Home Blog Page 2814

कँटोन्मेंट मधून काँग्रेसला पराभवाचा धक्का -सुनील कांबळे विजयी

0

पुणे- कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीमध्ये मतमोजणीच्या भाजपचे उमेदवार व महापालिकेच्या स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष सुनील कांबळे यांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उमेदवार व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांना चुरशीच्या लढतीनंतर पराभव स्विकारावा लागला आहे. भाजपाने त्यांच्या पराभवासाठी विविध राजकीय चाली केल्या, तसेच बागवे यांना काँग्रेसच्या बड्या नेत्यांना प्रचारासाठी मतदार संघात आनन्यात आलेले अपयश, फुटलेले काही काँग्रेसी अशा काही कारणानी यशाने हुलकावनी दिली.

 

मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध -सिद्धार्थ शिरोळे

0
पुणे-शिवाजीनगर मतदार संघाचे महायुतीचे विजयी उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांची प्रतिक्रिया

विधानसभा निवडणुकीत पुण्यातील प्रतिष्ठेच्या शिवाजीनगर मतदार संघामधून महायुतीचा उमेदवार म्हणून मला संधी दिल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आभारी आहे. याबरोबरच माझ्यावर विश्वास ठेवत मला विजयी करणा-या मतदारांचे, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे देखील मी आभार मानतो.आमदार म्हणून या पुढील काळात शिवाजीनगर मतदार संघातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. याशिवाय पक्षाच्या ध्येय धोरणांना अनुसरून असलेला माझा शिवाजीनगर मतदार संघाचा विकासाचा ‘निर्धारनामा’ राबविण्यासाठी देखील मी प्रयत्नशील असेल.

 परिचय –

युवा आणि अभ्यासू चेहरा म्हणून सर्वांच्याच परिचयाचे असलेले सिद्धार्थ शिरोळे हे आता शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार म्हणून ओळखले जाणार आहेत. चाळीस वर्षांचे सिद्धार्थ शिरोळे यांचे शालेय शिक्षण हे मॉडेल कॉलनी मधील विद्याभवन शाळेमधून झाले असून त्यांनी फर्गसन महाविद्यालयामधून ११ वी आणि १२ वी विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. यानंतर एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून त्यांनी बी. ई मेकॅनिकलची पदवी घेतली आहे.आपल्या वडिलांचा हॉटेलचा व्यवसाय पुढे नेत शहरातील प्रसिद्ध हॉटेल म्हणून नावाजलेल्या शबरी या हॉटेलचे व्यवस्थापन त्यांनी यशस्वीपणे सांभाळले आहे. यानंतर त्यांनी स्वत: शर्वरी हे रेस्टॉरंट देखील सुरु केले. मात्र व्यवसायापेक्षा आपला कल हा समाजकारणात आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ समाजकारण आणि राजकारणात काम करण्याचा निर्णय घेतला. यामधून २०१७ साली झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत डेक्कन – मॉडेल कॉलनी प्रभागातून नगरसेवक म्हणून ते निवडून आले आहेत. यानंतर पीएमपीएमएलचे संचालक म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पुणे शहराचे माजी खासदार अनिल शिरोळे यांचे ते सुपुत्र आहेतच याबरोबर महाराष्ट्र हॉकी असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे. अमेरिकी सरकारच्या प्रतिष्ठेच्या इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशिप प्रोग्रॅममध्ये देखील सिद्धार्थ शिरोळे सहभागी झाले होते.

स्वयंभू फाउंडेशनच्या माध्यमातून कला, क्रीडा क्षेत्रातही ते कार्यरत असून लेखन, प्रवास, छायाचित्रण, संगीत हे त्यांचे आवडते छंद आहेत. ते स्वत: आशावादी असून नुकतेच त्यांनी इंग्रजी भाषेत ‘टू डे इज माय फेव्हारेट डे’ हे पुस्तकही लिहिले आहे. या पुस्तकाचे मराठीत देखील भाषांतर झाले असून हे पुस्तक वाचकांना एक सकारात्मक दृष्टी देते.

नगरसेवक म्हणून काम करीत असताना डेक्कन – मॉडेल कॉलनी प्रभागातील वाहतूक प्रश्न, कचराप्रश्न सोडविण्यावर त्यांनी भर दिला आहे. याशिवाय पीएमपीएमएलचे संचालक म्हणून त्यांनी तेजस्विनी बस सेवा आणि इलेक्ट्रिक बस सेवा यांवर भर देत शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले.

