Home Blog Page 2865

पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत विपार स्पिडिंग चिताज संघाला विजेतेपद

0

पुणे: पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित
पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात आश्विन गिरमे
संघ मालक असलेल्या विपार स्पिडिंग चिताज संघाने विक्रम देशमुख संघ मालक असलेल्या कोद्रे फार्म्स
रोअरिंग लायन्स संघाचा 40-39 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद संपादन केले.
डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या
लढतीत गतविजेत्या विपार स्पिडिंग चिताज संघाने कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाचा 40-39 असा
केवळ एका गुणाच्या फरकाने पराभव करत विजेतेपद पटकावले. सामन्यात 8वर्षाखालील मिश्र गटात
चिताजच्या नमिश हुड याने रोअरिंग लायन्सच्या श्रावी देवरेचा 4-0 असा तर, 10वर्षाखालील मुलांच्या गटात
क्रिशांक जोशीने नील केळकरचा 4-2 असा पराभव करत संघाला विजयी सुरुवात करून दिली. 10
वर्षाखालील मुलींच्या गटात विपार स्पिडिंग चिताजच्या हृतिका कापले हिला रोअरिंग लायन्सच्या मृणाल
शेळकेने 1-4 असे पराभूत करून हि आघाडी कमी केली. 12 वर्षाखालील मुलांच्या गटात विपार स्पिडिंग
चिताजच्या अर्चित धुतने आरुष मिश्राचा 6-1 असा तर मुलींच्या गटात सलोनी परिदाने रोअरिंग
लायन्सच्या रितीका मोरेचा 6-1 असा पराभव करत संघाची आघाडी अधिक भक्कम केली. पण
14वर्षाखालील मुलांच्या गटात रोअरिंग लायन्सच्या अनमोल नागपुरेने चिताजच्या ईशान देगमवारचा 6-4
असा तर, मुलींच्या गटात रोअरिंग लायन्सच्या रूमा गाईकैवारी हिने चिताजच्या नाव्या भामिदिप्तीचा 6-0
असा सहज पराभव करून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. त्यानंतर मुलांच्या कुमार दुहेरी
गटात ऐतरेत्या राव व राज दर्डा यांनी प्रणव इंगोले व रियान मुजगुले यांचा 6-3 असा तर पराभव करत
चिताज संघाला आघाडी मिळवून दिली. 14वर्षाखालील मुलांच्या दुहेरीत रोअरिंग लायन्सच्या अर्जुन
अभ्यंकर व वेदांत सनस यांनी चिताजच्या अदनान लोखंडवाला व केयुर म्हेत्रे यांचा 6-3 असा तर, 10
वर्षाखालील मुलांच्या दुहेरीत समीहन देशमुख व आर्यन किर्तने या जोडीने चिताजच्या वेद मोघे व रियान
माळी यांचा 1-4 असा पराभव केला. मिश्र दुहेरीत निर्णायक लढतीत रोअरिंग लायन्सच्या डेलिशा रामघट्टा
व अथर्व जोशी यांनी विपार स्पिडिंग चिताजच्या विश्वजीत सनस व अलिना शेखच्या यांचा टायब्रेकमध्ये
5(1)-6 असा पराभव केला. पण सामन्यात सुरुवातीपासूनच आघाडीवर असणाऱ्या विपार स्पिडिंग चिताज
संघाने आपली आघाडी कायम राखत केवळ एका गुणाच्या फरकाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

स्पर्धेतील विजेत्या विपार स्पिडिंग चिताज संघाला करंडक व 40,000/-,रुपये, तर उपविजेत्या कोद्रे फार्म्स
रोअरिंग लायन्स संघाला करंडक व 25,000/- अशी पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
विपार स्पिडिंग चिताज वि.वि कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स 40-39(एकेरी: 8वर्षाखालील मिश्र गट: नमिश
हुड वि.वि श्रावी देवरे 4-0; 10वर्षाखालील मुले: क्रिशांक जोशी वि.वि निल केळकर 4-2 ; 10 वर्षाखालील
मुली: हृतिका कापले पराभूत वि मृणाल शेळके 1-4 ;12 वर्षाखालील मुले: अर्चित धुत वि.वि आरुष मिश्रा 6-
1; 12वर्षाखालील मुली: सलोनी परिदा वि.वि. रितीका मोरे 6-1 ; 14वर्षाखालील मुले: ईशान देगमवार पराभूत
वि अनमोल नागपुरे 4-6; 14वर्षाखालील मुली: नाव्या भामिडीपती पराभूत वि रूमा गाईकैवारी 0- 6 ; कुमार
दुहेरी मुले:ऐतरेत्या राव/ राज दर्डा वि.वि प्रणव इंगोले/रियान मुजगुले 6-3 ; 14वर्षाखालील मुले दुहेरी:
अदनान लोखंडवाला/केयुर म्हेत्रे पराभूत वि अर्जुन अभ्यंकर/वेदांत सनस 3-6;10 वर्षाखालील मुले दुहेरी: वेद
मोघे/रियान माळी पराभूत वि संमीहन देशमुख/आर्यन किर्तने 1-4; मिश्र दुहेरी: विश्वजीत सनस/अलिना शेख
पराभूत वि डेलिशा रामघट्टा/अथर्व जोशी 5(1)-6).

