Home Blog Page 288

गानवर्धनतर्फे नेहा महाजन यांचा कै. सुचेता नातू स्मृती युवा सतारवादक पुरस्काराने गौरव

पुणे : ‘तो न गातो ऐकतो तो सूर आपला’ या ज्येष्ठ कवी चिं. त्र्यं. खानोलकरांच्या उक्तीप्रमाणे कलाकाराचा प्रवास आपल्या आतल्या स्वराचा आर्त आवाज ऐकत जनतेसाठी गाणारी गाणी जनार्दनापर्यंत पोहोचणारा असावा. अनुभव आणि अनुभूती यांचा मेळ घालत कलाकाराने साधना करावी, असे आवाहन सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते सुरेश रानडे यांनी केले.

अभिजात संगीताला प्रेरणा देणाऱ्या गानवर्धन संस्थेमार्फत कै. सुचेता नातू स्मृती युवा पुरस्काराने सतारवादक नेहा विदुर महाजन यांना आज (दि. २९) सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे वितरण सुरेश रानडे आणि जयश्री रानडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी सुरेश रानडे बोलत होते. दहा हजार रुपये, शाल आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गानधर्वन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर, डॉ. सदानंद मोरे, पीएनजीचे पराग गाडगीळ, ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे, राजश्री महाजनी मंचावर होते.

कृ. गो. धर्माधिकारी यांनी अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी स्थापन केलेली गानवर्धन संस्था शास्त्रीय संगीत आणि नृत्यासाठी कलाकारांना सतत प्रोत्साहन देत असते. गानवर्धनतर्फे दरवर्षी विविध पुरस्कारही दिले जातात. शिष्यवृत्ती, युवा पुरस्कार, उदयोन्मुख कलाकार पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार यातून सर्व स्तरातल्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यात गानवर्धन सतत प्रयत्नशील असते, असे संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.

पुरस्कार वितरणानंतर नेहा महाजन यांचे सतारवादन झाले. त्यांनी राग मधुवंती सादर केला. सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. विनायक कुडाळकर यांनी त्यांना तबल्यावर साथसंगत केली. ज्या मंचासमोर बसून मी अनेक मैफिली ऐकल्या आहेत तिथे सादरीकरण करण्याचे भाग्य मला मिळाले. खरेतर कलाकाराचे कौतुक कार्यक्रम झाल्यानंतर होते; पण माझ्या सादरीकरणाच्या आधीच तुम्ही मला पुरस्कार देऊन गौरविले आहे, यासाठी मी कृतज्ञ आहे, असे नेहा महाजन म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सुप्रसिद्ध गायक पंडित कैवल्यकुमार गुरव यांची मैफिल रंगली. राग भुपालीच्या द्रुत बंदिशीने त्यांनी गायनाची सुरुवात केली. त्यानंतर रूपक मध्ये ठुमरी सादर करून संत कबीरांच्या भजनाने मैफलीची सांगता केली. मंद्र, मध्य आणि तार सप्तकात त्यांचा आवाज लीलया फिरणाऱ्या आवाजाने रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), प्रशांत पांडव (तबला), चारुहास दामले, आदित्य जोशी (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

संस्थेच्या कार्याध्यक्ष वासंती ब्रह्मे यांनी सूत्रसंचालन केले.

वारकऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ याहीवर्षी वैद्यकीय सुविधा पुरवणार

0

वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोल माफी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वारकऱ्यांना दिलासा

मुंबई :- आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली होती. त्याविषयीची अधिक माहिती प्रसार माध्यमांना आज देतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वारी मार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरूम, खडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीने डागडुजी करावी, वारकऱ्यांना मुबलक पाणी, विजेची जोडणी, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून घ्यावे तसेच वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे टोल मध्ये सवलत दिली जाईल असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य तपासणी

गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून भव्य आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील, वारकऱ्यांसाठी कार्डीएक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल, पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश शिंदे यांनी यावेळी त्याना दिले. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिड्यांना वारीच्या काळात पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नोडल अधिकारी नेमणार

यासोबतच गतवर्षी वारीदरम्यान झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना शासनाद्वारे मदत केली जाईल, पोलिसांशी व्यवस्थित समन्वय व्हावा यासाठी नोडल ऑफिसर नेमण्यात येईल. वारकऱ्यांचे भोजन आणि इतर प्रथा परंपरा वेळच्या वेळी पार पाडाव्यात यासाठी वारी कुठे जास्त वेळ खोळंबणार नाही यासाठी प्रयत्न केला जाईल, यंदाची वारीही स्वच्छ वारी, निर्मल वारी हरित वारी म्हणून आपल्याला पार पाडायची असल्याने त्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य शासनाकडून केले जाईल असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची आकर्षक पुष्पसजावट

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ;
गणरायाच्या पाताळातील (शेषात्मज) गणेश जयंतीनिमित्त गाभा-यात शेषनागाच्या प्रतिकृतीत बाप्पाची चांदीची मूर्ती विराजमान

पुणे : शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरात केलेली आकर्षक आरास आणि गाभा-यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रुप पहायला मिळाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शेषनागाच्या विविधरंगी फुलांच्या प्रतिकृती साकारुन ही सजावट करण्यात आली. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता.

गणेश जयंतीनिमित्त मंदिरात शुक्रवारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक पार पडला. त्यानंतर पहाटे ४ वाजता पं. कैवल्य कुमार गुरव यांनी स्वराभिषेकातून गणरायाचरणी स्वरसेवा अर्पण केली. तसेच मंदिरात गणेश याग, सहस्त्रावर्तने, गणेशजाग देखील पार पडला.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्र्थीचा श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे. भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झाले. त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले. त्याच्याकडे पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले. परिणामी आपल्या नव्या अपत्याला त्यांनी मायाकर असे नाव दिले. अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केले. पुढे विप्रचित्ती नामक राक्षसाने या मायाकराला राक्षसांचा राजा केले. मायाकराने आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरवशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्ग लोक जिंकले. त्यानंतर त्याने पाताळावर आक्रमण केले. त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचे स्मरण केले.

