पुणे-हिराबाई भिकाजी माने (वय 78) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यामागे चार मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. हिराबाई यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. कॅटॅलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने हे त्यांचे पुत्र होत.
अंत्ययात्रा सायंकाळी 6 वाजता राहत्या घरापासून (आंबेडकर चौक, पाटील कॉम्प्लेक्स, औंध रोड) निघेल. हिराबाई यांच्या पार्थिवावर औंध गावातील स्मशानभूमीत सायंकाळी 7 वाजता अंत्यसंस्कार होतील.
हिराबाई माने यांचे निधन ..
हा गायक पूरग्रस्त भागात बांधून देणार ५० घरे …
मुंबई – गायक मिका सिंगने सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना 50 घरे बांधून देणार असल्याची घोषणा केली आहे. मिकाने पाकिस्तानमध्ये परवेज मुशर्रफच्या नातेवाईकांच्या कार्यक्रमात परफॉर्म केल्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. यामुळे सोशल मीडिया युझर्सनी त्याला धारेवर धरेल होते. इतकेच नव्हे तर सिनेवकर्स इंडियन असोसिएशनने देखील मिकावर बंदी घातली आहे. या प्रकरणामुळे वादात असलेल्या मिका सिंगने आता जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात सरसावला आहे.
मिका सिंगने पूरग्रस्तांच्या मदतीला पुढे येण्यासाठी देशातील जनतेला केले आवाहन
मिका म्हणाला, “मराठी चित्रपटसृष्टी संबंधित एनजीओ चांगले काम करत आहे. माझ्यातर्फे पूरग्रस्त भागात 50 घरे बांधून देण्याचे मराठी बांधवांना आश्वासन देतो. संपूर्ण देशाने या मदतीसाठी एकत्र यावे. विशेषतः माझ्या बॉलिवूडमधील मित्रांनी हात दिला बरीच मदत होईल. मी 50 घरे बांधणार आहे. तुम्ही जर मदत केली तर ही संख्या हजारांवर पोहचू शकते. संपूर्ण देशाने मदत केली तर पूरग्रस्त भागात हजारो घरे बांधून होतील.
पाकिस्तानातील परफॉर्ममुळे वाद
मिकाने पाकिस्तानात कार्यक्रम सादर केल्यामुळे सोशल मीडियावर लोकांनी त्याच्यावर टीका केली होती. मिकाने गेल्या 8 ऑगस्ट 2019 रोजी कराची येथे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफच्या जवळील नातेवाईकाच्या लग्नात परफॉर्म केला होता. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकने भारतासोबतचे सर्व संबंध तोडले आहे. असे असूनही मिका सिंहने देशाच्या सन्मानापेक्षा पैशाला जास्त महत्व दिले. यामुळे ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA)ने बंदी घातली आहे.
पुण्यातल्या पत्रकाराला मिळणार भाजपकडून विधानसभेची उमेदवारी….?
या 19 खेळाडूंची झाली अर्जुन पुरस्कारासाठी निवड
नवी दिल्ली – पॅरालंपिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी दीपा मलिक आणि कुस्तीपटू बजरंग पूनियाची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पूनियाने आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले होते. याशिवाय क्रिकेटपटू रविंद्र जडेजासह 19 खेळाडूंना यावर्षीचा अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे.
बॉक्सर मेरी कोमने स्वतःला सभेपासून केले दूर
48 वर्षीय दीपाने 2016 साली रिओ पॅरालंपिकमध्ये शॉट पुटच्या एफ-53 वर्गात रौप्य पदक पटकावले होते. निवृत्त न्यायमूर्ती एम. शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील 12 सदस्यांच्या समितीने विजेत्यांची नावे जाहीर केली. दरम्यान, सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर मेरी कॉमने वाद टाळण्यासाठी स्वत:ला सभेपासून दूर केले. तिचे प्रशिक्षक छोटेलाल यादव यांना द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते.