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे ‘इंडिकॉन’ एक दिवसीय परिषद

0

पुणे, दि.१९ ऑगस्ट: इंडस्ट्री अ‍ॅकॅडमीया सहयोग समिती व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे “इंडकॉन” या एक दिवसीय परिषदेचे आयोजन उद्योगनगरी व शिक्षणाचे माहेरघर असणार्‍या पुणे येथे करत आहे. परिषदेचे उद्घाटन शुक्रवार, दि.२३ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी १० वा. केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक मंत्री माननीय अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात येईल. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा.डॉ. एस.परशूरामन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
विमाननगर येथील हॉटेल हयात रिजन्सी येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय सुभाष देसाई, न्युट्रॉन इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स प्रा.लि.चे अध्यक्ष श्री.नानिक रूपानी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड आणि कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड हे उपस्थित राहतील.
उद्योग क्षेत्राला तसेच मानवी जीवनाला अंतर्बाह्य बदलून टाकणारी तंत्रज्ञाने आणि आविष्कारांनी आज काही आव्हाने आपल्यासमोर उभी केली आहेत. या आव्हानांना सामोरे जाताना उद्योग व शिक्षण क्षेत्राने पुढील दिशा कशी ठरवावी यावर चर्चा घडवून आणण्यासाठी ही परिषद एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या इंडस्ट्री अ‍ॅकॅडमीया सहयोग समितीने आयोजित केली आहे. अशी माहिती विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा.डॉ. आर.एम. चिटणीस यांनी दिली.
दिवसभर चालणार्‍या या परिषदेत जागतिक उद्योगसमूहांचे प्रमुख, संशोधक व शासकीय अधिकारी “इंडस्ट्री ४.०”, “आर्टीफिशीयल इंटालिजन्स” आणि “स्मार्ट सिटी मिशन” या ज्वलंत विषयावर आपले विचार मांडतील व मार्गदर्शन करतील.
या चर्चासत्रात “इंडस्ट्री ४.०” सेशनचे चेअर ब्लू स्टारचे अध्यक्ष शैलेश हरीभक्ती, “आर्टीफिशीयल इंटालिजन्स” सेशनचे चेअर थॉटस्पॉटचे उपाध्यक्ष सुनील महाले आणि “स्मार्ट सिटी मिशन” सेशनचे चेअर अलाईड डिजीटल समुहाचे चेअरमन नितीन शाह यांचा महत्वपूर्ण सहभाग असेल. तसेच, जागतिक दर्जाच्या कंपन्यांचे १०० पेक्षा अधिक प्रमुख, मुंबई येथील चीनचे वाणिज्य दूत तांग गुओकाई, जर्मनीचे संशोधक डॉ. कार्स्टन, थर्मेक्सचे ईपीसी प्रमुख कीर्तिराज झीलकर, वालचंद चे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जी.के. पिलै, टाटा टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष आनंद भाडे, टाटा प्रोजेक्टस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विनायक देशपांडे, महाराष्ट्रातील रिलायन्स जिओचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश दुर्वे, बिग डेटा डीडब्ल्यूचे संजय पटवर्धन, बार्कलेज टेक इंडियाचे क्यएचे प्रमुख आणि देवऑप्स चे संचालक रश्मी जहागीरदार, एस बँकेचे कृत्रिम बुध्दिमत्ताचे प्रमुख उत्पाल चक्रवर्ती, डॉ. कार्स्टेन वेंडलँड, कॉग्रिझींटचे वरिष्ठ संचालक कौस्तुभ लातूरकर, अलाईड डिजिटलचे सीएमडी नितीन शहा, इन्फोसिसचे एसव्हीपी मुंजय सिंह, आयबीएमच्या ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स बिझजेस युनिटचे मॅनेजिंग पार्टनर व व्हीपी संतोष कुलकर्णी व डिजिटल ट्रान्सफॉर्मोशन बिर्लासॉफ्टचे उपाध्यक्ष आणि ग्लोबल डिलिव्हरी हेड गणेशन करूप्पनाइकर व इतर मान्यवर उपस्थित राहतील. अशी माहिती परिषदेचे कार्यवाहक प्रा.डॉ. प्रसाद खांडेकर यांनी दिली.
परिषदे दरम्यान संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे विद्यार्थी आणि शिक्षकांचा सुध्दा सत्कार करण्यात येईल. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि नामवंत कंपन्या यांच्यात सामजस्य करार होतील, अशीही माहिती डॉ. खांडेकर यांनी दिली.
यावेळी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. श्रीहरी होनवाड, प्र कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू प्रा.डी.पी. आपटे, एमआयटीचे प्राचार्य डॉ.एल.के.क्षीरसागर, युनिव्हर्सल बिझनेस अ‍ॅण्ड कॉर्पोरेट सर्व्हीस सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ शहा आणि स्टारकिंग स्पोर्टस् प्रा.लि.चे एमडी आणि सीईओ प्रविण पाटील हे उपस्थित होते.

मराठी आरमाराची इंग्रजांवरील विजयाची गाथा रंगमंचावर !

0

पुणे :इंग्रजांना हवे असलेले  खांदेरी बेट श्रीशिवछत्रपतींच्या आरमाराने समुद्रातील ज्या  युध्दात ताब्यात ठेवले, त्या इ स १६८० मधील युद्धाचा ऐतिहासिक थरार  ‘दर्याभवानी ‘ या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर आला असून २४ गस्ट रोजी पुण्यात प्रयोग होणार आहे .
.मुंबई आणि अलिबागच्या मध्ये खांदेरी  बेट (जलदुर्ग) लागते.इ स १६८० मध्ये श्रीशिवछत्रपतींच्या मावळ्यांनी हे बेट इंग्रजांकडून सागरी युद्धात जिंकून घेतले.इंग्रज विरुद्ध मराठे या  सागरी युद्धाचा थरार म्हणजे दर्याभवानी हे नाटक आहे .यात चाळीस कलाकारांच्या संचात नृत्य.,नाट्य आणि मराठी रंगभूमीच्या इतिहासात पहील्यादाच  प्रत्यक्ष दोन जहाजांमधील  इंग्रज आणि मराठे यांचे युद्ध रंगमंचावर येत आहे  उर्वीजा थिएटर (मुंबई) निर्मित ‘ दर्याभवानी ‘ हे ऐतिहासिक नाटक  रसिकांना पुण्यात प्रथमच पाहायला मिळणार आहे .४० जणांच्या संचातील भव्य नाट्य प्रयोग  २४ ऑगस्ट २०१९ शनिवार रात्रौ ९ वा बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे होणार आहे .निर्माते सौ कालिका विचारे,संदीप  विचारे यांनी  पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
या महानाटयाचे लेखन आणि गीत लेखन संदीप विचारे यांनी केले आहे. दिग्दर्शन डॉ. अनिल बांदिवडेकर, यांचे आहे. नेपथ्य प्रसाद वालावलकर , तर संगीत मनोहर गोलांबरे यांचे आहे. नृत्य रचना सचिन गजमल यांच्या आहेत.वेशभुषेची जबाबदारी मोहिनी टिल्लू, कलिका विचारे, गणेश मांडवे यांनी सांभाळली आहे  .यातील गाणी आदर्श शिंदे (गोंधळ) नंदेश उमप (पोवाडा) प्रा.गणेश चंदनशिवे (वासुदेव गीत) यांनी गायली आहेत. प्रकाश योजना शीतल तळपदे यांची आहे .                                         या नाट्याचे नायक मायनाक भंडारी हे दर्यासारंग यांच्या बरोबरीने स्वराज्य आरमाराचे सुभेदार होते. इ.स.१६८०  चे सुमारास महाराजांनी सागरी शत्रूंना थोपविण्यासाठी मुंबई बंदराच्या तोंडाशी असणाऱ्या खांदेरी-उंदेरी बंदरावर किल्ला बांधण्याचा ठरविला. त्यादृष्टीने राजाच्या वेगाने हालचालीही सुरु झाल्या .मुंबई बेटावर नजर ठेवून सागरी शत्रूंच्या हालचालींना प्रतिबंध करण्याची राजांची या मागची योजना होती. शिवाजी महाराजांच्या या हालचालीने इंग्रज प्रचंड धास्तावले आणि त्यांचा हा हेतू तडीस जाऊ नये म्हणून इंग्रजांनी खांदेरी-उन्देरीवर आपला हक्क दाखवीत महाराजांशी उघड उघड युद्ध पुकारले.कॅप्टन विलियम मिन्चीन, रिचर्ड केग्वीन, जॉन ब्रान्डबरी, फ्रान्सिस थोर्प असे नामांकित सागरी सेनानी खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले.रिव्हेंज आणि हंटर नावाच्या दोन फ्रींगेटी त्यांनी पाठवल्या होत्या.मायनाक भंडाऱ्यांनी अतिशय पराक्रमाने आणि चिवटपणाने प्रखर संघर्ष मांडीत इंग्रजांचा हा मनसुबा हाणून पाडला.

