Home Blog Page 2843

पुण्याच्या नामवंत इंटिरियर डिझायनर रचना गुप्ता यांना ‘मिसेस स्टाईल आयकॉन २०१९’ विजेतेपदाचा मुकूट

0

पुणे-“कुणी आपल्यावर लिंबू फेकून मारत असेल तर एक बरणी घ्या आणि त्या लिंबाचे सरबत बनवा. माझे जीवनाचे हेच तत्त्वज्ञान राहिले आहे.” हे शब्द आहेत रचना गुप्ता (वय ४१) यांचे. गेल्या आठवड्यात हयात पुणे हॉटेलमध्ये झालेल्यामिसेस इंडियाएम्प्रेस ऑफ नेशनसौंदर्य स्पर्धेत रचना यांनीमिसेस स्टाईल आयकॉन २०१९हा बहुमान जिंकला आहे.

रचना यांचा विवाह वयाच्या अठराव्या वर्षी झाला आणि दुर्देवाने वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांना वैधव्य आले. या आव्हानातून त्या धैर्याने बाहेर येत त्या जीवनातील सर्व अडथळ्यांवर मात करुन विजेत्या ठरल्या. आज त्या ख्यातनाम इंटिरियर डिझायनर होम डिझाईन कन्सल्टंट असून स्वतःच्या होम ह्यु क्रिएटिव्ह इंडिया या दोन कंपन्यांचे उत्तम व्यवस्थापन करतात. खेरीज एक फर्निशिंग स्टोअरही चालवतात. त्या पुणे इतर शहरांतील विविध पंचतारांकित हॉटेलांना सॉफ्ट फर्निशिंग्ज पुरवणाऱ्या पुरवठादार म्हणूनही काम करतात.

सौंदर्य स्पर्धेत बहुमानाचा मुकूट प्राप्त केल्यावर त्या म्हणाल्या, “मी एक मुलगा (वय १९) एक मुलगी (वय १४) अशा दोन किशोरवयीन मुलांची आनंदी आई असून मला माझ्या भूमिकेचा अभिमान आहे. एकाचवेळी काम सांभाळणे, दोन तरुण मुलांचे संगोपन करणे आणि घराची आघाडी या गोष्टी एकटीने सांभाळणे ही खरंतर खडतर लढाई होती. पण त्यामुळे माझी वाटचाल मंदावली नाही किंवा जीवन साहसाप्रतीचा माझा उत्साहही निस्तेज झाला नाही. मला प्रवासाची आकांक्षा असून या छंदावर माझे मनापासून प्रेम आहे. प्रवासाच्या आवडीनेच मी देशाचे विविध भाग फिरुन पाहिले अनेक परदेशांनाही भेट दिली. मला शर्यतीत वाहन चालवण्याची (रॅली ड्रायव्हिंग) आणि पदभ्रमणाची (ट्रेकिंग) आवड असून मी मित्र कुटूंबासमवेत आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी वेळ काढते.”

या सौंदर्य स्पर्धेबाबत त्या म्हणाल्या, “ स्पर्धेत भाग घेणे हा जीवनातील सर्वाधिक आव्हानात्मक क्षण होता. माझी आई मुलगी यांनी मला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले. मी मंचावर पाऊल टाकले तेव्हा मला त्या स्पर्धेची भव्यता जाणवली. अंतिम फेरीपूर्वी चार दिवस दिवा पेजंट्सचे मालक असलेल्या अंजना कार्ल मस्कारेन्हास यांच्याकडून जे मार्गदर्शन मिळाले त्यामुळे आम्हा सर्व ४२ स्पर्धकांच्या आयुष्यात पूर्णपणे बदल घडला. अंजना कार्ल यांचा पाठिंबा, प्रोत्साहन आणि दिग्दर्शनामुळे मी घडले आणि मला माझ्यातील सामर्थ्य समोरच्या संधी बाहेरुन पाहता आल्या. या दोघांनी मला अधिक कणखर अधिक आत्मविश्वासू बनवले. मला यापुढे आंतरराष्ट्रीय मंचावर स्पर्धेत सहभागी होण्याची आकांक्षा आहे.”

स्पर्धेच्या नामवंत परीक्षक मंडळात अश्मित पटेल (चित्रपट अभिनेता), मुग्धा गोडसे (अभिनेत्री मॉडेल), अदिती गोवित्रीकर (अभिनेत्री, मॉडेल मिसेस वर्ल्ड २००१ बहुमान विजेती), कार्ल मस्कारेन्हास, पिया पावानी, गौरांगी श्रावत, सिमरन गोधवानी, कमल शर्मा (हयातच्या पदाधिकारी) डॉ. रचना शर्मा यांचा समावेश होता.

जगांतील अव्वल टेनिस प्रशिक्षक स्टीफन कुन यांच्या प्रशिक्षण वर्गाचे एपीएमटीए अकादमीत आयोजन

0

पुणे:  जगांतील व आशियातील अव्वल टेनिस प्रशिक्षकांपैकी एक असलेल्या स्टीफन कुन यांनी एपीएमटीए(आदर पूनावाला महाराष्ट्र टेनिस अकादमी)साठी पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे 17 ते 25 सप्टेंबर या कालावधीत टेनिस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाटेनिस फाऊंडेशनच्या वतीने या उपक्रमाचे खास आयोजन करण्यात आले आहे.