मुळात सिद्धार्थ शिरोळे यांचा स्वभाव हा आशावादी असून कोणत्याही प्रश्न सोडविण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रामाणिक प्रयत्न करण्याची त्यांची तयारी असते. तसेच समस्येच्या मुळाशी जात त्यावर उपाय शोधणे हे त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे

अतुल बेनके यांचा विजय

0
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढतीत राष्ट्रवादी पक्षाचे अतुल वल्लभशेठ बेनके यांचा विजय झाला. त्यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांचा ९ हजार ६८ मतांनी पराभव केला.
 जुन्नरच्या राजकारणात काळे बेनके शेरकर हा फँक्टर पुन्हा यशस्वी झाला.
 राष्ट्रवादीचे अतुल बेनके यांना ७४हजार ९५८ मते तर शिवसेनेचे शरद सोनवणे यांना ६५हजार ८९० ,अपक्ष आशाताई बुचके  ५०हजार ४१ मते मिळाली . या तिरंगी लढतीत ९ हजार मतांनी  बेनके  यांनी विजय मिळविला. बाजार समितीचे सभापती अँड .संजय काळे ,विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी एकदिलाने कम करुन शरद पवार यांना दिलेला शब्द पूर्ण केला .लोकसभेलाही काळे ,बेनके ,शेरकर एकत्र होते .त्यामुळे डाँ .अमोल कोल्हे यांना ४२ हजाराचे मताधिक्य मिळाले होते .
पहिल्या फेरीपासूनच बेनके यांनी मताधिक्य घेतले होते ते शेवटच्या फेरीपर्यत ठेवले.
 जुन्नर तालुक्यातील पाणी प्रश्न,शेतकरी यांच्या अडीअडचणी याबाबत बेनके यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनास जनतेने पाठिंबा दिला होता.
  मार्क्सवादी पक्ष व मनसेने बेनके यांना पाठिंबा दिला होता  तर शिवसेनेत लोकसभेत पराभव झाल्याचे निमित्त पुढे करुन आशाताई बुचके यांची हकालपट्टी केली होती.
आशाताई बुचके यांनी मला आमदार व्हायचेच म्हणून  रणांगणात उतरल्या होत्या. त्यांचा यावेळी तिसऱ्यांदा पराभव झाला.
शिवसेनेचे आमदार शरद सोनवणे यांनी विकासकामे केल्याचा दावा करुन निवडणूक लढविली होती.परंतु पाणी प्रश्न योग्य नियोजन न केल्याचा त्यांना फटका बसला. पुन्हा त्यांचे आमदार होण्याचे स्वप्नभंग झाले.
काळे ,बेनके ,शेरकर हे एक आले तर तालुक्यात  विजय निश्चितच होते हे पुन्हा सिद्ध झाले.
विजयानंतर अतुल बेनके म्हणाले की ,हा विजय काळे ,बेनके ,शेरकर यांच्या एकजूटीचा व खासदार डाँ.अमोल कोल्हे यांच्या वआघाडीच्या परिश्रमाला आहे.

वडगाव शेरीत घड्याळाचा गजर ..कमळ हवेतच गुल ..

0

पुणे- वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांनी भाजपच्या जगदीश मुळीक यांचा 4,975 अशा मताधिक्याने पराभव केला आहे.भाजपच्या जगदीश मुळीक यांना 92,725 मते मिळाली तर सुनील टिंगरे यांना 97,700 मते मिळाली आहेत. तर 2,417 मते नोटाला मिळाली आहेत. भाजपच्या हवे बाबत मुळीकयांना  प्रचंड आत्मविश्वास होता .बाप्पू पठारे यांना भाजपमध्ये घेतल्यावर त्यांना विजयाबाबत अजिबात शंका राहिली नव्हती . छोट्या छोट्या घटकांकडे त्यांचे  दुर्लक्ष होत गेले त्याचा फायदा टिंगरे यांना झाला .

2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढविल्या होत्या. त्यावेळी टिंगरे हे शिवसेनेकडून लढले होते.