या युद्धात इंग्रजांना मदत करण्या करता जंजिऱ्याचा सिद्धी पण येतो या दोघांच्या म्हणजे सिद्दी आणि इंग्रज यांच्या आरमराला थळच्या समुद्रात मायनाक भंडारी आणि दौलतखांच्या नेतृत्वाखाली मराठे पाणी पाजतात आणि विजयश्री खेचून आणतात.. हा सर्व थरार ‘दर्या भवानी ‘ द्वारे रंगमंचावर पाहायला मिळणार आहे .
                     ‘ऐतिहासिक नाटक मोठ्या संचात रंगभूमीवर आणणे हे आव्हान असून आम्ही ते यशस्वीपणे पेलले आहे .स्वराज्याच्या इतिहासातील एक अद्भुत समरप्रसंग रसिकांना पाहायला मिळणार आहे ‘,असे संदीप विचारे यांनी सांगितले

शरद पवारांनी काँग्रेस सोडली तेव्हा ते कावळे होते का?

0

खासदार संजय काकडे यांचे पवारांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर

पुणे, दि. 19 ऑगस्ट :भारतीय जनता पक्षाकडे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस मधून येणाऱ्या नेत्यांचा ओघ काही केल्या थांबत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी विविध प्रकारे प्रयत्न करताना पक्ष सोडून गेलेल्यांना कावळ्याची उपमा दिली. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी अशाप्रकारे बोलण्यावर आक्षेप घेत भाजपचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी त्यांच्या वक्तव्याचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. स्वतः शरद पवार यांनी दोनवेळा काँग्रेस सोडली. मग आज राष्ट्रवादी काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांना शरद पवार जर कावळे म्हणत असतील तर, जेव्हा शरद पवार यांनी दोनदा काँग्रेस सोडली तेव्हा ते कावळे होते का? असा रोखठोक प्रश्न खासदार संजय काकडे यांनी उपस्थित केला आहे.

शरद पवार यांच्यासारखा जेष्ठ नेत्याने अशी वक्तव्ये करणे खरं तर अपेक्षित नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून असलेले विजयसिंह मोहिते पाटील, पिचड, गणेश नाईक यांच्यासह अनेक नेते राष्ट्रवादी ला रामराम करून भारतीय जनता पक्षात का आले याविषयी शरद पवार यांनी मनापासून एकदा तरी आत्मपरीक्षण करावे. वीस वीस वर्षे बरोबर राहिलेली माणसं आता दूर का जातायत हे त्यांनी तपासून पहावे. खरं तर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगले काम होत असल्यानेच ही सारे नेते भाजपात येत आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस मधील गटबाजीला ते आता कंटाळले असून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख व कणखर नेतृत्वाकडे ते आकर्षित झाले आहेत, असे खासदार संजय काकडे यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 35 वर्षांपासुन रखडलेले मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत आणून त्याची अंमलबजावणी सुरू केली. शरद पवार व काँग्रेस कोणत्याही मुख्यमंत्र्याला त्यांच्या सत्ताकाळात हे जमलं नाही ते फडणवीस यांनी करून दाखवले. फडणवीस सरकारने डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे थेट लाभार्थ्याच्या खात्यात पैसे पाठविले. त्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला. जलशिवार योजनेतून महाराष्ट्राचा दुष्काळ कायमचा हटविण्याच्या निर्धाराने काम सुरु आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सक्षम नेतृत्व देत असल्याने व विकासाची खात्री पटल्यानेच भाजपमध्ये इतर पक्षातील नेते येत आहेत व पुढेही अनेक नेते येण्याच्या मार्गावर आहेत, असे खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

याबरोबरच स्वातंत्र्यापासून कलम 370 रद्द होण्याची आपण वाट पाहत होतो. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने करून दाखवले. एक देश एक कर प्रणाली, रस्ते विकास, संशोधन, विज्ञान व तंत्रज्ञान, संरक्षण, परराष्ट्र धोरण इत्यादी अनेक आघाड्यांवर मोदी सरकार उत्तम कार्य करीत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र तर, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करतोय हा विश्वास आता सगळीकडे दिसतोय. म्हणूनच भाजपमध्ये येण्याचा कल वाढत आहे.

भाजपमध्ये अनेक नेत्यांचे ‘इनकमिंग’ सुरु असलेल्या तरी आम्ही अजित पवार व सुनील तटकरे यांच्यासारख्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना भाजपमध्ये घेतलेले नाही व भाजप अशांना घेणारही नाही. तसे पक्षाचे धोरण असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच जाहीर केल्याचेही खासदार संजय काकडे यावेळी म्हणाले.

अखेर राज ठाकरे यांना ईडी कडून नोटीस-कोहिनूर मिल प्रकरण

0
मुंबई: अखेर …. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली असून येत्या गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र राज्य सरकारने सूडाच्या भावनेतून राज यांच्यापाठी ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावला असून त्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा मनसेने दिला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही उद्या ईडीकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
असे सांगण्यात येते कि,सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) मुंबईच्या कोहिनूर सीटीएनएल कंपनीला ८६० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्यानंतर आयएलएफएसला मोठं नुकसान झालं होतं. त्या प्रकरणाचा ईडीने आता तपास सुरू केला असून याप्रकरणी राज यांना नोटीस बजावण्यात आली आहे. राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांनी कोहिनूरसाठी जागा खरेदी घेतली होती. त्यासाठी आयएलएफएसकडून कर्ज घेतलं होतं. मात्र त्यानंतर आयएलएफएसचं मोठं नुकसान झालं होतं. पुढे २००८मध्ये राज यांनी शेअर्स विकून या कंपनीतून अंग काढून घेतले होते. मात्र त्यानंतरही राज या कंपनीत सक्रिय राहिल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं.
ईव्हीएम विरोधातील आंदोलनामुळे कारवाई
दरम्यान, राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आल्याचं जराही आश्चर्य वाटत नाही. सरकार हे सूडाचं राजकारण करत असून हा दबाव तंत्राचा भाग आहे. आम्ही अशा दबावतंत्राला मुळीच भीक घालत नाही. राज यांच्यावर कारवाई झाल्यास आम्ही सरकारविरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना लोकसभा निवडणुकीत टार्गेट केल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू केल्यानेच त्यांच्याविरोधात कारवाई केली जात असल्याचा आरोप केला. सरकार सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला आहे.