श्रीशेष ध्यान करत असतांना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश श्रीशेषात्मज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला माध्यान्ह समयी प्रकट झाले. याच अवतारात पुढे गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तिने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले. या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुर वध केल्यामुळे याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषकग असे पण नाव प्राप्त झाले.

१० पेक्षा अधिक मनुष्यबळ असलेल्या आस्थापनांना विशाखा समिती स्थापन करण्याचे आवाहन

पुणे, दि. २९: कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायदा २०१३ अंतर्गत सर्व शासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त व्यक्ती काम करतात त्याठिकाणी अंतर्गत समिती (विशाखा समिती) स्थापन करणे बंधनकारक आहे. समिती स्थापन न करणाऱ्या संबंधित कार्यालय प्रमुख किंवा मालकांना ५० हजार रुपयापर्यंत दंड करण्याची तरतुद किंवा कार्यालयांचे नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवाना रद्द करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. सर्व खाजगी आस्थापनांनी त्यांच्या अंतर्गत समित्यांची भारत सरकारच्या https://shebox.wcd.gov.in/registerOffices ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी कार्यालयांनी अंतर्गत समिती स्थापन केल्याबाबत त्यांच्या आदेशाची प्रत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास lcpune2021@gmail.com या ईमेल इमेल पत्त्यावर पाठवावी. तसेच सर्व खाजगी आस्थापनांनी त्यांच्या अंतर्गत समित्यांची https://shebox.wcd.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा बिरारी यांनी केले आहे.

सफाई कर्मचाऱ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यासाठी त्यांचा डाटाबेस तयार करावा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. २९ : सफाई कर्मचाऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन त्यांची उन्नती व्हावी यासाठी त्यांची वयोगट, शिक्षण यानुसार यादी (डाटाबेस) तयार करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

सफाई कामगारांच्या विविध अडचणी व प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसार खैरनार, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ए. आर. गुजर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, पुणे मनपाचे मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लापा जाधव, बै.जी. वैद्यकीय महाविद्यालयाचे श्वसनोपचार विभागाचे विभागप्रमुख डॉ. संजय गायकवाड यांच्यासह पुणे, खडकी छावणी मंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगरपालिका, पिंपरी महानगरपालिकांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

सफाई कामगार आणि त्यांच्या पाल्यांच्या कल्याणासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी त्यांची निश्चित आकडेवारी असणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्व रुग्णालये, नगरपालिका, महसूल कार्यालये आदी ठिकाणच्या सफाई कामगारांचे सर्वेक्षण करावे. या समाजातील तरुण पिढीला शिक्षणासाठी, युवा पिढीला विश्वकर्मा योजनेतून रोजगार आणि उर्वरितांना अन्य सामाजिक व आर्थिक सुरक्षा योजनांचा लाभ कसा देता येईल याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

ससून रुग्णालयातील सफाई कामगारांच्या वारसांच्या अनुकंपा भरतीविषयक प्रकरणे आदींवर कार्यवाही गतीने व्हावी यासाठी पुढील आढवड्यात बैठक घ्यावी. ४८ बदली कामगारांचे भरतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा. सफाई कामगारांचे वेतन त्यांना रोख हातात न देता त्यांच्या बँक खात्यावर दरमहा ५ तारखेच्या आत जमा करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदारांना द्याव्यात. तसेच तसे झाल्याबाबत दरमहा १५ तारखेपर्यंत बँक स्टेटमेंट मागवून खात्री करावी, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत विविध स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधींनी सफाई कामगारांचे प्रश्न मांडले. त्यावर सकारात्मक राहून अधिकाऱ्यांनी काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या “सिंहस्थ कुंभमेळा २०२७” नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांकडे केली सविस्तर शिफारस

मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणारा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा सोहळा आहे. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सविस्तर निवेदन पाठवून नियोजन, अंमलबजावणी आणि समन्वयाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन व कृतीची विनंती केली आहे.

दिनांक २३ मे २०२५ रोजी नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, नाशिक महानगरपालिका, आरोग्य, बांधकाम आणि इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात सखोल चर्चा झाली.

डॉ. गोऱ्हे यांनी या पत्रात उल्लेख केला आहे की, महिलांपासून ज्येष्ठ नागरिक, बालक आणि दिव्यांग भाविकांसाठी स्वतंत्र व सुरक्षित चेंजिंग रूम, ‘हिरकणी कक्ष’, तसेच मदत केंद्र व महिला पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. गर्दीमुळे हरवलेली बालके सुरक्षितरित्या पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी, अशीही त्यांनी विनंती केली.

गोदावरी स्वच्छता अभियानास अधिक गती देणे, शौचालये, मैला व्यवस्थापन, घनकचरा प्रक्रिया आणि पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यावरही त्यांनी भर दिला. या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितता साधने व आवश्यक लसीकरण देण्यावरही त्यांनी लक्ष वेधले आहे.

सिंहस्थ मेळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांसाठी वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक सोयीसुविधा सुलभ व सुगम होण्यासाठी विशेष बसेस, पायी मार्गांचे नियोजन, महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृह, तसेच चांदवड, शिर्डी, शनि शिंगणापूर, सप्तश्रृंगीगड यांसारख्या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांशी दळणवळण सुधारण्याची शिफारस केली आहे.

आरोग्य सेवांच्या दृष्टिकोनातून, खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयांचा सहभाग सुनिश्चित करणे, तात्पुरती आरोग्य केंद्रे उभारणे, तपासणी शिबिरे आणि ॲम्ब्युलन्स सेवा कार्यान्वित करणे या बाबींवरही त्यांनी भर दिला आहे.

धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध करण्यासाठी प्रवचन, सत्संग आणि स्थानिक-राष्ट्रीय कलाकारांच्या सहभागातून कार्यक्रमांचे आयोजन करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. श्रद्धा व संस्कृतीचा संगम साधणारे उपक्रम राबवण्यावर डॉ. गोऱ्हे यांनी विशेष भर दिला आहे.

