Home Blog Page 2888

स्वच्छ सर्वेक्षण २०१८-पुणे महानगरपालिकेस राष्ट्रीय पुरस्कार

0

पुणे-स्वच्छ भारत अभियान (नागरी)अंतर्गत करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेत पुणे महानगरपालिकेस राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देण्यात आला.या वेळी हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महानगरपालिका चे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी स्वीकारला .यावेळी.प्रधान सचिव मनिषा म्हैसकर उपस्थितीत होत्या.

महायुतीला 1 कोटी 70 लाख मतदान होणार

0

पुणे – राज्यात आगामी निवडणुकीसाठी साडेचार कोटी मतदारांपैकी भाजप-सेना आणि मित्र पक्षाला किमान 1 कोटी 70 लाख मतदान होईल. या निवडणुकीत महायुतीच्या 220 हून अधिक जागा येतील, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे व्यक्‍त केला.

चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सोमवारी पुण्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापालिका सभागृह नेता श्रीनाथ भिमाले तसेच नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर आपली मते मांडली.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधून किती नेते संपर्कात आहेत, याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना पाटील म्हणाले, या दोन्ही पक्षातून येणाऱ्यांची यादी मोठी आहे. ती आम्ही लवकरच जाहीर करू, त्याचबरोबर कॉंग्रेसने जे 5 कार्याध्यक्ष घोषित केले आहेत. ते याच भीतीतून केले आहेत. पक्ष सोडून जावू नये म्हणून ही पदे दिली आहेत. तरी सुद्धा एक कार्याध्यक्ष भाजपच्या वाटेवर आहे; पण याबाबत नाव नंतर जाहीर करू. भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या जरी जास्त असली तरी प्रत्येकाला आम्ही पारखून घेतो आणि मगच निर्णय घेतो. आमच्या विचारांशी जुळणारे असतील तर आम्ही त्यांना पक्षात योग्य स्थान देतो. राधाकृष्ण विखे-पाटील यांना सुद्धा आम्ही अशाच प्रकारे पक्षात घेतले आहे. पक्षात आला आणि लगेच मंत्रीपद दिले असे आम्ही गेल्या 5 वर्षांत कधीच केले नाही. मंत्रीमंडळात असणारे सुद्धा सगळे भाजपच्या विचारसरणीचे आहेत. 5 वर्षांत एकमेव विखे पाटील असे नेते आहेत की त्यांना आम्ही मंत्रीपद दिले. पक्षात घेताना सुद्धा आम्ही तेवढी काळजी घेतो. नाहीतर मग काय भुजबळ सुद्धा आले असते, असा टोलाही त्यांनी लगाविला.

आम्ही फक्‍त दोनच नेत्यांची मते गांभिर्याने घेतो
महायुतीच्या जागा वाटपावरून अनेक नेत्यांकडून वेगवेगळी विधाने करण्यात येत असली तरी राज्यातील विद्यमान आमदार तेच राहतील पण एखादी दुसरी जागा इकडे-तिकडे होईल. त्या व्यतिरिक्‍त फारसा बदल होईल, असे मला वाटत नाही. युतीबाबत येणाऱ्या वेगवेगळ्या विधानांकडे आम्ही लक्ष देत नाही; आम्ही फक्‍त दोनच नेत्यांची मते गांर्भियाने घेतो. त्यात एक देवेंद्रजी आणि दुसरे उद्धवजी. त्यामुळे इतर नेते काय बोलतात त्याकडे फारसे लक्ष देत नाही. जागा वाटपाचा निर्णय सुद्धा हेच दोघे घेतील.

काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती २९, ३०, ३१ जुलै रोजी

0

मुंबई-
विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असणा-या ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे अर्ज केले आहेत. त्यांच्या मुलाखती २९, ३०, ३१ जुलै रोजी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. त्याला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती त्यांच्या जिल्हा मुख्यालयी २९, ३०, ३१ जुलै होणार आहेत. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारांच्या मुलाखतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन निरीक्षकांची नेमणूक केली आहे. हे निरीक्षक मुलाखती घेऊन आपला अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला देणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

पुणे रेसिंग सीझनला 25 जुलैपासून प्रारंभ

0

पुणे : सुमारे तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अश्वशर्यतींचा थरार पुन्हा एकदा पश्चिम भारतात सुरू होत असून पुणे मान्सून अश्वशर्यतींच्या यंदाच्या हंगामाला येत्या गुरुवार, 25 जुलैपासून प्रारंभ होत आहे. हा हंगाम 26 ऑक्टोबरपर्यंत चालणार असून ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याच्या जवळजवळ प्रत्येक वीकेंडला या शर्यती रंगणार आहेत.

यंदाच्या मौसमात एकूण 23 दिवस अश्वशर्यती होणार आहेत. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (आरडब्लूआयटीसी)ला यंदाच्या मौसमात दोन ग्रुप वन अश्वशर्यतींची घोषणा करताना अतिशय आनंद होत आहे. यातील पहिली इंडियन सेंट लेजर ही शर्यत रविवार, दि.22 सप्टेंबर रोजी होणार असून रविवार, दि.13 ऑक्टोबर  रोजी पुणे डर्बी होणार आहे.