स्टीफन कुन हे मूळ थायलंडमधील बँकॉक येथील प्रशिक्षक असून त्यांनी याआधी भारताचा युवा टेनिसपटू युकी भांब्री(2016-2018दरम्यान) मार्गदर्शन केले आहे. तसेच केविन अँडरसन, हिओन चूँग, निकोलोझ बॅसिलाश्विली, योशितो निशिओका, लु येन सून, लॉईड हॅरिस, तारो डॅनियल, या एटीपी खेळाडूंना डब्लूटीए खेळाडू प्रांजला येडलापल्ली यांनादेखील मार्गदर्शन केले आहे. एपीएमटीए आणि स्टीफन कुन आगामी वर्षभरात अनेक कार्यक्रम राबविणार आहेत.

महाटेनिस फाऊंडेशनच्या या उपक्रमाचा एक भाग असलेल्या एपीएमटीए अकादमीच्या प्रशिक्षण विभागाचे संचालक आदित्य मडकेकर याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले कि, स्टीफन कुन हे आशियातील सर्वोत्तम टेनिस प्रशिकसांपैकी एक असून ते सध्याअव्वल क्रमवारीत असलेल्या एटीपी आणि डब्लूटीए खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत. अशा दर्जेदार प्रशिक्षकांनी पुण्यात शिबीर आयोजित करून खेळाडूंना मार्गदर्शन केल्यामुळे आमच्या खेळाडूंना टेनिसमधील कौशल्याबरोबरच तंदरुस्ती मानसिक सामर्थ्य आणि खेळातील बारकावे शिकण्याची संधी मिळणार असून त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये याचा मोठाच उपयोग होणार आहे.

आईटीप्रोफेशनल व्यावसायिक डालिया दत्ता ठरल्या ‘मिसेस इंडिया

0

पुणे“माझी सर्वांत मोठी प्रेरणा सुश्मिता सेन आहे. मी लहान असताना वर्ष १९९४ मध्ये सुश्मिताच्या कामगिरीने माझ्याही डोळ्यात सौंदर्य स्पर्धेत मुकूट जिंकण्याच्या, सम्राज्ञीचा बहुमान मिळण्याच्या आणि देशबांधवांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्याच्या स्वप्नाचे बीज अंकुरले.”, ही प्रतिक्रिया आहे बंगाली सौंदर्यवती डालिया दत्ता हिची. डालियाला हयात पुणे हॉटेलमध्ये नुकत्याच झालेल्या ‘मिसेस इंडिया – एम्प्रेस ऑफ द नेशन’ या सौंदर्य़ स्पर्धेत सेकंड रनर अप मुकूट प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. तिने खरोखर आपल्या कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकत वाहवा मिळवली.

डालिया म्हणाल्या, “या प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेत जिंकण्याची माझी कहाणी अगदी रंजक आहे. खरेतर वैयक्तिक कटिबद्धता आणि आव्हानांमुळे माझे लहानपणीचे स्वप्न अंधुक झाले होते, पण एके दिवशी माझा संपर्क दिवा पेजंट्सशी आला आणि मला आश्चर्य वाटले. सौंदर्य स्पर्धांची रचना बहुधा अविवाहित आणि सडपातळ मुलींनी सहभागी होण्याच्या हेतूने चाकोरीबद्ध केली जाते, परंतु दिवा पेजंट्स मात्र विवाहित महिलांचेही ग्लॅमरच्या दुनियेत स्वागत करते. मुख्य म्हणजे सुप्त सामर्थ्य असलेल्या महिलांना पुढे आणण्याची त्यांची इच्छा बघून मलाही तथ्य जाणवले. मग मीही माझ्या कक्षांचा विस्तार करुन कृती करायचे ठरवले. बाकी सर्व इतिहास आहे आणि मी अजुनही माझ्या विजेतेपदाच्या मुकूटाच्या चमचमत्या वलयात आहे. दिवा पेजंट्स हे अनेक महिलांसाठी खऱ्या अर्थाने आयुष्य बदलवून टाकणारे ठरले आहेत. मला ही आय़ुष्यभराची संधी मिळवून दिल्याबद्दल मी माझे मार्गदर्शक आणि दिवा पेजंट्सचे मालक अंजना व कार्ल मस्कारेन्हास यांची ऋणी आहे. ते परिपूर्ण मार्गदर्शक आहेत, ज्यांनी आमची निवड केली, आमच्या व्यक्तीमत्वाला उजाळा दिला आणि आमचे रुपांतर चमचमत्या तारकांत केले. अंजना, कार्ल आणि दिवाचा संपूर्ण संघ यांच्यामुळे मी माझे स्वप्न जगण्याचे धाडस केले आणि विजयी झाले.”

डालिया या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विषयातील मास्टर ऑफ सायन्स पदवीधर असून त्यांनी सौंदर्य स्पर्धेतील प्रवासात मिळालेले पाठबळ, प्रेम व प्रोत्साहन तसेच यशाचे श्रेय विशेषतः आपला साडेतीन वर्षांचा मुलगा रोनिल, पती लिजो वर्गीस, बहीण तुली दत्ता, नणंद लिजी वर्गीस व मित्रपरिवाराला दिले आहे.

डालिया सध्या पुण्यातील ई-झेस्ट सोल्यूशन्स लिमिटेड या बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपनीत की अकाऊंट मॅनेजर म्हणून काम करतात. “या ठिकाणी मला संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) विविध संघटनांसमवेत काम करण्याची संधी मिळाल्याने मी आभारी आहे. मी या कामातून मानवतेप्रती जागतिक प्रभाव निर्माण करण्यात खारीचा वाटा उचलत आहे. माझा कर्म करण्यावर विश्वास आहे आणि माझ्यासाठी मानवता हा सर्वांत मोठा धर्म आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या संघटनांसमवेत सहकार्यातून मला नोकरीचे प्रचंड समाधान मिळत आहे.”, असा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे.