कुंभमेळ्यात सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागांमध्ये सायबर सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना राबवण्याची गरज त्यांनी नमूद केली आहे. गर्दीचे व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञानाचा उपयोगही प्रभावीपणे करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी नाशिकमधील सर्व प्रमुख मंदिरांची माहिती एकत्र करून प्रचार व प्रसार करणे, मंदिरांकडे जाणाऱ्या रस्त्यांची डागडुजी आणि पायाभूत सुविधा सुधारण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आराखड्याची पारदर्शकता राखण्यासाठी तो विधिमंडळ सदस्यांना उपलब्ध करून द्यावा आणि सर्व लोकप्रतिनिधींना नियोजनात सक्रिय सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी पत्रात केले आहे.

या निवेदनाच्या माध्यमातून डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली असून, संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हे आयोजन देशासाठी एक आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

डी.एल.एड. द्वितीय वर्षाच्या परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ३० मे रोजी

पुणे, दि.२९: अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- २०२५ (टीएआयटी) साठी प्रविष्ट झालेल्या डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन (डी.एल.एड.) द्वितीय वर्षाचे अंतिम सत्राच्या परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांची टीएआयटीची ऑनलाइन परीक्षा ३ जून ऐवजी ३० मे २०२५ रोजी नियोजित आहे. तरी संबंधित विद्यार्थ्यांनी बदलाची नोंद घेऊन सुधारित तारखेला परीक्षेस उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) २०२५ या परीक्षेच्या ऑनलाईन पद्धतीने घेण्याची नियोजन २७ ते ३० मे २०२५ व २ ते ५ जून २०२५ या कालावधीत करण्यात आलेली आहे. तथापि, १ हजार १०७ उर्दू माध्यमाच्या विद्यार्थी/उमेदवारांची डी.एल.एड. परीक्षा व (टीएआयटी) परीक्षा एकाच दिवशी येत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी हा बदल करण्यात आला असून विद्यार्थ्यांनी स्वतःची माहिती तपासून प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने प्राप्त करून घ्यावीत. नियोजित परीक्षेस उपस्थित व्हावे, याबाबत सर्वस्वी जबाबदारी उमेदवारावर राहील याची नोंद घ्यावी, असेही आयुक्तांनी कळविली आहे.
0000

पुणे महापालिकेकडून ३७ खेळाडूंना ८७ लाख २० हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती समारंभपूर्वक प्रदान

पुणे -पुणे महापालिकेचा क्रीडा शिष्यवृत्ती प्रदान समारंभ आज येथे संपन्न झाला यावेळी ३७ खेळाडूंना ८७ लाख २० हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

महानगरपालिका क्रीडा विभागाच्या अंर्तगत सुधारीत क्रीडा धोरणानुसार खेळाडूंसाठी विविध १८ योजना राबवण्यात येत आहेत. यामधील उदयोन्मुख खेळाडूंसाठी क्रीडा शिष्यवृत्ती अंतर्गत त्यांना स्पर्धा साहित्य खरेदी किंवा स्पर्धेच्या तयारीसाठी ठराविक रक्कम धनादेशाद्वारे आदा करण्यात येते.
सन २०२४-२५ या वर्षाकरीता खेळाडूंना शिष्यवृत्ती देणेकामी क्रीडा विभागाकडून जाहिरात देण्यात आली होती. त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून एकूण ७४३ खेळाडूंनी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३४४ खेळाडू शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. क्रीडा शिष्यवृत्तीसाठी पात्र खेळाडूंना एकूण ८७,२०,०००/- इतक्या रकमेचे धनादेश, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरण समारंभ आज दि.२९/०५/२०२५ रोजी सकाळी १० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाला .
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, यांच्यासह उप आयुक्त (प्राथमिक शिक्षण विभाग)आशा राऊत, उप आयुक्त (मालमत्ता व व्यवस्थापन) श्रीमती प्रतिभा पाटील, मुख्य कामगार अधिकारी नितिन केंजळे , क्रीडा अधिकारी प्राथ. शिक्षण विभाग माणिक देवकर इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश परदेशी यांनी केले तसेच क्रीडा विभागाच्या विविध योजना व क्रीडा विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामांबाबत क्रीडा विभागाच्या उप आयुक्त किशोरी शिंदे यांनी माहिती दिली. आशा राऊत यांनी मनपा शिक्षण विभागाच्या ३७ खेळाडूंना शिष्यवृत्ती दिल्याबद्दल आभार मानले, तसेच या वर्षी १०० हुन अधिक शिक्षण विभागाकडील खेळाडू विविध स्पर्धामध्ये प्राविण्य प्राप्त करतील असे सांगितले. आंतरराष्ट्रीय खेळाडू सिद्धार्थ कांबळे आणि राष्ट्रीय खेळाडू सुचिता खरवंडीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मनपाचे आभार मानले. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचून स्पर्धा जिंकण्यासाठी खेळाडू अथक प्रयत्न करतो, त्याच्या या प्रयत्नांना आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक असून पुणे मनपा क्रीडा शिष्यवृत्तीच्या माध्यमातून खेळाडूंना आर्थिक सहाय्य करीत आहे. अति. महापालिका आयुक्त यांनी क्रीडा नर्सरी व स्पोर्ट्स रिहॅब सेंटर सुरु करणेकरीता क्रीडा विभाग प्रयत्नशील असून क्रीडा नर्सरी प्रकल्प सुरू करणेस महापालिका आयुक्त यांची मान्यता प्राप्त झाली आहे असे सांगितले.
क्रीडा शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम अत्यंत आनंदमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करून खेळाडू व पालकांना गौरविण्यात आल्याबद्दल सर्व खेळाडू व पालकांनी पुणे महानगरपालिकेचे आभार व्यक्त केले.

मेट्रो तीनचे काम अपूर्ण असतानाही उद्घाटन का? सरकारी गलथानपणा मुळे आचार्य अत्रे स्टेशनमध्ये पाणी शिरले.