यंदाच्या पुणे अश्वशर्यती हंगामासाठी एकूण 8.19 कोटी रुपयांची रक्कम पणाला लागणार आहे.  रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब यांनी या हंगामात त्यांना पाठिंबा देणारे सर्व पुरस्कर्ते, जाहिरातदार व प्रायोजक यांचे आभार मानले आहेत.

या मौसमातील प्रमुख शर्यती व त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत:

  • द इंडिपेंडन्स मिलियन-प्रायोजक एसआरएस ग्रुप-गुरुवार 15 ऑगस्ट
  • द एफ.डी.वाडिया ट्रॉफी(ग्रेड 3)-प्रायोजक मेसर्स येरवडा स्टड अँड ऍग्रिकल्चरल फार्म-शनिवार 24 ऑगस्ट
  • द पंचशील मिलियन-प्रायोजक पंचशील समूह-रविवार 25 ऑगस्ट
  • द एस.ए. पुनावाला मिलियन (ग्रेड 3)-प्रायोजक पुनावाला ग्रुप-रविवार 15 सप्टेंबर
  • द विलू सी. पुनावाला मिलियन-प्रायोजक डॉ. सायरस एस. पुनावाला- रविवार 15 सप्टेंबर
  • द  थ्रेप्टीन फिलीज अँड मेअर्स स्टेक्स(ग्रेड 3)-प्रायोजक मेसर्स रॅप्टकोज ब्रेट अँड कंपनी लिमिटेड- रविवार 6 ऑक्टोबर
  • द नोशीर अँड डोली धनजीभॉय  स्प्रिंट मिलियन(ग्रेड 3)-प्रायोजक धनजीभॉय फॅमिली- रविवार दि 13  ऑक्टोबर(पुणे डर्बी डे)

या मौसमात अन्य प्रत्येक वयोगटातील अश्वांसाठी विविध दर्जाच्या शर्यतीसुद्धा आयोजित करण्यात येणार आहे.आरडब्लूआयटीसी या क्लबचे पुण्यातील स्थानिक लष्करी विभागाशी असलेले सहकार्य सर्वश्रुत आहे. या दोन्ही संस्थांमधील नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी क्लबने रविवार,1 सप्टेंबर रोजी सदर्न कमांड रेस डेची घोषणा केली आहे. या दिवशी सेना दलाच्या दक्षिण विभागातील(सदर्न कमांडमधील)नामवंत अधिकारी व कुटुंबियांच्या सहभागासह विशेष अश्वशर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या मौसमातील हा दिवस विशेष मानला जात आहे.

पुणे अश्वशर्यतींच्या हंगामासाठी रेडिओ पार्टनर म्हणून रेडिओ वन या वाहिनीची घोषणा करण्यात आली असून प्रत्येक आठवड्यातील सर्व शर्यतींचे धावते वर्णन रेडिओ वन वरून करण्यात येणार आहे. अत्यंत विख्यात अशा हेल्ट्न हॉटेल्स आणि रिसॉर्ट समूहातील लक्झरी ब्रँड असलेल्या आणि जगभरात 33हुन अधिक ठिकाणी अलिशान प्रॉपर्टी असलेल्या कॉनराड हॉटेल्स अँड रिसॉर्ट यांची पुणे अश्वशर्यतींच्या यंदाच्या हंगामासाठी हॉस्पिटॅलिटी पार्टनर म्हणून घोषणा करण्यात आली आहे या निमित्ताने कॉनराड हॉटेल्स अँड रिसॉर्ट यांच्या वतीने  रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या सभासदांसाठी जुलै ते डिसेंबर 2019 या कालावधीत विशेष सवलतींचे दर आकारण्यात येणार आहे. तसेच क्लबच्या वतीने फेसबुक, ट्विटर व इंस्टाग्राम या सोशल मीडियावर सर्व शर्यतींची अपडेट सातत्याने देण्यात येणार आहे. रेस शौकिनांनी आणि पुणेकरांनी दिलेल्या भरघोस पाठिंब्याबद्दल क्लबने त्यांचे आभार मानले आहेत.

पुणे हंगामातील अश्वशर्यतींच्या तारखा:

 

25 व 26 जुलै 2019

 3, 4, 10, 15, 16,24, 25 आणि 31 ऑगस्ट

1, 7, 14, 15, 21, 22 आणि 29 सप्टेंबर

5, 6, 12, 13, 25 व 26 ऑक्टोबर.

‘जेआरडी’च्या जन्मदिनी आंत्रप्रेन्युअर्सचा सन्मान

0
आंत्रप्रेन्युअर्स क्लबतर्फे ‘एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशीप पुरस्कार’ वितरण सोमवारी

पुणे : भारतरत्न जे. आर. डी टाटा यांच्या जन्मदिनी (२९ जुलै २०१९) साजरा होत असलेल्या २६ व्या आंत्रप्रेन्युअर्स दिनानिमित्त आंत्रप्रेन्युअर्स क्लब ऑफ पुणे, पिंपरी-चिंचवड, निगडी आणि बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींचा ‘एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशीप पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