भाजपच्या नव्या शहराध्यक्षाची आज घोषणा होण्याची शक्यता ?

0

पुणे- भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर आता, पुणे शहर भाजप च्या नव्या शहराध्यक्षांची घोषणा कदाचित आज होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. हेडमास्तर म्हणून कडक शिस्तीचे असा लौकिक मिळविल्यानंतर विद्यमान अध्यक्ष योगेश गोगावले यांची वर्णी विधानसभा उमेदवार म्हणून लावली जाण्याची शक्यता त्यामुळे अधिक दाट होत चालली आहे . पर्वती च्या आमदार माधुरी मिसाळ आणि कोथरूड चे भावी आमदार म्हणून ज्यांचा जयघोष सुरु आहे त्या स्थायी समिती च्या माजी अध्यक्ष असलेल्या मुरलीधर मोहोळ या दोघांपैकी एकाची भाजप पुणे शहर अध्यक्ष पदी वर्णी लागण्याची चिन्हे आहेत .तसे झाले तर त्यांची विधानसभेच्या रेस मधून माघार होईल असेही दिसते आहे .मिसाळ यांची वर्णी लागली तर पर्वती विधानसभा मतदार संघ महापालिकेत सभागृह नेते असलेले श्रीनाथ भिमाले यांच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. मात्र मोहोळ यांची वर्णी लागली तर आठ हि मतदार संघात विद्यामानांच्या इच्छुकतेला दाद देत नेत्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे . प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे नव्या शहराध्यक्षपदी कोणाची निवड करतील ? असा प्रश्न असला तरी ते सर्वस्वी स्थानिक खासदार गिरीश बापट यांच्या नजरेतूनच निवड करतील असे सांगितले जात आहे .

महापालिकेची पुढील अडीच वर्षे व्यवस्थितपणे पक्षाला सांभाळायची आहेत आणि कदाचित योगेश गोगावले यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी द्यायची आहे असे बोलले जाते आहे. हि त्यांच्या सारख्या जुन्या जाणत्या ज्येष्ठासाठी बढती ठरेल असे बोलले जात असले तरी गोगावले यांच्या पदरी नेमका कोणता मतदार संघ येवू शकेल हा हि प्रश्न उपस्थित होतो आहे .

नवीन मराठी शाळेत मंगळागौरीचे खेळ-रमणबागेत संस्कृत दिन साजरा

0

पुणे, ता. १७ ः डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत विनादप्तर उपक‘माअंतर्गत माता पालक संघाच्या वतीने ‘स्वामीनी ग‘ुप’च्या मंगळागौर खेळांचे आयोजन करण्यात आले होते. मंगळागौरीच्या खेळांतून होणारे व्यायाम, अभिव्यक्ती, सूसूत्रता, सण, व‘त या मागील वैज्ञानिक दृष्टिकोन, कला, मनोरंजन आदी माध्यमांतून प्रबोधन करण्यात आले. जर्मनी येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतीय संस्कृतीबद्दल प्रबंध सादर करणार्‍या डॉ. सविता केळकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे यांच्या मार्गदर्शनाखाली मु‘याध्यापिका कल्पना वाघ, वंदना कदम, अंजली रानडे यांनी संयोजन केले.

रमणबागेत संस्कृत दिन साजरा

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत संस्कृत दिनानिमित्त संस्कृत गीत गायन, स्तोत्रपठन, संस्कृत कथा आणि संस्कृत पोवाड्यांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतची गोडी लागावी यासाठी या उपक‘माचे आयोजन करण्यात आले होते. मु‘याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृत विभाग प्रमुख शारदा जोशी यांनी संयोजन केले. वर्षा गानू यांनी आभार मानले.

‘बॅलेट पेपर’साठी नागरिकांची स्वाक्षरी मोहीम

0
गोपाळ तिवारी मित्र परिवार, ऍड. रुपाली ठोंबरे, रवींद्र माळवदकर यांचा पुढाकार
 
पुणे : गेल्या काही निवडणुकात ईव्हीएम मशीनवरून सुरु असलेला गोंधळ आणि संशयाचे वातावरण लक्षात घेता यापुढे निवडणुका बॅलेट पेपरवर (मतपत्रिका) घेण्यात याव्यात, या मागणीसाठी रविवारी नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवली. हजारो नागरिकांनी या मोहिमेला प्रतिसाद देत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या मागणीसाठी स्वाक्षऱ्या केल्या. लोकमान्य टिळक चौकात (अलका टॉकीज) राजीव मिशन, राजीव गांधी स्मारक समिती, गोपाळ तिवारी मित्र परिवार, ऍड. रुपाली ठोंबरे, रवींद्र माळवदकर यांच्या पुढाकारातून ही मोहीम राबविण्यात आली.
टिळक चौकातील न. चि. केळकर व सेनापती बापट पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोहिमेला सुरवात झाली. काँग्रेसचे नेते आबा बागुल, सदानंद शेट्टी, सोनाली मारणे, राष्ट्रवादीचे रवींद्र अण्णा माळवदकर, प्रवीण करपे, गणेश नलावडे, सूर्यकांत मारणे, भाऊ शेडगे, गौरव बोराडे, संजय उकिरडे, विनायक चाचर, संदीप मोरे, सुरेश कांबळे, अनंता गांजवे, शारदा वीर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोपाळ तिवारी म्हणाले, “जगातील अनेक प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएमला फाटा देत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास प्राधान्य दिले आहे. भारतीय लोकशाही सर्वात मोठी असून, त्याचे पावित्र्य जपावे व मतदारांच्या मताचा आदर व्हावा, यासाठी साशंक ईव्हीएमचा वापर करू नये. भारतातही बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात. निवडणूक आयोगाच्या माजी आयुक्तांनीही ईव्हीएमला क्लिनचिट दिलेली नाही. त्यामुळे सार्वजनिक हिताचा विचार करणारे सरकार स्थापित होण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्याव्यात.”
रवींद्र माळवदकर म्हणाले, “राजकीय भूमिका बाजूला ठेवून लोकशाही अधिक मजबूत व्हावी, याकरिता ईव्हीएम हटाव मोहीम राबवत आहोत. निवडणूक निःशंकपणे पार पाडाव्यात, यासाठी नागरिकांचीही मागणी बॅलेट पेपरसाठी आहे. या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, हे स्वाक्षऱ्याचे अर्ज प्रशासनाकडे देण्यात येणार आहेत.”