डालिया या नृत्याकांक्षी असून त्यांनी काही वर्षांपूर्वी कथ्थक नृत्य शिकले आहे. सध्या त्या साल्सा व बाशाटा नृत्य प्रकारातही आहेत. त्यांना गायनाची, पाककलेची आवड असून प्रवासही खूप प्रिय आहे. आपण भटकंतीप्रेमी असल्याचे त्या स्मितपूर्वक नमूद करतात.

“सौंदर्य स्पर्धेतील विजेतेपदापर्यंतचा माझा प्रवास तितकासा सोपा नव्हता. घरात लहान मूल आणि कार्य़ालयातील पूर्णवेळची माहिती तंत्रज्ञान नोकरी त्यांच्याकडे पूर्ण लक्ष द्यावे अशी मागणी करत असताना, तसेच इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावताना तर ते आणखी अवघड होते. ही तारेवरची कसरत करताना मला अवघी ३ तास झोप मिळायची. आपण आपल्या स्वप्नाला न्याय देऊ शकत नाही, की प्रियजनांना, या निराशेने मी अनेकदा कोलमडून पडले, पण मी त्यातूनही उठून मार्ग कायम ठेवला. आता मी यशाची चव चाखली आहे आणि कबूल करते की त्याची सवय लागली आहे. माझे ध्येय आता इतर महिलांना त्यांच्या कोशातून बाहेर काढून त्यांची स्वप्ने जगायला लावण्यासाठी प्रेरणा देण्याचे आहे. एखादी महिला इतर महिलांमध्ये ताकद निर्माण करते तेव्हा ते खरे सक्षमीकरण असते, असे मला वाटते.” या शब्दांत डालिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

स्पर्धेच्या नामवंत परीक्षक मंडळात अश्मित पटेल (चित्रपट अभिनेता), मुग्धा गोडसे (अभिनेत्री व मॉडेल), अदिती गोवित्रीकर (अभिनेत्री, मॉडेल व मिसेस वर्ल्ड २००१ बहुमान विजेती), कार्ल मस्कारेन्हास, पिया पावानी, गौरांगी श्रावत, सिमरन गोधवानी, कमल शर्मा (हयातच्या पदाधिकारी) व डॉ. रचना शर्मा यांचा समावेश होता

पुण्यातील इंजिनिअर चैताली पाटील यांना ‘मिसेस इंडिया – एम्प्रेस ऑफ द नेशन’ बहुमानाचा मुकूट

0

पुण्यातील इंजिनिअर चैताली पाटील यांनी नुकत्याच झालेल्या मिसेस इंडिया – एम्प्रेस ऑफ द नेशन २०१९ सौंदर्य स्पर्धेत बहुमानाचा मुकूट, तसेच टॉप मॉडेल २०१९ हा सन्मानही पटकावला.

हयात पुणे हॉटेलमध्ये संपन्न झालेली ही स्पर्धा दिवा पेजंट्सच्या अंजना व कार्ल मस्कारेन्हास यांनी आयोजित केली होती. भारतभरातून ४२ महिला स्पर्धकांची निवड स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी झाली होती. त्यामध्ये चैताली यांनी सिल्व्हर श्रेणीमध्ये बहुमानाचा मुकूट पटकावला.

ही स्पर्धा ५ फेऱ्यांत झाली, ज्यात बुद्धिमत्ता फेरी (टॅलेंट राऊंड), छायाचित्रण (फोटोशूट), परिचय (इंट्रोडक्शन), पारंपरिक व पाश्चिमात्य पेहरावात पदन्यास (रॅम्प वॉक विथ ट्रॅडिशनल अँड वेस्टर्न अटायर) आणि प्रश्नोत्तर सत्र (क्वेश्चन अँड आन्सर सेशन) यांचा समावेश होता.

किताब जिंकल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चैताली पाटील म्हणाल्या, सौंदर्य स्पर्धेत सहभागी होऊन मुकूट पटकावण्याचे माझे बालपणापासूनचे स्वप्न होते. महाविद्यालयीन काळातही मी तीन सौंदर्य स्पर्धांत भाग घेऊन जिंकले होते. आज हा प्रतिष्ठेचा बहुमान जिंकल्यानंतर माझे स्वप्न साकार झाले आहे.  

स्पर्धेच्या नामवंत परीक्षक मंडळात प्रसिद्ध तारका  व्यक्तींचा समावेश होताअभिनेता अश्मित पटेलअभिनेत्री मुग्धा गोडसे  डॉअदिती गोवित्रीकर, ‘ बॉडी क्लिनिकच्या व्यवस्थापकीय संचालक डॉरचना शर्मामिसेस इंडिया २०१८ विजेत्या डॉगौरांगी श्रावतआंतरराष्ट्रीय शास्त्रीय नृत्यांगना सिमरन गोधवानीआंतरराष्ट्रीय मॉडेल पिया पावानीहयात पुणेचे डीओएसएम कमल शर्माकार्ल मस्कारेन्हास यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

 चैताली या यशस्वी स्थापत्य सिव्हिल इंजिनिअर असून सध्या त्या थिस्सेनक्रप इंडस्ट्रीज इंडिया कंपनीत काम करतात. 