रेणुका इंजिनिर्सचे  महेंद्र पाटील (आंत्रप्रेन्युर), सॉफ्टसेन्स टेक्नोसर्व्हिसेसचे अजिंक्य कोट्टावर (रिसर्च अँड इनोव्हेशन), राणा हॉस्पिटॅलिटीच्या भाग्यश्री जाचक (सर्व्हिस इंडस्ट्री), सांगलीतील रोझ हायटेक ऍग्रो फार्मचे तानाजीराव चव्हाण (आउटस्टँडिंग वर्क इन ऍग्रीकलचर), कृष्णा डायग्नोसिस्टच्या पल्लवी जैन (सोशल रिलेव्हन्स), मानसी करंदीकर व केतकी घाटे (ग्रीन एंटरप्राइज) यांच्यासह हिंदुस्थान कॅटल फीड्सचे सचिन माने यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

सोमवारी (ता. २९) सायंकाळी ५.०० वाजता जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे येथे हा सोहळा होणार आहे. सुदर्शन केमिकल्सचे अध्यक्ष प्रदीप राठी यांच्या हस्ते या पुरस्करांचे वितरण होणार असून, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या एसएमई एक्सचेंजचे प्रमुख अजय ठाकूर यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. क्लबचे सचिव डॉ. आशिष तवकर, खजिनदार सुनील थोरात, बारामती क्लबचे अध्यक्ष भाऊसाहेब तुपे, पीसीएमसी क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र कुलकर्णी, पुणे फास्ट क्लबचे सुभाष माईनकर, निगडी क्लबचे अध्यक्ष सागर दाणी आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आंत्रप्रेन्युअर्स क्लबचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी यांनी दिली.

आर्थिक मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये वाढ- महाराष्ट्रात सर्वाधिक 970 जागा

0

नवी दिल्ली -केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आर्थिक मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या 5200 जागा वाढवल्या आहेत. राज्य सरकारची महाविद्यालये, राज्य सरकार अनुदानित सोसायट्यांकडून चालवली जाणारी महाविद्यालये, महानगरपालिकेची महाविद्यालये आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील महाविद्यालये यांमध्ये 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी या जागा वाढवल्या असून महाराष्ट्रात सर्वाधिक 970 जागा उपलब्ध केल्या आहेत. त्याखालोखाल गुजरातमध्ये 700 तर राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 450  जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशात 360 आणि उत्तर प्रदेशात 326  जागा उपलब्ध असतील. विविध राज्यांमध्ये उपलब्ध असलेल्या जागांची आकडेवारी याप्रमाणे:-

2019-20 या वर्षात आर्थिक मागासवर्गाला 10 टक्के कोट्यांतर्गत एमबीबीएस च्या राज्यनिहाय वाढीव जागांची यादी  
अनु. क्र. राज्य वाढीव जागा  
 
1 आंध्र प्रदेश 360  
2 आसाम 174  
3 बिहार 190  
4 छत्तीसगढ 120  
5 दिल्ली 115  
6 गोवा 30  
7 गुजरात 700  
8 हरियाणा 110  
9 हिमाचल प्रदेश 120  
10 जम्मू-काश्मिर 85  
11 झारखंड 30  
12 केरळ 155  
13 मध्य प्रदेश 270  
14 मणिपूर 25  
15 महाराष्ट्र 970  
16 ओदिशा 100  
17 पद्दुचेरी 30  
18 पंजाब 100  
19 राजस्थान 450  
20 तेलंगणा 190  
21 त्रिपुरा 25  
22 उत्तर प्रदेश 326  
23 उत्तराखंड 75  
24 पश्चिम बंगाल 450  
  एकूण 5200

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री  अश्विनी कुमार चौबे यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

आंबेगाव तालुक्यात शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणणार- आढळराव पाटील