या 19 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार
निवड समितीने अर्जुन पुरस्कारासाठी 19 खेळाडूंची निवड केली आहे. यांमध्ये क्रिकेटपटू रविंद्र जडेजा आणि पूनम यादव, ट्रॅक मैदानातील तेजिंदर पाल सिंह तूर, मोहम्मद अनस, स्वपना बर्मन, फुटबॉलपटू गुरप्रीत सिंह संधू, हॉकीपटू सी.सिंह कंगुजम आणि नेमबाज अंजुम मुदगिल यांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी खेळ, नेतृत्व क्षमता, शिस्त व खेळाविषयीची भावना यांच्याही चाचपणी केली जाते.
द्रोणाचार्य पुरस्कारसाठी तीन नामांकन
द्रोणाचार्य पुरस्कारासाठी बॅडमिंटन प्रशिक्षक विमल कुमार, टेबल टेनिस प्रशिक्षक संदीप गुप्ता आणि अॅथलेटिक्स प्रशिक्षक मोहिंदर सिंह ढिल्लो यांच्या नावांची निवड करण्यात आली आहे. तर हॉकीचे यजमान पटेल, रामबीरसिंग खोखर (कबड्डी) आणि संजय भारद्वाज (क्रिकेट) यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
प्रदेश कॉंग्रेसने केली 288 मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या नावांची केंद्रीय मंडळाकडे शिफारस
मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच्या सर्व २८८ मतदारसंघांतील उमेदवार निश्चित केले आहेत. प्रत्येक मतदारसंघातून दोन ते तीन संभाव्य उमेदवारांच्या नावांची शिफारस लवकरच काँग्रेसच्या केंद्रीय निवड मंडळाला करण्यात येणार आहे.
प्रदेश काँग्रेसच्या राज्य निवड मंडळात ५४ सदस्य आहेत. मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवस टिळक भवनात बैठका झाल्या. त्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई-कोकण अशा विभागवार मतदारसंघातील स्थितीचा आढावा घेण्यात आला. २९ ते ३१ जुलैदरम्यान विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती यापूर्वीच जिल्हावार पार पडल्या होत्या. त्यासाठी राज्यभरातून सुमारे ११०० अर्ज प्राप्त झाले होते. जिल्हा समित्यांनी मुलाखतींचे अहवाल प्रदेश काँग्रेसला पाठवले होते. त्यावर दोन दिवस चर्चा झाली. प्रत्येक मतदारसंघातून दोन ते चार नावे निश्चित करण्यात आली आहेत.
‘आम्ही सध्या तरी राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील संभाव्य उमेदवार निवडले आहेत. मात्र मित्रपक्षांशी आघाडी झाल्यानंतर त्यातील काही मतदारसंघ सोडण्यात येतील,’ असे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
२००९, २०१४ मध्ये असे होते चित्र : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १७४ जागा लढवल्या होत्या. ८२ जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादीने ११४ जागा लढवून ६२ जागा मिळवल्या होत्या.
अनेक ठिकाणी पिता-पुत्र उमेदवार इच्छुक
‘प्रत्येक मतदारसंघात ५ ते २० पर्यंत इच्छुकांचे अर्ज आले होते. काँग्रेसला उमेदवारांची चणचण नाही. अनेक ठिकाणी पिता-पुत्र इच्छुकांच्या रांगेत आहेत. यावर केंद्रीय निवड मंडळ अंतिम निर्णय घेईल,’ अशी माहिती विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. उमेदवारांच्या निवडीचा घोळ घालण्याबाबत काँग्रेस बदनाम आहे. मात्र या वेळी पहिल्यांदाच काँग्रेसने उमेदवार निवड प्रक्रियेत तरी बाजी मारली असल्याचे चित्र आहे.