मुंबई, दि. २९ मे २०२५
मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे पण भाजपा युती सरकारच्या अव्यवस्थापनामुळे पहिल्याच पावसात मुंबई जलमय झाली. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला असतानाही आपत्ती व्यवस्थापन विभाग अथवा बीएमसीने कोणतीच पूर्व तयारी का केली नाही. भुयारी मेट्रो स्टेशनमध्येच पाणी शिरले असे नाही तर गोवंडी, वांद्रे, जुहू भागही जलमय झाला होता. भाजपा युती सरकारचा भ्रष्टाचार व गैरव्यवस्थापनामुळेच मुंबई जलमय झाली, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना अतुल लोंढे यांनी भाजपा युती सरकारचा भोंगळ कारभार व भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले, ते पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे मागील १० वर्षापासून नगरविकास विभागाचे मंत्री आहेत, पण त्यांच्या विभागाने मुंबईची पुरती वाट लावली आहे, पावसाने नगरविकास विभागाच्या धोरणांचे धिंडवडे काढले. मुंबईच्या जनतेची कसलीही काळजी न करता केवळ भ्रष्टाचारात हे सरकार आकंठ बुडाले आहे. हवामान खात्याने इशारा दिला असताना त्याकडे दुर्लक्ष का केले? बीएमसीने आगाऊ सूचना का दिल्या नाहीत? पावसाच्या (SOP) असतात त्याची अंमलबजावणी का झाली नाही ? पाऊस ८ वाजता सुरु झाला आणि १२ वाजेपर्यंत प्रशासन झापले होते का? असे प्रश्न उपस्थित केले.

मेट्रो-३ चे काम अपूर्ण असतानाही त्याचे उद्घाटन करण्याची घाई का केली? आचार्य अत्रे स्टेशनमध्ये पाणी शिरले त्याची जबाबदारी कोणाची? मेट्रो स्टेशन कसे असावे त्यासाठी काही तांत्रिक बाबी आहेत. या स्टेशनला तीन प्रवेशद्वार तर तीन बाहेर पडण्याचे दरवाजे असायला हवेत पण या स्टेशनवर दोनच दरवाजे आहेत. या त्रुटींची तपासणी कोणत्या अधिकारी वा सल्लागाराने केली होती का? ४० मीमी पाऊस पडला तरी मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरु शकते याची माहिती कोणालाच नव्हती का? बीएमसी अधिकाऱ्यांची ड्युटी मंत्र्यांच्या शिष्टाचारासाठी लावली आहे, मुंबईकरांच्या कामासाठी नाही असे लोंढे म्हणाले…

फक्त आचार्य अत्रे मेट्रो स्टेशनमध्येच पाणी शिरले असे नाही तर गोवंडी, जूहू, वांद्रे भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले पण चर्चा फक्त मेट्रो स्टेशनची झाली. मुंबई जलमय झाली पण बीएमसीचे अधिकारी, ठेकेदार किंवा नगरविकास विभागाच्या कोणत्याच व्यक्तीवर कारवाई का झाली नाही. भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मग कारवाई कोणावर केली याचे उत्तरही त्यांनी द्यावे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे जबाबदारीपासून पळ काढू शकत नाहीत, त्यांना उत्तर द्यावेच लागेल, असे अतुल लोंढे म्हणाले.

बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाण सिटी सर्वे प्रक्रियेला सुरुवात – दिलीप वेडेपाटील यांच्या प्रयत्नांना यश

पुणे: बावधन खुर्द व बावधन बुद्रुक या गावांचा गावठाण सिटी सर्वे आजपासून औपचारिकपणे सुरू झाला आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी गेल्या ५ वर्षांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे माजी नगरसेवक दिलीप अण्णा वेडेपाटील यांचे अथक प्रयत्न आज यशस्वी झाले आहेत.
बावधन परिसरातील झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर गावठाण हद्दीचे अचूक आणि कायदेशीर मोजमाप होणे ही गावाच्या भविष्यकालीन विकासासाठी अत्यावश्यक बाब होती. मात्र ही प्रक्रिया अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. याला चालना देण्यासाठी दिलीप अण्णा वेडेपाटील यांनी शासन, महसूल विभाग, आणि जमाबंदी कार्यालयाशी सातत्याने संवाद साधून या विषयाला प्राधान्य देण्याची मागणी केली.
या प्रक्रियेस गती मिळवून देण्यासाठी त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची विशेष भेट घेऊन बावधन गावातील स्थिती सविस्तरपणे मांडली. या बैठकीदरम्यान जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, उपायुक्त राजेंद्र गोळे, तसेच जमाबंदी नगर भूमापन विभागाचे अधिकारी हे उपस्थित होते.
सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आजपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरु झाले असून गावठाण हद्द, खाजगी जमिनी, रस्ते, सार्वजनिक जागा, मंदिरे, शाळा, यांचा नकाशा व मालकी हक्कांचे दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे.

सिटी सर्वेचे नागरिकांना होणारे फायदे :
• मालमत्तेवर कायदेशीर हक्क सिद्ध होणार.
• जमिनीच्या नोंदी शासकीय दस्तऐवजांमध्ये समाविष्ट होतील.
• बँक कर्ज, वारसा नोंदणी यांसारख्या प्रक्रियेस सुलभता.
• शासकीय योजना व नागरी सुविधांसाठी अडथळे दूर.
• बावधन गावाच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळणार.

दिलीप अण्णा वेडेपाटील यांनी यावेळी सांगितले की,
“हा सिटी सर्वे म्हणजे फक्त नकाशा काढण्याची प्रक्रिया नसून, हे गावाच्या विकासाच्या दृष्टीने एक मूलभूत पाऊल आहे. गावातील प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर हक्क निश्चित व्हावा, हीच माझी भूमिका होती. आज ती पूर्ण होताना पाहून समाधान वाटतं. s”या ऐतिहासिक निर्णयामुळे बावधन गावाच्या भविष्यकालीन पायाभरणीत महत्त्वाची भर पडणार असून, येत्या काळात अनेक विकासकामांना गती मिळणार आहे.

ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकन न्यायालयाची स्थगिती:म्हणाले- राष्ट्राध्यक्ष त्यांच्या अधिकारक्षेत्राबाहेर जात आहेत

वाशिंग्टन -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला संघीय व्यापार न्यायालयाने स्थगिती दिली आहे आणि ते असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला आणि संविधानाच्या कक्षेबाहेर जाऊन हे शुल्क लादण्याचा प्रयत्न केला.मॅनहॅटनमधील फेडरल कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेडने ट्रम्प यांचे पाऊल बेकायदेशीर घोषित केले. न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायद्याचा (IEEPA) गैरवापर केला. हा कायदा आणीबाणीच्या काळात राष्ट्राध्यक्षांना काही अधिकार देतो, परंतु ट्रम्प यांनी कोणत्याही ठोस आधाराशिवाय त्याचा वापर केला हे न्यायालयाने मान्य केले.