वडगावशेरी मतदारसंघ

1.सुनील टिंगरे (राष्ट्रवादी ) – 97,700 मते विजयी झालेले उमेदवार
2. जगदीश मुळीक (भाजप ) – 92,725 मते
3. बेंगळे राजेश दत्तात्रेय (बहुजन समाज पार्टी) – 1653 मते
4. गणेश बाळकृष्ण ढमाले (आम आदमी पार्टी) – 908 मते
5. डॅनियल लांडगे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) – 7702 मते
6. प्रविण बापूराव गायकवाड (वंचित बहुजन अघाडी) – 10276 मते
7. प्रसाद सुभाष कोद्रे (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी) – 174 मते कधीही आमदार रिपीट न करण्याचा विक्रम वडगावशेरी मतदार संघाने कायम ठेवला आहे. राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांनी भाजपच्या जगदीश मुळीक यांचा 4,975 अशा मताधिक्याने पराभव केला आहे.

भाजपच्या जगदीश मुळीक यांना 92,725 मते मिळाली तर सुनील टिंगरे यांना 97,700 मते मिळाली आहेत. तर 2,417 मते नोटाला मिळाली आहेत.

वीस नगरसेवक, दहा माजी नगरसेवक, एक माजी आमदार एवढ्या सगळ्या फौज फाट्यासह उभे राहिलेले सत्ताधारी पक्षाचे भाजपचे उमेदवार आमदार जगदीश मुळीक आणि त्याविरोधात उमेदवारी मिळालेले राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील टिंगरे…हे चित्र पाहता वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील हा सामना एकतर्फी होईल असे चित्र सुरुवातीपासून निर्माण केले जात होते. लोकसभेला भाजपच्या उमेदवाराला वडगाव शेरीत मिळालेले 56 हजाराचे मताधिक्य वाढवून ते 70 हजारापर्यंत नेण्याचे नियोजन भाजप महायुतीने केले होते. त्यातच उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचार सुरू झाल्यानंतर चार दिवसांनी राष्ट्रवादीसोबत असलेले माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी हातातील घड्याळ काढून हातात कमळ पकडले. या साऱ्या घडामोडित हवेत गेलेल्या नेते मंडळीना जोरका झटका बसला आहे.

 

सिद्धार्थ शिरोळे पहिल्याच प्रयत्नात आमदार …

0

पुणे-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे विजयी झाले आहेत.माजी नगरसेवक ,माजी खासदार असलेल्या अनिल शिरोळे यांचे पुत्र असलेले सिद्धार्थ यांनी पहिल्याच प्रयत्नात पहिल्यांदाच लढलेल्या विधानसभा निवडणुकीत यासह संपादन केले आहे.

या लढतीमध्ये शेवटच्या फेरीपर्यंत सिद्धार्थ शिरोळे यांनी आघाडी घेतली होती. 18 व्या फेरीत त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यावर आघाडी घेतली. तर 19 व्या फेरीत विजयी आघाडी घेत विजय संपादीत केला. शिरोळे यांनी 5 हजार पेक्षा अधिक मतांनी बहिरट यांचा पराभव केला. पहिल्या फेरीमध्ये दत्ता बहिरट हे आघाडीवर होते. त्यांना 308 मते मिळाली होती. पहिली फेरीत पोस्टल मतांची मोजणी झाली.

या मतदार संघामध्ये तीन लाख पाच हजार 587 मतदार आहेत.  एक लाख 33 हजार 772 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघातील औंधमधून 52 टक्के, प्रभात रस्ता, आपटे रस्ता, सेनापती बापट रस्ता परिसरातून 51 टक्के मतदान झाले होते.

हर्षवर्धन पाटलांना हिसका -राष्ट्रवादीचे भरणे विजयी….

0

पुणे-सत्तेसाठी भाजपवासी झालेले काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा  इंदापुरातून दारुण पराभव झाला आहे. त्यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झालाआहे.  हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना मंत्रीपद देण्याचे सुतोवाचही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, पण आता त्यांचा पराभव झाला आहे.

इंदापुरातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. राज्यातील तब्बल २० आयारामांना जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे.निवडणूकपूर्व तसेच निवडणुकोत्तर चाचण्यांना फोल ठरवत महाराष्ट्र जनेतेने निकाल दिला आहे.सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या गृहित धरण्याच्या राजकारणाला पूर्णपणे लाथाडले असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. मतमोजणी संपूर्ण पार पडली नसली, तरी भाजपची शंभरीच्या आसपासच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा निकाल सर्वांनाच चकीत करणारा आहे.