अभिनेत्री दिपाली सय्यद करणार 5 कोटींची मदत आणि घेणार 1 हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी
सांगली –अभिनेत्री दिपाली सय्यदने शनिवारी सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. सांगलीकरांना अनेकांनी मदत केली आहे पण सांगलीपर्यंत ती पोहोचली नाही. तसेच पुराचे राजकारण करू नये असे त्या यावेळी म्हणाल्या. सांगलीतील 1 हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेणार असून सय्यद फाऊंडेशनच्या माध्यमातून सांगली पूरग्रस्तांना 5 कोटींची मदत करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकणात यावेळेस भीषण पूरस्थिती निर्माण झाली. यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशात येथील लोकांसमोर संसार उभा करण्यासोबतच मुलींच्या विवाहाची आणि शिक्षणाची मोठी समस्या उभी राहिली आहे. अशा पूरग्रस्त भागातील 1 हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेणार असल्याची घोषणा दिपाली सय्यद यांनी केली आहे.
कृष्णा सुतार ची अमेरिकेतील स्पर्धेसाठी निवड
पूरग्रस्तांना मदतीबाबत स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींसोबत सोमवारी बैठक
पुणे : पुणे विभागातील प्रामुख्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीच्या अनुषंगाने सोमवार दि. 19 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11 वाजता कौन्सिल हॉल, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे.
पूरग्रस्तांना वेगवेगळ्या स्वरुपात मदत करण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच संस्था व व्यक्ती स्वयंस्फूर्तीने यामध्ये सहभागी होत असून आणखीही मदत करण्यास उत्सुक आहेत. या सर्वांचे योग्य नियोजन व अमलंबजावणी करणे आवश्यक आहे.
यासाठी होणाऱ्या या बैठकीला दानशूर व्यक्ति, संस्था, स्वयंसेवी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने कळविले आहे.
“रघु-नंदन” भरतनाट्यम नृत्याविष्कार…
पुणे: ज्यांचे सौंदर्य अगणिक कामदेवतेपेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यांचे शरीर निलमेघाप्रमाणे आहे, पितांबर नेसलेले त्यांचे रुप लखलखत्या विजेप्रमाणे दिसत आहे, अशा पावनरुपी श्रीरामाला वंदन करुन या रघुनंदन ह्या कार्यक्रमात रामावरच्या आणि कृष्णावरच्या अनेक रचनांनी रसिक प्रेक्षकांना अक्षरश: भूरळ घातली. नृत्यभक्ती फाउंडेशन तर्फे रघु-नंदन भरतनाट्यम नृत्याविष्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रामाचा आचार, कृष्णाचा विचार, हरिचा उच्चार या प्रवाहात तल्लीन होण्यासाठी रघुनंदन ही कथा आयोजिली होती. मुकुंदनगर येथील सकल ललित कलाघर येथे या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेशवंदना केली गेली, ठुमक चलत रामचंद्र, राम जन्मला गं सखी राम जन्मला.., श्रीरामचंद्र कृपालू भज हर अशा वेगवेगळ्या रामावरच्या रचना सादर केल्या. कृष्णाबरोबर होळी खेळणा-या गोपिका, राधे बरोबर झालेलं कृष्णाच भांडण आणि विरह, कृष्ण आणि कालियाचं द्वंद्व असे अनेक प्रसंग विविध रचनांद्वारे सादर करण्यात आले. तर कार्यक्रमाची सांगता दशावताराने झाली. यामध्ये कृष्ण आणि रामावरचं सुंदर भजन आणि दोघांचे दहा अवताराचे सुंदर चलचित्र सादर करण्यात आले. कृष्णाच्या नामगजरात कार्यक्रमाची सांगता झाली.
कुहू, ऐश्वर्या, सायली, नेहा, अंकिता,तेजोमयि, हर्षिता, ईश्वरी, जान्हवी, मेघा, सिमरन, तन्वी, देवयानी या कलाकारांनी भरतनाट्यम नृत्याविष्कार सादरीकरण केले.