पुण्यातील ‘हेल्प रायडर्स’ घेणार एक पूरग्रस्त गाव दत्तक

0
एक हजार  एकशे सत्तर पूरग्रस्तांवर  औषधोपचार : विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणार  
पुणे  –
रुग्णवाहिकांना मार्ग करू देताना अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी समाजमाध्यमावरून   एकत्र आलेल्या विविध क्षेत्रातील तरुणांच्या हेल्प रायडर्स या ग्रुपने सांगली जिल्हयात पूरग्रस्त  भिलवडी, पुणदी, अंकलकोप, आमनापूर  यासह सहा गावांमध्ये सुसज्ज रुग्णवाहिकेसह वैद्यकीय सेवा राबवून एक हजार  एकशे सत्तर पूरग्रस्तांना औषधोपचार केले, तसेच पुनर्वसन केंद्रात जीवनावश्यक वस्तूंची मदत करून दोन दिवस पूरग्रस्त भागात मदत कार्य केले. पुण्यासह औरंगाबादमधील सदस्यांनी पुरग्रत भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुणदी हे गाव दत्तक घेण्याचे ठरविले असून या गावातील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य  लवकरच पुरवले जाणार आहे.
सांगली जिल्ह्यात महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या भिलवडी, पुणदी, अंकलकोप, आमनापूर ,नागराळे या गावांमधील पुरग्रस्तांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यासाठी  हेल्प रायडर्सतर्फे डॉक्टरांचे पथक व रुग्णवाहिका या भागात पाठविण्यात आली. पाण्याचा वेढा असणाऱ्या ;पण घरातून बाहेर पडू न शकणाऱ्या पुरग्रस्तांपर्यंत  तांदूळ, डाळ, पिण्याचे पाणी , मेणबत्या , काडीपेटी, बिस्किटे, ब्लँकेट्स, गुडदाणी  आधी साहित्य स्थानिकांच्या मदतीने पोहचवले. तसेच ट्रॅक्टरद्वारे डॉक्टरांचे पथक पाठवून पुरग्रस्तांवर प्राथमिक उपचार करण्यात आले.  पलूसजवळील भिलवडीलगत असणाऱ्या खंडोबाचा माळ या पुनर्वसन केंद्रात तांदूळ, गहू आदी वस्तूंची मदत देण्यात आली.पूरग्रस्तांना मोठ्याप्रमाणावर येणाऱ्या मदतीमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीही  हेल्प रायडर्सच्या सदस्यांनी अनेक ठिकाणी कार्य केले.या  मदत कार्यात हेल्प रायडर्सचे मुख्य समन्वयक प्रशांत कनोजिया,अजित जाधव,  सचिन पवार , श्रीकांत कापसे, अनुपम शहा,प्रशांत महानवर ,बाळासाहेब  अहिवळे,  संतोष पोळ, बाळासाहेब ढमाले , सुदिन जायाप्पा, बाळा जगताप ,विशाल धुमाळ ,विनायक मुरुडकर, प्रसाद गोखले, महेश चिले,  प्रवीण पगारे ,संतोष वरे, संदीप करपे, महेंद्र जाधव  यांच्यासह औरंगाबादचे संदीप कुलकर्णी ,अक्षय बाहेती आणि सदस्यांनी सहभाग घेतला. डॉ. रोहित बोरकर,  डॉ. निखिल शेंडकर, डॉ. पूजा कणके व  पथकांनी पुरग्रस्तांवर प्राथमिक उपचार केले.  पलूस येथील प्रमोद देशमुख व डॉ देशमुख  यांचेही या उपक्रमाला सहकार्य लाभले.
मुख्यमंत्र्याना  आवाहन
पुरग्रत नागरिकांचे पुनर्वसन होईल ;पण पूरग्रस्तबाधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य पुराच्या पाण्यात भिजले आहे, वाहून गेले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पूरग्रस्त भागातील शाळांमधील  पटसंख्यानुसार विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आवाहन हेल्प रायडर्सचे मुख्य समन्वयक प्रशांत कनोजिया यांनी केले आहे.तसेच   विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी   पुणदी गाव  दत्तक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे . त्यासाठी  स्थानिक आमदार विश्वजित कदम यांच्याशीही  चर्चा  करण्यात आली आहे.

स्टेट बँक शाखा पातळीवर सेवा सुधारणेला देणार प्राधान्य-जी. रवींद्रनाथ

0

पुणे : “भारतातील अव्वल स्थानी आणि सगळ्यात मोठी असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ग्राहकाभिमुख सेवा देत आली आहे. यापुढे आपल्या सेवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी भारतीय स्टेट बँक शाखा पातळीवर जाऊन सेवा सुधारण्यास प्राधान्य देणार आहे. बँकिंगच्या मूलभूत सुविधा, कर्ज सहाय्यता, शेती, लघु व मध्यम उद्योगांसाठीच्या योजना आदी गोष्टींमध्ये सुलभता कशी आणता येईल, याबाबत दोन दिवस चर्चा झाली. या बैठकीतून आलेल्या सूचना व सुधारणांचा अहवाल बनवून राज्यस्तरीय बँकर्स समितीकडे पाठवला जाणार आहे,” अशी माहिती भारतीय स्टेट बँकेच्या महाराष्ट्र सर्कलचे मुख्य महाव्यवस्थापक जी. रवींद्रनाथ यांनी दिली.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्‍या कामकाजाची समिक्षा करण्‍यासाठी व बँकांना गरजेनुसार प्राथमिकता देउन त्‍यानुसार काम करण्याची प्रणाली भारत सरकारद्वारे बँकिंगच्‍या प्राथमिक स्‍तरापासून तयार केली आहे. या प्रक्रियेमधील पहिल्या टप्प्यात दिनांक १७ व १८ ऑगस्‍ट २०१९ रोजी भारतीय स्‍टेट बँक क्षेत्रिय व्‍यवसाय कार्यालय झोन १, २ व ३ मध्ये दोन दिवसीय बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रवींद्रनाथ बोलत होते. प्रसंगी पुणे पश्चिमचे सहायक महाव्यवस्थापक आकाश गुप्ते, पुणे-१चे उप महाव्यवस्थापक राजेंद्रकुमार नेहरा, स्टेट बँक इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंटचे संचालक प्रसाद बर्गे, पुणे पूर्वचे सहायक महाव्यवस्थापक मनीष चंद्र, पुणे शहर सहायक महाव्यवस्थापक विपुल अग्रवाल आदी उपस्थित होते. या बैठकीच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर टाकळे, जयंत सिन्हा यांनी परिश्रम घेतले.