निवडणुकीत कलम ३७० चा ज्यापद्धतीने मारा करण्यात आला. तसाच तेल लावलेला पैलवान कोण? राज्य सहकारी बँ केतील घोटाळ्यानंतर जो ईडीचा खेळ झाला त्यावरूनही बरेच राजकारण तापले. राष्ट्रवादीचे दस्तुरखुद्द शरद पवार यांनाच ईडीकडून नोटीस आल्यानंतर राज्यातील वातावरण पूर्णतः ढवळून निघाले.

कोथरूड मधून अवघ्या 25 हजार मतांनी चंद्रकांत दादा विजयी

0

पुणे : राज्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे चंद्रकांत पाटील 25 हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात मनसेच्या किशोर शिंदेंनी कडवी लढत दिली. घासून झालेल्या लढतीत पाटलांचा विजय झाला. चंद्रकांत पाटील यांना 1 लाख 4 हजार मतं मिळाली, तर किशोर शिंदेंना 79 हजार मतं मिळाली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील शेवटच्या क्षणी कोथरूड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. सर्व प्रमुख विरोधी पक्षांनीही या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला. मात्र किशोर शिंदे तरीही त्यांचा एवढा भक्कम विरोध करू शकतील असे कोणाला वाटत नव्हते , भाजपचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या या मतदारसंघात चंद्रकांत दादा मोठ्ठे मताधिक्य घेऊन विजयी होतील असेच सर्वांना वाटत होते . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा पुण्यात झाली. मोदी यांची सभा मुख्यत्वे पाटील यांच्यासाठी झाली. पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षाची केंद्राची व राज्याची यंत्रणाही कामाला लागली होती. शहरातील भाजपची सर्व यंत्रणा या भागात दिवसरात्र प्रचारात होती. पाटील यांच्यासाठी खासदार गिरीश बापट यांनी मतदारसंघात तळ ठोकला होता.  या सर्व बाबींचा विचार करता किशोर शिंदे यांना  खूपच चांगली मते मिळाली .

अन तापकीरांनी अखेरीस असमान दाखविले

0

पुणे-हवेत रहाणे ,अविर्भावात वागणे अशा स्वभावाने यशा पर्यंत पोहोचलेल्या आपल्या प्रतिस्पर्धी भाजपच्या भीमराव तापकीरांनी अखेरीस अस्मान दाखविले .आणि जवळ जवळ ‘हारी हुई बाजी ‘ जिंकून दाखवीत , निकराची झुंज देत तापकीरांनी हि विजयाची माला प्राप्त केली  आहे.  खडकवासल्यात शेवटपर्यंत राष्ट्रवादीचे उमेदवार, नगरसेवक सचिन दोडके आणि आमदार भिमराव तापकीर यांच्यात विजयासाठी झुंज पाहायला मिळाली. अखेर तापकीर यांनी 2100 मतांनी विजय मिळविला. तापकीर यांना 1 लाख 18 हजार 627, सचिन दोडके यांना 1 लाख 16 हजार 512 मते मिळाली. दरम्यान, दोडके यांनी मतमोजणी होण्यापूर्वीच मतदारसंघांत विजयाचे बॅनर्स मोठ्या प्रमाणात झळकविले होते. त्यामुळे खमंग चर्चांना उत आला होता. तर, आज दोडके यांचा केवळ 2100 मतांनी पराभव झाला . अगदी हारलेली बाजी तापकीरांनी जिंकून कशी नेली हे शेवटपर्यंत त्यांना समजेनासे झाले .

पंकजा मुंडेंचा दारुण पराभव

0

परळी – राज्याचे लक्ष लागून असलेल्या परळी मतदारसंघात पंकजा मुंडेंचा धक्कादायक पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार धनंजय मुंडें यांनी 30 हजार मतांच्या फरकाने पंकजा मुंडेंना पराभूत करत भाजपचा गड आपल्या काबीज केला आहे. यावरून परळीच्या जनतेने पंकजा मुंडेना नाकारल्याचे दिसून आले.

एकीकडे आनंद आहे तर दुसरीकडे मनात खंत आहे – धनंजय मुंडे

परळी मतदारसंघातील जनतेचे मनापासून आभार. एकीकडे आनंद आहे तर दुसरीकडे मनात खंत आहे. त्यांनी जरी मला घरातील व्यक्ती मानले नसले तरी मी त्यांनी आपले मानतो. विरोधी पक्षात असताना 5 वर्षांत जनतेची प्रश्न मांडता आली आणि सोडवता आली आता पुढे आणखी काम करणार असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यानी दिली. दरम्यान आज मला परळी मतदारसंघात विजयी गुलाल लागला. पण हे पाहायला आमचे आण्णा नाहीत. म्हणत धनंजय.मुंडे भावूक झाले.