प्रविण तरडे बनला इन्स्पेक्टर दिवाने

0

वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांची ‘मुळशी पॅटर्न’ मधील नन्या भाईची भूमिका खतरनाक गाजली. भाईगिरी नंतर आता संकेत पावसे दिग्दर्शित ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटात प्रविण विठ्ठल तरडे एका पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत असून ‘ट्रिपल सीट’ मधील त्यांचा इन्स्पेक्टर दिवाने चा लुक असलेले  पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

‘ट्रिपल सीट’च्या नव्या पोस्टरवर खाकी वर्दीतील प्रविण विठ्ठल तरडे यांनी हाताची मुठ बांधून, चेहऱ्यावर काहीसे संयमित भाव ठेवलेले आहेत, ते कुणाला तरी इशारा करत असावेत असे दिसते. प्रेक्षकांनी यापूर्वी तरडे यांना ‘रेगे’ मध्ये पोलीस अधिकारी म्हणून बघितले होते, आता या नव्या लुकमधील त्यांचा भाऊराव दिवाने हा पोलीस अइन्स्पेक्टर नेमका कसा असणार हे बघणे औत्सुक्याचा विषय आहे. अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंट, अहमदनगर फिल्म कंपनी निर्मित ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन संकेत पावसे यांनी केले आहे.

नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया निर्मित ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटात अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील यांच्या प्रमुख भूमिका असून या पोस्टरच्या माध्यमातून प्रविण विठ्ठल तरडे यांचीही महत्वपूर्ण भूमिका असल्याचे दिसते, या चित्रपटात आणखी कोणते कलाकार आहेत? हे जाणून घेण्यासाठी थोडे दिवस वाट बघावी लागणार आहे,

‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि क्रिएटीव्ह दिग्दर्शन अॅड. अभिजित अरविंद दळवी याचे असून सहनिर्माता स्वप्नील संजय मुनोत आणि सहाय्यक निर्माता अॅड. पुष्कर श्रीपाद तांबोळी आहेत. चित्रपटाला अविनाश – विश्वजित यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत लाभले आहे, तर गुरु ठाकूर, मंदार चोळकर, अश्विनी शेंडे, विश्वजित जोशी यांची गीते आहेत. ‘वायरलेस प्रेमाची गोष्ट’ अशी टॅगलाईन असलेला ‘ट्रिपल सीट’ हा मराठी चित्रपट यंदाच्या दिवाळीत दिवाळीत २४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

एमआयटी वर्ल्ड पीस “जागतिक शांतता पुरस्कार’-२०१९” पद्मविभूषण डॉ. करण सिंग यांना जाहीर

0

पुणे, दि. १६ : विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे,भारतच्या वतीने दिला जाणाराया वर्षीचा २०१९ सालचा एक अत्यंत प्रतिष्ठेचा, ऐतिहासिक स्वरूपाचा आणि नोबेल शांतता पारितोषिकाच्या धर्तीवर दिला जाणारा ‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली जागतिक शांतता पुरस्कार-२०१९’ (Philosopher Saint Shree Dnyaneshwara World Peace Prize-२०१९)  जगप्रसिध्द तत्वज्ञ, विद्वान, विचारवंत, संस्कृतचे गाढे अभ्यासक, थोर दूरदर्शी व संवेदनशील राजकारणी व माजी केंद्रीय मंत्री, पद्मविभूषण ‘डॉ. करण सिंग’ यांना जाहीर करण्यात आला आहे.
तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊलीची सुवर्णजडित मूर्ती, माऊलींची प्रतिमा असलेले सुवर्णपदक,  सन्मानपत्र, शाल व सव्वापाच लक्ष रूपये (रु.५,२५,०००/-) असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार प्रदान समारंभ धर्म, विज्ञान आणि अध्यात्माच्या पाचव्या जागतिक परिषदेचे औचित्य साधून गुरुवार, दि. ३ ऑक्टोंबर २०१९ रोजी जगातील सर्वात मोठ्या घुमटातील ‘तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज विश्‍व शांती सभागृह’, विश्‍वराजबाग, लोणी काळभोर, पुणे, भारत येथे प्रदान करण्यात येणार आहे.
भारताय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, संस्कृतचे विद्वान असलेले आणि जम्मू काश्मीरचे पूर्व महाराजा हरी सिंह आणि महाराणी तारा देवीचे वारस असलेले डॉ. करण सिंग यांनी केंद्रीय मंडळात असतांना अनेक महत्वपूर्ण पदांवर कार्य केले आहे. त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या काळात पर्यटन व नागरी उड्डाण मंत्री, आरोग्य व कुटुंब नियोजन मंत्री, शिक्षण व सांस्कृतिक मंत्री अशी पदे भूषविली आहेत. त्यांनी विज्ञान, संस्कृती आणि चेतना आंतरराष्ट्रीय केंद्र स्थापन केली आहे.
डॉ. करण सिंग यांनी इंग्रजी भाषेमध्ये राज्यशास्त्र, तत्वज्ञानविषयक निबंध, प्रवास आणि कविता यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या वन मॅन्स वर्ल्ड आणि हिंदू धर्मावर लिहिलेल्या निबंधांचे महत्वपूर्ण संग्रह खूप कौतुकास्पद म्हणावे लागेल. त्यांनी मातृभाषा डोगरीमध्येकाही भक्तीगीतेही लिहीली. भारतीय संस्कृती व परंपरेची सखोल माहिती, पाश्‍चात्य साहित्य आणि सभ्यता यांचे तपशीलवार ज्ञान असल्यामुळे त्यांना भारतात व परदेशात प्रतिष्ठित विचारवंत आणि नेता म्हणून ओळखले जाते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे डॉ. करण सिंग हे अनेक वर्ष जम्मू-काश्मीर विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलाधिपती म्हणून कार्यरत होते.
यापूर्वी हा प्रतिष्ठेचा तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर विश्‍व शांती पुरस्कार आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रणेते श्री श्री रवीशंकरजी, आदरणीय माता श्री अमृतानंदमयी देवी, व जपानच्या गोई पीस फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष श्री. हिरू सायोंजी – श्रीमती मासामी सायोंजी, साधू वासवानी मिशनचे आध्यात्मिक गुरू पूज्य दादा जे. पी. वासवानी, अक्षरधामचे प्रमुख स्वामीजी व  मानव एकता मिशन’चे संस्थापक-अध्यक्ष, महायोगी गुरू श्री एम (श्री मुमताज अली खान), जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. फ्रिजॉफ काप्रा आणि अमेरिकेतील मॉर्मन पंथाचे अध्यक्ष,  मार्गदर्शक, गुरु आणि  द चर्च ऑफ जीझस ख्राइस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स, ‘एल्डर डी टॉड ख्रिस्तोफरसन’ यांना प्रदान करण्यात आला आहे. .
या ऐतिहासिक जागतिक शांतता पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण मा. डॉ. रघुनाथ माशेलकर असून, जगप्रसिद्ध संगणकतज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर आणि वेदांचे व ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक वेदब्रह्म ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे यांचा या समितीत समावेश आहे.
अशी माहिती जागतिक शांतता समितीचे कार्याध्यक्ष व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी दिली