या शुल्कांमुळे प्रभावित झालेल्या पाच लहान अमेरिकन व्यवसायांच्या वतीने लिबर्टी जस्टिस सेंटरने हा खटला दाखल केला.
१२ अमेरिकन आयातदारांनीही न्यायालयात याचिका दाखल केली होती.
दोघांनीही असा युक्तिवाद केला की, आयात केलेल्या वस्तूंच्या किमती वाढल्याने त्यांचा खर्च वाढत असल्याने आयात शुल्कामुळे लहान व्यवसायांना त्रास होत आहे. न्यायालयाने हे युक्तिवाद मान्य केले आणि असे म्हटले की राष्ट्राध्यक्षांना इतके मोठे शुल्क लादण्याचा संवैधानिक अधिकार नाही.

ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे की, ते या निर्णयाविरुद्ध तात्काळ अपील करतील. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया साइट्सवर दावा केला की “अमेरिका पुन्हा महान बनवण्यासाठी” त्यांचे टॅरिफ धोरण आवश्यक आहे. तथापि, न्यायालयाने असे सुचवले की, ट्रम्प व्यापार कायदा १९७४ च्या कलम १२२ अंतर्गत १५० दिवसांसाठी १५% पर्यंत शुल्क लादू शकतात, परंतु यासाठी देखील ठोस आधार आवश्यक आहे.

अपीलची वाट पाहत आहे: ट्रम्प प्रशासनाच्या अपीलवरील न्यायालयाचा पुढील निर्णय खटल्याची दिशा निश्चित करेल.
९० दिवसांची सवलत: इतर देशांसोबत व्यापार करार करता यावेत यासाठी ट्रम्प यांनी आधीच काही शुल्क ९० दिवसांसाठी पुढे ढकलले होते. आता न्यायालयाच्या निर्णयामुळे हे धोरण आणखी कमकुवत झाले आहे.
जागतिक अर्थव्यवस्था: जागतिक व्यापार संघटनेने (WTO) आधीच इशारा दिला आहे की, ट्रम्पच्या शुल्कामुळे जागतिक व्यापारात ८१% पर्यंत घट होऊ शकते. न्यायालयाच्या या निर्णयामुळे हा धोका कमी होतो.
२ एप्रिल रोजी ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर कर लादले.

२ एप्रिल २०२५ रोजी ट्रम्प यांनी ‘मुक्ती दिन’ असे नाव दिले आणि जगभरातील १०० हून अधिक देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर नवीन शुल्क लावण्याची घोषणा केली. त्यांनी असा दावा केला की या शुल्कांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि अमेरिकेकडून कमी वस्तू खरेदी करणाऱ्या आणि जास्त विक्री करणाऱ्या देशांना धडा शिकवला जाईल.

तथापि, नंतर चीन वगळता सर्व देशांवरील शुल्क ९० दिवसांसाठी बंदी घालण्यात आली. ट्रम्पच्या टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून चीननेही टॅरिफ लादला होता आणि म्हणूनच चीनला टॅरिफमधून सूट देण्यात आली. चीनचा कर १४५% पर्यंत वाढवण्यात आला. चर्चेनंतर चीनवरील कर देखील कमी करण्यात आले.

भारतावरील करांबद्दल ट्रम्प म्हणाले होते,
भारत अमेरिकेवर ५२% पर्यंत कर लादतो, म्हणून अमेरिका भारतावर २६% कर लादेल. इतर देश आमच्याकडून जे शुल्क आकारत आहेत, त्याच्या जवळपास निम्मे शुल्क आम्ही आकारू. त्यामुळे दर पूर्णपणे परस्परसंवादी नसतील. मी ते करू शकतो, पण ते अनेक देशांसाठी कठीण होईल. आम्हाला ते करायचे नव्हते.

महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

मुंबई, दि. २९ मे २०२५: महावितरणच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन दि. १ ते ६ जून २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  दि.६ जून २०२५ रोजी महावितरण कंपनीचा २० वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्ताने आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहादरम्यान मॅरेथॉन, रॅली, निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांना सुरक्षाविषयक ई-मेल व एसएमएस पाठविणे, भित्तीपत्रके, चित्रफिती अशा विविध माध्यमांव्दारे विद्युत सुरक्षेविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे.

मागील काही वर्षामध्ये वीज अपघाताचे प्रमाण कमी करण्यात महावितरणला यश आले आहे. मात्र तरीही विविध कारणास्तव अपघात होतात. विद्युत अपघाताचे प्रमाण अजून कमी करण्यासाठी महावितरणने विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित करून व्यापक जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे.

“आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शुन्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार” हे ब्रिद घेऊन महावितरणच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयात दि.१ ते ६ जून २०२५ दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहात  विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. रविवार दि. १ जून रोजी सर्व परिमंडळ कार्यालयाच्या मुख्यालयाच्या शहरात मॅरेथॉन ‘रन फॉर सेफ्टी’ आयोजित करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी, ग्राहक व जनमित्र यांचेसाठी विद्युत सुरक्षा प्रश्नमंजुषा जाहीर करण्यात आली आहे.  या प्रश्नमंजुषेत सहभागी होणाऱ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. महावितरण कार्यालय / रोहित्र पेटी / आर. एम. यु. /डिजिटल बोर्ड / शिडी गाडी / उपकेंद्र / तक्रार निवारण केंद्र / ग्राहक सुविधा केंद्र / रहिवासी परिसर इ. ठिकाणी  विद्युत सुरक्षा पोस्टर्स लावण्यात येणार असून समाज माध्यमांद्वारे, रेडिओ, टि.व्ही. प्रिंट मिडिया तसेच इतर माध्यमे वापरुन विद्युत सुरक्षा विषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