पराभवाची जबाबदारी स्वीकारते – पंकजा मुंडे

जनतेचा कौल मी स्विकारला. लोकांनी का नाकारलं याचा अभ्यास करणार. माझ्यासाठी हा निकाल अनाकलनीय. पराभवाची जबाबदारी मी स्वीकारते. मी सभा घेतल्या तिथले उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर. कार्यकर्त्यांनी शांत रहावं. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

दरम्यान बीड शहरात काका-पुतण्याच्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला.

बारामतीत घुसण्याचा भाजपचा प्रयत्न फसला, गोपीचंद पडळकरांसह सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

0

बारामती- काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा गड असलेल्या बारामतीत भाजपला शिरकाव करायचा होता. पण, त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला आहे. अजित पवारांनी भाजपचे आव्हान मोडीत काढत मोठा विजय मिळवला. एवढच नाही तर, अजित पवारांच्याविरोधातील गोपीचंद पडळकरांसोबत सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट देखील जप्त झाले आहे. निवडणुकीत अजित पवारांना तब्बल 182200 मते मिळाली, तर गोपीचंद पडळकरांना 27404 मते मिळाली.

भाजपने अजित पवारांना त्यांच्या गडामध्ये घेरण्याचा प्रयत्न केला होता. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी अजित पवारांचा पराभव करणार असल्याचे विधान केले होते. त्यानंतर अजित पवारांनीही हे आव्हान स्वीकारत चंद्रकांत पाटलांसह सर्वांचेच बारामतीत लढण्यासाठी स्वागत केले होते. तसेच बारामतीतून 1 लाख मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला होता. तो या निकालातून खरा ठरला आहे.

हडपसर मध्ये पाटीलकीच ..चेतन तुपे पाटलांचा विजय (व्हिडीओ)

0

पुणे- महापालिकेत विरोधीपक्षनेता म्हणून खऱ्या अर्थाने कारकीर्द गाजवली …आणि त्याचे परिणाम या विधानसभेत जाणवले असे म्हणता येईल किंवा मनसे च्या वसंत मोरे यांनी उठविलेले टिळेकर यांच्या घोटाळ्याविरूद्धचे काहूर यांच्या पथ्यावर पडले ..या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा  लाभ झाला असे म्हणता येईल ..काहीही म्हणा …पण हडपसर ला खासदारकी दिलेल्या विठ्ठल पाटलांचे सुपुत्र चेतन पाटील यांचे आमदारकीचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे .हडपसर मतदार संघातून राष्ट्रवादी चे उमेदवार चेतन तुपे यांचा विजय झाला आहे . शरद पवार ,अमोल कोल्हे यांच्या भाषणांनी त्यांच्या विजयाला हाथभार लावला असे हि म्हणता येणार आहे.

भाजपच्या विद्यमान आमदारांच्या  कारस्थानांचा गेली ५ वर्षे पर्दाफाश करण्यात येत होता त्यात  मनसेच्या वसंत मोरेंची आघाडी असली तरी प्रत्यक्षात ते मतदानात आघाडी घेवू शकले नाहीत आणि चेतन पाटलांनी मात्र सत्ताधाऱ्यांच्या कारस्थानी वृत्ती विरोधा सह सार्वजनिक सुविधांसाठी  घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे विजयी टप्पा प्राप्त करणे त्यांना प्राप्त झाले .

हडपसर मतदार संघ

1. चेतन विठ्ठल तुपे (राष्ट्रवादी) – 92326 मते – विजयी झालेले उमेदवार
2. दिपक महादेव जाधव (बहुजन समाज पार्टी) – 1223 मते
3. योगेश कुंडलिक टिळेकर (भाजप) – 89506 मते
4. वसंत कृष्णा मोरे (मनसे) – 34809 मते
5. कृपाल कृष्णराव पलुसकर (प्रबुध्द रिपब्लिकन पार्टी) – 698 मते
6. घनशाम आनंद हाके (वंचित) – 7570 मते
7. जिहाद इब्राहिम शेख (एमआयएम)- 7901 मते
8. अंजुम झकेरिया इनामदार (अपक्ष) – 367 मते
9. अनुप जालिंदर शिंदे (अपक्ष) – 164 मते
10. अर्जुन लक्ष्मण सिरसाठ (अपक्ष) – 230 मते
11. अ‍ॅड. मोहम्मद जमिर शेख (अपक्ष) – 228 मते
12. अ‍ॅड. तोसिफ शेख (अपक्ष) – 164 मते
13. रेखा हाकरू वाल्मिकी (अपक्ष) – 256 मते
14. सुभाष काशिनाथ सरवदे (अपक्ष) – 253 मते
15. नोटा – 2474

टीप – मतदानाची आकडेवारी ही निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीवरून देण्यात आली आहे.