मोदी सरकार राजकीय लाभासाठी पाकिस्तानची वाईट प्रतिमा लोकांसमोर मांडत असल्याचा आरोप

0

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तानातील लोकांचे अगदी तोंडभरून कौतुक केले आहे. “मी पाकिस्तानात गेलो तेव्हा माझे चांगले स्वागत तर झालेच. शिवाय या लोकांनी खूप प्रेम दिले’, अशा शब्दांत पवारांनी तेथील लोकांची प्रशंसा केली. मोदी सरकार राजकीय लाभासाठी पाकिस्तानची वाईट प्रतिमा लोकांसमोर मांडत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पाकमधील जनतेचे सर्वच आघाड्यांवर हाल होत असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात ही स्थिती नाही, असा दावा पवार यांनी केला. पाकिस्तानातील लोक आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी भलेही भारतात येऊ शकत नसतील. परंतु, भारतातून तेथे गेलेल्या प्रत्येकालाच ते आपला पाहुणा मानतात, असेही ते म्हणाले. पवार यांच्या वक्तव्यावर शिवसेनेने टीका केली. पवार यांच्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते त्यांना सोडून जात आहेत. यामुळे त्यांना नैराश्य आले असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

सुलतान सुलेमान विजेता

0

पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019

पुणे: पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 या स्पर्धेत द एस.ए.पूनावाला मिलियन या शर्यतीत  सुलतान सुलेमान या घोड्याने 1600मीटर अंतरावरच्या या मुख्य शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला.

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब(आरडब्लूआयटीसी)येथे सुरु असलेल्या या स्पर्धेतील द एस.ए.पूनावाला मिलियन या  महत्वाच्या लढतीत दिनशा पी. श्रॉफ, मुनची पी. श्रॉफ, अबन एन.चॊथीया आणि सलीम फेजलभॉय यांच्या मालकीच्या सुलतान सुलेमान या घोड्याने 1मिनिट 38सेकंद व 584मिनीसेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. याचा ए संदेश हा जॉकी होता, तर अल्ताफ हुसेन ट्रेनर होता.

सविस्तर निकाल:
द एस.ए.पूनावाला मिलियन
विजेता: सुलतान सुलेमान, उपविजेता: त्रूवली

नाकर्तेपणा झाकण्यासाठी ओला, उबरची नावं घेतली जात आहेत – पृथ्वीराज चव्हाण

0

पुणे-

प्रवासासाठी आता ओला-उबरसारख्या वाहतुकीच्या सुविधांना प्राधान्य दिले जात असल्याने वाहन उद्योगाला विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागत असल्याचे वक्तव्य मागील आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. अर्थमंत्र्यांनी केलेलं हे वक्तव्य बेजबाबदारपणाचं असल्याचं म्हणत सरकारचा नाकरतेपणा झाकण्यासाठी ओला, उबरचं नाव पुढे केलं जात असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

शिवाय जबाबदार व्यक्तीकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती असेही चव्हाण यावेळी म्हणाले. पिंपरी-चिंचवडमधील पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. पुण्यासारख्या उद्योग नगरीत मुख्यमंत्री प्रचाराच्या निमित्ताने आले होते. पुणे, पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्र आहे या ठिकाणी सध्या मंदीचे वातावरण आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आर्थिक मंदीवर बोलणं अपेक्षित होतं. मंदीमुळे हाहाकार माजला आहे. हजारोच्या संख्येने लोकांचे रोजगार जात आहेत. वाहन कारखाने बंद पडले आहेत. यावर बोलणं महत्वाचं होत मात्र तस काही दिसलं नाही. आर्थिक मंदीबद्दल काही योजना नाही, काही घोषणा नाही, काय उपाय योजना कराल यावर काही बोललही जात नाही, असेही चव्हाण म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अर्थमंत्री सीतारामन यांनी केलेलं वक्तव्य हे बेजबाबदारपणाचे आहे, हे त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं. यापुढील उपाययोजना काय आहेत हे तुम्ही वाहन उद्योगाला सांगायला हवं. मात्र या ऐवजी तुम्ही जर ओला, उबर आले आहेत आता तुम्ही कारखाने गुंडाळा, तुमचा व्यवसाय काही चालणार नाही किंवा ओला-उबर बंद करावेत याचा परिणाम कारखान्यांवर होतोय असं जर तुम्ही तुमचा नाकारतेपणा झाकण्यासाठी म्हणत असाल तर हे चुकीचं आहे.