सोमवार दि. २ जून रोजी  राज्यातील ६५० उपविभाग अंतर्गत शहर व ग्रामीण भागातील रहिवासी परिसरात विद्युत सुरक्षा विषयी जनजागृती करण्यात येईल. ग्राहकांना विद्युत सुरक्षा विषयी ई-मेल पाठविणे. बाजार व इतर सार्वजनिक ठिकाणी विद्युत सुरक्षा विषयी जनजागृती, मंगळवार  दि. ३ व ४ जून रोजी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी आणि कुटूंबियांसाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विद्युत सुरक्षा विषयी निबंध / चित्रकला स्पर्धा, महावितरण कर्मचारी / अधिकारी यांच्यासाठी विद्युत सुरक्षा विषयी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

दि.५ जून वसुंधरा दिनी १५० विभागीय स्तरावर विद्युत सुरक्षा व वीज बचत विषयी रॅली काढण्यात येणार आहे. दि.६ जून रोजी सकाळी १०:०० ते १०:१५ या वेळेत राज्यातील सर्व शाखा कार्यालयातील जनमित्र यांच्यासाठी विद्युत सुरक्षा प्रतिज्ञा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. 

सकल हिंदू सामुदायिक व्रतबंध सोहळ्यात ५८ बटूंची मुंज

स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मी सावरकर उपक्रम अंतर्गत विनामूल्य व्रतबंध सोहळा

पुणे : गणेश पूजन…पारंपरिक पद्धतीने केलेले चौलकर्म…मातृभोजन… व्रतबंधन असे शास्त्रोक्त पद्धतीने विधी करत समाजातील वेगवेगळ्या घटकातील आणि अनाथ – विशेष मुलांची मुंज विधिवत पार पडली. व्रतबंध या पवित्र संस्कारामुळे मूळ संस्कृतीशी मुलांची नाळ जोडत ५८ मुले आणि मुली यांचा एकत्रित व्रतबंध सोहळा पार पडला. सामाजिक एकतेचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार या माध्यमातून समाजापर्यंत पोचविण्यात आला.

स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मी सावरकर उपक्रम अंतर्गत हिंदूंच्या १८ विविध समाजातील ५८ मुलामुलींच्या सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन कर्वे रस्त्यावरील अश्वमेध मंगल कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर उपस्थित होते.

संस्काराचे समाजव्यापी महत्त्व ओळखून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत आपल्या कार्यकाळात सर्व हिंदू समाजासाठी सामुदायिक व्रतबंध सोहळ्याची संकल्पना मांडली होती. सावरकरांनी मालवणला तथाकथित १५० अस्पृश्यांच्या मुंजी लावल्या होत्या आणि त्यांना स्वतः जानवं घातली होती. त्यांच्या या विचारातून प्रेरणा घेऊन स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट मागील चार वर्षे हा उपक्रम सातत्याने राबवत आहे.

बदलत्या काळात शिक्षण आणि जीवनशैलीत अनेक बदल झाले असले, तरी भारतीय हिंदू संस्कृतीतील मूलभूत संस्कारांची गरज अजूनही तितकीच महत्त्वाची आहे. त्यापैकीच एक म्हणजे व्रतबंध संस्कार, ज्ञानार्जनाच्या प्रवासाची सुरुवात करणारा एक पवित्र टप्पा आहे.

धायरीतील रस्ते होताहेत गायब, सरकारी पांदण,शिव रस्ते खुले करण्याची मागणी

पुणे:शहरातील सर्वात अधिक दाट लोकवस्तीच्या धायरी परिसरातील शिवकालीन वहिवाटीचे व सरकारी नकाशातील गाव पांदण,शिव रस्ते खुले करण्यात याव्यात अशी मागणी धायरी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व हवेली तालुका तहसीलदारांकडे केली आहे.
धायरी येथील बहुतांश सरकारी नकाशातील शिवकालीन वहिवाटीच्या पांदण,शिव रस्त्यांवर बेकायदा अतिक्रमणे झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसह रहिवाशांना ये जा करणे गैरसोयींचे झाले आहे.याकडे पुणे शहर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
या बाबत आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर, समस्त धायरी ग्रामस्थ समितीचे निलेश दमिष्टे, सनी रायकर अनिल रायकर संदीप विठ्ठल पोकळे संतोष चौधरी अमर खेडेकर चिंतामणी पोकळे आदींनी निवेदन दिले आहे.
आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,शासनाने शंभर दिवसांची मोहीम राबवुनही
धायरी गावातील अनेक पाणंद व शिव रस्ते अजुनही खुले झालेले नाहीत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू आहेत त्यामुळे आगामी काळात हे रस्ते खुले करण्यात अडचणी निर्माण होणार आहेत..उपमुख्यमंत्री व जिल्हाचे पालकमंत्री अजित पवार यांनी शिव व पाणंद रस्ते तातडीने खुले करण्याचे आदेश दिलेले आहेत. धायरी गाव हे शहरातील गाव असुन सदर गावात नागरीकरण हे प्रचंड वाढले असुन गावची लोकसंख्या दिड ते दोन लाखाच्या आसपास गेलेली आहे. रस्ते मात्र पुर्वीचेच असुन त्यामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही. त्यामुळे धायरी गावातील सर्व पाणंद व शिवरस्ते नागरीकांसाठी खुले करणे गरजेचे आहे. तरी ग्रामस्थांच्या मागणीनुसार धायरी गावातील सर्वच पाणंद व शिव रस्ते आपण तातडीने सरकारी मोजणी करूनबेकायदा अतिक्रमणे काढून सर्व पांदण शिव रस्ते खुले करण्याचे साकडे धायरी ग्रामस्थांनी शासनाला घातले आहे.