अन, महापौर झाल्या आमदार ..(व्हिडिओ)

0

पुणे- कॉंग्रेसचे अरविंद शिंदे आणि शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल धनवडे ,मनसे चे अजय शिंदे अशा तिघांचा सामना एकटीने करत भाजपच्या उमेदवार आणि पुण्याच्या महापौर पदावर गेली  तब्बल अडीच वर्षे आणि आजही असलेल्या महापौर मुक्ता टिळक यांनी कसब्याचा बालेकिल्ला सहजगत्या जिंकून घेत आपले आमदारकी चे स्वप्न देखील अगदी लीलया पूर्ण केल्याचे स्पष्ट झाले आहे. कसब्यात राज ठाकरे यांनी जरी सभा घेतली असली तरी  त्यांचा विजय होणार  होता तसा तो झाला आहे.

कसबा मतदार संघ –
1. अजय शिंदे (मनसे) – 8284
2. अरविंद शिंदे (काँग्रेस) – 47296
3. मुक्ता शैलेश टिळक (भाजप) – 75492
4. तोसिफ अब्बास शेख (संभाजी ब्रिगेड) – 594
5. अल्ताफ करिम शेख (अपक्ष) – 196
6. धनावडे विशाल गोरख (अपक्ष) -13989
7. नवनाथ गेनुभाऊ रणदिवे (अपक्ष) – 161
8. नाईक स्वप्नील अरूण (अपक्ष) -146
9. युवराज भुजबळ (अपक्ष) – 1072
10. राजेश सिसराम जान्नू (अपक्ष) -307
11. नोटा – 2528

एकुण मतदान 150069

विजयानंतर माध्यमांशी बोलताना पहा त्या काय म्हणाल्या ….

ईव्हीएम सीलबंद नसल्याने कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये काहीवेळ गोंधळ ; पोलिसांना केले पाचारण

0

पुणे : दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू असताना कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील एक ईव्हीएम मशीन सीलबंद नसल्याने सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनतर आता मतमोजणी काहिकाळासाठी थांबवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा मतमोजणी सुरु झाली आहे .

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील मतमोजणीला सकाळीच सुरुवात झाली. कॅन्टोन्मेंट मतदार संघाची पहिली फेरी पार पडल्यानंतर दुसऱ्या फेरीच्या सुरुवातीला 14 क्रमांकाच्या टेबलवरिल ईव्हीएम मशीन सीलबंद नसल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने काँग्रेस आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. व्हीव्हीपॅट मशीन मधील मतांची आधी मोजणी करावी आणि नंतरच ईव्हीएम मशीन ला हात लावावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

ईव्हीएम मशीन सीलबंद करायची राहिली असेल असे कारण अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. परंतु कार्यकर्त्यांनी जोपर्यंत लेखी मिळत नाही तोपर्यंत मतमोजणी थांबवण्याची मागणी केली. आता या मतदारसंघाची मतमोजणी थांबवण्यात अली आहे. दरम्यान मतमोजणी ठिकाणचा गोंधळ पाहता पोलिसांना पाचारण करण्यात आले.

दरम्यान कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पाहिल्याफेरी मध्ये भाजपचे सुनील कांबळे आघाडीवर आहेत.