0

मंचर : आंबेगाव तालुक्यात शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणायचा असा शिवसैनिकांनी मनात निश्चय केला तर नक्कीच बदल घडल्याशिवाय राहणार नाही. खेड, जुन्नर , आंबेगाव या तिन्ही तालुक्यातील उमेदवार कसा निवडून आणायचा यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे सर्व नियोजन मी करणार आहे. लोकसभा निवडणुकीला शंभर कौरव समोर होते आणि मी एकटा पांडव होतो. परंतु आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आंबेगावला सर्व शिवसैनिकांच्या ताकतीने उमेदवार निवडून आणणार आहे. याचा मला पूर्ण विश्वास आहे. शिवसैनिक जो उमेदवार सांगतील त्यालाच तिकीट देणार असल्याचे आढळराव पाटील यांनी जाहीर बैठकीमध्ये सांगून आगामी विधानसभेच्या उमेदवाराच्या नावाचा चेंडू शिवसैनिकांच्या गळ्यात टाकला. आंबेगाव
शिरूरच्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीबाबत शिवसैनिकांची महत्वपूर्ण बैठक वडगाव येथे पार पडली. यावेळी आढळराव पाटील बोलत होते. वडगाव (ता. आंबेगाव) आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघातील शिवसेना व सर्व अंगिकृत संघटनांचेपदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक शिवसेना उपनेते  शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वडगाव काशिंबेग फाटा येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाली. यावेळी शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या चर्चा घडून आली. याप्रसंगी जेष्ठ नेत्या सौ.जयश्रीताई पलांडे , युवानेते अक्षय आढळराव पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रविंद्र करंजखेले, आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे, शिरूर तालुकाप्रमुख गणेश जामदार , जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, सुनिल बाणखेले, सचिन बांगर, सुरेश भोर, बाळासाहेब वाघ, पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे, महेश ढमढेरे, दिपक घोलप, महिला आघाडीच्यामालतीताई थोरात, स्नेहलताताई मोरे, कल्पेश आप्पा बाणखेले, माऊली घोडे, दिलीप पवळे, संतोष डोके, अशोक थोरात, अजित चव्हाण, गोविंद काळे यांच्यासह शिवसेना व अंगिकृत संघटनांचे पदाधिकारी तसेच जेष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना आढळराव पाटील म्हणाले , २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला राष्ट्रवादीची दडपशाहीसंपविण्यासाठी जुन्नर , आंबेगाव , खेड ताल्लुक्यातील प्रत्येक शिवसैनिक पेटून उठला होता. ते दिवस आठवून आगामी विधानसभेच्या निवडणुकीला पेटून उठून प्रचार करा. आत्मविश्वासामुळेच लोकसभेला गाफील राहिलो.
शिवसेनेच्या बाहेर पडून दुटप्पीपणा करणाऱ्यांनी दुटप्पी राजकारण थांबवावा. कोणीही उठतो सुटतो बाळासाहेबांचा फोटो लावतो. बाळासाहेबांचे नाव घेऊन भगव्या झेंड्या खाली दुहेरी भूमिका बजावायची . हे धंदे थांबले पाहिजे. हे आंबेगाव तालुक्यातच नाही तर जुन्नर मध्येही तेच चालू आहे. त्यामुळे आपलं कोण हे शिवसैनिकांनी ओळखलं
पाहजे. शिवसैनिकांशी कट्टर शिवसैनिक म्हणून दुटप्पी राजकारण करणारे प्रा. राजाराम बाणखेले व आशाताई बुचके यांचे  नाव न घेता शिवसेनेचे उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी टोला लगावून शिवसैनिकांना सावध केले. शिवसेनेकडून आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी अक्षय आढळराव , जयश्री पलांडे , अरुण गिरे , दीपक घोलप , बाळासाहेब वाघ , देविदास दरेकर ,गणेश जामदार, सचिन बांगर यांनी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक सांगितलेले. सादर इच्छुकांच्या नावाची चर्चाच सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांशी करून अंतिम नावाची यादी मातोश्रीकडे पाठविणार असल्याचे आढळराव यांनी सांगितले. या कार्यक्रमाची प्रस्तावना सचिन बांगर यांनी तर आभार बाळासाहेब वाघ यांनी मानले.

वेतन विधेयक 2019 लोकसभेत सादर

0

नवी दिल्ली-केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री श्री संतोष कुमार गंगवार यांनी आज लोकसभेत वेतन संहिता विधेयक 2019 लोकसभेत सादर केले. वेतन आणि बोनस आणि संबधित इतर बाबींविषयी असलेल्या विविध कायद्यांचे एकत्रिकरण या विधेयकात करण्यात आले आहे.

या विधेयकात किमान वेतन कायदा, 1948, वेतन अदा करण्याचा कायदा 1936, बोनस अदा करण्याचा कायदा 1965 आणि समान भरपाई कायदा 1976 यांना एकत्र करण्यात आले आहे. हा कायदा अस्तित्वात आल्यावर या चारही कायद्यांचे पुनरुज्जीवन होणार आहे.

वेतन संहितेमध्ये कोणतेही क्षेत्र आणि वेतनाची मर्यादा कितीही असली तरी किमान वेतनाची  आणि वेळेवर वेतन देण्याची तरतूद आहे. सध्या किमान वेतन कायदा आणि वेतन अदा करण्यासंदर्भातला कायदा या दोन्ही कायद्यात एका विशिष्ट वेतनमर्यादेच्या खाली असलेल्या विशिष्ट कर्मचाऱ्यांना विचारात घेतले आहे. मात्र, नव्या तरतुदीनुसार प्रत्येक कामगाराला समान हक्क मिळणार आहेत. सध्याच्या किमान वेतन मर्यादेत 40 टक्के मनुष्यबळावरून 100 टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे प्रत्येक कामगाराला एका किमान वेतनाची हमी मिळून त्याची क्रयशक्ती वाढेल आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना मिळेल. तसंच कामगारांच्या किमान जीवनमानाचाही विचार करण्यात येणार आहे. त्यामुळे देशातल्या 50 कोटी कामगारांच्या जीवनाचा दर्जा उंचावायला मदत होईल.तसेच कामगारांना वेतन देताना ते डिजिटल करण्याचा देखील प्रयत्न आहे. वेतनाच्या वेगवेगळ्या व्याख्यांमुळे कायदेशीर प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी नव्या सुलभ व्याख्येमुळे दूर होणार

आहेत. अनेक प्रकारची कागदपत्रे, नोंदवह्या यांची कटकट दूर होऊन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कामगारांची माहिती साठवता येणार आहे. किमान वेतनाच्या विविध राज्यनिहाय मर्यादा आणि प्रकार कमी व्हायला मदत होणार आहे. कारखान्यांची पाहणी, अधिकारक्षेत्राची मर्यादा यात बदल होऊन कामगार कायद्यांमध्ये पारदर्शकता निर्माण होईल.