गोदरेजने पुण्यात स्मार्ट सुरक्षेची नवीन श्रेणी अनलॉक केली

आधुनिक ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्मार्ट नवकल्पनांसह बाजारपेठेतील 80% हिस्सा काबीज करण्याचा उद्देश

पुणे, 29 मे 2025 – महाराष्ट्राच्या वेगाने वाढत असलेल्या सुरक्षा उपायांच्या मार्केटमध्ये आपली नेतृत्व क्षमता सिद्ध करत
गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या सुरक्षात्मक उपायांच्या व्यवसायाने अत्याधुनिक, तंत्रज्ञान-उपयुक्त गृह लॉकर्सची नवीनतम
श्रेणी लॉन्च केली आहे. ग्राहक तसेच विविध संस्थांमध्ये मजबूत स्थान असल्याने कंपनी आता परिसरातील अत्यंत
गतिमान आणि शहरीकरणाचा उत्तम वेग असलेल्या शहरांपैकी पुण्यावर अधिक लक्ष केंद्रित करते आहे.
लक्झरी होम्स, एकात्मिक टाउनशिप आणि नागरी विकासासह पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल होत
आहेत. जगण्यासाठी उत्तम सोयी-सुविधा, सुरक्षा तसेच सौंदर्यात्मक नजरेला प्राधान्य देत असलेल्या रहिवाशांमध्ये
अत्याधुनिक गृह सुरक्षा उपायांची मागणी वाढती आहे. या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी गोदरेज
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक डिझाइनचा समावेश करत लॉकर्स तयार करणार आहे.
या उद्घाटनावर भाष्य करताना, गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुपच्या सुरक्षा समाधान व्यवसायाचे प्रमुख पुष्कर गोखले
म्हणाले, “पुण्यासारखी शहरे स्मार्ट शहरी केंद्रांमध्ये विकसित होत असताना, मूलभूत संरक्षणापासून आधुनिक जीवनाचा
अविभाज्य घटक म्हणून सुरक्षेची व्याख्या पुन्हा केली जात आहे. गोदरेजमध्ये आम्ही अंतर्दृष्टीपूर्ण तंत्रज्ञानासह आकर्षक
डिझाइनच्या साहाय्याने या स्थलांतराचे नेतृत्व करत आहोत. आमची नवीन श्रेणी फक्त संरक्षण करत नाही तर आजच्या
ग्राहकांना जगण्याचे, काम करण्याचे आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची दिशा दाखवते. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर
सुरक्षेच्या भविष्यात आकार देण्यासाठी आम्ही सज्ज आणि सक्षम आहोत. पुणे आमच्यासाठी उच्च प्राधान्य असलेले शहर
आहे आणि तिथे आम्ही नवकल्पना, भागीदारी तसेच प्रवेशयोग्यता याला प्राधान्य देत आहोत, जेणेकरून घरांच्या आणि
व्यवसायांचे जागतिक दर्जाच्या सुरक्षा साधनांनी संरक्षण होईल. पुढील तीन वर्षांत आम्ही 18% वार्षिक वाढ
साधण्याच्या उद्देशावर आहोत आणि घराच्या लॉकर विभागात सध्याच्या 75% वरून 80% बाजार हिस्सा घेण्याची
आमची योजना आहे. तर दागिन्यांच्या विभागात आम्हाला 70% हिस्सा मिळवायचा आहे.
ग्राहकांच्या आवडीनिवडी तसेच पुण्यातील दागिन्यांचे क्षेत्र विस्तारात असतानाच कंपनीचा महाराष्ट्रातील विस्तार होतो
आहे, हे अत्यंत योग्य आहे. सोन्याच्या किंमती जवळपास ₹1 लाख प्रति 10 ग्रॅम आहेत, आणि ग्राहक नवीन
दागिन्यांसाठी जुन्या दागिन्यांची अदला-बदली मोठ्या प्रमाणावर करत आहेत, ज्यामुळे पुनर्नूतनीकरण केलेल्या
सोन्याच्या व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. संपत्तीच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे वैयक्तिक घरांसाठी सुरक्षित,
विश्वसनीय घरगुती लॉकर आणि ज्वेलर्ससाठीही मजबूत सुरक्षितता प्रणालीची आवश्यकता.
ग्राहकांच्या या गरजेला प्रतिसाद म्हणून, गोदरेजने डिफेंडर ऑरम प्रो रॉयल क्लास E सुरक्षित उपकरण लाँच केले आहे,
जे एक BIS प्रमाणित उच्च-सुरक्षा देते आणि ज्वेलर्ससाठी योग्य आहे. मौल्यवान गोष्टींच्या संचयनासाठी उच्च क्षमतेची
सुरक्षा तसेच सर्वोत्तम संरक्षण प्रदान करते. सरकारने जारी केलेल्या अलीकडील गुणवत्ता नियंत्रण आदेशानुसार हा बदल
करण्यात आला आहे. ज्यात सर्व उत्पादकांना BIS मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची आणि ISI लेबल केलेल्या सुरक्षित
उपकरणांचाच पुरवठा करण्याचा आदेश आहे. याव्यतिरिक्त, AccuGold iEDX मालिका ज्वेलरी रिटेल, हॉलमार्किंग केंद्रे
आणि सोने कर्ज सेवेमध्ये संलग्न बँका यांच्यासाठी आदर्श असलेल्या शुद्धता चाचणी उपायांसह सोने इकोसिस्टमला समर्थन

देते. जिथे पारंपरिक RCC मजबूत खोली व्यवहार्य नाहीत, तिथे गोदरेज MX पोर्टेबल खोलीचे मजबूत पॅनेल अधिकतम
सुरक्षेसह लवचिक, मॉड्युलर पर्याय प्रदान करतात.
घरमालकांसाठी, नव्याने लॉन्च केलेले NX Pro Slide, NX Pro Luxe, Rhino Regal आणि NX Seal मॉडेल्समध्ये
ड्युअल-मोड प्रवेश (डिजिटल आणि बायोमेट्रिक), iBuzz अलार्म सिस्टम, छुपे कप्पे आणि आधुनिक सजावटीला पूरक
अशी अंतर्गत सजावट यासारख्या नवकल्पनांचा समावेश आहे—रोजच्या जीवनात सुरक्षा कशी समाकलित होते हे यातून
दिसते.
भविष्याचा विचार करताना, पुण्यापलीकडे गोदरेज महाराष्ट्रातील उच्च क्षमता असलेल्या Tier 2 आणि Tier 3
शहरांमध्ये जलद विस्तार करण्यास सक्रिय आहे. यातील अनेक शहरे दागिन्यांच्या कारागिरी तसेच वाढत्या समृद्धीसाठी
प्रसिद्ध आहेत. त्यांचे किरकोळ नेटवर्क तसेच डिजिटल संपर्क बळकट करून, राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रवेशयोग्य आणि
भविष्याच्या दृष्टीने योग्य सुरक्षा उपाय देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