तसेच यापुढे ते म्हणाले की, तब्बल २६७ कार शोरूम बंद पडलेली आहेत. यात पुणे आणि मुंबई येथील १०० पेक्षा अधिक शोरूम्स आहेत. ही का बंद केल्या गेली? कारण गाड्या कोणी विकत घेत नाहीत. लोकं रडायला लागली आहेत, बँकेचे कर्ज मिळत नाही. यावर्षी बँकांचे ७३ हजार कोटींचे घोटाळे झाले आहेत. असा रिझर्व्ह बँकेने मागील आठवड्यात अहवाल दिला आहे. त्यातील ९० टक्के घोटाळा हा राष्ट्रीयकृत बँकेत झाला आहे. कोण चालवत आहे राष्ट्रीयीकृत बँका?  हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा कोण आश्रयदाते आहेत? याची माहिती द्या असे म्हणत सरकारचे अर्थव्यवस्थेवर अजिबात नियंत्रण राहिलेले नाही असाही त्यांनी यावेळी आरोप केला.

महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्‍वरांचे अधीन झाले नव्हते : शरद पवार

0

नवी मुंबई ः छत्रपती शिवाज महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्‍वरांचे अधीन झाले नव्हते, अशी घणघणाती टीका आज राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नामोल्लेख टाळत साताराचे उदयनराजे भोसले यांच्यावर केली. तसेच मावळ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण करुन त्यांनी नवे रयतेचे राज्य निर्माण केलं. त्यामुळे कुणाच्या जाण्यानं महाराष्ट्रात फरक पडणार नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून आणि अठरापगड जातीच्या मावळ्यांमधून पुन्हा नवा महाराष्ट्र घडवू या, असा विश्‍वास श्री. पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सध्य राजकीय स्थिती याबाबत श्री. पवार यांनी संवाद साधला. महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षात आपण काय केले हे न सांगता विरोधकांची निंदा नालस्ती करण्यातच धन्यता मानत आहेत, असा प्रतिहल्ला श्री.

पवार यांनी चढवला. दरम्यान, साताराचे खासदार उदयनराजे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे श्री. पवार यांच्या रडारवर ते राहिलेत.

श्री. पवार म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह सहन करावा लागला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरुन आग्र्याला औरंगजेब दिल्लीश्‍वराच्या भेटीसाठी ते गेले. परंतू खचून न जाता पुन्हा महाराष्ट्रात परतून त्यांनी नव्याने सर्व किल्ले जिंकले. हिंदवी स्वराज्य निर्माण केलं.

छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत, आदेश द्यायचा-मुख्यमंत्री

0

सातारा : खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे हे दोन्ही राजे भाजपमध्ये आले. पण येताना त्यांनी कोणतीही अट घातली नाही. मात्र, त्यांनी फक्त जनतेच्या कामांची यादी दिली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) सांगितले. तसेच छत्रपतींनी विनंती करायची नसते तर आदेश द्यायचा असतो, असेही ते म्हणाले.

साताऱ्यात आलेल्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत. त्यांनी आदेश द्यायचा. त्यांचा आदेश आम्ही मावळे पाळणार आहोत. आपण जनतेचे सेवक आहोत. आपण केलेली कामांच्या माहिती देण्यासाठी फिरत आहोत. आता कोणी पैलवानच नाही. तर तुम्ही का यात्रा काढताय? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. त्यावर ते म्हणाले, आता लोकांचे म्हणणे ऐकण्यासाठी यात्रा काढली जात आहे. मागील पाच वर्षांत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठिशी राहण्याचे काम केले. शेतकरी अडचणी आला तेव्हा आम्ही त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.
तसेच ते पुढे म्हणाले, 18 हजार गावापर्यंत पिण्याच्या पाण्याचे काम आम्ही केले. 10 हजार किमीचे महामार्ग आमच्या सरकारने केले. बेघरांना 2 वर्षांत घर देण्याचे काम आता आम्ही करणार आहोत.

भाजपमध्ये गेलेल्या दोन्ही ‘राजें’ची भेट, साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांची बैठक

0

सातारा- नुकतंच राष्ट्रवादीमधून भाजपवासी झालेले साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांची साताऱ्यात बैठक पार पडली. भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच दोन्ही राजांची भेट झाली. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज साताऱ्यात येत आहे, याच पार्श्वभूमीवर दोघा नेत्यांची भेट झाली.

या बैठकीनंतर शिवेंद्रराजेंनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, “महाराजांचा निरोप आल्यानंतर भेटायला गेलो होतो.” दोन्ही राजेंमध्ये औपचारिक चर्चा झाल्याचे शिवेंद्रराजे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षवाढीसाठी याबाबत निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरणात बदल होत असल्याचेही शिवेंद्रराजे म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांनी अर्ध्या तासात माझ्या मतदारसंघातील रखडलेले प्रश्न मार्गी लावले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. 370 सारखे कलम रद्द करत त्यांनी अखंड राखण्याचा प्रयत्न केला,” असे सांगत शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपचे कौतुक केले. तसेच “मी लोकसभेसाठी इच्छुक नसून मला राज्यात काम करायचे आहे,” अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.

“कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर काही निर्णय घ्यावे लागतात. मी कोणाचं सांगून काहीतरी करत नाही. मी दुसरं कोणाच्या सांगण्यावरून काही करत नाही. आम्ही दोघेही योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास सक्षम आहोत.” असे शिवेंद्रराजे यांनी म्हटले. तसेच “उमेदवारीचा निर्णय पक्ष घेईल, पण जनतेचा आणि माझा, मी केलेल्या कामावर विश्वास आहे. त्यामुळे मतदार पुन्हा एकदा संधी देतील”, असा विश्वासही शिवेंद्रराजेंनी बोलून दाखवला.

राष्ट्रवादी सरकार असताना लोकांच्या हिताचं काम झाल नाही,- उदयनराजे

0

सातारा – भाजपच्या महाजनादेश यात्रेचे साताऱ्यात दुपारी आगमन झाले. त्यानंतर भव्य सभा भरवण्यात आली होती. यात नुकतंच भाजपात आलेले उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपाच्या व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करतांना सर्वप्रथम शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना तलवार भेट दिली तर उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना पारंपारिक राजेशाही पगडी घालून त्यांचे स्वागत केले. यावेळी भाषण करताना उदयनराजेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर आपली तोफ दागली. सत्ता असताना आमच्या मागण्यांकडे कायमच दुर्लक्षच करण्यात आले. आमच्या सर्व फायल्स थेट डस्टबीनमध्ये जायच्या असा आरोप त्यांनी केला. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या अवस्थेविषयी आत्मचिंतन करायला हवे असे ते म्हणाले.

कामं मार्गी लावणारी माणसं
उदयनराजे भोसले यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षावर केला. उदयनराजे भोसले म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील ही कामं मार्गी लावणारी माणसं आहेत. त्यामुळं कामं करणाऱ्या माणसांसोबत आपण राहिलं पाहिजे. या हेतूने मी भाजपमध्ये दाखल झालो. आधीच्या सरकारमध्ये घोंगडं भिजत ठेवण्याची प्रवृत्ती होती. आपल्या जिल्ह्याचे एक सुपूत्र (पृथ्वीराज चव्हाण) मुख्यमंत्री होते. पण, साताऱ्याचा विकास काही झाला नाही. तेही मुख्यमंत्री होते आणि हेही मुख्यमंत्री आहेत. पण, कामं यांनीच मार्गी लावली.’

राष्ट्रवादी सरकार असताना लोकांच्या हिताचं काम झाल नाही
गेली 15 वर्षे मी त्यांच्यासोबत होतो. विचार केल्यानंतर कळालं की, एक तरी लोकांच्या हिताचं काम काँग्रेस एनसीपीच्या सरकार असताना झालं का? आम्ही मागण्या घेऊन जायचो तर आमच्या नावासमोर फुलीच होती. आमची फाइल जायची ती थेट डस्टबीनमध्ये जायची. असे अनेक वर्षे गेले. खरं पाहता त्यांनी आमचे कधीच काम नाही केलं. तर निदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला काही नाही तर एक सहनशीलतेचा पुरस्कार तरी द्यायला हवा होता, मात्र तेही माझ्या नशीबी नव्हतं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला, असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला.

पुढे ते म्हणाले, मी कामे करायचा प्रयत्न केला, पण कामाच्या बाबतीत मी जेव्हा जायचो तेव्हा माझ्या पदरी निराशाच पडली. जी कामे झाली ती रेटून केली म्हणून झाली. सत्तेत असताना एकाही रुपयाचं काम झालं नाही. काम करण्यासाठी मला भांडावं लागल. ही लोकशाहीची पद्धत नाही, मात्र तेव्हा माझ्याकडे पर्याय नव्हता. नंतर भाजप सरकार आल्यापासून अनेक कामे झाली. जवळपास 15 हजार कोटींची कामे झाली आहेत.

ईव्हीएमवर राजेंचा यु-टर्न

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये असताना उदयनराजेंनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजप शिवसेना सरकावर प्रश्न उपस्थित केले होते. आता त्यांनी यावरही भाष्य केले आहे. ईव्हीएमवर मलाही संशय होता, एवढे मतदान या पक्षाला कसकाय मिळते, असा प्रश्न मलाही पडला होता. नंतर मी विचार की, देवेंद्रजींनी आतापर्यंत अनेक कामे केली आहेत, सर्व कामे मार्गी लावली. यामुळेच लोक त्यांचे काम पाहून मतदान करतात. लोकं नाव ठेऊ दे की, काहीही करो. मला ठाम विश्वास आहे की, ही सर्व सर्व कामाला लावणारी लोक नाही. तर कामं मार्गी लावणारी लोक आहेत. असे म्हणत, राजेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकांचा भडीमार केला तर भाजपची स्तुतीसुमनेही गायली.

उदयनराजेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

> एक-दोन नाही, तर 15 वर्षांनंतर असा निर्णय मी का घेतला ? याचा विचार टीकाकरांनी करावा.
> 15 वर्षे आमच्या नावावर फुली होती; आमची फाईल डस्टबिनमध्ये टाकली जात होती. इतकं सहन केलं. त्यासाठी किमान राष्ट्रवादीनं मला शहनशीलतेचा तरी पुरस्कार द्यायला हवा होता.
> जी काम केली ती रेटून केली म्हणून झाली. सत्तेत असताना 1 रुपयांच काम झालं नाही.
> नळावर भांडण असतं तसं भांडाव लागलं.
> विरोधी खासदार असताना देखील युतीच्या काळात भाजपने साताऱ्यामध्ये 680 कोटी रुपयांची काम केली. 15 हजार कोटीची रेल्वेची कामे केली.
> मी विचार केला, यांनी 15 वर्षात केलं नाही मग आत्ता काय करणार. माझा बँड वाजवण्याचा कार्यक्रम त्यांनी आखला होता. माझा बँड कोणी वाजवू शकत नाही. कारण माझा बँड फक्त मीच वाजवतो. कारण मीच बँड मास्टर आहे.
> कृष्णा खोरे प्रकल्प हा काँग्रेस आणि त्याच्या मित्र पक्षाने राबवायला हवा होता. कृष्णा खोरेचे काम 2006 सालीच व्हायला हवं होतं. पण अद्याप ती कामं झालेली नाही.