रवींद्रनाथ म्हणाले, “हा आपल्‍या स्‍तरावरील प्राथमिक कार्यक्रम असून, यामध्‍ये संबंधित क्षेत्रिय व्‍यवसाय कार्यालयाच्‍या शाखेस आपले कार्यनिष्‍पादन व त्‍याची समीक्षा स्‍वत: करावयाची होती. बँकिंग क्षेत्रापुढिल आव्‍हाने व त्‍याविषयी भविष्‍यासाठी सुधार रणनीति कार्यक्रम यावर चर्चा झाली. दोन दिवसीय कार्यक्रमांमध्‍ये विविध क्षेत्रातुन प्राप्‍त माहितीच्‍या आधारावर अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये विविध क्षेत्रात कर्जस्‍तर वाढविण्‍यासाठी (एमएसएसई, निर्यात रिटेल,कृषि इत्‍यादि), पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्‍यवस्‍था करण्‍यासाठी सक्षम संसाधन तयार करणे, नवोन्‍मेषी (डिजिटल पेमेंट) पध्‍दती व प्रोदयागिकी साधनांचा उपयोग वाढविण्‍यासंबंधी चर्चा करण्‍यात आली. बँकिंग व्‍यवस्‍थेला जनकेंद्रीत बनविणे व जेष्‍ठ नागरिक, शेतकरी, लघुउदयोजक, उदयमी, व्‍यावसायीक, युवावर्ग, विदयार्थी व महिला यांसह सर्व हितधारकांच्‍या अपेक्षा आणि आवश्‍यकतेनुसार त्‍याला अनुकुल करण्‍याविषयी चर्चा करण्‍यात आली.”

“मुलभुत सुविधां व कर्ज सहायता, शेती, एमएसएमई, निर्यात व रिटेल क्षेत्र, हरित अर्थव्‍यवस्‍था, स्‍वच्‍छ भारत, वित्तिय समावेशन व महिला सशक्तिकरण, प्रत्‍यक्ष लाभ अंतरण, डिजिटल अर्थव्‍यवस्‍था, रोख रकमेचा कमी वापर, राहणिमानामध्‍ये सहजपणा व कारपोरेट सामाजिक दायित्‍व यासारख्‍या विषयांवर बँकेनी केलेल्‍या कार्यांची समीक्षा आणि राष्‍ट्रीय उद्देशांच्‍या प्राथमिकतेनुसार व यावरील गरजेची समीक्षा करण्‍यात आली. सार्वजनिक क्षेत्रातिल बँका आणि विशेषत: भारतीय स्‍टेट बँकेला अधिक उत्‍कृष्‍ठ बनविण्‍यासाठी व भविष्‍यातील दिशा ठरविण्‍यासाठी आवश्‍यक असणाऱ्या नवीन सूचना, सुधारणा मिळाल्‍या आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.

“या सर्व सूचनांचे एकत्रिकरण करून राज्‍यस्‍तरावरील बँकर्स समितीच्‍या परिमंडळ कार्यालयास पाठविण्‍यात आल्‍या. प्रत्‍येक क्षेत्रातिल शाखांचे तुलनात्‍मक कार्यातिल निष्‍पादन समाविष्‍‍टआहे. राज्‍यस्‍तरावरील बँकर्स समिती मध्‍ये चर्चा झाल्‍यानंतर याची अंतिम स्‍वरूपातील चर्चा राष्‍ट्रीय स्‍तरावर होईल ज्‍यामध्‍ये बँकेतील आंतरिक आणि बँकांमधील परस्‍पर कार्य निष्‍पादना विषयी तुलना केली जाईल आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्‍ये मिळालेल्‍या सूचनांना लागू करण्‍याविषीय पुढिल दिशा ठरविण्‍यात येईल्. या दोन दिवसीय चर्चा सत्रातिल प्रक्रियेमध्‍ये निम्‍नस्‍तरावरील शाखेचे लक्ष्‍य व त्‍याच्‍या प्राप्ति साठी असणारा भागिदारीचा सहभाव पुनर्जिवित झालेला आहे. तसेच बँकेच्‍या भविष्‍याविषयी दिशा, रणनीति कार्यनिष्‍पादना मध्‍ये सुधारणा आणि राष्‍ट्रीय प्राथमिकतेच्‍या आधारावर स्‍वत:ला भारताच्‍या विकासाच्‍या कहाणिचा एक भाग म्‍हणून बँका आपली भूमिका निभावू शकतील,” असेही ते म्हणाले.

राजीव गांधींसारखे सहजपणे जनसामान्यांच्यात मिसळा – उल्हास पवार

0

पुणे – आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत देशाचे नेतृत्व करताना अगदी सहजपणे जनसामान्यांच्यात मिसळणारा नेते अशी स्व. राजीव गांधी यांची प्रतिमा कशी निर्माण झाली याची साक्ष म्हणजे हे त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगांची छायाचित्रांचे प्रदर्शन आहे. स्व. राजीव गांधी यांच्या शिकवणुकीप्रमाणे आता काँग्रेसच्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत सर्वानीच जनसामान्यांच्या मिसळून विद्यमान राज्यकर्त्यांच्या चुका लोकांना दाखवून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी आज येथे केले.

माजी पंतप्रधान स्वर्गिय राजीव गांधी यांची 75 वी जयंती येत्या 20 ऑगस्टला, मंगळवारी आहे. त्या निमित्ताने सारसबागे जवळच्या बाळासाहेब ठाकरे कलादालनात राजीव गांधी यांच्या जीवनातील विविध प्रसंगातील छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन करताना उल्हास पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे होते. नेते मोहन जोशी, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनाली मारणे, राजीव गांधी जयंती कार्यक्रमाचे निमंत्रक प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, नगरसेवक अजित दरेकर, नीता रजपूत यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

गांधी कुटुंबियांनी पाच कलमी कार्यक्रम, वीस कलमी कार्यक्रमातून जी दिशा देशाला दाखवली, त्यावर टीका करणारेच आज तेच कार्यक्रम जाहीर भाषणातून देत आहेत, असे सांगून उल्हासदादा पवार म्हणाले, गांधीं कुटुंबातील नेत्यांना जे चाळीस वर्षापूर्वी दिसत होते ते कळायाला आजच्या राज्यकर्त्यांना इतकी वर्षे लागली. राजीव गांधी हे हस-या चेह-याचे, निर्मळ….प्रसन्न मनाचे आणि प्रांजळ विचारांचे नेते होते. त्यांनी पायलट म्हणून काम करताना ते जेवढ्या सहजपणे एअर इंडियामधील सहका-यांच्यात मिसळत होते तेवढेच सहजपणे ते पंतप्रधान झाल्यानंतर देशातील जनसामान्यांच्यात मिसळत असत हे सांगणारी अनेक छायाचित्रे या प्रदर्शनात आहेत.