यापूर्वी हे विधेयक 10 ऑगस्ट 2017 रोजी लोकसभेत सादर करण्यात आले होते आणि ते संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवण्यात आले. या समितीने गेल्या वर्षी 18 डिसेंबरला नव्याने अहवाल दिला होता. मात्र, 16 व्या लोकसभेची मुदत संपल्यामुळे ते विधेयक बाद झाल्याने या वर्षी हे विधेयक नव्याने तयार करण्यात आले आहे.

 

निवडणूकपूर्व प्रचारावर भाजप-सेनेचा भर

0

(प्राब न्यूज )-

विधानसभा निवडणुकीपूर्वी  भाजपचे कार्यक्रम-

21 जुलै 2019 – प्रदेश विस्तारित कार्यसमिती
25 जुलै ते 10 ऑगस्ट 2019 – जिल्हयासह शक्ती केंद्र प्रमुख बैठक
9 ऑगस्ट 2019 – सदस्यता अभियान ड्राइव्ह
1 जुलै ते 15 ऑगस्ट – नवमतदार नोंदणी अभियान (युवा मोर्चा)
15 जुलै ते 15 ऑगस्ट – पक्ष विस्तार योजना (सर्व शक्ती केंद्रांपर्यंत)
10 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट – विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन
1 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट – शक्ती सन्मान महोत्सव (रक्षाबंधन पर्व) (बुथस्तरावर व मंडल स्तरावर राखी संकलन) 16 ऑगस्ट – रक्षाबंधन कार्यक्रम
1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट – महाजनादेश यात्रा
15 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर – विधानसभा स्तरावर नवमतदार संवाद कार्यक्रम
16 ऑगस्ट – स्व. अटलजी स्मृतीदिन (शक्ती केंद्रस्थानी बूथ कार्यकर्ता एकत्रीकरण)

152 विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा 

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ७ सप्टेंबरला जल्लोष करणार

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारताचे ‘चांद्रयान-२’ हे महत्त्वाकांक्षी यान यशस्वीरीत्या ७ सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येणार आहे या दिवशी अभिमानास्पद कामगिरीचा देशभर जल्लोष करून महाराष्ट्रात व हरियानात भाजप सरकारचे मतदारांना प्रभावित करण्याचे नियोजन देखील असल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांची घोषणा ७ सप्टेंबरनंतर होण्याची शक्यात देखील वर्तवली जात आहे.

सप्टेंबर महिन्याच्या १७ सप्टेंबर २०१९ रोजी अंगारकी चतुर्थीदिनी महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१९ करीता निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात येईल अशी शक्यता आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान घेण्यात येऊ शकते. सर्वसाधारण 20 ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान व दिवाळी पूर्वी म्हणजे 23 अथवा २४ ऑक्टोबर २०१९ रोजी मतमोजणी होऊ शकेल.  विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१४ मध्ये महाराष्ट्रात 15 ऑक्टोबर २०१४ रोजी घेण्यात आलेल्या होत्या तर मतमोजणी 19 ऑक्टोबर २०१४ रोजी करण्यात आली होती.निवडणूक कार्यक्रम १२ सप्टेंबर २०१४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या होत्या. महाराष्ट्रासह हरियाणामधील निवडणुका एकाच वेळी जाहीर करण्यात आलेल्या होत्या  महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबर २०१४ रोजी संपणार होती तत्पुर्वी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. संपूर्ण प्रक्रिया २२ ऑक्टोबर २०१४ रोजी पूर्ण करण्यात आलेली होती. विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१९ करीता देखील गेल्या वेळी प्रमाणे ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येतील कारण महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपणार आहे. तत्पुर्वी निवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे निवडणूक आयोगास क्रमप्राप्त आहे. गेल्या निवडणुकांच्या तारखांच्या पार्श्वभूमीवर यावेळी गणेशोत्सव सांगता १२ सप्टेंबर २०१९ रोजी संपणार आहे. या कालावधीत सुरक्षेवर मोठ्याप्रमाणात ताण यंत्रणांवर असतो त्यामुळे गणेशोत्सवानंतर निवडणुका जाहीर  होतील. तर २५ ऑक्टोबर २०१९ पासून दीपावली सण सुरु होणार आहे. त्यामुळे दिवाळी पूर्वीच मतदान घेण्यावर आयोगाची मदार असेल. सर्वसाधारण सप्टेंबर महिन्याच्या १७ सप्टेंबर २०१९ रोजी अंगारकी चतुर्थीदिनी महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१९ करीता निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात येईल अशी शक्यता आहे. तर २५ सप्टेंबर २०१९ रोजी अधिसूचना काढण्यात येऊ शकते तर नामनिर्देशनपत्र घटस्थापना व नवरात्री कालावधीत भरण्याची मुदत असणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान घेण्यात येऊ शकते. सर्वसाधारण 20 ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान व दिवाळी पूर्वी म्हणजे 23 अथवा २४ ऑक्टोबर २०१९ रोजी मतमोजणी होऊ शकेल. ऐनदिवाळीत अथवा नंतर नव्या मंत्रिमंडळाची शपथ ग्रहण होऊ शकते.