नृत्य कार्यक्रमाद्वारे रामाच्या आणि कृष्णाच्या आचार विचारांची देवाण घेवाण करत नामस्मरणामधून परमेश्वर रुपी शक्ती सदैव आपल्याला साथ देईल आणि आपला मार्ग आनंददायी करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे मत नृत्यभक्ती फाउंडेशनच्या सई परांजपे यांनी व्यक्त केले.
पूरग्रस्त भागातील ‘ चुली ‘ पुन्हा पेटणार!-महसूलमंत्री यांना विश्वास
तरुणांनी सैन्याकडून देशसेवेचा आदर्श घ्यावा – छिब्बर
पिंपरी येथील गोयल गंगा इंटरनैशनल स्कूल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
पुणे :- पिंपरी येथील गोयल गंगा इंटरनैशनल स्कूल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लेफ्टनंट कर्नल गौरव छिब्बर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.नाटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी’चाणाक्य’ यांची अखंड भारत ही संकल्पना सर्वांसमोर मांडली. याचसोबत सातवी मध्ये शिकणाऱ्या मुलांनी देशभक्तीपर गाण्यांवर सुंदर नृत्याविष्कार सादर केले.
यावेळी प्रमुख पाहुणे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरींग येथे इन्स्ट्रक्टर म्हणून काम पाहणारे लेफ्टनंट कर्नल गौरव छिब्बर, मुख्याध्यापिका भारती भागवाणी,इतर शिक्षकही उपस्थित होते.
यावेळी छिब्बर म्हणाले कि, शत्रूचे आक्रमण असो व देशावर आलेली नैसर्गिक संपत्ती कोणत्याही आपत्तीशी लढण्यासाठी देशाची सेना कायमच तत्पर असते.तरुणांनी देखील हा आदर्श घेऊन देशसेवेसाठी तत्पर असले पाहिजे. वर्णभेद,जातिभेद, स्त्री- पुरुष असमानता असे प्रश्न जेव्हा खऱ्या अर्थाने समाजातून नष्ट होतील त्यानंतरच देश खऱ्या अर्थाने प्रगती करू शकेल.
भारती भागवाणी म्हणाल्या कि,भारताला जगातील सर्वात यशस्वी देश बनविण्यासाठी देशाच्या नेतृत्वासोबत देशाच्या युवा पिढीने एकत्र येवून देशाची सर्वसमावेशक प्रगती साधण्यात सक्रियतेने प्रयत्न केले पाहिजेत.
येणाऱ्या पिढ्यांच्या स्वातंत्र्यासाठी आधीच्या पिढ्यांनी नेमकी काय किंमत मोजली याची माहितीही या निमित्ताने त्यांनी सांगितली. याशिवाय दिवसरात्र आपले संरक्षण करणारे आपले जवान आणि अनेक कष्ट सोसून आपल्यासाठी पीक काढणारे शेतकरी यांच्या कष्टाची जाणीव होणे किती आवश्यक आहे. याची माहिती देखील त्यांनी सांगितली.
सुर्यदत्ता राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार गुरुदेव राकेशभाई यांना प्रदान
‘एक सूर एक ताल’ सांगीतिक कार्यक्रम ‘युवक बिरादरी’तर्फे १९ ते २१ ऑगस्टला
केजे ट्रिनिटी शिक्षण संस्थेतर्फे पूरग्रस्तांना मदत
पुणे : कोल्हापूर, सांगलीतील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी येवलेवाडी येथील केजेज ट्रिनिटी शिक्षण संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तू, कपडे, शालेय साहित्य आदी मदत पाठविण्यात आली. संस्थेच्या सर्वच महाविद्यालयातील आणि शाळेतील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापनाकडून ही मदत गोळा करण्यात आली होती. कायम सामाजिक बांधिलकीची भावना जपणाऱ्या केजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी, प्राचार्य, विभागप्रमुख, विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मदत साहित्य गोळा करण्यात पुढाकार घेतला.