जुलमी सत्तेच्या विरोधात केलं जातं ते बंड असतं, पण सत्तेच्या गोटात जाण्यासाठी होते ती फक्त फितुरी असते- अमोल कोल्हे

0

नवी मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी केलेल्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे. “जुलमी सत्तेच्या विरोधात केलं जातं ते बंड असतं, पण सत्तेच्या गोटात जाण्यासाठी होते ती फक्त फितुरी असते. स्वातंत्र्यानंतर सर्व संस्थानं खालसा झाली असून आता कोणीही राजे नाही”, असे म्हणत कोल्हेंनी उदयनराजेंचा समाचार घेतला. “एकदा गणेशोत्सव संपला की विसर्जनानंतर त्यावर बोलायची गरज नाही”, असे म्हणत त्यांनी भाजपच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईक यांनाही टोला लगावला. नवी मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात कोल्हे बोलत होते.

“जनतेच्या विकासासाठी पक्षांतर करत आहे” असे जेव्हा एखादा नेता म्हणतो, तेव्हा जनता “स्वतःची कातडी बचावण्यासाठी” असंच वाचते, कारण जनता आता दुधखुळी राहिलेली नाही. ज्या सरकारच्या पाच वर्षांच्या काळात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्या सरकारमध्ये जाऊन कोणता विकास साधायचा आहे? असा घणाघात कोल्हेंनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर केला. तसेच, पाच वर्षांत महाराष्ट्रावरचे कर्ज दुपटीने वाढवले, ते आता विकासाच्या बाता करत आहेत. ज्या मुख्यमंत्र्यांकडे गृह मंत्रालय आहे, त्यांच्या नागपूर जिल्ह्याची क्राईम कॅपिटल अशी ओळख असल्याचेही अमोल कोल्हे अधोरेखीत केले.

जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागामध्ये हिरडा प्रक्रिया उद्योग होणार सुरु

0
श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा उत्पादक सहकारी संस्थेस समभाग खरेदीसाठी २६.६० लक्ष निधी मंजूर
जुन्नर /आनंद कांबळे 
जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागामध्ये हिरडा प्रक्रिया उद्योग लवकरच सुरु होणार आहे. कुकडेश्वर आदिवासी हिरडा उत्पादक सहकारी संस्थेस समभाग खरेदीसाठी २६.६० लक्ष निधीला महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने मंजुरी दिली असल्याची माहिती शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
जुन्नर तालुक्यातील श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक संस्थेचे अध्यक्ष काळू शेळकंदे व आदिवासी नेते मारुती वायाळ यांनी शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांची भेट घेऊन खानापूर, ता. जुन्नर येथील बंद अवस्थेत असलेला हिरडा प्रक्रिया उद्योग सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार शरद सोनावणे यांनी मंत्रालयात यासंदर्भात आदिवासी मंत्री अशोक उईके व प्रधान सचिवांची भेट घेऊन या प्रकल्पाची माहिती देत या प्रकल्पामुळे जुन्नर, आंबेगाव, खेड व मावळ भागातील आदिवासी भागाला या प्रकल्पाची होणारी उपयुक्तता निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार हा उद्योग सुरु करण्याच्या पहिल्या प्रयत्नाला यश मिळाले असून सदर संस्थेला हिरडा  उप्तादक आदिवासी शेतकऱ्यांकरिता समभाग खरेदी करण्यासाठी जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाद्वारे चालू वर्षांमध्ये (सन २०१९-२०) २६.६० लक्ष निधीला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले. याबाबतचे राज्य शासनाचे आदिवासी विभागाचे मंजुरीपत्र ११ सप्टेंबर रोजीचे पत्र जिल्हाधिकारी पुणे व आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी घोडेगाव यांना कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे.
माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की, आदिवासी भागातील नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी वर्षानुवर्षे रखडलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी स्वतः व जुन्नरचे आमदार शरद सोनावणे आम्ही कटिबद्ध आहोत. यासंदर्भात माझी नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या  आदिवासी मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरु असून याकरिता सुमारे १८ कोटी २४ लक्ष निधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. यापैकी हिरडा प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी २ कोटींची तरतूद आवश्यक आहे. तर भविष्यातील आदिवासी समाजाला मिळणारे फायदे लक्षात घेऊन हिरड्या व्यतिरिक्त जांभूळ, आंबा, करवंदे आदींवरील प्रक्रियांकरिता ५० टन क्षमतेचे शीतगृह उभारणे, बाळ हिरडा गोळ्यांचा प्रकल्प उभारणे यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे.
मी व आमदार शरद सोनावणे हा प्रकल्प सुरु व्हावा यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. हा प्रकल्प मार्गी लागल्यास पुणे जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधवांना हक्काचा व्यवसाय कायमस्वरूपी उपलब्ध होईल असे प्रतिपादन यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.