ऐननिवडणुकीतील खर्चाला लगाम लावण्यासाठी निवडणूकपूर्व प्रचारावर भाजप-सेनेचा भर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूकपूर्व प्रचार दौऱ्यांचे आयोजन केले जात असून ऐननिवडणुकीतील खर्चाला लगाम लावण्यासाठी निवडणूकपूर्व प्रचारावर भाजप व शिवसेनेचा जास्त भर आहे. निवडणुकीत आदर्श आचारसंहिता लागू असल्याने केंद्रित प्रचारावर व निवडणूक खर्चावर मर्यादा येतात. अनेक विभागांच्या परवानगी घ्यावी लागते. राज्य व केद्र स्तरावरील नेत्यांच्या सभांच्या आयोजनात कार्यकर्त्यांचा वेळ खूप वाया जातो. प्रत्यक्ष मतदारांना भेटणे व प्रचारसाहित्य पोहोचवणे जिकरीचे होते म्हणून ऐननिवडणुकीतील खर्चाला लगाम लावण्यासाठी निवडणूकपूर्व प्रचारावर भाजप-सेनेने भर दिलेला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी एका मतदारसंघात उमेदवारांना खर्चाची २८ लाखांची मर्यादा असते. या खर्चात स्टार प्रचारक व राजकीय पक्षांचा प्रचार खर्च समावेश केला जात असल्याने प्रचारावर मर्यादा येतात. यावर मात करण्यासाठी भाजप व शिवसेनेने निवडणूकपूर्व प्रचार दौऱ्यांचे आयोजन केले आहे.

152 विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा 

आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांची तयारी अन २२० जागांवर लक्ष्य आणि प्रत्यक्ष 152 विधानसभा मतदारसंघातच प्रचार ही भाजपची रणनीती आहे. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट संपूर्ण महिनाभर 30 जिल्हे व्याप्त महाजनादेश यात्रा काढून 25 दिवसात पूर्ण करून सुमारे 4 हजार 232 किलोमीटर अंतर कापून महाराष्ट्रातील 152 विधानसभा मतदारसंघात तब्बल 104 जाहीर सभा आणि 228 स्वागत सभा घेण्यात येणार आहेत तर 20 पत्रकार परिषदांमध्ये निवडणूकपूर्व प्रचारांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात ‘जनआशीर्वाद’ यात्रा नुकतीच काढली होती. या यात्रेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून राज्यात महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आले. शिवसेनेने आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू केली असून, ती जळगाव येथून सुरू झाली होती. आदित्य ठाकरे युवकांसोबतच शेतकऱ्यांशी यात्रेच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. त्यांच्या कार्यक्रमांना गर्दी होत असल्याचे चित्र आहे. या यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व जनतेच्या मनावर बिंबवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनेही जोरदार कार्यक्रम आखला आहे. विधानसभेसाठी मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट अशी महिनाभर मुख्यमंत्र्यांची राज्यभर महाजनादेश यात्रा निघणार आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील महाजनादेश यात्रा काढणार काढणार आहेत.  ‘एलईडी’युक्त रथ या यात्रेत वापरला जाईल. यात फडणवीस सरकारने केलेल्या कामाची माहिती चलचित्रांद्वारे दिली जाईल. राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. दीड ते दोन महिन्यांत आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 1 ते 31 ऑगस्टपर्यंत महाजनादेश यात्रा प्रत्येक जिल्ह्यातून जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून राज्य सरकारने केलेल्या कामासोबत नवीन काही घोषणा करण्याची शक्‍यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने नागपूर, नंदुरबार, अकोला, वाशीम व धुळे जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्‍ती करून महिनाभरात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्‍यता आहे. पाच जिल्ह्यांत निवडणुका असल्या तरी याचा परिणाम राज्यावर होईल. सरकारला धोरणात्मक निर्णय घेताना अवघड जाणार असल्याचे सांगण्यात येते. तसेच मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला फटका बसणार आहे. निवडणूक आयोगाकडून त्यांची यात्रा रोखली जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

इम्रान आणि ट्रम्प पत्रकार परिषदेत नेमका संवाद

0

पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारले की, अमेरिका काश्मीरप्रश्नी भारत-पाक यांच्यात मध्यस्थी करणार का? त्यावर इम्रान आणि ट्रम्प यांच्या प्रतिक्रिया…

> इम्रान : अमेरिका सर्वात शक्तिशाली देश आहे. भारतीय उपखंडात शांतता स्थापन करण्यात तो महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. मला वाटते की, राष्ट्रपती ट्रम्प यांच्या नेतृत्वात हा सर्वात शक्तिशाली देश दोन्ही देशांना (भारत-पाक) साहचर्यात आणू शकतो. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. चर्चा सुरू करणे आणि मतभेद मिटवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. मात्र दुर्दैवाने त्यात प्रगती झाली नाही. आशा आहे की, राष्ट्रपती ट्रम्प ही प्रक्रिया पुढे नेऊ शकतील.

> ट्रम्प : दोन आठवड्यांपूर्वी पंतप्रधान मोदी यांची भेट झाली होती. त्यांनी मला विचारले होते की या प्रश्नी तुम्ही मध्यस्थ होणे पसंत कराल का? मी विचारले, कोणत्या प्रश्नी? ते म्हणाले काश्मीर. हा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहे. मी म्हणालो, मला मदत करता आली तर मला आनंदच होईल. तुम्ही मला मध्यस्थ बनवाल तर मी तयार आहे.

> इम्रान : मी आता सांगू शकतो की, तुम्ही हा प्रश्न सोडवण्यास मध्यस्थी केली तर तुम्हाला कोट्यवधी लाेकांचे आशीर्वाद मिळतील.

