा , दीपक पवार , तुषार रायकर ,शशांक सुर्वे , धवल देशमुख, अक्षय गांधी , दूष्यांत मोहोळ , यश ओव्हाळ, शिवम बालवाडकर , प्रतीक कुंजीर उपस्थित होते .
Attachments area

धोनी दोन महिने भारतीय लष्करासोबत वेळ घालवणार- बीसीसीआय

0

नवी दिल्ली -भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड(बीसीसीआय)ने शनिवारी स्पष्ट केले की, महेंद्र सिंह धोनी वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार नाहीये. धोनी दोन महिने क्रिकेटपासून लांब राहणार आहे आणि तो हा वेळ पॅरामिलिट्री रेजिमेंटमध्ये घालवणार आहे. भारतीय संघाचा वेस्टइंडीज दौरा 3 ऑगस्टपासून सुरू होईल. बीसीसीआय विंडीज दौऱ्यासाठी 21 जुलैला संघाची निवड करणार आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “धोनीने स्वथःहून विंडीज दौऱ्यावर जाणानर नसल्याचे सांगितले आहे आणि तो या वेळात पॅरामिलिट्री रेजिमेंटमध्ये घालवणार असल्याचे सांगितले. त्याने रविवारी होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीच्या आधीच हा निर्णय घेतला.त्याने कर्णधार विराट कोहली आणि एमएसके प्रसादला याबाबत माहिती दिली आहे.” धोनीच्या या निर्णयावरुन हे तरी सिद्ध होते की, सध्या तो निवृत्ती घेण्याच्या मुडमध्ये नाहीये.


धोनीला लेफ्टिनंट कर्नलचा रँक
धोनीला इंडियन टेरिटोरिअल आर्मीने 2011 मध्ये लेफ्टिनेंट कर्नलची रँक देण्यात आली आहे. धोनीचा मित्र मिहिरने सांगितले की, ‘धोनीने वेस्टइंडीज दौऱ्यामधून स्वतःचे नाव मागे घेतले आहे. त्याने बीसीसीआयला याबाबत माहिती दिली असून, तो आता लष्करासोबत वेळ घालवणार आहे.”