पंकजा मुंडे,उदयनराजे पिछाडीवर …LIVE अपडेट

0
  • मुक्ताईनगर : 11 व्या फेरी अखेर रोहिणी खडसें याना 1323 चे मताधिक्य
  • जामनेर: गिरीश महाजन दहाव्या फेरीअखेर 18489 मतांची आघाडी
  • लातूर आघाडी

    लातूर शहर – अमित देशमुख (कॉग्रेस) लातूर ग्रामीण- धीरज देशमुख (कॉग्रेस औसा – अभिमन्यू पवार ( भाजप) निलंगा – संभाजी पाटील ( भाजप) अहमदपूर – बाबासाहेब पाटील ( राष्ट्रवादी) उदगीर – संजय बनसोडे ( राष्ट्रवादी)

  • परभणीत शिवसेनेचे डॉक्टर राहुल पाटील 32 हजार 965 मतांनी आघाडीवर. एकही विरोधक चार हजाराचा आकडा पार करू शकलेला नाही.
  • भोकर मतदार संघातून अशोक चव्हाणांनी घेतली 50 हजार मतांची आघाडी
  • भोकरदनमध्ये पाऊस, 8 व्या फेरी अखेर भाजपचे, संतोष दानवे 11747 मतांनी आघाडीवर
  • संगमनेरमधून बाळासाहेब थोरात आघाडीवर
  • जळगाव शहरात भाजपचे सुरेश भोळे 13 वी फेरी 30343 चा लीड
  • कोथरुडमधील यादी क्रमांक 127, राजा शिवराय प्रतिष्ठाण येथील एका EVM मशिनचा नंबर वेगळा असल्याची हरकत मनसेने घेतली आहे. त्यामुळे या एका टेबलवरील मतमोजणी थांबवली आहे.
  • महायुतीची 177 जागांवर तर आघाडी 89 जागांवर पुढे
  • औरंगाबाद पूर्व एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी 30 हजार मतांनी आघाडीवर, अतुल सावेंना हजारापेक्षा कमी मते
  • औरंगाबाद मध्य येथून प्रदीप जैसवाल 16,619 मतांनी आघाडीवर…
  • पूर्व औरंगाबादमधून एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी 16 हजार मतांनी पुढे
  • भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण 17 हजार मतांनी आघाडीवर
  • कोथरुड मतदारसंघातील मतमोजणी निवडणूक अधिकाऱ्यांनी थांबवली, ईव्हीएमचा नंबर आढळला वेगळा, मनसे उमेदवाराने घेतला होता आक्षेपपरळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे ९व्या फेरीअखेर ९५४० मतांनी आघाडीवर, भाजपच्या पंकजा मुंडे पिछाडीवर

    सातारा लोकसभा मतदारसंघ: भाजपचे उदयनराजे भोसले ३५ हजार मतांनी पिछाडीवर

    वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे आदित्य ठाकरे आघाडीवर
    भोकर मतदारसंघातून काँग्रेसचे अशोक चव्हाण आघाडीवर

    मलबारहिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा आघाडीवर

    तासगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन पाटील आघाडीवर

    मुंब्रा-कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आघाडीवर
    बल्लारपूर मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार आघाडीवर
    ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक आघाडीवर

    सिन्नरमधून माणिकराव कोकाटे आघाडीवर

    अचलपूरमधून बच्चू कडू आघाडीवर

    कोथरूडमधून भाजपचे चंद्रकांत पाटील आघाडीवर

    सोलापूर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे पिछाडीवर

  • परभणीत शिवसेनेचे डॉक्टर राहुल पाटील 32 हजार 965 मतांनी आघाडीवर. एकही विरोधक चार हजाराचा आकडा पार करू शकलेला नाही.
  • भोकर मतदार संघातून अशोक चव्हाणांनी घेतली 50 हजार मतांची आघाडी
  • भोकरदनमध्ये पाऊस, 8 व्या फेरी अखेर भाजपचे, संतोष दानवे 11747 मतांनी आघाडीवर
  • संगमनेरमधून बाळासाहेब थोरात आघाडीवर
  • जळगाव शहरात भाजपचे सुरेश भोळे 13 वी फेरी 30343 चा लीड
  • कोथरुडमधील यादी क्रमांक 127, राजा शिवराय प्रतिष्ठाण येथील एका EVM मशिनचा नंबर वेगळा असल्याची हरकत मनसेने घेतली आहे. त्यामुळे या एका टेबलवरील मतमोजणी थांबवली आहे.
  • महायुतीची 177 जागांवर तर आघाडी 89 जागांवर पुढे
  • औरंगाबाद पूर्व एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी 30 हजार मतांनी आघाडीवर, अतुल सावेंना हजारापेक्षा कमी मते
  • औरंगाबाद मध्य येथून प्रदीप जैसवाल 16,619 मतांनी आघाडीवर…
  • पूर्व औरंगाबादमधून एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी 16 हजार मतांनी पुढे
  • भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण 17 हजार मतांनी आघाडीवर
  • फुलंब्री औरंगाबादेत हरिभाऊ बागडेंना 5317, तर कल्याण काळेंना 3311
  • जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे गुलाबराव पाटील 6 व्या फेरी अखेर 13294 ने आघाडीवर
  • पुणेः आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून पहिल्या फेरीत दिलीप वळसे-पाटील यांनी आघाडी घेतली आहे त्यांना 3198 मिळाली आहे ती विरोधी शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांना 391 मते मिळाली आहेत.