या प्रदर्शनात राजीव गांधी यांची एकूण 130 छायाचित्रे लावण्यात आली असून त्याची सुरूवात त्यांच्या मुंबईतील त्या काळचे निष्णात प्रसुतीतज्ञ डॉ. शिरोडकर आणि डॉ. पुरंदरे यांच्या हॉस्पिटलच्या जन्म तारखेच्या दाखल्याने होते. याशिवाय त्यांचे आजोबा, आई, भाऊ आणि सोनिया गांधी, राहुल गाधी, प्रियांका गांधी यांच्या समावेतचे अनेक प्रसंग आहेत. दिल्लीत रस्त्यावर उभे राहून सोनिया गांधी समावेत आइसक्रिम खातानाचे छायाचित्र खूपच बोलके आहे. याशिवाय आजोबा पंडित नेहरू यांचा अस्थिकलश भाऊ संजय समावेत नेतानाच्या छायाचित्रात माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्रींचेही दर्शन होते. शेतकरी, आदिवासींच्या व्यथा ऐकणारे राजीव गांधी आणि त्याचवेळी आंतरराष्ट्रीय मंचावर नेत्यांसोबत बोलणारे राजीव गांधी इथेच दिसतात. प्रत्येक छायाचित्रात त्यांच्या चेह-यावरील वेगवेगळे भाव सहजपणे दिसतात. त्यांच्या विविध भाव मुद्रा बघितल्याकी आपण एका आश्वासक नेत्याला मुकलो आहोत याचीच जाणिव प्रदर्शन बघितल्यावर होते. या सर्व छायाचित्रांचे संकलन गेली 28 वर्षे मुक्त छायाचित्रकार सुशिल राठोड यांनी देशातील विविध प्रांतातून केलेले आहे. त्या काळात बहुतेक छायाचित्रे ही ब्लॅक ऍण्ड व्हाइट असल्याने मोठ्या मेहनतीने राठोड यांनी दुर्मिळ छायाचित्रे तंत्रज्ञानाच्या मदतीने जीवंत केली आहेत.

हे प्रदर्शन सोमवार दि. 19 आणि मंगळवार दि. 20 पर्यंत सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत सारसबागे जवळच्या बाळासाहेब ठाकरे कलादालनात सर्वांसाठी खुले रहाणार आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे हा प्रदर्शन आयोजित करण्यात आले.

रिपब्लिकन पक्षाच्या शहराध्यक्षपदी अशोक शिरोळे

0
संपर्क प्रमुखपदी अशोक कांबळे; सर्वांना सोबत घेऊन पक्षवाढीवर भर देण्याचा निर्धार 
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (A) पुणे शहर अध्यक्षपदी सर्वानुमते अशोक शिरोळे, तर संपर्क प्रमुखपदी अशोक कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड १८ ऑगस्ट २०२० पर्यंत एक वर्षासाठी असणार आहे. दरवर्षी अध्यक्षपदाची धुरा बदलण्यात येणार असून, शिरोळे यांच्यानंतर विद्यमान कार्याध्यक्ष संजय सोनवणे, त्यांच्यानंतर शैलेंद्र चव्हाण अध्यक्षपद सांभाळणार आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार या निवडी करण्यात आल्या आहेत.
आरपीआय शहर कार्यालयात रविवारी दुपारी झालेल्या बैठकीत या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष ऍड. अयुब शेख, नगरसेविका हिमाली कांबळे, युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनावणे, सचिव महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे, भगवानराव गायकवाड, मोहन जगताप, संजय कदम, प्रियदर्शिनी निकाळजे, निलेश आल्हाट, वसंत बनसोडे, कालिदास गायकवाड, शशिकला वाघमारे, यांच्यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्यात विधानसभा निवडणुकीत एक जागा हक्काने मागून घेणार असून, योग्य उमेदवाराची निवड करून त्याला निवडून आणण्याचा निर्धार एकमुखाने यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
पदभार स्वीकारल्यानंतर अशोक शिरोळे म्हणाले, “जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रिपब्लिकन पक्ष काम करीत आहे. सध्या पक्ष सत्तेत असला, तरी पुढील काळात सत्तेत वाटा मोठ्या प्रमाणात मिळावा, यासाठी पक्षवाढीवर भर देणार आहे. शहरातील सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढील काळात काम करणार आहे.”

गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा-पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम

0
पुणे : “समाजात कायदा व सुव्यवस्था राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. ज्येष्ठांसाठी, महिलांसाठी, लहान मुलांसाठी असे वेगवेगळे सेल सुरु करून त्यामार्फत अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा आणि शहराला सुरक्षित बनवण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. मात्र, समाजातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे,” असे मत पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी व्यक्त केले.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या लेडीज ऑर्गनायझेशन अर्थात फिक्की फ्लो संस्थेच्या वतीने आयोजित मार्गदर्शन सत्रात डॉ. व्यंकटेशम बोलत होते. हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी फिक्की फ्लो पुणेच्या चेअरपर्सन रितू छाब्रिया, सदस्य अनिता सणस यांच्यासह इतर पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
डॉ. व्यंकटेशम म्हणाले, “महिला सुरक्षा, गुन्हेगारीला आळा, वाहतूक कोंडी, सायबर गुन्हेगारी आदी गोष्टींवर पुणे पोलीस चोवीस तास काम करीत आहे. नागरिकांना चांगले आणि सुरक्षित आयुष्य कसे जगता येईल, यासाठी सतत नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. त्यासाठी पोलीस काका, दामिनी पथक यांसारखे विशेष विभाग कार्यरत आहेत. या सगळ्या उपक्रमांना नागरिकांची साथ मिळाली, तर शहर गुन्हेगारी मुक्त व्हायला वेळ लागणार नाही.” महिला सुरक्षेसाठी पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल फिक्की कडूनही गौरविण्यात आल्याचे डॉ. व्यंकटेशम यांनी नमूद केले.
पुणे शहराला सुरक्षित बनविण्यासाठी पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन रितू छाब्रिया यांनी दिले.