उत्पादने पोर्टफोलिओ:
NX सील फ्लोर लॉकर:
NX सील फ्लोर लॉकर आपल्या मौल्यवान वस्तू गुप्त तसेच सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य पर्याय आहे. या
पायावर स्थापित डिझाइनसह, या नवोन्मेषी सुरक्षिततेस तुमच्या फ्लोअरिंगमध्ये सहज समाविष्ट केले जाते, त्यामुळे ते उघड्या
डोळ्यांना दिसणे अशक्य असते. लाकडाच्या पारंपरिक कपाटांपेक्षा 10 पट अधिक मजबूत साहित्याने तयार केलेला, NX सील फ्लोर
लॉकर चोरल्यास नुकसानापासून उत्कृष्ट संरक्षण प्रदान करतो.
राइनो रिगल लॉकर: ही एक उच्च-सुरक्षा तिजोरी आहे, जी मौल्यवान वस्तूंना संरक्षण देण्यासाठी डिझाइन केली आहे, अत्याधुनिक
तंत्रज्ञानासह robust रचनेसह हे एकत्र करतो. मानक सुरक्षिततेंपेक्षा १०० पट मजबूत सामग्रीसह तयार केलेला, तो सुरक्षा
तोडण्याच्या सर्वात शक्तिशाली प्रयत्नांना देखील सहन करतो. अत्याधुनिक अचूक की लॉक, लॉक करण्यायोग्य टॉप खण, आणि २-
मार्गाने बोल्ट सिस्टीमची वैशिष्ट्ये त्याला उच्चतम सुरक्षा देतात. हे सर्वाधिक सुरक्षा देते. हेव्ही ड्युटी आणि सौंदर्यात्मक आकर्षण
मिळते, तसेच खालच्या बाजूला असलेले गुप्त कप्पे आणि ऍडजस्टेबल शेल्व्ह कार्यक्षमता वाढवतात. घरमालक, व्यावसायिक आणि
संग्रहकांसाठी आदर्श, राइनो रिगल लॉकर अनमॅच्ड सुरक्षा, टिकाऊपणा आणि कस्टमायझेबल स्टोअरेज प्रदान करते, ज्यामुळे
मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी हे अंतिम पर्याय ठरते.
NX Pro Luxe: NX Pro Luxe होम लॉकर्स आधुनिक सोयीसह प्रगत सुरक्षा प्रदान करतात, ज्यामध्ये डुअल लॉकिंग सिस्टम,
मोटराइज्ड लॉकिंग आणि व्हॉइस-गाइडेड ऍक्सेस समाविष्ट आहे. interiors मध्ये सहजपणे समाविष्ट होण्यासाठी डिझाइन केलेले,
यात ड्युअल पासवर्ड ऍक्सेस, ऑटो-फ्रीज फंक्शन, USB आपातकालीन चार्जिंग, आणि सौम्य LED प्रकाश समाविष्ट आहे. 30L आणि
48L आवृत्त्यांमध्ये उपलब्ध, हे टिकाऊपणा आणि वापरण्यास सुलभतेची हमी देते, सुरक्षित आणि स्टायलिश संग्रहणासाठी आदर्श
निवड ठरते.
NX प्रो स्लाइड: NX प्रो स्लाइड होम लॉकने तिच्या नाविन्यपूर्ण स्लाइड-आउट डिझाइनसह सुरक्षा पुन्हा परिभाषित केली आहे.
आधुनिक फर्निचरमध्ये सहजपणे समाकलित होते जे गुप्त पण मजबूत संरक्षण देते. हे लाकडाच्या कपाटाच्या तुलनेत 10X गुण जास्त
मजबूत आहे. यामध्ये एक अचूक की लॉक, कुलूप उघडण्यासाठी चुकीचे प्रयत्न केल्यास स्वयंचलित-फ्रीझ कार्य आणि वाढीव
दृश्यतेसाठी एक LED-प्रकाशित आहे. मोटरायझ्ड लॉकिंग प्रणाली सुलभ आणि सुरक्षित प्रवेश सुनिश्चित करते, तर USB इमरजेंसी
चार्जिंग आवश्यकतेवेळी बॅकअप पॉवर देते. तिच्या आकर्षक, जागा-कार्यक्षम डिझाइन आणि प्रगत सुरक्षात्मक सुविधांसह, NX प्रो
स्लाइड मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाय आहे. ज्यामुळे गोंधळमुक्त, आकर्षक घराचे सौंदर्यशास्त्र राखले जाते.
ऑरम प्रो रॉयल : ऑरम प्रो रॉयल हा भारताचा पहिला BIS प्रमाणित वर्ग E सुरक्षितता आहे जो वैयक्तिकृत केलेले संग्रहण उपाय
प्रदान करण्यासाठी आणि अधिक लवचिक अंतर्गत सजावट करण्यासाठी डिझाइन केले आहे. हे नवीनतम नियामक मानकांची पूर्तता
करण्यात सक्षम आहे, तसेच ज्वेलर्सच्या गरजा लक्षात घेतात, त्यांच्या मौल्यवान इन्व्हेंटरीसाठी उत्तम संरक्षण प्रदान करतात.
ऍक्यूगोल्ड iEDX श्रृंखला: सोन्याचे चाचणी यंत्र – अचूक, अविनाशी सोन्याच्या चाचणीसाठी डिझाइन केलेले. हे ज्वेलर्स, बँका आणि
हॉलमार्किंग केंद्रे यांच्यासाठी योग्य आहे.
Mx पोर्टेबल स्ट्रॉन्ग रूम मॉड्युलर पॅनेल : स्ट्रॉन्ग रूम मॉड्युलर पॅनेल जे सहज सेटअप, ट्रान्सपोर्ट आणि कमाल सुरक्षा यासाठी
डिझाइन केलेले आहे, उच्च-गुणवत्ता असलेली स्टीलची रचना आणि मॉड्युलर ऍडप्टबिलिटीसह व्यवसायाच्या संरक्षणाची पुनार्व्याख्या
करते.