> ट्रम्प : मला वाटते की हा प्रश्न सुटेल. मात्र, त्यांचेही (मोदी) विचार असेच असणे आवश्यक आहे. यावर मला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल.

विधानसभा निवडणुकीत नगरसेवकांची भूमिका ही महत्त्वपूर्ण असेल – लोढा

0

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या वाॅर्ड व्यतिरिक्त दुसऱ्या वाॅर्ड मध्येही पक्षाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी सर्व नगरसेवकांना यासंदर्भात कार्य प्रक्रिया सुनिश्चित करून एक योजना आखण्याचे निर्देश दिले आहेत. अध्यक्ष लोढा यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या बैठकीत सर्व नगरसेवक तसेच नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक, भाजप संघटन महामंत्री सुनील कर्जतकर, आमदार पराग अलवणी आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे महामंत्री मोहित भारतीय या बैठकीला उपस्थित होते.

महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी सायंकाळी संपन्न झालेल्या बैठकीत भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. भाजपाध्यक्ष लोढा यांनी नगरसेवकांना संबोधित करताना म्हणाले की, मुंबईच्या प्रत्येक बुथवर भाजपची गतिविधि सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये नगरसेवकांची महत्वाची भूमिका असणार आहे. मतदान यादीतून बनावटी मतदारांचे नाव कापणे तसेच नवीन युवा मतदारांची नावे मतदार यादीत जोडण्याकरता प्रत्येक स्तरावर पक्षाने बनवलेली योजना लोढा यांनी नगरसेवकांच्या समोर मांडली. लोढा यांनी नगरसेवकांना आवाहन केले आहे की, विधानसभा निवडणुकीआधी प्रत्येक वाॅर्ड मध्ये कार्यकर्त्यांना संघटित करून कोणत्याही परिस्थितीत विजय निश्चित करण्याच्या दृष्टीने लोकांना पक्षाशी जोडून ठेवण्याचे काम नगरसेवकांनी करावे.

या बैठकीत आमदार पराग अलवणी यांनी सामान्य जनतेमध्ये काम करत असताना नगरसेवकांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची चर्चा केली. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा महानगरपालिकेत आलेल्या मनोज कोटक यांचे मुंबई भाजप अध्यक्ष लोढा आणि भाजपच्या सर्व नगरसेवकांनी अभिनंदन केले. ते म्हणाले की पक्षाची स्थायी ओळख निर्माण होण्याकरता योग्य काम हाती घेतल्याने संघटन मजबूत होईल. या बैठकीत मुंबई भाजपचे शतप्रतिशत नगरसेवक उपस्थित होते. सर्व नगरसेवकांनी एका स्वरात भाजप अध्यक्ष लोढा यांना आश्वस्त  केले की, विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी ते सर्वतोपरी करतील.

 

माहिती अधिकार कायद्यातील सुधारणा म्हणजे ‘दात नसलेला वाघ’

0

नवी दिल्ली – महिती अधिकार कायद्यात नवीन सुधारणा करण्यात आली आहे. सोमवारी लोकसभेत माहिती अधिकार कादया सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र, विरोधकांनी मोदी सरकारच्या या सुधारणा विधेयकाला मोठा विरोध केला होता. या विधेयकातील नव्या धोरण आणि सुधारणांचा वापर केल्यास राष्ट्रीय मानवाधिकार कायद्याप्रमाणेच माहिती अधिका कायदाही दात नसलेल्या वाघासारखा होईल, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजीमंत्री शशी थरुर यांनी म्हटले आहे.

माहिती अधिकार कायद्याला कमकुवत बनविण्याचा सरकारचा डाव आहे. माहिती अधिकार कायदा सुधारणा विधेयक 2019 च्या सभागृहातील चर्चेवेळी शशी थरुर यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. हे माहिती अधिकार सुधारणा विधेयक नसून हा कायदाच संपुष्टात आणण्यात येत असल्याचं थरुर यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही माहिती अधिकार कायद्यातील बदलाल विरोध करताना, सरकारकडून या कायद्याची हत्या करण्यात येत असल्याचं सोनिया गांधींनी म्हटलं आहे. माहिती अधिकार कायदा विचार-विनिमय करुन बनविण्यात आला होता. पण, आता तो कायदा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

भारतीय नौदलात दहावी उत्तीर्ण खलाशी भरती

0

नवी दिल्ली-

भारतीय नौदल खलाशी या पदाच्या भरतीसाठी सप्टेंबर 2019 मध्ये संगणक आधारित परीक्षा आयोजित करणार आहे. 1 एप्रिल 2000 आणि 31 मार्च 2003 ( दोन्ही दिवस समाविष्ट) या दरम्यान जन्म झालेले अविवाहित पुरुष अर्ज करण्यासाठी पात्र असतील. उमेदवार दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दहावी उत्तीर्ण खलाशी भारतीय नौदलात शेफ, स्टुअर्ड आणि हायजिनिस्ट म्हणून काम करतील.