पुण्यातील या २ विधानसभा मतदार संघांवर उद्धव ठाकरेंचे लक्ष -खा. राऊत ( कृपया हेडफोन वर ऐका…)

0

mymarathi.net पुणे- वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील शिवसेना नगरसेवक संजय भोसले यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत देत खुद्द शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे वडगाव शेरी आणि खडकवासला या दोन मतदारसंघांवर विशेष लक्ष ठेवून असल्याचे आज संसदेतील शिवसेना गटनेते खा. विनायक राऊत यांनी येथे सांगितले .
शिवसेनेचे वडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष ,महापालिकेतील सेनेचे माजी गटनेते ज्येष्ठ नगरसेवक संजय भोसले यांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी मेळाव्यात खासदार राऊत बोलत होते .तब्बल ८०० विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला आणि त्यांच्यसह पालक वर्गासाठी स्नेह भोजन आयोजित करण्यात आले होते .
आयोजक नगरसेवक संजय भोसले ,अश्विनी भोसले,संपर्क प्रमुख बाळाभाई कदम ,तसेच गोपाळराव शेलार ,ज्येष्ठ नगरसेवक अविनाश साळवे,इरफान सय्यद,कविता आंब्रे ,आनंद गोयल, आनंद दवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करताना यावेळी खा. राऊत गुणवंत लोकप्रतिनिधी यांचे कौतुक करायला विसरले नाहीत . वडगाव शेरीला संजय भोसले यांच्यासारखा आमदार लाभला पाहिजे असे सांगत त्यांच्या लोकहितवादी गुणवत्तेची माहिती नेत्यांनी सेनाप्रमुखांच्यापर्यंत पोहोच्व्लेली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि विधानसभेचा बिगुल लवकरच वाजणार असून भोसले यांच्यासारखा आमदार लाभला तर या मतदार संघात खरी दिवाळी साजरी होईल असेही ते म्हणाले .नेमके खासदार राऊत काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात ……

अटलजींच्या कार्याचे स्मरण हीच खरी श्रद्धांजली – महापौर मुक्ता टिळक

0

पुणे-
अनेक व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधी एखाद्या वास्तूला,रस्त्याला किंवा चौकाला आपल्या नातेवाईकांचे नाव देतात,मात्र एका महान नेत्याच्या स्मृतीदिनी त्यांनी केलेल्या कार्याचा फलक लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे अनुकरणीय असल्याचे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले.इतर नेत्यांना आपण माननीय किंवा अन्य विशेषणाने संबोधित करतो मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धेय अटलजी असे संबोधित केले जाते यातच त्यांची महानता अधोरेखित होते.अटलजी हे संघर्षाचे प्रतीक असून विपरीत परिस्थितीत त्यांनी केलेल्या कार्यामुळेच आज भारतीय जनता पक्षाला स्वार्णिम दिवस आले आहेत असे ही त्या म्हणाल्या.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना प्रथम स्मृतिदिनी कश्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करता येइल याचा विचार करत असताना त्यांच्या कार्याचे स्मरण राहील असे काहीतरी करावे असा विचार मनात आला आणि कर्वेनगर मधील समर्थ पथावरील शक्ती ९८ चौकाचा इतिहास तत्कालीन वार्ड अध्यक्ष संतोष रासकर यांनी निदर्शनास आणून दिला.१९९८ साली अटलजीनी पोखरण येथे अणुचाचण्या घडविण्याचा ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेतला आणि भारत हा अणवस्त्रधारी देश म्हणून गणला गेला असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.आमचे परमाणु परीक्षण हे विरोधकांवर वापरण्यासाठी नाहीत तर विरोधकांच्या अश्या कुठल्याही प्रयत्नाला प्रतिबंधीत करण्यासाठी आहेत असे अटलजी म्हणत – म्हणूनच आज त्यांच्या प्रथम स्मृतीदिनी शक्ती ९८ चौकाच्या इतिहासाचा फलक लावून अटलजींच्या अतुलनीय कार्याचे स्मरण करत असल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
यावेळी नगरसेवक व कर्वेनगर वारजे प्रभाग समिती अध्यक्ष जयंत भावे,भाजयुमो चे शहर अध्यक्ष दीपकजी पोटे,नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भाग कार्यवाह विनायक बेहेरे,प्रभाग १३ च्या अध्यक्ष गौरीताई करंजकर,सरचिटणीस राजेंद्र येडे,हडपसर मंडल विस्तारक कुलदीप सावळेकर,भाजयुमो सरचिटणीस पुनीत जोशी ,सुयश गोडबोले ,अजय काळे ,सुधीर फाटक ,संजय कबाडे ,विठ्ठल मानकर ,स्वातीताई हिर्लेकर ,अजय धोंगडे ,श्री.खाडिलकर,प्रदीप जोशी ,श्रीपाद गोहाड ,सुवर्णाताई काकडे ,अपर्णा लोणारे ,चंद्रकांत पवार ,सौ निशा वाड ,सौ शहा ,हेमंत भावे ,निशीकांत भोमे ,दिलीप उंबरकर ,चरणसिंग सहानी ,सतीश गायकवाड,जयेश सरनौबत,जगदीशजी डिंगरे ,सुनिल मिश्रा ,सागर देशपांडे ,माणिकताई दीक्षित,अजय आडकर ,श्री.मांगले ,यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक आपल्या लाडक्या नेत्याचे स्मरण करण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते.
वक्ता दशसहस्त्रेषु असलेल्या अटलजींच्या सभेला लाखोंचा जनसमुदाय लोटायचा अशी आठवण सांगताना भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी अटलजींच्या कवितांच्या पंक्ती उधृत करतानाच अटलजींच्या स्वप्नातील सुजलाम सुफलाम हिंदुस्थानाचे स्वप्न पूर्ण करण्याचे कार्य आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा करत आहेत हीच अटलजीना सच्ची श्रद्धांजली असल्याचे मत व्यक्त केले.३७० व्या कलमापासून ,समान नागरी कायदा ,आसाम मधील घुसखोरांची हकालपट्टी,अयोध्येतील राममंदिर यासह अटलजींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय प्रश्नां वरील जन आंदोलनात आम्ही सक्रिय होतो याची आठवण ही त्यांनी सांगितली.यावेळी जयंत भावे,माधुरीताई सहस्त्रबुद्धे,दीपक पोटे ,मिताली सावळेकर व विनायक बेहेरे यांनीही मनोगत व्यक्त केले.तर संतोष रासकर यांनी भगवान क्षीरसागर उपमहापौर असताना या चौकाचे नामकरण केल्याची आठवण सांगितली.
कार्यक्रमाचे संयोजन नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केले ,सूत्र संचालन संदीप खर्डेकर यांनी तर आभार प्रदर्शन गौरी करंजकर यांनी केले.