विधानसभा :- पुणे अपडेट ..LIVE

0

पुणे- मतमोजणी ची प्रारंभिक हि काही क्षण चित्रे

कोथरूड मतदार संघ
एकूण मतदान 194969
भाजप – चंद्रकांत पाटील – 20028 – आघाडीवर
मनसे – किशोर शिंदे – 9942

हडपसर मतदार संघ (सहावी फेरी)
भाजप – योगेश टिळेकर – 26944 – आघाडीवर
राष्ट्रवादी – चेतन तुपे – 24640
मनसे – वसंत मोरे – 4657

– पुण्यात भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर

– कोथरुडमधून भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील आघाडीवर

कसब्यातुन भाजपच्या मुक्ता टिळक चौथी फेरी 11 हजार मतांनी आघाडीवर

कॅन्टोनमेंट मतदार संघ
भाजप – सुनील कांबळे – 2332
काँग्रेस – रमेश बागवे – 2048

कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी पहिल्या फेरीनंतर थांबवण्यात आली आहे. काही इव्हीएम मशीन सील नसल्याने कॉंग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे इथली मतमोजणी थांबवण्यात आली आहे.

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. त्यातच पुण्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता इथल्या कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी थांबवण्यात आली आहे.

हडपसर विधानसभा मतदार संघ सहावी फेरी
खडकवासला विधानसभा मतदार संघ ५ वी फेरी

शिवाजीनगर मतदार संघ (पाचवी फेरी)
एकूण मतदान 134335
भाजप – सिद्धार्थ शिरोळे – 14719 – आघाडी
काँग्रेस – दत्ता बहिरट – 12229 –

खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सचिन दोडके 5821 मतांनी आघाडीवर आहे. विद्यमान आमदार भिमराव तापकीर यांना धक्का देत दोडकेंनी आघाडी मिळवी आहे.

मतदारसंघ : खडकवासला

मतमोजणी फेरी : 8

भीमराव तापकीर (भाजप) : 37957

सचिन दोडके ( राष्ट्रवादी ) : 43778

यांना मिळालेले मताधिक्य : 5821

भाजपचे आमदार भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नगरसेवक सचिन दोडके यांच्यात खडकवासला मतदारसंघात थेट लढत होत आहे.

१९५ जुन्नर विधानसभा मतदार संघ निवडणूक अपडेट

9वी फेरी एकुण मते
*शरद सोनावणे सेना 22590
*अतुल बेनके राष्ट्रवादी 25586
*आशाताई बूचके*14807
9फेरीत राष्ट्रवादी कॉग्रेस चे अतुल बेनके मतांनी2996 आघाडीवर

खडकवासला १५ वी फेरी

भीमराव तापकीरांची मुसंडी

खडकवासला मतदार संघ (सोळावी फेरी)
एकूण मतदान 250071
भाजप – भीमराव तापकीर – 83852 आघाडी

राष्ट्रवादी – सचिन दोडके – 77385

खडकवासला मतदार संघ (19 वी फेरी)
एकूण मतदान 250071
भाजप – भीमराव तापकीर – 97558 आघाडी
राष्ट्रवादी – सचिन दोडके – 96481

 

हडपसर 14 वी फेरी

 

शिवाजीनगर मतदार संघ
एकूण मतदान 51550
भाजप – सिद्धार्थ शिरोळे – 22,423 (आघाडी)
काँग्रेस – दत्ता बहिरट – 19, 581

शिरोळे २ हजार ८४२ मतांनी आघाडीवर

 

जुन्नर विधानसभा मतदार संघ निवडणूक अपडेट
10वी फेरी एकुण मते

*अतुल बेनके राष्ट्रवादी 28309
शरद सोनवणे सेना 24352
*आशाताई बूचके*17078
10फेरीत राष्ट्रवादी कॉग्रेस चे अतुल बेनके मतांनी3957 आघाडीवर