या पदांसाठी केवळ  www.joinindiannavy.gov.in.च्या माध्यमातून आलेले ऑनलाईन अर्जच स्वीकारण्यात येतील. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपला वेळ वाचवण्यासाठी अॅप्लिकेशन विंडो खुली होण्यापूर्वी www.joinindiannavy.gov.in.वर स्वतःची नोंदणी करावी. या संकेतस्थळाव्यतिरिक्त इतर कोणतेही संकेतस्थळ किंवा अॅपवर नोंदणी करता येणार नाही. या संकेतस्थळावर आपले यूजर अकाउंट सुरू केल्यावर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज पाठवण्याच्या विंडोबाबत ईमेल अॅलर्ट पाठवण्यात येतील. ऑनलाईन नोंदणी केल्यावर उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि संपर्कासाठी उपयुक्त तपशील भरला पाहिजे.उमेदवारांना त्यांच्या माहितीची पुष्टी करणारी कागदपत्रे देखील अपलोड करता येतील. पूर्व-नोंदणीमुळे अॅप्लिकेशन विंडो खुली झाल्यावर उमेदवारांचा वेळ वाचेल.

भारतीय नौदलाची प्रवेश चाचणी आयएनईटी पूर्ण झाल्यावर चाळणी प्रक्रियेतून पुढच्या टप्प्याच्या निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांना बोलावण्यात येईल. पुढच्या टप्प्यात शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि प्राथमिक वैद्यकीय चाचणीचा समावेश असेल. या टप्प्यानंतर उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल आणि यशस्वी उमेदवारांना ओदिशामधील आयएनएस चिल्का या प्रशिक्षण केंद्रावर नोंदणीसाठी बोलावण्यात येईल. आयएनएस चिल्का येथे अंतिम वैद्यकीय चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांचीच नोंदणी केली जाईल. एप्रिल 2020 मध्ये प्रशिक्षणाची सुरुवात होईल. पात्रता आणि वैद्यकीय निकष यांचे तपशील जाणून घेण्यासाठी कृपया www.joinindiannavy.gov.in. ला भेट द्या. एखाद्या सामान्य सामाईक सेवा केंद्राला देखील उमेदवार भेट देऊ शकतात आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मदत घेऊ शकतात. या सेवेसाठी रुपये 60( अधिक जीएसटी) असे माफक शुल्क आकारले जाईल. ऑनलाईन अर्ज भरताना परीक्षा शुल्क भरावे लागेल.

 

मुंबई, दिल्ली आणि कोलकात्यामध्ये बीएसएनएल/ एमटीएनएलच्या इमारतींना लागलेल्या आगींच्या चौकशीचे दूरसंचार विभागाचे आदेश

0

नवी दिल्ली-मुंबईत वांद्रे टेलिफोन एक्सचेंजच्या इमारतीत आणि कोलकात्यामध्ये सॉल्ट लेक येथे बीएसएनएल इमारतीत काल मोठी आग लागली. तसेच दिल्लीत किडवाई भवनमध्ये लहानशी आग लागली. या आगींच्या घटनांची चौकशी करण्याचे आदेश दूरसंचारमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिले आहेत. तसंच बीएसएनएल आणि एमटीएनएल यांनी आपापल्या इमारतींचे नव्याने अग्निसर्वेक्षण करावे, असे त्यांनी सांगितले आहे.   मुंबईत 22 जुलै 2019 रोजी एमटीएनएलच्या इमारतीला दुपारी तीनच्या सुमाराला आग लागली होती आणि अग्निशमन दलाने व्यापक मदतकार्य राबवून ती दुसऱ्या  दिवशी पहाटे पूर्णपणे नियंत्रणात आणली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या इमारतीत असलेल्या टेलिफोन लाईन्स आणि इतर सामग्रीचे नुकसान झाल्याने 25000 दूरध्वनी ग्राहक आणि 8000 इंटरनेट ग्राहकांची सेवा बंद आहे. ही सेवा पुढल्या चार दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यात सॉल्ट लेक भागातल्या बीएसएनएलच्या इमारतीला देखील 22 जुलै 2019 रोजी आग लागली. ही आग दुसऱ्या दिवशी पहाटे आटोक्यात आणण्यात आली. यामुळे मोबाईल सेवांवर परिणाम झाला असला तरी बऱ्याच प्रमाणात मोबाईल सेवा पूर्ववत झाल्या असून अंदमान निकोबार भागातल्या सेवा येत्या चार दिवसात पूर्ववत केल्या जाणार आहेत. दिल्लीच्या किडवाई भवनमधल्या एमटीएनएल कार्यालयात लहानशी आग लागली होती. ही आग काही तासांतच आटोक्यात आली.

संगणक क्षेत्रातील ‘एचपी’च्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

0

मुंबई: संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हॅवलेट पकार्ड (एचपी) या कंपनीच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँटनिओ नेरी यांनी कंपनीच्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. राज्यातील स्मार्ट सिटीज, ई-हेल्थ केअर, एआय-स्किल इंडिया अशा विविध क्षेत्रात एचपी कंपनी काम करीत आहे. यापुढेही राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या वाय-फाय तंत्रज्ञानाशी निगडीत विविध प्रकल्पात काम करण्यास स्वारस्य असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘हॅवलेट पकार्डसोबत राज्यात अनेक प्रकल्प सुरू आहेत. आता या प्रकल्पांना आणखी वेग देण्याची आवश्यकता आहे. यामुळे विविध क्षेत्रातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची उपयुक्तता सिद्ध होईल.’